Home Blog Page 2084

रत्नागिरी येथे आणखी दोन कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर

0

मुंबई, दि.१७ : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे आज आणखी दोन ऑलिव्ह रिडले सागरी कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवून समुद्रकिनारी सोडण्यात आले.रेवा आणि लक्ष्मी अशी या कासवांची नावे आहेत. काल ‘वनश्री’ नावाचे कासव गुहागर समुद्रकिनारी सोडण्यात आले. यापूर्वी ‘प्रथमा’ आणि ‘सावनी या कासवांना वेळास आणि रत्नागिरी येथून सॅटेलाइट ट्रान्समीटर बसविण्यात आले होते.

वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सहकार्याने सागरी कासव निरीक्षण प्रकल्पांतर्गत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर एकूण 5 कासवांना अशा प्रकारे सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत अशी माहिती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी दिली.

21 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिटचा घोटाळा करणारे रॅकेट उघडकीस

0

मुंबई, 16 फेब्रुवारी 2022

नवी मुंबईच्या सीजीएसटी आयुक्तालयाने  सुमारे 21 कोटी रुपये बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा घोटाळा करणारे  रॅकेट उघडकीस आणले आहे आणि मेसर्स  श्री रामएंटरप्राइज (GSTIN: 27FPAPS4153A1Z3) च्या मालकाला आज अटक केली. ही कंपनी सुमारे 100 कोटी रुपयांच्या बनावट  इनव्हॉइसवर फसवे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवणे, वापरणे आणि दुसऱ्याला देण्याचे व्यवहार करतहोती.

सीजीएसटी नवी मुंबईच्या कर चुकवेगिरी विरोधी पथकाने या कंपनीची चौकशी केली. मालकाने दिलेल्या जबाबानुसार, ही कंपनी विविध धातूंच्या भंगाराच्या व्यापारात सहभागी आहे. तपासात असे आढळून आले की, करदात्याने अस्तित्वात नसलेल्या/बोगस कंपन्यांकडून बनावट आयटीसीचा लाभ घेतला आणि दुसऱ्याला हस्तांतरित केला. आरोपीला केंद्रीय वस्तू व सेवा कायदा, 2017च्या कलम 69 (1) अंतर्गत सदर कायद्याच्या कलम 132 (1) (b) आणि (c) नुसार गुन्हा केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे आणि त्याला बेलापूरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर 16.02.2022 रोजी हजर करण्यात आले. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हे प्रकरण सीजीएसटी  मुंबई विभागाने  फसवणूक करणार्‍या आणि कर चुकवणार्‍यांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेचा एक भाग आहे जे नियमांचे पालन करणाऱ्या प्रामाणिक करदात्यांसाठी स्पर्धा निर्माण करतात आणि सरकारी तिजोरीची फसवणूक करतात. या मोहिमेचा एक भाग म्हणून नवी मुंबई आयुक्तालयाने अलिकडेच सुमारे 500 कोटी रुपयांची करचोरी शोधून काढली,  20 कोटी रुपये जप्त केले आणि  13 जणांना अटक केली.

सीजीएसटी विभाग कर चुकवणार्‍यांची ओळख पटवण्यासाठी डेटा विश्लेषण साधनांचा वापर करत आहे. डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण वापरून, सीजीएसटी मुंबई विभागाच्या अधिकार्‍यांनी गेल्या पाच महिन्यांत 625 हून अधिक कर चुकवेगिरीचे गुन्हे  नोंदवले  असून 5500  कोटी रुपयांची कर चुकवेगिरी शोधून काढली आहे, तर  630 कोटी रुपये वसूल केले असून 50हून अधिक लोकांना अटक केली आहे.

फसवणूक  आणि करचोरी करून सरकारला फसवणाऱ्यांविरोधात सीजीएसटी विभागमोहीम अधिक तीव्र करणार आहे.

३ हजार कोटींच्या शिक्षण अर्थसंकल्पात मराठी शाळांसाठी ‘शून्य’- प्रतीक कर्पे

0

मुंबई- महानगरपालिकेच्या तीन हजार कोटीच्या शिक्षण अर्थसंकल्पात मराठी मुलांच्या भवितव्यासाठी एकही रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. ज्यांनी मराठी माणसाच्या नावावर आयुष्यभर राजकारण केले त्यांना शिक्षण अर्थसंकल्पात मराठी शाळांसाठी एखादे तरी विशेष पॅकेज जाहीर करावे असे वाटले नाही यावरून त्यांचे मराठी प्रेम बेगडी असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे शिक्षण समिती सदस्य प्रतिक कर्पे यांनी केली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत येणाऱ्या अनुदानास पात्र असलेल्या खासगी मराठी शाळा गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. निधीची तरतूद होऊनही अनुदान दिले नसल्याने या शाळांची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. या शाळांना वाचविण्यासाठी मुंबई मनपाने आपला अनुदान हिस्सा तातडीने देऊन अनुदान सुरू करावे अशीही मागणी वारंवार करण्यात येत आहे. तरीही त्याकडे सत्ताधारी शिवसेनेने दुर्लक्ष केले आहे. पालिका मुंबई पब्लिक स्कूलसाठी विशेष योजना राबवत आहे. मात्र, मराठी शाळांसाठी त्यांच्याकडे निधी नाही. गेल्या दहा वर्षात मराठी शाळेतील पटसंख्या १ लाख १३ हजारांवरून ३५ हजारापर्यंत घसरली आहे. ८० ते ९० मराठी शाळा बंद पडल्या आहेत तर २२३ मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तरीही मराठी पाट्या लावण्यावरून राजकारण करणाऱ्या शिवसेनेला त्याचे सोयरसुतक नसल्याची टीका श्री. कर्पे यांनी केली.

शिक्षण अर्थसंकल्पात हजारो कोटींची तरतूद करणार्‍या पालिकेला गेली कित्येक वर्षांत पालक, विद्यार्थ्यांना शिक्षणविषयक सेवा सुविधांची माहिती पुरवणारी साधी वेबसाईटही बनवता आलेली नाही. एकूणच २५ वर्षांत मराठी माणसाच्या वाट्याला उपेक्षाच आल्याची टीका श्री. कर्पे यांनी केली.

चार वर्षांखालील मुलांना दुचाकीवर मागे बसवून नेणे किंवा त्यांना दुचाकीवरून नेण्याबाबतच्या सुरक्षा उपाययोजनांसाठी अधिसूचना जारी

0

नवी दिल्‍ली, 16 फेब्रुवारी 2022

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 15 फेब्रुवारी 2022 रोजी जारी केलेल्या  अधिसूचनेच्या माध्यमातून  सीएमव्हीहीआर, 1989 च्या नियम 138 मध्ये सुधारणा केली असून त्यानुसार  चार वर्षांखालील मुलांना घेऊन दुचाकीवर मागे  बसवून नेणे किंवा त्यांना  दुचाकीवरून नेण्यासाठी  केलेल्या सुरक्षा उपाययोजनांशी संबंधित नियम निर्धारित केले आहेत.   मोटार वाहन कायद्याच्या कलम 129 अंतर्गत हे नियम  अधिसूचित  करण्यात आले आहेत , ज्यामध्ये केंद्र सरकार  नियमांनुसार,   चार वर्षांखालील मुलांना दुचाकीवर मागे  बसवून नेणे किंवा त्यांना  दुचाकीवरून नेण्यासाठी  मुलांच्या  सुरक्षेसाठी काही उपाययोजना करू शकते.या नियमांमध्ये  सुरक्षा सामग्री  आणि मजबूत  हेल्मेटचा वापर  त्याचप्रमाणे  अशा   दुचाकीचा  वेग 40 किमी प्रतितास पर्यंत मर्यादित असावा हे नमूद करण्यात आले आहे.केंद्रीय मोटार वाहन (दुसरी दुरुस्ती) नियम, 2022 प्रसिद्ध  झाल्यापासून एका  वर्षानंतर हे नियम लागू होतील.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १५ फेब्रुवारी २०२२ रोजी या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. हा नियम पुढील वर्षी १५ फेब्रुवारी २०२३पासून लागू होणार आहे. सध्या या नियमामध्ये दंडात्मक रक्कम निश्चित करण्यात आलेली नाही. तसेच अधिसूचनेमध्ये दंडाची रक्कम राज्य सरकारे निश्चित करतील, असे म्हटले आहे.

नव्या प्रस्तावानुसार ४ वर्षांपर्यंतच्या मुलांना दुचाकीवर मागे बसवून नेताना बाईक, स्कूटर आणि स्कूटीसारख्या दुचाकी वाहनाची वेगमर्यादा ही ४० किमी प्रतितास पेक्षा अधिक असता कामा नये.
– दुचाकीचालकाच्या मागे बसणाऱ्या ९ महिन्यांपासून ४ वर्षांपर्यंतच्या मुलांना क्रॅश हॅल्मेट घालणे आवश्यक आहे
– दुचाकीचालक ४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना आपल्यासोबत दुचाकीवर बांधून ठेवण्यासाठी सेफ्टी हार्नेसचा वापर करेल.
– सेफ्टी हार्नेस ही मुलांना घालण्यात येणारी एक जॅकेट असते. तिची साईझ अॅडजेस्ट करता येते. ती मुलांना दुचाकी चालकाशी बांधून ठेवते. सुरक्षा जॅकेटशी संबंधित फित मुलांना दुचाकी चालकाच्या खांद्याशी जोडून ठेवण्याचे काम करतात. मंत्रालयाने या प्रस्तावाबाबत सल्ले आणि आक्षेप मागवले आहेत.
कारमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी चाइल्ड लॉकसह अनेक फिचर्स दिले जातात. या फिचर्सच्या माध्यमातून मुलांच्या सुरक्षेबाबतच्या बाबींची पूर्तता केली जाते.

महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची पालखी मिरवणूक

0

पुणे : ब्रह्मोत्सवानिमित्त श्री महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची पालखी मिरवणूक थाटात काढण्यात आली. श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीच्या मूर्तींची मंदिराच्या प्रांगणात मिरवणूक काढण्यात आली. पालखी सोहळ्यानंतर पुष्पउत्सव म्हणजेच फुलांची होळी हा कार्यक्रम देखील मंदिरात पार पडला.
श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवात मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, विश्वस्त नगरसेवक प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, मुरली चौधरी यांसह विश्वस्त उपस्थित होते. 
राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुजाचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्याजी महाराज यांच्या आशिर्वादाने आयोजित उत्सवात हा पालखी सोहळा झाला. याशिवाय मंदिरात धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. सोने-चांदी पुष्पअर्पण करुन देवीचरणी आरोग्यसंपन्न भारताकरीता प्रार्थना करण्यात आली. सामाजिक कार्यक्रमांमध्ये उत्सव मूतीर्ची धान्यतुला करुन ते धान्य संतुलन पाषाण हा दगडखाण कामगारांच्या मुलांसाठी काम करणा-या संस्थेस वाटप देखील करण्यात आले होते.

महिंद्रा ऑटोमोटिव्हची क्विकलीझसोबत भागीदारी ग्राहकांना देणार एसयूव्ही लीजींग पर्याय

0

 –  मुंबई, पुणे दिल्ली, नोयडा, गुरुग्राम, बंगलोर, हैदराबाद आणि चेन्नई या आठ शहरांमध्ये उपलब्ध

–  महिंद्रा गाडी क्विकलीझमार्फत विकत घेण्याचा सहजसोपा, लवचिक पर्याय ग्राहकांसाठी खुला होणार

– महिंद्रा ऑटो पोर्टल तसेच या आठ शहरांमधील महिंद्रा ऑटोमोटिव्हच्या विशाल डीलरशिप नेटवर्कमार्फत ग्राहक क्विकलीझ लीजींगचा लाभ घेऊ शकतात

मुंबई१६ फेब्रुवारी २०२२: महिंद्रा ग्रुपच्या महिंद्रा ऑटोमोटिव्हने क्विकलीझ या महिंद्रा फायनान्सच्या आधुनिक वाहन लीजींग आणि सब्स्क्रिप्शन प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी केली असल्याची आज घोषणा केली आहे. त्यामुळे आता क्विकलीझ महिंद्रा ऑटोच्या पोर्टलवर आणि महिंद्रा ऑटोच्या संपूर्ण डीलरशिप नेटवर्कमध्ये लाईव्ह उपलब्ध असेल. या भागीदारीमुळे ग्राहकांना त्यांनी निवडलेली महिंद्रा गाडी पारदर्शक व सहजसोप्या पद्धतीने लीज करता येईल.

मुंबई, पुणे, दिल्ली, नोयडा, गुरुग्राम, बंगलोर, हैदराबाद आणि चेन्नई या भारतातील आठ शहरांमध्ये ग्राहकांना क्विकलीझमुळे अधिक जास्त सुविधा, लवचिकता आणि निवडीला भरपूर वाव उपलब्ध होणार आहे. गाड्यांचे मासिक भाडे दर महिन्याला २१००० रुपयांपासून पुढे असणार असून यामध्ये विमा, देखभाल, रस्त्यावर काही समस्या उद्भवल्यास गाडीला देण्यात येणारी सहायता यांचा समावेश असणार असून कोणतेही अतिरिक्त डाऊन पेमेंट करावे लागणार नाही.  ग्राहकांना २४ महिने ते ६० महिने यामधील अवधी निवडण्याचे स्वातंत्र्य असेल तसेच वर्षभरात १०००० किमी पासून पुढील वार्षिक किलोमीटरचे पर्याय निवडण्याची लवचिकता देखील त्यांना मिळेल.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री. वीजय नाक्रा यांनी सांगितले, ग्राहकांच्या बदलत्या गरजा ध्यानात ठेवून पे पर यूज मॉडेल खास तयार करण्यात आले आहे.  आमच्या विक्री चॅनेल्समार्फत ग्राहकांना लीजींगचेही पर्याय उपलब्ध करवून देण्यात आल्यामुळे ग्राहकांना सोप्या व सुविधाजनक पद्धतीने लवचिकता व पारदर्शकता यांचे लाभ मिळवता येतील. कालावधी संपल्यानंतर परत करण्याच्याबाय बॅक करण्याच्या किंवा अधिक नवीन मॉडेलमध्ये अपग्रेड करण्याच्या पर्यायासह ते आपल्या आवडीची वाहने निवडू शकतील. क्विकलीझमुळे आम्हाला भारतामध्ये सातत्याने वाढत असलेल्या कार लीजींग बाजारपेठेच्या क्षमता डोळ्यासमोर ठेऊन त्यादृष्टीने पावले उचलण्यात आणि त्या क्षमतांचा उपयोग करवून मदत मिळेलज्यामुळे आमच्या ग्राहकसंख्येत अधिक जास्त वाढ होईल.”

महिंद्रा फायनान्सचे कोअर बिझनेसचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. रॉल रिबेलो म्हणाले, “आमच्या क्विकलीझच्या वाटचालीमध्ये महिंद्रा ऑटोसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.  भारतात लीजींग आणि सब्स्क्रिप्शन मोड्यूलची सध्या नुकतीच सुरुवात होत आहेअशावेळी महिंद्राच्या ऑटोच्या क्षमतात्यांच्याकडून मिळू शकतील असे अनेकवेगवेगळे लाभआमचा देशभरातील विस्तार यामुळे ही भागीदारी नक्कीच लाभकारी ठरेल.  मला खात्री आहे कीव्यक्ती आणि कॉर्पोरेट्स अशा आमच्या दोन्ही प्रकारच्या ग्राहकांना या भागीदारीतून चांगले लाभ मिळतीलया भागीदारीमुळे ते सर्वोत्तम महिंद्रा वाहने लीज करू शकतील.”

क्विकलीझचे एसव्हीपी व बिझनेस हेड श्री. तुर्रा मोहम्मद यांनी सांगितले, “वाहनांचे लीजींग व सब्स्क्रिप्शन हे वाहन मिळवण्याचे नवे सर्वसामान्य आणि किफायतशीर मार्ग बनत आहेत. लीजींग आणि सब्स्क्रिप्शन उद्योग पुढील ५ ते १० वर्षात १५-२०% सीएजीआरने वाढण्याची शक्यता आहेज्यामुळे ती भारतातातील एक वेगाने विकसित होणारी बाजारपेठ बनेल. डिजिटल प्लॅटफॉर्ममार्फत महिंद्राकडून एसयूव्हीची संपूर्ण श्रेणी लीजींगवर प्रस्तुत करताना आम्हाला आनंद होत आहे. या बाजारपेठेत पक्के पाय रोवणे आणि क्विकलीझ ब्रँडचे स्थान अधिकाधिक बळकट करणे आमचे उद्दिष्ट आहे.”

क्विकलीझच्या सब्स्क्रिप्शन प्लॅटफॉर्म्सवर इलेक्ट्रिक वाहनांचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ उपलब्ध आहे. या भागीदारीअंतर्गत क्विकलीझ ई-व्यापारासाठी वापरल्या जाणाऱ्या ताफ्याच्या ऑपरेटर्सना महिंद्राची ट्रिओ लोड वाहने प्रस्तुत करेल. क्विकलीझच्या सब्स्क्रिप्शन मॉडेलमध्ये वाहनांची देखभाल, बॅटरी लाईफ आणि पुनःविक्री मूल्य याबाबत काहीही जोखीम किंवा अनिश्चितता राहणार नाही हे सुनिश्चित केलेले असते.

संत रविदास महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे अभिवादन

0

            पुणे, दि.16:- संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी शिवशंभूनगर येथील गुरु रविदास महाराज मंदिरात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, उपायुक्त उमेश सोनवणे, नगरसेवक प्रकाश कदम, अखिल भारतीय रविदाशिया धर्म संघटनेचे अध्यक्ष संजय खामकर, रतनलालजी सोनाग्रा आदी उपस्थित होते.

            कार्यक्रमस्थळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने नागरिकांसाठी पुस्तकांचे दालन ठेवण्यात आले, तसेच बार्टीच्यावतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रम व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

१८ ते २० फेब्रुवारीला जुन्नर द्राक्ष महोत्सवाचे आयोजन

0

            पुणे दि.१५: विभागीय पर्यटन कार्यालय आणि जुन्नर पर्यटन विकास संस्था यांच्या माध्यमातून जुन्नर द्राक्ष महोत्सव २०२२ चे आयोजन १८ ते २० फेब्रुवारी २०२२ या कालावधीत करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय पर्यटन कार्यालयाचे सहायक संचालक सुप्रिया करमरकर यांनी दिली आहे.

            या महोत्सवात द्राक्ष बाग भेट, जुन्नर हेरिटेज वॉक, वायनरी भेट, पक्षी निरीक्षण उपक्रम, देवराई भेट, नाणेघाट सहल, बोटिंग, ओझर गणपती दर्शन, गीब्सन स्मारक भेट, लेण्याद्री गणपती दर्शन, ताम्हणे संग्रहालय भेट, अंबा अंबिका लेणी समूह भेट, जुन्नर आठवडे बाजार भेट, कॅम्प फायर व मनोरंजनात्मक कार्यक्रम यांचा समावेश असेल.

            या कार्यक्रमासाठी जुन्नर एज्युकेशन सोसायटीअंतर्गत शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या मुख्य मैदानाचा वापर महोत्सव आयोजन करण्यासाठी करण्यात येणार आहे.

भावी पिढीला प्रेरणादायी असे स्मारक कोरेगाव भिमा येथे उभारावे-धनंजय मुंडे

0

   पुणे दि.१६- कोरेगाव भिमा येथे शौर्याचे प्रतिक म्हणून मोठी वास्तू उभी करायची आहे, भावी पिढीला प्रेरणा मिळावी असे सुंदर स्मारक येथे उभारण्यात यावे, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात  कोरेगाव भिमा येथील स्मारकाच्या विकासकामांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे आदी उपस्थित होते.

            श्री.मुंडे म्हणाले, शासनाने हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. जागेची अडचण दूर झाल्यानंतर या कामाला वेग देता येईल. त्यामुळे कायदेशीर बाबींसाठी तज्ज्ञांचे सहकार्य घेण्यात यावे. विविध देशात पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून अशी स्मारके उभारून त्यांचे जतन करण्यात येते. त्याच धर्तीवर सुंदर आणि त्या काळातील स्मृतींना उजाळा देणारे स्मारक उभारावे. या परिसरात कायमस्वरूपी वाहनतळ, आरोग्य सुविधा, स्वच्छतागृह आदी कायमस्वरूपी सुविधा निर्माण करण्याचा विचार व्हावा. स्मारकाच्या आराखड्यासाठी संकल्पना स्पर्धा घेण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

            जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील असे जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी यावेळी सांगितले.

दुर्गम भागातील ऊसतोडणी कामगारांच्या नोंदणीची व्यवस्था करा

            सामाजिक न्याय मंत्री श्री.मुंडे यांनी यावेळी स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला. ते म्हणाले, ऊसतोडणी मजुरांचे सहा महिने ऊस तोडणीत जातात. त्यांच्या कल्याणासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपमध्ये सर्व कामगारांची नोंदणी ऑनलाइन करता येणार नाही. दुर्गम भागात काम करणाऱ्या मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी समन्वयक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. त्यांच्या कामाच्या जागेवर नोंदणी करून नंतर साखर कारखान्याच्या मदतीने ऑनलाइन माहिती भरावी. कारखाना आणि ग्रामसेवकांकडून माहितीची खात्री करून घ्यावी.

            महामंडळाचे मुख्य कार्यालय पुणे येथे राहील आणि बीड परिसरात ऊसतोडणी कामगारांची अधिक संख्या लक्षात घेता उपकार्यालय बीड येथे असणे आवश्यक आहे. मुख्य कार्यालयासाठी इमारत तयार होईपर्यंत शिवाजी नगर येथील खाजगी जागेत कार्यालय सुरू करावे. महामंडळाचे कामकाज त्वरीत सुरू करून मजुरांना शासनाच्या योजनेचा लाभ देण्याचे प्रयत्न करावे. त्यासाठी शासनाकडून सर्व सहकार्य करण्यात येईल.

            ऊसतोडणीचे काम मजुरांकडून केल्यानंतर साखरेचा उतारा अधिक मिळतो असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे कारखाना आणि मजुरांचे संबंध साखर उत्पादन असेपर्यंत कायम राहणार आहे. या मजुरांची दिनचर्या लक्षात घेता त्यांचे श्रम कमी करण्यासाठी त्यांना सुविधा देण्यासोबतच महामंडळाने ऊसतोडणी कामगारांचे श्रम कमी करण्यासाठी प्रयत्न करावा. साखर आयुक्त आणि महामंडळाच्या समन्वयाने साखर कारखान्यांची कार्यशाळा आयोजित करून त्यांना कामगारांच्या नोंदणी प्रक्रीयेबाबत माहिती द्यावी.

            साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ऊसतोड कामगारांची नोंदणी ॲपद्वारे करताना आवश्यक बदलाबाबत सूचना केल्या. या कामासाठी साखर कारखान्यांचे सहकार्य घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

            स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामकाजासाठी ३ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. ऊस तोडणी कामगारांचा अपघात विमा, फिरत्या रुग्णालयासाठी शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सर्व साखर कारखान्यांना एक समन्वयक अधिकारी नेमण्याची सूचना साखर आयुक्तांमार्फत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे अशी माहिती डॉ.नारनवरे यांनी यावेळी दिली.

            या बैठकीनंतर समाज कल्याण आयुक्त यांच्या नवीन इमारतीबाबत आढावा घेण्यात आल्या. उपलब्ध जागेचा पूर्ण क्षमतेने उपयोग करून आवश्यक सुविधा ‍निर्माण करण्यात याव्यात. शक्य असेल तेथे अस्तित्वात असलेल्या इमारतीवर अतिरिक्त मजल्याचे बांधकाम करावे, अशा सूचना श्री.मुंडे यांनी यावेळी दिल्या.

संजय राऊत यांची नजर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर; फक्त आरोप काय करता? पुरावेही द्या? नारायण राणेंचा प्रहार

0

मुंबई-  संजय राऊत यांची नजर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर आहे. राऊत शिवसेनेचे नाही तर शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादीची सुपारी घेतली आहे, असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.

पत्रकार परिषदेत संजय राऊतांना घाम फुटला होता, असे राणे म्हणाले आहेत. ती एक आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद होती असे म्हणत त्यांनी उपहासात्मक टीका देखील केली. संजय राऊत यांची पत्रकार परिषदेला केविलवाणी परिस्थिती झाली होती. घाम फुटला होता. ते वारंवार सांगत होते की मी कुणाला घाबरत नाही. मर्दांची शिवसेना आहे. पण मर्द माणसाला मर्द आहे हे सांगायची गरज नसते. जो घाबरतो, तोच वारंवार सांगत असतो की मी कुणाला घाबरत नाही, असेही नारायण राणे म्हणाले.

 या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली. संजय राऊत हे १९९२ मध्ये शिवसेनेत आले त्याआधी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर टीका करायचे, असं राणे म्हणाले. संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये राणेंनी राऊत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या पत्रकारितेपासूनच्या प्रवासावरुन भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर २६ वर्षांनी राऊत शिवसेनेत आले असं म्हणत टोला लगावला. नारायण राणेंनी आज संध्याकाळी मुंबईत भाजपा कार्यालयात ही पत्रकार परिषद घेतली.

“संजय राऊत २ जून १९९२ ला शिवसेनेत आले. सामनामध्ये संपादक म्हणून आले. मार्मिकमधून हकालपट्टी झाली मग लोकप्रभाला गेले,” असं म्हणत नारायण राणेंनी राऊत यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. पुढे बोलताना राणेंनी राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंविरुद्ध अनेक लेख लिहिल्याचा उल्लेखही केला. “संजय राऊत अंतर्गत आग कशी लावता येईल हे पाहात असतो, असं बाळासाहेब म्हणाले होते”, असं देखील राणे म्हणाले. शिवसेनेसाठी पत्रकार परिषद घेतली की स्वत: अडचणीत आहेत म्हणून घेतली? जणू शिवसेना प्रमुख हेच झालेत अशा आवेशात पत्रकार परिषद घेतली, असा टोलाही राणेंनी लगावला.

शिवसेना, बाळासाहेबांचा आशिर्वाद याबद्दल बोलणारे संजय राऊत हे शिवसेनेच्या स्थापनेनंतर २६ वर्षांनी पक्षात आल्याचं सांगत आम्ही निधी गोळा करुन शिवसेना उभारल्याचा उल्लेखही नारायण राणेंनी केला. “तू आलास कधी? शिवसेनेच्या जन्मानंतर २६ वर्षांनी आला. शिवसेना बांधताना आम्ही पैसे गोळा केले. आम्ही ऐवढं केलं म्हणून आता सत्ता आहे. राऊतांचे शिवसेना भवनाच्या उभारणीत त्याचे ५ पैसे तरी आहेत का? कोणाच्या कनाफाटात मारली संजय राऊतने असं कुठे, कधी वाचलं का? उसनं अवसान कशासाठी?” असा एकेरी उल्लेख करत राणेंनी राऊत यांच्यावर निशाणा साधला. ज्यापद्धतीने राऊत बोलत होते, आव्हान देत होते ते करण्यासाठी तशी रग लागते, रक्त लागतं तसं असा टोलाही नारायण राणेंनी लगावला.

भाजपा विरोधात केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात करण्यात आलेले आरोपांमध्येही काही तथ्य नाहीय, असं सांगतानाच आरोप खरे असतील तर पत्रकार असणाऱ्या संजय राऊतांनी पुरावे सादर करावेत असं आव्हान नारायण राणेंनी केलंय.

भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी पाच कंपन्यांची नेमणूक

0

पुणे महापालिका हद्दीतील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी पाच संस्थांची तीन वर्षांसाठी नेमणूक करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, अनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या मान्यतेनुसार दर निश्चित करण्यात आला आहे. एका कुत्र्याची नसबंदी करण्यासाठी १४०० रुपये दर ठरविण्यात आला असून, त्याला पकडून पुन्हा जागेवर सोडण्यासाठी २०० रुपये दर आकारता येणार आहे. अशाप्रकारे १६०० रुपये किंवा त्यापेक्षा कमी दराने शुल्क अदा करण्यात येणार आहे. हे शुल्क दरवर्षी अंदाजपत्रकात याविषयी केलेल्या तरतुदीतून दिले जाणार आहे.

रासने पुढे म्हणाले, द पीपल फॉर एनव्हायरमेंट अँड अनिमल, अनिमल वेलफेअर असोसिएशन, जीवरक्षा, जेनी स्मिथ अनिमल वेलफेअर ट्रस्ट आणि यूनिव्हर्सल अनिमल वेलफेअर सोसायटी या पाच संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थांना पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी पशु संवर्धन विभागाचे प्रमाणपत्र घेणे, मनपाने प्रमाणित केलेले अप वापरणे, वाहनांना जीपीएस सिस्टिम लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. नसबंदी शस्त्रक्रिया, औषधोपचार, अँटी रेबीज लसीकरण तसेच महापालिकेने निर्धारीत केलेले बेल्ट, कर्मचारी, वाहन, इंधन आदींवरील खर्च संबंधित संस्थांनी करायचा आहे.

निवासी मिळकतींना निवासी दरानेच कर आकारणी

पुणे शहरात अनेक ठिकाणी निवासी मिळकतींना व्यावसायिक दराने आकारल्या जाणार्या कराऐवजी निवासी दरानेच कर आकारण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, निवासी जागेचा व्यावसायिक कारणांसाठी वापर होत असेल तर व्यावसायिक दराने कर आकारणी करणे योग्य आहे. परंतु त्या जागेचा निवासी वापर होत असेल तर निवासी दरानेच कर आकारणी करण्यात येणार आहे. अभय योजनेत अशा प्रकारे व्यावसायिक दराने कर आकारणी झालेल्या निवासी मिळकतींना सवलत देण्यात येणार आहे.

७ मार्चला आयुक्तांचा अर्थसंकल्प

पुणे महापालिकेच्या आयुक्तांना ७ मार्चला सकाळी साडेअकरा वाजता स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करण्यास मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार आयुक्तांनी दरवर्षी १५ जानेवारी पूर्वी अर्थसंकल्प सादर करणे आवश्यक असते. परंतु आयुक्तांनी २२ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्याची परवानगी स्थायी समितीला मागितली होती. स्थायी समितीने ही परवानगी दिली होती. आज आयुक्त कार्यालयाने काही अपरिहार्य कारणाने अर्थसंकल्पाचा आराखडा २२ फेब्रुवारी ऐवजी ७ मार्च रोजी सादर करण्यास स्थायी समितीने मान्यता द्यावी असा प्रस्ताव ठेवला होता. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली.

वैद्यकीय योजनांसाठी ४१ कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्यास मान्यता

शहरी गरीब वैद्यकीय सहाय योजना आणि अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनांची उपलब्ध असलेली तरतूद संपुष्टात येत असल्याने ४१ कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी १४६ कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली होती. त्यातून अंशदायी योजनेअंतर्गत मनपा सेवकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी १५ कोटी रुपये आणि मनपा सभासदांच्या आरोग्य सेवेसाठी १ कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. शहरी गरीब वैद्यकीय सहायता योजनेसाठी २६ कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

रासने म्हणाले, शहरी गरीब योजनेसाठी यापूर्वी ४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी सुमारे ४४ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. अंशदायी योजनेत ९० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या योजनेत यापूर्वी दीड कोटीचे वर्गीकरण करण्यात आले होते. जानेवारी अखेर सुमारे २ कोटी ३९ लाख रुपयांचा खर्च झाला आहे.

रासने पुढे म्हणाले, शहरी गरीब योजनेअंतर्गत एक लाख रुपयांच्या पेक्षा कमी उत्पन्न असणार्या कुटुंबांना वैद्यकीय सेवा दिली जाते. अंशदायी वैद्यकीय सहायता योजनेतून महापालिकेचे सेवक आणि आजी-माजी सभासदांच्या कुटुंबांना वैद्यकीय सेवा दिली जाते.

पर्यावरण विभागासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती

महापालिकेच्या पर्यावरण विभागातील विविध कामांसाठी तज्ज्ञ सल्लागार म्हणून राज्य शासनाने निर्धारीत केलेल्या तज्ज्ञांच्या यादीतील मे. केपीएमजी यांची निवड केल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, शहराची व्याप्ती वाढत असल्याने शहराचा विकास होत असताना तो पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतीने व्हावा यासाठी महापालिका विविध योजना राबवित आहे. पर्यावरण विषयाशी महापालिकेचे उपक्रम जोडलेले आहेत. हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषण, हरितीकरण, जैवविविधता, घनकचरा, आरोग्य, वाहतूक, उर्जा, कार्बन उत्सर्जन, हवामान बदल, शाश्वत विकास, पर्यावरणीय व्यवस्था, ग्रीन बिल्डिंग आदी क्षेत्र एकमेकांशी निगडीत आहेत. सध्या महापालिकेच्या उद्यान विभागाअंतर्गत पर्यावरण कक्षाचे कामकाम करण्यात येते.

रासने पुढे म्हणाले, केंद्र आणि राज्याच्या विविध योजना आणि उपक्रम राबविणे, १५ व्या वित्तीय आयोगाअंतर्गत प्राप्त निधीसाठी कृती आराखडा तयार करणे, विविध खात्यांशी समन्वय साधणे, प्रकल्पांचे प्रस्ताव तयार करणे, विहित नमुन्यातील अहवाल तयार करणे आदी प्रकारच्या कामांसाठी तज्ज्ञ सल्लागाराची आवश्यकता आहे. त्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती केली असून, दोन वर्षांसाठी सुमारे १ कोटी १४ लाख रपयांचे शुल्क देण्यात येणार आहे.

पुण्यातील किरकोळ विक्रेते व वितरक यांना वित्तपुरवठा योजना देण्यासाठी ‘वायना नेटवर्क’ची ‘पुणे कन्झ्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रिब्युटर असोसिएशन’शी (पीसीपीडीए) भागीदारी

0

पुणे, 16 फेब्रुवारी 2022 : भारतातील सर्वात मोठ्या ट्रेड फायनान्स प्लॅटफॉर्म्सपैकी एक असलेल्या ‘वायना नेटवर्क’ने आज ‘पुणे कन्झ्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रिब्युटर असोसिएशन’सोबत (पीसीपीडीए) भागीदारी करीत असल्याची घोषणा केली. या भागीदारीच्या माध्यमातून या भागातील अखेरच्या टप्प्यातील किरकोळ विक्रेते व वितरक यांना ‘वायना नेटवर्क’तर्फे ‘रिटेलर फायनान्सिंग प्रोग्रॅम’ देण्यात येणार आहे.

वितरक आणि किरकोळ विक्रेत्या समुदायाला आपल्यापुढील आव्हानांचा सामना करता यावा, या दृष्टीने ‘वायना नेटवर्क’चा ‘रिटेलर फायनान्सिंग प्रोग्रॅम’ तयार करण्यात आला आहे. किरकोळ विक्रेत्यांना उधारी दिल्याने किंवा कॉर्पोरेट्सशी व्यवहार करताना आगाऊ खरेदी केल्यामुळे वितरकांना अनेकदा रोकड टंचाईचे प्रश्न भेडसावतात. दुसरीकडे, किरकोळ विक्रेत्यांनाही पुरवठा-साखळी वित्तपुरवठा (एससीएफ) योजनांपासून वंचित राहावे लागते.  

‘वायना नेटवर्क’च्या उत्पादनामुळे किरकोळ विक्रेत्यांना ‘पीसीपीडीए’चे सदस्य असलेल्या वितरकांमार्फत केलेल्या खरेदीसाठी वित्तपुरवठा मिळू शकेल. याव्यतिरिक्त, औपचारिक बँकिंग प्रणालीचा भाग बनण्याची आणि परवडणाऱ्या दरात निधी मिळवण्याची संधीही किरकोळ विक्रेत्यांना यातून मिळेल. किरकोळ विक्रेत्यांनी सादर केलेले ‘जीएसटी रिटर्न्स’ किंवा त्यांचे लेजर यांतील माहितीवरून मिळवलेल्या त्यांच्या ऐतिहासिक व्यापारी डेटाच्या आधारावर हे उत्पादन त्यांना ऑफर केले जाईल.

या भागीदारीबद्दल बोलताना, ‘वायना नेटवर्कचे व्यवसाय प्रमुख जितिन नंदा म्हणाले, “सर्वात लहान व्यावसायिकांपर्यंत पोहोचून, त्यांची सर्वात मोठ्या वित्तपुरवठादारांशी गाठ घालून देऊन, पुरवठा साखळीतील व्यवसायांचे एकूण उत्पादन (जीडीपी) वाढविण्याचे वायना नेटवर्कचे धोरण आहे. त्या अनुषंगाने हा प्रोग्रॅम आखण्यात आला आहे. ‘वायना नेटवर्क’च्या मालकीच्या तंत्रज्ञानामुळे, एफएमसीजी व्यवसायाच्या पुरवठा साखळीतील अत्यंत महत्त्वूर्ण घटक असणाऱ्या एससीएफना अखेरच्या टप्प्यातील किरकोळ विक्रेत्यांपर्यंत विस्तार करणे शक्य झाले आहे. ‘पीसीपीडीए’सोबत भागीदारी करून आम्ही किरकोळ विक्रेते व वितरक यांना अखेरच्या टप्प्यातील ‘रिटेलर फायनान्स सोल्यूशन्स’ त्वरीत उपलब्ध करून देणार आहोत. त्यातून पुरवठा साखळीतील सर्व भागधारकांची विक्री व उलाढाल यांच्यात वाढ होऊ शकेल.”

‘वायना नेटवर्क’सोबतच्या भागीदारीबद्दल बोलताना ‘पीसीपीडीएचे अध्यक्ष आनंद मुनोत म्हणाले, “वितरक व किरकोळ विक्रेते हा समुदाय मुख्यत्वे पारंपरिक व्यवसाय विभागात मोडतो. या समुदायाला अनेकदा परवडणाऱ्या दरातील खेळत्या भांडवलाची गरज असते व ते न मिळाल्याने त्यांना अनेक आव्हानांना दीर्घकाळ सामोरे जावे लागते. वस्तुस्थिती अशी आहे की व्यावसायिक कर्जे स्थिर मालमत्तेवर दिली जातात आणि किरकोळ विक्रेते किंवा किराणा स्टोअर यांच्याकडे अशा मालमत्ता अस्तित्वात नसतात; तथापि या व्यवसायाची परिस्थिती वेगाने विकसित होत आहे आणि एमएसएमई क्षेत्रासाठी वाढीच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत, अशा नेमक्या वेळी आम्ही ‘वायना नेटवर्क’सोबत भागीदारी करीत आहोत. यातून आमचे वितरक व किरकोळ विक्रेत्यांचे नेटवर्क वाढेल, त्यांच्या व्यवसायात वाढ होईल आणि त्यांची बाजारात पत निर्माण होईल, अशी आम्हाला आशा आहे.”

यना नेटवर्कविषयी 

वायना नेटवर्क हा भारतातील सर्वात मोठ्या सप्लाय चेन फायनान्स प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे. 25 प्रकारच्या विविध क्षेत्रांमधील 1000 पुरवठा साखळींमध्ये 50,000 एमएसएमईंना 10 अब्ज डॉलर्सचा वित्तपुरवठा या कंपनीने मिळवून दिला आहे. कॉर्पोरेट्स आणि त्यांच्या व्यापार परिसंस्थांना त्यांच्या देय रकमा व प्राप्त करण्याच्या रकमा यांच्यासाठी डिजिटल स्वरुपाचा, सोयीस्कर पद्धतीचा आणि परवडणाऱ्या स्वरुपाचा पतपुरवठा उपलब्ध करून देण्यात वायना कार्यरत आहे. आपल्या स्वतःच्या मालकीच्या तंत्रज्ञानासह, ‘वायना’ने आजवर 20 लाखांहून अधिक व्यवहार पार पाडले आहेत आणि ग्राहकांना ‘शून्य-बदला’चा अनुभव दिला आहे. हे नेटवर्क आज भारतातील 600 शहरांमध्ये आणि 1150हून अधिक पिन कोड क्षेत्रांमध्ये पसरले आहे, तसेच जगभरातील 20 देशांमध्येही त्याचा विस्तार झालेला आहे. ही कंपनी पुरवठा साखळीच्या अखेरच्या टप्प्यात येणाऱ्या सर्वात लहान एमएसएमईंना वाढत्या प्रमाणात सेवा पुरवीत आहे. अनेक कॉर्पोरेट्स आणि लाखो एसएमईं यांना जीएसटी, ई-वे बिल आणि ई-इनव्हॉइस सुविधा देणारी वायना ही देशातील सर्वात मोठी जीएसपी (जीएसटी सुविधा प्रदाता) आहे. या जीएसपी प्लॅटफॉर्मवर जीएसटी व ई-इनव्हॉइसिंग यांचे 2.5 अब्जांपेक्षा जास्त ‘एपीआय कॉल्स’ ‘झीरो डाउनटाइम’मध्ये हाताळण्यात आले आहेत. ही कंपनी सुरू झाल्यापासून 5 पैकी 1 ई-इनव्हॉइस या कंपनीच्या माध्यमातून व्युत्पन्न झालेला आहे. प्रत्येक व्यवसायासाठी पुरवठा साखळी वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ‘वायना’ने बाळगले आहे. या कामगिरीमुळेच ‘वायना’ला गुजरातमधील ‘गिफ्ट सिटी’ येथे ‘आयटीएफएस प्लॅटफॉर्म’ स्थापन करण्यासाठी तत्वतः मान्यता मिळाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ गायक, संगीतकार बप्पी लहरी यांना श्रद्धांजली

0

मुंबई, दि. १६:- सहज सोप्या, उडत्या चालींच्या गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मनस्वी, निखळ असा गायक, संगीतकार बप्पी लहरी यांच्या निधनाने काळाने हिरावून नेला आहे. ते संगीत क्षेत्रातील आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे अजरामर राहतील अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ गायक, संगीतकार बप्पी लहरी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, बप्पी लहरी यांनी तरुणाईच्या ओठांवर सहज रुळतील अशा गाण्यांनी आपली वेगळी शैली रूढ केली. त्यांच्यामध्ये गायक आणि संगीतकार असा उत्कृष्ट मिलाफ होता. त्यामुळे त्यांचा असा एक चाहतावर्ग निर्माण झाला. त्यांनी काही धीरगंभीर संगीतरचनाही दिल्या. संगीत क्षेत्रातील जुन्या-नव्या प्रवाहातही त्यांनी आपली शैली जपत संगीत दिले. चित्रपट सृष्टीला या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची उणीव जाणवत राहील. ते आपल्या विशिष्ट शैलीमुळे आणि गाणी, संगीतामुळे अजरामर राहतील. ज्येष्ठ गायक, संगीतकार बप्पी लहरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

किरीट सोमय्या यांनी ईडी अधिकाऱ्याला पंधरा कोटी रुपये दिले; खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप

0

मुंबई-. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मोठा घोटाळा केला आहे. त्यांनी या घोटाळ्यातून जवळपास 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमवले आहेत. यातील 15 कोटी रुपये एका ईडीच्या अधिकाऱ्याला दिले आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी संजय राऊत यांनी एक ट्विट केले. त्यात त्यांनी पिता-पुत्र नक्कीच जेलमध्ये जाणार, असे पुन्हा एकदा म्हटले आहे. आज सकाळी-सकाळीच राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून किरीट सोमय्यांवर निशाणा साधला .बाप बेटे जेलमध्ये जाणार! असे ट्विट त्यांनी केले. ईडीच्या नावाने धमकी देऊन सोमय्याने कोट्यवधी जमा केले. बिल्डर्सना ईडीच्या धमक्या देऊन पैसे लाटले आहेत. 100 कोटींपैकी 15 कोटी एका ईडी अधिकाऱ्याला दिले आहेत, असा थेट आरोप राऊत यांनी केला.

पत्रकार परिषदेतून सोमय्या यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

2009 साली वनखात्याच्या जमिनीवर रश्मी ठाकरे यांनी अलिबागमध्ये 19 बंगले बांधले. अन् संजय राऊत म्हणतात की, त्याठिकाणी काहीच नाही. मग 2013 पासून आतापर्यंत रश्मी ठाकरे टॅक्स का भरतात? असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना प्रतिप्रश्न विचारला आहे. जर तुम्ही त्या बंगल्याचे मालक नाहीत तर मग तुम्ही कर कशाला भरला? वाधवान आणि कंपनीशी माझा आणि माझा परिवाराचा काहीच संबंध नाही. माझ्यावर संशय असेल, तर माझी खुशाल चौकशी करा. असे किरीट सोमय्या म्हणाले. संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेतल्यानंतर किरीट सोमय्या यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी दिल्लीत आज पत्रकार परिषद घेतली.

पुढे सोमय्या म्हणाले की, ठाकरे सरकार नाटकं करुन जनेतची दिशाभुल करत आहे. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. पीएमसी बँक घोटाळा किरीट सोमय्या यांनी समोर आणला. संजय राऊत का चौकशीसाठी गेले नाहीत? तुम्हाला चौकशी करायची असेल, तर खुशाल चौकशी करा. अलिबागमध्ये 2009 मध्ये वनखात्याच्या जमिनीवर 19 बंगले बांधण्यात आले, आता राऊत म्हणतात की, ते बंगले तिथे नाहीत. हे बंगले चोरी गेले आहे, की राऊत खोटे बोलतात. असे सोमय्या म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, अन्वय नाईक यांनी हे बंगले 2008 साली बांधले होते. त्याचा सर्व टॅक्स रश्मी ठाकरे भरतात. टॅक्सची रक्कम आरटीजीएस झाली आहे. ग्रामपंचायतीकडे घर नावावर करण्यासाठी देखील अर्ज करण्यात आला होता. स्वत: 19 बंगल्याप्रकरणी रश्मी ठाकरे यांनी ग्रामपंचायतीची माफी मागितली होती. मात्र खुन्नस काढण्यासाठी संजय राऊत दिशाभुल करत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

हिंमत असेल तर गुन्हा दाखल करा- किरीट सोमय्यांचे जाहीर आव्हान

0

नवी दिल्ली -2009 साली वनखात्याच्या जमिनीवर रश्मी ठाकरे यांनी अलिबागमध्ये 19 बंगले बांधले. अन् संजय राऊत म्हणतात की, त्याठिकाणी काहीच नाही. मग 2013 पासून आतापर्यंत रश्मी ठाकरे टॅक्स का भरतात? असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना प्रतिप्रश्न विचारला आहे. जर तुम्ही त्या बंगल्याचे मालक नाहीत तर मग तुम्ही कर कशाला भरला? वाधवान आणि कंपनीशी माझा आणि माझा परिवाराचा काहीच संबंध नाही. माझ्यावर संशय असेल, तर माझी खुशाल चौकशी करा. असे किरीट सोमय्या म्हणाले. संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेतल्यानंतर किरीट सोमय्या यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी दिल्लीत आज पत्रकार परिषद घेतली.

पुढे सोमय्या म्हणाले की, ठाकरे सरकार नाटकं करुन जनेतची दिशाभुल करत आहे. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. पीएमसी बँक घोटाळा किरीट सोमय्या यांनी समोर आणला. संजय राऊत का चौकशीसाठी गेले नाहीत? तुम्हाला चौकशी करायची असेल, तर खुशाल चौकशी करा. अलिबागमध्ये 2009 मध्ये वनखात्याच्या जमिनीवर 19 बंगले बांधण्यात आले, आता राऊत म्हणतात की, ते बंगले तिथे नाहीत. हे बंगले चोरी गेले आहे, की राऊत खोटे बोलतात. असे सोमय्या म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, अन्वय नाईक यांनी हे बंगले 2008 साली बांधले होते. त्याचा सर्व टॅक्स रश्मी ठाकरे भरतात. टॅक्सची रक्कम आरटीजीएस झाली आहे. ग्रामपंचायतीकडे घर नावावर करण्यासाठी देखील अर्ज करण्यात आला होता. स्वत: 19 बंगल्याप्रकरणी रश्मी ठाकरे यांनी ग्रामपंचायतीची माफी मागितली होती. मात्र खुन्नस काढण्यासाठी संजय राऊत दिशाभुल करत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

कोविड सेंटरमध्ये रुग्णांची हत्या झाली

कोरोना काळात ठाकरे सरकारने बोगस कागदपत्रे देऊन कोरोना सेंटरचे कंत्राट घेतले. त्यात कित्येक कोटींचा भ्रष्टाचार झाला. आता मी त्याचे घोटाळे बाहेर काढणार आहे. त्यामुळे ते हे सर्व प्रकार करत आहे. कोरोना सेंटरवर संजय राऊत काहीच बोलत नाहीत. पण तुमची घोटाळे बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.