महिलांना केंद्रस्थानी ठेवून मोदी सरकारच्या योजना-विजया रहाटकर
राष्ट्रवादी काँग्रेस हा जातीयवादी पक्ष-गिरीश बापट
गरीबांच्या ताेंडचा घास हिसकावणाऱ्या गिरीश बापट यांना मतदान करु नका : बाबा आढाव
पुणे : नीरव मोदी, विजय मल्ल्या यांना केलेले सहाय्य, नोटबंदी, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), राफेल घोटाळा यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका सामान्य लोकांच्या गळ्यात धोंडा बांधण्याची असल्याची दिसून येते. तर, भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) उमेदवार गिरीश बापट यांनी सत्तेवर आल्यावर कष्टकऱ्यांच्या विरोधातच भूमिका घेतली. त्यामुळे गरीबांच्या तोंडचा घास हिसकवणाऱ्या भाजपाला आणि गिरीश बापट यांना मतदान करु नका असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. कोणत्याही उमेदवाराच्या आणि पक्षाच्या विरोधी मतदान करण्याचे जाहीर आवाहन करण्याची आढावांची ही पहिलीच वेळ आहे.
रिक्षा पंचायतीचे रावसाहेब कदम, हनुमंत बहिरट, गोरख मेंगडे यावेळी उपस्थित होते. डॉ. आढाव म्हणाले, अन्नधान्य वितरण मंत्री झाल्यानंतर बापट यांनी ‘कष्टाची भाकर’चे रेशनिंग धान्य बंद करण्याचे काम केले. याबाबत त्यांना विनंती केल्यावर त्यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखविले. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतल्यावर राज्य सरकारला तसा आदेश दिला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बापट तोंडघशी पडले. त्यानंतरही धान्य सुरु झालेच नाही. परिणामी कष्टाची भाकर दुप्पटीहून अधिक महागली. महात्माफुले समता परिषदेला टिंबर मार्केट येथील १५ हजार चौरसफूट जागा महानगरपालिकेने मंजुर केली होती. त्यातही बापट यांनी खोडा घातला. शेतकºयांना हमीभाव मिळावा यासाठी केलेल्या आंदोलनावेळी मुख्यमंत्र्यांशी बैठकीचे आश्वासन त्यांनी ऑक्टोबर २०१७ रोजी दिले होते. मात्र, ती बैठक कधी झालीच नाही. कष्टकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या आणि फसव्या बापटांना पुणेकरांनी मतदान करु नये.
केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षा कायदा करण्याचे जाहीर केले. त्याला छत्री कायदा असे नाव दिले. मात्र, सामाजिक सुरक्षेची ही छत्री कधी उघडलीच नाही. मोदींच्या काळामध्ये बेरोजगारीमध्ये वाढ झाली. देशांतर्गत आणि सीमेवरील ताणावात वाढला. लोकशाहीचा संकोच, शेतकरी आणि कामगारांची धुळधाण करणारे धोरण राबविण्यात आले. त्यामुळे कामगार आणि शेतमजुरांचे जीवनमान घातक पातळीवर आले आहे. उलट या सरकारच्या काळात धार्मिक ध्रुवीकरणाचे काम झाल्याची टीका डॉ. आढाव यांनी केले.
बैलगाडीत बसुन बापटांच्या प्रचारफेरीची सुरुवात ..
गायिका सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट मराठीनंतर आता हिंदीत
गानसरस्वती लता मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी आशा भोसले ह्यांच्या सदाबहार गाण्यांची मैफल म्हणजे लताशा. हा कार्यक्रम सुमधूर गळ्याची गायिका सावनी रविंद्र गेली पाच वर्ष करत आहे. अमिट गोडीची मराठी गीते ह्यातून कानसेनांना ऐकायला मिळत असतात. आता पाच यशस्वी वर्षांनंतर लोकाग्रहास्तव सावनी ही क़न्सर्ट हिंदीमधून घेऊन आलीय.
सूत्रांच्या अनुसार, सावनीचा मंगेशकर कुटूंबीयांशी खूप पूर्वीपासून ऋणानुबंध आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर हे तिचे गुरू आहेत. त्यामूळे लतादीदी आणि आशाताईंची गाणी आणि त्यांचा अंदाज जणू सावनीच्या रक्तातच भिनलाय. लताशा मराठी कॉन्सर्ट्सना तर पंडित हृदयनाथ मंगेशकरही असतात. त्यामूळे तर कानसेनांसाठी पर्वणीच असते.
गायिका सावनी रविंद्र म्हणते, “गेली पाच वर्ष लताशा मराठीत करताना, अनेकजण मला लतादीदी आणि आशाताईंच्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम करावा, अशी मागणी करत होती. मग मी बाबा(पंडित हृदयनाथ मंगेशकर ) ह्यांच्या परवानगीने आणि त्यांच्या आशिर्वादाने हिंदी कार्यक्रम सुरू करायचे ठरवले. आणि पहिले दोन कार्यक्रम पूण्यात केले. तिथल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादानंतर मुंबईतल्या रसिकांसमोर कार्यक्रम सादर करायचा आत्मविश्वास आला. आणि मग आता 26 एप्रिलला दिनानाथ मंगेशकर सभागृहात हा कार्यक्रम आम्ही करत आहोत.”
कार्यक्रमाची खासियत सावनी सांगते, “ 20 वादकांच्या संचासह हा कार्यक्रम मी करत आहे. ह्या कार्यक्रमातून दीदी आणि ताईंनी भक्तीगीतांपासून अगदी कॅब्रेपर्यंत गायलेली गाणी आणि त्यांचे किस्से तुम्हांला ऐकायला मिळतील.”
डिजिटल व्यवहारांसह भारतातील आर्थिक सायबरगुन्हे व आयडेंटिटी थेफ्टमध्येही वाढ-एफआयएस पेस रिपोर्टचा निष्कर्ष
| महत्त्वाचे निष्कर्ष | · आर्थिक घोटाळ्यांचा अनुभव :वार्षिक दुपटीने वाढून 37 टक्के झाल्याचे 2019 एफआयएस पेस अहवालात आढळले
· 27-37 वर्षे वयोगटातील निम्म्या ग्राहकांनी गेल्या वर्षी घोटाळ्याचा अनुभव घेतला · गेल्या वर्षी घोटाळ्यांचे बळी ठरलेले 96 टक्के ग्राहक नुकतेच मोबाइल अॅप्सकडे वळले होते |
नवी दिल्ली : एफआयएस™ (NYSE: एफआयएस) या वित्तीय सेवा तंत्रज्ञानातील आघाडीच्या कंपनीने आज जाहीर केलेल्या नव्या संशोधनामध्ये, गेल्या वर्षापासून आर्थिक घोटाळे लक्षणीय वाढले असल्याचे व त्यांचा बळी ठरणाऱ्यांचे प्रमाण दुपटीने, म्हणजे 37 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे, तसेच सर्व वयोगटातील ग्राहक घोटाळेखोरांच्या जाळ्यात अडकत असल्याचे निदर्शनात आले आहे. 27 ते 37 वर्षे वयोगटातील व्यक्तींना अन्य वयोगटाच्या तुलनेत आर्थिक घोटाळ्यांचा अधिक फटका बसला आहे.
भारतीयांनी डिजिटल व्यवहार स्वीकारले आहेत, परंतु सोशल इंजिनीअरिंग व फिशिंग ईमेल मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने, वैयक्तिक माहिती देण्याबाबत काय पथ्ये पाळावीत, हे अद्याप त्यांच्या लक्षात यायचे आहे, असेएफआयएसच्या पाचव्या वार्षिक पेस अहवालात स्पष्ट झाले आहे.
भारतात मोबाइल अॅप्स, डिजिटल पेमेंटचा वढता स्वीकार आणि आर्थिक घोटाळ्यांचे वाढते प्रमाण, यांचा कमालीचा सहसंबंध आहे. गेल्या वर्षात आर्थिक घोटाळ्यांचा फटका बसलेले 96 टक्के भारतीय ग्राहक पेमेंट करण्यासाठी नुकतेच रोख रकमेकडून मोबाइल अॅप व डिजिटल पेमेंटकडे वळले होते. यामुळे देशाच्या आर्थिक एकात्मिकरणाच्या प्रयत्नांवर लक्षणीय परिणाम होतो.
“सध्याच्या डिजिटल बँकिंग क्षेत्रात, बँकांनी सुरक्षा, घोटाळे रोखणे व ग्राहक शिक्षण यासाठी गुंतवणुकीचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. यामुळे विश्वासार्हता वाढण्यासाठीही मदत होईल आणि ग्राहक बँकिंग करत असताना यास सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. ग्राहकांनी त्यांच्या बँकेवर ठेवलेला विश्वास केवळ भावना नसून, तो विविध अपेक्षांवर आधारित असणारा निर्णय असतो. परंतु, बँकांनी व्यवहार सुरक्षित होण्यावर, घोटाळे रोखण्यावर व वैयक्तिक माहिती गुप्त राखण्यावर भर दिला तरच त्या ग्राहकांचा विश्वास संपादित करू शकतील,” असे भारतातील एफआयएसटे व्यवस्थापकीय संचालक रामस्वामी व्येंकटचलम यांनी सांगितले.
अहवालातील अन्य ठळक निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत:
-मोबाइल अॅप्समुळे वापर व नावीन्य यांना चालना
वैयक्तिक स्वरूपाची सेवा देण्यासाठी व ग्राहकांना सहभागी करून घेण्यासाठी बँकेच्या शाखा हे आता एकमेव माध्यम राहिलेले नाही. मोबाइल अॅप्स अते अनेक बँकांचा डिजिटल “चेहरा” ठरू लागले आहेत आणि आता विक्रमी 41 टक्के व्यवहार मोबाइलद्वारे केले जातात. बँकिंग सेवांसाठी सर्व वयोगटांमध्ये मोबाइलचा वापर केला जातो. आगामी काळाचा विचार करता, बँकांनी पासवर्ड-मुक्त व बायोमेट्रिक-आधारित, व्हॉइस बँकिंग व वॉलेट बँकिंग सुरू करावे, अशी भारतीय ग्राहकांची अपेक्षा आहे. 10 पैकी 9 भारतीय ग्राहकांना त्यांच्या पीएफआयद्वारे सोशल मीडियामध्ये सहभागी होण्याची इच्छा असते.
मोबाइल पेमेंट आता अधिक लोकप्रिय
पैसे देण्यासाठी रोख रक्कम व कार्ड यांना अजूनही पसंती दिली जात असली तरी मोबाइल पेमेंटचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे, प्रामुख्याने बँकांचे मुख्य ग्राहक असणाऱ्या तरुण वर्गामध्ये ते अधिक दिसून येते. मोबाइल पेमेंट अवलंबण्याच्या बाबतीत भारताने अमेरिका, यूके व जर्मनी यांना बरेच मागे टाकले आहे. सोय व युजर-फ्रेंडली इंटरफेस, तसेच सातत्याने सुधारणारी, कमी खर्चिक मोबाइल डाटा कनेक्टिविटी व मर्चंटकडून स्वीकार यामुळे मोबाइल पेमेंटची लोकप्रियता वाढते आहे. कॅश बॅक व अन्य सवलती देणाऱ्या मोबाइल वॉलेटचे अवलंब करण्याचे प्रमाणही वाढते आहे. मर्चंटसाठी यूपीआय 2.0 वरदान ठरत आहे, कारण त्यामुळे ओव्हरड्रीफ्ट अकाउंट व पेमेंटपूर्ण इनव्हॉइसचे व्हेरिफिकेशन या बाबतीत मदत होत आहे, लहाम व मध्यम कंपन्यांच्या श्रेणीमध्येही मोबाइल पेमेंट पसंतीची ठरू लागली आहेत.
ग्राहकांच्या समाधानाच्या बाबतीत सार्वजनिक बँका आघाडीवर
आघाडीच्या 50 बँका व खासगी बँकांचे ग्राहक 2018 च्या तुलनेत कमी समाधानी होते. परंतु, साधारणतः संथपणे प्रतिसाद देणाऱ्या समजल्या जाणाऱ्या सार्वजनिक बँकांनी खराब कामगिरी करणाऱ्या ते उत्कृष्ट अशी झेप घेत,“अत्यंत समाधानी” ग्राहक हा टप्पा साध्य केला. नावीन्य हे विशिष्ट बँकांपुरते मर्यादित नाही, हे स्पष्ट आहे. अंदाजे 28 टक्के तरुण वर्ग (18-26) व 35 टक्के वयस्क ग्राहक (53+) त्यांच्या बँकांबाबत समाधानी नाहीत.
एफआयएसविषयी
एफआयएस वित्तीय सेवा तंत्रज्ञानातील जागतिक स्तरावरील आघाडीची कंपनी असून ती रिटेल व संस्थात्मक बँकिंग, पेमेंट, संपत्ती व मालमत्ता व्यवस्थापन, जोखीम व अनुपालन आणि आउटसोर्सिंग सोल्यूशन यावर भर देते. आमच्या सर्व सेवा, जागतिक क्षमता व डोमेनमधील कौशल्य याद्वारे एफआयएस 130 हून अधिक देशांतील20,000 हून अधिक ग्राहकांना सेवा देते. जॅक्सनव्हिले येथे मुख्यालय असणाऱ्या एफआयएसचे जगभर 47,000कर्मचारी आहेत आणि कंपनी पेमेंट प्रोसेसिंग, फायनान्शिअल सॉफ्टवेअर व बँकिंग सोल्यूशन यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे. वित्तीय क्षेत्राला सबल करेल, असे तंत्रज्ञानाचे आउटसोर्सिंग, सॉफ्टवेअर व सेवा देणारी एफआयएस ही फोर्च्युन 500 कंपनी आहे आणि स्टँडर्ड अँड पोरच्या 500® निर्देशांकाची सदस्य आहे
नवे वाहन विकसीत करण्यासाठी महिंद्र व फोर्ड यांचा सामंजस्य करार
- उत्पादनाच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याचा दोन्ही कंपन्यांमध्ये धोरणात्मक करार
- नवी मध्यम आकाराची एसयूव्ही विकसीत होणार महिंद्राच्या वाहनांच्या धर्तीवर आणि ’पॉवरट्रेन’वर
महिंद्रा समूह आणि फोर्ड मोटर कंपनीने भारतात आपली धोरणात्मक भागिदारी आणखी बळकट करण्याचे ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून या दोन्ही कंपन्या एक मध्यम आकाराचे नवे स्पोर्ट युटिलिटी वाहन संयुक्तरित्या विकसीत करणार आहेत. याबाबतचा करार उभय कंपन्यांनी नुकताच केला.
या करारान्वये दोन्ही कंपन्या भारत व अन्य उदयोन्मुख देशांसाठी मापदंड ठरणारे एक विशेष वाहन विकसीत करणार आहेत. महिंद्र आणि फोर्ड यांच्यात हे धोरणात्मक सहकार्य सप्टेंबर 2017 पासूनच सुरू झाले. ’पॉवरट्रेन शेअरींग’ची आणि ’कनेक्टेड कार सोल्युशन्स’ काढण्याची घोषणा ऑक्टोबर 2018 मध्ये त्यांनी केली होती. हेच त्यांचे आपसातील सहकार्य नव्या कराराने अधिक बळकट झाले आहे.
नवीन मिड-साईझ स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (सी-एसयूव्ही) मध्ये महिंद्रचे सध्याचे उत्पादन प्लॅटफॉर्म आणि पॉवरट्रेन असेल. त्याद्वारे वाहनाची अभियांत्रिकी आणि व्यावसायिक कार्यक्षमता वाढविण्यात येणार आहे.
’महिंद्र अन्ड महिंद्र लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोयंका म्हणाले, “आम्ही केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीमुळे आणि 2017 मध्ये फोर्डबरोबरच्या आमच्या धोरणात्मक भागिदारीच्या घोषणेनंतर निर्माण झालेल्या सृजनशीलतेमुळे मला खूप आनंद झाला आहे. आजच्या घोषणेमध्ये आमच्या दोघांच्या सहकार्याचे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. दोन्ही कंपन्या अनेक क्षेत्रांमध्ये संयुक्त विकासासाठी एकत्र आलेल्या असून यापुढेही एकसमान प्लॅटफॉर्मचा वापर करुन उत्पादनांचा विकास करण्यासाठी एकत्र कार्य करत राहतील. यामुळे उत्पादन विकास खर्च कमी होईल आणि दोन्ही कंपन्यांचा आर्थिक फायदा होईल.”
फोर्ड कंपनीच्या नवीन व्यवसाय, तंत्रज्ञान व धोरण विभागाचे अध्यक्ष जिम फर्ली या प्रसंगी म्हणाले, ’’आजच्या नव्या कराराच्या घोषणेमुळे आम्ही महिंद्राबरोबरची आमची चालू भागीदारी मजबूत करीत आहोत. तसेच भारतासारख्या महत्त्वपूर्ण उदयोन्मुख बाजारपेठेत आमची स्पर्धात्मकताही वाढवीत आहोत. “फोर्ड’चे तांत्रिक नेतृत्व आणि ’महिंद्र’चे कार्यान्वयाचे व उत्पादनाचे यशस्वी ठरणारे कौशल्य यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रितपणे एक वाहन विकसीत करण्यात येत आहे, जे भारतीय ग्राहक तसेच इतर उदयोन्मुख बाजारपेठांच्या अपेक्षा पूर्ण करेल.”
धोरणात्मक भागिदारीमुळे दोन्ही कंपन्यांची स्वतःची वैशिष्ट्ये अधोरेखीत होणार आहेत. ’फोर्ड’चे जागतिक पातळीवरील अस्तित्व व कसब आणि ’महिंद्र’चा भारतातील मोठ्या व्याप व यशस्वी संचालनाचे मॉडेल या दोन्ही वैशिष्टयांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. दोन्ही कंपन्यांनी विद्युतीकरण,वितरण व उत्पादन विकास अशा परस्परसंबंधांच्या सर्व क्षेत्रांवर सहयोग करणे सुरू ठेवले आहे.
’फोर्ड’च्या सध्याच्या व भविष्यातील वाहनांमध्ये वापरण्यासाठी ’लो-डिसस्प्लेसमेंट’ पेट्रोल इंजिन विकसित करून पुरविण्यासाठी ’फोर्ड’ने या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस महिंद्र समुहाशी करार केला आहे. हे उत्पादन 2020मध्ये सुरू होईल. महिंद्रा व फोर्ड यांनी ’टेलिमॅटिक्स कंट्रोल युनिट’चा संयुक्त विकास करण्याचीही घोषणा केलेली आहे.
’महिंद्र’ने मागील सात दशकांपासून भारतातील ’युटिलिटी व्हेईकल’ क्षेत्रात आघाडी घेतलेली आहे. जागतिक स्तरावर उपलब्ध असलेल्या विद्युतीय वाहनांच्या पोर्टफोलिओसह स्वच्छ आणि परवडणाऱ्या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी अग्रगण्य असलेल्या काही जागतिक कंपन्यांमध्ये ’महिंद्र’चा समावेश झालेला आहे. आपल्या जागतिक उपस्थितीचा विस्तार करून ’महिंद्र’ने कोरियामधील सॅन्गॉंग मोटर कंपनीतील बहुतांश हिस्सा विकत घेतला आहे. तसेच अमेरिकेतील ’राईड-शेअरींग’ क्षेत्रात गुंतवणूक करून ’महिंद्र’ने ’शेअर्ड मोबिलिटी स्पेस’मध्ये प्रवेश केला आहे. ’जेनझी’ ही जगातील पहिली इलेक्ट्रिक कनेक्ट स्कूटरही महिंद्रने विकसीत केली आहे.
भारतात 1995 मध्ये प्रवेश करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांपैकी फोर्ड ही एक आहे. सध्या ही कंपनी भारतातील सर्वाधिक कार निर्यात करणाऱ्यांपैकी एक बनली आहे. तामिळनाडूतील चेन्नई आणि गुजरातमधील साणंद येथे ’फोर्ड’चे कारखाने आहेत. तेथे वाहने व इंजिने उत्पादीत व निर्यात करण्यात येतात. नवी दिल्ली, चेन्नई आणि कोयंबतूर या शहरांमध्ये ’फोर्ड इंडिया’ आणि ’फोर्ड ग्लोबल बिझिनेस सर्व्हिसेस ऑपरेशन्स’मध्ये 14,000 हून अधिक लोक काम करत असून, जागतिक स्तरावर ’फोर्ड’च्या कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक असणारा भारत हा दुसरा देश आहे. .
भातुकली
‘आता प्रत्येक पॅकसह एक भातुकलीचं भांडं मोफत’ – फेसबुकवर ‘मधुरा रेसिपी’ची ही पोस्ट बघितली. भातुकली…समस्त महिलावर्गाचा हा जिव्हाळ्याचा विषय आणि लहानपणीचा आवडता छंद, खेळही. भातुकलीचा खेळ खेळले नाही, असे म्हणणारी विरळाच असेल एखादी. सुट्टीच्या दिवशी मैत्रिणींना जमवून भातुकलीचा संसार मांडला जायचा. मग त्यासाठी चणे, फुटाणे, शेंगदाणे आणि कुरकुमुऱ्याचा काहीबाही स्वयंपाक. अगदी घरी आई-आजी करतात त्या स्टाईलने. एखादी जुनी ओढणी साडीसारखी नेसून, पदर खोचून पाककला भरात असायची. या खेळामध्ये फक्त मुलीचं नाहीत तर कधीकधी मुलांचाही सहभाग असायचा. ब्याट बॉल खेळात खेळता छोट्या छोट्या कप बशीमधून खोटा खोटा चहा प्यायला त्यांनाही मजा यायची. काही टारगट मुलं मात्र भातुकलीच्या खेळामध्ये सहभागी झालेल्या मुलांना ‘मुलींमध्ये कोंबडा’ म्हणून हिणवयाचे. दोनतीन तास तरी आरामात हा खेळ चालायचा. भातुकलीचा हा खेळ पाहून आई किंवा घरातील जाणती स्त्री सुखावून जात असे आणि मनोमनी म्हणत ही असे की असाच सुखाचा संसार कर लग्न झाल्यावर.
भातुकलीची भांडी ही सगळी इटुकली पिटुकली. अगदी स्वयंपाकघरातील खऱ्याखुऱ्या भांड्यांसारखी आणि त्यात व्हरायटी पण किती बघा…स्टील, पितळ, चिनीमाती, छोटे छोटे कपबशी- किटलीचा सेट सुद्धा. अशी अनेक प्रकारची भातुकली एका पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये बंदिस्त होऊन दुकानातल्या काचेच्या शोरुममध्ये विराजमान झालेली. येणाऱ्याजाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी. आता मॉलमधील खेळण्यांच्या दुकानातून आऊटडेटेड झालेली ही खेळणी पुण्याच्या तुळशीबागेत अजूनही बघायला मिळतात. तेथे तर भातुकलीचे अनेक प्रकार- स्वयंपाकाच्या भांड्यांबरोबर विस्मृतीत गेलेला पाणी तापविण्याचा बंब, घंगाळ, हंडा-कळशी वगैरे वगैरे. भातुकलीच्या रूपात हे सारं अजून जपलं आहे. छोटी छोटी भांडी असली तरी स्वयंपाकघरातला सारा पसारा भातुकलीने मांडला. हळूच वा नकळत समस्त स्त्री-जातीला लहाणपणीच शिकवलं की कितीही मोठी झाली, शिकलीस तरी यापासून सुटका नाही आणि हे यायला हवंच. पुढील काही वर्षांत मात्र हे चित्र पालटलं. भातुकलीचा खेळ जाऊन मोबाइल हातात विसावले. ही पिढी मोबाईलच्या गेममध्ये जास्त रमून गेली. मोठी झाली तरी भातुकली काय पण प्रत्यक्ष स्वयंपाकाची बोंबच होती. आता स्वयंपाकाला बाई ठेवली जाऊ लागली. लग्नाची बोलणी होताना ‘स्वयंपाक तर येतो ना?’ हा मुद्याचा प्रश्न विचारावा की न विचारावा, ह्या भ्रमात मुलाची आई पडू लागली. अडीअडचणीला तरी स्वयंपाक यायला हवा; कारण काही झालं तरी हॉटेलच्या पार्सलवर किती दिवस तरुन जाणार. लहानपणी जाणता-अजाणता भातुकलीतून दिला गेलेला हा संदेश मौलिक होता. भातुकली खेळताना न कळत्या वयात घरातील काम स्त्रीचे, तिच्याच जबाबदारीचे असेच संस्कार बाईमनावर झाले. मोबाईलवर गेम खेळणाऱ्या आताच्या पिढीला काय कळणार म्हणा. काही जाहिरातींमधून भावनांचा अचूक मागोवा घेतला जातो. अगदी तसंच ‘मधुरा रेसिपी’च्या पोस्टने लहानपणीच्या आठवणी पुन्हा एकदा स्मरल्या आणि भातुकलीचे महत्त्व अधोरेखित झाले…
पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068
जुन्या याेजनांचा नवा ‘संकल्प’ ; भाजपाचा पुण्याचा जाहीरनामा
पुणे : भाजपा युतीचा पुण्याचा जाहीरनामा आज पुण्यातील भाजप कार्यालयात प्रकाशित करण्यात आला. त्याला भाजपाने संकल्पपत्र म्हटले आहे. भाजपाने प्रकाशित केलेल्या जाहिरनाम्यात बहुतांश याेजना या जुन्याच आहेत. त्याच याेजना नव्याने पूर्ण करण्याचा संकल्पच भाजपाने आपल्या संकल्पपत्रात दिला आहे. आज पुण्याचे भाजपाचे उमेदवार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष याेगेश गाेगावले, खासदार अनिल शिराेळे, शिवसेनेच्या उपनेत्या निलम गाेऱ्हे, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, आरपीआयचे शहराध्यक्ष अशाेक कांबळे, महापाैर मुक्ता टिळक, उपमहापाैर सिद्धार्थ धेंडे आदी उपस्थित हाेते.
भाजपाचा जाहीरनाम्यात विविध आश्वासने दिली आहेत. मेट्राेपासून पाणीपुरवठा, स्मार्ट सिटी, नदी सुधारणा, घनकचरा व्यवस्थापन, आराेग्य, शिक्षण, क्रीडा, संस्कृती यावर या जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे. त्याचबराेबर पुण्याला याेग सिटी करण्याचे आश्वासन सुद्धा भाजपाकडून देण्यात आले आहे. शहरासाठी सांस्कृतिक धाेरण देखील तयार करणार असल्याचे भाजपाकडून जाहीरनाम्यात सांगण्यात आले आहे. पुण्याला स्मार्ट सिटी करण्याचा निर्धार पुन्हा एकदा जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. पुणेकरांना 24 तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देखील देण्यात आले आहे.
पाण्याच्या मुद्यावर बाेलताना बापट म्हणाले, पाणी काहीवेळ येत असल्याने नागरिक पाण्याची साठवणूक करत असतात. परंतु 24 तास पाणी पुरवठा सुरु झाल्यास नागरिक साठवणूक करणार नाहीत. तसेच यामुळे पाण्याची बचत हाेणार आहे. तसेच पुण्यात येणाऱ्या लाेकसंख्येचा विचार करता त्यापद्धतीने नियाेजन करण्यात येईल. कसबा येथे मेट्राेच्या प्रस्तावित स्टेशनला स्थानिकांचा विराेध आहे या प्रश्नावर बाेलताना बापट म्हणाले, की कसब्यातला एकही माणूस रस्त्यावर राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल. दादाेजी काेंडदेव शाळेची जागा ताब्यात मिळाली असून तिचा वापर स्टेशनसाठी करण्यात येणार आहे. त्याचबराेबर या स्टेशनमुळे जे नागरिक बाधित हाेतील त्यांचे पुनर्वसन केल्याशिवाय मेट्राेचे स्टेशन तयार करण्यात येणार नाही.
मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी ; आयएएस अधिकारी मोहम्मद मोहसिन निलंबित
भुवनेश्वर : ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या 1996 मधील बॅचच्या आयएएस अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने बुधवारी निलंबित केले. मोहम्मद मोहसिन असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्यांनी संबलपूर लोकसभा मतदारसंघात मोदी सभेसाठी आले असताना मंगळवारी त्यांच्या हेलिकॉप्टरमधील साहित्याची तपासणी केली होती.
निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, मोहसिन यांनी एसपीजी सुरक्षेअंतर्गत मान्यताप्राप्त व्यक्तींसाठीच्या नियमावलीचे पालन केले नाही. यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात येत आहे. मोहम्मद मोहसिन हे 1996 च्या बॅचमधील कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी एसपीजी सुरक्षेतील महनीय व्यक्ती या अशा प्रकारच्या तपासणीपासून मुक्त असतानाही त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. या तपासणीमुळे पंतप्रधानांना या ठिकाणी 15 मिनिटे थांबावे लागले. उडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचेही हेलिकॉप्टर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मंगळवारी तपासले होते. तसेच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचेही हेलिकॉप्टर संबलपूरमध्ये मंगळवारी तपासण्यात आले होते.
बारामतीच्या बंद गाडीसाठी भाड्याचे ‘इंजिन’-मुख्यमंत्र्यांची पवारांवर जोरदार टीका
बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी सासवड येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावर आयोजित सभेत फडणवीस बोलत होते. या वेळी कांचन कुल, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार संजय काकडे यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
कुल म्हणाल्या, ‘पुरंदरची ओळख दुष्काळी तालुका म्हणून आहे. इथे लग्नासाठी कोणी मुली देत नव्हते. ती ओळख आता युती सरकारने पुसली असून, जलयुक्त शिवारसारखी कामे, सिमेंट बंधारे, पाझर तलाव, गुंजवणी प्रकल्प शिवतारे यांच्या माध्यमातून केला आहे. कुल कुटुंब नेहमी बंड करण्यासाठी परिचित आहे. माझ्या उमेदवारीचे हे बंडच आहे. त्यात मी यशस्वी होणार आहे.’
‘महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा,’ अशी शिफारसही आम्ही केंद्राकडे केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
‘पुरंदर’साठी आकर्षक पॅकेज
‘पुरंदरमधील नियोजित छत्रपती संभाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प ‘समृद्धी’प्रमाणे शेतकरी-जमीन मालकांशी चर्चा करूनच पूर्ण करणार आहे. त्याचे आकर्षक पॅकेज आणि जमीन संपादनासाठी लागणारी तरतूदही केली आहे. हे विमानतळ म्हणजे पुरंदरच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली ठरणार आहे,’ असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुरंदर विमानतळाबाबत भाष्य केले.
‘जेजुरीचा २५० कोटींचा आराखडा’
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरीचा विकास करण्यासाठी सरकारने २५० कोटींचा तीर्थक्षेत्र आराखडा तयार केला आहे. आचारसंहिता असल्याने बोलणे योग्य नाही. पण खंडेरायाचा आशीर्वाद आम्ही मिळवणार आहोत, तसेच ६५०० हेक्टर जमिनीवर जेजुरी ‘एमआयडीसी’चे विस्तारीकरण होऊ घातले आहे. त्यामुळे शेकडो आंतरराष्ट्रीय उद्योग येथे येत आहेत. त्याचा फायदा स्थानिक भूमिपुत्रांना होणार आहे. सासवड शहराची ५८ कोटी रुपये खर्चाची भुयारी भूमिगत गटार योजना दोन्ही काँग्रेसची सत्ता असताना १५ वर्षांत मंजूर केली नाही. ती मी पालकमंत्री गिरीश बापट आणि जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांच्या रेट्यामुळे मंजूर केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मोदींना सत्तेवरून खेचण्यासाठी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचा कॉंग्रेस राष्ट्रवादीला पाठींबा
पुणे- हा देश संविधानाने सांगितलेल्या लोकशाही मार्गाने चालला पाहिजे ही महात्मा फुले, शाहू
महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होवून पुरोगामी विचरांच्या चळवळीत
काम करणार्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. त्यामुळे हुकुमशाही प्रवृत्तीच्या आणि संविधान
आणि लोकशाही न मानणार्या नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कोंग्रेस-
राष्ट्रवादी कोंग्रेस आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या मागे उभे राहून त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडने घेतला असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी
सांगितले.
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. ‘लढाई लोकशाहीची, संविधानाच्या
अस्तित्वाची’ याचे आवाहन करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांना या
मेळाव्याला निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे,
संभाजी ब्रिगेडचे मुख्य समन्वयक शांताराम कुंजीर, प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे, प्रदेश संघटक रमेश
हांडे, पुण्याचे अध्यक्ष हर्षवर्धन मगदूम, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष सुधीर पुंड, पुणे जिल्हा संघटक
विशाल तुळवे, सचिन तावरे, विकास टिंगरे, प्राची दुधाने, डॉ. सुनीता मोरे यावेळी व्यासपीठावर
उपस्थित होते. संभाजी ब्रिगेडचे मुखी समन्वयक शांताराम कुंजीर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचा
राज्यातील कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन आघाडी कवडे गट, शेतकरी संघटना आणि मित्र
पक्षांच्या महाघाडीच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्याचा आणि पुणे शहर लोकसभा मतदार
संघासाठी मोहन जोशी, शिरूर मतदार संघासाठी अमोल कोल्हे, मावळ मतदार संघासाठी पार्थ पवार
आणि बारामती मतदार संघासाठी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा ठराव मांडला त्याला उपस्थित
सर्वांनी मान्यता दिली. संभाजी ब्रिगेडच्या पाठिंब्याचे पत्र आणि ठराव कोंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे
यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केले.
प्रवीण गायकवाड म्हणाले, निवडणूक कोणाला तिकीट मिळण्यावर महत्वाची नसते. पक्षाचा विचार
महत्वाचा असतो, व्यक्ती महत्वाची नसते. त्यामुळे पुरोगामी विचारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व
मित्रपक्षांच्या पुण्यातून मोहन जोशी, बारामतीतून सुप्रिया सुळे, मावळ मधून पार्थ पवार आणि शिरूर
मधून डॉ. अमोल कोल्हे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडने घेतला आहे.
लोकशाहित सर्वांची मते सर्वांना समजून घेणे आणि सर्वसमावेशक निर्णय घेणे हे गणराज्यसंस्कृतीत
होते. भारतात शिवाजी महाराजांच्या काळात लोकशाहील सुरुवात झाली. लोकशाहीमध्ये सर्वाना एकच
मत देता येते त्यामुळे समान अधिकार आले. बोलण्याचा आणि लिहिण्याचा अधिकार आला. परंतु
आता बोलण्याचा आणि लिहिण्याचा अधिकार धोक्यात आले आहे का? याचा विचार करण्याची गरज
निर्माण झाली आहे. डॉ. दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांची हत्याकरण्यात आली. आज
पुरोगामी विचार सरणीच्या, प्रबोधन करणार्या जुन्या रूढी परंपराविरुद्ध लिहिणार्या आणि
बोलणार्या ६३ जणांना संरक्षण आहे मग खर्या अर्थाने लोकशाही आहे का? याचा विचार करण्याची
आवश्यकता आहे. निवडणुकीला मतदान करणे आणि निवडून येणे म्हणजे केवळ लोकशाही नाही.
सध्याची परिस्थती बघता लोकशाही धोक्यात आली आहे . एकीकडे संविधानाची प्रत जाळली आणि
दुसरीकडे मनुस्मृतिचा अधिकार मिळाला पाहिजे अशी मागणी केली जाते. आजही आरएसएसचे लोक
संविधान मान्य करत नाही आणि निवडून येऊन सत्तेवर येतात. संविधानाच्या माध्यमातून लोकशाही
प्रस्थापित झाली आहे. महात्मा फुलेंनी समता, शाहू महाराजांनी बंधुता, डॉ. आंबेडकरांनी न्याय आणि
शिवाजी महाराजांनी, स्वातंत्र्य दिले. सविधान महापुरुषाच्या विचारातून तयार झाले आहे.
लोकशाही आणि संविधान वाचले पाहिजे कारण लिहिण्याचा व बोलण्याचा अधिकार दाबून टाकला
जात आहे. समाजकारणातील काही उद्देश साध्य करण्यासाठी राजकारणात जावे लागते. संविधान व
लोकशाही वाचवण्यासाठी राजकारणात जावे लागते. सीबीआय, न्ययपालिका धोक्यात आली आहे.
रघुरामराजन यांनी राजीनामा दिला, उर्जितबपटेल यांनी नोटांबंदीला विरोध करत होते. तरी त्यांचे
ऐकले नाही. साडेपाच लाख छोटे उद्योग बंद झाले. काळा पैसा बाहेर आणायचा जो हेतू होता तो
साध्य झाला नाही.उलट १ लाख २६ हजार कोटी रुपयांचे सरकारचे नुकसान झाले हे. पेट्रोल, डिझेल,
गॅस स्वस्त होईल, महागाई कमी होईल, १५ लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा होतील असे संगितले.
परंतु हा चुनवी जुमला होता हे अमित शहा स्वतः सांगतात. नरेंद्र मोदींची प्रतिमा एक चहावाला अशी
निर्माण केली तोच एक जुमला आहे. प्रशांत किशोर यांच्या कल्पनेतून मोदींचीचहावाला ही प्रतिमा
तयार करण्यात आली. अत्यंत चतुर अत्यंत हुशार शहा, मोदी, गोध्रा दंगलीत आरोपी आहेंत. अशी
टीका त्यांनी केली. मोदी हे अपयशी पंतप्रधान आहेत. त्यामुळेच, शेतकर्यांच्या आत्महत्या,
बेरोजगारी, महागाई, याबाबत न बोलता पुलवामा घटनेचा संदर्भ देत राष्ट्रप्रेमाचा मुद्दा समोर आणत
आहेत. ज्या पंतप्रधानाला किंवा राष्ट्रपतीला जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करता येत नाहीत तो भित्रा
असतो आणि त्यातून तो हुकूमशहा होतो हा जगाचा इतिहास आहे असे त्यांनी संगितले.
रमेश बागवे म्हणाले, पंतप्रधान मोदींनी शेतकरी, तरुण, कामगार, व्यापारी, सर्वसामान्य जनता यांना
फसवून देशात हाहाकार उडून दिला आहे. संविधान टिकले तर लोकशाही टिकेल आणि लोकशाही
टिकली तरच देश टिकेल याचा विचार सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे. मोदी सरकारला सत्तेची
आणि पैशाची मस्ती आली आहे. त्यामुळेच त्यांच्या मंत्रिमंडळतील मंत्री ज्या म. गांधींची हत्या नथुराम
गोडसे यांनी केला त्याचे मंदिर बांधण्याची भाषा करतात. मोदी यांच्या कथणी आणि करणी मध्ये
फरक असून महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांचे विचार ते मनात नाहीत हे त्यांच्या
कृतीतून आणि बोलण्यातून दिसतता अशी टीका त्यांनी केली.
.शांताराम कुंजीर म्हणाले, राज्यात मराठा क्रांतीचे ९८ मोर्चे निघाले. मुस्लिम, धनगर समाजाचे मोर्चे
निघाले. करोडो लोक रस्त्यावर आले. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात अडकून पडला
आहे. वकिलांची फौज उभी करू अशी भीमगर्जना चंद्रकांत पाटील यांनी केली. मात्र सक्षम वकिलांची
टीम दिसून येत नाही. याचा जाब सरकारला विचारला पाहिजे. करकर्त्यांवर गंभीर गुन्हे ते मागे
घेण्याचे आश्वासन दिले परंतु गुन्हे मागे घेतले नाही, शिवस्मारकाचे दोनवेळा पूजन परंतु ती मागणी
पूर्ण नाही. शाहूमहराजांच्या, डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. मुस्लिम, धनगर
समाजाचे प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकर्यांनी पायी मोर्चा काढला त्यांच्या मागण्या तशाच, लेखक,
विचारवंत, कलाकार यांना ते बोलल्यावर देशद्रोही ठरवले जाते आहे. त्यामुळे हे हुकुमशाही सरकार
हटवण्यासाठी निर्णय घ्यावा लागेल.पुरोगामी पक्षांना कशी मदत करायची याची दिशा ठरवावी लागेल.
मुख्यमंत्री फडणवीस ऐवजी गोडबोले असे नाव मुख्यमंत्र्यांचे ठेवायला पाहिजे. केवळ गोड बोलायचे
आणि आश्वासन दयायचे तीच पद्धत मोदींची आहे अशी टीका त्यांनी केली.
यावेळी विशाल तुळवे, प्रसन्न पाटील, अमोल काटे यांनीही आपले विचार मांडले. कार्यकर्माचे सूत्रसंचालन
रमेश हांडे यांनी केले तर आभार प्रदीप कणसे यांनी मानले. यावेळी बाळासाहेब अमराळे, हणमंत मोटे,
प्रफुल्ल गुजर पाटील, विश्वजित चौगुले, हर्षवर्धन मगदुम, संजय मते आदि मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना दोनच मतदार संघात अडकविण्यात मुख्यमंत्री यशस्वी-खासदार संजय काकडे
सासवड:लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते बारामती व मावळ मतदार संघात अडकविण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले. एवढं होऊनही बारामती व मावळमधील पराभव ते टाळू शकत नाहीत, असे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी आज येथे व्यक्त केले.
बारामती लोकसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ सासवड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. यावेळी खासदार काकडे बोलत होते. याप्रसंगी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, उमेदवार कांचन कुल, आमदार भीमराव तापकीर, आमदार योगेश टिळेकर, आमदार राहुल कुल, पुरंदर व हवेली मतदार संघातील भाजप शिवसेना व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीच्या 48 जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त करतानाच खासदार काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय डावपेचांचे जाहीर सभेत कौतुक केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलगी बारामतीतून उभी आहे तर, अजित पवारांचा मुलगा मावळमध्ये आहे. राष्ट्रवादीचे राज्यभरातील नेते या दोन मतदार संघात अडकवून ठेवण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले. राष्ट्रवादीने बाकीचे मतदार संघ आताच सोडून दिलेत, पण त्यांचे हे दोन्ही म्हणजे बारामती व मावळ लोकसभा मतदार संघ निवडून येणार नाहीत. त्यांचा पराभव निश्चित होणार आहे.
बैलगाडा शर्यत सुरु करा!
पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीचं महत्व जास्त आहे. बैलगाडा शर्यतीला मान्यता मिळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केली.
मोदींविरोधात सुप्त लाट-केंद्रात सरकार काँग्रेस आघाडीचे येईल -खा. दलवाई
पुणे-लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशात मोदींविरोधात सुप्त लाट असल्याचे आढळून आले आहे. विदर्भात हे चित्र जागोजागी दिसले. त्यामुळे केंद्रातील भावी सरकार हे काँग्रेस आघाडीचे असेल असा विश्वास काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई यांनी बुधवारी येथे व्यक्त केला. पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार
मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
याप्रसंगी आमदार शरद रणपिसे, राष्ट्रवादी काँगेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश सोनवणे, गोपाळ तिवारी, सुनील शिंदे, शानी नौशाद आदी उपस्थित होते.
२०१४ साली सत्तेवर येण्यासाठी मोदी यांनी जी आश्वासने दिली होती त्यातील एकही आश्वासन मोदी सरकारने पाळले नाही असे सांगून खासदार हुसेन दलवाई म्हणाले, या निवडणुकीत देखील मोदी, आपल्या सरकारने काय विकास केला हे न सांगता राष्ट्रवाद, देशभक्ती अशा गैरलागू मुद्यांवरच बोलत
आहेत. प्रचाराला मुद्दे नसल्याने महाराष्ट्रात येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर त्यांच्याकडून केली जाणारी वैयक्तिक टीका निषेधार्ह आहे असेही ते म्हणाले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे मोदी सरकारच पुन्हा सत्तेवर यावे अशी इच्छा व्यक्त करतात त्यावरून उभयतांमध्ये नक्कीच
‘साटेलोटे’; झाले असावे अशी शंका येते असे सांगून दलवाई म्हणाले, पाकिस्तान नव्हे तर भारतातील मुसलमान हे मोदी सरकारचे ‘लक्ष्य’आहे.
महाराष्ट्र सरकार हे घोटाळेबाज मंत्र्यांचे सरकार आहे असे सांगून खा. दलवाई म्हणाले, तूरडाळ- घोटाळा, चिक्की-घोटाळा, औषध-घोटाळा, शैक्षणिक घोटाळा असे अनेक घोटाळे महाराष्ट्रात झाले आहेत त्यामुळे या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातून परदेशी पळून जाणाऱ्यांची संख्या मोठी असेल असेही त्यांनी
उपहासाने सांगितले. प्रकाश आंबेडकर यांनी जहाल मुस्लिम नेते ओवैसी यांच्याशी युती करून वंचित विकास आघाडी स्थापन केल्यामुळे दलित समाज नाराज आहे हा समाज काँग्रेसच्याच पाठीशी आहे.
त्यामुळे राज्यात वंचित विकास आघाडीचा काँग्रेस आघाडीवर परिणाम होणार नाही असे दलवाई यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार गिरीश बापट यांनी पालकमंत्री म्हणून केलेल्या अकार्यक्षम कारभारावर टीका केली. गेल्या पाच वर्षात वारंवार मागणी करूनही त्यांना ‘म्हाडा’घरकुलासंबंधी साधी नियमावली तयार करण्यात आली नाही असे त्यांनी सांगितले. अकलूज येथील भाजपच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर व्यासपीठावर उपस्थित राहिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर पक्षातर्फे लवकरच कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
संस्कृतीची मोडतोड करणाऱ्यांना पुणेकर निवडून देणार का ? काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांचा सवाल
पुणे- सुसंस्कृत शहर म्हणून पुण्याची जगात ओळख आहे. मात्र अशोभणीय तसेच अक्षेपाहार्य विधाने करुन, पालक मंत्री या शहराला असंस्कृत ठरविण्याचे काम करीत आहेत. संस्कृतीची मोडतोड करणाऱ्यांना सुज्ञ पुणेकर निवडून देणार का असा प्रश्न काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे उपस्थित केला.
कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ मेहतर बाल्मिकी समाजाचा मेळावा समाजाचे नेते रवी परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात पार पडला. यावेळी उमेदवार मोहन जोशी, माजी नगरसेवक रशिद शेख, नगरसेवक आविनाश बागवे, माजी नगरसेविका मीना परदेशी, करण मकवानी, हरियाणा सरकारच्या एस.सी. समितीचे माजी सदस्य मनोज बागडे, वीरदास चव्हाण, माजी नगरसेवक
सुनील गोगल, गौतम आर्केडे, मेहतर बाल्मिकी समाजाचे अध्यक्ष कवीराज संगेलिया, समाजाचे सल्लागार चंद्रकांत चव्हाण, शाहु-फुले-आंबेडकर विचार मंचचे हनुमंत गायकवाड, आरपीआय गवई गटाचे राहुल डंबाळे, नरेश जाधव आदी मंचावर उपस्थित होते.
बागवे म्हणाले, ही लोकसभेची निवडणूक नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या पवित्र संविधानाला वाचविण्याची लढाई आहे. दलित, मुस्लिम बांधवावर अन्याय, अत्याचार करुन जातीयवादाला खतपाणी घालणाऱ्या विचाराविरोधातली ही निवडणूक आहे. त्यामुळे काही जण महामानवांची नावे घेऊन मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या भुलथापांना
बळी पडू नका. मतांचे विभाजन होऊ देऊ नका. आंबेडकर, महात्मा गांधी यांचे सर्वकश विचार घेऊन निष्ठेने काँग्रेसचे काम करीत असलेले उमेदवार मोहन जोशी यांच्या पाठिशी एकीने उभे रहा असे आवाहनही बागवे यांनी केले.
मोहन जोशी म्हणाले, मागील 40 वर्षांपासुन कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. मला शहराच्या प्रश्नाविषयी अस्था आहे. शहरातील प्रश्न सोडवून लोकांची सेवा करण्याची संधी मला द्या. मी दिल्लीत गेलो, तरी जमिनीवर राहुनच शहराच्या विकासाठी प्रयत्नशिल असेन.
मनोज बागडे म्हणाले, आजपर्यंत समाजाच्या उन्नतीचे काम काँग्रेसने केले. सर्वांना सन्मान देणाऱ्या बाबासाहेबांच्या संविधानाला धोका निर्माण झाला आहे. हा धोका दूर करण्यासाठी सर्वांनी महाआघाडीच्या पाठिंशी उभे राहणे नितांत गरजेचे आहे.
रशिद शेख म्हणाले, महागाईने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. नोटा बंदीने गरिबांना अधिक गरिब, तर श्रीमंतांना अधिक श्रीमंत केले आहे. भाजपचे धोरण अल्पसंख्याक,दलितांविरोधी आहे. निवडणूकीत स्वतःचा वापर होऊ न देता जागरुकपणे महाआघाडीला मतदानकरा.
आविनाश बागवे, राहुल डंबाळे, कवीराज संगेलिया, नरेश जाधव, करण मकवाणी, सुनील गोगल, चंद्रकांत चव्हाण यांनी भाषणे केली.

