पुणे- प्रख्यात रॅम्बो सर्कस पुण्यातील कात्रज – कोंढवा मार्गावरील शिवगौरक्षा ग्राउंड येथे सुरू झाली असून रोज दुपारी 1, दुपारी 4 आणि सायंकाळी 7 वाजता असे तीन शो होणार आहेत. येथे पार्किंगची देखील सोय करण्यात आली आहे.
रॅम्बो सर्कसचा तंबू 145 फूट – 110 फूट असून संपूर्ण तंबू वॉटर प्रूफ व फायर प्रूफ आहे. या सर्कसमध्ये 80 स्त्री-पुरूष कलावंत असून त्यामध्ये उझबेकीस्तान आणि नेपाळ येथील कलावंत आहेत. सर्कसमध्ये 3 विदूषकही आहेत. विविध कसरतींसाठी प्रसिद्ध असलेल्या रॅम्बो सर्कसमध्ये ट्रॅपिझ, जर्मन व्हील, ग्लोब ऑफ डेथ, रोलाबोला, डॉग मॅथेमॅटिक्स, डॉग शो, पोनी शो, एरियल रिंग,हुला हूप, व्हील ऑफ डेथ, ग्रुप सायकल आदी खेळांचा समावेश आहे. यामध्ये 12 कुत्री व 2 घोडे असून रिंगणात विविध रंगांचे रूमाल ठेवल्यावर प्रेक्षक सांगतील त्या रंगाचे रूमाल घोडे उचलतात हे विशेष आकर्षण असणार आहे