Home Blog Page 1617

लंपी चर्म रोगाचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही -सचिन्द्र प्रताप सिंह

0

मुंबई, दि. १३ : लंपी चर्म रोगाच्या नियंत्रणासाठी १० लक्ष लसमात्रा प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अभियान स्वरुपात बाधित गावांच्या ५ किमी क्षेत्रात लसीकरण करण्यात येत आहे. हा आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नसल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह
यांनी सांगितले.

समाज माध्यमात अफवा पसरविली जात असल्यास त्यावर कठोर कारवाई

पशुसंवर्धन आयुक्त श्री सिंह यांनी सर्व पशुपालकांना शासनाच्या वतीने आवाहन केले आहे की, राज्यात लंपी चर्म रोगाचा झपाट्याने प्रसार होतो आहे. हा आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नाही. तसेच दूध हे मानवी आरोग्यासाठी लाभदायक आहे. त्यामुळे कांही समाज माध्यमात अफवा पसरविली जात असल्यास त्यावर कठोर शासकीय कार्यवाही केली जाईल.

मोठ्याप्रमाणात जनजागृती करावी

या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अधिका-यांनी मोठ्याप्रमाणात जनजागृती करावी. जनजागृतीसाठी सामाजिक माध्यमांचाही (सोशल मिडियाचाही वापर करावा. लंपी आजारावर उपयुक्त असणा-या लस व औषधींची उपलब्धता जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्हयासाठी रू. १ कोटी निधी उपलब्ध करून करावी. लंपी चर्म आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी खाजगी पशुधन पर्यवेक्षक यांच्या सहकार्यातून लसीकरण मोहीम घ्यावी. त्यासाठी मानधन तत्वावर त्यांच्या सेवा घ्याव्यात अशा सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या.

औषधांची फवारणी करावी

हा रोग माशा, डास, गोचिड इ. किटकांमार्फत पसरत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने पशुसंवर्धन विभागाने शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करावी. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत आणि जिल्हा परिषद सेस यातून औषधे व इतर बाबींसाठी निधी उपलब्ध करून देण्याविषयी श्री सिंह यांनी सांगितले.

नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित

शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अधिसूचना प्रसिद्ध करून त्याअन्वयेप्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, २००९ (२००९ चा २७) याची कलमे (६), (७), (११), (१२) व (१३) या दूद्व्यारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, संपूर्ण महाराष्ट्र राज्य लंपी चर्म रोगाच्या बाबतीत “नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार गो व म्हैस प्रजातीची नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. तसेच गो व म्हैस प्रजातीचा बाजार भरविणे, शर्यती, प्राण्यांच्या जत्रा, प्रदर्शने इ. बाबीस मनाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

घाबरू नका काळजी घ्या

श्री सिंह यांनी सांगितले की,हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. आतापर्यंत या रोगामुळे भारतात दि. ९.०९.२०२२ पर्यंत ७०,१८१ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने राजस्थान मध्ये ४५०६३, पंजाबमध्ये १६८६६, गुजरात मध्ये ५३४४ व हरियानामध्ये १८१० जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. या आकडेवारीमुळे तसेच समाज माध्यमांमधून प्रसारित होणाच्या बातम्यांमुळे पशुपालकांमध्ये अनावश्यक भीती बाळगण्याचे कारण नाही, परंतु आवश्यक खबरदारी घ्यावी, असे सिंह यांनी पशुपालकांना आवाहन केले आहे.

त्वरित उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो

लंपी चर्म रोग हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो त्वरित उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो. या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नये, तसेच मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

लम्पी आजारापासून पशुधन वाचविण्यासाठी यंत्रणेने तातडीने पावले उचलावीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई दि.१२- पशुधन ही आपली संपत्ती आहे. त्याची जपणूक करणे आवश्यक असून सध्या राज्यात लम्पी आजाराने पशुंना ग्रासले आहे. या आजारावर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आवश्यक पाऊले तातडीने उचलावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले. या संदर्भात पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता यांनी या आजारासंदर्भात माहिती दिली.  यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सज्ज राहून आपापल्या भागात हा आजार रोखण्यावर बारकाईने लक्ष द्यावे असेही सांगितले.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गोवंश व महिष वर्गातील जनावरांना लम्पी या विषाणूजन्य त्वचारोगाची लागण झालेली आहे. हा वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच पशुपालकांनी जनावरांची वेळीच काळजी घेतल्यास आपल्या जनावराला लम्पी आजाराची लागण होण्यापासून वाचविता येईल, हे लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांमध्ये जनजागृतीसाठी करावी. तसेच रोगनियंत्रण लसीकरण करण्यासाठी मोहिम राबवावी. तसेच बाधित जनावरांना औषधोपचार उपलब्ध होतील याची काळजी घ्यावी. यासाठी संबधित पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी आपल्या भागात पशुपालकांच्या मदतीसाठी उपलब्ध रहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

लम्पी आजाराबाबत मदतीसाठी पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ देण्यात आला आहे अशी माहितीही राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंदसोहळा आणि टाटा समूहाची भूमिका~ टाटा सेंट्रल अर्काइव्जतर्फे प्रदर्शनाचे आयोजन ~

0

पुणे-

भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ टाटा सेंट्रल अर्काइव्जने एका विशेष प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. भारताचे स्वातंत्र्य आणि टाटा समूहाची भूमिका यावर हे प्रदर्शन आधारित आहे.

टाटा-भारत वाटचाल‘ या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमधून उलगडण्यात आली आहे. स्वातंत्र्यपूर्व वसाहतकाळस्वातंत्र्योत्तर काळातील एकत्रीकरण व दृढीकरण आणि उदारीकरणानंतरचे विस्ताराचे युग असे वेगवेगळे टप्पे यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या काळांमध्ये टाटा समूहाने स्थापन केलेल्या वेगवेगळ्या कंपन्यापार केलेले अनेक टप्पे आणि त्यातून देशाच्या जडणघडणीत व प्रगतीमध्ये देण्यात आलेले योगदान असा संपूर्ण प्रवास याठिकाणी पाहता येईल. क्रीडा व लोकोपकारी उपक्रमांमध्ये टाटा समूहाने दिलेल्या लक्षणीय योगदानाची माहिती देखील या प्रदर्शनामध्ये घेता येईल.

टाटा समूहाने भारताच्या विकासात दिलेले अतुलनीय योगदान दर्शवणारी अनेक छायाचित्रेपत्रे आणि इतर अनेक रोचकमाहितीपूर्ण कागदपत्रे प्रत्येक विभागामध्ये प्रदर्शित करण्यात आली आहेत.

टाटा सेंट्रल अर्काइव्जने विशेष तयार केलेल्या या प्रदर्शनाला भेट देऊन भारताचा आगळावेगळा इतिहास जाणून घेण्याची संधी मिळवा.

सोमवार १२ सप्टेंबर २०२२ पासून सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील.

ठिकाण: टाटा सेंट्रल अर्काइव्जमंगलदास रोडपुणे ४११००१

पुण्याची तुंबई करणारे भाजपा,राष्ट्रवादीच:पाऊस ही समस्या नव्हे तर राजकर्ते ही समस्या-आप चा आरोप

0

केवळ पाऊस नव्हेतर काटेकोर, दीर्घकालीन नियोजनाचा, दृष्टीचा अभाव असणारे धोरण कर्ते ही पुण्याची समस्या !

पुणे- पाऊस हि समस्या नाही तर नैसर्गिक नद्या , नाले ,जलस्त्रोत यांच्यावर आक्रमण करणारे राजकर्ते आणि त्यांना साथ देणारे प्रशासक हि खरी समस्या आहे ,सध्या येणारे पूर हि नैसर्गिक नाही तर अशा धोरणकर्त्यांच्या कृत्यांनी येणारी आपत्ती आहे याकडे आता आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी लक्ष वेधले आहे .पाऊस तास २ तास झाला ,रात्रभर नाही झाला अशी पुष्टी जोडून त्यांनी आता तरी पुणेकरांनी जागे व्हावे असे आवाहन केले आहे .

ते म्हणाले,’ गेल्या दोन दिवसात प्रचंड पावसामुळे पुणे शहर तुंबलेले पाहायला मिळाले. खरंतर 2019 मधील धडकी भरणारा पाऊस व त्याच्यामुळे आंबील ओढा , इतर परिसरात झालेली जीवित हानी याची अंगावर काटा आणणारी आठवण पुणेकरांना पुन्हा झाली. वस्तूतः 2019 मध्ये आणि आत्ता 2022 मध्ये म्हणजे गेल्या तीन वर्षांमध्ये आपण काहीही शिकलो नाही याचं हे दर्शक आहे. आज राष्ट्रवादी आणि भाजप एकमेकांना दोष देताना पाहायला मिळाले प्रत्यक्षात गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये ओढे नाले बुजवणे, रस्त्याच्या कडेचे पाणी वाहून जाणारे ड्रेनेज बंद होणे, सिमेंट काँक्रीटचे थर ,पावसाचे पाणी व मैला विसर्जन यासाठीच्या पाईपलाईनची क्षमता अपुरी असणे.उंच सखल पणाचा विचार केलेला नसणे, सफाई केलेली नसणे, सखल भागात बांधकामे करणे आदी बाबी कारणीभूत आहेत असे दिसते.

परंतु 50 ते 100 वर्षासाठी एखादी वास्तू, एखादी जागा भाड्याने व वापरासाठी देण्यासाठी अत्यंत तत्पर असणारे नगरसेवक आणि प्रशासन, या पाऊस पाणी नियोजनामध्ये मात्र पाच वर्षाचा सुद्धा विचार करत नाहीत असेच दिसते. त्यामुळेच वाहतूक आराखडा, रस्ते नकाशे, उड्डाणपूल, नदी प्रकल्प या सर्वच बाबी तत्कालीन फायद्यासाठी,आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी फेरफार करीत ठरवल्या जात आहेत. यामुळे शहर तुंबण्याला सध्याचे प्रशासन व आधीचे सत्ताधारी म्हणजे भाजप आणि त्यापूर्वीचे राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार आहे. एकमेकांवर चिखलफेक करण्याऐवजी पुणेकरांना ज्या समस्यांना तोंड द्यायला लागत आहे, त्यावर गंभीरपणे चर्चा होण्याची गरज आहे. भाजप व राष्ट्रवादी याबाबत पुरेशे संवेदनशीलच नाहीत असेच म्हणावे लागेल. काटेकोर, दीर्घकालीन नियोजन हाच एकमेव पर्याय आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त १४ सप्टेंबर रोजी फेरफार अदालत

0

पुणे दि. १३ : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जनतेच्या कामकाजाचा निपटारा होण्याच्यादृष्टीने पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर १४ सप्टेंबर २०२२ रोजी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

नागरिकांच्या कामकाजाचा निपटारा करण्यासाठी फेरफार अदालतीच्या वेळी फेरफार अदालतीशिवाय जनतेच्या इतर कामकाजामध्ये सातबारा मधील त्रुटी दुरुस्त करणे तसेच तक्रार नोंदी विहीत मुदतीत निर्गत करणे, नागरिकांच्या तक्रार अर्जांच्या अनुषंगाने तालुका स्तरावर तक्रारीचे निवारण करणे, संजय गांधी लाभार्थ्याचे अर्ज स्वीकारणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजासाठी जातीचे, उत्पन्नाचे आदी दाखले वितरीत करण्याबाबतचे कामकाज करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले.

फेरफार नोंदी प्रलंबित आहे अशा व्यक्तींनी १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या फेरफार अदालतीमध्ये संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित रहावे. यावेळी मंडळ अधिकाऱ्यांना आवश्यक ते कागदपत्र उपलब्ध करुन देऊन आपल्या नोंदी निर्गत करुन घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.

अदालतीच्या दिवशी जास्तीत जास्त नोंदी निर्गत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडळ स्तरावर संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.
0000

आयएनएस सातपुडा  आणि P8 I सागरी गस्त  विमाने बहुराष्ट्रीय नौदल सराव  काकाडूमध्ये सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियातील डार्विन येथे पोहोचली

0

नवी दिल्ली-

रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलातर्फे आयोजित नौदल सराव,  काकाडूमध्ये भाग घेण्यासाठी  भारतीय नौदलाची आयएनएस सातपुडा  आणि P8 I सागरी गस्त  विमाने 12 सप्टेंबर 2022 रोजी ऑस्ट्रेलियातील डार्विन येथे पोहोचली.

बंदरावर तसेच समुद्रात होणाऱ्या  या दोन आठवड्यांच्या सरावात चौदा नौदलांमधली  जहाजे तसेच सागरी विमाने भाग घेतील. बंदरावरील सरावाच्या वेळी जहाजावरील कर्मचारीवर्ग इतर नौदलांसोबत कार्यान्वयन  नियोजन संवाद  तसेच क्रीडाविषयक कार्यक्रमात भाग घेईल.

‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’ या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन

0

पुणे, दि. १३: मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’ या विषयावर विद्यापिठाच्या संत नामदेव सभागृहात १४ व १५ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचा समारोप उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.

राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे. लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभागाचे अधिकारी, तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आदी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेत ‘एलजीबीटीआयक्यू’चा अर्थ आणि फरक, व्यसायामध्ये यशस्वी झालेल्या तृतीयपंथीयांशी संवाद, तृतीयपंथीयांचे शिक्षण आणि रोजगार, आपल्या पाल्याचे तृतीयपंथीत्व स्वीकारलेल्या पालकांशी संवाद, तृतीयपंथीयांचे चित्रण आणि स्थान : भाषा-साहित्य-पत्रकारिता-चित्रपट, तृतीयपंथीयांचा निवारा आणि आरोग्य, तृतीयपंथीयांसाठी आम्ही काय करणार? या सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. जमीर कांबळे व पथक हे तृतीयपंथी कवयित्री दिशा पिंकी शेख यांच्या कविता सादर करणार आहेत.

परिषदेत तृतीयपंथीयांची वेगळी ओळख, त्यांच्या पालकांनी त्यांचा केलेला स्वीकार-अस्वीकार, त्यांचे आरोग्य, रोजगार, शिक्षण, निवारा या समस्यांचा मागोवा, या समस्या सोडविण्यासाठी धोरणात्मक तरतुदी करण्याची गरज आदी विषयांची चर्चा केली जाणार आहे. तृतीयपंथीयांचे प्रश्न समजून घेण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांनी केले आहे.

रोजगार भरती मेळाव्यात ८०३ उमेदवारांची निवड

0

पुणे दि.१३: औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी तसेच रोजगार भरती मेळाव्यात विविध कंपन्याकडून नोंदणी केलेल्या ८३७ पैकी ८०३ उमेदवारांची निवड करण्यात आली.

या मेळाव्यात जिल्ह्यातील एकूण ४५ आस्थापना सहभागी झाल्या होत्या. शिकाऊ उमेदवारी भरतीकरीता आयटीआय उत्तीर्ण तसेच इतर शाखेतील एकूण ८३७ उमेदवारांनी मेळाव्यासाठी नोंदणी केली होती. आस्थापनांच्या मनुष्‍यबळ विकास विभागाकडून ८३७ पैकी ८०३ विद्यार्थ्यांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली. यामध्ये फिटर, इलेक्ट्रिशिअन, टर्नर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मशिनिस्ट व संगणक या पदांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे १२१ महिला उमेदवार पैकी ९६ महिला उमेदवारांची प्रामुख्याने सुईंग टेक्नोलॉजी, फॅशन टेक्नॉलॉजी, संगणक परिचालक या पदासाठी निवड करण्यात आली आहे.

औंध औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बी. आर. शिंपले यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार विकास टेके व यशवंत कांबळे, घोले रोड येथील शासकीय तांत्रिक विद्यालयाचे डब्ल्यू. व्ही. कोठेकरकनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रतिक देशमुख व दीपक चौधरी आदी उपस्थित होते.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा नुकताच निकाल जाहीर झाल्यानंतर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्यामुळे राज्यभरातून मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याची माहिती प्राचार्य यांनी यावेळी दिली.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या 5 लाख होणार-मंत्री चंद्रकांत पाटील

0


उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा घेतला आढावा
मुंबई, दि. 13 : महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड निर्माण व्हावी, सामजिक प्रश्नांची जणीव होऊन राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांचा अधिक सहभाग वाढावा यासाठी या योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या आता 5 लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाचा उपयोग व्यक्तिगत किंवा सामजिक अडचणी दूर करण्यासाठी झाला पाहिजे. सामाजिक अडचणीवर व्यावहारिक उपाय शोधण्यासाठी आणि समाजाप्रती सामजिक बांधिलकी जोपासण्यासाठी नेतृत्व गुण धारण करून लोकशाही प्रवृत्तीचा विकास आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख ७० हजारावरून आता ५ लाख करण्यात येणार आहे. ही संख्या जवळपास दीडपट वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव विद्यार्थ्यांचा खर्च राज्य शासन करेल असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
विद्यार्थी हे आपल्या देशाच भवितव्य, राष्ट्राची संपत्ती व उद्याची उमेद आहे. राज्यातील शैक्षणिक परिस्थिती पाहता आणि भविष्याचा विचार करता विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि कमी खर्चात उच्च शिक्षण उपलब्ध करून देणे मोठे आव्हान आहे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
एसएनडीटी विद्यापीठ येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागाची आढावा बैठक पार पडली त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते.
शासकीय महाविद्यालय आणि खाजगी महाविद्यालय यामधील शैक्षणिक शुल्कमध्ये मोठी तफावत आहे. शैक्षणिक वृद्धीसाठी ही तफावत कमी झाली पाहिजे. विद्यार्थ्यांना कमी खर्चात दर्जेदार उच्च शिक्षण मिळाले पाहिजे.यासाठी उच्च शिक्षण विभागाअंतर्गत नाविन्यपूर्ण शैक्षणिक योजना,विविध उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी आणि उत्कृष्ट नियोजन करावे, तसेच शैक्षणिक चळवळ सुरू राहावी यासाठी क्रीडा, सांस्कृतीक,सामाजिक उपक्रम राबवावेत विभागाने याचे नियोजन करावे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
नॅक मूल्यांकन न झालेल्या महाविद्यालयांनी तीन महिन्यात प्रक्रिया सुरू करावी
राज्यशासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने अकृषी विद्यापीठे सलंग्न महाविद्यालयांना नँक मूल्यांकन करून घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. तसेच दर पाच वर्षांनी नँक पुनर्मुल्यांकन करून घेणे बंधनकारक आहे. राज्यातील अद्यापही नँक मूल्यांकन पूर्ण न केलेल्या महाविद्यालयाने पुढील तीन महिन्यात नँक मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू न केल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल.असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
शासनमान्य ग्रंथालयात प्रकाशक/ ग्रंथ विक्रेता यांना नवीन ग्रंथ विक्रीसाठी शासनाच्या परवानगीची आवश्यकता नाही
राज्यातील तालुका पातळीवर ग्रंथ विक्रीची पुरेशा प्रमाणात व्यवस्था नसल्याने ग्रंथालयात वाचकांची गैरसोय होऊ नये यासाठी संबंधित ग्रंथालय व्यवस्थापनाने ग्रंथ प्रकाशक/ग्रंथ विक्रेता यांना नवीन ग्रंथ विक्रीस परवानगी देऊन व्यवस्था करावी. जिल्हा तालुका पातळीवरील ‘अ’ दर्जा वर्ग शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयात प्रकाशक ग्रंथ विक्रेता यांना नवीन ग्रंथ विक्रीस परवानगी देणे ग्रंथालय व्यवस्थापनाचा निर्णय असेल त्यासाठी शासनाच्या परवानगीची आवश्यकता नाही.असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी सांगितले.
ज्या विभागीय स्तरावर एसएनडीटी कॅम्पस नाही तिथे नवीन कॅम्पस सुरू करावे, सार्वजनिक ग्रंथालयांची दर्जा वाढ करताना आवश्यक तेवढेच पॅरामीटर्स ठेवून दर्जावाढ द्यावा, फिरत्या वाचनालयांची संख्या वाढवावी, ग्रंथालय विभाग ऑटोमोव्हिग करून पुस्तक देवघेव, अनुदान वितरण ऑनलाईन करावे, तीन वर्षातून एकदा ग्रंथालयाची तपासणी करावी. पदोन्नती व इतर अडचणी बाबत आढावा, व्यवसायिक महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क यावर्षी निश्चित झाले आहे त्यापैकी दहा टक्के प्रकरणांचे शुल्क निर्धारणाची तपासणी करावी, विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर क्रीडा महोत्सव, युवा महोत्सव आयोजन करावे, एनएसएसची नोंदणी वाढवावी अशा सूचनाही श्री. पाटील यांनी बैठकी वेळी केल्या.
दिनांक ११व १२ सप्टेंबर २०२२ रोजी या दोन दिवसीय बैठकीत विद्यापीठ, महाविद्यालय, तांत्रिक,सामान्य शाखा, राष्ट्रीय शिक्षण धोरण, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, कला संचालनालय, सीईटी, एफआरए, एमएसबीटीई, एमएसएफडीए, रुसा, राष्ट्रीय सेवा योजना या विषयावर सादरीकरण करून सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, रुसाचे प्रकल्प संचालक निपुण विनायक, एफआरए सचिव लहुराज माळी, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीबाबत माहिती देण्याचे आवाहन

0

पुणे दि.१३: प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीच्या कठीण परिस्थितीत पीक विमाधारक शेतकऱ्यांना फायदा होण्याच्यादृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत ७२ तासांच्या आत माहिती द्यावी आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी केले आहे.

सप्टेंबर २०२२ मध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसानीसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण दिले जाते.

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये जिल्हयातून एकूण ९ हजार ६४३ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. विमाधारक बाधीत शेतकऱ्यांनी आपले नुकसानीची पूर्वसुचना विमा कंपनीस ७२ तासांचे आत सादर करणे बंधनकारक आहे.

नुकसानीबाबत माहिती देण्यासाठी क्रॉप इन्सुरन्स अॅपद्वारे, संबंधीत विमा कंपनीच्या १८००२६६०७०० या टोल फ्री क्रमांकावर तसेच बँक, वित्तीय संस्था, कृषी व महसुल विभाग यांच्याकडे पीक विमाधारक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती वेळेत द्यावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

कोविड निर्बंध मागे घेतल्याने, मंडप डेकोरेटर्स, केटरर्स व मूर्तींचे कारागीर यांच्यासाठीच्या मागणीत नवरात्र व दुर्गापूजेच्या निमित्ताने लक्षणीय वाढ 

0

·         एक हजार भारतीय गावे आणि शहरांमध्ये उत्सवांसंबंधित सेवांच्या मागणीत ५५ टक्क्यांची वाढ.

·         उत्सवांसंबंधित सेवांना टियर-वन शहरांच्या तुलनेत टियर-टू शहरांमध्ये दुप्पट मागणी

·         मूर्ती निर्माते आणि मंडप डेकोरेटर्स यांना कोलकात्यामध्ये सर्वाधिक मागणी.

मुंबई१३ सप्टेंबर : कोविड निर्बंधांमुळे गेली दोन वर्षे उत्सव किरकोळ पद्धतीने साजरे झाले. यंदाच्या वर्षी मात्र हे निर्बंध उठविण्यात आल्यानंतर आगामी नवरात्र आणि दुर्गापूजेसाठी मंडप डेकोरेटर्स, मूर्ती निर्माते आणि केटरर्स यांसारख्या सेवांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे भारताच्या गिग अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असलेला उत्साहही वाढला आहे. जस्ट डायल कन्झ्युमर इनसाईट्स या नवीन अहवालात ही माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.

संपूर्ण भारतातील एक हजार गावे आणि शहरांमध्ये, मूर्ती निर्माते, मंडप डेकोरेटर्स, मिठाईची दुकाने, फ्लॉवर डेकोरेटर्स, पूजा वस्तूंचे विक्रेते आणि नवरात्री व दुर्गा पूजेसाठीचे खास केटरर्स यांसारख्या उत्सवी सेवांच्या विस्तृत श्रेणीसाठीची मागणी गेल्या वर्षीपेक्षा यंदा २९ टक्क्यांनी वाढली आहे. टियर-वन शहरांमधील ही मागणी ३३ टक्के आणि टियर-टू शहरांमध्ये ६० टक्के वाढली आहे.

याविषयी माहिती देताना जस्ट डायलचे सीएमओ प्रसून कुमार म्हणाले, “गेल्या दोन आव्हानात्मक वर्षांनंतर आता ग्राहकांचा उत्साह वाढला आहे. ही सुधारणा पाहणे आनंददायी आहे. नवरात्र आणि दुर्गा पूजेसाठी या विविध सेवांसाठीची मागणी वाढली, हे जस्ट डायलवर झालेल्या नोंदणीवरून सहज लक्षात येते. देशभरात, मंडप डेकोरेटर्ससाठीची मागणी १२४ टक्क्यांनी, केटरर्ससाठीची ५५ टक्क्यांनी आणि मूर्ती निर्मात्यांसाठीची मागणी २३ टक्क्यांनी वाढली. टियर-टू शहरांमधील शोधांमध्ये झालेल्या वाढीवरूनही हे सूचित होते, की ग्राहकांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचण्यासाठी सर्व व्यवसायांनी ऑनलाइन यंत्रणेत उपस्थित असणे आता आवश्यक झाले आहे. आगामी सणासुदीच्या हंगामात सेवा पुरवठादारांच्या विस्तृत श्रेणीला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. या चालना देण्यात जस्ट डायल महत्त्वाची भूमिका बजावेल.”

उपरोक्त सेवांच्या वाढत्या मागणीच्या अनुषंगाने, पूजेसाठीच्या वस्तूंचे विक्रेते, फ्लॉवर डेकोरेटर्स आणि मिठाईची दुकाने यांनादेखील संपूर्ण भारतात सण सुरू होण्याच्या सध्याच्या काळात मागणी वाढली आहे. पूजेसाठीच्या वस्तूंच्या विक्रेत्यांच्या शोधात १६ टक्क्यांनी, मिठाईच्या दुकानांसाठी १८ टक्क्यांनी आणि फ्लॉवर डेकोरेटर्ससाठी ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

टियर-वन शहरांमध्ये, मंडप डेकोरेटर्ससाठीच्या मागणीत ११८ टक्के, मूर्ती निर्मात्यांसाठीच्या मागणीत २९ टक्के, केटरर्ससाठी ३६ टक्के, पूजा साहित्य विक्रेत्यांसाठी २१ टक्के आणि मिठाईच्या दुकानांसाठीच्या मागणीत १३ टक्के वाढ झाली, तर फ्लॉवर डेकोरेटर्ससाठीची मागणी स्थिर राहिली. कोलकात्यातील दुर्गापूजेच्या प्रसिद्ध उत्सवामुळे तेथे मूर्ती विक्रेत्यांना सर्वात जास्त मागणी आहे. त्यानंतर दिल्ली आणि मुंबईचा क्रमांक लागतो.

मंडप डेकोरेटर्ससाठीची मागणी प्रामुख्याने कोलकाता, दिल्ली आणि मुंबई शहरांमध्ये होती, तर फ्लॉवर डेकोरेटर्ससाठीची मागणी मुंबई, दिल्ली आणि हैदराबादमध्ये जास्त होती. मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथेही दुर्गा पूजा आणि नवरात्रोत्सवासाठी केटरर्सचा शोध वाढला आहे, तर मिठाईच्या दुकानांसाठी ऑनलाइन शोध मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये जास्त होत आहे.

सणासुदीतील सेवांसाठी ऑनलाइन शोधांमध्ये टियर-टू शहरांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात, म्हणजे ६० टक्क्यांनी वाढ झाली. टियर-वन शहरांच्या तुलनेत ही वाढ जवळपास दुप्पट होती. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि कर्नाटकातील म्हैसूर या शहरांमध्ये मूर्तीकारांना मागणी जास्त होती, तर कोईम्बतूर, मदुराई, सुरत, त्रिची, सालेम या शहरांमध्ये मंडप सजावट करणाऱ्यांना जास्त मागणी होती. पूजासाहित्याच्या विक्रेत्यांसाठी टियर-टू शहरांमधील बहुसंख्य शोध हे पाटणा, इंदूर, नागपूर, रायपूर आणि वाराणसी येथे घेण्यात आले, तर चंडीगढ, जयपूर, कोईम्बतूर, एर्नाकुलम आणि इंदूरमध्ये फुलांच्या विक्रेत्यांना मागणी वाढली होती. केटरर्सना सर्वाधिक मागणी चंडीगढ, कोईम्बतूर, एर्नाकुलम, गोवा आणि इंदूर या शहरांमधून निर्माण आली होती, तर मिठाईच्या दुकानांसाठी चंडीगढ, अमृतसर, आग्रा, डेहराडून आणि अलाहाबाद या शहरांमधून मोठी मागणी होती.

एकूण 2157.48 दशलक्ष टन कोळसा साठा असलेल्या पाच राज्यांतील आठ खाणींचा झाला  ई-लिलाव

0

कोळसा मंत्रालयाने नियुक्त केलेल्या प्राधिकरणाने आज आठ कोळसा खाणींचा ई-लिलाव केला.  त्याचे  तपशील खालीलप्रमाणे आहेत: –

  • पाच कोळसा खाणी पूर्णत: अन्वेषण केलेल्या आहेत आणि तीन खाणी अंशतः अन्वेषित  आहेत.
  • या आठ कोळसा खाणींमध्ये  एकूण  2157.48  दशलक्ष टन (एमटी ) भूगर्भीय साठा  आहे.
  • या कोळसा खाणींची  एकूण सर्वाधिक दर  क्षमता (पीआरसी) वार्षिक 19.31 दशलक्ष टन आहे.

ई- लिलावाच्या पहिल्या दिवसाचे निकाल खालीलप्रमाणे आहेत.

S. No.Name of the MineStatePRC (mtpa)Geological Reserves (MT)Closing Bid Submitted byReserve Price (%)Final Offer (%)
1SursaChhattisgarhNA72.55Madhya Bharat Minerals Private Limited/3337024.005.50
2Dahegaon/Makardhokra-IVMaharashtra1.61121.00Avassa Ferro Alloys Private Limited/3329774.005.50
3BasantpurJharkhandNA200.00Gangaramchak Mining Private Limited/1480954.005.00
4Bandha NorthMadhya PradeshNA500.00Jaiprakash Power Ventures Limited/647024.0015.75
5Marki Mangli-IVMaharashtra0.203.42Sobhagya Mercantile Limited/3218544.006.00
6JitpurJharkhand2.5081.10Terri Mining Private Limited/3271954.007.00
7-8Rampia & Dip Side of RampiaOdisha15.001179.41Jhar Mineral Resources Private Limited/2310294.509.50

.

जपान – भारत सागरी द्विपक्षीय सराव,बंगालच्या उपसागरात सुरु

0

नवी दिल्ली- भारतीय नौदलातर्फे आयोजित, भारत आणि जपान यांच्यातील सागरी सराव 2022 (JIMEX 22) च्या सहाव्या सत्राला बंगालच्या उपसागरात  सुरूवात झाली.

जपान सागरी स्वसंरक्षण दलाच्या (JMSDF) जहाजांचे नेतृत्व, रियर अॅडमिरल हिराता तोशियुकी, कमांडर एस्कॉर्ट फ्लोटिला फोर करत आहेत तर भारतीय नौदलाच्या जहाजांचे नेतृत्व, नौदलाच्या पूर्व ताफ्याचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग, रियर अॅडमिरल संजय भल्ला करत आहेत.

जेएमएसडीएफच्या इझुमोचे या हेलिकॉप्टर वाहक जहाजाचे आणि ताकानामी या मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिकेचे  बंगालच्या उपसागरात आगमन झाल्यानंतर भारतीय नौदलाच्या जहाजांनी त्यांचे स्वागत केले. स्वदेशी बनावटीच्या तीन भारतीय युद्धनौका या सरावात सहभागी होत असून त्यात सह्याद्री या रोल स्टेल्थ युद्धनौकेसह कडमॅट आणि कवरत्ती  या पाणबुडी रोधक युद्धनौकांचा समावेश आहे. त्याशिवाय रणविजय हे मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक, ज्योती हा फ्लीट टँकर, सुकन्या ही सागरी गस्ती नौका, पाणबुड्या, मिग 29 के लढाऊ विमान, लांब पल्ल्याचे सागरी गस्ती विमान तसेच जहाजावरील हेलिकॉप्टर्ससुद्धा या सरावात सहभागी होणार आहेत. 

JIMEX 22 अंतर्गत सागरी सराव आणि विशाखापट्टणम येथील बंदरावरील सराव अशा दोन टप्प्यांमध्ये सराव होणार आहे.

जपानमध्ये 2012 साली सुरू झालेल्या JIMEX च्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर भारत आणि जपान यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या 70 व्या वर्धापन दिनाचेही औचित्य आहे. JIMEX 22 अंतर्गत समुद्रातील, समुद्रावरच्या आणि आकाशातील खडतर सरावांच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या सागरी दलांमधील परस्पर समन्वय वाढण्यास मदत होईल.

१७ आणि १८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे महारोजगार मेळावा, स्टार्टअप प्रदर्शन, करिअर कौन्सिलिंगसह विविध उपक्रम

0

मुंबई, दि. 13 : मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृत महोत्सवाचा शुभारंभ तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या 17 व 18 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार मेळाव्याचे त्याचबरोबर नवउद्योजकांना चालना देण्यासाठी स्टार्टअप प्रदर्शन, युवकांसाठी करिअर कौन्सिलिंग, स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्धतेबाबत माहिती, आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी ऑन जॉब ट्रेनिंग, अप्रेंटीशीपच्या संधी यांविषयी माहिती, फोटो गॅलरी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नोकरी इच्छुक उमेदवार आणि उद्योजक यांना या मेळाव्यात एकाच व्यासपीठावर आणण्यात येणार असून पात्र उमेदवारांना तिथेच नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

मराठवाड्यातील रोजगारविषयक कार्यक्रमाला गती मिळेल

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासात मराठवाड्याचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामात योगदान देणाऱ्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन देण्यासाठी महारोजगार मेळाव्यासह इतर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर या दिवशी प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असून प्रधानमंत्री यांनी स्किल इंडिया मोहिमेद्वारे देशातील प्रत्येक युवकाला कौशल्य प्रशिक्षण आणि त्याद्वारे रोजगार, स्वयंरोजगार मिळवून देण्याचे सुनिश्चित केले आहे. महारोजगार मेळावा आणि त्याबरोबर आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांमधून मराठवाड्यातील रोजगार उपलब्धतेच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गती मिळेल, असा विश्वास मंत्री श्री. लोढा यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद येथील रेल्वे स्टेशन रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) या मेळाव्याचे तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रदर्शनस्थळी विविध उद्योजक आपले स्टॉल मांडणार असून त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त जागांवर उमेदवारांची थेट भरती केली जाणार आहे. मेळावास्थळी विविध उद्योग असोसिएशन यांचेही स्टॉल असणार आहेत. स्वयंरोजगाराबाबत इच्छुक उमेदवारांना माहिती व मार्गदर्शन देण्यासाठी विविध महामंडळे, बँका, खाजगी संस्था तसेच स्वयंरोजगाराच्या योजना राबविणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांचे प्रतिनिधी या मेळावास्थळी उपलब्ध असणार आहेत. स्वयंरोजगारासाठी कर्ज कशा पद्धतीने उपलब्ध करून घ्यावे, याची माहिती त्यांच्यामार्फत देण्यात येईल.

स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि मॅजिक इंडस्ट्रीज असोसिएशन हे इन्क्युबेटर्स म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत विविध स्टार्टअप्सचे प्रदर्शन आणि सादरीकरण आयोजित करण्यात येणार आहे. याद्वारे स्टार्टअप्सना आपले इनोवेशन सादर करण्याची संधी मिळणार आहे. स्टार्टअप, युनिकॉर्न यांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या नाविन्यताविषयक विविध संकल्पनांची माहिती देणारा स्टॉलही येथे असणार आहे. कौशल्य विकास विभागामार्फत युवकांसाठी करिअरविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय यांच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. फोटो गॅलरी आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून कौशल्य, उद्योजकता आणि महारोजगार मेळाव्याची माहिती यावेळी देण्यात येणार आहे. युवक- युवतींना कौशल्य विकास आणि रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी या माध्यमातून व्यापक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

मेळाव्यास मंत्री श्री. लोढा यांच्यासह केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त दीपेन्द्र सिंह कुशवाह यांच्यासह विविध उद्योजक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

“स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्राला धोके” महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातला गेल्याने आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

0

मुंबई- वेदांत कंपनीचा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातला गेल्याने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. वेदांतचा हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार, हे जवळपास निश्चित झालं असताना हा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्राला धोके, असं हे सरकार असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.हा उद्योग पावणे दोन लाख कोटींचा आहे. या उद्योगासोबत १०७ इतर छोटे-मोठे उद्योग उभे राहणार होते. याच्या माध्यमातून ७० हजार ते १ लाख रोजगार निर्माण होणार होते. 

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, वेदांतचा संबंधित प्रकल्प महाराष्ट्रात यावा, यासाठी आम्ही मागील अनेक दिवसांपासून चाचपणी करत होतो. अनेक बैठका घेत होतो. हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार हे जवळपास ९५ टक्के निश्चित झालं होतं. स्वाक्षरी झाल्यानंतर १०० टक्के प्रकल्प महाराष्ट्रात आला असता. संबंधित कंपनीने पुण्याजवळील तळेगाव येथे प्रकल्प उभारण्यासाठी जागा निश्चित केली होती. सर्वकाही सकारात्मक घडत असताना, एवढा मोठा प्रकल्प गुजरातला कसा काय गेला? असा प्रश्न आम्हाला पडला आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

1.54 लाख कोटी रुपयांच्या प्रचंड गुंतवणुकीसह महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला महत्त्वाकांक्षी वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातला गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण या प्लांटमधून महाराष्ट्रातील थेट एक लाख कुशल तरुणांना नोकऱ्या मिळणार होत्या. यावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राजकारण करू नका

आदित्य म्हणाले, सदर कंपनीला आणि राज्याला शुभेच्छा. मात्र, प्रकल्प राज्याबाहेर का गेला याचे उत्तर मिळायलाच हवे. यावर राजकारण करू नका. जी कंपनी आपल्याकडे 100 टक्के येणार होती. ती का गेली हे आम्ही विचारणार. 1 लाख लोकांना रोजगार मिळणार होता. त्यामुळे याला जर कोणी राजकारण म्हणत असेल तर राजकारण म्हणा पण आम्ही प्रश्न विचारणार.

महाराष्ट्राला मोठा फटका

आदित्य पुढे म्हणाले, आपल्याकडे आता जी व्यवस्था आहे, तिच्यावर आता कोणाला विश्वास नसेल. महाविकास आघाडीचे सरकार असताना कंपनी येणार होती मग आता का नाही. आत्ताच्या सरकारने आपण काय कमी पडलो याचे उत्तर द्यावे. महाराष्ट्राला यातून मोठा फटका बसलाय. याचे दुःख होत आहे. थोडे राजकारण बाजूला ठेवून इकडेही पाहा.

या सरकारवर विश्वास नाही

आदित्य ठाकरे म्हणाले की, एवढ्या मोठ्या गुंतवणुकीकडे दुर्लक्ष का केले? हा विषय महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांचा आहे. सगळे ठरले होते. त्यानंतर आत्ताचे हे खोके सरकार काय करत होते? असा प्रश्न उपस्थित होतो. कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झालाय. या सरकारवर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. त्याचमुळे आज ही परिस्थिती उद्भवल्याची टीका त्यांनी केली.

प्रकल्प तळेगावला होणार होता-देसाई

माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले, वेदांतचे प्रमुख अनिल अग्रवाल यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली होती. गोष्टी पुढे गेल्या होत्या. त्यानंतर 3 महिन्यांपूर्वी फॉक्सकॉनचे तैवानचे सीईओंची दिल्लीत भेट घेतली होती. प्रकल्प तळेगावला होणार हे देखील निश्चित झाले होते. मात्र, त्यानंतर आता प्रकल्प आपल्या हातातून गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.