• मेसर्स टी. राजगोपाल अय्यंगार अँड सन्स यांच्या ग्राहकसेवेची १२५ वर्ष पूर्ण.
• संस्थापक श्री. टी. राजगोपाल अय्यंगार यानी १५ सप्टेंबर १९८७ रोजी मेसर्स टी. राजगोपाल अय्यंगार अँड सन्स, दिंडीगुलची एशियाटिक प्लॅटफॉर्मवर केरोसीन एजंट म्हणून स्थापना केली व त्यानंतर त्याचे आमचे पूर्वीचे कॉर्पोरेट नाव बर्मा शेलमध्ये रुपांतर झाले.
• सध्या आरओचे कामकाज चौथ्या पिढीतील श्री. एन. सुंदरसनम यांच्यातर्फे हाताळले जात आहे.
• सध्या टी. राजगोपाल अय्यंगार अँड सन्सची तमिळ नाडूमध्ये ३ रिटेल दालने आहेत.
दिंडीगुल, १५ सप्टेंबर २०२२ – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), या महारत्न आणि फॉर्च्युन ग्लोबल ५०० कंपनीतर्फे आपले वितरक मेसर्स टी. राजगोपाल अय्यंगार अँड सन्सचे दिंडीगुल येथील त्यांच्या आरओमध्ये १२५ वर्षपूर्ती साजरी केली जात आहे.
प्रमुख पाहुण्यांनी या समारंभासाठी खास तयार करण्यात आलेले स्मृतीचिन्ह व कोनशिलेचे अनावरण करत सोहळ्याची सुरुवात केली. कलात्मक पद्धतीने सजावण्यात आलेल्या आरओच्या या विक्रमी टप्प्यानिमित्त निवडक ग्राहकांना १२५ भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.
या संस्थेची स्थापना टी. राजगोपाल अय्यंगार अँड सन्स, दिंडीगुल यांनी १५ सप्टेंबर १९८७ रोजी बेस्ट अँड कंपनीचे केरोसीन एजंट म्हणून केली होती, जे एशियाटिक पेट्रोलियम कं. या बर्मा शेलच्या पालक कंपनीचे एजंट होते. राष्ट्रीयीकरणानंतर या कंपनीचे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. मध्ये रुपांतर झाले.
या शुभप्रसंगी कार्यकारी संचालक (रिटेल) श्री. पी. एस. रवी म्हणाले, ‘आमचे वितरक टी. राजगोपाल अय्यंगार अँड सन्सच्या कामकाजाची १२५ वर्ष आज आम्ही साजरी करत आहोत. यापूर्वीच्या कॉर्पोरेट अवतारात आम्ही देशाच्या दूरदूरच्या भागातील केरोसीन एजंट नेमण्यात प्रवर्तकीय भूमिका निभावली होती. त्याकाळी उजेडासाठी केरोसीन वापरले जायचे आणि नंतर गॅसोलिनला मागणी आली. कालांतराने भारतात वाहतुकीला मोठी चालना मिळाली. टी. राजगोपाल अय्यंगार अँड सन्स हे आमच्या पहिल्या काही वितरकांपैकी एक आहेत आणि ते भारतातील वाहतूक क्षेत्रात झालेल्या क्रांतीचे साक्षीदार आहेत. १२५ वर्षांनंतर आजही ते आमच्या सर्वात आश्वासक वितरकांपैकी एक आहेत आणि ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देत बीपीसीएलचा ब्रँड पुढे नेत आहेत.’
आज त्यांच्या कंपनीची धुरा मूळ वितरकांच्या चौथ्या पिढीतर्फे सांभाळली जात असून ते त्रिची जिल्ह्यात तीन फ्युएल स्टेशन्सचे कामकाज हाताळतात.