Home Blog Page 2471

बाणेरच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाची ‘ती ‘ बातमी खोडसाळपणाची – अमोल बालवडकर

विरोधी पक्षनेत्यांकडून अशी अपेक्षा नव्हती

पुणे- बाणेर येथे आज उद्घाटन होणाऱ्या कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन कालच स्थानिक नगरसेवकाने केल्याची बातमी खोडसाळ हेतूने राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे असे सांगत अति हुशार समजनाऱ्या कोणी विरोधी पक्ष नेत्यांना सांगितली आणि नेत्यांनी हि कान भरवून घेत पोराच्या सांगण्याप्रमाणे राजकारण करत प्रेस रिलीज व्हाटसएप वरून प्रसिद्ध केले ,हा निव्वळ बालिश पणा आहे . उद्घाटन आजच भाजप आणि राष्ट्रवादी च्या नेत्यांच्या हस्ते ठरल्याप्रमाणे होत आहे , काल पसरवलेली ती बातमी खोटी दिशाभूल करणारी आणि उगाचच राजकीय फायदा घेऊन गोंधळ माजविणारी आहे असे स्पष्टीकरण भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी ‘माय मराठी’ला दिले आहे.

अगोदर महापौर आणि आम्ही येथे भेट देवून पाहणी केली होती त्यानंतर वास्तू पूर्ण होण्या अगोदर ,वा हे सेंटर पूर्ण होण्या अगोदर हाॅस्पिटलला काल प्रत्यक्ष भेट देवुन तेथील सोयी सुविधांची पाहणी केली व तसेच सर्व हाॅस्पिटल आता कार्यरत होवू शकेल कि नाही याची माहिती घेतली आणि माझ्या हस्ते त्याठिकाणी हॉस्पिटल चे सर्व काम निर्विघ्न व्हावे म्हणुन पुजा करण्यात आली व श्रीफळ फोडण्यात आले .यावेळी माझ्या समवेत, अतुल चोरडीया, शहर अभियंता .प्रशांत वाघमारे, युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता वाईदंडे, सहा.आयुक्त जयदिप पवार, झोनल आयुक्त नितीन उदास, डाॅ.ढमाले व आदी उपस्थित होते.उद्घाटन आजच नेत्यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होईल असे बालवडकर यांनी स्पष्ट केले आहे . मी उद्घाटन करणार असतो तर अतुल चोरडिया आणि महापालिकेचे अधिकारी अशा ‘तथाकथित उद्घाटनाला उपस्थित राहिले असते काय ? उगाच प्रेस नोट काढण्याच्या बहाण्यात हा बालीशपणा आहे असे ते म्हणाले

चार दिवसांपासून कोविडचे रिपोर्टच नाहीत :अश्विनी कदम संतापल्या..

0

पुणे- कोरोना च्या टेस्ट देवून चार दिवस झाले तरी अनेक नागरिकांना त्याचे रिपोर्ट अद्याप प्राप्त न झाल्याने राष्ट्रवादी च्या नगरसेविका अश्विनी कदम संतापल्या आहेत . त्या म्हणाल्या, नागरिक हतबल झालेत,पुणे मनपाच्या केंद्रांवर सोमवार दिनांक 24/8/2020 रोजी केलेल्या कोविड चाचणी चे रिपोर्ट चार दिवस झाले तरी आलेच नाहीत. त्यातील काहीं नागरिकांना त्रास होत आहे परंतु रिपोर्ट आला2 नसल्या मुळे उपचार कुठे घ्यावे आणि काय घ्यावे हेच काही कळेनासे झाले. शिवाय चार दिवस होम कोरंटाईन असल्यामुळे त्यांच्यासह इतर सर्व कुटुंबच वेठीस धरले गेलेले आहेत.
काही रुग्णांना त्रास वाढू लागल्यामुळे खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन दाखल झालेले आहेत तेथे केलेले कोविडच्या चाचण्यांचे तातडीने त्याचे रिपोर्ट आलेले आहेत.त्यामुळे त्यांच्यावर योग्य ते उपचार होऊ शकले व त्यांचे प्राण वाचले. परंतु पुणे मनपाच्या धनकवडी सहकार नगर केंद्रावरील रिपोर्ट बाबतीत हा सगळा प्रकार घडत आहे. कदाचित संपूर्ण शहरांमध्ये असे घडलेले असेल. पुणे मनपा आरोग्य प्रमुखांनी तातडीने या प्रकरणांमध्ये लक्ष घालून नागरिकांची सुटका करावी. नाही तर आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील.

बाप्पा आणि नियम (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

0

“वहिनी यावर्षी गणपती आणणार आहेत ना? आणि हो तुमच्या बिल्डिंगमध्ये यायला परवानगी आहे ना?” काशीकर गुरुजींचा फोन आला.
“हो आणणार ना नेहमीप्रमाणे, तुम्ही येणार ना पूजा सांगायला.” – मी 
“हो, मग दरवर्षीप्रमाणे मी येतो सकाळी ९ ला” – गुरुजी.
करोनामुळे अजूनही जनजीवन सुरळीत झालं नाही. लॉकडाऊनच्या ह्या संभ्रमात आपणच काय तर सगळे सण-उत्सवही बंदिस्त झालेत. यावर्षी गणेशोत्सव कसा साजरा करायचा याबाबत काही महिन्यांआधी चर्चेला सर्व माध्यमांतून सुरुवात झाली होतीच आणि जसजशी बाप्पाच्या आगमनाची तारीख जवळ आली तसं तर बातम्यांना उधाणच आलं.
गणपतीची मूर्ती घरी कशी बनवायची याचे व्हिडिओ व्हाट्सअप, फेसबुकवर यायला लागले. इकोफ्रेंडली गणेश मूर्तीचा किटसुद्धा ऑनलाईन मिळू लागला. साधारण गुढीपाडवा झाला की गणेश मूर्तीच्या कारखान्यांत मूर्तिकारांच्या कामाचा श्रीगणेशा होतो आणि जूनपासून बुकींगला सुरुवातही होते. यावर्षी जूनच काय जुलै गेला तरी कारखान्यात / दुकानात मूर्ती आलेल्या किंवा रंगवल्या जाताना दिसत नव्हत्या. गणपती आणायचा तर ठरवलं पण मूर्ती कुठे मिळेल याची शोधाशोध सुरू झाली. आठवडाभर शोधकार्य केल्यावर बोरिवलीला वझिरा येथे आम्हाला हवी तशी मूर्ती मिळाली. यंदा त्यांच्याकडे मुर्त्या खूपच कमी आल्या होत्या आणि साचेही आले नव्हते. काही नवीन आणि हौशी मूर्तीकारांना यावेळी शाडूची माती मिळू न शकल्यामुळे मूर्ती बनविता आली नाही.

दरवर्षी नेमाने येणाऱ्या बाप्पांना यावर्षी मात्र चुकचुकल्यासारखे झाले असेल. गेले ५ महिने चालू असलेल्या करोनाच्या थैमानामुळे सगळेच चित्र पालटले होते. लॉक-अनलॉकच्या गोंधळात गणेशोत्सवाबाबतीत शासन काय निर्णय घेते, यावर खास करून मुंबईचा चाकरमानी बारकाईने लक्ष ठेवून होता. कारण होळी आणि गणपती हे दोनच सण असे आहेत की चाकरमानी गावी हजेरी लावतोच. यावर्षी गणपतीला कुटुंबासोबत तरी गावी जायला मिळणार की नाही या विवंचनेत असताना बातमी आली की गावी कोकणात जाणाऱ्यांना ७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत जाता येणार…कारण नियमाप्रमाणे गावी जाऊन त्यांना १४ दिवस आधी क्वारंटाईन होणे गरजेचे होते. गणपतीसाठी ५-६ दिवस सुद्धा सुट्टी मिळता मुश्किल तिथे १४ दिवस सुट्टी कशी काय मिळणार? काही जणांचं वर्क फ्रॉम होम असलं तरी गावी सगळ्याच ठिकाणी मोबाईलला, नेटला रेंज मिळेल याची शाश्वती नाही. बरं गावी जायचं तर तेही कसं?? ट्रेन चालू नाहीत, खाजगी बसेस नाहीत. खाजगी वाहन करून जायचे तर त्याचे भाडेही अव्वाच्या सव्वा. एक ना अनेक प्रश्न चाकरमान्यांच्या डोळ्यांसमोर उभे राहिले आणि काहीही करून गावी जायचंच म्हटलं तर गावकरी किती प्रमाणात आपलं स्वागत करणार हाही मोठा प्रश्नच. सगळ्या शक्यतांची जुळवाजुळव सुरू असताना दुसरी बातमी येऊन थडकली की आता १२ ऑगस्टपर्यंत गावी जाता येणार. त्यामुळे बऱ्याच जणांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला (कारण आता दिवस कमी करण्यात आले होते). गावी फोनाफोनी, मेसेज करून सगळे काही विचारूनही घेतले. गावचे नियम आणि बाकी सगळ्या गोष्टीही पडताळून पाहिल्या. तरीही अजून काही चमत्कार घडतो का याचा चाकरमानी विचार करत असताना शासनाने आणखी एक निर्णय घोषित केला की, ४८ तास आधी गावी जाणाऱ्यांना करोनाची टेस्ट करून गावी जाता येणार आहे. मग काय विचारता चाकरमान्यांच्या आनंदाला उधाणच आलं आणि तो टेस्ट करून गेला सुद्धा.
इकडे शहरात गणपतीसाठीची नियमावली जाहीर झाली होतीच. त्यात मूर्तीची उंची पण – घरगुती गणपती २ फूट तर सार्वजनिक गणपती ४ फूट अशी ठरवली गेली. मूर्ती शाडू किंवा घरातील धातू किंवा संगमरवरी असावी, असाही आग्रह धरला गेला. तसं पाहिलं तर बऱ्याच आधी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपापले निर्णय जाहीर केले होते. काहींनी १० दिवसांऐवजी ५ दिवसच गणपती आणायचे ठरवले, तर काहींनी यावर्षी उत्सव रद्द करून तो पुढल्या वर्षी माघ चतुर्थीला साजरा करण्याचे ठरविले. जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील लालबागच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही  लोकहिताचा निर्णय घेतला. करोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टिकोनातून राजाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करता फक्त आरोग्योत्सव साजरा केला जाईल, असं ठरवलं.
गणेश चतुर्थी जरी २२ ऑगस्टला असली तरी आमच्या घरी बाप्पाचे आगमन २ दिवस अगोदरच झाले होते. मूर्तिकारांकडे गर्दी व्हायला नको म्हणून त्यांनीही प्रत्येकाला वेळ निश्चित करून दिली होती. अपॉइंटमेंटच म्हणा ना! एका वेळी ८-१० जणांना प्रवेश दिला जाणार होता, मात्र उदबत्ती लावता येणार नाही हे निक्षून सांगितले होते. यावर्षी गणपतीच्या दर्शनासाठी कुणाच्या घरी जाता येणार नाही; त्यामुळे बऱ्याच जणींनी बाप्पाच्या व्हर्चुअल दर्शनाची सोय उपलब्ध करून दिली. काही जणांनी स्वतःच घरी ऑनलाईन पूजा केली तर काही ठिकाणी गुरुजींनी 

एकाचवेळी ५-६ गणपतींसाठी झूमवर ऑनलाईन पूजा सांगितली. दर्शन आणि आरतीच्या वेळा आधीच सांगून डिजिटल दर्शन आणि आरती साग्रसंगीत झाली. तर काही सोसायट्यांमधून एका वेळी ३-५ जणांना यायला परवागी दिली गेली. गणपती विसर्जनाचीही चोख व्यवस्था महापालिकेकडून केली गेली आहे. नैसर्गिक आणि कृत्रिम मूर्ती संकलन केंद्र असे नवनवे पर्याय उपलब्ध करून दिले. काही जणांनी तर घरीच मूर्ती विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. बाप्पाच्या आगमनाची आणि विसर्जनाची मिरवणूक या दोन्ही गोष्टींवर बंदी होती हे एका अर्थी योग्यच झाले; कारण काही ठिकाणी अचकट विचकट केले जाणारे नृत्य आणि वाजले जाणारे कर्कश संगीत या सगळ्यांना आळा बसला. आमच्या बाप्पाचे विसर्जन सोसायटीच्या आवारातच झाले. त्यामुळे घरातील सर्व वयस्कर मंडळींना बाप्पाला अखेरचा निरोप देता आला. नाहीतर गर्दीमुळे त्यांना विसर्जन स्थळावर नेता येणे शक्य नसते. यावर्षी त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आनंद देऊन गेले. 
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्यात आलेली काळजी आणि नियम बाप्पानेही स्वीकारले असणार. निरोप देताना बाप्पाकडे बघताना किंचित हसत, शांत मुद्रेने तो आशीर्वाद देत असल्याचे मनोमन जाणवले / अनुभवले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या – साश्रूपूर्ण नयनांनी बाप्पाला निरोप दिला. दिड आणि पाच दिवसांचे बाप्पा आपल्या घरी गेले.
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या
करोनाला संपवून या
आनंद, उत्साह घेऊन या!

© पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग, 

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.), 

मुंबई – 400068

राज्यात आज १४ हजार ७१८ नवीन रुग्णांचे निदान; १ लाख ७८ हजार २३४ रुग्ण ॲक्टिव्ह

0

मुंबई, दि.२७ : राज्यात आज ९१३६ रुग्ण बरे झाले तर १४ हजार ७१८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४६ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ३१ हजार ५६३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ७८  हजार २३४ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १४,७१८ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३५५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१३५० (३०), ठाणे- २३८ (१२), ठाणे मनपा-१८३ (१), नवी मुंबई मनपा-४०५ (११), कल्याण डोंबिवली मनपा-२७८, उल्हासनगर मनपा-२१, भिवंडी निजामपूर मनपा-१६ (१), मीरा भाईंदर मनपा-१८९ (६), पालघर-१३० (२), वसई-विरार मनपा-१७६, रायगड-३०५ (१३), पनवेल मनपा-२१४ (७), नाशिक-२१९ (१५), नाशिक मनपा-७४० (१६), मालेगाव मनपा-४६ (१), अहमदनगर-३४७ (४),अहमदनगर मनपा-२५८ (४), धुळे-७२, धुळे मनपा-७८ (१), जळगाव- ६०३ (७), ९जळगाव मनपा-९४ (३), नंदूरबार-१४३ (३), पुणे- ८१९ (१२), पुणे मनपा-१७७२ (३५), पिंपरी चिंचवड मनपा-१०८५, सोलापूर-२५१ (१४), सोलापूर मनपा-५६ (४), सातारा-५३२ (२), कोल्हापूर-३५२ (२२), कोल्हापूर मनपा-१५१ (५), सांगली-२४७ (११), सांगली मिरज कुपवाड मनपा-२७६ (६), सिंधुदूर्ग-१८, रत्नागिरी-६४, औरंगाबाद-१३५ (१),औरंगाबाद मनपा-११९ (५), जालना-४३ (४), हिंगोली-५९ (१), परभणी-४८, परभणी मनपा-२५, लातूर-८५ (२), लातूर मनपा-१२८ (१), उस्मानाबाद-४९ (४),बीड-५६ (२), नांदेड-१११ (१८), नांदेड मनपा-१८२ (१३), अकोला-४२ (२), अकोला मनपा-१२, अमरावती-४५, अमरावती मनपा-८६ , यवतमाळ-११७ (२), बुलढाणा-६७ (२), वाशिम-२८, नागपूर-१५२ (२), नागपूर मनपा-१०८६ (३४), वर्धा-४१ (३), भंडारा-३९ (४), गोंदिया-६५, चंद्रपूर-७४, चंद्रपूर मनपा-४९, गडचिरोली-२५, इतर राज्य २२ (३).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३८ लाख ६२ हजार १८४ नमुन्यांपैकी ७ लाख ३३ हजार ५६८ नमुने पॉझिटिव्ह (१८.९९ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख २४ हजार २३२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ६४१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३५५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                         

मुंबई: बाधित रुग्ण- (१,४०,८८८) बरे झालेले रुग्ण- (१,१३,५७७), मृत्यू- (७५३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१३), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,४६३)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,२७,३७४), बरे झालेले रुग्ण- (१,०३,४६३), मृत्यू (३६७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,२३३)

पालघर: बाधित रुग्ण- (२४,४६३), बरे झालेले रुग्ण- (१७,१४०), मृत्यू- (५६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७६२)

रायगड: बाधित रुग्ण- (२८,१४३), बरे झालेले रुग्ण-(२१,९४६), मृत्यू- (७४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४४७)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (३६७६), बरे झालेले रुग्ण- (२१२६), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२१)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१०४९), बरे झालेले रुग्ण- (५७१), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६२)

पुणे: बाधित रुग्ण- (१,६१,९४५), बरे झालेले रुग्ण- (१,११,९०५), मृत्यू- (३९१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६,१२४)

सातारा: बाधित रुग्ण- (११,५३०), बरे झालेले रुग्ण- (६६८८), मृत्यू- (३१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५२७)

सांगली: बाधित रुग्ण- (१०,६३६), बरे झालेले रुग्ण- (६१२६), मृत्यू- (३५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१५४)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१९,५८८), बरे झालेले रुग्ण- (१२,८२६), मृत्यू- (५६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२००)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१८,०५१), बरे झालेले रुग्ण- (१२,९३२), मृत्यू- (७३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३८३)

नाशिक: बाधित रुग्ण- (३५,६२०), बरे झालेले रुग्ण- (२४,२८३), मृत्यू- (८१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,५२४)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१८,५०१), बरे झालेले रुग्ण- (१४,३७८), मृत्यू- (२७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८५२)

जळगाव: बाधित रुग्ण- (२४,६२७), बरे झालेले रुग्ण- (१६,८१९), मृत्यू- (८०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७००४)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (२२१८), बरे झालेले रुग्ण- (११२७), मृत्यू- (६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०२६)

धुळे: बाधित रुग्ण- (७११३), बरे झालेले रुग्ण- (५००१), मृत्यू- (१९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९१५)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२२,०२८), बरे झालेले रुग्ण- (१५,६४९), मृत्यू- (६४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७३८)

जालना: बाधित रुग्ण-(४०५२), बरे झालेले रुग्ण- (२५२९), मृत्यू- (१२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३९६)

बीड: बाधित रुग्ण- (४४३२), बरे झालेले रुग्ण- (२६००), मृत्यू- (१०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१७२५)

लातूर: बाधित रुग्ण- (७२३५), बरे झालेले रुग्ण- (४१११), मृत्यू- (२४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८७७)

परभणी: बाधित रुग्ण- (२३४३), बरे झालेले रुग्ण- (९६८), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३०५)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१३५२), बरे झालेले रुग्ण- (१०६१), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६०)

नांदेड: बाधित रुग्ण- (६०१९), बरे झालेले रुग्ण (२९३८), मृत्यू- (१९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८८५)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (५३७७), बरे झालेले रुग्ण- (३२५९), मृत्यू- (१४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९७३)

अमरावती: बाधित रुग्ण- (४७१९), बरे झालेले रुग्ण- (३५६५), मृत्यू- (११२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०४२)

अकोला: बाधित रुग्ण- (३६६८), बरे झालेले रुग्ण- (२९२३), मृत्यू- (१५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९३)

वाशिम: बाधित रुग्ण- (१५५७), बरे झालेले रुग्ण- (१२४८), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८३)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (३०४३), बरे झालेले रुग्ण- (२०४८), मृत्यू- (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९२४)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२८६१), बरे झालेले रुग्ण- (१८४९), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९४३)

नागपूर: बाधित रुग्ण- (२३,६२२), बरे झालेले रुग्ण- (१२,६८६), मृत्यू- (६१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,३१५)

वर्धा: बाधित रुग्ण- (७२७), बरे झालेले रुग्ण- (३७६), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३४)

भंडारा: बाधित रुग्ण- (८६१), बरे झालेले रुग्ण- (५७९), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६१)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१२१५), बरे झालेले रुग्ण- (७७५), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२५)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१६८८), बरे झालेले रुग्ण- (९३४), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३९)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (६५०), बरे झालेले रुग्ण- (५५७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९२)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६९७), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२७)

एकूण: बाधित रुग्ण-(७,३३,५६८) बरे झालेले रुग्ण-(५,३१,५६३), मृत्यू- (२३,४४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३२७),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,७८,२३४)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण ३५५ मृत्यूंपैकी २३६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३६ मृत्यू  हे नागपूर -७, ठाणे -६, नाशिक -६,  पुणे -५, रायगड -३, सोलापूर -३, अहमदनगर- ३, औरंगाबाद -१, जळगाव – १ आणि कर्नाटक -१  असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात  आली आहे. आज १४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२० या कालावधीतील कोविड बाधित रुग्णांच्या रिकॉन्सिलिएशन प्रक्रियेत  एकूण बाधित रुग्णसंख्येत १३९ रुग्णांची वाढ झाली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

गावाकडंच्या आठवणी जागवित गौराईंचे प्रस्थान..(व्हिडीओ)

0

पुणे- कोरोनाच्या महामारीत देखील मोठ्या भक्ती भावाने गौराईंचे स्वागत करणाऱ्या भक्तांच्या घरी गावच्या आठवणींना उजाळा देत आज गौराईं भाविकांचा निरोप घेतला .पुण्यातील प्रातिनिधिक स्वरूपात सौ. अंजली अजय भोसले यांच्या घरातील गौराईंनी पहा कशा जागवल्या गावाच्या आठवणी …..

भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन झाल्यानंतर भाद्रपदातील शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे घरोघरी आगमन झाले. . भारतीय परंपरा, संस्कृतीत गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अनेक ठिकाणी गौराईचे पूजन महालक्ष्मी स्वरुपात केले जात असल्यामुळे याला महालक्ष्मी पूजन असेही संबोधले जाते. २५ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ०१ वाजून ५८ मिनिटांनी अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन झाले. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ ऑगस्ट २०२० रोजी गौरी पूजन झाले .   मूळ नक्षत्रावर गौरींचे किंवा महालक्ष्मींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पोवत्याच्या वा सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा, असे एक एक जिन्नस घालतात. हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तूंचा त्यात समावेश असतो. गौरींची -महालक्ष्मींची पूजा व आरती झाली . गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखविला गेला गुरुवार, २७ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांनंतर ज्येष्ठागौरी विसर्जन सुरु झाले .

फिट इंडिया फ्रीडम रनचे 29 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन

0

पुणे दि .27 : – युवा व खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत फिट इंडिया फ्रीडम रन हा नवीन उपक्रमाचे 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2020 या कालावधीत आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी कळविले आहे.
धावणे हे मानवी शरीराचे सर्वात मोठे स्वातंत्रय आहे. त्यास नेहमी तंदुरुस्त फिटनेस नियमित व्यायामाची आवश्यकता असते. नियमित व्यायामाकरीता प्रोत्साहित करण्यासाठी आणि सर्वांना लठ्ठपणा, आळस, तणाव, चिंता, आजारापासून मुक्त होण्यास मदत करण्यासाठी फिट इंडिया अंतर्गत फिट इंडिया फ्रीडम रन चळवळ 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2020या कालावधीत राबविण्याचे कळविण्यात आले आहे. तुम्ही कोठेही,कधीही पळु शकता अथवा चालु शकता अशी या उपक्रमाची संकल्पना आहे.
प्रत्येक जण धावण्यासाठी, चालण्यासाठी आपल्या आवडीचा मार्ग, अनुकूल वेळ निवडू शकतात. आवश्कतेनुसार काही मिनिटांची विश्रांती घेवूनही धावणे, चालण्याची मुभा असणार आहे. प्रत्येकास स्वत:च्या वेगाने धावणे, चालण्याची मुभा असणार आहे. स्वयंचलित किंवा कोणत्याही ट्रॅकिंग, ॲप किंवा जीपीएस घडयाळाचा वापर करुन धावलेल्या, चाललेल्या अंतराचा मागोवा घेता येणार आहे. जिल्हयातील नागरिक, शिक्षक, संस्था, क्रीडामंडळे यांनी www.dsopune.com या वेबसाईट वरील लिंक मध्ये रजिस्टर करुन आपली वैयक्तिक माहिती ( स्वत: धावल्याची माहिती सदर विंडोमध्ये उदा.नाव, ई मेल, धावण्याची अथवा चालण्याची तारीख, अंतर इ) भरावयाची आहे. ही माहिती भरल्यानंतर सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र सांगता झाल्यावर ई-मेल द्वारे प्राप्त होणार आहे. हा उपक्रम राबविताना सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.
राज्यात 29 ऑगस्ट हा दिवस मेजर ध्यानचंद ( हॉकीचे जादूगर ) यांचा जन्मदिन असल्यामुळे प्रतिवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन साजरा केला जातो. तर या दिनाचे ऑचित्य साधुन फिट इंडिया फ्रीडम रन चळवळ 29 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरीक, खेळाडू, महिला, पुरुष यांनी सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, विजय संतान यांनी केले आहे.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत उच्च शिक्षण विभागाचे राज्यपालांपुढे सादरीकरण

0

मुंबई,दि. २७ : उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव जलोटा यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदींबाबत त्यांचेपुढे सादरीकरण केले.

राज्य शासन नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने तयार करीत असलेल्या कृती आराखड्याबद्दल देखील त्यांनी यावेळी माहिती दिली. यावेळी राज्यपालांनी विविध विषयांवर निरीक्षणे नोंदवीत उपयुक्त सूचना केल्या.

शिक्षणातील सार्वजनिक गुंतवणूक वाढविणे, सन २०२५ पर्यंत उच्च शिक्षणातील नोंदणी प्रमाण ५० टक्के इतके वाढविणे, शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण, मातृभाषेतून शिक्षणाला चालना देणे, डिजिटल ग्रंथालये, व्यवसायिक शिक्षणावर भर, या तसेच धोरणातील इतर तरतुदींसंदर्भात राज्यपालांना विस्तृत माहिती देण्यात आली.

तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ हे देखील यावेळी उपस्थित होते

HONDA – दणकट, स्पोर्टी आणि अत्याधुनिकहॉर्नेट 2.0 द्वारे होंडाचे 180- 200 सीसी क्षेत्रात पदार्पण

0

वाऱ्यावर स्वार व्हा

दणकटस्पोर्टी आणि अत्याधुनिक हॉर्नेट 2.0 द्वारे होंडाचे 180- 200 सीसी क्षेत्रात पदार्पण

अत्याधुनिक तंत्रज्ञान

·         गोल्डन अपसाइड डाउन (युएसडी) फ्रंट फोर्क – 200 सीसी क्षेत्रातील पहिली सब

·         अत्याधुनिक माहिती दर्शवणारे नवे पूर्णपणे डिजिटल निगेटिव्ह लिक्विड क्रिस्टल मीटर

·         उत्कृष्ट नियंत्रणासाठी सिंगल चॅनेल एबेससह ड्युएल, पेटल डिस्क ब्रेक्स

·         छोट्या स्टॉपदरम्यान सोयीस्कर ठरणारा नवा इंजिन स्टॉप स्विच

·         विस्तीर्ण ट्यूबलेस टायर्स (पुढील 110 एमएम आणि मागे 140एमएम)

·         कमी दृश्यमानता असल्यास आपत्कालीन स्टॉपसाठी हझार्ड स्विच

जबरदस्त कामगिरी

·         नवे ताकदवान आणि कार्यक्षम 184 सीसी एचईटी बीएसव्हीआय पीजीएम- एफआय इंजिन, या विभागातील आघाडीच्या मध्यम श्रेणीच्या टॉर्कसह

·         नवे उच्च दर्जाचे एयरोडायनॅमिक डिझाइन जे अधिक सफाईदार हाताळणीस मदत करते

आंतरराष्ट्रीय मजबूत शैली

वजनदार टाकीसह आक्रमक, पुढे झुकणारे डिझाइन जे वर्चस्वाची भावना निर्माण करते

 पोझिशन लॅम्पसह नवा एलईडी हेडलॅम्प, नवे एलईडी विंकर्स आणि एक्स आकाराचे एलईडी टेल लॅम्प जे विसंबून राहाण्याची क्षमता आणि अधिक चांगली दृश्यमानता देतात

 टाकीवर किल्लीची सोय असल्यामुळे जास्त सोयीस्करपणा तसेच दिसायला आकर्षक

्राहकासाठी खास मूल्य

खास सहा वर्षांचे वॉरंटी पॅकेज, हॉर्नेट 2.0 वर

आकर्षक किंमत रू. 126,345 एक्स- शोरूम गुरुग्राम (हरियाणा)

नवी दिल्ली, 27 ऑगस्ट 2020 – होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया प्रा. लि. ने आज आपल्या दणकट, स्पोर्टी आणि अत्याधुनिक हॉर्नेट 2.0सह 180- 200 मोटरसायकल क्षेत्रात प्रवेश केला आहे. आंतरराष्ट्रीय स्ट्रीट फायटर या संकल्पनेसह विकसित करण्यात आलेली ही मोटरसायकल अतिशय चपळ असून त्याला डिझाइन कोड्समधील अत्याधुनिक वैशिष्ट्यांची जोड देण्यात आली आहे, तर ‘बिल्ट टु परफॉर्म’ ही तिची वृत्ती अभिजातता दर्शवते.

या लाँचविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. चे व्यस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘नव्या युगातल्या ग्राहकांची स्वप्ने आणि रायडिंगविषीयी त्यांच्यात असलेली पॅशन यांपासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आलेली नवी होंडा हॉर्नेट 2.0 सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जबरदस्त कामगिरीच्या मदतीने नवी हॉर्नेट 2.0 तरुण मोटरसायकलप्रेमींमधअये नवा मापदंड तयार करण्यासाठी सज्ज आहे. हे लाँच होंडाच्या श्रेणी विस्तार योजनेची सुरुवात असून त्याद्वारे भारतातील मोठ्या ग्राहकवर्गाला सेवा दिली जाईल.’

नवी हॉर्नेट 2.0 सादर करताना होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या विक्री व विपणन विभागाचे संचालक श्री. यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘नव्या हॉर्नेट 2.0 मध्ये होंडाच्या रेसिंग डीएनएचे स्ट्रीट रायडिंगच्या थरारकतेमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. कामगिरी आणि स्टाइल या दोन्हीविषयी रायडरच्या गरजा एकाच मशिनमध्ये पूर्ण करणारे ताकदवान, उच्च क्षमता असलेले एचईटी बीएसव्हीआय इंजिन, गोल्ड युएसडी फ्रंट फोर्क्स, पूर्णपणे डिजिटल निगेटिव्ह लिक्विड क्रिस्टल मीटर, ड्युएल, पेटल डिस्क ब्रेक्स आणि आक्रमक डिझाइन यांसारखी या विभागातील सर्वोत्तम वैशिष्ट्ये रायडिंगचा एकंदर अनुभव उंचावतात. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, ज्यांना वाऱ्यावर स्वार व्हायचे आहे, त्यांच्यासाठी हॉर्नेट 2.0 अगदी योग्य आहे.’

अत्याधुनिक तंत्रज्ञान

ग्राहकांनी होंडा ब्रँडच्या नाविन्यपूर्ण निर्मितीवर नेहमी दाखवलेला विश्वास सार्थ करत नवी हॉर्नेट 2.0, 6 नव्या पेटंट अप्लिकेशन्ससह बनवण्यात आली आहे.

रस्त्यावर पूर्ण आनंद घेत गाडी चालवताना आवश्यक नियंत्रण मिळावे यासाठी सिंगल चॅनेल एबीएससह ड्युएल, पेटल डिस्क ब्रेक्स हॉर्नेट 2.0 मध्ये देण्यात आले आहेत. मोनो शॉक रियर सस्पेंशनमुळे रायडिंगचा विशेषतः कॉर्नरिंग करताना जबरदस्त अनुभव मिळतो, तर चांगले स्थैर्यही मिळते.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट इमेज यांचा संगम म्हणजेच गोल्डन अपसाइड डाउन (एसडी) फ्रंट फोर्क – पहिल्यांदाच 200 सब सेगमेंटमध्ये देण्यात आले आहे.

नव्या इंजिन स्टॉप स्विचमुळे छोट्या स्टॉपवर इंजिन सहजपणे बंद करता येते. त्याशिवाय कमी दृश्यमानता असल्यास हझार्ड स्विचच्या मदतीने चालकाला सुरक्षित राहाता येते.

विस्तारित ट्यूबलेस टायर्समुळे, पुढील चाक (110) आणि मागील चाक (140 एमएम) रस्त्यावर अधिक चांगली पकड मिळते आणि पर्यायाने चालकाचा आत्मविश्वास वाढतो.

नव्या पूर्णपणे डिजिटल निगेटिव्ह लिक्विड क्रिस्टल मीटरमध्ये गियर पोझिशन इंडिकेटर, सर्व्हिस ड्यू इंडिकेटर, बॅटरी व्होल्टमीटर यांसारखी माहिती दर्शवली जाते. हे मीटर अडस्ट करता येण्यासारखा ब्राइटनेस (पाच लेव्हलपर्यंत अडस्ट करता येण्यासारखा) देण्यात आला आहे. त्याशिवाय यात सील चेन देण्यात आली आहे, जी वारंवार अडस्ट करण्याची गरज पडत नाही व त्यामुळे देखभालीचा खर्च कमी होतो.

जबरदस्त कामगिरी

नव्या हॉर्नेट 2.0 मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाइन दिले आहे, ज्यांच्या मदतीने गाडीची कामगिरी उच्च दर्जाची होते. हॉर्नेट 2.0 ला नवे भारत स्टेज व्हीआय पालन करणारे उच्च क्षमता असलेले अत्याधुनिक 184 सीसी पीजीएम- एफआय एचईटी (होंडा इको तंत्रज्ञान) इंजिन बसवण्यात आले आह. पीजीएम- एफआय यंत्रणा 8 ऑनबोर्ड सेन्सर्सचा वापर करते, जे सातत्याने कार्यक्षमपणे इंधन आणि एयर मिक्शर वापरून चांगली कामगिरी व उच्च दर्जाची कार्यक्षमता देते.

ही गाडी वेगाच्या कोणत्याही स्थितीमध्ये इनटेकचा संपूर्ण वापर आणि एक्सॉस्ट भागांसह जबरदस्त अक्सलरेशन व जलद प्रतिसाद देते. जबरदस्त कामगिरीसाठी खास तयार करण्यात आलेली हॉर्नेट 2.0 या विभागातील आघाडीचा, मध्यम श्रेणी टॉर्क देते. रोलर रॉकर आर्ममुळे फ्रिक्शन नाश कमी होण्यास मदत होते व त्यामुळे जास्त सफाईदार पॉवर डिलीव्हरी मिळते. नव्या इंजिनला देण्यात आलेले पिस्टन कुलिंग जेट उष्णता शोषक महणून काम करते आणि पर्यायाने इंजिनची थर्मल कार्यक्षमता सुधारते व अधिक चांगली इंधन कार्यक्षमता अनुभवता येते.

आंतरराष्ट्रीय स्टाइल

एलईडी लाटिंग पॅकेजमुळे (एलईडी हेडलॅम्प आणि पोझिशन लॅम्प, एलईडी विंकर्स आणि एक्स आकाराचे एलईडी टेल लॅम्प ) विसंबून राहाण्याची क्षमता तसेच दृश्यमानता वाढते.

नव्या उच्च दर्जाच्या एयरोडायनॅमिक डिझाइनमुळे सफाईदार हाताळणी करता येते व त्यामुळे हायवे तसेच शहराअंतर्गत प्रवासासाठी परफेक्ट व ताकदवान जोडीदार मिळतो.

नवे स्पोर्टी सीट आणि किल्लीसाठी टाकीवर जागा केल्यामुळे स्ट्रीट फायटर लूक आणखी उठावदार होतोच, शिवाय चालकाटी जास्त सोय होते.

शॉर्ट मफलर आणि नव्या अलॉय व्हील डिझाइनमुळे स्पोर्टी लूक जास्त खुलून दिसतो, तर अलॉय फूट पेग्जमुळे एकंदर स्टाइलमध्ये भर पडते.

महत्त्वाची विश्वासार्हता

या क्षेत्रात पहिल्यांदाच होंडाद्वारे 6 वर्षांचे वॉरंटी पॅकेज (3 वर्षांची नेहीची 3 वर्षांची पर्यायी विस्तारित वॉरंटी) हॉर्नेट 2.0 वर देण्यात आले आहे.

किंमत आणि रंग

नवी हॉर्नेट 2.0 पर्ल इग्नियस ब्लॅक, मॅट सांग्रिया, रेडम टॅलिक, मॅट अक्सिस ग्रे मेटॅलिक आणि मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक या चार आकर्षक रंगांत उपलब्ध आहे. हॉर्नेट 2.0 ची किंतमत रू. 126,345 एक्स- शोरूम गुरुग्राम (हरियाणा) आहे.

कोरोनायोद्ध्यांच्या मुलांकरिता रायसोनी समूहातर्फे शिष्यवृत्ती

0

पुणे : कोरोना महामारीच्या लढाईत स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक लोक फ्रंटलाईनला काम करत आहेत. अशा या फ्रंटलाईन कोरोनायोद्ध्यांच्या मुलांसाठी रायसोनी शिक्षण समूहातर्फे विशेष शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. हुशार, गरजू व कोरोना योद्धा मुलांना रायसोनी शिक्षण समूहात ही शिष्यवृत्ती आगामी शैक्षणिक वर्षाकरिता मिळणार आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे आज जनतेला आरोग्य व आर्थिक नियोजनाच्या समस्या भेडसावत आहेत. मात्र अशा स्थितीतही डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाई कर्मचारी आदी लोक आपले जीवन धोक्यात घालून रात्रंदिवस कोरोनाच्या लढाईत कार्यरत आहेत.

या योद्ध्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने रायसोनी शिक्षण समूहातर्फे ही शिष्यवृत्ती योजना राबवली जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना कोरोनायोद्ध्यांचे पाल्य असल्याचे, तसेच इतर कागदपत्रे सादर करावे लागतील. या शिष्यवृत्तीसाठी रायसोनी समूहातर्फे एक समिती स्थापण्यात आली असून, त्या समितीमार्फत प्राप्त अर्जांची छाननी करण्यात येईल व पात्र उमेदवारांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाईल.

ही शिष्यवृत्ती केवळ भारतीय विद्यार्थ्यांकरिता असून, नियमित स्वरूपाच्या अभ्यासक्रमासाठी आहे. यासाठी सहा लाखापेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० सप्टेंबर २०२० अशी आहे. रायसोनी शिक्षण समूहात कोणत्याही शहरातील महाविद्यालयात ही शिष्यवृत्ती लागू होईल. अधिक माहितीसाठी www.raisoni.net किंवा www.ghraisoni.org या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

“भाजपच्या नाकर्तेपणामुळे स्मार्ट पुण्याचे रॅंंकिंग घसरले!” – खासदार वंदना चव्हाण

0

पुणे -स्मार्ट सिटी प्रकल्पात पुण्याचा क्रमांक आता २८ व्या क्रमांकावर गेला आहे, असे प्रसारमाध्यमांतून वाचल्यावर आश्‍चर्याचा धक्का बसला. केंद्रात, महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. महापालिकेत स्पष्ट बहुमत असतानाही भाजपच्या कारभारामुळे पुण्याचा लौकीक घसरल्याचे स्मार्ट सिटीच्या रॅंकिंगमधून उघड झाले आहे.  या वस्तुस्थितीला केवळ प्रशासनच नव्हे तर, सत्ताधारी म्हणून भाजपचे सपशेल अपयश आहे.

पुणे शहर हे मुळातच स्मार्ट शहर आहे. गेल्या १५-२० वर्षांत शहराचा कायापालट झाला असून पुरेसा प्रमाणात पायाभूत सुविधाही निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शहराची वाढ झपाट्याने झाली. म्हणूनच स्मार्ट सिटी प्रकल्पात जून २०१६ मध्ये देशात पुण्याची दुसऱ्या क्रमांकाने निवड झाली. त्यावेळी पुणे महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. तेव्हा शहरातील १४ प्रकल्पांचे भूमिपूजन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. महापालिकेतील राष्ट्रवादीच्या उत्तम कामामुळे लाईट हाऊस, स्मार्ट क्‍लिनिक, प्लेस मेकिंग, स्मार्ट स्कूल, स्मार्ट स्ट्रीट, हॅपी स्ट्रिट, ई- बसची खरेदी आदी अनेक प्रकल्पांना सुरुवात झाली. मात्र, महापालिकेत भाजपची सत्ता आल्यावर स्मार्ट सिटीचे काम एकदम ठप्प झाले. गेल्या दहा महिन्यांत एकाही नव्या प्रकल्पाला सुरुवात झाली नाही आणि काम सुरू असलेला एकही प्रकल्प वेळेत पूर्ण झाला नाही. स्मार्ट सिटीमध्ये महापालिकेच्या माध्यमातून होत असलेल्या कामांच्या नोंदीही केंद्र सरकारकडे गेल्या काही महिन्यांत महापालिकेला पोचविता आलेल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेला अपेक्षित असलेला निधीही केंद्र सरकारकडून मिळालेला नाही. परिणामी पुणे स्मार्ट सिटीची हेळसांड झाली. महापालिकेतील सत्ताधारी फक्त निविदां आणि त्यातील टक्केवारीमध्ये मग्न असल्यामुळे दैनंदिन कारभाराकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे, हे स्मार्ट सिटीच्या या उदाहरणातून अधोरेखित झाले आहे.

केंद्रात भाजपची सत्ता आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारही महापालिकेला सहकार्य करीत आहे. तरीही शहरासाठी नव्या विकास प्रकल्पांची मांडणी आणि अंमलबजावणी भाजपला गेल्या दीड वर्षांत करता आलेली नाही. भाजपचे महापालिकेतील पदाधिकारी, आमदार आणि खासदार यांचेही स्मार्ट सिटीकडे लक्ष नाही. तसेच पुण्यातून आमदार झालेल्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचेही स्मार्ट सिटी आणि महापालिकेतील कारभाराकडे दुर्लक्ष झाले आहे, असे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपच्या नाकर्तेपणामुळेच पुण्याचे रॅंकिंग घसरले आहे. त्यामुळे आपल्या अपयशाचे खापर अन्य कोणावर फोडण्यापेक्षा भाजपने आपल्या कारभारात सुधारणा करावी आणि पुणेकरांचा विश्‍वासघात न करता, त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करावी.

केंद्राकडे जुलैअखेर महाराष्ट्राची २२ हजार ५३४ कोटींची थकबाकी

0

थकबाकी वाढत राहिल्यास १ लाख कोटींवर जाण्याची भीती

मुंबई, दि. २७ : वस्तू व सेवाकरातील नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून महाराष्ट्राला जुलै २०२० पर्यंत २२ हजार ५३४ कोटी रुपयांची थकबाकी येणे असून ही रक्कम वेळेवर न मिळता अशीच वाढत गेल्यास दोन वर्षात १ लाख कोटींवर जाईल, अशी भीती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज ४१ व्या वस्तू व सेवाकर (जीएसटी) परिषदेत व्यक्त केली.

जीएसटीचा हिस्सा आणि थकबाकी राज्यांना वेळेत देणं, राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढणं ही जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारली असल्यानं ते कर्तव्य पार पाडण्यासाठी केंद्रानेच कमी व्याजदराने कर्ज घेऊन राज्यांना निधी उपलब्ध करावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जीएसटी परिषदेत केली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ४१ व्या जीएसटी परिषदेत राज्याच्या वतीने अर्थमंत्री नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते.मंत्रालयातील त्यांच्या दालनातून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परिषदेत सहभागी होताना त्यांनी राज्याची बाजू दमदारपणे मांडली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जीएसटीतील नुकसान भरपाईची रक्कम केंद्र सरकारकडून वेळेवर मिळत नाही, त्यामुळे सर्वच राज्यांसमोर आर्थिक संकट आहे. त्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. देशातील जवळपास सगळी राज्ये सध्या कोरोना संकटाशी लढत असल्याने केंद्राकडून अधिक निधी मिळालाच पाहिजे. केंद्रानं महसुल गॅरन्टी घेतली असल्यानं राज्यांना भरपाईचा निधी वेळेवर देणं ही केंद्राची जबाबदारी आहे. केंद्राने त्यासाठी कर्ज घ्यावे कारण त्यांना राज्यांपेक्षा कमी दराने कर्ज उपलब्ध होऊ शकते, असे मतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीएसटी परिषदेत व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रासह अन्य राज्यांची बाजू मांडताना स्पष्ट केले की, आर्थिक मर्यादांमुळे राज्यांना कर्ज घेणे शक्य नाही. केंद्र सरकारला अल्पदरात कर्ज उपलब्ध होऊ शकते, ती सोय राज्य सरकारांना नाही. राज्यांनी जादा व्याजदराने कर्ज घेतल्यास त्याचा अकारण सेसवर परिणाम होईल व अंतिम बोजा ग्राहकांवर पडेल. राज्यांनी खुल्या बाजारातून कर्ज घेण्याचा प्रयत्न केल्यास तिथेही व्याजदर वाढण्याची व कर्ज मिळणं दुरापास्त होण्याची भीती आहे. ही वस्तुस्थिती असल्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी जीएसटी परिषदेत लक्षात आणून दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिषदेत आणखी काही सूचना केल्या. ते म्हणाले की, राज्यांना जीएसटी नुकसानीपोटी भरपाई देण्यासाठी सुरु केलेल्या सेसची कालमर्यादा पाच वर्षांसाठी म्हणजे येत्या २०२२ वर्षापर्यंत आहे. ही कालमर्यादा वाढवून मिळावी. केंद्राकडून राज्यांना देय निधी वेळेत देण्यासाठी केंद्र सरकारनेच कर्ज घ्यावं आणि राज्यांना ती रक्कम द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली. केंद्र सरकारकडून राज्यांना दिलेल्या रकमेची वसुली सेसची कालमर्यादा वाढवून करावी व संपूर्ण वसुली होईपर्यंत सेसचा कालावधी वाढवण्यात यावा, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

देशातील सर्वात प्रगत आणि आघाडीचं राज्य असलेल्या महाराष्ट्रासमोर, कोरोनामुळे निर्माण झालेलं आर्थिक संकट अभूतपूर्व आहे, या संकटावर मात करण्याचा आमचा निर्धार असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत, केंद्र सरकारनेही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. राज्यांच्या उत्पन्नाचा वस्तू व सेवाकर अर्थात जीएसटी हा मुख्य स्त्रोत असल्याने केंद्र सरकारने ‘जीएसटी’पोटी राज्यांना देय रक्कम व थकबाकी वेळेत द्यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्र्यांनी जीएसटी परिषदेत केली. केंद्र सरकारने वडीलबंधूची भूमिका बजावत महाराष्ट्रासह अन्य राज्यांनाही आर्थिक संकटातून बाहेर काढावे, ही केंद्राने स्विकारलेली जबाबदारी व  कर्तव्य सुद्धा असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीएसटी परिषदेत महाराष्ट्राची तसेच अन्य राज्यांचीही बाजू मांडली.

विधानमंडळ पावसाळी अधिवेशन : सदस्यांसाठी प्रवेशद्वाराजवळ दि.५ व ६ रोजी कोरोना चाचणीची सुविधा

0

मुंबई,दि.२७ : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन दिनांक ७ व ८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असून आरटी-पीसीआर कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक असल्याची खात्री केल्यानंतरच विधानभवनामध्ये प्रवेश देण्यात येईल. आज यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक होऊन सर्व व्यवस्थांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.

विधानभवन, मुंबई येथील प्रवेशद्वाराजवळ सन्माननीय सदस्यांसाठी  दिनांक 5 व 6 सप्टेंबर, 2020 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 यावेळेत आरटी-पीसीआर कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  या पूर्वतयारी संदर्भातील बैठकीस विधानमंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सभागृह तसेच विधानभवन इमारत येथे सर्व खबरदारीच्या उपाययोजना कार्यान्वित करण्यासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सोमवार‍ दिनांक 7 सप्टेंबर, 2020 पासून विधानभवन, मुंबई येथे सुरु होणाऱ्या विधानमंडळाच्या अधिवेशनाकरिता उपस्थित राहणाऱ्या सन्माननीय सदस्यांनी कोरोना विषाणू संसर्ग नसल्याबाबतचा अधिवेशनाच्या अगदी लगतपूर्वीचा अधिकृत प्रयोगशाळेचा अहवाल विधानमंडळ सचिवालयाकडे सादर करणे आवश्यक राहिल असे दिनांक 25 ऑगस्ट, 2020 रोजी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. सन्माननीय सदस्यांच्या वास्तव्याच्या नजीक असलेल्या अधिकृत प्रयोगशाळेचा दिनांक 4 सप्टेंबर, 2020 नंतर केलेला आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल विधानमंडळ सचिवालयाला सादर करता येईल अथवा तशी सुविधा उपलब्ध होत नसल्यास विधानभवन, मुंबई येथे करण्यात आलेल्या व्यवस्थेचा वापर केला जाऊ शकतो. मा.पीठासीन अधिकारी यांच्या आदेशानुसार मा.मुख्यमंत्री तसेच मंत्री परिषदेतील सर्व मा.मंत्री, मा.राज्यमंत्री, मा.विरोधी पक्ष नेते आणि त्यांच्या सोबतचे स्वीय सहायक यांना विधानभवन इमारतीत प्रवेश करण्यासाठी वरील प्रमाणे चाचणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.  मंत्रालयातील व विधानमंडळ सचिवालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना देखील वरीलप्रमाणे चाचणी अहवाल सादर केल्याशिवाय विधानमंडळ इमारतीत प्रवेश दिला जाणार नाही.

मुद्रांक शुल्क दर कपातीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

0

मुंबई, : येत्या ३१ डिसेंबर २०२० अखेरपर्यंत ३ टक्के तर ३१ मार्च २०२१ पर्यंत २ टक्के मुद्रांक शुल्क दर सवलतीमुळे सर्वसामान्य, शेतकरी वर्ग यांच्यासह बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळेल, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

श्री. थोरात म्हणाले की, सध्याचा प्रचलित मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे अभिहस्तांतरणपत्राच्या दस्तावरील प्रचलित मुद्रांक शुल्काचा दर दि. 1 सप्टेंबर, 2020 पासून ते दि.31 डिसेंबर, 2020 या कालावधीकरिता 3 टक्क्यांने तर दि.1 जानेवारी, 2021 ते दि.31 मार्च, 2021 या कालावधीकरिता 2 टक्क्यांने  कमी करण्यात आला आहे.

कोविड – 19 मुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत उद्योग व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बांधकाम व्यावसायिक आणि विविध संघटना यांच्याकडून मुद्रांक शुल्क कमी करण्याची मागणी महसूल विभागाकडे करण्यात येत होती. राज्य शासनाने याबाबत पुढाकार घेऊन घर खरेदीदार आणि बांधकाम व्यावसायिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे श्री. थोरात यांनी सांगितले.

‘गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट’चा वनस्पती पोषण क्षेत्रात प्रवेश

0

27 ऑगस्ट, 2020 : ‘गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट’ या कंपनीने आज ‘बायोइबरका’ या स्पॅनिश संघटनेच्या संयुक्त विद्यमाने वनस्पती पोषणासाठीची विविध उत्पादने सादर करण्याची घोषणा केली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश / तेलंगणा, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेशात हा उत्पादनांचा पोर्टफोलिओ उपलब्ध असणार आहे. वनस्पतींमधील ताण कमी करण्याची गरज असल्याने या उत्पादनांचे महत्त्व मोठे आहे.

वनस्पतींचा ताण हा अजैविक (अत्यधिक किंवा अत्यंत कमी तपमान, कमी किंवा जास्त पाऊस, दुष्काळ इ. कारणांमुळे) किंवा जैविक (कीटकांचा संसर्गामुळे) असू शकतो. हवामानातील बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग अशा विविध घटकांचा वनस्पतींवर थेट परिणाम होतो. सेंद्रिय उत्पादनांच्या कमतरतेमुळे कीटकनाशकाचा जास्त प्रमाणात वापर केल्यास, वनस्पतीच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यांत तिच्या आरोग्याची हानी होणे, विशिष्ट पीक, फळ आणि फूल यांच्या उत्पादनात घट होणे ही वनस्पतीवर ताण आल्याची सामान्य लक्षणे आहेत.

वनस्पतीवर ताण आल्याचा गंभीर परिणाम वनस्पतींच्या आरोग्यावर आणि शेतीच्या अर्थकारणावर होतो, तरीही बहुसंख्य शेतकरी वनस्पतीवरील ताण हा शेती व्यवस्थापनाचा महत्वाचा पैलू मानत नाहीत.  तंत्रज्ञानाच्या आधारे सादर करण्यात आलेल्या ‘सोल्युशन’मुळे आता वनस्पती ताण कमी करण्याच्या या सुप्त गरजेचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यास शेतकऱ्यांना शक्य होईल. या समस्या दूर करण्यासाठी आणि निरोगी शेतीची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी ‘गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट’तर्फे पीकनिहाय पौष्टिक उत्पादने देण्यात येतात.

गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटचे व्यवस्थापकीय संचालक बलरामसिंग यादव म्हणाले, “वनस्पतींच्या ताणामुळे निर्माण झालेल्या शेतीविषयक प्रश्नांचा थेट परिणाम शेती अर्थशास्त्रावर होतो. तो कमी करण्यासाठी  त्वरित जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. पीक उत्पादन सुधारण्यासाठी कृषी-इनपुट उत्पादनांच्या विविध श्रेणी सादर करीत गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट ही कंपनी भारतीय शेतकर्‍यांची सेवा करत आहे. वनस्पतींच्या पोषणासाठीची उत्पादने आणण्याचा प्रारंभ या नीतिशी सुसंगत आहे. यामुळे शेतकर्‍यांना विशिष्ट पिकाचे अपेक्षेएवढे उत्पन्न मिळू शकेल.”

वनस्पती पोषण उत्पदनांच्या पोर्टफोलिओमध्ये पुढील पीकनिहाय उत्पादनांचा समावेश आहे:

टेरा सॉर्ब कॉम्प्लेक्स – द्राक्ष, सफरचंद, मिरची, बटाटा

आर्मुरॉक्स – द्राक्ष, सफरचंद, मिरची, कापूस

इक्विलिब्रियम – टोमॅटो, वांगी, भेंडी, तोंडली, ढोबळी मिरची, काकडी आणि केळी या फळभाज्या.

ही उत्पादने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश / तेलंगणा, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेशात उपलब्ध असतील.

गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट लिमिटेडबद्दल

गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट लिमिटेड (जीएव्हीएल) ही एक वैविध्यपूर्ण संशोधन आणि विकास केंद्रित कृषी व्यवसाय क्षेत्रातील कंपनी आहे. पीक आणि पशुधनाचे उत्पादन सातत्याने वाढविणारी उत्पादने आणि सेवांचे नूतनीकरण यांद्वारे भारतीय शेतकऱ्यांची उत्पादकता सुधारण्यासाठी ती समर्पित आहे. पशुखाद्य, पीक संरक्षण, तेल पाम, दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन आणि प्रक्रिया केलेले खाद्य या क्षेत्रांमध्ये या कंपनीचे अस्तित्व आहे.

कृषी क्षेत्रात संशोधनासाठी संस्था निर्माण होणे गरजेचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
  • केंद्रीय कृषीमंत्र्यांसमवेतच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

मुंबई : कृषीप्रधान देशात शेती ही आपली संपत्ती असून तिचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी असून शेतकऱ्याला सन्मान देतानाच कृषी क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात पिकेल ते विकेल याधर्तीवर शेतीक्षेत्रात काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

केंद्र शासनाने शेती क्षेत्रामध्ये हाती घेतलेल्या सुधारणांबाबत आढावा घेण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध राज्यातील मुख्यमंत्री, कृषीमंत्री यांच्याशी संवाद साधला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषीमंत्री दादाजी भुसे त्यामध्ये सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आदी यावेळी उपस्थित होते.

शेती क्षेत्राच्या सुधारणेसाठी केंद्र शासनाने आणलेल्या नवीन अध्यादेशाचे स्वागत करून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, शेती आणि शेतकरी आपली संपत्ती आहे. कृषी क्षेत्रातील सुधारणांच्या माध्यमातून शेतकरी कल्याणाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यास मदत होईल.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी राज्याचा हिस्सा पूर्वीप्रमाणे ५० टक्के करावा

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी राज्याचा हिस्सा पूर्वीप्रमाणे ५० टक्के करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. विमा कंपन्यांची जिल्हास्तरावर कार्यालये असावीत जेणेकरून शेतकऱ्याला विमा प्रतिनीधीशी संपर्क साधता येईल. बँकांकडून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा होण्यासाठी केंद्र शासनाने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

कडधान्य आणि डाळींच्या खरेदीसाठीची २५ टक्क्यांच्या मर्यादेची अट रद्द करावी

बाजारपेठेचे सर्वेक्षण करून ज्या मालाला बाजारपेठ आहे त्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी पिकेल ते विकेल या धोरणानुसार राज्यात काम सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात कृषी विद्यापीठे आहेत मात्र कृषीआधारित संशोधनासाठी  संस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नाफेड मार्फत कडधान्य आणि डाळींच्या खरेदीसाठीची २५ टक्क्यांच्या मर्यादेची अट रद्द करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी १ टक्का व्याजदराने कर्ज द्यावे- कृषीमंत्री भुसे

कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी शेतकऱ्यांना, शेतकरी उत्पादक कंपन्यांना आणि शेतकरी गटांना १ टक्का व्याज दराने कर्ज देण्याची मागणी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी केली. राज्य शासनाने फळपीक विम्याचा सुधारित प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे त्याला मान्यता देण्यात यावी, अशी मागणीही श्री. भुसे यांनी केली.