Home Blog Page 1921

नौवहन मंत्रालयाने भारतीय नौदलातील अग्निवीरांना मर्चंट नेव्हीमध्ये सुरळीत प्रवेश मिळावा यासाठी सहा आकर्षक सेवा संधी जाहीर केल्या 

0

नवी दिल्ली- बंदरे, नौवहन  आणि जलमार्ग मंत्रालयाने अग्निवीरांना  भारतीय नौदलातील कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर  मर्चंट नेव्हीमध्ये  विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी  सहा आकर्षक सेवा संधींची घोषणा केली आहे. या योजनेमुळे अग्निवीरांना जगभरातील मर्चंट नेव्हीतील संधींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण,  नौदलाचा समृद्ध अनुभव आणि व्यावसायिक प्रमाणपत्र मिळवता येईल.  बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या नौवहन  महासंचालनालयाने आज मुंबईत या तरतुदी जाहीर केल्या.

अग्निवीरांसाठीच्या या योजनांमध्ये भारतीय नौदलातील रेटिंगकडून मर्चंट नेव्हीमधील प्रमाणित रेटिंगमधील बदल  समाविष्ट आहे. भारतीय नौदलाच्या माध्यमातून वरीलपैकी कोणत्याही योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अग्निवीरांसाठी नौवहन मंत्रालय  INDOS आणि CDC जारी करेल.  मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल शाखेत आयटीआय  ट्रेड सर्टिफिकेट प्राप्त  अग्निवीरांसाठी विद्यमान पात्रतेसह सामील होण्याची  किंवा भारतीय नौदलातील त्यांच्या कार्यकाळात कौशल्य प्राप्त करण्यासह काही योजनांची पुनर्रचना केली आहे .

अग्निपथ योजना – भारताच्या सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करण्यासाठीचा  परिवर्तनात्मक निर्णय देशाच्या तरुणांना देशसेवेसाठी संधी निर्माण करेल आणि त्याच वेळी या संधींचा लाभ  घेण्यासाठी त्यांना समृद्ध  व्यावसायिक अनुभव आणि प्रशिक्षण मिळवून देईल. जागतिक स्तरावर मर्चंट नेव्हीत काम करण्यासाठी,  अग्निवीरांना प्रशिक्षित आणि सुसज्ज बनवण्यासाठी तसेच नौदलामध्ये चार वर्षांच्या कार्यकाळानंतर मर्चंट पदावर पर्यायी कारकीर्द सुरु करण्याच्या दृष्टीने नौवहन मंत्रालय भारतीय नौदलासोबत काम करेल.

या योजनेबाबत बोलताना, केंद्रीय बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्री  सर्बानंद सोनोवाल म्हणाले, “परिवर्तनात्मक अग्निपथ योजनेच्या माध्यमातून भारतीय सशस्त्र दलांना तरुण ठेवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे. या कार्यकाळात नवीन तंत्रज्ञानाशी ते जुळवून घेतील आणि आपल्या जागतिक दर्जाच्या भारतीय नौदलाच्या माध्यमातून जागतिक मर्चंट नेव्हीमध्ये उत्तम  करिअर घडवण्यासाठी  त्यांना तयार केले जाईल.  या योजनांद्वारे मर्चंट नेव्हीतील  कुशल मनुष्यबळातील तफावत दूर करण्यासाठी आम्ही भारतीय नौदलासोबत काम करत आहोत.यामुळे आपल्या अग्निवीरांना नौवहन क्षेत्रात प्रवेश करता येईल आणि समृद्ध कौशल्य आणि अनुभवाद्वारे भारतीय सागरी अर्थव्यवस्थेत भरीव योगदान देऊन  मर्चंट नेव्हीमध्ये एक उत्तम  करिअर घडवण्यात  मदत करेल.”

जागतिक स्तरावर मर्चंट नेव्हीसाठी   भारत  सर्वाधिक  मनुष्यबळ पुरवणाऱ्या देशांपैकी एक आहे.  भारतीय खलाशी एसटीसीडब्ल्यू  कन्व्हेन्शननुसार प्रमाणित असून  त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी आहे. या योजना अग्निवीरांना नौवहन  क्षेत्रात सामावून घेण्यासाठी  मदत करण्यासाठी तयार केल्या आहेत. यासाठी नौवहन मंत्रालय आणि भारतीय नौदल एकत्रितपणे काम करतील.

१० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात:विजयासाठी सर्वच उमेदवारांना २६ मते मिळवणे आवश्यक

0

दहा जूनला झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी संयुक्तपणे लढली होती. त्यात सेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने २० जूनच्या विधान परिषदेच्या मतदानाला आघाडी स्वतंत्रपणे सामोर जात आहे. आपली अतिरिक्त मते सहयोगी पक्षाला देण्यास आघाडीचे घटक पक्ष तयार नसल्याने आघाडीत मोठा संभ्रम आहे. त्यामुळे १३ अपक्ष व छोट्या पक्षांच्या १६ अशा २९ आमदारांचा भाव या निवडणुकीत चांगलाच वधारला आहे. चारही पक्षांनी आपल्या आमदारांना शनिवारी मुंबईत हाॅटेलमध्ये सुरक्षित ठेवले. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे प्रसाद लाड, काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात दहाव्या जागेसाठी लढत असून एकाचा पराभव अटळ असून विजयासाठी २६ मते आवश्यक आहेत.

या निवडणुकीला २८५ आमदार मतदार असून प्रत्येक उमेदवारास विजयासाठी २६ मते हवी आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा आमदारांना धमकावत आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केला. तर पराभवानंतर वाचायची ही काँग्रेसची स्क्रिप्ट आहे, असा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. अपक्षांना सन्मानाने मते मागणे गैर नाही. ज्याला २६ आकडा गाठता येणार नाही तो पराभूत होणार आहे. त्याविषयीचा चमत्कार सोमवारी दिसेलच, असे राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तसेच राष्ट्रवादीकडून अपक्षांना फोन गेले होते, हे अजित पवार यांनी मान्य केले. दरम्यान, भाई जगताप यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या सहयोगी आमदारांची मते देण्याची त्यांनी विनंती केली. दररम्यान, बविआचे हिंतेद्र ठाकूर यांच्याकडे ३ मते आहेत. शनिवारी दिवसभर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. मात्र, त्यांचा मुलगा व आमदार क्षितीज ठाकूर हे परदेशात असल्याने ते मतदानाला येतील की नाही ? हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.

२८ चा कोटा करण्यावर पक्षांचा भर : विजयासाठी २६ मते आवश्यक आहेत. मात्र, काही मते बाद झाल्यास उमेदवाराला धोका होऊ शकतो. त्यामुळे २८ चा कोटा करण्यावर सर्वच पक्षांचा भर आहे. हे गुप्त मतदान असल्याने पक्षातील मते फुटू नयेत याकडे लक्ष दिले जात आहे. आक्षेप घेऊन मते बाद करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असतो. त्यामुळे काटेकोर नियमात मतदान करण्याचे धडे शनिवारी सर्वच पक्षांनी आमदारांना दिले.

भाजपचे प्रसाद लाड डेंजर झोनमध्ये आहेत. शनिवारी रात्री आमदारांना देवेंद्र फडणवीसांनी मार्गदर्शन केले. या वेळी राजा राऊत, प्रकाश आवाडे, महेश बालदी हे अपक्ष आमदार रात्रीच्या बैठकीला हजर होते.

सचिन अहिर आणि आमशा पाडवी हे उमेदवार आहेत. सेनेकडे ५५ मते असून ७ सहयोगी आमदार आहेत. सेना आपली अतिरिक्त मते काँग्रेसला देणार की स्वत:च्या उमेदवारांना कोटा वाढवून देणार, याची उत्सुकता आहे.

चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप हे दुसरे उमेदवार आहेत. काँग्रेसकडे ४४ आमदार असून दुसऱ्या उमेदवारास ८ मते आवश्यक आहेत. काँग्रेसचे सर्व आमदार वरळीच्या हाॅटेल फोर सीझनमध्ये शनिवारी दाखल झाले आहेत.

राष्ट्रवादीचे रामराजे नाईक-निंबाळकर आणि एकनाथ खडसे हे दिग्गज उमेदवार आहेत. राष्ट्रवादीकडे ५१ संख्याबळ आहे. देवेंद्र भुयार, संजय शिंदे, किशोर जोरगेवार हे तीन अपक्ष रात्रीच्या बैठकीला होते.

अपक्ष आमदार रवी राणा यांना अमरावतीच्या शाईफेक प्रकरणात हायकोर्टाने शनिवारी अटक वॉरंट काढले. मात्र,ते पोलिसांना सापडले नाही. याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

एमआयएम, समाजवादी, रासप, शेकाप तसेच बहुजन विकास आघाडीचे ९ आमदार आहेत. हे छोटे पक्ष प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांचा फैसला करणार आहेत.

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला

0

आमदार गिरिष महाजन व आमदार मंगेश चव्हाण सुध्दा उपस्थित
लोकल ट्रेनने केला चर्चगेट ते विरार पर्यंतचा प्रवास

मुंबई, दि. १८ जून- महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात सध्या सत्ताधारी व अपक्ष आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व असंतोषाचे वातावरण दिसत आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने या नाराज आमदारांची नाराजी उघड होऊ शकेल व आम्हाला निवडणुकीत अपेक्षित यश मिळेल असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज व्यक्त केला.
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते, आमदार गिरीश महाजन,आमदार मंगेश चव्हाण यांनी आज बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची विरार येथे भेट घेतली. विधानपरिषद निवडणुक ही आमच्यासाठी महत्त्वाची असून अपक्ष असो वा छोटे पक्ष यांचे एक-एक मत महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची आज विवा कॉलेज येथे भेट घेतली व त्यांच्याशी सोमवारी होणा-या विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने चर्चा केली असे विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सांगितले.


विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्यासह आमदार महाजन व आमदार चव्हाण यांनी विरारपर्यंतचा प्रवास हा लोकल ट्रेनने केला.विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाच्या महत्त्वाच्या बैठका सध्या होत असून त्या बैठकींनाही उपस्थित राहावे लागणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होण्याच्या दृष्टीने आम्ही रस्ते मार्गे प्रवास करण्याएवजी रेल्वे लोकल ट्रेनने विरार पर्यंतचा प्रवास केला. असेही दरेकर यांनी सांगितले.

यंदाच्या वारीत महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक विशेष अत्याधुनिक सोयीसुविधा

0

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्यवारी’ अभियानाचा पुण्यातून शुभारंभ

▪️महिला वारकऱ्यांना विसावा कक्ष
▪️स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष
▪️सॅनिटरी पॅड व्हेंडिंग व बर्निंग मशीन
▪️आरोग्य तपासणीसाठी तज्ज्ञ महिला डॉक्टर

पुणे, दि. १८: आगामी पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिला वारकऱ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या ‘आरोग्यवारी’ उपक्रमाचा शुभारंभ पुण्यातील पालखी विश्रामस्थळ असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिर येथे उद्या १९ जून रोजी दुपारी १२.३० वा. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते होत आहे.

श्रीमती चाकणकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला जात आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला खासदार ॲड.वंदना चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देहू, आळंदी, पंढरपूर येथे दाखल होत असतात. यामध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय असते हे लक्षात घेता श्रीमती चाकणकर यांनी ‘आरोग्यवारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना काही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली होती.

पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाला, वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था करणे, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन उपलब्ध करून देणे, स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देणे यासोबतच महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परीसरात दर्शनी भागात लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. याशिवाय महिला वारकऱ्यांना विसावा कक्ष, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करण्याबाबतही सूचित करण्यात आले होते.

या तीनही जिल्ह्याच्या प्रशासनाने ‘आरोग्यवारी’ या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देत महिला वारकऱ्यांसाठी या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. आरोग्य आणि सुरक्षाबाबतीतच्या या महत्वाच्या सुविधा महिला वारकऱ्यांच्या उपलब्ध करून दिल्याने पुरोगामी महाराष्ट्रात महिला आरोग्य विषयक जागृतीचा एक नवीन अध्याय सुरु झाला आहे, असे मत श्रीमती चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.

कोथरूडमधील गुंडावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई

0

पुणे : वाहनांची तोडफोड, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कोथरुडमधील एका गुंडाविरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. ऋषीकेश उर्फ शुभम मधुकर वाघमारे (वय २४, रा. गुजरात काॅलनी, कोथरुड) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे.

या गुंडाची औरंगाबादमधील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.वाघमारे विरोधात कोथरुड, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गेल्या पाच वर्षात त्याच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे पाच गुन्हे दाखल झाले होते. त्याच्या दहशतीमुळे नागरिकही तक्रार करत नव्हते. त्याच्या विरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचा प्रस्ताव कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप आणि गुन्हे प्रतिबंधक शाखेच्या पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी तयार केला होता.या प्रस्तावाला पोलीस आयुक्त गुप्ता यांनी नुकतीच मंजुरी दिली. वाघमारे याला वर्षभरासाठी ओैरंगाबादमधील कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे. शहरात दहशत माजविणाऱ्या ६९ गुंडां विरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे

कोंढव्यातही जागा बळकाविण्यासाठी ..’गंगाजल’

0

अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देऊन हुसकावून लावले.

पुणे- येवले वाडीतील जागा बळजबरीने हस्तगत करू पाहण्याचा प्रकार एकीकडे उघडकीस आलेला असताना दुसरीकडे कोंढवा बुद्रुक सर्वे नंबर ५५ ता. हवेली येथे हि राज्य वक्फ मंडळाच्या प्रादेशिक वक्फ अधिकारी खुसरो खान यांना भूखंडाच्या कारणावरूनच ५ ते ६ लोकांनी दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय काम करण्यात अडथळाकरत हुसकावून लावल्याचा प्रकार घडला .कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फौजदार वैभव सोनावणे अधिक तपास करीत आहेत.सदरची जागा आलमगीर मस्जिद देवस्थान कोंढवा बुद्रुक यांच्या मालकीची असताना या जागेशी अन्य कोणी व्यवहार करू नये म्हणून हे अधिकारी तिथे फलक लावण्यास गेले असताना अगोदरचे फलक आणि लावण्यासाठी नेलेले फलक दोन्ही उखडून फेकून संबधित अधिकाऱ्यास शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देऊन हुसकावून लावण्यात आले. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

टँकर लॉबीला प्रस्थापित नगरसेवकांचे आणि भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संरक्षण

0

सोमवारी दिनांक २० जून रोजी सकाळी ११ वाजता आम आदमी पक्षातर्फे हंडा मोर्चाचे आयोजन

पुणे- पाणीटंचाई कृत्रिमरीत्या वाढवून तिचे रूपांतर पाणीबाणीमध्ये केलेले आहे. पुणे मनपा प्रशासनाला पाणीचोरीला पायबंद घालण्यात अपयश आले आहे. टँकर लॉबीला प्रस्थापित नगरसेवकांचे आणि भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संरक्षण असून या पाणीबाणी विरोधात सोमवारी दिनांक २० जून रोजी सकाळी ११ वाजता आम आदमी पक्षातर्फे हंडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात त्रस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आप पुणे शहर जल हक्क आंदोलन समितीचे आबासाहेब कांबळे (8390906656) व सुदर्शन जगदाळे (9527911911) यांनी केले आहे.अशी माहिती येथे आप चे राज्य प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे यांनी दिली आहे.

या संदर्भात डॉ अभिजीत मोरे यांनी सांगितले कि,’ टँकर लॉबीच्या दबावाखाली पुणे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण केली गेली असून त्यामूळे टँकर लॉबीचे उखळ पांढरे झाले आहे. या टँकर लॉबीला प्रस्थापित नगरसेवक आणि प्रशासनाचे संरक्षण आहे. पुण्यातील विशेषत: बाणेर, बालेवाडी, हडपसर, फुरसुंगी, काळे पडळ, साडे सतरा नळी, मोहम्मदवाडी, खडी मशीन चौक, उंद्री, पिसोली, वडकी नाला, येवलेवाडी, कोंढवा बू. वनावडी, कात्रज, आंबेगाव पठार,आंबेगाव बू. , नऱ्हे, वडगाव बू. सिंहगड रोड, धायरी, नांदेड फाटा, किरकटवाडी, कोल्हेवाडी, खडकवासला, वारजे_ माळवाडी गणपती माथा, कोंढावे- धावडे, NDA गेट, बावधान, ससरोड, सुसगाव, बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे, दापोडी, बोपोडी, मुळा रोड, विश्रांतवाडी, कळस, धानोरी, लोहगाव, विमान नगर, खराडी, चंदन नगर बायपास, मांजरी, वाघोली या भागांमध्ये तीव्र पाणटंचाई निर्माण केली गेल्याने या परिसरातील हजारो गृह सोसायट्यांना पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यासाठी अक्षरशः लाखो रुपये प्रत्येक महिन्याला एका सोसायटीला मोजावे लागत आहे. महागाईच्या जमान्यात तुटपुंज्या पैशात घर चालवणारे वस्तीत राहणाऱ्या लोकांना सुद्धा पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. उच्च न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा पुणे मनपाने शहराच्या परीघावरील नवीन समाविष्ट गावांना आणि पूणे मनपा हद्दीतील जुन्या भागांना पुरेसा पाणी पुरवठा केलेला नाही. नको त्या योजनांवर, भ्रष्ट कंत्राटावर, फुटकळ खरेदीवर, वायफळ बांधकामांवर कोट्यावधी रुपये खर्च करणारी पुणे मनपा नागरिकांना पाणी देण्यासाठी मात्र हात वर करत आहे. या मनपाला तिच्या जबाबदारीची जाणीव करून देणे गरजेचे आहे.पुणे मनपाला पाणीपट्टी भरुन देखील पाण्यासाठी लाखो रुपये नागरिकांना मोजावे लागत आहेत. या विरोधात आम आदमी पक्षाच्या जल हक्क समितीद्वारे वेळोवेळी निदर्शने देखील केली आहेत. तसेच याबाबत अभियान राबवून शेकडो गृह सोसायट्यांनी पुणे मनपाला आम आदमी पक्षातर्फे निवेदने दिलेली आहेत. पण मुर्दाड व्यवस्था अजूनही तशीच आहे. या पाणी चोरीच्या भ्रष्ट व्यवस्थेला जनतेने धक्का द्यायची वेळ आली आहे. याकरिता या हंडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.असेही डॉ अभिजीत मोरे यांनी म्हटले आहे.

माजी नगरसेवकाच्या भूमाफिया टोळीतील एकाला पोलिसांनी केले गजाआड

0

पुणे- येवलेवाडी येथील जमिनीचा आपल्याबरोबरच व्यवहार करावा , यासाठी धमकावून गुंडांमार्फत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक विष्णु अप्पा हरिहर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विष्णु अप्पा हरिहर, राहुल दत्ताराम खुडे (वय ३८, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी), प्रेम शाम क्षीरसागर (वय १८, रा. पर्वती दर्शन) व त्याचे इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्वारगेट पोलिसांनी राहुल खुडे व प्रेम क्षीरसागर या रेकॉर्डवरील गुंडांना अटक केली आहे.

याबाबत सादीक सलीम खोजा (वय ३९, रा. बोट क्लब रोड) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ११५/२२) दिली आहे. ही घटना सॅलिसबरी पार्कमधील गोल्डन बेकरीसमोर २७ मे रोजी रात्री साडेनऊ व ६ जून रोजी दुपारी चार वाजता घडली. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे त्यांची वडिलोपार्जित जमीन कोंढवा येवलेवाडी येथे आहे. तेथे त्यांना काही तरी व्यावसायिक प्रकल्प सुरु करायचा होता. पण, लॉकडाऊनमुळे ते व्यवसाय सुरु करु शकले नाही. २०२१ मध्ये विष्णू हरिहर व राहुल खुडे यांच्याकडे आले व ती जमीन त्यांना पाहिजे असल्याचे सांगितले. योग्य भाव दिल्यास व्यवहार करु असे बोलणे झाले. त्यानंतर ती जागा हरिहर यांनाच विकण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणू लागले. २७ जून रोजी रात्री साडेनऊ वाजता फिर्यादी यांचे मित्र नसीर अन्सारी यांच्या सॅलिसबरी पार्क येथील गोल्डन बेकरीजवळ विष्णु हरिहर व इतर लाठ्या, काठ्या, कोयते घेऊन आले. नसीर अन्सारी यांना दमदाटी करुन त्यांच्या कारची तोडफोड केली. स्थानिक राजकीय व्यक्ती एकनाथ ढोले यांनी मध्यस्थी केल्याने नसीर अन्सारी यांनी तक्रार केली नव्हती.

या घटनेनंतर १ जून रोजी फिर्यादी यांना राहुल खुडे यांचा फोन आला. त्यात खुडे याने फिर्यादींना धमकाविले.
येवलेवाडी येथील जमिनीचा व्यवहार विष्णु हरिहर बरोबर कर. नाही तर गोळ्या घालून मारेल, अशी धमकी दिली.
फिर्यादी यांनी त्याला महत्व दिले नाही.

फिर्यादी हे ६ जून रोजी दुपारी नसीर अन्सारी यांना भेटण्यासाठी गोल्डन बेकरी येथे आले होते.त्यांच्याशी व्यवहारासंबंधी मिटींग करुन ते बेकरीबाहेर लावलेल्या कारकडे आले असताना त्यांना काही अंतरावर राहुल खुडे हा मोटारसायकलवर आलेला दिसला.त्यांना पाहून तो मोटारसायकलवरुन उतरुन त्यांच्या दिशेने रिव्हाल्व्हरसारखे काही तरी काढून त्यांच्या दिशेने रोखून धरत होता.फिर्यादी हे घाबरून तातडीने कारमध्ये बसून जीवाच्या भितीने वेगात कार चालवत घरी आले.धाडस करुन ते महर्षीनगर पोलीस चौकी येथे तक्रार देण्यासाठी गेले.परंतु जीवाच्या भितीने राहुल खुडे व विष्णु हरिहर काही तरी अपाय करेल, या भितीने त्यांनी सविस्तर तक्रार दिली नाही.पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत.

झांशीची राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन 

0

पुणे : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त बालगंधर्व चौकात राणी लक्ष्मीबाई यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ अहिल्यादेवी शाळा आणि मा. स. गोळवलकर गुरुजी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी अभिवादन केले.
ढोल-ताशाच्या गजरात गोळवलकर गुरजी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. मेरी झांसी नहीं दूंगी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसीवाली रानी थी, वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.
स्वरा अपामार्जने या विद्यार्थिनींने पोवाड्याचे गायन केले. हिरण्याक्षी पवार हिने लक्ष्मीबाईंची चरित्रकथा, पराक्रम कथन केला. गाथा राऊत या विद्यार्थिनीने झाशीच्या राणीची वेशभूषा केली होती.       अहिल्यादेवीच्या पर्यवेक्षिका चारुता प्रभुदेसाई, शिक्षिका दीपाली थोरात, डॉ. सुलोचना शिंदे-माने, सुभाष निंबाळकर, प्रशांत जाधव यांनी संयोजन केले.

समाज कल्याण विभागाच्या ७७ निवासी शाळांची लक्षणीय कामगिरी, निकाल १०० टक्के

0

मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन

पुणे दि.१८-राज्यात समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती मुलां व मुलींच्या शासकीय निवासी शाळेमधील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. राज्यात कार्यरत असलेल्या एकूण ९० पैकी ७७ निवासी शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांच्या या लक्षणीय कामगिरीबद्दल सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी निवासी शाळेतून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

या सर्व शाळांमधून ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे ११९ विद्यार्थी आहेत हे विशेष. ६ शाळांचा निकाल ९५ टक्के लागला आहे, तर ४ निवासी शाळांचा निकाल ९० टक्के लागला आहे. या सर्व निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांमधून अमरावती विभागाच्या रुपाली रमेश सभादींडे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिला ९५.८० टक्के गुण मिळाले आहेत. द्वितीय क्रमांक गायत्री रामकृष्ण सरदार ९५.२० टक्के, तर तृतीय क्रमांक ममता बाळू तायडे हिला ९५ टक्के गुण मिळाले आहेत. समाज कल्याण विभागाच्या शाळांमध्ये मुलींनी उल्लेखनीय यश मिळविले आहे.

राज्यातील सर्व निवासी शाळांच्या कामगिरीबद्दल सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, सचिव सुमंत भांगे, आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व विद्यार्थी, शाळांचे मुख्याध्यापक, कर्मचारी, शिक्षक यांचेदेखील अभिनंदन केले आहे.

चोकट

डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त समाज कल्याण विभाग -राज्यातील अनुसूचित जातीच्या मुला-मुलींच्या इयत्ता दहावीतील लक्षणीय यशाबद्दल विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. येणाऱ्या काळात देखील गुणवत्ता वाढीसाठी अधिक प्रयत्न विभागाच्यावतीने करण्यात येणार असून लवकरच या निवासी शाळांमध्ये सीबीएससी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे

शनी शिंगणापूरचा चौथरा महिलांनाही खुला: तेल अभिषेक करण्यास परवानगी

0

श्री क्षेत्र शनिी शिंगणापूर- येथील शनी मंदिराचा चौथरा आता भाविकांना खुला करण्यात आला आहे. विश्वस्तांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे तेल अभिषेकासाठी महिलांनाही पुन्हा एकदा चौथऱ्यावर प्रवेश देण्यात येत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. यापूर्वी पुरुष आणि स्त्री भाविकांना चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करता येत होता. मात्र, काही वर्षे या ठिकाणी महिलांना प्रवेश बंद होता. त्यामुळे तो प्रवेश सुरू करण्यासाठी 2014 मध्ये भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी केवळ पादुकापर्यंत भाविकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. आता शनिवारपासून शनिशिंगणापूरमध्ये चौथऱ्यावर जाऊन भाविकांनी तेल अभिषेक करण्यास सुरुवात केली आहे. विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

प्रवेशाचा वाद काय?

शनी शिंगणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश बंदी होती. मात्र, 28 नोव्हेंबर 2015 रोजी एका महिलेने हा नियम मोडला. चौथऱ्यावर जात अभिषेक केला. जवळपास चारशे वर्षांच्या परंपरेला तिने चूड लावल्याचे बोलले गेले. या प्रकरणी सात सुरक्षारक्षकांवर निलंबनाची कारवाई केली. मात्र, अनेकांनी या महिलेचेही स्वागत करत ही नवी क्रांती असल्याचे म्हटले. मात्र, ग्रामस्थांनी दुग्धाभिषेक आणि मूर्ती शुद्धतेचा घाट घातला.

अभिषेकासाठी 500 ची देणगी

विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भागवत बानकर म्हणाले की, विश्वस्तांनी घेतलेल्या निर्णयानुसार शनिवारपासून भाविकांनी चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करण्यास सुरुवात केली. चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करण्यासाठी भाविकांना श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्टची देणगी पावती घ्यावी लागेल. तेल अभिषेकासाठी महिला व पुरुष भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते श्री क्षेत्र ओझर येथे विघ्नहर उद्यानाचे उद्घाटन संपन्न

0

पुणे, दि.१८:  विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र ओझर येथे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी व जेष्ठाना विरंगुळा मिळावा यासाठी साकारण्यात आलेल्या विघ्नहर उद्यानाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी (दि.१७) राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.

श्री विघ्नहर मंदिरालगत या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशाताई बुचके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, जुन्नर शहराचे माजी नगराध्यक्ष श्याम पांडे, ओझर गावच्या सरपंच मथुरा कवडे,ओझर नं-२ च्या सरपंच तारामती कर्डक, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे ,उपाध्यक्ष अजित कवडे, सचिव दशरथ मांडे आदी उपस्थित होते.

देवस्थान ट्रस्टने निर्माण केलेले आणि त्यात एकवीस पत्री गणेशाच्या प्रिय वनस्पतीची लागवड असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव उद्यान असेल असा उल्लेख करून मंत्री श्री. सामंत यांनी भाविकांच्या सुख सोईसाठी निर्माण केलेल्या सर्व सुविधांचे विशेष कौतुक केले. 

श्री. सामंत म्हणाले, हे उद्यान लहान-थोरांचा विचार करून कल्पकतेने निर्माण करण्यात आले आहे. लहानांचे मनोरंजन आणि ज्येष्ठांची विश्रांती या दोन्ही बाबी येथे साध्य होतील. पुढील काळात देवस्थान ट्रस्टला विकासासाठी शासनाकडून निश्चितच सहकार्य दिले जाईल.

याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

वडोदरा येथे गुजरात गौरव अभियानात पंतप्रधान सहभागी:21,000 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन

0

वडोदरा -पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वडोदरा येथे गुजरात गौरव अभियानात सहभागी झाले. त्यांनी 21,000 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी लाभार्थी, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, केंद्रीय आणि राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीलाच पंतप्रधान म्हणाले की आजचा दिवस त्यांच्यासाठी मातृ वंदना (मातृपूजन) दिवस आहे. आज 100 व्या वर्षात पदार्पण केलेल्या आईचे आशीर्वाद घेऊन त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर, त्यांनी पावागड टेकडीवरील जीर्णोद्धार करण्यात आलेल्या  श्री कालिका मातेच्या मंदिराचे उद्घाटन केले, आणि देशासाठी प्रार्थना केली तसेच देशसेवेसाठी आणि अमृत काळात  देशाचे संकल्प सिद्धीस नेण्यासाठी देवीकडे शक्ती मागितली. त्यानंतर त्यांनी यावेळी उपस्थित असलेल्या विशाल ‘मातृशक्तीला’ वंदन केले.

आजच्या कार्यक्रमातील 21000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, हे प्रकल्प गुजरातच्या विकासाद्वारे भारताच्या विकासाच्या संकल्पनेला बळ देतील. मातांचे  आरोग्य, गरीबांसाठी घरे, कनेक्टिव्हिटी आणि उच्च शिक्षण या क्षेत्रांतील ही मोठी गुंतवणूक गुजरातच्या औद्योगिक विकासाला चालना देईल, असे ते म्हणाले. यातील अनेक प्रकल्प महिलांचे आरोग्य, पोषण आणि सक्षमीकरणाशी संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, महिला सक्षमीकरणाला विकासाचा आधार बनवण्याच्या दुहेरी इंजिन सरकारच्या प्रयत्नांना कालिका मातेच्या आशीर्वादाने  नवी गती मिळाली आहे. 21व्या शतकातील भारताच्या जलद विकासासाठी महिलांचा जलद विकास, त्यांचे सक्षमीकरण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आज भारत महिलांच्या गरजा आणि आकांक्षा लक्षात घेऊन योजना आखत आहे आणि निर्णय घेत आहे,” असे यावेळी उपस्थित अनेक परिचित चेहरे ओळखताना त्यांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, महिलांसाठी सर्व क्षेत्रात संधी खुल्या झाल्या आहेत आणि सरकारने महिलांच्या जीवनचक्राचा  प्रत्येक टप्पा  लक्षात घेऊन त्यांच्या सक्षमीकरणासाठी योजना आखल्या आहेत. “वडोदरा हे मातृशक्ती उत्सवासाठी योग्य शहर आहे कारण मातेप्रमाणे संस्कार देणारे हे शहर आहे. वडोदरा हे संस्कारांचे शहर आहे. हे शहर येथे येणाऱ्यांची सर्व प्रकारे काळजी घेते, त्यांच्या सुख-दु:खात साथ देते आणि पुढे जाण्याची संधी देते. या शहराने स्वामी विवेकानंद, महर्षी अरविंद, विनोबा भावे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांना प्रेरणा दिली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या वैयक्तिक प्रवासात या शहराने बजावलेल्या भूमिकेचेही मोदींनी स्मरण केले. ते म्हणाले की 2014 मध्ये त्यांना वडोदरा  आणि काशी विश्वनाथ या दोन्ही ठिकाणी विजय मिळाला होता. माता  आणि महिलांचे आरोग्य महत्त्वाचे आहे याचा त्यांनी  पुनरुच्चार केला. मातेचे आरोग्य केवळ तिच्यासाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी, विशेषतः तिच्या बाळासाठी महत्त्वाचे आहे. दोन दशकांपूर्वी जेव्हा गुजरातने मला सेवा करण्याची संधी दिली तेव्हा कुपोषण हे एक खूप मोठे आव्हान होते. तेव्हापासून आम्ही एकामागून एक या दिशेने काम करू लागलो, ज्याचे फलदायी परिणाम आज दिसत आहेत”, असे ते म्हणाले. आदिवासी भागातील सिकलसेलच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबतही पंतप्रधानांनी सांगितले. ते म्हणाले की सप्टेंबर ‘पोषण माह’-पोषण महिना म्हणून साजरा करण्याचा निर्णय गुजरातच्या महिलांना मदत करेल. पोषणाव्यतिरिक्त, स्वच्छ भारत आणि उज्ज्वला सारख्या योजनांच्या माध्यमातून  सरकारने महिलांना पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे.

“गुजरातमधील महिलांना प्रत्येक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी,  निर्णय घेण्यासाठी त्यांना अधिक संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांची व्यवस्थापन क्षमता समजून घेऊन गावाशी संबंधित अनेक प्रकल्पांमध्ये भगिनींना नेतृत्वाची भूमिका देण्यात आली आहे”, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी कुटुंबाच्या आर्थिक निर्णयात महिलांची मध्यवर्ती भूमिका सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेचाही  पुनरुच्चार केला. जन धन खाते, मुद्रा योजना आणि स्वरोजगार योजना या उद्देशांसाठी  योगदान देत आहेत, असे  त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या कल्याणासाठी केलेल्या उपाययोजनांही सांगितल्या. 7.5 लाख शहरी गरीब कुटुंबांना याआधीच घरे मिळाली आहेत. 4.5 लाख मध्यमवर्गीय कुटुंबांना घरे बांधण्यासाठी मदत मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले.  रास्त भाडे योजना आणि स्वानिधी योजना देखील ग्रामीण गरीब आणि मध्यमवर्गीय वर्गाला मदत करत आहेत, यावर पंतप्रधानांनी भर दिला. कल्याणकारी उपाययोजनांसोबतच राज्यातील औद्योगिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठीही काम सुरू आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गुजरातमधील पर्यटन विकासाच्या उपाययोजनांमुळे वडोदऱ्याला  मोठा फायदा होईल, असे पंतप्रधान म्हणाले. पावागड, केवडिया ही गावे पर्यटन केंद्रे  म्हणून विकसित झाली आहेत. वडोदऱ्यामध्ये  रेल्वे आणि विमान वाहतुकीच्या  पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय विद्यापीठ, रेल विद्यापीठ, बिरसा मुंडा आदिवासी विद्यापीठ यामुळे  शैक्षणिक क्षेत्रात नवी ऊर्जा, चैतन्य येत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

कार्यक्रमांचे तपशील:

पंतप्रधानांनी 16,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. यामध्ये  357 किमी लांबीची मालवाहतूक समर्पित मार्गिकेचा  न्यू पालनपूर – मदार विभाग आहे. 166 किमी लांब अहमदाबाद-बोटाद  विभागाचे   ‘गेज’ रूपांतरण; 81 किमी लांबीच्या पालनपूर – मिठा विभागाचे विद्युतीकरण या  कामाचा समावेश आहे.  सुरत, उधना, सोमनाथ आणि साबरमती स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी आणि रेल्वे क्षेत्रातील इतर उपक्रमांची पंतप्रधानांनी पायाभरणी केली. या प्रकल्पांमुळे ‘लॉजिस्टिक’  खर्च कमी होण्यास आणि उद्योग आणि कृषी क्षेत्राला चालना मिळण्यास मदत होईल. तसेच  प्रदेशातील संपर्क व्यवस्‍थेमध्‍येही  सुधारणा होणार आहे; त्यामुळे प्रवाशांना मिळणा-या  सुविधा वाढणार आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत, शहरी भागात सुमारे 1,800 कोटी रुपयांची घरे आणि ग्रामीण भागात 1,530 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची घरे यांच्यासह एकूण 1.38 लाख घरे पंतप्रधानांच्या हस्ते समर्पित करण्‍यात आली. याशिवाय 310 कोटींहून अधिक किमतीच्या सुमारे 3000 घरांच्‍या कामाचा मुहूर्त करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या वेळी, पंतप्रधानांनी खेडा,  आणंद, वडोदरा, छोटा उदेपूर आणि पंचमहाल इथल्या 680 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकासकामांचे लोकार्पण केले तसेच पायाभरणी केली.  या प्रदेशातील राहणीमान सुलभ करण्याचे उद्दिष्ट ही कामे करण्‍यामागे आहे.

गुजरातमधील दभोई तालुक्यातील कुंधेला गावात गुजरात केंद्रीय विद्यापीठाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. वडोदरा  शहरापासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेले हे विद्यापीठ सुमारे 425 कोटी रुपये खर्चून बांधले जाईल आणि यामुळे  2500 हून अधिक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या गरजा पूर्ण करेल.

माता आणि बाल आरोग्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करून, पंतप्रधानांनी ‘मुख्यमंत्री मातृशक्ती योजना’ सुरू केली.  या योजनेसाठी 800 कोटी रुपये खर्च येणार आहे. या योजनेंतर्गत गरोदर आणि  स्तनदा मातांना दर महिन्याला अंगणवाडी केंद्रातून 2 किलो काबुली चणे, 1 किलो तूर डाळ आणि 1 किलो खाद्यतेल मोफत दिले जाणार आहे. पंतप्रधानांनी ‘पोषण सुधा योजने’साठी सुमारे 120 कोटी रुपये वितरित केले, त्याचा लाभ आता राज्यातील सर्व आदिवासी लाभार्थींना  मिळू शकणार आहे. यासाठीच  या  योजनेचा विस्‍तार केला आहे.  आदिवासी जिल्ह्यातील गरोदर आणि स्तनदा मातांना लोह  आणि कॅल्शियमच्या गोळ्या आणि पोषणाबाबतचे शिक्षण देण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर हे पाऊल उचलण्‍यात आले आहे.

पावागड टेकडीवरील जीर्णोद्धार केलेल्या श्री कालिका मातेच्या मंदिराचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन

0

पावागड टेकडीवर जीर्णोद्धार केलेल्या श्री कालिका मातेच्या मंदिराचे पंतप्रधानांनी आज उद्घाटन केले. परिसरातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी  हे एक असून, मोठ्या संख्येने यात्रेकरू मंदीराला भेट देतात. मंदिराचा पुनर्विकास 2 टप्प्यात करण्यात आला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला एप्रिलमध्ये पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले होते. आजच्या कार्यक्रमात उद्घाटन झालेल्या दुसऱ्या टप्प्याच्या पुनर्विकासाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते 2017 मध्ये करण्यात आली. यामध्ये मंदिराच्या पायाचा विस्तार आणि तीन स्तरांवर ‘परिसर’ मधे सुविधांचा विकास यात पथदिवे, सीसीटीव्ही प्रणाली यांसारख्या सुविधांचा समावेश आहे.    

मंदिरात येण्याचे भाग्य लाभल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. 5 शतके आणि स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनंतरही मंदिरावर पवित्र ध्वज फडकत असताना आजच्या क्षणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. “आज शतकांनंतर पुन्हा एकदा पावागड मंदिराच्या शिखरावर ध्वज फडकला आहे. हा ‘शिखर ध्वज’ केवळ आपल्या श्रद्धेचे आणि अध्यात्माचे प्रतीक नाही तर शतके उलटतात, युगे उलटतात, पण आस्था शाश्वत राहते याचेही प्रतीक आहे असे ते म्हणाले. आगामी ‘गुप्त नवरात्री’च्या अगदी आधी हा जीर्णोद्धार म्हणजे ‘शक्ती’ कधीही लोप पावत नाही याचे द्योतक आहे असे त्यांनी सांगितले.

अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ धाम आणि केदार धामचा संदर्भ देत, “आज भारताचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव पुनर्संचयित होत आहे. आज नवीन भारत आपल्या आधुनिक आकांक्षांसह आपली प्राचीन ओळख अभिमानाने जगत आहे” असे पंतप्रधान म्हणाले. श्रद्धेच्या केंद्रांसोबतच आपल्या प्रगतीच्या नव्या शक्यता निर्माण होत आहेत आणि पावागड येथील हे भव्य मंदिर त्या प्रवासाचा एक भाग आहे, असेही ते म्हणाले. हे मंदिर सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास यांचे प्रतीक आहे असे त्यांनी सांगितले.

कालिमातेची कृपावचने ऐकून स्वामी विवेकानंद यांनी जनसेवेसाठी स्वतःला समर्पित केल्याचे पंतप्रधानांनी स्मरण करून दिले. जनतेच्या सेवेसाठी त्यांनीही आज देवीकडे शक्ती मागितल्याचे त्यांनी सांगितले. “देवीमाते, मला अधिक ऊर्जेने, अधिक त्याग करून आणि अधिक समर्पणभावनेने जनसेवक म्हणून देशवासीयांची सेवा अशीच सुरु ठेवता यावी, यासाठी मला आशीर्वाद दे. माझ्याकडे असलेल्या सर्व शक्तीनिशी, माझ्याकडील सर्व गुणांचा पुरेपूर उपयोग करून माझ्या देशातील माताभगिनींच्या कल्याणासाठी मला येथून पुढेही असेच समर्पित राहून काम करता आले पाहिजे”, अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवासंदर्भाने पंतप्रधान म्हणाले की, गुजरातने स्वातंत्र्यसंग्रामात तसेच देशाच्या विकासासाठीही उत्तुंग योगदान दिले आहे. ‘गर्वी गुजरात’ हे शब्द भारताच्या गौरवाशी आणि तेजाशी जोडलेले आहेत, असेही त्यांनी सांगितले. “पंचमहल आणि पावागढ या तीर्थक्षेत्रांनीही सोमनाथ मंदिराची तेजस्वी परंपरा पुढे सुरु ठेवली आहे. आज येथील पुनर्विकास पूर्ण करून घेऊन आणि ध्वजारोहण करून घेऊन मा कालीने तिच्या भाविकांना सर्वोत्तम भेट दिली आहे.” असे उद्गारही पंतप्रधानांनी काढले. या मंदिराच्या मूळ प्राचीन रचनेला आणि तिच्यातून प्रतीत होणाऱ्या अर्थाला धक्का न लावता पुनरुज्जीवन करण्यात आले आहे, असे सांगत, या देवळात जाणे आता सर्वांसाठी सहजसोपे झाल्याचीही त्यांनी नोंद घेतली. “पूर्वी पावागढची यात्रा इतकी कठीण होती, की आयुष्यात एकदा तरी मातेचे दर्शन घ्यावे, असे लोक म्हणत असत. आज वाढत्या सुविधांमुळे ते कठीण दर्शन सोपे झाले आहे.” असे पंतप्रधान म्हणाले. भाविकांनी शिस्त पाळावी, असे आवाहनही त्यांनी केले. “पावागढमध्ये आध्यात्मिकता आहे, इतिहास आहे, कला आहे आणि संस्कृतीही आहे. येथे एकीकडे महाकाली मातेचे शक्तीपीठ आहे आणि दुसरीकडे जैन मंदिराची वारसावास्तूही आहे. म्हणजे, पावागढ हे एका अर्थी भारताच्या ऐतिहासिक विविधतेशी विश्वाच्या असणाऱ्या सुसंवादाचेच केंद्र आहे.” असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. मातेच्या विविध मंदिरांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले, “गुजरातला मातेच्या कृपाप्रसादाने सुरक्षाकवच लाभले आहे.”

“तीर्थक्षेत्रांच्या विकासाबरोबरच त्या-त्या प्रदेशात अनेक संधी निर्माण होतात, पर्यटन, रोजगार आणि स्थानिक कलाकौशल्याबद्दल जागरूकता वाढते.” असे पंतप्रधान म्हणाले. पंचमहल ही विख्यात संगीततज्ज्ञ बैजू बावरा यांची भूमी आहे, याची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की, “जेथे जेथे वारसा आणि संस्कृती यांचे सामर्थ्य वाढते, तेथे तेथे कला आणि प्रतिभाही उमलून येतात आणि फुलतात.”

2006 मध्ये चंपानेरमधूनच ‘ज्योतिग्राम’ योजना सुरु केल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.

माझी आई जितकी साधी तितकीच असामान्य”

0

आईने शंभराव्या वर्षात पदार्पण केल्यावर पंतप्रधान मोदी यांचा भावनिक ब्लॉग

आई शंभरव्या वर्षात पदार्पण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक भावनिक ब्लॉग लिहिला आहे. त्यांनी आपल्या आईसोबत घालवलेल्या बालपणीच्या काही खास क्षणांना उजाळा दिला आहे. ते मोठे होत असताना आपल्या आईने केलेल्या अनेक त्यागांची आठवण त्यांनी करून दिली आणि त्यांच्या मन, आत्मविश्वास तसेच व्यक्तिमत्वाला आकार देणाऱ्या आईच्या विविध गुणांचा उल्लेख त्यांनी केला.

“आज मला हे सांगताना खूप आनंद होतोय आणि हे माझे सौभाग्य समजतो की माझी आई श्रीमती हिराबा मोदी शंभरव्या वर्षात पदार्पण करत आहे. हे तिचे जन्मशताब्दी वर्ष असणार आहे.” असे पंतप्रधान मोदी यांनी लिहिले आहे.

लवचिकतेचे प्रतीक

आईने बालपणी भोगलेल्या संकटांची आठवण करून देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “माझी आई जितकी साधी तितकीच असामान्य आहे. अगदी सर्व मातांप्रमाणे.” लहान वयात पंतप्रधान मोदी यांच्या आईने आपली आई गमावली. “तिला माझ्या आजीचा चेहरा किंवा तिच्या कुशीतली मायेची ऊबही आठवत नाही. तिने तिचे संपूर्ण बालपण आईशिवाय घालवले. असे मोदी यांनी म्हटले आहे.”

मातीच्या भिंती आणि छतावर मातीची कौले असलेल्या वडनगरमधील छोट्याशा घराची आठवण त्यांनी सांगितली. आई-वडील आणि भावंडांसोबत तिथे ते राहत होते. त्यावेळी असंख्य दैनंदिन संकटे उभी ठाकत. आईने तोंड देत त्यावर यशस्वी मात केली असे त्यांनी नमूद केले.

आईने केवळ घरातील सर्व कामे एकटीनेच केली नाहीत तर घराच्या तुटपुंज्या उत्पन्नाला हातभार लावण्यासाठीही काम केले. घरखर्च भागवण्यासाठी ती काही घरात धुणीभांडी करायची आणि चरखा कातण्यासाठीही वेळ काढायची असे त्यांनी सांगितले.

“पावसात आमचे छत गळायचे आणि घरभर पाणी व्हायचे. पावसाचे पाणी जमा करण्यासाठी आई गळत असलेल्या ठिकाणी बादल्या आणि भांडी ठेवायची. या प्रतिकूल परिस्थितीतही आई हे लवचिकतेचे प्रतीक भासायचे याची पंतप्रधान मोदी यांनी आठवण करुन दिली.

स्वच्छता करणाऱ्यांचा मनापासून आदर

स्वच्छतेबाबत आईचा कटाक्ष असायचा, त्याबद्दल ती फार आग्रही होती. स्वच्छता राखण्याबाबतच्या शिस्तीची झलक मिळणारे काही प्रसंग मोदी यांनी सामायिक केले.

आईला स्वच्छता आणि स्वच्छता कार्यात सहभागी असलेल्यांबद्दल खूप आदर होता. वडनगरमध्ये त्यांच्या घराशेजारील नाला स्वच्छ करायला कोणी यायचे तेव्हा आई त्यांना चहा दिल्याशिवाय जाऊ द्यायची नाही असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

इतरांच्या आनंदात आनंद शोधणे

आईला इतर लोकांच्या आनंदात आनंद मिळत असे आणि ती खूप मोठ्या मनाची होती असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले. “वडिलांचा एक जवळचा मित्र बाजूच्या गावात राहायचा. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर, वडिलांनी त्यांच्या मित्राच्या मुलाला, अब्बासला आमच्या घरी आणले. आमच्यासोबत राहून त्याने शिक्षण पूर्ण केले. आई आम्हा सर्व भावंडांप्रमाणेच अब्बासची प्रेमाने काळजी घ्यायची. दरवर्षी ईदच्या दिवशी ती त्याच्या आवडीचे पदार्थ बनवत असे याची आठवण त्यांनी सांगितली. सणासुदीला, आजूबाजूची मुले आमच्या घरी यायचे आणि आईच्या हातच्या खास पदार्थांचा आस्वाद घ्यायचे असेही त्यांनी नमूद केले .”

पंतप्रधान मोदी यांच्या आई फक्त दोन जाहीर कार्यक्रमात त्यांच्यासोबत सहभागी झाल्या आहेत.

आई फक्त दोन जाहीर कार्यक्रमात त्यांच्यासोबत सहभागी झाल्याचे ब्लॉग पोस्टमध्ये, पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रध्वज फडकावून एकता यात्रा पूर्ण केली. तिथून परतल्यावर अहमदाबादमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात आईने त्यांच्या कपाळावर कुमकुम तिलक केले होते, हे एक आणि दुसरे उदाहरण म्हणजे 2001 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती तेव्हा.

पंतप्रधान मोदी यांच्याच्या आईने त्यांना जीवनाचा धडा शिकवला

आईने त्यांना जाणीव करून दिली की औपचारिक शिक्षण न घेताही शिकणे शक्य आहे. त्यांनी एक घटनाही सांगितली. मोदी यांना त्यांच्या सर्व शिक्षकांचा जाहीर सन्मान करायचा होता, त्यात त्यांच्या सर्वात मोठ्या शिक्षिका – त्यांच्या आईचा समावेश होता. मात्र, त्यांच्या आईने नकार दिला. त्या म्हणाल्या “हे बघ, मी एक सामान्य माणूस आहे. मी कदाचित तुला जन्म दिला असेल, परंतु तुला त्या सर्वशक्तिमान शक्तीने शिकवले आहे आणि वाढवले ​​आहे.”

त्यांची आई कार्यक्रमाला आली नाही. मात्र त्यांनी जेठाभाई जोशीजी यांच्या कुटुंबातील कोणाला तरी बोलावले जावे हे सुनिश्चित केले. – ते त्यांचे स्थानिक शिक्षक होते. त्यांनी मोदी यांना वर्णमाला शिकवली होती. “आईची विचार प्रक्रिया आणि दूरदृष्टी मला नेहमीच आश्चर्यचकित करते,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

एक कर्तव्यपरायण नागरिक

पंतप्रधान मोदी म्हणतात, त्यांची आई एक कर्तव्यपरायण नागरिक असून, त्यांनी (आईने) निवडणुका सुरु झाल्यापासून प्रत्येक निवडणुकीत मतदान केले आहे- अगदी पंचायतीच्या निवडणुकीपासून ते संसदेच्या निवडणुकीपर्यंत.

अत्यंत साध्या राहणीमानाचा अंगीकार

आपल्या आईच्या अत्यंत साध्या राहणीमानाविषयी पंतप्रधान सांगतात, की आजही त्यांच्या (आईच्या) नावावर कोणतीही मालमत्ता नाही. “तिला मी कधीही कोणतेच सोन्याचे दागिने घालताना बघितले नाही, नि तिला त्यात काही स्वारस्यही नाही. पूर्वीप्रमाणेच आजही एका छोट्याशा खोलीत अतिशय साधेपणाने ती राहते”, पंतप्रधान म्हणतात.

ताज्या घडामोडींशी सातत्याने जवळून परिचय

जगातील ताज्या घडामोडींशी आपल्या आईचा सातत्याने जवळून परिचय असल्याचे पंतप्रधान मोदी सांगतात. आपल्या ब्लॉगमध्ये ते म्हणतात, “मी नुकतेच तिला विचारले, की ती दिवसभरात किती वेळ टीव्ही बघते. ती म्हणाली, टीव्हीवरील बहुतेक लोक एकमेकांशी भांडत असतात. मग जे लोक शांतपणे वृत्तनिवेदन करतात आणि सर्व काही उकलून सांगतात, त्यांचेच कार्यक्रम/बातम्या ती बघते. आई इतक्या गोष्टींकडे लक्ष देते, हे बघून मला आनंदही वाटलं आणि नवलही !

इतक्या वयातही तीव्र स्मरणशक्ती

इतक्या वार्धक्यातही पंतप्रधानांच्या आईचा सावधपणा आणि तरतरीतपणा कायम आहे. हे सिद्ध करणारा 2017 मधील एक प्रसंग पंतप्रधान सांगतात. 2017 मध्ये पंतप्रधान मोदी काशीहून परस्पर त्यांना भेटायला गेले होते आणि जाताना त्यांच्यासाठी प्रसाद घेऊन गेले होते. “मी आईला भेटल्याबरोबर लगेचच तिने मला विचारले की मी काशी विश्वनाथ महादेवाला दक्षिणा अर्पण केली की नाही.. आई आजही पूर्ण नावाचा उच्चार करते- काशी विश्वनाथ महादेव. पुढे गप्पा मारताना तिने विचारले, “काशी विश्वनाथ मंदिराकडे जाणारे गल्लीबोळ अजूनही तसेच आहेत का, जणू काही एखाद्याच्या घराच्या आवारातच देऊळ असल्यासारखे?” .. मी चकित झालो आणि तिला विचारले की ती त्या देवळात कधी गेली होती.. ती अनेक वर्षांपूर्वी काशीला जाऊन आल्याचे तिने सांगितले. परंतु आश्चर्य म्हणजे तिला तेथील सर्व काही आठवत होते”- पंतप्रधान म्हणतात.

इतरांच्या आवडीनिवडीचा आदर

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, त्यांची आई इतरांच्या आवडीनिवडीचा केवळ आदरच करते असे नाही तर तिच्या आवडी/तिची मते इतरांवर कधी लादतही नाही. “विशेषतः माझ्याबाबतीत, ती माझ्या निर्णयांचा आदरच करत आली आहे, कदापि कोणत्या अडचणी निर्माण न करता, मला कायम प्रोत्साहन देत आली आहे. बालपणापासून तिला हे जाणवत होते की माझ्यामध्ये एक वेगळी मनोभूमिका वाढत आहे”, पंतप्रधान आवर्जून उल्लेख करतात.

पंतप्रधान मोदी यांनी जेव्हा आपले घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला तो त्यांच्या आईनेच. त्यांच्या आकांक्षा समजून घेत त्यांना आईनेच आशीर्वाद दिला, “तुझे अंतःकरण जे सांगते ते कर.”

गरीब कल्याणावर भर

गरीब कल्याणाचा ठाम निर्धार करून त्यावर भर देण्यासाठी आईने त्यांना सतत प्रेरणा दिल्याचे पंतप्रधान सांगतात. 2001 मध्ये जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदीजींचे नाव घोषित करण्यात आले, तेव्हाचा प्रसंग ते वर्णन करतात. गुजरातमध्ये पोहोचल्यावर ते थेट आईला भेटायला गेले. तिला पराकोटीचा आनंद झाला होता. ती त्यांना म्हणाली, “मला तुझे सरकारमधले काम काही कळत नाही, पण तू कधीही लाच घ्यायची नाहीस, इतकेच सांगते.”

त्यांनी तिची काळजी करू नये आणि अधिक मोठ्या जबाबदाऱ्यांकडे लक्ष केंद्रित करावे, असे त्यांची आई त्यांना नेहमीच सांगत आली आहे. ते जेव्हा जेव्हा आईशी फोनवर बोलतात, तेव्हा तेव्हा ती सांगते, “कधीही काही चुकीचे करू नकोस, कोणाशीही वाईट वागू नकोस नि सतत गरिबांसाठी काम करत राहा.”

कठोर परिश्रमाचा जीवनमंत्र

पंतप्रधान मोदी सांगतात की त्यांच्या आईवडिलांचा प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान हे त्यांचे सर्वात मोठे गुण होते. “गरिबीशी आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या अनेक आव्हानांशी झुंज देत असूनही आईवडिलांनी कधी प्रामाणिकपणाची कास सोडली नाही की कधी स्वाभिमान बाजूला ठेवला नाही. कोणत्याही आव्हानांवर मात करण्यासाठी ‘सातत्यपूर्ण कठोर परिश्रम’ हाच त्यांचा पहिला मंत्र असे !”, पंतप्रधान सांगतात.

मातृशक्तीचा आदर्श

पंतप्रधान मोदी पुढे म्हणतात, “माझ्या आईच्या जीवनात मला दिसते ते तपाचरण, त्याग आणि भारताच्या मातृशक्तीचे योगदान. मी जेव्हा जेव्हा आईकडे आणि तिच्यासारख्या कोट्यवधी स्त्रियांकडे बघतो, तेव्हा तेव्हा मला असे जाणवते की भारतीय स्त्रियांना मिळवता येणार नाही, असे काहीच नाही. त्या सर्व काही संपादन करू शकतात.”

आपल्या आईची प्रेरक जीवनगाथा

पंतप्रधान सारांशाने शब्दबद्ध करतात-

“वंचिततेच्या प्रत्येक कहाणीच्या पार पलीकडे असते, एका मातेची तेजस्वी कथा, प्रत्येक संघर्षापेक्षा कितीतरी उंचावर असते, एका मातेच्या ठाम निर्धाराची गाथा”.