पुणे- कोरोनाच्या महामारीत देखील मोठ्या भक्ती भावाने गौराईंचे स्वागत करणाऱ्या भक्तांच्या घरी गावच्या आठवणींना उजाळा देत आज गौराईं भाविकांचा निरोप घेतला .पुण्यातील प्रातिनिधिक स्वरूपात सौ. अंजली अजय भोसले यांच्या घरातील गौराईंनी पहा कशा जागवल्या गावाच्या आठवणी …..
भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन झाल्यानंतर भाद्रपदातील शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे घरोघरी आगमन झाले. . भारतीय परंपरा, संस्कृतीत गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अनेक ठिकाणी गौराईचे पूजन महालक्ष्मी स्वरुपात केले जात असल्यामुळे याला महालक्ष्मी पूजन असेही संबोधले जाते. २५ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ०१ वाजून ५८ मिनिटांनी अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन झाले. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ ऑगस्ट २०२० रोजी गौरी पूजन झाले . मूळ नक्षत्रावर गौरींचे किंवा महालक्ष्मींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पोवत्याच्या वा सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा, असे एक एक जिन्नस घालतात. हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तूंचा त्यात समावेश असतो. गौरींची -महालक्ष्मींची पूजा व आरती झाली . गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखविला गेला गुरुवार, २७ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांनंतर ज्येष्ठागौरी विसर्जन सुरु झाले .