मुंबई दि, १७ : महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई द्वारा हिंदी भाषा व साहित्याच्या विकासासाठी सातत्याने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई द्वारा ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत १५ व्या शतकातील महान संत कबीरदास यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. १४ जून, २०२२ रोजी सायंकाळी ‘दास्तान ए कबीर’ या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम म्हैसूर असोसिएशन ऑडिटोरियम, माटुंगा येथे संपन्न झाला.
त्यात संत कबीरदास यांचे दोहे गीत संगीतच्या माध्यमातून सादर करण्यात आले. तसेच संत कबीरदास यांच्या जीवनकार्यास देखील उजाळा देण्यात आला. किरदार आर्ट अकादमी द्वारा निर्मित या संगीत मैफलीचे संकल्पक व निर्देशक इकबाल नियाजी हे होते. दास्तानचे लेखन डॉ. नाज खान यांनी केले. या दास्तानचे सादरीकरण डॉ. नाज आणि शिव शर्मा यांनी केले. याचे संगीत संयोजन हे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त वरिष्ठ संगीतकार कुलदीप सिंघजी यांचे होते. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी चे सदस्य सचिव व सहनिर्देशक सचिन निंबाळकर यांनी आभार व्यक्त केले.
पुणे-धनकवडीत क्रांतिसूर्य महात्मा फुले चौकात बसविलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शिल्पाचे अवघ्या ४ महिन्यात काही भाग निखळले ,यात भ्रष्टाचार झाला .. असा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने या घटनेचा निषेध करत येथे निदर्शने केली आणि या सर्व प्रकाराच्या चौकशीची मागणी केली. या प्रकरणी महापालिका अधिकारी – ठेकेदार आणि स्थानिक नगरसेवक सर्वच संशयाच्या भोवऱ्यात असून याकामा बाबत योग्य आणि पूर्ण माहिती मिळत नसल्याची तक्रार हि करण्यात आली . पहा या आंदोलनाची एक झलक ….
पुणे दि.१७: यंदाच्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने पुणे विभागातून ६ ते १४ जुलै या कालावधीत ५३० बसेस सोडण्यात येणार आहेत.
आषाढी वारीसाठी राज्यातूनच नव्हे तर देशभरातील वैष्णवांचा मेळा चंद्रभागेच्या काठी जमण्याची शक्यता आहे. या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे विभागात जय्यत तयारी सुरू आहे. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येत्या २० जून रोजी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे, तर २१ जून रोजी संत ज्ञानेश्वरर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यामुळे स्वारगेट आगारातून आळंदी ते देहू व देहु ते आळंदी व पुणे या प्रवासासाठी ७० बसेस १७ जुनपासूनच सेवेत दाखल झाल्या आहेत.
सासवडला पालखीचा मुक्काम असतो. गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे पालखी सोहळा न झाल्याने यावर्षी अधिक संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीने सासवड ते पुणे प्रवासासाठी १५० बसेस भाविकांच्या सेवेत दाखल होणार आहेत. गेल्या वारीस ११० बसेस सेवेत होत्या. यंदा त्यामध्ये ४० बसेस वाढविण्यात आल्या आहेत.
गावातील वारकऱ्यांनी एकत्रितपणे बसचे बुकींग केल्यास त्यांना गावातूनच बससेवा मिळणार आहे. ४० व्यक्तींची संख्या यासाठी आवश्यक असून ही बस प्रवाशांना पंढरपूर येथे सोडेल. त्यानंतर तेथून पुन्हा त्यांच्या गावी सोडेल. यामुळे प्रवाशांना थेट घरापासून पंढरपूरला जाण्याची सुविधा एसटीने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन राज्य परिवहन महामंडळाने केले आहे.
ज्ञानेश्वर रणावरे, विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे
पुणे विभागातून ६ ते १४ जुलै या कालावधीत ५३० बसेस सोडण्यात येणार आहेत. लाखो भाविक प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटीचे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच अधिकारी वर्गही अहोरात्र कार्यरत राहणार आहेत.
पुणे, दि. 17: राज्य सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला नाही त्यांनी तात्काळ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आरक्षित जागेवर प्रवेश घ्यायचा असल्यास त्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिर्वाय आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यतः ३ महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र बाबत समिती निर्णय घेते.
वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळणेपासून वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी त्वरित अर्ज करावा, असे आवाहन पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीमार्फत करण्यात आले आहे.
नाशिक : दिनांक 17 जून 2022 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रातून विविध प्रकारचे शिक्षण मिळणार आहे, या उपकेंद्राच्या माध्यमातून देशाचे आधारस्तंभ घडविण्याचे काम होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
आज दिंडोरी तालुक्यातील शिवनाई येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या नियोजित इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृष्यप्रणालीद्वारे संबोधित करत होते. यावेळी कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे, उपकुलगुरु डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, दिंडोरी प्रांताधिकारी संदीप आहेर, शिवनाई गावच्या सरपंच सुनंदा निंबाळकर यांच्यासह शिवनाई गावाचे गावकरी, महाविद्यालयांचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रत्यक्ष कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया रचला आहे. या शिक्षणात बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत असून या तंत्रज्ञानाचा वापर आपण आपल्या प्रगतीसाठी कसा करतो हे महत्वाचे आहे. नाशिक उपकेंद्राच्या माध्यमातून साधारण दीड लाख विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ होणार आहे. तसेच या उपकेंद्रांची संख्या अजून वाढवून प्रत्येक घरात शिक्षण पोहचविण्याचे काम करणे अपेक्षित आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक शिक्षण मिळण्यासाठी संबंधित क्षेत्रातील माहिती असणे आवश्यक असते आणि माहितीचे रूपांतर ज्ञानार्जनात करण्याचे काम या नाशिक उपकेंद्रामार्फत होणार आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येवून काम करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे राजकारणाच्या पलीकडे जावून जनतेच्या कल्याणासाठी विचार केला तरच राज्य प्रगतीच्या वाटेवर यशस्वी वाटचाल करू शकेल, असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
शिक्षण विकासात प्रगल्भ भारत बनविण्याची ताकद
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार स्वत: सोबत देशाचा विकास करून प्रगल्भ भारत बनविण्याची ताकद शिक्षण विकासात आहे. शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसून ती निरंतर चालणारी प्रक्रीया आहे. शिक्षणाच्या ज्योतीमुळे आयुष्यातील अज्ञानाचा अंधार दूर करून प्रत्येकाने पुढे जाणे आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून नाशिक उपकेंद्रामध्ये कौशल्य विकास अंतर्गत वाइनरी, पैठणी बनविणे अशा स्थानिक पातळीवर असणाऱ्या उद्योगांच्या प्रशिक्षणाची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. कोरोना महामारीच्या आव्हानात्मक काळात शिक्षण व तंत्रज्ञानाच्या आधारे लसीकरणात संशोधन करू शकलो. आत्मनिर्भर भारत अंतर्गत आपला देश अनेक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. देशाची प्रगती अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी शिक्षण व आरोग्याची ताकद महत्वाची आहे, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.
जिल्हा नियोजनातून उपकेंद्राच्या सक्षमीकरणासाठी देणार पाच कोटी – पालकमंत्री छगन भुजबळ उपकेंद्रांच्या मार्फत विद्यापीठांचे विकेंद्रीकरण होणे आवश्यक आहे. तसेच या उपकेंद्राच्या सक्षमीकरणासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी मागणी केल्याप्रमाणे पाच कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिली आहे.
सावित्रीबाई फुलेंची विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचवायचे असतील तर शैक्षणिक प्रगती महत्वाची आहे. देशाला विश्वगुरू बनविण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. नाशिक जिल्ह्याची एज्युकेशनल हब म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. या उपकेंद्रातून व्यावसायिक, औद्योगिक, संशोधनात्मक अशा विविध प्रकारच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रासाठी शिवनाई गावाने जागा उपलब्ध करून दिली त्यासाठी पालकमंत्री यांनी सर्व गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले. उपकेंद्र व शिवनाई गावासाठी वीज, रस्ते, पाणी यासारख्या आवश्यक सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासनही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिले आहे.
राज्य शासन सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शिक्षणाला कौशल्यपूर्ण ज्ञानाची जोड देवून विद्यार्थ्यांना स्वबळावर आयुष्य जगण्यासाठी राज्य शासन सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे. एखादे कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे असते. त्याचप्रमाणे हे उपकेंद्र उभारण्यासाठी देखील लोकप्रतिनिधी व शासन यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. राज्यातील प्रत्येक विद्यार्थी हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले यांचा वारस असल्याने तो कधीही वाईट मार्गावर जाणार नाही असा विश्वास मंत्री श्री. सामंत यांनी व्यक्त केला. या उपकेंद्रात कौशल्य विकासाचा अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना विविध उद्योगांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी या उपकेंद्राच्या सक्षमीकरणा करीता पालकमंत्री यांनी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाची तंतोतंत अंमलबजावणी करणारे आपले पहिले राज्य आहे. कोरोनाच्या गेल्या दोन वर्षांच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची प्रक्रीया निरंतर सुरू ठेवण्यात यश आले आहे. परंतू आता कोरोनाच्या दृष्टचक्रातून आपण बाहेर पडत असून सर्वस्तरावर सुरळीतपणा येत असल्याने आता राज्यात सर्वत्र प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू झाली असून परिक्षा देखील ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला पालकमंत्री छगन भुजबळ व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नाशिक उपकेंद्राच्या नियोजित इमारतीचे भूमीपूजन करून कोनशीलेचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगरु डॉ. कारभारी काळे यांनी प्रास्ताविकात नाशिक उपकेंद्राची व त्याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली.
आज नवे तंत्रज्ञान आले असले तरी बरेच शेतकरी पारंपरिक शेतीसाठी जनावरांचा उपयोग करतात. विशेषत: शेतीकामासाठी बैल आणि दूधासाठी गाई-म्हशींचे शेतकऱ्यासाठी खूप महत्व आहे. सोबत शेळी-मेंढी पालनासारखे जोड व्यवसायदेखील त्याच्या उत्पन्नात भर घालतात. त्यामुळे पावसाळ्यात अशा जनावरांची काळजी घेणे महत्वाचे आहे.
पावसाळ्यात आर्द्रता वाढते आणि ऊन कमी असल्याने गोठा ओलसर रहातो. त्यामुळे जनावरांना विविध प्रकारचे होतात. जनावरांची योग्यप्रकारे काळजी घेतली तर आजार कमी होवून पशुपालकाचे आर्थिक नुकसान होत नाही. बदलत्या वातावरणात प्राण्यांचे शरीर योग्यप्रकारे साथ देत नसल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होवून जनावरे विविध प्रकारच्या आजारास बळी पडतात. त्यामुळे गोठ्याची काळजी, लसीकरण, जंतनाशक औषधीचा वापर, चाऱ्यांचे योग्यप्रकारे नियोजन करुन आपल्या जनावरांची पशुपालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
गोठ्याचे व्यवस्थापन गोठ्यात पाणी येणार नाही याबाबत काळजी घ्यावी. पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावणानी गोठा धुवून घ्यावा. गोठ्यात सुर्यप्रकाशासोबतच हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या असणे गरजेचे आहे. त्यामुळे गोठ्यातील जागा कोरडी राहण्यास मदत होईल आणि गोठ्यातील जनावरे एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून रवंथ करतील. गोठ्यातील दलदल कमी झाल्यास स्तनदाह आजार कमी होण्यास होतो.
पावसाळ्यात गोठ्यात पाणी साचणार नाही याचीदेखील दक्षता घ्यावी. जनावरांचे मलमूत्र वेळीच स्वच्छ करून गोठा कोरडा करावा. निश्चित कालावधीत गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावे. गोठ्यातील हवा खेळती राहिल्यास आणि सुर्यप्रकाश असल्यास जनावरांच्यादृष्टीने चांगले वातावरण रहाते.
चारा व्यवस्थापन जनावरांना पावसाने भिजलेला ओला चारा खाण्यासाठी देण्यात येवू नये. ओले गवत मऊ असल्याने जनावरे ते कमी वेळेत अधिक प्रमाणात खातात. परंतु त्यात पाण्याचे प्रमाण अधिक आणि तंतूमय पदार्थ कमी असल्याने जनावरांची पचनक्रिया बिघडून त्यांना जुलाब होतात. त्यामुळे जनावरांसाठी देण्यात येणारे पशुखाद्य किंवा सुका चारा कोरडा राहील याबाबत दक्षता घ्यावी.
जनावरांना बाहेर चरण्यासाठी घेवून जातांना विशेष काळजी घ्यावी. जनावरांना पाऊस किंवा विजा पडतांना झाडाखाली घेवून थांबू नये. जवळपास निवारा असल्यास त्याठिकाणी घेवून थांबावे. पावसाळ्याच्या सुरुवातीस बागायती क्षेत्रात फुलीचे गवत मोठ्या प्रमाणात आढळून येते. जनावरांना फुलीचे गवत खावू घातल्यास विषबाधेमुळे कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन जनावरे दगावतात. विशेषत मेंढ्यामध्ये हा प्रकार आढळून येतो.
पावसाळ्यातील वातावरण विविध कृमींसाठी अनुकूल असते. त्यामुळे विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. जनावरांच्या सभोवतीचे वातावरण स्वच्छ आणि कोरडे ठेवल्यास त्यांना होणारा आजाराचा संसर्ग टाळता येतो. त्यासोबतच त्यांचे पोषण आणि पावसाळ्यातील आजाराबाबत माहिती करून घेत योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. जिल्हा माहिती कार्यालय पुणे
मुंबई, दि. 17 : महिला स्वयंपूर्ण झाल्या तर राज्याची जलद गतीने उन्नती होण्यास मदत होणार आहे . त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी अधिकचे प्रयत्न करणे गरजेचे आहे असे, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
मंत्रालयातील दालनात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्न्ाती अभियान अर्थात एमएसआरएलएमच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी एमएसआरएलएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, अवर सचिव माळी आदी उपस्थित होते.
योजनांविषयी जागृती करा
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत असणाऱ्या योजनांची माहिती ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहचवा. त्याविषयी महिलांना माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला बचत गटांचे कार्यक्रम घेऊन त्यांना योजनेविषयी जागृत करण्याच्या सूचना राज्यमंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी दिल्या. त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटात कार्यक्रम घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
कोल्हापूर, दि.17: कोरोनामुळे विधवा झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येत आहे, हा स्तुत्य उपक्रम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाची राज्यभर अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
कृषी विभागाची कोल्हापूर व सांगली जिल्ह्याची आढावा बैठक कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, कोल्हापूर व सांगलीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनुक्रमे जालिंदर पांगरे व मनोजकुमार वेताळ आदी उपस्थित होते.
कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना बियाणे व खतांची कमतरता भासू नये, यासाठी राज्यव्यापी नियोजन करण्यात आले असून गरज भासल्यास बफर स्टॉक मधून खते व बियाणे उपलब्ध करुन देण्यात येतील. याबाबतीत गैरप्रकार आढळून आल्यास कृषी विभागाकडे तक्रार करा, असे सांगून शेतकऱ्यांनी पुरेशा प्रमाणात पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये, जेणेकरुन दुबार पेरणी करावी लागणार नाही, असे आवाहन त्यांनी केले.
कृषी मंत्री श्री. भुसे म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविण्यात येत असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. राज्यात सोयाबीन व कापूस उत्पादकता वाढीसाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन या पिकांच्या उत्पादकता वाढवावी. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रकिया उद्योग योजना यांसह विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. ‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेप्रमाणे मागणीनुसार पिके घ्यावीत. तसेच आवश्यक तेवढ्या पाण्याचा वापर करुन जमिनीचा पोत सुधारावा व उत्पादन अधिक होण्यासाठी ठिबक सिंचनद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर जादा दर देण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ महिला शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी 50 टक्के निधी राखीव ठेवण्यात येत आहे, असेही सांगितले.
कोल्हापूर समृद्ध जिल्हा आहे. कोल्हापुरी गुळाच्या नावावर अन्य राज्यातील गुळाची विक्री होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात येतील. कोल्हापुरी गुळ, आजरा घनसाळ तांदळाला भौगोलिक (जीआय) मानांकन मिळाले आहे. कोल्हापूरी गुळ, आजरा घनसाळ तांदूळ, सांगलीचे बेदाणे(मनुके) व हळद उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी या उत्पादनांचे मूल्यवर्धन करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच चंदगड भागातील काजूला जीआय मानांकन मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ व हातकणंगले तालुक्यात संकरित भाजीपाला बियाणे उत्पादन सुरु होण्यासाठीही सहकार्य करु, असेही त्यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती १ जुलै रोजी कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येते, तर हा सप्ताह ‘कृषी संजीवनी सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. कृषी सप्ताह साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे सांगून यानिमित्ताने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावपातळीपर्यंत शेतकऱ्यांशी संवाद, त्यांचे योग्यपद्धतीने पोषण व्हावे, यासाठी ‘किट’ देण्यात येणार आहे, असे सांगून आवश्यकता भासल्यास जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून ‘किट’ घ्यावे व जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाला वितरीत करावे, असे आवाहन त्यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना उद्देशून केले.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना दिली. या भागात शेतकरी विविध नाविन्यपूर्ण प्रयोग राबवित आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र कृषी क्षेत्राच्या संपन्नतेसाठी ओळखला जातो. कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘ऊस उत्पादकता वाढ मोहीम’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना अल्प काळाचे पिक उत्पादन, नवीन जोडधंदे याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करावे. शिरोळ, हातकणंगले तालुक्याचे पोषक हवामान पाहता याठिकाणी संकरित भाजीपाला बियाणे उत्पादन सुरु होण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर व सांगली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनुक्रमे जालिंदर पांगरे व मनोजकुमार वेताळ यांनी जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांबाबत माहिती दिली.
पुणे -राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला. 99.27 टक्के मिळवत कोकण विभागाने निकालात बाजी मारली. विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजेपासून पाहता येणार आहे.
विभागनिहाय निकाल
पुणे: 96.96%
नागपूर: 97%
औरंगाबाद: 96.33%
मुंबई: 96.94%
कोल्हापूर: 98.50%
अमरावती: 96.81%
नाशिक: 95.90%
लातूर: 97.27%
कोकण: 99.27%
दहावी परीक्षेत एकूण ६६ विषयांपैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के
दहावी परीक्षेत एकूण ६६ विषयांपैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. राज्यातून नियमित विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ५० हजार ७७९ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ५ लाख ७० हजार २७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २ लाख ५८ हजार २७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ४२ हजार १७० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
दहावीच्या परीक्षेत राज्यातून एकूण ८ हजार १६९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी ८ हजार २९ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यातील ७ हजार ५७९ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.४० आहे.
उत्तीर्णतेत यंदाही पुन्हा मुलींचीच बाजी, मुलांपेक्षा १.९० टक्के अधिक निकाल
नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.९६ टक्के इतकी आहे, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०६ टक्के आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा १.९० टक्के इतकी जास्त आहे. अशाप्रकारे यावर्षी देखील मुलींनीच बाजी मारली.
16 लाख 36 हजार परीक्षार्थी
यंदा 2021-22 या वर्षाची दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान घेण्यात आली होती. राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून 16 लाख, 36 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये 8 लाख, 89 हजार विद्यार्थी तर 7 लाख, 49 हजार विद्यार्थिनींचा समावेश होता. परीक्षेसाठी राज्यभरात एकूण 22 हजार 911 माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. 5 हजार 50 मुख्य केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.
डीईएस सेकंडरी स्कूल दहावी निकाल : 100% 53 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण
प्रथम क्रमांक चिन्मय चिटणीस गुण : 99.40% मोबाईल : 9511883457
दुसरा क्रमांक सम्यक जोशी गुण : 99.20% मोबाईल : 9422331022
रुद्र कानडे डीसलेक्सिया आणि डीस्कलक्यूलिया या आजारांवर मात करून 79.60% गुण मिळविले मोबाईल : 942283654
अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स ,पुणे
दहावी निकाल –98.93%
प्रथम क्रमांक आर्या श्रीश्रीमाळ —99.4% मोबाइल क्रमांक 9067012445
द्वितीय क्रमांक राजेश्वरी वैद्य—-99.2% मोबाईल क्रमांक 9960621244
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे 30
दहावी निकाल : 93.10%
प्रथम क्रमांक सार्थक सुहास गोडसे गुण : 95.40% मोबाईल क्रमांक: 9765851707 (आर्थिक परिस्थिती बिकट असूनही त्यावर मात करून या विद्यार्थ्याने नेत्रदीपक कामगिरी केली आहे.)
दुसरा क्रमांक तन्मय मुक्तेश्वर जोशी गुण : 93.40% मोबाईल क्रमांक: 7841069631
तृतीय क्रमांक निनाद किरण वाघ गुण: 93.00% मोबाईल क्रमांक: 8484935096
मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय दहावी निकाल : 100%
पहिला क्रमांक जुई कुलकर्णी 97.40% 8806454466
दुसरा क्रमांक सम्यक जोशी गुण : 99.20% मोबाईल : 9422331022
तिसरा क्रमांक अलका जोशी गुण : 97.00% मोबाईल : 9423306767
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग
मार्च २०२२ SSC परीक्षा
शाळेचा एकूण निर्णय 96.63%
90% पेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी 23
विशेष योग्यता विद्यार्थी संख्या 103
प्रथम श्रेणी विद्यार्थी संख्या 138 द्वितीय श्रेणी विद्यार्थी संख्या 82 पास श्रेणी विद्यार्थी संख्या 22
(1) प्रथम क्रमांक
नाईक मैत्रेय प्रशांत गुण- 97.80% मोबाईल नंबर 9921177546 9325333924
मुंबई, : ‘महाप्रितने’ इथिओपिया देशाबरोबर नविनीकरणीय ऊर्जा प्रकल्पांमध्ये एकत्रित काम करावे, असे निर्देश सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
इथिओपिया देशाच्या जलसिंचन व ऊर्जा विभागाचे राज्यमंत्री व राजदूत अस्फॉ डिन्गामो व त्यांच्या भारतातील समन्वयकासमवेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे तसेच `महाप्रित`चे अधिकारी यांच्यासोबत मुंबईत संयुक्त बैठक झाली. त्या बैठकीत सामाजिक न्याय मंत्री बोलत होते. या बैठकीला महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महाप्रितचे संचालक (संचलन) विजयकुमार ना. काळम, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, महाप्रितचे कार्यकारी संचालक (प्रशासन) प्रशांत गेडाम, कार्यकारी संचालक (पारेषण) रविंद्र चव्हाण, सतिश चवरे व इतर अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. मुंडे म्हणाले, महाप्रित करीत असलेल्या प्रकल्पांच्या अनुषंगाने इथिओपिया देशाबरोबर सामंजस्य करार (MOU) करण्याकरिता त्वरित कार्यवाही करावी तसेच इथिओपियाच्या मंत्रिमहोदयांनी ज्या क्षेत्रामध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाबरोबर प्रकल्प राबविण्याचे प्रस्तावित केले आहे. त्याबाबत महाप्रितने त्वरित बैठका घेऊन पुढील निर्णय घ्यावा, असेही श्री. मुंडे यावेळी म्हणाले.
इथिओपियाचे राज्यमंत्री अस्फॉ डिंन्गामो यांनी त्यांच्या देशाची भौगोलिक संरचना, परिस्थिती, ज्या क्षेत्रात त्यांना एकत्रित काम करण्याचा विचार आहे, याबाबत सविस्तर मुद्दे मांडले. इथिओपियातील पाण्याचा प्रश्न व त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना, प्रकल्प, त्याबाबतची सद्यस्थिती, सौरऊर्जा प्रकल्पामध्ये महाप्रितची लागणारी आवश्यकता आणि हे प्रकल्प महाप्रित व इथिओपिया यांच्या संयुक्त उपक्रमाने राबविण्याचा विचार असल्याचे सांगितले. ज्या – ज्या क्षेत्रामध्ये त्यांना महाराष्ट्र शासनासोबत व महाप्रित कंपनीसोबत एकत्रित काम करावयाचे आहे त्याबाबत इथियोपियाचे राज्यमंत्री अस्फॉ डिंन्गामो यांनी सविस्तर चर्चा केली.
श्री. डिन्गामो यांनी कृषी, पाणीपुरवठा, नविनीकरणीय ऊर्जा, कृषी फिडरचे सोलरायझेशन, नवीन तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा व अन्य काही क्षेत्रांबाबत सामंजस्य करार (MOU) करणार असल्याचे सांगितले. तसेच महाप्रितच्या विविध प्रकल्पांच्या उपयोगितेबाबत समाधान व्यक्त केले.
महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी महाप्रित कंपनी व त्यांचे विविध विभाग यामध्ये अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प, पर्यावरणसंबंधित प्रकल्प, ऊर्जा बचत व ऊर्जा संवर्धन प्रकल्प, आरएमसी प्लांट, कृषी प्रक्रिया मूल्य साखळी, परवडणारी घरे, महामार्ग रस्ते प्रकल्प, हायड्रोजन प्रकल्प, नवीन आणि उद्योन्मुख ऊर्जा तंत्रज्ञान प्रकल्प, सॉफ्टवेअर तंत्रज्ञान, सीएसआर प्रकल्प इत्यादींबाबतची माहिती व सौरऊर्जा प्रकल्प तसेच डाटा सेंटर प्रकल्पाबाबतची कामे सध्या सुरु असून प्रगतिपथावर असल्याची सविस्तर माहिती दिली. तसेच महाप्रित व इथियोपिया यांच्यासमवेत लवकरच सामंजस्य करार (MOU) करण्याचा मनोदय महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी व्यक्त करून महाप्रितची भूमिका सविस्तरपणे सांगितली.
महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी इथियोपियाचे राज्यमंत्री व राजदूत अस्फॉ डिंन्गामो यांनी महाप्रित कार्यालयास भेट दिल्याबाबत आभार मानले.
आळंदी, दि. १७ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनामार्फत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत संत ज्ञानेश्वर यांच्या ७२५ व्या संपन्न झालेल्या समाधी संजीवन वर्षाचे औचित्य साधून व संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांच्या ७२५ व्या निर्वाण वर्षानिमित्त आळंदी येथील श्री संत भगवानबाबा मंगल कार्यालय येथे शनिवार व रविवार दिनांक १८ व १९ जून रोजी अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांच्या समाधी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारीत ज्ञानियांचा राजा या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १८ व १९ जून २०२२ या कालावधीत आळंदी येथील श्री संत भगवानबाबा मंगल कार्यालय येथे करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात सारेगमप महाविजेती कार्तिकी गायकवाड व गौरव महाराष्ट्राचा महाविजेता कौस्तुभ गायकवाड हे सुप्रसिद्ध कलाकार आपली कला सादर करणार आहेत, याशिवाय दररोज हरिपाठ, व्याख्यान, किर्तन, भजन, अभंगवाणी, भक्तीगीते, भारुड, दिंडी इ. कलांचा आविष्कार या कार्यक्रमात पाहता येणार आहे.
शनिवार दिनांक १८ जून रोजी दुपारी ४ वाजता हरिपाठाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. यानंतर संत निवृत्ती, संत सोपान व संत मुक्ताई यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान सादर हाईल. ह.भ.प.श्री. अक्षय महाराज भोसले हे किर्तन सादर करणार आहेत. याच दिवशी रात्रौ ८ वाजता भारुड, अभंगगीत, भक्तीगीत इ. भक्तीसंगीताचा कार्यक्रम प्रसिद्ध कलाकार कार्तिकी गायकवाड आणि कौस्तुभ गायकवाड हा कार्यक्रम सादर करणार आहेत. रविवार दिनांक १९ जून रोजी दुपारी ४ वाजता हरिपाठ कार्यक्रम होईल. श्री स्वामीराज भिसे महाराज यांचे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान सादर करणार आहेत. संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडावर आधारीत समर्थ पाटील हे भजन सादर करतील. तर ह.भ.प.श्री. प्रमोद महाराज जगताप हे कीर्तन करणार असून ज्ञानेश्वर माऊलींच्या काव्यावार आधारीत ओडिसी नृत्य श्रीमती शुभदा दादरकर आणि सहकारी सादर करणार आहेत तसेच भूपाळी ते भैरवी कलामंच ही संस्था गण, गौळण, नमन, भूपाळी, ओवी, वासुदेव, दिंडी, कीर्तन, भारुड, पसायदान इ. कार्यक्रम सादर करणार आहेत.
आळंदी येथे आयोजित ज्ञानियांचा राजा या कार्यक्रमात सहभागी कलाकारांचा कला आविष्कार किंबहूना प्रबोधनातून संतांच्या पुरोगामी विचारांचा जागर करणाऱ्या कलावंतांचे किर्तन, व्याख्यान, हरिपाठ, भजन अशा आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.
मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील वर्ग ‘क’ आणि ‘ड’ मध्ये पात्र ठरलेल्या ३४२ जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरुपात पाच जणांना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनात नियुक्तपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पाटील आदी उपस्थित होते.
महामंडळातील सरळसेवेची वर्ग ‘क’ आणि ‘ड’ मधील १४ संवर्गातील ८६५ रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यातील ११ संवर्गातील ५०२ पदांकरिता ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. त्यातील पाच जणांना प्रातिनिधीक स्वरुपात मंत्रालयात नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
दरम्यान, या परीक्षेत कुठलाही अनूचित प्रकार घडणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली. भरती प्रक्रिया सुरळीत व यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मुख्यालयीन स्तरावरून समन्वय साधण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला होता. सर्व प्रक्रिया कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आली. पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांना ऑनलाइन किंवा पोस्टाद्वारे नियुक्तीपत्रे पाठविण्यात आली आहेत. दरम्यान, शासनाद्वारे राबविलेली सर्वाधिक पारदर्शक नोकरभरती असल्याचे समाधान मंत्री श्री.देसाई यांनी व्यक्त केले.
मुंबई, दि. 16 : चार धाम यात्रेला येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये याकरीता मार्गदर्शक तत्वे जारी केली असून भाविकांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु केल्याची माहिती उत्तराखंड शासनाच्या पर्यटन विभागाने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागास पत्राद्वारे कळविली आहे.
चार धाम यात्रेकरीता देशभरातून श्रद्धाळू येतात. परंतु, अनेक भाविकांची योग्य मार्गदर्शनाअभावी गैरसोय होते, अनधिकृत ठिकाणांहून नोंदणी केल्यामुळे त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची बाब निदर्शनास आल्यावर उत्तराखंड शासनाच्या पर्यटनविभागाद्वारे ही प्रक्रिया सुलभ पद्धतीने राबविण्यास येत आहे. भाविकांसाठी registrationandtouristcare.uk.gov.in या संकेतस्थळावर आणि Tourist Care Uttarakhand (Android/IOS) ॲपवर ही नोंदणीप्रक्रिया मोफत सुरु केली असून 01351364 हा टोल फ्री क्रमांकही दिला आहे.
भाविकांनी नोंदणीसाठी या अधिकृत मार्गाचा अवलंब करुनच यात्रा करावी, असे आवाहनही उत्तराखंड शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पुण्यातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दैनंदीन सफाई व देखभाल दुरूस्ती यापुढे ठेकेदारांमार्फत-टेंडर काढणार
पुणे-पालखी सोहळ्यादरम्यान शहरात २० ठिकाणी वारकर्यांना औषधोपचाराची सुविधा करण्यात येणार असून याठिकाणी ६० वर्षांवरील वारकर्यांना कोरोनावरील लसीचा बूस्टर डोस देण्यात येईल.
तसेच शहरातील शाळांमध्ये १२ वर्षांवरील मुलांसाठी शाळांच्या मागणीनुसार लसीकरणाचे कॅम्पही भरविण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली.
आषाढी वारीनिमित्त पुढील आठवड्यात शहरात संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालख्या येणार आहेत. पालखी मार्गावर तसेच मुक्कांमांच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतेसोबतच पाणी व आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने तयारीही करण्यात येत आहे. पालखी सोहळ्यादरम्यान वारकर्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने २० ठिकाणी औषधोपचारांची सुविधा करण्यात येणार आहे. याठिकाणी ६० वर्षांवरील वारकर्यांना कोरोनावरील लसीचा मोफत बूस्टर डोसही देण्यात येणार आहे. बूस्टर डोससाठी वारकर्यांनी आधार कार्ड आणि दोन डोस घेतल्याचे सर्टीफिकेट सोबत ठेवल्यास लसीकरणाची प्रक्रिया अधिक सोपी होईल, असे आवाहनही कुमार यांनी केले आहे.
सध्या कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. आज नवीन १९३ पॉझीटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरीत सर्व रुग्णांना सौम्य लक्षणे असून घरीच उपचार घेत आहेत. लहान मुलांना कोरोनाची लागण होण्यापासून रोखण्यासाठी लसीकरण वाढविण्यात येणार आहे. प्रामुख्याने १२ वर्षावरील शालेय मुलांचे लसीकरण करण्यासाठी शाळांमध्येच लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी शाळांकडून आलेल्या मागणीनुसार वेळापत्रकाचे नियोजन करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नमूद केले.
शहरातील सार्वजनिक स्वच्छता गृहांची दैनंदीन देखभाल दुरूस्तीची कामे यापुढे खाजगी ठेकेदारांमार्फत केली जाणार आहेत. यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली.
विक्रम कुमार यांनी सांगितले, की शहरात एक हजार २०० सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत. सध्या महापालिकेच्या माध्यमातुन या स्वच्छतागृहांची स्वच्छता व देखभाल दुरूस्ती करण्यात येते. परंतू यानंतरही स्वच्छतागृहांबाबत सातत्याने तक्रारी येतात. यामध्ये प्रामुख्याने सकाळी एकवेळेसच स्वच्छता, देखभाल दुरूस्तीच्या कामांना विलंब होत असल्याने वापर न होणे अशा तक्रारींची संख्या अधिक आहे. यासाठी स्वच्छता गृहांची दैनंदीन स्वच्छता व देखभाल दुरूस्तीची कामे ठेकेदारांमार्फंत करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सार्वजनिक स्वच्छतागृहांची दैनंदीन सफाई व देखभाल दुरूस्ती यापुढे ठेकेदारांमार्फत– विक्रम कुमार
महापालिकेच्या पाचही झोनसाठी स्वतंत्र निविदा काढण्यात येणार आहेत. याकरिता स्वच्छतेसाठी ५ कोटी रुपये आणि देखभाल दुरूस्तीसाठी ४ कोटी रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे. स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबाबत क्षेत्रिय कार्यालय पातळीवर मॉनिटरींग करण्यात येईल, असेही विक्रम कुमार यांनी नमूद केले.जाहिरातींच्या हक्काच्या बदल्यात अत्याधुनिक सुविधा असलेली एअर कंडीशनयुक्त सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याची तयारी काही कंपन्यांनी दाखविली आहे. यासाठी प्रायोगीक तत्वावर एका सार्वजनिक स्वच्छतागृहाची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती विक्रम कुमार यांनी दिली. शहरातील ड्रेनेज लाईन व चेंबर सफाईची कामे दोन मोठ्या मशिन्सद्वारे सुरू आहेत. तसेच अंतर्गत ड्रेनेज लाईन सफाईसाठी जेटींग मशीन्सचा वापर करण्यात येत आहे. मुख्य रस्त्यावरील ड्रेनेज सफाईची कामे मोठ्या मशिन्सद्वारे करण्यात येणार आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या कामांना गती देण्यात आली आहे, अशी माहितीही विक्रम कुमार यांनी दिली.
मुंबई, दि. 16 :- मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. या परिसराचा पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने विकास करून तो अधिक आकर्षक करण्यात येईल, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
गेट वे ऑफ इंडिया परिसराचा विकास करण्यासाठी श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. खासदार अरविंद सावंत, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. ठाकरे म्हणाले, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गेट वे ऑफ इंडियाच्या मुख्य भागाची आणि घुमटाची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर परिसरातील विविध सोयी सुविधांची दुरूस्ती अथवा पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. यासाठी परिसरातील सुविधांची सुयोग्य रचना करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा परिसर आकर्षक करून येथे ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत 75 फुट उंचीचा ध्वज उभारण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. सुरक्षारक्षकांची कॅबिन, स्वच्छतागृह, जुने वैभव दर्शविणारे पथदिवे, परिसराची माहिती देणारे फलक, रस्त्याच्या दुभाजकांवर लहान ध्वज लावण्यासाठी खांबांची रचना आदी सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.