मुंबई, दि. ३ नोव्हेंबर- मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड बिनविरोध निवडून आले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांच्या विरोधात कोणीच अर्ज न भरल्याने दोघांची बँकेचे संचालक म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.
निवडणुकीसाठी शुक्रवारपर्यंत (तारीख ३) अर्ज भरण्याची मुदत होती. अखेरच्या दिवशी बँकेवर वर्चस्व असलेल्या सहकार पॅनेलच्या २१ उमेदवारांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक अधिकारी कैलास जेबले यांनी अर्ज स्वीकारले. या उमेदवारांमध्ये दरेकर आणि लाड यांचाही समावेश होता. त्याचप्रमाणे शिवाजीराव नलावडे, सुनील राऊत, सिद्धार्थ कांबळे, संदीप घनवट, नंदकुमार काटकर, विठ्ठलराव भोसले, अभिजीत अडसूळ, पुरुषोत्तम दळवी, आनंदराव गोळे यांचाही समावेश होता.
मुंबै बँकेच्या संचालकपदी प्रविण दरेकर बिनविरोध
“94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरूवात”
भव्यदिव्य ग्रंथ दिंडीचे नाशिककरांकडून उत्साहात स्वागत…
नाशिक -कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरूवात आज भव्य ग्रंथ दिंडीने करण्यात आली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, उपाध्यक्ष तथा कृषीमंत्री दादाजी भुसे व मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते दिंडींचे पुजन करण्यात आले. कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून सुरू झालेल्या दिंडीचे नाशिककरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
साहित्य संमेलनाचा शुभारंभ करणाऱ्या या ग्रंथदिंडीच्या सोहळ्यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, विधानसभेचे उपाध्यक्ष तथा संमेलनाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार पंकज भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी लितीन मुडांवरे, संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले, संमेलन समन्वयक समीर भुजबळ, निमंत्रक-प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगांवकर, संमेलनाच्या सर्व समितींचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकुर, सर डॉ. मो. स. गोसावी, प्राचार्य प्रशांत पाटील यांच्यासह लेखक, कवी, साहित्यिक, विद्यार्थ्यांचे लेझीम पथक व साहित्यप्रेमींनी उपस्थिती लावली होती.
यावेळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले, लेझीम पथक, वारकरी मंडळी व ढोलताशांच्या गजरात ग्रंथ दिंडीला सुरूवात करण्यात आली. ग्रंथदिंडीच्या पालखीमध्ये भगवत गिता,
ज्ञानेश्वरी व कुसुमाग्रजांची साहित्यसंपदा ठेवण्यात आली होती. यावेळी नाशिक पोलीस विभागामार्फत पोलीस व जनता यांच्यातील सुसंवाद वाढवा यासाठी जनजागृतीपर काढण्यात आलेल्या रॅलीतून महाराष्ट्र राज्य पोलिसांचे मुखपत्र असलेल्या दक्षता या मासिकाची माहिती देण्यात आली.
ही दिंडी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून निघून नागरिकांना दिंडीत सहभागी होणे सोयीचे व्हावे, यासाठी टिळकपथ, पोलिस ग्राऊंड, सीबीएस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शालिमार, नेहरू उद्यान यामार्गाने सार्वजनिक वाचनालय येथे येवून त्यानंतर बसमधून संमेलन स्थळाकडे ग्रंथदिंडी मार्गस्थ झाली आहे.
12 कोटी रुपयांचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट घोटाळा उघडकीस
मुंबई, 3 डिसेंबर 2021
सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर मंडळाच्या ठाणे आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी मुंबई प्रदेश सीजीएसटीच्या गुन्हे माहिती पथकाने दिलेल्या विशेष गुप्त माहितीनुसार कारवाई करत मे.स्टार स्क्रॅप स्टील या कंपनीच्या मालकाला करचोरी प्रकरणी ताब्यात घेतले. ही कंपनी, लोखंडी कचरा आणि भंगार वितळवून त्यातील लोखंड अथवा पोलाद विकण्याचा व्यवसाय करते. या कंपनीच्या मालकाने सीजीएसटी कायदा 2017 चे उल्लंघन करत, कोणत्याही वस्तू अथवा सेवा न घेता, 12 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडीट हडपले आणि फसवणुकीने त्याचा वापर केला असे तपासणीअंती निदर्शनास आले.
या कंपनीला अनेक व्यापारी कंपन्यांकडून इनपुट टॅक्स क्रेडीट मिळत होते आणि ही कंपनी ते रोलिंग मिल्स या कंपनीकडे हस्तांतरित करत होती. कोणतीही पावती आणि वस्तूंचा पुरवठा न होता, बनावट कंपन्यांच्या पावत्यांवर अस्वीकरणीय इनपुट टॅक्स क्रेडीट घेऊन हा सगळा घोटाळा केला जात होता.
मे.स्टार स्क्रॅप स्टील या कंपनीला वास्तवात, कोणत्याही वस्तूंचा पुरवठा न करता फसव्या पद्धतीने निधी हस्तांतरण करणाऱ्या ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यांतील करदात्यांच्या विविध ठिकाणांवर धाडी घालण्यात आल्या. या कंपनीच्या मालकाला अटक केली असून त्याला 3 डिसेंबर 2021 रोजी ठाण्याच्या प्रथम वर्ग न्याय-दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या कर घोटाळा प्रकरणात सहभागी असलेल्या इतरांना शोधून काढण्यासाठी पुढील तपास सुरु आहे.
अपंगत्वावर मात केलेल्या महाराष्ट्रातील १० दिव्यांगांना राष्ट्रीय पुरस्कार
नवी दिल्ली, 3 डिसेंबर : अपंगत्वावर मात करून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेल्या महाराष्ट्रातील 10 दिव्यांगाना वर्ष 2020 च्या राष्ट्रीय सक्षमीकरण या राष्ट्रीय पुरस्काराने आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद्र यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यासह दिव्यांगांच्या सुगम्यतेसाठी नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागालाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विज्ञान भवन येथे आज ‘आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसा’निमित्त केंद्रीय सामाजिक आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने ‘राष्ट्रीय सक्षमीकरण पुरस्कार’ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रपती, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री विरेंद्र सिंह, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्रीव्दय रामदास आठवले, श्रीमती प्रतिमा भौमिक, सचिव अंजली भावड़ा, उपमहानिदेशक किशोर सुरवाडे उपस्थित होते.
यावेळी एकूण 59 व्यक्तींना तसेच शासकीय अशासकीय संस्थांना विविध श्रेणीतील पुरस्काराने गौरिविण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील 10 व्यक्ती तसेच नाशिक सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा समावेश आहे. मूळची महाराष्ट्राची सध्या दिल्लीत वास्तव्यास असलेली देवांशी जोशी यांनाही आज राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सन्मान स्वरूपात सन्मानपत्र, पदक, आणि काही पुरस्कार प्राप्त व्यक्तींना रोख रक्कम देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रातून राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त व्यक्तींमध्ये चलन अक्षमता (महिला) श्रेणीमध्ये उत्कृष्ट कर्मचारी (स्वरोजगार) या श्रेणीमध्ये सांगलीच्या डॉ. पुनम उपाध्याय यांना पुरस्कृत करण्यात आले. जन्मत: 50 टक्के चलन अक्षमता असलेल्या डॉ. उपाध्याय यांनी बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन एंड सर्जरीचा अभ्यासक्रम पूर्ण करून एमडी, पीजीपीपी आणि पीजीडीईएमएस पदवीत्तोर अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. कामगार आणि गरीब रूग्णांना नाममात्र दराने वैद्यकीय सेवा पुरवितात.
चलन अक्षमता (पुरूष) श्रेणीमध्ये कोल्हापूराच्या देवदत्त रावसाहेब माने यांना रोल मॉडेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वयाच्या तिस-या वर्षापासून 86 टक्के चलन अक्षमता श्री माने यांच्यामध्ये आहे. त्यांनी कलाशाखेत पदवी घेतली आहे. दिव्यांगांच्या कल्याण आणि अधिकारांसाठी औद्योगिक सहकारी संस्था नावाने संस्था स्थापन केलेली आहे. 10 वर्षे ते वॉलीबॉल राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेले आहेत. त्यांचा स्वंयरोजगार आहे.

चलन अक्षमता (महिला) या श्रेणीतील रोल मॉडेल चा पुरस्कार लातूरच्या डॉ. प्रीति पोहेकर यांना प्रदान करण्यात आला आहे. श्रीमती पोहेकर 100 टक्के चलन अक्षमता या वर्गात मोडतात. त्यांनी पदवी, पदवीत्तर तसेच पीएच.डी. चे शिक्षण पुर्ण केलेले आहे. प्राध्यापक म्हणून 2001 पासून सुरूवात केलेली आहे. देश विदेशातील विविध परिषदेमध्ये त्यांनी मराठीसह इंग्रजीत प्रबंध सादर केलेले आहेत. त्या मानवाधिकार कार्यक्रमाशीही जुडलेल्या आहेत.
सर्वोत्कृष्ट दृष्टिबाधित कर्मचारी (महिला) या श्रेणीतील पुरस्कारासाठी मुंबईच्या निकिता वसंत राऊत यांना आज राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती राऊत या 100 टक्के दृष्टीबाधित आहेत. त्या अभ्यासात हुशार असून त्यांनी एमबीए, मास्टर्स ऑफ मैनेजमेंट स्टडीज, क्वालिफाइड यूजीसी नेट, सीएआईआईबी, एचआर मध्ये पदवीका घेतली आहे. यासह श्रीमती राऊत यांना संगीताची आवड असल्याने त्यांनी संगीत विशारद आणि संगीत भास्कर या संगीत क्षेत्रातील पदवीही घेतल्या आहेत. सध्या त्या बैंक ऑफ बड़ौदा येथे सहायक महाव्यवस्थापक या पदावर कार्यरत असलेल्या सर्वात कमी वय असलेल्या आहेत. त्यांना इतरही संस्थेचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
दिव्यांगांसाठी कार्यकरणा-या वैयत्किक श्रेणीमध्ये पुण्याच्या सकीना संदीप बेदी यांना सर्वोत्कृष्ट व्यक्तीचा पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. श्रीमती सकीना या स्वत: 100 टक्के दृष्टीबाधित आहेत. त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायंसेस, मुंबईतून मेडिकल आणि मनोरोग सामाजिक कार्य या अभ्यासक्रमात एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी कामाची सुरूवात प्रकल्प अधिकारी म्हणून केली होती नंतर प्रकल्प संचालक म्हणून महाराष्ट्रात नेशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड जागृती स्कूल फॉर ब्लाइंड गर्ल्समध्ये काम केले. मागील 22 वर्षांपासून दृष्टिबाधित मुलींना अद्ययावत शिक्षण सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नरत आहेत.
दृष्टिबाधित (महिला) श्रेणीतील रोल मॉडेल चा राष्ट्रीय पुरस्कार बांद्रा (ईस्ट) ,मुंबई येथे राहणाऱ्या नेहा नलिन पावस्कर यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्या वयाच्या 8 व्या वर्षापासून 100 टक्के दृष्टिबाधित आहेत. त्यांनी समाजशास्त्र याविषयात बीएची पदवी घेतली आहे. त्या टेलिफोन ऑपरेटर म्हणून शासकीय सेवेत आहेत. त्या खेळाडू आहेत. त्यांना शॉटपुट, डिस्कस थ्रो, वैली क्रॉसिंग आणि रैपलिंग इवेंट सारख्या खेळांमध्ये भाग घेतला आहे. यासह साहसी खेळांमध्येही त्यांची आवड आहे. त्यांनी काकीनाडा येथे 8 मिनीट 30 सेंकदात 1200 फीट टायरोलिन ट्रैवर्सला पूर्ण केले आहे. वर्ष 2017 मध्ये भारत-नेपाळ एमेच्योर अंतराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग घेतला आहे.
दृष्टीबाधित (पुरूष) श्रेणीतील रोल मॉडेल चा राष्ट्रीय पुरस्कार नागपूरचे राजेश असुदानी यांना मिळालेला आहे. श्री असुदानी जन्म: 100 टक्के दृष्टिबाधित आहेत. त्यांनी इंग्रजी साहित्यितात एम.ए. , एलएलएम, एमएससी (एप्लाइड साइकोलॉजी) याविषयात केले आहे.ते कवी, लेखक, सामाजिक कार्यकर्ताही आहेत. श्री असुदानी यांनी एलएलबी आणि एमएध्ये 19 सुवर्ण पदक पटकावले आहेत. त्यांनी इंग्रजी, विधी, आणि मनोविज्ञान विषयात नेट केलेले आहे. श्री अुसदानी यांची हिंदी आणि उर्दूत अधूरा आसमान एन एंथोलॉजी ऑफ गजल हा कवितासंग्रह आहे. वर्जिन वर्सेज या कविता संग्रहाचा अनुवाद हरी दिलगिरी या शिर्षकाखाली केला आहे. ते भारतीय रिजर्व बँकेत सहायक महाप्रबंधक या पदावर कार्यरत आहेत. दृष्टिबाधित बँक कर्मचारी कल्याण संघाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. केम्ब्रिज विद्यापीठाव्दारे प्रकाशित 20व्या शतकातील 5000 नेतांच्या यादीत श्री राजेश असुदानी यांचेही नाव आहे.
श्रवणबाधित (पुरूष) श्रेणीतील रोल मॉडेल चा राष्ट्रीय पुरस्कार औरंगाबादच्या सागर राजीव बडवे यांना प्रदान करण्यात आला आहे. ते 100 टक्के श्रवण बाधित आहेत. त्यांनी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण येथुन जलतरणमध्ये बीसीए, बीपीएड, एनआईएस डिप्लोमा घेतलेला आहे. त्यांनी सलग तीन वेळा 2005, 2009 आणि 2013 मध्ये डेफलिम्पिक्समध्ये भाग घेतला आहे. विविध राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेत त्यांनी 80 पदके मिळविली आहेत. त्यांनी दोन आंतरराष्ट्रीय जलतरण मीट (स्पेन ते मोरक्कोपर्यंत आणि जिब्राल्टर स्ट्रेट ते ज्यूरिख लेक प्रतिस्पर्धा स्विझर्लंन्ड)मध्ये भाग घेतला आहे. क्रिडा क्षेत्रासह त्यांना कलेचीही आवड आहे. हैद्राबाद आणि मुंबईमध्ये झालेल्या कला प्रदर्शनात कलाकार म्हणून त्यांनी भाग घेतलेला आहे. महाराष्ट्र शासनाने वर्ष 2019 मध्ये शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने श्री बडवे यांना सन्मानित केलेले आहे.
बौध्दिक दिव्यांगता (पुरूष) श्रेणीतील रोल मॉडेल चा राष्ट्रीय पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमधील प्रथमेश यशवंत दाते यांना प्रदान करण्यात आला आहे. श्री दाते जन्म: 50 टक्के बौध्दिक व्यंगताने ग्रसित आहेत. 9 वी पास करून श्री दाते मागील 10 वर्षांपासून लाइब्रेरी अटेंडेंट म्हणून पूर्णकालीन कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. यापुर्वी वर्ष 2010 मध्ये कुशल कर्मचारी या श्रेणीतील राष्ट्रीय पुरस्कार प्रदान झालेला आहे. प्रथमेश वर ‘टेल ऑफ ए हाफ चिक’ हा सिनेमाही बनलेला आहे. वर्ष 2015 मध्ये जागतिक वर्ल्ड डाउन सिंड्रोम कॉग्रेस मध्ये ‘सेल्फ एडवोकेसी’ या विषयावर वक्ता म्हणून बोलविण्यात आले होते. यासह ‘राइजिंग द बार’ या लघुपटात त्यांनी काम केले आहे. या लघुपटाने वर्ष 2016 च्या हॉलीवुड इंटरनेशनल इंडिपेंडेंट डॉक्यूमेंट्री अवार्ड रिकग्निशन जिंकले होते. प्रथमेशच्या जीवनावर आधारित ‘कथा घाडकेनी हटेंची ’ पुस्तक प्रकाशित झालेली आहे. या पुस्तकाचे दोन भाषेत अनुवाद ही झालेली आहे.
बौध्दिक दिव्यांगता (महिला) श्रेणीतील रोल मॉडेल चा राष्ट्रीय पुरस्कार मुळची महाराष्ट्रातील सध्या दिल्लीत वास्तव्यास असणारी देवांशी जोशी यांना प्रदान करण्यात आला आहे. 50 टक्के बौध्दिक दिव्यांगता आहे. मागील आठ वर्षापासून देवांशी पुर्णकालीन कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. वर्ष 2018 मध्ये कुशल कर्मचारी श्रेणीतील उत्कृष्ट कर्मचारीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. वर्ष 2020 मध्ये संयुक्त राष्ट्र जिनेवामध्ये एशिया पैसिफिक डाउन सिंड्रोम फेडरेशनमध्ये प्रतिनिधित्व करणारी एक अतिथी वक्ता होती. सुगम्य आणि समावेशी निवडणुक अभियानात वर्ष 2020 मध्ये निवडणूक आयोगाने तयार केलेल्य जाहीरातीचा देवांशी महत्वाचा भाग बनली होती.
सर्वोत्कृष्ट दिव्यांग क्रीडा खेळाडू (महिला) या श्रेणीमध्ये वैष्णवी विनायक सुतार यांना सन्मानित करण्यात आले. 65 टक्के चलन अक्षमता(पेशीय पक्षाघात) असूनही त्या टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात उत्कृष्टपणे खेळतात. मागील तीन वर्षात त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धेत दोन-दोन पदके जिकंली आहेत. श्रीमती वैष्णवी यांची आशियाई रैकिंगमध्ये 4 क्रमांक लागतो. तर जागतिक क्रमवारीत 17 वा क्रमांक लागतो. महाराष्ट्र शासनाने त्यांना पैरा टेबल टेनिस मध्ये शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.
दिव्यांगांच्या सुगम्यतेसाठी नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाला राष्ट्रीय पुरस्कार
दिव्यांगांच्या सुगम्यतेसाठी नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाला आज राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार विभागाचे अभियंता सिध्दार्थ तांबे यांनी स्वीकारला. सुगम्य योजनेतंर्गत नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाने 25 सार्वजनिक ठिकाणी अपंगस्नेही सुविधा निर्माण केल्या. यामध्ये शासकीय कार्यालयासह, सार्वजनिक ठिकाणांचाही समावेश आहे. आदिवासी मुलांचे वसतीगृह, शासकीय विश्रामगृह, फाळके स्मारक, बिटको रूग्णालय, जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालय, आरटीओ कार्यालय, मुला-मुलींचे बालसुधारगृह, सामाजिक न्याय भवन शासकीय आयटीआय, जिल्हा क्रीडा संकुल आदिंचा समावेश आहे.
मोहन जोशी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
पुणे : सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शहर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष रमेश बागवे यांना मोहन जोशी यांचा सत्कार करीत अभिष्टचिंतन केले. यावेळी नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. शहराच्या विविध भागात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम राबवले. गरजूना मदत, अन्नधान्याचे वाटप, वैद्यकीय साहित्याचे वाटप, आरोग्य तपासणी, बाळमेळावे, खाऊ वाटप, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, मित्र परिवार आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
आगामी काळात पाकिस्तानचे विभाजन अटळ- निवृत्त लेफ्टनंट जनरल शेकटकर
पुणे : जगातील दहशतावादाचा वाढता धोका कमी करण्यासाठी सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा धोका कमी करायचा असेल तर दहशतवाद्यांचे केंद्र असणार्या पाकिस्तानला सामरिक हद्दीपासून तोडणे यावर पाश्चिमात्य देशांतही चर्चा आणि काम सुरू आहे. पाकिस्तानचे सिंध आणि बलुचिस्तान यांच्या अंतर्गत संघर्षामुळेच हे भाग वेगळे होतील. त्यामुळे येत्या काही वर्षांत पाकिस्तानचे पुन्हा विभाजन होणे अटळ आहे, असे मत लेफ्टनंट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर (निवृत्त) यांनी आज येथे व्यक्त केले. पुणे मनपा कॉँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी भारतरत्न पं. भीमसेन जोशी कलादालन येथे ते बोलत होते.
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयाला यंदा पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून 3 ते 16 डिसेंबर 2021 अशा ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज शुभारंभाचा कार्यक्रम पुणे महानगरपालिकेच्या सहभागातून संपन्न झाला. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पोलिस जॉइंट कमिशनर डॉ. रवींद्र शिसवे, पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, नरेंद्रपालसिंग बक्षी, नगरसेवक दत्ता बहिरट, रफिक शेख, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, माजी महापौर रजनी त्रिभुवन, शहर काँग्रेसचे सरचिटणीस वीरेंद्र किराड,सौ. जयश्री बागुल, अमित बागुल यांसह अनेक मान्यवर व नागरिक या वेळी उपस्थित होते.
1965 आणि 1971 च्या युद्धात सहभागी टी-55 या प्रदर्शनीय रणगाड्याचे लोकार्पण लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर (निवृत्त) यांच्या हस्ते आज सकाळी वसंतराव बागुल उद्यान येथे झाले. यावेळी उपस्थितांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या उत्स्फूर्त घोषणा देऊन सारा परिसर दणाणून सोडला. सैन्यदलाने पुणे महानगरपालिकेस भेट म्हणून दिलेला हा रणगाडा नागरिकांना बघण्यासाठी खुला असणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यानंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशी कलादालन येथे नव्याने बसविण्यात आलेल्या 27 एलईडी स्क्रीनच्या डिजिटल लायब्ररीचे आणि 1971 च्या युद्धातील एकशे एक छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन लेफ्ट. जन. डी. बी. शेकटकर (निवृत्त), मनपा आयुक्त विक्रमकुमार आणि पोलिस जॉइंट कमिशनर डॉ. शिसवे यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रदर्शनातील छायाचित्रे बघताना लेफ्ट. जन. शेकटकर (निवृत्त) यांनी 1971 च्या युद्धातील अनेक प्रसंगांचे रोमहर्षक वर्णन उपस्थितांना केले.
1971 चा पाकिस्तानवरील विजय हा अभूतपूर्व असून, दुसर्या महायुद्धानंतर एकाच देशातील 93 हजार सैनिकांनी त्यांच्याच भूमीवर शरणागती पत्करणे ही जगातील एकमेव घटना आहे असे सांगून लेफ्ट. जन. शेकटकर (निवृत्त) म्हणाले की, 3 डिसेंबर 1971 या दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधी कोलकात्यामध्ये एका समारंभात होत्या. तिथे त्यांना सायंकाळी पाच वाजता पाकिस्तानने काही भारतीय हवाईतळांवर हल्ले केल्याची माहिती देण्यात आली. तेथून त्या ताबडतोब दिल्लीला परतल्या आणि लगेच युद्धाची घोषणा केली. 13 डिसेंबर या दिवशी युद्ध आपण जिंकणार हे जवळपास निश्चित झाले होते. त्यावेळी मेजर निर्भय शर्मा हे पत्र घेऊन पूर्व पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल नियाझींना भेटायला गेले. त्या पत्रात ‘देशवासीयांना वाचविण्यासाठी शरणागती पत्करण्यास सांगण्यात आले होते. यावेळी जनरल नियाझींनी ‘रावळपिंडी और लाहोर में बैठनेवाले अधिकारियों ने हमें मरवा दिया’ अशा शब्दांत त्यांना शिव्या घातल्याची आठवण त्यांनी सांगितली.
जगातल्या 58 देशांना आजही भारताची प्रगती बघवत नाही असे सांगून ते म्हणाले की, यूएई, दुबईसारख्या ठिकाणी मंदिरे बनली, जगात ‘योग डे’ म्हणून योगा सुरू झाला. अशा अशक्य वाटणार्या घटना घडत आहेत. भारता हा राष्ट्रशक्ती म्हणून उभा राहात आहे. त्यामुळे नव्या पिढीने ‘अगर है हमें प्यार तो हरदम कहना चाहिए । मैं रहूँ या ना रहूँ भारत देश रहना चाहिए । शत्रू सीमा में रहना सीख ले । भारत अमर है यह सत्य भी सीख ले।’ अशा शब्दांत त्यांनी युवाशक्तीने देशाप्रती व लष्कराप्रती सदैव आदरभाव ठेवण्यासाठी केलेला हा कार्यक्रम सदैव प्रेरणादायी ठरेल असे गौरवद्गार आबा बागुल यांच्याबद्दल शेकटकर यांनी काढले.
ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार म्हणाले, ‘त्यावेळचे लष्करप्रमुख जनरल सॅम माणेकशॉ यांनी युद्ध एक महिना उशिरा सुरू करण्याचा सल्ला पंतप्रधान इंदिराजींना दिला. त्यांनी तो सल्ला मानला आणि योग्य व्यक्तीचा सल्ला आपण मानत असल्याचे दाखवले.’ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे प्रमुख जनरल जगन्नाथराव भोसले या सैन्यातील शहानवाझ खान, हबीबुल्ला यांचा नंतर पं. नेहरू यांनी सन्मान केला आहे. जनरल भोसले यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे देशाचे प्रमुख करून केंद्रीय मंत्रिपदाचा दर्जा दिला. इंदिरा गांधी यांच्यासारख्या कणखर नेतृत्वाने अवघ्या तेरा दिवसांत पाकिस्तानचे दोन तुकडे केले व जगाचा इतिहास, भूगोल बदलला. अशी भारताची ही एकमेव कणखर महिला पंतप्रधान होती, असे गौरवद्गार उल्हास पवार यांनी काढले. त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींचे नेतृत्व आणि भारतीय लष्कराचे कर्तृत्व याबद्दल सारा देश सदैव ऋणी आहे’ असे सांगितले. तसेच असा स्तुत्य द्विसप्ताह आयोजित केल्याबद्दल आबा बागुल व पुणे महानगरपालिका यांचे अभिनंदन केले.
प्रारंभी या द्विसप्ताह संकल्पनेचे जनक आबा बागुल म्हणाले की, ‘भारत जगातल्या कोणत्याही मोठ्या शक्तीपुढे झुकत नाही हे 1971 च्या युद्धाच्या वेळी पंतप्रधान इंदिराजींनी जगाला दाखवले’. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्यसैनिक आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणारे सैनिक यांची चिरंतन स्मृती नव्या पिढीसमोर राहावी म्हणून या ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगून आबा बागुल पुढे म्हणाले की, भारत हा शांतताप्रिय देश आहे. मात्र, त्याच्यावर कुणी हल्ला केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास भारत समर्थ आहे. पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. आता पुढील पिढीने दहशतवादाचे केंद्र बनलेल्या उरल्यासुरल्या पाकिस्तानचे चार तुकडे करावेत असे आबा बागुल म्हणाले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. या संपूर्ण द्विसप्ताहासाठी लष्करासोबत समन्वय साधणारे नरेंद्रपालसिंग बक्षी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी 100 फूट बाय 20 फूट पाण्याच्या पडद्यावर दाखवल्या जाणार्या व 16 डिसेंबर रोजी समारोप प्रसंगी उद्घाटन होणार्या 20 मिनिटांच्या थ्रीडी लेझर चित्रफितीचा तीन मिनिटांचा टीझर दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाार्या व ऑर्डनन्स ऑफिसर म्हणून नुकतेच निवृत्त झालेल्या घनश्याम सावंत यांचा विशेष सत्कार यावेळी लेफ्ट. जन. शेकटकर (निवृत्त) यांच्या हस्ते करण्यात आला. आभार प्रदर्शन वीरेंद्र किराड यांनी केले. सामूहिक राष्ट्रगीतानंतर कार्यक्रम संपला. प्रदर्शनीय रणगाडा व फोटो प्रदर्शन बघण्यास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
खावटी योजनेमुळे आदिवासी बांधवांना दिलासा
कोविडसंकट काळात शासनाने खावटी अनुदान योजना सुरू केल्याने आदिवासी बांधवांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील सुमारे १२ हजार नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
आदिवासी विकास विभागाची खावटी कर्ज योजना सन २०१३ नंतर बंद झाली होती. या योजनेऐवजी कोरोना कालावधीसाठी ‘खावटी अनुदान योजना’ सुरू करण्यात आली. या योजनेत लाभार्थी आदिवासी कुटूंबाना प्रति कुटूंब एकूण २ हजार रुपयांचा लाभ देण्यात आला. त्यापैकी २ हजार रुपये पात्र लाभार्थी कुटूंबाना बँक खात्यात ‘थेट लाभ हस्तांतरण’ (डीबीटी) माध्यमातून देण्यात येत आहेत. उर्वरित रु. २ हजार किंमतीच्या किराणा वस्तू देण्यात येत आहेत. यामध्ये १८ किलो धान्य आणि १ लिटर शेंगदाणा तेलाचा समावेश आहे.
शासन निर्णयानुसार मनरेगावर एक दिवस कार्यरत असलेले आदिवासी मजूर, आदिम जमातीची सर्व कुटुंबे, पारधी जमातीची सर्व कुटुंबे, परितक्याए , घटस्फोटीत महिला, विधवा, भूमिहीन शेतमजूर, अपंग व्यक्ती असलेले कुटुंब, अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब आणि वैयक्तिक वनहक्क प्राप्त झालेली वनहक्कधारक कुटुंबांचा खावटी अनुदानासाठी समावेश करण्यात आला आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव अंतर्गत २३ आश्रमशाळा, ९ अनुदानीत आश्रमशाळा आणि २४ शासकीय वसतीगृहातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तत्कालीन प्रकल्प अधिकारी…….. पंढूरे आणि विद्यमान प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रमपूर्वक सर्वेक्षण आणि नियोजन करून लाभार्थ्याच्या घरापर्यंत अन्नधान्य कीट पोहोचविले. त्यासाठी स्वतंत्र खावटी कक्ष तयार करण्यात आला होता. मोहिम स्तरावर हे काम करण्यात आल्याने लाभार्थ्यांना तात्काळ मदत देणे शक्य झाले.
सहाय्यक प्रकल्प अधिकारी नवनाथ भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यात येऊन जिल्ह्यातील ११ हजार ९९५ लाभार्थ्यांना खावटी कीटचे वाटप करण्यात आले. यात आंबेगावमधील २३५९, बारामती १३६, भोर २३०, दौंड ११८, हवेली ५४९, इंदापूर १८०, जुन्नर ३३९१, खेड १९१०, मावळ ११८७, मुळशी ६८७, पुणे शहर ४९, पुरंदर ८४, शिरूर ९५३ आणि वेल्हे तालुक्यातील १६२ लाभार्थ्यांचा समावेश आहे. तर ११ हजार ९१८ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर २ हजार रुपयांप्रमाणे २ कोटी ३८ लाख ३६ हजार रुपये डीबीटीद्वारे जमा करण्यात आले आहेत.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अरुणा घोडेकर, सुरेश दुरगुडे, विष्णू साखरे, विपुल टकले, विजया बोऱ्हाडे व अनिता करंजकर यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
कोविड संकट काळात अनेक कुटुंबांसमोर रोजगार गेल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना आदिवासी बांधवांना खावटी अनुदानामुळे संकटातून सावरण्यास मदत झाली आहे. संकटकाळात मिळालेली मदत त्यांच्यासाठी महत्वाची ठरली आहे.
-जिल्हा माहिती अधिकारी पुणे
सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहांतर्गत रविवारपासून फुटबॉल स्पर्धा
पुणे : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार सोनिया गांधी व काँग्रेस नेते माजी आमदार मोहन जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहांतर्गत ही फुटबॉल स्पर्धा ५ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२१ या कालावधीत होणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव प्रदीप परदेशी यांनी दिली.
प्रदीप परदेशी म्हणाले, “पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेशी संलग्नित ३२ संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. वानवडी येथील मथुरावाला फुटबॉल स्टेडियमवर हे सामने खेळवले जातील. या फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (दि. ५) राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, शहराध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते होणार आहे. १२ डिसेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाणार असून, विजेत्या व उपविजेत्या संघाला पारितोषिक देण्यात येणार आहे.”
आर्यन पंप्स आशियाई ज्युनियर(कुमार) टेनिस अजिंक्यपद स्पर्धेस 6 डिसेंबर पासून प्रारंभ
पुणे, 3 डिसेंबर 2021: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आशियाई स्पर्धा मालिकेतील 18 वर्षांखालील गटातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या आर्यन पंप्स आशियाई ज्युनियर(कुमार) टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आशियातील B1प्रकारातील ही एकमेव स्पर्धा असून येत्या 5ते 12 डिसेंबर या कालावधीत डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर होणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना आर्यन पंप्सचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक आणि एमएसएलटीएचे उपाध्यक्ष प्रशांत सुतार, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे यांनी सांगितले की. पुण्यात ही स्पर्धा तब्बल चार वर्षानंतर होत असून भारताला व महाराष्ट्राला अनेक अन्य देशांकडून तीव्र चुरस मिळत असतानाही आम्हाला ही स्पर्धा आयोजित करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही आशियाई टेनिस संघटनेचे आभारी आहोत.
अय्यर पुढे म्हणाले की, तसेच, सुमारे 25लाख रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या या स्पर्धेला प्रायोजकत्व दिल्याबद्दल आम्ही प्रशांत सुतार आणि आर्यन पंप्स यांचे विशेष आभारी आहोत
आर्यन पंप्सचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक, एमएसएलटीएचे उपाध्यक्ष प्रशांत सुतार म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी सातत्याने जोडलेले राहणे हे आर्यन पंप्स या ब्रँडच्या तत्वज्ञानाचे मूलभूत स्वरूप आहे. मी स्वतः टेनिस खेळाडू असल्यामुळे आणि एका छोट्या गावातुन आलो असल्याने उदयोन्मुख खेळाडूंना योग्यवेळी संधी देण्याचे महत्व तसेच, भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी घरच्या मैदानावर स्पर्धा करण्याची संधी दिल्यास त्यांचा खेळाचा दर्जा उंचावेल हे जाणून घेऊन टेनिसच्या माध्यमातून युवा खेळाडूंचा विकास करण्याचा मार्ग आम्ही निवडला आहे.
सुतार पुढे म्हणाले की, आशियातील व भारतातील गुणवान युवा खेळाडूंना जागतिक दर्जाच्या खेळाडूंशी लढण्याची संधी देणाऱ्या या स्पर्धेला पाठिंबा देताना आम्हाला खरोखरच आनंद होत असून ही स्पर्धा आशियातील सर्वाधिक प्रतिष्ठेची ठरेल. या स्पर्धेला पाठिंबा दिल्यामुळे टेनिसच्या माध्यमातून देशभरातील टेनिसपटूंना पाठिंबा देण्याचे आणि टेनिस चा विकास करण्याचे लक्ष्य आर्यन पंप्सने बाळगले आहे.
या स्पर्धेसाठी संपूर्ण आशियातील भारतासह, थायलंड, तैवान, जपान, दक्षिण कोरिया,फिलिपिन्स, हॉंगकॉंग, मलेशिया, चीन, श्रीलंका व इराण अशा 11 देशांमधील खेळाडू सहभागी झाले आहेत. केवळ आशियाई खेळाडूंसाठी खुली असलेली ही स्पर्धा ज्युनिअर ग्रँडस्लॅम स्पर्धांनंतर कुमार खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेली जगातीळ दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्पर्धा आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिस्पर्ध्यांशी खेळण्याच्या अनुभवाबरोबरच बहुमोल आयटीएफ गुणांचीकमाई करण्याची आणि त्या आधारे आंतरराष्ट्रीय मानांकनात सुधारणा करण्याची संधी भारतीय खेळाडूंना मिळणार आहे, असे सांगून अय्यर पुढे म्हणाले की, या आशियाई स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला पुढच्या वर्षी च्या कोणत्याही ज्युनिअर ग्रँडस्लॅम स्पर्धेत थेट प्रवेश करण्याची संधी मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना(आयटीएफ), आशियाई टेनिस संघटना(एटीएफ), अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए) आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांनी संयुक्त पणे आयोजित केलेल्या या स्पर्धतील एकेरीत आणि दुहेरीत मिळून मुले व मुलींच्या गटात 90 हुन अधिक भारतीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. प्रत्येक गटात मुख्य ड्रॉ32 खेळाडूंचा असून त्यामध्ये आयटीएफ मानांकनानुसार 22 अव्वल मानांकित खेळाडूंना मुख्य ड्रॉमध्ये थेट प्रवेश देण्यात येणार असून उर्वरित खेळाडू पात्रता फेरी आणि वाईल्ड कार्ड द्वारे मुख्य डॉमध्ये प्रवेश करू शकणार आहेत.यंदाच्या मुख्य ड्रॉमध्ये 28भारतीय खेळाडूंनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. तसेच, स्पर्धेतील विजेत्यांना गुण मिळणार आहेत. स्पर्धेत मुलांच्या गटात पर्व नागे, स्कंधा राव, पुण्याचा आर्यन सुतार, जैष्णव शिंदे यांना, तर मुलींच्या गटात परी चव्हाण, प्रियांशी पाणिग्रही, कोतिष्ठा मोडक यांना वाईल्ड कार्डद्वारे थेट मुख्य फेरीत प्रवेश देण्यात आला आहे.
कझाकस्तानची सेंदुगेस केंझीबायव्हा, आरझून सगेनडिकोव्हा, इराणच्या साफी मेशकातोलजहरा, जपानच्या सारा साईतो, दक्षिण कोरियाचा वोबीन शिन, थायलंडचा तानपात निरुद्रोण यासंह अव्वल भारतीय खेळाडूंमध्ये निशांत दबस, अमन दहिया यांसारखे मानांकित खेळाडू झुंजणार आहेत. याआधी या स्पर्धेतील आशियाई ज्युनियर विजेत्यांमध्ये निरुपमा मंकड, संदीप किर्तने, ईशा लखानी, ऋतुजा भोसले, मिहिका यादव, सिद्धांत बांठिया या महाराष्ट्रातील माजी खेळाडूंचा समावेश आहे.
आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री लीना नागेशकर यांची या स्पर्धेसाठी आयटीएफ स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. आयटीएफच्या जागतिक ज्युनिअर स्पर्धा मालिकेत140 देशांमधील 650 स्पर्धांचा समावेश असतो. या स्पर्धांअंमध्ये एकूण 6 स्तरांवरील स्पर्धांचा समावेश असतो त्यामध्ये जेए(ज्युनिअर ग्रँडस्लॅम दर्जा), यापासून जे1,जे2,जे3, जे4 आणि जे5(सर्वात कमी दर्जाची स्पर्धा) अशी या स्पर्धांची क्रमवारी असते. आयटीएफ जागतिक स्पर्धा मालिकांमुळे कुमार गटातील खेळाडूंना विविध आंतरराष्ट
वीजबिलांचा नियमित भरणा हे ग्राहकांचे आद्यकर्तव्यच
मुंबई, दि. ०३ डिसेंबर २०२१: वीजबिल म्हणजे नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा ठराविक किंवा निश्चित केलेला शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर नाही. वीजबिल म्हणजे ग्राहकांनी प्रत्यक्षात वापरलेल्या विजेचे शुल्कच आहे. वीजजोडणी घेतलीच नाही तर वीजबिल किंवा विजेचे शुल्क भरण्याचा प्रश्नच नाही. तसेच वीजजोडणी घेतल्यानंतरही विजेचा वापर केला नाही तर केवळ स्थिर आकाराशिवाय एकही जादा पैसा भरावा लागत नाही. त्यामुळे अत्यावश्यक असलेल्या विजेचा वापर आपणाकडून होत असताना त्यापोटी आलेले विजेचे शुल्क म्हणजेच वीजबिल आहे व ते दरमहा नियमित भरणे हे ग्राहकांचे कर्तव्य आहे.
ना नफा, ना तोटा (रेव्हेन्यू न्यूट्रल) तत्वाने वीजसेवा देणाऱ्या महावितरणवर एक ग्राहक म्हणून वीजखरेदी, पारेषण खर्च तसेच विविध कर्ज व त्याच्या हप्त्यांचे सद्यस्थितीत करोडो रूपयांचे दायित्व आहे. दुसरीकडे महावितरणच्या वीजग्राहकांकडे तब्बल ७१ हजार ५७८ कोटी रुपयांच्या थकबाकीचा मोठा डोंगर आहे. या गंभीर आर्थिक संकटामुळे महावितरणच्या अस्तित्वाचा सध्या बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे. घरगुती, उद्योग, शेती, व्यवसाय, सार्वजनिक सेवा आदींसाठी वापरलेल्या विजेसाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे महावितरणकडून बिलांची आकारणी केली जाते. या दराप्रमाणे महावितरणकडून बिलांची आकारणी केली जाते व ग्राहकांकडून वापरलेल्या विजेनुसार बिलांचा भरणा केला जातो. मात्र यापूर्वी कधी नव्हे अशी प्रचंड वीजबिलांची थकबाकी व विविध देणींच्या दायित्वाचे आर्थिक ओझे असल्याने सद्यस्थितीत बिलांच्या थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे.
आजच्या घडीस वीज ही एक मूलभूत गरज झालेली आहे. अन्न, वस्त्र व निवारा किंबहूना त्यापेक्षाही महत्वाची गरज झालेली आहे. विजेशिवाय जगणे हा विचारच आजमितीस आपण करु शकत नाही. घरातील टीव्ही, फ्रिज, मोबाईल, मुलांचे ऑनलाईन शिक्षण, नोकरदारांचे ऑनलाईन काम, घरातील उपकरणे इत्यादी प्रामुख्याने विजेवरच अवलंबून आहेत. ग्राहकांना या सर्व गोष्टी हव्या आहेत व त्यासाठी लागणारी वीजसुध्दा हवी आहे. परंतु आलेले वीजबिल नियमितपणे भरणे हे मात्र ग्राहकांकडून होताना सकृतदर्शनी दिसून येत नाही. आज ग्राहकांचे स्वारस्य व खर्च हा प्रामुख्याने भौतिक वस्तुंच्या खरेदी, मोबाईल, डिश टी.व्ही., विजेवरील उपकरणे इत्यादी गोष्टींवर मोठ्या प्रमाणावर होत आहे. शिवाय आयकर, मालमत्ता कर व इतर ग्राहकोपयोगी आवश्यक खर्चसुध्दा ठराविक वेळेत केला जातो. मात्र दुर्दैवाची बाब अशी आहे की अतिशय मुलभूत गरज असलेल्या विजेचे बील भरण्यास ग्राहकांकडून फारसे प्राधान्य दिले जात नाही.
दैनंदिन जीवन संपूर्णपणे विजेवर अवलंबून असल्याने वीजबिलांचा भरणा करणे आवश्यक आहे. सध्या महावितरणच्या आर्थिक स्थितीचा गांभिर्याने विचार करून थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करून वीजग्राहकांनी सहकार्य करावे. तसेच शेतकऱ्यांना कृषीपंपांच्या वीजबिलांमधून संपूर्ण थकबाकीमुक्त होण्यासाठी मूळ थकबाकीमधील रकमेत सुमारे ६६ टक्के सवलत देण्याची ऐतिहासिक योजना महावितरणने राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणली आहे. त्याचाही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
वीजसेवा देणारी महावितरण कंपनी ही स्वतः एक ग्राहक आहे. महावितरणकडून महानिर्मिती तसेच इतर खासगी वीजकंपन्यांकडून वीज खरेदी केली जाते. ही वीज उपकेंद्रांपर्यंत आणण्यासाठी महापारेषणला वहन आकार द्यावा लागतो. या सर्वांचे पैसे वीजग्राहकांनी भरलेल्या वीजबिलांच्या रकमेतून दिले जातात. त्याचप्रमाणे वसुल केलेल्या वीजबिलांमधील सुमारे ८० ते ८५ टक्के रक्कम ही वीजखरेदी, पारेषण खर्च आदींवर खर्च होते. त्यानंतर नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचे वेतन, कार्यालयीन खर्च, विविध कर, दैनंदिन देखभाल व दुरुस्तीचे कामे आणि व्याजासह कर्जांचे हप्ते अशा दरमहा देणी द्यावी लागतात. वसुलीमध्ये दरमहा येणाऱ्या तुटीमुळे थकबाकी मात्र वाढत आहे. परिणामी वसुली आणि खर्च यामध्ये ताळमेळ बसविण्यासाठी राष्ट्रीय बँका व वित्तीय संस्थांकडून लघु व दीर्घ मुदतीचे कर्ज घ्यावे लागत आहे. वीजग्राहकांनी थकविलेल्या वीजबिलांमुळे अत्यंत गंभीर आर्थिक संकटात असताना देखील महावितरणने कोणत्याही भागात विजेचे भारनियमन केले नाही हे उल्लेखनीय.
महावितरणची आर्थिक घडी विस्कटल्याने व अन्य कोणताही पर्याय नसल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला संपूर्ण राज्यभरात सध्या वेग देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांनी थकबाकीचा तत्परतेने भरणा करावा तसेच चालू वीजबिल नियमित भरावे. ग्राहकांच्या या सहकार्याच्या बळावरच महावितरणला अभूतपूर्व आर्थिक संकटातून उभारी घेणे शक्य होणार आहे. अन्यथा आपणा सर्वांची असलेली महावितरण कंपनी बंद होण्यास वेळ लागणार नाही.
मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण
“महाराष्ट्राचा फेवरेट कोण’?” सुवर्णदशक सोहळा उद्या
यंदाचा “महाराष्ट्राचा फेवरेट कोण?” हा लोकप्रिय सोहळा ‘सुवर्णदशक सोहळा’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या सोहळयात गेल्या १० वर्षातील दर्जेदार कलाकृतींचा गौरव केला जाणार आहे. ४ डिसेंबरला हा सोहळा रंगणार आहे.
झी टॉकीज आयोजित हा सन्मान सोहळा रसिकांनी दिलेल्या मतांवर अवलंबून असतो.‘झी टॉकीज’ची ही अभिनव संकल्पना मराठी सिनेसृष्टीत चांगलीच नावाजली गेली. यातील विजेत्यांची निवड थेट प्रेक्षकांकडून केली जाते. त्यामुळे या सुवर्णसोहळ्यात प्रेक्षक कोणाला महाविजेता ठरवणार? याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. नुकतीच या सोहळ्यातील पुरस्कारांची नामांकन यादी जाहीर करण्यात आली आहे. “महाराष्ट्राचा फेवरेट कोण?” सुवर्ण दशक सोहळ्यामध्ये १२ श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. यामध्ये फेवरेट चित्रपट, फेवरेट दिग्दर्शक, फेवरेट अभिनेता, फेवरेट अभिनेत्री, फेवरेट सहाय्यक अभिनेता, फेवरेट सहाय्यक अभिनेत्री, फेवरेट खलनायक, फेवरेट गीत, फेवरेट गायक, फेवरेट गायिका आणि फेवरेट पॉप्युलर फेस, फेवरेट स्टाईल आयकॉन असे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या सुवर्णदशक सोहळयाविषयी बोलताना ‘झी’च्या मराठी मुव्ही क्लस्टरचे चीफ चॅनेल ऑफिसर श्री.बवेश जानवलेकर सांगतात, ‘’गेलं दशक हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी अतिशय महत्त्वाचं ठरलं. २०१० ते २०१९ या कालावधीत मराठी चित्रपट उद्योगाने वेगाने प्रगती केली. चित्रपटांची संख्या वाढली, चित्रपट निर्मीतीवरचा खर्च, त्याचबरोबर प्रेक्षकांची तसेच चित्रपटगृहांचीही संख्या वाढली. मराठी चित्रपटांमध्ये तांत्रिकदृष्टया ही कमालीची प्रगती झाली. मराठी चित्रपट खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार गेला. जगभरातल्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिमाखाने झळकू लागला. याच दशकात मराठी चित्रपटाने लोकप्रियतेबरोबरच बॉक्स ऑफिसवरही कोटींची मजल मारत विक्रमी झेप घेतली. आशय-विषय आणि सादरीकरणातील नवनवे मापदंड याच दशकात निर्माण झाले. सर्वार्थाने हे दशक मराठी चित्रपटांसाठी सोनेरी ठरलं. कोरोनामुळे काही काळ घडी विस्कळीत झालेली असली तरी आगामी काळात पुन्हा एकदा आपली मराठी चित्रपटसृष्टी डौलाने घौडदौड़ करेल, यात मला शंका वाटत नाही’’.
यंदाच्या सुवर्णदशक सोहळयातील नामांकनाची यादी पुढील प्रमाणे …..
सर्वोत्कृष्ट चित्रपट
२०१०- (मी शिवाजीराजे भोसले बोलतोय)
२०११-(मी सिंधुताई सपकाळ)
२०१२-(काकस्पर्श )
२०१३-(दुनियादारी)
२०१४-(लय भारी)
२०१५-(डॉ. प्रकाश बाबा आमटे)
२०१६-(सैराट)
२०१७-(फास्टर फेणे)
२०१८-(मुळशी पॅटर्न)
२०१९- (हिरकणी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
२०१०-संतोष मांजरेकर(मी शिवाजीराजे भोसले बोलतोय)
२०११-महेश मांजरेकर (लालबाग परळ )
२०१२-महेश मांजरेकर (काकस्पर्श)
२०१३-संजय जाधव (दुनियादारी)
२०१४-निशिकांत कामत (लय भारी)
२०१५-परेश मोकाशी (एलिझाबेथ एकादशी)
२०१६-नागराज मंजुळे (सैराट)
२०१७-अदित्य सरपोतदार (फास्टर फेणे)
२०१८-प्रवीण तरडे (मुळशी पॅटर्न)
२०१९-संजय जाधव (खारी बिस्कीट)
सर्वोत्कृष्ट अभिनेता
२०१०- सचिन खेडेकर(मी शिवाजीराजे भोसले बोलतोय)
२०११-सचिन खेडेकर(ताऱ्यांचे बेट)
२०१२-सचिन खेडकर(काकस्पर्श)
२०१३-स्वप्निल जोशी (दुनियादारी)
२०१४ –रितेश देशमुख(लय भारी)
२०१५- अंकुश चौधरी (क्लासमेट्स)
२०१६-आकाश ठोसर (सैराट)
२०१७-अमेय वाघ (फास्टर फेणे)
२०१८-सुबोध भावे (पुष्पक विमान)
२०१९-ललित प्रभाकर (आनंदी गोपाळ)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
२०१०- सोनाली कुलकर्णी (नटरंग)
२०११- तेजस्विनी पंडित (मी सिंधुताई सपकाळ)
२०१२- अमृता खानविलकर (झकास)
२०१३- सई ताम्हणकर (दुनियादारी)
२०१४–केतकी माटेगावकर (टाइमपास)
२०१५–मुक्ता बर्वे (डबल सीट)
२०१६- रिंकू राजगुरू (सैराट)
२०१७- सई ताम्हणकर (जाऊंद्याना बाळासाहेब)
२०१८- माधुरी दीक्षित (बकेट लिस्ट)
२०१९- सोनाली कुलकर्णी (हिरकणी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
२०१०-
२०११–सिद्धार्थ जाधव(लालबाग परळ)
२०१२-जितेंद्र जोशी(झकास)
२०१३- अंकुश चौधरी (दुनियादारी)
२०१४- पुष्कर श्रोत्री (रेगे)
२०१५- वैभव मांगले (टाइमपास २)
२०१६- तानाजी गालगुंडे (सैराट)
२०१७- सचिन खेडेकर (मुरांबा)
२०१८- नागराज मंजुळे (नाळ)
२०१९- प्रसाद ओक (हिरकणी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
२०१०-
२०११ –विशाखा सुभेदार (मस्त चाललंय आमचं )
२०१२- सविता मालपेकर(काकस्पर्श)
२०१३- उर्मिला कानिटकर(दुनियादारी)
२०१४-तन्वी आझमी(लय भारी)
२०१५- सई ताम्हणकर (क्लासमेट्स )
२०१६-छाया कदम (सैराट)
२०१७-शिल्पा तुळसकर (बॉइज)
२०१८- मृणाल कुलकर्णी (ये रे ये रे पैसा)
२०१९- मृणाल कुलकर्णी(फत्तेशिकस्त)
सर्वोत्कृष्ट खलनायक
२०१०- सयाजी शिंदे (गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा)
२०११–सचिन खेडेकर (फक्त लढ म्हणा)
२०१२- वैभव मांगले (काकस्पर्श)
२०१३- जितेंद्र जोशी (दुनियादारी)
२०१४-शरद केळकर (लय भारी)
२०१५-
२०१६-सचिन पिळगावकर (कट्यार काळजात घुसली)
२०१७-गिरीश कुलकर्णी (फास्टर फेणे)
२०१८-प्रवीण तरडे (मुळशी पॅटर्न)
२०१९-
सर्वोत्कृष्ट गीत
२०१०- वाजले की बारा (नटरंग )
२०११ –हे भास्करा मी (सिंधुताई सपकाळ )
२०१२- गणाधीश (मोरया )
२०१३- टिक टिक वाजते (दुनियादारी)
२०१४-माउली माउली(लय भारी)
२०१५- किती सांगायचंय (मला डबल सीट)
२०१६- झिंगाट(सैराट)
२०१७-हृदयात वाजे समथिंग(ती सध्या काय करते)
२०१८-जाऊ दे न व (नाळ)
२०१९- तुला जपणार आहे (खारी बिस्कीट)
सर्वोत्कृष्ट गायक
२०१०- अजय गोगावले -खेळ मांडला (नटरंग)
२०११ –सुरेश वाडकर- हे भास्करा (मी सिंधुताई सपकाळ)
२०१२- अवधूत गुप्ते – गणाधीश (मोरया )
२०१३- सोनू निगम – टिक टिक (वाजते दुनियादारी)
२०१४-अजय गोगावले – माउली माउली (लय भारी)
२०१५- जसराज जोशी – किती सांगायचंय मला (डबल सीट)
२०१६- अजय-अतुल-झिंगाट (सैराट)
२०१७-कौस्तुभ गायकवाड आणि जनार्दन खंडाळकर-लग्नाळू(बॉइज)
२०१८-अजय गोगावले- देवाक काळजी(रेडु)
२०१९- आदर्श शिंदे-तुला जपणार आहे (खारी बिस्कीट)
सर्वोत्कृष्ट गायिका
२०१०- बेला शेंडे – वाजले की बारा (नटरंग)
२०११ –बेला शेंडे – आज म्हारे घर पावण(बालगंधर्व )
२०१२- उर्मिला धनगर – वेलकम हो राया वेलकम (देऊळ)
२०१३- सायली पंकज – टिक टिक वाजते (दुनियादारी)
२०१४-केतकी माटेगावकर – मला वेड लागले प्रेमाचे (टाइमपास)
२०१५- आनंदी जोशी – किती सांगायचंय मला (डबल सीट)
२०१६- श्रेया घोषाल – आत्ताच बया का बावरलं (सैराट)
२०१७-आर्या आंबेकर – हृदयात वाजे समथिंग (ती सध्या काय करते)
२०१८-वैशाली सामंत – खंडाळा घाट (ये रे ये रे पैसा)
२०१९- रोंकिनी गुप्ता – तुला जपणार आहे (खारी बिस्कीट)
सर्वोत्कृष्ट पॉप्युलर फेस
सोनाली कुलकर्णी
क्रांती रेडकर
केतकी माटेगावकर
सई ताम्हणकर
अमृता खानविलकर
प्रिया बापट
रिंकू राजगुरू
वैदेही परशुरामी
शिवानी सुर्वे
सर्वोत्कृष्ट स्टाईल आयकॉन
अंकुश चौधरी
अनिकेत विश्वासराव
स्वप्नील जोशी
रितेश देशमुख
आकाश ठोसर
अमेय वाघ
डॉ. सविता केळकर यांना जर्मनीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) पहिल्या महिला आजीव सदस्या, पहिल्या प्रबंधक आणि फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयाच्या जर्मन भाषा विभागाच्या माजी प्रमुख डॉ. सविता केळकर यांना ‘ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी’ हा जर्मनीचा सर्वोच्च मानला जाणारा नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अम्फिथिएटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला जर्मनीचे महा वाणिज्यदूत यूर्ग्रेन मोरहार्ड, दक्षिण आशियाचे भाषा संचालक थोमास ग्योडेल, डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, अर्थशास्त्र आणि राजशिष्टाचार विभागाच्या वरिष्ठ सल्लागार अशुमी श्रॉफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यूर्ग्रेन मोरहार्ड म्हणाले, ‘राजकीय, सामाजिक, मानवशास्त्र अशा काही विशिष्ट क्षेत्रांत विशेष कामगिरी करणार्या नागरिकांना जर्मनीच्या प्रेसिडेंटच्या वतीने हा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. सविता केळकर यांनी विद्यार्थी-शिक्षक आदानप्रदान आणि अभ्यास सहलींच्या तेहतीस कार्यक्रमांतून भारत आणि जर्मनीतील शैक्षणिक आणि सांस्कृतिक संबंध वृध्दिंगत करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. म्हणून त्यांना हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला.’
डॉ. शरद कुंटे, थोमास ग्योडेल यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सविता केळकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. प्राजक्ता प्रधान आणि डॉ. चित्रा दंडवते यांनी सूत्रसंचालन, महेश आठवले यांनी स्वागत आणि प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.
इंग्रजांशी एकहाथी युद्ध पुकारणारे महाराजा ….(लेखक -संजय सोनवणी )
४ मार्च १८०४ रोजी यशवंतरावांनी लेकला लिहिलेल्या पत्रात म्हटले, : “माझा देश आणि माझी संपत्ती माझ्या घोड्याच्या खोगिरावर आहे. ज्याही दिशेला माझ्या पराक्रमी सैनिकांचे घोडे वळतील त्या दिशेचा सर्व देश आम्ही जिंकुन घेवु. जर तुम्ही शहाणे आणि विचारी असाल तर माझे प्रतिनिधी सांगतील त्या महत्वाच्या विषयांचा आधी फडशा पाडाल…” जनरलल लेकला असे सुनावणारा भारतात कोणी भेटला नव्हता. जनरल लेकने २२ मार्च १८०४ रोजी वेलस्लीला पत्र लिहुन यशवंतरावांविरुद्ध युद्ध सुरु करण्याची काकुळतीने परवानगी मागितली. या पत्रात लेक म्हणतो- “जर होळकरला आत्ताच नष्ट केले नाही तर पावसाळ्यानंतर तो कमालीचा उपद्रवी ठरेल. या राक्षसाने मला जेवढे अस्वस्थ केले आहे तसे कधीही कोणी केले नसेल. हा माणुस इंग्रजांचा सर्वात घातक शत्रु आहे यात शंका बाळगु नये. अशा दरोडेखोराचे कौतुक करतांना मला संकोच वाटतो आहे. तो स्वत: माझ्यावर चालुन येणार नाही, असेच दडपण वाढवत राहील…आणि जर मी त्याच्यावर चालुन गेलो तर तो हुलकावन्या देत सरळ आपल्याच प्रदेशांत घुसुन वाटेत आडवे येईल ते उध्वस्त करत पुढे जाईल…”. हे पत्र वाचून गव्हर्नर वेलस्लीने १६ एप्रिल १८०४ रोजी वेलस्लीने यशवंतराव होळकरांविरुद्ध युद्ध घोषित केले आणि जनरल लेकला यशवंतरावांवर शिस्तबद्ध चढाई करण्याची परवानगी दिली. युद्ध सुरु होळकर तयारीत होतेच. ते किंबहुना या क्षणाचीच वाट पहात होते. बुंदेलखंडात कुचजवळ कर्नल फॉसेटचा आठ हजार सैन्याचा तळ होता. युद्ध त्यांनी घोषित केले असले तरी पहिला आघात यशवंतरावच केला. त्यांनी फॉसेटच्या तळावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. आपल्या सोबत अमिरखान व पाच हजार पेंढारी घेवुन त्यांनी फॉसेटच्या तळावर अचानक धाड घातली आणि त्याच्या जवळपास दोन बटालियनची भिषण कत्तल केली. फॉसेट घाबरुन जो पळत सुटला तो बेटवालाच जावुन पोहोचला. त्याच्या अनेक तोफा आणि युद्धसामग्री या युद्धात यशवंतरावांच्या हाती लागली. ही लढाई २२ मे १८०४ रोजी झाली. मुकंद-याचे युद्ध: भर पावसात २५० मैलांचा झंझावाती पाठलाग….मोन्सनच्या सेनेचा पुरता खात्मा… यशवंतरावांचे हे युद्ध आठवले की इंग्रजांना धडकी भरते. युद्धनीतीचा वेगळाच रयोग यशवंतरावांनी या युद्धात केला. मॉन्सनची बलाढ्य फौज जयपुरवरुन यशवंतरावांवर चाल करुन निघाली होती. येतांना त्याने होळकरांचा टोंक-रामपुरा विभाग जिंकुन घेतला. विवक्षीत ठिकाणी त्याच्या व मरेच्या फौजेची गाठ पडणार होती. सर्व फौजा एकत्र येताच होळकरांवर हल्ला करण्याची त्यांची योजना होती. पण ती योजना यशस्वी होवू देतील ते यशवंतराव कसले? यशवंतरावांनी ते एकत्र येण्याआधीच मॉन्सनला तोंड दाखवले, किरकोळ चमक केली आणि सरळ माघार घेतली. मॉन्सनला वाटले, यशवंतराव घाबरले, त्याने यशवंतरावांचा पाठलाग सुरु केला. वाटेत अधुन मधुन यशवंतराव त्याच्याशी किरकोळ चकमक करीत आणि पुन्हा पळत सुटत. मॉन्सनने मुकुंदरा घाटही ओलांडला. यशवंतराव सामोरे न येता त्याला पाठ दाखवत आपल्या प्रदेशातच घुसत राहिले. मॉन्सनला आपण या नादात सापळ्यात अडकत आहोत याचे भानच आले नाही. त्याला वाटले कि यशवंतराव घाबरुन पळत आहेत. मुकुंद-यापासुन ५० मैलावर असलेला हिंगलेशगढही त्याने जिंकुन घेतला. होळकरांनी तेथेही कसलाही प्रतिकार केला नाही. येथे एक वेगळीच गंमत झाली. ज्या दिशेने यशवंतराव चालले होते नेमक्या त्याच दिशेला मरेचा तळ होता. त्यामुळे मरेला वाटले कि यशवंतराव आपल्यावरच चालून येत आहेत. मरे व मॉन्सनमधील दळण-वळण यशवंतरावांनी पार तोडून टाकले होते त्यामुळे मॉन्सन यशवंतरावांच्या पाठीशी आहे हे त्याला समजलेच नाही. मरे अद्याप एकट्याने युद्ध करण्याच्या तयारीत नव्हता. तो अजून माघारी सरकत गेला. या पाठलागाच्या नादात मॉन्सनजवळ आता फार तर दोन दिवस पुरेल एवढा शिधा उरला. त्यात पावसाळा सुरु झाला. चंबळ नदी पुराने दुथडी भरुन वाहू लागली. आता चंबळेकाठी भर पावसात उपाशीपोटी युद्ध करणे किंवा मागे हटणे हेच काय ते पर्याय त्याच्यासमोर उरले. त्याने दुसरा पर्याय निवडला. त्याने नाईलाजाने न लढताच कॅप्टन ल्युकान या अधिका-याजवळ जड सामान देवुन परत वेगाने मुकुंदरा खिंडीकडे माघारी वळायचे मोन्सनने ठरवले. बहिरी ससान्याने संधी मिळताच भक्षावर धाड घालावी तसे मॉन्सन चंबळकाठावरून हलताच यशवंतरावांनी पुर्ण शक्तीनिशी ल्युकानच्या सैन्यावर हल्ला चढवला. हा हल्ला एवढा भिषण होता कि ल्युकानचा एकही सैनिक वा बुणगा वाचला नाही. सर्वांना कापुन काढले गेले. . आता स्थिती बदललली. आता मोन्सन पळत सुटला तर शिका-यासारखे आपल्या घोडदळासह यशवंतराव त्याच्या मागे लागले. यशवंतरावांचे पायदळ व तोफा मागुन येत राहिल्या. हा पाठलाग चालला तो अडिचशे मैल…भर पावसात आणि गालाने भरलेल्या प्रदेशातून. मॉन्सनची गाळण उडाली. तो आग्र्याच्या दिशेनं पळत सुटला. यशवंतराव त्याच्यावर दमादमाने हल्ले करत त्याचे सैन्य कमी करत राहिले. बियास नदीच्या किनारी त्याचे निम्मेअधिक सैन्य कापले गेले. तेहून तो पळत सुटला तर त्याला पुन्हा यशवंतरावांनी कुशलगढजवळ गाठले. तेथे उरलेल्या सैन्यातीत दीड हजार सैनिक मारले गेले. तेथुनही तो पुन्हा जीव वाचवत पळत सुटला. पण आताचे पलायन सोपे नव्हते. मॉन्सनचे सैन्य घाबरले होते. एरवी इंग्रजी कंपू सैन्यात असलेली शिस्त प्रथमच मोडली होती. होळकरांची फौज पाठलाग करता करता गोळीबाराचा भडिमार करत होती. कोठे थांबले कि तोफांचा भडिमार होत होता. त्यात विनाश पाहून अनेक अधिकारी मोन्सनलाही सोडुन पळुन जायला लागले. बुणगे आणि सैन्यात सरमिसळ होवु लागली. गावा-खेड्यातील नागरिकही मोन्सनच्या पळत्या सैन्यावर हल्ले करु लागले. दगडफेक करू लागले. फतेहपुरला मात्र यशवंतराव होळकरांनी मोन्सनवर भिषण आणि अंतिम हल्ला चढवला. मॉन्सनला शरणागती पत्करण्याखेरीज गत्यंतर उरले नाही. अडिच महिना चाललेल्या भर पावसाळ्यातील या प्पाठलागात त्याचे जवळपास १० हजार सैनिक आणि २ ते ३ हजार बुणगे ठार झाले होते. एवढा अवमानस्पद पराभव इंग्रजांचा कधीच झाला नव्हता. पावसाळ्यात मराठी सैन्य सुस्त असते, लष्करी हालचाली करत नाही हा जो काही फाजिल आत्मविश्वासात व गैरसमजात जनरल जेरार्ड लेक होता तो धुळीला मिळाला होता. एखाद्या सावजाला दमादमाने दमवुन मारावे तसे मोन्सनच्या बलशाली सैन्याचे झाले होते. २८ आगस्ट १८०४ रोजी हा महाविजय, तोही इंग्रजांविरुद्ध यशवंतरावांनी मिळवला. मॉन्सन ३० आगस्टला जगल्या-वाचल्या २-३०० सैनिकांसह आग्र्याला पोहोचला… पराभुताच्या स्वागताला कोण येनार? जनरल वेलस्ली या भिषण पराभवाची वार्ता ऐकुन हतबुद्ध झाला होता. यशवंतरावांविरुद्ध केलेली सर्व व्युहरचना अंगलट आली होती. यशवंतरावांनी दळणवळणच तोडले असल्याने लेक किंवा मरे मॉन्सनला कसलीही मदत पोहोचवू शकले नव्हते. जी हानी व्हायची ती झाली होतीच…पण संभाव्य हानी आता कशी टाळायची याचीच विवंचना त्याला जास्त लागुन राहिली होती. त्याने अक्षरश: हादरुन एका पत्रात लिहिले…”You will have heard of Monson’s reverses: I tremble for the political consequences of these events.” (मोन्सनच्या पराभवाचे राजकीय परिणाम काय होतील या विचारानेच मला थरकाप सुटला आहे.) पराभव माहित नसलेल्या इंग्रजी सैन्याचे मनोधैर्य तर खचलेच पण त्याचे पडसाद इंग्लंडमद्धेही उमटले. पहिल्यांदाच या पराभवाने इंग्रजांनी माती खाल्ली. त्यांचा लष्करी माज पुरेपुर उतरला. त्यांची जगज्जेत्या लष्कराची प्रतिष्ठा धुळीला मिळाली. त्यांचे सारे बेत उधळले गेले. या पराभवामुळे आता भारतीय रजवाडे यशवंतरावांच्या बरोबर जाणार अशी शंका त्यांना छळु लागली……
फ्रँकलिन इलेक्ट्रिक कंपनीमध्ये अनंतराव पवार अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची निवड
पुणे-अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल ने आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ८ विद्यार्थ्यांची लॉकडाऊनच्या काळात देखील या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली. फ्रँकलिन इलेक्ट्रिकहि कंपनी इलेक्ट्रिक क्षेत्रात काम करणारी अग्रनामांकित कंपनी आहे. या कंपनीने विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेवून निवड प्रक्रियेतून विद्यार्थ्यांची निवड केली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक चार लाखाचे पॅकेज मिळाले. या कंपनीमुळे मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध झाली. अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी एकापाठोपाठ एक असे अनेक कंपन्याच्या कसोटीला उतरत असल्याने महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांच्या रोजगार वाढीसाठी करण्यात येणारे प्रयत्न दिसून येतात. महाविद्यालयामध्ये औद्योगिक क्षेत्राशी पूरक शैक्षणिक उपक्रम निर्माण करून कंपनीमध्ये कशाप्रकारचे विद्यार्थी हवे असतात याचा सखोल अभ्यास करून मागणी तसा पुरवठा या तत्वा प्रमाणे संबंधित प्रशिक्षण देण्याचे कार्य इनोव्हेशन क्लब च्या माध्यमातून अविरतपणे चालू आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये जापनीज भाषा शिकविण्याचा उपक्रम सुरु होणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. दिगंबर पवार यांचे मार्गदर्शन लाभले. लॉकडाऊनच्या काळात देखील विद्यार्थ्यांची आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या टाटा कन्सलटन्सी ली., विप्रो, कॉगनिझंट, कॅपजेमिनी, फ्रँकलिन इलेक्ट्रिक प्रा.ली.अग्रनामांकित कंपन्यामध्ये निवड होऊ लागल्याने विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले.निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सरचिटणीस मा. सौ. प्रमिला गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे, सर्व विभाग प्रमुख, व प्राध्यापकांनी अभिनंदन केले.
महासाथीतील घरे व कार्यालये – किती बदलले आहे? – अनिल फरांदे, अध्यक्ष – फरांदे स्पेसेस
कोव्हीड १९ महासाथीने भारतीयांच्या जीवनात अनेक बदल घडवून आणले हे किमानपक्षी सर्वांना मान्य व्हावे. टाळेबंदी ही भीतीदायक होती व तिने आपल्या घर आणि कार्यालयाकडे नव्याने बघायला आपल्याला शिकविले. .
एकदा भीतीने ताबा घेतल्यावर बाधा होण्याची भीती हा कोणत्याही कारणासाठी परावर्तक ठरला आहे. कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा पर्याय देऊ करावा लागला आणि भारतीयांनी त्याची सवय करून घ्यायला काहीसा वेळ लावला. .
परंतु या ८ -१० महिन्यांच्या कालावधीत घरून काम करण्याचा पर्याय अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी ठरत असल्याचा आश्चर्यकारक अनुभव भारतातील कंपन्यांना आला. महासाथीचा तीव्र टप्पा सुमारे १८ महिने लांबला आणि सवयी व दृष्टीकोनात सखोल बदल घडवून आणण्यासाठी पुरेसा दीर्घ होता. अनेक भारतीयांना घरून काम करण्याची सवय झाली आणि तेच त्यांना बरे वाटू लागले. .
आणि आता पूर्वीप्रमाणे प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची वेळ येऊन ठेपली असताना काहीसा विरोध असणे स्वाभाविक आहे. आतापर्यंत घर आणि कामाच्या जागेशी असलेल्या भारतीय लोकांच्या नात्यात कमालीचा फरक पडला आहे. आता अनेक कर्मचारी घरून काम करण्यास प्राधान्य देतील. एक तडजोड म्हणून कंपन्यांनी कामाची मिश्र पद्धती – म्हणजेच अंशतः घरून व अंशतः कार्यालयात येऊन काम करण्याच्या पद्धती अवलंबिण्यास सुरवात केली आहे.
गेल्या दोन वर्षातील हा अतिशय महत्वाचा व मोठा बदल झालेला आहे. महासाथीचे आगमन होईपर्यंत भारतीय आपले घर व कार्यालय या दोन्ही वेगवेगळ्या जागा असल्याचे गृहीत धरून जगत होते आणि प्रत्येक ठिकाणची कामे व फायदे वेगवेगळे आहेत असाच दृष्टीकोन होता. परंतु तेच भारतीय कार्यालयाचे घरून काम करण्याची जीवनशैली इतक्या झटपट स्वीकारतील असा अंदाज सुद्धा कोणी केला नसेल. .
घरांनी कार्यालयांची जागा घेतली आहे काय?
सल्लागार व मुक्तपणे काम करणारे सोडले, तर कोव्हीड १९ महासाथीपूर्वी बहुतांशी भारतीय कार्यालयात काम करण्यास प्राधान्य देत असत . यासाठी काही कारणे होती .
कंपन्यांची कार्यालये ही सामाजिकदृष्ट्या दुमदुमणारी , स्वच्छ, सुनियोजित व आपल्यासाठी आवश्यक अशा प्रत्येक बाबतीत सुसज्ज असतात. सर्वसामान्य मध्यमवर्गीय भारतीयांकडे कार्यालयातील काम घरून करण्यासाठी योग्य पद्धतीची उपकरणे उपलब्ध नव्हती. तसेच घरामध्ये अनेक प्रकारच्या घडामोडी घडत असल्यामुळे कार्यालयाच्या कामावर लक्ष केंद्रित करणे अवघड जाते. .
उत्पादकता व प्रेरणा कायम ठेवण्यात कार्यालयांनी नेहमीच महत्वाची भुमिका बजावली आहे. पण गेल्या दोन वर्षात जगभरात लोकांनी आपली घरे ही कार्यालये म्हणून सुद्धा वापरता येतील असे बदल करून घेतले. ज्या सुदैवी लोकांकडे घरातच कार्यालय सुरु करण्यासाठी पुरेशी जागा होती, त्यांना फक्त एखादा लॅपटॉप व इंटरनेट जोडणी व घराच्या अंतरंगात व स्वतःच्या दैनंदिन जीवनशैलीत केलेले बदल पुरेसे होते. .
कर्मचारी घरूनच काम करतात याबाबत कंपन्याच समाधानी असल्याची बाब नक्कीच समाधानकारक आहे . पण गेल्या १८ महिन्यात आपणच आपल्यात अमुलाग्र बदल केले आहेत.
ऑनलाईन खरेदी ते झूम व टीमच्या माध्यमातून शाळा ते डॉक्टरांशी दृक्श्राव्य सल्लामसलतीच्या बाबतीत शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात प्रवास न करता काम आणि व्यक्तिगत जीवनाचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य भारतीयांनी आत्मसात केले.
आता घरे इतकी महत्वाची झाली आहेत की महासाथीच्या ऐन भराच्या कालावधीत सुद्धा घरांच्या किमती कमी झाल्या नाहीत. आपल्या मालकीची व नियंत्रणाखालील जागा असण्याबाबत भारतीयामध्ये जशी अधिकाधिक जागरूकता निर्माण होत गेली, तशी घरांची मागणी वाढत गेली. आपले घर आपण खरेदी केले पाहिजे ही भावना पहिली साथ संपण्यापूर्वी जोर धरत होती आणि तेव्हापासून ती जोरात आहे. .
कोव्हीडच्या पहिल्या साथीत जसजशी कार्यालये बंद होत गेली आणि लोक आपापल्या मूळ गावी परतले, तसे भाड्याचे दर सुरवातीला कमी झाले, परंतु आता आणि विशेषतः आमचे अनेक कर्मचारी आता आठवड्यातील काही दिवस कार्यालयातून काम करणे अपेक्षित असल्याचे मोठ्या कंपन्यांनी घोषित केल्यावर आजघडीला घरांच्या भाड्याचे दर करोना महासाथीच्या पूर्वस्थितीला आले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदर पुन्हा एकदा घरांमध्ये गुंतवणूक करण्याचा व त्यापासून उत्पन्न मिळविण्याचा विचार करू लागले आहेत.
बदल – तात्पुरते की कायमस्वरूपी?
पेपर जायंट या ऑस्ट्रेलिया स्थित संशोधन संस्थेच्या अहवालानुसार, कोव्हीड महासाथीच्या कालावधीत जेव्हा लासी उपलब्ध नव्हत्या, तेव्हा सुमारे ८३ % भारतीय कर्मचारी काम करण्यासाठी कार्यालयात जाण्यास फारसे उत्सुक नव्हते. परंतु लिंक्डइन द्वारे नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात ७२ % भारतीय आता काम करण्यासाठी कार्यालयात जाण्यास उत्सुक असल्याचे आढळून आले आहे.
इस्पोस ही बाजारपेठेचे व सार्वजनिक अभिप्रायांचे बाबत संशोधन करणारी संस्था व जागतिक आर्थिक मंच यांच्या ऑगस्ट २०२१ मधील एका अहवालानुसार या स्थितीत आठवड्याला ३.४ दिवस घरून करावे लागेल अशी भारतीयांची अपेक्षा आहे.
अनेक बदल घडले आहेत आणि घडत राहतील. काही बदल तात्पुरते तर काही बहुधा कायमस्वरूपी असतात. .
उदाहरणार्थ छोट्या घरांचे पूर्वी असलेले आकर्षण आता कमी होईल. घरातच कार्यालय व इ स्कूलिंगची सुविधा देता येईल अशा मोठ्या घरांची खरेदी करण्याकडे भारतीयांचा कल राहिल. विकासक सुद्धा १.५, २.५, ३.५ बीएचके स्वरुपाची घरे ग्राहकांना देऊ करीत आहेत.
यापुढे घर खरेदी करण्याचे सर्व पर्याय हे घर व कार्यालय एकाच ठिकाणी आवश्यक व बहुविध सुविधा देऊ करणारे असतील.
लेखकाविषयी:
श्री अनिल फरांदे हे पुण्याच्या पश्चिम भागातील नगर वसाहतीच्या क्षेत्रातील अघाडीची व आयएसओ ९००१ प्रमाणित फरांदे स्पेसेस या मुख्य कंपनीच्या फरांदे प्रमोटर्स & बिल्डर्स कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असून क्रेडाई (पुणे मेट्रो) चे अध्यक्ष आहेत.
