नवी दिल्ली-
रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलातर्फे आयोजित नौदल सराव, काकाडूमध्ये भाग घेण्यासाठी भारतीय नौदलाची आयएनएस सातपुडा आणि P8 I सागरी गस्त विमाने 12 सप्टेंबर 2022 रोजी ऑस्ट्रेलियातील डार्विन येथे पोहोचली.
बंदरावर तसेच समुद्रात होणाऱ्या या दोन आठवड्यांच्या सरावात चौदा नौदलांमधली जहाजे तसेच सागरी विमाने भाग घेतील. बंदरावरील सरावाच्या वेळी जहाजावरील कर्मचारीवर्ग इतर नौदलांसोबत कार्यान्वयन नियोजन संवाद तसेच क्रीडाविषयक कार्यक्रमात भाग घेईल.