Home Blog Page 1966

आयएनएस निशंक आणि आयएनएस अक्षय ही नौदलाची जहाजे सेवानिवृत्त

0

मुंबई, 4 जून 2022

देशाची 32 वर्षे गौरवशाली सेवा केल्यानंतर निशंक आणि अक्षय ही  भारतीय नौदलाची जहाजे काल सेवानिवृत्त झाली. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड येथे पारंपरिक समारंभात त्यांना निरोप देण्यात आला. राष्ट्रीय ध्वज, नौदलाचे चिन्ह आणि दोनही जहाजांचे पेनंट सूर्यास्ताच्या वेळी खाली करण्यात आले.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे, नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार  यांनी मानवंदना स्वीकारली

आयएनएस निशंक आणि आयएनएस अक्षयच्या कमांडिंग अधिकाऱ्यांसमवेत मेळाव्याला संबोधित केले

आयएनएस निशंक 12 सप्टेंबर 1989 रोजी कार्यान्वित झाली होती तर त्यानंतर एका वर्षानंतर 10 डिसेंबर 1990 रोजी आयएनएस अक्षय पोटी, जॉर्जिया येथे नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. आयएनएस निशंक आणि आयएनएस अक्षय ही जहाजे महाराष्ट्र नौदल क्षेत्राच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंगच्या ऑपरेशनल नियंत्रणाखाली अनुक्रमे 22 मिसाईल व्हेसल स्क्वाड्रन आणि 23 पॅट्रोल व्हेसल स्क्वाड्रनचा भाग होते.

दोन जहाजांवरचे नौदलाचे चिन्ह आणि डिकमिशनिंग पेनंट सूर्यास्ताच्या वेळी शेवटच्या वेळी खाली करण्यात आले आणि जतन करण्यासाठी सुपूर्द केले

दोन जहाजांवरचे नौदलाचे चिन्ह आणि डिकमिशनिंग पेनंट सूर्यास्ताच्या वेळी शेवटच्या वेळी खाली करण्यात आले आणि जतन करण्यासाठी सुपूर्द केले

दोन जहाजांवरचे नौदलाचे चिन्ह आणि डिकमिशनिंग पेनंट सूर्यास्ताच्या वेळी शेवटच्या वेळी खाली करण्यात आले आणि जतन करण्यासाठी सुपूर्द केले

दोन जहाजांवरचे नौदलाचे चिन्ह आणि डिकमिशनिंग पेनंट सूर्यास्ताच्या वेळी शेवटच्या वेळी खाली करण्यात आले आणि जतन करण्यासाठी सुपूर्द केले

दोन जहाजांवरचे नौदलाचे चिन्ह आणि डिकमिशनिंग पेनंट सूर्यास्ताच्या वेळी शेवटच्या वेळी खाली करण्यात आले आणि जतन करण्यासाठी सुपूर्द केले

ही जहाजे 32 वर्षांहून अधिक काळ नौदल सेवेत सक्रिय होती आणि त्यांच्या गौरवशाली प्रवासादरम्यान कारगिल युद्धादरम्यान ओपरेशन तलवार आणि 2001 मध्ये ऑपरेशन पराक्रम यासह अनेक नौदल मोहिमांमध्ये त्यांनी भाग घेतला.

आयएनएस निशंकच्या माजी कमांडिंग अधिकाऱ्यांचा ग्रुप फोटो

आयएनएस अक्षयच्या माजी कमांडिंग अधिकाऱ्यांचा ग्रुप फोटो

नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार हे या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे होते. व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंग, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड आणि व्हाईस ॲडमिरल बिस्वजित दासगुप्ता, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ ईस्टर्न नेव्हल कमांड या समारंभासाठी उपस्थित होते. आयएनएस अक्षय आणि आयएनएस निशंकचे पहिले कमांडिंग अधिकारी व्हाइस ॲडमिरल आरके पटनायक (निवृत्त) आणि व्हाईस ॲडमिरल एसपीएस चीमा (निवृत्त) या कार्यक्रमासाठी सन्माननीय पाहुणे होते.

आयएनएस निशंकची लहान प्रतिकृती अंतिम कमांडिंग ऑफिसर सीडीआर हिमांशू कपिल यांनी प्रथम कमांडिंग ऑफिसर व्हीएडीएम एसपीएस चीमा (सेवानिवृत्त) यांना नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांच्या उपस्थितीत सुपूर्द केली

ईडीच्या कारवायांना 2024 नंतर उत्तर देण्याचा संजय राऊतांचा इशारा

पुणे-येथील एका कार्यक्रमात घेण्यात आलेल्या प्रगत मुलाखतीत शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले कि,’ भाजपने विरोधी बाकावर बसण्याची तयारी ठेवावी. पुढील अडीच वर्षेही सुखरूप पूर्ण होतील. महाराष्ट्र लढणारा आहे. कोणासमोरही झुकणार नाही. देशामध्ये बदल घडवण्याची महाराष्ट्राची ताकद. मी बाळासाहेबांनाही पाहिले आणि शरद पवारांना पाहिले. दोघेही लोकांमध्ये राहतात. तीच त्यांची ऊर्जा. पवारांमध्ये कोणताही बदल नाही. तेच आहेत तसेच आहेत. भाजपच्या लोकांवर ईडीचे छापे पडत नाहीत…2024 नंतर याचे उत्तर देतो. आमचेही दिवस येतील.

देशात भाजपचे राज्य आहे. त्यांना महागाईवरून लक्ष हटवायचे आहे. आणि ज्ञानव्यापी, शिवलिंग असे विषय काढले जातात. काही लोकांना आपल्या देशाची तुलना श्रीलंकेशी केलेली आवडत नाही. मात्र, श्रीलंकेसारखी ठिणगी इथे पडायला वेळ लागणार नाही. माझ्यासारख्या माणसाने नसलेली प्रॉपर्टी कोणतीही नोटीस न देता ताब्यात घेतली. आणि म्हणतात अटक करणार अटक करणार मी सांगितले मी दिल्लीत बसलोय मला अटक करा. असे म्हणत त्यांनी भाजपला इशारा दिला आहे

बाळासाहेबांची करून दिली आठवण

बाळासाहेब असते तर हे असे उद्योग करण्याची हिंमत झाली नसती, हे लोक तेव्हाही मातोश्रीत येण्यास घाबरत होते, आणि आताही घाबरतात असे म्हणत राऊतांनी भाजपला टोला लगावला आहे. नक्कीच त्यांचा प्रभाव आहे. बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा, आताही आमच्या पक्षामध्ये पक्ष मोठा लढवय्ये लोक आहेत. अजूनही त्यांची भूमिका त्यांच्याच भाषेत लिहिले जातात. बाळासाहेब असते तर आज जे उपद्वव्याप करतात ते झाले नसते. ते बाळासाहेबांना चळाचळा कापायचे. आमचे सध्याचे नेते सुसंस्कृत आहेत. अंगावर आला तरी आम्ही शिंगावर घेतो. प्रभाव आहे, तो राहिला पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण, प्रभाव राहिला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी एकत्र व्यासपीठ शेअर केलेय. आता जो संभ्रम निर्माण करतायत, त्यांना बाळासाहेबाचे विचार माहित नाही. मी त्यांची शिकवणी घ्यायला तयार आहे. भारतीय जनता पक्षाचे आभारा मानले पाहिजेत. त्यांनी महाराष्ट्राच्या मनातले सरकार आणायला भाग पाडले. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

महाविकास आघाडीचा प्रयोग कायम राहीला तर देशात सत्तांतर-शरद पवार

पुणे-महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा (मविआ) प्रयोग कायम राहिला तर देशातही सत्तांतर अटळ असल्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (ता. 4) व्यक्त केला. “विरोधी पक्षाचे प्रमुख नेते मविआ सरकार महिना-पंधरा दिवसांत पडेल असा दावा करतात. पण आता भविष्य सांगायचे बंद झाले. अडीच वर्ष हे सरकार टिकले असून 5 वर्षांचा कार्यकाळही पूर्ण करेल. ‘मविआ’चा प्रयोग कायम राहिला तर देशातही सत्तांतर होऊ शकते,” असे ते म्हणाले. आपण आस्तिक किंवा नास्तिकचा प्रचार करत नसल्याचेही पवार यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची पुण्यात आज एका कार्यक्रमात प्रगट मुलाखत झाली. या मुलाखतीत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर पवारांनी सडेतोड उत्तरेही दिली.

काश्मिर फाईलद्वारे लक्ष विचलित केले

काश्मिर फाईल चित्रपटात चुकीच्या पद्धतीने महत्व दाखवून लक्ष विचलित करण्यात आले. त्यावेळी सत्ता कोणाची होती, हे चित्रपटात दाखवले नाही असेही शरद पवार म्हणाले.बृजभूषण कुणी मॅनेज करेल अशी व्यक्ती नाही असा टोलाही पवारांनी राज ठाकरे यांना दिला.

अनेक गोष्टी पुढे येतात, मीडियाही बायस झाला आहे, माध्यमांचे नियंत्रण ताकदवान व्यक्तीच्या हाती आहे. जे योग्य आहे ते योग्य असे माध्यमांनी धोरण अवलंबवायला हवे असेही पवार म्हणाले.

बाळासाहेब असते तर भाजपची हिमंत नसती

संजय राऊतांसारखे स्पष्ट विचार लिहायला हवे असे सांगतानाच पवार म्हणाले की, बाळासाहेब असते तर असे उद्योग करण्याची हिंमत भाजपच्या लोकांत नसती असेही ते म्हणाले.

सध्याचे राजकारणी सभ्य, सुसंस्कृत नाही

शरद पवारांना सद्यस्थितीतील राजकारण्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी स्पष्ट केले की, सध्याचे राजकारणी सभ्य, सुसंस्कृत नाहीत. 2024 मध्ये भाजपचे अर्धे नेते पक्ष सोडतील असा दावाही त्यांनी केला.

आम्ही दडपशाहीला घाबरत नाही

इडी असो कि काहीही आम्ही दडपशाहीला घाबरत नाही असे पवार म्हणाले, ते पुढे हेही म्हणाले की, शिवसेना राजकारणात येण्यापुर्वी एका विचारधारेने चालत होती त्यानंतरही हा विचार शिवसेनेने सोडला नाही त्यांचा विचार आजही तितकाच प्रभावी आहे असेही पवार म्हणाले.

म्हणून मी देवासमोर हात जोडतो

पवार म्हणाले, अस्तितकता नास्तिकता अशा तपासण्या झाल्या नाहीत. योग्य नाही, आस्तिक, नास्तिक व्यक्तिगत प्रश्न आहे, मी नास्तिक, आस्तिकतेचा गवगवा कधी करत नाही. पंढरपूरला गेलो तर मी हात जोडतो. कारण सामान्य माणसांची श्रद्धा असते त्या सामान्य माणसांच्या श्रद्धेचा अनादर होऊ नये म्हणून मी हात जोडतो अशी आस्तिक व नास्तिकतेवर आपली भूमिका मांडली.

भारत पुन्हा आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची निवडणूक लढविणार

0

नवी दिल्ली, 4 जून 2022

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक डिजिटल परिवर्तनाच्या बाबतीत आघाडीवर राहिला असून, भारताने विकास तसेच माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाच्या वापराच्या बाबतीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे,” केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी डब्ल्यूएसआयएस 2022 अर्थात या वर्षीच्या जागतिक माहिती संघटनेच्या शिखर परिषदेत सांगितले. स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा येथे 31 मे ते 3 जून 2022 या कालावधीत पार पडलेल्या या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व देवुसिंह चौहान यांनी केले.

आयटीयू अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ, संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, युनेस्को अर्थात वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना, यूएनडीपी अर्थात संयुक्त राष्ट्रांचा विकासविषयक कार्यक्रम तसेच यूएनसीटीएडी अर्थात संयुक्त राष्ट्रांची व्यापार आणि विकास परिषद यांच्या सर्व डब्ल्यूइआयएस कृती वाहिनीचे सह-सुविधाकार तसेच संयुक्त राष्ट्रांच्या इतर संघटनांसोबत दृढ सहकारी संबंध प्रस्थापित करून संयुक्त विद्यमाने या डब्ल्यूएसआयएस शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 

भारत आयटीयू मंडळाच्या 2023 ते 2026 या कालावधीतील परिचालनासाठी पुन्हा निवडणूक लढवत आहे. भारत 1869 पासून या मंडळाचा सदस्य आहे आणि तेव्हापासून मंडळाचे कार्य, संघाचे उपक्रम यामध्ये अखंडितपणे भाग घेत असून जागतिक समुदायाच्या हितासाठी दूरसंचार तसेच माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान विभागाच्या वाढीसाठी तसेच विकासासाठी शक्य तितक्या अधिक प्रमाणात योगदान देत आहे.

आरआरबी अर्थात रेडीओ नियामक मंडळाच्या सदस्यत्वासाठीचा उमेदवार आणि आयटीयू मंडळाच्या सदस्यत्वासाठी पुन्हा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने आयोजित कार्यक्रमात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री देवुसिंह चौहान म्हणाले की संपूर्ण विश्वाला एक संपर्कात असलेला समाज म्हणून स्थापित करण्यासाठी तसेच माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानविषयक संस्थांना वर्ष 2030पर्यंत पूर्ण करण्यासाठी निश्चित झालेली शाश्वत विकास ध्येये  गाठणे शक्य व्हावे म्हणून भारताने आयटीयूचे स्वप्न आणि संकल्पना स्वीकारल्या आहेत.

भारतातर्फे रेडीओ नियामक मंडळाच्या सदस्य म्हणून एम.रेवती यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करताना केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की एम.रेवती यांनी समावेशक माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानविकासासाठी  व्यावसायिकतेतील विशेष प्राविण्य, नेतृत्व करण्याची क्षमता,  कालबद्ध पद्धतीने विहित कार्ये पूर्ण करण्याप्रती वचनबद्धता, पद्धतशीरपणे समस्या सोडविण्याची क्षमता तसेच नियम निश्चित करण्याची हातोटी या गुणांसह स्वतःला सिध्द केले आहे असे ते म्हणाले.

या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री चौहान “ब्रीजिंग द डिजिटल डिव्हाईड” या विषयावरील उच्चस्तरीय धोरणनिश्चिती सत्र, स्वास्थ्य, समावेश तसेच लवचिकता यासाठीची  माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान विषयक मंत्रीस्तरीय गोलमेज परिषद आणि कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानावर आधारित उच्चस्तरीय संवाद यांसह अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले.

डब्ल्यूएसआयएस2022च्या कार्यक्रमासोबतच, केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी विविध द्विपक्षीय बैठका घेतल्या तसेच, आयटीयूचे उपसचिव माल्कम जॉन्सन, इराणचे दळणवळण अनि माहिती तंत्रज्ञान मंत्री इस्सा झारेपोर, जपानचे धोरण समन्वयन उपमंत्री यूजी सासाकी, आयटीयूचे महासचिव हाओलीन झोऊ अशा विविध मान्यवर आणि तज्ञ व्यक्तींच्या भेटी घेतल्या.  

बीएमसीसीत बी. कॉम ऑनर्स चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम

पुणे, ता. ४ – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) ‘बीकॉम ऑनर्स’ हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या (आयसीएआय) सहकार्याने येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करणार असल्याची माहिती बीएमसीसीच्या प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित यांनी कळविली आहे.

पुरोहित म्हणाल्या, ‘सीए/सीएस/सीएमए असे व्यावसायिक अभ्यासक्रम आणि सीएफए/सीपीए या सारख्या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राच्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी ‘बीकॉम ऑनर्स’ पदवी उपयुक्त ठरणार आहे. हा अभ्यासक्रम १६० क्रेडिट गुणांचा असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण दिले जाणार असून, वाणिज्य व्यवस्थापन, वित्त, कॉस्ट अण्ड मॅनेजमेंट अकाउंटिंग, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष करप्रणाली, विधी, अर्थशास्त्र, उद्योजकता, व्यापार अशा विषयांचा समावेश असणार आहे. प्रवेशासाठी कोणत्याही बोर्डाची बारावीची परीक्षा ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी दिली जाणार आहे.’

आयसीएआयचे सेंट्रल कौन्सिल मेंबर चंद्रशेखर चितळे म्हणाले, ‘या अभ्यासक्रमासाठी बीएमसीसी आणि आयसीएआय यांच्यात सहकार्य करार करण्यात आला आहे. आयसीएआयच्या वतीने अभ्यासक्रम निश्चित करणे, महाविद्यालयातील शिक्षकांना प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांना कौशल्यविकास मार्गदर्शन करणे आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण, नोकरी व व्यवसायासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.’

या वेळी डीईएसचे उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, बीएमसीसीच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर फडके, प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित, सीए चंद्रशेखर चितळे, यशवंत कासार, काशीनाथ पठारे, अभ्यासक्रमाच्या समन्वयिका प्रा. वर्षा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तडीपार करुनही सुधारला नाहीत तर थेट मोक्का लावू- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

पुणे- : पिंपरी-चिंचवड शहराची सार्वजिक सुरक्षितता सरकारची जबाबदारी आहे. गुन्हगारांची गय केली जाणार नाही. सर्वांना सुरक्षित जगता आले पाहिजे. जो गुंडगिरी करत असेल, दहशत करत असेल तो कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित असेल, त्याचा आम्ही विचार करणार नाही.

त्याच्यावर जर चार – पाच गुन्हे दाखल झाले असतील तर त्याला आम्ही तडीपार करु. तडीपार करुनही तो सुधारला नाही तर थेट मोक्का लावू, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचवड येथे दिला.

पिंपरी- चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिंचवड येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, प्रदेशचे रविकांत वरपे, सुनील गव्हाणे, माजी महापौर योगेश बहल, जगदीश शेट्टी, भाऊसाहेब भोईर, मंगला कदम, प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.

कोणाची गुंडगिरीही खपवून घेतली जाणार नाही.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मी कडवट बोलतो पण, व्यवहार्य बोलतो. आम्हाला कोणाला विनाकारण त्रास द्यायचा नाही. मात्र, कोणाची गुंडगिरीही खपवून घेतली जाणार नाही. महिलांनी निर्भयपणे फिरावे, असे वातावरण हवे. ”

कमीशन मिळेल त्यांचाच विचार भाजपाने केला
”पाच वर्षे महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्या भाजपने केवळ स्वार्थाचे विषय मार्गी लावले. ‘कमिशन’ जास्त कसे मिळेल, याचा विचार केला. घरचा पैसा असल्यासारखी उधळपट्टी करत शहर बॅकफुटवर गेले. सहा कोटी रूपये खर्चुन कुत्र्यांची नसबंदी केली. नसबंदीसाठी सोन्याची उपकरणे वापरलीत काय, श्वानांच्या नसबंदीत कमिशन मिळविले, असा प्रश्न पवार यांनी केला.

ज्यांच्या अंगातच पाणी नाही ते काय रोज पाणी देणार
पवार म्हणाले, ”भाजपला पाच वर्षात आंद्रा, भामा – आसखेड धरणातून पिंपरी – चिंचवडकरांकरिता पाणी आणता आले नाही. ज्यांच्या अंगातच पाणी नाही ते काय रोज पाणी देणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे १०० नगरसेवक निवडून द्या शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करु, मी शहरवासीयांना दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी राजकीय स्टंटबाजी करणार नाही. प्रश्न सोडविण्याची धमक, ताकद आमच्यात आहे. अन्यथा अजित पवार नाव सांगणार नाही.”

कसबा पेठेत चार बोगदे झाले एकत्र

पुणे : कसबा पेठेतील साततोटी पोलीस चौकीच्या पुढे जमिनीखाली २८ मीटर खोलीवरचा कातळ फोडून साडेसात मीटर व्यासाचे कटर असलेले टीबीएम दुपारी १२ वाजता बाहेर आले.त्याआधी याच मार्गाने एक बोगदा कसबा पेठेत येऊन पोहोचला होता. शिवाजीनगरपासून सुरू होणारे दोन बोगदेही कसबा पेठेत आले होते. हा चौथा बोगदा आज पूर्ण झाला. कसबा पेठेत आता चार बोगदे एकत्र झाले आहेत. या जागेत मेट्रोचे भुयारी स्थानक आहे. भुयारी मार्गात एकूण ४ स्थानके आहेत. त्यातील शिवाजीनगर, स्वारगेट या स्थानकांची कामे जोरात सुरू आहेत. मध्य भागातील सिव्हिल कोर्ट स्थानकाचे कामही जोरात सुरू आहे. मंडई व कसबा पेठ या स्थानकांचे काम मात्र रेंगाळले होते. बोगद्यांचे काम पूर्ण झाल्याने तेही आता पूर्ण होईल.

यावेळी महामेट्रो तसेच ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला. शिवाजीनगरकडून आलेले दोन व स्वारगेटकडून आलेले दोन अशा एकूण १२ किलोमीटरच्या चार बोगद्यांचे काम शनिवारी पूर्ण झाले. भुयारी स्थानकांचे काम सुरू असून, मार्च २०२३मध्ये ६ किलोमीटर अंतराचा हा शिवाजीनगर ते स्वारगेट असा भुयारी मार्ग वापरण्यास सुरूवात करता येईल.

मंडईपासून या बोगद्याचे काम सुरू करण्यात आले होते. दुपारी बरोबर १२ वाजता साडेसात मीटर व्यासाचा कटर असलेले टीबीएम भला मोठा आवाज करत तेवढ्याच आकाराच्या गोलातला दगडी कातळ भेदत बाहेर आले. कटर पूर्ण बाहेर आल्यानंतर त्यातून कर्मचारी खाली उतरले. त्यावेळी बाहेरच्या कर्मचाऱ्यांनी ‘भारत माता की जय’ म्हणून हातात तिरंगा घेऊन त्यांचे स्वागत केले. जमिनीखाली २८ मीटर खोलीवर हा स्वागत सोहळा रंगला.

बॅडमिंटनमध्ये पहिला विजय

0

खेलो इंडिया युथ गेम्स हरियाणा 2022

पंचकुला (हरियाणा), ४ ः
बॅडमिंटनच्या मुलांच्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्रालने विजय मिळविला. दर्शन पुजारी याने तामीळनाडूच्या थांगम कविन याचा दोन सेटमध्ये पराभव केला. उद्या त्याचा सामना उत्तराखंडच्या प्रणव शर्मासोबत होणार आहे.
ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समधील सुसज्ज बॅडमिंटन हॉलमध्ये हे सामने सुरू आहेत. स्पर्धेचा आज दुसरा दिवस होता.
दर्शन पुजारीने (मुंबई) सुरूवातीपासून आक्रमक खेळ केला. थांगम त्याचा अंदाज घेत होता. परंतु लगेच महाराष्ट्राच्या दर्शनने दोन गुण घेत चांगली सुरूवात केली. नंतर ही आघाडी त्याने वाढवत नेली. थांगमला त्याने डोके वर काढू दिले नाही. दर्शनने पहिला सेट (२१ विरूद्ध १०) जिंकून सामन्यात आघाडी घेतली. फोरहँड आणि बॅकहँड हे दोन्ही फटके तो लीलया मारत होता. खास करून त्याने स्मॅश जास्त मारले.

पहिला सामना हरलेला थांगम दबावाखालीच खेळत होता. त्यामुळे गुणफलक १९ विरूद्ध ७ असा झाला. काही चुकीचे फटके मारल्याने थांगमला गुण मिळाले. परंतु सरळ सेटमध्ये दर्शनने त्याचा पराभव केला. दोन्ही सेट त्याने २१ विरूद्ध १० आणि २१ विरूद्ध १० अशा फरकाने जिंकले.

हैदराबादला सराव
मुंबईचा रहिवासी असलेला दर्शन पुजारी हा हैदराबाद येथील पुलेला गोपीचंद यांच्या अकादमीमध्ये सराव करतो. त्याच्याकडून महाराष्ट्राला पदकाची अपेक्षा आहे. सामन्यानंतर त्याने तसा निश्चय बोलून दाखवला.

महाराष्ट्राला गतकामध्ये पहिले कांस्य पदक :मुलींची पंजाबसोबत शर्तीची झुंज

0

खेलो इंडिया यूथ गेम्स हरियाणा 2022

पंचकुला (हरियाना), ४ ः
खेलो इंडिया स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने ४ कांस्य पदकाने खाते उघडले. गतका (सोटी-फरी सांघिक) या क्रीडा प्रकारात मुलींनी हे पदक पटकावले. तगड्या पंजाबसोबत झालेल्या उपांत्य फेरीत पराभव झाला. महाराष्ट्राच्या मुलींनी अत्यंत उत्कृष्ट खेळ करीत निकराई लढाई केली. गतका हा पंजाबचा खेळ समजला जातो. तरीही महाराष्ट्राने त्यांना दिलेली टक्कर पाहून येथील क्रीडाप्रेमींनी महाराष्ट्राचे कौतुक केले.
येथील ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये हा सामना रंगला. गतका हा क्रीडा प्रकार खेलो इंडियात पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्राचे पहिलेच पदक आहे.

आपला पहिला सामना तामीळनाडूसोबत झाला. यात महाराष्ट्राने ७४ तर तामीळनाडूचे अवघे २१ गुण होते. दुसरा सामना छत्तीसगडसोबत झाला. त्यात महाराष्ट्राने (११७ विरूद्ध ४८) एकतर्फी विजय मिळवला. उपांत्य फेरीची लढत पंजाबसोबत झाली. शुभांगी अंभुरे, सीमा खिस्ते, जान्हवी खिस्ते, नंदिनी पारधे या खेळाडूंनी पंजाबसोबत शर्तीची लढत दिली. पहिल्याच स्पर्धेत मिळवलेले हे यश नेत्रदीपक आहे.

ड्रायव्हरच्या मुलींचे यश

गतका संघातील चारही मुली मराठवाड्यातील आहेत. यात सीमा खिस्ते आणि जान्हवी खिस्ते (परभणी) या दोन्ही बहिणी आहेत. गरीब कुटुंबातील असूनही त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत धडक मारली. त्यांचे वडील ड्रायव्हर आहेत. बिकट आर्थिक परिस्थितीत या मुलींनी पांडुरंग अंभुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळवले. क्रीडा विभागाने सराव शिबिर घेतल्याने खेळाडूंना यश मिळवता आल्याचे अंभुरे यांनी सांगितले.

बॅडमिंटनमध्ये निराशा
बॅडमिंटनमध्ये पहिल्याच सामन्यात महाराष्ट्राला पराभवाला सामोरे जावे लागले. महाराष्ट्राच्या रिया हब्बूने कर्नाटकच्या हरीश विजेथासोबत चांगली लढत दिली. मात्र, अटीतटीच्या या सामन्यात हब्बूची हार झाली. पहिल्या सेटमध्ये रिया तीन गुणांनी पिछाडीवर होती. दुसऱ्या सेटमध्ये रियाने चांगला खेळ केला. १२-१२ अशी कडवी झुंज दिली. मात्र, तिचे आक्रमण विजेथाने धुडकावून लावले. सामन्याच्या शेवटी रियाने कच खाल्ल्याने विजेथाने २१ विरूद्ध १७ असा सामना जिंकला.

कबड्डीत मुलींची दमदार आगेकूच छत्तीसगडला ४४ गुणांनी चारली धूळ-खेलो इंडिया युथ गेम्स हरियाणा 2022

0

पंचकुला (हरियाना)-महाराष्ट्राच्या मुलींच्या कबड्डी संघाने आज (शनिवार) दुसऱ्या दिवशीही विजयी घोडदौड कायम ठेवली. छत्तीसगडच्या संघावर ६२ विरूद्ध १८ असा ४४ गुणांनी दणदणीत विजय मिळवित दिमाखात पुढची फेरी गाठली. या सामन्यात महाराष्ट्राने छत्तीसगडवर तब्बल पाच लोण चढवले.
ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे कबड्डी मैदान आजही महाराष्ट्राने गाजवले. ऋतुजा अवघडी, यशिका पुजारी आणि हरजीतकौर संधूने आजही धडाकेबाज खेळ केला. पहिल्या तीन मिनिटांत महाराष्ट्राच्या मुलींनी छत्तीसगडच्या संघाचा अंदाज घेतला. त्यानंतर आक्रमण सुरू केले. उत्कृष्ट पकडी आणि चढाई केल्याने गुणांची मोठी आघाडी घेता आली.
पहिल्या हापमध्ये दोन आणि दुसऱ्या हापमध्ये तीन असे पाच लोण महाराष्ट्राने छत्तीसगडवर चढवले.
प्रत्येक चढाईत छत्तीसगडचे गडी बाद केले जात होते. पकडीही तितक्याच कौशल्याने होत होत्या. शेवटची दहा मिनिटे उरली असताना गुणफलक होता ४१ विरूद्ध १४. महाराष्ट्राने सुरूवातीपासून सामन्यावर मजबूत पकड ठेवली होती. परिणामी हा सामना एकतर्फी झाला.

संघाने आज चढाईत सर्वाधिक गुण मिळवले. उद्या (रविवारी) आंध्र प्रदेशसोबत लढत होणार आहे.

चमकदार खेळ
हरजीतकौर (१३ गुण), मनिषा राठोड (१२) यांनी चढाईत कमाल केली. डिफेन्समध्ये कोमल ससाणे (५), यशिका पुजारी (७), शिवरजनी पाटील (४), ऋतुजा अवघडी (३), निकिता लंगोटे (२), मुस्कान लोखंडे (२), किरण तोडकर (२) यांनीही गुण मिळवित संघाला विजय मिळवून दिला. अनुजा शिंदे आणि हर्षदा पाटील या आज राखीवमध्ये होत्या.

डीवाय पाटील पुरस्कृत 16व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अस्मि आडकर, क्रिश त्यागी यांना विजेतेपद

0

कोल्हापूर, 4 जून 2022 : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या वतीने आयोजित व डीवाय पाटील पुरस्कृत 16व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात पुण्याच्या महाराष्ट्राच्या अस्मि आडकर हिने तर, मुलांच्या गटात कर्नाटकाच्या क्रिश त्यागी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर विजय मिळवत विजेतेपद संपादन केले.

कोल्हापूर येथील केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या दहाव्या मानांकित अस्मि  आडकरने कर्नाटकाच्या एन हर्षिनीचा 6-1, 7-5 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. लक्ष्यचा पाठिंबा असलेली अस्मि ही दहावी इयत्तेत अभिनव हायस्कुलमध्ये शिकत असून बाउन्स टेनिस अकादमीत प्रशिक्षक केदार शहा व अनिकेत वाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.  

मुलांच्या गटात अंतिम लढतीत अव्वल मानांकित कर्नाटकाच्या क्रिश त्यागीने तामिळनाडूच्या आठव्या मानांकित प्रणव रेथिन आरएसचा 7-5, 6-4 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. बंगळूरू येथील क्रिश हा सिल्व्हर ओक्स शाळेत दहावी इयत्तेत शिकत असून एचएलटीए टेनिस अकादमी/एसओएल स्पोर्ट्समध्ये प्रशिक्षक सूरज बिकनवर व हर्षा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

दुहेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात प्रणव रेथीन आरएस व महालिंगम खांडवेल यांनी तेजस आहुजा व क्रिश त्यागी यांचा 6-4, 7-5 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात ऐश्वर्या जाधव व आकृती सोनकुसरे या तिसऱ्या मानांकित जोडीने सायली ठक्कर व श्रीनिधी बालाजी यांचा 1-6, 6-4, 10-1 असा पराभव करून विजेतेपद मिळवले.

स्पर्धेतील एकेरीतील विजेत्या खेळाडूंनी करंडक, प्रशस्तिपत्रक व 200एआयटीए गुण, तर उपविजेत्यांना करंडक, प्रशस्तिपत्रक व 150एआयटीए गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण डीवाय पाटील ग्रुपचे चेअरमन डॉ.संजय पाटील, स्पर्धेचे चेअरमन दिलीप मोहिते, एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देसाई, केडीएलटीएचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश कित्तूर, केडीएलटीए सचिव आशिष शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे समन्वयक शितल भोसले, स्पर्धा निरीक्षक वैशाली शेकटकर, केडीएलटीए सहसचिव सचिन कदम, केडीएलटीए खजिनदार मेघन बागवाडे, केडीएलटीए मुरलीधर घाटगे, महेंद्र परमार, मनल देसाई, सागर फडतरे,  आदी मान्यवर उपस्थित होते.  

निकाल: अंतिम फेरी: मुली: अस्मि  आडकर(महा)(10)वि.वि.एन हर्षिनी(कर्नाटक)6-1, 7-5; मुले: क्रिश त्यागी(कर्नाटक)(1)वि.वि.प्रणव रेथिन आरएस(तामिळनाडू)(8)7-5, 6-4;  

दुहेरी: मुले: अंतिम फेरी: 
प्रणव रेथीन आरएस/महालिंगम खांडवेल वि.वि.तेजस आहुजा/क्रिश त्यागी[1]  6-4, 7-5; 


मुली: ऐश्वर्या जाधव/आकृती सोनकुसरे[3] वि.वि.सायली ठक्कर/श्रीनिधी बालाजी[2] 1-6, 6-4, 10-1.

बचत गटांना संधी देण्यासाठी जिल्हा, तालुका स्तरावर विक्री मॉल उभारणार

0

नागपूर, दि. 4:  मानकापूर क्रीडासंकुलात काल आलेल्या ग्रामीण भागातील महिला केवळ कार्यक्रमासाठी नव्हे तर त्यांना जी आपण स्वप्न दाखवली आहे. त्याची उत्तरे शोधायला आणि संधी शोधायला आल्या होत्या. आता आमची जबाबदारी वाढली असून उद्योगउत्सुक असणाऱ्या ग्रामीण भागातील या महिलांसाठी जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा व तालुका स्तरावर मॉल व विक्री केंद्र उभारणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय , युवक कल्याण व क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले.

             मलकापूर क्रीडासंकुलात आज त्यांनी भेट दिली. त्यांच्या पुढाकारातून शुक्रवारपासून या ठिकाणी विभागीय सरस मेळावा व जिल्हास्तरीय महिला मेळावा सुरु झाला आहे. काल १२ हजार महिला मानकापूर क्रीडा संकुलात उद्योग, व्यवसाय उभारणी संदर्भातील मार्गदर्शन, यशकथा व प्रबोधन घ्यायला उपस्थित होत्या. कालच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कौतुक केले.

            कालच्या मेळाव्यात आलेल्या महिलांनी एक जबाबदारी आपल्यावर सोपविली आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला गती देण्याची ही उत्तम संधी असून जे प्रयोग बारामतीमध्ये सुनंदा पवार यांनी केले. तेच प्रयोग नागपूर ग्रामीणमध्ये करण्याची पार्श्‍वभूमी तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.

            ग्रामीण भागात प्रत्येक घरात असणारी महिला, सून, मुलगी आता सुशिक्षित आहे. आपल्या कुटुंबाचा आर्थिक डोलारा सक्षम करण्याची तिची इच्छा आहे. तिने घेतलेले शिक्षण तिला वाया घालवायचे नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्था गतिशील करण्याची ही संधी समजून कामी लागावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            बचत गटाचे, गृह उद्योगाचे आणि समूह उद्योगाचे स्वप्न घेऊन काल महिला या ठिकाणी आल्या होत्या. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था नीट करण्याची त्यांची तयारी आहे. त्यामुळे आपल्याला त्यांच्यासाठी व्यवस्था उभी करावी लागेल, अशी एक यंत्रणा तयार करावी लागेल ज्या मार्फत त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. त्यातून त्यांना अर्थसाह्य होईल,त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ज्या मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत. त्या जिल्ह्याच्या ठिकाणी असोत वा तालुक्याच्या ठिकाणी असोत या ठिकाणी विक्री केंद्र, छोटे मॉल उभे करावे लागतील. त्यासाठी जिल्हा परिषदेने पुढे यावे, यासाठी लवकरच अशा पद्धतीची यंत्रणा उभी करणे आवश्यक असून नागपुर जिल्हा परिषदेने हा आदर्श पुढे करावा असे स्पष्ट निर्देश त्यांनी आज याठिकाणी दिले.

            तत्पूर्वी, जिल्हा परिषदेच्या वतीने सुनील केदार यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुमित्राताई कुंभारे, सभापती तापेश्वर पुंडलिक वैद्य, सभापती उज्वला बापू बोढारे, जिप सदस्य अवंतिका लेकुरवाळे, कुंदा राऊत, रवींद्र भोयर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे विवेक इलमे आदी उपस्थित होते.

मानकापूर क्रीडा संकुलात सुरू असलेल्या विभाग स्तरीय सरस महोत्सव व जिल्हा महिला मेळाव्याचा रविवार हा शेवटचा दिवस असून मोठ्या संख्येने नागरिकांनी प्रदर्शन बघण्यासाठी व खरेदीसाठी यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

            मानकापूर येथे क्रीडा संकुलात सुरू असलेला हा विभाग स्तरीय सरस मेळावा आहे. त्यामुळे या मेळाव्यामध्ये नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांचे स्टॉल लागले आहेत. काल पहिल्याच दिवशी या स्टॉलवर १७ लाखांची विक्रमी उलाढाल झाली आहे.

            यामध्ये नागपूर जिल्ह्याच्या स्टॉलवर ७ लक्ष ७१ हजार, वर्धा जिल्हा १ लक्ष ५८ हजार, चंद्रपूर जिल्हा २ लक्ष ४२ हजार, भंडारा जिल्हा २ लक्ष ५५ हजार , गोंदीया जिल्हा १ लक्ष ७३ हजार , गडचिरोली १ लक्ष २२ हजार, असा एकूण सतरा हजाराची विक्री शुक्रवारी पहिल्या दिवशी झाली आहे.

            शनिवार व रविवार मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी येतील व विविध जिल्ह्यातून आलेल्या स्टॉलवर खरेदी करतील, अशी अपेक्षा आहे. नागपूर सारख्या महानगरांमध्ये लागलेल्या प्रदर्शनात आपल्या दर्जेदार वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांनी अतिशय तयारीने या ठिकाणी आपले स्टॉल सजविले आहे. त्यांचे कौतुक करण्यासाठी व आपल्या परिवारासोबत विकेन्ड साजरा करण्याकरिता या ठिकाणी घेण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे.

            ग्रामीण भागातील पारंपारिक हस्तकला, सेंद्रिय शेतीतील खाद्यान्न, खमंग शाकाहारी मांसाहारी खाद्यपदार्थ, पुरणपोळी चटपटीत खाद्यपदार्थ ,लोणचे, घरांतील सजावट वस्तू, यासोबतच विविध शरबत असे सर्व जिन्नस मानकापूर क्रीडासंकुलमध्ये महिला बचत गट मेळाव्यांमध्ये उपलब्ध आहे.

            चादर कपडे यापासून तर घरगुती वापराच्या वेगवेगळ्या वस्तू देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोफत आरोग्य तपासणीचा लाभ या ठिकाणी घेता येतो. बीपी, शुगर,तपासणी करता येते. याशिवाय सिकलसेल सारख्या आजाराची मोफत तपासणी देखील या ठिकाणी केली जाते.

नागरिकांनी मोठ्या संख्येने याठिकाणी खरेदीसाठी, प्रदर्शनाचा लाभ घेण्यासाठी, यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे दूरगामी धोरण आखावे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुण्यातील वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटमध्ये साखर परिषद-२०२२ चे उद्घाटन

पुणे दि.४- केंद्रीय पातळीवर साखर उद्योगात भविष्यात येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन दूरगामी धोरण आखल्यास त्याचा सकारात्मक परिणाम या उद्योगाच्या प्रगतीवर होईल. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीनी एकत्र यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

वसंतदादा साखर इन्स्टिट्यूट येथे आयोजित साखर परिषद-२०२२ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, सतेज पाटील, शंभुराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, हेमंत पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर आदी उपस्थित होते.

श्री.ठाकरे म्हणाले, साखर उद्योग क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान स्वीकारून भविष्याचा वेध घेतला तर चांगली प्रगती साधता येईल. ब्राझीलने साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी केलेले उपायांचा अभ्यास करून आपणही अनुकूल बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना संघटित करून त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. आपला शेतकरी कष्टासाठी मागे पडत नाही. आपला कृषिप्रधान देश आहे. साखर, इथेनॉलच्या मागणीबाबत बाजाराचा अभ्यास करून कोणते उत्पादन करून बाजारपेठ काबीज करावी याचे  मार्गदर्शन करावे लागेल. त्याच्या कष्टाला योग्य किंमत मिळावी यासाठी योग्य दिशा द्यावी लागेल. राज्य शासन साखर उद्योगाच्या उत्कर्षासोबत या क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

साखर उद्योगातील योग्य नियोजन गरजेचे

साखर उद्योग हा महाराष्ट्राचा मुख्य उद्योग आहे. या उद्योगातील क्षमता लक्षात घेऊन  पुढील नियोजन करणे गरजेचे आहे. इथेनॉलचे महत्व लक्षात घेता त्याच्या निर्मितीवरही विशेष लक्ष द्यावे लागेल. ऊसतोड कामगार, शेतकरी, साखर कारखानदार हे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देत असतील तर त्यांना सहकार्य करणे शासनाचे कर्तव्य आहे. साखर कारखाने तोट्यात चालत असताना उद्योगाच्या नियोजनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. साखर परिषदेमध्ये या उद्योगातील समस्यांवर विचार व्हावा. शेतकऱ्यांनी उसाच्या पिकासाठी सूक्ष्म सिंचनाचा उपयोग करावा, असेही त्यांनी सांगितले.

शासनाने ऊस वाहतुकीचा प्रश्न, गाळपाचा प्रश्न, थकहमी याबाबत शासन सहकार्य करीत आहे. यापुढेदेखील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन मदत करेल. पण बदलत्या काळाप्रमाणे विकसित तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्याप्रमाणे बदल घडवून आणावा लागेल. इथेनॉल निर्मितीचे महत्त्व लक्षात घ्यावे लागेल.

ऊसतोड कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन केले आहे. त्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडविता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. साखर परिषदेमध्ये अनेक अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्ती सहभागी झाल्याने ही परिषद या क्षेत्रातील व्यक्तींना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुण्यात इथेनॉलचे पंप सुरू करा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 

केंद्रीय मंत्री श्री.गडकरी म्हणाले, आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कृषि आणि ग्रामीण क्षेत्रात क्रांतीची गरज आहे. देशाच्या अर्थव्यवस्थोत कृषी आणि निगडीत क्षेत्राचे प्रमाण केवळ १२ टक्के आहे. शेतकरी संपन्न झाला पाहिजे तरच देशाची प्रगती होईल. आकांक्षित जिल्ह्यातही शेतीला समृद्ध केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. यादृष्टीने साखर उद्योग हा कृषि आणि ग्रामीण क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

येत्या काळात संशोधनाला खूप महत्त्व आहे. कृषि क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोगाद्वारे बदल घडवून आणणे गरजेचे आहे. ज्ञानाचे आर्थिक सुबत्तेत परिवर्तन करणे आवश्यक आहे. भविष्यात आपल्या देशात २५ लाख कोटी इंधन आयातीसाठी खर्च करावा लागणार आहे. रस्ते वाहतुकीत वाढ होऊन वाहनांची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे इथेनॉल, मिथेनॉल, ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रिक या पर्यायांना खूप वाव आहे.

आपल्या देशात पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल टाकण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार १ हजार कोटी लिटर इथेनॉल लागणार आहे. तेवढे उत्पादन करण्याची आपल्या साखर कारखान्यांमध्ये क्षमता नाही. येणाऱ्या काळात ऊसाचे दर कमी होणार नाही, मात्र साखरेचे दर कमी होऊ शकतील. त्यामुळे येणाऱ्या काळात साखर उद्योग इथेनॉलकडे वळविणे ही काळाची गरज आहे. पेट्रोलियम मंत्र्यांशी बोलून यासाठी मार्ग काढावा लागेल.

नव्या तंत्रज्ञानामुळे इथेनॉलचे उपयोगिता मूल्य पेट्रोल एवढेच होणार असल्याने त्यांच्या किंमतीवरही फरक होईल. इथेनॉल हे हरित इंधन आहे, त्यामुळे प्रदूषण कमी होते. पुण्यात इंडियन ऑईलचे तीन पंप सुरू करण्याच्या सूचना कंपन्यांना करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्यासोबत पुण्यातील प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल. त्यामुळे शासनाने पुण्यात इथेनॉलचे पंप सुरू करण्यास पुढाकार घ्यावा. इथेनॉल निर्मिती शेतकऱ्यांना समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ड्रोनद्वारे फवारणी फायदेशीर आणि अधिक परिणामकारक असल्याने सुशिक्षित युवकांना सहाय्य करून त्यांच्या माध्यमातून ड्रोनद्वारे खत फवारणीबाबतही शासनाने प्रयत्न करावा. वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटने त्याबाबत मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे वीज देण्याबाबतही शासनाने विचार व्हावा, अशी सूचना श्री.गडकरी यांनी केली.

दूरगामी दृष्टी, संकल्प आणि तंत्रज्ञानाधिष्ठित उपायोजना ही साखर उद्योगासाठी त्रिसूत्री-खासदार शरद पवार

खासदार पवार म्हणाले,  भविष्यात ऊसाचे क्षेत्र आणखी वाढणार आहे. त्यामुळे येत्या हंगामात ऊस तोडणीचे नियोजन हंगाम सुरू होण्याआधी करावे लागेल. ऊस तोडणी आणि वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. साखर आयुक्तालय आणि साखर कारखान्यांनी योग्य नियोजन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.

देशात कोळसा टंचाईमुळे वीज निर्मिती कमी होत आहे. याचा परिणाम उद्योग आणि शेतीवर होत आहे. ऊसाच्या बगॅसच्या माध्यमातून ३ हजार ६०० मेगावॅट वीज निर्मिती होऊ शकते. सध्या महाराष्ट्रामध्ये २४७० मेगावॅट स्थापित क्षमतेचे सहवीज निर्मिती प्रकल्प आहेत. त्यापैकी आपण ६५ ते ७० टक्के वीज महावितरणला दिली तरी अंदाजे १६६० मेगावॅट वीज राज्य सरकारला मिळू शकते. यासाठी बगॅस आधारीत प्रकल्पाची उभारणीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

त्याचसोबत सौर ऊर्जेचा उपयोग करणेही आवश्यक आहे. राज्यात सौरऊर्जा निर्मितीसाठी भरपूर वाव आहे,मात्र त्यासाठी निधीची उपलब्धता होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन इथेनॉल साठवणुकीची क्षमता वाढविणे आणि त्यासाठी गुंतवणूक, रेल्वेने वाहतूक करण्याची योजना आणि  इथेनॉल खरेदी याबाबत तेल कंपन्यांचे धोरण अधिक अनुकूल होण्याची गरज आहे.

साखर उद्योगासमोर असलेले प्रश्न अनेक आहेत,  या प्रश्नांवर चर्चा करून विधायक, अनुकूल, शाश्वत आणि पर्यावरण पूरक उपाययोजना हाती घेऊन त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. त्यासाठी काळ सुसंगत असे सर्वस्पर्शी व्यापक सूक्ष्म नियोजन महत्त्वाचे आहे. दूरगामी दृष्टी, दृढनिश्चयी धोरणात्मक संकल्प आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठीत उपाययोजना या त्रिसूत्रीच्या बळावर साखर उद्योगाला चांगली दिशा देण्यासाठी साखर परिषद महत्त्वाचे योगदान देईल, असे त्यांनी सांगितले.

व्हीएसआयच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले बेणे-सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

प्रास्ताविकात सहकारमंत्री पाटील म्हणाले, राज्यात यावर्षी ऊसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. यावर्षी साखरेचे उत्पादन वाढताना साखरेचा उताराही वाढला आहे. साखर उद्योगातून ६ हजार कोटीपेक्षा जास्त महसूल मिळतो. हा उद्योग वाढण्यासाठी ऊसाचे उत्पादन वाढविण्यासोबत चांगला उतारा असणे गरजेचे आहे. व्हीएसआयच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना चांगले बेणे देण्याचा प्रयत्न आहे. आता साखरेसोबत इथेनॉलचे उत्पादन वाढायला हवे. यावर्षी ८ कारखाने चालवायला घेतले. त्यात २६ लाख टन ऊसाचे गाळप झाले. त्या परिसारातील जनतेचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

श्री.दांडेगावकर म्हणाले, साखर कारखानदारीच्या क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाविषयी चर्चा करण्यासाठी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी साखर उत्पादनात विक्रम करण्यात आला असून महाराष्ट्र साखर उत्पादनात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. साखर उद्योग ऊर्जेच्या क्षेत्राकडे वळल्यास सर्व घटकांना  लाभ होईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार श्री. पवार यांच्याहस्ते ‘राज्यस्तरीय साखर परिषद- २०२२’  पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

फिक्की महिला आघाडीच्या वतीने गुरुद्वारा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

पुणे -सध्या देशभर आणि सर्वत्र रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे ..त्यामुळेच 14 जून रोजी होणाऱ्या जागतिक रक्तदान दिनाच्या पार्श्वभूमीवर  फिक्की महिला आघाडी ,रोटरी क्लब पुणे एअरपोर्ट  व गुरुद्वारा कॅम्प यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुद्वारा कॅम्प येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी सैनिकांनी रक्तदानात मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेतला, पुणे शहरातील नागरिकही  सहभागी झाले होते .परंतु दिवसभरात अतिशय मोठ्या प्रमाणात सैनिकांनी रक्तदान करून या  शिबिरात मुख्य सहभाग घेतला होता .या शिबिरात जमा झालेले रक्त  ससून रुग्णालयात देण्यात आले .   फिक्की महिला आघाडी च्या वतीने शहरभर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे  त्याचे उद्घाटन महाराष्ट्र आणि गोवा चे दक्षिण सब एरियाचे  मेजर जनरल इंद्रजित सिंग यांच्या हस्ते करण्यात आले .त्यांनी यावेळी मनोगत ही व्यक्त केले .         या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मेजर जनरल इंद्रजित सिंग ,फिक्की महिला आघाडीच्या अध्यक्षा निलम शेवलेकर ,वस्तू व सेवा कर विभागाचे प्रधान आयुक्त राजीव कपूर , आयकर विभागाचे आयुक्त राजीव कुमार ,माजी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख ,गुरुद्वारा कमिटीचे अध्यक्ष चरणजित सिंग सहानी ,सचिव करमजित सिंग आनंद,प्रसिद्ध उद्योजक अनिल शेवलेकर ,फिक्की च्या सचिव पिंकी राजपाल ,सोनिया राव ,अनिता अग्रवाल यासह फिक्की महिला आघाडी ,रोटरी क्लब पुणे एअरपोर्ट , गुरुद्वारा कमिटी विविध संस्थाचे प्रतिनिधी व रक्तदाते मोठ्या प्रमाणात सहभागी होते .

मुंबईत राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात ६ जून रोजी ‘शिवस्वराज्य दिन’

0

मुंबई, दि. 4 : छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या शिवस्वराज्यभिषेक दिनी स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन साजरा करावा, अशा शासनाच्या सूचना आहेत.

या दिनाचे औचित्य साधून सोमवार, 6 जून 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, नगर भवन, फोर्ट, मुंबई येथे हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ग्रंथ निवड समितीचे अध्यक्ष प्रताप आसबे, साहित्यिक अरुण म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या नियोजित कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित  राहावे, असे आवाहन प्र.ग्रंथालय संचालक शालिनी इंगळे यांनी केले आहे.