Home Blog Page 1539

उद्धव ठाकरे म्हणाले- राऊतांना पुन्हा खोट्या केसमध्ये अटक होऊ शकते, तपास यंत्रणांचा वापर पाळीव प्राण्याप्रमाणे..

0

मुंबई -संजय राऊतांना खोट्या केसेसमध्ये पुन्हा अटक होऊ शकते. त्यांना गोवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा आरोप आज शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच, तपास यंत्रणांचा वापर केंद्र सरकार पाळीव प्राण्यांप्रमाणे करत आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. संजय राऊत यांनी मातोश्रीवर जात आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणा सुपारी घेतल्याप्रमाणे काम करत आहे. केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे त्यांचा वापर होत आहे. केंद्र सरकार म्हणेल त्यांच्या अंगावर या यंत्रणांना बेकायदेशीरपणे सोडले जात आहे. देशात अशी उदाहरणे आपण रोजच पाहत आहोत. अशा यंत्रणांना केंद्र सरकारच्या यंत्रणा म्हणता येणार नाही. अशा यंत्रणा कायमच्या बंद का करु नये, असा प्रश्न आता पडत आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्र सरकारकडून न्यायव्यवस्थाही अंकित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनीच न्यायव्यवस्थेवर केंद्राचे काही नियंत्रण हवे, असे वक्तव्य केले आहे. सध्या देशात न्यायालये हे सामान्यांचे एकमेव आशास्थान असताना त्यांनाच आता बुडाखाली घेण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. सर्व जनतेने याला विरोध केला पाहिजे.

उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्र सरकारने तपास यंत्रणांचा गैरवापर करून अनेक पक्ष फोडले. विरोधकांवर खोट्या केसेस लादल्या. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर तेलंगणामध्ये केसीआर यांना, आप पक्षाला, झारखंडमध्ये सोरेन यांना व पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना छळले जात आहे. हे सर्व पक्ष एकत्र आले तर किती मोठी ताकद निर्माण होईल, याची कल्पना केंद्र सरकारला नाही.

उद्धव ठाकरे म्हणाले, संजय राऊत केवळ शिवसेना नेते, खासदार नाहीत. ते माझे जिवलग मित्र आहेत. आपल्यावर संकट येऊनही जो डगमगत नाही, तोच खरा मित्र. संजय राऊत तसे मित्र आहेत. केवळ मित्र नव्हे तर ते एका लांब पल्ल्याची तोफ आहेत. तसेच, न्यायव्यवस्थेने जो निकाल दिला, तपास यंत्रणेबद्दल जे परखड निरीक्षण नोंदवले, त्याबाबतही मी न्यायालयाचे आभार मानतो. न्यायालय निष्पक्षपणे न्याय देतात, हे या निकालाने अधोरेखित केले आहे. संपुर्ण देशासाठी हे एक चांगले चित्र आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले, तुरुंगात गेल्यानंतरही ठाकरे व शिवसेनेचे कुटुंब माझ्या परिवाराची काळजी घेईल, याची खात्री मला होती. त्यामुळेच मी निश्चिंत होतो. शिवसेनेसाठी दहावेळेस तुरुंगात पाठवले तरी जाण्यास मी तयार आहे.

संजय राऊत यांनी सांगितले की, तुरुंगात असताना मला तेथील अनेक समस्या, कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेता आल्या. राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांसमोर मी या सर्व समस्या मांडणार आहे. त्यासाठी त्यांची भेट घेणार आहे, याच चुकीचे काय. तसेच, तुरुंगात मी दोन पुस्तकांचे काम केले आहे. लवकरच ते सर्वांसमोर मांडणार आहे, अशी माहितीही राऊतांनी दिली.

आदित्य ठाकरे यांनी घेतले खंडोबादेवाचे दर्शन

पुणे -माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल सायंकाळी सात वाजता जेजुरीगडावर जाऊन कुलदैवत खंडोबादेवाचे दर्शन घेतले. कुलधर्म, कुलाचारानुसार त्यांनी तळीभंडार केला.ऐतिहासिक तलवार उचलून देवाचा जयजयकार केला. आपण श्री खंडोबादेवाच्या दर्शनासाठी व देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो असून, राजकीय विषयावर बोलणार नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सचिन अहिर, जिल्हा शिवसेनाप्रमुख राजेंद्र काळे, पुरंदर तालुका शिवसेनाप्रमुख अभिजित जगताप, हवेली तालुकाप्रमुख संदीप धाडसी, जेजुरी शहरप्रमुख किरण दावलकर, रमेश जाधव, डॉ. प्रसाद खंडागळे, अनिल घोणे आदी उपस्थित होते.

श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त तुषार सहाने, विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे पाटील, राजकुमार लोढा, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे यांनी आदित्य ठाकरे यांचा देवाची प्रतिमा, मूर्ती व घोंगडी देऊन सन्मान केला. जेजुरी नगरपालिकेच्या वतीने देखील त्यांचा सन्मान करण्यात आला

काल सायंकाळी आदित्य ठाकरे यांचे जेजुरी शहरात आगमन झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते जेजुरीगडावर गेले. जेजुरीगडावर श्री खंडोबादेवाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरासमोरील कासवावर त्यांनी कुलधर्म, कुलाचारानुसार तळीभंडार्‍याचा धार्मिक विधी करून भंडार-खोबर्‍याची उधळण केली.

त्यानंतर देवसंस्थानच्या वतीने ऐतिहासिक तलवारीची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यांनी स्वतः बावीस किलो वजनाची तलवार उचलून ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष केला. लहानपणी आपण वडिलांबरोबर श्री खंडोबादेवाच्या दर्शनसाठी जेजुरीगडावर आलो होतो. आज देवाचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

गुजरातमधील सिंह नोव्हेंबरअखेरीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

0

मुंबई :गुजरातमधील सक्करबाग येथील सिंहाची जोडी नोव्हेंबर अखेरीस मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल होणार आहे. २६  सप्टेंबर रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गुजरात दौऱ्याच्या वेळी गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी याविषयी चर्चा झाली होती. त्यावेळी गुजरातमधील सिंहाची जोडी मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविण्याबाबत एकमत झाले होते. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकारणाच्या परवानगीसाठी हा विषय थांबला होता. आता ही परवानगी मिळाल्याने गुजरात येथील सक्करबाग प्राणी संग्रहालयातील आशियायी सिंहाची जोडी (एक नर व एक मादी ) आता नोव्हेंबरअखेरीस मुंबईत दाखल होणार आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे १२ हेक्टर कुंपण क्षेत्रात क्षेत्रात १९७५-१९७६ मध्ये सिंह सफारी सुरू करण्यात आली होती. सिंह सफारी मुळे उद्यानाच्या महसुलात वाढदेखील झाली होती ; परंतु केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने सिंहाचे प्रजनन करण्यास मनाई केल्याने येथील सिंहाची संख्या कमी झाली. गेल्या महिन्यात १७वर्षे वयाच्या सिंहाचा मृत्यू झाल्याने उद्यानात एकच नर सिंह शिल्लक राहिला.दरम्यान वन मंत्री श्री.मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे गुजरात राज्यातील ही सिंहाची जोडी येणार असल्याने उद्यानात पर्यटकांची संख्या पुन्हा वाढणार आहे.

शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या अनुदानाबाबत सुधारित प्रस्ताव तयार करावा-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 9 : राज्यातील शारीरिक शिक्षण महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबत नव्याने सुधारित प्रस्ताव तयार करावा अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.आज मुंबईत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी विधान परिषद सदस्य प्रकाश गजभिये, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, सहसंचालक प्रकाश बच्छाव संबंधित अधिकारी उपस्थित होते. कायम विनाअनुदानित शारीरिक शिक्षण महाविद्यालय एनसीटीई दिल्लीच्या मान्यतेने विद्यापीठाशी संलग्नित असून महाविद्यालयात नियमित दोन वर्षीय बी.पी.एड व तीन वर्षीय बी.पी.ई. हे अभ्यासक्रम शिकविण्यात येत आहेत. हे महाविद्यालय 1994 पासून नियमित सुरू असल्याने कायम विनाअनुदानित तत्त्वावर त्यांचा समावेश होत नाही. कायम विनाअनुदानित तत्त्व हे सन 2001 नंतर राज्यातील महाविद्यालयांना लागू झाले आहे. सन 1994 नंतरची 2001 पर्यंत सर्व महाविद्यालय अनुदानास पात्र आहेत, परंतु काही महाविद्यालयानी उच्च न्यायालयात अनुदान मिळण्याबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या अनुषंगाने बैठकीत या महाविद्यालयाच्या अनुदानाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. याबाबत नव्याने पुन्हा सविस्तर प्रस्ताव सादर करावा.त्यानंतर हा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात येईल, असे सांगून याबाबत शासन सकारात्मक असल्याचे श्री. पाटील यांनी सा

थेट सरपंचपदांसह ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान

मुंबई, दि. 9 : राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

श्री. मदान यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी  सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. तसेच नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या : अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदूर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.

ज्येष्ठ प्रेस फोटोग्राफर मुकुंद भुते यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ प्रेस फोटोग्राफर मुकुंद भुते(वय ५४ ) यांचे आज हृदयविकाराच्या  झटक्याने निधन झाले. वाराणसीमध्ये कुटुंबासोबत गेले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.भुते यांच्या अचानक अशा निधनामुळे हळहळ व्यक्त होते आहे.

30 वर्ष त्यांनी मीडिया क्षेत्रामध्ये आपले योगदान दिले. ‘केसरी मधून त्यांनी छायाचित्रे, फोटोग्राफी पत्रकार म्हणून व्यावसायिक आयुष्याची सुरुवात केली.नंतर ‘सकाळ, टाइम्स ऑफ इंडिया, मिड डे सारख्या वृत्तपत्रांसोबत त्यांनी काम केले. त्यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त होते आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे.

उद्योग क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे आवाहन

पुणे, दि.९: उद्योग क्षेत्रात कामगारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि मतदार यादीत नाव नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उद्योग संस्थांनी प्रोत्साहित करावे, असे आवाहन भारताचे मुख्य निवडणूक राजीव कुमार यांनी केले.

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील टेक महिंद्रा – फेज ३ येथे आयोजित कार्यक्रमात उद्योगांमधील मतदार जागृती मंचाच्या नोडल अधिकाऱ्यांशी संवाद कार्यक्रमाच्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे, निवडणुक आयोगाचे विशेष अधिकारी डॉ.रणबीर सिंग, निवडणूक उपायुक्त हिरदेश कुमार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवडणुक आयोगाच्या माध्यम व संवाद महासंचालक शेफाली शरण, टेक महिंद्राचे उपाध्यक्ष सतीश पै, उद्योग समूहाचे प्रतिनिधी, औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, पुण्यामध्ये मतदानाची टक्केवारी ५० टक्केपेक्षा कमी आहे. मतदान प्रक्रियेत सहभागी होतांना मतदानाची टक्केवारी वाढणे गरजेचे आहे. उद्योग क्षेत्राच्या प्रतिनिधींनी मतदानाविषयी जनजागृती करुन पात्र कर्मचारी, कामगारांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले. मतदार जागृती मंचाच्या प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांबाबत भारत निवडणूक आयोग सकारात्मक विचार करेल, असेही ते म्हणाले.

निवडणूक आयुक्त श्री. पांडे म्हणाले, मतदान प्रक्रिया सुरळीतपणे, शांततेत पार पाडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग नेहमीच तत्पर असून निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात येते. लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलिस दलातील जवान (सर्व्हिस वोटर्स) तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक अशी इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम (इटीपीबीएस) सेवा भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी विविध कंपन्यांमधून आलेल्या प्रतिनिधींच्या प्रश्नांना श्री. कुमार आणि श्री. पांडे यांनी उत्तरे दिली. नवीन मतदार नोंदणी व मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रपत्र क्र. ६, ७ आणि ८ नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. तसेच मतदार प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुलभ, जलद गतीने होण्यासाठी ‘व्होटर हेल्पलाईन मोबाईल अॅप’, ‘नॅशनल वोटर्स सर्व्हिस पोर्टल’ ( एनव्हीएसपी), मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसाठी ‘गरुडा’ मोबाईल अॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जवळच्या उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे ऑफलाईनपद्धतीने मतदार नोंदणी करता येते, असे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित उद्योग समूहाचे प्रतिनिधी, औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी यांनी निवडणूक आयोगाशी संवाद साधला.

“सावधान रहो शेर आ रहा है…”; संजय राऊतांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधवांचा विरोधकांना इशारा!

मुंबई-शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना जामीन झाल्यावर “सावधान रहो शेर आ रहा है…” असा इशारा शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी दिला आहे. ते म्हणाले,’अतिशय खोट्या केसेस तयार केल्या, खोटे पुरावे तयार केले आणि त्यांना जेलमध्ये टाकलं. परंतु जेलमध्ये गेल्यानंतरही संजय राऊत हे दमले नाहीत, थकले नाहीत. कोणत्याही प्रकारे त्यांनी शरणागती पत्कारली नाही. किंबहूना ते अधिक ताकदीने उभा राहिले, हिंमतीने उभा राहिले.”

त्यांना अखेर पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. यामुळे ठाकरे गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसैनिक जल्लोष साजरा करत आहेत.

भास्कर जाधव म्हणाले, “आम्ही आज सगळेच आनंदअश्रूंमध्ये न्हाऊन निघतोय. याचं कारण असं आहे की संजय राऊत हे आमचे नेते आहेत. एक लढवय्ये नेते आहेत, तत्वनिष्ठ नेते आहेत. आपल्या भूमिकेशी ठाम राहणारे नेते आहेत. हे नेते मागील चार-दोन वर्षे या देशात जो लोकशाहीवर घाला घातला जात होता. या लोकशाहीचं अधंपतन केलं जात होतं. या लोकशाहीच्या नावाने, सत्तेचा दुरुपयोग करून संपूर्ण देशाला अधोगतीकडे नेण्याचं काम सुरू होतं, त्याविरोधा ते आपल्या लेखणीने प्रहार करत होते. त्यांना विविध प्रकारे थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु ते काही थांबवू शकले नाहीत आणि मग शेवटचा उपाय म्हणून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. तुरुंगात टाकत असताना अतिशय खोट्या केसेस तयार केल्या, खोटे पुरावे तयार केले आणि त्यांना जेलमध्ये टाकलं. परंतु जेलमध्ये गेल्यानंतरही संजय राऊत हे दमले नाहीत, थकले नाहीत. कोणत्याही प्रकारे त्यांनी शरणागती पत्कारली नाही. किंबहूना ते अधिक ताकदीने उभा राहिले, हिंमतीने उभा राहिले.”

निवडणूक आयोगाने साधला तृतीयपंथीय समुदायातील मतदारांशी संवाद

पुणे, दि. ९: निवडणूक प्रक्रियेबाबतच्या तृतीयपंथीय घटकांच्या समस्यांबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच त्यांना आपले म्हणणे, समस्या मांडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाईल, अशी ग्वाही देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या देशपातळीवरील शुभारंभाच्या निमित्ताने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या उपस्थितीत शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे त्यांनी तृतीयपंथी घटकांशी संवाद साधला. यावेळी निवडणूक उपायुक्त हृदयेश कुमार, निवडणुक आयोगाचे विशेष अधिकारी डॉ.रणबीर सिंग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या सदस्या दिलशाद मुजावर आदी उपस्थित होते.

श्री. कुमार म्हणाले, तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी प्रकिया अतिशय सोपी केली असून तंत्रज्ञान, जन्म दाखला आदी समस्यांवर मार्ग काढला जाईल. प्रत्येक राज्यात तृतीयपंथी मतदारांशी संवाद साधत आहोत. निवडणूक प्रकियेच्या अनुषंगाने तृतीयपंथींयासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याबाबत आयोग आवश्यक ती कार्यवाही करेल.

निवडणूक आयुक्त श्री. पांडे म्हणाले, तृतीयपंथीयांची संख्या सुमारे ५ लाख आहे. तथापि, केवळ १० टक्के मतदार नोंदणी झाली आहे. त्यांनी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या राज्यघटनेने जात, धर्म, लिंग आदी कशाही आधारे भेदभाव होणार नाही याची हमी दिली आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियमातदेखील ही तरतूद असल्यामुळे तृतीयपंथीयांनाही मतदार नोंदणी, निवडणुकीत भाग घेण्यास कोणतीही समस्या येणार नाही, त्याबाबत आयोग अधिक प्रयत्न करेल. राष्ट्रीय स्तरावर आणि जिल्हा स्तरावर तृतीयपंथींयांमधून निवडणूक आयकॉन नेमण्याबाबत निवडणूक आयोग निश्चित विचार करेल, असेही ते म्हणाले.

यावेळी श्रीकांत देशपांडे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

बैठकीत मानीनी मोहिते, डॉ. सान्वी जेठवाणी, दिशा पिंकी शेख, माया अवस्थी, माया शेख, मयुरी आवळेकर आदींनी समस्या, अडीअडचणी मांडल्या तसेच विविध सूचना केल्या.

निवडणूक साक्षरता मंच आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांशी संवाद
तत्पूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील निवडणूक साक्षरता मंचाचे सदस्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसेच ‘वुई फौंडेशन’च्या स्वयंसेवकांशी संवाद साधला. साक्षरता मंचांकडून मतदार जागृतीसाठी राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांदरम्यान येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी तांत्रिक आणि अन्य सहकार्याविषयी त्यांनी सदस्य आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केली.

पुणे महापालिकेच्या निविदा प्रक्रियेसाठी घेतले जाणारे शुल्क हे अवाजवी व नियमबाह्य !!

शासन निर्णयानुसार निविदा शुल्क घ्यावे : आम आदमी पार्टीची मागणी

पुणे- महापालिका निविदा प्रक्रियेत सहभागासाठी लागणारे अवाजवी, शासन निर्देशाकडे दुर्लक्ष करून आकारण्यात येत असलेले निविदा शुल्क कमी करणे बाबत आज आदमी पार्टीतर्फे आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देण्यात आले. आपचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, बिबवेवाडी विभाग प्रमुख घनश्याम मारणे व अमोल मोरे यांनी ही मागणी केली. अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली असता वाढीव निविदा शुल्क पुणे मनपाच्या तिजोरीत जमा होत नसल्याने त्याचा मनपाला कोणताही लाभ होत नसल्याने लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

पुणे महानगर पालिका आपल्या विविध विकास कामांच्या हजारो निविदा प्रसिद्ध करते. त्यात हजारो सर्वसामान्य ठेकेदार, अनेक सुशिक्षित बेरोजगार अभियंता ह्यात सहभाग घेतात. ह्यासाठी लागणारे तसेच परत न मिळणारे निविदा खरेदी शुल्क प्रचंड आहे.

शासनाने दिलेल्या निर्देशाच्या कितीतरी पटीने ते अधिक आहे.(शासन अध्यादेश क्रमांक CAT/ 2017/ प्र. क्र. 08/इमा -2 दि. 27/09/2018 पृष्ठ क्रमांक 25 )उदा. जिथे शासनाने रु. 2000/- सांगितली आहे तिने रु. 11,979/- ची आकारणी होत आहे. सदर प्रकार का, कशासाठी, कुणाच्या फायदयासाठी होत आहे, त्यावर कोणाचेच कसलेच बंधन का नाही? असे अनेक प्रश्न या निमित्ताने आम आदमी पार्टीने उपस्थित केले आहेत.तरी सदर प्रकरणी त्वरित चौकशी करून सोबत जोडलेल्या शासन निर्देशानुसार निविदेचे शुल्क ठेवण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, अशी मागणी आपने केली.

मुंबई-बर्मिंगहम विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करणार 

ब्रिटनमधील वेस्टमिडलँड आणि महाराष्ट्रात सामंजस्य करार करणार

इलेक्ट्रिक वाहन, पर्यटन प्रकल्पांच्या निर्मितीसाठी परस्परांना सहकार्य

मुंबई दि 9: :-ब्रिटनमधील वेस्टमिडलँड आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये गुंतवणूकविषयक सामंजस्य करार करण्यात येणार आहे. वेस्टमिडलँडचे महापौर अँडी स्ट्रीट यांनी आपल्या शिष्टमंडळासह आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी परस्पर सहकार्याने दोन राज्यातील संबंध अधिक दृढ  करण्याचा निर्णय घेतला. मुंबई-बर्मिंगहम विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात पुढील काही वर्षात हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, शिवडी न्हावाशेवा सी लिंक असे अनेक मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प उभे राहत असून त्याद्वारे गुंतवणुकीच्या अनेक मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे राज्यात भविष्यात निर्माण होणाऱ्या संधीचा फायदा घेण्यासाठी वेस्टमिडलँडमधील कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. याबाबत सकारात्मकता दर्शवत एकमेकांशी गुंतवणूकविषयक सामंजस्य करार करून हे संबंध अधिक वृद्धिंगत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

लंडनपासून जवळच वेस्टमिडलँड हे राज्य वसलेले आहे. जॅग्वार, कॅडबरी आणि जेसीबीसारख्या प्रतिष्ठित कंपन्या या भागातील आहेत. गेल्या काही वर्षात राज्यातील अनेक मराठी तरुणांनी स्टार्टअपद्वारे या राज्यात आपल्या कंपन्या सुरू केल्या असून त्यांना स्थानिक प्रशासनाकडून उत्तम सहकार्य मिळत आहे. त्यामुळे दोन देशांप्रमाणे दोन राज्यामध्ये गुंतवणूकविषयक संबंध अधिक वाढावेत अशी मागणी या बैठकीत वेस्टमिडलँडचे महापौर अँडी स्ट्रीट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

वेस्टमिडलँड राज्य हे इलेक्ट्रिक व्हेईकल्स क्षेत्रातले मोठे हब असून त्यादृष्टीने राज्यात नवीन गुंतवणूक येण्यासाठी मोठी संधी आहे. त्यासोबतच मुंबई ते बर्मिंगहम थेट विमानसेवा सुरू झाल्यास या दोन राज्यात पर्यटन वाढीसाठी त्याचा मोठा फायदा होऊ शकतो, ही बाबही अँडी स्ट्रीट यांनी निदर्शनास आणून दिली, त्यावर  ही सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे नक्की पाठपुरावा करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला दिली.

वेस्टमेन्सलँड येथे बोरिक कॅसल, एजबर्स्टन क्रिकेट ग्राउंड, एमस्टरडम येथील सुप्रसिद्ध केनॉल अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. या जागा भारतीय पर्यटकांना पहाता येतील त्यामुळे पर्यटनात मोठ्या संधी उपलब्ध असल्याने त्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यासोबतच पायाभूत सुविधा क्षेत्रात अनेक कंपन्या कार्यरत असून त्यांनादेखील या दोन राज्यामध्ये काम करण्याची संधी मिळू शकेल. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, पर्यटन आणि पायाभूत सुविधांचा विकास या तीन क्षेत्रात महाराष्ट्र आणि वेस्टमिडलँड यांनी एकत्रितरित्या काम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीला इयन ब्रूकफिल्ड, एलन गेमेल, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, नील रामी, बेथ येट्स, अभिजित आफले, आशुतोष चंद्रा हेदेखील उपस्थित होते.

कोर्टात अचानक टाळ्यांचा कडकडाट झाला…संजय राऊतांच्या डोळ्यातून आनंदाश्रू 

मुंबई-कारागृहात 101 दिवस वास्तव्यानंतर आज पीएएलए कोर्टात संजय राऊतांच्या जामिनावर सुनावणी सुरू होती. अचानक टाळ्यांचा कडकडाट झाला तेव्हा राऊतांना नेमके काय झाले हे कळलेच नाही, गोंधळलेली अवस्था असतानाच वकील म्हणाले, तुम्हाला जामीन मिळाला अन्..संजय राऊतांच्या डोळ्यातून आनंदआश्रू तरळले. आता मी पुन्हा लढेल, न्यायदेवतेचे आभार अशी त्यांची प्रतिक्रिया होती.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना आज दुपारी जामीन मंजूर झाला. राऊतांना जामीन मंजूर होताच कोर्टरुमच्या बाहेरही टाळ्यांचा कडकडाट झाला. राऊतांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएल कोर्टाने निकाल दिला. सर्वजण काय निकाल येईल याची वाट पाहात होते. खुद्द संजय राऊत हेही याच गोष्टीची वाट पाहत होते पण राऊतांना जामीन मंजूर होताच कोर्टरुमबाहेर टाळ्यांचा कडकडाट झाला. राऊतांना त्यावेळी नेमके काय झाले हे उमगले नाही. काही क्षणातच त्यांच्या वकिलांनी राऊत यांना जामीन मंजूर झाल्याचे सांगितले. त्यानंतर संजय राऊतांच्या डोळ्यातून अश्रू तराळले.

​​​​​आईसह कुटुंब वाट पाहतेय

संजय राऊतांच्या जामीनावरील सुनावणीवेळी त्यांचे कुटुंबीय न्यायालयात उपस्थित होते. त्यांना जामीन मिळाल्याचे समजताच कुटुंबीय अत्यंत भावूक झाले होते. 102 दिवस दुरावलेले संजय राऊत घरी येणार हा मोठा दिलासा कुटुंबाला मिळाला. हा प्रसंग अत्यंत धीरगंभीर पण आनंदाचा होता. राऊतांच्या कुटुंबियांच्याही डोळ्यांच्या कडाही पानावल्या.

संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्याची बातमी मिळताच त्यांच्या आई ते येण्याची वाट पाहत आहेत. घरासमोर आता लगबग सुरू असून राऊत यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. डीजेसह स्वागतासाठीच्या सर्व वस्तूही आणल्या असून त्यांच्या आई अगदी घराच्या वरच्या मजल्यावरील दारात उभे राहून त्या ही सर्व तयारी पाहतानाचे व्हिडीओही समोर आले आहेत.

संजय राऊतांना झालेली अटक अवैध:PMLA कोर्टाची ED ला चपराक; स्वत:च्या मर्जीने आरोपी निवडले, मुख्य आरोपींनाच अटक नाही

मुंबई-शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत तसेच त्यांचे बंधू प्रवीण राऊत यांना झालेली अटक ही बेकायदेशीर आहे. ईडीने स्वःतच्या मर्जीने आरोपी निवडले आहेत. मुख्य आरोपींना ईडीने अटक केली नाही, अशी गंभीर टीप्पणी ‘पीएमएलए’ कोर्टाने केली आहे.राऊंताच्या जामीन अर्जावर आज झालेल्या सुनावणीवेळी ईडीला ही चपराक लगावली आहे. यावरून येणाऱ्या काळात नवे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘पीएमएलए’ कोर्टाने काय म्हटले?

  • ईडीने गुणवत्तेच्या आधारावर युक्तीवाद करावा.
  • आरोपींना अटक कायदेशीर होती हे पटवून द्या.
  • संजय राऊत यांना कोणतेही कारण नसताना अटक.
  • जामीन अर्जावर सुनावणीवेळी ईडीला कोर्टाने खडसावले.
  • प्रमुख आरोपी राकेश वाधवान, सारंग वाधवान यांना अटक नाही.
  • म्हाडाची भूमिका संशयास्पद पण म्हाडाच्या कोणत्याही अधिकाऱ्यावर कारवाई नाही.
  • अन्य आरोपींवर कुठलाही कारवाई कारवाई झाली नाही.
  • प्रवीण राऊत यांना दिवाणी प्रकरणात अटक.

हायकोर्टाचा स्थगितीस नकार

विशेषतः हायकोर्टानेही संजय राऊत यांच्या जामीनावर तातडीने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला. पीएमएलए न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला. तसेच, या प्रकरणात प्रवीण राऊत यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर या निर्णयाविरोधात इडीतर्फे मुंबई हायकोर्टात धाव घेतली. परंतु, हायकोर्टानेही संजय राऊत यांच्या जामीनावरील स्थगितीला नकार दिला. त्यामुळे उद्या या प्रकरणावर सुनावणी होईल. तुर्तास हा राऊतांना सर्वात मोठा दिलासा तर इडीला झटका मानला जात असून आज सायंकाळी सातपर्यंत राऊत जेलमधून बाहेर येणार आहेत.

कोर्टाचा शेरा विचार करण्यासारखा – अंधारे

सुषमा अंधारे म्हणाल्या, कोर्टाने जो शेरा दिला तो विचार करण्यासारखा आहे. ईडीवर कोर्टाने ज्या टीप्पणी केली आहे. ईडीने दाखल केलेल्या पाच हजार आठ केसेसमध्ये केवळ आठ केसेसचा निकाल लागला म्हणजेच लोकांना बदनाम करणे, कुटुंबांना नाहक त्रास देणे हा याचा अर्थ आहे.

कारागृह, घराबाहेर जल्लोष-आज दिवाळी

संजय राऊत यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर राज्यभरात आनंदोत्सव साजरा होत आहे. आर्थर रोड कारागृहाच्या आवारात मोठी गर्दी सध्या जमली असून तेथे आनंदोत्सव साजरा केला जात आहे. जेलपासून संजय राऊत यांच्यासह दुचाकी फेरीही निघणार आहे. लढवय्या योद्धा अशा बिरुदावलीचे बॅनरही कार्यकर्त्यांच्या हाती आहेत.

याशिवाय संजय राऊत यांच्या घरीही दिवाळी साजरी होणार असून त्यांच्या घरासमोर रांगोळी काढण्यात आली असून स्वागतासाठी मोठा समुदाय तेथे उपस्थित आहे. राऊत आधी सिद्धीविनायक दर्शनासाठी नंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेतील. त्यानंतर मातोश्रीवर जातील व शेवटी घरी जातील.

राऊतांना जामीन, सुषमा अंधारेंचे डोळे पाणावले:म्हणाल्या, टायगर इज बॅक, आम्हाला हजार हत्तींचे बळ मिळाले, आता जलवा पाहा

मुंबई- संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सुषमा अंधारेंचे डोळे पाणावले. संजय राऊत यांच्या जामिनामुळे आम्हाला हजार हत्तीचे बळ मिळाले. आम्ही अत्यंत आनंदी आहोत, असे म्हणताना सुषमा अंधारे भावूक झाल्या.

तसेच, ठाकरेंची तोफ समजले जाणारे संजय राऊत लवकरच तुरुंगाबाहेर येतील. आता जलवा पाहा, असा इशाराही अंधारे यांनी विरोधकांना दिला. याशिवाय संजय राऊत यांना जामीन मिळताच टायगर इज बॅक असे ट्विटही अंधारे यांनी केले.

‘टीव्ही 9’ या वृत्तवाहिनीशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, संजय राऊत यांना जामीन मिळाल्यामुळे खूप आनंदी आहोत. राऊत तुरुंगात गेल्यानंतर, त्यांच्या गैरहजेरीत माझा ठाकरे गटात प्रवेश झाला. त्यामुळे राऊतांची आणि माझी भेट होऊ शकली नाही. भाजपने तर मी अपशकुनी आहे, माझ्या येण्यामुळेच राऊत तुरुंगात गेले, या पातळीवर टीका केली. त्यामुळे संजय राऊतांचे आता बाहेर येणे. त्यासोबतच अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंना विजय मिळणे, हे व्यकिगतरित्या माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे. हे सांगताना सुषमा अंधारे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

सुषमा अंधारे म्हणाल्या, संजय राऊत तुरुंगाबाहेर येतील तेव्हा महाप्रबोधन यात्रा सोडून मी त्यांच्या स्वागतासाठी मुंबईला जाणार आहे. राऊतांच्या बाहेर येण्यामुळे आम्हाला फार शक्ती मिळाली आहे. आता पुढे पहा काय जलवा होतो, असा इशाराच सुषमा अंधारेंनी विरोधकांना दिला.

आमच्यासाठी आज दिवाळी

राऊत तुरुंगातून बाहेर आल्यास तुम्ही महाप्रबोधन यात्रेत एकत्र दिसणार का, असा प्रश्न सुषमा अंधारे यांना विचारण्यात आला. त्यावर अंधारे यांनी म्हटले की, महाप्रबोधन यात्रेत त्यांच्यासोबत असणे हा माझ्यासाठी मान असेल. त्यांच्या अनुपस्थितीत मी खारीचा वाटा म्हणून महाप्रबोधन यात्रेला सुरुवात केली होती. संजय राऊतांना जामीन मिळाल्यामुळे आज आमच्यासाठी दिवाळीचा दिवस आहे. आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, जे ४० लोक गेले, ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली, त्यापैकी काहीजण पूर्वी रिक्षा चालवत होते, फुलं विकत होते, टपरी चालवत होते. बाळासाहेब ठाकरे यांनी या लोकांना गावखेड्यातून आणून वर्षा आणि सह्याद्रीवर बसवले. या लोकांनी कठीण काळात धीर बाळगणे अपेक्षित होते. संजय राऊत यांच्या आदरापोटी आमच्या डोळ्यात आज अश्रू येत आहेत, तशी हिंमत ४० लोकांनी दाखवली असती तर आमच्या मनात त्यांच्याविषयी हीच भावना असती.

पीएमपी अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया यांचेकडून नाट्य सेवा संघातील कलाकारांचे अभिनंदन

पुणे- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या नाट्य सेवा संघाने ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये ‘प्रश्न कायद्याचा आहे’ हे नाटक सादर करून या नाटकासाठी पुरुष व स्त्री अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र पटकावले. याबद्दल पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी गुणवत्ता प्राप्त कलाकारांसह पीएमपीएमएलच्या नाट्य सेवा संघातील सर्व कलाकारांचे अभिनंदन केले.

पीएमपीएमएलच्या नाट्य सेवा संघाची वाटचाल गेली २८ वर्षे अविरतपणे सुरू आहे. नाट्य सेवा संघाने एकांकिका
स्पर्धेपासून सुरुवात करून दोन अंकी नाटक व त्यानंतर महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेत सन २०२१-२२ पर्यंत रंगमंचावर तब्बल २८ नाटके सादर केलेली आहेत. व्यावसायिक रंगभूमीवर गाजलेली अनेक नाटके पीएमपीएमएलच्या नाट्य सेवा संघाने रंगमंचावर सादर केली आहेत. सन २००३-०४मध्ये “घरघर” नाटकाला पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळून या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. तर “फॉरमॅट”
(२०११-१२), “खेळ” (२०१२-१३), “धुवाँ” (२०१६-१७), “प्रश्न कायद्याचा आहे” (२०२०-२१) या नाटकांना विभागीय
स्तरावर द्वितीय पारितोषिके प्राप्त झालेली आहेत. तसेच २०१४-१५ मध्ये अधांतर या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले होते.परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी पीएमपीएमएल नाट्य
सेवा संघाने आतापर्यंत मिळविलेल्या यशाबद्दल पीएमपीएमएल चे कामगार व जनता संपर्क अधिकारी श्री. सतिश गाटे यांचे
मार्गदर्शनाखाली नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेणारे विनोद जंबुकर, दिलीप आंग्रे, उमेश शेंडगे, नितीन पगारे, देविदास धायगुडे,
अशोक बोरसे, हेमांगी काळे व नाट्य सेवा संघाची धुरा सांभाळणारे राजेंद्रकुमार यादव आदी सर्व कलाकारांचे अभिनंदन केले व नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले.