Home Blog Page 2829

चंद्रकांतदादा टार्गेट -काॅंग्रेस – राष्ट्रवादीने कोथरुडमध्ये दिला मनसे उमेदवाराला पाठींबा

पुणे : काेथरुड मतदारसंघातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर हाेताच विराेधक त्यांच्या विराेधात काेणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. आघाडीमध्ये काेथरुडची जागा मित्र पक्षाला देण्याचे ठरविण्यात आले हाेते. अखेर काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीने काेथरुडमधील मनसेचे उमेदवार किशाेर शिंदे यांना पाठींबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता काेथरुडमध्ये पाटील विरुद्ध शिंदे असा सामना रंगणार आहे.

काेथरुडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. कुलकर्णी यांनी काेथरुडमध्ये पक्षाची चांगली बांधणी केली हाेती. सुरुवातीला उमेदवारी डावलल्याने कुलकर्णी या काहीशा नाराज हाेत्या. परंतु त्यांची समजूत काढण्यात पक्षाला यश आले. पाटील यांच्या उमेदवारीला पहिल्यापासूनच विराेध झाला. सुरुवातीला आमचा आमदार काेथरुडचा हवा असे लिहीलेले बॅनर लावण्यात आले तर नंतर शंभर टक्के नाेटा ला मतदान करणार असे बॅनर काेथरुडमध्ये लावण्यात आले. युतीत काेथरुड हा शिवसेनेचा मतदारसंघ हाेता. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते देखील काहीसे नाराज हाेते.

काेथरुडची जागा मित्र पक्षाला देणार असल्याचे अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जाहीर केले हाेते. राजू शेट्टी यांनी काेथरुडमधून उभे राहण्याची ऑफर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चाैधरी यांना दिली हाेती. परंतु राज ठाकरे यांनी काेथरुडमधून किशाेर शिंदे यांना उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे मतांचे विभाजन टाळण्यासाठी चाैधरी यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. अखेर काेथरुडमध्ये मनसेच्या उमेदवाराला पाठींबा देण्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि काॅंग्रेसचे नेते अभय छाजेड यांनी जाहीर केले आहे.

मला आमदार व्हायचंय: आशाताई बुचके

0
जुन्नर शहरात बुचके यांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जुन्नर, दि. ४ (आनंद कांबळे वार्ताहर) –
गोरगरीबांची, पिडितांची आणि सामान्य नागरिकांची सेवा करण्यासाठी विधानसभेत पाठविण्याचे भावनिक आवाहन जुन्नर विधानसभेच्या अपक्ष उमेदवार आशाताई बुचके यांनी केले.
शुक्रवारी (दि. ४) जुन्नर शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीनंतर मार्केट यार्डच्या आवारात आयोजित प्रचारसभेत बुचके बोलत होत्या. जुन्नर शहरात आयोजित या प्रचार सभेतील गर्दी पाहता “मला आज एबी फॉर्म मिळाला” असे उद्गार याप्रसंगी बुचके यांनी काढले.
कोणताही पक्ष किंवा ज्येष्ठ नेता उपस्थित नसतानाही बुचके यांच्या सभेला याप्रसंगी हजारो सामान्य नागरिकांनी हजेरी लावली होती. गेली २५ वर्षे मी तालुक्यात जनतेची कामे प्रामाणिकपणे केली असून यंदा आपण मला विधान सभेत पाठविणार याबद्दल आता मला शंका नाही, असे बुचके यांनी याप्रसंगी सांगितले. मागील विधानसभेला पक्षाचा एबी फॉर्म स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी मला दिला होता, परंतु नंतर राजकारण केले गेले. दोन वेळा पक्षाने संधी मिळाली मात्र तालुक्यातील नेत्यांनीच घात केल्याचा आरोप बुचके यांनी याप्रसंगी केला.
मी आपणास माझी झोळी पसरून मतांची भीक मागत आहे, माझ्यावर प्रेम करणाऱ्यांकडे मतांची भीक मागताना मला आनंदच वाटत असून तो माझा हक्कच आहे, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. तालुक्यातील शेतकर्यांसाठीचे पाण्याचे नियोजन फसले आहे, तालुक्यात पाच धरणे असूनही वर्षोनुवर्षे आदिवासी भागात टँकर सुरू आहेत. ही संधी पुन्हा येणार नाही, त्यामुळे माझ्यासाठी तुम्हाला लढायचं आहे, मला नेता नसून तुम्हीच माझे नेते आहात, कामाला लागा, असे बुचके यांनी आपल्या भाषणात सांगितले.
माझी शिवसेनेतून हकालपट्टी झाली असून आता आपले चिन्ह धनुष्यबाण नाही, मात्र माझे दैवत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत, तो हक्क माझ्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नसल्याचे बुचके यांनी सांगितले. याप्रसंगी नारायणगावचे सरपंच बाबू पाटे, विघ्नहरचे संचालक संतोषनाना खैरे, प्रसन्ना डोके, पंडित मेमाणे, संगीता वाघ, राजेंद्र चव्हाण, बंडूशेठ बांगर, ज्योती दुराफे आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन आशिष माळवदकर यांनी केले.

भाजप-150, शिवसेना-124 तर मित्रपक्षांना 14 जागा-बंडखोरांना जागा दाखवून देऊ

0

मुंबई- आज विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांनीही अर्ज दाखल केले. त्यानंतर आता भाजप-शिवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेत महायुतीची औपचारिक घोषणा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील, मनोहर जोशी यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती.

बंडखोरांना जागा दाखवून देऊ-पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, युती होईल का? असा इतरांना प्रश्न पडत होता, आमच्या मनात हा प्रश्न कधीच आला नाही. युतीच्या फॉरम्यूल्यावर बोलताना ते म्हणाले की, एकत्र रहायचे असेल तर कधी-कधी तडजोडी कराव्या लागतात. महायुती प्रचंड मताधिक्क्याने विजयी होईल आणि मुंबईतून आदित्य ठाकरे सर्वाधिक मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वस यावेळी त्यांनी बोलून दाखवला. दरम्यान, उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी बंडाची तलवार काढली आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न करु. पण, तरीही कोणी बंडखोरीवर ठाम असेल तर महायुती पूर्ण ताकदीने लढेल. यावेळी अनेक दिग्गजांची तिकीट कापली, त्यावर विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, तिकीटं कापली म्हणणे योग्य नाही, त्यांना दुसरी जबाबदारी देण्यात येईल.

खंडेनवमीला तुळजापूर येथे होणारी अजबळी प्रथा थांबवा : डॉ. गंगवाल

0
पुणे : तुळजापूर येथे नवरात्रीत खंडेनवमीला तुळजाभवानी मातेच्या मंदिरात अजबली देण्याची प्रथा आहे. ही अनिष्ठ, अमानुष प्रथा असून कायदेविरोधी तसेच मानवी सभ्यतेच्या विरुद्ध आहे. त्यामुळे ही प्रथा थांबवावी, अशी मागणी सर्व जीव मंगल प्रतिष्ठनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी वकील ऍड. पियुष शर्मा उपस्थित होते. या मागणीचे पत्र डॉ. गंगवाल यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार व न्यायाधीश याना ईमेलद्वारे आणि पोस्टाद्वारे पाठवलेले आहे.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, ”नवरात्रात खंडेनवमीच्या दिवशी तुळजाभवानी मातेसमोर असुराला नैवद्य म्हणून बोकड कापले जाते, या प्रथेला अजबली म्हणतात. वर्षानुवर्षे सुरु असलेल्या या प्रथेला कोणतेही धार्मिक अधिष्ठान नाही. भाविक स्वतःची भावनीक, कौटुंबिक, मानसिक गरजा भागविण्यासाठी केलेल्या नवसापायी हजारो बोकड देवी पुढे नैवेद्य म्हणून कापतात आणि तो मांसाहार प्रसाद म्हणून सेवन करतात. या कालावधीत अनेक बोकड तर कापले जातातच, परंतु अनारोग्य, रोगराई यालाही आमंत्रण मिळते. यातून देवस्थानच्या उत्पादनात भर पडत असली तरी ही प्रथा सुसंस्कृत विज्ञानवादी मानव धर्माच्या विरोधात आहे. अशी प्रथा कायमस्वरूपी हद्दपार करण्यात यावी. ”
”पशु क्रुरता निवारण कायदा १९६० नुसार उघड्यावर पशुहत्या करणे अवैध आहे, तसेच मुंबई पोलीस कलम १०५ आणि भारतीय दंड विधान १३३ देखील सार्वजनिक स्थळी केलेल्या पशुहत्येस बेकायदेशीर ठरवितात. यासंदर्भात १९९६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देत पशुबळी संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. मुंबई उच्च न्यायालय व औरंगाबाद खंडपीठात रिट पिटिशन दाखल आहेत. खंडपीठाने देवाच्या नावावर होणारी पशुहत्या बंद करण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलावीत, असे आदेश दिले होते. राज्याच्या गृहखात्याने काढलेल्या आदेशात यात्रा- जत्रांमध्ये होणारे पशुबळी थांबविण्याचे आदेश सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले जात आहेत. यासंदर्भात काम करणाऱ्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे,” असेही डॉ. गंगवाल म्हणाले.
”हरियाणा हायकोर्टाने आणि त्रिपुरा हायकोर्टाने नुकतीच देवी देवतांसमोर पशु पक्षी बळी देण्यावर बंदी घातली आहे. गुजरात राजस्थान आंध्रप्रदेश य राज्यांमध्ये बऱ्याच वर्षांपासून कायद्यानेच बळी प्रथेवर बंदी घातली आहे. महाराष्ट्रातही ही प्रथा बंद व्हावी, यासाठी प्रशासनाने कृती समिती तयार करावी. कायदा व प्रबोधनाद्वारे अजबली प्रथा रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करावी. यातून अंधश्रद्धा निर्मूलन आणि कायदा आणि पर्यावरण यांचे रक्षण होईल,” असेही त्यांनी नमूद केले.

चालू आर्थिक वर्षात व्हॅस्कॉनला 1245 कोटी रुपयांची कंत्राटे

0

पुणे– व्हॅस्कॉन इंजिनियर्स लि. (बीएसई स्क्रिप आयडी व्हॅस्कॉनक्यू) या पुण्यातील आघाडीच्या स्थावर मालमत्ता डेव्हलपरने सार्वजनिक कामकाज विभाग 3, रायपूर, छत्तीसगढ यांच्याकडून न्यू रायपूर, छत्तीसगढ येथे राजभवन, माननीय मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, माननीय मंत्र्यांसाठी निवासस्थान आणि उच्च अधिकारी निवासस्थान बांधण्यासाठी 505.54 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवले आहे. विक्रमी वेळेत दर्जेदार बांधकामासह कार्यक्षम वितरणासाठी प्रसिद्ध असलेले व्हॅस्कॉन या करारावर सही केल्यानंतर 24 महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करणार आहेत.

यावर्षी व्हॅस्कॉनला महाराष्ट्र राज्य पोलिस हाउसिंग अँड वेल्फेयर कॉर्पोरेशन लि. (महाराष्ट्र सरकारचे अंडरटेकिंग) यांच्याकडूनही मुंबईत कर्मचाऱ्यांसाठी बहुपयोगी सभागृहासह घरे बांधण्यासाठीचे 465 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. या प्रकल्पाचे वितरण निविदेची पावती आल्यापासून 36 महिन्यांत द्यायचे आहे.

या कंत्राटांविषयी व्हॅस्कॉन इंजिनियर्स लि. चे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष सुंदरराजन म्हणाले ‘दोन मोठ्या प्रकल्पांचे काम मिळाल्याचा आम्हाला अतिशय आऩंद आहे आणि परिणामी चालू आर्थिक वर्षात आमची ईपीसी कंत्राटे दुप्पट झाली आहेत. महाराष्ट्र आणि छत्तीसगढ सरकारकडून मिळालेल्या या दोन ईपीसी कंत्राटांमुळे उत्पन्न दृश्यमानता लक्षणीयरीत्या वाढली आहे. पुढे जाऊन आम्हाला क्षमता वापर सुधारण्यासाठी संधी मिळेल व त्यातूनच अधिक चांगले कार्यकारी मार्जिन साध्य करता येईल. ही कंत्राटे व्हॅस्कॉनच्या दर्जेदार बांधकामाची पावती देणारी आणि आम्ही ग्राहकांसाठी जे काम करतो, त्यावर असलेल्या भागधारकांच्या विश्वासाचा पुनरूच्चार करणारी आहेत.’

नुकत्याच मिळालेल्या कंत्राटांमुळे व्हॅस्कॉनची एकूण कंत्राटे चालू आर्थिक वर्ष 1245 कोटी रुपयांवर गेली असून बाह्य कंत्राटांचे एकूण मूल्य अंदाजे 1900 कोटी रुपयांवर गेले आहे.

‘वन अँड ओन्ली लता’मधून लतादिदिंना गानवंदना

0

पुणे : ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘हवा मे उडता जाए मेरा लाल दुपट्टा मलमल का’, ‘इब के सजन सावन मे’ अशा जुन्या काळातील बहारदार गाण्यांना आपल्या सुमधूर आवाजाने सूरसाज चढवित आणि त्याचसोबत लतादिदिंच्या आठवणींना उजाळा देत तरुण कलाकारांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ९० व्या वाढदिवसानिमित्त अनोखी गानवंदना दिली.

पुणे नवरात्र महोत्सव समिती, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फौंडेशनतर्फे आयोजित २५ व्या पुणे नवरात्र महोत्सवात युवा गायक आणि कलाकारांनी ‘दि वन अ‍ॅन्ड ओन्ली लता’ या संगीतमय कार्यक्रमातून सप्तसुरांची बरसात केली. महोत्सवाचे संयोजक आबा बागूल, जयश्री बागूल, घनःश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल, विकी खन्ना यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

स्वप्नजा लेले यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’ या गाण्याने कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर स्वरदा गोडबोले यांनी ‘हवा मे उडता जाए’ या गाण्याने रसिकांची वाहवा मिळविली. सौरभ दफ्तरदार आणि कोमल कनाकिया यांनी गायलेल्या ‘बाहो मे चले आ’ या द्वंद्वगीताने रसिकांना संगीताच्या सुवर्णकाळाची आठवण करुन दिली. ‘तुझसे नाराज नही जिंदगी हैराण हू मै’, ‘प्यार हुआ इकरार हुआ’, ‘तु जहॉ जहॉ चलेगा, मेरा साया साथ होगा’, ‘कही दिप जले’, ‘नाम गुम जाएगा’ अशा अजरामर गीतांनी तरुण गायक आणि वादकांनी लतादिदिंना त्यांच्या अप्रतिम योगदानासाठी गानवंदना वाहिली.

सौरभ दफ्तरदार, कोमल कनाकिया, स्वरदा गोडबोले, स्वप्नजा लेले या गायकांनी लतादीदी यांच्या गाण्यांना स्वरसाज चढविला. केदार परांजपे (सिंथेसायजर), दर्शना जोग (सिंथेसायजर), विशाल थेलकर (गिटार), निलेश देशपांडे (बासरी), अभिजित बधे (ऑकटोपॅड), अपूर्व द्रविड (तबला), अजय अत्रे (ढोलक) यांनी गायकांना साथसंगत केली. निरजा आपटे यांनी निवेदन केले.

ग्रामदैवताचे दर्शन घेऊन अरविंद शिंदे यांनी फोडला प्रचाराचा नारळ

0
  • कसब्यात इतिहास घडविणार
  • कसबा मतदार संघात पाणी वाटपाचे नियोजन नाही. धरणे भरली असताना पाणी कपात सुरू आहे. नागरिक रोज समस्यांचा सामना करीत असताना भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदार खुशाल आहेत. त्यांना नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात रस नाही. कसब्यातील जनता इतिहास घडविण्यास उत्सुक आहे असे उमेदवार अरविंद शिंदे यांनी सांगितले.

पुणे : महापालिकेतील गटनेते आणि कसबा विधानसभा मतदार संघाचे महाआघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे यांनी ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन शुक्रवारी प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर गणेश कला क्रीडा रंगमंचपर्यत प्रचार फेरी काढली. प्रचार फेरीत महाआघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आरंभापासून ते समारोपापर्यत या प्रचार फेरीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हवेत फडफडणारे महाआघाडीचे झेंडे, फुलांची उधळण, उमेदवार आणि नेत्यांच्या नावांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण प्रचार फेरी मार्ग महाआघाडीमय झाला होता.


यावेळी माजी मंत्री व काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार काँग्रेसचे नेते मोहन जोशी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. रोहित टिळक, सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, आमदार अनंतराव गाडगीळ, माजी आमदार दिप्ती चवधरी, काँग्रेसचे नेते डॉ. सतीश देसाई, नगसेविका लता राजगुरु, वैशाली मारणे, हजी चाँद बी नदाफ, अजित दरेकर, माजी महापौर रजनी त्रिभुवन, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष सोनाली मारणे, कल्पना अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे नेते दत्ता सगरे, बाळासाहेब अमराळे, चंदन सुरतवाला, काँग्रेसचे ब्लाक अध्यक्ष नाना करपे, राष्ट्रवादीचे कसबा ब्लाॅक अध्यक्ष विठ्ठल हनमघर, कार्याध्यक्ष गणेश नलावडे, नरेश नलावडे आदी उपस्थित होते.

कसबा गणपतीचे दर्शन घेऊन प्रचार फेरीला प्रारंभ झाला. यावेळी महाआघाडीच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणुन गेला. लाल महाल चौकात प्रचार फेरी येताच प्रचार फेरीवर कार्यकत्यांनी फुलांची उधळण केली. त्यानंतर उमेदवार अरविंद शिंदे व महाआघाडीच्या पदाधिकार्‍यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. येथेही प्रचार फेरीचे फुलांची उधळण करून जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिंदे यांनी दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतले. श्रीनाथ टाकीज चौकात भाऊ करपे यांनी उमेदवार व पदाधिकार्‍यांचे स्वागत केले. राष्ट्रभुषण चौकातही उमेदवाराचे महिलांनी औक्षण केले. काँग्रेस कार्यकत्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. त्यानंतर जेधे चौक मार्गे प्रचार फेरी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पोहोचली येथे प्रचार फेरीचा समारोप झाला. प्रचार फेरी मार्गावर महाआघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नवरात्र महोत्सव, गणेश मंडळे, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना,  विक्रेत्यांनी शिंदे यांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.

गांधी जयंती निमित्त गोयलगंगा स्कूल मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन

0

पुणे . :राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल मध्ये ५ कि.मी ‘प्लॉग रन’ (चालता चालता केली जाणारी स्वच्छता) हा उपक्रम राबवण्यात आला.

गोयल गंगा इंटरनैशनल स्कूलच्या वतीने जीजीआयएस-संत तुकाराम नगर – नेहरू नगर – मगर स्टेडियम येथून परत जीजीआयएस(गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल) असे एकूण ५ किमीचे अंतर ‘प्लॉग रन’च्या दरम्यान पूर्ण करण्यात आले. अत्यंत उत्साहाने गोयलगंगा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि कर्मचार्‍यांनी ही या उपक्रमामध्ये उत्साहाने भाग घेतला.कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जवळपास ६०० विद्यार्थी ५ किलोमीटर पर्यंत चालले.

यादरम्यान सर्वांनी वाटेत सापडलेला सर्व प्लास्टिक कचरा उचलून तेथील स्वयंसेवकांकडे दिला.नंतर हा सर्व प्लास्टिक कचरा गोळा करून या अविघटनशील उत्पादनांचा पुनर्वापरावर काम करणार्‍या संस्थांना पाठविला गेला.  सकाळी सहा वाजल्या पासून हा उपक्रम राबवण्यात आला. पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता प्रत्येक विद्यार्थ्याने जपण्यासाठी आमची शाळा कायम प्रयत्नशील आहे. तसेच महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील स्वच्छ भारताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आमचा असाच सहभाग राहील. अशा भावना शाळेच्या संचालिका सोनू गुप्ता यांनी व्यक्त केल्या.

 

सकाळी साडेसहा वाजता सोनू गुप्ता, भारती भागवाणी, गोयल गंगा फाउंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल आणि गीता गोयल यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

शाळेच्या आवारात माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. तसेच प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गांधीजींचे आवडते भजन गायले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समाजसेवक विनोद कुदळे गोयल गंगा फाउंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल आणि गीता गोयल यांच्या उपस्थितीमुळे वातावरण आनंददायी बनले.

 

विनोद कुदळे म्हणाले कि, ग्रामस्वराज्य असो की ग्रामोद्योग, व्यक्तिगत आचरण असो की राहणीमान, पर्यावरण, आरोग्य, अशा अनेक विषयांवर गांधीजींनी आपली मते मांडली. आजच्या बदलत्या काळातही ती सुसंगत आहेत. त्यांच्या विचारांचे महत्त्व नवीन पिढीला समजेल अशा पद्धतीने मांडून त्याची वर्तमानातील समस्यांशी सांगड घालून त्याची उपयुक्तता कुदळे यांनी विद्यार्थ्यांना यावेळी सांगितली.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे- लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन

0
पुणे :-  आपल्या भोवतालच्या पर्यावरण रक्षणात आपली जबाबदारी प्रत्येक सुज्ञ नागरिकांने ओळखली पाहिजे. त्यानुसार कृती करून केवळ पर्यावरण रक्षणच नव्हे, तर जाणीवपूर्वक प्रयत्न करून त्याचे संवर्धन देखील करावे. विकासाबरोबरच पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांनी केले.

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी आर्ट, डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात मोठ्या घुमटातील तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली विश्व शांती प्रार्थना सभागृह, विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या वर्ल्ड पार्लमेंटचा समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

या प्रसंगी अमेरिकन गांधी बर्नी मेयर, नवी दिल्ली येथील इंडियन काउंसिल ऑफ फिलॉसॉफीकल रिसर्चचे अध्यक्ष डाॅ. आर. सी सिन्हा, नवी दिल्ली येथील अखिल भारतीय दर्शन परिषदेचे सचिव प्रा. अंबिका दत्ता शर्मा, दिल्ली विद्यापीठाचे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक डॉ. अशोक व्होरा, जगप्रसिद्ध संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, माईर्सचे अधिष्ठाचा प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, माईर्स एमआयटीचे संस्थापकीय सहविश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, विश्वस्त डाॅ. चंद्रकांत पांडव, एमआयटी डब्ल्युपीयुचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी युनिवर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. एस. परशूरामन, प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्र-कुलगुरू प्रा. डी. पी. आपटे, प्र-कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस हे उपस्थित होते.
यावेळी नवी दिल्ली येथील अखिल भारतीय दर्शन परिषद व नवी दिल्ली येथील इंडियन कौन्सिल ऑफ फिलॉसॉफीकल रिसर्च यांच्या वतीने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांना त्यांनी केलेल्या  अद्वितिय कार्याबद्दल “विश्व-विज्ञान-दार्शनिक” पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सुमित्रा महाजन म्हणाल्या, पर्यावरणाच्या रक्षणाससोबतच संस्कृती जतनाचे काम व्हावे. वृक्ष जीवनाला जोडतात. विकास आणि पर्यावरण एकमेकास पुरक आहेत. नदीवरील अतिक्रमणामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. नदीचे प्रवाह नष्ट केल्यामुळे त्याचे परिणाम भागावे लागत आहेत. महिला ही नदीचे रुपक आहे. मानवी हस्तक्षेपामुळे सृष्टीत फेरबदल होत आहेत. पृथ्वी वाचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. विनोबा भावे म्हणातात  कोणतेही काम करताना भावनेचा ओलावा असावा. आस्था आणि श्रद्धेने आणि समाधानाने काम करावे. तत्वज्ञानाच्या मागील भावना समजून घ्यावी. धर्म म्हणजे जीवन जगण्याची कला आहे. विश्वाला ज्ञान देण्याचे कार्य या घुमटाद्वारे होईल. कल्पनेला स्वप्नात पाहणे आणि ती सत्यात उतरविण्यासाठी सहकार्या सोबत घेऊन कृती करणे हीच यशाची गुरूकिल्ली आहे. भारतात सुसंस्कृत आणि ज्ञानी समाज बनवायचा आहे. वेदात सर्व ज्ञानाची कल्पना आहे. विज्ञान, धर्म आणि तत्वज्ञान या तिन्हीच्या माध्यमातून आपल्या जीवनपद्धतीची माहिती मिळते. भारताला विश्वगुरू कसे बनवावे या कल्पनेला युवकांनी मुर्त रुप द्यावे. डाॅ. कराड यांनी उभारलेला जगातील सर्वात मोठा घुमट हा ज्ञान केंद्र म्हणून उदयास येईल.

डॉ. विजय भटकर म्हणाले, विज्ञान, तत्वज्ञान, धर्म यांचा जागर गेली तीन दिवस या जगातील सर्वात मोठ्या घुमटात होत आहे. समाजासाठी काय आवश्यक आहे याविषयावर आणि जगात शांती नांदावी यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. संत ज्ञानेश्वर, जगतगुरू तुकाराम आणि शंकाचारार्या हे तत्वज्ञ होत. मुस्लिम धर्म नेता वेद आणि हिंदु संस्कृतीची बाब अधोरेखित करतो, हेच या परिषदेचे मोठे यश आहे. मानवतेच्या कल्याणासाठी धर्म, पंथ, भेदभाव विसरून एकत्र येण्याची ही सुरूवात आहे.

डॉ. आर. सी. सिन्हा म्हणाले, तत्वज्ञ हा सिस्टिम बसवतो. शंकराचार्य यांच्यानंतरचे तत्वज्ञ आणि तत्वज्ञता यांची पुन्हा रिडिफाईन करण्याची गरज आहे. तत्वज्ञ हा एका आडियाला इतर आडियाशी जोडण्याचा प्रयत्न करत असतो. धर्म हा एकात्मतेचा संदेश देतो.

प्रा. अंबिका दत्ता शर्मा म्हणाले, यश, किर्ती आणि प्रतिष्ठा तेव्हाच मिळते जेव्हा त्या व्यक्तीकडे अधिक गुणसंपन्नता असेल. सर्व धर्म समभावाचा संदेश संतांनी दिला. ज्ञान अनमोल आहे. ते अमुर्त रूपात असते. त्याला मुर्त स्वरूप देण्याचे कार्य शिक्षक करतात.

डॉ. अशोक व्होरा म्हणाले, संतांना तत्वज्ञ मानण्याची सुरूवात या शतकात सुरू झाली. यात संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू संत तुकाराम यासारखे अनेक संतांना आज तत्वज्ञ म्हणून ओळखले जात आहे.

पुरस्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, पूर्णब्रम्हयोगिनी त्यागमुर्ती प्रयाग अक्का कराड, संत ज्ञानेश्वर आणि जगतगुरू संत तुकाराम यांनी जीवनाचा मार्ग दाखविला. संत, तत्वज्ञ आणि शास्त्रज्ञ यांनी जगाला सत्याचा मार्ग दाखविला. मानव कल्याणासाठी आणि भारतीय संस्कृती, परंपरेच्या स्वरुपाचे दर्शन या घुमटातून मिळत राहिले. सर्व धर्म एकच आहे. शांतीपूर्ण समाज निर्मितीची सध्याच्या काळात गरज आहे. शांतीसाठी सर्वांनी एकत्र यावे. या घुमटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, परंपरा व तत्त्वज्ञानाचे वेगळे स्वरूप जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, वैश्र्विक भारतीय संस्कृतीचे दर्शन जगाला घडणार आहे.

या समारोप समारंभात तीन  दिवस चाललेल्या पाचव्या वर्ल्ड पार्लमेंटमध्ये सात ठराव सर्वानुमते पास करण्यात आले. त्याचे वाचन प्रा.डाॅ. आर.एम.चिटणीस यांनी केले.

राहुल विश्वनाथ कराड यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी. पी. आपटे यांनी आभार मानले. प्रा.डाॅ. मिलिंद पांडे यांनी सन्मान पत्राचे वाचन केले.

आपल्या लेकीसाठी आबा हट्ट सोडतील-पर्वतीतून अश्विनी कदमांचा उमेदवारी अर्ज दाखल (व्हिडीओ)

0
पुणे : पर्वती विधानसभा मतदार संघाच्या  राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांनी शक्ती प्रदर्शन करीत आज उमेदवारी अर्ज दाखल केला .यावेळी अरण्येश्वर येथील त्यांच्या निवासस्थाना पासून त्यांनी मिरवणुकीने जावून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला . यावेळी त्यांच्या समवेत कॉंग्रेसचे आमदार अनंतराव गाडगीळ ,मोहन जोशी ,अरविंद शिंदे तसेच विशाल तांबे,बाळा ,धनकवडे ,डॉ. सुनीता मोरे ,अनिल सातपुते,सतीश पवार  आदी मान्यवर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती .
  अर्ज भरण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना अश्विनी कदम म्हणाल्या, मला मतदार संघाचा अनुभव असून मी स्थानिक आहे.मी तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहे.  त्यामुळे मला स्थानिक जनतेचे प्रश्न माहिती आहेत. मतदार संघात विकास कामे झालेली नाहीत. अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. काँग्रेसचे नाराज नगरसेवक आबा बागुल यांची मी लेकच आहे. ते मला पित्यासमान असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होतील. आबा लेकीसाठी नक्की माघार घेतील अशी भावनिक साद यावेळी त्यांनी घातली . 

तरी कॉंग्रेसचे डोळे उघडत नाहीत-पर्वतीतून आबा बागुलांची बंडखोरी (व्हिडीओ)

0
पुणे- तब्बल सहा वेळा जनतेने निवडून दिले, स्थानिक कुरघोडयांच्या राजकरणात हि विकासाचे असंख्य प्रकल्प राबवून जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला पण …आपल्यापेक्षा कुणाला पुढे जावून द्यायचे नाही या वृत्तीतून नगरसेवक पदापर्यंतच मला रोखण्यात आले. अशा राजकारणातून कॉंग्रेसचे ९० नगरसेवकांचे संख्याबळ ९ वर पोहोचले तरी कॉंग्रेसचे डोळे उघडले नाहीत . पण आता माघार नाही ,घाबरणार नाही आता लढणार ,तुम्ही आहात ना माझ्याबरोबर ? असा सवाल आज आपल्या हितचिंतक नागरिकांच्या मेळाव्यात करत ,मिरवणुकीने जावून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक ,माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पर्वती मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
या मतदार संघातून त्यांनी कॉंग्रेस कडे उमेदवारी मागितली होती, काम पहा आणि उमेदवारी द्या असा त्यांचा हट्ट होता . शरद पवार ,  अजित  पवार, पृथ्वीराज चव्हाण ,अशोक  चव्हाण यासारखी असंख्य नेते मंडळी त्यांच्या विविध कार्यक्रमांना आलेली .. एवढेच काय भाजपच्या तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापटांनी त्यांच्या कामाचे कौतुक केलेले .पण राष्ट्रवादी ने नेहमीप्रमाणे हा मतदार संघ आघाडीच्या जागा वाटपात स्वतःकडेच ठेव्यात यासह मिळविले आणि आबांच्या नशिबी पुन्हा निराशा आली . अखेरीस आता माघार नाही असे म्हणत आबा बागुलांनी नागरिक आणि कार्यकर्त्यांशी संवाद ठेवत आज अखेरच्या दिवशी आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. पहा तत्पूर्वी आबा बागुल नेमके आपल्या भाषणात काय म्हणाले …..

छत्रपती संभाजी महाराज यांच्या डेक्कन येथील पुतळ्याला अभिवादन करून सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात

0

पुणे : भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (A), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे शिवाजीनगर मतदार संघातील अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज सकाळी डेक्कन बसस्थानकाजवळील गरवारे चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करीत आपल्या प्रचाराला सुरुवात केली. काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिरोळे यांनी आपला मतदारसंघातील प्रचार आज सुरु केला.

आज त्यांनी खंडोजी बाबा मंदिरातील समाधीचे दर्शन घेतले याबरोबरच तुकाराम पादुका चौकातील तुकाराम महाराज मंदिरातील पादुकांचेही दर्शन घेतले या वेळी भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, नगरसेविका नीलिमा खाडे, स्वाती लोखंडे, राजश्री काळे, प्रतुल जगदाळे, गणेश बागडे, अशोक लोखंडे, राम म्हेत्रे, ओंकार केदारी, नितीन कुंवर, योगेश बाचल आदी अपस्थित होते.

या आधी सकाळी फर्गसन रस्त्यावरील रुपाली हॉटेल येथे जमलेल्या ज्येष्ठ नागरिकांची  भेट घेत सिद्धार्थ शिरोळे यांनी त्यांच्या अपेक्षा जाणून घेत त्यावर चर्चा केली. तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणा-या सिद्धार्थ शिरोळे यांचा उत्साह पाहून उपस्थित नागरिकांनीही त्यांचे कौतुक करीत त्यांची पाठ थोपटली.

या नंतर खडकी येथील अजमेर शरीफ ख्वाजा गरीब नवाज दर्गा आणि गांधी चौक, खडकी येथील गणेश मंदिरात आरती करीत सिद्धार्थ शिरोळे यांनी तेथील पदाधिकारी व नागरिक यांची भेट घेतली. या भागातील नागरिकांच्या अपेक्षा देखील त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी खडकीचे नगरसेवक विजय शेवाळे, उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील एस. के. जैन, माजी नगरसेवक मुकेश गवळी आदी उपस्थित होते.    

माधुरी मिसाळ यांचाविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार

0

पुणे :पर्वती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी निवडणूक कार्यालयाच्या परिसरात सभा घेतली. हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याने त्यावर आम आदमी पार्टीकडून आक्षेप घेण्यात आला आहे. आपकडून माधुरी मिसाळ यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंगाची खी तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेच्या नियमानुसार, निवडणूक कार्यालयाच्या १०० मीटरच्या आतमध्ये कोणत्याही स्वरुपाची राजकीय सभा घेता येत नाही. मात्र, तरी देखील आमदार माधुरी मिसाळ यांनी निवडणूक कार्यालयाच्या परिसरात कार्यालयापासून १०० मीटरच्या आतमध्ये सभा घेतली. त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप करीत आपचे कार्यकर्ते चंद्रशेखर पानसे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

पानसे यांनी आपल्या लेखी तक्रारीत म्हटले की, “३ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी त्यांची संबंधित निवडणूक कार्यालयाच्या १०० मीटरच्या आतमध्ये सभा सुरु होती. या सभेमध्ये खासदार गिरीश बापट, योगेश गोगावले, माधुरी मिसाळ यांनी भाषणे केली. निवडणूक आचारसंहितेचा हा भंग आहे. तरी याची दखल घेऊन कारवाई करावी.”

दरम्यान, हा तक्रार अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी स्विकारला असून या अर्जावर कार्यालयातील लिपिकाचा शिक्का आणि सही देखील आहे.

टिळेकर -मोरे यांचे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

0

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी हडपसर मतदारसंघातून भाजपचे योगेश टिळेकर, मनसेकडून वसंत मोरे यांच्यासह एकूण दहा उमेदवारांनी 13 अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून चेतन तुपे हे उद्या दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेतभाजपचे उमेदवार टिळेकर यांनी कोंढवा गोकुळ नगर भागातून भव्य रॅली काढून हडपसर येथील निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल केला. तसेच, मनसेचे उमेदवार मोरे यांनीही कात्रज येथून भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोन्ही उमेदवारांनी आज शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले. वंचित विकास आघाडीकडून घनश्याम बापू हाके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी दाखल उमेदवारांचे अर्ज
योगेश पुंडलिक टिळेकर – भाजप
वसंत कृष्णाजी मोरे – मनसे
घनश्याम आनंद हाके – वंचित बहुजन आघाडी
गंगाधर विठ्ठल बधे – अपक्ष
दीपक महादेव जाधव – बसप
खंडू सतीश लोंढे – अपक्ष
राकेश हारकू वाल्मिकी – अपक्ष
ए सईद अरकाटी – अपक्ष
ऍड तौसिफ शेख – अपक्ष
कृपाल कृष्णराव कलुसकर – प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष

लोकसभेपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून निवडून येईन : चंद्रकांतदादा पाटील

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती 220 जागा मिळवेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा  पाटील यांनी व्यक्त केला. त्याच वेळी कोथरूडमधून लोकसभेपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून विजय संपादित करेल असेही ते म्हणाले. गुरुवारी सकाळी जोरदार शक्तीप्रदर्शन करत चंद्रकांतदादा   यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कोथरुड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

कोथरुड चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅलीला होणार सुरुवात केली. आज सकाळीच त्यांनी कोथरूडचे ग्रामदैवता म्हातोबाचे दर्शन घेतले.यावेळी विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी ,माजी मंत्री शशिकांत सुतार ,खासदार गिरीश बापट, खासदार संजय काकडे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे उपस्थित होते. लोकसभेत कोथरूडमधून 1 लाख 6 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. आता त्यापेक्षा जास्त मिळेल असे त्यांनी यावेळी म्हटले आहे .

दरम्यान पर्वती विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार व भाजपा शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी आज पर्वती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले,खा.गिरीश बापट,सरचिटणीस दीपक मिसाळ,शिवसेना शहर प्रमुख संदीप मोरे यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी,नगरसेवक,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…