पुणे- येथील आनंद ग्रुप फौंडेशन तर्फे वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते तसेच आनंद ग्रुप फौंडेशन च्या आनंद रेखी तसेच डॉ धर्मेंद्र शहा यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न झाला.काश्मीर मध्ये 370 कलम उठवल्यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालय, रोटरी इंटरनॅशनल यांच्या तर्फे पुण्यातील भुलतज्ञ डॉ श्यामकांत कुलकर्णी, नेत्रातज्ञ डॉ राजेश पवार आणि नेत्रतज्ञ डॉ आनंद खडके यांनी 12 दिवसात 4861 विविध शस्त्रक्रिया केल्या त्यात डोळ्यांच्या 886 शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडल्या. त्यांच्या या अफाट कार्याला समर्पक प्रतिसाद म्हणून आनंद ग्रूप फौंडेशन च्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. श्री आनंद ग्रुप फाउंडेशन आयोजित सत्कारसमारंभाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक हे म्हणाले की, काश्मीर भारताचे मुकूट आहे, तर गोवा हे तीळ आहे. काश्मीर च्या शान, शांती आणि सुव्यवस्थेसाठी सर्वजण प्रयत्न करूयात. या सत्कार समारंभात दौंडच्या जि प शाळेच्या एक आदर्श शिक्षिका ज्योती सातव यांचा ही विशेष सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ श्यामकांत कुलकर्णी , डॉ खडके आणि डॉ राजेश पवार यांनी काश्मीर मधील आपले अनुभव कथन केले. सदर कार्यक्रमाला वाहतूक कोंडीमुळे उशीर झाल्याने नियोजित सार्थकी लावत प्रा काशिनाथ भतगुणकी यांनी शेतीपासून ते स्पर्धा परीक्षेच्या यशा पर्यंतचा प्रवास कथन केला आणि उपस्थितांनामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण केली. त्यांनी मा पर्यटन मंत्री यांना विशिष्ट प्रकारचा लक्षवेधक कापडी पुष्पगुच्छ भेट दिला. प्रणव शेंडकर, डॉ कौस्तुभ शेंडकर, डॉ संकेत खरपुडे, नगरसेवक कुंदन गायकवाड, माजी नगरसेवक रमेश काळे तसेच सागर हिंगणे यांचं सहकार्य मोलाचं ठरलं. स्वागतपेयासह स्नेहभोजनचं उत्कृष्ट नियोजन असलेल्या कार्यक्रमाचं सूत्र संचालन डॉ परवेझ बागवान यांनी केलं, तर प्रास्ताविक संजय भोसले यांनी केलं आणि सतीश लोखंडे यांनी आभार प्रदर्शन केलं.