Home Blog Page 2890

पुण्याच्या शशांक वाघ यांना ‘डॉ. बी. आर. आंबेडकर प्रेरणा सन्मान’ पुरस्कार जाहीर

0

पुणे-देशातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने दूरदृष्टीने काम करीत देश सामर्थ्यवान बनवणार्‍या व्यक्तींना ‘धम्मा विरियो फाउंडेशन’ तर्फे दरवर्षी पुरस्कार देऊन गौरवले जाते. यंदा तंत्रज्ञानाचा वापर वाढवून जनतेचे जीवन उंचावण्यासाठी प्रयत्न करणार्‍या पुण्याच्या शशांक वाघ यांना‘धम्मा विरियो फाउंडेशन’तर्फे यंदाचा ‘डॉ. बी. आर. आंबेडकर प्रेरणा सन्मान’ देऊन गौरवले जाणार आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. 22 जुलै 2019 रोजी सायं. 4.00 वाजता नवी दिल्लीतील कॉस्टिट्युशन क्लब येथे होणार असून केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पास्वान यांच्या मुख्य उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होईल. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय पशुपालन मंत्री गिरीराज सिंग, केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा,केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्य मंत्री किरण रिजिजू, केंद्रीय संसदीय राज्य मंत्री अर्जुन मेघवाल, केंद्रीय समाजकल्याण राज्य मंत्री रामदास आठवले यांसह अनेक खासदार उपस्थित राहणार आहेत.

            पुण्याचे शशांक वाघ हे बँकींग तज्ञ असून वेगवेगळ्या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान भारतात आणून भारतीयांचा जीवनस्तर सुखात आणि काळानुसार अद्ययावत करण्याची महत्वाचे कार्य ते करीत आहेत.

बिनतारी संदेश यंत्रणेद्वारा इंटरनेटचे संदेश ग्रामीण भागात, दुर्गम भागात पोहचवणे, शहरी भागात अद्ययावत अ‍ॅटोमॅटिक मीटर रिडिंग यंत्रणेद्वारा जनजीवन सुसह्य करणे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये स्टेमसेल द्वारा कॅन्सर, डायबेटीस, अर्धांगवायू अशा दुर्धर रोगांवर वाजवी दरांमध्ये परदेशातील उपचार पद्धती भारतात उपलब्ध करून देणे आणि बर्फावरील खेळ भारतासारख्या उष्णकटीबंधीय देशात उपलब्ध करून देणे या क्षेत्रात ते काम करीत आहे.

प्रख्यात रॅम्बो सर्कस कात्रज येथे वॉटर प्रूफ व फायर प्रूफ तंबूत सुरू

0

पुणे- प्रख्यात रॅम्बो सर्कस पुण्यातील कात्रज – कोंढवा मार्गावरील शिवगौरक्षा ग्राउंड येथे सुरू झाली असून रोज दुपारी 1, दुपारी 4 आणि सायंकाळी 7 वाजता असे तीन शो होणार आहेत. येथे पार्किंगची देखील सोय करण्यात आली आहे.

     रॅम्बो सर्कसचा तंबू 145 फूट – 110 फूट असून संपूर्ण तंबू वॉटर प्रूफ व फायर प्रूफ आहे. या सर्कसमध्ये 80 स्त्री-पुरूष कलावंत असून त्यामध्ये उझबेकीस्तान आणि नेपाळ येथील कलावंत आहेत. सर्कसमध्ये 3 विदूषकही आहेत. विविध कसरतींसाठी प्रसिद्ध असलेल्या रॅम्बो सर्कसमध्ये ट्रॅपिझ, जर्मन व्हील, ग्लोब ऑफ डेथ, रोलाबोला, डॉग मॅथेमॅटिक्स, डॉग शो, पोनी शो, एरियल रिंग,हुला हूप, व्हील ऑफ डेथ, ग्रुप सायकल आदी खेळांचा समावेश आहे. यामध्ये 12 कुत्री व 2 घोडे असून रिंगणात विविध रंगांचे रूमाल ठेवल्यावर प्रेक्षक सांगतील त्या रंगाचे रूमाल घोडे उचलतात हे विशेष आकर्षण असणार आहे

प्रियांका अखेर पीडित कुटुंबीयांना भेटल्या

0

मिर्झापूर -जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचा विरोध डावलून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी अखेर आज (शनिवारी) सोनभद्र हत्यांकाडातील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. ‘प्रशासनाने पीडितांचे रक्षण करण्याची आवश्यकता असून, ही घटना घडत असतानाच त्यांना मदत करायला हवी होती. प्रशासनाची मानसिकता आकलनापलिकडे असून प्रसारमाध्यामांनी प्रशासनावर दबाव टाकायला हवा,  अशा शब्दांत प्रियांका यांनी या भेटीनंतर आपले मत व्यक्त केले.

प्रियांका गांधी वड्रा रात्रीपासूनच मिर्झापूरमधील चुनार गेस्ट हाऊसवर थांबल्या होत्या. आज सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रियांका गांधींना भेटून पीडितांना भेटू नये अशी पुन्हा एकदा विनंती केली. मात्र, प्रियांकांनी पोलीस आणि अधिकाऱ्यांची विनंती फेटाळून लावली. जो पर्यंत मी पीडितांची भेट घेत नाही, तो पर्यंत इथून जाणार नाही. आणि जिल्हा प्रशासनाने मला भेट घेऊ दिली नाही, तर प्रशासनाला सोयीचे असेल अशा ठिकाणी आपण पीडितांची भेट घेऊ, असे प्रियांका यांनी स्पष्ट केले होते. मात्र, आज सकाळी बळींच्या कुटुंबांतील १५ जण मिर्झापूर गेस्ट हाऊसला पोहोचले आणि त्यांनी प्रियांकांची भेट घेतली.

प्रियांका यांच्या भेटीसाठी पीडित गेस्ट हाऊसला आल्याचे समजताच जिल्हा प्रशानाचाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना प्रियांकाला भेटण्यास मनाई केली. हे समजताच प्रियांका यांनी पुन्हा धरणे आंदोलन केले आणि त्यांना आपल्याला भेटू देण्याची मागणी केली. त्यानंतर भेटीची परवानगी देण्यात आली.

पीडितांची प्रियांकांशी भेट झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. प्रियांका यांच्या डोळ्यांमधून देखील अश्रू वाहिल्याचे दिसले अशी माहिती काँग्रेस कार्यकर्ते विवेकानंद पाठक यांनी सांगितले.चुणार येथून निघाल्यावर प्रियांका यांनी वाराणसी येथील काळ भैरवनाथ मंदिरात पूजा केली .

डॉ. संजय चोरडिया डॉ.शंकरराव चव्हाण गुरूरत्न पुरस्काराने सन्मानीत

0

पुणे : भारताचे माजी गृहमंत्री तथा मराठवाड्याचे भगीरथ डॉ. शंकररावजी चव्हाण यांनी माणूस हा केंद्रबिंदू ठेऊन विकासाची कामे केली. त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार देशातील नामवंत व्यक्तीच्या कार्याला उर्जा देणारा असल्याने ही परंपरा कायम ठेवावी,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.

मीमांसा फाऊंडेशन,  समीक्षा, ह्यूमन राईटस फाऊंडेशन व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्या वतीने दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दिला जाणारा ‘डॉ. शंकरराव चव्हाण गुरूरत्न पुरस्कार’ पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांना अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार विद्याताई चव्हाण, बायोशुगरचे चेअरमन नरेंद्र चव्हाण, नांदेडच्या महापौर दिक्षा धबाले, हार्दिक पटेल, पद्मजा सिटीचे संचालक बालाजीराव जाधव, लातूरचे विजयकुमार यादव आदी उपस्थित होते. डॉ. चोरडिया यांच्यासोबतच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मानसीक रोग्यांवर उपचार करण्याचे कठीण काम करणारे डॉ. नितीन दलाया यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सर्वांगीण विकास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. विद्यार्थ्यांना कौशल्याधारित आणि गुणवत्तेचे शिक्षण देऊन एक चांगला भारतीय नागरिक घडविण्यासाठी आम्ही काम करत आहोत.”

दिलीपराव देशमुख म्हणाले, “डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे नांदेडसह परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. एवढ्या उंचीचा नेता पुन्हा होणे शक्य नाही. नरेंद्र चव्हाण, ज्येष्ठ गायक नंदेश उमप, हभप शालीनीताई देशमुख इंदोरीकर, विद्याताई चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी जाधव यांनी केले.
डॉ. चोरडिया यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाच्या ज्युनिअर कॉलेजमधील ७०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी व लाईफ स्किल्स यावर सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर यशवंतच्याच हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये हॉटेल व्यवसायातील संधी यावर मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे संचालक, प्राचार्य व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ मृत आहार – डॉ. प्रिया धर्माधिकारी

0
पुणे : “फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ म्हणजे मृत आहारच आहे. फ्रिजमध्ये ठेवलेल्या पालेभाज्या लवकर खराब होतात आणि अश्या भाज्यांमधून शरीराला आवश्यक घटकदेखील मिळत नाहीत. त्यामुळे फ्रीजचा वापर कमी करावा. आज सर्वजण आरोग्यविषयी विविध माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतात, परंतु त्या आलेल्या माहितीवरून कोणत्याही क्रिया करू नयेत, कारण ती अचूक माहिती असेलच असे नाही,” असे प्रतिपादन आयुर्वेदिक तज्ञ डॉ. प्रिया धर्माधिकारी यांनी केले.
मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने आयोजित ‘बदलती जीवनशैली–तणाव व वैज्ञानिक दृष्टीकोन’ या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्ष विनय र.र., प्रा. नीता शहा, डॉ. संगमनेरकर, प्राध्यापक देशमाने आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. प्रिया धर्माधिकारी म्हणाल्या, “कोणतीही भाजी किंवा अन्नपदार्थ गरम असल्यापासून ते थंड होईपर्यंत म्हणजे जवळपास तीन तासांपर्यंत ताजे असतात. तीन-चार तासाच्या पुढे ते अन्न शिळे होते. असे अन्न आपण खाणे टाळले पाहिजे. अन्न पुन्हा पुन्हा गरम करू नये. त्यामुळे त्या पदार्थाचे सर्व घटक नाहीसे होऊन जातात. आपण एखाद्या मॉलमध्ये किंवा मार्केटमध्ये जातो, तिथे बरेच पॅकिंग केलेले खाद्यपदार्थ असतात, अशा खाद्यपदार्थांची खरेदी करणे टाळावे, कारण ते पदार्थ कित्येक दिवसाचे आणि ते पदार्थ शिळे झालेले असतात, अशा पदार्थांना आपण बळी पडू नये.”
“जेवण आणि टीव्ही यांचा संबंध सध्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. आयुर्वेद म्हणते मन लावून अन्नपदार्थांचे सेवन करावे. कारण या वेळी आपल्या शरीरातील पाचक स्राव अन्न प्रक्रिया व पचन करण्यासाठी तयार झालेले असतात. अन्नपदार्थांचे सेवन करताना बडबड करू नये किंवा हसू नये हे एक पवित्र क्रिया आहे. चिंता क्रोध भय निद्रानाश या सर्व गोष्टींमुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो आणि आपली कार्यशक्तीदेखील मंदावते, असेही त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविक नीता शहा यांनी प्रास्ताविक केले. विनय र. र. यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून आभार मानले.

प्रियांकाच्या गळ्यात पडून त्या दोघी ओक्साबोक्सी रडरड रडल्या …प्रियांका म्हणाल्या ,मै ना खाना खाऊंगी ,ना पाणी पिऊंगी (व्हिडीओ)

0

२ पिडीत स्वतः प्रियांका पर्यंत पोहोचले ,इतरांना पोलिसांनी अडविले

प्रियंका गांधी यांनी वीज-पाणी नसलेल्या विश्रामगृहातच काढली रात्र …

उत्तर प्रदेशातील सोनभद्र हिंसाचारातील पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांना पोलिसांनी नारायणपुरातून ‘ताब्यात’ घेतलं. सध्या त्या चुनार विश्रामगृहात  आहेत.दरम्यान, काही वेळापूर्वीच पीडित कुटुंबातील दोघांनी इथे येऊनच गांधींची भेट घेतली. प्रियंका गांधींची भेट घेतल्यावर ते म्हणाले, “आम्ही स्वतःहून इथवर प्रियंका जींना भेटायला आलोय. आम्ही 15 जण आलो आहोत, पण पोलिसांनी बाकिच्यांना अडवलं आहे. फक्त आम्ही इथे आलोय.”

प्रियंका गांधी शुक्रवारपासून विश्रामगृहातच आहेत. काँग्रेस नेते आणि कार्यकर्तेही त्यांच्यासोबत आहेत.उत्तर प्रदेश पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रियंका गांधी या आता पोलिसांच्या ताब्यात नाहीत. वाराणसी विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बृज भूषण यांनी सांगितलं की, “प्रियंका गांधी आता उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात नाहीत. सोनभद्र वगळता तुम्ही कुठेही जाऊ शकता, असं आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलंय. चुनार विश्रामगृहात त्या स्वेच्छेने थांबल्या आहेत.”

दुसरीकडे, प्रियंका गांधी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, “पीडितांची भेट घेणं हा गुन्हा नसून, तो नेत्यांचा धर्म असतो. मी कुठलाही गुन्हा केला नाहीये. मी जामीन भरणार नाही. एक पैसा भरणार नाही.”शनिवारी सकाळीदेखील त्यांनी चुनार येथे धरणे आंदोलन सुरू केलं. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “प्रशासनाला काय हवंय, मला कळत नाहीये. ते मला या कुटुंबाला का भेटू देत नाहीयेत.””मी त्यांची भेट घेतल्याशिवाय तर परत जाणार नाही. जर सरकारला वाटत असेल तर मी त्यांना सोनभद्रऐवजी दुसरीकडे कुठेही भेटण्यास तयार आहे. तशी व्यवस्था सरकारने करावी,” असंही गांधी म्हणाल्या.

विश्रामगृहात ना वीज, ना पाणी!

प्रियंका गांधी यांना शुक्रवारी संध्याकाळी जेव्हा चुनार विश्रामगृहात आणलं गेलं, त्यावेळी तिथे ना पाणी होतं ना विजेची व्यवस्था होती. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोबाईलच्या टॉर्च लावल्या आणि भजन-कीर्तन सुरू केलं.

रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विश्रामगृहावर जनरेटर आणण्यात आलं आणि पर्यायी विजेची व्यवस्था झाली.

या दरम्यान पोलीस अधिकारी प्रियंका गांधींना परत जाण्यासाठी विनंती करत होते. मात्र पत्रकारांशी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, “हिंसाचार पीडितांना भेटल्याशिवाय मी परत जाणार नाही.”

विश्रामगृहात पाणी, वीज नसल्याबाबत त्यांना विचारण्यात आल्यावर त्या थेटपणे न बोलता म्हणाल्या, “मी संघर्ष करत आहे आणि करत राहीन.”

“जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनी मला सांगितलं की, इथे एसी नाहीये, तुम्ही वाराणसीला जा. तर मी त्यांना सांगितलं की, मी जाणार नाही. मला एसी किंवा विजेची आवश्यकता नाही. मला तुरुंगात टाकायचं असेल तर टाका, पण पीडितांना भेटल्याशिवाय परत जाणार नाही.”

नेमकं प्रकरण काय?

उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील घोरवाल परिसरात बुधवारी एका जमिनीच्या वादातून हिंसाचार झाला होता. या ठिकाणी झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू तर 24 हून जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी या हिंसाचाराला ‘नरसंहार’ म्हटलं असून, उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हही उपस्थित केलं आहे.

शुक्रवारी त्या पीडितांना भेटायला सोनभद्र येथे आल्या असताना त्यांना रोखण्यात आलं. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि चुनार विश्रामगृहात ठेवलं. प्रियंका यांनी विश्रामगृहातच धरणे आंदोलन सुरू केलं.

परिसरातील तणाव पाहता स्थानिक प्रशासनाने सोनभद्रमध्ये कलम 144 लागू केला.

प्रियंका यांना ताब्यात घेतल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी माध्यमांना सांगितलं की, प्रियंका गांधी यांना सोनभद्र येथे जाण्यापासून रोखण्यात आलं तर त्या रस्त्यावरच बसून आंदोलन करू लागल्या. त्यानंतर त्यांना मिर्झापूर रोडवरील नारायणपूरमधून ताब्यात घेण्यात आलं.

प्रियंका गांधी म्हणाल्या, “सोनभद्रमध्ये कलम 144 लागू असेल, तर मी त्याचं उल्लंघन करणार नाही, असं मी अधिकाऱ्यांना सांगितलं. मी तुमच्यासोबत पीडितांना भेटायला जाईन. कुठल्याही स्थितीत पीडितांची भेटवून द्या. तरीही माझ्यावर पोलिसांनी कारवाई केली. मला इथे ठेवलंय. मात्र पीडितांना भेटल्याशिवाय मी जाणार नाही, हे स्पष्ट आहे.”

प्रियंका गांधी यांच्या माहितीनुसार, मिर्झापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि वाराणसीला परतण्याचा आग्रह केला.तुम्ही कधीपर्यंत वाट पाहाल, असा प्रश्न प्रियंका यांना विचारला, तेव्हा त्या म्हणाल्या, “माझ्यात प्रचंड सहनशक्ती आहे.”

चौकशीसाठी समिती स्थापन

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोनभद्रमधील हिंसाचाराला काँग्रेसला जबाबदार ठरवलंय. याआधी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत योगी आदित्यनाथ सोनभद्रमधील हिंसाचाराबाबत माहिती देत होते, त्यावेळी काँग्रेस आमदारांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे त्यांना नीट बोलता आलं नव्हतं.त्यानंतर एका चर्चासत्रात योगी आदित्यनाथ यांनी या संपूर्ण हिंसाचाराला काँग्रेसला जबाबदार ठरवत म्हटलं, काँग्रेसच्या सत्ताकाळात आदिवासींच्या जमिनी एका सोसायटीच्या नावे करण्यात आल्या होत्या.प्रियंका गांधींना याबाबत विचारल्यावर त्या म्हणाल्या, “केंद्रात आणि राज्यात सरकार कुणाचं आहे?”दुसरीकडे, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा माध्यमांशी बोलताना म्हणाले, सोनभद्रच्या घटनेवरून राजकारण करू नये.दरम्यान, सोनभद्र हिंसाचाराच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती 10 दिवसात अहवाल देईल.

पुणे-सोलापूर रस्त्यावर ट्रक-कारचा भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू

0

पुणे- सोलापूर रोडवरील कदम वाक वस्ती ग्रामपंचायती समोर एर्टिगा आणि ट्रकमध्ये रात्री १२.५० मि. झालेल्या भीषण अपघातामध्ये कारमधील ९ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सर्व मयत यवत येथील रहिवासी आहेत. ह्यातील सर्व जण महाविद्यालयाीण विद्यार्थी आहेत. या घटनेचा तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहे.

अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद अब्बास दाया, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत घिगे, दत्ता गणेश यादव, व जुबेर अजिज अशी सर्व मृतांची नावे आहेत. सर्व मयत यवत येथील आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सकाळी सर्व यवत येथून रायगडला फिरण्यास गेले होते आणि आज घरी सर्व येत होते. त्याच दरम्यान हा अपघात झाला. पुणे सोलापूर महामार्गावर कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीसमोर सोलापूरच्या दिशेने जाणार्‍या एर्टिगा या चार चाकी गाडीतील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडीने दुभाजक ओलंडुन ट्रकला समोरच्या बाजूने जोरात धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की कारमधील ९ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद अब्बास दाया, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत घिगे, दत्ता गणेश यादव, व जुबेर अजिज अशी सर्व मृतांची नावे आहेत. सर्व मयत यवत येथील रहिवासी आहेत. या घटनेमुळे तब्बल दोन किलो मीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.

 दोस्ती जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी…

अपघातातील ८ जण यवतमधील जनविद्या विकास मंदिर या शाळेत २०१४ – १५ च्या दहावीच्या बॅचमध्ये एकत्र होते. यातील सर्व जण पहिल्या इयत्तेपासून वर्ग मित्र होते.

दत्ता गणेश यादव हा जेएसपीएम कॉलेज (उंड्री) येथे शिकत होता. निखिल चंद्रकांत वाबळे हा विश्वराज हॉस्पिटल येथे बाऊन्सर म्हणून काम करीत होता. विशाल सुभाष यादव हा जेएसपीएम कॉलेज, वाघोली येथे शिकत होता. शुभम भिसे (कासुर्डी) हा उरुळी कांचन येथील कॉलेजमध्ये बीसीएसला होता.

अक्षय चंद्रकांत घिगे हा हडपसर येथील आणासाहेब मगर महाविद्यालयात बीसीएसच्या शेवटच्या वर्षाला होता. विशाल सुभाष यादव हा यवत येथील माजी उपसरपंच सुभाष यादव यांचा मुलगा आहे.

सोनू उर्फ नूर महम्मद दाया हा लोणी काळभोर येथे बीए़च्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. अक्षय भरत वायकर हा घरी व्यवसाय करीत असे. जुबेर अजित मुलानी हा एके ठिकाणी कामाला जात होता. परवेज अश्फाक अत्तार हा पूना कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला शिकत होता.

परवेजचे वडील आठवडी बाजारामध्ये काथ्या साबण विक्रीचे दुकान लावतात. त्यांच्या त्या व्यवसायावर त्यांनी परवेजला बीसीएच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन दिला. तो शेवटच्या वर्षाला होता. या वर्षी पास झाल्यावर एका चांगल्या कंपनीत कामाला लागून वडिलांचे स्वप्ने पूर्ण करायचे आहे, असे आम्हाला परवेज सांगायचा. पण त्याच्या अपघाती निधनामुळे त्याचं हे स्वप्न अपूर्णच राहिले, असे परवेजचा भाऊ मोहसीनने सांगितले.

प्रियंका गांधींना १४ दिवस जेलमध्ये टाकण्याचा इशारा…जामीन घेण्यास प्रियांकाचा नकार

0

मिर्झापुर -उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.प्रियंका यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखण्यात आलं. त्यामुळे रस्त्यावरच धरणे आंदोलनाला बसलेल्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.

प्रियंका गांधींनी याविषयी एकानंतर एक ट्वीट करत मत मांडलं आहे.

 

“पीडितांना भेटल्यामुळे सरकार मला तुरुंगात टाकणार असेल, तर मी त्यासाठी तयार आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. खरं तर प्रशासनाची इच्छा असेल तर मी एकटीच पीडित कुटुंबीयांना भेटेल, असं मी सकाळीच स्पष्ट केलं होतं. पण असं असतानाही उत्तर प्रदेश सरकार तमाशा करत आहे. जनता सगळं काही पाहत आहे. मला पीडित आदिवासींना भेटू द्यावं, ही मागणी कायम आहे,” असं प्रियंका यांनी म्हटलं आहे.

संध्याकाळपासून त्या या ठिकाणी ठिय्या मांडून बसल्या आहेत. पीडित कुटुंबाला भेटल्याशिवाय आपण परतणार नाहीत असं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. पोलिसांनी त्यांना नारायणपूर येथे ताब्यात घेतलं आणि आता त्या मिर्झापूर येथील चुनार विश्राम गृहात थांबल्या आहेत.

बुधवारी एका जमिनीच्या वादातून सोनभद्रमध्ये हिंसाचार झाला होता. या ठिकाणी झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू तर 24 हून जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

प्रियंका यांनी सर्वप्रथम लखनऊमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या जखमींची विचारपूस केली. त्यानंतर पीडितांची भेट घेण्यासाठी त्या सोनभद्रकडे जात होत्या.

याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, “मला फक्त पीडित कुटुंबीयांची भेट घ्यायची आहे. मी माझ्यासोबत फक्त 4 व्यक्ती घेऊन जाईन असं सांगितलं. पण प्रशासन मला त्याचीसुद्धा परवानगी देत नाही. आम्हाला का रोखण्यात आलं, हे त्यांनी सांगावं. तोपर्यंत आम्ही इथेच शांतपणे ठाण मांडून बसणार आहोत.”

“आम्ही आता झुकणार नाही. आम्ही शांतपणे पीडित कुटुंबीयांना भेटायला जात होतो. आता मला कुठे नेण्यात येत आहे, हे मला माहीत नाही. ते आम्हाला कुठेही नेणार असले तरी आम्ही जायला तयार आहोत,” असं त्यांनी एएनआयसोबत बोलताना सांगितलं.

 

प्रियंका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन

भाजप सरकार प्रियंका गांधी यांना घाबरते: आ. बाळासाहेब थोरात

मुंबई -भाजप सरकार प्रियंका गांधी यांना घाबरत आहे म्हणूनच प्रियंका गांधी सोनभद्र या ठिकाणी हिंसाचार पीडितांची भेट घेण्यासाठी गेल्या असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांना अटक केली. या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी दादर पश्चिम येथे इंडियाबुल्स समोर तीव्र निदर्शने केली व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आ. यशोमती ठाकूर, मुजफ्फर हुसेन, अखिल भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री अनिस अहमद, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, बी. एम. संदीप, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, राजेश शर्मा, रमेश शेट्टी, प्रकाश सोनावणे, अभिजीत सपकाळ, गजानन देसाई, सचिव शाह आलम शेख, तौफिक मुलाणी, दादासाहेब मुंडे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कृतीचा निषेध करून आ. थोरात म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे बुधवारी जमिनीच्या वादातून गोळीबार करून १० जणांची हत्या करण्यात आली आहे. या हिंसाचारात बळी गेलेल्या पीडितांना भेटण्यासाठी सोनभद्र येथे जात असताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बेकायदेशीररित्या अटक केली आहे. हिंसाचारात बळी पडलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना भेटायला जाणे गुन्हा आहे का? असा संतप्त सवाल करून उत्तर प्रदेश पोलिसांनी नेत्यांना अटक करण्याऐवजी गुन्हेगारांना अटक करावी असे आ. थोरात म्हणाले. उत्तर प्रदेशात गुन्हेगार खुलेआम हत्या करतायेत, दरोडे घालतायेत. समाजकंठक दंगली घडवत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी उत्तर प्रदेश पोलीस विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक का करत आहेत? उत्तर प्रदेशात सर्वसामान्यांच्या हक्कांची गळचेपी सुरु असून हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरु आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

घुसखोरांना माघारी परतावे लागेल, आधी मतदान यादीतून आणि मग भारतातूनही बाहेर काढणार’

0

भाजप मुंबई अध्यक्ष बनताच लोढा यांचा बांगलादेशी आणि बनावट मतदारांना इशारा

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष पदाचे पदभार सांभाळतात मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईमध्ये राहत असलेल्या बांगलादेशी घुसखोरांच्या आणि बनावटी मतदारांच्या विरोधात मोहीम छेडणार असल्याचा इशारा दिला आहे. लोढा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, अध्यक्षपदाचा पदभार सांभाळताच त्यांचं पुढचं पाऊल हे बांगलादेशी घुसखोर आणि आजमगड आदी परिसरातून आलेल्या बनावटी मतदारांच्या विरोधात असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, हे नाही चालणार की कोणाचं आजमगड मध्येही मतदार यादीत नाव असेल आणि मुंबईच्या मतदार यादीतही. ते म्हणाले की, असे लाखोंचा संख्यामध्ये घुसखोर आणि बनावटी मतदार आहेत, त्यांना सर्वात आधी भाजप कार्यकर्ता मदान यादीतून डिलीट करतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या सहित उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, शिक्षा मंत्री अशिष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री योगेश सागर, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्यासह अनेक खासदार आणि आमदार हे दादर येथील वसंत स्मृती येथे आयोजित नवसंकल्प समारंभात भाजपचे वरिष्ठ आमदार मंगलप्रभात लोढा यांनी भाजप मुंबई अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. भाजपचे वरिष्ठ आमदार लोढा हे अशिष शेलार यांच्या जागी मुंबई भाजपचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. लोढा यांनी पदभार सांभाळताच आपल्या पहिल्या भाषणात स्पष्टपणे सांगितलं आहे की, काही राष्ट्रविरोधी घटक भारताच्या सार्वभौमत्वाला नुकसान पोचवत आहे. त्यांना सहन केलं जाणार नाही. लोढा यांनी मुंबई भाजप अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. याप्रसंगी ते म्हणाले की, त्यांना या गोष्टीचा गर्व आहे की देशातील सर्वात मोठ्या महानगराची जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाची सेवा करण्याची संधी मिळाली. ते म्हणाले की, आम्ही सर्वांच्या सहकार्याने मुंबईमधील सर्व ३६ जागांवर काँग्रेसचा सफाया करू.

नवसंकल्प समारंभामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्याप्रकारे मागील काही निवडणुकांमध्ये मुंबईने भाजपला अधिकाधिक मतदान केले आहे, हा प्रधानमंत्री यांचा चमत्कार असून या बदल्यात पंतप्रधान यांनी मुंबईला बरच काही दिलं आहे. जे मागील कोणत्याही सरकारने दिले नाही. ते म्हणाले की, मागील सरकार मुंबईला सोन्याचे अंड देणारी कोंबडी समजत होती. परंतु मोदीजी यांच्याद्वारे पाठवण्यात आलेल्या आर्थिक सहकार्यामुळे आम्ही ३० पेक्षा अधिक विकासकार्यांना सुरुवात केलेली आहे. जे मागील सरकारने केलेले नव्हते. आमदार लोढा यांची संघटन क्षमता, निवडणूक रणनितीची ताकद आणि प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण करण्याच्या कौशल्याचे त्यांनी कौतुक केले. तसेच त्यांनी आमदार लोढा यांच्या प्रती विश्वास व्यक्त करत, येत्या ऑक्टोंबरमध्ये होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईची जनता काँग्रेसचा सफाया करणार असल्याचे ते म्हणाले आहेत. कारण मुंबईमध्ये विकासाचे गुणात्मक परिवर्तनाचे जे काम झाले आहे, ते आमच्या सरकारने केले आहेत.

मुंबई भाजप अध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळण्याचा या समारंभात प्रदेश भाजपचे संघटन महासचिव विजयराव पुराणिक आणि मुंबई भाजप संघटनेचे महासचिव सुनील कर्जतकर सहित मुंबईचे सर्व आमदार, नगरसेवक तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता यांच्यासह दोन हजारपेक्षाही अधिक लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई भाजप कार्यालयमध्ये मागील अनेक वर्षांनंतर लोढा यांच्या पदभार सांभाळण्याच्या कार्यक्रमात  मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

मराठी -हिंदी ‘गीतबहार’ने जिंकली मने !

0

पुणे ः‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘गीतबहार’ या लोकप्रिय हिंदी-मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शुभांगी मुळे प्रस्तुत हा कार्यक्रम दि.१९ जुलै रोजी , शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, (सेनापती बापट रस्ता) येथे झाला. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.

या कार्यक्रमात गण,गवळण,लावणी,लोकप्रिय हिंदी -मराठी गीत अशा एकाहून एक बहारदार रचना सादर करण्यात आल्या.

‘ दही दूध लोणी ‘ ,’ रात्र काळी, घागर काळी ‘ सारख्या गवळणी, ” झाला महार पंढरीनाथ ‘, ‘ कानडा राजा पंढरीचा ‘, ‘ वासुदेव ‘ सारखी भक्तीगीते ‘, ‘धुंदी कळ्यांना, ‘, घन ओथंबून येती ‘ , ‘ जीवलगा ‘ सारखी भावगीते रसिकांना मोहवून गेली.

‘ झुमका गिरा रे ‘, ‘ कजरा मोहब्बतवाला ‘, ‘ उडे जब , झुल्फे तेरी ‘, सारखी लोकप्रिय हिंदी गीते या कार्यक्रमात सादर झाली.

ही गीते शुभांगी मुळे , हेमंत वाळुंजकर यांनी गायली. केदार परांजपे,जयंत साने,मोहन पारसनीस,हेमंत पोटफोडे या कलाकारांनी साथसंगत केली. सौ मीरा ठकार कार्यक्रमाचे निवेदन केले.

‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’ आयोजित हा ७९ वा विनामूल्य कार्यक्रम होता.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून पात्र लाभार्थी सुटता कामा नये-कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे

0

पुणे : प्रधानमंत्रीकिसान सन्मान निधी योजनेतून एकही पात्र लाभार्थी शेतकरी सुटता कामा नये, असे स्पष्ट निर्देश कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज दिले.

येथील कृषि आयुक्तालयाच्या पद्मश्री सभागृहात कृषि मंत्री डॉ.अनिल बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे कृषि विभागाची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, कृषि आयुक्त सुहास दिवसे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, फलोत्पादन संचालक श्री. पोकळे, मृदसंधारण संचालक श्री. मोटे, कृषि सहसंचालक दिलीप झेंडे आदि उपस्थित होते.

कृषि मंत्री डॉ.अनिल बोंडे म्हणाले की, कृषि विभागांतर्गत शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे खते उपलब्ध करुन देणे, कृषि पतपुरवठा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना, हवामानावर आधारीत फळपिक योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना अशा अनेक योजना राज्यात राबविण्यात येत असून या सर्व योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यत पोहचवणे आवश्यक आहे. यासाठी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या बियाणांची गुणवत्ता तपासूनच बियाणे वाटप करण्यात यावे जमिनीची गुणवत्ता राखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबरोबरच पीक विमा योजनेचीही प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच नागपूर, सोलापूर, औरंगाबाद या तीन जिल्हयातील दुष्काळी भागामध्ये लवकरच कृत्रिम पाऊस पाडण्याचे शासनाचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीत कृषिविषयक योजनांच्या आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाचे सादरीकरण कृषिसहसंचालक दिलीप झेंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कृषि आयुक्त सुहास दिवसे यांनी मानले. यावेळी विभागीय कृषि विभागाचे कृषि अधीक्षक, विभागप्रमुख, कृषि अधिकारी उपस्थित होते.

0000

‘एच सी एम टीआर’ प्रकल्पाची जन सुनावणी घेण्याची मागणी

0

पुणे:एच सी एम टीआर(उच्च क्षमता वर्तुळाकार द्रुतगती मार्ग) निर्मिती विषयी असलेले आक्षेप ‘एच सी एम टीआर’ नागरिक कृती समिती ने पुणे महानगरपालिका रस्ते विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांची गुरुवारी ,18 जुलै रोजी भेट घेवून नोंदवले.या आक्षेपांचे पत्र नगर नियोजन विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर ,जिल्हाधिकारी सौरभ राव आणि अनिरुद्ध पावसकर यांना पाठविण्यात आले आहे.

हा वर्तुळाकार मार्ग १९८३ च्या आराखड्यात फक्त सार्वजनिक वाहतुकीसाठी असताना तो त्या काळात शहराच्या वेशीवर बांधण्याचा विचार होता. १९८३ पासून शहर रचना खूप बदलली असून २०१९ सालात हा प्रोजेक्ट चा मार्ग आता शहराच्या मध्यवर्ती, दाट वस्तीतून जाणार असून तो आजच्या परिस्थितीला किती उपयोगाचा ठरेल हा प्रश्न उद्दभवला आहे. या प्रोजेक्ट मध्ये बदल करून, ४ मार्गिका या खासगी वाहनांसाठी ठेवण्याचे , आणि फक्त दोन मार्गिका बीआरटी साठी करण्याचे टेंडर निघाले आहे. मुळात साडेआठ हजार कोटी खर्चाच्या या मोठ्या प्रकल्पाला जनसुनावणी न घेता असा अचानक बदल योग्य नाही,असे कृती समितीने म्हटले आहे.

खासगी वाहनांना प्राधान्य देणे हे नॅशनल अर्बन transport पॉलिसी, स्टेट अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसी आणि पुण्याचा कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन च्या विरोधात आहे. ‘एच सी एम टीआर’ खासगी वाहनांना प्राधान्य देण्या बरोबर सार्वजनिक वाहतुकीला माग पाडत आहे. हा प्रोजेक्ट traffic कोंडी chya समस्येला न सोडवता ही समस्या फक्त एका हायवेवर नेऊन सोडणार आहे असे नागरिक कृती समितीचे म्हणणे आहे.

‘एच सी एम टीआर’ मुळे भूजल पुनर्भरण प्रक्रियेत अडथळा निर्माण होणार आहे . वेताळ टेकडी ,हनुमान टेकडी ,चतुःशृंगी अशा टेकड्यांमुळे ,पाणलोट क्षेत्रामुळे पुण्यातील पर्जन्य जल पुनर्भरण व्हायला मदत होते . अपुरा पाऊस आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भूजल रचना धोक्यात आणणे चुकीचे ठरणार आहे . कोणत्याही विकासकामांमुळे टेकड्यांचा,वनांचा आणि मोकळ्या जागांचा नाश होता कामा नये . विधी महाविद्यालय टेकडी ,एस आर पी एफ टेकडी ,व्हॅम्नीकाँन टेकडी उतारांचा ,२ हजार झाडांचा या प्रकल्पामुळे नाश होणार आहे .

८० टक्के जागा शासनाच्या ताब्यात आल्याशिवाय टेंडर काढले जाणार नाही ,असा पालिकेचाच २०१८ चा नियम असताना या प्रकल्पाची ५० टक्केही जमीन ताब्यात नसताना टेंडर काढले आहे . संरक्षण खाते आणि रेल्वेनेही जागा देण्यास अजून तयारी दाखवलेली नसताना हा प्रकल्प पुढे नेण्याची घाई केली जात आहे .

नागरिक कृती समितीने पुढील मागण्या केल्या आहेत :

– मेट्रो आणि ‘एच सी एम टीआर’ चा एकत्रित वाहतूक संदर्भाने अभ्यास व्हावा
– पर्यावरण खात्याच्या मान्यताप्राप्त
– तज्ज्ञाकडून पर्यावरणा वर होणाऱ्या दुष्परिणामाचा अभ्यास केला जावा
– सामाजिक दुष्परिणामांचा अभ्यास व्हावा
– पुणे विद्यापीठ आणि पौड फाटा जंक्शन येथे मेट्रो ,फ्लाय ओव्हर ,एलेव्हेटेड ‘एच सी एम टीआर’ सगळेच उभारले जाणार असल्याचे नियोजन योग्य आहे का ?
– या सर्व प्रकल्पाच्या नियोजनाचे नकाशे समितीला मिळावेत
– दोन आठवड्यात आयुक्त -महापौर -स्थायी समिती च्या सदस्यांच्या उपस्थितीत जन सुनावणी घ्यावी

या बैठकीला डॉ सुषमा दाते ,सत्या नटराजन ,कनिझ सुखरानी ,पी के आनंद ,राजीव सावंत ,हेमा चारी ,सुवर्णा आँखेगावकर ,मयुरेश मांडके ,रमेश नारायणी ,भूपेश शर्मा ,पुष्कर कुलकर्णी हे विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते

संशोधनाने आयुर्वेदावरील लोकांचा विश्वास वाढेल-डॉ. आशुतोष गुप्ता

0

पुणे : “आयुर्वेद शास्त्राबद्दल लोकांच्या मनात विश्वास आणि अपेक्षा वाढत आहेत. त्यामुळे आयुर्वेदात प्रॅक्टिस करणाऱ्या वैद्यांनी यामध्ये संशोधन करण्यावर भर द्यावा. संशोधन ठरवून होत नाही, तर ते मानसिकतेत असावे लागते. आयुर्वेदाचे अभ्यासपूर्ण सादरीकरण झाले, तर लोक आयुर्वेदाकडे वळतील,” असे प्रतिपादन महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांनी केले.

भारतातील पहिल्या आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब अँड रिसर्च सेंटर असलेल्या केशायुर्वेदच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्यवर्धिनी चिकित्सालय व बीव्हीजी इंडिया यांच्या वतीने १०८ सेवाशाखा संकल्पपूर्ती सोहळा, केशायुर्वेद गौरवग्रंथ प्रकाशन व केशायुर्वेद पुरस्कार वितरण करण्यात आले. नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या या सोहळ्यावेळी उद्योजक प्रतापराव पवार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण जामकर, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश डुंबरे, केशायुर्वेदचे संस्थापक डॉ. हरीश पाटणकर, नानासाहेब पाटणकर आदी उपस्थित होते.

केशायुर्वेदमध्ये उल्लखेनीय कार्य करणाऱ्या  वैद्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. त्यामध्ये वैद्य कुशाग्र बेंडाळे यांना केशायुर्वेद गौरव, वैद्य रश्मी वेद यांना केशायुर्वेद भूषण, वैद्य ओमप्रसाद जगताप यांना केशायुर्वेद रत्न, तर वैद्य आनंद कुलकर्णी, वैद्य मिलिंद मोरे व वैद्य सुनील पंजाबी, वैद्य बकुळ परदेशी, वैद्य नलीमा रस्तोगी, वैद्य सुप्रिया सातपुते यांना केशायुर्वेद मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैद्य गायत्री पांडव सर्वाधिक सॅम्पल्सच्या मानकरी ठरल्या. यशश्री वाईकर आणि अरुणकुमार कोळसे यांना तंत्रसाहाय्यासाठी गौरविण्यात आले. गुरुपौर्णिमेनिमित्त वैद्य श्रीप्रसाद बावडेकर, वैद्य वैभव मेहता, वैद्य अभिजीत सराफ, वैद्य रसिक पावसकर यांना आचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी जीवराज चोले संपादित केशायुर्वेद गौरवग्रंथाचेही प्रकाशन झाले. यामध्ये तीस आयुर्वेदाचार्यांचा, तसेच केशायुर्वेदाचा  प्रवास उलगडण्यात आला आहे.

डॉ. आशुतोष गुप्तता म्हणाले, “आयुर्वेदाचा प्रचार प्रसार केला, तर या क्षेत्रात व्यवसायाला मोठा वाव आहे. आयुर्वेदामध्ये संशोधन करण्यासाठी कौन्सिलकडून प्रोत्साहन दिले जात असून, त्यासाठी विविध प्रकारचे फेलोशिप प्रोग्रॅम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. शिक्षणविषयक कायदे, यूजीसीचे नियम यांचा अभ्यास करून हे अभ्यासक्रम सुरु केले जातील. केशायुर्वेद ही एक आयुर्वेदातील सुपरस्पेशालिटी असून, याप्रमाणे इतर आजार आणि उपचार पद्धतीची सुपरस्पेशालिटी करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. केशायुर्वेदाचा प्रवास केवळ १०८ वर न थांबता तो १००८ वर जायला हवा.”

प्रतापराव पवार म्हणाले, “बाहेरच्या देशांमध्ये फिरताना तिकडे आयुर्वेदाला मोठ्या संधी असल्याचे जाणवते. आयुर्वेदिक औषधांच्या निर्यातीसाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. कोणत्याही आजाराच्या मुळाशी जाणे अतिशय महत्वाचे असते. आज ऍलोपॅथीवर लोकांचा अधिक विश्वास आहे. त्याचा गैरफायदा घेतला जातो. त्यामुळे आयुर्वेदाने या संधीचा लाभ उठवून लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला पाहिजे. आजारी पडल्यावर डॉक्टरऐवजी वैद्याची आठवण येईल, तो दिवस आयुर्वेदाचा असेल. इतर शास्त्राच्या तुलनेत प्राचीन असलेले आयुर्वेद कोठेही कमी नाही. आयुर्वेदाच्या अभ्यासात बाबतीत चिकित्सक वृत्ती असू द्या. आयुर्वेद अभ्यासाला संशोधन आणि शास्त्रीय दृष्टीने मांडणीची गरज आहे. आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे. यामधील शास्त्रीय संशोधनाचा खूप लोकांना फायदा होईल. सरकारी पातळीवरही आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारासाठी प्रयत्न केले जात आहेत, ही सकारात्मक बाब आहे.”

डॉ. अरुण जामकर म्हणाले, “तीन वर्षात केशायुर्वेदच्या १०८ शाखा काढणे हा पराक्रम आहे. कोणतेही नवीन शास्त्र लोकांना शिकवत नाही, तोपर्यंत ते मर्यादित राहते. यावर एक वर्षाचा फेलोशिप प्रोग्राम सुरू करावा. १०८ शाखेत येणाऱ्या रुग्णांचा अभ्यास करा. आयुर्वेदामध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर संशोधन व्हायला हवे, त्याशिवाय समाज त्याचा गांभीर्याने स्वीकार करणार नाही.”

डॉ. सतीश डुंबरे म्हणाले, ”केशायुर्वेदचा प्रवास थक्क करणारा आहे. केसासारख्या विषयात काम करत १०८ शाखा चालवणे कौतुकास्पद आहे. या विषयात शैक्षणिक आणि संशोधनाचे काम व्हावे. आयुर्वेद क्षेत्राला समाजाभिमुख करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. केशायुर्वेदाप्रमाणे त्यातील सुपरस्पेशालिटी शोधायला हव्यात.”

डॉ. हरीश पाटणकर म्हणाले, “गेल्या तीन वर्षात केशायुर्वेदच्या देश-विदेशात १०८ सेवा शाखा उभारल्या. यापुढे ही जबाबदारी केशायुर्वेदाच्या सदस्यांवर सोपवत असून, त्यांनी याला पुढे न्यावे. केशायुर्वेद ही एक संशोधन आणि पुराव्यांवर आधारित संकल्पना आपण वाढवत आहोत, याचा अभिमान आहे.”

वैद्य विवेक आंबरे यांनी सूत्रसंचालन केले. वैद्य हरीश पाटणकर यांनी आभार मानले.

बहुजन वंचित आघाडीची स्वबळाचीच तयारी; पहिली यादी 30 जुलैला जाहीर होणार

0

पुणे(प्राब न्यूज )-काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही इच्छूकांची पाऊले बहुजन वंचित आघाडीकडे वळली आहेत. लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीला ज्या विधानसभा मतदारसंघात जास्त मते प्राप्त झालेली आहेत अशा मतदारसंघावर प्रामुख्याने काँग्रेस व राष्ट्रवादीतील इच्छूकांचा डोळा आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छूकांकडून त्यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांना पुढे केले जात आहे. तर काही मात्तबर वंचितमुळे मतविभाजन होऊ नये यासाठी स्वताचा कार्यकर्ताच डमी उमेदवार म्हणून देण्याची रणनीती आखण्यात येत आहे. नुकत्याच झालेला लोकसभा निवडणुकीत ५२ विधानसभा मतदारसंघात प्रभावी मते घेतली आहेत. तर 66 विधानसभा मतदारसंघात किमान 20 हजारहून जास्त मते घेतली आहेत. अशा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक फटका काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसणार आहे. हे गृहीत धरूनच वंचितचा प्रभाव व मतविभाजन रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून डमी उमेदवार घुसविण्याचा डाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा वंचितच्या पदाधिकारी यांचा आरोप आहे.  दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी 30 जुलैला जाहीर होणार आहे. वंचित आघाडी  स्वबळाची तयारी करीत असून महाआघाडीत सामील होण्याची शक्यात धूसर आहे. पहिल्या यादीत विदर्भातील उमेदवारांचा समावेश असणार आहे. विदर्भातील उमेदवारांच्या मुलाखतीही पूर्ण झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूकीची पुर्वतयारी म्हणून इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. 13 ते 16 जुलैपर्यंत विदर्भातील सर्व मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यानंतर मराठवाड्यातील मतदारसंघासाठी मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सदर मुलाखती वंचित बहुजन आघाडी पार्लमेंटर्री बोर्ड सदस्य अॅड अण्णाराव पाटील, अशोकभाऊ सोनोने आणि रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतल्या जाणार आहे. मराठवाड्याकरीता मुलाखतींचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –  उस्मानाबाद – 21 जुलै 2019, बीड – 22 जुलै 2019, लातूर – 23 जुलै 2019, नांदेड – 24 जुलै 2019, हिंगोली – 25 जुलै 2019, परभणी – 26 जुलै 2019, औरंगाबाद – 27 जुलै 2019, जालना – दि.28 जुलै 2019 वरील तारखेला प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी सकाळी 10.00 वाजता पासून मुलाखती घेण्यात येणार आहेत. मुलाखतीत इच्छुकांना मतदारसंघातील सामाजिकदृष्ट्या जातीय समीकरण विचारले जाते तर राजकीयदृष्ट्या यश कसे मिळू शकते याचा अंदाज व शक्यतेबाबत प्रश्न विचारण्यात येत आहेत.
दरम्यान लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ मधील निवडणुकीत 52 विधानसभा मतदारसंघात वंचितचा प्रभाव राहिलेला आहे. लोकसभा निवडणुकीत झालेला मतदानानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांमध्ये वंचित आघाडीला असाच कल राहिला तर महाराष्ट्रातील १४ मतदारसंघात यश मिळू शकेल अशा स्वरूपाचे मतदान या निवडणुकीत झालेले आहे. तर महाराष्ट्रातील 52 मतदारसंघात दुसरा व तिसरा क्रमांकावरील मते प्राप्त करू शकेल यामध्ये 30 विधानसभा मतदारसंघात महाआघाडीच्या उमेदवारांचा पराभव करण्यास कारणीभूत ठरेल. तर 48 मतदारसंघात स्थानिक पातळीवरील निवडणुकीत महत्वपूर्ण राजकीय घडामोडीस पात्र ठरेल. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीला 66 विधानसभा मतदारसंघात 20 हजार ते 1 लाख मते मिळालेली आहेत. आणि लोकसभा निवडणूक 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीला 78  विधानसभा मतदारसंघात 10 हजार ते 20 हजार मते मिळालेली आहेत.

वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणूक 2019 मध्ये

20 हजार ते 1 लाख मते मिळालेले 66 विधानसभा मतदारसंघ

मतदारसंघ क्र. मतदारसंघ नाव वंचित मते
107 107 – औरंगाबाद मध्य 99450
109 109 – औरंगाबाद पूर्व 92347
286 286 – खानापूर 78024
108 108 – औरंगाबाद पश्चिम 71239
31 31 – अकोला पूर्व 61712
29 29 – बाळापूर 56981
111 111 – गंगापूर 56023
287 287 – तासगाव-कवठेमहाकाळ 54787
288 288 – जत 53083
32 32 – मुर्तिजापूर 52230
74 74 – चिमुर 50989
33 33 – रिसोड 44400
278 278 – हातकणंगले 42325
285 285 – पळूस खडेगाव 40169
28 28 – अकोट 39177
86 86 – नांदेड उत्तर 38795
26 26 – खामगाव 38732
281 281 – मिरज 38506
93 93 – कळमनुरी 38442
27 27 – जळगाव(जामोद) 36688
112 112 – विजापूर 35462
105 105 – कणाद 34263
72 72 – बल्लारपूर 33759
94 94 – हिंगोली 33473
92 92 – बसमत 33348
97 97 – गंगाखेड 32806
282 282 – सांगली 32780
24 24 – सिंदखेडराजा 30552
247 247 – मोहोळ 30145
252 252 – पंढरपूर 29323
84 84 – हदगाव 28670
34 34 – वाशिम 28351
251 251 – सोलापूर दक्षिण 28092
280 280 – शिरोळ 27913
250 250 – अक्कलकोट 27625
89 89 – नायगाव 27530
249 249 – सोलापूर शहर मध्य 27468
73 73 – ब्रम्हपुरी 27283
87 87 – नांदेड दक्षिण 27222
248 248 – सोलापूर शहर उत्तर 26870
98 98 – पाथरी 26829
90 90 – देगलूर 26339
95 95 – जिंतूर 26079
85 85 – भोकर 26020
173 173 – चेंबुर 25146
22 22 – बुलढाणा 24917
123 123 – नाशिक पूर्व 24776
70 70 – राजुरा 24480
126 126 – देओली 24459
30 30 – अकोला पश्चिम 23741
235 235 – लातूर शहर 22654
20 20 – मुक्ताईनगर 22636
82 82 – उमरखेड 22223
242 242 – उस्मानाबाद 22058
99 99 – परतूर 21700
23 23 – चिखली 21658
96 96 – परभणी 21335
88 88 – लोह 21184
100 100 – घनसावंगी 21085
208 208 – वडगाव शेरी 21084
71 71 – चंद्रपूर 21048
232 232 – केज 20908
125 125 – नाशिक पश्चिम 20784
21 21 – मलकापूर 20702
233 233 – परळी 20683
241 241 – तुळजापूर 20412