महाविकास आघाडीचा प्रयोग कायम राहीला तर देशात सत्तांतर-शरद पवार

Date:

पुणे-महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा (मविआ) प्रयोग कायम राहिला तर देशातही सत्तांतर अटळ असल्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (ता. 4) व्यक्त केला. “विरोधी पक्षाचे प्रमुख नेते मविआ सरकार महिना-पंधरा दिवसांत पडेल असा दावा करतात. पण आता भविष्य सांगायचे बंद झाले. अडीच वर्ष हे सरकार टिकले असून 5 वर्षांचा कार्यकाळही पूर्ण करेल. ‘मविआ’चा प्रयोग कायम राहिला तर देशातही सत्तांतर होऊ शकते,” असे ते म्हणाले. आपण आस्तिक किंवा नास्तिकचा प्रचार करत नसल्याचेही पवार यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची पुण्यात आज एका कार्यक्रमात प्रगट मुलाखत झाली. या मुलाखतीत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर पवारांनी सडेतोड उत्तरेही दिली.

काश्मिर फाईलद्वारे लक्ष विचलित केले

काश्मिर फाईल चित्रपटात चुकीच्या पद्धतीने महत्व दाखवून लक्ष विचलित करण्यात आले. त्यावेळी सत्ता कोणाची होती, हे चित्रपटात दाखवले नाही असेही शरद पवार म्हणाले.बृजभूषण कुणी मॅनेज करेल अशी व्यक्ती नाही असा टोलाही पवारांनी राज ठाकरे यांना दिला.

अनेक गोष्टी पुढे येतात, मीडियाही बायस झाला आहे, माध्यमांचे नियंत्रण ताकदवान व्यक्तीच्या हाती आहे. जे योग्य आहे ते योग्य असे माध्यमांनी धोरण अवलंबवायला हवे असेही पवार म्हणाले.

बाळासाहेब असते तर भाजपची हिमंत नसती

संजय राऊतांसारखे स्पष्ट विचार लिहायला हवे असे सांगतानाच पवार म्हणाले की, बाळासाहेब असते तर असे उद्योग करण्याची हिंमत भाजपच्या लोकांत नसती असेही ते म्हणाले.

सध्याचे राजकारणी सभ्य, सुसंस्कृत नाही

शरद पवारांना सद्यस्थितीतील राजकारण्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी स्पष्ट केले की, सध्याचे राजकारणी सभ्य, सुसंस्कृत नाहीत. 2024 मध्ये भाजपचे अर्धे नेते पक्ष सोडतील असा दावाही त्यांनी केला.

आम्ही दडपशाहीला घाबरत नाही

इडी असो कि काहीही आम्ही दडपशाहीला घाबरत नाही असे पवार म्हणाले, ते पुढे हेही म्हणाले की, शिवसेना राजकारणात येण्यापुर्वी एका विचारधारेने चालत होती त्यानंतरही हा विचार शिवसेनेने सोडला नाही त्यांचा विचार आजही तितकाच प्रभावी आहे असेही पवार म्हणाले.

म्हणून मी देवासमोर हात जोडतो

पवार म्हणाले, अस्तितकता नास्तिकता अशा तपासण्या झाल्या नाहीत. योग्य नाही, आस्तिक, नास्तिक व्यक्तिगत प्रश्न आहे, मी नास्तिक, आस्तिकतेचा गवगवा कधी करत नाही. पंढरपूरला गेलो तर मी हात जोडतो. कारण सामान्य माणसांची श्रद्धा असते त्या सामान्य माणसांच्या श्रद्धेचा अनादर होऊ नये म्हणून मी हात जोडतो अशी आस्तिक व नास्तिकतेवर आपली भूमिका मांडली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...