Home Blog Page 1560

शाही अभ्यंगस्नान, नवे कपडे, फराळाच्या आस्वादाने ‘त्यांनी ‘ लुटला दिवाळीचा आनंद !

पुणे,(प्रतिनिधी) :
शाही अभ्यंग स्नान, नवे कपडे जोडीला फराळाचा आस्वाद आणि मुबलक फटाके उडविताना जीवनात ‘आपलेही कुणीतरी आहे’, हा भक्कम आधार अनुभवत ‘त्यांनी ‘ दिवाळीचा आनंद लुटला.
निमित्त होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माजी नगरसेवक श्रीकान्त पाटील आणि सहकाऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे अनाथ आश्रमातील मुलांसाठी आयोजित केलेल्या दिवाळी उपक्रमाचे. ‘ स्पर्श अनाथ आश्रमा’ त झालेल्या या उपक्रमात प्रारंभी मुलांना अभ्यंग स्नान घालण्यात आले. त्यानंतर नवे कपडे परिधान करून या मुलांनी फराळाचा आस्वाद घेतला. त्यानंतर मनसोक्त फटाके उडविण्याचा आनंद लुटताना ते हरखून गेले. नवे कपडे, मिठाई, फराळ आणि फटाके अशा शाही सरंजाममुळे ‘आपलेही कुणीतरी आहे ‘ हा भाव या अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर दिसला. या उपक्रमात सादिक शेख, नाजिम मणियार, अनिताताई बहिरट,दिलशाद आत्तार, वसुधाताई निरभवणे, पुष्पाताई निघोजकर, ज्योतीताई बहिरट, सीमाताई कदम, नसीम पिरजादे, अख्तरी शेख आदींसह पदाधिकारी -कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी माजी नगरसेवक श्रीकान्त पाटील म्हणाले की, तुम्ही एकटे नाहीत तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत,
हा आधार देताना या मुलांना दिवाळी सणाचा आनंद मिळावा या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो.

समाजाप्रती आपलेही कर्तव्य असते या भावनेतून ज्यांना कुणीही नाही ,अशा अनाथांसह दुर्लक्षित घटकांसाठी दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो.

  • श्रीकांत पाटील, माजी नगरसेवक

दीपावलीनिमित्त 6 ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

मुंबई, दि. 21 ऑक्टोबर 2022:
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील 6 ठिकाणी दीपावलीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दीपावली पहाट व दीपावली संध्या या स्वरूपात होणाऱ्या या सांगितिक कार्यक्रमंचे नाव “लखलख चंदेरी” असे असून यातील पहिला कार्यक्रम रविवार 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता नागपूरच्या वंजारी नगर मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. याठिकाणी स्वप्नील बांदोडकर यांच्यासह सन्मिता शिंदे, डॉ. वैशाली उपाध्ये, मुकुल पांडे, आदित्य सावरकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

अमरावती येथे रविवारी 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता दीपावली संध्या आयोजित करण्यात आली आहे. डॉ. मंजिरी सय्यद, सारंग जोशी आणि संच यावेळी आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. तर सोमवारी 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता दीपावली पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अजित परब, मुग्धा कऱ्हाडे आणि संच यावेळी आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. सदर दोन्ही कार्यक्रम अमरावती येथील परिणय-बंध हॉल, बडनेरा रोड येथे होणार आहेत.

मुंबई येथे मंगळवारी 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता दीपावली संध्या आयोजित करण्यात आली आहे. शौनक अभिषेकी, कार्तिकी गायकवाड, प्रसेनजीत कोसंबी आणि इतर कलाकार आपली कला सादर करणार आहेत. तर बुधवारी 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता दीपावली पहाट आयोजित करण्यात आली आहे. अजित कडकडे, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि संच यावेळी आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. सदर दोन्ही कार्यक्रम मुंबई येथील रवींद्र नाटय मंदिर, प्रभादेवी येथे होणार आहेत.

नाशिक येथे मंगळवारी 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता दीपावली संध्या आयोजित करण्यात आली आहे. डॉ. गणेश चंदनशिवे, आकांक्षा कदम, समाधान आणि इतर कलाकार आपली कला सादर करणार आहेत. तर बुधवारी 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता दीपावली पहाट आयोजित करण्यात आली आहे. संजीव चिम्मलगी, केतन पटवर्धन, मधुरा कुंभार आणि संच यावेळी आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. सदर दोन्ही कार्यक्रम नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिर येथे होणार आहेत.

पुणे येथे मंगळवारी 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता दीपावली संध्या आयोजित करण्यात आली आहे. केतकी माटेगांवकर, श्रीधर फडके, पं. संजीव अभ्यंकर, नारायण खिल्लारी आणि इतर कलाकार आपली कला सादर करणार आहेत. तर बुधवारी 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 5 वाजता दीपावली पहाट आयोजित करण्यात आली आहे. सावनी रवींद्र, प्रसेनजीत कोसंबी, सौरभ काडगावकर आणि संच यावेळी आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. सदर दोन्ही कार्यक्रम पुण्यातील सदाशिव पेठ येथील भरत नाटयमंदिर येथे होणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मंगळवारी 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता दीपावली संध्या आयोजित करण्यात आली आहे. अभिजीत कोसंबी, अभिषेक नलावडे, दीपाली देसाई, संज्योती जगदाळे आणि इतर कलाकार आपली कला सादर करणार आहेत. तर बुधवारी 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता दीपावली पहाट आयोजित करण्यात आली आहे. मंगेश बोरगांवकर आणि रसिका नातू यावेळी आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. सदर दोन्ही कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाटयमंदिर येथे होणार आहेत.

राज्यातील 6 ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या सर्व कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून या कार्यक्रमांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रसिाद द्यावा असे आवाहन श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.

कोर्टाने ईडीलाच घेतले फैलावर:संजय राऊत मीडियाशी बोलले, तर तुमच्या पोटात का दुखतंय; न्यायाधीशांचा खडा सवाल

खासदार संजय राऊत मीडियाशी बोलले तर तुमचा प्रॉब्लेम काय, असा खडा सवाल शुक्रवारी न्यायालयाने केला. तेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली.पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. राऊत यांची कोठडी दोन नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवली. यावेळी झालेल्या सुनावणीत ईडीची बोलतीही बंद केली.

ईडी वकीलः राऊत यांना सुनावणीसाठी आणले जाते, तेव्हा ते न्यायालयाबाहेर उभ्या असलेल्या माध्यम प्रतिनिधींशी बोलतात. राजकीय वक्तव्ये करतात. तिथे गर्दी होते. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.

कोर्टः तुम्ही म्हणता की, राऊतांची राजकीय केस नाही. मात्र, ते खासदार आहेत. ते कोर्टाबाहेर मीडियाशी बोलले, तर तुमची नेमकी अडचण काय? त्यांच्या मीडियाशी बोलण्याचा तुम्हाला काय प्रॉब्लेम? तुमच्या पोटात का दुखतंय?.

ईडी वकीलः आम्हाला काही हरकत नाही. मात्र, राऊत मीडियाशी बोलल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.

कोर्टः सुरक्षेचा प्रश्न म्हणता. ते बोलल्यामुळे इथे काय गोळीबार होईल का? तसे असेल तर लेखी द्या. त्यावर निर्णय घेऊ. कोर्ट बाहेर जाऊन सुरक्षा बघू शकत नाही. अनेकदा इतर आरोपींना चहा पायला नेतात, डबा खातात. तसेच राऊत राजकीय विधान करत असतील तर ईडीला अडचण का? तुम्ही म्हणतात ही राजकीय केस नाही. कोर्टाबाहेरच्या गर्दीवर आम्ही नियंत्रण आणू शकत नाही आणि लोक राऊतांना भेटत असतील, तर तुमच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. कोणी बंदुक, चाकू आणला तर गोष्ट वेगळी.

आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

संजय राऊतांच्या वकिलांनी आज कोर्टात युक्तिवाद केला. पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीने आरोप केले आहेत. मात्र, त्याचा कुठलाही संबंध थेट राऊत यांच्याशी लागत नाही. प्रवीण राऊतांना मिळालेले पैसे पीएमसी बँकेसंबंधात होते. त्याच्याशी संजय राऊत यांचा काहीही संबंध नव्हता. मात्र, त्यांची प्रॉपर्टी जप्त केली. त्याचे कारण काय, असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.

प्रवीण राऊत यांच्याकडून खात्यावर पैसे जमा झाले. याचा अर्थ ते गैरव्यवहारासंबंधात आहेत, असे कसे म्हणता येईल. हे पैसे अनेकांनी स्वीकारले. यातल्या दोन व्यक्तींनी पैसे दिले आहेत. मात्र, ते कुठे आहेत, असा सवालही वकिलांनी केला.

सध्याच्या या प्रकरणात पैसे दिले आहेत. मात्र, हे पैसे कोण आणि कुणाला दिले हे स्पष्ट होत नाही. प्रत्येकजण एकमेकांकडे बोट दाखवत आहे. त्यांच्या जबाबात सारखेपणा नाही. विशेष म्हणते ते आपल्या म्हणण्यावर ठाम नाहीत. सारखा जबाब बदलत आहेत. त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा सवालही वकिलांनी केला.

स्वप्ना पाटकर आपल्या जबाबाबत कुणालाही भेटले नाही म्हणतात, तर सुजीत पाटकर हे व्यवहार स्वप्ना पाटकरांच्या कार्यालयात झाल्याचे सांगतात. त्यातही पुढे हे व्यवहार स्वप्ना पाटकरांनी केल्याचे ते म्हणतात. हा मुद्दाही राऊत यांच्या वकिलांनी उपस्थित केला.आता न्यायालयाने दोन नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे.

पीएमआरडीएने समाविष्ट गावातील पायाभूत सुविधा विकासावर भर द्यावा- पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

पुणे, दि. २१: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो, वर्तुळाकार रस्ता (रिंग रोड) या प्रमुख बाबींसोबतच सर्वसामान्यांसाठी स्वस्त घरे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, समाविष्ट गावातील रस्ते आदी प्रमुख पायाभूत सुविधा विकासावर लक्ष केंद्रित करून कामांना गती द्यावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिल्या.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी पीएमआरडीएच्या कामकाजाचा आढावा पीएमआरडीए कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी आमदार उमा खापरे, आमदार महेश लांडगे, महानगर आयुक्त राहुल रंजन महिवाल, अतिरिक्त महानगर आयुक्त बन्सी गवळी, नगररचना उपसंचालक डी. एन. पवार, महानगर नियोजनकार विवेक खरवडकर, मुख्य अभियंता अशोक भालकर आदी उपस्थित होते.

मेट्रो, अग्निशमन केंद्रांचा विकास, सर्वसामान्यांसाठी गृहप्रकल्प अशा ठोस बाबींसारख्या नागरिकांना आवश्यक प्राधान्याच्या बाबी विकसित करण्यावर भर द्यावा. नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प विकसित करण्याला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. माण- हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होईल यासाठी प्रकल्पाच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवावे तसेच त्यात अडचणी आल्यास तत्काळ सोडवण्यास प्राधान्य द्यावे, असेही ते म्हणाले.

यावेळी आयुक्त श्री. महिवाल, अतिरिक्त आयुक्त बन्सी गवळी तसेच नियोजनकार श्री. खरवडकर यांनी संगणकीय सादरीकरण करून पीएमआरडीएचे कामकाज तसेच मेट्रो प्रकल्पाबाबत माहिती दिली.

बैठकीस प्राधिकरणाचे अग्निशमन विभाग प्रमुख देवेंद्र पोटफोडे, उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मोनिका सिंग, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी सविता नलावडे आदी उपस्थित होते.

वादकांनी वादन करुन गोळा केला २ हजार किलो धान्यरुपी जोगवा

आपलं घर संस्थेला धान्याची मदत : सेवा मित्र मंडळ कृत विघ्नहर्ता वाद्य पथक यांचा उपक्रम

पुणे : शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ कृत विघ्नहर्ता वाद्य पथक यांच्या  ‘धान्यरूपी जोगवा’ या उपक्रमांतर्गत उत्सवकाळात विविध ठिकाणी वादन करून  २ हजार किलो धान्यरूपी जोगवा गोळा करण्यात आला. हा धान्यरुपी जोगवा  विजय फळणीकर यांच्या सिंहगड येथील उपेक्षित मुलांसाठी काम करणाऱ्या  ‘आपलं घर ‘ या संस्थेला देण्यात आला. 
नंदा रेणुका, सचिन गायकवाड, विद्या मोहिते, श्रावणी काकडे, निधी पोटे, प्रथमेश पिसे, सुमित आष्टीगे, सिद्धेश्वर दळवी, प्रवेश पिसे, किरण पतंगे, विराज मोहिते, वृषाली मोहिते यांनी उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला. विघ्नहर्ता वाद्यपदकातील वादकांकडून संस्थेमध्ये गुरु-भजन सेवा यावेळी रुजू करण्यात आली.
गहू ,तांदूळ, ज्वारी ,बाजरी ,रवा साखर, गुळ ,चहा पावडर, पीठ तेलाचे डबे, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, तुरीची डाळ, हरभरा डाळ, लापशी, मसूर डाळ पोहे, केळी बॉक्स ,बिस्कीटचे बॉक्स असे एकूण २ हजार किलो धान्य देण्यात आले.
 ‘आपलं घर ‘  या संस्थेचे हाॕस्पिटल असून तिथे स्त्रियांचे ब्रेस्ट कँन्सरचे आॕपरेशन्स् कमी दरात केले जातात. तसेच पेशंट व एक नातेवाईक यांना फक्त नाममात्र रु. १०/- मध्ये जेवण दिले जाते. त्यामुळे धान्याची मदत करण्यात आली.  

अखिल मंडई मंडळात वसुबारसेनिमित्त गोमातापूजन


पुणे : गोमातेच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारसेच्या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. अखिल मंडई मंडळाच्या वतीने वसुबारसेनिमित्त गाय – वासरु पूजनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंडई परिसरातील महिलांनी गोमातेचे पूजन केले
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, सुचेता थोरात, वंदना थोरात, पौर्णिमा थोरात, स्वप्ना थोरात, श्रृती चांदणे, मोनाली मोरे, सुजाता शिंदे आदी उपस्थित होते
अण्णा थोरात म्हणाले. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. दिवाळीचा पहिला दिवस हा गाई वासरांची दिवाळी म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्‍यात आला आहे. काळानुरुप सणांचे स्वरुप बदलत आहे तरीही भारतीय संस्कृतीचे मूळ जपत पारंपरिक पद्धतीने आज गाई-वासरुचे पूजन मंडई परिसरातील महिलांनी केले.

पूर्वा बर्वे, मधुमिता नारायण उपांत्यपूर्व फेरीत

व्ही. व्ही. नातू स्मृती अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धा

पुणे: महाराष्ट्राच्या पूर्वा बर्वे आणि मधुमिता नारायण यांनी पुणे जिल्हा आणि मेट्रोपोलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) वतीने आयोजित व्ही. व्ही. नातू स्मृती अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

शिवाजीनगर येथील पीडीएमबीएच्या मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा सुरू आहे. महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत मधुमिताने केरळच्या मेघना एस.वर १९-२१, २१-९, २१-१३ असा विजय मिळवला. तत्पूर्वी, मधुमिताची दुसऱ्या फेरीत मध्य प्रदेशच्या ऐश्वर्या मेहताविरुद्ध लढत होती. मधुमिताने पहिली गेम २१-१२ अशी गमावली होती, तर दुसऱ्या गेममध्ये ती १५-१०ने पुढे असताना ऐश्वर्याने दुखापतीमुळे माघार घेतली. तिसऱ्या मानांकित पूर्वा बर्वेने गुजरातच्या श्रेया लेलेवर १५-२१, २१-१९, २१-१६ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. तत्पूर्वी, पूर्वाने दुसऱ्या फेरीत तमिळनाडूच्या प्रणवी एन.वर २१-१८, २१-१६ अशी मात केली होती. तेलंगणच्या अभिलाषाने तारा शहाला पुढे चाल दिली.

दुसऱ्या फेरीचे निकाल – पुरुष एकेरी – कौशल धर्मामेर (महाराष्ट्र) वि. वि. तलर ला (अरुणाचल प्रदेश) २१-१५, २१-१०, अभिषेक सैनी (हरियाणा) वि. वि. कौशिक सी. एस. (तमिळनाडू) २१-१७, २१-१४, प्रणव राव गंधम (तेलंगण) वि. वि. डॅनिएल फरिद एस. (कर्नाटक) २१-१७, २१-११, तुकुम ला (अरुणाचल प्रदेश) वि. वि. मनराजसिंग (हरियाणा) २१-१३, २१-१९, जगदीश के. (आंध्र प्रदेश) वि. वि. कार्तिक जिंदाल (हरियाणा) २१-१८, २१-१२, तरुण एम. (तेलंगण) वि. वि. अरुणेश एच. (तमिळनाडू) २१-१९, २१-१४, कनिष्क एम. (तेलंगण) वि. वि. अभिषेक येलिगर (कर्नाटक) २१-१२, २१-१९, मुनेवार महंमद (केरळ) वि. वि. प्रणय कट्टा (राजस्थान) १३-२१, २१-१६, २१-१७, बोधित जोशी (उत्तराखंड) वि. वि. पृथ्वी रॉय के. (कर्नाटक) २३-२१, २१-१३, हर्षल दाणी (महाराष्ट्र) वि. वि. हेमंत एम. जी. (कर्नाटक) २१-१५, २१-१९, रोहन गुरबानी (महाराष्ट्र) वि. वि. ध्रुव कुमार (दिल्ली) २१-९, २१-१०, हर्षल भोयार (मध्य प्रदेश) वि. वि. श्रीकर राजेश (कर्नाटक) २१-१७, ११-२१, २१-८.

महिला एकेरी – मालविका बनसोड (महाराष्ट्र) वि. वि. मिहिका भार्गव (मध्य प्रदेश) २१-१७, २१-१८, मेघना रेड्डी (तेलंगण) वि. वि. रिया हब्बू (महाराष्ट्र) २१-७, २१-१०, साद धर्माधिकारी (महाराष्ट्र) वि. वि. अनुरा प्रभुदेसाई (गोवा) २१-३, ९-२१, २२-२०, श्रुती मुंदडा (महाराष्ट्र) वि. वि. दीपशिखा सिंग (दिल्ली) २१-७, २१-९.

विविध अडथळ्यांवर मात करून दापोडीमधील वीजपुरवठा सुरळीत

पुणे, दि. २१ ऑक्टोबर २०२२: महापारेषण कंपनीच्या उपकेंद्रात झालेल्या बिघाडामुळे महावितरणचा दापोडी ११ केव्ही वीजवाहिनीचा वीजपुरवठा सहा ते सात तास बंद राहिला. यासह पावसाची हजेरी व साचलेल्या पाण्यामुळे या वीजवाहिनीमध्ये विविध ठिकाणी व फिडर पिलर बॉक्समध्ये आर्द्रता निर्माण होऊन एकामागे एक बिघाड होत गेले. मात्र महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांनी अविश्रांत दुरुस्ती कामे करीत दापोडीमधील गणेशनगर, आनंदवन, सुंदरबाग, गगनगिरी या परिसरातील वीजपुरवठा शुक्रवारी (दि. २१) दुपारी ३.३० पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ववत केला.  

याबाबत माहिती अशी, की महापारेषणच्या खडकी ५१२ केव्ही उपकेंद्रामध्ये गुरुवारी (दि. २०) सायंकाळी ५.३० च्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या किर्लोस्कर २२/११ केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा सहा ते सात तास बंद पडला होता. महापारेषणने केलेल्या दुरुस्ती कामानंतर मध्यरात्री १२ वाजता या उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरु झाला. मात्र सहा ते सात तास वीजपुरवठा बंद राहिल्याने तसेच पावसाची हजेरी व साचलेल्या पाण्यामुळे दापोडी ११ केव्ही वीजवाहिनीवरील फिडर पिलर, भूमिगत वीजवाहिनीमध्ये विविध ठिकाणी एकामागे एक बिघाड होत गेले. पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांनी रात्रभर पावसात विविध पथकांद्वारे दापोडी ११ केव्ही भूमिगत वाहिनीची केबल टेस्टींग व दुरुस्तीचे कामे केली. नेहरू चौकातील भाजीमंडईमध्ये एका फिडर पिलरमध्ये मोठा बिघाड झाल्याचे दिसून आले. मात्र स्थानिक अतिक्रमणाने फिडर पिलर पूर्णतः वेढल्याने दुरुस्तीसाठी तेथे जाणे शक्य नव्हते. तरीही मोठ्या जिकरीने या फिडर पिलरची दुरुस्ती करण्यात आली. त्या व इतर ठिकाणच्या दुरुस्ती कामानंतर शुक्रवारी (दि. २१) पहाटे ५.३० वाजता दापोडीमधील नेहरू चौक तसेच महामार्गालगतच्या ६० टक्के परिसरात वीजपुरवठा करण्यात आला.

तथापि साचलेल्या पाण्यामुळे भूमिगत वाहिनी व फिडर पिलरमधील बिघाड वाढतच गेले. फिडर पिलरपाशी टाकलेल्या कचऱ्याची दुर्गंधी व चिखलामध्ये जाऊन विविध ठिकाणी अविश्रांत दुरुस्ती कामे करण्यात आली. त्यानंतर ११ केव्ही दापोडी वीजवाहिनीवरील उर्वरित गणेशनगर, आनंदवन, सुंदरबाग, गगनगिरी या परिसरातील वीजपुरवठा शुक्रवारी (दि. २१) दुपारी ३.३० पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला.

गोकूळनगर, टिळेकरनगर, पॅरामाऊंट गार्डनमध्ये वीजपुरवठा सुरळीत

पुणे, दि. २१ ऑक्टोबर २०२२: कात्रज कोंढवा परिसरात मुसळधार पाऊस व साचलेल्या पाण्यामुळे २२ केव्हीच्या दोन भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये गुरुवारी (दि. २०) सायंकाळी बिघाड झाला. या दोन्ही भूमिगत वाहिन्यांमध्ये एकमेकांना पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा करण्याची सोय आहे. मात्र दोन्ही वाहिन्या नादुरुस्त असल्याने तांत्रिक कामे करून इतर ठिकाणाहून वीजपुरवठा सुरु करण्यात आला. तथापि भारव्यवस्थापन शक्य नसल्याने गोकूळनगर, शिवशंभो गल्ली क्र. २ ते ४, पॅरामाऊंट गार्डनच्या सोसायट्या, राजमाता कॉलनी, टिळेकरनगर, समर्थनगर या परिसरातील सुमारे २२०० ग्राहकांचा वीजपुरवठा शुक्रवारी (दि. २१) सकाळी ८.३० वाजता सुरळीत करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या राजीव गांधी २२/२२ केव्ही उपकेंद्रातून निघणाऱ्या कात्रज-कोंढवा २२ केव्ही भूमिगत वाहिनीमध्ये कात्रज स्मशानभूमीजवळ ओढ्यानजीक साचलेल्या पाण्यामुळे काल सायंकाळी ५.३० च्या सुमारास दोन ठिकाणी बिघाड झाला. त्याच सुमारास २२/२२ आकृती उपकेंद्रातून निघणाऱ्या इस्कॉन २२ केव्ही भूमिगत वाहिनीमध्ये देखील साचलेल्या पाण्यामुळे आर्द्रता निर्माण होऊन दोन ठिकाणी बिघाड झाला. या दोन्ही वीजवाहिन्यांमध्ये एकमेकांना पर्यायी वीजपुरवठा करण्याची सोय आहे. मात्र दोन्ही वाहिन्या नादुरुस्त झाल्यामुळे महावितरणचे अभियंते व कर्मचारी यांनी युद्धपातळीवर तांत्रिक कामे करून वीजपुरवठ्याची पर्यायी सोय केली. यामध्ये तासाभरात कात्रज-कोंढवा २२ केव्ही वाहिनीवरील सर्व परिसराचा वीजपुरवठा भिलारेवाडी वीजवाहिनीद्वारे सुरु करण्यात आला.

तसेच नादुरुस्त झालेल्या इस्कॉन २२ केव्ही या दुसऱ्या भूमिगत वाहिनीचा ६० टक्के वीजपुरवठा लेकटाऊन उपकेंद्र व इतर ठिकाणाहून सुरु करण्यात आला. मात्र गोकूळनगर, शिवशंभो गल्ली क्र. २ ते ४, पॅरामाऊंट गार्डन, पॅरामाऊंट इरोस, माऊलीनगर, समर्थनगर, राजमाता कॉलनी, आंबेडकरनगर, टिळेकरनगर या परिसरातील सुमारे २२०० ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु होऊ शकला नाही. महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांनी रात्रभर दुरुस्तीचे काम करून आज सकाळी ८.३० वाजता या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत केला.

देशभरातील पोलीसदले अत्यंत कठीण परिस्थितीतही आपली जबाबदारी पार पाडत आहेत -केंद्रीय गृहमंत्री

‘पोलीस स्मृती दिना’निमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस स्मारक येथे पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (सीएपीएफ)  शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री  जयकुमार मिश्रा,  निशीथ प्रामाणिक आणि केंद्रीय गृह सचिव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आज भारत प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे आणि आपण निर्धाराने आणि वेगाने आपल्या ध्येयाकडे निश्चितपणे वाटचाल करत आहोत हे स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर आज आपण समाधानाने म्हणू शकतो, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले. पोलिस आणि सीएपीएफच्या शूर जवानांचे सर्वोच्च बलिदान हे देशाने केलेल्या अतुलनीय  कामगिरीतील महत्वाचे योगदान आहे, असे शाह म्हणाले. देशाची  अंतर्गत सुरक्षा आणि सीमांचे रक्षण करताना देशभरातील पोलीस दले आणि सीएपीएफच्या 35,000 हून अधिक जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे, असे त्यांनी सांगितले. देशाच्या रक्षणासाठी या जवानांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही आणि भारत विकासाच्या मार्गावर वाटचाल करत राहील, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी कृतज्ञ देशाच्या वतीने त्या सर्व शहीद जवानांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित रहावी म्हणून देशभरातील  पोलीस दले अत्यंत कठीण परिस्थितीत देखील आपली जबाबदारी पार पडतात आणि कर्तव्य बजावतात आणि त्यामुळेच भारतासारखा विशाल देश आज विकासाच्या मार्गावर प्रगती करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, गेल्या काही वर्षांत देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या स्थितीत सकारात्मक बदल झाला आहे असे अमित शाह म्हणाले. यापूर्वी ईशान्येकडे तसंच  जम्मू आणि काश्मीरमध्ये रोजच हिंसेची प्रकरणं नोंदवली जात होती आणि हा प्रदेश डाव्या कट्टरपंथी कारवायांना बळी पडत होता. मात्र गेल्या आठ वर्षांमध्ये, ईशान्य भारतात सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्याच्या (आफ्स्पा) जागी, तरुणांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विशेष अधिकार दिले जात आहेत. शाह म्हणाले की ईशान्येकडील हिंसाचाराच्या घटनांमध्ये 70% पेक्षा जास्त घट होणे, हे ईशान्येकडील राज्यांच्या समृद्धतेचे लक्षण आहे. त्याचप्रमाणे जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील पूर्वी तरुणांकडून दगडफेक केली जायची, आता तेच तरुण पंच आणि सरपंच बनून जम्मू आणि काश्मीरच्या विकासामध्ये लोकशाहीच्या मार्गाने योगदान देत आहेत. ते म्हणाले की नक्षलवाद बाधित भागात पूर्वी हिंसाचाराची अनेक प्रकरणं नोंदवली जायची पण आज एकलव्य शाळांमध्ये राष्ट्रगीत गायले जात आहे आणि प्रत्येक घरात तिरंगा झेंडा फडकवला जातो.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृह मंत्रालयाने देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अनेक सक्रीय पावले उचलली आहेत आणि देशभरातली पोलीस दले आणि सीएपीएफने हे प्रयत्न देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवले  आहेत. ते म्हणाले की देशातील बहुतांश हॉटस्पॉट (हिंसाचारग्रस्त प्रदेश) देशविरोधी कारवायांपासून जवळजवळ मुक्त झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचे सरकार पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे, अशी ग्वाही शाह यांनी दिली.

पंतप्रधानांनी उत्तराखंडमध्ये बद्रीधाम मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री बद्रीधाम मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली. मोदी यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रार्थना केली. अलकनंदा नदीवरील विकास कामांच्या प्रगतीचा त्यांनी आढावाही घेतला.

पंतप्रधानांबरोबर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि उत्तराखंडचे राज्यपाल (निवृत्त) जनरल गुरमीत सिंह होते.

रस्त्यात नाले अन नाल्यात रस्ते …तू तू में मे कशाला ? उपाय योजना करा – आबा बागुल

पुणे- परतीच्या पावसाने अल्प अल्प वेळेत तडाखे देऊन प्रशासनाचा टवाळखोर पन्ना चव्हाट्यावर आणला असताना आता पुणे का तुंबले यावर राजकीय टवाळ्या न करता प्रत्यक्षात उपाय योजना कराव्यात अशी मागणी आणि सूचना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी केली आहे .

महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी पावसाळी लाईन टाकलेल्या असून याच्या चेम्बर्स मध्ये बोर करून पावसाळी पिट तयार केल्यास भूजल पातळी वाढून शहरातील रस्त्यांवर थांबणारे जमिनीत जाईल याबाबत आम्ही अनेक वर्षांपासून मागणी करीत आहोत. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा व लेखी पत्रव्यवहार आम्ही करीत असून प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार केलेला नाही.
सध्या पुणे शहरात पावसाचे पाणी रस्त्यांवर साचून वाहतूक कोंडी / घरात पाणी शिरणे / सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होणे हे प्रकार घडले आहेत. यानंतर राजकीय पक्ष व राजकीय नेते एकमेकांवर कुरघोड्या करत असून तू तू में मे करण्यापेक्षा यावर उपाय योजना वेळीच करणे गरजेचे आहे असे आबा बागुल म्हणाले.
ते पुढे म्हणाले,’ काही वर्षांपासून पुणे शहरात पाऊस पडल्यानंतर नाले ओढे नदी च्या बाजूला असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरून जीवित व वित्तीय हानी होत असून नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे.तसेच छोटे व्यावसायिक व दुकानदार यांचे मागील २ वर्षे कोरोनामुळे अतोनात आर्थिक नुकसान झाले. यंदाच्या वर्षी सामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक व दुकानदार यांचे दिवाळी सारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर दुकानांमध्ये / घरामध्ये पाणी शिरून देखील अतोनात हाल व नुकसान झालेले आहे. आम्ही पुणे महापालिकेकडे अनेक वर्षांपासून आग्रही मांडत असलेली पावसाळी लाईन मधील चेम्बर्समध्ये पावसाळी पीट तयार करणारी उपाय योजना वेळीच केली असती तर रस्त्यांवर/दुकानांमध्ये/घरामध्ये पाणी साचून अतोनात हाल व नुकसान झाले नसते. असे सांगताना आबा बागुल म्हणाले कि आता तरी राजकीय चिखलफेक करण्यापेक्षा आम्ही दिलेल्या उपाययोजनांची ठोस अंमलबजावणी करा.
आम्ही दिलेल्या उपाययोजनांची ठोस अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन तसेच सहकार्य करायला आम्ही तयार आहोत, प्रशासनाने डोळ्यावरची झापड काढून तातडीने पुणेकरांना सुसह्य जीवन देण्यासाठी आम्ही दिलेल्या ठोस उपाययोजना कराव्यात, अशी विनंती मा.महापालिका आयुक्तांना आबा बागुलांनी केली.

पुणे महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी पावसाळी लाईन टाकलेल्या असून याच्या चेम्बर्स मध्ये बोर करून पावसाळी पिट तयार केल्यास भूजल पातळी वाढून शहरातील रस्त्यांवर थांबणारे जमिनीत जाईल याबाबत आम्ही अनेक वर्षांपासून मागणी करीत आहोत. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा व लेखी पत्रव्यवहार आम्ही करीत असून प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार केलेला नाही.सध्या पुणे शहरात पावसाचे पाणी रस्त्यांवर साचून वाहतूक कोंडी / घरात पाणी शिरणे / सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होणे हे प्रकार घडले आहेत. यानंतर राजकीय पक्ष व राजकीय नेते एकमेकांवर कुरघोड्या करत असून तू तू में मे करण्यापेक्षा यावर उपाय योजना वेळीच करणे गरजेचे आहे असे आबा बागुल म्हणाले.
काही वर्षांपासून पुणे शहरात पाऊस पडल्यानंतर नाले ओढे नदी च्या बाजूला असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरून जीवित व वित्तीय हानी होत असून नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे.
तसेच छोटे व्यावसायिक व दुकानदार यांचे मागील २ वर्षे कोरोनामुळे अतोनात आर्थिक नुकसान झाले. यंदाच्या वर्षी सामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक व दुकानदार यांचे दिवाळी सारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर दुकानांमध्ये / घरामध्ये पाणी शिरून देखील अतोनात हाल व नुकसान झालेले आहे. आम्ही पुणे महापालिकेकडे अनेक वर्षांपासून आग्रही मांडत असलेली पावसाळी लाईन मधील चेम्बर्समध्ये पावसाळी पीट तयार करणारी उपाय योजना वेळीच केली असती तर रस्त्यांवर/दुकानांमध्ये/घरामध्ये पाणी साचून अतोनात हाल व नुकसान झाले नसते. असे सांगताना आबा बागुल म्हणाले कि आता तरी राजकीय चिखलफेक करण्यापेक्षा आम्ही दिलेल्या उपाययोजनांची ठोस अंमलबजावणी करा.
आम्ही दिलेल्या उपाययोजनांची ठोस अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन तसेच सहकार्य करायला आम्ही तयार आहोत, प्रशासनाने डोळ्यावरची झापड काढून तातडीने पुणेकरांना सुसह्य जीवन देण्यासाठी आम्ही दिलेल्या ठोस उपाययोजना कराव्यात, अशी विनंती महापालिका आयुक्तांना आबा बागुलांनी केली.पुणे महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी पावसाळी लाईन टाकलेल्या असून याच्या चेम्बर्स मध्ये बोर करून पावसाळी पिट तयार केल्यास भूजल पातळी वाढून शहरातील रस्त्यांवर थांबणारे जमिनीत जाईल याबाबत आम्ही अनेक वर्षांपासून मागणी करीत आहोत. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा व लेखी पत्रव्यवहार आम्ही करीत असून प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार केलेला नाही.
सध्या पुणे शहरात पावसाचे पाणी रस्त्यांवर साचून वाहतूक कोंडी / घरात पाणी शिरणे / सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होणे हे प्रकार घडले आहेत. यानंतर राजकीय पक्ष व राजकीय नेते एकमेकांवर कुरघोड्या करत असून तू तू में मे करण्यापेक्षा यावर उपाय योजना वेळीच करणे गरजेचे आहे असे आबा बागुल म्हणाले.
काही वर्षांपासून पुणे शहरात पाऊस पडल्यानंतर नाले ओढे नदी च्या बाजूला असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरून जीवित व वित्तीय हानी होत असून नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे.
तसेच छोटे व्यावसायिक व दुकानदार यांचे मागील २ वर्षे कोरोनामुळे अतोनात आर्थिक नुकसान झाले. यंदाच्या वर्षी सामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक व दुकानदार यांचे दिवाळी सारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर दुकानांमध्ये / घरामध्ये पाणी शिरून देखील अतोनात हाल व नुकसान झालेले आहे. आम्ही पुणे महापालिकेकडे अनेक वर्षांपासून आग्रही मांडत असलेली पावसाळी लाईन मधील चेम्बर्समध्ये पावसाळी पीट तयार करणारी उपाय योजना वेळीच केली असती तर रस्त्यांवर/दुकानांमध्ये/घरामध्ये पाणी साचून अतोनात हाल व नुकसान झाले नसते. असे सांगताना आबा बागुल म्हणाले कि आता तरी राजकीय चिखलफेक करण्यापेक्षा आम्ही दिलेल्या उपाययोजनांची ठोस अंमलबजावणी करा.आम्ही दिलेल्या उपाययोजनांची ठोस अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन तसेच सहकार्य करायला आम्ही तयार आहोत, प्रशासनाने डोळ्यावरची झापड काढून तातडीने पुणेकरांना सुसह्य जीवन देण्यासाठी आम्ही दिलेल्या ठोस उपाययोजना कराव्यात, अशी विनंती महापालिका आयुक्तांना आबा बागुलांनी केली आहे.

राज्यस्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत ‘रमणबाग’ विजेते

पुणे – केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या नेहरु सायन्स सेंटर आणि नागपूरच्या गणित व विज्ञान संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या वर्षीच्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत पुणे विभागातील ‘न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग’ने विजेतेपद पटकाविले. रमणबाग शाळेने ‘कहानी रेबीज वैक्सिन की’ हे नाटक सादर केले होते. ईशान जबडे या विद्यार्थ्याला उत्कृष्ट अभिनेता आणि रवींद्र सातपुते या शिक्षकाला उत्कृष्ट दिग्दर्शकाचे पारितोषिक मिळाले. या यशामुळे रमणबाग शाळेची राष्ट्रीय स्पर्धेच्या पूर्व विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर विभागातील चिपळूणच्या एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलने दुसरा क्रमांक मिळविला. राज्य विज्ञान शिक्षणसंस्थेचे माजी संचालक नारायण जोशी यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला.

‘सिंहगड’ने पटकाविला ‘सरपोतदार करंडक’

पुणे –  बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन प्रसंगनाट्य स्पर्धेत ‘सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’च्या ‘खंजीर’ या प्रसंगनाट्याला पहिला क्रमांक मिळाला.

‘एमईएस कॉलेज ऑफ परफॉरर्मिंग आर्टस्’च्या ‘जुगार’ला दुसरा, तर ‘सिंहगड’च्या ‘परंपरा’ या प्रसंगनाट्याला तिसरा  क्रमांक   मिळाला. या वर्षी स्पर्धेचे विसावे वर्ष होते. बत्तीस महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.

स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे पुढीलप्रमाणे

सर्वोत्कृष्ट अभिनेता – 1) सोहम आठवले (इंडसर्च), 2) नील देशपांडे (स. प. महाविद्यालय), 3) ओमकार सरदेशपांडे (व्हीआयटी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – 1) श्रावणी धुमाळ (स. प. महाविद्यालय), 2) श्रृती देवधर (कावेरी कॉलेज), 3) श्रीनिधी पवार (सिंहगड)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – 1) वरद शिंदे (पीव्हीजी कॉलेज), 2) समर्थ खाडे (सिंहगड), 3) सौमित कारखानीस (गोखले इन्स्टिट्यूट)

प्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, उपप्राचार्य डॉ. आशिष पुराणिक, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती. अभिनेत्री अक्षया देवधर, ऋचा आपटे, विनोद सातव यांनी परीक्षण केले.

प्रसंगनाट्य स्पर्धेत आपण थोड्या वेळात काय उत्तम देऊ शकतो, याचा कस लागतो. कमीतकमी वेळात जलद विचार करून उत्तम कल्पना पुढे नेता येते. महाविद्यालयीन वयात गमवायचे काहीच नसते. चुकांमधून अधिकाधिक शिकता येते, अनुभव मिळतो, स्वतःला घडविता येते. अनेकदा जोखीम घ्यायला आपण घाबरतो. ती घ्यायची तयारी ठेवा. वेगळा विचार करून काहितरी आश्चर्यकारक करा, तर प्रशंसा होऊ शकते, व्यावसायिक रंगभूमिवर यश मिळू शकते, असे मत दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी व्यक्त केले

कंत्राटी कामगारांचे पैसे खाणारी महापालिका :आप च्या डॉ . मोरेंचा आरोप

मनपातील सर्व ७००० ते ८००० कंत्राटी कामगारांना नियमानुसार बोनस, रजा वेतन व घरभाडे भत्ता द्या – आपची मागणी

कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे २ महिन्यांचे थकलेले वेतन आज संध्याकाळ पर्यंत देणार – आपच्या शिष्ट मंडळाला आयुक्तांचे आश्वासन

प्रसादाची पर्वा न करता क्रिस्टल कंपनीचे लाड थांबवा, काळया यादीत टाका

पुणे – गेल्या वर्षभरापासून महापालिका आणि पीएमपीएमएल मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्याया विरोधात आम आदमी पार्टीने महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवणे सुरु ठेवले असून या कंत्राटी कामगारांचे ७० ते ७५ कोटी रुपये महापालिकेने खाल्याचा आरोप प्रवक्ते डॉ अभिजित मोरे यांनी केला आहे . आज त्यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन सुरक्षा रक्षकांचे पगार का नाहीत ? बोनस का नाहीत . असे सवाल केले .

पुणे महानगरपालिकेतील १६०० सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना त्यांचे थकलेले दोन महिन्यांचे वेतन तातडीने द्यावे तसेच पुणे मनपाच्या सेवेतील कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे वेतन थकवणाऱ्या KRYSTAL INTEGRATED SERVICES PRIVATE LIMITED कंपनीवर दंडात्मक कारवाई करत काळया यादीत टाकावे यासाठी आज आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्या कार्यालयात धडक भेट घेतली. या शिष्टमंडळाशी चर्चा करताना आयुक्तांनी आज संध्याकाळपर्यंत थकीत वेतन दिले जाईल असे आश्वासन आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले.

पुणे महानगरपालिकेच्या सेवेतील १६०० कंत्राटी सुरक्षारक्षकांचे ऑगस्ट, सप्टेंबर २०२२ या दोन महिन्यांचे वेतन क्रिस्टल कंपनीद्वारे थकीत झाले आहे. ही अतिशय गंभीर बाब असून सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल सुरु आहेत. कुटुंब कसे चालवावे हा प्रश्न कामगारांपुढे आहे. दिवाळी सण कसा साजरा करायचा हा यक्ष प्रश्न या कामगारांपुढे आहे. केलेल्या कामाचे वेतन न देणे हा फौजदारी गुन्हा आहे. तसेच ठेकेदाराने कामगारांचे वेतन दिले की नाही हे तपासणे आणि दिले नसल्यास त्यांना द्यायला लावणे व कामगार हिताच्या तरतुदीला हरताळ फासणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करणे ही पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.
भाजपचे विधान परिषदेतील सर्वात श्रीमंत आमदार प्रसाद लाड यांच्या कुटुंबाशी संबंधित असणाऱ्या KRYSTAL INTEGRATED SERVICES PRIVATE LIMITED या कंपनीवर सत्ताधारी भाजप- शिंदे सरकारचा राजकीय वरदहस्त असल्याने तिच्या विरोधात अद्यापही कोणतीही प्रशासकीय व फौजदारी कारवाई होत नाही. तिचे लाड केले जात आहेत. या कंपनीला काळ्या यादीत टाकावे असा अहवाल कामगार कल्याण विभाग व सुरक्षारक्षक विभागाने दिलेला आहे अशी आमची माहिती असून पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार हे राजकीय दबावापोटी कोणतीही कारवाई करत नाहीत.असे आरोप यावेळी करण्यात आले , याबाबत आयुक्तांनी कोणत्याही प्रसादाची पर्वा न करता लाड थांबवत या कंपनीला काळया यादीत टाकावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी आपच्या शिष्टमंडळाला आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले.

पुणे महानगरपालिकेच्या सेवेमध्ये सुमारे सात ते आठ हजार कंत्राटी कामगार ठेकेदारांमार्फत काम करत आहेत. बोनस प्रधान अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार कंत्राटी कामगारांचे मूळ वेतन अधिक विशेष भत्ता मिळून येणारे रक्कम दरमहा रुपये 21000 पेक्षा कमी असल्यास आणि वर्षातील 30 दिवसांपेक्षा जास्त काळ कंत्राटी कामगारांची सेवा घेतली असल्यास त्याला मूळ वेतन अधिक विशेष भत्ता मिळून येणाऱ्या रकमेच्या 8.33% बोनस देणे बंधनकारक आहे. परंतु पुणे महानगरपालिका कामगार कायद्यांचे उल्लंघन करत 17 फेब्रुवारी 2021 रोजी कार्यालयीन आदेश काढत कंत्राटी कामगारांना 8.33% बोनस, 5% घर भाडे व 5% रजावेतन देणे बंद केले आहे. हा आदेश कायद्याच्या कसोटीवर योग्य नाही हे आपचे प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. पुणे महानगरपालिकेतील कामगार विभाग अशा पद्धतीने कंत्राटी कामगारांच्या हक्कांची पायमल्ली करत आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे केले जाणाऱ्या या शोषणाला कोणत्याही पद्धतीने कायद्याचा आधार नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांचे साधारणपणे सुमारे 4000 ते 4500 रुपयांचे दरमहा नुकसान होत आहे. अशा पद्धतीने गेल्या 22 महिन्यांमध्ये पुणे महानगरपालिकेने कंत्राटी कामगारांचे सुमारे 70 ते 75 कोटी रुपये बुडवले आहेत. याबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नुकसान झाले आहे. वर्ष 2021 अगोदर पुणे महानगरपालिकेमध्ये कंत्राटी कामगारांच्या वेतनासोबत वरील बोनस, घरभाडे व रजावेतन सुद्धा दिले जात होते. पुणे शेजारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुद्धा कंत्राटी कामगारांना वर उल्लेख केल्याप्रमाणे बोनस, घरभाडे व रजावेतन दिले जात आहे. तरी पुण्यातही ते दिले जावे अशी मागणी आप तर्फे डॉ अभिजीत मोरे यांनी केली. बोनस मिळाला असता तर कंत्राटी कामगारांची दिवाळी देखील गोड झाली असती अशी गोष्टी आम आदमी पक्षाचे श्रीकांत आचार्य यांनी केली.

आजच्या शिष्टमंडळामध्ये राज्य प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे, राज्य वाहतूक विंग अध्यक्ष श्रीकांत आचार्य, किरण कद्रे, किशोर मुजुमदार, फॅबियन सॅमसन, आबासाहेब कांबळे, साजिद खान, सुरेखा भोसले, निलेश वांजळे, अनिल कोंढाळकर हे उपस्थित होते. याशिवाय आपचे सुजित अगरवाल, संजय कोने, शेखर ढगे, सर्फराज शेख, तानाजी शेरखाने, हर्षल भोसले, रविराज डोंगरे, कुमार धोंगडे, शिवाजी डोलारे, संजय कटरनवरे यांसह अनेकजण उपस्थित होते.