Home Blog Page 290

गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर नाशिकच्या इगतपुरी येथे लवकरच साकारणार भव्य चित्रनगरी – छगन भुजबळ

मुंबई, दि. ६ ऑक्टोबर –

नाशिक विभाग विकास कार्यक्रम २००९ अन्वये नाशिक येथे गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर चित्रपट सृष्टी निर्माण करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. या चित्रनगरीसाठी प्रस्तावीत असलेला नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीचा परिसर नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत सुसंपन्न व सुंदर आहे. त्याचप्रमाणे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे इगतपुरी पासून मुंबईचे अंतरसुद्धा लक्षणीयरित्या कमी झालेले आहे. त्यामुळे या ठिकाणी आम्ही लवकरच एक भव्य चित्रपटनगरी साकारणार असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह याठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आजही नाशिक परिसरामध्ये अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट तसेच मालिकांचे चित्रीकरण केले जाते.
नियोजन विभागाने सन 2009 ते 2012 या कालावधीसाठी नाशिक चित्रपटसृष्टी करिता रुपये १० कोटी इतका नियतव्यय सुद्धा मंजूर केलेला होता.या प्रकल्पासाठी मौजे मुंढेगाव ता. इगतपुरी येथे प्रत्यक्ष पाहणी करून सर्वे नंबर 459 येथील 54.58 हेक्टर मधील 47 हेक्टर 39.4 आर ही शासकीय जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला देण्यासाठी जमीन जिल्हाधिकारी नाशिक यांनी महसूल विभागाला प्रस्ताव पाठवलेला आहे.

पुढे ते म्हणाले की, गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर नाशिक चित्रनगरी उभारण्यासाठी हा प्रकल्प आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य व सुसाध्य आहे किंवा नाही याची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे काम दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळामार्फत मिटकॉन या संस्थेला देण्यात आलेले होते.मिटकॉन या संस्थेने व्यवहार्यता अहवाल तयार करून महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाला सादर केलेला आहे.महामंडळाने या व्यवहार्यता अहवालाचे विश्लेषण व तपासणी करून हा अहवाल शासनास सादर केलेला आहे.

यावेळी अजित पवार यांनी निर्देश दिले की,
प्राप्त अहवालाचे विश्लेषण करून या प्रकल्पाचा फायनान्शिअल वायबिलिटी व गॅप अनालिसिस करण्यासाठी के.पी.एम.जी या तज्ञ सल्लागाराची नेमणूक करण्यात आलेली आहे. या सल्लागार संस्थेने नोव्हेंबर अखेरपर्यंत आपला अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. ही जागा सांस्कृतिक कार्य विभागाला देणे बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीमध्ये आदेश दिले.

या या बैठकीत बोलताना सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री आशिष शेलार म्हणाले की नाशिक येथे चित्रनगरी व्हावी या मताचे आमचा विभाग आहे. या चित्रनगरीसाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागाराची नेमणूक करण्याचे निर्देश देखील सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री आशिष शेलार यांनी दिले. या ठिकाणी चित्रनगरी सोबतच अमुझनेंट पार्क करण्यात यावा अशी अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केली.

या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री आशिष शेलार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे,नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ राजेश देशमुख,
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नाशिक समिती प्रमुख शाम लोंढे, दिग्दर्शक राजू फिरके ,लाईन प्रोडूसर अमित कुलकर्णी, कला दिग्दर्शक प्रसाद राहणे, आणि फिल्म निर्माता अंबादास खैरे आदी उपस्थित होते.

ज्ञानाला जात, धर्म आणि देश नसतो. – श्रीपाल सबनीस

पुणे-ज्ञानाधिष्ठ संस्कृती हा विश्वाचा आत्मा आहे. ज्ञानामुळेच मानवी विकास झाला. वाचन संस्कृतीला पर्याय नाही. ज्ञानाला जात, धर्म आणि देश नसतो. म्हणून महामाता रमामाई भीमराव आंबेडकर मुक्त वाचनालय नव्ययुगाचे मुक्तद्वार आहे. असे उदगार ज्येष्ठ विचारवंत डॉ.श्रीपाल सबनीस यांनी रमामाई मुक्त वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी काढले.
यावेळी साहित्य सम्राट पुणेचे दोनशे दहावे कविसंमेलन आणि माजी नगरसेविका लताताई राजगुरु आणि समाजरत्न शंकर गायकवाड यांचा वाढदिवस अशा कार्यक्रमांचे आयोजन महामाता रमामाई बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने वाडिया कॉलेज जवळ पुणे येथे केले होते.
विचारपिठावर माननीय बर्गे, जयदेव गायकवाड, परशुराम वाडेकर, लता राजगुरु, ॲड. विवेकभाई चव्हाण, ॲड. अविनाश साळवे मुख्य आयोजक विठ्ठल गायकवाड आणि साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ उपस्थित होते.
यावेळी अनेक मान्यवरांच्या मनोगतानंतर साहित्य सम्राट पुणेचे आई या विषयावर अतिशय महत्त्वपूर्ण कविसंमेलन ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या प्रबोधनात्मक कविसंमेलनामध्ये म.भा.चव्हाण, विनोद अष्टुळ, किशोर टिळेकर, शरयू पवार, लक्ष्मण शिंदे, राहुल भोसले, बाबासाहेब ढोबळे, लक्ष्मी रेड्डी, जनाबापू पुणेकर, छगन वाघचौरे, विजय कावळे, नंदकुमार गावडे, महमुदा शेख, शौकत शेख, थोरात, प्रतिमा काळे, योगिता कोठेकर, भगवान धेंडे आणि विठ्ठल गायकवाड यांनी आपल्या काव्य रचना सादर करून उपस्थिनांची मने जिंकली.
या प्रबोधनात्मक कविसंमेलनाचे सूत्रबद्ध निवेदन विनोद अष्टुळ यांनी तर भावनात्मक आभार विठ्ठल गायकवाड यांनी व्यक्त केले.

लीला पूनावाला फाउंडेशन एक वट वृक्ष: डॉ. किरण बेदी

३० वर्षांच्या यशास्वी वाटचालींची  स्मरणिका प्रकाशन

पुणे,  : लिला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) — शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेली सामाजिक संस्था — हिने आपल्या कार्याचा ३० वर्षांचा अभिमानास्पद टप्पा गाठला आहे. या निमित्ताने ३० वा पदव्युत्तर शिष्यवृत्ती वितरण सोहळा रविवार, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी देवांग मेहता ऑडिटोरियम, पर्सिस्टंट सिस्टिम्स, पुणे येथे उत्साहात पार पडला.

या ऐतिहासिक सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे माजी आयपीएस अधिकारी आणि पुदुचेरीच्या माजी राज्यपाल डॉ. किरण बेदी यांची प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती. विशेष म्हणजे, त्या १९९६ मध्ये एलपीएफच्या पहिल्याच पुरस्कार सोहळ्याच्या मुख्य पाहुण्या होत्या. तब्बल ३० वर्षांनंतर त्यांनी पुन्हा त्या मंचावर येऊन इतिहासाची पुनरावृत्ती केली.

डॉ. बेदी म्हणाल्या, “१९९६ मध्ये मला शंका होती की ही संस्था दहा वर्षे टिकेल का. पण जर ती टिकली तर मी पुन्हा येथे येईन, असे मी त्यावेळी म्हटले होते. २००५ मध्ये मी परत आले आणि आज पुन्हा ३० वर्षांनंतर येथे उपस्थित राहून मला अत्यानंद होत आहे. लीला पूनावाला फाउंडेशन एक वट वृक्ष झाला असून हजारो युवतींना बळ देते आहे, जे अभिमानास्पद बाब आहे.  मला खात्री आहे की ही संस्था कायमस्वरूपी चालत राहील.”

या प्रसंगी संस्थापक विश्वस्त फे्रनी तारापोरे, शेर्नाझ एडीबम, माया ठदानी (व्हिडिओ संदेशाद्वारे) आणि  फिरोज पुनावाला उपस्थित होते. सर्व विश्वस्तांनी आपले अनुभव मांडत सोहळ्याला संस्मरणीय स्वरूप दिले.

डॉ. बेदींनी एलपीएफच्या ३० वर्षांच्या कार्यप्रवासावर आधारित स्मरणिका प्रकाशित केली.  पुनावालांनी त्यांना विशेष भेट म्हणून एक भिंतीवरील घड्याळ प्रदान केले आणि म्हणाले, “ही घड्याळ सतत चालणाऱ्या आणि वाढणाऱ्या लिला पुनावाला फाउंडेशनचे प्रतीक आहे.”

समारंभाला १९९६ च्या पहिल्या बॅचमधील अनेक विद्यार्थिनींनी उपस्थिती दर्शवली, काहींनी प्रत्यक्ष आणि काहींनी व्हिडिओ संदेशाद्वारे आपली भावना व्यक्त केली.

डॉ. बेदींनी विद्यार्थिनींना उद्देशून सांगितले, “तीन दशकांपूर्वी मी येथे आले तेव्हा फक्त २० मुली होत्या, आणि आज एलपीएफचे कुटुंब १८,००० पेक्षा अधिक आहे. ही तुमच्या ‘लिला गर्ल्स’ची शक्ती आहे. आता या चळवळीला पुढील अनेक वर्षे चालविण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे.”

सुश्री लिला पुनावाला** यांनी आपल्या भाषणात सांगितले, “आमचे ध्येय केवळ शिष्यवृत्तीपुरते मर्यादित नाही. आम्ही आत्मविश्वासी, सक्षम आणि संवेदनशील महिला नेत्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्यावर विश्वास ठेवून आमच्यासोबत चालणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते.”
एलपीएफने गेल्या तीन दशकांत आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार पुण्याबरोबर वर्धा, अमरावती, नागपूर, हैदराबाद आणि बेंगळुरू येथे केला आहे. संस्थेने पदव्युत्तर आणि पदवी शिष्यवृत्तीबरोबरच शालेय मुलींसाठी ‘2morrow 2gether’ हा विशेष कार्यक्रमही सुरू केला आहे.

३० वर्षांच्या या यशस्वी प्रवासानंतर, फाउंडेशनने २०३० पर्यंत २५,००० आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींचे जीवन सकारात्मकपणे बदलण्याचे ध्येय ठेवले आहे — ज्याचा परिणाम केवळ मुलींवरच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबांवर आणि समाजावरही होणार आहे.

मुंबईतील तृतीयपंथी समुदायाच्या राष्ट्रीय नेत्या डॉ. सलमा खान यांना ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान’

मुंबई, दि. ६ ऑक्टोबर २०२५ —
मुंबईतील तृतीयपंथी समुदायाच्या राष्ट्रीय नेत्या आणि किन्नर मॉं संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सलमा खान यांना ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान’ प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित ‘ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा’ या राज्यस्तरीय कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे आणि वस्तू व सेवा कर विभागाचे विशेष आयुक्त नितीन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सन्मानाने तृतीयपंथी समुदायाच्या कार्यकर्त्यांच्या समाजातील योगदानाची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे.
या सन्मान सोहळ्यात राज्यातील विविध भागांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये कोल्हापूर येथील सुशीला ओडेयर, सांगली येथील चेलनादेवी खुरपे, पुणे येथील अरुण रोडे, छत्रपती संभाजीनगर येथील रमेश दुसे, चंद्रपूर येथील श्रीराम पान्हेरकर आणि मुंबई येथील डॉ. सलमा खान यांचा समावेश होता. तसेच, लातूर ज्येष्ठ नागरिक संघास राज्यस्तरीय संघ सन्मान प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. प्रमोद ढोकले, प्रास्ताविक दत्ता बाळसराफ यांनी केले, तर दीपिका शेरखाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

पूर्व पुणे भागातील रसिकांसाठी ‘स्वरयज्ञ’ ठरली सांगीतिक पर्वणी

बासरीचे स्वर्गीय स्वर, मोहिनी अट्टमची मोहिनी आणि सुश्राव्य गायनातून रसिक आनंदले
एसएनबीपी आयोजित ‘स्वरयज्ञ’ संगीत महोत्सव
पुणे : पद्‌मविभूषण हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरीच्या स्वर्गीय स्वरवर्षाव, मोहिनीअट्टम नृत्याची मोहिनी तर बनारसी घराण्याचे सुश्राव्य गायनाने ‘स्वरयज्ञ’ सांगीतिक मैफल रंगली. पूर्व पुण्यातील यंदाचा महोत्सव सांगीतिक पर्वणी ठरला आहे.
एसएनबीपी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि एस. ई. सोसायटी या येरवडा परिसरातील प्रतिष्ठीत शैक्षणिक संस्थेतर्फे ‘स्वरयज्ञ’ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गेली अनेक दशके ज्यांच्या बासरीच्या सुरांनी रसिकांना स्वर्गीय आनंद दिला आहे, अशा जगविख्यात बासरी वादक पद्‌विभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरी वादनाची मैफल ही या ‘स्वरयज्ञा’चा कळसाध्याय ठरली.
सुरुवातीस प्रसिद्ध समाजसेवक पद्‌श्री गिरिश प्रभुणे, एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूच्या अध्यक्ष डॉ. वृषली भोसले, संचालिका देवयानी भोसले, ॲड. ऋतुजा भोसले, पंडित अरविंदकुमार आझाद, डॉ. रिटा देव, तुषार केळकर, प्रिन्सिपल रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन झाले.
कार्यक्रमाची सुरुवात त्रिवेंद्रम (केरळ) येथील नाट्यविध महाविद्यालयाच्या कलाकारांनी मोहिनीअट्टम नृत्याविष्कारातून गणेश वंदना सादर केली. त्यानंतर आदिशक्तीच शाश्वत स्त्रोत दर्शविणारी नृत्यप्रस्तुती करण्यात आली. सुकुमार भगवान श्रीकृष्ण आणि गोपिकांच्या शृंगाराचे दर्शन घडविणारे नृत्य सादरीकरण रसिकांना विशेष भावले. नृत्यप्रस्तुतीची सांगता करताना ऋतुचक्राचे महत्त्व अधोरेखीत करत आजच्या काळात निसर्गाचा होत असलेला ऱ्हास त्यातून निर्माण झालेले पर्यावरणारचे प्रश्न या विषयी प्रभावी सादरीकरण करण्यात आले. लास्य आणि भावांचे सुंदर मिश्रण असणाऱ्या या नृत्याविष्कारात पद्‌मा, रश्मी, चित्रा, उमा, नवमी यांचा सहभाग होता.
दुसऱ्या सत्रात बनारस घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका डॉ. रिटा देव यांचे सुमधुर गायन झाले. त्यांनी राग बिहाग मधील खयाल सादर करताना ‘परि हो पिया’ ही बंदिश सादर केली. द्रुत लयीत ‘झनन झनन मोरि बाजे पायलिया’ ही पारंपरिक रचना बहारदारपणे सादर केली. मिश्र खमाजमधील ‘का रे मतवारी मन हर ली ना शाम, मद के भरे तोरे नैना’ ही श्रीकृष्णाच्या डोळ्यांचे समर्पक वर्णन करणारी ठुमरी ऐकवून डॉ. रिटा देव यांनी आपल्या गायनाची भुरळ रसिकांच्या मनावर अच्छादिली. त्यांना पांडुरंग पवार (तबला), तुषार केळकर (संवादिनी) यांनी सुरेल साथसंगत केली.
स्वरयज्ञाची सांगता होत असताना स्वरमंचावर पद्‌मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचे आगमन झाले तेव्हा श्रोत्यांमधील प्रत्येक व्यक्तीने आदराने उभे राहून त्यांना टाळ्यांच्या गजरात मानवंदना दिली. पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी मारू बिहाग रागतील आलाप, झपताल आणि तीन तालात निबद्ध रचना ऐकवून रसिकांना संमोहित केले. त्यांच्या बासरीचे सुर रसिकांच्या मनात रेंगाळत राहिले आणि या मैफलीची सांगताच होऊ नये असे भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटले म्हणूनच खास रसिकांच्या आग्रहावरून पंडित चौरासिया यांनी ‘ॐ जय जगदिश हरे’ या भजनाची धून रसिकांना ऐकविली. त्याला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात साथ दिली. पंडित अरविंदकुमार आझाद यांनी तबल्यावर समर्पक साथसंगत केली. ‘स्वरयज्ञाना’ला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
पद्‌श्री गिरिश प्रभुणे म्हणाले, इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून रागदारीवर आधारित उत्तम भारतीय शास्त्रीय संगीत अनुभवायला मिळते आहे ही समाधानाची गोष्ट आहे. या स्वरयज्ञानाच्या माध्यमातून संस्कृतीची पाळेमुळे रूजण्यास मदत होईल.
कलाकारांचा सत्कार डॉ. वृषली भोसले, देवयानी भोसले, डॉ. ॲड. ऋतुजा भोसले, रश्मी शुक्ला यांनी केला.

ढोले पाटील जूनियर कॉलेजच्या गौरी गरुड हिला शालेय जिल्हा स्तर ज्युदो स्पर्धेत द्वितीय क्रमांक

पुणे : ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय चेअरमन मा. सागर जी ढोले पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने प्रेरणा घेऊन महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हा स्तर ज्युदो स्पर्धा (सन २०२५-२६) बालेवाडी,पुणे येथे पार पडली. या स्पर्धेत ढोले पाटील जूनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, खराडी, पुणे येथील विद्यार्थीनी कु. गौरी गरुड हिने उत्तम कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य
प्रा .विठ्ठल गायकवाड सर, विभाग प्रमुख व सर्व अध्यापकांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

जागतिक पातळीवर सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हावा : विनय सहस्रबुद्धे

‌‘पार्थसूत्र‌’ आणि ‌‘बो ॲण्ड बियाँड‌’ पुस्तकांचे प्रकाशन
पुणे : आपल्या संस्कृतिक संचिताचा अविभाज्य आणि अनमोल ठेवा असलेल्या रामायण आणि महाभारताच्या प्रवाभाखाली जगाच्या पाठीवरील खूप मोठी लोकसंख्या आहे. सध्याच्या काळातील संघर्षाची परिस्थिती बघता जगातील सगळ्या घटनांकडे सांस्कृतिकदृष्टीकोनातून बघण्यासाठी सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार झाला पाहिजे, अशी अपेक्षा माजी खासदार विनय सहस्रबुद्ध यांनी व्यक्त केली.
दिलीपराज प्रकाशन प्रकाशित, वैभव केळकर व डॉ. मेघना दलाल लिखित पार्थसूत्र आणि बो ॲण्ड बियाँड या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कर्वेनगर येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी विनय सहस्रबुद्धे बोलत होते. खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्सिस्टंटचे संस्थापक आनंद देशपांडे, प्रकाशक मधुर बर्वे उपस्थित होते.
महाभारतातील अर्जुन ही व्यक्तिरेखा केंद्रस्थानी ठेवून ‌‘पार्थसूत्र‌’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. लेखनाची प्रभावीपणे केलेली मांडणी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल, असे नमूद करून विनय सहस्रबुद्धे पुढे म्हणाले, ललित पद्धतीने पुस्तकाचे लिखाण करण्यात आले असल्याने वेगळेपणा जाणवतो.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, रामायण-महाभारत हे आपल्या संस्कृतीचा ठेवा आहेत. आपल्या आयुष्यात अर्जुनावस्था येते तेव्हा मनातील वैचारिक धागे कृष्ण बनून मार्गदर्शन करीत असतात. अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या नात्यात खूप वेगळेपण आहे. अर्जुनाने प्रश्न विचारले पण श्रीकृष्णाने उत्तर देणे सोडले नाही. संवाद न तुटणे हे दोघांच्या नात्यातील वैशिष्ट्य आहे.
पुस्तक लेखनाविषयी बोलताना मेघना दलाल म्हणाल्या, अर्जुन आणि त्या भोवतीचे महाभारत असे लिखाणाचे कथासूत्र आहे. आजच्या काळाशी अन्वयार्थ लावत केलेले लिखाण म्हणजे हे पुस्तक होय. नायक म्हणून अर्जुनाची निवड का केली याविषयी वैभव केळकर यांनी मनोगत व्यक्त केले.

छायाचित्रकार मंगेश पवार यांचे निधन

पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी सदस्य आणि छायाचित्रकार मंगेश विलास पवार (वय 40) यांचे रविवारी पहाटे पुण्यात आकस्मिक निधन झाले. पवार यांच्यावर रविवारी रात्री ता. माढा, जि. सोलापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि भाऊ असा परिवार आहे. पुण्यातील विविध वृतपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमध्ये छायाचित्रकार आणि कॅमेरामन म्हणून त्यांनी काम पाहिले.

ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे एकनाथ शिंदेंना समाजस्नेह पुरस्कार

पुणे : ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्ताने देण्यात येणारा ‘समाजस्नेह पुरस्कार’ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. दत्त संप्रदायातील महत्त्वाचे क्षेत्र असणाऱ्या कर्नाटकातील श्री माणिकप्रभू संस्थानचे पीठाधीश ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांच्या हस्ते पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात रविवारी (ता. १२) सायंकाळी सहा वाजता हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ‘या पुरस्कारासोबतच समाजभूषण, युवा गौरव पुरस्काराचे वितरण देखील याप्रसंगी होणार आहे.
‘‘समर्थ रामदास स्वामींचे भक्त असणाऱ्या शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री पदावर करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे ते नेते आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव ब्राह्मण समाजातर्फे व्हावा, अशी पुरस्कार निवड समितीची मनापासून इच्छा आहे. शिंदेंच्या या सन्मानामुळे समाजातील एकोपा अधिक वाढण्यास मदत होईल’’ असे मत संस्थेचे कार्याध्यक्ष पं. अतुलशास्त्री भगरे यांनी व्यक्त केले.
याआधी हा पुरस्कार उज्वल निकम, शेषराव मोरे, भरतकुमार राऊत, देशाचे माहिती आयुक्त उदय माहूरकर आदी मान्यवरांना देण्यात आला आहे. कार्यक्रमास जास्तीतजास्त समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक अंकित काणे यांनी केले आहे.

   महिलांना पाठिंबा आणि सन्मान देणे गरजेचे   

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे मत : श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे ‘नारी तू नारायणी’ या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन

 पुणे : नवरात्रीत देवीने असुर शक्तीशी लढा दिला तेव्हा सर्व देवतांनी तिला आपापले शस्त्र दिले आणि लढ्यात पाठिंबा दिला. लढा संपल्यानंतर तिच्या उग्र रूपाला शांत करण्यासाठी भगवान शंकर तिच्या पायाखाली आले. या कथेतून हे स्पष्ट होते की देवी ही सर्व शक्तींची मूळ आहे आणि तिच्या पायाखाली भगवान शंकर येणे हे शक्ती, भक्ती आणि सन्मान याचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे, आज अहंकार बाजूला ठेवून महिलांना पाठिंबा देण्याची आणि त्यांचा सन्मान करण्याची गरज आहे, असे मत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले. 

सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने नारी तू नारायणी या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यंदाचा पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या मीरा बडवे, सिस्टर ल्युसी कुरियन आणि पूजा मिसाळ यांना प्रदान करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, डॉ.तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते. 

खासदार डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, पूर्वी महिलांचे कर्तृत्व अनेक अडथळ्यांमुळे मर्यादित होते, पण आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करत आहे. आज महिला पैसे कमवायला शिकल्या आहेत, पण ते कसे वापरायचे हे शिकणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आजही अनेक महिलांचे सर्व आर्थिक व्यवहार त्यांच्या घरातील पुरुष पाहतात. महिलांनी केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम न होता, आर्थिक व्यवहारात स्वावलंबी झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. 

पुरस्कार स्वीकारताना ल्युसी कुरियन म्हणाल्या, जेव्हा मला पुरस्कार मिळतो, तेव्हा मी परमेश्वराला विचारते की मी या योग्यतेची आहे का?  ही गोष्ट मला प्रेरणा देते आणि मी आणखी मेहनत करते. आज माझं वय ७० आहे, तरीही मी पुढे काम करत राहणार आहे.

मीरा बडवे म्हणाल्या, माझ्या प्रत्येक मुली वेगवेगळ्या क्षेत्रात सक्षमपणे काम करत आहेत. मग त्यांना अनाथ किंवा अंध का म्हणावे? त्यांची प्रगती बघून मला आणखी काम करण्याची प्रेरणा मिळते. पूजा मिसाळ म्हणाल्या, आज पुरस्कार मिळाल्यावर वाटतं की आपण योग्य मार्गावर आहोत. आज ज्यांना पुरस्कार मिळाले आणि ज्यांनी ते पुरस्कार दिले, त्या दोघीही समाजातील इतरांसाठी काम करत आहेत. अशा व्यक्तींची प्रेरणा घेवून पुढे आणखी काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. 

मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, निलेश लद्दड, मुरली चौधरी, राजेश सांकला आदींनी उत्सवाचे आयोजन केले होते. 

राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्यानगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत जाहीर

मुंबई, दि. 6 : राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी नगर विकास विभागांचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, उपसचिव प्रियांका कुलकर्णी, छापवाले, उपसचिव विद्या हम्पय्या, अनिरुद्ध जेवळीकर, यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यातील 247 नगरपरिषदेपैकी 33 पदे अनुसूचित जातींसाठी व 11 पदे अनुसूचित जमातीसाठी आणि 67 पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत. तर 136 पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

नगरपरिषद आरक्षण पुढील प्रमाणे :-
नगर परिषदांमधील अनुसूचित जातीसाठी आरक्षित पदे (एकूण 33 पदे)
• अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित नगरपरिषद (17 पदे)-

  1. देऊळगाव राजा, 2. मोहोळ, 3. तेल्हारा, 4. ओझर, 5. वाना डोंगरी (नागपूर), 6. भुसावळ, 7. घुग्घुस, 8. चिमूर, 9. शिर्डी, 10. सावदा, 11. मैंदर्गी, 12. डिगडोह(देवी), 13. दिग्रस (यवतमाळ), 14. अकलूज, 15. परतूर, 16. बीड, 17. शिरोळ
    • अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (सर्वसाधारण) आरक्षित नगरपरिषद (16 पदे)
  2. पांचगणी, 2. हुपरी, 3. कळमेश्वर, 4. फुरसुंगी ऊरुळी-देवाची, 5. शेगांव, 6. लोणावळा, 7. बुटीबोरी, 8. आरमोरी, 9. मलकापूर, जि.सातारा, 10. नागभिड, 11. चांदवड, 12. अंजनगांवसूर्जी, 13. आर्णी, 14. सेलू, 15. गडहिंग्लज, 16. जळगांव-जामोद,
    अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित नगर परिषदा :-
    अनुसुचित जमातीसाठी एकूण 11 पदांपैकी 6 पदे महिलांसाठी आरक्षित आहेत.
    • अनुसुचित जमाती महिलांसाठी आरक्षित (6 पदे)
  3. पिंपळनेर, 2. शेंदूरजनाघाट, 3. भडगांव, 4. यवतमाळ, 5. उमरी, 6. वणी
    • अनुसुचित जमाती सर्वसाधारण प्रवर्ग (5 पदे)
  4. पिंपळगांव-बसवंत, 2. राहुरी, 3. एरंडोल, 4. अमळनेर, 5. वरुड

नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी नगर परिषदा :-
एकूण 247 नगरपरिषदांमधून 67 पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत.
• नागरिकांचा मागास प्रवर्गातील (सर्वसाधारण) आरक्षित पदे (33 पदे)

  1. तिरोडा, 2. वाशिम, 3. भद्रावती, 4. परांडा, 5. नंदुरबार, 6. खापा, 7. शहादा, 8. नवापूर, 9.त्र्यंबक, 10. कोपरगांव, 11. मंगरुळपीर, 12. कन्हान-पिंपरी, 13. पाथर्डी, 14. रामटेक, 15, नशिराबाद, 16.पालघर, 17. वरणगांव, 18. मलकापूर, जि.बुलडाणा, 19. इस्लामपूर, 20. मोहपा, 21. तुमसर, 22. महाड, 23. राहता, 24. श्रीवर्धन, 25. ब्रम्हपूरी, 26. दर्यापूर, 27. वैजापूर, 28. गोंदिया, 29. सांगोला, 30. वर्धा, 31. येवला, 32. कंधार, 33. शिरपूर-वरवाडे.
    • नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव पदे (34 पदे)
  2. धामणगांव रेल्वे, 2. भोकरदन, 3. भगूर , 4. मालवण , 5. वरोरा , 6. हिंगोली , 7. मोर्शी , 8. उमरेड , 9. हिवरखेड , 10. बाळापूर , 11. शिरुर , 12. कुळगांव-बदलापूर , 13. देगलूर , 14. नेर-नबाबपूर , 15. धाराशिव , 16. इगतपूरी , 17. माजलगांव , 18. मुल , 19. बल्लारपूर , 20. जुन्नर , 21. कुर्डूवाडी , 22. औसा , 23. मुरुड-जंजिरा , 24. अकोट , 25. विटा , 26. चोपडा , 27. सटाणा , 28. काटोल , 29. दौंड , 30. रोहा , 31. देसाईगंज , 32. पुलगांव , 33. कर्जत, जि.रायगड , 34. दोंडाईचा-वरवाडे.
    खुल्या प्रवर्गातील नगर परिषदांचे आरक्षित
    एकूण 247 पैकी 136 पदे ही खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असून यापैकी 68 पदे ही महिलांसाठी राखीव आहेत.
    खुला प्रवर्ग (सर्वसाधारण)
    1 फलटण, 2 अहमदपूर, 3 पाथरी, 4 चाळीसगांव, 5 तळोदा, 6 वाई, 7 नांदगांव, 8 जयसिंगपूर, 9 निलंगा, 10 लोहा, 11 खोपोली, 12 राजगुरूनगर
    13 कराड, 14 जेजुरी, 15 उमरगा, 16 आळंदी, 17 पुसद, 18 बारामती
    19 जत, 20. पारोळा, 21 तळेगांव-दाभाडे, 22 सासवड, 23 गडचांदुर, 24 रिसोड, 25 वेंगुर्ला, 26 पातूर, 27 किल्लेधारुर, 28 चिखली, 29 मेहकर, 30 दारव्हा, 31 सिल्लोड, 32 सिन्नर, 33 देवळी, 34 मुरूम, 35 वडगांव, 36 महाबळेश्वर, 37 आष्टा, 38 दुधणी, 39 कुंडलवाडी, 40 खुलताबाद, 41 नरखेड, 42 राजूरा, 43 सिंदखेडराजा, 44 वाडी, 45 डहाणू, 46 देवळाली-प्रवरा, 47 कामठी, 48 अक्कलकोट, 49 सातारा, 50 भोर, 51 इंदापूर, 52 चिपळून, 53 माथेरान, 54 श्रीगोंदा, 55 श्रीरामपूर, 56 मनमाड, 57 नळदुर्ग, 58 भोकर, 59 बिलोली, 60 अंबेजोगाई, 61 जिंतूर, 62 सोनपेठ, 63 गंगापूर, 64 पांढरकवडा, 65 घाटंजी, 66 मुर्तीजापूर, 67 चिखलदरा, 68 तुळजापूर.
    खुला प्रवर्गाताली महिलांसाठी नगरपरिषदा
  3. परळी-वैजनाथ, 2. मुखेड, 3. अंबरनाथ, 4. अचलपूर ,5. मुदखेड 6. पवणी 7. कन्नड , 8. मलकापूर, जि.कोल्हापूर , 9. मोवाड , 10. पंढरपूर , 11. खामगांव , 12. गंगाखेड , 13. धरणगांव , 14. बार्शी , 15. अंबड , 16. गेवराई , 17. म्हसवड , 18. गडचिरोली , 19. भंडारा , 20. उरण , 21. बुलडाणा , 22. पैठण , 23. कारंजा , 24. नांदुरा , 25. सावनेर , 26. मंगळवेढा , 27. कळमनूरी , 28. आर्वी , 29. किनवट , 30. कागल , 31. संगमनेर , 32 मुरगुड , 33 साकोली , 34 कुरुदंवाड , 35 पुर्णा , 36 कळंब , 37 चांदुररेल्वे , 38 चांदुरबाजार , 39 भुम , 40 रत्नागिरी , 41 रहिमतपूर , 42 खेड , 43 करमाळा , 44 वसमत, 45 हिंगणघाट , 46 रावेर , 47 जामनेर , 48 पलुस , 49 यावल , 50 सावंतवाडी , 51 जव्हार, 52 तासगांव , 53 राजापूर , 54 सिंधीरेल्वे , 55 जामखेड , 56 चाकण , 57 शेवगांव, 58 लोणार, 59 हदगांव, 60 पन्हाळा, 61 धर्माबाद, 62 उमरखेड, 63 मानवत, 64 पाचोरा , 65 पेण , 66 फैजपूर , 67 उदगीर, 68 अलीबाग.
    नगर पंचायतीचे आरक्षण
    राज्यातील 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण आज काढण्यात आले. यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण 18 जागा आरक्षित असून यामध्ये महिलांसाठी 9 व सर्वसाधारण साठी 9 पदे आरक्षित आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी 13 जागा असून त्यामध्ये 7 जागा महिलांसाठी व 6 जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 40 पदे आरक्षित असून त्यामध्ये 20 जागा महिलांसाठी व 20 जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. खुल्या प्रवर्गासाठी एकूण 76 जागा असून 38 जागा महिलांसाठी व 38 जागा या सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहेत.
    अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव :-
    महिलांसाठी आरक्षित नगरपंचायती (9 पदे)
    1 .निलडोह, 2. गोधनी(रेल्वे), 3. कोरची, 4. बहादुरा , 5. धानोरा, 6. गौंडपिंपरी, 7. ढाणकी , 8. अहेरी , 9. बेसा-पिपळा अनुसूचित जाती प्रवर्ग (सर्वसाधारण)
    येरखेडा, कांद्री (कन्हान), भिसी, कुरखेडा, देवरी, माळेगांव(ब्रु.), बिडगांव-तरोडी (खुर्द)-पांढुर्णा, भातकुली, दहीवडी.
    अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव:-
    महिलांसाठी आरक्षित नगर पंचायती (7 पदे)
    भिवापूर, अर्जुनी-मोरगांव, सिरोंचा , हिंगणा, समुद्रपूर, पाली, देवळा.
    अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) (6 पदे)
    कोरपणा, कळंब, माणगांव, गोरेगांव, सेलू , सिंदेवाही

नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राखीव (40 पदे) :-
• सर्वसाधारण गटासाठी आरक्षित (20 पदे)
पारनेर, तळा, खानापूर, पालम, मंठा, कोंढाळी, माळशिरस , एटापल्ली, झरी-जामणी, पोंभूर्णा , माहूर, आटपाडी, मालेगांव-जहांगिर, तिर्थपूरी, कणकवली, शिरुर-कासार, विक्रमगड, अकोले , मोखाडा, सुरगणा.
• नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित (20 पदे)
घनसावंगी, भामरागड, मंचर, पाटोदा, माढा, कळवण, सावली, मानोरा, मारेगांव, आष्टी, जि.वर्धा, तलासरी, वडवणी, पोलादपूर, खालापूर, शिरुर-अनंतपाळ, जाफ्राबाद, चाकूर, आष्टी, जि.बीड, जिवती, कर्जत, जि.अहिल्यानगर.

खुल्या प्रवर्गासाठी नगर पंचायती (एकूण 76 पदे)
• खुला (सर्वसाधारण) (38 पदे)
शेंदूर्णी , साक्री, सालेकसा, कवठे-महांकाळ, देवणी, मोताळा, अर्धापूर, बोदवड, हिमायतनगर, कसई-दोडामार्ग, मुलचेरा, धडगांव-वडफळ्या, कुडाळ, कोरेगांव, दापोली, वाभवे-वैभववाडी, निफाड, चंदगड, चार्मोर्शी, बदनापूर, कारंजा, धारणी, फुलंब्री, हातकणंगले, लोहारा (ब्रु.), मुरबाड, केज, आजरा, संग्रामपूर, खंडाळा, वडूज, देवगड-जमसंडे, नेवासा, मौदा, शिराळा (जि.सांगली), नायगाव, सेनगाव, महागाव.
• खुला प्रवर्गातील महिलांसाठी :- (पदे 38)

आरक्षण सोडत पारदर्शकपणे राबविली – राज्यमंत्री माधुरी मिसाळ
राज्यातील नगरपरिषदा व नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली, असे सांगून महिला प्रवर्गासाठी आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या भगिनींना तसेच या निवडणुकीसाठी सर्वांना नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी शुभेच्छा दिल्या.

कट्टर शिवसैनिक संजय लोणकर यांचे निधन

पुणे- नगर जिल्ह्यात शिवसेनेचा जोरदार प्रसार करणारे,शिवसेनेचे पहिले संपर्क प्रमुख संजय निवृत्ती लोणकर यांचे रविवारी (दि.५) पहाटे निधन झाले. ते ६४ वर्षे वयाचे होते.त्यांच्या मागे पत्नी, दोन भाऊ, दोन विवाहित बहिणी, दोन मुले, नात असा परिवार आहे.धनकवडी स्मशान भूमी येथे काल सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवसेनेचे नगर जिल्ह्याचे माजी उपजिल्हाप्रमुख अरुण पाटील तसेच पुण्यातील रमेश बोडके,रघुनाथ कुचिक,उमेश वाघ यांच्या सह अभय छाजेड,संदीप खर्डेकर, अप्पा परांडे आणि नगर जिल्ह्यातील अनेक जुन्या जाणत्या शिवसैनिकांनी त्यांच्या निधनाबद्दल हळ हळ व्यक्त केली आहे.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक अशी ओळख असणारे संजय लोणकर यांनी तत्कालीन अहमदनगर आणि आताचा अहिल्यानगर जिल्हा शिवसेनेचे पहिले संपर्क प्रमुख होते जेव्हा सुहास वहाडणे हे जिल्हाप्रमुख होते या दोघांच्या निवडी शिवसेनेत खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पहिल्या वहिल्या नियुक्त्या होत्या.लोणकर यांच्या नंतर साबिरभाई शेख नगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख झाले होते,त्यानंतर युतीच्या राज्यात साबीर भाई कामगार मंत्री देखील झाले.
.श्रीरामपूर जिल्हा व्हावा म्हणून स्थापन करण्यात आलेल्या श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष पद लोणकर यांनी भूषविले होते.नगर जिल्ह्यातील पहिला मोर्चा लोणकर यांच्या नेतृत्वाखाली राहुरी येथे काढला गेला. शिवसेनेच्या नगर जिल्ह्यातील इतिहासातील या पहिल्या खुणा ठरल्या. ‘युक्रांद’ चे संस्थापक माजी आमदार डॉ.कुमार सप्तर्षी, बबनराव पाचपुते यांच्या बरोबर लोणकर यांनी काही काळ राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम केले आहे.ज्येष्ठ पत्रकार अरुण लोणकर आणि शरद लोणकर यांचे ते थोरले बंधू होत.

बिहारमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका:6 आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान, 14 नोव्हेंबरला निकाल

पाटणा – बिहारमधील २४३ विधानसभेच्या जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील. निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारी ४ वाजता पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

निवडणुकीच्या घोषणेपासून मतमोजणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया एकूण ४० दिवस चालेल. २०१० मध्ये निवडणूक प्रक्रिया ६१ दिवस, २०१५ मध्ये ६० दिवस आणि २०२० मध्ये ४७ दिवस चालली. अशा प्रकारे, यावेळी गेल्या १५ वर्षातील सर्वात कमी कालावधीत निवडणुका पूर्ण होतील.

बिहारमध्ये मतदानाचा पहिला टप्पा छठ नंतर आठ दिवसांनी होईल. सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिवाळी आणि छठ नंतर मतदानाच्या तारखा ठेवण्याचे आवाहन केले होते.बिहारमध्ये ४० वर्षांनंतर दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. यापूर्वी १९८५ मध्ये दोन टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. राज्यात २४३ जागा आहेत, ज्यामध्ये अंदाजे ७४.२ दशलक्ष मतदार आहेत, ज्यात १०० वर्षांवरील १४,००० मतदारांचा समावेश आहे. मतदान केंद्रांवर प्रवास करण्यास असमर्थ असलेले लोक फॉर्म १२डी भरून घरून मतदान करू शकतील. राज्यातील १४ लाख लोक पहिल्यांदाच मतदान करतील. बिहारमध्ये मतदान केंद्रांवर मोबाईल फोन घेऊन जाण्याची परवानगी असेल.

२०२० मध्ये बिहारच्या निवडणुका तीन टप्प्यात झाल्या. २० ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत मतदान झाले. निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. यापूर्वी २०१५ मध्ये पाच टप्प्यात मतदान झाले. १२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत मतदान झाले. निवडणुकीचे निकाल ८ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले.

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला वाढती पसंती,गेल्या ३ महिन्यांत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग

पर्यावरणस्नेही ७ लाखांवर ग्राहकांना ८ कोटींचा फायदा

मुंबई, दि. ६ ऑक्टोबर २०२५: वीजबिलांच्या छापील कागदांचा वापर बंद करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या ‘गो-ग्रीन’ योजनेला वीजग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल २ लाख ३ हजार ३४० वीजग्राहकांनी या योजनेत सहभाग घेतला आहे.

वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘इमेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडून सोमवार (दि. ६) पर्यंत लघुदाब वर्गवारीतील पर्यावरणस्नेही ७ लाख ६ हजार ९२४ ग्राहक या योजनेत सहभागी झाले आहे व त्यांना ८ कोटी ४८ लाख ३० हजार ८८० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे.

‘गो-ग्रीन योजनेतील वीजग्राहकांचा वाढता प्रतिसाद सहभाग स्वागतार्ह आहे. त्यांना वीजबिल डिजिटल स्वरुपात पाठवले जात आहे. पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे’, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी केले आहे.

गेल्या तीन महिन्यांत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग – वीजग्राहकांसाठी ऐच्छिक असलेल्या गो-ग्रीन योजनेला राज्यात प्रतिसाद वाढत आहे. विशेष म्हणजे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये २ लाख ३ हजार ३४० ग्राहकांची या योजनेत भर पडली आहे. यात सर्वाधिक पुणे प्रादेशिक विभागातील ८७ हजार ४० ग्राहकांचा तर कोकण प्रादेशिक विभागातील ७८ हजार ८२९ ग्राहकांचा समावेश आहे.

या योजनेत आतापर्यंत ७ लाख ६ हजार ९२४ पर्यावरणस्नेही वीजग्राहक सहभागी झाले आहेत. या ग्राहकांना ८ कोटी ४८ लाख ३० हजार ८८० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. यामध्ये (कंसात आर्थिक फायदा रूपयांत) पुणे प्रादेशिक विभागात सर्वाधिक २ लाख ८८ हजार २३८ (३.४६ कोटी), कोकण- २ लाख ६२ हजार २३७ (३.१५ कोटी), नागपूर प्रादेशिक विभाग- ८४ हजार ५३१ (१.०१ कोटी) आणि छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागामध्ये योजनेत सहभागी ७१ हजार ९१८ वीजग्राहकांना ८६ लाख ३० हजार रूपयांचा वार्षिक फायदा होत आहे.

असे व्हा योजनेत सहभागी – गो-ग्रीन योजनेसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाइटवर किंवा मोबाईल अॅपवर नोंदणी करण्याची स्वतंत्र सोय उपलब्ध आहे. केवळ ग्राहक क्रमांक सबमीट करावे लागेल व छापील बिलाची प्रत रद्द करून संबंधितांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक व इमेलवर दरमहा बिल पाठविण्यात येईल. नोंदणीकृत मोबाईल किंवा इमेल बदलण्याची सोय देखील त्याच ठिकाणी उपलब्ध आहे.    

वार्षिक १२० रूपयांचा फायदा – महावितरणकडून गो-ग्रीनचा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. यात ग्राहकांचा वीजबिलामध्ये वार्षिक १२० रुपयांचा फायदा होत आहे. विशेष म्हणजे गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या पहिल्याच वीजबिलामध्ये पुढील १२ महिन्यांची म्हणजे १२० रुपयांची सवलत एकरकमी देण्यात येत आहे.

गो-ग्रीन योजनेचे फायदे – गो-ग्रीन सहभागी झालेल्या ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत ‘इमेल’वर व मोबाईल ‘एसएमएस’द्वारे दरमहा वीजबिल पाठविण्यात येत आहे. वीजबिलांच्या तारखेपासून सात दिवसांमध्ये रकमेचा तत्पर भरणा केल्यास एक टक्के सवलत दिली जाते. त्यासाठीही ऑनलाईन बिल भरणे सोयीचे झाले आहे. इमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणक किंवा मोबाइलमध्ये जतन करून ठेवता येते. आवश्यकतेप्रमाणे वीजग्रा

काश्मीर मध्ये आतंकवाद संपविण्यासाठी महिलांचे शिक्षण आणि सक्षमीकरण महत्वाचे – अधिक कदम

राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे” आयोजन

पुणे-जम्मू काश्मीर मध्ये आतंकवादाचा परिणाम हा थेट महिला आणि मुले यांच्यावर होत असतो. एक महिलाच घराला स्थैर्य देऊ शकते. ज्याठिकाणी महिलेस प्राधान्य मिळत नाही ती अस्वस्थ होते आणि त्याजागी अशांतता नांदत असते. आतंकवाद संपविण्यासाठी महिलांचे शिक्षण आणि सक्षमीकरण महत्वाचे आहे. महिलांनी शिक्षण घेऊन पुन्हा काश्मीर मध्ये जाऊन वास्तव्य केले पाहिजे यासाठी “बसेरा ई तबस्सुम “हा उपक्रम काश्मीर मध्ये आम्ही राबवत आहे.याद्वारे अनेक मुली शिक्षण घेऊन कुटुंब सुव्यवस्थित करू शकतील. पुढील पिढीतील मुलांच्या मागे खंबीरपणे पाठबळ देण्यासाठी हे आवश्यक आहे. काश्मीर मध्ये बदल घडवण्यासाठी ही दीर्घकालीन योजना  असल्याचे मत बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे प्रमुख अधिक कदम यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे ” राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे” आयोजन गांधी भवन कोथरूड याठिकाणी करण्यात आले आहे. यामध्ये” काश्मीर आणि मी “या विषयावर बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे प्रमुख अधिक कदम यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजी सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, विश्वस्त सचिव अन्वर राजन, एम एस जाधव,नीलिमा जोशी, स्वप्नील तोंडे, तेजस भालेराव उपस्थित होते.

अधिक कदम म्हणाले, १९९७ मध्ये मी काश्मीर मध्ये कुपवाडा जिल्ह्यात एका गावात युनिसेफ प्रकल्प होता त्यासाठी बहिणी भारती सोबत गेलो होतो. त्यावेळी एका संध्याकाळी आम्ही दुचाकी गाडीवर जात असताना तीन जण मला रस्त्यात भेटले आणि त्यांच्या हातात एके ४७ सारखे काहीतरी संशयास्पद दिसले लवकरच ते आतंकवादी असल्याचे स्पष्ट झाले. माझी गाडी काहीजणांनी अडवली आणि सामानाची तपासणी केली. त्यांच्याशी बोलताना त्यातील एकजण पुण्यात भारती महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणास प्रवेश घेण्यासाठी आला होता असे समजले. नंतर तो काश्मीर मध्ये गेल्यावर काहीजणांच्या संपर्कात येऊन पाकिस्तानला गेला आणि त्याचा आयुष्याचा मार्ग बदलला. त्यांनी आम्हाला जीवे मारणार नाही असे सांगितले. मात्र, या घटनेमुळे  माझे देखील जीवन बदलले. काश्मीर माझ्यासाठी गुरू स्थानी आहे. वयाच्या १८ व्या वर्षी मी काश्मीरला गेलो.त्यानंतर मागील २९ वर्षात मी काश्मीर मध्ये अनेकवेळा गेलो पण कधी हॉटेल मध्ये राहिलो नाही तर स्थानिक लोकांच्या घरी राहिलो. वेगवेगळ्या गावात जाऊन लोकांच्या घरात राहून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. काश्मीर आणि मी विषयावर बोलताना मला जाणवते की, “मी”  हा अहंकारी शब्द असून प्रत्येकजण आपापल्या परीने काश्मीर मध्ये लक्ष्य घालत असल्याने अनेक अडचणी वाढल्या आहे.बुलेटचा कोणता धर्म नसून त्याला केवळ लक्ष्य भेद करणे माहिती असते. मला जीवे मारण्यासाठी दोन ते तीन वेळा प्रयत्न झाला पण माझ्या कामामुळे आणि स्थानिक सहकार्य यामुळे माझी सुटका झाली. काश्मीर मधील माझ्या कामाचा प्रवास हा त्या त्याक्षणी उभे राहण्याची क्षमता यामुळे लोकांची कामे करू शकत आहे. काश्मीर मध्ये बोगस स्वयंसेवी संस्था यामुळे खराब परिस्थिती काही प्रमाणात झाली आहे. त्याठिकाणी आम्ही चांगले काम उभे करू शकलो. काश्मीर मध्ये सध्या तीन तुकडे झाले असून पाकिस्तान, भारत आणि चीन सगळेच आपापले हक्क सांगत आहे. भारताकडे  काश्मीरचा मोठा भाग आहे. आपल्याला जम्मू काश्मीर माणसे सोबत असेल तरच तो प्रदेश आपल्याकडे आहे. माणसेच संस्कृती पुढे नेण्याचे काम करतात त्यामुळे ते टिकवणे आवश्यक आहे. काश्मीर मधील संस्कृती पुरातन आहे. विविधता त्याठिकाणी दिसून येते कारण हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शिया असे विविध लोक दिसून येतात. कलम ३७० तरतूद ही त्यावेळी तो भाग सोबत रहावा यासाठी केली होती. पण नंतरच्या काळात त्याचा वेगळा अर्थ घेतला गेला. कायम हा भाग वादाचा राहिलेला असून त्याचा सर्वांगीण विचार करून बदल घडणे महत्वपूर्ण आहे.

कुमार सप्तर्षी म्हणाले, निःस्वार्थ सेवा काहीजण करतात मात्र, आता स्वार्थी काही लोक दिसून येतात. अधिक कदम यांना काश्मीर वेदनाची तार छेडली गेली आणि त्यातून आदर्श काम उभे राहत आहे हे महत्वपूर्ण आहे. धर्म हा माणसाला जीवन जगण्यास मदत करत असतो पण, धर्माच्या नावाने कोणी हिंसा करणे योग्य नाही.

लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, कागदावर आपण देश निर्माण करतो पण प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे बॉर्डरलेस काम करणे महत्त्वपूर्ण आहे. काश्मीर प्रश्न हा जुना असून जटिल आहे. काश्मीर बाबत मी दोन कादंबरी लिखाण सध्या करत आहे. भारतात काश्मीर हा तत्कालीन परिस्थितीमुळे राजा हरिसिंग यांच्या पुढाकाराने आला.  काश्मीर मध्ये सध्याच्या काळात शांतता राहणे गरजेचे आहे.