Home Blog Page 1985

मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबत 28 मे रोजी पुण्यात  राज्यव्यापी बैठक

 महाराष्ट्रातील पदाधिकारी ठरवणार पुढील दिशा –

 पुणे-मातंग समाजावर वारंवार होणा-या जिवघेणे व जुलमी अत्याचाराला थांबविण्याकरीता  मातंग समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची व नेत्यांच्या राज्यव्यापी बैठकीचे आयोजन 28 मे रोजी  पुण्यात करण्यात आले आहे .         

या राज्यव्यापी बैठकीचे आयोजन मातंग एकता आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे .या बैठीकाला माजी मंत्री रमेश बागवे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.  असे सांगून आयोजकांनी सांगितले कि,’    फुले ,शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभुमी महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या संख्येने असलेल्या मातंग समाजावर सध्याच्या काळात वारंवार अन्याय, अत्याचार जुलमी व जिवघेणे हल्ले त्याच बरोबर माता भगिनींवर शाररीक व मानसिक अत्याचार होत असून त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची कास धरून फुले, शाहू. अण्णाभा साठे यांच्या विचाराने महाराष्ट्र प्रामाणिकपणे व कष्टमय जिवन जगत असलेल्या समाजावर मागील काळात व सदयस्थितीत अनेक अन्याय अत्याचार होत आहेत. यामध्ये मातंग समाजाचे प्रेत जाळू न देणे, महिला भगिनींवर शाररीक व मानसिक अत्याचार वाढत आहेत. अनेक तरुणाचे नाहक बळी घेतले जात आहेत.
यामध्ये सदयस्थितीतील औरंगबादची मनोज आव्हाड यांना बांधून अमानूष जिवे मारण्याची घटना अशा अनेक घटना या महाराष्ट्रात घडत आहेत. यामुळे आज मातंग समाजाला स्वातंत्र्य मिळाले आहे की नाही असे संपुर्ण मातंग समाजाला वाटू लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजा सारखे अन्याया विरोधात लढणारे राजे या महाराष्ट्राचे खरे राज्यकर्ते होते. तथापी सध्याचे राज्यकर्ते मातंग समाजावर होणा-या अन्याय अत्याचाराला खतपाणी घालत आहेत असेच वाटू लागले.   हे अन्याय अत्याचार यापुढे आपणच थांबवायचे असा निर्धार मातंग समाजाने केला असून हे जुलमी अन्याय अत्याचार कशा प्रकारे थांबवायचे यावर विचार विनिमय करण्याकरीता मांतग एकता आंदोलनाचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष गृहराज्य मंत्री रमेश बागवे यांच्या अध्यक्षते खाली व कार्याध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनामध्ये राज्याच्या जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिका-यांची दिशा दर्शक महत्वाची बैठक जनरल अरुणकुमार वैदय स्टेडियम भवानी पेठ पुणे ४२ येथे २८/०५/२०२२ रोजी दुपारी १२ वाजता. आयोजित केली आहेअशी माहिती महाराष्ट्र राज्य समन्वयक विठ्ठल थोरात ,अरुण गायकवाड ,संजय साठे यांनी दिली आहे .

सारसबागेतील पावभाजी स्टॉलच्या अतिक्रमणांवर झालेली कारवाई चुकीची : राष्ट्रवादीची भूमिका

पुणे- सारसबागेतील पावभाजी स्टॉल च्या अतिक्रमणांवर झालेली कारवाई चुकीची असा दावा करत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आणि नगरसेविका अश्विनी कदम यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेऊन अतिक्रमण कारवाई करून हे व्यवसाय सिल करणे चुकीचे आहे. त्याऐवजी पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी खाऊ चौपाटी विकसित करावी व सर्व व्यावसायिकांना जागा ठरवून देत त्याप्रमाणे कर लावण्यात यावा व पुन्हा ही चौपाटी सुरू करण्यात यावी अशी मागणी केली .

या संदर्भात राष्ट्रवादीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पुणे शहरातील प्रत्येक व्यक्तीसाठी सारस बागेत असणारी चौपाटी हे कधी ना कधी भेट दिलेले हे कधी ना कधी भेट दिलेले ठिकाण आहे. पुणे महानगरपालिकेच्या कॉफीटेबल बुकमध्ये अभिमानाने सारसबाग चौपाटी चे नाव “प्राईड ऑफ पुणे” म्हणून समाविष्ट करण्यात आलेले आहे. असे असताना पुणे महानगरपालिकेत ने अतिक्रमण विरोधी कारवाई करत संपूर्ण चौपाटी सिल केली आहे. मुळात सारसबाग चौपाटी ही ज्या रस्त्यावर आहे, त्या रस्त्यावर कुठलीही रहदारी नाही, इतर कुठल्याही मोठ्या वाहनांची ये-जा होत नाही. त्या रस्त्याला जर गेल्या ६० वर्षांपासून असणाऱ्या चौपाटीवर अचानकपणे झालेली कारवाई चुकीची आहे. येथे व्यवसाय करणारे व्यवसायिक गेल्या ६० वर्षांपासून या ठिकाणी आपला व्यवसाय करतात. त्यांची दुकाने अशी अचानक पणे सिल करणे देखील चुकीचे आहे. त्याऐवजी पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी चौपाटी विकसित करावी व सर्व व्यावसायिकांना जागा ठरवून देत त्याप्रमाणे कर लावण्यात यावा व पुन्हा ही चौपाटी सुरू करण्यात यावी अशी विनंती निवेदनाद्वारे पुणे महानगरपालिका आयुक्त श्री.विक्रम कुमार यांना करण्यात आली. याबाबत येत्या गुरुवारी २६ मे रोजी मा.आयुक्तांच्या दालनात याबाबत बैठक आयोजित करत या प्रश्न सोडविणार असल्याचे पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले.
“निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सर्व स्टॉलधारकांच्या पाठीशी आहे, कारण या स्टॉलवर येणारा ग्राहक हा सर्वसामान्य पुणेकर असतो.त्या सर्वसामान्य पुणेकरांसाठी असणारी ही चौपाटी वाचली पाहिजे , हीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका आहे.पुणे शहरात महानगरपालिकेकडून सुरू असलेली अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे बऱ्याच ठिकाणी व्यवसायिक अडचणीत आले आहेत, अगोदरच कोविडच्या काळात २ वर्ष सर्वांचे व्यवसाय बंद होते.ते पुन्हा सुरू झाले असतानाच आता पुन्हा अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू करण्यात आली आहे. या सर्वच ठिकाणी सामंजस्याने मार्ग काढला गेला पाहिजे. शहराला शिस्त लावत असतानाच शहरातील व्यवसायिक अडचणीत येऊ नयेत ही आमची प्रामाणिक मागणी आहे”,असे मत शहराध्यक्ष श्री. प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.
समवेत स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सौ. अश्विनी कदम व सारसबाग चौपाटीतील व्यवसायिक देखील उपस्थित होते.

 निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ‘पेंशन अदालत’ चे आयोजन

0

मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र शासनातीत निवृत्त कर्मचाऱ्यांकरिता अधिदान व लेखा कार्यालय, वांद्रे पूर्व, मुंबई येथे दिनांक 27 मे 2022 रोजी सकाळी 11 पासून पेंशन अदालतचे आयोजन करण्यात येत आहे. प्रधान महालेखाकार (लेखा व हकदारी), महाराष्ट्र 1 मुंबई येथील अधिकारी अधिदान व लेखा कार्यालय, वांद्रे पूर्व, मुंबई येथे निवृत्तीवेतन संबंधित समस्या आणि मागण्यांचे निराकरण करण्यासाठी उपस्थित राहतील.

प्रधान महालेखाकार (लेखा व हकदारी) महाराष्ट्र- 1 मुंबई कार्यालयाने निवृत्तीवेतनधारकांच्या सोयीकरीता अनेक उपक्रम राबविले आहेत. जसे साप्ताहिक ऑनलाईन पेशन संवाद, 24 तास उपलब्ध टोल फ्री नं. 1800-22-0014/ 24/7 व्हॉइस मेल नं. 020-71177775, माहिती वाहिनी, पेंशन सेवापत्र आणि जीपीएफ सेवापत्र, पेन्शनर्संकरीता समर्पित ई-मेल: helpdesk.mhlaebeag.gov.in या उपक्रमांची माहिती पेन्शन अदालतमध्ये देण्यात येईल.

मुंबई शहर व मुंबई उपनगरातील सर्व निवृत्तीवेतनधारक संघटनांचे प्रतिनिधी व त्यांचे सदस्य यांनी या अदालतमध्ये कृपया सहभागी व्हावे, असे आवाहन अधिदान व लेखा अधिकारी श्रीमती रश्मी नांदिवडेकर यांनी केले आहे.

एमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10वर्षाखालील टेनिस सर्किट स्पर्धेत मुंबईच्या तमन्ना नायर, आरव छल्लाणी यांना विजेतेपद 

पुणे, 23 मे 2022:  मुंबई उपनगर टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित व सुहाना प्रायोजितएमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10वर्षांखालील टेनिस सर्किट या स्पर्धेच्या मुंबई लीग स्पर्धेत मुलींच्या गटात मुंबईच्या तमन्ना नायर हिने  तर, मुलांच्या गटात मुंबईच्या आरव छल्लाणी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले. 
प्रकटेनिस अंधेरी येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या दोन दिवसीय स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित मुंबईच्या तमन्ना नायरने अव्वल मानांकित पुण्याच्या सृष्टी सूर्यवंशीचा 4-0, 2-4, 5-3असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. तमन्ना हि सुलोचनादेवी सिंघानिया शाळेत शिकत आहे. याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित सृष्टी सूर्यवंशीने पाचव्या मानांकित समीक्षा शेट्टीचा 6-0 असा तर, दुसऱ्या मानांकित तमन्ना नायरने तिसऱ्या मानांकित मायरा शेखचा 6-0 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. 
मुलांच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित आरव छल्लाणी याने अव्वल मानांकित अधिराज दुधानेचा 5-3, 4-0 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. आरव हा नेरुळ येथील दिल्ली पब्लिक शाळेत पाचवी इयत्तेत शिकत असून बिलीफ टेनिस अकादमीत प्रशिक्षक गोटेश अवस्थी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीए सुपरवायझर सोनल वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले.   
निकाल: मुली: उपांत्य फेरी: 
सृष्टी सूर्यवंशी[1] वि.वि.समीक्षा शेट्टी[5] 6-0; तमन्ना नायर[2]वि.वि.मायरा शेख[3] 6-0;अंतिम फेरी: तमन्ना नायर[2]वि.वि.सृष्टी सूर्यवंशी[1] 4-0, 2-4, 5-3;      
मुले: उपांत्य फेरी:
अधिराज दुधाने[1] वि.वि.वीर चतुर[3] 6-4आरव छल्लाणी[2] वि.वि.आरव शहा[15] 6-2;अंतिम फेरी: आरव छल्लाणी[2] वि.वि.अधिराज दुधाने[1] 5-3, 4-0. 

इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे परदेश शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याचे आवाहन

0

मुंबई, दि. २३ : इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील  विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात परदेश शिष्यवृत्ती साठी २३ जून २०२२ पर्यंत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुकांनी विहीत वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक डी.डी.डोके यांनी केले आहे.

परदेश शिष्यवृत्तीसाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थ्यांच्या पालकांचे अथवा कुटूंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.८ लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत THE (Time Higher Education ) / आणि QS World University Ranking २०० च्या आतील असावी. शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३०% जागेवर मुलींची निवड करण्यात येईल. अन्य अटी व शर्ती हया सविस्तर विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, शासन निर्णय दिनांक ११ ऑक्टोबर २०१८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे लागू राहतील. अर्जाचा नमूना, शासन निर्णय व अधिक सविस्तर माहितीसाठी  www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावरील रोजगार या लिंकवर भेट द्यावी. ही योजना शासन निर्णय इमाव, सावशैमाप्र, विजाभज आणि विमाप्रा कल्याण विभाग क्र. शिवृत्ती २०१८/प्र.क्र.११८/शिक्षण, दि. ११ ऑक्टोबर २०१८ नुसार  हा अर्ज संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे-१ यांच्याकडे दि.२३ जून २०२२ रोजी सायं ६.१५ पर्यंत जमा करावा.

 योजनेसाठी लाभाचे स्वरूप पढीलप्रमाणे आहे. विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण शुल्काची पूर्ण रक्कम. विद्यापीठाच्या निकषानुसार वैयक्तिक आरोग्य विमा खर्च, विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता परदेशातील संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या DOPT विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे अथवा महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाहीर करेल ती रक्कम निर्वाह भत्ता म्हणून अनुज्ञेय असेल.विद्यार्थ्यांना परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत येताना विमान खर्च अनुज्ञेय असेल.

“या, तुमचे चित्रपट भारतात चित्रित करा”- कान येथे केंद्रीय राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांचे चित्रनिर्मात्यांना निमंत्रण

नवी दिल्ली, 23 मे 2022

केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमन्त्री डॉ. एल.मुरुगन यांनी आज कान चित्रपट महोत्सवात भारतीय दालनात झालेल्या एका गोलमेज बैठकीत भाग घेतला. ‘भारत दरवर्षी सर्वाधिक चित्रपटांची निर्मिती करतो’ अशी माहिती देत, वीसपेक्षा अधिक भाषांमध्ये हे चित्रपट तयार होतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले. चित्रपटाच्या प्रेक्षकांची संख्या एक अब्जापेक्षा अधिक असल्याचे सांगून चित्रपटांसाठीची बाजारपेठ म्हणूनही भारताचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. सरकारच्या यशस्वी कामगिरीची माहिती देताना, “2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आल्यापासून, चित्रपट उद्योगाच्या फायद्याचे अनेक उपक्रम सरकारने हाती घेतले आहेत”, असे त्यांनी सांगितले.

सरकारकडून स्टार्टअप उद्योगांना दिल्या जात असलेल्या प्रोत्साहनाचा त्यांनी विशेष उल्लेख केला. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने, सरकारने चित्रपटनिर्मिती क्षेत्रातील प्रज्ञावान भारतीयांचे स्टार्टअप उद्योग कान महोत्सवात आणले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

परदेशी चित्रपटनिर्मात्यांना बरोबर घेऊन चित्रपटांची सहनिर्मिती करण्यासाठी सरकार विविध प्रकारे प्रोत्साहन देत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, परदेशी चित्रपटांचे चित्रीकरण भारतात करण्यासाठी दिलेल्या जात असलेल्या प्रोत्साहनाबद्दल त्यांनी विशेष माहिती दिली. कथाकथनाची परंपरा आणि रामायण-महाभारतासारख्या महाकाव्यांचा सांस्कृतिक वारसा सोबत घेऊन भारत या क्षेत्रात झेपावण्यासाठी सज्ज झाला आहे. “फिल्म फॅसिलिटेशन ऑफिस- चित्रपट सुविधा कार्यालय यासारख्या उपक्रमांमुळे विविध प्रकारच्या परवानग्या एका खिडकीत मिळणे शक्य होत आहे”, असेही त्यांनी सांगितले.

“कलाकृतीच्या बाबतीत आता भाषेचे बंधन जाणवत नाही” असे सांगून मुरुगन म्हणाले की, “भारतातील प्रादेशिक भाषांतील चित्रपटांकडेही आता जगाचे लक्ष वेधले जात आहे.”

मुरुगन यांनी तेथे सहभागी झालेल्या सर्वांना, ‘भारतात येऊन चित्रीकरण करण्यासाठी’ तसेच भारतातील विविध चित्रपट महोत्सवांत सहभागी होण्यासाठीही निमंत्रित केले.

डॉ.एल.मुरुगन यांच्यासह पुढील मान्यवरांनी या गोलमेज बैठकीत भाग घेतला-:

  1. सेल्वागिया वेलो, संचालक, रिव्हर टू रिव्हर चित्रपट महोत्सव, फ्लोरेन्स, इटली
  2. कॉलिन बरोस, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक, स्पेशल ट्रीट्स प्रोडक्शन्स, युनायटेड किंगडम
  3. मायकेल स्वेनसून, चित्रपट आयुक्त, दक्षिण स्वीडन चित्रपट आयोग
  4. ऍमी जेन्सन, प्रकल्प व्यवस्थापक, संकल्पनात्मक संवाद एकक, स्वीडन संवाद विभाग
  5. मेरी लिझा दिनो, चित्रपट आयुक्त, फिलिपिन्स
  6. ज्यूडी ग्लाडस्टोन, कार्यकारी आणि कलाविषयक संस्थापिका, एजलेस इंटरनॅशनल चित्रपट महोत्सव, अमेरिका
  7. स्टीफन ओटेनब्रच, दिग्दर्शक, भारतीय-जर्मन चित्रपट
  8. कॅरे सॉहने, संचालक, लंडन भारतीय चित्रपट महोत्सव

वीरमाता आणि वीरपत्नी हे बलिदानाचे मूर्तिमंत उदाहरण-कर्नल प्रणय पवार

पुणे : देशात राहून देशासाठी काम करणारे अनेकजण आहेत. परंतु, देशासाठी प्राणाची आहुती जवान देत असतात. त्यांचे कुटुंबीय देखील देशासाठी त्यांचे प्राण अर्पण करण्याकरिता त्यांच्या मागे ठाम उभे राहतात, त्यामुळे त्यांचे बलिदान हे सर्वात मोठे आहे. बलिदानाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वीर माता व वीरा पत्नी आहेत. जवानांसाठी काही करायचे असेल तर त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे रहा, असे मत कर्नल प्रणय पवार यांनी व्यक्त केले.

भारत माता महिला मंडळ ट्रस्ट पुणे व इंडियन आर्मी आयोजित ‘अतूट बंधन – वीर नारी सन्मान’ सोहळ्याचे आयोजन पर्वती पायथ्या जवळील भारतमाता अभ्यासिकेच्या प्रांगणात करण्यात आले. कार्यक्रमात वीरमाता आणि वीरपत्नी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे श्रीकांत कारेगावकर, आयोजिका प्रियांका शेंडगे शिंदे, माजी महापौर सरस्वती शेंडगे, राजाभाऊ शेंडगे, कालिदास शिंदे, राजाभाऊ तुंगतकर,आकाश मालोदे, तनिषा वाड आदी उपस्थित होते.

कर्नल प्रणय पवार म्हणाले, तुम्ही कधी काश्मिरला बॉर्डरवर गेलात तर तेथील माती घेऊन या आणि ती देवाऱ्यात ठेवा. त्याची पूजा करा आणि तुमच्या मुलांना सांगा की, एक देवळातला देव आणि दुसरा देव म्हणजे ही माती, ज्या मातीत जवानांनी प्राणाची आहुती दिली आहे. तुमच्या मुलांना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांना काश्मीरच्या भूमीवर घेऊन जा आणि जवानांनी केलेला संघर्षाची प्रेरणादायी गोष्ट त्यांना सांगा, असेही त्यांनी सांगितले.

जगदीश मुळीक म्हणाले, देशाच्या सिमेवर राहून सैनिक देशाची रक्षा करतात. तर आपण देशात राहून देशासाठी काम केले पाहिजे. महापुरुषांचे विचार, जवानांच्या संघर्षगाथा पुढच्या पिढीला सांगितल्या पाहिजेत. महापुरूषांच्या विचारावर व सैनिकांची प्रेरणा घेवून आपल्याला देश घडवायचा आहे. जगात भारत विश्वगुरू म्हणून सिद्ध करायचा आहे.

प्रियांका शेंडगे शिंदे म्हणाल्या, देशाच्या सिमेवर सैनिक अहोरात्र लढत असतात. मृत्यू समोर येतो, तेव्हा ते स्वतः:च्या कुटुंबाचा नाही तर देशाच्या रक्षणाचा विचार करीत असतात. त्यामुळे देशाचे जवान हे खरे हिरो आहेत. त्यांच्यासाठी काही करायचे असेल तर त्यांच्या कुटुंबाचा आधार आपण झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. मृणमयी परळीकर व मयूर पाटील यांनी सूत्रसंचालन केले, राजाभाऊ शेंडगे यांनी आभार मानले.

डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 16 वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत ध्रुवा माने, आर्या शिंदे, पियुश जाधव, आशुतोष कवडेकर यांचे मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय  

पुणे,  23 मे 2022: फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 16वर्षांखालील  टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात पियुश जाधव, आशुतोष कवडेकर, अद्विक नाटेकर यांनी तर, मुलींच्या गटात ध्रुवा माने, आर्या शिंदे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.  
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात बिगरमानांकीत ध्रुवा मानेने दुसऱ्या मानांकित ईश्वरी मार्कंडेचा 6-4, 6-3 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. आर्या शिंदेने आठव्या मानांकित दुर्गा बिराजदारचा 6-0, 1-6, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. 
मुलांच्या गटात बिगरमानांकीत अद्विक नाटेकर याने सातव्या मानांकित देवेंद्र कुलकर्णीचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. आशुतोष कवडेकरने पाचव्या मानांकित आदित्य आयंगरचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(3) असा पराभव केला. पियुश जाधवने सहाव्या मानांकित स्वराज ढमढेरेचा 6-2, 6-3 असा सहज पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. 
निकाल: मुख्य ड्रॉ(पहिली फेरी): मुले:लक्ष गुजराथी[1] वि.वि.साहिल कोठारी 6-2, 6-2;
अनुज तशीलदार वि.वि.क्रिशांक जोशी 3-6, 6-1, 7-5;अवनीश चाफळे वि.वि.शिवम पडिया 6-3, 6-2;अद्विक नाटेकर वि.वि.देवेंद्र कुलकर्णी[7] 6-3, 6-2;अमोघ दामले वि.वि.देव तुराकिया 6-2, 6-1;आशुतोष कवडेकर वि.वि.आदित्य आयंगर[5] 6-3, 7-6(3);अर्चित धूत[8] वि.वि.कौशिक कोठा 6-2, 6-1;पियुश जाधव वि.वि.स्वराज ढमढेरे[6] 6-2, 6-3;ओमकार शिंदे वि.वि.मनन अगरवाल 6-1, 6-3;राघव अमीन[3] वि.वि.शार्दूल खवळे 6-1, 6-1;
मुली:श्रीया साई[1] वि.वि.आर्या हिरे 7-6(4), 6-3;श्रावणी देशमुख वि.वि.काव्या देशमुख 6-4, 6-2;रिद्धी शिंदे[7] वि.वि.श्रेया होनकन 6-3, 6-0;आर्या शिंदे वि.वि.दुर्गा बिराजदार[8] 6-0, 1-6, 6-4;भक्ती ताजने वि.वि.जान्हवी चौगुले 6-0, 6-1; ध्रुवा माने वि.वि.ईश्वरी मार्कंडे[2] 6-4, 6-3. 

ऐतिहासिक वास्तूंचे जतन करताना पुरातत्त्वीय शैली जपावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. २३- श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १०९.५७ कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करताना त्या वास्तूची मूळ शैली जपणे आवश्यक असून पुरातत्त्वीय जाण असलेल्या संस्थेमार्फत ही कामे करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. जेजुरी गडावरील मंदिराचे जतन आणि संवर्धन करताना परिसरातील इतर मंदिरेही पुरातत्व विभागाअंतर्गत संरक्षित करावीत, असेही त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात जेजुरी मंदीर व गड जतन आणि संवर्धन तसेच परिसर व जल व्यवस्थापनाचे काम करण्यात येणार आहे.

या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने, जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, आर्किटेक्ट तेजस्विनी आफळे आदी उपस्थित होते.

जेजुरी गड विकास आराखड्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात वास्तूचे जतन आणि संवर्धन, पायाभूत सुविधा आणि पर्यटक सोयी सुविधा, जलव्यवस्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये शास्त्रीय पद्धतीने दगडांची स्वच्छता, अनियोजित व हानिकारक जोडण्या काढणे, खराब झालेल्या चुन्याच्या गिलाव्याची डागडुजी, पाणी गळती थांबविण्यासाठी डागडुजी, विद्युत सोयी, पाणी पुरवठा, निचरा व्यवस्था, मल:निसारण आणि त्या पाण्याचा पुनर्वापर, योग्य वायुविजन प्रणाली, मंदिर परिसरातील धूळ गोळा करण्यासाठी यंत्र, घनकचरा व्यवस्थापन, भक्तांसाठी सोयीसुविधा, गर्दीचे व्यवस्थापन, आपत्कालीन व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक योजना आदी कामे करण्यात येणार आहेत.

श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र मंदिराचे सपोर्ट क्षेत्रफळ १६७ चौरस मीटर असून कोटाचे क्षेत्रफळ १२४० चौ मी.आहे. येथे यात्रा उत्सवाच्या वेळी दर दिवशी सुमारे दीड ते दोन लाख तर वर्षात सुमारे ४० ते ५० लाख भाविक भेट देतात. या मंदिरास ऐतिहासिक समृद्ध वारसा असून अनेक राज्यांतील नागरिकांचे हे कुलदैवत आहे. मागील २५० वर्षात याचे जतन आणि संवर्धन झाले नसल्याने ते अत्यावश्यक असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सादरीकरणाद्वारे दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऐतिहासिक वास्तूंवर झाडे उगवू नयेत, यासाठी उपाययोजना करून वास्तूंचे दगडांवर रंगरंगोटी न करता ते मूळ स्वरूपात ठेवावीत असे सांगितले. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत ही कामे करावीत अशी सूचनाही त्यांनी केली. तर, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील कामे या क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फतच करावीत, अशी सूचना केली.

सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘खंडेरायाची जेजुरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र जेजुरी गड (ता. पुरंदर, जि. पुणे) या तीर्थक्षेत्राच्या विकासाकरीता निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून रु.३४९.४५ कोटी रकमेचा श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखडा एकूण तीन टप्प्यांमध्ये राबविण्याचे नियोजन तयार करण्यात आले आहे.

खेलो इंडिया युवा स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील खेळाडूंचा कसून सराव

बालेवाडीत खेळाडूंच्या सराव शिबिरास प्रारंभ

            पुणे दि.23: हरियाणा येथे ३ ते १३ जुन २०२२ या कालावधीत चौथ्या खेलो इंडिया युवा स्पर्धेसाठी २१ क्रीडाप्रकारात महाराष्ट्राचे ३५५ खेळाडु पात्र ठरले असून त्यांच्या सराव शिबिरास बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडापीठ येथे प्रारंभ झाला आहे. स्पर्धेत १०८ प्रशिक्षक आणि पदाधिकाऱ्यांसह ४६३ सदस्यांचे पथक सहभागी होणार आहे.

            स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी आयोजित हे शिबिर ३१ मेपर्यंत चालणार आहे. तर काही स्पर्धेचे ७ जूनपर्यंत चालणार आहे. हरियाणातील पंचकुला या  मुख्य मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. ४ जून रोजी स्पर्धेचे उदघाटन होणार असून १३ जून रोजी स्पर्धेची सांगता होणार आहे. बालेवाडीतील सराव शिबिरानंतर १ ते ८ जून या कालावधीत हे सर्व संघ हरियाणाकडे रवाना होतील. सायकल रोड रेस आणि आर्चरी हे संघ ८ जून रोजी म्हणजे सर्वात शेवटी हरियाणाला जातील. तोपर्यंत त्यांचे टप्प्याटप्प्याने बालेवाडीत सराव शिबिर सुरू राहणार आहे.

’खेलो इंडिया’त महाराष्ट्राची कामगिरी

            केंद्र शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत देशातील प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेण्यासाठी खेलो इंडीया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन २०१७-१८ पासून करण्यात येते. २०१७-१८ या वर्षी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेअंतर्गत पहिल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण ३९७ खेळाडू १३ खेळ प्रकारांमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्र राज्याने एकूण ३६ सुवर्ण,३२ रौप्य, ४३ कांस्य अशा एकूण १११ पदकांसह द्वितीय स्थान प्राप्त केले होते.

पुढील वर्षी २०१८-१९ मध्ये १७ व २१ वर्षाखालील मुले- मुली या गटाच्या एकूण १८ खेळ प्रकारांच्या द्वितीय राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे करण्यात आले. या स्पर्धेत ७२९ खेळाडू व १६० पदाधिकारी असे ८९९ सदस्यांचे महाराष्ट्र राज्याचे पथक सहभागी झाले. राज्याने एकूण ८५ सुवर्ण, ६१ रौप्य ८१ कास्य अशा एकूण २२७ पदके संपादन करुन संपूर्ण देशातून एकूण पदक तालिकेमध्ये प्रथम स्थान प्राप्त केले.

गुवाहाटी येथे ९ ते २१ जानेवारी २०२० या कालावधीत झालेल्या तिसऱ्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत २० खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण १९ खेळ प्रकारात महाराष्ट्राचे ५९० खेळाडू पात्र ठरले. १४५ पदाधिकारी मिळुन एकुण ७३५ सदस्यांचे पथक सहभागी झाले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघास १४७ सुवर्ण, १०७ रौप्य व १५४ कास्य असे एकुण ४०८ पदक महाराष्ट्राने मिळवले आहेत.

महाराष्ट्राचे अव्वल स्थान कायम ठेवण्याचा खेळाडूंचा निर्धार

खेलो इंडिया ही राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी स्पर्धा आहे. त्यामुळे देशभरातील खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या तीन वर्षांपासून या स्पर्धेवर महाराष्ट्रातील खेळाडूंनी अधिराज्य गाजवले आहे. राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने दिलेल्या सुविधांमुळे खेळाडूंना अनेक क्रीडा प्रकारात चांगले यश संपादन करता आले आहे.. खो-खो, मल्लखांब, कबड्डी आणि कुस्ती या खेळात महाराष्ट्राला पदकांची अपेक्षा आहे. आतापर्यंत खेलो इंडियामध्ये महाराष्ट्र अव्वल राहिला आहे. याही वर्षी तो कायम राहण्याचा निर्धार खेळाडूंनी केला आहे. त्यादृष्टीने क्रीडानगरीत त्यांचा कसून सराव सुरू आहे.

सहभागी क्रीडा प्रकार

राज्यातील तब्बल २१ क्रीडाप्रकारातील संघ खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी होणार आहेत. कंसात सहभागी खेळाडूंची संख्या कब्बडी (२४),  बॅडमिंटन (४), कुस्ती  (३३), गटका (१६), थांगता (५), योगासन (२२), वेटलिफ्टिंग (२०), जिम्नॅस्टिक (४५), सायकल ट्रॅक ( ६), शुटिंग (७), टेनिस (६), मल्लखांब (१२), जलतरण (२८), खो-खो (२४), बास्केटबॉल (१२), ॲथलेटिक्स (३६), टेबल टेनिस (८), बॉक्सिंग (१६), ज्युदो (१४), सायकल रोड रेस (६), आर्चरी (१२). असे २१ संघ स्पर्धेत उतरणार आहेत.

खेलो इंडियासाठी महाराष्ट्राचा कबड्डी संघ सज्ज

खेलो इंडियासाठी महाराष्ट्राचा मुलींचा कबड्डी संघ सज्ज झाला आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी बालेवाडीत सध्या त्यांचा सराव शिबिर सुरू आहे. मुलींच्या संघाने यंदा जय्यत तयारी केली आहे. हा संघ १८ वर्षांखालील असून ६५ किलो वजन गटात तो खेळणार आहे.

बालेवाडीत सराव शिबीरात तज्ज्ञांचे मार्गदर्शन

चौथ्या खेलो इंडीया क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र संघाचे १३ दिवसांचा सराव शिबीर शिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु आहे स्पर्धेसाठी सहसंचालक चंद्रकांत कांबळे, यांची समन्वयक अधिकारी तर उपसंचालक अनिल चोरमले पथक प्रमुख तसेच क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांची मुख्य व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्रीडा क्षेत्रातल्या चांगल्या मार्गदर्शकांच्या निरीक्षणाखाली खेळाडू तयारी करीत आहेत.

 ओमप्रकाश बकोरिया, क्रीडा आयुक्त राज्यातील उत्तम खेळाडूंना राज्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी हरियाणाला पाठवित आहोत. खेळाडुंचा आत्मविश्वासही उंचावलेला आहे. खेलो इंडियाच्या गेल्या तीन स्पर्धांमध्ये  राज्याने अव्वल स्थान मिळवले आहे, यावर्षीदेखील प्रत्येक खेळाडू पूर्ण प्रयत्न करून राज्याला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करतील.

दारूप्रमाणेच पेट्रोल-डिझेलवरील करातही ५० टक्के कपात करा: भाजपची ठाकरे सरकारकडे मागणी

0

जनतेच्या खिशातून हजारो कोटींची लूट केल्यानंतर आता पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करामध्ये अनुक्रमे २.०८ रुपये व १.४४ रुपये कपातीचा केवळ कागदी गाजावाजा करून ठाकरे सरकारने पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली आहे. महागाईने त्रासलेल्या जनतेस दिलासा देण्याऐवजी केंद्राविरुद्धच्या राजकारणात जनतेला वेठीस धरण्याचा ठाकरे सरकारचा डाव उघड झाला असून राज्याच्या करामध्ये ५० टक्के कपात करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. माधव भांडारी यांनी केली आहे.

केंद्र सरकारने गेल्या सहा महिन्यांत दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात कपात करून जनतेला मोठा दिलासा दिल्यावर ठाकरे सरकारने दीड ते दोन रुपये कपात करून राज्यातील जनतेची क्रूर चेष्टा केली. महाराष्ट्रात पेट्रोलवर लिटरमागे ३२.५५ रुपये तर डिझेलवर लिटरमागे २२.३७ रुपये एवढा कर राज्य सरकार आकारते. केंद्र सरकारने कर कपात करून राज्याचा कर कमी करण्याचे आवाहन केल्यानंतरही ठाकरे सरकारने कर कमी केले नाहीत, उलट अनावश्यक वाद घालून राजकारण सुरू ठेवले. एकीकडे महागाईच्या नावाने सत्ताधाऱ्यांनीच निदर्शने करायची आणि दुसरीकरे कर कपात न करता जनतेची लूट सुरूच ठेवायची असा दुटप्पी डाव महाविकास आघाडी खेळत असून केंद्राशी संघर्ष करण्याच्या खुमखुमीतून जनतेला महागाईच्या खाईत भरडण्याचा कपटी खेळ उघड झाला आहे, असे ते म्हणाले.

ठाकरे सरकारने दारुवरील करात तब्बल ५० टक्क्यांची कपात करून दारू उत्पादकांना मोठा मलिदा मिळवून दिला. मात्र इंधनाच्या किंमती कमी झाल्यास महागाई कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळेल हे ठाऊक असूनही पेट्रोलवर जेमतेम दोन रुपयांची कपात करून जनतेला दिलासा नाकारला, असा आरोपही त्यांनी केला. विदेशी मद्याला दिलेल्या सवलतीप्रमाणेच पेट्रोल डिझेलवरील राज्याच्या व्हॅट आकारणीतही ५० टक्के कपात झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

आपण धूर्त राजकारणी आहोत असे सांगत मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. आताच्या कर कपातीचे गाजर दाखवून जनतेला राज्य सरकारकडून प्रत्यक्षात कोणताच लाभ मिळणार नाही याची काळजी घेत ठाकरे यांनी पुन्हा तेच दाखवून दिले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मुळात ठाकरे सरकारने कर कपातीचा केवळ कागदावरच गाजावाजा केला असून ही कर कपात प्रत्यक्षात आणून जनतेला दिलासा देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यासंबंधीचा अधिकृत आदेश जारी करण्यातही ठाकरे सरकार टाळाटाळ करीत आहे. जनतेची क्रूर चेष्टा करणाऱ्या सरकारचा हिंस्र चेहरा यातून उघड झाला आहे, असेही ते म्हणाले.

टाटा कॅपिटलने सुरु केली ‘शेयर्सवर कर्ज’ डिजिटल सेवा

मुंबई२३ मे २०२२: आघाडीची आर्थिक सेवा कंपनी आणि टाटा समूहाचा एक भागटाटा कॅपिटल लिमिटेडने शेयर्सवर कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. टाटा कॅपिटल एक परिपूर्णएकात्मिक डिजिटल आर्थिक सेवा म्हणून शेयर्सवर कर्ज देणाऱ्या पहिल्या आर्थिक संस्थांपैकी एक असून आपल्या ग्राहकांना सहजसोपाविनासायास अनुभव प्रदान करणे त्यांचा उद्देश आहे.

ग्राहक आपल्या डिमटेरियलाईज्ड शेयर्सना ऑनलाईन तारण ठेवून ५ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकतातज्याची सुविधा एनएसडीएलने दिलेली आहे. संबंधित डिपॉजिटरी पार्टीसिपंटकडून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर सर्व प्रक्रिया त्याच दिवशी पूर्ण होते. यासाठी ग्राहकांना फक्त टाटा कॅपिटलच्या वेबसाईटवर जावे लागेलआणि याठिकाणी त्यांना मिळेल कागदपत्रे सादर करावी न लागतावेगवान आणि सहजसोपा सेवा अनुभव. ग्राहकांच्या पोर्टफोलिओमधील शेयर्सच्या मूल्याच्या आधारे कर्जाची रक्कम कस्टमाइज केली जाईल.

टाटा कॅपिटलच्या शेयर्सवर कर्ज डिजिटल सेवेतून मिळणारे प्रमुख लाभ:

·        सुरुवातीपासून शेवटपर्यंतरजिस्ट्रेशनपासून कर्ज खाते बनवले जाईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया कागदरहित असते. 

·        ऑनलाईन केवायसी आणि एनएसडीएलमार्फत शेयर्स गहाण ठेवले जातात. 

·        ई-एनएसीएच सुविधेसह कर्ज कागदपत्रांवर इलेक्ट्रॉनिक स्वाक्षऱ्या केल्या जातात. 

·        ग्राहकांना कर्ज दिले जाणेकर्जाची परतफेडअतिरिक्त तारण ठेवणे आणि तारण ठेवलेले शेयर्स सोडवणे यासाठी ऑनलाईन पोर्टल ज्याचा उपयोग करणे खूपच सोपे आहे.

शेयर्सवर कर्ज‘ लॉन्च करतेवेळी टाटा कॅपिटलच्या प्रमुख डिजिटल अधिकारी श्रीमती अबोन्ती बॅनर्जी म्हणाल्याआमच्या ग्राहकांना त्यांच्या आर्थिक गरजा सहजपणे पूर्ण करण्यात सक्षम बनवण्याच्या आमच्या प्रयत्नांपैकी एक म्हणजे शेयर्सवर कर्ज डिजिटल सेवा. याशिवाय या सेवेला कस्टमाइज केले जाऊ शकते आणि ग्राहक तातडीने फंड्स मिळवू शकतात.  आम्हाला खात्री आहे की यातून आमच्या ग्राहकांना अनेक लाभ मिळतील आणि आम्ही आमच्या डिजिटल उत्पादनांमध्ये अशाप्रकारची आणखी अनेक विशेष उत्पादने आणत राहू.”  

नुकत्याच टाटा कॅपिटलने सुरु केलेल्या म्युच्युअल फंड्सवर कर्ज‘ सेवेला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. टाटा कॅपिटलच्या सर्वात नवीन शेयर्सवर कर्ज सेवेचा लाभ घेण्यासाठी कृपया येथे संपर्क साधा:  https://www.las.tatacapital.com/online/loans/las/apply-now-las-loan

स्टेट बँक ऑफ इंडियाची विद्यार्थ्यांसाठी कर्ज योजना – महत्त्वपूर्ण माहिती

0

स्टेट बँक ऑफ इंडियाची विद्यार्थ्यांसाठी कर्ज योजना

हे टर्म कर्ज असून भारत किंवा परदेशात जिथे प्रवेश मिळालेला आहे तिथे उच्च शिक्षण घेण्यासाठी भारतीय नागरिकांना हे कर्ज दिले जाते.  भारताच्या भवितव्यामध्ये नवपरिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठीत्यांच्या गरजेनुसारत्यांना अनुकूल ठरेल अशा पद्धतीने आर्थिक साहाय्य या कर्ज योजनेमार्फत पुरवले जाते.

हे कर्ज पुढील अभ्यासक्रमांसाठी दिले जाते.

§  भारतातील विद्यार्थ्यांसाठी

·         विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी)/एआयसीटीई/आयएमसी/सरकार यांनी मान्यता दिलेली महाविद्यालये/विद्यापीठे यांचे पदवीपदव्युत्तरनियमित तांत्रिक आणि व्यावसायिक पदवी/पदविका अभ्यासक्रम. आयआयटीआयआयएम इत्यादी स्वायत्त संस्थांचे नियमित पदवी/पदविका अभ्यासक्रम.

·         केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांनी मान्यता दिलेले शिक्षक प्रशिक्षण/नर्सिंग कोर्सेस

·         डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एव्हिएशन/शिपिंग/संबंधित नियामक प्राधिकरणाने मान्यता दिलेले नियमित पदवी/पदविका अभ्यासक्रम उदाहरणार्थएरॉनॉटिकलपायलट प्रशिक्षणशिपिंग इत्यादी.

§  परदेशातील विद्यार्थ्यांसाठी

·         नामांकित विद्यापीठांचे नोकरी मिळवून देणारे व्यावसायिक/तांत्रिक. पदवी/पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रम उदाहरणार्थएमसीएएमबीए इत्यादी.

·         चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट्सलंडनसर्टिफाईड पब्लिक अकाउंटंटयूएसए इत्यादी संस्थांचे अभ्यासक्रम.

वैशिष्ट्ये आणि लाभ

·         कमी व्याज दर

·         विद्यार्थिनींसाठी व्याजामध्ये सूट

·         ७.५ लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी तारण ठेवण्याची गरज नाही

·         २० लाखांपर्यंतच्या कर्जासाठी प्रक्रिया शुल्क घेतले जात नाही

·         अभ्यासक्रम पूर्ण होऊन एक वर्षानंतर कर्जाची परतफेड करणे सुरु होते.

·         कर्ज परतफेडीचा कालावधी अभ्यासक्रम कालावधी संपल्यानंतर पुढची १५ वर्षे + १२ महिन्यांचा रिपेमेंट हॉलिडे (असा कालावधी ज्यामध्ये कर्जाची परतफेड करणे तात्पुरते थांबवले जाऊ शकते)

·         अधिक उच्च शिक्षणासाठी दुसरे कर्ज घेतले असेल तर दुसरा अभ्यासक्रम संपल्यानंतर दोन्ही कर्जांची मिळून एकत्रित परतफेड १५ वर्षात केली जाऊ शकते. 

·         ४ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी मार्जिन नाही.

कर्जाची रक्कम

भारतातील अभ्यासक्रमांसाठी ५० लाख रुपयांपर्यंतचे आणि परदेशातील अभ्यासक्रमांसाठी १.५० कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज विद्यार्थ्यांना मिळू शकते. 

व्याज दर

·         प्रभावी व्याज दर – ८.६५%

·         विद्यार्थिनींसाठी व्याजामध्ये ०.५०% सवलत

प्रक्रिया शुल्क

·         २० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी – काहीही नाही

·         २० लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जासाठी – १०,००० रुपये (+ कर)

तारण     

  • ७.५ लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी – काहीही नाही
  • ७.५ लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी – मूर्त तारण

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जामध्ये हे खर्च समाविष्ट करण्यात आले आहेत:

  • महाविद्यालय/शाळा/वसतिगृह यांना देय फी
  • परीक्षा/ग्रंथालय/प्रयोगशाळा फी
  • पुस्तके/उपकरणे/साधने/युनिफॉर्म यांची खरेदी, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आवश्यक संगणकाची खरेदी (अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी देय असलेल्या एकूण ट्युशन फीच्या २०% इतकी जास्तीत जास्त रक्कम)
  • खबरदारी म्हणून घेतले जाणारे डिपॉझिट/इमारत निधी/परत करण्यायोग्य  डिपॉझिट (संपूर्ण अभ्यासक्रमाच्या ट्युशन फीच्या १०% इतकी जास्तीत जास्त रक्कम)
  • प्रवास खर्च/परदेशात अभ्यासासाठी पॅसेज रक्कम
  • दुचाकीची किंमत ५०,००० रुपयांपर्यंत.
  • अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी करावे लागणारे स्टडी टूर, प्रोजेक्ट काम इत्यादीचे इतर कोणतेही खर्च.

आवश्यक कागदपत्रे आणि इतर तपशील जाणून घेण्यासाठी वेबसाईट लिंक – https://bank.sbi/web/personal-banking/loans/education-loans/student-loan-scheme

तळजाई ,पाचगांव पर्वती कॉंक्रिटिकरण किंवा सुशोभिकरणाचा प्रयत्न केला तर तो हाणून पाडू- आमदार माधुरी मिसाळ

मेट्रो आणि वनविभागावर मिसाळ यांचे ताशेरे

पुणे, ता. २३ :तळजाई , पाचगांव पर्वती वन आराखड्यासाठी मंजूर करून आणलेला १३ कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग वनीकरणासाठीच केला जाईल, वन विभागाने या ठिकाणी कॉंक्रिटिकरण किंवा सुशोभिकरणाचा प्रयत्न केला तर तो हाणून पाडू असा इशारा आमदार माधुरी मिसाळ यांनी दिला.

मिसाळ यांनी आज सकाळी तळजाई टेकडी वनक्षेत्रांत (पाचगांव पर्वती) भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. वन विभागाचे अधिकारी दीपक पवार, प्रदीप संकपाल, माजी नगरसेवक महेश वाबळे, साईदिशा माने, श्रीकांत जगताप, पर्वती भाजपचे अध्यक्ष जितेंद्र पोळेकर, सरचिटणीस प्रशांत दिवेकर, शैलेश देशपांडे, विश्वास ननावरे, सहकार नगर नागरीक मंचच्या तळजाई बचाव अभियानाचे अमित अभ्यंकर, पुरुषोत्तम दुरवास यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार मिसाळ म्हणाल्या, पाचगांव पर्वती वनक्षेत्राच्या वनीकरणासाठी १३ कोटी रुपयांचा निधी मी पाठपुरावा करून मिळविला. या निधीतून टेकडीवर कॉंक्रिटिकरण आणि सुशोभिकरणाच्या कामांचा शुभारंभ वन विभागाने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते केला. स्थानिक आमदार या नात्याने मला विश्वासात घेतले गेले नाही. गेली अनेक वर्षे या टेकडीवर वन संपदेचे संरक्षण आणि संवर्धनासाठी आम्ही नागरिकांसह प्रयत्न करीत आहोत. या नागरिकांमध्ये वन विभागाच्या प्रकल्पाबाबत प्रचंड नाराजीची भावना आहे. उपलब्ध निधीतून परिसरात मियावाकी वन, बांबू वन, उंच रोपवन या स्वरूपाची कामे केली जातील. केवळ परदेशी झाडांच्या जागेवर स्थानिक प्रजातींची झाडे लावण्यात येणार आहेत. येत्या पावसाळ्यात टेकडीवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. कॉंक्रिटिकरण किंवा सुशोभीकरणाचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडू.

मिसाळ पुढे म्हणाल्या, मेट्रोने टेकडीवर पुनर्रोपण केलेले वृक्षांची वाताहात झाली आहे. वन विभाग आणि मेट्रोने त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. विविध खात्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. यासाठी पुढील आठवड्यात महापालिकेचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी आणि मेट्रोचे अधिकारी यांच्या एकत्रित बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

गोदरेज व्हेज ऑइलआणि आंब्याच्या ;उत्सवाची आम्रमहोत्सवाची भागीदारी

0

मुंबई 22 मे 2022: गोदरेज व्हेज ऑइल, गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या खाद्यतेलाचे नाव आहे,  यांनी मुंबईमध्ये 21 आणि 22 मे ला होणाऱ्या एका मोठ्या आंब्याच्या उत्सवासोबत भागीदारी केली आहे. हा कार्यक्रम दोन्ही दिवस सकाळी 11 :0० वाजल्‍यापासून दुपारी 3:00 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6:00 वाजल्यापासून रात्री 9:15 पर्यंत वनिता समाज, शिवाजी पार्क, दादर पश्चिम येथे होणार आहे.

या आम्र महोत्सवामध्ये लोकांना चवदार पुरी, बटाट्याची भाजी या आवडत्या महाराष्ट्रीयन जेवणासोबत आंब्यांची चव चाखता येणार आहे. या भागीदारीचा भाग म्हणून खाण्याचे सर्व पदार्थ गोदरेज व्हेज तेलामध्ये बनवले जातील. या आम्र महोत्सवामध्ये चार हजारपेक्षा अधिक लोक अपेक्षित आहेत. हा कार्यक्रम अनेक मोठ्या ताऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे नामवंत शेफ वरुण इनामदार, अभिनेता आनंद इंगळे, अभिनेत्री ऋजुता देशमुख, अभिनेता अभिजित केळकर, अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि अभिनेता अभिजीत खांडकेकर या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.

भागीदारीमध्ये, गोदरेज व्हेज तेलाने ग्राहकांसाठी एक विशेष सूट ठेवलेली आहे, ज्यामध्ये महोत्सवाला भेट देणाऱ्या लोकांनी पाच लिटर गोदरेज व्हेज ऑइल (पाच लिटरची एक बरणी अथवा एक लिटर तेलाची पाच पाकिटे) विकत घेतल्यास त्यांना दहा टक्के सूट मिळणार आहे. ई-कॉमर्स वर, बिग बास्केट.कॉम या ठिकाणी GODREJ10 असा कूपन कोड बिल देताना वापरला तर तेथेही दहा टक्के सूट मिळणार आहे. ही दिलेली सूट गोदरेज कंपनीच्या  सूर्यफुलाचे तेल, राइस ब्रान तेल, गाळलेले शेंगदाण्याचे तेल, रिफाइन्ड शेंगदाण्याचे तेल, आणि रिफाइन्ड सोयाबीनचे तेल या सर्व तेलांवर लागू होते. जून 30, 2022 पर्यंत दोन्ही ठिकाणी ही सूट सुरू राहणार आहे.

नितीन बाबरएक्झिक्यूटिव्ह डिरेक्टर प्रेसिडेंट गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड असे म्हणतात, “अमृत महोत्सव सारख्या नामांकित आंब्याच्या उत्सवासोबत भागीदारी करण्यात आम्हाला आनंद आहे. बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने आम्हाला अशा कार्यक्रमांची भागीदारी करायची आहे, जिथे आम्ही ग्राहकांसोबत प्रत्यक्ष संवाद साधू शकू आणि आमच्या उत्तम दर्जाच्या सूर्यफूल तेल, राइस ब्रान तेल, दाण्याचे तेल, रिफाइन्ड शेंगदाण्याचे तेल, आणि रिफाइन्ड सोयाबीनचे तेल या श्रेणी मधील अनुभव ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकू. कार्यक्रमाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून आम्हाला भरून आले आहे. गोदरेज व्हेज तेलामध्ये बनवलेल्या चवदार जेवणाचा आणि आम्ही दिलेल्या सवलतीचा अभ्यागत लाभ घेतील, याची मी आशा करतो.”  

मिस्टर संजय मोने आणि मिसेस सुकन्या मोने, ऑर्गनायझर्स,अमृत महोत्सव असे म्हणतात, “आमच्या महोत्सवाच्या यावर्षीच्या कार्यक्रमामध्ये गोदरेज वनस्पती तेल यांनी भागीदारी केल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. या सहयोगातून आम्ही खात्री देतो की, या उत्सवाला भेट देणाऱ्या लोकांना गोदरेज व्हेज तेलामध्ये तयार केलेले आंबा थाळीचे खाद्यपदार्थ अनुभवता येतील. आम्हाला खात्री आहे की, लोकांना केवळ उत्तम चवीचेच पदार्थ मिळतील असे नाही तर चांगल्या दर्जाच्या तेलामध्ये तयार झालेले पदार्थ खाता येतील.”

गोदरेज व्हेज तेल खाण्याच्या तेलाच्या अनेक पैलूंची श्रेणी देऊ करते- जसे सूर्यफूल तेल, राइस ब्रान तेल, गाळलेले शेंगदाण्याचे तेल, रिफाइन्ड शेंगदाण्याचे तेल आणि रिफाइन्ड सोयाबीन तेल. मागील चार दशकांहून अधिक काळ आम्ही ग्राहकांना  त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून त्याचा आनंद घेण्यासाठी  गरजेची सेवा देत आहोत. आमच्या तेलाचे नाव चव, शुद्धता, उत्तम दर्जा आणि खाण्याच्या तेलांची विविधांगी श्रेणी यासाठी ओळखले जाते. हे तेल महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा  येथे घरामध्ये आणि खाद्य कट्ट्यांवर नियमितपणे वापरले जाते.