Home Blog Page 2052

पुण्याच्या विकासात आता तरी आडवे येऊ नका : आ.चंद्रकांत पाटील

0

पुणे – मुळा-मुठा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाला स्थगिती देण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा पुण्याच्या विकासात पाय आडवा घालण्याचे काम केलेले आहे. खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला स्थगिती देत राज्य सरकारनेही पुण्याच्या विकासाबाबतची उदासिनता कृतीतून दाखवून दिलेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवेला हिरवा कंदिल दाखविला.केवळ पाच वर्षांत भूमीपूजन ते उद्घाटन हा वेग भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्षमतेचे उदाहरणच होते. शहरांच्या विकासाचे प्रकल्प भाजपा प्रभावीपणाने आणि वेळेत पूर्ण करतो, हा विश्वास पुणेकरांच्या मनात निर्माण करणारी ही घटना होती. नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाचे भूमीपूजन करून तोही वेळेत पूर्ण होणार, हे लक्षात आल्यानंतर त्याला अपशकून करण्याचे सूतोवाच गेल्याच आठवड्यात खासदार शरद पवार यांनी केले होते.

काल झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला स्थगिती देण्याचा निर्णय गुणात्मक नसून राजकीय आहे. नदी पुनरूज्जीवन प्रकल्प किती संवेदनशील आहे, याची भारतीय जनता पार्टीस पूर्ण कल्पना आहे. हा प्रकल्प भाजपाच्या कल्पनाभरारीतून आलेला नाही तर पूर्ण अभ्यासांती होतो आहे. हा नदी सुशोभीकरणाचा प्रकल्प असल्याची आवई उठवून त्याला विरोध करण्याचा पवार यांचा प्रयत्न त्यांना शोभणारा नाही.

नद्या आणि पाणी या संदर्भात शिखर संस्था असलेल्या सीडब्लूपीआरएसने जलसंपदा खात्याच्या शिफारसीनुसार या प्रकल्पाच्या हायड्रॉलॉजी आणि हायड्रॉलिक्स अभ्यासास डिसेंबर २०१७ मध्ये मान्यता दिलेली आहे. जवळपास पाच वर्षांच्या पूर्वाभ्यासानंतर या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पाच वर्षांच्या कालावधीत जलसंपदा खाते, सीडब्लूपीआरएस, लोकप्रतिनिधी, विविध पर्यावरणविषयक संस्थांचे प्रतिनिधी, माध्यमकर्मी, या प्रकल्पाशी निगडित असलेल्या नागरिकांशी संवाद केला गेला आहे. राष्ट्रीय हरित लवादात या प्रकल्पासंदर्भात आलेल्या सर्व रास्त मुद्द्यांचे निराकरण झाल्यावरच या प्रकल्पाच्या निविदा निघाल्या.

नदीत सांडपाण्याचा व दूषित पाण्याचा एक थेंबही जाणार नाही, यासाठी ११ मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महापालिकेकडे असलेले मर्यादित आर्थिक स्रोत लक्षात घेउन मोदी सरकारने जायकाकडून ९९० कोटींचे कर्ज घेऊन त्यातील ८४१ कोटी रुपये अनुदानस्वरूपात महापालिकेला देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

शरद पवार साहेब पुण्याचा विकास तुम्ही करू शकता, असा भ्रम तुम्ही गेली पन्नास वर्षे पुणेकरांच्यात जोपासलात. परंतु तुमच्या दुर्देवाने पुण्यात, राज्यात आणि केंद्रात भाजपा सरकार आल्यावर पुणेकरांना विकास वेगाने होऊ शकतो आणि वेळेत होऊ शकतो, याचे प्रत्यंतर आले. २०१२ च्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत तुमच्या पक्षाने प्रकाशित केलेल्या जाहिरनाम्यात ‘नदीसुधार योजना राबवविणार,’ असे आश्वासन दिलेले होते. त्या कारकिर्दीत तुमच्या पक्षाची निर्विवाद सत्ता होती. परंतु त्या पाच वर्षांत आपल्याकडून त्याबाबत कोणतेही पाऊल पुढे पडले नाही. त्यानंतर २०१७च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पुन्हा नदीसुधार योजनेअंतर्गत काय काम करणार, याचा उल्लेख केलेला आहे.

पवारसाहेब, पुण्याच्या नदीची झालेली ओंगळवाणी अवस्था आम्हाला पाहवत नव्हती म्हणूनच या नदीचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आम्ही कंबर कसली. केंद्र सरकार आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मदतीचा हात पुढे केला. त्याचाच परिणाम म्हणून पुण्यात भारतीय जनता पार्टीला गेल्या पाच वर्षांत या प्रकल्पाचा सर्वांगाने अभ्यास करता आला. आणि त्यानंतच या प्रकल्पाचे भूमीपूजन झाले आहे.पुण्याचा विकास आपल्या सहभागाशिवाय कसा होऊ शकतो, या अहंकारापोटी आपण नदी पुनरूज्जीवन प्रकल्प रेंगाळण्याचा निर्णय घेतला असेल तर ते आपणास शोभा देणारे नाही. पुण्याच्या पर्यावरणात, आरोग्यात, सौंदर्यात आणि अर्थकारणात भर घालणारा हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मन मोठे करा असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

पीएम मोदींनी भूमिपूजन केलेल्या साडेपाच हजार कोटीच्या नदी सुधार प्रकल्पाला मुख्यमंत्री ठाकरेंनी लावला ब्रेक .

0

मुंबई- मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांनी भूमिपूजन केलेल्‍या नदीकाठ सुधार योजनेच्या कामाला ब्रेक लावला आहे.पुण्यात 6 मार्चला नदी सुधार योजनेचे भू्मिपूजन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. या प्रकल्पावरील विविध आक्षेपांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे मोदींच्या समवेत या उद्घाटन प्रकल्पाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते आणि या प्रकल्पांच्या होणार्या जाहिरातीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी हि प्रश्न उपस्थित केले होते. या प्रकल्पासाठी महापालिकेच्या अधिकारी आणि पदाधिकारी यांनी मोठ्या गोपनीय पद्धतीने कोरोनाची लाट वेगात असताना गुजरात दौरा केला होता. या सर्व प्रकारची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन कार्ण्यात्येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्‍य सरकारकडून या प्रकल्पावर असणाऱ्या आक्षेपांबाबत एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीद्वारे येत्या आठ ते दहा दिवसात अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्‍यानंतर मुख्‍यमंत्री ठाकरे हे शरद पवारांशी चर्चा करणार आहेत अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. भाजपची पुणे मनपात सत्‍ता असल्‍याने ठाकरे सरकाकडून भाजपला मोठा धक्‍का देण्‍यात आला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे

राज्‍य सरकार समिती स्थापन करणार

पुण्यातील नदी सुधार योजनेला ठाकरे सरकारकडून ब्रेक लावण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यातच या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. आता ठाकरे सरकार नदीकाठ सुधार योजनेवरील आक्षेप, योजनेतील कामे, परिणाम या बाबींचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करणार आहे. यासाठी नगरविकास, जलसंपदा आणि पर्यावरण खात्यातील सचिवांची समिती नेमण्यात येणार आहे. अशी माहिती राज्‍य सरकारकडून देण्‍यात आली आहे. पुण्‍यात भाजप आणि राष्‍ट्रवादी यांच्‍याकडून विकास कामांचा धडाका सुरू आहे. आगामी निवडणूक अवघड जाऊ नये, यासाठी तर हे सगळं सुरू नाहीये ना. असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे.तर प्रकल्‍पाच्‍या अहवालानंतर मुख्‍यमंत्री शरद पवारांची भेट घेणार असल्‍याने यांच्यात काय चर्चा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई पोलिसांचे एक पाऊल मागे; म्हणाले तुम्ही नका येऊ, आम्हीच येतो, घरी जाऊनच घेणार फडणवीसांचा जबाब

0

मुंबई-राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन टॅपिंग प्रकरणात बीकेसीतील सायबर पोलिस ठाण्यात जबाब नोंदविण्याबाबत नोटीस पाठविण्यात आली आहे. फडणवीसांना पोलिसांनी उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे नोटीसमध्ये सांगण्यात आले होते. मात्र, आता पोलिसांनीच एक पाऊल मागे घेत फडणवीसांच्या मुंबईतील निवासस्थानी जबाब नोंदविण्याची तयारी सूरू केली आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या सत्ताकाळात राजकीय नेत्यांचे फोन बेकायदेशीर रित्या टॅप केल्याचा आरोप केला असा आरोप महाविकास आघाडी त्यांच्यावर करत आहे. या प्रकरणात सनदी अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याच प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी फडणवीसांना पोलिस ठाण्यात बोलावले. खुद्द ही माहितीच देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत आज दिली. त्यानंतर भाजपने याबाबत आंदोलनची तयारी सुरु केली. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी एक पाऊल मागे घेत आता त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन जबाब नोंदवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, फडणवीस यांनी काही मिनिटांपूर्वीच एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात. जयहिंद, जय महाराष्ट्र !”असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.

फोन टॅपिंग प्रकरणात पोलिसांकडून देवेंद्र फडणवीस यांना नोटीस ..

0

माहितीचा स्त्रोत विचारला जाऊ शकत नाही -फडणवीस

मुंबई-घोटाळे बाहेर काढणाऱ्यांना महाविकास आघाडी सरकार पोलिस ठाण्यात पाठवत आहे. मी घोटाळेबाज महाविकास आघाडीचा भांडाफोड केला, म्हणून मला फोन टॅपिंग प्रकरणात पोलिसांकडून नोटीस पाठवली गेली असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत केला. मी पोलिसांना तपासात मदत करणार असल्याचेही ते म्हणाले.

फडणवीस म्हणाले, 12 मार्च 1993 ला मुंबईत बाँम्बस्फोट झाला होता. 29 वर्षानंतरही या आठवणी वेदनादायी व ताज्या आहेत. बाँम्बस्फोटीतील आरोपीशी संबंधित लोक जेलमध्ये जाऊ नये असे प्रयत्न सत्ताधारी महाविकास आघाडीकडून होत आहे त्याबद्दल मी खंत व्यक्त करतो.

गत वर्षी मी गृहविभागातील महाघोटाळा बाहेर काढला होता. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत हे मी सांगितले होते. घोटाळ्याची माहिती मी दिल्लीत देशाच्या गृहसचिवांना सादर केली. त्याचे गांभिर्य ओळखून न्यायालयाने यासंबंधीची चौकशीचे आदेश सीबीआयला दिले. या सर्व घोटाळ्याच्या चौकशीत अनिल देशमुखांचीही चौकशी केली जात आहे.

ही चौकशी सीबाआयकडे गेली, त्यावेळी राज्य सरकारने आपला घोटाळा दाबण्यासाठी एक एफआयआर दाखल केला. याच प्रकरणात पोलिसांनी मला प्रश्नावली पाठवली व ही माहिती आपल्याकडे कुठुन आली ही विचारणा केली. पण याचे उत्तर मी देऊ शकत नाही असे त्यांना सांगितले. त्यानंतर मला मुंबई पोलिसांनी सीआरपीसीच्या कलम 163 नुसार नोटीस पाठवली. त्यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार मला पोलिसांचे बोलावणे आले आहे. मी पोलिस ठाण्यात उद्या सकाळी 11 वाजता जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

माहितीचा स्त्रोत विचारला जाऊ शकत नाही

मी सांगतो की, माझ्या माहितीचा स्त्रोत विचारला जाऊ शकत नाही. मी माहिती देऊ शकत नाही. मी स्वःत पोलिसांकडे जाणार आहे. त्याला योग्य ते उत्तर देणार आहे. पोलिसांनी चुकीची केस केली असली तरीही मी त्यांना तपासात मदत करील. आताच हे प्रकरण बाहेर का आले, सहा महिने यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे सरकारचाच तपास करायला हवा असेही ते म्हणाले. मी परवा केलेल्या भांडाफोडीवर उत्तर सुचत नसल्याने हे कारनामे राज्य सरकारला सुचत आहेत असा आरोपही त्यांनी केला.

प्रवीण चव्हाण यांच्या व्हिडीओचे फाँरेन्सिक ऑडीट केले

प्रवीण चव्हाण यांच्या व्हिडीओचे फाँरेन्सिक ऑडिट केले आहे. प्रवीण चव्हाण यांनी माध्यमाला काल दिलेले वक्तव्य खोटे आहे. आता मला माहित आहे की, एखादा गुन्हा दाखल करून मला अडकवतील. हे मी होऊ देणार नाही. मी एक्स्पर्टचा सल्ला घेणार आहे असेही ते म्हणाले.

सामंजस्याने वाद मिटविण्यासाठी लोक अदालत अत्यंत महत्त्वाची-प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश संजय देशमुख

0

पुणे,दि.१२: लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा अग्रेसर असून सामंजस्याने वाद मिटविण्यासाठी लोक अदालत अत्यंत महत्त्वाची ठरते, जिल्ह्यात लोक अदालतीच्या माध्यमातून अधिकाधिक प्रकरणे निकाली निघतील, असा विश्वास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश तथा विधी सेवा प्राधिकरण पुणेचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी व्यक्त केला.

जिल्हा व सत्र न्यायालयात आज राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा न्यायधीश एस.एस.गोसावी, जिल्हा न्यायधीश के.पी.नांदेडकर,
न्यायधीश श्री. वेदपाठक, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर प्रताप सावंत, जिल्हा सरकारी वकील एन.डी.पाटील, पुणे वकील बार आसोसियशनचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे आदी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. मतभेद असू शकतात पण मनभेद नसावेत. भविष्याचा विचार करून कोर्टात वेळ व पैसा न घालवता वाद सामंजस्याने मिटवावे असा सल्ला त्यांनी दिला. तसेच लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा आपले अग्रेसर स्थान कायम ठेवेल, असेही ते म्हणाले.

श्री.नांदेडकर म्हणाले, लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणांचा निपटारा गतीने करू शकल्यामुळे लोक अदालतीला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. गतवर्षी लोक अदालतीमध्ये पुणे जिल्ह्याने देशात यश मिळवले. आजच्या लोक अदालतीच्या यशाचीही नोंद होईल. आजच्या लोक अदालतीच्या माध्यमातून अधिकाधिक प्रकरणे निकाली कसे निघतील यासाठी प्रयत्न करावे असे आवाहनही त्यांनी केले.

श्री. सावंत म्हणाले, लोक अदालतीमध्ये पुणे येथील ५० हजारापेक्षा जास्त प्रलंबित प्रकरणे, दाखलपूर्व २ लाखापेक्षा अधिक, ई-चलन ११ लाखापेक्षा अधिक प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यासाठी पुण्यात ६० पॅनल उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ७ ते ११ मार्च या कालावधीत छोट्या गुन्ह्यातील १७ हजारापेक्षा अधिक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या पुणे जिल्हा लोक अदालतीची दखल जागतिक बँकेने व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने घेतली असून याबाबत एकत्रित अभ्यास करून डाटा संकलनाचे काम सुरू आहे. विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी याबाबतचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी न्यायाधीश, वकील, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मुळे अनेक कुटुंबांना लाभ मिळतोय-खासदार गिरीश बापट

0

पुणे ता १२:कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन क्षेत्रीय कार्यालय पुणे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे (आजादी का अमृत महोत्सव) औचित्य साधून कर्मचारी भविष्य निधी कायद्याअंतर्गत “कौटुंबिक लाभ वितरण” कार्यक्रमाचे आज आयोजन केले होते. खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते यामध्ये जवळपास १२० मृत व्यक्तींच्या वारसदारांना कर्मचारी पेन्शन योजना रु.३ कोटी ४३ लक्ष, इन्शुरन्स लाभ रु. ४ कोटी ०६ लक्ष (एकूण रु.७ कोटी ४९ लक्ष) व पेन्शनचा लाभ देण्यात आला. कोरोना काळात मृत्यु झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना लाभ मिळवून देणेसाठी पुणे क्षेत्रीय कार्यालयाने ७ दिवसाची विशेष मोहीम हाती घेवून १२० प्रकरणाचा निपटारा केला. सदर योजनेचा लाभ मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना देण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त-१ अमित वशिष्ठ, नगरसेवक धनराज घोगरे, उमेश गायकवाड, नगरसेविका कालिंदा पुंडे, महेश पुंडे, आयुक्त अरुण कुमार, आयुक्त सौरभ सुमन प्रसाद, आयुक्त निखीलचंद्र झोडे, आयुक्त सत्वतसिंग शिवूरकर, आयुक्त सुरज पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध व्यवस्थांचे व्यवस्थापन करते. तरतुदी कायदा, 1952. भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन आणि विमा लाभांच्या रूपात सामाजिक सुरक्षा लाभ कामगार वर्गाला प्रदान करणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. EPFO, जी सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाची वैधानिक संस्था आहे. भारताचे, EPF आणि MP कायदा 1952 च्या तरतुदींची अंमलबजावणी करणे, ट्रस्टमध्ये ठेवलेल्या पैशांचे व्यवस्थापन, कव्हर केलेल्या आस्थापनांमधून वसुली, निधीच्या सदस्यांना समाधानकारक सेवा प्रदान करणे आणि निवृत्तीवेतन वितरित करणे आणि मृत्यूशी संबंधित फायद्यांसह इतर लाभांची व्यापकपणे कार्ये पात्र दावेदार.
प्रादेशिक कार्यालय, पुणे (कॅन्ट.)
EPFO, प्रादेशिक कार्यालय, पुणे कॅन्टोन्मेंट सामाजिक सुरक्षा सेवांचा विस्तार सुमारे कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या 10229 आस्थापनांमध्ये 11.42 लाख ग्राहक आहेत. भोर, पुरंदर, बारामती, शिरूर, दौंड तालुक्यांसह पुणे शहर आणि आसपासच्या आस्थापनांवर या कार्यालयाचे कार्यक्षेत्र आहे. आणि या आस्थापनांमध्ये असलेल्या ग्राहकांना सेवा प्रदान करते. दिनांक 12 मार्च 2022 रोजीच्या आझादी का अमृत महोत्सव (AKAM)
श्रम आणि रोजगार मंत्रालय (MoLE) 07 ते 14 मार्च 2022 या कालावधीत आपला आझादी का अमृत महोत्सव हा प्रतिष्ठित सप्ताह साजरा करत आहे. हे लक्षात घेऊन प्रादेशिक कार्यालय, पुणे (Cantt.) ने एका विशेष मोहिमेद्वारे मृत्यूशी संबंधित दाव्यांची प्रक्रिया केली आहे. कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याला, लिपिकापासून ते आयुक्तांपर्यंत, मृत्यू प्रकरणाचा पाठपुरावा करून त्यावर तातडीची कार्यवाही करण्यासाठी नियुक्त केले होते. त्यानुसार, मिशन मोडवर एका आठवड्यात 118 मृत्यू प्रकरणांवर प्रक्रिया करण्यात आली. ज्यामध्ये कर्मचारी पेन्शन योजना, 1995 च्या मृत सदस्यांच्या पात्र कुटुंबातील सदस्यांना पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPOs) वितरित करणार आहे.

स्व. यशवंतराव चव्‍हाण यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

0

     पुणे- शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकनेते, महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्‍हाण यांच्या जयंती निमित्त आज काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास माजी आमदार व ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

      ‘‘संघटनेतील कार्यकर्त्यांनी स्नेहाचे जाळे विनावे, माणसे सांभाळावी आणि माणसे वाढवावीत’’ पुण्यातील काँग्रेस भवन येथे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुतळ्याखाली लिहिलेले हे शब्द कायमच काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रेरणा देणारे आणि त्यांची ऊर्जा वाढविणारे राहणार आहेत. असे विचार आज पुण्यातील काँग्रेस भवन मध्ये यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमेश बागवे यांनी मांडले.

     ‘‘महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून स्व. यशवंतराव चव्हाण यांनी जेवढं महाराष्ट्रासाठी विविध योजनांच्या माध्यमातून केले तेवढंच भरभरून प्रेम त्यांना जनतेने दिले. इथून पुढेही त्यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रासाठी कायम उभे राहण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्ता करत राहील’’ असे गौरवोद्गार माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी काढले.

     कार्यक्रमाचे आभार माजी महापौर कमल व्यवहारे यांनी मांडले. या कार्यक्रमात माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, ॲड. अभय छाजेड, वीरेंद्र किराड, हाजी नदाफ, बाळासाहेब अमराळे, सुनिल शिंदे, सतिश पवार, शिलार रतनगिरी, रमेश सोनकांबळे, सुनिल घाडगे, राजू नाणेकर, अनुसया गायकवाड, नारायण पाटोळे, निलेश सांगळे, भगवान धुमाळ, दिलीप लोळगे, देविदास लोणकर, आशिष व्‍यवहारे, विठ्ठल गायकवाड, परवेज तांबोळी, सुरेश कांबळे तसेच पुण्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

नमूद भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार करण्याचे आवाहन

0

मान्यताप्राप्त शेअर ए-ऑटोरिक्षा व टॅक्सी प्रवाशांसाठी स्टँड यादी आणि प्रतीप्रवासी भाडे

मुंबई दि. १२: ऑटोरिक्षा व टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी विविध प्रकारच्या योजना परिवहन विभागामार्फत राबविण्यात येतात. ऑटोरिक्षा व टॅक्सीने प्रवास करताना शेअरिंग पद्धतीने सेवेचा लाभ घेतल्यास प्रतीप्रवासी देय भाड्यापेक्षा मीटरप्रमाणे देय होणारे भाडे हे कमी असते. मुंबईतील विविध भागातील प्रवाशांना या योजनेचा लाभ घेण्याकरीता प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील शेअर-ए-ऑटोरिक्षांच्या ८० मार्गांना व शेअर-ए-टॅक्सींच्या १७ मार्गांना मान्यता देण्यात आली आहे.

            या योजनेचा लाभ घेणाऱ्या जनतेला या प्रसिद्धीपत्रकामार्फत या दरांबाबत अवगत करण्यत येत असून संबंधित मार्गिकेसाठी ठरवून दिल्याप्रमाणेच प्रतीप्रवासी भाडे अदा करावे. तसेच शेअरिंग योजनेचा लाभ घेताना नमूद भाडे दरापेक्षा जादा भाडे आकारणी केल्यास प्रवासाचा तपशील व वाहन क्रमांकासह कार्यालयाकडे तक्रार करावी, तसेच जनतेनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आवाहन सचिव मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (पश्चिम) यांनी प्रसिद्धीपत्रकामार्फत केले आहे.

            शेअर-ए-ऑटोरिक्षा व शेअर-ए-टॅक्सी या योजनेतून प्रवास करण्यासाठी मान्यताप्राप्त स्टँड यादी व त्या-त्या मार्गावर प्रतीप्रवासी किती भाडे देय आहे याची यादी सोबत जोडण्यात आली आहे, असे सचिव मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (पश्चिम) यांनी प्रसिद्धीपत्रकामार्फत कळविले आहे.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

0

मुंबई दि. 12: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, भारताचे माजी उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले आहे. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रचला, स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात की, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग होता. देशप्रेमाने भारावलेले त्यांचे व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि नंतर देशाचे संरक्षण, अर्थ, गृह, परराष्ट्र मंत्री, उपपंतप्रधान पद त्यांनी भूषविले. या संपूर्ण कारकिर्दीत जनतेशी नाळ त्यांनी कायम जोडली होती. महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव होता. सामाजिक कार्य आणि साधी राहाणी, वाचनाची आवड हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक तरुणांमधील नेतृत्वगुण व धडाडी ओळखून त्यांना पुढे आणले. कृषी, शिक्षण, सहकार, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांची जाण असलेले त्यांचे नेतृत्व होते. देशाचे संरक्षण मंत्री असताना त्यांनी दिलेले योगदान देश कायम स्मरणात ठेवेल. त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.


उधारीचा वायदा करणारा आणि जबाबदारी टाळणारा राज्याचा अर्थसंकल्प -भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील

0

पुणे-राज्याच्या अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी मांडलेला अर्थसंकल्प हा उधारीचा वायदा करणारा आणि महत्त्वाच्या विषयांत जबाबदारी टाळून दिशाभूल करणारा आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

ते म्हणाले की, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा यापूर्वीच्या अर्थसंकल्पात केली होती पण त्याची अंमलबजावणी केलीच नाही याची कबुली अर्थमंत्र्यांनी दिली आणि आता आगामी वर्षात वचनपूर्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था रुळावर आली आणि विकासाचा वेग वाढला म्हणून कालच आर्थिक पाहणी सादर करताना दावा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना द्यायच्या निधीबाबत जबाबदारी का पार पाडली नाही आणि आता उधारीचा वायदा का केला हे सांगितले पाहिजे.

त्यांनी सांगितले की, एसटी ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे हे अर्थमंत्री कबूल करतात पण संपामुळे बंद पडलेली एसटीची चाके पुन्हा सुरू करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्याच्या ऐवजी केवळ नव्या बसेससाठी घोषणा करून या सरकारने दिशाभूल केली आहे. त्याच प्रमाणे पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून सामान्य माणसाला दिलासा देण्याची जबाबदारीही अर्थसंकल्पात टाळली आहे.

विकासाची पंचसूत्री सांगताना अर्थमंत्र्यांनी अल्पसंख्यांक समाजाचा आवर्जून उल्लेख करून त्यांच्यासाठीची योजना सांगितली. पण त्यांना मराठा व धनगर समाजांचा विसर पडला. या समाजांसाठीही काम करण्याची या सरकारची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.

अर्थसंकल्पातील विकासाची पंचसूत्री राज्याला प्रगतीपथावर नेईल – जलसंपदामंत्री जयंत पाटील

0

मुंबई, दि. 11 : कृषी, दळणवळण, आरोग्य, मनुष्यबळ विकास आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांवर भर देणारा राज्याचा सन 2022-23 चा अर्थसंकल्प विकासाला चालना देणारा ठरेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी राज्याचा सन 2022-23 साठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील तरतुदींचे जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील यांनी स्वागत केले आहे.

जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, अर्थसंकल्पात जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांसाठी करण्यात आलेली भरीव तरतूद अतिशय महत्त्वाची आहे. या अर्थसंकल्पात येत्या वर्षभरात १०४ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. विदर्भातील गोसीखुर्द प्रकल्पासाठी सुमारे 840 कोटी रुपयांची करण्यात आलेली तरतूद विदर्भाच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

कोयना, जायकवाडी आणि गोसीखुर्द धरणाच्या जलाशयात जलपर्यटन प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे या भागातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून या भागातील रोजगाराला चालना मिळेल असा विश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला आहे.

आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण आणि विस्तारीकरण करण्यासाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेली तरतूद कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची आहे. महिलांच्या आरोग्यासाठी राज्यातील सोळा जिल्ह्यात शंभर खाटांचे महिला रुग्णालये उभारण्याचा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे, असे श्री जयंत पाटील यांनी सांगितले.

राज्यातीलऔद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी करण्यात आलेली तरतूद गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मनुष्यबळ विकासासाठी इनोव्हेशन हब उभारणीसाठी पाचशे कोटी आणि स्टार्टअप फंडसाठी शंभर कोटी रुपयांची करण्यात आलेली तरतूद अतिशय स्वागतार्ह असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.

पर्यटनाच्या विकासासाठी नवीन प्रकल्पांची सुरूवात करण्याचा संकल्प महत्वाचा आहे. पुणे वन विभागातील बिबट्या सफारी आणि बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा उद्यानातील आफ्रिकन सफारी सुरू करण्याचा मानस चांगला आहे, असे श्री जयंत पाटील यांनी सांगितले.

कृषीसाठी करण्यात आलेली तरतूद शेती आणि संलग्न क्षेत्राला चालना देणारी ठरेल. येत्या वर्षभरात साठ हजार वीज पंपांना जोडण्या देण्याचे करण्यात आलेले नियोजन शाश्वत सिंचनासाठी अतिशय महत्त्वाचे ठरेल. ग्राम विकास आणि गृहनिर्माण क्षेत्रासाठी अर्थ संकल्पात करण्यात आलेली तरतूद निश्चितच चांगली आहे, असे श्री जयंत पाटील यांनी सांगितले.

दळणवळणाच्या सुविधा विकासासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. त्यामुळे या अर्थसंकल्पात रस्ते, रेल्वे, मेट्रो विकासासाठी करण्यात आलेली तरतूद राज्यातील प्रगतीला चालना देईल, असा विश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला आहे.

अर्थसंकल्पात पशुसंवर्धनाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

0

मुंबई, दि. 11 : सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाला अर्थसंकल्पात 406 कोटी 1 लाख रुपयांची तरतूद करून पशुसंवर्धनच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना दिली असल्याची प्रतिक्रिया पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.

गायी-म्हशींमध्ये स्त्रीभृण प्रत्यारोपणाची सुविधा किफायतशीर दरात

देशी गायी, म्हशींसाठी प्रयोगशाळा- देशी गायी, म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकी एक, अशा एकूण तीन मोबाईल प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहेत. उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गायी व म्हशींची स्त्रीबीजे प्रयोगशाळेत फलित करुन सर्वसाधारण गायी-म्हशींमध्ये स्त्रीभृण प्रत्यारोपणाची सुविधा किफायतशीर दरात व शेतकऱ्यांच्या दारात उपलब्ध करून देण्यात येईल.

      मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळसाठी देखभाल दुरूस्तीकरिता 10 कोटी रूपये

“बैलघोडा हॉस्प‍िटल” म्हणून प्रसिध्द असलेल्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना परळ येथे 2 ऑगस्ट 1886 रोजी झाली. या महाविद्यालयाच्या परिसरात 60 ते 120 वर्षे जुन्या 13 इमारती आहेत.  हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी या इमारतींच्या देखभाल दुरूस्तीकरिता 10 कोटी रूपये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

राज्यातील प्रत्येक महसुली विभागात एक शेळी समूह प्रकल्प राबविण्यात येणार

शेळी पालनासाठी सामूहिक सुविधा केंद्र- अमरावती जिल्हयातील पोहरा येथे शेळी समूह योजनेअंतर्गत श्रेणीवर्धन व क्षमतावाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील प्रत्येक महसुली विभागात एक शेळी समूह प्रकल्प राबविण्यात येईल. या प्रकल्पासाठी 50 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

बैलगाडा शर्यतीमुळे स्थानिक जातींच्या सुदृढ गोवंशांची पैदास अबाधित राहणार

परंपरेने चालत आलेल्या बैलगाडा शर्यतींनी उत्तम, सुदृढ गोवंशाची पैदास आणि संगोपनाचे साधन म्हणून मोठी कामगिरी बजावली आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी या शर्यती सुरू राहाव्यात अशी ठाम भूमिका घेऊन सरकारने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला आणि बैलगाडा शर्यतींची परवानगी मिळवली. महाराष्ट्रातील स्थानिक जातींच्या सुदृढ गोवंशांची पैदास यामुळे अबाधित राहण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.

रोजगार हमी योजनेसाठी १ हजार ७५४ कोटी, फलोत्पादनासाठी ५४० कोटी रुपयांची भरीव तरतूद – रोहयोमंत्री संदिपान भुमरे

0

मुंबई, दि.11 :रोजगार हमी योजनेसाठी सन 2022-23 मध्ये 1 हजार 754 कोटी आणि फलोत्पादनासाठी 540 कोटी रुपयांची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी अर्थसंकल्पाविषयी दिली.

43 हजार 902 सिंचन विहिरींची कामे

सिंचन विहिरींच्या धडक कार्यक्रमांतर्गत नागपूर विभागातील 6 जिल्ह्यात 24 हजार ६१४ सिंचन विहिरींच्या धडक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 43 हजार 902 सिंचन विहिरींची कामे हाती घेतली आहेत.

यावर्षी 1 लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दीष्ट

फळबाग लागवड योजनेंतर्गत फळबाग लागवडीच्या सुधारित धोरणानुसार या योजनेत केळी, ड्रॅगन फ्रुट, ऍव्हॅकॅडो, द्राक्षे आदी फळ पिके तसेच अन्य महत्त्वाच्या मसाला पिकांचा नव्याने समावेश करण्यात येत आहे. यावर्षी १ लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दीष्ट आहे.

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेस पूरक निधी

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेमधून रस्त्यांच्या कामातील कुशल भागासाठी रोजगार हमी योजनेतून पूरक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हे स्वागतार्ह असल्याचे श्री.भुमरे यांनी सांगितले.

देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना बळकट करण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना – केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड

0

पुणे, 11 मार्च 2022

देशभरातील सुक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योगांना बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना आखल्या असून त्यांच्या माध्यमातूनच आपला देश आत्मनिर्भर होण्यास मदत होईल असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ . भागवत कराड यांनी आज पुण्यात व्यक्त केला . मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर ला भेट देऊन चेंबरच्या पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करताना डॉ . कराड बोलत होते . उद्योगांशी संबंधित अनेकविध अडचणी यावेळी या पदाधिकाऱ्यांनी डॉ . कराड यांच्यापुढे मांडल्या . त्यात प्रमुख मुद्दा अर्थातच सुक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योगांपुढे गेल्या काही वर्षात उभ्या राहिलेल्या समस्यांविषयक होता. त्यावर अधिक विस्तृत माहिती देताना डॉ. कराड यांनी गेल्या अर्थसंकल्पात आणि आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पातही त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून उद्योजकांनी त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन केलं.

बँकांकडून होणाऱ्या कर्ज वाटपाविषयी या उद्योगांच्या अजूनही काही अडचणी असल्यास बँक आणि उद्योगांचे प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेऊन त्या सोडवल्या जातील असं डॉ कराड म्हणाले.

त्यानंतर डॉ. कराड यांनी पुण्यात इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

आगामी 25 वर्षाचा कालावधी आणि देशहिताला डोळ्यासमोर ठेऊन भारताला अधिक सामर्थ्यशाली बनवणारा 22-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ . कराड यांनी  यावेळी सांगितले.

महिलांमध्ये यशस्वी उद्योजक होण्याची क्षमता : खा.वंदना चव्हाण

0

लर्निग लिंक्स फाऊंडेशन व मास्टरकार्ड यांच्यातर्फे १०९० महिलांना उद्योजकता, आर्थिक-डिजिटल साक्षरता प्रशिक्षण
पुणे : “महिलांना संधी मिळाली, तर त्याचे त्या सोने करतात. सचोटी, प्रामाणिकता, कष्टाची तयारी यामुळे त्यांच्यात उद्योजिका होण्याची क्षमता असते. योग्य संधी आणि पाठिंबा मिळाला, तर महिला उद्योगातही यशस्वी होते. लर्निंग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टरकार्ड यांच्या पुढाकारातून १२५ महिलांचे बिझनेस प्लॅन निवडण्यात आले, ही आनंदाची गोष्ट आहे,” असे मत राज्यसभा खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.

‘महिला उद्योजकता व तंत्रज्ञान’ प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील १०९० महिलांना लर्निग लिंक्स फाऊंडेशन व मास्टरकार्ड यांच्यातर्फे आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता व मार्केटिंग, उद्योजकता व बिझनेस प्लॅन या विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यातील १२५ महिलांच्या उद्योगांना मान्यता देण्यात आली. तर १२ महिलांना अनुदानाचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. प्रसंगी ‘वी अँड टेक पुणे’ यात महिलांनी केलेल्या कामाची चित्रफीत दाखवण्यात आली.
बाणेर रस्त्यावरील यशदा येथे झालेल्या कार्यक्रमावेळी सिंहगड इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. डॅनीयल पेनकर, लर्निग लिंक फाउंडेशनचे व्यवस्थापकीय सल्लागार महम्मद अमीर अजीज, फाउंडेशनच्या लीड कन्सल्टंट स्वाती दुधाले आदी उपस्थित होते. वंदना चव्हाण यांच्या हस्ते हेमलता गायकवाड, उज्वला नांदे, सुजाता शिंदे, नीलम सोनवणे, कौसर सय्यद, उज्ज्वला दिखले, मनीषा कालेकर, रंजना उमाप, स्वाती ताम्हाणे, नेहा शिंदे, साक्षी, सानिया सय्यद अशा १२ महिलांना धनादेश व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

वंदना चव्हाण म्हणाल्या, “तुम्ही सगळ्या महिला भाग्यवान आहेत. लर्निग लिंक्स फाऊंडेशनने तुम्हाला व्यासपीठ मिळवून दिले आहे. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करणे आपल्या हातात आहे. कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही. त्यामुळे आज मिळालेल्या ५,००० रुपयांचे ५०,००० कसे होतील, यावर आपण काम केले पाहिजे. स्माईल फाउंडेशन तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे. ध्येय निश्चित करून व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करा. हे करताना आरोग्याकडेही लक्ष द्या.”
डॉ. डॅनीअल पेनकर म्हणाले, “महिलांमध्ये अपरिमित शक्ती असते. अनेकदा पुरुषांना जमत नाही, तेही काम महिला करून दाखवतात. त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. लर्निंग लिंक्स फाउंडेशनसारख्या संस्था महिलांना उभा करण्याचे काम करत आहेत. सकारात्मक विचार, निर्णयक्षमता असेल, तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. ३६५ दिवस महिला दिन साजरा होईल, असे महिलांचे कर्तृत्व आहे.”
महम्मद अमीर अजीज म्हणाले, “लर्निग लिंक्स फाऊंडेशन ही २० वर्ष जुनी संस्था आहे. प्रत्येकाला नवीन काहीतरी शिकायला मिळावे हाच फॉउंडेशनचा उद्देश आहे. आज देशात केवळ १३ टक्के महिला उद्योगात आहेत. हे प्रमाण वाढवण्यासाठी महिला उद्योग प्रशिक्षण व अनुदान देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता धर्माराव यांनी केले. स्वाती दुधाले यांनी आभार मानले.