Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कोविड निर्बंध मागे घेतल्याने, मंडप डेकोरेटर्स, केटरर्स व मूर्तींचे कारागीर यांच्यासाठीच्या मागणीत नवरात्र व दुर्गापूजेच्या निमित्ताने लक्षणीय वाढ 

Date:

·         एक हजार भारतीय गावे आणि शहरांमध्ये उत्सवांसंबंधित सेवांच्या मागणीत ५५ टक्क्यांची वाढ.

·         उत्सवांसंबंधित सेवांना टियर-वन शहरांच्या तुलनेत टियर-टू शहरांमध्ये दुप्पट मागणी

·         मूर्ती निर्माते आणि मंडप डेकोरेटर्स यांना कोलकात्यामध्ये सर्वाधिक मागणी.

मुंबई१३ सप्टेंबर : कोविड निर्बंधांमुळे गेली दोन वर्षे उत्सव किरकोळ पद्धतीने साजरे झाले. यंदाच्या वर्षी मात्र हे निर्बंध उठविण्यात आल्यानंतर आगामी नवरात्र आणि दुर्गापूजेसाठी मंडप डेकोरेटर्स, मूर्ती निर्माते आणि केटरर्स यांसारख्या सेवांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे भारताच्या गिग अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असलेला उत्साहही वाढला आहे. जस्ट डायल कन्झ्युमर इनसाईट्स या नवीन अहवालात ही माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.

संपूर्ण भारतातील एक हजार गावे आणि शहरांमध्ये, मूर्ती निर्माते, मंडप डेकोरेटर्स, मिठाईची दुकाने, फ्लॉवर डेकोरेटर्स, पूजा वस्तूंचे विक्रेते आणि नवरात्री व दुर्गा पूजेसाठीचे खास केटरर्स यांसारख्या उत्सवी सेवांच्या विस्तृत श्रेणीसाठीची मागणी गेल्या वर्षीपेक्षा यंदा २९ टक्क्यांनी वाढली आहे. टियर-वन शहरांमधील ही मागणी ३३ टक्के आणि टियर-टू शहरांमध्ये ६० टक्के वाढली आहे.

याविषयी माहिती देताना जस्ट डायलचे सीएमओ प्रसून कुमार म्हणाले, “गेल्या दोन आव्हानात्मक वर्षांनंतर आता ग्राहकांचा उत्साह वाढला आहे. ही सुधारणा पाहणे आनंददायी आहे. नवरात्र आणि दुर्गा पूजेसाठी या विविध सेवांसाठीची मागणी वाढली, हे जस्ट डायलवर झालेल्या नोंदणीवरून सहज लक्षात येते. देशभरात, मंडप डेकोरेटर्ससाठीची मागणी १२४ टक्क्यांनी, केटरर्ससाठीची ५५ टक्क्यांनी आणि मूर्ती निर्मात्यांसाठीची मागणी २३ टक्क्यांनी वाढली. टियर-टू शहरांमधील शोधांमध्ये झालेल्या वाढीवरूनही हे सूचित होते, की ग्राहकांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचण्यासाठी सर्व व्यवसायांनी ऑनलाइन यंत्रणेत उपस्थित असणे आता आवश्यक झाले आहे. आगामी सणासुदीच्या हंगामात सेवा पुरवठादारांच्या विस्तृत श्रेणीला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. या चालना देण्यात जस्ट डायल महत्त्वाची भूमिका बजावेल.”

उपरोक्त सेवांच्या वाढत्या मागणीच्या अनुषंगाने, पूजेसाठीच्या वस्तूंचे विक्रेते, फ्लॉवर डेकोरेटर्स आणि मिठाईची दुकाने यांनादेखील संपूर्ण भारतात सण सुरू होण्याच्या सध्याच्या काळात मागणी वाढली आहे. पूजेसाठीच्या वस्तूंच्या विक्रेत्यांच्या शोधात १६ टक्क्यांनी, मिठाईच्या दुकानांसाठी १८ टक्क्यांनी आणि फ्लॉवर डेकोरेटर्ससाठी ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

टियर-वन शहरांमध्ये, मंडप डेकोरेटर्ससाठीच्या मागणीत ११८ टक्के, मूर्ती निर्मात्यांसाठीच्या मागणीत २९ टक्के, केटरर्ससाठी ३६ टक्के, पूजा साहित्य विक्रेत्यांसाठी २१ टक्के आणि मिठाईच्या दुकानांसाठीच्या मागणीत १३ टक्के वाढ झाली, तर फ्लॉवर डेकोरेटर्ससाठीची मागणी स्थिर राहिली. कोलकात्यातील दुर्गापूजेच्या प्रसिद्ध उत्सवामुळे तेथे मूर्ती विक्रेत्यांना सर्वात जास्त मागणी आहे. त्यानंतर दिल्ली आणि मुंबईचा क्रमांक लागतो.

मंडप डेकोरेटर्ससाठीची मागणी प्रामुख्याने कोलकाता, दिल्ली आणि मुंबई शहरांमध्ये होती, तर फ्लॉवर डेकोरेटर्ससाठीची मागणी मुंबई, दिल्ली आणि हैदराबादमध्ये जास्त होती. मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथेही दुर्गा पूजा आणि नवरात्रोत्सवासाठी केटरर्सचा शोध वाढला आहे, तर मिठाईच्या दुकानांसाठी ऑनलाइन शोध मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये जास्त होत आहे.

सणासुदीतील सेवांसाठी ऑनलाइन शोधांमध्ये टियर-टू शहरांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात, म्हणजे ६० टक्क्यांनी वाढ झाली. टियर-वन शहरांच्या तुलनेत ही वाढ जवळपास दुप्पट होती. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि कर्नाटकातील म्हैसूर या शहरांमध्ये मूर्तीकारांना मागणी जास्त होती, तर कोईम्बतूर, मदुराई, सुरत, त्रिची, सालेम या शहरांमध्ये मंडप सजावट करणाऱ्यांना जास्त मागणी होती. पूजासाहित्याच्या विक्रेत्यांसाठी टियर-टू शहरांमधील बहुसंख्य शोध हे पाटणा, इंदूर, नागपूर, रायपूर आणि वाराणसी येथे घेण्यात आले, तर चंडीगढ, जयपूर, कोईम्बतूर, एर्नाकुलम आणि इंदूरमध्ये फुलांच्या विक्रेत्यांना मागणी वाढली होती. केटरर्सना सर्वाधिक मागणी चंडीगढ, कोईम्बतूर, एर्नाकुलम, गोवा आणि इंदूर या शहरांमधून निर्माण आली होती, तर मिठाईच्या दुकानांसाठी चंडीगढ, अमृतसर, आग्रा, डेहराडून आणि अलाहाबाद या शहरांमधून मोठी मागणी होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन

पुणे, दि. २८: महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था...

अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलां-मुलींच्या निवासी शाळेत प्रवेश घेण्यासाठी आवाहन

पुणे, दि. २८: जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची...