Home Blog Page 276

ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन

पुणे : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कामगार आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा आढाव यांचे आज रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी निधन झाले, ते ९५ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते, त्यांतच त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच, शरद पवार हे बाबा आढावांच्या भेटीला रुग्णालयात गेले होते. पुना हॉस्पिटलमध्ये बाबा आढाव यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. तर, गेल्याच आठवड्यात ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले होते. तेव्हाही शरद पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पन्नालाल सुराणा यांच्या कार्याची आठवण काढत त्यांना आदरांजली वाहिली होती.तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर , व्ही पी सिंह यांना बाबा आढावांच्या सामाजिक कार्याबाबत मोठा आदर होता या दृष्टीने त्यांनी पंतप्रधान असताना देखील पुण्यात बाबा आढाव यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवला होता. समाजवादी नेते म्हणूनच नव्हे तर ते कष्टकरी समाजाचे नेते म्हणूनही त्यांचा परिचय होता.भाई वैद्य , एस एम जोशी , मोहन धारिया आणि बाबा आढाव हि पुण्यातील समाजवादी नेते मंडळी देशभर आपल्या कार्याने परिचित होती.

बाबा आढाव यांना गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पुना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य व तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर आवश्यक ते उपचार सुरू होते. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आय.सी.यू. मध्ये ठेवण्यात आले होते. अखेर, आज रात्री 8.25 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कष्टकऱ्यांसाठी लढणारा, समाजवादी विचारांचा नेता महाराष्ट्राने गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

1970 च्या दशकात डॉ. बाबा आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. तात्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीने नेते म्हणूनही काम करत होते. ‘एक गाव एक पाणवठा’ नावाची मोहिम चालवली जात होती. बाबा आढाव त्याचे प्रणेते होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची मोठी ओळख होती, मृत्यूसमयी ते 95 वर्षांचे होते.

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर देशातील आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी परखडपणे भाष्य केलं होतं. माणूस सकाळी कुठं असेल अन संध्याकाळी कुठं असेल, सध्या अशी परिस्थिती आहे. कारण त्यांना सत्तेची भूक आहे. पण लक्षात ठेवायला हवं, 140 कोटी जनताच ठरवेल, कोणाचं काय करायचं असं बाबा आढाव म्हणाले. ते म्हणाले की, काळ कठीण आहे, काळाचे भान ठेवा. सध्याचं राजकारण खूप विलक्षण आहे. कॅनडा मधून माझे कुटुंबीय म्हणतायेत की भारतात काय चाललंय नेमकं? आपल्या इथं फक्त सत्तेसाठी सगळं सुरू आहे, असे म्हणत राष्ट्रवादीतील फुटीनंतर बाबा आढाव यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत वयाच्या 93 व्या वर्षीही आंदोलन केलं होतं.

ईव्हीएमच्या विरोधात आत्मक्लेश

बाबा आढाव खऱ्या अर्थाने संघर्ष करणारे नेते होते. त्यांनी गेल्यावर्षी ईव्हीएमच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन केलं होतं. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी सलग तीन दिवस ईव्हीएमच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन केलं होतं. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांनी ईव्हीएमवर टीका केली होती. त्यानंतर बाबा आढाव यांनी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरु केलं होतं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिवून त्यांनी आपलं उपोषण सोडलं होतं. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, संजय राऊत या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती.
बाबा आढाव यांचा जन्म १९३७ मध्ये पुण्यात झाला. ते नाना पेठेतील नामांकीत आयुर्वेदिक डॉक्टर होते. याच नाना पेठ भागात अनेक व्यवसायांतील कामगार त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी येत असतं त्यातूनच त्यांना हमालांना येणार्‍या अनेक अडचणी लक्षात आल्या. हमालांचे शोषण होऊनही त्यांना कुठलेही कायदेशीर संरक्षण नसल्याचे त्यांनी पाहिले. अखेर त्यांनी १९६६ मध्ये बाबांनी डॉक्टरकीचा व्ववसाय सोडला आणि कामगारांच्या पाठीशी उभे राहायचे ठरवले.

डॉ. बाबा आढाव सुरुवातीला समाजवादी पक्षाबरोबर काम करायचे. मात्र, त्यांनी तो राजकीय पक्ष सोडला आणि १९५५ मध्ये हमाल पंचायत स्थापन केली. याच पंचायतीची पुढे १९७२ मध्ये कामगार संघटना झाली. १९५६ मध्ये वाहतूक क्षेत्रातील कामगारांना योग्य वेतन मिळावे, या मागणीसाठी हमाल पंचायतीने पहिले आंदोलन केले. त्यानंतर त्यासाठी केलेल्या सततच्या संघर्षामुळे १९६९ ला राज्यात महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा मंजूर झाला. असंघटित कामगारांच्या कल्याण आणि सुरक्षेसाठी भारतातील हा पहिला कायदा होता. याच संपूर्ण श्रेय हे बाबा आढाव यांच्या संघर्षालाच जाते. १९७२ मध्ये दलितांना सर्व ठिकाणी पाणी मिळावे, यासाठी त्यांनी ‘एक गाव, एक पाणवठा’ नावाने राज्यभर मोर्चे काढले. पुण्यातील कामगारांना स्वस्त, पौष्टिक जेवण उपलब्ध करून देणारी ‘कष्टाची भाकरी योजना’ हीदेखील आढाव यांचीच कल्पना होती. या योजनेतील पहिल्या शाखेची सुरुवात २ ऑक्टोबर १९७४ रोजी भवानी पेठेत झाली

डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या कोणत्याही पुस्तकात ‘वंदे मातरम’चा उल्लेख असल्यास तो दाखवून द्या-ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिले खुले आव्हान

ज्यांनी तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत, अरविंद सावंतांचा हल्लाबोल
नवी दिल्ली– आज ‘वंदे मातरम’चे गोडवे गाणाऱ्यांच्या ‘पितृ संघटने’ने 50 वर्षे आपल्या कार्यालयावर कधीही तिरंगा फडकवला नाही किंवा राष्ट्रगीत गायले नाही. ज्यांना इतिहासाचा विसर पडला आहे, त्यांनी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या कोणत्याही पुस्तकात ‘वंदे मातरम’चा उल्लेख असल्यास तो दाखवून द्यावा, असे खुले आव्हान ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिले आहे. संसदेत ‘वंदे मातरम’वर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केला.

स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचा समाचार घेताना अरविंद सावंत यांनी देशातील संस्थांच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, पंतप्रधान आत्मनिर्भरतेच्या गप्पा मारत असले, तरी आज देशातील न्यायव्यवस्था, सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग यांसारखी कोणतीही संस्था खऱ्या अर्थाने ‘आत्मनिर्भर’ राहिलेली नाही. त्यांच्यात ‘आत्मभान’ उरलेले नाही. संविधानाच्या मूळ ढाच्यावर आणि स्वातंत्र्यावर रोज हल्ले होत आहेत. त्यामुळे ‘वंदे मातरम’चा खरा जयघोष करण्यासाठी आणि आत्मसन्मानासाठी देशाला आता स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागेल.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा उपस्थित करत सावंत यांनी सीमावासियांच्या वेदना मांडल्या. एकीकडे मातृभूमीची स्तुती केली जात आहे, तर दुसरीकडे बेळगाव-कारवार-निपाणी भागात मागील 60 वर्षांपासून न्यायासाठी लढणाऱ्या मराठी भाषिकांना अटक केली जात आहे. हा कुठला न्याय? असा संतप्त सवाल त्यांनी केला. केवळ कार्यालयांची नावे बदलून विकास होत नसतो, ‘सेवा मंदिरा’चे दरवाजे जनतेसाठी बंद झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

‘वंदे मातरम’चा खरा इतिहास सांगताना अरविंद सावंत यांनी महाराष्ट्रातील बलिदानाची आठवण करून दिली. ते म्हणाले, 1942 च्या आंदोलनात नंदुरबार येथील अवघ्या 14 वर्षांच्या शिरीष कुमारने हातात तिरंगा घेऊन ‘वंदे मातरम’चा नारा दिला आणि तो इंग्रजांच्या गोळीला हसत हसत सामोरा गेला. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात सर्व नेत्यांना अटक झाली असताना, अरुणा असफ अली यांनी धाडसाने तिरंगा फडकवत ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’चा नारा दिला होता. हा देशाचा खरा इतिहास आहे, असे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवला.

नाताळ सण सर्वधर्मीयांसह सिटी चर्च येथे साजरा करण्याची परंपरा

नाताळ सण सर्वधर्मीयांसह सिटी चर्च येथे साजरा करण्याचा परंपरा कायम असून या चर्चने शैक्षणिक कार्य उभे करण्यात मोठा सहभाग नोंदविला असे येथेख्रिश्चन समाजाचे नेते लुकस केदारी यांनी सांगितले..

पुणे : सवाई माधवराव पेशव्यांनी१७९२ मध्ये सिटी चर्चसाठी जमीन दिली. हे शहरातील पहिले चर्च आहे. तेव्हा येथून शहराला सुरुवात होत असे. सिटी चर्चने या जागेत शाळा सुरू करून या भागात मोठे शैक्षणिक कार्य उभा केले आहे, अशी भावना पुष्करसिंह पेशवा यांनी सोमवारी व्यक्त केली.
नाना पेठ क्वार्टर गेट येथील सिटी चर्च या सर्वात जुन्या कॅथोलिक चर्चला सोमवारी २३३ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुष्करसिंह पेशवा, त्यांच्या मातु:श्री जयमंगलाराजे पेशवा आणि कन्या रियाराजे पेशवा यांचा अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कन्सेपशन चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर लुई हेरेडिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पेशव्यांचा चर्चतर्फे सत्कार करण्याच्या संकल्पनेबद्दल ज्येष्ठ पत्रकार प्रवीण प्र वाळिंबे यांचा सत्कार फादर गॉडवीन सालढाणा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी फादर अल्फानसो, फादर भाऊसाहेब संसारे, रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे अध्यक्ष
लुकस केदारी , सोसायटीचे संघटक पीटर डिसुझा , फ्लॉरिना वाझ, मिलिफा फर्नांडिस, जोएन डिसुझा उपस्थित होते.
पुष्करसिंह पेशवा म्हणाले, आज जाती आणि धर्मांकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे. सत्तेसाठी पूर्वी संघर्ष झाला. मात्र , एका पातळीनंतर संबंध जोपासले जात होते.
चिम्माजीअप्पांनी वसईच्या लढ्यात पोर्तुगीजांचा पराभव केला. मात्र, मराठ्यांनी तेथील पोर्तुगीजांचा धर्म बदलला नाही. आज तेथे मराठी आणि ख्रिश्चन लोक मिळूनमिसळून राहतात. हेच उदाहरण पुण्यात सिटी चर्चच्या बाबतीत दिसते. सवाई माधवराव पेशव्यांनी १७९२ मध्ये सिटी चर्चसाठी जमीन दिली. माझे वडील उदयसिंह पेशवा या चर्चच्या कार्याविषयी नेहमी माहिती सांगायचे. चर्चला २२५ वर्षे पूर्ण झाली. तेव्हाही आम्ही येथे आलो होतो. पेशव्यांची आठवण ठेवून तेव्हाही आम्हाला गौरविण्यात आले होते. थोरले बाजीराव पेशव्यांची माझी दहावी पिढी आहे. हे पहिले सिटी चर्च आहे असे वडील सांगायचे. येथून शहराला सुरुवात होत असे. सिटी चर्चने येथे शाळा सुरू करून मोठे शैक्षणिक कार्य उभा केले आहे. आमच्या तर्फे सर्वांना नाताळच्या शुभेच्छा.
प्रमुख धर्मगुरू फादर लुई हेरेडिया यांनी पेशवा कुटुंबीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपस्थित शेकडो ख्रिस्ती बांधवांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

शहरातले पहिले चर्च

सन १७८८ मध्ये शंभर पोर्तुगीज सैनिक आणि दोनशे कॅथोलिक सैनिक हे दारूगोळ्यासह पेशव्यांच्या सैन्यात दाखल झाले. पोर्तुगीजांचे अधिकारी नोमिन्हो हे माधवराव पेशवे (दुसरे) यांच्या संपर्कात होते. त्यांच्या विनंतीनुसार माधवराव पेशव्यांनी पाच एकर जागा पोर्तुगीजांना दान केली. त्यावरच पुण्यातील पहिले चर्च उभा राहिले. तेच आज सिटी चर्च म्हणून ओळखले जाते.


विमान वाहतूक मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा:इंडिगो क्रायसिसवर पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : इंडिगो विमानसेवेतील अलीकडील मोठ्या प्रमाणातील क्रायसिस आणि प्रवाशांना झालेल्या प्रचंड त्रासाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईतील गांधी भवन, कुलाबा येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार, DGCA आणि विमान कंपन्यांवर गंभीर आरोप केले. विमान वाहतूक क्षेत्रात वाढती मक्तेदारी, नियमांचे उल्लंघन आणि सरकार-एअरलाइन यांच्यातील कथित संगनमतामुळे आजची परिस्थिती निर्माण झाल्याचा ठपका चव्हाण यांनी ठेवला.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, इंडिगो चा प्रवासी क्रायसिस हा अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक प्रकार आहे. हे सर्व DGCA आणि केंद्र सरकारने इंडिगोला दिलेल्या सूट आणि ढिलाईमुळे घडले. त्यांनी सांगितले की DGCA ने 1 जुलै 2024 पासून लागू करायचे नियमांची अंमलबजावणी न झाल्याने मक्तेदारी वाढत गेली.

पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, विमान क्षेत्रात केवळ दोनच कंपन्यांची मक्तेदारी राहिली आहे. इंडिगो 65% आणि टाटा समूह 30%. ही स्थिती अत्यंत धोकादायक आहे.

Competition आयोगाला अशा मक्तेदारीला रोखण्यात पूर्ण अपयश आले असून, हा आयोग बरखास्त करून नवी समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. इंडिगोचे दोन भाग करून दोघांचा जास्तीत जास्त 30-30% मार्केट शेअर ठेवण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.

“इंडिगोच्या मालकांनी बीजेपीला इलेक्ट्रोर बॉण्डद्वारे 56 कोटी रुपयांची देणगी दिली. त्याचा DGCA च्या निर्णयांशी काही संबंध आहे का? हे तपासणे गरजेचे आहे.

25 नोव्हेंबर 2025 रोजी अदानी डिफेन्सने देशातील सर्वात मोठ्या पायलट ट्रेनिंग संस्थेची खरेदी केली. यामुळे या क्षेत्रात सुद्धा मक्तेदारी वाढण्याची भीती आहे. कारण काही दिवसापूर्वीचं केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांनी जाहीर केले कि, येत्या 10-15 वर्षात देशात 30,000 पायलट ची गरज भासू शकते आणि त्यानंतरचं हा अदानी यांनी ट्रेनिंग संस्था विकत घेतली.

पुढे श्री चव्हाण म्हणाले कि, प्रवाशांनी दुप्पट-तिप्पट किंमतीत तिकीट घेतल्याने झालेल्या आर्थिक नुकसानीबद्दल सरकारने किमान 1000 कोटींचा विशेष फंड तयार करण्याची मागणी चव्हाण यांनी केली. भोपाळ गॅस दुर्घटनेप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पृथ्वीराज चव्हाण यांनी खालील मागण्या पत्रकार परिषदेत मांडल्या:

  1. केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
  2. DGCA चे जबाबदार अधिकारी बडतर्फ करावेत.
  3. इंडिगोचे CEO यांना तात्काळ निलंबित करावे.
  4. क्रायसिसवर 15 दिवसांत अहवाल देणारी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी.
  5. Competition committee बरखास्त करून नव्याने सक्षम आयोग स्थापन करावा.
  6. इंडिगोचे दोन तुकडे करून मक्तेदारी रोखावी.
  7. मनमोहन सिंग सरकारने प्रस्तावित केलेल्या CAA (Civil Aviation Authority) ची रचना लागू करावी.

“विमान वाहतूक क्षेत्रातील मक्तेदारी देशासाठी धोकादायक” – चव्हाण

“2004 मध्ये 10 विमान कंपन्या होत्या, आज फक्त 2 मोठ्या कंपन्या शिल्लक आहेत.”

“40 कोटी प्रवासी आणि फक्त दोन कंपन्या—ही स्थिती भविष्यात अधिक गंभीर होईल.”

“सरकारने विमान वाहतूक क्षेत्र खाजगी हातात जाऊ न देता स्वतःची एक विमान कंपनी सुरू करावी.”

अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून २००+ इच्छुकांनी दिवसभरात नेले उमेदवारीसाठी अर्ज

निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज वाटप – पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद

पुणे- महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इच्छुक उमेदवारांसाठी उमेदवारी अर्ज वाटपाची प्रक्रिया आज उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. पक्षाचे पूर्व विभागाचे अध्यक्ष सुनील टिंगरे व पश्चिम विभागाचे अध्यक्ष सुभाष जगताप साहेब या दोघांच्या हस्ते पक्षाच्या पुणे शहर कार्यालयात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सामाजिक न्यायाच्या धोरणाला अनुसरून उमेदवारी अर्जाची रक्कम निश्चित केली आहे.ओपन व ओबीसी प्रवर्गासाठी उमेदवारी अर्जासोबत २०,००० रुपये, तर अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी १०,००० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. अर्जाचा फॉर्म शुल्क केवळ ५०० रुपये ठेवण्यात आले असून, सर्वसामान्य कार्यकर्ते, तरुण आणि समाजाच्या विविध घटकांना संधी देण्याचा पक्षाचा ठाम उद्देश यातून स्पष्ट होतो. अर्ज विक्रीस सुरुवात व अर्ज स्वीकारण्याची तारीख 8 डिसेंबर पासून ते 18 डिसेंबर पर्यंत अशी 10 दिवस ठेवण्यात आली आहे.

आज दिवसभरात सुमारे २०० हून अधिक उमेदवारी अर्ज वितरित झाले असून, यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर पुणेकरांचा असलेला विश्वास आणि आगामी महापालिका निवडणुकीबाबतची सकारात्मक ऊर्जा स्पष्टपणे दिसून येते. आजी-माजी नगरसेवक, युवक कार्यकर्ते, महिला प्रतिनिधी तसेच नव्या नेतृत्वाने मोठ्या उत्साहाने अर्ज घेतले.

पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध असून, सक्षम, स्वच्छ प्रतिमा असलेले व जनतेशी नाळ जोडलेले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याचा पक्षाचा मानस आहे. त्यामुळेच उमेदवार निवड प्रक्रियेत सामाजिक समतोल, कार्यक्षम नेतृत्व आणि लोकसेवेची बांधिलकी हे प्रमुख निकष असतील, असे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

पुण्यात भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची महागर्दी:पहिल्याच दिवशी दोन हजार अर्जांची मागणी…

पुणे- महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली. यावेळी भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी दिसून आली.पुणे महापालिका निवडणूक लवकरच होणार असून, विविध राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघांत प्रचाराची कामे सुरू केली आहेत. पुण्यात भाजपचे १०० नगरसेवक असल्याने, पक्षाकडून उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा आहे. अर्ज स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून २ हजार अर्जांची मागणी करण्यात आली, ज्यामुळे भाजपला मोठी पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. इच्छुकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाल्याने भाजप नेत्यांची देखील उमेदवारी देताना सर्कस होणार आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने महापालिका निवडणुकीसाठी १० डिसेंबर पासून अर्ज स्वीकृती

दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने आज कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुणे महानगरपालिका निवडणूक भारतीय जनता पक्षासोबत महायुतीतून लढवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच पक्षाच्या उमेदवार निवडीसंदर्भात महत्वाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांच्या अर्जांचे वाटप आणि अर्ज स्वीकृती १० ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत करण्यात येणार आहे. पक्षाच्या मुख्य कार्यालयात सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत छापील अर्जफॉर्म उपलब्ध राहतील. इच्छुक उमेदवारांनी निर्धारित सर्व माहिती अचूकपणे भरून नियोजित वेळेत अर्ज जमा करण्याचे आवाहन पक्षतर्फे करण्यात आले आहे. बैठकीस शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव,  प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, अशोक शिरोळे, मोहन जगताप, बाबूराव धाडगे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, शहर महिला अध्यक्षा हिमाली कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोरियन सांस्कृतिक महोत्सवाने जिंकली पुणेकरांची मने

फॅशन शो, के-पॉप, फ्यूजन संगीत व कोरियन खाद्य-संस्कृतीच्या स्टॉलना उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : इंडो-कोरियन सेंटर, किंग सेजोंग इन्स्टिट्यूट पुणे येथे आयोजित कोरियन सांस्कृतिक महोत्सवाला विद्यार्थ्यांसह त्यांचे कुटुंबीय आणि कोरियन संस्कृतीच्या चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. फॅशन शो, के-पॉप, फ्युजन संगीत व कोरियन खाद्य-संस्कृतीचे विविध स्टॉल, चार ऋतूंचे प्रदर्शन आदी उपक्रमांनी पुणेकरांची मने जिंकली.

बालेवाडी येथील इंडो-कोरियन सेंटरचा संपूर्ण परिसर कोरियन रंग, संगीत आणि के-पॉपच्या उत्साहाने रंगून गेला. दक्षिण कोरियाचे मुंबईतील वाणिज्य दूत यु डोंग-वॉन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून भारत–कोरिया सांस्कृतिक नातेसंबंध मजबूत करण्यासाठी संस्थेने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. इंडो-कोरियन सेंटरच्या संचालिका डॉ. एउन्जु लिम, सहसंस्थापक आणि करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे प्रमुख संजीब घटक आदी उपस्थित होते.

स्वागतपर भाषणात डॉ. एउन्जु लिम म्हणाल्या, कोरियाच्या सांस्कृतिक, क्रीडा व पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत २०२३ मध्ये स्थापन झालेल्या इंडो-कोरियन सेंटर या संस्थेत कोरियन भाषेचे प्राथमिक व माध्यम स्तरावरील अभ्यासक्रम तसेच इंटरप्रिटेशन, कोरियन संगीत, कोरियन-थ्रू-मीडिया आणि कामकाजासाठी लागणारा प्रोफेशनल कोरियन असे विशेष अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना कोरियातील उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन आणि करिअर मार्गदर्शनाची सुविधा दिली जाते.

महोत्सवाची सुरुवात सेजोंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या प्रभावी सादरीकरणांनी झाली. इंडो-कोरियन फ्यूजन संगीत, कोरियन काव्यपठण आणि उत्साहवर्धक के-पॉप डान्सने उपस्थितांना कोरियन संस्कृतीची झलक अनुभवायला मिळाली. निवांत, संवादात्मक वातावरणामुळे भेट देणाऱ्यांना कोरियन संस्कृतीशी सहज जुळवून घेता आले.

कल्चरल अ‍ॅक्टिव्हिटी झोन हे महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. स्क्विड गेम-वर आधारित खेळांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. तसेच ‘फोर सीझन्स ऑफ कोरिया’ फोटोबूथ, हान्गूल कॅलिग्राफी, नामसान टॉवरच्या मॉडेलवर रंगीबेरंगी हृदय-लॉक्स टांगणे आणि कोरियन-स्टाइल फेस पेंटिंग अशा उपक्रमांमध्येही भेट देणाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कोरियन लोकप्रिय स्नॅक्स देणारा फूड काऊंटरही विशेष लोकप्रिय ठरला. यावेळी सत्र-३ चा समारोप समारंभही पार पडला. विद्यार्थ्यांनी आपले अनुभवकथन केले. उत्कृष्ट कामगिरी, उपस्थिती आणि मेहनतीसाठी विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

शेवटी रंगतदार फॅशन शो आणि उत्साहात भर घालणाऱ्या के-पॉप रँडम प्ले डान्सने संपूर्ण वातावरण जल्लोषमय झाले. इंडो-कोरियन सेंटर भाषिक, सांस्कृतिक आणि करिअर-केंद्रित कार्यक्रमांचा विस्तार करत असून, पुण्यातील वाढत्या के-कल्चर समुदायासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रास्ताविकात संजीब घटक यांनी नमूद केले.

राज्यपाल आचार्य देवव्रत यांची सभापती व उपसभापती यांनी घेतली सदिच्छा भेट

नागपूर, दि. ७ डिसेंबर २०२५ : मुख्यमंत्री यांच्या ‘भारतीय राज्यघटनेच्या गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल’ या विषयावर आधारित वैशिष्ट्यपूर्ण भाषणाचे पुस्तक राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते आगामी ९ डिसेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज लोकभवन, नागपूर येथे जाऊन राज्यपालांना प्रदान केले.

सदिच्छा भेटीदरम्यान राज्यकारभार, राज्यातील विकासात्मक उपक्रम, विधिमंडळातील कार्यपद्धती आणि जनकल्याणाशी निगडित विविध विषयांवर सखोल व विधायक चर्चा झाली. राज्यपालांनी लोकशाही संस्थांच्या बळकटीकरणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत सभापती व उपसभापती यांच्याशी मार्गदर्शक व सूचनापूर्ण संवाद साधला.

या प्रसंगी सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ आणि शाल अर्पण करून त्यांचा सत्कार केला. तसेच डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भगवान जगन्नाथ यांची प्रतिमा माननीय राज्यपालांना भेट म्हणून प्रदान केली. ही सदिच्छा भेट लोक भवन येथे स्नेहपूर्वक व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली.

जागतिक वारसास्थळांवर मूलभूत सुविधांची दयनीय अवस्था-प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यांकडून राज्यसभेत मुद्दा उपस्थित

विशेष ‘हेरिटेज इन्फ्रा पॅकेज’ची मागणी

पुणे: महाराष्ट्रातील युनेस्को मानांकन असलेल्या किल्ल्यांवर, जागतिक वारसास्थळांवर स्वच्छता, पायाभूत सुविधा, माहितीफलक, डिजिटल गाईड यांसारख्या अत्यावश्यक सुविधा नाहीत. येथील मूलभूत सुविधांची दयनीय अवस्था असून, याठिकाणी तातडीने सुधारणांची कामे करावीत. त्यासाठी विशेष ‘हेरिटेज इन्फ्रा पॅकेज’ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सोमवारी राज्यसभेत केली.

सभापतींचे लक्ष वेधताना प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या वारशाचे प्रतीक असलेले महाराष्ट्राचे ११ किल्ले युनेस्कोच्या ४७व्या जागतिक वारसा समितीत समाविष्ट झाले, हे महाराष्ट्रासाठी अभिमानाचे पाऊल आहे. शिवनेरी, राजगड, रायगड अशा इतिहासप्रसिद्ध दुर्गांचा त्यामध्ये समावेश आहे. याआधी अजिंठा-वेरूळ, घारापुरी, तसेच पुण्यातील शनिवारवाडा यांसारख्या ठिकाणांनाही जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला आहे.”

या वारसास्थळांच्या ठिकाणी इतिहास जाणून घेण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मात्र, या सर्व पर्यटनस्थळांवर स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, अस्वच्छता, डिजिटल माहितीचा अभाव, गाईड वा मार्गदर्शकाची अनुपलब्धता, कचऱ्याचे ढीग, प्लास्टिक व आग लागल्याने पर्यावरणाची हानी, दिव्यांगांसाठी सुविधांचा अभाव अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते, असेही त्यांनी नमूद केले.

राजगड किल्ल्यावरच्या त्यांच्या वैयक्तिक अनुभवाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, किल्ल्यावरील स्वच्छतागृह कचऱ्याने भरलेले होते, प्लास्टिकच्या बाटल्या आणि रॅपर्सचे ढीग होते. काही ठिकाणी हा कचरा जाळला जात असल्याने पर्यावरणाला हानी पोहोचते आणि वन्यजीवांनाही धोका निर्माण होतो. महाराणी सईबाईंची समाधी पूर्णपणे दुर्लक्षित आहे, तर संजीवनी माचीसारख्या अद्वितीय वास्तु-संकल्पनांना पुरेसे माहितीफलक नसल्याने पर्यटकांना त्याचे महत्त्व समजत नाही, असे त्यांनी नमूद केले.

रायगड हा महाराष्ट्राचा भावसंपन्न आणि ऐतिहासिक केंद्रबिंदू असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी परिसराचा विस्तार आणि भव्यतेसाठीही विशेष पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील किल्ले, गड-किल्ल्यांचा वारसा हा फक्त प्रदेशाचा नव्हे, तर भारताच्या सांस्कृतिक ओळखीचा आणि जागतिक प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे तेथील विकासासाठी विशेष पॅकेज आणि हेरिटेज मिशनची मागणीही त्यांनी यावेळी केली.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या प्रमुख मागण्या:

– आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये महाराष्ट्रासाठी ‘हेरिटेज इन्फ्रा अपग्रेडेशन पॅकेज जाहीर करावे

– पुढील ३ महिन्यांत राज्यातील सर्व हेरिटेज स्थळांचे व्यापक सर्वेक्षण करावे

– युनेस्को मानांकन प्राप्त स्थळांवर सुविधा विकसित करण्यासाठी पॅकेज द्यावे

– बेकायदेशीर अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावीत

देश विविध समस्यांनी त्रस्त त्याकडे दुर्लक्ष करून बंगालच्या निवडणुका म्हणून वंदेमातरम वर मोदींची चर्चा

तुम्ही निवडणुकांसाठी लढा तर आम्ही देशासाठी लढू …होऊन जाऊ द्यात .. कायम आम्ही इथे बसून देशासाठी लढत राहू

1896 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम वंदे मातरम् गायले...

नवी दिल्ली- सोमवारी लोकसभेत वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या चर्चेदरम्यान प्रियंका गांधी यांनी विचारले की, “हे गाणे १५० वर्षांपासून देशाच्या आत्म्याचा भाग आहे. ते ७५ वर्षांपासून लोकांच्या हृदयात आहे. मग आज त्यावर चर्चा का होत आहे?”मी तुम्हाला सांगते, कारण मोदीजी, बंगालच्या निवडणुका येत आहेत. सरकार स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांवर नवीन आरोप लावू इच्छिते. मी तुम्हाला सांगते की, मोदीजी आता पूर्वीसारखे पंतप्रधान राहिले नाहीत.देश विविध समस्यांनी त्रस्त पण त्याकडे दुर्लक्ष करून दिशा भरकटवणे या हेतूने चर्चा करत आहेत . वंदेमातरम देशाच्या कणाकणात जिवंत यावर चर्चा, वादंग होण्याचे कारण नाही,पण सत्ताप्राप्तीसाठी त्याचा उपयोग कोणी करू नये. वास्तव देशासमोर येऊ द्यात .१८९६ मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी वंदेमातरम हे गीत एका अधिवेशनात सर्वप्रथम गायले हे सांगतात पण हे गीत त्यांनी हिंदू महासभेच्या अधिवेशनात गायले कि कॉंग्रेसच्या अधिवेशनात गायले ? हे नाही सांगत

चर्चा सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेसने वंदे मातरमचे तुकडे केले. जवाहरलाल नेहरू जिनांसमोर नतमस्तक झाले. स्वातंत्र्यापासून वंदे मातरम हे प्रेरणेचे स्रोत होते, मग गेल्या दशकात त्याच्याशी अन्याय का केला गेला?”

भाजप खासदार अनुराग ठाकूर म्हणाले, “वंदे मातरम हे देशभक्तांसाठी ऊर्जा आहे. काही लोकांना त्याची अ‍ॅलर्जी आहे. आता जिनांच्या मुलालाही वंदे मातरमची समस्या आहे.”सपा प्रमुख आणि खासदार अखिलेश यादव म्हणाले, “स्वातंत्र्य चळवळीला एकत्र आणणारे तेच वंदे मातरम हे गाणे आजचे फुटीर लोक देशाचे विभाजन करण्यासाठी वापरतात. वंदे मातरम हे गाण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे.”

बंकिमचंद्र यांनी १८७५ मध्ये लिहिले होते, आनंदमठमध्ये छापले होते

भारताचे राष्ट्रगीत वंदे मातरम् बंकिमचंद्र चटर्जी यांनी 7 नोव्हेंबर 1875 रोजी अक्षय नवमीच्या शुभ मुहूर्तावर लिहिले होते. हे 1882 मध्ये पहिल्यांदा त्यांच्या बंगदर्शन मासिकात त्यांच्या आनंदमठ कादंबरीचा भाग म्हणून प्रकाशित झाले होते.1896 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी व्यासपीठावर वंदे मातरम् गायले. ही पहिलीच वेळ होती जेव्हा हे गीत सार्वजनिकरित्या राष्ट्रीय स्तरावर गायले गेले. सभेत उपस्थित हजारो लोकांचे डोळे पाणावले होते.

संसदेत वंदे मातरम् वर चर्चा घडवून आणण्याची 5 कारणे

सरकार संसदेत राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ वर चर्चा करून घेऊ इच्छिते, जेणेकरून त्याच्या १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजकीय महत्त्व देशासमोर मांडता येईल. यामागे ५ प्रमुख कारणे मानली जात आहेत:

राष्ट्रीय भावना आणि एकतेचा संदेश- सरकारला वाटते की वंदे मातरम् वरील चर्चेमुळे देशात राष्ट्रभावना, सांस्कृतिक गौरव आणि एकतेचा संदेश जाईल. हा विषय जनतेमध्ये भावनिक जोडणी देखील निर्माण करतो.
बंगाल निवडणुकीशी संबंधित राजकीय संकेत- वंदे मातरम् चा इतिहास बंगालशी जोडलेला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या बंगाल निवडणुका लक्षात घेता सरकार हा मुद्दा सांस्कृतिक आणि भावनिक दृष्ट्या समोर आणू इच्छिते. यामुळे सरकारला वाटते की ती राज्यात भाजपसाठी सकारात्मक आणि राजकीय वातावरण निर्माण करू शकेल.
1937 मध्ये वंदे मातरम् चा भाग वगळण्याच्या वादाला समोर आणणे- स्वातंत्र्यापूर्वी 1937 मध्ये, धार्मिक कारणांमुळे याचा दुसरा भाग वापरातून वगळण्यात आला होता. सरकारला त्या ऐतिहासिक वादावर चर्चा करायची आहे आणि त्यामागे असलेल्या तुष्टीकरणाच्या राजकारणाला समोर आणायचे आहे.
बंगाल फाळणी आणि स्वातंत्र्य चळवळीची आठवण करून देणे- वंदे मातरम् ही घोषणा बंगाल फाळणी (1905) विरुद्धच्या मोठ्या आंदोलनांचे केंद्र होती. सरकारला हा इतिहास पुन्हा राष्ट्रीय स्तरावर आणून देशभक्तीची भावना मजबूत करायची आहे.
विरोधी पक्षांसोबतच्या संघर्षावरून लक्ष विचलित करणे- SIR वर सुरू असलेल्या तणावाच्या दरम्यान, वंदे मातरम् सारख्या भावनिक आणि सर्वमान्य चर्चेने संसदेचे वातावरण सकारात्मक करण्याचा प्रयत्न करणे ही देखील सरकारच्या रणनीतीचा भाग आहे.

काँग्रेसने वंदे मातरम् चे तुकडे केले:जिन्नासमोर नेहरू झुकले..मोदींचा पुनरघोष

नवी दिल्ली-
पंतप्रधान मोदींनी सोमवारी लोकसभेत वंदे मातरम्‌ला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या चर्चेची सुरुवात केली. त्यांनी एका तासाच्या भाषणात सांगितले की, ‘वंदे मातरम् ब्रिटिशांना सडेतोड उत्तर होते, ही घोषणा आजही प्रेरणा देत आहे. स्वातंत्र्याच्या वेळी महात्मा गांधींनाही ते आवडले होते. त्यांना हे गीत राष्ट्रगीत म्हणून दिसत होते.

पंतप्रधानांनी सांगितले की, त्यांच्यासाठी या गीताची ताकद मोठी होती. मग गेल्या दशकांमध्ये यावर इतका अन्याय का झाला? वंदे मातरम्‌सोबत विश्वासघात का झाला? ती कोणती शक्ती होती, ज्याची इच्छा पूज्य बापूंच्या भावनांवरही भारी पडली? त्यांनी सांगितले,


मोहम्मद अली जिन्ना यांनी १५ ऑक्टोबर १९३६ रोजी लखनौमधून वंदे मातरम्‌विरोधात घोषणा दिली. काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष जवाहरलाल नेहरू यांना आपले सिंहासन डळमळताना दिसले.

पंतप्रधानांनी सांगितले की, नेहरू मुस्लिम लीगच्या निराधार विधानांना सडेतोड उत्तर देण्याऐवजी, त्यांचा निषेध करण्याऐवजी, उलट घडले. त्यांनी वंदे मातरम्‌चीच चौकशी सुरू केली

पंतप्रधान मोदींनी एका तासाच्या भाषणात वंदे मातरम् १२१ वेळा, देश ५०, भारत ३५, इंग्रज ३४, बंगाल १७, काँग्रेसचा १३ वेळा उल्लेख केला. त्यांनी वंदे मातरम्चे रचनाकार बंकिमचंद्र चटर्जी यांचे नाव १० वेळा, नेहरू ७ वेळा, महात्मा गांधी ६ वेळा, मुस्लिम लीग ५ वेळा, जिन्ना ३ वेळा, संविधान ३ वेळा, मुसलमान २ वेळा, तुष्टीकरण ३ वेळा म्हटले.


पंतप्रधानांच्या भाषणातील काही महत्त्वाच्या गोष्टी

वंदे मातरम् चे स्मरण या सभागृहाचे भाग्य: ‘ज्या मंत्राने, ज्या जयघोषाने देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाला ऊर्जा आणि प्रेरणा दिली होती, त्याग आणि तपस्येचा मार्ग दाखवला होता, त्या वंदे मातरम् चे पुण्य स्मरण करणे या सभागृहात आपल्या सर्वांचे खूप मोठे भाग्य आहे.’
वंदे मातरम् च्या १५० वर्षांवर भारत वेगाने प्रगती करत आहे: जेव्हा वंदे मातरम् ला ५० वर्षे पूर्ण झाली होती, तेव्हा देश गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये अडकलेला होता. जेव्हा याला १०० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा देश आणीबाणीच्या अंधारात होता. आज जेव्हा याला १५० वर्षे होत आहेत, तेव्हा भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि वेगाने पुढे जात आहे.
1906 चा एक किस्सा सांगितला: वंदे मातरम्शी संबंधित किस्सा सांगताना ते म्हणाले- 20 मे 1906 रोजी बारीसाल (आता बांगलादेशात आहे) येथे वंदे मातरम् मिरवणूक काढण्यात आली, ज्यात 10 हजारांहून अधिक लोक रस्त्यावर उतरले होते. यात हिंदू आणि मुस्लिम यांच्यासह सर्व धर्म आणि जातींच्या लोकांनी वंदे मातरम्चे झेंडे हातात घेऊन रस्त्यावर मोर्चा काढला होता.
बंगालसाठी वंदे मातरम् गल्लोगल्लीचा नारा बनला: आमचे शूर सुपुत्र कोणत्याही भीतीशिवाय फाशीच्या तख्तावर चढत असत आणि शेवटच्या श्वासापर्यंत वंदे मातरम् म्हणत असत. आमच्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी वंदे मातरम् म्हणत फाशीला कवटाळले. बंगालच्या एकतेसाठी वंदे मातरम् गल्लोगल्लीचा नारा बनला होता, आणि हाच नारा बंगालला प्रेरणा देत होता.
नेहरूंनी मुस्लिम लीगसमोर गुडघे टेकले: जवाहरलाल नेहरूंना आपले सिंहासन डळमळताना दिसले. नेहरूंनी मुस्लिम लीगच्या निराधार विधानांना सडेतोड उत्तर देण्याऐवजी, त्यांचा निषेध करण्याऐवजी, उलट घडले. त्यांनी वंदे मातरम ची चौकशी सुरू केली. नेहरूंनी 5 दिवसांनंतर नेताजींना पत्र लिहिले. त्यात जिन्नांच्या भावनांशी सहमती दर्शवत लिहिले की, वंदे मातरम्च्या आनंदमठमधील पार्श्वभूमीमुळे मुस्लिमांना दुखापत होऊ शकते. ते लिहितात- ही जी पार्श्वभूमी आहे, यामुळे मुस्लिम भडकतील. काँग्रेसचे निवेदन आले की 26 ऑक्टोबर रोजी काँग्रेस कार्यसमितीची बैठक होईल, ज्यात वंदे मातरम्च्या वापराचे पुनरावलोकन केले जाईल.

या प्रस्तावाच्या विरोधात लोकांनी देशभरात प्रभातफेऱ्या काढल्या, पण काँग्रेसने वंदे मातरम् चे तुकडे केले. इतिहास साक्षी आहे की काँग्रेसने मुस्लिम लीगसमोर गुडघे टेकले.


INC चालता-चालता MNC झाले: काँग्रेसने आउटसोर्स केले आहे, दुर्दैवाने काँग्रेसची धोरणे तशीच आहेत. INC चालता-चालता MNC झाले. ज्यांच्या-ज्यांच्यासोबत काँग्रेस जोडले गेले आहे, ते वंदे मातरम् वर वाद निर्माण करतात. जेव्हा कसोटीचा काळ येतो, तेव्हाच हे सिद्ध होते की आपण किती दृढ आहोत, किती सशक्त आहोत.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी सोमवारी लोकसभेत वंदे मातरम्‌ला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त चर्चा केली जात आहे. यासाठी १० तासांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुपारी १२ वाजता या चर्चेची सुरुवात केली. मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसच्या वतीने लोकसभेतील उपनेते प्रतिपक्ष गौरव गोगोई यांनी सर्वप्रथम आपले मत मांडले.

खरं तर, राष्ट्रगीत वंदे मातरम्‌ला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारत सरकारकडून वर्षभर कार्यक्रम आयोजित केला जात आहे. २ डिसेंबर रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. यात ठरवण्यात आले होते की, वंदे मातरम्‌वर ८ डिसेंबर रोजी लोकसभेत आणि ९ डिसेंबर रोजी राज्यसभेत चर्चा होईल.

अखेर 21 डिसेंबरची MPSC परीक्षा लांबणीवर:आता 4 जानेवारीला होणार पेपर

मुंबई-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीमुळे 21 डिसेंबर रोजी होणारी महाराष्ट्र गट ‘ब’ अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलली आहे. आता ही परीक्षा नववर्षाच्या पहिल्या रविवारी म्हणजे 4 जानेवारी 2026 रोजी होईल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र गट ‘ब’ अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 21 डिसेंबरला होणार होती. जिल्हा पातळीवर या परीक्षेची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी व महसूल विभागाकडे असते. पण 21 डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व इतर अधिकारी या मतमोजणीत व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे प्रस्तुत परीक्षा होणार किंवा नाही याविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली होती. अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सोमवारी एका परिपत्रकाद्वारे ही परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली. आता 21 डिसेंबर रोजी होणारी परीक्षा 4 जानेवारी 2026 रोजी होईल.

आयोगाने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट – ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2025 च्या परीक्षेचे आयोजन 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते 12 या कालावधीत करण्यात आले होते. तथापि, राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका – 2025 कार्यक्रमांतर्गत राज्य निवडणूक आयोगाच्या 2 डिसेंबर 2025 च्या आदेशानुसार मतमोजणी दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी करण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे. आयोगामार्फत आयोजित परीक्षा व मतमोजणी एकाच दिवशी म्हणजेच 21 डिसेंबर रोजी असल्याने त्यासंदर्भात काही मुद्यांच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून माहिती मागवण्यात आली होती.

या माहितीनुसार, काही जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्र व मतमोजणीचे ठिकाण यामधील कमी अंतर, लाऊडस्पीकरचा आवाज, वाहतूक कोंडी, परीक्षेदरम्यान निघणाऱ्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, तसेच परीक्षेच्या आयोजनाकरीता कर्मचाऱ्यांची कमतरता इत्यादी बाबी विचारात घेऊन त्यांनी परीक्षा आयोजित करम्यास अडचणी उद्धवू शकतात असे कळवले आहे. सदर वस्तुस्थिती विचार घेता प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

त्यानुसार, महाराष्ट्र गट -ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2025 ही 4 जानेवारी 2026 रोजी होईल, तर महाराष्ट्र गट – क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2025 ही 11 जानेवारी 2026 रोजी होईल, असे आयोगाने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे.उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय), राज्य कर निरीक्षक (एसटीआय) आणि सहायक कक्ष अधिकारी (एएसओ) यासाठी संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाते. यंदा 674 पदांसाठी जाहिरात देण्यात आली. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी 3, राज्य कर निरीक्षक 279 पदे आणि पोलिस उपनिरीक्षकाच्या 392 पदांचा समावेश आहे. सुरुवातीला संयुक्त पूर्व गट ‘ब’ 2025 (अराजपात्रित) परीक्षा 9 नोव्हेंबरला होणार होती. मात्र, महाराष्ट्राच्या काही भागात आलेल्या पूर परिस्थितीमुळे ती परीक्षा 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. पण आता ती पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली आहे.

मुंढवा प्रकरणातील आरोपी तहसीलदाराने 85.50 लाखांची थकबाकी भरली रोख…

पुणे -मुंढवा भूखंड घोटाळ्यातील आरोपी असलेल्या निलंबित तहसीलदाराने आपल्या कुटुंबीयांच्या नावे असलेली सुमारे 85.50 लाख रुपयांची थकबाकी रोख स्वरुपात भरली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार व अंजली दमानिया यांनी या प्रकरणी एका सरकारी अधिकाऱ्याकडे एवढी रोख कशी आली? असा सवाल उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे. हा सरळ सरळ मनी लाँड्रिंगचा प्रकार असल्याचे ते म्हणालेत.

पुण्यातील मुंढवा भूखंड घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार अडचणीत सापडले. त्यांच्या अमेडिया कंपनीवर 1800 कोटींची महार वतनाची जमीन अवघ्या 300 कोटींत घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी ही जमीन अमेडियाला विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शीतल तेजवानी नामक महिलेला अटक केली आहे. या प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पण आता या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच सूर्यकांत येवले यांनी आपल्या कुटुंबीयांच्या नावे असलेली सुमारे 85.50 लाख रुपयांची थकबाकी रोख स्वरुपात भरल्याचे समोर आले आहे.

विजय कुंभार यांनी सोमवारी एका पोस्टद्वारे हा मुद्दा उजेडात आणला आहे. मुंढवा जमीन घोटाळ्यातील आरोपी, निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांने कुटुंबियांची पतसंस्थेची थकबाकी ₹85.50 लाख रोख भरले. मुंढवा प्रकरण सुरू असतानाच ही रक्कम भरली गेलीय. एका सरकारी अधिकाऱ्याकडे एवढी रोख रक्कम आली कुठून? हा सरळ सरळ भ्रष्टाचार आणि मनी लॉन्डरिंगचा प्रकार दिसतो! ED व सरकारने तात्काळ चौकशी करून दोषींना अटक करावी, असे ते म्हणालेत. कुंभार यांनी या प्रकरणी अंजली दमानियांसोबत प्रशासनाला एक निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी या प्रकरणाच्या चौाकशीची मागणी केली आहे.
विजय कुंभार व अंजली दमानिया म्हणतात, पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातील एक प्रमुख आरोपी पुण्यातील निलंबित तहसीलदार सूर्यकांत गुलाबराव येवले यांच्या कुटुंबातील दोन व्यक्तींची कर्ज खाती नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बावडा, ता. खंडाळा, जि. सातारा येथे आहेत.

1) चंद्रकांत गुलाबराव येवले, मु. पो. भोगाव, ता. वाई, जि. सातारा – कर्ज खाते क्र. 195/99 थकबाकी – 52.50 लाख
2) बाळकृष्ण जगू जाधव, मु. पो. खानापूर, ता. वाई, जि. सातारा – कर्ज खाते क्र. 295/132. थकबाकी – 33 लाख.

वरील दोन्ही खात्यांना आरोपी सूर्यकांत येवले हे जामीनदार आहेत. दोन्ही खात्यांची एकूण थकबाकी 85 लाख 50 हजार एवढी होती. दैनिक पुढारी व 7/12 यावरूनही सूर्यकांत येवले यांच्या दोन्ही मिळकतींवर जप्ती आदेशाने नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचा बोजा असल्याचे दिसते.

आमच्या माहितीनुसार, दिनांक 10 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सूर्यकांत येवले यांनी एकूण 85.50 लाख इतकी संपूर्ण रक्कम रोख स्वरुपात नागरी सहकारी पतसंस्थेत जमा केली असल्याचे दिसून येते.

या संदर्भात गंभीर शंका निर्माण करणारे मुद्दा पुढीलप्रमाणे –

एका सामान्य शासकीय अधिकाऱ्याने एवढी मोठी रक्कम रोख स्वरुपात कशी जमा केली?
सहकारी पतसंस्था एकाच व्यक्तीकडून एवढी मोठी रोख रक्कम कायद्याने स्वीकारू शकते का?
ही रक्कम मुंढवा जमीन घोटाळ्यातील गैरव्यवहारातून आली असण्याची शक्यता अत्यंत जास्त आहे. अशा स्वरुपातील व्यवहार काळा पैसा पांढरा करण्याचा (मनी लाँड्रिंग) गंभीर प्रयत्न असण्याची शक्यता आहे.

म्हणूनच आमची आपणास विनंती आहे की, सूर्यकांत येवले यांनी जमा केलेल्या 85.50 लाखांच्या मूळ स्त्रोताची अतिशय सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. या व्यवहारात सहभागी नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, तिचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्या भूमिकेची चौकशी करावी.

हा व्यवहार मुंढवा जमीन घोटाळ्यातील पैसे वळवण्यासाठी वापरला गेला का? याची स्वतंत्र चौकशी आर्थिक गुन्हे शाखा/ अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मार्फत केली जावी.

सदर व्यवहारातील कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधित आरोपी, जामीनदार, तसेच संस्थेतील जबाबदार पदाधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या गंभीर प्रकणातील आर्थिक बाबींमागे प्रचंड गैरव्यवहार, भ्रष्टाचार व मनी लाँड्रिंगचा ठोस व स्पष्ट संशय निर्माण होत आहे. त्यामुळे तत्काळ व प्रभावी कारवाई होणे अत्यावश्यक आहे. आपण याबाबत त्वरीत चौकशी करून सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत ही विनंती, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

ताडीतील भेसळ ओळखण्यासाठी “सीएचटी-किट” विकसित

तंत्रज्ञानाचे हस्तांतरण ऑथेंटिक केमिकल्स अँड रिसर्च सेंटर, टेंभुर्णी यांना

पुणे:-सीएसआयआर- राष्ट्र्रीय रासायनिक प्रयोगशाळा (सीएसआयआर-एनसीएल), पुणे, यांनी ताडीत
आढळणाऱ्या क्लोरल हायड्रेट भेसळीचा त्वरित शोध घेण्यासाठी सोपे, जलद आणि वापरास सुलभ असे
क्लोरल हायड्रेट टेस्ट किट (सीएचटी-किट) विकसित केले आहे.
या तंत्रज्ञानाचे व्यापारीकरणासाठी ऑथेंटिक
केमिकल्स अँड रिसर्च सेंटर (ACRC-TEM), टेंभुर्णी यांना हस्तांतरण करण्यात आले आहे.
ताडी हे ताडाच्या झाडांपासून मिळणारे नैसर्गिक किण्वित पेय असून, ते राज्य शासन मान्यताप्राप्त
दुकानांमधून विक्रीस उपलब्ध असते. ताडीत सामान्यतः ५–६ टक्के इथाइल अल्कोहोल तसेच आरोग्यदायी
नैसर्गिक घटक असतात. महाराष्ट्र शासनाने ताडीच्या गुणवत्तेबाबत वाढलेल्या चिंतेची दखल घेऊन, उत्पादन
शुल्क अधिकारी, ताडी पुरवठादार, सीएसआयआर-एनसीएलचे वैज्ञानिक व तज्ज्ञ यांचा समावेश असलेली
समिती स्थापन केली होती. समितीच्या अहवालात ताडीत क्लोरल हायड्रेट या भारतात विक्रीस बंदी
असलेल्या रासायनिक पदार्थाची मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याचे निष्पन्न झाले. अनेक नमुन्यांमध्ये
या रासायनिक द्रव्याचे अत्यंत धोकादायक प्रमाण आढळले.
क्लोरल हायड्रेट शरीरात गेल्यावर ते ट्रायक्लोरोइथॅनॉल (एक प्रभावी मध्यवर्ती मज्जासंस्था दमनकारी)
आणि ट्रायक्लोरोअॅसिटिक आम्ल (क्षारक संयुग) मध्ये रूपांतरित होते. हे रसायन त्वचेवर पुरळ, उलट्या,
पोटाचे विकार, अल्सर, अवयवांचे नुकसान तसेच कोमामध्ये जाण्यापर्यंत गंभीर दुष्परिणाम करतात.
क्लोरल हायड्रेट, ट्रायक्लोरोइथॅनॉल आणि ट्रायक्लोरोअॅसिटिक आम्ल ही तिन्ही संयुगे संभाव्य
कर्करोगजनक म्हणून ओळखली जातात.

सध्याच्या चाचणी पद्धतींमध्ये उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना विविध उपकरणे बाळगावी लागतात अथवा
नमुने प्रयोगशाळेत पाठवावे लागतात, ज्यामुळे अडचणी निर्माण होतात आणि निकालास विलंब होतो. ही
समस्या सोडवण्यासाठी सीएसआयआर-एनसीएलच्या वैज्ञानिकांनी व्यापक प्रयोग करून फील्ड लेव्हलवर
त्वरित तपासणी करता येईल असे सीएचटी-किट विकसित केले आहे.
सीएचटी-किटमध्ये विशिष्ट प्रमाणात मिश्रित अभिक्रियेचे द्रावण असते. ताडीच्या नमुन्यात क्लोरल हायड्रेट
≥ 10 mg/L प्रमाणात उपस्थित असल्यास किट तत्काळ गुलाबी रंग दर्शवते. गुलाबी रंग न दिसल्यास नमुना
क्लोरल हायड्रेट भेसळीपासून मुक्त असल्याची खात्री मिळते. या किटची कार्यक्षमता महाराष्ट्र सरकारच्या
फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) ने प्रमाणित आणि मंजूर केली आहे.
सीएसआयआर-एनसीएलने हे किट महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांना
सादर केले असून, उत्पादन व पुरवठ्यासाठीचे तंत्रज्ञान ACRC-TEM, टेंभुर्णी यांना अधिकृतरीत्या
हस्तांतरित केले आहे. ताडीतील घातक क्लोरल हायड्रेट भेसळीचा जलद व परिणामकारक शोध घेण्यासाठी
सीएसआयआर-एनसीएलचे सीएचटी-किट हे एक अद्वितीय, कार्यक्षम आणि लोकांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी
महत्त्वपूर्ण साधन ठरेल.

५ मजली हॉटेलचे बेकायदा बांधकाम अवघ्या 3 सेकंदात जमीन दोस्त… उरली केवळ धूळ आणि मातीचा ढिगारा

जयपूर: येथे – 5 मजली (G+4) बांधकाम सुरू असलेले हॉटेल अवघ्या 3 सेकंदात जमीनदोस्त झाले. ते पाडण्यासाठी, सर्वप्रथम जेसीबीने इमारतीत जागोजागी ड्रिल करण्यात आले. त्यानंतर खांब पाडण्यात आले होते.शहरातील सर्वात पॉश भागांपैकी एक असलेल्या मालवीय नगरमध्ये बांधलेल्या या इमारतीला तडे गेले होते. हे हॉटेल बेकायदेशीर असल्याचा आरोप आहे.ही इमारत निवासी क्षेत्रात परवानगीशिवाय व्यावसायिक कामांसाठी नियमांविरुद्ध बांधली जात होती. याचे बांधकाम बऱ्याच अंशी पूर्ण झाले होते. बाथरूममध्ये फिटिंग आणि फरशांचे कामही पूर्ण झाले होते.

6 डिसेंबर रोजी तळघराजवळ खोदकाम करताना हॉटेलला तडे गेले होते. त्यानंतर हॉटेल एका बाजूला झुकले होते. इमारतीला आधार देण्यासाठी दोन क्रेन लावण्यात आल्या. अखेरीस 7 डिसेंबर रोजी इमारत पाडण्यात आली. संपूर्ण हॉटेल ढिगाऱ्यात बदलले.उप अंमलबजावणी अधिकारी इस्माईल खान म्हणाले – या बांधकामासाठी प्राधिकरणाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती.हॉटेल मालकांचे म्हणणे आहे की, आम्ही महानगरपालिकेकडून परवानगी घेतली आहे. यासाठी आम्ही महापालिकेत 1 लाख 25 हजार रुपये जमा केले होते. आता इमारतीला अवैध ठरवून पाडण्यात आले आहे.