पुणे : ज्येष्ठ प्रेस फोटोग्राफर मुकुंद भुते(वय ५४ ) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वाराणसीमध्ये कुटुंबासोबत गेले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.भुते यांच्या अचानक अशा निधनामुळे हळहळ व्यक्त होते आहे.
30 वर्ष त्यांनी मीडिया क्षेत्रामध्ये आपले योगदान दिले. ‘केसरी मधून त्यांनी छायाचित्रे, फोटोग्राफी पत्रकार म्हणून व्यावसायिक आयुष्याची सुरुवात केली.नंतर ‘सकाळ, टाइम्स ऑफ इंडिया, मिड डे सारख्या वृत्तपत्रांसोबत त्यांनी काम केले. त्यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त होते आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे.