‘गांधीजींची पुनर्भेट’ विशेषांकाचे बुधवारी प्रकाशन
पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७१व्या पुण्यतिथीनिमित्त ‘गांधीजींची पुनर्भेट’ या विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले आहे. बुधवार, दि. ३० जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११.१५ वाजता कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात होणार आहे. एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, लोकशाहीसाठी समंजस संवाद व डेमोक्रॅटिक पब्लिकेशन नेटवर्क आणि गांधी व्हिजन फिचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेषांक प्रकाशित होत आहे.
कोल्हापूर येथील ज्येष्ठ विचारवंत-साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे व ग्रॅव्हिटास फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांच्या हस्ते ‘गांधीजींची पुनर्भेट’ या विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, तर प्राचार्या डॉ. कमलादेवी आवटे व बार्शी येथील प्रा. रुपाली नारकर यांची विशेष उपस्थिती असणार आहेत, असे लोकशाहीसाठी समंजस संवादचे संपादक अरुण खोरे, डॉ. विकास आबनावे व इतर संयोजकांनी कळविले आहे.