Home Blog Page 1614

खेलरत्न, जीवनगौरव, द्रोणाचार्य, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन, अर्जुन पुरस्कार खेळाडुंनी पुरस्कारांकरिता नामनिर्देशन प्रस्ताव सादर करावेत

0

मुंबई, दि. 15 : मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, खेळामध्ये यश संपादन केल्याबद्दल ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी (विद्यापीठांकरिता), द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन पुरस्कार 2022 च्या नामांकनाकरिता नामनिर्देशन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

हे प्रस्ताव दिनांक 20 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. विहित कालावधीनंतर प्राप्त होणारे अर्ज तसेच अपुर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही. या वर्षीपासून पात्र खेळाडुंनी या पुरस्काराकरिता मार्गदर्शक तत्त्वानुसार ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. हे अर्ज भरताना कोणत्याही विभागाची अथवा व्यक्तींची शिफारस न घेता ते केंद्र शासनाच्या https://dbtyas-sports.gov.in/ या संकेतस्थळावर थेट सादर करावे. अर्ज संदर्भात नियमावली तसेच विहित नमुन्यातील अर्ज https://yas.nic.in/sports या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

ऑनलाईन अर्जाबाबत काही अडचण असल्यास Department of sports च्या section.sp4-moyas@gov.in या ई-मेल किंवा 011-23387432 या क्रमांकावर कार्यालयीन कामाकाजाच्या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 पर्यंत संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी कळविले आहे.

विद्यार्थी मिळाले तर शिक्षक मिळेनात : पुणे महापालिकेची दयनीय अवस्था-नितीन कदम म्हणाले,शिक्षकांना योग्य पगार द्या….

0

पुणे- ३२० शिक्षकांची भारती ठरलेली असताना प्रत्यक्षात २८९ शिक्षकांची नियुक्ती केलेल्या पुणे महापालिकेत प्रत्यक्षात मात्र केवळ १२० शिक्षकच रुजू झाल्याने पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाची अवस्था मोठी दयनीय झाली आहे. स्मार्ट सिटी च्या नावाखाली रंगरंगोटी करणाऱ्या आणि दरवर्षी पूर येऊ नये म्हणून नालेसफाई ची नाटके करणाऱ्या अब्जावधीची उड्डाणे घेणाऱ्या पुणे महापालिकेने खुद्द स्वतःच्या सुरक्षेसाठी ठेवलेल्या सुरक्षा रक्षकांना तर वाऱ्यावर सोडलेले आहेच पण आता महापालिका शाळेतील गोरगरीब मुलांना शिकविण्यासाठी मेहनत घेऊ पाहणाऱ्या शिक्षकांची देखील आर्थिक पिळवणूक सुरु ठेवली आहे. येथे एकवट पद्धतीने दरमहा १५ हजार रुपये वेतन दिले जात असल्याने आता महापालिका शाळांना शिक्षक मिळेनासे झाले आहेत . हजारो कोटींची मेट्रो, नदी सुधार प्रकल्प अशा विविध बाबींवर उधळपट्टी करणाऱ्या महापालिकेने चालविलेली हि सेवकांची आर्थिक पिळवणूक येथे शासनाने पाठविलेल्या आय ए एस दर्जाच्या अधिकाऱ्यांना कशी दिसत नाही , ते सोयीस्करपणे कशी डोळ्यावर पट्टी ओढून घेतात ? असे सवाल यानिमित्ताने पुढे येत आहेत .

याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नितीन कदम म्हणाले कि,’राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने सातत्याने यासंदर्भात पाठपुरावा केला जात आहे. यापूर्वीही शाळा सोडल्याचा दाखल्याविना मनपा शाळेत प्रवेश द्यावा याची आग्रही व यशस्वी मागणी केली होती.कोरोना प्रादुर्भाव काळात खाजगी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांची शालेय फी थकल्यामुळे अनेक पालकांनी पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुलांचे प्रवेश घेतले. त्यामुळे साहजिकच महानगरपालिका शाळांचा पट मोठ्या संख्येने वाढला असून त्याकरिता ३५० शिक्षकांची भरती होणे आवश्यक असताना २८९ शिक्षकांना नियुक्ती पत्र देण्यात आली. तरी देखील त्यातून फक्त १२० शिक्षक सेवेत रुजू झाले.आम्हाला माहिती प्राप्त झाल्यानुसार सदर शिक्षकांना एकवट १५ हजार मासिक पगार दिला जातो. अपुऱ्या पगारामुळे, नौकरीच्या अनिश्चिततेमुळे कदाचित शिक्षकांनी याकडे पाठ फिरवली आहे. याच तुलनेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षकांना एकवट २५ हजार मासिक पगार देत आहे.

महत्वाचे म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये यंदाच्या वर्षी विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्राथमिक शिक्षण देणे ही पुणे मनपाची जबाबदारी असून शिक्षकांअभावी त्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थी चांगल्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत.त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तातडीने आवश्यक ती शिक्षक भरती करून पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण व सुविधा देण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात यावी, ही राष्ट्रवादी अर्बन सेल ची आग्रही मागणी आहे.

आनंद ग्रुप फौंडेशन तर्फे वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न

0

पुणे- येथील आनंद ग्रुप फौंडेशन तर्फे वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते तसेच आनंद ग्रुप फौंडेशन च्या आनंद रेखी तसेच डॉ धर्मेंद्र शहा यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न झाला.काश्मीर मध्ये 370 कलम उठवल्यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालय, रोटरी इंटरनॅशनल यांच्या तर्फे पुण्यातील भुलतज्ञ डॉ श्यामकांत कुलकर्णी, नेत्रातज्ञ डॉ राजेश पवार आणि नेत्रतज्ञ डॉ आनंद खडके यांनी 12 दिवसात 4861 विविध शस्त्रक्रिया केल्या त्यात डोळ्यांच्या 886 शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडल्या. त्यांच्या या अफाट कार्याला समर्पक प्रतिसाद म्हणून आनंद ग्रूप फौंडेशन च्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. श्री आनंद ग्रुप फाउंडेशन आयोजित सत्कारसमारंभाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक हे म्हणाले की, काश्मीर भारताचे मुकूट आहे, तर गोवा हे तीळ आहे. काश्मीर च्या शान, शांती आणि सुव्यवस्थेसाठी सर्वजण प्रयत्न करूयात. या सत्कार समारंभात दौंडच्या जि प शाळेच्या एक आदर्श शिक्षिका ज्योती सातव यांचा ही विशेष सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ श्यामकांत कुलकर्णी , डॉ खडके आणि डॉ राजेश पवार यांनी काश्मीर मधील आपले अनुभव कथन केले. सदर कार्यक्रमाला वाहतूक कोंडीमुळे उशीर झाल्याने नियोजित सार्थकी लावत प्रा काशिनाथ भतगुणकी यांनी शेतीपासून ते स्पर्धा परीक्षेच्या यशा पर्यंतचा प्रवास कथन केला आणि उपस्थितांनामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण केली. त्यांनी मा पर्यटन मंत्री यांना विशिष्ट प्रकारचा लक्षवेधक कापडी पुष्पगुच्छ भेट दिला. प्रणव शेंडकर, डॉ कौस्तुभ शेंडकर, डॉ संकेत खरपुडे, नगरसेवक कुंदन गायकवाड, माजी नगरसेवक रमेश काळे तसेच सागर हिंगणे यांचं सहकार्य मोलाचं ठरलं. स्वागतपेयासह स्नेहभोजनचं उत्कृष्ट नियोजन असलेल्या कार्यक्रमाचं सूत्र संचालन डॉ परवेझ बागवान यांनी केलं, तर प्रास्ताविक संजय भोसले यांनी केलं आणि सतीश लोखंडे यांनी आभार प्रदर्शन केलं.

पर्यटन व प्रवास प्रदर्शनाचे आयोजन

0

पुणे दि.१५: महाराष्ट्र पर्यटन संचालनालय, विभागीय पर्यटन कार्यालय, आणि भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १६,१७ व १८ सप्टेंबर या कालावधीत दिवस सेंट्रल पार्क हॉटेल, आपटे रोड, येथे ‘पर्यटन व प्रवास प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात येणार आहे.

सकारात्मक व्यावसायिक स्पर्धा निर्माण करून पर्यटकांना सहलीचा दर्जा आणि किंमत यांच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात फायदा मिळवून देणे या प्रदर्शनाचे मूळ उद्दिष्ट आहे. प्रदर्शनात राज्यभरातील सुमारे ६०- ७० पर्यटनाशी निगडीत व्यावसायिक सहभागी होणार आहे. तीन दिवसीय प्रदर्शनात महाराष्ट्र राज्यासह देश विदेशातील पर्यटक भेट देतात.

प्रदर्शनास भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी सोडत पद्धतीने सहल आणि भेटवस्तू आदी सुविधा असून पर्यटकांनी प्रदर्शनास भेट देऊन जास्तीत जास्त सवलतींचा व भेटवस्तुंचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय पर्यटन कार्यालयाच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर यांनी केले आहे.

४२ कोटी रुपयांच्या बनावट खरेदी बिलांचा वापर करुन इनपुट टॅक्स क्रेडिट घेणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

0

महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई

पुणे दि. १५: बनावट कंपन्यांकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय सुमारे ४२ कोटी २८ लाखाहून अधिक बनावट खरेदी देयकाद्वारे शासनाची ८ कोटी ६९ लक्ष रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन त्याद्वारे जीएसटी कररुपातील महसूल बुडविणाऱ्या व्यापाऱ्यास महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने अटक केली आहे.

मे.ओम साई टेड्रिंग कंपनीच्या मालका विरोधात महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाकडून करचोरी विरोधी विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. वस्तू व सेवा कर विभागाकडून बनावट देयकांसंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत सुशील जग्गुमल जैन या यांना १४ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी या व्यक्तीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभाग कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा कसून शोध घेत आहे. विभागाकडून या आर्थिक वर्षात आतापर्यंत ४२ कारवाया करण्यात आल्या आहेत.

अपर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे मार्गदर्शनाखाली तसेच राज्यकर सह आयुक्त दीपक भंडारे यांच्या नेतृत्वाखाली राज्यकर उपायुक्त मनिषा गोपाळे-भोईर, राज्यकर सहायक आयुक्त सतीश लंके, दत्तात्रय तेलंग सचिन सांगळे यांनी कारवाई करण्यात आली आहे.

लंपी रोगावरील लस खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून ५० लाखाचा निधी

0

पुणे दि.१५: लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पुणे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुणे यांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून औषधे व लस खरेदीसाठी प्रत्येकी २५ लाख याप्रमाणे ५० लाखाच्या खर्चास जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ.राजेश देशमुख यांनी मान्यता दिली आहे.

लंपी रोगावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. विशेषत: लसीकरणावर भर देण्यात आला आहे. लंपी रोगाचा संसर्ग झालेल्या पशुधनाला इतर जनावरांपासून वेगळे ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या उपचारासाठी पुरेशी औषधे आणि लसमात्रादेखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या खर्चास तातडीने मान्यता दिली आहे.

लंपी नियंत्रणासाठी आवश्यकता असल्यास अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्र किंवा राज्य शासनाकडून लंपी आजारावरील लशीसाठी निधी उपलब्ध झाल्यास हा निधी प्राधान्याने औषधांसाठी वापरण्यात यावा, असेही मंजूरी आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जिल्ह्यात लसीकरणाला वेग
जिल्ह्यात १२ तालुक्यातील ७६ ठिकाणी पशुधनाला लंपीचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. ३०६ जनावरांना लंपीचा संसर्ग झाला असून त्यापैकी ८ जनावरांचा मृत्यू झाला आहे आणि १७७ सक्रीय असून १२१ बरे झाले आहेत. हा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी आणि बाधित जनावरांवर औषधोपचार करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. त्यासाठी २ लाख ८५ हजार ७०० लसमात्रा उपलब्ध झाल्या आहेत. जिल्हा संनियंत्रण समितीच्या बैठकीतही याबाबत आढावा घेण्यात आला आहे.

बाधित जनावरे आढळलेल्या गोठ्यापासून ५ किलोमीटर परिसरातील सर्व पशुधनाचे तातडीने लसीकरण करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले असून त्यानुसार मोहिम स्तरावर हे काम करण्यात येत आहे. निगराणी क्षेत्रातील सुमारे ४ लाख ४० जनावरांचे लसीकरण करावयाचे असून त्यापैकी १ लाख ५५ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. बाधित जनावरे आढळलेल्या भागापासून ५ किलोमीटरच्या क्षेत्रातील सर्व पशुधनावर मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाची एकूण २९० पथके नेमण्यात आले असून त्यासाठी ७३० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रिंग व्हॅक्सिनेशन
लंपी संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लसीकरण पद्धतीला ‘रिंग व्हॅक्सिनेशन’असे म्हणतात. यात बाधित जनावराचे ठिकाण किंवा गोठा केंद्र मानून ५ किलोमीटरच्या परिघाच्या भागातील लसीकरण आधी करण्यात येते आणि तेथून सुरूवात करीत बाधित भागाकडे जात जनावरांचे लसीकरण करण्यात येते. त्यामुळे संसर्गाची तीव्रता कमी करण्यास मदत होते असे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शितलकुमार मुकणे यांनी सांगितले.
0000

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक स्थैर्य आणि विकास मंडळाची 26 वी बैठक संपन्न

0

मुंबई, 15 सप्टेंबर 2022

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत आर्थिक स्थैर्य आणि विकास मंडळाची 26 वी बैठक पार पडली.इतर अनेक बाबींसोबत, या बैठकीत मंडळाच्या सदस्यांनी अर्थव्यवस्थेबाबतच्या धोक्याची पूर्वसूचना देणारे संकेत आणि त्यासंदर्भातील आपली सज्जता, सध्याच्या आर्थिक/कर्जविषयक माहिती प्रणालींच्या कार्यक्षमतेत सुधारणा, आर्थिक बाजारांच्या पायाभूत सुविधांसह प्रणाली संदर्भात महत्त्वाच्या आर्थिक संस्थांमधील प्रशासन तसेच व्यवस्थापनविषयक समस्यांवर उपाययोजना, आर्थिक क्षेत्रातील सायबर सुरक्षा आराखडा मजबूत करणे, सर्व अर्थविषयक सेवा आणि संबंधित व्यवहारांसाठी सामायिक केवायसी, अकाऊंट ॲग्रीगेटरबाबत अद्ययावतीकरण तसेच पुढील पावले, उर्जा क्षेत्राला वित्तपुरवठा करण्याशी संबंधित मुद्दे, नव्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत जीआयएफटी आयएफएससीची धोरणात्मक भूमिका आणि सर्व सरकारी विभागांतर्फे  नोंदणीकृत व्हॅल्युअरच्या सेवांचा उपयोग करून घेण्याची आवश्यकता या मुद्यांवर चर्चा केली.

आर्थिक क्षेत्रातील जोखीम, आर्थिक स्थिती आणि बाजारातील घडामोडी यांच्यावर सरकारने तसेच नियामकांनी सतत लक्ष ठेवण्याची गरज आहे जेणेकरून विपरीत परिस्थिती उद्भवल्यास असुरक्षितेचा सामना करता येईल आणि आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत करण्यासाठी वेळेवर, योग्य उपाययोजना करता येऊ शकतील हा मुद्दा या बैठकीत ठळकपणे मांडण्यात आला.

भारताच्या अध्यक्षतेखाली वर्ष 2023 मध्ये होणाऱ्या जी-20 राष्ट्रांच्या बैठकीत चर्चिल्या जाणाऱ्या आर्थिक क्षेत्रातील समस्यांच्या संदर्भातील तयारीचा मंडळाच्या सदस्यांनी आढावा देखील घेतला.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत किशनराव कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास, केंद्रीय अर्थ सचिव आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयातील व्यय विभागाचे सचिव डॉ.टी.व्ही.सोमनाथन, केंद्रीय अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ, केंद्रीय अर्थ मंत्रालयातील महसूल विभागाचे सचिव तरुण बजाज, केंद्रीय अर्थ मंत्रालयातील आर्थिक सेवा विभागाचे सचिव संजय मल्होत्रा, केंद्रीय अर्थ मंत्रालयातील मुख्य आर्थिक सल्लागार डॉ.व्ही.अनंत नागेश्वरन, सेबीच्या अध्यक्ष माधोबी पुरी बुच, आयआरडीएचे अध्यक्ष देबाशिष पांडा,पीएफआरडीएचे अध्यक्ष सुप्रतीम बंदोपाध्याय, आयबीबीआयचे अध्यक्ष रवी मित्तल, आयएफएससीएचे अध्यक्ष आणि आर्थिक व्यवहार विभागाच्या एफएसडीसीचे सचिव इंजेती श्रीनिवास हे देखील या बैठकीला उपस्थित होते.

जागतिक संकट काळातही भारताने ऊर्जा, अन्न आणि इंधन या तीन आघाड्यांवर अत्यंत चांगली कामगिरी केली आहे: केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी

0

मुंबई, 15 सप्टेंबर 2022

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज मुंबईत, भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या (MoP&NG) अंतर्गत, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने, सेंटर फॉर हाय टेक्नॉलॉजी (CHT) द्वारे आयोजित 25 व्या ऊर्जा तंत्रज्ञान मेळाव्याला संबोधित केले. देशातील नागरिकांसाठी ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या भारताच्या प्रगतीवर मंत्र्यांनी प्रकाश टाकला तसेच देशातील ऊर्जा मिश्रण अधिक शाश्वत आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या सरकारच्या योजनांची रूपरेषा सांगितली.

पूर्वी रिफायनिंग अँड पेट्रोकेमिकल्स टेक्नॉलॉजी मीट म्हणून ओळखल्या जाणार्‍या, ह्या वार्षिक ऊर्जा तंत्रज्ञान संमेलनात भारत आणि परदेशातील 1000 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. या वर्षी 15 ते 17 सप्टेंबर दरम्यान चालणारा हा कार्यक्रम, ऊर्जा क्षेत्राशी थेट संबंध असलेल्या अलीकडील काळातील प्रगती आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देणारा ठरला आहे. “नवीन ऊर्जा युगातील परिष्करण” या संकल्पनेअंतर्गत, 25 व्या ऊर्जा तंत्रज्ञान संमेलनात देशातील बदलत्या ऊर्जा परिदृश्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

या संमेलनाला संबोधित करताना, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले की, सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे निर्माण झालेली नवी आव्हाने समोर उभी असताना देखील, भारताने आपले शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य कायम ठेवले आहे. तसेच, भारत हायड्रोकार्बनच्या जगातून अशा जगात संक्रमण करण्यासाठी कटिबद्ध आहे, जिथे हरित आणि शाश्वत ऊर्जा आपली ऊर्जेची गरज भागवेल.

मंत्री म्हणाले की, जागतिक संकटांच्या पार्श्वभूमीवर भारताने ऊर्जा, अन्न आणि इंधन या तीन आघाड्यांवर अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. ऊर्जेची उपलब्धता आणि किफायतशीरतेची हमी देत जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संकटातून देशाला आत्मविश्वासाने मार्ग काढता आला. ते म्हणाले की, देशाचा दरडोई ऊर्जेचा वापर सध्या जागतिक सरासरीच्या एक तृतीयांश आहे आणि येत्या काही वर्षांत तो जागतिक सरासरी ओलांडेल. भारत 2030 मध्ये 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळे ऊर्जा मिश्रणात बदल करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

ऊर्जा क्षेत्रात देशाने केलेली प्रगती अधोरेखित करताना हरदीप सिंह पुरी म्हणाले की, आज आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन हे निवडीचे पर्याय राहिले नसून अनिवार्य घटक झाले आहेत. मे 2022 पर्यंत, भारताने आधीच 10% जैवइंधन मिश्रण उद्दिष्ट गाठले असून येत्या एक-दोन वर्षात 20% मिश्रणाचा टप्पा गाठणार आहे.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनीही उपस्थित प्रतिनिधींना संबोधित केले आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील देशाच्या प्रगतीवर प्रकाश टाकला. देशातील ऊर्जा मिश्रणातील नैसर्गिक वायूचा वाटा सध्याच्या 6% वरुन 2030 पर्यंत 15% पर्यंत वाढवण्याच्या सरकारच्या संकल्पाची माहिती त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 2030 पर्यंत देशात 18 हजार कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने देशभरात सीएनजी आणि पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) दोन्हीची उपलब्धता अधिक चांगल्या प्रकारे सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या इतर उपाययोजनांची माहिती तेली यांनी दिली.

25 व्या ऊर्जा तंत्रज्ञान मेळाव्यात 15 तांत्रिक सत्रांमध्ये, एकूण 82 मौखिक शोध निबंध सादर केले जातील ज्यात 43 परदेशी कंपन्यांच्या निबंधाचा तर परदेशातील 24 वक्त्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, आघाडीच्या तेल कंपन्या, तंत्रज्ञान / सेवा प्रदात्यांनी आपले तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा याबाबत माहिती देणारे 16 प्रदर्शन स्टॉल्स देखील लावले आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण यांची निवड

0

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय ; पुढील २ वर्षांकरीता माणिक चव्हाण यांची अध्यक्षपदी तर सरचिटणीसपदी हेमंत रासने यांची नियुक्ती ; उत्सव प्रमुख अक्षय गोडसे तर सहचिटणीसपदी अमोल केदारी यांची नियुक्ती

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी ट्रस्टचे विद्यमान सरचिटणीस माणिक चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली. गुरुवार (दि.१५) झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून पुढील २ वर्षांकरीता माणिक चव्हाण यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी तर सरचिटणीसपदी हेमंत रासने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विश्वस्त मंडळाच्या बैठकीला ट्रस्टचे डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, अक्षय गोडसे, अमोल केदारी, कुमार वांबुरे, मुरलीधर लोंढे, उत्तमराव गावडे आदी उपस्थित होते. माणिक चव्हाण हे ट्रस्टचे विद्यमान सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. माणिक चव्हाण हे ट्रस्टच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ कायमच सक्रिय सहभागी असतात. तसेच कोविड काळात ट्रस्टने केलेल्या मदतकार्यात देखील स्वत: रस्त्यावर उतरुन त्यांनी सहभाग घेतला होता.

ट्रस्टने यापूर्वी घोषणा केल्यानुसार १५ सप्टेंबर रोजी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सन २०२२ ते २०२४ याकरिता ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, विश्वस्त कुमार वांबुरे, मुरलीधर लोंढे, उत्तमराव गावडे हे वरील पदांवर कार्यरत राहणार आहेत.

पुढील १४ वर्षांचे नियोजीत अध्यक्ष
सन २०२२ ते २०२४ याकरिता ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण, सन २०२४ ते २०२६ अशा पुढील दोन वर्षांकरीता ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने, सन २०२६ ते २०३१ या पुढील पाच वर्षांकरीता महेश सूर्यवंशी आणि सन २०३१ ते २०३६ या त्या पुढील पाच वर्षांकरीता हेमंत रासने हे ट्रस्टचे अध्यक्षपद भूषविणार असल्याचा महत्वाचा निर्णय देखील एकमताने घेण्यात आला आहे. यामाध्यमातून पुढील १४ वर्षांचे नियोजीत अध्यक्ष देखील यावेळी एकमताने ठरविण्यात आले. बैठकीनंतर सर्व विश्वस्तांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.

६५ अभियंत्यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करुन गौरव

0

अंतर्गत स्पर्धा संपवून विभागाचा कारभार अधिक स्वच्छ व पारदर्शक ठेवा
विभागाची प्रतिमा व कामाची गुणवत्ता अधिक सुधारा
-सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आवाहन

मुंबई दि.१५ सप्टेंबर : सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आज अनेक आव्हाने असली तरी यासर्वांवर मात करून प्रत्येक कामामध्ये सकारात्मकता आणून नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनतेला उत्कृष्ट सेवा देण्याबरोबरच प्रत्येकाने सर्वोत्कृष्ट काम करण्याचा संकल्प करून राज्याला प्रगतीपथावर नेवूया, तसेच आपल्या विभागाची कामगिरी सर्वोत्तम करण्याच्यादृष्टीने विभागाचा कारभार स्वच्छ व पूर्णपणे पारदर्शक ठेवायाला हवा. विशेष म्हणजे विभागात कोणामध्येही कसल्याही प्रकारची असलेली सध्याची अंतर्गत स्पर्धा संपली पाहिजे. आपला विभाग हा जनसामान्यांशी जोडलेला असल्यामुळे यापुढे विभागाची प्रतिमा व कामाची गुणवत्ता,दर्जा हा अधिक सुधारण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.

माटुंगा येथील षण्मुखांनद सभागृहात, भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिन राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीचा गौरव समारंभ शानदारपणे पार पडला. याप्रसंगी विभागात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ६५ अभियंताचा गौरव सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करुन करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, भारतरत्न विश्वेश्वरैया यांनी आधुनिक भारताची निर्मिती केली आणि देशाला नवे रूप दिले. अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांनी असाधारण योगदान दिले आहे. आज सार्वजनिक बांधकाम विभागासमोर अनेक आव्हाने आहेत. आपल्या विभागाकडून जनतेच्याही खूप अपेक्षा आहेत त्या पूर्ण क्षमतेने परिपूर्ण करण्यासाठी काम करा. आपापल्या कामामध्ये सकारात्मकता आणा. जगासोबत जाताना अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत करा. कोणताही रस्ता अथवा बांधकाम करताना ते दर्जेदार व उत्कृष्टपणे निर्माण करा. देश घडविण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. त्यादृष्टीने विभागाने आपल्या कार्यपध्दतीमध्ये बदल करुन पावले उचलण्याची गरज आहे. विभागाला सध्या निधीची कमतरता आहे, तरीही कमी निधीमध्ये आवश्यक पण दर्जेदार स्वरुपाची कामे करण्याची मानसिकता आपण ठेवली पाहिजे व त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. आपल्या विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी आगामी काळात आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून सर्वांच्या सूचनांचे स्वागत करण्यात येईल. आपली कामे हे पूर्ण क्षमतेने करा. कोणीही आपल्या विभागाविषयी तक्रार करता कामा नये याची प्रत्येकाने दक्षता घ्यायला हवी. मी माझ्या विभागाच्या कामामध्ये उत्कृष्ट सेवा देणार असे जर सर्वांनीच ठरवले तर येणा-या काळात आपला महाराष्ट्र राज्य नक्कीच प्रगतीपथावर जाईल असा विश्वासही मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.

मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, रस्त्यांवरील अपघात प्रवण क्षेत्र दुरुस्तीच्या अनुषंगाने अधिक सक्षम उपाययोजना करा, नाविन्यपूर्ण प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने नियोजनबध्द आराखडा असणे आवश्यक आहे. रस्ते, पूल बांधणी यामध्ये नवीन साहित्य, व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करा, विभागाच्या सर्व कामांची गुणवत्ता सुधारण्याबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात सर्वांनी अंतर्गत स्पर्धा टाळून काम करा. आपण सुचवलेल्या सूचनांवर नक्की काम करता येईल. तसेच, इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटिस सारख्या नवीन उपक्रम राबवावा जेणेकरून नवोदित अभियंता राज्याला मिळतील, असेही त्यांनी सांगितले.

आजचा दिन ईडीचा आहे म्हणजेच इंजिनिअरिंग डे आहे असा उल्लेख करुन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, गुगल, उबेर सारख्या ज्या कंपन्यांनी आज जगामध्ये क्रांती घडविली व यशाची नवीन शिखरे गाठली आहेत. त्या कंपन्याच्या यशाचे गमक म्हणजे एका इंजिनिअरने आपल्या कल्पकतेने या कंपन्या स्थापन केल्या व यश मिळविले. याच पध्दतीने आपल्या विभागाच्या प्रत्येक कर्मचा-यांमध्ये असलेल्या इच्छाशक्तीच्या जोरावर मिशन मोडमध्ये काम करुन त्यांनी नव्याने इंजिनिअरप्रमाणे बदल घडवून विभागाला प्रगतीपथावर नेले पाहिजे, अशी अपेक्षाही रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार आता ख-या अर्थाने तळागळातील जनसामान्यांसाठी काम करण्यासाठी तत्पर आहे. आमचे सरकार जनसामान्यांचे असून जनतेची अधिक सेवा सरकारला करावयाची आहे. त्यामुळे हे सरकार अधिक गतीने काम करेल असेही रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

राज्याच्या विकासात सार्वजनिक बांधकाम विभागाची महत्त्वाची भूमिका :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस

राज्याला शाश्वत आणि सर्वसमावेशक भविष्याकडे नेवून राज्याच्या विकासात सार्वजनिक बांधकाम विभाग महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

गेल्या दीडशे वर्षात बांधले गेलेले रस्ते, पूल, रेस्ट हाऊस , सर्किट हाऊस आणि अनेक प्रशासकीय इमारतींच्या बांधकामांचा साक्षीदार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्याच्या पायाभूत सुविधा उभारणीत महत्त्वाचे योगदान आहे. संपूर्ण बांधकाम चक्रामध्ये कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आज महत्वाचे झाले आहे. महाराष्ट्रात ग्रीन बिल्डींग उभ्या रहात आहेत, मात्र त्याला आणखी गती देण्याची गरज आहे. तसेच, स्वदेशी आणि स्थानिक पातळीवर तयार झालेले बांधकाम साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून सार्वजनिक बांधकाम विभागाला आपली नवी कार्यपद्धती विकसित करावी लागेल असेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले,

यावेळी विभागाची बलस्थाने, कोणकोणती नवीन कामे करता येवू शकतात तसेच विभागाच्या कामामध्ये जाणवणा-या विविध अडचणी याबद्दल राज्यातील अभियंता यांनी सूचना केल्या व मत मांडली.पुरस्कार वितरणसोहळा पार पडल्यानंतर पुरस्कार प्राप्त अभियंत्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कायापालट करण्याच्या दृष्टीने विभागाची कार्यपध्दती अधिक दर्जेदार व सक्षम करण्यासाठी अपर मुख्य सचिव मनोज सौनिक व विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रंसगी बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, सचिव (रस्ते) स.शं.साळुंखे, सचिव (इमारती) प्र.द.नवघरे, मुंबई प्रदेश प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे सचिव सु.अ.वांढेकर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनाचे सचिव खं.तु.पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाचे सह व्यवस्थापकीय संचालक अ.ब.गायकवाड, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे र.रा.हांडे यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता उपस्थित होते. सचिव (रस्ते) स.शं.साळुंखे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम चांदोरकर यांनी केले.

सन २०१३ ते २०१९ पर्यंत उत्कृष्ट अभियंत्यांच्या पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे-

वर्ष २०१३-१४

तत्कालीन कार्यकारी अभियंता साहेबराव सुरवसें, कार्यकारी अभियंता बी.एन. बहिर ,तत्कालीन उप अभियंता लक्ष्मीकांत जाधव,उप अभियंता प्रदीप दळवी,सहाय्यक अभियंता श्रीमती रिता शुक्ला,कनिष्ठ अभियंता सुरेश जोशी,कनिष्ठ अभियंता श्री.संदीप चाफले,तत्कालीन वास्तुशास्त्रज्ञ मिंथिला जाधव,अंजली माटोडकर.

वर्ष २०१४-१५

तत्कालीन अधीक्षक अभियंता खंडेराव पाटील,कार्यकारी अभियंता विजय कारंडे,कार्यकारी अभियंता संजय मुनगिलवार,कार्यकारी अभियंता अनिल लक्ष्मण पवार,उप अभियंता श्रीकांत ढगे, उप अभियंता अनील निमकर, तत्कालीन उप अभियंता अस्मिता खोंडे,कनिष्ठ अभियंता समीर राऊळ,सहा.अभियंता श्रेणी-2 राहुल कुलकर्णी,कनिष्ठ अभियंता मोहन महाडीक,तत्कालीन वास्तुशास्त्रज्ञ श्रीमती यशोधरा देशपांडे.

वर्ष २०१५-१६

तत्कालीन अधीक्षक अभियंता राजीव गायकवाड,कार्यकारी अभियंता विनोद भदाणे,कार्यकारी अभियंता पोपट वाघमारे,उप अभियंता अजय भोसले,उप अभियंता संदीप कोटलवार,उप अभियंता कृष्णा वाघ,कनिष्ठ अभियंता शिवानंद बिराजदार,कनिष्ठ अभियंता संजय सोमाण,कनिष्ठ अभियंता (विद्युत)इशांत प्रकाश कुलकर्णी,तत्कालीन वास्तुशास्त्रज्ञ संजय गेडाम,वास्तुशास्त्रज्ञ हर्षद साळुंके.

वर्ष २०१६-१७

अधीक्षक अभियंता शामकांत पाटील,तत्कालीन कार्यकारी अभियंता नारायण वेदपाठक,कार्यकारी अभियंता बाबासाहेब थोरात,कार्यकारी अभियंता प्रमोद बनगोसावी,
उप अभियंता सच्चिदानंद श्रावणी (अमरावती),उप अभियंता गणेश पाटील (नाशिक),उप अभियंता (विद्युत) संभाजी घोरपडे,कनिष्ठ अभियंता जितेंद्र नेहेते,कनिष्ठ अभियंता आनंद नागरे,सहाय्यक अभियंता श्रीकांत गुलकोटवार,वास्तुशास्त्रज्ञ शिल्पा कडू,सतिश पाटील.


सन २०१७-१८

अधीक्षक अभियंता सुनिल देशमुख, तत्कालीन कार्यकारी अभियंता सुषमा साखरवाडे,तत्कालीन कार्यकारी अभियंता जयंत कुलकर्णी,उप अभियंता ललिता गिरीबुवा,उप अभियंता सत्यशील नगराळे, उप अभियंता सुग्रीव गंगाधर केंद्रे,उप अभियंता संजीवनी करले,कनिष्ठ अभियंता बाबू शिंदे,कनिष्ठ अभियंता सुभाष बल्लाळ.

सन २०१८-१९

अधीक्षक अभियंता विकास रामगुडे,कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई,कार्यकारी अभियंता सचिन चिवटे,कार्यकारी अभियंता गजानन टाके,उप अभियंता रश्मी डोळे,कनिष्ठ अभियंता जितेंद्र काळे,कनिष्ठ अभियंता अतुल मुंडे,कनिष्ठ अभियंता (विद्युत) तानाजी थोपटे, पंकज पाटील, योगिता सोडल, दिपाली पवार, आर.बी.राजगुरु

पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा प्रकल्प आणू म्हणणे म्हणजे, लहान मुलाच्या हट्टानंतर त्याला त्याहून मोठा फुगा देऊ असं सांगण्यासारखं.. शरद पवारांची टीका

0

पुणे- पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा प्रकल्प आणू म्हणणे म्हणजे ,म्हणजे एका घरात एका लहान मुलाला एक फुगा दिला, दुसऱ्या मुलाच्या हट्टानंतर त्याला त्याहून मोठा फुगा देऊ असं सांगण्यासारखं आहे,गेलेला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्यात पुन्हा येणार नाही. अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी टोलेबाजी केली. वेदांता-फॉक्सकाॅन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातेत गेला. तर आता चर्चा कशाला. केंद्रातील सत्ता हातात असल्यास राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जातात, असे प्रकार घडत असतात. शिंदे-भाजप सरकारला राज्यात प्रकल्पाची गरज वाटत नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.

पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी या महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या प्रकल्पासंदर्भात विचारण्यात आलं असता त्यांनी झालं ते झालं आता नवीन काय करता येईल असा विचार केला पाहिजे अशी भूमिका मांडली. मात्र त्याचवेळी त्यांनी या प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन त्यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीला दोष देणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री सामंत यांचा खोचक शब्दांमध्ये समाचार घेतला.

शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र नेहमी गुंतवणूकदार यांच्या पसंतीचे देशातील पाहिले राज्य राहिलेले आहे. तशाप्रकारे नेतृत्व राज्यात त्यावेळी होते. परंतु सध्याचे राज्याचे नेतृत्व आम्हाला गरज नाही अशाप्रकारचे दिसते आहे. भांडवली गुंतवणुकीस योग्य वातावरण अतापर्यंत देशात महाराष्ट्राने निर्माण केले आहे. ‘काय झाडी, काय हवा’ हे रोज म्हणण्यापेक्षा आणि वाद घालण्यापेक्षा राज्याच्या दृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकत्रित येऊन विकासावर चर्चा केली पाहिजे. मुख्यमंत्री यांनी पुढाकार घेऊन नवीन गुंतवणूक प्रकल्प राज्यात आणले पाहिजे.

पवार म्हणाले, वेदांत प्रकल्प हा महाराष्ट्र सोडून गुजरात मध्ये गेला आहे. तळेगाव येथे हा प्रकल्प येणार होता. त्यानुसार राज्य सरकारने आवश्यक ती तयारी केली होती. हा प्रकल्प दुसरीकडे जायला नको होता. त्यामुळे आता चर्चा करून उपयोग नाही. कारण तो पुन्हा राज्यात प्रकल्प येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत होते. त्यामुळे त्यांनी केवळ आरोप करू नये. कंपनीने दुसरा प्रकल्प देवू असे सांगितले हे केवळ समजूत काढण्याचा प्रकार आहे.

पवार म्हणाले, केंद्राची सत्ता हातात असल्याने अशाप्रकारे निर्णय होतात. मोदी आणि शाह हे केंद्रांत सत्तेत असून त्यांचे सर्वात जास्त दौरे गुजरातमध्येच असतात. तळेगावच्या आजूबाजूला चाकण , रांजणगाव औद्योगिक परिसर असून त्याला ऑटोमोबाइल हब म्हणून ओळखले जाते. इथे प्रकल्प टाकला असता, तर वेदांत कंपनीला ही चांगले झाले असते.

पवार म्हणाले, कंपनीला आपली कंपनी कुठे चालवायची हा त्यांचा अधिकार आहे. यापूर्वी सुद्धा अशाप्रकारे कंपनीने भूमिका घेतली असून त्यात नवीन काही वाटत नाही. आमच्या काळात एनरोन प्रकल्पास विरोध झाला आणि राज्य सरकारला तो प्रकल्प गुंडाळावा लागला होता. नवीन सरकार राज्यात आले परंतु त्याचा कारभार दिसून आला नाही.

पंतप्रधानांनी कंपनीवर दबाव आणून वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प हुकूमशाही पद्धतीने गुजरातला हलवला- पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

0

मुंबईचे महत्व कमी करून अहमदाबादचे महत्त्व वाढविण्यासाठी पंतप्रधानांचा गैर पद्धतीने हस्तक्षेप

कराड-वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प हुकूमशाही पध्दतीने गुजरातला हलविण्यात आला असल्याचा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये आज पत्रकार परिषदेत केला.मुंबईचे महत्व कमी करून अहमदाबादचे महत्त्व वाढविण्यासाठी पंतप्रधानांनी गैर पद्धतीने हस्तक्षेप करून कंपनीवर दबाव आणत प्रकल्प गुजरातला नेला आहे. यामुळे महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकारची राज्याला जबर किंमत मोजावी लागणार असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप केला की, 1 लाख 54 हजार कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातील तळेगाव परिसरात येणार होता. प्रकल्प येणार हे जवळजवळ निश्चित झाले होते. तळेगावमध्ये कमी किमतीत जागाही उपलब्ध करून दिली जाणार होती. केंद्र सरकारकडून या प्रकल्पाला मोठ्या रकमेचे अनुदान मिळणार आहे. मात्र, अचानक चक्रे फिरली आणि गुजरात राज्यात प्रकल्प जाणार असल्याचे घोषित करण्यात आले. पंतप्रधानांनी गैर पध्दतीने हस्तक्षेप करत कंपनीवर दबाव आणून हा प्रकल्प गुजरातला नेला.

हायजॅक करणे भाजपची नीती

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना पालघरमध्ये मरीन अ‍ॅकॅडमीला जमीन दिली होती. दुर्देवाने त्यानंतर सत्तांतर झाले आणि सत्तेवर आलेल्या भाजप नेतृत्वाने तो प्रकल्पही हायजॅक केला. त्यानंतर फणवणीस सरकारच्याच काळात आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र देखील महाराष्ट्रातून अहमदाबादला नेले. मोठे प्रकल्प गुजरातला नेऊन मुंबईचे महत्व कमी करून अहमदाबादचे महत्व वाढविण्याचा भाजप नेतृत्वाचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईला आंतरराष्ट्रीय फ्लाईटची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत अहमदाबादमध्ये फ्लाईट येत नाहीत. तरीही मुंबईतील प्रकल्प अहमदाबादला का नेले जात आहेत, असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ठाणे, पालघर भागातून जाणार्‍या बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला कसलाही फायदा होणार नसताना मोदींच्या हट्टापोटी हा प्रकल्प लादला गेला आहे.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, बीकेसीसारख्या बिझनेस सेंटरमधील हजारो कोटींची जागा बुलेट ट्रेन स्टेशनसाठी दिली आहे. यामध्ये सरकारमधील काही जणांचा फायदा आहे. काही जणांच्या फायद्यासाठी प्रकल्प अन्यत्र हलविण्याची जी मालिका सुरू आहे. त्या मालिकेतील वेदांता-फॉक्सकॉन हा तिसरा प्रकल्प आहे. हुकूमशाही पध्दतीने प्रकल्प गुजरातला हलविण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकारचा अशा पध्दतीने फटका महाराष्ट्राला बसतोय. मोदींचा आदेश आला की निमुटपणे तो पाळण्याचे काम माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री करतात.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आम्ही बंद केलेले उद्योगातील लायसन्स राज मोदींनी पुन्हा आणले आहे. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाणे ही महाराष्ट्रासाठी तोट्याची गोष्ट ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प अशा पध्दतीने हायजॅक करण्याचा प्रयत्न यापुर्वीच्या कोणत्याही पंतप्रधानांनी केलेला नव्हता. त्यामुळे लोकांनी याबद्दल राज्यातल्या डबल इंजिन सरकारला जाब विचारला पाहिजे.

मी काँग्रेस सोडणार, वेगळा निर्णय घेणार, अशा बातम्या कोण पेरतयं?

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी काँग्रेस सोडणार, वेगळा निर्णय घेणार, अशा बातम्या कोण पेरतंय ते मला माहित नाही. मी काँग्रेसच्याच विचारांचा आहे, असे स्पष्ट करून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशात लोकशाही धोक्यात आली असून काँग्रेस पक्षच लोकशाही वाचवू शकतो. पक्षाला कायमस्वरूपी अध्यक्ष असावा, अशी आम्ही मागणी केली होती. सोनिया गांधींशी थेट संवाद होत नव्हता. वेळ मिळत नव्हती. म्हणून आम्ही पत्र लिहिले होते. ते पत्र कोणीतरी फोडले. त्यामुळे गैरसमज निर्माण झाले. मात्र, ज्येष्ठ नेत्यांची मागणी मान्य करून निवडणूक जाहीर केल्यानंतर मी सोनिया गांधींचे आभार मी मानले.

अध्यक्षपदासाठी इच्छुक नाही

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी अध्यक्षपदासाठी इच्छुक नाही. किंबहुना अध्यक्षपदाची निवडणूकही लढविणार नाही, असे स्पष्ट करून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या घटनेनुसार निवडणूक व्हावी. लोकशाही पध्दतीने पक्ष चालावा, यासाठी कार्यकारिणीत नेमलेले लोक नसावेत, तर निवडून आलेले असावेत, अशी आमची भूमिका आहे. पक्ष मजबुतीने आणि लोकशाही पध्दतीने चालला पाहिजे. कारण, काँग्रेसच भाजपचा मुकाबला करू शकते.

बंडखोर अपात्र ठरतील

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,​​​​​​​ राज्यात डबल इंजिन सरकार आहे. मात्र, अजुन पूर्ण मंत्रीमंडळ नाही. त्यामुळे पालकमंत्री नेमले नसावेत. आमदार अपात्रतेबाबतच्या सुनावणीवर सुप्रीम कोर्ट देखील चालढकल करत आहे. तसेच 91 व्या घटना दुरूस्तीनुसार बंडखोर आमदार अपात्र ठरतील, असे मला वाटते. सरकारच राहणार नसल्यामुळे राज्यातील सरकारच्या हालचाली थंडावल्या.

सकाळी 6 वाजेपर्यंत काम केलं तर हे बाबा उठतात कधी? झोपतात कधी?

0

जळगाव-नुकत्याच झालेल्या पैठण येथील सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपण सकाळी 6 वाजेपर्यंत काम करत असतो, असे म्हणत अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्यावर सकाळी 6 वाजेपर्यंत काम केल तर हे बाबा उठतात कधी? झोपतात कधी?, असा सवाल करत अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंची खिल्ली उडवली.जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवार यांनी शिंदे सरकारसह बंडखोरांवर जोरदार हल्ला चढवला.पवार म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारमधील एक आमदार गोळीबार करतो, अमरावतीमधील एक खासदार पोलिसांनी हुज्जत घालते, एक जण विरोधकांच्या तंगड्या तोडायची भाषा करते. एवढे होऊनही फडणवीस, शिंदे काहीच बोलत नाही. मविआ सरकारच्या काळात काँग्रेसमधील कुणाच चुकल की सोनिया गांधींचा निरोप यायचा आणि सगळ व्यवस्थित व्हायच. राष्ट्रवादी काँग्रेसमधील कुणी चुकीच केल तर शरद पवार सूचना करायचे आणि ती चूक दुरुस्त व्हायची. शिवसेनेमधील कुणी चुकीच वागल की उद्धव ठाकरे त्यांना आवरायचे. पण, शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात कुणी कुणाला सांगायच? हा प्रश्नच आहे. सर्वच्या सर्व 40 बंडखोर म्हणतात आम्हीच मुख्यमंत्री. वर म्हणताय काय, आमचे सरकार सर्वसामान्यांचे. अरे मग आमचे सरकार सामान्यांचे नव्हते काय? आम्ही काय वरुन पडलो होतो का?

अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे पैठण येथील भाषण मीही ऐकले. म्हणे मी सकाळी 6 पर्यंत काम करतो. 6 पर्यंत काम केल तर हे बाबा उठतात कधी ? 6 पर्यंत काम करतात तर मग झोपतात कधी? काही कळल पाहिजे ना. पटेल असं बोला ना राव. लयच पुढच बोलाय लागलेय

सूरतला गेल्यावर जागू शकतो

अजित पवार म्हणाले, काही दिवसांपूर्वी माझी बहीण म्हणाली होती की मी सकाळी 6 ला उठून काम करतो. आता आहे सवय. वाईट आहे का? त्यावरही मुख्यमंत्री म्हणतात, मी सहाला उठतो. माणूस 24 तास काम करु शकतो का? फार फार तर एक, दोन दिवस तो अशा पद्धतीने काम करु शकतो. किंवा सुरतला गेल्यावर एखाद पद मिळेल म्हणून जागू शकतो. पण नंतर कधीतरी मेंदू म्हणेलच अरे बाबा झोप, झोप. सहा तास तरी झोप पाहिजेच ना.

…तर बोलावं लागेलच ना

अजित पवार म्हणाले, आम्ही शरद पवार साहेबांना 55 वर्षांपासून काम करताना पाहतोय. रात्री 2 ला झोपले तरी साहेब सकाळी 7 ला तयार रहायचे. पण मध्ये पाच, सहा तासांची झोप व्हायचीच ना. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याप्रती आदर आहेच. पण तुम्ही काहीही न पटण्यासारख बोलायला लागला तर आम्हालाही बोलाव लागेलच ना.

दादा भुसे कर्णाचा दुसरा अवतार

शिंदे-फडणवीस सरकारमधील जवळपास 14 मंत्र्यांनी अजून आपल्या खात्यांचा कारभारच न स्वीकारल्याबद्दलही अजित पवारांनी जोरदार टोले लगावले. पवार म्हणाले, अनेक मंत्र्यांच्या वाटेला नको ती खाती आली आहेत. ज्यांना कृषि खाते हवी होते, त्यांना खनिज आणि बंदरे दिली. आता दादा भुसेंचा खनिजाशी काय संबंध? त्यांच्याकडे एकतरी बंदर आहे का? याबाबत मी दादा भुसेंना विचारलं तर भुसे म्हणतात, मीच सांगितल होत मला साधे खाते द्या. म्हटलं भुसे एवढा मोठा माणूस कधी झाला. कर्णाचा दुसरा अवतारच जणू काही.

अभिनेता सलमान खानला 3 महिन्यांत दोनदा मारण्याचा प्रयत्न

0

मुंबई-सलमान खान गेल्या 4 वर्षांपासून लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर आहे. या टोळीने एवढ्या वर्षांत सलमानच्या हत्येचा 4 वेळा प्रयत्न केला होता. आता याप्रकरणी पंजाब पोलिसांनी गुरुवारी नवा खुलासा केला आहे. त्यानुसार लॉरेन्स टोळीने गेल्या तीन महिन्यांत सलमानवर हल्ला करण्याचे आणखी दोन प्रयत्न केले होते. या टोळीने सलमानला त्याच्या फार्म हाऊसच्या वाटेवर मारण्याचा कट रचला होता.पंजाब पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी शूटर कपिल पंडितला अटक केली होती. त्याने चौकशीदरम्यान सलमानच्या हत्येचा खुलासा केला आणि संपूर्ण कटाची माहिती दिली.

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायक सिद्धू मुसेवालाला मारण्यापूर्वी लॉरेन्सने सलमानच्या हत्येचा कट रचला होता. प्लॅन ए अयशस्वी झाल्यानंतर टोळीने प्लॅन बी तयार केला. मात्र, याबाबत फारशी माहिती मिळालेली नाही. या योजनेचे नेतृत्व गोल्डी ब्रार करत होता. गोल्डीने सलमानला मारण्यासाठी कपिल पंडित (लॉरेन्स गँगचा शार्प शूटर) ची निवड केली होती आणि पनवेल फार्महाऊसवर जाताना अभिनेत्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

शूटर्स दीड महिना फार्महाऊसजवळ राहिले, रेकीही केली होती
कपिल पंडित, संतोष जाधव, दीपक मुंडी आणि बाकीचे शूटर्स पनवेल येथे भाड्याच्या खोलीत राहिले, कारण पनवेल येथे सलमानचे फार्म हाऊस आहे. येथे ते शूटर्स सुमारे दीड महिना राहिले. लॉरेन्स गँगच्या या सर्व शूटर्सनी सलमानवर हल्ला करण्यासाठी लहान शस्त्रे, पिस्तूल आणि काडतुसे खोलीत ठेवली होती.

वृत्तानुसार, हिट अँड रन प्रकरणानंतर सलमान खान वाहनाचा वेग कमी ठेवत असल्याचेही शूटर्सच्या लक्षात आले होते. सलमान जेव्हाही त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर येतो तेव्हा शेरा त्याच्यासोबत असतो.

लॉरेन्सने 2018 मध्ये पहिल्यांदा दिली होती धमकी
लॉरेन्सने 2018 मध्ये जोधपूर कोर्टातील सुनावणीदरम्यान सलमानला मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सलमान केवळ दोनदा जोधपूरच्या कोर्टात आला होता. दोन्ही वेळेस त्याची सुरक्षा कडेकोट ठेवण्यात आली होती. अलीकडेच सलमान खानच्या वकिलालाही धमकीचे पत्र आले होते. असेच पत्र त्याचे वडील सलीम खान यांनाही मिळाले होते. यानंतर हे पत्र लॉरेन्सनेच पाठवले असल्याची भीती व्यक्त केली जात होती.

सलमान खानला मारण्यासाठी लॉरेन्सने 4 वेळा प्लॅन केला होता. यासाठी त्याने एक रायफलही खरेदी केली होती. लॉरेन्सने 2018 मध्ये सलमानला मारण्यासाठी शूटर संपत नेहराला मुंबईत पाठवले होते. संपतकडे पिस्तूल होते. सलमान पिस्तुलच्या रेंजपासून खूप लांब होता. त्यामुळे त्याला मारता आले नाही. नंतर लांब पल्ल्याची रायफल 4 लाख रुपयांना विकत घेऊन संपतला देण्यात आली. सलमानला मारण्यापूर्वीच तो पकडला गेला. यानंतर लॉरेन्सने आणखी दोन प्रयत्न केले, पण सलमानला मारण्याची संधी मिळाली नाही.

काळवीट शिकार प्रकरणामुळे लॉरेन्स नाराज
लॉरेन्स सलमानवर काळवीट शिकार प्रकरणामुळे नाराज आहे. त्यामुळे त्याला मारण्याचा लॉरेन्सचा कट आहे. सलमान 24 वर्षांपासून काळवीट प्रकरणात कोर्टाच्या फेऱ्या मारत आहे. अलीकडेच लॉरेन्सने कबूल केले होते की, त्याचा समुदाय काळवीटांच्या शिकारीच्या विरोधात आहे. म्हणूनच सलमानला मारायचे आहे. यासाठी शूटरही पाठवण्यात आले होते.

बीपीसीएल वितरक, टी. राजगोपाल अय्यंगार अँड सन्सची १२५ वर्ष पूर्ण!

0

• मेसर्स टी. राजगोपाल अय्यंगार अँड सन्स यांच्या ग्राहकसेवेची १२५ वर्ष पूर्ण.

• संस्थापक श्री. टी. राजगोपाल अय्यंगार यानी १५ सप्टेंबर १९८७ रोजी मेसर्स टी. राजगोपाल अय्यंगार अँड सन्स, दिंडीगुलची एशियाटिक प्लॅटफॉर्मवर केरोसीन एजंट म्हणून स्थापना केली व त्यानंतर त्याचे आमचे पूर्वीचे कॉर्पोरेट नाव बर्मा शेलमध्ये रुपांतर झाले.

• सध्या आरओचे कामकाज चौथ्या पिढीतील श्री. एन. सुंदरसनम यांच्यातर्फे हाताळले जात आहे.

• सध्या टी. राजगोपाल अय्यंगार अँड सन्सची तमिळ नाडूमध्ये ३ रिटेल दालने आहेत.

दिंडीगुल, १५ सप्टेंबर २०२२ – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), या महारत्न आणि फॉर्च्युन ग्लोबल ५०० कंपनीतर्फे आपले वितरक मेसर्स टी. राजगोपाल अय्यंगार अँड सन्सचे दिंडीगुल येथील त्यांच्या आरओमध्ये १२५ वर्षपूर्ती साजरी केली जात आहे.

प्रमुख पाहुण्यांनी या समारंभासाठी खास तयार करण्यात आलेले स्मृतीचिन्ह व कोनशिलेचे अनावरण करत सोहळ्याची सुरुवात केली. कलात्मक पद्धतीने सजावण्यात आलेल्या आरओच्या या विक्रमी टप्प्यानिमित्त निवडक ग्राहकांना १२५ भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.

या संस्थेची स्थापना टी. राजगोपाल अय्यंगार अँड सन्स, दिंडीगुल यांनी १५ सप्टेंबर १९८७ रोजी बेस्ट अँड कंपनीचे केरोसीन एजंट म्हणून केली होती, जे एशियाटिक पेट्रोलियम कं. या बर्मा शेलच्या पालक कंपनीचे एजंट होते. राष्ट्रीयीकरणानंतर या कंपनीचे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. मध्ये रुपांतर झाले.

या शुभप्रसंगी कार्यकारी संचालक (रिटेल) श्री. पी. एस. रवी म्हणाले, ‘आमचे वितरक टी. राजगोपाल अय्यंगार अँड सन्सच्या कामकाजाची १२५ वर्ष आज आम्ही साजरी करत आहोत. यापूर्वीच्या कॉर्पोरेट अवतारात आम्ही देशाच्या दूरदूरच्या भागातील केरोसीन एजंट नेमण्यात प्रवर्तकीय भूमिका निभावली होती. त्याकाळी उजेडासाठी केरोसीन वापरले जायचे आणि नंतर गॅसोलिनला मागणी आली. कालांतराने भारतात वाहतुकीला मोठी चालना मिळाली. टी. राजगोपाल अय्यंगार अँड सन्स हे आमच्या पहिल्या काही वितरकांपैकी एक आहेत आणि ते भारतातील वाहतूक क्षेत्रात झालेल्या क्रांतीचे साक्षीदार आहेत. १२५ वर्षांनंतर आजही ते आमच्या सर्वात आश्वासक वितरकांपैकी एक आहेत आणि ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देत बीपीसीएलचा ब्रँड पुढे नेत आहेत.’

आज त्यांच्या कंपनीची धुरा मूळ वितरकांच्या चौथ्या पिढीतर्फे सांभाळली जात असून ते त्रिची जिल्ह्यात तीन फ्युएल स्टेशन्सचे कामकाज हाताळतात.