Home Blog Page 1920

वारजे परिसरामध्ये जागतिक योगदिनाचे औचित्य साधून कायम योग वर्गाचे उदघाटन !

0

पुणे -योग विद्नान संस्थान दिल्ली, शाखा पुणे व वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वारजे येथील राजमाता जिजाऊ योग साधना केंद्र मध्ये जागतिक योग दिनाचे औचित्य साधून कायमस्वरूपी योग वर्गाचे शुभारंभ करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन माजी विरोधीपक्षनेता दिपाली प्रदीप धुमाळ व माजी नगरसेवक प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ व मित्र परिवार यांच्या माध्यमातून करण्यात आले. हे योगावर्ग विनामूल्य असून वर्गामध्ये योगसाधना चे वर्ग घेण्यात येणार आहे.

प्रशिक्षक हे शास्त्रोक्त पध्दतीने उच्च शिक्षित व अनुभवी असून अनेक योग शिक्षक घडविण्याचे उद्दीष्ट आहे.याप्रसंगी योग विद्नान संस्थान दिल्ली पुणे शाखेचे प्रमुख शिवप्रकाश मानधनी; दत्तात्रय रेड्डी, राजाभाऊ अभ्यंकर, दिलीप सोमवंशी, उदय हर्डीकर, श्रीधर डुरेपाटील, सौ.सुलेखा मानधनी व मीनाताई गावडे यांनी योगा संदर्भात मानवाच्या दैनदिन जीवनामध्ये किती महत्वाचे स्थान आहे याचे महत्व पटवून दिले. योगा मधील प्रत्येक आसने किती महत्वाचे आहे व या आसना मुळे काय काय फायदे होतात व कोणते रोग अथवा शरीराला अपायकारक असणाऱ्या ज्या गोष्टी कशा दुर करायचे यावर शास्त्रोक्त पध्दतीने योग साधकांना योगाद्वारे व प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून पटवून दिले . आजच्या या वर्गाच्या शुभारंभ प्रसंगी जवळपास दोनशे योग साधकांनी सहभाग घेऊन प्रत्यक्ष योग साधना केली. सदर योग वर्ग रोज सकाळी साडे सहा ते आठ यावेळेत कायमस्वरूपी सुरू राहिल या योग वर्गात जास्तीतजास्त योग साधकांनी व नागरिकांनी सहभागी होऊन आपले शरीर तंदुरुस्त व निरोगी , आनंदी राहण्यासाठी रोज योगा करावे असे दिपाली धुमाळ यांनी आवाहन केले. सदर योग वर्ग यशस्वी होण्यासाठी महादेव गायकवाड व सौ मानसी नलावडे व वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठान च्या सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.

आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त मैसूर पॅलेस मैदान येथे सामूहिक योग प्रात्यक्षिकांमध्ये पंतप्रधान होणार सहभागी

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 20 आणि 21 जून 2022 रोजी कर्नाटक येथे दौऱ्यावर जाणार आहेत. 20 जून 2022 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान बेंगलुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) येथे भेट देतील, त्याठिकाणी ते मेंदू संशोधन केंद्राचे (सेंटर फॉर ब्रेन रिसर्च-सीबीआर) उद्घाटन करतील आणि बागची पार्थसारथी मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाची पायाभरणी करतील.  दुपारी पावणे दोनच्या सुमारास ते  बेंगलुरू   येथील डॉ. बी आर आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (बीएएसई) येथे भेट देतील, याठिकाणी ते बीएएसई विद्यापीठाच्या नवीन प्रांगणाचे उद्घाटन करतील आणि डॉ. बी आर आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. कर्नाटकमध्ये,  औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) परिवर्तनातून विकसित 150 टेक्नॉलॉजी हब पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील. त्यानंतर  दुपारी पावणेतीनच्या सुमारास, पंतप्रधान  बेंगलुरू   येथील कोम्माघट्टा  येथे पोहोचतील, येथे ते 27000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.  त्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान  म्हैसूर येथील महाराजा कॉलेज मैदानावर सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. तेथे नागनहुल्ली येथीस कोचिंग टर्मिनलचा पायाभरणी करतील  आणि  संप्रेषण विकार असलेल्या व्यक्तींसाठी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग  एआयआयएसएच  मैसूर   येथे सेंटर ऑफ एक्सलन्सदेखील राष्ट्राला समर्पित करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सात वाजताच्या सुमाराला   मैसूर   येथील श्री सुत्तुर मठ येथे पंतप्रधान भेट देतील आणि पावणेआठच्या सुमारास, ते म्हैसूर येथील चामुण्डेश्वरी  मंदिराला भेट देतील.

दुसऱ्या दिवशी 21 जून 2022 रोजी सकाळी 06:30 च्या सुमाराला    मैसूर   पॅलेस मैदानावर पंतप्रधान सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

पंतप्रधानांचा  बेंगलुरू  दौरा

बेंगलुरू शहराचा संपर्क आणि दळणवळण वाढावे,यासाठीचे एक पाऊल म्हणून   बेंगलुरू   उपनगरीय रेल्वे प्रकल्पाचे (BSRP) भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.  यामुळे  बेंगलुरू   शहर, परिसरातील उपनगरे आणि नवीन वसाहतींशी जोडले जाईल. या प्रकल्पासाठी सुमारे 15,700 कोटी रुपयांहून अधिक खर्च येणार असून यामध्ये एकूण 148 किलोमीटरहून अधिक लांबीच्या 4 कॉरिडोरच्या निर्मितीची योजना आहे.  बेंगलुरू   कॅन्टोन्मेंट पुनर्विकास आणि यशवंतपूर जंक्शन रेल्वे स्थानक विकास कामाचे भूमिपूजन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कामांसाठी अनुक्रमे सुमारे 500 कोटी आणि 375 कोटी रुपये खर्च येणार आहे.

आधुनिक विमानतळाच्या धर्तीवर विकसित, सुमारे 315 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या, बैयप्पनहळ्ळी इथल्या  भारतातील पहिल्या वातानुकूलित सर एम. विश्वेश्वरय्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होईल. यासोबतच, कोकण रेल्वे मार्गावरील (अंदाजे 740 किमी) रोहा ( महाराष्ट्र ) ते ठाकूर ( कर्नाटक ) या स्थानकादरम्यान 100% विद्युतीकरण झालेल्या मार्गावर उडुपी, मडगाव आणि रत्नागिरी येथून चालणाऱ्या विद्युत रेल्वे गाड्यांना झेंडा दाखवून पंतप्रधान या प्रकल्पाचे लोकार्पण करतील. कोकण रेल्वे मार्गावरील या विद्युतीकरणासाठी 1,280 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च आला आहे. याखेरीज, दुहेरीकरण करण्यात आलेले  दोन रेल्वे मार्ग प्रकल्प : अर्सिकेरे ते तुमकुर ( सुमारे 96 किमी) आणि येलाहंका ते पेनूकोंडा (सुमारे 120 की. मी) यांचे लोकार्पण  पॅसेंजर  आणि मेमु रेल्वेला झेंडा दाखवून पंतप्रधान  करतील. या दोन्ही मार्गांच्या दुहेरीकरणासाठी अनुक्रमे 750 कोटी आणि 1,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च करण्यात आला आहे.

या दौऱ्यात, पंतप्रधान बेंगलुरू   रिंग रोड प्रकल्पाच्या दोन भागाच्या बांधकामाची पायाभरणी करतील. सुमारे 2280 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे  बेंगलुरू   शहरातील वाहतूककोंडी कमी होईल. पंतप्रधान इतर काही  रस्ते  प्रकल्पांची देखील पायाभरणी करतील. यामध्ये, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील नेलमंगला – तुमकुर दरम्यानच्या रस्त्याचे सहा पदरीकरण; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 73 वरील पंजलकट्टे ते चारमंडी दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 69 च्या काही भागाचा विकास आणि पुनर्वसन यांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 3,150 कोटी रुपये आहे.  बेंगलुरू   शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुद्दलिंगनहळ्ळी इथे सुमारे 1,800 कोटी रुपये गुंतवून बांधण्यात येणाऱ्या मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्कची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते केली जाणार आहे. यामुळे वाहतूक, हाताळणी तसेच दुय्यम मालवाहतूक खर्च कमी होईल. पंतप्रधानांच्या हस्ते  बेंगलुरू  शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या   ( BASE) नव्या परिसराचे उद्घाटन केले जाणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वतंत्र भारताच्या विकासातील अनुकरणीय योगदानाची ओळख म्हणून तसेच त्यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली रूपात 2017 मध्ये हे निवासी विद्यापीठ स्थापन करण्यात  आले आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथल्या कार्यक्रमादरम्यान, संपूर्ण कर्नाटक राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचा (ITIs) कायापालट करून नव्याने उभारण्यात आलेल्या 150 टेक्नॉलॉजी हबचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केले जाईल. या अभिनव उपक्रमासाठी सुमारे 4 600 कोटी रुपये खर्च आला असून या खर्चात अनेक औद्योगिक संस्थांनी योगदान दिले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक असलेले कौशल्य युक्त मनुष्यबळ 4.0 तयार करणे हा आहे. हे टेक्नॉलॉजी हब विविध नवोन्मेषी अभ्यासक्रद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचे सर्वोत्तम कौशल्य प्रशिक्षण देऊन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या स्नातकांना रोजगाराच्या आणि नव व्यवसायाच्या नव्या संधी प्राप्त करून देतील.

बेंगलुरूमध्ये  भारतीय विज्ञान संस्थेत, पंतप्रधान एका मेंदू संशोधन केंद्राचे (CBR) उद्घाटन करतील. या संशोधन केंद्राची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते झाली होती. वयानुरूप होणाऱ्या मेंदूच्या आजारांवरील उपचारांच्या प्रमाण आधारित संशोधनासाठी हे केंद्र उभारण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते 832 खाटांच्या बागची पार्थ-सारथी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची पायाभरणी केली जाईल. हे रुग्णालय   बेंगलुरू  मधील भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात उभारण्यात आले असून यामुळे विज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखांना एकत्रीकृत संशोधन करणे शक्य होणार आहे. यामुळे देशात चिकित्सा विषयक संशोधनाला चालना मिळणार आहे तसेच यातून संशोधित होणाऱ्या नव नव्या उपचार पद्धतीमुळे देशात आरोग्य सेवेमध्ये सुधारणा घडणार आहे.

पंतप्रधानांचा मैसूर दौरा

मैसूरमधल्या महाराजा महाविद्यालय मैदानावर होणाऱ्या एका सार्वजनिक कार्यक्रमात, पंतप्रधान 180 कोटी रुपये खर्चून नागनहुळ्ळी रेल्वेस्थानक येथे उभारण्यात करण्यात येणाऱ्या उपनगरीय वाहतूकीसाठी कोचिंग टर्मिनलची पायाभरणी करतील. कोचिंग टर्मिनल मध्ये मेमु शेडची सुविधा असणार आहे त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या मैसूर यार्डातील वाहतूक कोंडी कमी होऊन मैसूर स्थानकातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या तसेच मेमू रेल्वे गाड्यांची संख्या वाढेल, याची परिणती म्हणून मैसूरचा संपर्क वाढून पर्यटनला चालना मिळेल. याचा फायदा रोज प्रवास करणारे प्रवासी तसेच लांब अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील होईल.

या दौऱ्यात, मैसूर येथील अखिल भारतीय वाचा आणि श्रवण संस्थेत उभारण्यात आलेल्या सेंटर फॉर एक्सलन्स फॉर परसन्स विथ कम्युनिकेशन डीसॉर्डर चे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होईल. या केंद्रात संप्रेषण कमतरता असलेल्या लोकांच्या निदान, परिक्षण आणि पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

पंतप्रधानांचा 21 जूनचा कार्यक्रम

आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला  21 जून 2022 या दिवशी मैसूरमधल्या मैसूर पॅलेस मैदानावर होणाऱ्या  योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात हजारो सहभागींसह पंतप्रधानही सहभागी होतील. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात 8 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात 75 वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी 75 केंद्रीय मंत्र्यांच्या नेतृत्वात योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे, पंतप्रधानांच्या नेतृत्वातील मैसूर येथील योग प्रात्यक्षिक आयोजन त्यापैकीच एक आहे. देशभरात अनेक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक, धार्मिक, कार्पोरेट तसंच इतर नागरी संस्थांनी योग प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम आयोजित केले असून त्यामध्ये करोडोंच्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत.

पंतप्रधानांचा मैसूर येथील योग प्रात्यक्षिक कार्यक्रम हा देखील गॉर्जियन योग रिंग या अभिनव कार्यक्रमाचा भाग आहे. हा कार्यक्रम देशांच्या सीमा ओलांडत योगाचा प्रभाव सर्व जगात पसरवण्याच्या उद्देशाने 79 राष्ट्रांमध्ये तसेच संयुक्त राष्ट्रांमध्ये  साजरा केला जाणार आहे. ज्याप्रमाणे सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे संक्रमण करत जाताना दिसतो, त्याच प्रमाणे, योगदिनी जगभरात सहभागी देशांमध्ये एकापाठोपाठ एक अशी महा योग प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. यामध्ये ‘एक सूर्य  – एक पृथ्वी’ ही संकल्पना दिसून येईल. या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण 21 जून या दिवशी डीडी इंडिया या वाहिनीवरून भारतीय वेळेनुसार सकाळी 3 वाजल्यापासून ( फिजी येथून प्रक्षेपण ) भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजेपर्यंत ( अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को येथून प्रक्षेपण ) केले जाणार आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून पंतप्रधानांच्या मैसूर येथील योग प्रात्यक्षिकाचे थेट प्रक्षेपण इंडिया या वाहिनीवरून भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6:30 वाजता करण्यात येईल.

जगभरात 2015 पासून 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. यावर्षीच्या योग दिनाची मुख्य संकल्पना मानवतेसाठी योग अशी आहे. या वर्षीची संकल्पना कोविड महामारीच्या काळातील मनुष्याच्या वेदना कमी करण्यात योग क्रिया कशी लाभदायक ठरली याची दर्शक आहे.

‘अग्निपथ’च्या विरोधातील हिंसाचार राजकीय हेतुने, त्यामुळे तरुणांचे करिअरचे कायमचे नुकसान-भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील

0

मुंबई-लष्करात जाऊन देशाची सेवा करू इच्छिणारा तरूण कधीही देशाच्या संपत्तीचे नुकसान करू शकत नाही. अग्निपथ योजनेच्या विरोधात चाललेला हिंसाचार हा राजकीय हेतूने असून त्यातून गुन्हे दाखल झाल्यामुळे संबंधित तरुणांना कोणतीही नोकरी मिळणे अशक्य होईल व त्यांचे करिअरचे कायमस्वरुपी नुकसान होईल, अशी जाणीव भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी करून दिली.

आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, अग्निपथ योजनेतून केंद्र सरकारने तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात काम करण्याची संधी दिली आहे. या योजनेमुळे तरुणांना लष्करी प्रशिक्षण मिळेल, चांगले वेतन आणि नोकरी सोडताना साडेअकरा लाख रुपये मिळतील तसेच सैन्यातून परतल्यानंतर समाजात व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. या योजनेमुळे समाजात लष्करी प्रशिक्षण मिळालेल्या शिस्तबद्ध तरुणांचे प्रमाण वाढेल. या योजनेमुळे तरुणांचे कोणतेही नुकसान होणार नाही. अग्निपथ योजनेसोबत नियमित लष्करी भरतीसुद्धा चालूच राहणार आहे.

राजकीय हेतुने अग्निपथच्या विरोधात हिंसाचाराला चिथावणी देण्यात येत आहे. या हिंसाचारात भाग घेणाऱ्या तरुणांच्या विरोधात गुन्हे दाखल होतील. नंतर त्यांना लष्करात, सरकारमध्ये किंवा खासगी क्षेत्रातही नोकरी मिळणार नाही. त्यांचे आयुष्यभराचे नुकसान होईल. हिंसाचार केल्यामुळे आपले करिअरचे काय नुकसान होईल याचा तरुणांनी विचार करावा. एकूणच तरुणांनी या योजनेबाबत पूर्ण माहिती घेऊन शांतपणे विचार करावा, असे त्यांनी सांगितले.

अग्निपथ योजनेबाबत पूर्ण माहिती घेतली तर गैरसमज दूर होईल, असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले की, ज्या तरुणांना लष्करात भरती होऊन देशाची सेवा करायची आहे ते कधीही राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करून समाजात संकट निर्माण करणार नाहीत. सध्या या योजनेच्या विरोधात काही ठिकाणी होत असलेला हिंसाचार हा राजकीय हेतूने घडविण्यात येत आहे. समाजात अराजक निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.

फुरसुंगीच्या सचिन संजय नवले आणि टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

0

पुणे-वानवडी परिसरात संघटित गुन्हेगारीकरुन दहशत पसरविणार्‍या सचिन नवले याच्यासह त्याच्या टोळीतील एकूण 9 जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

सचिन संजय नवले (वय 27, रा. संकेत विहार, सिद्धी विनायक कॉलनी, फुरसुंगी), कुमार ऊर्फ गोट्या बलभीम लोहार (वय 26, रा. शिवतेजनगर, काळेपडळ, हडपसर), रोहन ऊर्फ भैय्या अनिल देडगे (वय 25, रा. रामटेकडी, हडपसर), आकाश दत्तात्रय कोठावळे (वय 25५, रा. काळेपडळ, हडपसर), राहुल हरी घडाई ऊर्फ कोळी (वय 23, राा. फुरसुंगी), आकाश उमेश कसबे (वय 19, रा. संकेत विहार कॉलनी, फुरसुंगी), ओमकार ईश्वर सुपेकर (वय 21, रा. गाडीतळ वेताळ बाबा वसाहत, हडपसर), मयुर राजू सकपाळ (वय 24, रा. काळे पडळ, हडपसर), शाम दत्तात्रय सरक (वय 20, रा. काळेपडळ, हडपसर) अशी मोक्का कारवाई झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार घेतल्यानंतरची मोक्का अंतर्गत केलेली 84 वी कारवाई असून या वर्षातील 21 वी कारवाई आहे.

सनी ऊर्फ गिरीश हिवाळे व सचिन नवले या सराईत गुन्हेगारांमध्ये वाद होता. हिवाळे याच्यावर फेब्रुवारी 2021 मध्ये मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. 9 एप्रिल 2022 रोजी सनी हिवाळे हा जामीनावर सुटून बाहेर आला होता. सनी व त्याचे मित्र सोहेल हे काळे पडळ येथील चौकात थांबले असताना सचिन नवले व त्याच्या साथीदारांनी सनी हिवाळे याच्यावर कोयता, पालघन, लाकडी दांडक्याने मारहाण करुन सनीचा खून केला होता. सोहेलही जखमी झाला होता.

वानवडी पोलिसांनी सचिन नवले व त्याच्या 15 ते 20 साथीदारांवर खूनाचा गुन्हा दाखल करुन त्यातील अनेकांना अटक केली आहे.सचिन नवले हा स्वत:च्या टोळीचे परिसरात वर्चस्व निर्माण व्हावे म्हणून वारंवार शरीराविरुद्धचे गुन्हे करीत असतो.
त्याने वानवडी, हडपसर व परिसरात कोयता, बांबु अशा घातक हत्यारांसह गंभीर दुखापत करणे, दंगा करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे,
कट रचून खून करणे व गुन्ह्याचा पुरावा नष्ट करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यामुळे वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्फत मोक्का कारवाईचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठविला होता.या प्रस्तावाची छाननी करुन नामदेव चव्हाण यांनी त्याला मंजूरी दिली.
सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे अधिक तपास करत आहेत

‘अग्निपथ योजना रद्द होणार नाही’; तीनही सैन्यदल प्रमुखांनी केले स्पष्ट

0

केंद्र सरकारने जाहीर केलेली ‘अग्निपथ’ योजना (Agnipath scheme) रद्द होणार नसून लवकरच या योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती लष्कराच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच भरती अगोदर युवकांना हिंसा आणि तोडफोडीत सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक असल्याचेही लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले. तीनही सेना दलाच्या वतीने आज संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बोलताना लेफ्टनंट जनरल अनिल पुरींनी ही माहिती दिली.

अग्निवीरांच्या वयोमर्यादेत वाढ
योजनेला वाढता विरोध पाहता केंद्र सरकारने या योजनेमध्ये अनेक तरतुदी जाहीर केल्या आहेत. या योजनेसाठी वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवण्यात आली आहे. तसेच अग्निवीरांसाठी संरक्षण मंत्रालय आणि कोस्ट कार्डमध्ये १० टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी संरक्षण मंत्रालयातील नोकऱ्यांच्या १० टक्के जागा राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजूरी दिली आहे. हे आरक्षण माजी सैनिकांसाठीच्या सध्याच्या आरक्षणाव्यतिरिक्त असणार असल्याचे लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लष्कराला जोश आणि होश असणाऱ्या युवकांची गरज
अग्निपथ योजनेअंतर्गत येत्या २४ जूनपासून वायू दलात भरती प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. तसेच भारतीय लष्कराकडूनही लवकरच भरती प्रक्रियेबाबत अधिसूचना जारी केली जाईल असे सांगण्यात आले आहे. २०५० पर्यंत ५० टक्के लोकसंख्या ही ५० वर्षाच्या आतील असेल त्यामुळे लष्कराला जोश आणि होश असणाऱ्या युवकांची गरज असल्याचे पुरी म्हणाले.

कलम ३७० रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न साकार केले- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

0

मुंबई :
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशाच्या अखंडतेसाठी प्राणांचे बलिदान दिले. त्यांनी ‘एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नही चलेंगे’ असे निक्षून सांगितले होते. मुखर्जी यांचे काश्मीरबाबतचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी सन २०१९ साली कलम ३७० रद्द करून साकार करून दाखवले असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनसंघाचे अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते शनिवारी बोलत होते. हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. मुखर्जी यांच्या जीवनावर आधारित हे प्रदर्शन २३ जून ते ६ जुलै या कालावधीत देशभरात भरवण्यात येणार आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी प्रखर राष्ट्रभक्त होते. ते विद्वत्तापूर्ण, बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.
संसद आणि बंगालमध्ये त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांच्याकडून तुष्टीकरणाचा प्रयत्न झाला त्यावेळी त्याला डॉ. मुखर्जी यांनी सातत्याने विरोध केला. प्रकांड बुद्धिमत्तेच्या श्यामाप्रसादजींनी राष्ट्रीय राजकारणावर अल्पकाळातच छाप उमटविली होती. नेहरू लियाकत करारातून तुष्टीकरणाचा प्रयत्न होत असून यातून द्वेषाची बीजे रोवली जातील असे त्यांनी ठणकावून नेहरू यांना सांगितले होते. याकरिता त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. ३७० वे कलम हे देशाला विघटनाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणारे आहे याची जाणीव त्यांनी सरकारला वेळोवेळी करून दिली होती.

श्री. फडणवीस पुढे म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करण्यास राज्याबाहेरील नागरिकांना प्रवेश पत्र घेणे अनिवार्य करण्यात आले होते. कलम ३७० च्या विरोधात भारतीय जनसंघाने सत्याग्रह सुरू केला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्यासमवेत जम्मू येथे निघाले असताना डॉ. मुखर्जी यांना अटक करण्यात आली. त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. तिथेच त्यांचा संशयास्पद मृत्यु झाला. डॉ. मुखर्जी यांच्या बलिदानामुळेच काश्मीर भारतात राहू शकला. त्यानंतर ३७० व्या कलमाविरोधात देशभरात सातत्याने आंदोलने होत राहिली. डॉ. मुरलीमनोहर जोशी यांनी १९९१-९२ मध्ये या कलमाविरोधात देशव्यापी एकता यात्रा काढली होती. या यात्रेची सांगता नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावून झाली. डॉ. मुखर्जी यांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. भाजपा ‘जे बोलतो ते करतो’ असेही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी निक्षून सांगितले.

प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी झालेले भाजपचे राष्ट्रीय सह-संघटन मंत्री श्री. शिवप्रकाश म्हणाले की, डॉ. मुखर्जी हे देशाच्या एकता आणि अखंडतेचे पहिले बलिदान होते. प्रदर्शनाचे आयोजन करणाऱ्या मुंबई भारतीय जनता पार्टीचे त्यांनी आभार मानले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे अभ्यासू व्यक्तिमत्व होते. ते आधी काँग्रेस आणि नंतर हिंदू महासभेत सामील झाले पण त्यांनी नेहमीच देशाला पुढे नेण्यासाठी आणि हिंदुत्वासाठी काम केले.

मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार श्री. मंगलप्रभात लोढा यांनी प्रास्ताविक केले. निवडणूक संचालन समिती अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आभार मानले. मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी सूत्रसंचालन केले.

‘मी समतेचा वारकरी, सेवा हीच माझी पंढरी’ उपक्रमांतर्गत देणार १८ पद्धतीच्या सेवा

0

पुणे-

कष्टकरी जनता आघाडी आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने ‘मी समतेचा वारकरी, सेवा हीच माझी पंढरी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. संघटनेचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या मध्ये वारकऱ्यांना सुमारे १८ वेगवेगळ्या पद्धतीच्या सेवा देण्याचा निर्धार संघटनेचा आहे. या मध्ये आरोग्य, मोफत रिक्षा, चप्पल, बूट दुरुस्ती आदींसह विविध सेवांचा समावेश आहे. निगडी ते पंढरपूर या मार्गापर्यंत संघटनेचे पदाधिकारी ही सेवा देणार आहेत. २१ जुनपासून ही सेवा निगडी पासून सुरु करणार असल्याची माहिती, बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, आषाढी वारीमध्ये राज्यभरासह देशभरातून अनेक वारकरी पंढरीकडे विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात. त्यावेळी त्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था काम करतात. अनेक कष्टकऱ्यांना थेट पंढरपूरपर्यंत जाऊन विठुरायाचे दर्शन घेता येत नाही. त्यामुळे आपले काम आणि वारकऱ्यांची सेवा करण्यातच विठ्ठलाचे दर्शन होते, अशी भावना कष्टकऱ्यांची असते. त्यामुळे येणाऱ्या आषाढी वारीमध्ये ‘मी समतेचा वारकरी, सेवा हीच माझी पंढरी’ हा उपक्रम बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कष्टकरी जनता आघाडी आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये वारकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या १८ सुविधा देण्याचा संघटनेचा मानस आहे.

२१ जुन सायंकाळी ४ वाजता या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. निगडी लोकमान्य टिळक चौक रिक्षा स्टँड समोरून मोफत रिक्षा सेवा देण्यात येणार आहे. या मध्ये अपंग, वयोवृद्ध,आजारी, दिंडीत वारकरी भक्तांसाठी ही मोफत रिक्षा सेवा देण्यात येणार आहे. छत्री, बॅग दुरुस्ती करून देण्यात येणार आहे. बूट, चप्पलची सेवा देण्यात येणार आहे. या बरोबरच अन्नधान्य, फळवाटप, दिंडी चालक मालकांसाठी फळे व भाजी पुरवठा करण्यात येणार आहे. 22 जून रोजी सकाळी ६ वाजता महात्मा फुले ग्रंथालय, भक्ती कॉम्प्लेक्स, खराळवाडी येथे मोबाईल चार्जिंग स्टेशन, तज्ञ डॉक्टरांच्या टीम सोबत प्राथमिक आरोग्य उपचार केंद्राची केशकर्तनालयाची, मालिशची सेवा सुविधा देण्यात येणार आहे. खडकीत भावगीत, कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. 23 रोजी देवाजी बाबा मंदिर पुणे येथे, 24 जून रोजी हडपसर गाडीतळ पासून पंढपूरपर्यंत सेवा देणार असल्याचे बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

विशेष मुलांची सेवा ही समाजसेवेची तपस्या-आमदार सिद्धार्थ शिरोळे

0

भारतीय जनता पक्ष आणि सुनील पांडे यांच्या वतीने सुह्रद मंडळ संचलित बधिर मूक शिक्षण केंद्रातील मुलांना वह्यांची भेट
पुणे : दिव्यांग मुलांच्या विकासाला मर्यादा आहेत. अशा मुलांच्या घरातील वातावरण देखील वेगळे असते. त्यामुळे घरातील वातावरण व शाळेतील शिक्षण याचा समतोल राखत विशेष मुलांची सेवा शिक्षक करतात. या कार्याची किंमत होवू शकत नाही. विशेष मुलांची सेवा ही ख-या अर्थाने समाजसेवेची तपस्या आहे, असे प्रतिपादन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले.

भारतीय जनता पक्ष आणि सुनील पांडे यांच्या वतीने भांडारकर रस्त्यावरील सुह्रद मंडळ संचलित बधिर मूक शिक्षण केंद्रातील मुलांना वह्यांची भेट देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध कायदेतज्ञ अ‍ॅड.अभय आपटे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस दत्तात्रय खाडे, आयोजक सुनील पांडे-लोहगांवकर, रविंद्र साळेगावकर, गणेश पगारे, प्रतुल जागडे, ओंकार केदारी, अपूर्व खाडे, निलेश घोडके, मिलिंद टकले, प्रकाश सोळंकी, सौरभ पुंडलिक यांसह संस्थेच्या मानद सचिव डॉ.वासंती देशपांडे, अनुया नाईक, अर्पणा चक्रदेव आदी उपस्थित होते. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, दिव्यांग मुलांसाठी कार्य करणा-यांची संख्या व कार्याची व्याप्ती वाढवायला हवी. दिव्यांग मुलांना त्यांची स्वप्ने व्यक्त करण्याची संधी मिळायला हवी. ते स्वप्न कोणतेही असो, आपण त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहायला हवे. तर त्यांच्या पंखांना ख-या अर्थाने बळ मिळेल.

अ‍ॅड.अभय आपटे म्हणाले, कोणतेही संकट असले, तरी देखील प्रतिकूल परिस्थितीत कशा प्रकारे पुढे जाता येते, हे दिव्यांग व विशेष मुलांचे हास्य आपल्याला शिकविते. ही मुले विशेष नाहीत, तर वेगळ्या प्रकारे सक्षम आहेत. एकाग्रती, चिकाटी ही सामान्यांकडे जेवढया प्रमाणात नाही, त्यापेक्षा जास्त या मुलांकडे असते. त्यामुळे त्यांना समाजाच्या मुख्य आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही त्यांनी सांगितले. प्राचार्य विकास पाटोळे यांनी प्रास्ताविक केले. जयश्री नाईक यांनी सूत्रसंचालन केले. शिवकुमार श्रीरामवार यांनी आभार मानले.

स्वच्छता सुविधा, पंचायतींना अनुदानासाठी सुमारे ९ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

0

मुंबई दि. 19 : पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी दोन कोटी एकोणसाठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या तसेच वारकरी भाविकांना तात्पुरत्या स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी सहा कोटी त्र्याहत्तर लाख वीस हजार रुपयांच्या निधीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली. पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे, असेही श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आषाढी एकादशी निमित्त पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असे श्री मुश्रीफ यांनी सांगितले.

आषाढी एकादशीच्या निमित्त पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतून विविध संतांच्या पालख्या सोबत मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येते. यानुसार पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी दोन कोटी एकोणसाठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, असे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

पुणे, सातारा व सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागणी केलेल्या निधीच्या पन्नास टक्के निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित निधी जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा अन्य निधीतून उपलब्ध करावयाचा आहे. हा निधी जिल्हा परिषदांनी ग्रामपंचायतींना मागणीनुसार उपलब्ध करून द्यायचा आहे, असे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

पुणे जिल्हा परिषदेला ब्याऐंशी लाख रुपये, सातारा जिल्हा परिषदेला वीस लाख पंचवीस हजार रुपये तर सोलापूर जिल्हा परिषदेला एक कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे.

सहा कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेला मंजूर

पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्या सोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता पुरविण्यासाठी भाडेतत्त्वावर तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यासाठी सहा कोटी त्र्याहत्तर लाख वीस हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली असल्याचेही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. एकूण मंजुरीच्या वीस टक्के प्रमाणात म्हणजेच एक कोटी चौतीस लाख चौसष्ठ हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बीडीएस प्रणालीद्वारे वितरित करण्यात आला असल्याची माहितीही श्री. मुश्रीफ यांनी दिली.

महाराष्ट्राला ऊर्जाक्षेत्रासाठी ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच पुरस्कार’ प्रदान

0

नवी दिल्ली, दि. 19 : ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्राला ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच अवार्ड इन पावर अँड एनर्जी’ प्रदान करण्यात आला. राज्याच्या ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

स्कॉच ग्रुपच्यावतीने शनिवारी येथील इंडिया हॅबिटॅट सेंटरच्या सिल्वर ओक सभागृहात आयोजित कार्यक्रमात  शासन, अर्थ, बॅंकिंग, तंत्रज्ञान  क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे महाराष्ट्र शासनाचा ऊर्जा विभाग ‘इंडिया गव्हर्नन्स फोरम’ च्या ‘स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट’ 2021 मध्ये देशात प्रथम स्थानावर राहिला. या उपलब्धीसाठी राज्याच्या ऊर्जा विभागालाही यावेळी पुरस्काराने गौरविण्यात आले. स्कॉच ग्रुपचे अध्यक्ष समीर कोचर यांच्या हस्ते प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या महापारेषण कंपनीचे सल्लागार श्याम प्रसाद, सुत्रधारी कंपनीचे निवासी कार्यकारी संचालक प्रफुल्ल पाठक यावेळी उपस्थित होते.

                                            ऊर्जा विभागाच्या उपलब्धीविषयी      

राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या महापारेषण कंपनीने ड्रोनचा वापर करून दुर्गम भागातील अति उच्च दाब वाहिन्यांचे  सर्वेक्षण व देखरेख केली. मुंबई उपनगर व शहरी भागातील महत्त्वाच्या पारेषण वाहिन्यांच्या जुन्या तारा बदलून नवीन एचटीएलएस कंडक्टरचा उपयोग करून वाहिन्यांच्या क्षमतेत वाढ केली. मोनोपोल मनोऱ्यांचा वापर सुरू केला परिणामी, वहिवाट मार्गाची समस्या कमी करण्यात व रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध झाला.

‘एचव्हीडीसी योजने’अंतर्गत एकूण 1 लाख 29 हजार 546 कृषीपंप ऊर्जान्वित झाले. ‘मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजने’अंतर्गत एकूण 99 हजार 744 कृषीपंप बसविण्यात आले. 24 एप्रिल 2021 पासून सुरू झालेल्या ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने’अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्त घटकांसाठी सुमारे 12 हजार 102 घरगुती वीजजोडणी देण्यात आली.

कोरोना काळात राज्यातील जनतेला अखंडित व विक्रमी वीजपुरवठा झाला. सुयोग्य नियोजन केल्यामुळे तौक्ते, निसर्ग चक्रीवादळ, पूरपरिस्थितीतही विद्युतपुरवठा सुरळीत ठेवला. या सर्व बाबींच्याआधारे महाराष्ट्राने ‘स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट’ 2021 मध्ये देशात प्रथम स्थान मिळविले आहे.

महिला कार्यकर्त्यांच्या सहभागाशिवाय सामाजिक विकास अपुरा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

कानपूर दि. 19 : महिला सुरक्षेबाबत संवेदनशिलतेने पाऊले उचलण्यासाठी मार्गदर्शक यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. या विषयात स्त्री आधार केंद्र संस्थेच्या माध्यमातून 1996 ते 2010 या काळात पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी स्त्री-पुरुष समानता आधारित प्रशिक्षण घेण्यात आली. सध्याही आम्ही पोलिस व महिला कार्यकर्त्यांच्या सहकार्याने काम करीत आहोत, अशा सक्रीय सहभागाशिवाय सामाजिक विकास प्रक्रिया अपूर्ण असते, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

कानपूर स्थित समाजसेविका श्रीमती नीलम चतुर्वेदी यांच्या सखी केंद्राच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. गोऱ्हे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी महाराष्ट्रातील स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व अधिकाऱ्यांच्या मदतीने एकूण 80 कार्यशाळा पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये विहित कार्यप्रणाली ठरविणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता. बलात्कार, अत्याचाराच्या घटनांमध्ये पीडित महिलेचा जबाब कसा घ्यायचा. अशा आपत्तीमध्ये सापडलेल्या जर कोणी मूकबधिर, कर्णबधिर, विशेष अपंग महिला असेल तर त्यांची उत्तरे कोणत्या माध्यमातून मिळवायची, पोलिसांशी कसे बोलावे, याचे प्रशिक्षण देण्यात आले. या विहित कार्यप्रणाली तयार करण्याचे काम सुमारे दहा वर्ष चालले आणि आजही सुरु आहे. पोलिसांशी संवाद आणि सहकार्याने हे काम केले जात आहे. विधान परिषदेची रचना, कायद्याची माहिती आणि सहाय्यक कार्य, कायदेशीर सहाय्य, पर्यावरणीय बदल, महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सेवा आणि महिला संस्थांचे व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर डॉ. गोऱ्हे यांनी मार्गदर्शन केले. आंतरराज्य स्तरावर, महिला संस्थांचा संवाद आवश्यक आहे आणि ज्यांना महिला संस्थेच्या कार्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी संपर्क करण्याचे आवाहन केले.

सखी केंद्राच्या संचालिका नीलम चतुर्वेदी यांनी समाजातील विविध व्यक्ती जसे की, दिव्यांग जेष्ठ नागरिकांनी हिंसाचार पीडित महिलांसाठी सखी केंद्र कसे काम करत आहे याची माहिती दिली. सखी केंद्राने संकेतस्थळ व मोबाईल ॲप तयार केले आहे. सर्वांनी या ॲपच्या माध्यमातून संस्थेच्या कामात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. महिला कार्यकर्त्यांनी कोविडच्या कामकाजाच्या काळात संस्थांना केलेल्या मदतीबाबत त्यांचे अनुभव कथन केले.

श्रीमती जेहलम जोशी यांनी पर्यावरण बदलाविषयी आपले विचार मांडले. विकासाच्या सीमेपासून कोणालाही दूर ठेवू नये यासाठी काम करत असल्याचे सांगितले. तसेच स्त्री आधार केंद्र शाश्‍वत विकासाच्या उद्दिष्ट बद्दल कशा पद्धतीने काम करीत आहे याबाबत भूमिका सांगितली महिला कार्यकर्त्यांना तयार करण्याचे कामही स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून केले जाते.

स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या भगिनी श्रीमती जेहलम जोशी सामाजिक कार्यकर्ता श्रीमती नीलम चतुर्वेदी, विधानपरिषदेचे उपसभापती यांचे विशेष कार्य अधिकारी सचिन चिखलकर व मोठ्या संख्येने स्थानिक महिला कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.

 कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

0

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
पुणे: रांगोळीच्या पायघड्या… मंदिराला केलेली आकर्षक पुष्प सजावट… सनईचे मंगलमय सूर… दत्त नामाने भक्तिमय झालेले वातावरण आणि हेलिकॉप्टर मधून मंदिरावर होणारी पुष्पवृष्टी पाहून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या जयघोषात पुणेकरांचे हात आपसूकच जोडले. हेलिकॉप्टर मधून होणारी पुष्पवृष्टीचे विलोभनीय दृश्य पाहण्याची संधी यावेळी पुणेकरांना मिळाली.

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हेलिकॉप्टर मधून मंदिरावर सुभाष सरपाले, वैशाली सरपाले यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच सोहळ्यादरम्यान शिधा संकल्प योजनेअंतर्गत १२५ अनाथ अपंगांचे संगोपन करणाऱ्या व परितक्त्या महिलांचा सांभाळ करणाऱ्या संस्थांना व वृद्धाश्रमांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, मुकुंदजी लोहिया ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त पुरुषोत्तमदास लोहिया, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगरचे कार्यवाह महेश करपे, पं. वसंत गाडगीळ, ईशान्य पूरम संस्थेचे विनीत कुबेर, ट्रस्टचे अध्यक्ष  ॲड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त  ॲड. शिवराज कदम जहागीरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ,  ॲड. रजनी उकरंडे, युवराज गाडवे, सुनील रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते. यावेळी ईशान्य पुरम् संस्था, माई बाल भवन, लोकसेवा संस्था इत्यादी संस्थांना धान्य देण्यात आले.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, पुण्यातील ऐतिहासिक संस्कृती जपण्यासाठी अशा शतकोत्तर संस्थाचा मोलाचा वाटा आहे. सामाजिक काम करून या संस्था त्यांच्या कार्याची व्याप्ती आणखी वाढवत आहेत. लोकमान्य टिळकांच्या काळात पुण्यातील दगडूशेठ कुटुंबियांचे अत्यंत मोलाचे योगदान होते. लोकमान्य टिळक तुरूंगातून बाहेर आल्यानंतर पुण्यातील लोक त्यांच्यासाठी उपहार म्हणून विविध भेटवस्तू घेऊन जात होते. त्यावेळी हलवाई कुटुंबीयांनी त्यांच्यासाठी नानकटाई आणली होती, अशी आठवण देखील त्यांनी यावेळी सांगितली.  

महेश करपे म्हणाले, पुण्यातील धार्मिक, आरोग्य, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक शक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होऊ शकते याची प्रचिती या कार्यक्रमातून मिळते. ट्रस्टच्यावतीने चालणाऱ्या उपक्रमात संघ नेहमी त्यांच्या मदतीसाठी असेल, असेही त्यांनी सांगितले.

प्रताप परदेशी म्हणाले, ट्रस्टच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील विविध घटकांसाठी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.  महोत्सवाचा शुभारंभ आज वृद्धाश्रम व संस्थांना शिधा वाटप करून झाला. यावेळी मंदिराचा इतिहास व आज पर्यंत चालणाऱ्या उपक्रमांची माहिती देखील त्यांनी सांगितली.  

सकाळी १० वाजता अक्षय हलवाई यांच्या हस्ते लघुरुद्र याग करण्यात आला. त्यानंतर अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख बाबामहाराज तराणेकर यांच्या हस्ते आरती व योगाभ्यानंद श्री माधवनाथ महाराज, श्रीमंत दगडूशेठ हलवाई व श्रीमती लक्ष्मीबाई हलवाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व विश्वस्तांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करण्यात आली. मंदिरातील माध्यान्ह आरती पुण्याचे पोलिस सह आयुक्त संदिप कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आली.
ॲड. शिवराज कदम जहागीरदार यांनी सूत्रसंचालन केले. ॲड.प्रताप परदेशी यांनी प्रास्ताविक केले.

औरंगाबाद मध्ये 75 ठिकाणी योग शिबिराचे आयोजन करून योग दिन साजरा करण्यात येणार- केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड

0

औरंगाबाद –

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणा-या केंद्रीय संचार ब्यूरो, औरंगाबाद, योग संवर्धन संस्था व भारतीय योग संस्थान, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने भानुदास चव्हाण सभागृह प्रांगण येथे आयोजित योग दिंडीचे (रॅली) उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, डॉ. भागवत कराड यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबाद मध्ये 75 ठिकाणी योग शिबिराचे आयोजन करून योग दिन साजरा केला जाईल अशी माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर लोकप्रतिनिधी नंदकुमार घोडेले आणि दिलीप थोरात; अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी; योग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष, गोपाल कुलकर्णी, कार्याध्यक्ष, डॉ. चारुलता रोजेकर, भारतीय योग संस्थानचे उप प्रांत प्रमुख, डॉ उत्तम कालवणे केंद्रीय संचार ब्यूरो, औरंगाबादचे प्रबंधक, संतोष देशमुख, योग संवर्धन संस्थेचे सचिव श्रीकांत पक्ती आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले योगचा मानवी शरीरावर खुप चांगला फायदा होतो हे मी डॉक्टर या नात्याने जाणुन आहे व योग साठी औरंगाबाद मध्ये लागेल ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी नंदकुमार घोडेले, अंजली धानोरकर, संतोष देशमुख व डॉ. चारुलता रोजेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

उद्घाटनाच्या कार्यक्रमात व योग दिंडीत कृष्णा ग्रुप महिला च्या महिला, अरविंद लोखंडे यांच्या विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिक केले. योग प्रात्यक्षिक केलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय संचार ब्यूरो, औरंगाबाद तर्फे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. यावेळी कार्यक्रमात योग लोगो छापलेल्या टोप्यांचे वितरण करण्यात आले.

यावेळी औरंगाबाद शहरातील विविध योग संस्थेतील योग प्रेमी तसेच स्काउट गाइड चे विद्यार्थी, नेहरू युवा केंद्र औरंगाबादचे स्वयंसेवक या योग दिंडीत मोठ्या संखेने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवदर्शन सांस्कृतिक संच, औरंगाबाद यांच्या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते व त्यानंतर योग प्रार्थना घेउन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. योग दिंडीच्या यशस्वीतेसाठी सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदप पवार, कार्यालय सहा. प्रिती पवार, राहुल मोहोड आणि प्रभात कुमार योग संवर्धन संस्था व भारतीय योग संस्थान, औरंगाबादच्या पदाधिकारी व् कार्यकर्ते आदिनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली आयाचित व आभार प्रदर्शन उत्तम काळवणे यांनी केले.

मुंबई पोलिसांचा संडे स्ट्रीट उपक्रम कौतुकास्पद

0

मुंबई दि. 19 : मुंबई पोलिसांच्या वतीने नरिमन पॉईंट येथे संडे स्ट्रीट उपक्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अभिनेता अक्षय कुमार उपस्थित होते. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

मुंबई शहरातील लोकांना तणावमुक्त वातावरणामध्ये वावरता यावं. त्यांना मनोरंजन, योगा, जॉगिंग, सायकलिंग आणि सांस्कृतिक खेळ यांसारख्या कार्यक्रमांचा आनंद घेता यावा याकरिता मुंबई पोलिसांमार्फत ‘संडे स्ट्रीट‘ संकल्पना राबवण्यात येत आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, मुंबई पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

गृहमंत्री श्री.वळसे-पाटील म्हणाले, संडे स्ट्रीट अतिशय चांगला उपक्रम असून तो सातत्याने सुरु राहिल असा विश्वास वाटतो. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील विविध भागात याचे आयोजन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून पोलिसांमधील कलागुणांना वाव मिळतो आहे, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे.

यावेळी अभिनेता अक्षय कुमार म्हणाले, कोविड काळात सर्वत्र शांतता होती. परंतु आता दिसणारे हे चित्र दिलासादायक आहे. संडे स्ट्रीट कल्पना कायम स्वरूपी राबवावी. पोलिसांचे लोकांसोबत संबंध दृढ करण्यासाठी हा चांगला उपक्रम आहे.

मुंबईमध्ये आज एकूण 13 ठिकाणी ‘संडे स्ट्रीट‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या या उपक्रमाचे मुंबईकरांनी स्वागत केले असून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामाठीपुरा येथील मुलींनी तयार केलेल्या पोस्टकार्ड्सचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण

0

मुंबई,दि.19 : मुंबईमधील कामाठीपुरा येथील शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या 8 मुलींनी तयार केलेल्या सचित्र पोस्टकार्ड्सचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 18) राजभवन येथे करण्यात आले.

मुंबई सर्कलच्या पोस्ट मास्टर स्वाती पांडे, प्रोजेक्ट मुंबईचे मुख्याधिकारी  शिशिर जोशी, रुपेश सोनवाले तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.