मुंबई-नाशिकच्या साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या दोन कार्यकर्त्यांकडून शाईफेकली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे कृत्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे.ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेकण्यात आल्याचे समजल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. साहित्य संमेलन हे अभिव्यक्तीचे केंद्रं असते. तुम्हाला जर दुसरी अभिव्यक्ती व्यक्त करायची असेल तर दुसरे कुठेही करता येते. अभिव्यक्ती करण्याऐवजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे आणि शाईफेक करणे योग्य नाही, असे फडणवीस त्यांनी म्हटले आहे.तसेच, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या सर्वांचेच दैवत आहेत. काही चुकीचे लिहिले असेल तर त्याचा निषेधच झाला पाहिजे. परंतू साहित्य संमेलनात शाईफेक करणे हे चुकीचे आणि निषेधार्ह आहे. संमेलन ही अभिव्यक्तीची जागा आहे. चुकीच्या विचारांना तर्क आणि पुराव्यांनी उत्तर दिले पाहिजे.
पुणे ओपन गोल्फ चॅम्पियनशिप अभिजीत सिंग चड्डाला विजेतेपद
अखेरच्या फेरीतील 66 गुणांच्या जोरावर सहा फटक्यांनी विजय; कार्तिक शर्माला दुसरे स्थान
पुणे, 5 डिसेंबर 2021: अखेरच्या फेरीतील फोर अंडर 66 अशा अत्यंत प्रभावी कामगिरीच्या जोरावर नजीकच्या प्रतिस्पर्ध्यावर 6 फटक्याच्या अंतराने विजय मिळवताना चंदीगडच्या अभिजित सिंग चड्डा याने 40 लाख रुपये पारितोषिक रकमेच्या पुणे ओपन गोल्फ चॅम्पियनशिप मध्ये विजेतेपदाचा मान पटकावला.पूना क्लब गोल्फ कोर्सवर पार पडलेल्या या स्पर्धेत अभिजित सिंग चड्डा ने सलग तिसऱ्या फेरीत एकाही बोगीची नोंद न करता चमकदार कामगिरी केली.
30 वर्षीय अभिजित सिंग याने नजीकचा प्रतिस्पर्धी कार्तिक शर्मावर तिसऱ्या फेरीअखेर(63-65-64-66) एका फटक्याची आघाडी घेतली होती. चौथ्या फेरीअखेर चार बर्डीजची नोंद करताना अभिजितने एकूण 21-अंडर 258 अशा एकूण गुणसंख्येसह विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देताना अभिजित सिंग चड्डा ने संपूर्ण आठवडाभर प्रभावी कामगिरी केली. पहिल्या फेरीतील पहिल्या होलनंतर झालेल्या बोगीची चूक त्याने पुढच्या 71 होलमध्ये होऊ दिली नाही. याच कामगिरीच्या जोरावर सहा वर्षातील पाहिले विजेतेपद पटकवताना अभिजित सिंग चड्डाने 6,46,600/- रुपयांची पारितोषिक रक्कम पटकावली. या विजयामुळे पीजीटीआय मानांकन यादीत अभिजीतने नऊ क्रमांकानी प्रगती करताना 15व्या स्थानावर झेप घेतली.
गुरुग्रामचा युवा खेळाडू कार्तिक शर्माने(66-60-67-71) अशा कामगिरीसह या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. तिसऱ्या फेरीअखेर केवळ एका फटक्याने पिछाडीवर असलेल्या कार्तिकला अखेरच्या फेरीतील 1-ओव्हर 71 अशा कामगिरीमुळे एकूण 15-अंडर264 अशा कामगिरीसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या अखेरच्या फेरीत त्याने एका बर्डीची नोंद केली असली, तरी दोन बोगी मुळे त्याने विजेतेपदाची संधी गमावली. तरीही डावखुऱ्या कार्तिक शर्मासाठी ही कामगिरी कारकिर्दीतील सर्वोत्तम ठरली.त्यामुळेच त्याला मानांकन यादीत सात क्रमांकानी प्रगती करून 18व्या स्थनावर झेप घेता आली. या मौसमात त्याने पाचव्यांदा पहिल्या10 क्रमांकात स्थान मिळवले आहे.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कोलकत्ताच्या सुनीत चौरसियाने सलग दुसऱ्या फेरीत चांगली कामगिरी करताना एकूण 13-अंडर 266 अशा गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला. चौरसियाच्या 65 गुणांची बरोबरी चंदीगडच्या युवराज सिंग संधू (7- अंडर272) , बेंगळुरूच्या सी मुनियप्पा(3-अंडर 276), आणि गुरुग्रामच्याअंकुर चड्ड्या(2-ओव्हर 281)या खेळाडूंनी ही केली.
चौथ्या व अंतिम फेरीअखेर पूना क्लबच्या गोल्फ कोर्सवरील सर्वोत्तम कामगिरीचा निकष 70 गुण असा होता आणि ही फेरी वेळेवर सुरू झाली. परंतु पावसाचा अडथळा अखेरपर्यंत कायम राहिला.2010 आशियाई स्पर्धेतील रौप्य विजेत्या अभिजीत सिंगने पहिल्यापासून आपल्या प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवले. त्यातच नजीकच आव्हानवीर कार्तिकने सलग दुसऱ्या व तिसऱ्या होलला दोन चुका केल्यानंतर अभिजीतने त्याचा फायदा घेत आपली घौडदौड कायम राखली. पाचव्या व सहाव्या होलला 10फुटांवरून बर्डीची नोंद करताना त्याने तब्बल पाच फटक्यांची आघाडी मिळवली.

त्यानंतर, कार्तिकला ही आघाडी मोडता आली नाही. तसेच अभिजीतनेही सोळाव्या व सतराव्या होलला बर्डीची नोंद करताना तसेच तब्बल 66 फुटांवरून अचूक लक्ष वेध करताना आपली आघाडी वाढवत नेली आणि अखेर 6फटक्यांनी विजेतेपदाची निश्चिती केली.
फुटबॉल शौकीन आणि पंजाबी संगीताचा चाहता असणाऱ्या अभिजीतने आपल्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करताना प्रतिकूल परिस्थितीत सातत्य राखता आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तो म्हणाला की, अंतिम फेरीत इतकी सातत्याने कामगिरी करता येईल, अशी मला अपेक्षा नव्हती. परंतु कार्तिकने सुरुवातीला केलेल्या चुकांचा फायदा मी घेतला त्यानंतर केवळ कमीतकमी चूका करणे इतकेच माझे लक्ष्य राहिले. त्यामुळे माझ्यावर दडपण ही नव्हते. गेल्या तीन स्पर्धांमध्ये मी दोनदा पहिल्या दहात व अकरावा क्रमांक पटकावला होता. या विजेतेपदामुळे मी प्रगती पथावर असल्याचे निश्चित झाले आहे.अखेरीच्या होलमध्ये लक्षवेध केल्यानंतर मला माझ्या सर्व परिश्रमाचे फळ मिळाल्याची भावना मनात आली आणि सर्वकाही जुळून येत असल्याचे पाहून मी समाधानचा निश्वास टाकला. माझ्या यशात माझा अनुभवी कॅडी राजू याचा मोठा वाटा आहे. त्याने संपूर्ण आठवडाभर अत्यंत व्यावसायिक व बिनचूक कामगिरी केली
बेंगळुरूच्या सईद साकीब अहमद(69)याने 9-अंडर270 अशी कामगिरी करताना चौथा क्रमांक पटकावला. पुण्याच्या खेळाडूंपैकी हौशी गोल्फपटू रोहन ढोले पाटीलने 75-67-68-70 अशा कामगिरी सह(एकूण 1-ओव्हर 280) संयुक्त 24वे स्थान मिळवले. तसेच, त्याने सर्वोत्तम हौशी खेळाडूचा करंडक ही पटकावला.
दिल्लीचा हौशी युवा खेळाडू कृष्णव चोप्रा हा भारताचा माजी क्रिकेटपटू निखिल चोप्राचा पुत्र असून त्यानेही 16व्या होलमध्ये होल-इन-वन अशी कामगिरी करताना एकूण 2-ओव्हर 281 अशा गुणांसह संयुक्त 26वेस्थान निश्चित केले.
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा सदैव प्रेरणा देत राहील – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आदरांजली
मुंबई, दि. ५ :- संसदेत मराठीत भाषण करणारे पहिले खासदार, इंग्रज राजवटीत दीड हजार गावांमध्ये प्रतिसरकार चालवणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे. क्रांतिसिंहांनी देशाच्या स्वातंत्र्यालढ्यात दिलेले योगदान तसेच देशाच्या जडणघडणीसाठी, बहुजन समाजाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणा देत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, क्रांतिसिंह नाना पाटील खऱ्या अर्थानं ‘क्रांतिसिंह’होते. महात्मा गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुरु केलेल्या असहकार चळवळीपासून इंग्रज सत्तेला आव्हान देणाऱ्या ‘प्रतिसरकार’आंदोलनापर्यंतचा त्यांचा लढा भारतीय स्वातंत्र्यचळवळीत सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला इतिहास आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर भागातल्या दीड हजार गावात ‘प्रतिसरकार’च्या माध्यमातून त्यांनी लोकन्यायालये, बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठ्यासाठी पर्यायी यंत्रणा निर्माण केली होती. गावगुंड, समाजकंटकांवर वचक निर्माण केला होता. हे इंग्रज सरकारविरोधातलं मोठं धाडस होतं. स्वातंत्र्य लढ्याबरोबरंच त्यांनी देशाच्या जडणघडणीत योगदान दिलं. शिक्षणप्रसार, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, अनिष्ठ रुढी-परंपरांवर बंदी यासाठी प्रबोधनाचे कार्य केले. स्वातंत्र्यलढ्यासह देशाच्या जडणघडतीतील योगदानामुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांचं स्थान आपल्या सर्वांच्या मनात कायम वरचं असेल व ते सदैव आपल्याला प्रेरणा देत राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांना आदरांजली वाहिली.
महापरिनिर्वाणदिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेबांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन
मुंबई, दि. 5 :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्य आणि विचारांचे स्मरण करून त्यांच्या स्मृतीस कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला, समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांमध्ये मानवकल्याणाची ताकद असून या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी पुनर्निर्धार करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात की, डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला ‘शिका आणि संघटीत व्हा’ अशी शिकवण दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान, न्याय, व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क व समानतेची वागणूक देणारी राज्यघटना दिली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंध, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचं श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना व राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी दृढसंकल्प होऊया, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
आर्यन पंप्स आशियाई ज्युनियर(कुमार) टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत वोबीन शिन, आरझून सेगनडिकोव्हा यांना अग्रमानांकन
पुणे,5 डिसेंबर 2021: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) आणि डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित आर्यन पंप्स आशियाई ज्युनियर(कुमार) टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात कोरियाच्या वोबीन शिन यांना, तर मुलींच्या गटात कझाकस्तानच्याआरझून सेगनडिकोव्हा यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेस आज( डिसेंबर रोजी)मुख्य ड्रॉच्या सामान्यांना सुरुवात होणार आहे. मुलांच्या गटात कोरियाच्या वोबीन शिनने अव्वल मानांकन, तर भारताच्या निशांत दबसला दुसरे व थायलंडच्या तानापत निरुद्रोणला तिसरे मानांकन देण्यात आले आहे.
मुलींच्या गटात तैपेईच्या यु-युन ली व भारताच्या श्रुती अहलावत यांना अनुक्रमे दुसरे व तिसरे मानांकन देण्यात आले आहे.
खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे: मुले:वोबीन शिन(कोरिया), निशांत दबस(भारत), तानापत निरुद्रोण(थायलंड), अमन दहिया(भारत), मॅक्स बात्यूतेंको(कझाकस्तान), चिराग दुहान(भारत), डेनिम यादव(भारत), युवान नांदल(भारत)
मुली: आरझून सेगनडिकोव्हा(कझाकस्तान), यु-युन ली(तैपेई), श्रुती अहलावत(भारत), सारा साईतो(जपान), सेंदुगेस केंझीबायव्हा(कझाकस्तान), हायु किनोशिता(जपान), झेनल रुस्तमोव्हा(कझाकस्तान), सुहिता मारूरी(भारत).
शाई फेक: ही अॅॅक्शन ला रीअॅक्शन -म्हणाले प्रवीण दरेकर(व्हिडीओ)
मुंबई, दि. ५ नोव्हेंबर- साहित्य संमेलनामध्ये अशा प्रकारे शाई फेकण्याच्या प्रकाराचे समर्थन करता येणार नाही. असे होता कामा नये. परंतु क्रियेला आलेली ही प्रतिक्रिया आहे, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
नाशिक येथे अखिल भारतीय साहित्य संमेलनस्थळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याने लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार रविवारी घडला. त्यावर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, अशा प्रकारचे लिखाण करण्याची काय आवश्यकता आहे. स्वतःला जे विचारवंत समजतात, आपल्या लिखाणाने जातीय तेढ निर्माण होणार नाही, लोकांची दैवते आहेत त्यांचा अपमान होणार नाही, त्यांच्या भावनांना ठेच लागणार नाही याची काळजी सुजाण समजणाऱ्या लोकांनी घ्यायला पाहिजे. आणि स्वभाविकपणेआपण लेखणीने वार करतो. छत्रपती संभाजी राजे यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण केल्यामुळे संभाजी ब्रिगेडचे मावळे आहेत त्यांनी आक्रमकपणे जे काही केले ते समर्थनीय नसले तरीही ती क्रियेला प्रतिक्रिया होती असेच म्हणावे लागेल. भविष्यात समाजाला दिशा देणारे काम पत्रकाराचे असते. हे पत्रकार असतात, लेखक संपादक हा त्याहून महत्त्वाचा असतो. आपल्या लेखणीतून ते इतिहास उभा करत असतात, भविष्याला दिशा देत असतात. लिखाणातून विद्वेषक काही होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे आणि ती या प्रकरणात घेतलेली दिसत नाही. सनसनाटी निर्माण करून काहीतरी लिहिणे यावर ही क्रियेला प्रतिक्रिया आली आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक आपण किती करणार आहोत याचा विचार करायला हवा – आ. चंद्रकांत पाटील (व्हिडीओ)
पुणे- ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर नाशकात झालेली शाई फेक प्रकरणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आ. चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रतिक्रियेने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे . ते म्हणाले निषेधाची पद्धती चुकीची असली तरी आता हे फार झाले आहे , या देशात आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक किती करणार आहोत याचाही विचार आता करायला हवा ,पहा आणि ऐका नेमके आ. चंद्रकांत पाटील काय म्हणाले त्यांच्याच शब्दात
मोदींना हटवले नाही तर २०२४ नंतर देशात लोकशाही नसेल – पृथ्वीराज चव्हाण
पुणे- यापुढे 2024 ला मोदींचा पराभव केला नाही तर देशात लोकशाही उरणार नाही असे सांगून ममता बैनर्जी च्या मुद्द्यावर बोलताना , काँग्रेसला सोडून आघाडी करणे म्हणजे भाजपाला सहाय्य करणे होईल, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा माध्यमांशी संवाद करताना व्यक्त केले. इंदिराजींनी अमेरिकेलाही ललकारले होते ही आठवण 1971 च्या विजयी युद्धा च्या आठवणी जाग्या करताना होते, आज चीन भारताचे लचके तोडत आहे, देशाची आर्थिक स्थिती बांगला देशाहून अधिक कमजोर करून ठेवण्यात आली आहे हे चिंताजनक असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे .कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आले असताना माध्यमांशी ते बोलत होते
राजकारणात राजकीय महत्त्वकांक्षा ठेवणे काही गैर नाही. पण बाकीचे वातावरण तयार करून विरोधकांची एकजूट तोडण्याचा प्रयत्न करू नये, काँग्रेस शिवाय कोणतीही आघाडी होऊच शकत नाही. आणि अशी आघाडी झाल्यास तिला यश मिळणार नाही, असे विधान करत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना प्रत्युत्तर दिले.
पुढे म्हणाले, त्यामुळे राजकीय महत्त्वकांक्षा असणे गैर नाही. त्यांना पंतप्रधान व्हायचे असेल त्यांनी पहिल्यांदा निवडणुका जिंकल्या पाहिजे. निवडणुका जिंकल्यानंतर जे चित्र निर्माण होईल, त्यानंतर नेते पुढचा निर्णय घेतील. पण स्वतःच्या महत्वकांक्षा पुढे आल्यातर काही निष्पन्न होणार नाही, असे सांगतानाच तरी सर्व विरोधी पक्षांची एकजूट होईल ही आशा आहे.
2024 मध्ये होणारी निवडणूक एक निर्णायक निवडणूक असणार आहे. त्या निवडणुकीत मोदींचा पराभव केला नाही तर देशात लोकशाही अस्तित्वात राहणार नाही. असेही मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत कोण एकत्र येईल, कोण त्याच नेतृत्व करेल हे नंतर ठरेल. त्यासाठी आधी पाच राज्यात होणाऱ्या निवडणुका लढवाव्या लागेल. तिथं मोदींना रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. नंतर 2024 ची निवडणूक होईल. त्या कालावधीत ही सर्व आघाडी एकत्र करावी लागेल. तोपर्यंत एकदिलाने मोदींच्या कारभारावर टीका केली पाहिजे. त्यांचा कारभार उघड केला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
गिरीश कुबेरांंचे पुस्तक मी हि वाचलेले … काय म्हणाले शरद पवार …
नाशिक: तुम्ही पुस्तक वाचलेलं आहात, तुम्हाला त्यात काही आक्षेपार्ह आढळलं का? या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटलंय की, त्यांची काही मते आहेत, मी काही इतिहासाचा तज्ज्ञ नाही. मी जास्त खोलात गेलो नाही. त्यांची मते मान्य नसतील तर तुम्हीही लिहू शकता. मते मांडू शकता, मात्र हल्ला करु शकत नाही.आपल्याकडे लोकशाही असून लोकशाहीत मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. विरोध करण्याचाही अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र व्यक्तिगत हल्ला करणे चुकीचा आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे.
ज्येष्ठ लेखक आणि संपादक गिरीश कुबेर यांच्यावर आज नाशिक येथील साहित्य संमेलनामध्ये संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक करुन हल्ला करण्यात आला आहे. त्यांनी लिहलेलं ‘Renaissance State’ या पुस्तकावर सध्या महाराष्ट्रात बराच वाद सुरु आहे.या पुस्तकात कुबेर यांनी आक्षेपार्ह लिखाण केल्याचा ठपका अनेकांनी ठेवला आहे. अनेक राजकीय पक्ष, विविध संघटना, गट आणि लोकांकडून पुस्तकारावर बंदी आणण्याची देखील मागणी केली होती. त्यांच्यावर झालेल्या या शाईफेकीच्या घटनेवर आता शरद पवार यांनी मत मांडलंय.
शरद पवार यांनी या घटनेचा निषेध करताना म्हटलंय की, हा वाद गेल्या पाच-सहा महिन्यांपासून सुरु होती. कुबेरांचं हे पुस्तक मी स्वत: वाचलेलं आहे. कुबेरांना लोकशाहीमध्ये स्वत:ची मते मांडण्याचा अधिकार आहे. या मतांचा विरोध करणारे दुसरे घटकही असू शकतात. या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण स्विकारलेलं आहे. आणि ते स्वातंत्र्य असल्यामुळे एखादी गोष्ट एखाद्या लेखकानं लिहली तर त्याबद्दल व्यक्तिगत हल्ला करणं ही गोष्ट अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी असून चुकीची आहे. आम्ही कुणीही कधीही त्याचा पुरस्कार करणार नाही. ही घटना निंदनीय नाही. ही घटना घडणे महाराष्ट्राला शोभत नाही. आणि विशेषत: ज्या परिसरामध्ये हा सोहळा इतक्या उत्साहाने सुरु आहे, अशा परिसरामध्ये अशी घटना घडणे अत्यंत चुकीचं आहे, असं त्यांनी म्हटलंय.
गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक
नाशिक -येथील साहित्य संमेलनाला आज तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी गालबोट लागलं. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर साहित्य संमेलन स्थळी शाई फेकण्याचा प्रकार समोर आला आहे. संभाजी ब्रिगेडनं ही शाईफेक केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी शाई फेकणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं असून ते दोघेही संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
साहित्य संमेलनाचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. संमेलन स्थळी गिरीश कुबेर दाखल होत असताना हा हल्ला करण्यात आला. त्यामुळे शेवटच्या दिवशी संमेलनाला गालबोट लागल्याचं दिसून आलं आहे. हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने गिरीश कुबेर यांना सुरक्षितपणे सभागृहात पोहोचवलं. हा हल्ला करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सतीश काळे आणि राजेश बुंदला अशी या दोघांची नावं असल्याची माहिती खुद्द संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी नितीन रोटे पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
1971च्या युद्धातील विजय हा लोकशाही, राज्यघटनेचा विजय – पृथ्वीराज चव्हाण (व्हिडीओ आणि छायाचित्रे )
पुणे – 1971 चा भारत पाकिस्तान युद्धातील भारताचा विजय म्हणजे अनेक दशकांनंतर भारताने खरा पहिला निर्णायक विजय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाखाली मिळवला. हा विजय म्हणजे जशी लोकशाहीची ताकद आहे तशी देशाला ओळख देणार्या व एकत्र ठेवणार्या राज्य घटनेचीही ताकद आहे. भारतीय सैन्य, हवाई दल आणि नौदल यांच्या प्रभावशाली एकत्रित कामगिरीचे प्रत्येकाने कौतुकच केले पाहिजे असे सांगून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुवर्ण विजय व्दीसप्ताह अतिशय कल्पकतेने साजरा करीत असल्याबाबत याचे संयोजक आबा बागूल यांचे कौतुक व अभिनंदन केले. पुणे मनपा काँग्रेसचे गटनेचे आबा बागूल यांच्या संकल्पनेतून 3 ते 16 डिसेंबर या काळात आयोजित सुवर्ण विजय व्दीसप्ताहमधील चित्रकारांच्या पेंटिंग उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी लेफ्टनंट जनरल एस. एस. मेहता (निवृत्त), ब्रिगेडिर अजित आपटे (निवृत्त) व ज्येष्ठ व्यंगचित्रकार चारूहास पंडित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुण्याच्या जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानाबाहेरील पदपथावर पुण्यातील सुमारे 25 नामवंत चित्रकारांनी इंदिरा “गांधी आणि 1971 चे युद्ध” या विषयावर पेंटिंग्ज काढली. सकाळी 7 ते सायंकाळी 5 या काळात हे चित्रकार आपल्या कुंचल्यातून चित्रे साकारत असताना ती बघण्यासाठी शेकडो पुणेकरांनी गर्दी केली होती.सुवर्ण विजय व्दीसप्ताहातील चित्रकारांच्या या अभिनव उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी या संकल्पनेचे जनक पुणे मनपा काँग्रेसपक्ष गटनेते आबा बागूल यांनी सर्वांचे स्वागत व सत्कार केला. आबा बागुल म्हणाले की, सुवर्ण विजय व्दीसप्ताह आयोजित करताना चित्रकारांनी पंतप्रधान इंदिरा गांधी व 1971 चे युद्ध या विषयावर थेट सादरीकरण करायची अभिवन कल्पना आम्ही येथे साकारली आहे. या युद्धातील विजयाची व सैन्य दलाच्या पराक्रमाची माहिती युवा पिढीपर्यंत जावी यासाठी असे कार्य क्रम आयोजित केले आहेत.

लष्कर आणि जनता यांना एकमेकांशी संवाद करण्याची फारशी संधी नसते त्यामुळे अनेक निवृत्त सैन्य अधिका-यांना या व्दीसप्ताहात आवर्जून निमंत्रित केले आहे असे सांगून आबा बागूल यांनी चित्रकार चित्र साकरताना ते बघायला आलेल्या शेकडो पुणेकरांचेही आभार मानले.या प्रसंगी बोलताना लेफ्टनंट जनरल एस.एस. मेहता (निवृत्त) यांनी आबा बागूलांच्या पुढाकाराने साजरे होणार्या सुवर्ण विजय व्दीसप्ताहाचे कौतुक करून म्हटले की, पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धात भारताने निर्णायक विजय मिळवला. हे युद्ध म्हणजे नरसंहार, क्रूरता विरूद्ध मानवता यांच्यातील युद्ध होते. हा देशाचा विजय आहे. देशवासीयांचा विजय आहे असे मी मानतो. देशाचे सैन्यदल, देशवासीय जनता आणि राजकीय व्यवस्था (लोकशाही) हे तिन्ही घटक एकत्र आल्यामुळे आपण हा निर्णायक विजय मिळवला. त्यामुळे हा लोकशाहीचा विजय आहे, असे ते म्हणाले.

या प्रसंगी ब्रिगेडियर अजित आपटे (निवृत्त) यांनी आपल्या कुटुंबाच्या चार पिढ्या सैन्य दलात आहेत असे सांगून म्हटले की, 1971 युद्धात माझे वडिलही लष्करात ब्रिगेडियर होते. मी सुद्धा नुकताच सैन्यदलात प्रवेश केला होता. मला या युद्धात भाग घेण्याची संधी मिळाली असे सांगून ते म्हणाले की, माझे बंधू प्रदीप आपटे हे हवाईदलात होते व त्यांनी चांगले शौर्य गाजवले पण पाकिस्ताने त्यांचे विमान पाडले आणि छळ करून त्यांना ठार केले. आपण मात्र 1971 युद्धात शरण आलेल्या 93000 पाकिस्तानी सैनिकांना चांगली वागणूक देऊन परत पाठवले. हीच भारताच्या सुसंकृत सैन्याची ओळख आहे, असे ते म्हणाले.या प्रसंगी ज्येष्ठ व्यंगचित्रकार चारूहास पंडित म्हणाले की, या युद्धाच्यावेळी मी चिंटूच्या वयाचा होतो. त्यावेळी वर्तमानपत्र आणि रेडिओ ही महितीची माध्यमे होती. या युद्धानंतर या विजयावर व्यंगचित्रांची पुस्तके निघाली होती आणि त्यातील अनेक पुस्तकातील मी सर्व व्यंगचित्रे त्यातील संवादासह पुन्हा काढली आहेत.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन घनश्याम सावंत यांनी केले. शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपला. या कार्यक्रमास माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेविका लता राजगुरू, गोपाळ तिवारी, रोहित टिळक, मुकतार शेख, नरेंद्रपालसिंग बक्षी, सौ जयश्री बागुल, अमित बागुल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. चित्रकारांच्या या कलाकृती शिवदर्शन येथील वसंतराव बागूल उद्यानातील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलादालनात 18 डिसेंबरपर्यंत बघण्यास नागरिकांना उपलब्ध असतील.
छोटी छोटी संस्थाने, राज्ये, व्यापक भारतवर्ष, हिंद, हिंदी आणि हिंदू …पराभवांची मालिका , 65 चा करार- ड्रॉ, 1971 चा विजय, आणि तरीही बांगला देशाला दिलेला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा,आणि आजची आर्थिक स्थिती … यावर पृथ्वीराज चव्हाण यांची अत्यंत मार्मिक विधाने अवघ्या शेवटच्या 9 मिनिटात..
पुणेकरांच्या रोषाला सामोरे जावे लागेल लक्षात आल्याने राष्ट्रवादीचा पाणी कपातीचा निर्णय मागे – महापौरांची टीका
पुणे : जयंत पाटील केवळ जलसंपदा मंत्रीच नाही तर प्रथम ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत हे आज त्यांनी दाखवून दिले आणि पुण्याचा महापौर पाणी कपातीच्या जलसंपदा च्या आदेशावरच बोलण्यासाठी तासभर प्रतीक्षा करत असताना, त्यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटून पत्रकार परिषद घेऊन पुण्याची पाणी कपात करण्याचा निर्णय संपूर्णतः मागे घेतली पुणेकरांच्या रोषाला आता सामोरे जावे लागेल हे त्यांच्या लक्षात आल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतला आणि देवेंद्र फडणविसांवर राजकीय टिप्पणी केली असा दावा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी येथे केला . एकंदरीत या प्रकरणी चुकीचे आदेश काढून , पोलीस बंदोबस्तात पाणी कपात करा असे शब्द टाकून , नंतर पुण्याच्या महापौरांना टाळून जयंत पाटील यांनीच हे राजकारण केल्याची अप्रत्यक्ष टीका महापौरांनी केली आहे.
ते म्हणाले,’ पुण्याच्या पाणी प्रश्नावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची वेळ घेऊन पाच वाजता सिंचन भवन येथे गेलो, तासभर वाट पाहिली. त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन थेट पत्रकार परिषदेला गेले.त्यामुळे मी सिंचन भवन येथून निघून आलो. माझ्या वैयक्तीक कामासाठी नाही तर पुणेकरांचा प्रतिनिधी म्हणून त्यांना पूर्वकल्पना देऊन भेटण्यासाठी गेलो होते. तरीही भेट झाली नाही, ” अशा शब्दात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली.दरम्यान पुणेकरांच्या दबावामुळे भितीपोटी जलसंपदा मंत्र्यांनी पाणी कपात रद्द केली याचे आम्ही स्वागत करतो, असा खोचक टोला मोहोळ यांनी लावला.जयंत पाटील यांनी भाजपवर केलेल्या आरोपांमध्ये मला जायचे नाही, पण दोन दिवसांपूर्वी तुमच्या खात्याने आदेश काढून पोलिस बंदोबस्तात पाणी कपात करणार असल्याचे सांगितले. तरीही पाणी कपातीचा कोणताही प्रस्ताव नव्हता असे मंत्री सांगत आहेत. हे राजकारण सुज्ञ पुणेकर बघत आहेत. भामा आसखेडचे पाणी मिळाले म्हणून खडकवासल्याचे पाणी कपात केले जात आहे, यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायचा काय संबंध, वड्याचे तेल वांग्यावर काढत असल्याची टीका मोहोळ यांनी केली.
पाणी कपात बिपात काही नाही , भाजपा राजकारण करतेय – जलसंपदा मंत्र्यांचा पुण्याला दिलासा
पुणे : पाटबंधारे विभागाने पोलिस बंदोबस्तात पाणी कपात करण्याचा निर्णय घेतल्याने यावरून आज राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना यामध्ये हस्तक्षेप करून ”पुणेकरांच्या पाण्यात कुठलीही कपात होणार नाही.गावांच्या समावेशामुळे पाण्याची गरज वाढली असून पुणेकरांना अधिकचे पाणी कसे उपलब्ध होईल, यासाठी आमचे प्रयत्न आहेत.” असे स्पष्ट करत दिलासा दिला . मात्र, याचवेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ११ वेळा पाणी कपातीची पत्र पाठविण्यात आली व त्यांनी धरणावरील पंप बंद केले होते याची आठवण करून देत जलसंपदा विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या पत्राचा सहारा घेऊन भाजप आणि फडणवीस राजकारण करत असल्याची टीका पाटील यांनी केली .
पुणे महापालिकेला भामा आसखेड धरणातून रोज सुमारे १६० एमएलडी पाणी मिळत असल्याने एवढेच पाणी खडकवासला धरणातून कमी केले जाणार आहे. त्यासाठी ३ डिसेंबर पासून पोलिस बंदोबस्तात पाणी कपात केली जाईल, असे पत्र पाटबंधारे विभागाने महापालिकेला पाठविल्याने गेल्या दोन दिवसांपासून यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यानंतर आज (ता. ४) जयंत पाटील यांनी सिंचन भवन येथे पत्रकार परिषद घेतली . त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पाटील यांची भेट घेऊन पाणी कपात करू नये अशी मागणी केली.
जयंत पाटील म्हणाले, ”पुण्याला प्रति माणसी १५० लिटर याप्रमाणे पाणी दिले जात आहे. २०३१ची ७६ लाख लोकसंख्या गृहीत धरून, सध्या १४ टीएमसी पाणी कोटा मंजुर केला आहे. पण सध्या यापेक्षा जास्त पाणी पुरवठा केला जात आहे. ३४ गावांचा समावेश व लोकसंख्या वाढत असल्याने पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कुठलिही कपात केली जाणार नाही. पाणी कपात करण्याचा जलसंपदा विभागाचा कोणताही प्रस्ताव नाही, निर्णय झालेला नाही. उलट शहराठी जास्त पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष वाढतच जाणार असल्याने शेती, उद्योगांनाही पाणी द्यावे लागणार आहे. थोडा जरी पाऊस कमी झाला की गंभीर स्थिती निर्माण होते. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी सामुहिक प्रयत्न करण्याची गरज आहे.” असे पाटील यांनी सांगितले.
…हे श्रेय भाजपलाच
देवेंद्र फडणवीस यांनी पाणी कपात करणाऱ्यांना पुणेकर पाणी पाजतील असे वक्तव्य केले, पण मला याचे आश्चर्य वाटत आहे. त्यांच्या काळात ११ पत्र महापालिकेला देण्यात आली, एवढ्यावरच न थांबता महिनाभर पंप बंद करून पाणी कपात केली होती. महापालिका भाजपच्या ताब्यात गेल्यापासून पुणेकरांना पाण्याची चिंता वाटते याचे श्रेय मी भाजपलाच देतो, असा टोला पाटील यांनी मारला.
देवेंद्र फडणवीस हे कुसुमाग्रज यांच्याबद्दल अनादर दाखवत असतील तर हा साहित्य आणि संस्कृती समोरील सर्वात मोठा यक्षप्रश्न आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर जावी यासाठी ते सतत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख करत असतात. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा वापर साहित्य संमेलनातील राजकारणासाठी करू नये, अशा शब्दात मंत्री पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला.
नाशिक येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावावरून संमेलनाच्या आयोजकांना त्यांनी टोला लगावत संमेलनाला उपस्थित राहणार नसल्याचे म्हटले आहे. त्यावर बोलताना जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
जयंत पाटील म्हणाले, नाशिक ही कुसुमाग्रजांची भूमी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सुशिक्षित आणि अतिशय समंजस नेतृत्वाने जर कुसुमाग्रज यांच्याबद्दल अशी भावना व्यक्त केली असेल तर हे फार मोठे दुर्दैव आहे. कुसुमाग्रज यांचा अपमान करणे म्हणजे मराठी भाषेचा, मराठी वांगमयाचा, मराठी भाषिकांचा अपमान आहे. केवळ शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसपासून बाजूला जावी म्हणून फडणवीस सातत्याने सावरकरांचा विषय काढत असतील तर त्यांनी हे करू नये अशी माझी त्यांना सूचना आहे.
“एका खासदारासाठी नगरसेवकांना कोणताही पक्ष धोक्यात टाकणार नाही’ कॉंग्रेसच्या पवित्र्यावर म्हणाले जयंत पाटील
महापालिका निवडणुकीत काँग्रेसला सोबत घेण्यासाठी आमचे स्थानिक पातळीवरचे नेते चर्चा करतील, त्यास आमचा पाठिंबा असेल,”असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्पष्ट केले.महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त नगरसेवक आल्यास लोकसभा निवडणुकीच्या वेळेस पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादी दावा करेल यामुळे काँग्रेसचा आघाडीत येण्यास विरोध आहे का ? राष्ट्रवादीची काय भूमिका काय असेल असा प्रश्न विचारण्यात आला. यावर जयंत पाटील यांनी “एका खासदारासाठी नगरसेवकांना कोणताही पक्ष धोक्यात टाकणार नाही असे उत्तर दिले.महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र यावेत ही आमची भूमिका आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी इतर पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांना सोबत घेतील, त्यास आमची सहमती असेल, असे पाटील यांनी सांगितले.प्रदेश पातळीवर नाना पटोले स्वबळाची भाषा करत आहेत, त्यांची समजूत काढणार का या प्रश्नावर पाटील म्हणाले, समजूत काढण्याचा प्रश्न येत नाही, वारंवार ते जर स्वबळाची भाषा करत असतील तर ते त्यांचे धोरण होते. तरी देखील काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते त्यांच्याकडे वेगळी भूमिका व्यक्त करत असतील तर ते भूमिका बदलू शकतील.”
भाजपविरोधात जे आहेत त्यांना एकत्र घेतले पाहिजे कोणालाही सोडणे बरोबर नाही. सध्या युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत. महागाई, शेतकरी आंदोलन असे महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र यावे. हीच भूमिका राष्ट्रवादीची आहे. शिवसेना आमच्यापासून दूर जावी यासाठी फडणवीस हे कायम सावरकरांचा मुद्दा उपस्थित करत आहेत. राजकारणासाठी साहित्य संमेलनाचा वापर करणे योग्य नाही, अशी टीका फडणवीस यांच्यावर केली.
चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याची कुठलीही घाई नाही. चंद्रकांत पाटील यांनाच घाई झाली आहे. फडणवीस यांच्या आडून तेच मुख्यमंत्री होण्याची मनीषा बाळगून आहेत. पण पक्षात आपले हितचिंतक कोण आहेत हे फडणवीस चांगली माहिती असल्याचा टोला जयंत पाटील यांनी यावेळी मारला
आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत पूना कॉलेजला ५ सुवर्ण
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे शहर विभागीय क्रीडा समिती व पूना कॉलेज कॅम्प पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत पूना कॉलेजने ५ सुवर्णपदके पटकाविली. यामध्ये मिनाज शेख, आलिया सय्यद, मोहित सिंग भोदोरिया, रोहन पंढरे, अहुजी अनिल रामा यांनी सुवर्णपदक पटकाविले.
मथुरावाला बॉक्सिंग रिंग येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पुना कॉलेजचे प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख, नगरसेवक विनोद मथुरावाला, दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते अजित सिंग कोचर, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष भरतकुमार व्हावळ, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजय गुजर, पुणे शहर विभागीय क्रीडा समिती सचिव मनीषा कोंढरे, शांताराम ढमाले, आयोजक सचिव डॉ. आयाज शेख, प्रा. इमान पठाण प्रा. आशद शेख उपस्थित होते
विजेते पुरुष:- अजय शिर्के- मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर –प्रथम (४६-४८ किलो)
मोहित सिंग भौदोरीया -पूना कॉलेज-प्रथम, परशुराम पगारे -नौरोजी वाडिया कॉलेज-द्वितीय (४८-५१ किलो)
संकेत गौड-नौरोजी वाडिया कॉलेज–प्रथम, राज जाधव -शिवछत्रपती आर्ट्स कॉलेज-द्वितीय (५१-५४ किलो)
साहिल पाटणवाला -एम ए रंगूनवाला कॉलेज-प्रथम, प्रतिक मस्के- सेंट विन्सेंट-द्वितीय (५४-५७ किलो)
अनिल रामा अहुजी. पूना कॉलेज-प्रथम, कार्तिक राजपूत – मॉडेल कॉलेज-५-द्वितीय (६०-६३.५)
रोहन पंढरे -पूना कॉलेज-प्रथम, मुस्तफा तांबोळी- ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल कॉलेज ऑफ इंजीनियरिंग-द्वितीय (६३.५-६७ किलो)
महिला:-
मीनाज शेख (पुना कॉलेज) -प्रथम, प्राजक्ता ताडे (पूना कॉलेज) द्वितीय (४५-४८ किलो)
जाधव वैष्णवी अनिल( स.प.कॉलेज)-प्रथम परदेशी योगिता कैलाश(नेस वाडिया) द्वितीय – (४८-५० किलो)
आर्या कुलकर्णी ( एम एम सी सी कॉलेज) -प्रथम, पिंकी चव्हाण (सरहद कॉलेज) द्वितीय (५०-५२ किलो)
अलीया सय्यद (पूना कॉलेज) -प्रथम, नृता शहा (बी.एम.सी.सी.कॉलेज) द्वितीय (५२-५४ किलो)
सात वर्षात केवळ मोदींच्या विध्वंसक गोष्टींचे उत्सवच-खासदार कुमार केतकर यांचे प्रतिपादन
पुणे : “पंडित नेहरूंनी दूरदृष्टी ठेवून निवडणूक आयोग, नियोजन आयोग, मतदानाचा अधिकार, संशोधन संस्था, सार्वजनिक क्षेत्राची बांधणी केली. विकासाची धोरणे राबवत देशाला आकार दिला. इंदिरा गांधी यांनी आपल्या खंबीर नेतृत्वाने देशाला सर्वार्थाने सक्षम बनवले. राजीव गांधी यांनी तंत्रज्ञान आत्मसात करत भारताला तरुण व अद्ययावत बनवले. सत्तर वर्षात काँग्रेसने केलेल्या विकासाचा, उभारलेल्या संस्थांचा, धोरणांचा विध्वंस करण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. खासगीकरण आणि केवळ शब्दांचा खेळ करून गेल्या सात वर्षात मोदी सरकार केवळ विध्वंसक गोष्टींचा उत्सव साजरा करण्यात दंग आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक खासदार कुमार केतकर यांनी केले. मोदी आणि भक्तमंडळी ‘देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारत भ्रष्टाचारमुक्त झाला’, अशा अविर्भावात वावरत असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात ‘७० वर्ष आणि ७ वर्ष’ या विषयावरील व्याख्यानात कुमार केतकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. यावेळी काँग्रेसच्या महाराष्ट्र सह-प्रभारी सोनलबेन पटेल, संयोजक माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश कमिटीचे संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक अजित दरेकर, सुजाता शेट्टी, रफिक शेख, शेखर कपोते, प्रशांत सुरसे, चेतन अग्रवाल आदी उपस्थित होते.
कुमार केतकर म्हणाले, “भारतीय राज्यघटना देशाला समर्पित करत काँग्रेसने लोकशाही रुजवण्याचे काम केले. भविष्याचा वेध घेत नेहरूंनी अर्थव्यवस्थेला प्रगतीपथावर घेऊन जाणारे निर्णय घेतले. बँकांचे राष्ट्रीयीकरण, लोकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राबवलेल्या योजना, विविध शैक्षणिक-संशोधन, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांची उभारणी या काळात झाली. आज या सर्व संस्थांचा, काँग्रेसच्या काळात झालेल्या विकासाचा लाभ घेत मोदी आणि त्यांच्या सरकारमधील लोक ‘काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले?’ हा प्रश्न बालिशपणे विचारत आहेत. गांधी-नेहरू कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करताना त्यांचा त्याग ही मंडळी विसरतात, हे दुर्दैव आहे.”
“नियोजन आयोग बरखास्त करणे, सरकारी संस्थांचे खासगीकरण करणे, नोटबंदीसारखा निर्णय लादणे अशा कितीतरी विध्वंसक गोष्टी या सात वर्षात झाल्या आहेत. इतिहास आणि भूगोल या दोन्हीचा अभाव असलेले मोदी आज गांधींना चांगले म्हणतात, तर नेहरूंवर टीका करतात. हा दुटप्पीपणा २०२४ नंतर कदाचित संपले आणि ते गांधींवरही टीका सुरु करतील. विध्वंसक गोष्टी अंगाशी येताहेत, असे जाणवले की काँग्रेसवर खापर फोडायचे ही रणनीती आहे. भाजपला, संघालाही मोदी नकोसे आहेत. पण त्यांचा नाईलाज होतोय. खोटी आकडेवारी, लबाड धोरणे राबवून जनतेची फसवणूक करण्याचा सपाटा यांनी लावला आहे. शेतकरी आंदोलनावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची नाचक्की झाली आहे. २०१४ मध्ये भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे आज झोपले आहेत, अरविंद केजरीवाल यांना जनलोकपालचा विसर पडला आहे,” असेही केतकर यांनी नमूद केले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “काँग्रेसची विकासाची विचारधारा, परंपरा पुढे नेण्याचे काम सोनियाजीनी केले. सामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास टाकून काम करण्याची संधी देण्याचा त्यांचा स्वभाव आहे. काँग्रेस कमिटी, केंद्रात राज्यमंत्री आणि पुढे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला काम करत आले. पंतप्रधान कार्यालयात समन्वय साधण्याची आणि काँग्रेस कमिटीत त्यांना रिपोर्ट करण्याचे काम करायचो. सोनियजींबद्दल अनेकदा गैरसमज पसरवले जातात. मात्र, त्यांनी कधीही आपली मते लादली नाहीत. पंतप्रधान पदाचा कटाक्षाने त्यांनी सन्मान ठेवला. युपीए आणि मनमोहन सिंग सरकार उभारणीत सोनिया गांधी यांचे मोलाचे योगदान होते. मात्र, त्यांनी कधीही सरकारच्या कामात हस्तक्षेप केला नाही. मोदींनी निर्णयप्रक्रियेत एकाधिकारशाही आणली आहे. सात वर्षात सत्तर वर्षाच्या भरीव कामाची वाट लावणाऱ्या या मोदी सरकारला सत्तेपासून दूर करण्याची गरज आहे.”
प्रास्ताविक मोहन जोशी यांनी सांगितले. सूत्रसंचालन संजय बालगुडे यांनी केले. आभार प्रवीण करपे यांनी मानले.
