Home Blog Page 1922

410 हज यात्रेकरूंची पहिली तुकडी मुंबईतून रवाना

0

सुमारे 8,000 हज यात्रेकरूंना घेऊन जाण्यासाठी मुंबईतून 19 विमाने  उड्डाण करणार

मुंबई, 18 जून 2022

हज 2022 यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीने आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. या यात्रेकरूंना केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी निरोप दिला. ‘मुंबई एम्बार्केशन पॉईंट’ वरून एकूण 410 हज यात्रेकरू पहिल्या तुकडीमध्ये सहभागी झाले. यामध्ये 207 पुरुष आणि 203 महिला हज यात्रेकरूंचा समावेश आहे. सुमारे 8000 हज यात्रेकरूंसाठी  मुंबई एम्बार्केशन पॉईंटवरून 19 उड्डाणे करण्‍यात येणार आहेत.

“भारतातील हज यात्रेकरूंनी संपूर्ण जगाच्या शांती आणि समृद्धीसाठी त्याचबरोबर  मानवाला सर्व प्रकारच्या संकटांपासून सुरक्षित ठेवण्‍यासाठी प्रार्थना करावी ,” असे आवाहन नक्वी  यांनी करून यात्रेकरूंना त्यांची यात्रा यशस्वी होण्‍यासाठी शुभेच्छा दिल्या.

सौदी अरेबियाचे अधिकारी आणि प्रतिनिधी भारतातील हज यात्रेकरूंच्‍या चांगल्या वर्तनाबद्दल नेहमीच कौतुक करतात, असेही नक्वी यांनी यावेळी  नमूद केले. तसेच 2022 मध्ये हजला जाणारे भारतीय मुस्लिम हा विश्वास कायम ठेवतील, अशी आशा नक्वी यांनी  व्यक्त केली. अशा महत्त्वाच्या काळात भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी सौदी अरेबियाच्या दूतावासाचे अधिका-यांचे आभार मानले. “सौदी अरेबियाने यावर्षी भारतातून जास्तीत जास्त हज यात्रेकरूंना परवानगी दिली आहे,” असेही नक्‍वी यावेळी म्हणाले.

100% डिजिटल/ ऑनलाईन अर्जप्रक्रिया आणि यात्रेकरूंसाठी सुधारित सोयीसुविधा यांसारख्या महत्त्वपूर्ण सुधारणांसह हज 2022 यशस्वीरित्या सुरू असल्याचे नक्वी यांनी सांगितले.  ‘डिजिटल हेल्थ कार्ड’ , ‘ई-मसीहा आरोग्य सुविधा’ आणि ई-लगेज प्री- टॅगिंग यासह मक्का मदीना येथील निवास तसेच वाहतूक यांसंबंधीची संपूर्ण माहिती देणाऱ्या  अनेक ऑनलाइन/ डिजिटल सुविधा हज यात्रेकरूंना पुरवण्यात आल्या आहे असे नक्वी यांनी सांगितले.

हज 2022 साठी जाणाऱ्या भारतीय मुस्लिमांपैकी 50% महिला यात्रेकरू आहेत.

एकंदर 79,237 भारतीय मुस्लिम हज 2022 साठी जात आहेत,अशी माहिती नक्वी यांनी दिली.  लक्षणीय बाब म्हणजे हज यात्रेकरूंपैकी 50 % महिला यात्रेकरू आहेत.  1800हून अधिक मुस्लिम महिला हज 2022 साठी ‘महरम’ अथवा पुरुष सोबत्याशिवाय हजयात्रेला जात आहेत. महाराष्ट्रातून 4,874 यात्रेकरूंनी हज 2022 साठी नोंदणी केली आहे.

हज 2022 साठीमुंबईव्यतिरिक्त दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, कोची, लखनऊ, श्रीनगर आणि गुवाहाटी अशा नऊ  एम्बार्केशन पॉईंटवरून (प्रस्थानबिंदूंवरून) विमान उड्डाणे संचालित केली जात आहेत.

सौदी अरेबियाचे मुंबईतील रॉयल कौन्सुल जनरल एच.ई.  सुलेमान बिन ईद अलोतैबी ; भारतीय हज कमिटीचे अध़्यक्ष ए.पी.अब्दुल्लाकुट्टी; भारतीय हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहम्मद याकुब शेखा आणि इतर वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

फुगेवाडी मेट्रो स्थानकावर साजरा होणार यंदाचा योगदिन

0

पुणे-

आगामी आंतराष्ट्रीय योग्य दिनानिमित्त भारत सरकार देशाच्या विविध भागात विशेष योग उत्सव साजरा करत आहे. देशातील विशेष व ऐतिहासिक अशा 75 स्थानांची यासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक मंत्रालयाला एक स्थान देण्यात आले आहे. पुण्यामध्ये केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीमध्ये योग उत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील फुगेवाडी मेट्रो स्टेशनवर या योगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, महाराष्ट्रचे संचालक पी. एम. पारलेवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय; राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, आयुष मंत्रालय, पुणे; केंद्रीय संचार ब्युरो, माहिती व प्रसारण मंत्रालय, पुणे व पुणे मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून रोजी पुण्यामध्ये हा योग दिन साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत देण्यात अली.    

फुगेवाडी मेट्रो स्टेशनवर सकाळी 6.30 ला या योगोत्सवाचे व माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, पुणे तर्फे आयोजित तीन दिवसीय योग व योगगुरुंबद्दल माहिती देणारे चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात येईल. त्यानंतर 6.40 ते 7.00 वाजेपर्यंत म्हैसूर, कर्नाटक येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण उपस्थित नागरिकांसाठी होईल. त्यानंतर 7.00 ते 7.45 या वेळात सामान्य योग सत्र म्हणजेच नियमित सोपे योग सत्र घेण्यात येईल. या कार्यक्रमासाठी एक हजाराहून अधिक नागरिक उपस्थित राहू शकतील असे नियोजन करण्यात आले असल्याचे पारलेवार यांनी यावेळी सांगितले.

पुण्यातील नागरिकांसाठी ऐतिहासिक नव्हे तर आधुनिक व सार्वजनिक अशा ठिकाणी योग दिन आयोजित करत आहोत, ज्याच्याशी नागरिकांचा नव्याने परिचय होत आहे, याबद्दल आनंद असल्याची भावना डॉ. सत्यलक्ष्मी यांनी व्यक्त केली. वाहनतळ, प्रवेश व तिकीट मजला तसेच प्रत्यक्ष मेट्रो प्लाटफॉर्म अशा तीन मजल्यांवर 21 जून रोजी फुगेवाडी मेट्रो स्टेशनवर सहभागी नागरिकांसह योग सराव/प्रात्यक्षिक होणार आहे. या सर्व नागरिकांसाठी योगा मॅट, सात्विक अल्पोपहार याची व्यावस्था राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेतर्फे करण्यात अली आहे, अशी माहिती संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. के सत्यलक्ष्मी यांनी दिली.

प्राचीन योग आधुनिक तंत्रज्ञानाचा भाग असलेल्या मेट्रो सोबत होणार आहे, हि एक विशेष बाब आहे, या उत्सवात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे आणि मेट्रोचे काम देखील पाहावे, असे आवाहन पुणे मेट्रोचे अधिकारी मनोजकुमार डॅनियल यांनी यावेळी केले. प्रथम येणाऱ्या एक हजार नागरिकांना फुगेवाडी ते पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आणि परत असा मोफत प्रवास दिला जाईल. केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने हा मोफत प्रवास प्रायोजित केला आहे, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

केंद्रीय संचार ब्युरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, पुणे यांच्या तर्फे आयोजित तीन दिवसीय योग चित्र प्रदर्शनाचा लाभ देखील पुण्यातील नागरिकांनी घ्यावा; हे प्रदर्शन मोफत असून प्लॅटफॉर्म तिकीट काढण्याची देखील आवश्यकता नसल्याचे ब्युरोचे उपसंचालक निखील देशमुख यांनी स्पष्ट केले.

याशिवाय सह्याद्री हॉस्पिटल एक वैद्यकीय शिबिर उभारून आपला सहभाग देणार आहेत. या माध्यामातून प्रथमोपचार व कार्यक्रमातील सर्व सहभागींसाठी मोफत आरोग्य शिबिर उपलब्ध असेल. 

पंतप्रधानांचे भाषण आणि सामान्य योगाभ्यास देखील शहरातील विविध ठिकाणी एलईडी प्रोजेक्टरद्वारे थेट स्क्रीनिंग केले जाईल. IDY कार्यक्रमाचे तपशील होर्डिंग्ज, बॅनर, सोशल मीडिया पोस्ट, फ्लॅश मॉब आणि विविध कार्यालये, नामवंत व्यक्ती आणि पुणे जिल्ह्यातील रहिवाशांना आमंत्रण देऊन प्रसारित आणि प्रसिद्ध केले जात आहेत. योग दिनाच्या प्रचार आणि प्रचारासाठी, रेड एफएम 93.5 वर रेडिओ जिंगलद्वारे कार्यक्रमाची रूपरेषा सर्व लोकांसाठी प्रसारित केली जात आहे.

विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग-पटोलेंचा आरोप

0

मुंबई-आमच्या (मविआ) आमदारांना फोन करून धमकावण्याचा प्रयत्न केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू आहे, असा आरोप शनिवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते मुंबईत बोलत होते. विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणाचा दुरुपयोग सुरू आहे. आमदारांना धमकावल्याची माहिती आम्हाला मिळत आहे. ज्या प्रकारे ते फोनवर आमच्या आमदारांना बोलतात, त्यांची भाषा ऐकूण विरोधकांना केंद्राच्या सत्तेची गर्मी आली आहे. आमच्याकडे या साऱ्या प्रकाराची रेकॉर्डिंग असून, वेळ आल्यावर सर्व पुरावे समोर आणू, असा इशाराही त्यांनी दिला.विधान परिषद निवडणुकीत आम्ही नक्कीच जिंकू. त्यानंतर मात्र, जनतेसमोर या सर्व क्लिप आणू. महाविकास आघाडीने केंद्रीय तपास यंत्रणांचा आणि भाजपचे स्टिंग ऑपरेशन केल्याचेही त्यांनी सांगितले.

देश कुठे चाललाय?

पटोले म्हणाले की, या पद्धतीची लोकशाही असू शकत नाही. मतदानाच्या अधिकारापासून वंचित करण्याचे काम ज्या पद्धतीने सुरू आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीन न्याय मिळवण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन संरक्षण देण्याची मागणी करतात, याचा अर्थ आपला देश कुठल्या दिशेने चालला आहे, याचा अंदाज सगळ्यांना यायला पाहिजे.

योग्य वेळी भूमिका मांडू

पटोले म्हणाले की, योग्य वेळी आम्ही जनतेसमोर ही भूमिका मांडणार आहोत. आमच्याकडे त्यांची रेकॉर्डिंगही आहे. ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग सुरू आहे. ते आम्हाला या निवडणुकीच्या तोंडावर लक्षात आले आहे. आम्हाला मतदान करा, नाहीतर आम्ही तुमच्यावर कारवाई करू, अशा धमक्या आमच्या आमदारांना आलेल्या आहेत. ही परिस्थिती लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे. भाजपने किती त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडीचे सर्व सहा उमेदवार विधान परिषदेवर निवडून येतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

20 तारखेला चमत्कार घडेल-अजितदादांचा वादा

0

मुंबई-विधान परिषद निवडणुकीत 20 तारखेला चमत्कार घडेल, असा दावा शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. ते मुंबईत बोलत होते. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार यावेळी निवडून येतील. कोटा कसा जास्त राहू शकेल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, हे सांगताना शिवसेनेच्या सहयोगी अपक्षांना आम्ही फोन केले अशी कबुली त्यांनी यावेळी दिली.

होय, आम्ही कॉल केला

अजित पवार म्हणाले, शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून येण्यास काहीच समस्या नाही. कारण त्यांचे मतदार आणि काही अपक्षांचा शिवसेनेला पाठिंबा आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येतील. मविआची एकजूट आहे. काही जणांकडे मतदार कमी पडत असल्याने नेत्यांकडून अपक्षांना फोन करण्यात आले. मात्र शिवसेनेच्या सहयोगी आमदारांनी मुख्यमंत्री जे सांगतिले तसे करू, असे सांगितल्याचेही ते म्हणाले.

आमदारांना मार्गदर्शन करणार

अजित पवार म्हणाले, राज्यसभेवेळी आमची मते बाद ठरवण्यात आली. मात्र, विधान परिषदेच्या वेळी आम्ही निवडणुकीत मत बाद होणार नाही यासाठी प्रयत्न करू. साधारण 30 कोटा केला तरी शिवसेनेचे 2 उमेदवार निवडून येतात. तर राष्ट्रवादीचे दोन मतदारांना मतदान करण्याची परवानगी नाही. यामुळे अपक्षांच्या मदतीने आम्ही दुसरा उमेदवार निवडून आणू. अपक्ष आमदारांना योग्य आदर देत त्यांचे मत पदरात पाडून घ्यावे लागते, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.

पवार बैठकीला मार्गदर्शन करणार

अजित पवार म्हणाले की, आज संध्याकाळी आमच्या आमदारांची बैठक आहे. या बैठकीला शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. मला अजून कोणत्याही सूचना आल्या नाही. कुणीही दबाव आणल्याचे अजून सांगितले नाही. यावेळी आमदार निवडून देत असताना आपल्याकडे व्यवस्थित कोटा आहे. मागच्यावेळी आमचे उमेदवार निवडून देऊन कमी मते उरत होती. त्यामुळे आम्ही एकत्र बैठक घेतली होती. मात्र, आता शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून येतील असे चित्र आहे.

पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची घ्यावयाची काळजी:भाग-२

0


शेतकऱ्याने जनावरांच्या बाबतीत योग्य खबरदारी घेतली तर त्यांना होणारे आजार टाळता येतात. तरी देखील पावसाळ्यात जंतूसंसर्ग किंवा योग्य पोषणाअभावी जनावरांना विविध प्रकारचे आजार होतात. गायींना घटसर्प, फऱ्या, पोटकृमी, विषबाधा, तिवा, अपचन अशा प्रकारच्या विविध आजारांना सामोरे जावे लागते. तसेच शेळी, मेंढींना फुटरॉट, आंत्रविषार, विषबाधा, हिमरेझीक सेप्टिसेमियाजंतप्रार्दुभाव, यासारखे आजार होतात. या आजारावर वेळीच उपचार केल्यास होणारे नुकसान टाळता येते.

घटसर्प
या आजारामध्ये जनावरांना अधिक प्रमाणात ताप येतो. श्वास घेण्यास त्रास होवून घशा भोवती सूज येवून जनावरे मृत्युमुखी पडतात. जनावरांच्या शरीरामध्ये घटसर्पाचे जंतू असतात परंतू वातावरणात झालेला बदल व उन्हाळ्यात पौष्टिक चारा न मिळाल्यामुळे शरीरावर ताण येऊन त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे या आजाराचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होतो. जनावरांना आजार होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वी हिमरेझीक सेप्टिसेमिया या घटसर्प प्रतिबंधक लसीची मात्रा दिल्यास या आजारापासून जनावरांचे रक्षण होते.

फऱ्या
या आजारात जनावरांना ताप येतो व एक किंवा दोन्ही पायांना सूज येऊन जनावरे लंगडतात. कमी वयाची जनावरे या रोगास जास्त बळी पडतात. त्यामुळे जनावरांचे वेळीच लसीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी पावसाळ्यापूर्वी ब्लॉक क्वार्टर (बीक्यू) ही लस घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रामुख्याने दोन वर्षाच्या आतील वासरांचे शंभर टक्के लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे.

पोटफुगी किंवा अपचन
पावसाळ्यात हिरवा चारा उपलब्ध होतो. परंतू अचानक चाऱ्यांमध्ये बदल केल्यास तर पोटफुगी होऊन जनावरे दगावतात. चाऱ्यात बदल करतांना थोड्या थोड्या प्रमाणात पूर्वीचा व नवीन चारा एकत्र करुन खाण्यासाठी द्यावा. हिरवा चाऱ्यांबरोबरच वाळलेला चाराही देण्यात यावा. पिण्यासाठी स्वच्छ पाणी देण्यात यावे त्यामुळे अपचन थांबविता येते.

फुटरॉट
शेळी व मेंढीमध्ये पावसाळ्यात चिखल व पाण्यामुळे खुरामध्ये जंतुची वाढ होऊन पायांना व खुरांना सूज येते तसेच तापही येतो. शेळ्या चालतांना लंगडतात. खुरांची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. यासाठी पोटाशिअम परमॅगनेटच्या द्रावणामध्ये खुरे बुडवून स्वच्छ धुतल्यास हा आजार आटोक्यात येते.

आंत्रविषार
शेळी व मेंढी मध्ये ह्या आजारांची मोठ्या प्रमाणात लागण होते. जास्त प्रमाणात कोवळे गवत खाल्यास अपचन होते. यावेळी शेळ्या आजारी पडून चालतांना अडखळतात. तोल जावून श्वास घेण्यास त्रास होतो. पोट फुगी किंवा जुलाब होवून जनावरे दगावतात. पावसाळ्यापूर्वी लसीकरण केल्यास आजार नियंत्रणात येतो. जनावरांना योग्य प्रमाणात चारा खाण्यास द्यावा. शेळी व मेंढ्यांना एंटरोटोक़्झेमिया (ईटी) लस १४ दिवसाच्या अंतराने दोनवेळेस देण्यात यावी.

जंत प्रादुर्भाव:
पावसाळ्यात विविध प्रकारचे जंत पाण्यात मिसळल्यामुळे पाणी दूषित पाणी होते. असे दूषित पाणी पिल्यामुळे लिव्हर फ्ल्यूक, गोलकृमी, पट्टकृमी या जंताचे शरीरात प्रमाण वाढून प्राणी दगावतात. हे जंत वाढण्यासाठी गोगल गायी कारणीभूत असतात. त्यामुळे त्यांची संख्या नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. पावसाळ्यापूर्वी आपल्या सर्व जनावरांना जंतनाशक औषध पाजून घेतल्यास जंताचे प्रमाण कमी होते आणि प्राण्याची उत्पादनक्षमता वाढून दगावण्याचे प्रमाण कमी होते.


पावसाळ्यामध्ये पशुधनांच्या आवश्कतेनुसार लसीकरण करणे, गोठ्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन केल्यास पशुधनांची उत्पादकता वाढवून संभाव्य मरतुकीपासून बचाव होवू शकतो. जनावरांमध्ये आजार आढळल्यास पशुपालकांनी अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा १९६२ या टोल फ्री क्रमांक साधावा- उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. शीतलकुमार मुकणे
जिल्हा माहिती कार्यालय पुणे

पाऊस आनंदाचा….अन् क्षण दक्षतेचा!

0

उन्हाळ्यातील घामाच्या धारांनी बेजार झाल्यानंतर येणारा पावसाळा सर्वांना सुखावणारा असतो. पाऊस धो-धो बरसायला लागला की नदी-नाले वाहू लागतात, डोंगर-कपारीत धबधबे कोसळू लागतात. सृष्टी हिरवागार शालू नेसते. अशा वातावरणाचा आनंद घेण्याचा मोह आवरत नाही. विशेषत: तरुणाई मोठ्या प्रमाणात पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडते. मात्र अशावेळी खबरदारी नाही बाळगली तर ते दुर्घटनेला आमंत्रण ठरते. फक्त भटकंती करणाऱ्यांनीच नाही तर सर्वांनी पावसाळ्यात काही गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात.

पावसाचा आनंद जरूर घ्यावा, मात्र वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना बाहेर जाणे टाळावे. मोकळ्या जागेत असल्यास आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जावून गुडघ्यात डोके घालून बसावे. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. घराची बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये. घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्वरित बंद करावीत.

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाइन दूरध्वनीचा वापर करु नये. शॉवरखाली आंघोळ करु नये. घरातील बेसिनचे नळ, जलवाहिनीला स्पर्श करु नये. कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करु नये. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे सुरू असताना लोखंडी धातूच्या साहाय्याने उभारलेल्या तंबू, शेड, उंच झाडाच्या खाली आसरा घेवू नये. धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नये. घरात असाल, तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

माहिती घ्या, अफवा टाळा

पूर येण्यापूर्वी नागरिकांनी व्हॉटस्ॲप किंवा इतर समाज माध्यमांवर कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये. आपत्कालीन परिस्थितीसाठी ‘एसएमएस’चा उपयोग करावा. आपला मोबाईल चार्ज करुन ठेवावा. हवामानातील बदलांची अद्ययावत माहिती रेडिओ, टी.व्ही.वर पाहत राहावी. गुरेढोरे, पशुंच्या सुरक्षिततेची सोय सुनिश्चित करुन घ्यावी.

आवश्यक वस्तूसह आपत्कालीन कीट तयार ठेवावी. आपली कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू जलरोधक पिशवीत जवळ ठेवावे. जवळपास असलेली निवारा, पक्के घराकडे जाण्यासाठी सुरक्षित मार्ग जाणून घ्यावा. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशनाचे पालन करावे. कमीत कमी एका आठवड्यासाठी पुरेसे खाण्याजोगे अन्न आणि पिण्यासाठी पाणी साठवा, पूर असलेल्या क्षेत्रातील कालवे, नाले, ड्रेनेज वाहिन्यापासून नागरिकांनी सतर्क राहावे.

पूर आल्यास घ्यावयाची खबरदारी

पूर पहायला जाण्याचा मोह टाळावा. पूर परिस्थितीत मदतकार्य सुरू असताना त्यात अडथळा येईल असे वर्तन करू नये. पूर प्रवाहात प्रवेश करू नये. सिवरेज लाईन, गटारे, नाले, पूल, नदी, ओढे इत्यादी पासून दूर रहावे. विद्युत खांब आणि पडलेल्या वीज लाईन पासून दूर रहावे. ओपन ड्रेन किंवा धोक्याच्या ठिकाणी चिन्हे (लाल झेंडे किंवा बॅरीकेड्स) सह चिन्हांकित करा. पुराच्या पाण्यामध्ये चालू नका किंवा गाडी चालवू नका. लक्षात ठेवा, दोन फूट वाहणारे पुराचे पाणी मोठ्या मोटारींना सुद्धा वाहून नेऊ शकते. ताजे शिजलेले किंवा कोरडे अन्न खावे. आपले अन्न झाकून ठेवा. उकळलेले, क्लोरीन युक्त पाणी प्यावे. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जंतुनाशकाचा वापर करावा.

पूर ओसरल्यावर आरोग्याची काळजी घ्या

पूर येऊन गेल्यानंतर मुलांना पुराच्या पाण्यामध्ये किंवा जवळपास खेळू देऊ नका. कोणतीही खराब झालेली विद्युत वस्तू वापरू नका, त्यापूर्वी तपासणी करा. सूचना दिल्या असल्यास, मुख्य स्विचेस आणि विद्युत उपकरण बंद करा तसेच ओले असल्यास विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका. तुटलेली विद्युत खांब आणि तारे, तीक्ष्ण वस्तू आणि मोडतोड अथवा पडझड झालेल्या वस्तूंपासून सावध रहा. पुरातील पाण्यात वाहून आलेले अन्न खाऊ नका. मलेरिया पासून बचाव करण्यासाठी डासांच्या जाळीचा वापर करा. सापांबद्दल सावधगिरी बाळगा कारण पुरामध्ये सर्पदंश होण्याची शक्यता असते. जर गटार लाईन फुटली असेल तर शौचालयाच्या किंवा पिण्याच्या पाण्याचा नळ वापरू नका. आरोग्य विभागाने सांगितल्याशिवाय नळाचे पाणी पिऊ नका.

पूरात जीव धोक्यात घालण्यापेक्षा प्रशासनाच्या सूचनांचे पालन महत्वाचे

पूर आल्यावर सुरक्षित ठिकाणी जाण्याची वेळ आल्यास घरातील वस्तू पलंगावर आणि टेबलावर ठेवा. शौचालयाच्या वाडग्यात वाळूच्या बॅग्स ठेवा आणि सांडपाणी परत येऊ शकते (बॅक फ्लो). ते टाळण्यासाठी सर्व ड्रेन होल झाकून ठेवा. वीज आणि गॅस कनेक्शन बंद करा. उंच मैदान, सुरक्षित ठिकाणी जा. आपत्कालीन कीट, प्रथमोपचार बॉक्स, मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे आपल्याबरोबर घ्या. खोल, पाण्यात प्रवेश करू नका, पाण्याची खोली तपासण्यासाठी काठी वापरा. जेव्हा सक्षम अधिकारी आपल्या घराची तपासणी करून ते राहण्यास योग्य असल्याबाबत सांगतील व घरी परत जाण्याची परवानगी देतील तेव्हाच घरात प्रवेश करा. कौटुंबिक संप्रेषण योजना बनवा. ओली झालेली प्रत्येक गोष्ट स्वच्छ आणि निर्जंतुक करा, प्रशासनाच्या सूचनाचे पालन करावे.

जिल्हा माहिती कार्यालय पुणे

पुण्यामध्ये पुन्हा एकदा झळकणार YOO चे वास्तूसौंदर्य

पुण्यामध्ये आलिशान निवासी प्रकल्प साकारण्यासाठी ट्रायबेकाची YOOबरोबर भागीदारी

ट्रायबेका डेव्हलपर्स (Tribeca Developers) आणि ट्रायकॉन इन्फ्रा बिल्डटेक प्रा. लि. (TriconInfra Buildtech Pvt. Ltd.) यांनी आज एनआयबीएम रोडदक्षिण पुणे येथे “YOO ONE” या आलिशान निवासी प्रकल्पाच्या शुभारंभाची घोषणा केली. हा प्रकल्प म्हणजे सुप्रसिद्ध YOO ब्रॅण्डच्या दक्षिण पुण्यातील प्रवेशाची नांदी असणार आहे तर संपूर्ण जगातील सर्वाधिक YOO ब्रॅण्डेड प्रॉपर्टीज असलेल्या पुणे शहरातील हा तिसरा YOO प्रकल्प असणार आहे. सुझॅन खान फॉर YOO या प्रकल्पाच्या इंटिरिअर डिझायनर असणार आहेत.

द आर्क या १८ लाख चौरस फुटांच्या क्षेत्रावर उभारल्या गेलेल्या प्रकल्पाच्या रूपात ट्रायबेकाने शहरामध्ये प्रवेश केल्यानंतर १८ महिन्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. मिश्र वापरासाठीच्या विकास प्रकल्पातील जागा अत्यंत वेगानेअवघ्या १५ महिन्यांमध्ये ४५० कोटी रुपयांहून अधिक किंमतीला विकल्या गेल्या होत्या.

YOO पुणे आणि YOO व्हिलाजच्या माध्यमातून २०१२ मध्ये शहरात पदार्पण करणा-या YOO ब्रॅण्डला पुण्याच्या उच्चभ्रू वर्गाची मोठी मागणी असल्याचे दिसते. हे दोन्ही प्रकल्प पुण्यातील सर्वात मोठे विकासक असलेल्या पंचशील रिअल्टीद्वारे साकारण्यात आले होते. तर ट्रायबेका ही आलीशानब्रॅण्डेड निवासी जागांच्या क्षेत्रातील एक अनुभवी स्पर्धाशील कंपनी असून ट्रम्प ऑर्गनायझेशन खालोखाल ट्रम्प ब्रॅण्डेड मालमत्तांची ती सर्वात मोठी विकासक कंपनी आहे.

काच व झिंक यांची अप्रतिम दर्शनी बाजू असणारे व एका बाजूला २०० एकरांचे संरक्षित जंगल तर दुसया बाजूला सह्याद्री पर्वतरांगा यांचे विहंगम दृश्य दिसेल असे टॉवर्स ही YOO ONE ची खास ओळख असणार आहे. रचनासौंदर्य हे येथील निवासी जागांच्या केंद्रस्थानी आहे. येथील प्रत्येक खोलीमध्ये जमिनीपासून छतापर्यंत पोहोचलेल्या महागड्या खिडक्यांमधून येणारा उजेड या घरांना नैसर्गिक प्रकाशाने भरून टाकतो व शहरलगतचे जंगल आणि सह्याद्री यांचे मनोहारी दर्शन घडवतो.

येथील रहिवाशांना १.५ एकर जागेवर पसरलेल्या रूफटॉप टेरेसवर आणि YOO ONE क्लबच्या माध्यमातून इन्फिनिटी पूलस्पा अँड फिटनेस सेंटर विथ सौनास्टीम आणि मसाज रूम, लायब्ररीलाउंजगेम्स रूमलहान मुलांचा प्ले एरियाएक फाइन-डाइन रेस्टॉरंट आणि बिझनेस सेंटर अशा अनेक आलिशान सोयीसुविधांचा आनंद उपभोगता येणार आहे. या इमारतीसाठी काटेकोरपणे निवडला गेलेला कर्मचारीवर्ग रहिवाशांना इन-रेसिडन्स केटरिंगघरगुती कामांसाठीची मदत२४ तास डोअरमॅन आणि व्हॅले पार्किंग सेवा पुरवेल.

YOO ONE या प्रकल्पाची अंदाजित किंमत रु. ४५० कोटी रुपये इतकी असून यात १.९ कोटी रुपयांपासून ते ३.६ कोटी रुपयांपर्यंत किंमतीची ३ व ४ बेडरूम घरे उपलब्ध आहेत.

ट्रायबेकाचे संस्थापक श्री. कल्पेश मेहता म्हणाले, एक विलक्षण ठिकाण आणि एक उत्कृष्ट ब्रॅण्ड यांनी एकत्र येऊन खरोखरीच काहीतरी भव्यदिव्य उभारल्याच्या काही अत्यंत मोजक्या घटनांपैकी ही एक घटना आहे. निव्वळ आराखडा तयार करण्यासाठी १२ महिने घेतल्यानंतरअचूकता साधण्याच्या असंख्य प्रयत्नांनंतर आम्ही केलेल्या या निर्मितीचा मला प्रचंड अभिमान वाटत आहे. YOO ONE हा प्रकल्प सर्व अपेक्षांच्या पार जाणारा आहे. हा प्रकल्प म्हणजे केवळ निवडक लोकांसाठीच घर नसेल तर पुणे शहरातील ते एक मानचिन्ह असेल.

YOO ग्रुपचे चेअरमन जॉन हिचकॉक्स म्हणाले, YOO ONE च्या उद्घाटनाच्या घोषणेहून आणि ट्रायबेका व ट्रायकॉनच्या साथीने काम करण्याहून अधिक आनंददायी आमच्यासाठी काहीही नाही – YOO साठी ही आणखी एक थोर भागीदारी आहे. चांगल्या वास्तूरचनेमुळे जगण्याला एक आगळी उंची प्राप्त होते आणि आमच्या सर्वच प्रकल्पांच्या माध्यमातून आम्ही याच गोष्टीशी कटिबद्ध आहोतआणि या नव्या विलक्षण इमारतीमधील घरांना आपल्या समकालीन शैलीतील अभिजाततेचा स्पर्श देणा-या सुझॅन खान यांच्याबरोबर काम करण्यासाठी तर आम्ही विशेष उत्सुक आहोत.

ट्रायकॉनचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. ब्रजेश सिंग यांच्या मते: “आपल्या शहरामध्ये एक जागतिक दर्जाचे मानचिन्ह उभारण्याचे स्वप्न मी नेहमीच पाहिले आहे. आणि हे स्वप्न साकारण्यासाठी आयकॉनिक YOO ब्रॅण्ड दक्षिण पुण्यामध्ये घेऊन येण्याहून अधिक चांगला मार्ग तो कोणता असणार? हा प्रकल्प या शहराला समर्पित करताना त्यात एकही तपशील सोडलेला नाही वा खर्चात कुठलीही काटकसर करण्यात आलेली नाही. YOO ब्रॅण्डला असलेली वैश्विक ओळख व सर्वोत्कृष्ट घरांची उपलब्धता यामुळे पुण्यातील आलिशान निवासी जागांच्या बाजारेठेसाठी ही चिरंतन जतन करावी अशी वास्तू असणार आहे.

ट्रायबेका विषयी

ट्रायबेका ही एक स्पेश्यालिटी रिअल इस्टेट डेव्हलपर कंपनी आहेजी जागतिक दर्जाची उत्पादने व ग्राहक अनुभव निर्माण करण्यावर आपले लक्ष केंद्रित करते. ट्रायबेकाने ट्रम्प ब्रॅण्ड देशात आणून ब्रॅण्डेड राहत्या जागांची संकल्पना भारतात प्रथम आणली. आता भारतातील सर्वाधिक ब्रॅण्डेड निवासी प्रकल्पांशी ट्रायबेकाचे नाव जोडलेले आहे.

शाश्वत पर्यावरणासाठी आपले योगदान देण्यावर ट्रायबेकाचा विश्वास आहे आणि ऊर्जाबचत साधणारी जबाबदार घरे विकसित करण्यावर तसेच पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होऊ नये अशाप्रकारचे साहित्य व संसाधना वापरण्यावर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे. सध्याट्रायबेकाद्वारे भारतात ५ दशलक्ष चौ. फुटांच्या क्षेत्रावर ब्रॅण्डेड निवासी प्रकल्प उभारले जात आहेत, ज्यांचे विक्रीमूल्य रु. ६,००० कोटी रुपये इतके आहे व ४ दशलक्ष चौरस फुटांहून अधिक क्षेत्रावरील विकासकामे सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

ट्रायकॉन विषयी

भारताच्या पायाभूत सोयीसुविधा उभारणीच्या गरजा पूर्ण करण्यामध्ये योगदान देण्याच्या हेतूने पहिल्या पिढीचे उद्योजक श्री. ब्रजेश सिंग यांनी २००९ मध्ये ट्रायकॉन इन्फ्रा बिल्डटेक प्रा. लि. ची स्थापना केली. ही आयएसओ प्रमाणित कंपनी व्यावसायिकनिवासीशैक्षणिकहॉस्पिटल्स आणि हॉटेल बिल्डिंग्जच्या डिझाइन व बांधकामासाठी कॉन्ट्रॅक्टिंग सेवांचा विस्तृत संच पुरविते. एक संस्था ते आम्ही दर्जासुरक्षितता आणि वेग त्याचबरोबर खर्चाचा इष्टतम वापर या गोष्टींवर विशेष भर देतात.  

त्यांचे सेंट्रलाइझ्ड फॉर्मवर्क यार्ड हा कंपनीचा आधारस्तंभ आहे, जिथे उच्च दर्जाची शटरिंग्ज डिझाइन केली जातात व त्यांची निर्मिती केली जातेज्यातून त्यांच्या ग्राहकांना दर्जाची हमी मिळते व साहित्याच्या पुनर्निर्मितीद्वारे पर्यावरणाला शाश्वततेची खात्री मिळते.

YOO विषयी

YOO ही जगातील सर्वात वैविध्यपूर्ण आणि सुविख्यात रचनापद्धती आहे.

YOO हे नाव फक्त रचनेपुरतेच मर्यादित नाही तर अप्रतिम आलिशान वास्तू आणि सामायिक जागांच्या माध्यातून एक जीवनशैली निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहेजिथे लोकांना एकत्र येता येईल व एकमेकांविषयी जाणून घेता येईल. अशा वास्तू जिथे लोकांना कोणतीही गोष्ट अशक्य नाही असा विचार करण्याची प्रेरणा मिळावी.

YOO जागतिक आहेमात्र तिच्या रचना स्थानिक आहेत. या रचनांमध्ये स्थानिक संस्कृती आणि रीतिरिवाज सामावून घेणे आम्हाला महत्त्वाचे वाटते. स्थानिक लोकांना ज्या गोष्टींपासून प्रेरणा मिळतेआम्हीही तिथूनच प्रेरणा घेतो.

YOO ही एक ब्रॅण्डेड लाइफस्टाइल अँड डिझाइन यांना महत्व देणारी वास्तूकार कंपनी आहे.

अस्सल डिझाइन्सच्या माध्यमातून जगणे अधिक समृद्ध करणे आणि विवेकाने जगण्यावर भर देणारे समुदाय तयार करणे हे YOO चे तत्व आहे.

जॉन हिचकॉक्सचेअरमन, YOO ग्रुप

१९९९ मध्ये स्थापन झालेला YOO डिझाइन स्टुडिओ हा आर्किटेक्ट्सइंटिरिअर डिझायनर्स आणि प्रोडक्ट डिझायनर्सचा एक पुरस्कार विजेता समूह आहे. YOO हेड ऑफ डिझाइनमार्क डेव्हिसन यांच्या सर्जनशील मार्गदर्शनाखाली या संस्थेचे काम चालते. 

जगभरात आपला विशिष्ट ठसा उमटविणा-या निवासी इमारतीहॉटेल आणि खासगी कमिशन प्रोजेक्ट्सचे डिझाइनिंग करणारा YOO डिझाइन स्टुडिओ फिलिप स्टार्कजेड जॅगरमार्सेल वॉण्डर्सकेट मोसस्टीव्ह लुंग आणि सुझान खान यांच्या सहयोगाने साकारलेल्या रचनाही उपलब्ध करून देतो. याच अनुभवामधून या स्टुडिओकडे अनोख्या रचनांसाठीची एक विशिष्ट दृष्टी तयार झाली आहेजी केवळ जगातील सर्वोत्कृष्ट प्रतिभेसह काम केल्यानेच मिळू शकते. 

रचनेकडे लवचिक दृष्टीकोनातून पाहणा-या YOO डिझाइन स्टुडिओकडे ३६ देशांतील कामांचा अनुभव आहे. या अनुभवांमुळे कंपनीने स्थानिक संस्कृतीरीतिरिवाज आणि रचनेच्या गरजा याविषयीची सखोल जाण प्राप्त केली आहे.

सुझॅन खान यांच्याविषयी

सुझॅन यांनी ब्रुक्स कॉलेजलाँग बीचकॅलिफोर्निया येथून इंटिरिअर डिझाइन या विषयात असोसिएट आर्ट डिग्री मिळवली आहे. त्यानंतरच्या वर्षांमध्ये त्यांनी गृहसजावट आणि संकल्पनात्मक रचनांची स्वत:ची खास शैली विकसित केली आहे. 

२६ फेब्रुवारी २०११ मध्ये त्यांनी भारताच्या पहिल्या आणि सर्वात अनोख्या डिझाइन कॉन्सेप्ट स्टोअरची; द चारकोल प्रोजेक्टची स्थापना केली. चारकोल प्रोजेक्टमधील आर्किटेक्ट्सइंटिरिअर डिझायनर्सप्रोडक्ट डिझायनर्स यांच्या टीमच्या सोबतीने त्यांनी ओबेरॉय रिअल्टी, पंचशील रिअल्टीलोढा ग्रुपरुस्तमजी, आवास व्हिलाज इत्यादी अनेक अग्रगण्य रिअल इस्टेट ब्रॅण्ड्ससाठी राहती घरेडेस्टिनेशन्सबंगलेव्यावसायिक कार्यालये आणि मॉडेल शो अपार्टमेंट्सच्या क्षेत्रामध्ये अनेक संकल्पनात्मक प्रकल्प साकारले आहेत.

आलीशानपणा ही एक भावना आहे आणि डिझाइन हे त्यासाठीचे एक साधन आहे असे सुझॅन यांना वाटते.

त्यांनी व्हॅरिसन ग्रुपसोबत सॅलॉन डे मोबाइल २०२१ येथे प्रथमच लक्झरी इटॅलियन फर्निचर ब्रॅण्ड चेलिनीसह आपली संयुक्त कामगिरी सादर केली. या कलेक्शनमध्ये हस्तकारागिरीतून घडविलेल्या लाउंज चेअर्सकॉकटेल टेबल्स आणि लायटिंगचा समावेश आहे.

सुझॅन यांना गेल्या चार वर्षांपासून आर्किटेक्चरल डायजेस्टद्वारे दिला जाणारा डीओटीवायटॉप १०० डिझायनर्समधील आशियातील सर्वात प्रभावशाली डिझायनर हा सन्मान मिळत आला आहे, ईटी पनाश यांच्या होम स्पेसेसकडून ट्रेण्ड सेटर म्हणून गौरवले गेले आहेगुड होम्सकडून बेस्ट फर्निचर कलेक्शनचे बक्षिस मिळाले आहे तर गेल्या अनेक वर्षांपासूनच्या त्यांच्या वाटचालीसाठी एशिया वन मॅगझिनने त्यांचे फास्टेस्ट ग्रोइंग लीडर आणि फास्टेस्ट ग्रोइंग ब्रॅण्ड म्हणून कौतुक केले आहे.

सुझॅन या रिहान आणि हृदान या आपल्या दोन मुलांसह मुंबईत राहतात व आयुष्याच्या प्रवासामध्ये अशक्य ते साध्य करण्याचे स्वप्न पाहण्याचे धाडस दाखवायला हवे असे त्यांना ठामणे वाटते.

युरो किड्स नवीन शैक्षणिक वर्षात लहान मुलांना ‘स्थिरस्थावर’ करण्यास करणार मदत

0

प्रत्यक्ष वर्गांमध्ये जाऊन शिकणे सुलभ व्हायला २ आठवड्यांच्या सेटलिंग प्रोग्राम मुळे होईल मदत

पुणे, १७ जून २०२२: भारतातील आघाडीचे प्री-स्कूल नेटवर्क असलेले युरो किड्स प्री-स्कूल जून २०२२ मध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी सज्ज झाले असून देशभरातली सर्व १२०० हून अधिक केंद्रांवर लवकरच प्रत्यक्ष वर्गांमध्ये जाऊन शिकायला सुरुवात करणाऱ्या मुलांना सुलभ व्हावे यासाठी २ आठवड्यांचा सेटलिंग प्रोग्राम त्यांनी सुरू केला आहे. (सर्वप्रथम मूल याला प्राधान्य देणारी विचारसरणी)’चाइल्ड फर्स्ट आयडियोलॉजी’ साठी ओळखले जाणारे युरोकिड्स आपल्या प्रत्येक प्री-स्कूल केंद्रावर सुरक्षा आणि स्वच्छता यांचे सर्व नियम पाळून मुलाला घरासारख्या वातावरणात अनेक आठवड्यांपर्यंत मजेशीर उपक्रमांच्या माध्यमातून सेटल (स्थिरस्थावर) करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

सेटलिंग प्रोग्राममध्ये लहान मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी आणि प्री-स्कूलमध्ये दररोजच्या उपस्थितीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध रोमांचक सत्रांचा समावेश आहे. यापैकी काही सत्रांमध्ये बाह्य उपक्रम, संगीत सत्रे, योग सत्रे आणि त्यांचे सामाजिक कौशल्य परत मिळवण्यासाठी त्यांच्या समवयस्क आणि शिक्षकांशी संवाद साधण्याच्या अनेक उपक्रमांचा समावेश असेल. एकदा ‘सेटलिंग प्रोग्राम’ संपल्यानंतर युरोकिड्सचे सुप्रशिक्षित शिक्षक विशेष नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम EUNOIA चा वापर गेल्या दोन वर्षांत महामारीमुळे निर्माण झालेली शिक्षणातील तफावत दूर करण्यासाठी करतील.

युरो किड्स प्री-स्कूलचा अभ्यासक्रम मुलांसाठी # अविरत शिक्षणाची खात्री देतो कारण भाषा, मोटर स्किल्स आणि संज्ञानात्मक कौशल्ये, सामाजिक वर्तन आणि संवाद साधणे यासारखी महत्वाची कौशल्ये ०-५ वर्षे वयोगटात विकसित होत असतात. युरोकिड्स प्री-स्कूलचे होमबडी अॅप आणि होम एंगेजमेंट कार्यक्रम मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संरचित शिक्षण कार्यक्रम आणि उपक्रम सादर करतात. युरो किड्स प्री-स्कूलमधील प्रत्येक कार्यक्रम हा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्‍यासाठी मुलांना त्यांच्या वयानुसार योग्य ते शिक्षण देत तयार केले गेले असून शिक्षण आणि मौजमजेचा त्यात समतोल साधण्यात आला आहे. युरोज्युनियर आणि
युरोसिनियर स्तरावरील कार्यक्रमांमध्ये प्लेग्रुप, नर्सरी आणि बालवाडीतील मुलांचे खेळ जिज्ञासा वाढविणारे आणि या कोवळ्या मनांच्या सर्जनशील बाजूला चालना देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.
युरो किड्स प्री-स्कूलमधील EUNOIA हा दक्ष, जागरूक अभ्यासक्रम चाइल्ड फर्स्ट विचारसरणीतून घेतला गेला आहे. यामध्ये मुलांचे निष्पाप आणि सुंदर मन हे प्रगतीसाठी प्रेरणा आहे. EUNOIA या हसत खेळत सजग अभ्यासक्रमातून मन, शरीर आणि आत्मा यांच्यावर परिणाम करणाऱ्या मजेदार उपक्रम आणि खेळांचे मिश्रण सादर करण्यात येते. त्यामुळे मुलांसाठी आवश्यक जीवन कौशल्ये शिकणे, वाढणे आणि आत्मसात करणे यासाठी एक मजबूत पाया तयार होतो. अभ्यासक्रमामध्ये 3 डोमेन्स आहेत जी पुढे युरोफिट, युफोनिक्स, मॅथलॅब, सायंटिफिक स्पार्क, योगाकिड्स, युरोम्युझिक आणि माइंडफुल + यासारख्या विविध कार्यक्रमांमध्ये विभागली गेली आहेत. विशेष आशय वितरण भागीदारांच्या सहयोगाने हे कार्यक्रम आहेत.

लाइटहाऊस लर्निंगच्या प्री-के विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हीएस सेषसाई म्हणाले, “आम्ही प्रवेशप्रक्रिया सुरू केली असून आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी मुलांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत. आमच्या सेटलिंग प्रोग्रामचा उद्देश लहान मुलांना शाळेत परत येण्यास मदत करणे आणि त्यांना त्यांच्या मित्रांसह शिकण्याचा आनंद घेऊन देणे हा आहे. मुलांच्या शिक्षणात तंत्रज्ञानाचा परिचय असो किंवा सुरक्षितता असो युरो किड्स नेहमीच एक पाऊल पुढे आहे. महामारीच्या काळात सादर केलेल्या होमबडी अॅपने आम्हाला # विना अडथळा अविरत शिक्षण पुरविण्यात आणि ऑनलाइन परस्परसंवादी आणि मुलांना शिक्षणात गोडी लावणारे, गुंगवून ठेवणारे वर्ग विकसित करण्यात मदत केली आहे.”

लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने युरोकिड्स प्री-स्कूलने BVQI, Hicare आणि Diversey सारख्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय स्वच्छता, सुरक्षितता आणि सुरक्षा तज्ञांनी मांडलेली २२ कलमी सुरक्षा प्रोटोकॉल प्रणाली सर्व केंद्रांवर लागू केली आहे. प्री-स्कूलमध्ये उपस्थित राहण्यासाठी केवळ पूर्ण लसीकरण झालेले कर्मचारी आणि शिक्षकांनाच परवानगी असेल. प्री-स्कूलमधील प्रत्येकालाच आवश्यक मार्गदर्शक कार्यप्रणालीचे (SOPs) पालन करणे बंधनकारक आहे. त्याची पूर्वकल्पना त्यांना देण्यात आली आहे. आरोग्य आणि सुरक्षा अधिकारी प्रीस्कूल सुरू होण्यापूर्वी आणि नंतर नियमित अंतराने शिक्षक, काळजीवाहक, शिक्षकेतर कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांच्यासाठी न्यू नॉर्मल नियमांचे प्रशिक्षण घेतील.

महावितरणकडून अचूक मीटर रीडिंगसाठी विविध उपाययोजना

0

४ महिन्यांमध्ये मीटर रीडिंगमध्ये लक्षणीय सुधारणा

मीटर रीडिंगबाबत ग्राहकांच्या तक्रारींमध्ये मोठी घट

मुंबई, दि. १७ जून २०२२: लघुदाब वर्गवारीतील सुमारे २ कोटी १५ लाख ग्राहकांना वीजवापराप्रमाणे अचूक मीटर रीडिंगचे बिल देण्यासाठी महावितरणने गेल्या फेब्रुवारीपासून विविध उपाययोजनांना सुरवात केली आहे. यामध्ये हेतुपुरस्सर चुका व अचूक रीडिंगमध्ये हयगय केल्याचे आढळून आल्याने राज्यातील तब्बल ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना बडतर्फ करण्यात आले आहे. यातील ८ एजन्सीजना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. या धडक उपाययोजनांमुळे मीटर रीडिंगच्या बाबतीत ग्राहकांच्या तक्रारींमध्ये मोठी घट झाली असून महावितरणच्या महसूलात देखील वाढ झाली आहे.

वीजगळती कमी करण्यासोबतच ग्राहकहिताच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत महावितरणने ग्राहकाभिमुख सेवेच्या सुधारणांना मोठा वेग दिला आहे. यात अतिशय महत्वाच्या बिलिंगसाठी वीजमीटरच्या अचूक रीडिंगला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. याबाबतीत आढावा घेताना १०० टक्के अचूक मीटर रीडिंग अपेक्षित असताना त्यात हयगय होत असल्याचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांना आढळून आले. या प्रकाराची त्यांनी गंभीर दखल घेतली व महावितरणच्या इतिहासात प्रथमच राज्यातील थेट सर्व मीटर रीडिंग एजन्सीजचे संचालक तसेच क्षेत्रीय उपविभाग कार्यालयांचे प्रमुख व लेखा अधिकारी यांची व्हीसीद्वारे ताबडतोब आढावा बैठक घेतली होती. ‘कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक वीजमीटरचे रीडिंग १०० टक्के अचूक झालेच पाहिजे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप व बिल दुरुस्तीचा त्रास तसेच महावितरणच्या महसूलाचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही. मीटरचे अचूक रीडिंग घेण्यात हयगय करणाऱ्या एजन्सीजविरुद्ध कारवाई करावी’ असे निर्देश त्यांनी दिले होते.

त्याप्रमाणे गेल्या फेब्रुवारीपासून मुख्यालय व क्षेत्रीय कार्यालयांनी एकत्रितपणे पर्यवेक्षणातून मीटरच्या अचूक रीडिंगसाठी धडक उपाययोजनांना सुरवात केली आहे. महावितरणच्या सुमारे २ कोटी १५ लाख लघुदाब ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग कंत्राट पद्धतीच्या एजन्सीजद्वारे करण्यात येते. या एजन्सीजने काढलेल्या मीटर रीडिंगच्या फोटोची खातरजमा व पडताळणी करण्यासाठी मुख्यालयात यापूर्वीच स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाने केलेल्या पडताळणीमध्ये मीटर रीडिंगचे फोटो अस्पष्ट असणे, फोटो व प्रत्यक्ष रीडिंगमध्ये तफावत असणे तसेच रीडिंग न घेता आल्याचा हेतुपुरस्सर शेरा देणे आदी प्रकार आढळून येत आहे. त्याप्रमाणे संबंधित रीडिंग एजन्सीच्या कामामध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. परंतु हयगय कायम राहिल्यास एजन्सीजविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.

गेल्या चार महिन्यांमध्ये मीटर रीडिंगच्या कामामध्ये हयगय करणाऱ्या तब्बल ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना बडतर्फ करण्यात आले आहे. यामध्ये नांदेड परिमंडलातील १०, जळगाव- ८, अकोला- ७, लातूर, कल्याण, बारामती व नाशिक- प्रत्येकी ४, औरंगाबाद- २, तसेच पुणे, चंद्रपूर, कोकण व अमरावती या परिमंडलातील प्रत्येकी एका एजन्सीचा समावेश आहे. यातील ८ एजन्सीजना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल हे दर पंधरवड्याला प्रामुख्याने अचूक मीटर रीडींग संदर्भात आढावा घेत आहेत. मुख्यालयासोबतच क्षेत्रीयस्तरावरील विविध उपाययोजना तसेच कामात कुचराई करणाऱ्या एजन्सीजविरुद्ध सुरु असलेली कारवाई यामुळे अचूक मीटर रीडिंगमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांना रीडिंगनुसार वीजवापराचे योग्य वीजबिल मिळत असल्याने त्यांच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. सोबतच गेल्या एक महिन्यात वीजविक्रीमध्ये १९९ दशलक्ष युनिटने म्हणजेच १४० कोटी रुपयांनी महावितरणच्या महसूलात वाढ झाली आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणकडून गेल्या दीड वर्षांमध्ये वीजग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यासाठी तसेच कंपनीच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी विविध स्तरांवर प्राधान्याने कामे करण्यात येत आहेत. यामध्ये वीजचोरीविरोधी मोहीम, कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२०, सौर कृषिपंप योजना, वीजबिल वसूली मोहीम आदींचा समावेश आहे. त्याची फलश्रुती म्हणून वीजहानी कमी व महसूलात ऐतिहासिक वाढ करण्यात तसेच वीजग्राहकांना तत्पर सेवा देण्यात महावितरणला यश प्राप्त झाले आहे. 

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी गुरुवारी (दि. १६) मीटर रीडिंगचे फोटो घेण्यामध्ये आणखी सुधारणा आवश्यक असलेल्या ३२ उपविभाग कार्यालयप्रमुख तसेच सर्व १४७ विभाग कार्यालयप्रमुख अभियंत्यांशी व्हीसीद्वारे थेट संवाद साधला. ‘मीटरचे फोटो रीडिंग घेण्याची प्रक्रिया स्वतंत्र मोबाईल अॅपद्वारे सोपी व वेगवान झालेली आहे. प्रत्येक मीटरच्या रीडिंगसाठी एजन्सीजना चांगला मोबदला दिला जातो. तरीही मीटरचे चुकीचे रिडींग घेणे व फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा शेरा देणे आदी प्रकार होत असल्यास ते खपवून घेतले जाणार नाही’, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. सोबतच सर्व ग्राहकांना अचूक वीजबिल देण्यासाठी सातत्याने पर्यवेक्षण व स्थानिक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी महावितरणच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

नगरसेवकांच्या पक्षबदलाच्या हालचाली सुरु ..राष्ट्रवादी आणि भाजपाकडे ओघ ..

0

पुणे- सिंहगड रस्त्यावरील एका भाजपा च्या नगरसेवकाने आपला राष्ट्रवादी प्रवेश निश्चित केल्याची बातमी असताना कॉंग्रेसच्या एका नगरसेविकेने देखील भाजपा आणि राष्ट्रवादी अशा दोहोंकडे संपर्क साधल्याचे वृत्त सूत्रांकडून समजले आहे.भाजपात आल्यावर पद मिळालेल्या पण मूळचाच कॉंग्रेस मधून भाजपा मध्ये गेलेल्या नगरसेवकाची राष्ट्रवादी च्या नेत्याशी भेट झाली आहे तर स्थायी समिती मिळूनही कॉंग्रेसची एक नगरसेविका भाजपा आणि राष्ट्रवादी अशा दोहोंचे दरवाजे ठोठावते आहे. एकूणच सुमारे १० ते १५ नगरसेवक या निवडणुकीपूर्वी पक्ष बदलतील असे बोलले जाते . यातील काहींचे राष्ट्रवादीचे प्रवेश निश्चित झाल्याचे सांगण्यात येते आहे. तर भाजपमध्ये मात्र काहींचे भिजत घोंगडे पडलेले दिसते आहे .

भाजपा मध्ये गिरीश बापट कि चंद्रकांत पाटील अशी दोन नेतृत्वाची फळी समोर असताना राष्ट्रवादी मध्ये मात्र याबाबत एकच वादा असल्याने म्हणजे एकच नेतृत्व अजित पवारांचे असल्याने तिथे धदाधड निर्णय होण्याची शक्यता असल्याचे जाणवत असल्याने राष्ट्रवादीत यावेळी जास्त प्रवेश होण्याची शक्यता राजकीय सूत्रांनी वर्तविली आहे. दरम्यान कॉंग्रेसच्या कडे मोजकेच नेते निवडून येणारे असताना यातील दोन नेत्यांची मुले आपल्या पक्षात येतील अशी आशा भाजपा आणि राष्ट्रवादीलाही वाटते आहे.एकूणच निवडणुका लांबल्याने या हालचाली संथ असल्या तरी याबाबत विचार विनिमय आणि शक्यतो निरोप निरोपी मात्र सुरु झाल्याचे वृत्त आहे.

झाशी येथील राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारकास विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट

0

मुंबई दि. 17 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या झाशी येथील स्मारकास भेट दिली. उद्या दि. 18 जून रोजी राणी लक्ष्मीबाई यांचा 164 वा स्मृतीदिन असून आज त्यांनी येथील किल्ल्यास भेट देऊन स्मृतीशिल्पास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, आज माँ जिजाऊचा स्मृती दिन आहे. माँ जिजाऊ साहेब, अहिल्याबाई होळकर आणि राणी लक्ष्मीबाई यांनी सती न जाता राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे.  झाशी येथील 300 वर्षे जुने गणेश मंदिराची व्यवस्था पाहणाऱ्या स्थानिक मराठी मंडळाच्या वतीने त्यांना पूजेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी वस्तूसंग्रहालयास भेट दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही या ठिकाणास भेट द्यावी, अशी इच्छा येथील मराठी बांधवांनी व्यक्त केली. झांशी, लखनौ, कानपूर, वाराणसी या भागातील असंख्य मराठी बांधवांचे सशक्तीकरण, एकत्रीकरण आणि समन्वय साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सहकार्य मिळावे, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

आजच्या भेटीने मराठी सैन्याचा, छत्रपती शिवाजी महाराज, तात्या टोपे, बाजीराव पेशवे यांनी गाजवलेल्या पराक्रमाचा इतिहास मनात जागृत झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. यावेळी महाराष्ट्र गणेश मंदिर कमिटीच्या सदस्यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत त्यांच्या भगिनी जेहलम जोशी, महाराष्ट्र गणेश मंदिर कमिटी सचिव गजानन खानवलकर, उज्ज्वल देवधर, राहुल खांडेश्वर, संजय तळवळकर, मिलिंद देसाई, मीना खंडकर, आरती अभ्यंकर उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी उत्तरप्रदेश विधानसभेचे सभापती राहिलेल्या आचार्य रघुनाथ धुळेकर यांच्या स्नुषा व डॉ. गोऱ्हे यांच्या आत्या डॉ. लता धुळेकर यांची सदिच्छा भेट घेवून त्यांनी डॉक्टरेट मिळवलेल्या “बुंदेलखंड पन्ना राज्य व मराठ्यांचे संबंध” याविषयी माहिती घेतली.

पुणे विद्यार्थी गृह संचालित महाराष्ट्र विद्यालयाचा दहावीचा निकाल सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के

0

पुणे : यंदाच्या दहावी बोर्डाच्या परीक्षेत पुणे विद्यार्थी गृह संचालित महाराष्ट्र विद्यालयाचा निकाल सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के लागला आहे. किरण रमेश गोरडे (९२.४० टक्के), ओमप्रसाद पांडुरंग खोडदे (८८ टक्के), विश्वजीत विठ्ठलसिंग जारवाल (८६ टक्के) यांनी विद्यालयात अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, कार्यवाह प्रा. राजेंद्र कांबळे, मुख्याध्यापक विष्णुदास गावडे यांनी विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले. उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवत संस्थेच्या नावलौकिकात भर घातल्याचे रेडेकर यांनी म्हटले आहे.

वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉटस् अॅपद्वारे माहिती द्या

0

नागरिकांना महावितरणचे आवाहन

पुणे, दि. १७ जून २०२२: पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात वीजयंत्रणा धोकादायक आढळून आल्यास त्याची माहिती नागरिकांनी मोबाईलच्या व्हॉटस् अॅपद्वारे द्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांसाठी ७८७५७६७१२३ तसेच बारामती मंडल अंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर या तालुक्यांसाठी ७८७५७६८०७४ हा व्हॉटस् अॅप मोबाईल क्रमांक महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर फक्त महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्यास त्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती / तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. नागरिकांनी या क्रमांकावर कॉल करण्याऐवजी फक्त धोकादायक वीजयंत्रणेची माहिती व्हॉटस् अॅपद्वारे द्यावी. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉटस् अॅप नाहीत त्यांनी ‘एसएमएस’द्वारे या मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे.

महावितरणची वीजतार तुटलेली आहे. झोल किंवा जमीनीवर लोंबळकत आहे. फ्यूज पेट्या किंवा फिडर पिलरचे झाकणे उघडे किंवा तुटलेले आहे. रोहित्रांचे कुंपण उघडे आहे. भूमिगत वाहिनी उघड्यावर आहे, मुसळधार व संततधार पावसामुळे माती वाहून गेल्याने किंवा अन्य कारणांमुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण झाला आहे इत्यादी स्वरुपाची माहिती/तक्रारी छायाचित्रांसोबत संबंधीत स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून किंवा लोकेशनसह महावितरणच्या व्हॉटस् अॅप मोबाईल क्रमांकावर पाठवता येत आहे. यासोबतच महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर देखील संपर्क साधून धोकादायक यंत्रणेची माहिती देण्याची सेवा उपलब्ध आहे.

व्हॉटस् अॅपद्वारे महावितरणला नादुरुस्त किंवा धोकादायक वीजयंत्रणेची माहिती प्राप्त होताच ती ताबडतोब संबंधित विभागीय व उपविभागीय कार्यालयांना पाठविण्यात येत आहेत. त्यानंतर वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधीत तक्रारकर्त्यांना व्हॉटस् अॅपद्वारेच यंत्रणेच्या दुरुस्तीनंतरचे छायाचित्र पाठवून कळविण्यात येत आहे. नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टींगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व त्याबाबत संबंधीत तक्रारकर्त्यांना कळविण्यात येणार आहे. महावितरणच्या या उपक्रमाला सार्वजनिक वीजसुरक्षेसाठी प्रतिसाद द्यावा व सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.

मोदी सरकारने सरकारी यंत्रणेचा वापर करून राहुल गांधी व विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालविलाय -डॉ. विश्वजीत कदम

0

पुणे- शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेल्या मोदी सरकारने सरकारी यंत्रणेचा गैर वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न चालविला आहे त्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे तीव्र आंदोलन केले. महाराष्ट्राचे सहकार राज्य मंत्री डॉ. विश्वजीत कदम, , प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड,गटनेते आबा बागुल,आ. प्रणिती शिंदे, आ. राजेश राठोड, आ. लहू कानडे, आ. जयंत आसगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आंदोलन पार पडले.  यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, कमल व्‍यवहारे, संजय बालगुडे, गोपाळ तिवारी, सोनाली मारणे, पुजा आनंद, , नगरसेवक अविनाश बागवे,,रविंद्र धंगेकर, लता राजगुरू, रफिक शेख, चंदूशेठ कदम, राहुल शिरसाट, शिवा मंत्री, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, सचिन आडेकर, शोएब इनामदार, प्रदिप परदेशी, विजय खळदकर, प्रवीण करपे, विकास टिंगरे, साहिल केदारी, अमिर शेख, रमेश अय्यर, राजेंद्र शिरसाट, द. स. पोळेकर, फिरोज शेख, प्रमोद निनारिया, संदिप मोकाटे, आबा जगताप, अनुसया गायकवाड, इंदिरा अहिरे, रजनी त्रिभुवन, स्वाती शिंदे, राधिका मखामले, राजश्री अडसुळ, शारदा वीर, राहुल तायडे, सुजित यादव, शाबीर खान, आयुब पठाण, चेतन आगरवाल, भरत सुराणा, मेहबुब नदाफ, अजित ढोकळे, अजित जाधव, भगवान कडू, नरसिंग आंदोनी, ऋषीकेश वीरकर, रामविलास माहेश्वरी, संगीता क्षीरसागर, नलिनी दोरगे, पपिता सोनावणे, बबलू कोळी, सुरेश कांबळे, विनोद रणपिसे, प्रशांत सुरसे, बंडू नलावडे, सुमित डांगी, विश्वास दिघे आदींसह असंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

     यावेळी बोलताना डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, ‘‘केंद्रातील मोदी सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैर वापर करीत असून लोकशाही धोक्यात आणलीच आहे परंतु आराजकतेच्या दिशेने या देशाची वाटचाल चालू झाली आहे. याला केवळ मोदी व शहा जबाबदार आहेत. केंद्र व राज्य यांचे अत्यंत चांगले असलेले संबंध गेल्या अडिच वर्षांपासून महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर मोदीजी फक्त सूडाचे राजकारण करीत असून ई.डी., सी.बी.आय. सारख्या संस्थाचा गैरवापर करीत आहेत्‌. काँग्रेस कार्यकर्त्याने रस्त्यावर उतरून या सर्व गोष्टी जनतेपर्यंत मांडल्या पाहिजेत. काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी या सर्व गोष्टी संसदेमध्ये व बाहेर लोकांपुढे सतत मांडत आहेत म्हणूनच त्यांचा आवाज दाबण्यासाठी ई. डी. ची चौकशी लावून त्यांच्यावर दबाब आणण्याचा प्रयत्न हे मोदी शासीत केंद्र सरकार करीत आहे त्यामुळे आजपासून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वावरताना ‘मै भी राहुल गांधी’ असे लोकांपुढे जायला पाहिजे’’

     आ. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, ‘‘देशामध्ये मोदी व शहा हे लोकशाही धोक्यात आणत आहेत. सार्वजनिक संस्था विकल्यानंतर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ई. डी. चा वापर करून आपण केलेल्या चूका झाकण्याचे काम करीत आहे. राहुलजी गांधी हे या देशाचे भविष्य असून त्यांच्या सत्य बोलण्याने केंद्रातील मोदी सरकारचे पितळ उघडे पडत आहे. त्यामुळेच राहुलजी गांधी यांना टारगेट करून त्यांना ई. डी. मार्फत त्रास देण्याचे काम हे मोदी सरकार करीत आहे.’’

   

   

देशातील इस्लामिक जिहादी कट्टरता आणि हिंसाचारविरोधात विश्व हिंदू परिषदेचे आंदोलन

0

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून राष्ट्रपतींच्या नावे निवेदन 

पुणे : देशातील इस्लामिक जिहादी कट्टरता आणि हिंसाचारविरोधात कट्टर कारवाई करावी, यासाठी विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत, बजरंग दल यांच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रांत सहमंत्री सतीश गोरडे, प्रांत सहसंयोजक नितीन महाजन, प्रांत विशेष संपर्कप्रमुख किशोर चव्हाण, विभाग प्रमुख तुषार कुलकर्णी, धनंजय गायकवाड, संतोष अंघोळकर, नितीन वटकर, कुणाल साठे, मुकुंद चव्हाण यांच्यासह पुणे शहरासह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

किशोर चव्हाण म्हणाले, देशात वाढणाऱ्या इस्लामिक जिहादी कट्टरपंथी यांच्या अतिरेकी घटना व मशिदीमधून बाहेर पडणारे जिहादी कट्टरपंथी सातत्याने हिंदूंची घरे जाळत आहेत. त्यांच्यावर जीवघेणे हल्ले करत आहेत या हिंसक घटनांच्या विरोधात विश्व हिंदू परिषदेची युवा शाखा बजरंग दल यापुढे रस्त्यावर उतरणार आहे.

जिहादी मानसिकतेचे लोक, मशिदी आणि जमियत-ए-उलेमा-ए-हिंद सारख्या संघटनाही या दंगलखोरांसाठी अन्न आणि पाण्याचे स्त्रोत आहेत. याविरोधात विश्व हिंदू परिषद युवा शाखा बजरंग दल रस्त्यावर उतरणार आहे.