महिलांना केंद्रस्थानी ठेवून मोदी सरकारच्या योजना-विजया रहाटकर

Date:

पुणे-मोदी सरकार हे पहिले सरकार आहे, ज्याने महिलांना केंद्रस्थानी ठेवून योजना आखल्या. ज्या योजनांचा लाभ २० कोटी महिला लाभार्थींना झाला. योजना महिलांपर्यंत पोहोचल्या म्हणजे तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचल्या. याचा ङ्गायदा या निवडणुकीत महायुतीला नक्की होईल, असा विश्‍वास भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केला.
पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती रहाटकर बोलत होत्या. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापौर मुक्ता टिळक, स्वरदा बापट यांची प्रमुख उपस्थिती होती.
रहाटकर पुढे म्हणाल्या, ‘प्रधानमंत्री आवास योजनेचा २ कोटी महिलांना, शौचालय योजनेचा ९ कोटी महिलांना, उज्ज्वला योजनेचा ७ कोटी महिलांना, मुद्रा योजनेचा १६ कोटी महिलांना आणि सौभाग्य योजनेचा २ कोटी महिलांना लाभ झाला. त्यामुळे देशात भाजपला अभूतपूर्व प्रतिसाद आहे. विरोधी पक्षात मात्र गोंधळाची स्थिती आहे. भाजप पूर्ण बहुमताने देशात सत्तेत येईल.’
रहाटकर पुढे म्हणाल्या, ‘आपपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महागाई हा मु‘य मुद्दा होता. ही पहिली निवडणूक आहे ज्यामध्ये महागाई हा मुद्दा नाही. १९९१ नंतर महागाईचा दर सर्वात कमी म्हणजे २.५७ टक्के इतका आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर आहेत.’
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नागरिकांना अखंड व सुरळीत वीजपुरवठा मिळावा-महापौरांनी ऊर्जामंत्र्यांना घातले साकडे

पुणे, दि. १७ एप्रिल २०२६ : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका...

मोदी सरकारला पहिला धक्का! महिला आरक्षण विधेयक नामंजूर; लोकसभेत गदारोळ

महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक 54 मतांनी पडले:बाजूने 298, विरोधात...

”शी कॅन अँड शी विल” उपक्रमातून पुण्यातील महिला बॉक्सर्सना नवी झेप

पुणे, दि. १७ एप्रिल २०२६ :महिला सक्षमीकरण आणि क्रीडा...

होर्मुझची सामुद्रधुनी सर्व प्रकारच्या जहाजांसाठी खुली..

तेहरान: इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी सर्व प्रकारच्या जहाजांसाठी खुली करण्याची...