Home Blog Page 1919

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत पुणे विभागाची ३० जुन रोजी जन सुनावणी

0

पुणे, दि. २०: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत पुणे येथे ३० जुन २०२२ रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ही सुनावणी घेण्यात येणार असल्याचे आयोगाचे संशोधन अधिकारी मेघराज भाते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

पुणे विभागाची सुनावणी ३० जुन रोजी व्हि.व्हि.आय.पी. शासकीय विश्रामगृह, पुणे येथे दुपारी २ वाजेपासून होणार आहे. सुनावणीस सगर, कडिया, कुलवाडी, टकारी, लिंगायत रड्डी जाती तसेच जमाती उपस्थित राहणार आहेत.

आळंदीत माऊलींच्या जयघोषाबरोबर निघणार संविधान दिंडी; मंगळवारी दिंडीचे आळंदीत होणार उद्घाटन

0

पुणे दि. २० – कोविड विषयक निर्बंधांमुळे मागील दोन वर्षांपासून खंड पडलेली ‘ज्ञानोबा-तुकोबांची’ पालखी यावर्षी मोठ्या उत्साहात आळंदी आणि देहू येथून पंढरपुराकडे प्रस्थान करणार आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अभिनव संकल्पनेतून यावर्षी पालखी सोहळ्यात ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाबरोबरच संविधानाचादेखील जागर करण्यात येणार आहे.

पालखी प्रस्थानाच्या वेळी आळंदी येथून पालखी सोबतच संविधान दिंडी आयोजित करण्यात आली असून २१ जून रोजी आळंदी येथून निघणारी ही संविधान दिंडी पालखी मार्गावर सर्वत्र संवैधानिक मूल्यांचा जागर भजन- कीर्तन, अभंग आदींच्या माध्यमातून करत १० जुलै रोजी पंढरपूर येथे पोचणार आहे.

अशी असेल संविधान दिंडी :
आळंदी येथील चऱ्होली फाटा येथे २१ जून रोजी दुपारी ३ वाजता दिंडीचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येईल. या दिवशी सायंकाळी संविधान जलसा व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ रोजी संविधान दिंडी विठोबा मंदिर भवानी पेठ पुणे येथे मुक्कामास येईल, या दरम्यान राज्यातील नामवंत विचारवंत, सांस्कृतिक कलावंत, भजनी मंडळ आदींच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम घेतले जातील.

पालखी मुक्काम स्थळाजवळ २३ (गुरुवार) रोजी नाना पेठ येथे संविधान जलसा हा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमास मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह ज्येष्ठ सिने कलाकार तथा विचारवंत नसिरुद्दीन शहा, निलेश नवलखा, शबाना आझमी, नागराज मंजुळे, रत्नाकर पाठक, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांसह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

२४ जून रोजी पासून ते १० जुलैपर्यंत पालखी सोहळ्यामध्ये संविधान दिंडी संमिलित होऊन, त्यामधून ठिकठिकाणी संविधान जलसा, संविधानावर व संविधानातील मूल्यांवर आधारित प्रवचने कीर्तने, सप्तखंजिरी कीर्तन आदी उपक्रम सुरू राहतील. त्याचबरोबर ठिकठिकाणी संविधान उद्देशिका वाचन व वाटप, अभंग व कीर्तनाच्या माध्यमातून संवैधानिक मूल्यांबाबत जागृती, संविधानातील हक्क व कर्तव्ये तसेच विविध परिशिष्ट, कलमे आदींचे डिजिटल सादरीकरण, दृकश्राव्य माध्यमातून लोकसंवाद, वृक्षारोपण, योजनांच्या माहितीच्या घडी पत्रिकांचे वाटप इत्यादी उपक्रम राबवले जाणार आहेत.

बार्टी मार्फत संपूर्ण नियोजन करण्यात आले असून या संविधान दिंडीचा १० जुलै रोजी पंढरपूर येथे समारोप होणार असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे.

धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री-महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन दरवर्षी लाखो भाविक वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन देहू-आळंदी येथून निघणाऱ्या संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात संमिलीत होतात. देशाचे संविधान देखील आपल्या संतांनी दिलेल्या समता, बंधुभाव व सामाजिक न्याय या मुलतत्वांवर आधारित आहे. आजच्या पिढीला आपल्या अधिकार व कर्तव्यांची जाणीव व्हावी, देशाचे नागरिक हे जबाबदार असावेत, या उद्देशाने लाखो भाविकांच्या ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या जयघोषाच्या निनादात निघणाऱ्या पालखी सोहळ्यात यावर्षी संविधान दिंडी आयोजित करण्यात येत आहे. पालखीच्या या संपूर्ण प्रवासात हरिनाम घोषासह संवैधानिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश यानिमित्ताने देण्याचा प्रयत्न आहे.

अधिकारी महासंघाच्या पुणे समन्वय समितिच्या अध्यक्षपदी हिम्मत खराडे

0

पुणे दि.२०-महाराष्ट्र् राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पुणे समन्वय समितीच्या अध्यक्षपदी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांची सर्व संमतीने निवड करण्यात आली. राज्य सरचिटणिस इंजि. विनायक लहाडे , राज्य संघटक अशोक मोहिते, पुणे सरचिटणिस इंजि. विठ्ठल वाघमारे आणि कोषाध्यक्ष मोहन साळवी यांनी श्री.खराडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पुणे समन्वय समितीचे अध्यक्ष भारत शेंडगे हे 31 मे 2022 रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी ही निवड करण्यात आली आहे

टाळ-मृदंगाच्या गजरात तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

0

पुणे, दि.२० : ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका… अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान केले.

दोन वर्षानंतर पायी वारी होत असल्याने वारकऱ्यांचा अमाप उत्साह यावेळी जाणवत होता. गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी रद्द झाली होती. यंदा कोणत्याही निर्बंधाविना वारी होत असल्याने भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

देहू मंदिरात खासदार श्रीरंग बारणे यांनी सपत्निक पादुकांचे पुजन आणि आरती केली. यावेळी आमदार रोहित पवार, सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार यांच्यासह बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार पूजेला उपस्थित होते. त्यानंतर उपस्थित सर्वजण वारकऱ्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले. यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे, संतोष मोरे, विशाल मोरे, संस्थांचे विश्वस्त संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे आदी उपस्थित होते.महापूजेनंतर पालखीने इनामदारवाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.

काँग्रेसचा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने तातडीने फेटाळला; आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार

0

मुंबई-लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यांच्या मतदानावेळी दोन सहकारी उपस्थित होते, असा आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तर अशोक चव्हान यांनी दोन्ही मते रद्द करावी अशी मागणी केली आहे. मात्र कोणताही विलंब न लावता काँग्रेसचा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळला असल्याचे वृत्त आहे, आता कॉंग्रेस केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेसच्या आक्षेपाला अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तर परवानगी घेऊनच टिळक आणि जगताप यांनी मतदान प्रकियेत मदत घेतली, असा दावाही त्यांनी केला.विधान परिषदेसाठीचे दुपारी पावणेचार वाजेपर्यंत 285 आमदारांचे मतदान पूर्ण झाले असून 5 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. ​राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास आघाडी सावध झाली आहे. तर भाजपने देखील या निवडणुकीतही चमत्कार करून दाखवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे

काँग्रेसचा असंवेदनशिलतेचा कळस – फडणवीस

भाजपचे दोन्ही आमदार आजारी आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातून मतपत्रिका पेटीत टाकली. काँग्रेसने आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगतापांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. हा असंवेदनशिलतेचा कळस असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे, असे फडणवीस म्हणाले.

पंतप्रधानांनी आयआयएससी बंगळुरू येथे मेंदू संबंधी संशोधन केंद्राचे उद्‌घाटन केले आणि बागची पार्थसारथी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची पायाभरणी केली

0

बेंगलोर 20 जून 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयआयएससी बंगळुरू  येथे मेंदू संबंधी संशोधन केंद्राचे उद्‌घाटन केले आणि बागची पार्थसारथी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची पायाभरणी केली.

पंतप्रधान म्हणाले,येथे मेंदू संबंधी संशोधन केंद्राचे उद्घाटन करताना आनंद झाला. या प्रकल्पाची पायाभरणी करण्याचा मानही मला मिळाला होता , त्यामुळे अधिक आनंद झाला आहे. मेंदूशी संबंधित विकारांचे व्यवस्थापन कसे करायचे यावर प्रामुख्याने   संशोधन केले जाईल. ”

“ज्या वेळी प्रत्येक राष्ट्राने आरोग्यसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, अशा वेळी बागची पार्थसारथी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासारखे  प्रयत्न खूप महत्त्वाचे ठरतात.  आगामी काळात, यामुळे आरोग्य सेवा क्षमता अधिक मजबूत होईल आणि या क्षेत्रात अग्रगण्य संशोधनाला  प्रोत्साहन मिळेल.

मेंदूवरील संशोधन केंद्र हे एक प्रकारची विशिष्ट संशोधन सुविधा म्हणून विकसित केले असून  वयानुरूप होणाऱ्या मेंदूच्या  विकारांचे व्यवस्थापन करण्यासाठी पुरावा आधारित सार्वजनिक आरोग्य उपचार पुरवण्यासाठी महत्त्वपूर्ण संशोधन करण्यावर भर देते.आयआयएससी बंगळुरू  संकुलात 832 खाटांचे बागची पार्थसारथी मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारले जाणार आहे आणि प्रतिष्ठित संस्थेत विज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्र अभ्यासक्रमांना एकत्र जोडण्यात मदत करेल. यामुळे देशात क्लिनिकल  संशोधनाला मोठी चालना मिळेल  आणि नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याच्या दिशेने काम करेल ज्यामुळे देशातील आरोग्य सेवा सुधारण्यास मदत होईल.

आनंद सोहळ्याची तयारी

0

पंढरीची वारी वारकऱ्यांसाठी भक्तीचा, श्रद्धेचा आणि चैतन्याचा सोहळा असतो. पंढरीची वारी पायीच करण्याचा प्रघात एके काळी होता व आजही अनेक वारकरी तो पाळतात. वाहनांची सोय झाल्यामुळे बरेचसे लोक वाहनानेही जातात. एरव्ही ठिकठिकाणी विखुरलेले वारकरी पंढरीच्या वाटेवर एकमेकांना भेटू शकतात. जे जाऊ शकत नाही त्याची भावना संत नामदेवांनी ‘पंढरीची वारी जयाचिये कुळी । त्याची पायधुळी लागो मज ॥१॥’ अशा शब्दात वर्णिली आहे.

असा हा वारीचा सोहळा अनुभवण्यासाठी राज्यातून आणि राज्याबाहेरून भाविक येतात. विठूनामाचा गजर करीत एकरूप होतात. तहान-भूक विसरून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. त्यांना वारीचा आनंद लुटता यावा आणि उत्साहाने पंढरीच्या दर्शनासाठी ते मार्गस्थ व्हावे यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे.

पुणे जिल्ह्यात दोन प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत, देहू आणि आळंदी. देहू येथून संत तुकाराम महाराजांची आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान करते. यावर्षी या दोन्ही पालखी सोहळ्याला अनुक्रमे 20 आणि 21 जून रोजी प्रारंभ होणार आहे. तसेच सासवड येथून संत सोपानकाका आणि चांगावटेश्वरचा पालखी सोहळादेखील 25 जून रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.

पालखी सोहळ्याचा मार्ग साधारणत: जिल्ह्यातील हवेली, पुरंदर, दौंड, बारामती आणि इंदापूर या पाच तालुक्यातून जात असल्याने या भागावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. राज्याच्या इतर भागातील भाविकदेखील जिल्ह्यातून प्रवास करणार असल्याने त्यांनाही कोणतीही अडचण येऊ नये याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे यंदा दोन वर्षाच्या कोरोना संकटानंतर हा सोहळा होत आहे. वारीत सहभागी होण्यासाठी भाविक उत्सुक असतात, आणि म्हणूनच यावर्षी नेहमीपेक्षा अधिक गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊनच सूक्ष्म नियोजनावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी पालखी सोहळ्याच्या प्रतिनिधींसोबत बैठका घेण्यात येऊन नियोजनाची रुपरेषा तयार करण्यात आली. सोबतच पालखी मुक्काम, पालखीतळ आणि विसाव्याच्या ठिकाणी भेट देऊन आवश्यक सुविधेबाबत माहिती घेण्यात आली आणि त्यानुसार नियोजनाला अंतिम रुप देण्यात आले.

स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक व्यापक स्वरुपाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत वारकऱ्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन त्यानुसार चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री महोदयांनी दिले. बैठकीस सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हेदेखील उपस्थित होते.

शासनाने पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छतेच्या सोयी पुरविण्यासाठी भाडेतत्त्वावर तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यासाठी सहा कोटी त्र्याहत्तर लाख वीस हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यादरम्यान पालखी मार्ग, पालखी तळ आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधांसह ज्या भाविकांनी कोरोना लशीची दुसरी मात्रा किंवा वर्धक मात्रा घेतली नसेल त्यांच्यासाठी लसीकरणाची सुविधा करण्यात येणार आहे. ११२ वैद्यकीय अधिकारी आणि ३३६ कर्मचाऱ्यांची आरोग्यसेवेसाठी पालखी मार्गावर नियुक्ती करण्यात आली आहे. २३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ८७ फिरते वैद्यकीय पथक आणि १०८ रुग्णवाहिका वारकऱ्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी सज्ज असतील. पालखी मार्गावरील रुग्णालयातील १० टक्के खाटा पालखी सोहळ्यादरम्यान आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. देहू आणि आळंदी येथे भविकांच्या अँटीजन चाचणीची सुविधा करण्यात आली आहे.

पावसाळा लक्षात घेऊन पालखी तळाची आवश्यक कामे करण्यात आली आहेत. पालखी मार्गावर महिलांसाठी ५ किमी अंतरावर शौचालय सुविधा करण्यात येणार आहे. पाण्याच्या सुविधेसाठी ३७ विहिरी आणि विंधनविहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत आणि ७० टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे.

गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पोलिस विभागातर्फे आवश्यक नियोजनदेखील करण्यात आले आहे. आवश्यक तेथे वाहतूक मार्ग वळविण्यात येणार आहेत. पालखी मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालखी सोहळ्यात सहभागी वाहनांची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तपासणी करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनातर्फे खाद्य आणि पेय पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने पुणे विभागातून ६ ते १४ जुलै या कालावधीत ५३० बसेस सोडण्यात येणार आहेत.

वारीचे पावित्र्य जपले जावे यासाठी पालखी मार्ग, पालखी तळ आणि मुक्कामाचा परिसर स्वच्छ रहावा यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल, मच्छी मार्केट, दारुची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

भाविकांच्या व्यवस्थेत कोणतीही त्रुटी रहायला नको, किंवा एखादी घटना घडल्यास तात्काळ प्रतिसादासाठी उपविभागीय अधिकारी यांना इन्सिडन्ट कमांडन्ट म्हणून तर तहसिलदार यांना डेप्युटी इन्सिडन्ट कमांडन्ट म्हणून नेमण्यात आले आहे.

संपर्क यंत्रणा निश्चित करण्यासाठी अतिरिक्त मोबाईल टॉवर उभारण्याचे नियेाजन आहे. ऐनवेळी संपर्क यंत्रणा विस्कळीत झाल्यास बिनतारी यंत्रणादेखील सज्ज ठेवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांकडे वॉकीटॉकी देण्यात येणार आहेत.

पालखी सोहळ्यातील व्यवस्थेबाबत माहिती देण्यासाठी प्रशासनातर्फे सर्व संबंधित यंत्रणांचे संपर्क क्रमांक असलेली पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. सोबतच अशा माहितीसह पंढरपूर येथून श्री विठ्ठलाचे लाईव्ह दर्शनाची सुविधा असलेले ॲपही तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे वारकऱ्यांना सर्व सुविधांची माहितीदेखील मिळू शकणार आहे.

पालखी सोहळ्यात साधाभोळा भाविक भक्तीभावाने येत असतो. त्याच्या श्रद्धेला किंवा उत्साहाला कोणताही धक्का लागू नये याची दक्षता प्रशासन घेत आहे. प्रशासनाचे सुरक्षा, सुविधा, सेवा या त्रिसुत्रीवर विशेष लक्ष आहे. ‘आमुचिये कुळी पंढरीचा नेम । मुखी सदा नाम विठोबाचे ।।‘ असे म्हणत पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने जाणाऱ्या वारकऱ्यांना वारीचा आनंद घेता यावा यासाठीच हा प्रयत्न आहे.

-जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

बदलती जीवनशैली आणि योग (लेखिका:सौ. ममता दवे, रियल बॉडी योगा केंद्र, पुणे)

0

            आज आपली जीवनशैली खऱ्याप्रकारे आरोग्याच्या आधारावर योग्य आहे का ? आजचा आपला आहार , विहाराबाबत खरेतर नव्याने विचार करायची तसेच यामध्ये बदल करायची आवश्यकता निर्माण झालीये. आजच्या संगणकीय युगात तरुणांची जीवनशैली पाश्चात्य देशांप्रमाणे होवू लागली आहे. धकाधकीच्या जीवनशैलीमुळे विविध आजार उद्भवतात. बिघडल्यामुळे जीवनशैली पूर्वी पन्नाशीनंतर होणारे रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, पचनाच्या तक्रारी, ताणतणाव असे आजार तरुण वयात होतांना दिसून येत आहेत. ‘जीवनशैली’मुळे उद्भवणारे आजार हे डॉक्टरांसहित सगळ्यासाठीच एक आव्हान आहे.

            व्यायामाचा अभाव, अनियमित आहार, मानसिक ताणतणाव, व्यसनाधीनता ,जंक फूड खाण्याचे प्रमाण, भ्रमणध्वनीचा अतिरिक्त वापर, रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उशीरा उठणे, बदलते नाते संबंध, कामाच्या ठिकाणी असलेले ताणतणाव , अभ्यासाचा वाढणारा अतिरिक्त ताण आणि ह्या सगळ्यामुळे होणारे शारीरिक आणि मानसिक आजार शरीराबरोबर मनावरही तेवढेच खोल परिणाम करतात. ह्या सगळ्यावर आपल्या भारतीय संस्कृतीत योग हे एक उत्तम शास्त्र आहे .  योगामुळे शरीर, मनाची क्रिया उत्तम प्रकारे कार्य करते. त्यामुळे योग आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग करुन घेणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी दररोज योगा करुन आपले आरोग्य स्वास्थ ठेवावे.

            योग म्हणजे ‘युज’ ह्या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थ आहे जोडणे. इथे आत्मा आणि मन हे जोडणे असा अर्थ अभिप्रेत आहे. भारतीय योग जीवनशैली, शारीरिक आणि मानसिक त्रास दूर करुन शरीराला नवीन उर्जेचा संप्रेषण करते.

शारिरीक विकासासाठी योग

            वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन, उत्तम आरोग्य, यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योगा समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात. परंतू प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात.  तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो.  योगाचे सखोल परिणाम आपल्या सूक्ष्म स्तरावर सुद्धा होत असतात.

आसनातून आरोग्याचे संवर्धन

            आसनांचा नियमित अभ्यास केल्याने शरीर निरोगी राहते. रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते. अग्नी प्रदीप्त राहतो. भूक लागते, मलाचे अनुलोमन नीट  होते. मनाची एकाग्रता वाढते. मास स्नायू व मज्जारज्जू या सर्वांचे कार्य सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथींचे कार्य सुधारते.  आसनांमुळे आरोग्याचे संवर्धन होते.  शरीरातील सर्व अवयव व मन हे एकत्रितपणे समन्वयाने काम करतात. त्यामुळे मनावरील व शरीरातील ताणतणाव कमी होते. आसनांमुळे शरीरातील विकृतीचे निराकरण होवून त्यांचे कार्यात सुधारणा होते परिणामी शरीर उत्तम स्थितीत राहते. मानसिक विकृती जसे काम क्रोध, मत्सर, द्वेष, लोभ, अहंकार यांवर नियंत्रण प्राप्त होते. आसनांमध्ये संधी आणि स्नायू यांना ताण बसतो त्यामुळे तेथील रक्तपुरवठा सुधारतो. त्या स्नायूंचे कार्य सुधारते.

आनंदी मनासाठी योग

            सूर्य नमस्कार, कपाल भाती आणि प्राणायाम या योगिक्रियांनी वजन कमी होते. अनुलोम विलोम, भरम्री या सारख्या प्राणायामा मुळे ताणतणावापासून मुक्ती मिळते.  रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणाऱ्या ताण तणावांचा निचरा योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणामुळे होतो. योगाच्या सरावाने शरीरातली विष द्रव्ये आणि ताण तणाव शरीराबाहेर टाकली जातात.  योगा आणि ध्यानधारणेमुळे मन सतत आनंदी, प्रसन्न आणि शांत राहते.  त्याचा उपयोग आपल्या जवळच्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित होवून नाते संबंधात सुधारणा होते. 

शरीरशुद्धीसाठी प्राणायाम

            प्राणायाम हा शब्द प्राण आणि आयाम यापासून बनला आहे.  प्राणही उर्जा शरीरातील सर्व अवयवांना पुरवला जाते व त्याबरोबरच शरीरातील महत्त्वाची श्वसन संस्था व रक्ताभिसरण संस्था याचे नियमन केले जाते. नियमन यामध्ये प्रयत्नपूर्वक श्वासावर नियंत्रण केले जाते कारण प्राणाद्वारे विश्वासाचे महत्त्वपूर्ण नियमन होते. प्राणायाम ही एक अशी क्रिया आहे ज्यामध्ये प्राणाचे नियमन हे श्वासाद्वारे प्रयत्नपूर्वक केले जाते  प्राणायामामुळे विविध प्रकारच्या नाडीची शुद्धी होते. प्राणायाम सर्व प्रकारच्या शरीरातील विषजन्य घटकांची शुद्धी होते. अलीकडे मनोकायीक आजार (सायको सिमॅटिक)  आजार  नियंत्रित करण्यासाठी प्राणायामाचा फायदा होतो. प्राणायामाचे महत्त्वाचे उद्दिष्ट मनावर नियंत्रण करणे असे आहे. जेव्हा मन नि:श्चल होते त्यावेळी कोणत्याही विचारांची प्रक्रिया किंवा भावनिक अडथळे निर्माण करू शकत नाही म्हणून मनावर नियंत्रण ठेवल्यामुळे आपण विविध प्रकारच्या भावनांवर विजय मिळवू शकतो.

आसने करतांना घ्यावयाची काळजी

            सकाळी लवकर उठून प्रातविधी उरकून रिकाम्या पोटी आसने करावीत. आसने नेहमी प्रसन्न मोकळे आणि नैसर्गिक वातावरणात करावे.चटई किंवा आसन घेवूनच आसने करावीत. सुती आणि सैलसर कपडे वापरावे शक्यता मौन पाळावे. गर्भवती आणि रोगी अवस्थेत योग्य योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय आसने करु नयेत. आसनांच्या वेळी श्वासोश्वास नॉर्मल असावा. थकवा येईपर्यंत आसने करू नयेत. आसने केल्यानंतर किमान अर्धा ते एक तासाने आंघोळ करावी. शक्यतो रिकाम्यापोटी आसने करावी. संध्याकाळी आसने करण्यापूर्वी जेवणानंतर तीन-चार तासानंतर करावेत. शरीरात कंप आल्यास आसन सोडून द्यावे. बळजबरीने आसने करू नयेत आसना नंतर शवासन जरूर करावे.

            आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तंदरुस्त ठेवू शकतो. मनावर चांगले संस्कार करुन त्यावर ताबा ठेवता येतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम योगाच्या माध्यमातून होतो. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवरील विविध देशांनी स्वीकारुन त्याचा प्रचार आणि प्रसारही केला आहे. संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट असतांना योगामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत झाली. त्यामुळे योगाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहणे, संगीत आणि योगा क्लासेसच्या मागणीत मुंबई अव्वल स्थानावर

0

छंद वर्गासाठी एकूण सर्च मध्ये २००% ची वाढ: जस्ट डायल कंझ्युमर इनसाईट्स

– टियर१ शहरांपेक्षा टियर २ गावे आणि शहरांमध्ये छंद वर्गासाठी ३५% जास्त सर्च 

– देशभरात नृत्य वर्गासाठी सर्वाधिक सर्च

मुंबई, २० जून: या उन्हाळ्याच्या सुट्टीत नृत्य, भाषा आणि संगीतासाठीच्या शिकवणी वर्गाची मागणी वाढल्याचे दिसून आले. कोविडच्या उद्रेकामुळे दोन वर्षांच्या लॉकडाऊननंतर छंद वर्गाच्या सर्चमध्ये वर्ष दर वर्ष २०९% वाढ झाल्याचे जस्ट डायल कंझ्युमर इनसाईट्सच्या नवीनतम अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

नृत्य, भाषा आणि संगीत वर्ग हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे स्थानिक सर्च इंजिन असलेल्या जस्टडायल वर एप्रिल मे २२ या कालावधीत सर्वाधिक शोधले जाणारे पहिले ३ अग्रगण्य छंद वर्ग होते तर पोहणे आणि योगाचे वर्ग पहिल्या पाचामध्ये होते. टियर १ शहरांमधील शोधांमध्ये वर्ष दर वर्ष २०३% ची वाढ झाली तर टियर-२ शहरे आणि गावांमध्ये ते प्रमाण २३२% होते.

या सर्च प्रवाहाबद्दल भाष्य करताना जस्ट डायलचे सीएमओ श्री. प्रसून कुमार म्हणाले: “उन्हाळ्यात शाळा आणि महाविद्यालयाला सुट्टी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी छंद जोपासण्याची हीच योग्य वेळ आहे. आम्ही आजूबाजूच्या परिसरातील छंद वर्गांची विस्तृत श्रेणी एकत्रित केली आहे. त्यामुळे आमच्या वापरकर्त्यांना सोयीस्कर निवड करण्यात मदत होऊ शकेल. कोविड मुळे असलेल्या  लॉकडाऊनच्या मागच्या दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी या काळात सर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आम्ही सेवा पुरवठादार ऑनलाइन सेवा देण्याच्या प्रमाणामध्येही वाढ पाहत आहोत आणि त्यामुळे जस्टडायल हे सर्व प्रकारच्या छंद वर्गासाठी योग्य व्यासपीठ बनले आहे. टियर १ गावे आणि शहरांमध्ये हा प्रवाह अधिक दिसून येत असून टियर १ च्या तुलनेत येथील सर्च ३५% ने जास्त आहे.”

जस्ट डायलवर नृत्य हा सर्वात जास्त मागणी असलेला छंद वर्ग होता, ज्यामध्ये दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू ही सर्वाधिक मागणी असलेली आघाडीची ३ टियर १ शहरे होती. दिल्लीतील मागणीत सर्वाधिक ५३% आणि कोलकाता ३१ % सह दुसऱ्या क्रमांकावर होते. टियर २ गावे आणि शहरांमध्ये लखनौ, जयपूर, चंदीगड, इंदौर आणि नागपूर सर्वाधिक मागणी असलेली आघाडीची ५ शहरे होती.

भाषा वर्गासाठी दिल्ली आणि मुंबईतील मागणीचे प्रमाण टियर-1 शहरांमधून असलेल्या मागणीच्या जवळपास ५०% होते आणि पुणे तिसऱ्या स्थानावर होते. इंदौर, जयपूर, चंदीगड, नागपूर आणि पाटणा ही आघाडीची ५ टियर २ गावे आणि शहरे होती जिथे भाषा वर्गांना सर्वाधिक मागणी होती.

संगीत वर्गासाठीच्या सर्चच्या मागणीत मुंबईने अव्वल स्थान मिळवले आणि टियर १ शहरांमधून झालेल्या एकूण सर्चमध्ये हे प्रमाण २०% होते तर त्यानंतर दिल्ली आणि चेन्नई अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होते. लखनौ, इंदौर, नागपूर, चंदीगड आणि कोईम्बतूर ही संगीत वर्गाना वाढती मागणी असलेली आघाडीची ५ टियर २ गावे आणि शहरे होती.

वाढत्या तापमानामुळे मुंबईत पोहण्याच्या वर्गांना सर्वाधिक मागणी दिसून आली. मुंबईत जलतरण  वर्गासाठी शोध सर्वात जास्त होता आणि टियर १ शहरांमधून झालेल्या मागणीच्या ३०% एवढे हे प्रमाण होते. दिल्ली आणि बंगळुरू अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते. जयपूर, लखनौ, इंदौर, चंदीगड आणि कोईम्बतूर ही पोहण्याच्या वर्गाना सर्वाधिक मागणी असलेली आघाडीची ५ टियर २ गावे आणि शहरे होती.

योगा वर्गासाठी देखील मुंबईने मागणीत अव्वल स्थान पटकावले.  टियर शहरांमधून झालेल्या मागणीच्या २५% हून अधिक एवढे हे प्रमाण होते. आघाडीच्या ३ शहरांमध्ये दिल्ली आणि चेन्नई ही शहरे होती. चंदीगड, जयपूर, लखनौ, सुरत आणि इंदौर ही टियर-२ गावे आणि शहरे मागणीत आघाडीवर होती.

काँग्रेसकडून भाजपचे जगताप, टिळक यांच्या मतदानावर आक्षेप; निवडणूक आयोगाकडे तक्रार

0

विधान परिषदेसाठीचे दुपारी पावणेचार वाजेपर्यंत 285 आमदारांचे मतदान पूर्ण; 5 वाजता मतमोजणी सुरू होणार

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेचा निकाल काय येतो याची आतुरता सर्वाना लागली आहे. विधान परिषदेसाठीचे दुपारी पावणेचार वाजेपर्यंत 285 आमदारांचे मतदान पूर्ण झाले असून 5 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. ​राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास आघाडी सावध झाली आहे. तर भाजपने देखील या निवडणुकीतही चमत्कार करून दाखवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यांच्या मतदानावेळी दोन सहकारी उपस्थित होते, असा आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

न्यायालयाने मलिक, देशमुखांना मतदानाची परवानगी नाकारली

महाविकास आघाडीतील बिनखात्याचे मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी परवानगी नाकारली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीलाही मोठा फटका बसला आहे. मलिक आणि देशमुख यांच्या मतदान सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मतदान करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी मलिक, देशमुखांच्या वकिलांतर्फे न्यायालयात करण्यात आली होती पण न्यायालयाच्या निर्णयाने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेस-भाजपात लढत

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता भाजपने याही निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का द्यायची रणनीती आखली आहे. दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात लढत आहे. त्यामुळे विधानपरिषदेची खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्येच असल्याचे दिसून येत आहे.

भाजपकडे मतं नाहीत

भाजपचे 4 उमेदवार कटाकटीने निवडूण येतील. मात्र, पाचव्या जागेसाठी भाजपचे एकही मत शिल्लक नसताना भाजप हा चमत्कार कसा घडवून आणणार? हे पाहावे लागणार आहे. कॉंग्रेसच्या भाई जगताप यांच्याविरुद्ध भाजपने प्रसाद लाड यांनी उमेदवारी दिली आहे. छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून 29 आमदार आहे. या सर्वांनी मतदान भाजपला केले तर निवडणूक भाजपसाठी सोपी होईल. मविआच्या संपर्कात सुद्धा यातले काही आमदार आहेत.

मविआची प्रतिष्ठा पणाला

भाजपचे 5 आणि महाविकास आघाडीचे 6 असे 11 उमेदवार रिंगणात असून सत्ताधारी आघाडीची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागली आहे. राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर होणाऱ्या या निवडणुकीत आघाडीला पुन्हा अपयश आल्यास तीन पक्षांच्या बनलेल्या राज्य सरकारच्या स्थैर्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. शिवसेनेकडे अतिरिक्त 10 मते आहेत. ती आपल्या दुसऱ्या उमेदवारास मिळावीत, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

मविआकडे 170 संख्याबळ

आघाडीच्या संयुक्त रणनीतीवर विचार करण्यासाठी रात्री निवडक नेत्यांची ट्रायडंटमध्ये बैठक झाली. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. आघाडीकडे 170 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे सहा उमेदवारांपैकी प्रत्येकास 28 मतांचा कोटा निश्चित करण्यात आल्याचे समजते. भाजपनेही कोटा ठरवल्याचे समजते.

एकूण आमदार 285, मतांचा कोटा : 26

10 जागांसाठी 11 उमेदवार
इतर : 29 मते = अपक्ष 13, छोटे पक्ष 16

अपात्र : 3 मते = 1 निधन, 2 आमदार तुरुंगात

शिवसेना 55 मते : 7 अपक्षांचा पाठिंबा : 2 जागा, 10 मते जास्त

राष्ट्रवादी 51 मते : 2 जागा, 3 मतांची गरज

काँग्रेस 44 मते : 2 जागा, 8 मतांची गरज

भाजप 106 मते : 5 जागा, 29 मतांची गरज

डॉक्टरच्या कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या:मिरजेजवळील म्हैसाळमधील घटना

0

सांगली- मिरज येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरजेपासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये ही घटना घडली आहे. दोन सख्ख्या भावांनी कुटुंबासह विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरजेमधील म्हैसाळ येथे रविवारी रात्री एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विष पिऊन जीवन संपवलं. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे या दोन भावांनी आपल्या कुटुंबासहित आत्महत्या केली. मृतांमध्ये आई, पत्नी आणि मुलांचाही समावेश आहे. सोमवारी सकाळी मृतदेह आढळल्यानंतर घटना उघडकीस आली.

मात्र आत्महत्ये नेमके कारण आद्यप स्पष्ट झाले नाही, आत्महत्या केलेल्या पोपट वनमोरे यांच्या खिशात एक चिठी सापडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या चिठीत काही लोकांची नावे आणि सांख्यिकी आकडेवारी आहे. मृतांमध्ये डॉक्टर माणिक यल्लाप्पा व्हनमोरे यांच्यासह घरातील सदस्यांच्या समावेश आहे.​​​​​ कर्जबाजारीपणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. सध्या मिरज ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केलाय.

मृतांची नावे –

  • माणिक येलाप्पा वनमोरे (डॉक्टर), आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनमोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा),
  • पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा)

नेमके प्रकरण काय?

म्हैसाळ येथे पशुवैद्यकीय डॉक्टर माणिक यल्लाप्पा व्हनमोरे यांच्या संपूर्ण कुटुंबांने आत्महत्या केली आहे. कुटुंबातील साऱ्या सदस्यांनी विष घेतल्याचे समजते. मृतांमध्ये डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा माणिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा) आणि पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) यांचा समावेश आहे.

असा आला संशय

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी उशिरापर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याने ग्रामस्थांना संशय आला. यावेळी दवाखान्यातील कर्मचारी आणि ग्रामस्थांनी त्यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही मोबाइल उचलत नसल्याने त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता, कुटुंबातील सर्व जण मृत अवस्थेत आढळून आल्याने त्यांना धक्का बसला.

अग्निवीरांसाठी कोणत्या आहेत सुविधा ….

0

सेवारत असताना अग्निवीरांना मिळणार स्किल इंडियाचे प्रमाणपत्र, जेणेकरून उद्योजकता आणि नागरी क्षेत्रातील नोकऱ्यांची संधी त्यांना मिळेल

सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा कंपन्या आणि वित्तीय संस्था यांच्याकडून अग्निवीरांना उचित पतपुरवठ्याद्वारे पाठबळ

कॉर्पोरेट उद्योगांकडून अग्निपथ योजनेचे स्वागत, अग्निवीरांची सेवा पूर्ण झाल्यावर त्यांना नोकरीत भर्ती करून घेण्याची व्यक्त केली इच्छा

नवी दिल्ली-
सैन्यदलात भर्ती करून घेण्यासाठीच्या अग्निपथ योजनेविषयीच्या शंकाकुशंकांवर उत्तर देण्यासाठी गेल्या काही दिवसांत भारत सरकारने अनेक लाभदायी आणि बलदायी उपाय घोषित केले असून त्याद्वारे अग्निवीरांना पाठबळ मिळणार आहे. सैन्यदलात चार वर्षे सेवा केल्यानंतर पोलीस दलांमध्ये भर्तीसाठी अग्निवीरांना प्राधान्य दिले जाईल असे गृह मंत्रालय, भारत सरकार आणि विविध राज्य सरकारांनी घोषित केले आहे. अग्निवीरांच्या क्षमतेत वाढ करून त्यांना उज्ज्वल भवितव्याची हमी देण्यासाठी इतरही विविध विभागांनी अग्निपथ योजनेला पाठबळ दिले आहे. त्याशिवाय, त्यांच्या अंगभूत कौशल्यांना जोड दिली गेल्यामुळे, अग्निवीर म्हणजे देशातील सुप्रशिक्षित आणि अत्यंत शिस्तबद्ध अशी युवाशक्ती बनू शकणार आहे. अशी युवाशक्ती राष्ट्राच्या उभारणीत तर उत्तम योगदान देईलच आणि समाजासाठी मानबिंदूही ठरू शकेल.

तटरक्षक दल आणि संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक कंपन्यांमध्ये जागांचे आरक्षण
संरक्षण मंत्रालयाच्या नोकऱ्यांमधील रिक्त जागांमध्ये 10 टक्के जागा अग्निवीरांसाठी राखीव ठेवण्यास संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी मान्यता दिली आहे. हे 10 टक्के आरक्षण भारतीय तटरक्षक दल आणि संरक्षण क्षेत्रातील 16 सार्वजनिक कंपन्यांमध्ये (HAL, BEL, BEML, BDL, GRSE, GSL, HSL, MDL, Midhani, AVNL,AWEIL,MIL,YIL, GIL, IOL, TCL) लागू होईल. या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी नियमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील. संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक कंपन्यांनीही त्यांच्या नोकरभर्ती नियमांमध्ये तसेच बदल करावेत असे त्यांना सुचविले जाईल. वरील जागांवर अग्निवीरांना भर्ती करता येण्याच्या दृष्टीने आवश्यक , वयाची अट शिथिल करण्याची तरतूदही करण्यात येईल.

पहिल्या वर्षीच्या भर्तीसाठी वयोमर्यादेत सूट
वर्ष 2022 च्या भर्ती प्रक्रियेसाठी अग्निवीरांसाठीची कमाल वयोमर्यादा 21 वर्षांवरून वाढवून 23 वर्षे करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा सरकारने केली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये भर्ती न झाल्याची वस्तुस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला गेला आहे. “भर्ती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्यासाठी लष्कर कामकाज विभाग, संरक्षण मंत्रालय आणि सैन्यदले कटिबद्ध आहेत” असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भर्ती
अग्निवीरांसाठी केंद्रीय राखीव पोलीस दल (CAPFs) आणि आसाम रायफल्स मध्ये 10 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे. एवढेच नाही, तर सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये नियुक्तीसाठी निश्चित असलेल्या कमाल वयोमर्यादेला तीन वर्षांची विशेष सवलत अग्निवीरांना दिली जाईल, अशी घोषणाही गृह मंत्रालयाने केली आहे. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी कमाल वयोमर्यादा पाच वर्षांसाठी शिथिल केली जाईल, अशी महिती गृहमंत्रालयाने आज ट्विटरवरुन दिली आहे.

मर्चंट नेव्हीमध्ये भर्ती
मर्चंट नेव्हीमध्ये अग्निवीरांना सहजपणे सामावून घेण्यासाठी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाअंतर्गत कार्यरत नौवहन महासंचालनालयाने भारतीय नौदलासह एक व्यवस्था निर्माण करण्याची घोषणा केली आहे.
या अंतर्गत, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने सेवेच्या अशा सहा मार्गांची घोषणा केली आहे ज्याद्वारे अग्निवीरांना, त्यांच्या भारतीय नौदलातील कार्यकाळानंतर मर्चंट नेव्हीमधल्या विविध पदांसाठी निवडले जाऊ शकेल. यामुळे, अग्निवीरांना आवश्यक ते प्रशिक्षण घेता येईल, तसेच नौदलाचा समृद्ध अनुभव आणि व्यावसायिक प्रमाणपत्र मिळाल्याने जगभरात कुठेही त्यांना उत्तम वेतन/मानधन मिळणाऱ्या मर्चंट नेव्हीची नोकरी मिळू शकेल. जहाजबांधणी आणि बंदरे तसेच जलमार्ग मंत्रालयाच्या महासंचालनालयाने आज मुंबईत ही घोषणा केली.
ह्या सगळ्या उपाययोजनांमुळे अग्निवीरांना त्यांच्या गुणानुक्रमानुसार भारतीय नौदल ते मर्चंट नेव्हीपर्यंत सामावून घेतले जाऊ शकेल. नौदलातील इलेक्ट्रिकल रेटिंगपासून ते मर्चंट नेव्हीमधील इलेक्ट्रो टेक्निकल रेटिंगपर्यंतचे स्थित्यंतर आणि त्यांनतर मर्चंट नेव्ही मध्येच सर्टिफाईड क्लास IV-NCV CoC धारकापर्यंतचा प्रवास, भारतीय नौदलातील स्वयंपाक्यापासून ते मर्चंट नेव्ही मधील सर्टिफाईड कुक पर्यंतचे स्थित्यंतर सहजपणे होऊ शकेल.
अशा सर्व ठिकाणी भारतीय नौदलाच्या माध्यमातून जाण्याची इच्छा असलेल्या अग्निवीरांसाठी जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय INDOS आणि CDC जारी करेल.
अग्निवीरांसाठी काही उपाययोजना तयार करण्यात आल्या असून त्यात मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल शाखेतील आयटीआय व्यवसायिक प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. त्यांना ह्या पात्रतेसह प्रवेश घेता येईल किंवा भारतीय नौदलातील त्यांच्या कार्यकाळात त्यांना ही पात्रता/पदविका मिळवता येईल.

राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्था (NIOS) 10 उत्तीर्ण अग्निवीरांसाठी 12 वीच्या परीक्षेची सोय करणार.
राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्था (NIOS) या आपल्या स्वायत्त संस्थेद्वारे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग 10 वी उत्तीर्ण अग्निवीरांसाठी 12 वीचा विशेष अभ्यासक्रम तयार करणार आहे. लष्करी अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून हा विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे, जो समकालीन तर आहेच, त्यासोबतच त्यांच्या कामाशी सुसंगत देखील आहे. जेणेकरून 10 उत्तीर्ण अग्निवीरांना आपले शिक्षण सुरू ठेवून 12 वी चे प्रमाणपत्र मिळवता येईल. हे प्रमाणपत्र नोकरी आणि पुढील शिक्षणासाठी संपूर्ण देशात ग्राह्य धरले जाईल. यामुळे पुढील आयुष्यात अग्निवीरांना पुरेसे शिक्षण आणि कौशल्य मिळवून समाजात विधायक भूमिका निभावता येईल. NIOS च्या या विशेष कार्यक्रमामुळे अभ्यासक्रमांना प्रवेश, अभ्यासक्रम विकास, विद्यार्थ्यांना मदत, स्वअभ्यास पुस्तके, अधिस्वीकृत अभ्यास केंद्रे, वैयक्तिक संपर्क कार्यक्रम, मूल्यमापन आणि प्रमाणीकरण यात मदत मिळेल. NIOS ची मुक्त शिक्षण व्यवस्था अतिशय सोपी आहे तसेच अग्निपथ योजनेत सर्व अग्निवीरांच्या आवाक्यात असणारी आहे.

शिक्षण मंत्रालयाचा पदवी अभ्यासक्रम
अग्निवीरांसाठी भविष्यातील करिअरच्या संधी वाढवण्यासाठी आणि नागरी क्षेत्रातील विविध नोकऱ्यांसाठी त्यांना तयार करण्यासाठी, शिक्षण मंत्रालयाने संरक्षण दलातील कर्मचार्‍यांसाठी एक विशेष तीन वर्षांचा कौशल्य आधारित पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, जो संरक्षण आस्थापनांमधील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मिळवलेल्या कौशल्य प्रशिक्षणाला मान्यता देईल.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने हा अभ्यासक्रम तयार केला असून याची अंमलबजावणी देखील तेच करणार आहेत. पदवीसाठी आवश्यक असलेल्या श्रेयांक -क्रेडिट्सपैकी 50% क्रेडिट्स अग्निवीरांनी मिळवलेल्या तांत्रिक आणि बिगर -तांत्रिक कौशल्य प्रशिक्षणातून मिळतील आणि उर्वरित 50 टक्के भाषा, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, गणित, शिक्षण, वाणिज्य, पर्यटन, व्यावसायिक अभ्यासक्रम, कृषी आणि ज्योतिष यासारख्या विविध विषयांचा समावेश असलेले अभ्यासक्रम तसेच पर्यावरण अभ्यास आणि इंग्रजीमध्ये संवाद कौशल्य संबंधी क्षमता विकास अभ्यासक्रमांमधून घेतले जातील.
हा अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाचे मापदंड आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत अनिवार्य केल्यानुसार राष्ट्रीय क्रेडिट आराखडा/राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा (NSQF) यांच्याशी अनुरूप आहे. या अभ्यासक्रमातून बाहेर पडण्यासाठी विविध मार्गांची तरतूद देखील आहे – प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर पदवीपूर्व प्रमाणपत्र, प्रथम आणि द्वितीय वर्षाचे अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यावर पदवीपूर्व पदविका आणि तीन वर्षांच्या कालावधीत सर्व अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पदवी मिळेल.
कार्यक्रमाच्या आराखड्याला संबंधित नियामक संस्था – अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (AICTE) आणि राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण (NCVET) आणि विदयापीठ अनुदान आयोग यांनी मान्यता दिली आहे. युजीसी नामांकनानुसार (BA; B. Com.; BA (व्यावसायिक); BA (पर्यटन व्यवस्थापन), इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाद्वारे पदवी प्रदान केली जाईल आणि रोजगार आणि शिक्षणासाठी भारतात आणि परदेशात तिला मान्यता दिली जाईल.

उद्योजकता आणि रोजगारासाठी कौशल्य विकास
स्किल इंडिया आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) सशस्त्र दलांच्या विविध शाखांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना नागरी नोकऱ्यांसाठी अधिक योग्य बनवण्यासाठी अतिरिक्त कौशल्य प्रशिक्षण देतील. अग्निवीरांना सेवेत असताना स्किल इंडिया प्रमाणपत्र मिळेल, ज्यामुळे त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आपल्या अर्थव्यवस्थेत निर्माण होत असलेल्या उद्योजकता आणि नोकरीच्या विविध संधींबाबत पाठपुरावा करणे शक्य होईल. अग्निवीरांना सेवेत असताना नोकरी संबंधित आवश्यक कौशल्य प्रमाणपत्रे मिळतील यासाठी स्किल इंडियाच्या सर्व संस्था – प्रशिक्षण महासंचालनालय (DGT), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC), विविध क्षेत्रातील कौशल्य परिषद, उद्योजकता संस्था NIESBUD आणि IIE, तसेच कौशल्य नियामक संस्था NCVET, यांना या कार्यक्रमाशी जोडले जाईल. नोकरी करत असताना शिकलेली काही कौशल्ये NSQF अभ्यासक्रमाच्या समान समजली जातील. काहींसाठी, अतिरिक्त ऑनलाइन किंवा ऑफलाइन, थिअरी किंवा प्रत्यक्ष कौशल्यांसह त्यांच्या नोकरीच्या प्रत्यक्ष अनुभवाची सांगड घालणे आवश्यक असू शकते. हे तपशील, तसेच सशस्त्र दलांच्या प्रशिक्षकांसाठी कोणतेही प्रशिक्षण, आणि विशेषतः सुरक्षा दलातील प्रशिक्षण मूल्यांकन करणाऱ्यांसाठी, मूल्यांकन आणि प्रमाणीकरण – या सर्व बाबींवर काम केले जात आहे. अभ्यासक्रमातून बाहेर पडण्याच्या वेळी, संपूर्ण कौशल्य परिसंस्था या युवा अग्निवीरांसाठी खुली असेल, त्यांना त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध कौशल्य प्रशिक्षण आणि उद्योजकता अभ्यासक्रमांचा लाभ घेता येईल.

अग्निवीरांसाठी कर्जाच्या सुविधा
अग्निवीरांच्या सेवेचा काळ पूर्ण झाल्यावर त्यांना कोणत्या बँका आणि वित्तीय संस्था पाठबळ देऊ शकतात ते निश्चित करण्यासाठी वित्तीय सेवा विभागाच्या सचिवांची सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSBs), सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या(PSICs) आणि वित्तीय संस्थांच्या (FIs) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या आणि वित्तीय संस्था अग्निवीरासांठी त्यांची शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य यावर आधारित योग्य त्या पदांसाठी सुयोग्य लाभ/सवलती इ. च्या माध्यमातून रोजगार संधी निर्माण करतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
व्यवसाय करण्यासाठी आणि स्वयंरोजगाराकरिता कौशल्याचे अद्ययावतीकरण, शिक्षण यांसाठी अग्निवीरांना योग्य प्रकारच्या कर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बँका प्रयत्न करतील, असा देखील या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मुद्रा, स्टँड अप इंडिया इ. सारख्या सध्या सुरू असलेल्या सरकारी योजनांचा अग्निवीरांना अशा प्रकारे पाठबळ देण्यासाठी जास्त उपयोग करण्यात येईल.

राज्यांच्या पोलिस दलांमध्ये भरतीसाठी प्राधान्य
सशस्त्र दलांमध्ये 4 वर्षे सेवा केल्यानंतर अग्निवीरांना राज्यांच्या पोलिस दलातील पदे भरताना प्राधान्य देण्यात येईल, अशी घोषणा अनेक राज्य सरकारांनी केली आहे. सशस्त्र दलांमध्ये अग्निवीरांना मिळालेल्या प्रशिक्षणाचा आणि शिस्तपालनाचा राज्यांच्या पोलिस दलांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि बंडखोरी, नक्षलवाद आणि नैसर्गिक आपत्तींची हाताळणी करण्याच्या त्यांच्या क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

कॉर्पोरेट क्षेत्राकडून अग्निवीरांच्या प्रशिक्षणाचा आणि कौशल्याचा वापर
अनेक कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांनी सशस्त्र दलातील या नव्या आणि परिवर्तनकारी भरती प्रक्रियेचे स्वागत केले आहे. सशस्त्र दलातील आपली सेवा पूर्ण करणारा, अतिशय उत्तम प्रकारे प्रशिक्षित, शिस्तबद्ध आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेला युवा वर्ग हा त्या उद्योगांसाठी एक बहुमूल्य ठेवा असेल, असे त्यांनी सांगितले.

फक्त टीका करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा मुख्यमंत्र्यांचा केविलवाणा प्रयत्न – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

0

मुंबई, दि. १९ जून -भारताच्या विकासासाठी व प्रगतीसाठी काय करायचे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार सक्षम आहे. जगाच्या पातळीवर भारताचे नाव उंचावण्याचे काम पंतप्रधान करत आहेत. विविध माध्यमातून देशाला पुढे नेण्याचे काम ते करतायत. नवनवीन योजना ते आणतायत. अशीच अग्निपथ ही योजना आहे. या योजनेवर फक्त टीका करायची आणि लोकांचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न करायचे, असा केविलवाणा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भाषणातून दिसला, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणात त्यांनी केंद्र सरकारच्या नवीन अग्निपथ योजनेवर टिका केली, त्याला प्रत्युत्तर देताना दरेकर म्हणाले की, हातात काम नसेल, तर केवळ राम राम करण्यात अर्थ नाही, जनतेला अशी वचने द्यावीत जी पाळता येतील. मुख्यमंत्र्यांना अग्निपथ योजनेच्या मागचा उद्देशच कळलेला नाही किंवा त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे फक्त राजकीय अभिनिवेशातून टीकाटिपण्णी करणारे त्यांचे वक्तव्य आहे. अशी टिकाही दरकेर यांनी केली.
देशहिताचे, देशप्रेमाचे मुख्यमंत्र्यांनी पडलेले नाही राष्ट्रवादाशीही त्यांना पडलेले नाही. फक्त राष्ट्रवादीशी त्यांना पडलेले आहे. काँग्रेसशी पडलेय म्हणून ते अशी विधाने करीत आहेत. देशाची काळजी करण्यापेक्षा राज्याचे नेतृत्व आपल्याकडे आहे व ते कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहकार्याने कसे टिकवून ठेवता येईल त्याची काळजी मुख्यमंत्र्यांनी करावी असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्षे कशी गेली त्याचा विचार करा.
आतापर्यंत किती बेरोजगारांच्या हाताला काम दिले त्याचा लेखाजोखा मांडावा राज्यात किती उद्योगधंदे नव्याने आले आहेत. तेथील रोजगाराचे काय झाले.राज्यातील शेतक-यांना वचने द्यायची परंतु शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन दिलेल्या वचन पूर्तीचे काय झाले. शेतक-यांचा सातबारा कोरा झाला का.यावर मात्र मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत, असेही दरेकर यांनी सांगितले.

शतरंज का बादशाह कोण आहे हे राज्यसभेमध्ये आम्ही दाखवून दिले

जून-हिंदुत्वाचा बाप अशा वल्गना किंवा कोट्या करून तुम्ही हिंदुत्वापासून दूर गेलाय हे तुम्हाला पुसून काढता येत नाही. दुसऱ्याकडे बोटे दाखवत असताना चार बोटे आपण सत्ता उपभोगतोय त्याच्याकडे देखील असतात. शतरंज का बादशाह कोण आहे हे राज्यसभेमध्ये आम्ही दाखवून दिले, अशी रोखठोक प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली.
आज शिवसेनेचा वर्धापनदिन पार पडला. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केले की, राज्यसभेची एक जागा भाजपने जिंकली म्हणजे जग जिंकले असे नाही. त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी दरेकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, संस्थाने खालसा झाली तरी राजे रजवाडे असतात त्यांचा रुबाब जात नसतो. तशा प्रकारची वक्तव्ये जर केली नाहीत तर ते अस्तित्वात आहेत हे कसे कळणार.आजही सरकारी नोकर भरतीचा बॅकलॉग भरपूर प्रमाणावर आहे. त्याचबरोबर सरकारी अंगीकृत महामंडळांमध्ये नोकर भरती आवश्यक आहे. खाजगी आस्थापनांमध्ये नवीन उद्योग बंद आहेत ते सुरू करून नोकऱ्या प्रस्थापित करणे हे सगळे विषय असताना अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांनी या विषयावर एक बैठक लावली का. एखादा कृती आराखडा करत एवढ्या लोकांना नोकरी देणारी योजना आखली का. त्याचा जनतेसमोर पाढा वाचा. टीकाटिपण्णी करण्यापेक्षा अडीच वर्षात तुम्ही काय केले.एकाही माणसाला नोकरी देण्याचे काम आपण दुर्दैवाने करू शकलो नाही, असेही दरेकर यांनी सांगितले.

 शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन संपन्न , काय म्हणाले ,उद्धव बाळासाहेब ठाकरे …

0

उद्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीची चिंता नसून, हारजीत होत असते. उद्या शिवसेनाच जिंकणारच आहे. राज्यसभेत एकही मत फुटलं नाही. कोणी काय कलाकारी केली मला माहित आहे. फुटलं कोण त्यात अंदाज लावला आहे. त्याचा हळूहळू उलगडा होईल’ असं शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत..अग्निपथ योजनेवरुन उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. अग्निपथ योजना म्हणजे मृगजळ असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच नोकरीच्या नावाखाली पोरांची माथी फिरवत असल्याचा टोलाही लगावला . तसेच अग्निपथ म्हणजे ‘युज अँन्ड थ्रो’ योजना असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

मुंबई: शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन आज पार पडला. यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आवर्जुन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांचा उल्लेख केला. यावेळी विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेकडून तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली असल्याने दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. तरीही त्यांनी कुठलेही रुसवे फुगवे न करता माझा आदेश म्हणून प्रत्येक गोष्ट मान्य केली, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.”५६ वर्षातल्या अनेक गोष्टी आजही मनात ताज्या आहेत. जेव्हा मी शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदाची शपथ घेतली तेव्हा एक क्षण माझ्या डोळ्यासमोर तरळला. तो म्हणजे ५६ वर्षांपूर्वीचा शिवसेनेच्या स्थापनेचा तो क्षण, शिवाजी पार्कच्या घरात आजोबा, साहेब, माँ, काका, आम्ही तीन मुलं होतो. तेव्हा वेळकाळ दिवस न बघता शिवसेनेची स्थापना करण्यात आली. त्या क्षणावेळी साक्षीदार मी आणि आणखी माझ्या कुटुंबातील एक-दोन जण असतील. माझं वय ६ वर्षांचं होतं. शिवाजी महाराज की जय म्हणून शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ फुटला. त्या नारळाच्या पाण्याचे शिंतोडे माझ्या अंगावर उडाले, तेव्हा जोश होता, गंमत होती. तेव्हा स्वप्नातही वाटलं नव्हतं की ते शिंतोडे मला इतकं भिजवतील”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.”फार मोठी जबाबदारी, हे तेव्हा कळलेच नाही. शिवसेना प्रमुखांनंतर शिवसेनेचं काय हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला, त्याला आपण नुसतच नाही तर कणखरपणे उत्तर देत आलो आहोत. तुमच्या साथीने आपण अजून पुढे जाऊ. काही आहेत काही निघून गेलेत त्या सर्वांना अभिवादन. त्या पिढीचे देसाई रावते पहिल्या पिढीचे शिवसेना प्रमुखाचे साथी आहेत. तेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल हे स्वप्नातही येणं शक्य नव्हतं. शिवसेनेचा पहिला महापौर १९७१ मध्ये होणं हेच खूप मोठं वैभव होतं. आज तर मुख्यमंत्री आपले आहेत, मंत्रीपद आपल्याकडे आहे. अशावेळी हे दोन्ही शिवसेनाप्रमुखांचे दोन्ही साथी, ज्यांनी शिवसेनाप्रमुखांना पावलावरती साथ दिली. यावेळी जबाबदारी माझी आहे. मी त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाही दिली. तरीही कुठेही धुसफूस, रुसवे फुगवे न दाखवता दोघेही त्याच उमेदीने त्याच जिद्दीने जणूकाही आज हे शिवसेनेच्या प्रवेशासाठी आले आहेत, त्याच उत्साहाने ते मंचावर आहेत”, असं म्हणत त्यांनी दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांच्यासाठी कौतुकोद्गार काढले.”याला शिवसैनिक म्हणतात. स्वत:साठी स्वप्न बघणं हे सगळ्यांसाठी असतं पण दुसऱ्यासाठी स्वप्न बघणं आणि ते साकारण्यासाठी झटणं याला शिवसैनिक म्हणतात. या दोघांत आजही शिवसैनिक जिवंत आहे. त्यांना जी जबाबदारी दिली ती यशस्वी करुन दाखवली. मार्मिक छापायला तयार नसतांना दिवाकर रावतेंनी ते शक्य केले. मी सुभाष देसाईंचे नाव सुचवले आणि तेव्हापासून देसाई साहेब सामनाला जोडले गेले. वयाने मोठे आहेत, पण माझा आदेश समजून काम करताहेत. शिवसेनेसाठी दोघेही हवे आहेत”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
‘दरम्यान, शिवसेना आमदार आणि सर्व नेत्यांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी उद्याच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठिशी ठामपणे उभं राहाण्याचं आवाहन केलं. ‘उद्याची निवडणूक आमच्यात फूट पडू शकत नाही हे दाखवणारी आहे. महाराष्ट्र वेगळा विचार करू शकतो हे उद्या आपल्याला देशाला दाखवायचं आहे. महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालत नाही हे उद्या दाखवायचं आहे. प्रत्येकाला पर्याय असतो. सत्तेचा माज हवा असेल तर जा भाजपाकडे. पण हे किती दिवस चालणार? आज मी शेर आहे, पण उद्या कुणीतरी सव्वाशेर येणार आहे. आत्ताचं राजकारण हे पावशेर आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हिंदुत्वाचा बाप कोणी असेल तर ते बाळासाहेब ठाकरे

यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलताना विरोधकांना इशारा दिला आहे. हिंदुत्वाचा बाप कोणी असेल तर ते बाळासाहेब ठाकरे आहेत, असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.

 “५६ वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत एक ठिणगी टाकली. त्यातून देशभरात जो वणवा पेटला आहे त्याचा आज वर्धापण दिन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांना आज पितृदिन असल्याचे सांगितले. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे या देशाला बाप नाही. पण आज मी सांगू इच्छितो की हिंदुत्वाचा बाप कोणी असेल तर ते बाळासाहेब ठाकरे आहेत. जगभरात ज्याच्या मनात हिंदुत्व आहे तो बाळासाहेबांना बापच मानतो आणि बाप एकच असतो. आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन हिंदुत्वाचे बाप असल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व काय आहे, कसे आहे आणि कोणत्या दिशेने चालले आहे त्याचे कोणाकडून मार्गदर्शन घेण्याची गरज नाही,” असे संजय राऊत म्हणाले.

“आतापर्यंत फक्त ५६ वर्ष झाली आहेत पण अजून पुढे बरेच आहे हे विरोधकांनी समजून घेतलं पाहिजे. राजकारणात काही लोकांना फार घमंड आली आहे. राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यात एखादी जागा एकडे तिकडे होत असते. आता विधान परिषदेच्या जागांसाठी घालमेल सुरु आहे. पण एक जागा जिंकली म्हणून तुम्ही जग जिंकले असं होत नाही. या राज्याची सुत्रे ही शिवसेनेकडे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील. त्यामुळे फार घमंड करु नका,” असा इशारा संजय राऊतांनी दिला.

‘ज्ञानियाचा राजा’ अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

0

आळंदी, दि. १९ जुन : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनामार्फत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत संत ज्ञानेश्वर यांच्या ७२५ व्या संपन्न झालेल्या समाधी संजीवन वर्षाचे औचित्य साधून व संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांच्या ७२५ व्या निर्वाण वर्षानिमित्त आळंदी येथील श्री संत भगवानबाबा मंगल कार्यालय येथे शनिवार व रविवार दिनांक १८ व १९ जून रोजी ज्ञानियाचा राजा या अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाचे ज्ञानोबा तुकाराम पारितोषिक विजेते व वारकरी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ साधक प्रिय अध्यापक श्री मारुती बाबा कुर्हेकर यांच्या हस्ते थाटामाटात उद्घाटन झाले.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांच्या समाधी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारीत ज्ञानियांचा राजा या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १८ व १९ जून २०२२ या कालावधीत आळंदी येथील श्री संत भगवानबाबा मंगल कार्यालय येथे करण्यात आलेला होता.
शनिवार दिनांक १८ जून रोजी दुपारी ४ वाजता हरिपाठाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर संत निवृत्ती, संत सोपान व संत मुक्ताई यांच्या जीवनावर आधारीत व्याख्यान श्री निरंजन नाथजी यांनी सादर केले. ह.भ.प.श्री. अक्षय महाराज भोसले यांनी किर्तन सादर केले . याच दिवशी रात्रौ ८ वाजता भारुड, अभंगगीत, भक्तीगीत इ. भक्तीसंगीताचा कार्यक्रम सुप्रसिद्ध संगीतकार गायक कल्याणजी गायकवाड, प्रसिद्ध कलाकार कार्तिकी गायकवाड आणि कौस्तुभ गायकवाड यांनी भक्ती संगीताचा कार्यक्रम सादर केला.
रविवार दिनांक १९ जून रोजी दुपारी ४ वाजता हरिपाठ कार्यक्रम झाली. श्री स्वामीराज भिसे महाराज यांचे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान सादर केले. संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडावर आधारीत समर्थ पाटील व त्यांच्या समूहाने भजन विराणी सादर केली. तर ह.भ.प.श्री. प्रमोद महाराज जगताप हे कीर्तन सादर केले असून ज्ञानेश्वर माऊलींच्या काव्यावर आधारीत ओडिसी नृत्य श्रीमती शुभदा वराडकर आणि सहकारी सादर केले तसेच भूपाळी ते भैरवी कलामंच ही संस्था गण, गौळण, नमन, भूपाळी, ओवी, वासुदेव, दिंडी, कीर्तन, भारुड, पसायदान इ. दर्जेदार कार्यक्रम सादर केला.