Home Blog Page 2188

जिल्ह्यात एकाच दिवशी 1 लाख मोफत सातबारा वाटप होणार

0

पुणे दि.6: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात 7 डिसेंबरचे (7-12-2021) औचित्य साधून एकाच दिवसात 1 लाख मोफत सातबारा वाटपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

महसूल व वनविभागाच्या 1 सप्टेंबर 2021 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील शेतकऱ्याना मोफत सुधारित 7/12 वाटप करण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेनुसार जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुधारित नमुन्यातील डिजिटल स्वाक्षरीत 7/12 मोफत वाटप करण्याचा शुभारंभ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पुरंदर तालुक्यातील खळद येथे करण्यात आला होता.

जिल्ह्यात एकूण खातेदारांची संख्या 12 लाख 34 हजार 471 इतकी असून त्यापैकी 5 डिसेंबरपर्यंत अखेरपर्यंत 10 लाख 10 हजार 278 सातबारा मोफत वाटप करण्यात आले आहेत.  उर्वरित 2 लाख 24 हजार 193 सातबारा वाटप करावायाचे आहेत. यापैकी 7 डिसेंबरचे (7-12) औचित्य साधून एकाच दिवसात 1 लाख 7/12 वाटप करण्याचे नियोजन जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी केलेले आहे. एकूण 557 सजांच्या गावी तलाठ्यांकडून  मोफत 7/12 चे वाटप करण्यात येणार आहे.

शासन निर्णयानुसार लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालती आयोजित करण्यात येवून जनतेच्या प्रलंबित साध्या/वारस/तक्रारी फेरफार नोंदी निर्गत करण्यात येत  आहेत. कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी झाल्याने मागील महिन्यात झालेल्या फेरफार अदालतीमध्ये 3 हजार 369 इतक्या नोंदी निर्गत झालेल्या आहेत. डिसेंबर महिन्यात दुसऱ्या बुधवारी 8 डिसेंबर 2021 रोजी तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर फेरफार अदालत आयोजित करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात 6 डिसेंबरपर्यंत मुदत पूर्ण झालेल्या 11 हजार 789  नोंदी प्रलंबित असून या नोंदी मध्ये प्रामुख्याने साध्या / वारस / तक्रार व मुदत पूर्ण झालेल्या सर्व प्रकारच्या नोंदी निर्गती करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळकायदा शाखेकडून  संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार जास्तीत जास्त नोंदी निर्गत करण्याच्यादृष्टीने फेरफार अदालतीमध्ये प्रयत्न केले जाणार आहेत. फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडळ स्तरावर संपर्क अधिकारी यापूर्वीच नियुक्त केले आहेत.

उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांनादेखील काही फेरफार अदालतीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. 8 डिसेंबर रोजी होणाऱ्या फेरफार अदालतीमध्ये फेरफार नोंदी प्रलंबित असलेल्या व्यक्तींनी संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित राहून मंडळ अधिकारी यांना आवश्यक ते कागदपत्र उपलब्ध करून द्यावीत आणि  आपल्या नोंदी निर्गत करून घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केले आहे.

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन!

0

मुंबई, दि. ६ डिसेंबर – भारतासारखा एवढा मोठा देश, विविधतेने नटलेला देश त्याला एका चौकटीत ठेवण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने केले आहे आणि लाखो जीवनांचा विकास बाबासाहेबांनी केला. म्हणून जगात ते एकमेव महामानव असतील की ज्यांच्या महापरिनिर्वाणदिनी एवढा मोठा जनसमुदाय त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतो, असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी चैत्यभूमीला भेट देऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. त्यांनतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले, घटना दिली, केवळ त्यामुळेच आपण आज उभे आहोत, मानसन्मान मिळवतोय. म्हणून त्या महापुरुषाच्या आठणवणीने आज सदगदित व्हायला होतेय.
आज आपण पाहतोय की देशामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर विविध प्रश्न निर्माण होतायत. परंतु त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच येते की, संविधान, घटना आणि कायदा असेही त्यांनी सांगितले.
चैत्यभूमी आणि परिसरात ज्या पद्धतीने व्यवस्था उभ्या करायला पाहिजेत त्या दिसत नाहीत. कुठल्याही प्रकारचे नियोजन दिसले नाही. कोरोना संपुष्टात आल्यानंतर या ठिकाणी गर्दी उसळणार हे महापालिका आणि राज्य सरकारने गृहीत धरून तशी व्यवस्था करायला हवी होती. परंतु यापैकी काहीच दिसले नाही. स्वच्छतागृहव, पाणी, नाश्ता, भोजनाची व्यवस्था किंवा ट्राफिकचे नियोजन यामध्ये विस्कळीतपणा दिसला. प्रशासनाचे दुर्लक्ष झाले ही वस्तुस्थिती आहे, अशी टीका प्रविण दरेकर केली

लाईट हाऊस उपक्रम समाजाला दिशा देणारा : चंद्रकांत पाटील

0
  • सभागृह नेते बिडकर यांचे केले कौतुक

पुणे-शाळा, महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच ‘कौशल्य विकास शिक्षण’ गरजेचे आहे, यासाठी लाईट हाऊस सारखे उपक्रम अधिकाधिक ठिकाणी सुरू करणे गरजेचे आहे. हीच गरज लक्षात घेऊन सभागृह नेते गणेश बिडकर यांनी आपल्या भागात सुरू केलेला लाईट हाऊस उपक्रम समाजाला दिशा देणारा आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सभागृह नेते बिडकर यांच्या कामाचे कौतुक केले.
पुणे महानगपालिका आणि पुणे सिटी कनेक्ट यांच्या वतीने सोमवार पेठेतील पालिकेच्या भोलागिरी प्राथमिक शाळेत युवक युवतींना आपल्या पायावर उभे राहता यावे यासाठी लाईट हाऊस सुरू करण्यात आले आहे. पालिकेचे सभागृह नेते बिडकर यांच्या विशेष प्रयत्नांतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोमवारी झाले त्यावेळी ते बोलत होते. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील कांबळे, सभागृह नेते गणेश बिडकर, पुणे सिटी कनेक्ट चे चेअरमन गणेश नटराजन, वॅनडरलॅन्ड कंपनीच्या रश्मी आर्या, पालिकेच्या समाज विकास विभागाच्या उपायुक्त रंजना गगे, शिक्षण प्रमुख मीनाक्षी राऊत, भवन विभागाचे प्रमुख शिवाजी लंके, गणेश सोनुने यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. हा प्रकल्प चालविण्यासाठी वॅनडरलॅन्डच्या वतीने आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
बदलत्या काळानुसार शिक्षणामध्ये देखील आवश्यक ते बदल करणे आवश्यक आहे. मात्र आजही आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल झालेले नाहीत. परिणामी मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत असल्याचे चित्र आहे, असे पाटील म्हणाले. करोनाच्या काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या हे वास्तव विसरता येणार नाही. या भागातील १८ ते ३० वयोगटातील तरुण तसेच तरुणींना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी, लाईट हाऊसच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांची ही गरज ओळखून बिडकर यांनी पुढाकार घेत हा उपक्रम सुरू केला ही मोठी आनंदाची गोष्ट असून असे उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू कसे होतील, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले. पुण्यासह संपूर्ण राज्यात असे लाईट हाऊस सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नटराजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी कंपनीच्या वतीने या उपक्रमासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे आर्या यांनी स्पष्ट केले.
सोमवार पेठेत सुरू करण्यात आलेल्या लाईट हाऊस मध्ये दरवर्षी १८ ते ३० वयोगटातील २५० विद्यार्थ्यांना या कौशल्य विकास कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. यामध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंग, हार्डवेअर, डिजिटल मार्केटिंग, स्पोकन इंग्लिश, टॅली, ॲनिमेशन, फोटोग्राफी, मोबाईल रिपेअरिंग, फॅशन डिझायनिंग असे अनेक कोर्स शिकविले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


देशातील पथदर्शी प्रकल्प म्हणून लाईट हाऊस ची ओळख आहे. शहरातील विविध भागात ११ ठिकाणी लाईट हाऊस सुरू असून सात हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊन रोजगार मिळाला आहे. तरुणाईला आपल्या पायावर सक्षमपणे उभे राहता यावे, यासाठी पुढील काळात मोठ्या संख्येने अशा पद्धतीचे लाईट हाऊस सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

  • गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसींना 27 टक्के आरक्षण देता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

0

मुंबई -स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे आगामी महापालिका, जिल्हापरिषद, नगर पंचायत निवडणुकांच्या दृष्टीकोनातून ही हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने आज दिलेला आहे.

ओबीसींच्या 27 टक्के आरक्षण असलेल्या जागांच्या निवडणुकांवर कोर्टाने स्थगिती दिली आहे. इतर जागांच्या निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसल्याचे कोर्टाने यावेळी स्पष्ट केले आहे. आगामी महाराष्ट्रातील स्थानिक विकास संस्थांच्या निवणुकांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. कोर्टाने दिलेल्या या निर्णयाचा राज्य सरकारला मोठा धक्का मानला जात आहे.

कॅबिनेटने दिली होती मंजूरी

23 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत ओबीसींना निवडणुकीत आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर राज्य सरकारने अध्यादेशाचा मसुदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला. कोश्यारी यांनी अध्यादेशावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्यात बदल करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला होता.

आरक्षणाच्या टक्केवारीचे औचित्य सिद्ध करण्यासाठी ठोस आकडेवारी उपलब्ध नसल्याच्या कारणावरून यावर्षी मार्चमध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली होती. एकूण आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असेही सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला म्हटले होते. आतापर्यंत महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत ओबीसींना 27 टक्के आरक्षण मिळत आहे.

असे असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या अध्यादेशाद्वारे ओबीसी आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला होता. राज्याच्या विधी व न्याय विभागाने एका अध्यादेशाद्वारे ओबीसींसाठी निवडणूक कोटा निश्चित करण्याचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या अवास्तव असल्याचे म्हटले होते.

रमणबागेला ७५ लाख रुपयांची देणगी

0

पुणे-

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या रमणबाग प्रशालेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांनी ७५ लाख रुपयांची देणगी दिली. शाळेच्या १९६५ च्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात धनादेश सुपूर्द करण्यात आला.

यापूर्वी चौधरी यांनी प्रशालेला पन्नास लाख रुपयांची देणगी दिली होती. त्याचा विनियोग करून विद्यार्थ्यांसाठी पथदर्शक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. शाला समितीचे अध्यक्ष अड अशोक पलांडे, प्रबंधक डॉ. सविता केळकर, मुख्याध्यापक सुनील शिवले, उपमुख्याध्यापिका अर्चना पंच, पर्यवेक्षक्‍ दीलीप रावडे, सुरेश वरगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुण्यात भाजपचेच अस्तित्व-देवेंद्र फडणवीस

0

२५ डिसेंबरला भाजपचे अटलशक्ती महासंपर्क अभियान

पुणे, ता. ६ : पुण्यात लोकोपयोगी कामे होत असताना सत्ता आणि संघटन एकत्रित काम करीत आहेत, त्यामुळे शहरात जिथे जार्इल तिथे भाजपचेच अस्तित्व जाणवते, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी (२५ डिसेंबर) शहर भाजपच्या वतीने अटलशक्ती महासंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या प्रचारार्थ तयार करण्यात आलेली पुस्तिकेचे प्रकाधन, बोधचिन्ह आणि पक्षाच्या यूट्यूब चॅनेलचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नारायण राणे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, माजी आमदार योगेश टिळेकर, बापूसाहेब पठारे, संघटन मंत्री रवी अनासपुरे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, दत्ता खाडे, दीपक पोटे, संदीप लोणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट म्हणजेच मतदारांशी थेट संपर्क हे भाजपचे पारंपरिक शक्तीस्थळ आहे. मतदारांपर्यंत केंद्र आणि महापालिकेच्या माध्यमातून केलेली विकासकामे आणि योजना पोहोचवा. त्यासाठी अटलशक्ती महासंपर्क अभियान महत्त्वाचे आहे. सर्व कार्यकर्त्यांनी ते मनावर घ्या. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनावर घेतले तर ते काहीही करू शकतात. पुण्यात चांगले काम केले आहे. लोकांमध्ये सकारात्मकतेची भावना आहे. मागच्या महापालिका निवडणुकीतील रेकॉर्ड तोडून आपण त्यापेक्षा जास्त जागा जिंकू शकतो. त्यासाठी बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना कार्यरत करण्यासाठी योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करा.

राणे म्हणाले, पुणेकरांना नागरी सुविधा देऊन, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करा. भाजपचे पुण्यात वर्चस्व आहे. लोकसंपर्क, लोकांचा विश्वास, जागरुकता, नियोजन, जिद्द, निष्ठा आणि प्रामाणिकपणाची जोड यामुळे निवडणुकीत विजय खेचून आणण्याचे कौशल्य प्राप्त करता येते. राजकारणात केवळ आत्मविश्वास कामाचा नाही, तर सैन्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी निवडणुकीत विजय मिळेपर्यंत जागरुक राहायला पाहिजे.

पाटील म्हणाले, भाजपचे ३३ हजारहून अधिक कार्यकर्ते २५ डिसेंबरला एकाच दिवसात पुणे शहरातील दीड लाखांहून अधिक घरांत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे कार्य घराघरात पोहचविण्यासाठी अटलशक्ती महासंपर्क अभियान राबविणार आहेत. केंद्र सरकारच्या लोकोपयोगी योजना, महापालिकेची विकासकामे घरोघरी पोहोचविली जाणार आहेत या माध्यमातून संघटनचे सक्षमीकरण आणि जनसंपर्क वाढविण्यात येणार आहे.

शहराध्यक्ष मुळीक म्हणाले, सहा लाख नागरिकांपर्यंत पोहोचण्याची योजना करण्यात आली आहे. त्यासाठी मंडल बैठका, प्रभाग बैठका, शक्ती केंद्र बैठका, बूथ बैठका, बूथ समिती बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध योजनांची माहिती देणारी पुस्तिका तयार करण्यात आली आहे. तिचे दीड लाख कुटुंबांमध्ये वितरण करण्यात येणार आहे.

अभियानाचे प्रमुख राजेश पांडे म्हणाले, अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आठ मंडलातील ६० प्रभागप्रमुख, ६०० शक्तीकेंद्र प्रमुख, ३००० बूथप्रमुख आणि ३३ हजार बूथ संपर्क कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. विविध योजना आणि विकासकामांबरोबर कॉल सेंटर, मतदार नोंदणी, यू ट्यूब चॅनेलची माहिती दिली जाणार आहे.

डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाची व विचारांची उपेक्षा ठाकरे सरकारने थांबवावी- भाजपाचे सुनील माने यांचे आवाहन

0


पुणे-ठाकरे सरकारने दादरच्या इंदुमिल परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत तारखांवर तारखा जाहीर करीत जनतेस झुलवत ठेवले असून बाबासाहेबांच्या स्मृती जिवंत राखणाऱ्या प्रकल्पांची कामे रखडल्याने केवळ मतांच्या राजकारणासाठी ठाकरे सरकार बाबासाहेबांचा वापर करत आहे, असा आरोप भाजपचे शहर चिटणीस श्री. सुनील माने यांनी केला. डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथसंपदेची छपाईदेखील ठाकरेसरकारच्या नाकर्तेपणामुळेच रखडली असून न्यायालयाने कान उपटल्यानंतरही सरकार हललेले नाही, अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली.त्यांनी सांगितले की , २००४मध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आंबेडकर स्मारकाचे आश्वासन दिले होते. काँग्रेसने रखडविलेल्या या स्मारकासाठीमोदी सरकारनेच पुढाकार घेऊन दादरच्या इंदू मिलची २३०० कोटींची जमीन एकही पैसा नघेता महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित केली.  पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या हस्ते २०१५ मध्ये स्मारकस्थळाचे भूमिपूजन झाले. फडणवीस सरकारनेस्मारकाच्या कामास गती दिली. आघाडी सरकारच्या काळात कामथंडावले असून कामाला विलंब होत असल्याचे कारण देत खर्चाचे आकडे वाढविण्याचा उद्योगसुरू आहे. २०१४ मध्ये साडेचारशे कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प ठाकरे सरकारच्यादिरंगाईच्या धोरणामुळे एक हजार कोटींहून अधिक खर्चावर जाणार आहे. काँग्रेसने चालढकल केल्याने अखेर लिलावाच्या अवस्थेत गेलेले लंडनमधीलबाबासाहेबांचे निवासस्थानही फडणवीस सरकारच्या पुढाकारामुळेच महाराष्ट्र सरकारला घेता आले, याची आठवणही श्री. … यांनी करून दिली. जपानमधील विद्यापीठातही पुतळ्याच्या रूपाने उभे राहिलेल्या बाबासाहेबांच्या स्मारकाचेअनावरण देवेंद्र फ़डणवीस यांच्या हस्ते झाले होते. जगभरातील अनेक देश बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत असताना  ठाकरे सरकार मात्र, राष्ट्रीय स्मारकाच्या पूर्ततेसाठी लागोपाठ मुदतवाढ घेत आहे, असा आरोप त्यांनी केला.गेल्यावर्षी स्मारक स्थळावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीसमारंभालाही आघाडी सरकारमधील राजकारणाचे गालबोट लागले होते. सरकारमधील काँग्रेस वराष्ट्रवादीच्या नेत्यांना निमंत्रणे नव्हतीच, पण ज्यांच्या कार्यकाळात याकामास गती मिळाली, ते माजी मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनाही डावलले गेले होते. महाराष्ट्रच नव्हे, तरदेशाला अभिमानास्पद असलेल्या एका राष्ट्रीय महत्वाच्या प्रकल्पाच्या कामातहीराजकारण केले जाते, हेच त्या वेळी ठाकरे सरकारने दाखवून दिले होते, अशीटीका त्यांनी केली. डॉ.आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेच्या छपाईचे कामही संथगतीने सुरू असून, जगातीलसर्वोत्कृष्ट घटना देशाला देणाऱ्या या महामानवाच्या विचारांचीच ही उपेक्षा आहे, असाआरोप श्री. माने यांनी केला. बाबासाहेबांच्या भाषणांचा समावेश असलेल्या ग्रंथांनाप्रचंड मागणी असतानाही, त्यांच्या प्रकाशनात दिरंगाई करणे म्हणजे बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यात अडथळे आणण्यासारखेच आहे, असेते म्हणाले. उच्च न्यायालयाने अलीकडेच याची दखल घेतल्यानंतर आता तरी नाकर्तेपणा बाजूला ठेवावा आणि जगाने स्वीकारलेल्या या महामानवाच्या प्रेरणादायी विचारांना न्याय द्या, अशी मागणीही त्यांनी केली.

प्रामाणिक करदात्याच्या पाठीत खंजीर खुपसू नका -आबा बागुलांचे पुन्हा एकदा आवाहन

0

 पुणे – कर चोरांना साथ( अभय ) देऊन जे प्रामाणिक करदाते आहेत त्यांच्या पाठीत खंजीर खुपसू नका असे पुन्हा एकदा आवाहन कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केले आहे.

ते म्हणाले ,’महानगरपालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे वारंवार मिळकत कराची अभय योजना आणण्याचा घाट घातला जात असून प्रशासन यास मूक पाठींबा देत आहे. परिणामी पुणे महानगरपालिकेचे कोट्यावधींचे नुकसान होत आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थांचे मिळकत कर हे प्रमुख उत्पन्नस्त्रोत असल्याने हा कर वेळेत भरावा व वेळेत कर न भरल्यास प्रति महिना २ टकके दंड घेणेबाबत महाराष्ट्र महापालिका अधिनियमामध्ये तरतूद केलेली आहे. हा कायदा राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू आहे. यामध्ये एखाद्या मिळकतीबाबत निर्णय घेण्याची असलेल्या तरतुदीचा चुकीचा अर्थ काढत वारंवार अभय योजना आणणे, म्हणजे करबुडव्यांना सवलत व प्रामाणिक कर भरणाऱ्यांवर अन्याय होतो.

लोकप्रतिनिधींनी कितीही आग्रह केला तरी आपणा महापालिकेच्या हिताचा निर्णय घेऊन कायद्यात तरतूद नसलेली अभय योजना आणू नये. पूर्वी सर्वसामान्यांसाठी मिळकत कराची अभय योजना आणली होती, हि बाब आपण समजू शकतो, परंतु करोडोची थकबाकी असलेल्या मिळकतींना अभय योजना देणे महापालिकेच्या हिताचे नाही.

मिळकत कर वेळेत वसुल करणे हे प्रशासनाचे कर्तव्य असून वेळेत कर वसूल न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याच्या C.R. मध्ये नोंद करणेबाबत तरतूद आहे.  मिळकत कर वेळेत वसूल न झाल्याने उत्पन्न कमी झाल्याने पुणेकरांना अनेक विकासकामे व प्रकल्पांपासून वंचित रहावे लागले आहे. एच.सी.एम.टी.आर. सारखा शहरातील वाहतूक समस्या सोडविणारा प्रकल्प व अशी अनेक उदाहरणे आहेत.
        मिळकत कर अभय योजना आणण्याची हालचाल चालू झाल्याने माहिती घेतली असता २१७५ कोटींची थकबाकी असून १ ते २ कोटी थकबाकी पर्यंत असलेल्या मिळकतींना सवलत देणेबाबत विचार विनिमय चालू असून हे महापालिकेच्या हिताचे नाही.

        तरी आपण १ ते २ कोटी थकबाकी असलेल्या मिळकतींना मिळकत कराची अभय योजना आनेस कॉंग्रेस पक्षाचा विरोध असून आपण यावर लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी पडू नये, हि विनंती

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

0

 पुणे- शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज सोमवार     दि. ०६/१२/२०२१ रोजी काँग्रेस भवन, पुणे येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  रमेशदादा बागवे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आहे.

     यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, नगरसेविका लताताई राजगुरू, सेवादल अध्यक्ष श्री. प्रकाश पवार, अल्पसंख्याक सेलचे अधयक्ष यासीन शेख, माजी नगरसेवक शिवाजी बंगर, भगवान कडू, डॉ. अनुप बेगी, मिरा शिंदे, दुर्गा शुक्रे, विठ्ठल गायकवाड, रमाकांत साठे, देविदास लोणकर, अस्लम मिरजकर आदी उपस्थित होते.

     या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. शिलार रतनगिरी यांनी केले व आभार प्रदर्शन अक्षय रतनगिरी यांनी केले. तसेच यावेळी विविध सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी विधानभवन येथे अभिवादन

0

मुंबई, दि. 6 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यासंदर्भात विशेष उपक्रम राबविणाऱ्या वाचनालयांना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी 10 लक्ष रुपयांचा निधी जाहीर केला. यासंदर्भात उपसभापती कार्यालय येथे संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी विधानमंडळाचे उप सचिव विलास आठवले, राजेश तारवी, उप सभापती, विधानपरिषद यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी रविंद्र खेबुडकर, सचिन चिखलकर आदिंसह अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गानेही गुलाबपुष्प अर्पण करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.

आर्यन पंप्स आशियाई ज्युनियर(कुमार) टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत साहेब सोधीचा मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय

0

पुणे,6 डिसेंबर 2021: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) आणि डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित आर्यन पंप्स आशियाई ज्युनियर(कुमार) टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य ड्रॉ च्या पहिल्या फेरीत मुलांच्या गटात भारताच्या साहेब सोधी याने मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात भारताच्या साहेब सोधी याने थायलंडच्या तिसऱ्या मानांकित व नुकत्याच पार पडलेल्या आयटीएफ ग्रेड 3कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या तानापत निरूद्रोणचा 6-2, 2-6, 7-5असा तीन सेटमध्ये पराभव केला. भारताच्या सहाव्या मानांकित चिराग दुहानने कझाकस्तान च्या आरतूर खेरडीनव्होचा टायब्रेकमध्ये 7-6(6), 6-1 असा पराभव करून आगेकूच केली. भारताच्या आठव्या मानांकित युवान नांदलने मानव जैनचा 4-6, 7-5, 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. अनर्घ गांगुलीने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या जैष्णव शिंदेचा टायब्रेकमध्ये 7-6(5), 6-0 असा पराभव केला.

मुलींच्या गटात पहिल्या फेरीत कशिश बोटेने परी चव्हाणला 6-4, 3-6, 6-4 असे तीन सेटमध्ये पराभूत केले. पुण्याच्या रुमा गायकैवारीने कोतिष्ठा मोडकचा 6-2, 6-2 असा सहज पराभव केला. कोल्हापूरच्या सोनल पाटील हिने लक्ष्मी गौडाला 7-5, 6-0 असे नमवले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: मुले:

युवान नांदल (भारत) [8] वि. वि. मानव जैन (भारत) 4-6, 7-5, 6-3;

चिराग दुहान (भारत) [6] वि.वि.आरतूर खेरडीनव्हो (कझाकस्तान) 7-6(6), 6-1;

इस्लाम ओरिनबासर (कझाकस्तान)वि. वि. आर्यन शाह (भारत)2-6, 6-3,6-4;

रुशील खोसला (भारत) वि.वि. स्कंध प्रसन्न राव (भारत) 6-2, 6-1;

डॅनिल फेल्कर (कझाकस्तान)वि.वि.मुनी अनंत मणी (भारत) 6-2, 6-4;

मॅक्स बा ट्युटेन्को(कझाकस्तान) [5] वि.वि.रेथिन प्रणव सेंथिल कुमार (भारत) 6-3, 6-4;

डेनिम यादव (भारत) [7] वि. वि. दक्ष अगरवाल (भारत) 7-6(7), 6-1;

अनर्घ गांगुली(भारत)वि.वि.जैष्णव शिंदे (भारत)7-6(5), 6-0;

साहेब सोधी (भारत) वि.वि. तानापत निरूद्रोण (थायलंड) [3] 6-2, 2-6, 7-5;

पहिली फेरी: मुली:

हयु किनोशिता (जपान) [6]वि.वि.रिया उबवेजा (भारत) 6-2, 6-2;

कशिश बोटे (भारत)वि.वि.परी चव्हाण (भारत)6-4, 3-6, 6-4;

रुमा गायकैवारी (भारत) वि.वि.कोतिष्ठा मोडक (भारत) 6-2, 6-2;

क्रिस्ती बोरो (भारत) वि.वि.चहाना बुधभट्टी (भारत) 6-1, 6-7(5), 6-0;

होनोका उमेदा (जपान)वि.वि.अन्या जेकब (भारत) 1-6, 6-2, 6-2;

श्रुती अहलावत (भारत) [3] वि.वि.नेमा सारा किस्पोटा (भारत) 6-1, 6-1;

सोनल पाटील (भारत) वि.वि.लक्ष्मी गौडा (भारत) 7-5, 6-0;

सारा साईतो (जपान) [4]वि.वि.नंदिनी दीक्षित (भारत) 6-2, 6-1;

सुहिता मारुरी (भारत) [8] वि.वि. प्रियांशी पानिग्राही (भारत) 6-0,6-0;

यू-युन ली (तैपैई) [2]वि.वि.आर्नी रेड्डी येल्लू (भारत) 6-1, 6-1;

एरकझेन एरीस्टेंबिकोव्हा (कझाकस्तान)वि.वि.भूमी शेखर (भारत) 6-0, 6-0.

घाबरू नका, काळजी घेऊ यात : महापौर मुरलीधर मोहोळ

0

पुणे-

आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान सेवा सुरू झाल्यापासून, पुण्यात विमानप्रवास करून येणाऱ्या प्रत्येकाची महापालिकेच्या वतीने RT-PCR टेस्ट केली जात होती. त्यातीलच फिनलँड येथून प्रवास करून आलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रोन व्हेरियंटची लागण असल्याचे समोर आले आहे. लागण झालेल्या व्यक्तीची प्रकृती चांगली आहे. तरीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून त्या व्यक्तीच्या इमारतीमधील सर्वांची RT-PCR टेस्ट करण्यात आलेली आहे. पुणेकर नागरिकांनी, कोणत्याही अफवांना बळी पडून घाबरून जाण्याची गरज नाही. महापालिकेच्या वतीने सर्व आरोग्य यंत्रणा सतर्क आणि सुसज्ज ठेवण्यात आलेली आहे. परदेशातून आलेल्या आणि पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. ज्या नागरिकांनी अजूनही कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही, त्यांनी ती त्वरित घेणे अत्यंत गरजेचे आहे.

मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आवश्यक ते प्रयत्न करू – खासदार शरद पवार

0

मराठी भाषिकांनी मराठी साहित्य नव्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत – शरद पवार

नाशिक,दि.५ डिसेंबर :- आपल्याला नव्या पिढीतून रोबो घडवायचे नाहीत. माणसं घडवायची आहेत. त्यासाठी मराठी मन जपायला हवं आणि ते मातृभाषेतूनच जपलं जाऊ शकतं असा माझा विश्वास आहे. साहित्य रसिकांना माझी विनंती की, त्यांनी मराठी भाषिकांनी मराठी साहित्य नव्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. संमेलनाच्या समारोप प्रसंगी नाशिकच्या गोदाकाठी हा साहित्य कुंभमेळा यशस्वीपणे आयोजित करणाऱ्या लोकहितवादी मंडळाचे, संमेलानाध्यक्षांचे तसेच सहभागी साहित्यिक व साहित्यप्रेमींचे मी मन:पुर्वक अभिनंदन करतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रज नगरी भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे खासदार शरद पवार, स्वागताध्यक्ष मंत्री छगन भुजबळ,ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ,महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्य संमेलनाचा समारोप करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार हेमंत गोडसे,कार्यवाह दादा गोऱ्हे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सुधीर तांबे, आमदार हिरामण खोसकर, हेमंत टकले, पंकज भुजबळ, जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, दीपक चंदे, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, मिलिंद कुलकर्णी, प्राचार्य प्रशांत पाटील, दिलीप साळवेकर, संजय करंजकर, सुभाष पाटील, किरण समेळ, प्रतिभा सराफ, प्रशांत देशपांडे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खासदार शरद पवार म्हणाले की,इंग्रजी वाघीणीचे दूध असेल पण एतदेशीय भाषांच्या विकसनावर ते विरजनाचं काम करत होतं . विसाव्या शतकाच्या प्रारंभी मराठी भाषेच्या संवर्धनाचा विडा अनेक राजकीय , समाजसुधारक , सुशिक्षित लोकांनी उचलला . महात्मा ज्योतीराव फुले , सावित्रीबाई फुले , महादेव रानडे , गोखले , आगरकर , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , वि . दा . सावरकर कितीतरी नावे घ्यावीत ज्यांनी राजकीय अथवा सामाजिक कार्याबरोबरच मराठी साहित्याची सेवा केली . मराठी भाषेच्या संवर्धनाची तळमळ असणाऱ्या सुशिक्षितांमध्ये ज्ञानकोशकार तथा श्रीधर व्यंकटेश केतकरांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल . छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहारकोशाचा घालून दिलेला आदर्श त्यांनी अंगिकारला , केतकरांना नेहमी वाटे की , मराठी माणसाचे बौद्धिक स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर मराठी भाषेचे स्वामीत्व अबाधित राहिले पाहिजे . देशी भाषेत राज्यकारभार असणारे सरकार खरे सरकार अशी त्यांची भुमीका होती . न्यायालयीन निवाडे देशी भाषेत व्हावे असे ठाम त्यावेळी त्यांनी मांडले होते . राज्यकारभारात मराठी आली आहे पण दुर्दैवाने आजही न्यायालयीन निवाडे सामान्य माणसांसाठी दुर्बोध आहेत असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रज गेले पण अध्यापन क्षेत्रात मराठी भाषेचा प्रवास तसा खडतर राहिला. भाषावार प्रांतरचनेनुसार राज्ये अस्तित्वात येत असताना भाषिक अस्मितेचा अंगार मुलत होता. भाषावार राज्य निर्मितीनंतर राज्यांतर्गत भाषेची अभिवृद्धी होणे अपेक्षित होते , परंतू तसे म्हणावे त्या वेगाने घडत नव्हते , पदवी परीक्षेला मराठी विषय पहिल्यांदा १९२१ साली आला. मात्र आपणास आश्चर्य वाटेल की मुंबई विद्यापीठात मराठी विभाग स्वातंत्र्यानंतर २२ वर्षांनंतर म्हणजे १९६९ -७० मध्ये सुरू झाला . मराठी भाषेच्या संवर्धनात स्व . यशवंतराव चव्हाणांनी मात्र अतिशय कष्ट घेतले. ह्या प्रसंगी त्यांच्याविषयी कृतज्ञता प्रकट करणे औचित्याचे आहे . ते स्वतः एक उत्तम लेखक तर होतेच पण साहित्यवाचनात त्यांची आजही कोणी बरोबरी करू शकत नाही असे त्यांनी सांगितले.

मराठी भाषेचा विकास केवळ साहित्यिक अंगाने होऊ नये तर मराठी भाषेच्या माध्यमातून वैज्ञानिक आविष्कार घडावेत अशी त्यांची पोटतिडिक होती . त्यांनी राज्यात स्वतंत्र भाषा संचालनालय स्थापन केले , शासन व्यवहार कोश निर्माण करण्यात पुढाकार घेतला . त्यांच्या कारकीर्दीत राज्यात महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ , मराठी विश्वकोश मंडळ स्थापन झाले . महाराष्ट्र शासनाने वाजवी किमतीत ग्रंथ प्रकाशित करण्याचे कार्य हाती घेतले . महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील पुस्तकांची निर्मिती करण्याचे मोलाचे काम केले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोश निर्मितीचे शिवधनुष्य उचलले . ह्या सर्व प्रयत्नांमुळे कोश निर्मितीत महाराष्ट्र राज्य इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, यशवंतरावांच्या कालखंडात हे जोमाने चालणारे प्रयत्न नंतरच्या काळात थंड झाले. ग्रंथनिर्मिती मंडळ आता बंद पडले आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राजकीय इच्छाशक्ती कुठे कमी पडली याचे सिंहावलोकन करण्याची वेळ आता आली आहे . राज्य मराठी भाषिकांचे राज्य म्हणून निर्माण झाले त्या राज्यात ममराठी भाषे मचे नेमके काय झाले ? आपण आपल्या भाषेच्या जतनासाठी संवर्धनासाठी इतक्या वर्षात काय केले ? आज मराठी भाषा नेमकी कुठे आहे ? याचा लेखाजोखा मांडला जावा आणि मराठी भाषेच्या सर्वागिण वृद्धीसाठी राज्यशासनाने पुन्हा कार्यक्रम हाती घ्यावा असे मी आवाहन करतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, संगणकीय युगात माहितीचा विस्फोट झाला आहे. परकीय भाषेतील अनेक शब्द मराठी भाषेत प्रवेश करू लागले आहेत . परकीय भाषांमध्ये नवनवीन शब्दांची निर्मिती होत आहे . त्यामुळे सध्याचे शब्दकोश कालानुरूप सुधारित करणं महत्वाचे आहे . इतर भाषांमध्ये होतं ते काम वेगाने घडत आहे . आपणही से करावयास हवे. बहुजनांच्या भाषेला बोलीभाषेला साहित्यात व मराठी कोशात अधिकाधिक स्थान द्यावयास हवे. प्रारंभी समाजसुधारकांच्या लिखाणाला शब्दांना कोशकार स्थान देत नसत . ज्ञानकोशकार केतकरांवर देखील तशी टिपणी झाली होती . ज्योतीराव फुलेंच्या साहित्यातील शब्दांना कोशकारांनी दूर ठेवले होते . परंतु बहुजन भाषेतील शब्द मनाची पकड पटकन घेतात . भाषा पांडित्यप्रचूर, क्लिष्ट न राहता सोपी , ओघवती होते. आपण पाहातो की , संगणक अथवा इंटरनेटच्या जमान्यात कॅची वर्ड संज्ञा पुढे आली आहे. सोपे आणि पकड घेणारे शब्द मराठी साहित्यात आले तर त्याची नव्या पिढीला गोडी लागेल . दर दहा मैलाला भाषा बदलते असे म्हणतात . थोडक्यात प्रत्येक भागाची एक वेगळी भाषाशैली आहे . मला वाटते की , आपण आपल्या प्रमाण भाषेबद्दलचा दुराग्रह सोडून ह्या सर्व इतर शैलींना शब्दांना स्थान द्यावे. मराठी भाषा स्थानीक बोलीभाषांच्या बाबतीत समावेशक झाली तरच ती अधिक समृद्ध होईल असे माझे ठाम मत असल्याचे त्यांनी सांगितले.

पाठ्यपुस्तकांच्या रचनेत आधुनिकता आणता येईल का ? याकडे लक्ष देणे व आधुनिकता आणण्यासाठी सातत्याने काम करणे अत्यावश्यक आहे . नाहीतर माहितीच्या वेगवान जगात मराठी खूप मागे पडेल . तसेच पदवी – पदव्युत्तर लिखाणात मराठी भाषा कमी होत चालली आहे . यशवंतराव चव्हाणांना मराठी भाषेची वैज्ञानिक प्रांतात वृद्धी व्हावी अशी कळकळ होती . दहावी पर्यंत विज्ञानात मराठी भाषा आहे . परंतू पदवी व नंतरच्या अध्यापनात मराठी दिसत नाही . मराठी भाषेची पिछेहाट होण्यामागे हे एक महत्वाचे कारण आहे . महाविद्यालयीन शिक्षणासाठी इंग्रजी भाषा महत्वाची ह्या समजामुळे शालेय शिक्षणासाठी सुद्धा मराठी पेक्षा इंग्रजी भाषेला पसंती दिली जाते हा धोका मार मोठा आहे . संख्येअभावी मराठी शाळा बंद होण्याइतपत गंभीर परिस्थिती आज निर्माण होताना दिसते आहे . त्यामुळे पदवी व नंतरचे विज्ञान , वाणिज्य व इतर शिक्षण मराठीतून देण्याचा विचार व्हावा असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, नाशिक ही कुसुमाग्रजांची कर्मभूमी त्यांनी आपल्या काव्यातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्याग्रह मांडला आहे. सावरकर हे विज्ञानवादी होते. सावरकरांच्या नावाला कोणी नाशिककर व महाराष्ट्रातील नागरिक करू शकत नाही. मात्र काही लोक त्यावर वाद निर्माण करतात याची खंत आहे. कुसुमाग्रजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साहित्य संमेलनाला त्यांचे नाव दिले हे स्वागतार्ह आहे. मराठी साहित्य संमेलनात त्यांचे मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना ज्ञानपीठ हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. मराठी भाषेच्या विकासासाठी त्यात्यासाहेब यांनी अविरत प्रयत्न केले असल्याचे सांगत साहित्य संमेलन म्हटले की वाद निर्माण करणं ही परंपरा पडत आहे काय असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

भाषेचा विकास करण्यासाठी तिचा वापर वाढविणे आवश्यक – न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर

यावेळी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर म्हणाले की,आपल्या राज्यघटनेने विचार करण्याचा आणि विचारांचा विकास करण्यासाठी अधिकार दिला आहे. शिक्षणात मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. बालवयापासूनच मराठी भाषा शिकविली गेली तर त्यात विशेष प्राविण्य मिळवता येणे शक्य आहे. आपली स्वतःच्या भाषेचा अधिक वापर केला पाहिजे. मराठी ही ज्ञान भाषा करावी यासाठी यशवंतराव चव्हाण यांचे प्रयत्न त्या काळापासून होते. ही भाषा ज्ञान भाषा आपल्याला करायची असेल तर तिचा वापर वाढला पाहिजे. मराठी भाषा अधिक वाढविण्यासाठी शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांची देखील तितकीच महत्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे आदर्शच त्यांचा संमेलनालात यथोचित सन्मान – छगन भुजबळ

कविवर्य कुसुमाग्रजांच्या नावाला विरोध का याबद्दल दुःख- छगन भुजबळ

यावेळी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले की, सभामंडपाला कुसुमाग्रज नगरी नाव देण्याचे अगोदरच ठरले होते. मग त्यांच्या नावाला विरोध का ? स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमच्यासाठी आदर्श आहे. संमेलनात त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तरी देखील आमच्या आदर्शचा अपमान झाला असा विरोध केला गेला. हे अतिशय चुकीचे आहे. कारण नसतांना देखील विरोध केला याचं दुःख आहे. असे सांगत नाशिकची द्राक्ष आंबट नाही त्यात आता शरद सीडलेस तर खूपच गोड आहे असा टोला त्यांनी लगावला. हे संमेलन अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न आपण केला. हा उत्सव संपल्यावर आपल्याला गणेशोत्सवाप्रमाणे चुकल्या चुकल्यासारखे वाटणार आहे.नाशिकला येत चला नाशिकला पुन्हा संमेलन होऊद्या अशी गळ साहित्य मंडळाला घातली. तसेच समतेची ही संस्था आपल्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. आपण परत परत नाशिकला या असे आवाहन त्यांनी साहित्यिकांना केले.

यावेळी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनामुळे संमेलनासाठी उशीर झाला. संमेलन घेणे आवश्यक असल्याने महिन्यांपूर्वी संमेलन घेणे हे ठरलं आणि रात्रंदिवस तयारी केली. यासाठी सर्वांचे हातभार लागला. यामध्ये साफसफाई कामगारांच्या विशेष योगदानाबद्दल आभार. तसेच भोजन व्यवस्था, डॉक्टर, सजावट, चित्रकार, शिल्पकार, रांगोळीकर, फुलांची सजावट, जिल्हापरिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, महापौर ,पोलीस यंत्रणा, अग्निशामक यंत्रणा, उद्योजक चांदे, निधी दिलेले सर्व आमदार, महाराष्ट्र शासन, सर्व देणगीदार, उद्योजक चंदे, बालकवी, गझलकार, साहित्यिक, मराठी साहित्य मंडळ, लोकहितवादी मंडळ, मेट भुजबळ नॉलेज सिटी, मराठी भाषा विभाग सर्व पाहुणे, प्रेक्षक, माध्यमे या सर्वांसोबत हे कसं होणार, काय होणार यावर अनेक चर्चा झाली. मात्र उपस्थिती बघितल्यावर या जागेचा निर्णय घेतला त्याबद्दल लोकहितवादी मंडळ आणि महामंडळाचे आभार यावेळी छगन भुजबळ यांनी मानले.

नाशिकच्या संमेलनाची देशातील सर्वोत्कृष्ट मराठी साहित्य संमेलन म्हणून नोंद होईल – मंत्री बाळासाहेब थोरात

यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचे नियोजन मंत्री छगन भुजबळ यांनी अतिशय सुंदर केली आहे. हे संमेलन
नव्या तंत्रज्ञानाने हे साहित्य संमेलन जगभरात जाऊन पोहचले आहे. नाशिक मध्ये झलेलं हे संमेलन देशातील अतिशय सर्वोत्कृष्ट साहित्य संमेलन म्हणून नाशिकच्या साहित्य संमेलनाची नोंद होईल असा विश्वास मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, नाशिकच्या मातीला साहित्याचा इतिहास आहे. ज्या संत ज्ञानेश्वराणी पाया रचला त्यांचे गुरू निवृत्तीनाथ यांनी त्र्यंबकेश्वर येथे साहित्य लिहिले. त्यातून समतेचा संदेश त्यांनी यातून दिला. मराठी साहित्याची सुरुवात या ब्रम्हगिरीच्या पायथ्यापासून सुरू झाली हे विसरता येणार नाही. येथील पाण्यात आणि मातीत मुळातच साहित्य असून या भूमीतून अनेक साहित्य पुढे येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिथे चुकीच घडतंय त्या ठिकाणी साहित्यिकांनी बोललं पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीवर बोललं जातं तेव्हा साहित्यिकांनी गप्प बसता कामा नये. आज स्वातंत्र्यावर बोलल जातंय उद्या घटनेवर बोललं जाईल. अशा वेळी गप्प बसता येणार नाही अन्यथा येणाऱ्या काळात तुम्हाला अस्वस्थता जाणवल्याशिवाय राहणार नाही. ज्या ज्या वेळी राज्यघटना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाईल त्यावेळी लोकशाही व्यवस्था वाचविण्यासाठी साहित्यिकांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

१९७१ च्या युद्धातील इंदिरा गांधी यांचे योगदान अविस्मरणीय-मंत्री सुनील केदार

0

 सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात १९७१ च्या युद्धातील वीर सैनिकांचा सन्मान

पुणे : “भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी धाडसाने आणि धीराने प्रत्येक प्रश्न हाताळला. बांगलादेश मुक्ती संग्रामात इंदिराजींचे आणि माणिक शॉ यांच्या नेतृत्वातील भारतीय सैन्याचे मोठे योगदान आहे. देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा निर्णय घेत इंदिराजींनी भारताला प्रगतीपथावर नेतानाच शत्रू राष्ट्राला भारताकडे वाकड्या नजरेने बघू नका, असा इशारा दिला. स्वतंत्र भारताला मजबूत राष्ट्र म्हणून ओळख मिळवून देण्यात इंदिरा गांधी आणि भारतीय सैन्याचे अविस्मरणीय आहे,” असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले. इंदिराजींना खुद्द अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘दुर्गा’ अशी उपमा दिली होती, ही आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.


अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहांतर्गत १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील वीर सैनिकांचा, वीरमाता व वीरपत्नींना सुवर्ण विजय महोत्सवानिमित्त सन्मानित करण्यात आले. यावेळी संयोजक माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, प्रदेश कमिटीचे वीरेंद्र किराड, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक विनोद मथुरावाला, लता राजगुरू, रफिक शेख, शेखर कपोते, प्रशांत सुरसे, चेतन अग्रवाल आदी उपस्थित होते.


सुनील केदार म्हणाले, “इतिहास नीटपणे माहित असेल, तर उज्ज्वल भविष्याचा प्रवास चांगला होतो. अनेक शूर-वीरांच्या बलिदानातून, योगदानातून हा स्वतंत्र भारत देश सक्षमपणे प्रगतीपथावर चालत आहे. मात्र, आजच्या पिढीतील अनेकांना स्वातंत्र्य लढ्याचे महत्व समजत नाही. त्यामुळे शूर-वीरांचा हा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीला नीटपणे सांगण्याची आवश्यकता आहे. सैन्यातील लोकांसोबत बोलताना सुद्धा स्फूर्ती चढते. देशाचा नागरिक म्हणून आपले कर्तव्य आणि जबाबदारी ओळखली पाहिजे. इतिहास समजून घेत, शूर-वीरांच्या कार्यातून प्रेरणा घेतली पाहिजे.  स्वातंत्र्यलढ्यासह पाकिस्तान, चीन यांच्यासोबत झालेल्या युद्धांचा इतिहास आपण अभ्यासला पाहिजे.प्रास्ताविकात मोहन जोशी म्हणाले, “युद्धातील वीर जवान, बलिदान दिलेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपत्नींचा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटतो. भारतीय सैन्याच्या १९७१ मधील या शौर्याचा स्वर्ण विजय महोत्सव आपण साजरा करतो.” कर्नल साळुंखे, कर्नल पाटील यांनीही आपले अनुभव सांगितले. लेखा नायर यांनी सूत्रसंचालन केले. चैतन्य पुरंदरे आभार मानले.

या वीरांचा झाला सन्मान

१९७१ च्या युद्धातील योगदानाबद्दल कर्नल सदानंद साळुंके, शहीद मेजर दडकर यांच्या वीरपत्नी गीता दडकर, कर्नल संभाजी पाटील, लेफ्टनंट कर्नल सुरेश शिंदे, सुभेदार संपत कोंडे, वायुदलातील रामचंद्र शेंडगे, विठ्ठल बाठे, शहीद हवालदार प्रल्हाद दिघे (वीरपत्नी लक्ष्मीबाई दिघे), शहीद लक्ष्मण जाधव, शहीद तुळशीराम साळुंके (वीरपत्नी मंगलाताई साळुंके), शहीद मारुती माने (वीरपत्नी श्रीमती माने), गोविंद मासाळकर यांना सन्मानित करण्यात आले. सोबतच शहीद सौरभ फराटे (वीरमाता मंगल फराटे), शहीद शिवाजी भोईटे (स्वप्ना भोईटे), मेजर लेखा नायर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

मनातील कथा प्रेक्षकांसमोर ठेवण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम

0

दिग्दर्शन क्षेत्रात पहिल्यांदाच उतरणा-या दिग्दर्शकांनी व्यक्त केल्या भावना

पुणे, दि. ५ डिसेंबर, २०२१ : आयुष्यातील एखादी घटना मनात कोरून राहते. आपल्या मनात त्याची कथा तयार होते. हीच कथा प्रेक्षकांसमोर आणायची असेल तर, चित्रपट हे प्रभावी माध्यम असून, याच माध्यमातून आम्ही आमची गोष्ट सांगायचा पहिला प्रयत्न केला आहे. असे मत चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलेल्या दिग्दर्शकांनी व्यक्त केले.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सुरू असलेल्या १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे ‘कँडिड टॉक्स’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कलात्मक संचालक समर नखाते यांनी आज ‘पिग’, ‘पिंकी एली?’ आणि कंदील या चित्रपटांच्या दिग्दर्शकांशी संवाद साधला.

‘पिग’ या तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शक थमीज, ‘पिंकी एली?’ या कानडी चित्रपटाचे कला दिग्दर्शक रामचंद्र होसूर, ‘कंदील’ या मराटी चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते महेश कंद आदी या वेळी उपस्थित होते.

‘पिग’ हा चित्रपट ग्रामीण भागातील जातीव्यवस्थेवर भाष्य करणारा आहे असे सांगत दिग्दर्शक थमीज म्हणाले, “खालच्या जातीतील आजोबा व नातू यांचे नाते उलगडत असताना समाजातील जातीव्यवस्था व भेदभावांवर बोट ठेवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. तामिळनाडूमध्ये उच्च जातीमध्ये कोंबडी, शेळीचे मांस खाण्याची तर तुलनेने खालच्या जातीत डुक्कराचे मांस खाण्याची पद्धत आहे. मात्र एका उच्च जातीतील व्यक्तीला डुक्कराचे मांस खाण्याची इच्छा होते. ते तयार करण्याची जबाबदारी खालच्या जातीतील आजोबा आणि नातवावर पडते. हे जेवण बनत असताना घडणा-या घटना चित्रपटात दाखविल्या आहेत.”

जेवण, खाद्यसंस्कृती ही सर्व जाती धर्मातील व्यक्तीना एकत्र आणते असे म्हटले जाते. मात्र, एखाद्या व्यक्तीचा फाजील आत्मविश्वास या मध्ये आला तर काय होते, याचे चित्रण चित्रपटात मांडण्यात आले आहे.

नुकत्याच लॉस एंजेलिस येथे झालेल्या चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला ग्रँड ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे चित्रपटात काम केलेल्या सर्वांनीच पहिल्यांदा कॅमे-यासमोर अभिनय केला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक चित्रपट बनवायचे म्हणून घर सोडून चेन्नई शहरात आहे. त्यांनी दहा वर्षे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून अनेक दिग्दर्शकांसोबत काम केले. दिग्दर्शनाचे कोणत्याही औपचारिक शिक्षण न घेता सुरू असलेला त्यांना हा प्रवास प्रेरणादायी असल्याचे मत समर नखाते यांनी व्यक्त केले. आणखी एक विशेष बाब म्हणजे या चित्रपटासाठी त्यांनी तब्बल पाच ड्राफ्ट लिहिले.

स्त्रिया आणि लहान मूल यांच्यामधील भावनिक नातेसंबंधांवर प्रकाश टाकणा-या ‘पिंकी एली?’ अर्थात ‘व्हेअर इज पिंकी’ या चित्रपटाचे कला दिग्दर्शक रामचंद्र होसूर म्हणाले, “चित्रपटाची कथा ही सत्य घटनेवर आधारित आहे. एका बातमीवर संशोधन करीत ही गोष्ट साकारण्यात आली असून हरवलेल्या लहान बाळाचा अर्थात पिंकीचा प्रवास यामध्ये चित्रित केला आहे. मुले हरविल्यानंतर केवळ पोलिसात तक्रार होते. मात्र त्या मूलाचा संपूर्ण प्रवास व मानवी मनाचे कंगोरे उलगडणार हा चित्रपट आहे.” सोळा दिवसांत बंगळूरू शहरात याचे चित्रकरण पूर्ण करण्यात आले असून दिग्दर्शकाने आपल्या गोष्टीनुसार ठिकाणे निवडण्याचा आणि शहराचे एक वेगळे अंग दाखविण्याचा प्रयत्न केला असल्याचेही होसूर यांनी नमूद केले.

‘कंदील’ या मराठी चित्रपटाबद्दल सांगताना दिग्दर्शक महेश कंद म्हणाले, “१५ वर्षांपासून उरात असलेले स्वप्न या चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण झाले. चित्रपटासाठी मुंबईतील धारावीसोबतच पिंपरी चिंचवड व जनता वसाहत या ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीतील प्रत्येक घरनंघर पाहिले. समाजातील वास्तव ‘जसं आहे तसं’ या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. झोपडपट्टीत राहणारी पाच मुले एका अतरंगी बाबाच्या सांगण्यावरून कसे वागतात. बाबाने सांगितलेल्या मार्गावर कंदील घेऊन चालत ते त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतात का, याचा प्रवास चित्रपटात पाहायला मिळणार आहे. जीवनातील आशा, निराशा आणि त्यांमधील हिंदोळा याद्वारे समोर आणण्याचा प्रयत्न आहे. आपण चित्रपट बनवीत नसतो, तर चित्रपट आपल्याला बनवतो याचा अनुभव यावेळी आला असे मत कंद यांनी आवर्जून व्यक्त केले.