‘गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट’चा वनस्पती पोषण क्षेत्रात प्रवेश

Date:

27 ऑगस्ट, 2020 : ‘गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट’ या कंपनीने आज ‘बायोइबरका’ या स्पॅनिश संघटनेच्या संयुक्त विद्यमाने वनस्पती पोषणासाठीची विविध उत्पादने सादर करण्याची घोषणा केली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश / तेलंगणा, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेशात हा उत्पादनांचा पोर्टफोलिओ उपलब्ध असणार आहे. वनस्पतींमधील ताण कमी करण्याची गरज असल्याने या उत्पादनांचे महत्त्व मोठे आहे.

वनस्पतींचा ताण हा अजैविक (अत्यधिक किंवा अत्यंत कमी तपमान, कमी किंवा जास्त पाऊस, दुष्काळ इ. कारणांमुळे) किंवा जैविक (कीटकांचा संसर्गामुळे) असू शकतो. हवामानातील बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग अशा विविध घटकांचा वनस्पतींवर थेट परिणाम होतो. सेंद्रिय उत्पादनांच्या कमतरतेमुळे कीटकनाशकाचा जास्त प्रमाणात वापर केल्यास, वनस्पतीच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यांत तिच्या आरोग्याची हानी होणे, विशिष्ट पीक, फळ आणि फूल यांच्या उत्पादनात घट होणे ही वनस्पतीवर ताण आल्याची सामान्य लक्षणे आहेत.

वनस्पतीवर ताण आल्याचा गंभीर परिणाम वनस्पतींच्या आरोग्यावर आणि शेतीच्या अर्थकारणावर होतो, तरीही बहुसंख्य शेतकरी वनस्पतीवरील ताण हा शेती व्यवस्थापनाचा महत्वाचा पैलू मानत नाहीत.  तंत्रज्ञानाच्या आधारे सादर करण्यात आलेल्या ‘सोल्युशन’मुळे आता वनस्पती ताण कमी करण्याच्या या सुप्त गरजेचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यास शेतकऱ्यांना शक्य होईल. या समस्या दूर करण्यासाठी आणि निरोगी शेतीची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी ‘गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट’तर्फे पीकनिहाय पौष्टिक उत्पादने देण्यात येतात.

गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटचे व्यवस्थापकीय संचालक बलरामसिंग यादव म्हणाले, “वनस्पतींच्या ताणामुळे निर्माण झालेल्या शेतीविषयक प्रश्नांचा थेट परिणाम शेती अर्थशास्त्रावर होतो. तो कमी करण्यासाठी  त्वरित जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. पीक उत्पादन सुधारण्यासाठी कृषी-इनपुट उत्पादनांच्या विविध श्रेणी सादर करीत गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट ही कंपनी भारतीय शेतकर्‍यांची सेवा करत आहे. वनस्पतींच्या पोषणासाठीची उत्पादने आणण्याचा प्रारंभ या नीतिशी सुसंगत आहे. यामुळे शेतकर्‍यांना विशिष्ट पिकाचे अपेक्षेएवढे उत्पन्न मिळू शकेल.”

वनस्पती पोषण उत्पदनांच्या पोर्टफोलिओमध्ये पुढील पीकनिहाय उत्पादनांचा समावेश आहे:

टेरा सॉर्ब कॉम्प्लेक्स – द्राक्ष, सफरचंद, मिरची, बटाटा

आर्मुरॉक्स – द्राक्ष, सफरचंद, मिरची, कापूस

इक्विलिब्रियम – टोमॅटो, वांगी, भेंडी, तोंडली, ढोबळी मिरची, काकडी आणि केळी या फळभाज्या.

ही उत्पादने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश / तेलंगणा, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेशात उपलब्ध असतील.

गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट लिमिटेडबद्दल

गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट लिमिटेड (जीएव्हीएल) ही एक वैविध्यपूर्ण संशोधन आणि विकास केंद्रित कृषी व्यवसाय क्षेत्रातील कंपनी आहे. पीक आणि पशुधनाचे उत्पादन सातत्याने वाढविणारी उत्पादने आणि सेवांचे नूतनीकरण यांद्वारे भारतीय शेतकऱ्यांची उत्पादकता सुधारण्यासाठी ती समर्पित आहे. पशुखाद्य, पीक संरक्षण, तेल पाम, दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन आणि प्रक्रिया केलेले खाद्य या क्षेत्रांमध्ये या कंपनीचे अस्तित्व आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दिल्ली-टेकऑफ दरम्यान स्विस विमानाला आग :6 जखमी, 4 नवजात बालकांसह 232 प्रवासी होते

नवी दिल्ली-दिल्ली विमानतळावर टेकऑफ करताना स्विस विमानाचे इंजिन निकामी...

भोंदू बागेश्वर मनुस्मृतीचेच आधुनिक व्हर्जन:त्याने स्वतःपासूनच 4 मुले जन्माला घालण्याची सुरुवात करावी, रोहित पवार यांचा टोला

मुंबई--नागपूर येथील कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी...

बेकायदा होर्डिंग्जने गिळले महापालिकेचे १८७ कोटी तर अधिकृत होर्डिंग्जने देखील दिला ८०० कोटीचा फटका ?

पुणे- महापालिकेच्या हद्दीत गेल्या ७ वर्षापासून बेकायदा १५०० होर्डींग्जने...

महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल, दुरूस्तीचे पूर्वनियोजित कामे आता सकाळच्या सत्रात होणार

मुंबई, दि. २५ एप्रिल २०२६: उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे सध्या वेगात सुरु आहे. मात्र उन्हाचा तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे संबंधित दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करावेत असे निर्देश मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना शनिवारी (दि. २५) देण्यात आले. महावितरणची प्रामुख्याने पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच वीजपुरवठा खंडित होणे व वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी वीज ग्राहकांना पूर्वसूचना देऊन देखभाल व दुरूस्तीचे कामे वीजराज्यभरात सध्या सुरु आहे. साधारणतः मे महिन्याच्या अखेरीस सर्व कामे पूर्णत्वास जातात. मात्र सद्यस्थितीत सकाळी १० ते दुपारी २ किंवा चार वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवत देखभाल व दुरुस्तीचे कामे सुरु आहेत. नागरिकांसाठी ही गैरसोयीची वेळ टाळण्यासाठी यापुढे संबंधित दिवशी व वीजवाहिनीच्या पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीचे काम यापुढे सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करण्याचे निर्देश मुख्यालयाकडून देण्यात आले आहे. महावितरणच्या देखभाल दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे करताना सर्वप्रथम प्राधान्याने पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे तसेच संबंधित वीजग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे तसेच प्रसिद्धी माध्यमांद्वारे कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्तीच्या पूर्वनियोजित कामांमध्ये प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या छोट्या फांद्या तोडणे, तूटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रे, फिडर पिलर, रिंगमेन युनिटचे अर्थिंग तपासणे, ऑइल फिल्टरेशन व ऑइल टॉपिंग अप, रोहित्राच्या वितरण पेटीची दुरुस्ती, नादुरुस्त लाईटनिंग अरेस्टर बदलणे, वीजखांब व तारांचे मजबुतीकरण, तारांमधील झोल काढणे, गंजलेले किंवा खराब झालेले वीजखांब बदलणे, जुन्या वीजतारा बदलणे, फिडर पिलरची साफसफाई व आवश्यकतेनुसार इन्सूलेशन स्प्रे मारणे, उच्च व लघुदाब वीजतारांना गार्डिंग करणे यासह उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, पॉवर ट्रान्सफॉर्मरची देखभाल व ऑइल टॉपिंग अप अशा व इतर विविध दुरुस्ती कामांसह वीजपुरवठ्याच्या पर्यायी यंत्रणा सज्ज करणे आदी कामे करण्यात येत आहेत.