पुणे : मास्को रशिया येथे मास्को स्टार आंतरराष्ट्रीय वुशु स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भारताने २० सुवर्ण, २५ रौप्य, २० कांस्य पदके पटकाविली तर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील कल्याणी जोशी हिने तायजीक्वॉन इव्हेंन्ट मध्ये १ सुवर्ण व ड्युअल मध्ये १ रौप्य आणि स्वराज कोकाटे याने नंनक्वान इन्व्हेन्ट मध्ये कांस्य तर ड्युअलमध्ये रौप्य पदक पटकाविले.
स्वयंम कटके, सलोनी जाधव, मिताली वाणी यांना ड्युअल इव्हेन्ट मध्ये प्रत्येकी एक रौप्य पदक पटकाविले. या स्पर्धेमध्ये भारताचा संघ सहभागी झाला होता. या स्पर्धेत एकूण १५ देशाच्या जवळपास ५५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्राचे सोपान कटके यांनी भारतीय वुशू संघाची मुख्य प्रशिक्षकाची धुरा सांभाळली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने पदकांची लयलूट केली. २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा माॅस्को येथे पार पडली.
भारतीय संघ दिल्लीत आल्यावर वुशू असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष भूपेंदर सिंह बाजवा सीईओ सोहेल अहमद यांनी सर्व खेळाडू व कोचेसचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राच्या कल्याणी जोशीला सुवर्ण-भारताला २० सुवर्ण, २५ रौप्य, २० कांस्य, तर महाराष्ट्राला १ सुवर्ण, ५ रौप्य, १ कांस्य
पंजाबमध्ये आम आदमीचा बोलबाला, सर्वच पक्षांवर फिरला झाडू- उत्तर प्रदेशात भाजपा अडीचशे पार , कॉंग्रेस सर्वत्र पिछाडीवर
पंजाब आप ला तर अन्य चारही राज्ये भाजपा कडे …
नवी दिल्ली- पंजाबच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरूवातीच्या मतमोजणीमध्ये आम आदमी पक्षाने बहुमताचा आकडा पार केला असून येथे दिल्ली विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची सध्या तरी दाट शक्यता दिसत आहे. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असून अकाली दल पिछाडीवर आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबत निवडणूक लढवत असलेला भाजपला या युतीचा काहीच फायदा झालेला दिसत नाही.आप ने पंजाब मध्ये ९० जागांवर आघाडी मिळविली असून कॉंग्रेसने १३ तर अकाली ने ८ जागांवर आणि भाजपने अवघ्या ५ जागांवर आघाडी मिळविल्याचे वृत्त आहे .36 जागांचे बहुमत असलेल्या उत्तराखंडमध्येदेखील भाजप आणि काँग्रेसमध्ये कडवी झुंज सुरू असून दोन्ही पक्ष सध्या भाजपा ४२ तर कॉंग्रेस २४ जागांवर पुढे आहे. येथे सत्तेत असलेल्या भाजपने गेल्या निवडणुकीत 57 जागांवर विजय मिळवला होता. दुसरीकडे, मणिपूरमध्येही भाजप सध्या 25 जागांवर पुढे असून येथे बहुमतासाठी 31 जागांची आवश्यकता आहे.गोव्यामध्ये मात्र आपला काहीही मिळाल्याचे चित्र नाही येथे भाजपा १९ तर कॉंग्रेस १४ जागांवर आघाडीवर असल्याचे वृत्त आहे उत्तर प्रदेशात भाजपने २६४ जागांवर मुसंडी मारून सपा ला ११२ जागांवर रोखले आहे तर बसपा आणि कॉंग्रेस प्रत्येकी ४/४ जागांवर अडकले आहेत . मणिपूर मध्ये भाजपने २८ जागांवर आघाडी घेतली असून कॉंग्रेस ने कॉंग्रेसने १८ जागांवर आघाडी घेतली आहे .
1. पंजाब विधानसभेची स्थिती
एकूण जागा – 117 बहुमत- 59
| एकूण जागा | काँग्रेस | आप | अकाली | भाजप+ | इतर |
| 117 | 13 | 88 | 8 | 5 | 3 |
2. उत्तराखंड विधानसभेची स्थिती
एकूण जागा – 70
बहुमत – 36
उत्तराखंडमध्ये जनतेचा रोष कमी करण्यासाठी सत्ताधारी भाजपने चार महिन्यांतच तीन वेळा मुख्यमंत्री बदलले. आता भाजप चौथ्यांदा राज्याला मुख्यमंत्री देणार की काँग्रेस बाजी मारणार हे निकालानंतर स्पष्ट होईल.
| पक्ष | पुढे | विजयी | एकूण |
| भाजप | 42 | 0 | 42 |
| काँग्रेस | 24 | 0 | 24 |
| आप | 1 | 0 | 1 |
| इतर | 2 | 0 | 2 |
3. मणिपूर विधानसभेची स्थिती
एकूण जागा – 60
बहुमत – 31
मणिपुरमध्येदेखील सत्तेत असलेल्या भाजपने यंदा सर्वच्या सर्व 60 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. यात भाजपला कितपत यश मिळेल, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
| पक्ष | आघाडी | विजयी | एकूण |
| भाजप | 28 | 0 | 26 |
| काँग्रेस | 18 | 0 | 9 |
| एनपीएफ | 0 | 0 | 0 |
| एनपीपी | 17 | 0 | 17 |
| इतर | 2 | 0 | 2 |
गोवा एकूण जागा ४० –
आघाडीवर
भाजपा १७
कॉंग्रेस १३
आप 1
तृनुमल मगोपा-५
सेना राष्ट्रवादी -0
इतर -3
उत्तर प्रदेश एकूण जागा ४०३
आघाडीवर
भाजपा २५४
सपा ११८
बसपा ५
कॉंग्रेस ६
पंजाबमध्ये या जागांकडे सर्वांचे लक्ष
अमृतसर पूर्व – येथून पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिद्धू आणि दिग्गज अकाली नेते बिक्रम मजिठिया यांच्यात लढत आहे. 2017 मध्ये नवज्योत सिद्धू येथून निवडणूक जिंकले होते. यावेळी सिद्धूंना आव्हान देण्यासाठी बिक्रम मजिठिया त्यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. सिद्धू आणि मजिठिया आजपर्यंत एकही निवडणूक हरलेले नाहीत. त्यामुळे दोघांमध्ये या जागेसाठी चुरशीचा सामना होणार आहे व या जागेसाठी प्रथमच कोणालातरी पराभवाचा सामना करावा लागणार आहे.
भदौर – या जागेवर मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांना आम आदमी पक्षाचे लाभ सिंह उगोके यांच्याकडून कडवी टक्कर मिळत आहे. चन्नी हे काँग्रेसचा मुख्यमंत्री चेहरा असल्याने त्यांना याचा फायदा मिळत आहे; मात्र चन्नी मुळचे येथील नसल्याने आम आदमी पक्षाला येथे लोकांकडून समर्थन मिळत आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही चन्नी यांचा या जागेवर पराभव होईल, असे सांगितले आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या जागेच्या निकालाकडे लागले आहे.
धुरी – आम आदमी पक्षाच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले भगवंत मान येथून निवडणूक लढवत आहेत. त्यांची लढत काँग्रेसचे युवा नेते दलवीर सिंग गोल्डी यांच्याशी आहे. मान हे सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. धुरी ही जागा त्यांच्या लोकसभा मतदारसंघात येते. मात्र, यापूर्वी ते जलालाबाद आणि लेहरामधून विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. अशातच त्यांना गोल्डीकडून तगडे आव्हान मिळत आहे.
पतियाळा – माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग येथून निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीच्या सुमारे साडेतीन महिने आधी काँग्रेसने त्यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. नंतर त्यांनी पंजाब लोक काँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला आणि भाजपसोबत युती केली. पतियाळा मतदारसंघात आम आदमी पक्षाचे उमेदवार अजित पाल कोहली कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.
मोगा – बॉलिवूड स्टार सोनू सूदची बहीण मालविका सूद येथून निवडणूक लढवत आहे. काँग्रेसने त्यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे काँग्रेसचे मोगा येथील विद्यमान आमदार हरजोत कमल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मतदानाच्या दिवशीही मोगा येथील मतदान केंद्रावर फिरणाऱ्या सोनू सूदला पोलिसांनी अडवले होते आणि त्याचे वाहनही जप्त केले होते.
पंजाब निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे
- भ्रष्टाचार, अंमली पदार्थांचे व्यसन, बेरोजगारी, पाकिस्तानसोबतची सीमा सुरक्षा, पंजाबमधील शांतता आणि कायदा सुव्यवस्था
- मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्लीतील लोकांना ‘भैय्या’ संबोधले. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काँग्रेसला घेरले.- दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपी प्रोफेसर दविंदरपाल भुल्लरच्या सुटकेसाठी अकाली दलाने आम आदमी पक्षावर टीकेची झोड उठवली. अकाली दलाने म्हटले की, दिल्लीच्या केजरीवाल सरकारने प्रा. भुल्लरची सुटका केली नाही.
- पंजाबमधील हिंदुंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सत्ताधारी काँग्रेससह भाजपलाही शह देण्याचा प्रयत्न केला आहे. फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत राहिलेल्या त्रुटींचा दाखला देत केजरीवाल यांनी व्यापाऱ्यांना सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे.
उत्तराखंडमध्ये भाजप परंपरा खंडीत करणार का?
गंगा-यमुनेच्या पवित्र लाटांनी सजलेल्या देवभूमी उत्तराखंडमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा पराभव करून सत्ता हिसकावून घेतली; पण आजपर्यंत राज्यात एकाही सत्ताधारी पक्षाला सलग दोन टर्म आपले सरकार टिकवता आलेले नाही. 2002 मध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आणि 2007 मध्ये भाजपने सत्ता मिळवली. यानंतर 2012 मध्ये काँग्रेसने पुन्हा पुनरागमन केले, मात्र 2017 मध्ये मोदी लाटेवर स्वार होऊन भाजपने विक्रमी 57 जागांसह सरकार स्थापन केले. आता ही परंपरा मोडीत काढून भाजप पुन्हा सत्ता मिळवणार की, परंपरेनुसार काँग्रेस सत्तारूढ होणार, हे लवकरच समजेल.
नळस्टॉप दुहेरी उड्डाणपूल रविवारपासून खुला : महापौर मोहोळ एक्स्प्रेस जोरात ..
- कर्वे रस्ता घेणार मोकळा श्वास
- देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत लोकार्पण
पुणे -पश्चिम पुण्याच्या वाहतुकीला वेग येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या नळस्टॉप येथील शहरातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण येत्या रविवारी संध्याकाळी ६ वाजता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून कर्वे रस्ता आता वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेणार आहे. मेट्रोकडून हा पूल महापालिकेच्या ताब्यात आल्यावर पुलाच्या विद्युत व्यवस्थेचेही काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे असताना महापालिकेच्या २०१७-१८ अंदाजपत्रकात या उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यास निधी उपलब्ध करुन दिला होता. वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग प्रस्तावित झाल्यावर नळस्टॉप येथे दुमजली पूल साकारण्यासाठी महापौर मोहोळ यांनी पाठपुरावा करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन केले होते. जयपूर येथील साकारलेल्या दुमजली उड्डाणपुलाच्या पार्श्वभूमीवर ही संकल्पना महापौर मोहोळ यांनी मांडली होती. त्यास आता मूर्त रूप आले आहे.
दुमजली उड्डाणपुलाच्या लोकार्पणाबाबत महापौर मोहोळ म्हणाले, ‘डेक्कन परिसरातून पश्चिम पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला या उड्डाणपुलामुळे चांगलीच गती मिळणार आहे. नळस्टॉप परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरून दर तासाला ३५ ते ४० हजार वाहने जा-ये करत असल्याची नोंद होती. त्यामुळे या भागात तातडीने उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते. त्यासाठी उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा केला. आता हा प्रकल्प सिद्धीस गेला आहे’.
‘नळस्टॉप येथील दुमजली उड्डाणपुलामुळे केवळ पश्चिम पुणेच नाही तर हवेली आणि मुळशी तालुक्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसही वेग येणार आहे. पुण्यातील हा पहिलाच दुमजली उड्डाणपूल असून याचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याकडे आपला कल होता आणि त्या दृष्टीने यशदेखील आले आहे. कोरोनाचे संकट असतानाही मेट्रोने हे काम वेगाने पूर्ण केले त्याबद्दल मेट्रोचे पुणेकरांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद.
असा आहे पुण्यातील पहिला दुमजली उड्डाणपूल !
- महापौर मुरलीधर मोहोळ यांची संकल्पना आणि पाठपुरावा
- पुलाची एकूण लांबी ५५० मीटर
- पुलावरून ४ पदरी वाहतूक होणार
- पहिल्या मजल्यावरून वाहने, दुसऱ्या मजल्यावर मेट्रो
- मेट्रो आणि महापालिकेचा संयुक्त प्रकल्प
कोथरुडकरांना आणखी एक गिफ्ट; बाळासाहेब ठाकरे उद्यानाचेही रविवारी लोकार्पण
महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बाळासाहेब ठाकरे उद्यानाचेही लोकार्पण येत्या रविवारी फडणवीस यांच्या हस्ते आणि पाटील यांच्या उपस्थितीत होत आहे, अशीही माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.
जातीत अडकवून ,माथी भडकावून मते मिळविण्याचा धंदा करणारे आपसात लढून संपतील त्यानंतर आपणच उरणार -राज ठाकरे
मुलांचं शिक्षण, रोजगार, एसटी कामगार यावर कोणी बोलतय का?
पुणे : नागरिकांच्या मुलभूत गरजा , जीवनावश्यक समस्या यावर न बोलता जातीत लोकाना अडकवून ,काही तरी वक्तव्ये करून लोकांची माथी भडकावून मते मिळवायचा धंदा करणारे सत्ताधारी आणि विरोधक आता दोघेही आपसात एकमेकांना संपवायला निघाले आहेत त्यानंतर उरणार कोण ? तर आपणच उरणार आहोत .. मनसैनिकांनी कोरोना काळात केलेल्या कामाची जाणीव आहे पडत्या काळात पक्षाबरोबर राहिलेल्यांची जाणीव आहे . २१ मार्चला तिथीनुसार शिवजयंती साजरी करा आणि २ तारखेला पाडव्याला शिव्तीत्र्ठाव्र या पुण्यात तर छोटासा हा तीझार आहे शिव्तीत्र्हाव्र पिक्चर दिसेल असे येथे मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा १६ वा वर्धापनदिन सोहळा पुणे शहरातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मनसैनिक आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते..दरवर्षी मुंबईत साजरा होणारा वर्धापन दिन सोहळा यंदा १५ वर्षानंतर प्रथमच पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लढायचं ते जिंकण्यासाठीच या नव्या नाऱ्याने पक्ष महापालिका निवडणुकीत उतरणार आहे. यावेळी राज ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे. मुलांचं शिक्षण, रोजगार, एसटी कामगार असे अनेक प्रश्न राज्यात निर्माण झाले आहेत त्यावर कोणी बोलतय का असा सवाल त्यांनी उपस्थित केला राज ठाकरे म्हणाले, राज्यातील नागरिक अनेक अडचणीत सापडले आहेत, ते मदत मागण्यासाठी सरकार कडे जात नाहीत. त्यांच्यासमोर मुलांचं शिक्षण, नोकरी याबरोबरच एसटी कामगारांचा मूळ प्रश्न आहे. त्याकडेही बघितले जात नाही. आमचे मनसे कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांना मदत करत आहेत. त्यांच्या समस्य सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सरकार याकडे दुर्लक्ष करू लागले आहे.
राज्यपाल -कुडमुड्या राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून राज्यपालांवर जोरदार निशाणा साधला. तुम्हाला शिवराय समजतात का? जर एखाद्या विषयातलं आपल्याला समजत नसेल तर त्यावर भाष्य कशाला करायचं, अशा शब्दात राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा समाचार घेतला.राज्यपालांवर निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले. सध्या महाराष्ट्रात महापुरुषांवरून माथी भडकवण्याचं काम सुरू आहे. त्यात हे आपले राज्यपाल. एकदा मी त्यांना भेटायला गेलो तर वाटलं हे तर कुडमुडे ज्योतिषी आहेत की काय. त्यांनी शिवरायांबाबत एक विधान केलं. पण आपल्याला ज्या विषयातील माहिती नाही, त्या विषयावर बोलायचं कशाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण कधी रामदास स्वामींचे शिष्य असल्याचं सांगितलं नाही. ना रामदास स्वामींनी आपण शिवरायांचा गुरू असल्याचा दावा केलाय. पण रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जेवढं चांगलं लिहिलंय, तेवढं कुणीही लिहिलेलं नाही. निश्चयाचा महामेरू… हे सुभाषित आज पुन्हा वाचा, असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला.यावेळी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अवमान करण्यावरूनही राज ठाकरेंनी राज्यपालांवर निशाणा साधला. इतक्या छोट्या वयात लग्न व्हायची, हे मला माहितच नव्हतं, असे राज्यपाल म्हणाले, पण त्याकाळात लहानपणी लग्न व्हायची. बालविवाह व्हायचे. पण तुमचे अजून झाले नाही, असा टोला त्यांनी लगावला.
प्रमुख मुद्दे :
🔸मध्यंतरीच्या काळात माझ्यावर संकटं आली. आपल्या पक्षावर आली. संकटं जेव्हा येतात, तेव्हा हातात हात घालून येतात आणि जातात तेव्हा एकएकटी जातात. अशा संकटांना घाबरून जायचं नसतं. त्यांना सामोरं जाऊन आपण पुढे जाणं महत्वाचं. या संकटकाळात तुम्ही- सर्व महाराष्ट्र सैनिक, तुमची कुटुंबं माझ्यासोबत राहिलात. मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो.
🔸बाबासाहेब पुरंदरे यांना सॉफ्ट टार्गेट बनवलं गेलं. आम्हाला इतिहास नाही बघायचा, आम्हाला इतिहास लिहिणाऱ्याची जात बघायची आहे! महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना तुम्हाला जातीपातीत अडकवून ठेवायचं आहे.
🔸आपल्या राज्यपालांना काही समज वगैरे काही आहे की नाही? कुडमुडे ज्योतिषी असतात ना, तसे आहेत! शिवाजी महाराज, रामदास स्वामी यांच्याबद्दल यांना काही माहिती आहे का? यांना एकाचं (महाराजांचं) शौर्य कमी करायचं आहे आणि दुसऱ्याची (स्वामींची) विद्वत्ता कमी करायची आहे. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांचं जे वर्णन केलं आहे तितकं सुंदर वर्णन मी कुठेही वाचलेलं नाही. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांविषयी जे लिहिलं आहे ते मी माझ्या घरात लावलं आहे…. “श्रीमंत योगी”! दुर्दैवाने, आमच्याकडे कुणी ‘योगी’ नाहीच! ईडीची धाड पडली की कळतं हा ‘श्रीमंत’ आहे!!
🔸राज्यपालांनी महात्मा फुले- सावित्रीबाई यांच्याबद्दल वक्तव्य केलं. अहो, तेव्हा लहानपणीच लग्नं व्हायची. तुमचं अजून नाही झालं! नको तिथे बोटं घालायची यांना सवय आहे.
🔸सध्याच्या वातावरणात निवडणूक नाही. निवडणूक पुढे ढकलायला ओबीसी समाजाची मोजणी वगैरे कारणं देताहेत. हे सगळं झूठ आहे. मला कुणाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल किंवा आजारपणाबद्दल बोलायचं नाही. पण, मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली नाही हे खरं कारण आहे.
🔸संजय राऊत किती बोलतात? कसले हातवारे करत बोलतात.. महिला, विद्यार्थी, नोकऱ्या किंवा एसटीच्या विषयावर कुणी बोलत नाही. राजकीय नेत्यांची भाषणं, त्यांचे वाद-विवाद तरुण पिढी बघत आहे.
🔸कसली संपर्क कार्यालयं? कार्यालय न उघडताही लोकांनी त्यांच्या कामांसाठी तुम्हाला संपर्क करायला हवा. लोक त्यांच्या कामांसाठी सरकारकडे जात नाहीत. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या राज ठाकरेकडे येतात. नोकरी, ऍडमिशनचे प्रश्न घेऊन आपल्याकडे येतात. लोकांचा आपल्यावरचा हा विश्वास हीच आपल्या सर्वांची गेल्या १६ वर्षातील कमाई आहे. करोना लॉकडाऊनच्या काळात तुम्ही सर्वांनी- महाराष्ट्र सैनिकांनी जे काम केलं, त्याबद्दल तुमचे आभार मानायला माझ्याकडे शब्दच नाहीत.
🔸महाराष्ट्र सैनिकांनो, महाराष्ट्रासाठी काही तरी चांगलं काम करायची जी आग तुमच्यात आहे ना, ती कधीही विझू देऊ नका.
🔸गेल्या काही दिवसांत मी आपल्या काही पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन जेवलो. यापुढे कुठे गेलो तर तिथेही पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन जेवेन. पण इतर राजकीय नेत्यांप्रमाणे कुणाची जात बघून त्याच्या घरी जेवणार नाही!
🔸२१ मार्चला तिथीनुसार शिवजयंती आहे. हा आपल्याला आपली ओळख देणाऱ्या राजाचा जन्मदिवस आहे. आपला सण आहे. तो सर्वांनी धुमधडाक्यात साजरा करावा.
🔸आजचं माझं भाषण म्हणजे फक्त टिजर/ ट्रेलर आहे. संपूर्ण चित्रपट २ एप्रिल- गुढीपाडव्याला शिवतीर्थावर!
🔸२ एप्रिलला आपला गुढीपाडवा मेळावा आहे. त्यासाठी शिवतीर्थावर- छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर येण्याचं आमंत्रण मी तुम्हा सर्वांना देतो.
‘पिफ २०२२’ मध्ये कासारवल्ली यांच्या चित्रपटांवरील पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, दि. ९ मार्च – अधिकाधिक चित्रपट दिग्दर्शकांवर पुस्तके येण्याची गरज आहे. त्यातून त्यांचा दृष्टिकोन तर समजतोच, पण पुढच्या पिढीलाही त्याचा फायदा होतो, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांनी व्यक्त केले.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ२०२२), ‘सिअर ऑफ कंटेम्पररी हिस्टरी – गिरीश कासारवल्ली अँड हिज सिनेमा’ या गणेश मतकरी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे आज प्रकाशन झाले. त्यावेळी गिरीश कासारवल्ली बोलत होते.
‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ‘ पिफ’च्या संयोजन समितीचे सदस्य समर नखाते, लेखक गणेश मतकरी यावेळी उपस्थित होते.
कासारवल्ली म्हणाले, “चित्रपट दिग्दर्शक आणि त्यांच्या चित्रपटांमधून मांडलेल्या राजकीय- सामाजिक परिस्थितीचे विश्लेषण करणारी अधिकाधिक पुस्तके येण्याची गरज आहे. त्यातून समकालीन चित्रपटांचा इतिहास समजत जातो.”
कासारवल्ली पुढे म्हणाले, “हे पुस्तक पुण्यामध्ये प्रसिद्ध होणे हा एक भावनिक क्षण आहे कारण मी इथेच ५० वर्षांपूर्वी चित्रपट शिकायला आलो होतो.” आपल्या चित्रपटांवर इंग्रजीमध्ये आलेले हे ९ पुस्तक असल्याचेही त्यांनी सांगितले.
मगदूम म्हणाले, “राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे संशोधन पठ्यवृत्ती दिली जाते. त्यातूनअनेक चित्रपट दिग्दर्शक आणि संबंधित लोकांवर संशोधन केले जाते. त्यातून पुस्तकनिर्मिती केली जाते. या प्रकल्पातून आतापर्यंत २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत.” मतकरी यांनी उत्तम संशोधन करून हे पुस्तक पुढे आणल्याचे त्यांनी सांगितले.
पटेल म्हणाले, “कासावल्ली हे एकमेव दिग्दर्शक आहेत, ज्यांना १४ राष्ट्रीय पुरस्कार आणि ४ सुवर्ण कमळ पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे चित्रपट हे काळाच्या पुढे आहेत. “ २०२३ मध्ये कासावल्ली यांच्या चित्रपटांवर रेट्रस्पेक्टीव्ह करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
समर नखाते म्हणाले, “कासारवल्ली यांचे चित्रपट माणसाचा प्रवास सांगणारे आहेत. त्यांच्या चित्रपटांवर आलेले हे पुस्तक समकालीन इतिहास सांगणारे आणि म्हणूनच पुढे कसे पहायचे याचे भान देणारे आहे.”
मतकरी म्हणाले, “आपण सगळा सिनेमा हा एकच प्रतलावर आणि एकाच पद्धतीने पाहत असतो. मला कासारवल्ली यांचा सिनेमा वैशिष्ट्यपूर्ण वाटला. त्यांचा सिनेमा इतिहास घडत असताना त्याकडे वेगळ्या प्रकारे पाहतो. जणूकाही पुढे घडणाऱ्या गोष्टी त्या चित्रपटांमधून दिसतात. एकाचवेळी समाज आणि व्यक्ती यांच्याकडे कासारवल्ली यांचा सिनेमा पाहतो. आणि त्यांच्या संबंधांवर भाष्य करतो. व्यवस्थेकडे सामान्य माणूस कसा बघतो,
राज्यपालांनी आतातरी विधानसभा अध्यक्ष निवडणूक व १२ आमदारांच्या प्रश्नावर निर्णय घ्यावा-नाना पटोले
मुंबई-– विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अडथळे आणून ही निवडणूक होऊ नये यासाठी प्रयत्न करत असलेल्या भारतीय जनता पक्ष व माजी मंत्री गिरीश महाजन यांना मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून आज मोठी चपराक दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आतातरी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व १२ आमदारांच्या विषयावर लवकर निर्णय घ्यावी अशी आमची विनंती आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
विधिमंडळ आवारात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत अडथळे आणण्याचे काम करत आहे. कुठलातरी कायदा पुढे करुन न्यायालयात याचिका दाखल करायची परंतु त्यांच्या या प्रवृत्तीला मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी त्यांची याचिका फेटाळत १२ लाख रुपयेही जप्त करुन मोठी चपराक दिली आहे. भाजपने आतातरी लोकशाहीची वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. जाणीवपूर्वक कोर्टात जायचे आणि चांगले काम सुरू आहे त्याला कोर्टात आव्हान द्यायचे काम भाजपने बंद करावे. राज्यपाल महोदय यांना माझी विनंती आहे की त्यांनी आता लवकरात लवकर निर्णय घ्यावा. राज्य विधिमंडळाचा अर्थसंकल्प ११ तारखेला सादर केला जाणार आहे. त्याआधी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडावी अशी आमची इच्छा आहे. अशोक चव्हाण, अनिल परब, अजित पवार यांनी राज्यपाल महोदय यांची काल भेटही घेतली आहे. अर्थसंकल्पाच्या आधी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडावी आणि राज्यपाल त्यादृष्टीने निर्णय घेतील असा आमचा विश्वास आहे, असे पटोले म्हणाले.
युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
मुंबई दि 9 : युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या २५० विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमासाठी उपाययोजना तसेच त्यांना भारतीय विद्यापीठांत सामावून घेण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्यात येणार आहे. कुलगुरुंच्या अभ्यासगटांची व्याप्ती वाढवून सकारात्मक दृष्टीने सर्व बाबींची तपासणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले. कोणत्याही परिस्थितीत युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
विधान भवन येथे युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आमदार डॉ. मनिषा कायंदे, आमदार धीरज देशमुख, विभागाचे सचिव सौरभ विजय, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ माधुरी कानिटकर, रूस एज्युकेशनचे उपाध्यक्ष लिंकन अमेरिकन विद्यापीठाचे कुलगुरू पवन कपूर, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे डॉ. एस एस उत्तुरे आणि खाजगी विद्यापीठांचे प्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती पाहता त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.
युक्रेनमध्ये ३३ विद्यापीठे वैद्यकीय शिक्षण देत आहेत, १८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, दोन हजार विद्यार्थी हे केवळ महाराष्ट्राचे आहेत. आपल्या देशात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परिक्षा घेण्यात येते. मात्र, रशिया आणि युक्रेनमध्ये ही परीक्षा न देता प्रवेश मिळतो. तसेच, शैक्षणिक शुल्कही भारतातील शुल्कापेक्षा कमी आकारले जाते. या विद्यार्थ्यांना भारतातील विद्यापीठात सामावून घेण्यासाठी पुन्हा परीक्षा देणे गरजेचे आहे. अथवा अन्य उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी सादरीकरणादरम्यान सांगितले.
वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख म्हणाले, रशिया आणि युक्रेन देशाशेजारील ७ ते ८ देशांतही अभ्यासक्रम सारखाच असल्याने इतर देशांसोबत सामंजस्याने या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल का याबाबत चर्चा करण्याचा प्रस्ताव केंद्राला सादर करण्यात येईल. भारतात पुन्हा येणाऱ्या विद्यार्थ्यांना (नीट) सामायिक प्रवेश परीक्षा देण्यासही मानसिकरित्या तयार करावे लागेल. याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने युक्रेन शासन शिक्षण देईल का यासंदर्भातही विचार करावा लागेल.
जे शिक्षण पूर्ण करून आंतरवासिता करीत आहेत त्यांना आधी काम द्यावे. जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यांना येथील विद्यापीठात वर्ग, प्रयोगशाळा, ग्रंथालय वापरासाठी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येईल त्यासाठी संबंधित देशाच्या विद्यापीठाशी चर्चा करण्यात येईल. कुलगुरूंचा जो अभ्यासगट नेमला आहे. त्यांनी या सूचनांचा अभ्यासासाठी अंतर्भाव करावा व अहवाल महिनाभरात सादर करावा. जेणेकरून शासनास धोरणनिश्चितीसाठी त्याचा उपयोग होईल. असेही मंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितले.
सामाजिक न्याय विभागाच्या अभिप्रायानंतर लगेच जे.जे. रुग्णालयातील पात्र वारसदारांना नियुक्ती – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
मुंबई, दि. 9 : भायखळा येथील सर जे.जे. रुग्णालयातील पात्र असलेल्या वारसदारांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्त्या देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे अभिप्रायासाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्यांचे अभिप्राय दोन-तीन दिवसात मिळाल्यास पुढील आठवड्यात संबंधित वारसदारांना शासन सेवेत सामावून घेण्याचे आदेश काढण्यात येतील, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
विधानसभा सदस्य अमिन पटेल यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले की, लाड पागे समितीचा संबंध हा सामाजिक न्याय विभागाशी येत असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने वारसदारांना नियुक्त्या देण्याचा प्रस्ताव त्यांच्याकडे पाठवला आहे. या वारसदारांच्या नियुक्त्यांच्या विषयला विलंब होत असला तरी ज्या ७ उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडली आहे, त्यांना विशेष बाब म्हणून सेवेत सामावून घेण्यासाठी शासन विचार करेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने अभिप्रायासाठी पाठविलेल्या प्रस्तावांवर दोन दिवसांत बैठक घेऊन प्रश्न निकाली काढणार असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
वैद्यकीय अधिकारी, सहायक प्राध्यापकांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन
वैद्यकीय अधिकारी, सहायक प्राध्यापकांच्या मागण्यांसंदर्भात शासनस्तरावर अनेक बैठका घेतल्या आहेत. ८० टक्के मागण्या शासनाने मान्य केल्या असून हे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी केले. कोविड काळात वैद्यकीय अधिकारी, सहायक प्राध्यापकांनी अतिशय उत्तम काम केले असून आता सुरु असलेल्या आंदोलनामुळे वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णांच्या उपचारात व्यत्यय येऊ नये यासाठी आंदोलन मागे घेण्याचेही आवाहन त्यांनी केले.
लाड-पागे समितीच्या शिफारशींसह नवीन समितीचा विचार करावा लागेल – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
लाड-पागे समिती होऊन ४२ वर्षे झाली असून त्यावेळची आणि आताची स्थिती यात फरक आहे. येत्या काळात या समितीच्या शिफारशीसह नवीन समिती गठित करण्याचा विचार करावा लागेल असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी उपस्थितीत झालेल्या उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
२०१८ च्या शासन निर्णयामध्ये फक्त नवबौद्धांनाच लाड पागे समितीच्या शिफारशींचा लाभ मिळेल असा उल्लेख असल्याने अनेक सफाई कामगारांना या शिफारशींचा लाभ मिळालेला नाही. या शासन निर्णयामध्ये सुधारणा केल्यानंतर सर्वंकष धोरण आणून येत्या पंधरा दिवसात मंत्रिमंडळासमोर ते ठेवले जाईल. यामुळे सफाई कामगाराची जात न पाहता तो फक्त सफाई कामगार आहे हे पाहून समितीच्या शिफारशींनुसार वारसांना नोकऱ्या देण्यात येतील असेही सामाजिक न्यायमंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.
यावेळी विधानसभा सदस्य रविंद्र वायकर, सुनील प्रभू, योगेश सागर, राहुल पाटील यांनीही या विषयाच्या संबंधाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सामाजिक न्याय मंत्र्यांनी उत्तर दिले.
०००००
उत्तुंग कामगिरी करणाऱ्या ९ महिलांना राज्यपालांच्या हस्ते नवदुर्गा सन्मान प्रदान
मुंबई, दि. 9 : विविध क्षेत्रात आपल्या विलक्षण प्रतिभेचा आणि उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटविणाऱ्या ९ महिलांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते जागतिक महिला दिनानिमित्त ‘नवदुर्गा’ सन्मान प्रदान करण्यात आले.
पल्लवी फाउंडेशन व स्वामीराज प्रकाशनतर्फे दामोदर हॉल, परळ येथे ‘जागर स्त्रीच्या आत्मभानाचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपालांच्या हस्ते नवदुर्गा सन्मान प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते व नाट्य निर्माते प्रशांत दामले, पल्लवी फाउंडेशनच्या अध्यक्षा शलाका कोरगावकर, स्वामीराज प्रकाशनच्या रजनी राणे, भाऊ कोरगावकर, अनिल जोशी, ॲड. नैना परदेशी आदी उपस्थित होते.
समाजातील कर्तृत्ववान महिलांना शोधून त्यांना नवदुर्गा सन्मानाने सन्मानित केल्याबद्दल पल्लवी फाउंडेशन व स्वामीराज प्रकाशन संस्थेचे अभिनंदन करताना राज्यपालांनी मातृशक्तीचा गौरव केला. देशात अनादी काळापासून महिलांना सन्मान दिला जातो. आज महिला सर्व क्षेत्रात पुढे येत आहेत. आगामी युग महिलांचे असून पुढील काळात महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर होतील, असे राज्यपालांनी सांगितले. .
या कार्यक्रमात दृष्टिबाधित असून देखील अनेक वाद्यात पारंगत असलेल्या योगिता तांबे, कचऱ्यात गेलेल्या टेट्रापॅकचा पुनर्वापर करणाऱ्या लता पाटील, मराठी शाळांच्या उन्नतीसाठी योगदान देणाऱ्या क्षमा गडकरी, गडकिल्ले संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या सुवर्णा वायंगणकर, जबाबदार नेटिझन्स निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सोनाली पाटणकर, रुग्णसेवेला समर्पित डॉ माया परिहार, नगरसेविका सोनम जामसूदकर, भटक्या कुत्र्यांना मायेची ऊब देणाऱ्या उमा गटानी व योग प्रशिक्षिका रूपा ध्रुव चापेकर यांना राज्यपालांच्या हस्ते नवदुर्गा सन्मान प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमात भूषण नेमळेकर, विक्रम मेहता, जाहिरात क्षेत्रातील मनोज चौधरी, औषध निर्माण उद्योगातील आशिष मंगल व जळगाव येथील होमिओपॅथी डॉक्टर सुनील दत्त चौधरी यांना राज्यपालांच्या हस्ते ‘सावली’ पुरस्कार देण्यात आले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘रंगबावरी’ या मानिनी चौसाळकर संपादित मराठी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमापूर्वी व नंतर ‘उंच माझा झोका’ हा महिलांच्या संगीत वाद्यवृंदाचा कार्यक्रम झाला.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विनम्र अभिवादन
मुंबई, दि. 9 : “देशातील स्त्रीशक्ती आज सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देत आहे. व्यक्ती, अभिव्यक्ती, आर्थिक स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहे. आजच्या स्त्रीशक्तीला मिळालेल्या स्वातंत्र्याचे श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी त्याकाळात स्री शिक्षणासाठी घेतलेले कष्ट, सहन केलेल्या हालअपेष्टांना आहे. राज्यातील, देशातील स्त्रीशक्ती क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला सत्यशोधक विचार, त्यांनी रचलेल्या स्त्री शिक्षणाच्या पायावरंच आजचा प्रगत, पुरोगामी, समर्थ भारत उभा आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे स्मरण करुन स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले आहे.
कोकण विभागात लोककलाद्वारे प्रसिद्धी; नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद
नवी मुंबई, दि. 09 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोंकण विभागांतर्गत येणाऱ्या ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्हयांमध्ये शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचे लोककलांच्या माध्यमातून जनजागृती करण्यास आज पासून प्रारंभ झाला आहे.
महाविकास आघाडी सरकारला यशस्वी दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या शासनाने विविध क्षेत्रांसाठी नवनवीन योजना राबविल्या. गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने स्वीकारलेली धोरणे, घेतलेले निर्णय, केलेल्या कार्याची माहिती कोकणाच्या कानाकोपऱ्यात पोहचावी यासाठी लोककला या प्रभावी माध्यमाव्दारे शासकीय योजना व विकास कामांच्या प्रचार व प्रसिध्दीची मोहिम संपूर्ण राज्यभर दि. 9 ते 17 मार्च या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
या प्रसिध्दी मोहिमेचा आज पासून शुभारंभ झाला. कोकण विभागाच्या जिल्हा माहिती कार्यालयांमार्फत विविध लोककला व पथनाट्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख गावांमध्ये जनजागृती अभियान #दोन_वर्षे_जनसेवेची_महाविकास_आघाडीची या टॅगलाईनसह सुरु आहे.
आज ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने ठाणे जिल्हयातील खारेगाव, माजिवाडा, बाळकुंभ आणि येऊर तसेच शहापूर तालुक्यातील वाशिंद आणि कल्याण येथील तहसिल कार्यालये, बाजारपेठा आणि वर्दळीच्या ठिकाणी माहिती व जनसंपर्क महासंचालयाच्या वतीने ठाणे जिल्हयासाठी निवडण्यात आलेल्या कलापथक व लोककलामंचांनी कार्यक्रमांचे सादरी करण केले .
रायगड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने रायगड जिल्हयातील म्हसळा, खरसई अलिबाग आणि नागडोंगरी येथील तहसीलदार कार्यालय, बसस्थानक, अलिबाग समुद्रकिनारा, बाजारपेठा आणि वर्दळीच्या ठिकाणी रायगड जिल्हयासाठी निवडण्यात आलेल्या कलापथक व लोककलामंचांनी कार्यक्रमांचे सादरीकरण केले .
रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने रत्नागिरी जिल्हयातील खेड पंचायत समिती कार्यालय, वावे तर्फे नातू, नाणिज, हातखांब, नाटे आणि धाऊलवल्ली बाजारपेठ, बसस्थानक, आणि वर्दळीच्या ठिकाणी रत्नागिरी जिल्हयासाठी निवडण्यात आलेल्या कलापथक व लोककलामंचांनी कार्यक्रमांचे सादरीकरण केले .
पालघर जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पालघर जिल्हयातील बोईसर रेल्वेस्थानक परिसर आणि नालासोपारा बाजारपेठ, बसस्थानक, आणि वर्दळीच्या ठिकाणी पालघर जिल्हयासाठी निवडण्यात आलेल्या कलापथक व लोककलामंचांनी कार्यक्रमांचे सादरी करण केले .
आज दिवसभरात कोकण विभागात विविध ठिकाणी लोककला माध्यमातून राबविण्यात आलेल्या या प्रसिध्दी मोहिस नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
दाऊदचा फोन आल्यानेच नवाब मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक आरोप
मुंबई -नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये असा दाऊदचा फोन आल्याने मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही; असा खळबळजनक आरोप भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. धडक मोर्चा सुरू होण्याआधी चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तूळात मोठी खळबळ माजली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना दाऊद इब्राहिमसाठी मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपाखाली ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली. त्यावेळी मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय झाला होता परंतु दाऊद इब्राहिमच्या दबावामुळे हा निर्णय मागे घेतला, असा गौप्यस्फोट भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी मुंबईत भाजपाच्या मोर्चाला संबोधित करताना केला.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी संघर्ष करेल. गावोगावी, रस्तोरस्ती भाजपा निदर्शने करेल. दाऊदला संरक्षण देणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना फिरणे मुश्किल करू आणि हा संघर्ष यशापर्यंत नेऊ असा इशारा त्यांनी दिला.
ते म्हणाले की, पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर जनतेमध्ये संताप उसळल्यानंतर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील महिना शंभर कोटीच्या वसुलीबाबत सीबीआय चौकशीचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ताबडतोब देशमुख यांनी राजीनामा दिला. नवाब मलिक यांना न्यायालयाने ईडी कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांच्याही राजीनाम्याचा निर्णय आघाडीच्या प्रमुखांनी घेतला होता. पण नंतर दाऊदचा असा दबाव आला की राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्यात आला. दाऊदच्या दबावाखाली काम करणाऱ्या सरकारला हटविण्यासाठी भाजपा रस्त्यावर उतरली आहे.
त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. त्यांची विजेची कनेक्शन कापली जात आहेत आणि पिके पाण्याअभावी जळत आहेत. पण दाऊदला संरक्षण देण्यासाठी आणि त्याला मदत करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी हे सरकार धडपडत आहे. त्यांना शेतकऱ्यांना नाही पण नवाब मलिक यांना वाचवायचे आहे.
ऊर्जा क्षेत्रात देशाने स्वयंपूर्ण व्हावे-डॉ. प्रमोद चौधरी
पुणे-ऊर्जा क्षेत्रात देशाने स्वयंपूर्ण झाले पाहिजे, त्यासाठी बायोइथेनॉल सारख्या पर्यायी ऊर्जा उत्पादनांत काम करण्याची आवश्यकता प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असणार्या चौधरी यांना विल्यम सी. होलमबर्ग यांच्या नावाने दिला जाणारा आंतरराष्ट्रीय स्तरावरील या वर्षीच्या बायोएनर्जी क्षेत्रातील पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्या निमित्त महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात चौधरी विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.
डीईएसच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, प्राचार्य डॉ. रविंद्रसिंग परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
माव्हरिक्स संघाची जॅग्वार्सवर मात
सेलर्स संघाचा रोमहर्षक विजय; पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा
पुणे : माव्हरिक्स संघाने पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत जॅग्वार्स संघावर सहा गडी राखून मात केली.
पूना क्लब क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. जॅग्वार्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित सहा षटकांत ५ बाद ५६ धावा केल्या. यात मनप्रीत उप्पलने १६ चेंडूंत २३ धावा केल्या. माव्हरिक्स संघाने विजयी लक्ष्य ५.३ षटकांत दोन गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. यात साहिल कावडेने ११ चेंडूंत १९, तर रौनक सागर ढोले-पाटीलने नऊ चेंडूंत तेरा धावा केल्या. तर तुषारने आठ चेंडूंत दोन चौकार व एका षटकारासह नाबाद १९ धावा केल्या.
अखेरच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झालेल्या लढतीत सेलर्स संघाने किंग्ज संघावर सहा गडी राखून मात केली. या स्पर्धेत किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित सहा षटकांत २ बाद ५७ धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना सेलर्स संघाला पहिल्या चार षटकांत १ बाद ३७ धावाच करता आल्या होत्या. यानंतर पाचव्या षटकात सुमिरन मेहता आणि झमीरने भार्गव पाठकच्या गोलंदाजीवर चौदा धावा वसूल केल्या. त्यामुळे सेलर्स संघाला अखेरच्या षटकात विजयासाठी सात धावांची गरज होती. यात पहिल्याच चेंडूवर झमीर दुसरी धाव घेताना धावबाद झाला. यानंतर अखेरच्या चेंडूवर एका धावेची गरज असताना सुमिरन मेहताने फाइन लेगला चौकार ठोकून सेलर्सचा विजय साकारला. सुमिरन मेहताने १९ चेंडूंत नाबाद ३० धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक : १) जॅग्वार्स – ६ षटकांत ५ बाद ५६ (मनप्रीत उप्पल २३, राजेश बनसोडे १७, विजय सामंत १-११, हिरेन परमार १-६, किरण देशमुख १-१०) पराभूत वि. माव्हरिक्स – ५.३ षटकांत २ बाद ५८ (साहिल कावडे १९, तुषार नाबाद १९, रौनक सागर ढोले-पाटील १३, पिनाकिन मराठे १-८).- सामनावीर – रौनक ढोले पाटील
२) किंग्ज – ६ षटकांत २ बाद ५७ (आर्यमन पिल्लई ३५, उमेश पिल्लई नाबाद ११, सचिन डी. १-२) पराभूत वि. सेलर्स – ६ षटकांत २ बाद ६१ (सुमिरन मेहता नाबाद ३०, झमीर २४, सतीश मुंदडा १-७).
३) टायफून्स – ६ षटकांत ३ बाद ६१ (अश्विन शाह १८, अमन पारेख १६, क्रिश शाह नाबाद १४, ऋषी चैनानी १३, प्रकाश कारिया २-१३) वि. वि. ऑल स्टार्स – ६ षटकांत २ बाद ४२ (खलीद परवानी १९, प्रकाश कारिया १३, क्रिश शहा १-७). सामनावीर – क्रिश शाह
४) वेन्डकिन ईगल्स – ६ षटकांत १ बाद ७४ (अरुण खट्टर ४०, सिद्धान्त धर्मा नाबाद ३४) पराभूत वि. जेट्स – ५.५ षटकांत २ बाद ७९ (चिराग लुल्ला ४९, ऋषभ बजाज नाबाद १२, अमित के. १०, अरुण खट्टर १-२१).
५) जॅग्वार्स – ६ षटकांत १ बाद ५९ (सुशांत खोसला नाबाद २५, राजेश बनसोड २०, विक्रम काकडे १-८) पराभूत वि. टायगर्स – ५.४ षटकांत ४ बाद ६२ (आदिश शहा नाबाद २७, आदिल खान २२, विमल हंसराज १-३, युवराज गुलाटी १-९, सुशांत खोसला १-१०). सामनावीर – आदिश शहा
महिलांसाठी पॉवर योगा व स्वसंरक्षण प्रशिक्षण क्रीडा विभागाचा उपक्रम
पुणे दि.9: जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, स्टार इंटरप्रायजेस तसेच येथील इंडो तायक्वादो दोजांग अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित महिलांसाठी पॉवर योगा व स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला.
यावेळी महाविद्यालयीन युवती, शालेय विद्यार्थिनी, महिला उपस्थित होत्या. जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी क्रीडा क्षेत्रात देशाला विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये महिला खेळाडूंनी पदके मिळवून दिल्याचा गौरवपूर्ण उल्लेख याप्रसंगी केला.
योग प्रशिक्षिका मनाली देव घारपुरे यांनी योगासन प्रात्यक्षिके दाखवली. नोकरदार व व्यवसायिक महिलांसाठी सहज योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. विखे पाटील मेमो. स्कूलच्या क्रीडा शिक्षिका सपना यादव यांनी समाजकंटक, चैन स्नॅचर्स यांच्यापासून स्वतःचा बचाव करण्याबाबतचे स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमास उपसंचालक प्रमोदिनी अमृतवाड, क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकते, शिल्पा चाबूकस्वार, महिला उद्योजिका स्टेला डिसोझा आदी उपस्थित होते.
