Home Blog Page 1533

‘पुणे जिल्हा ग्रंथोत्सव २०२२’ चे उद्घाटन

समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ग्रंथ चळवळ महत्वाची-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे,दि.१५: समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ग्रंथ चळवळ महत्वाची आहे. ग्रंथात संपूर्ण जीवन बदलण्याची क्षमता असल्याने डिजीटल क्रांतीच्या युगातही नवे ज्ञान संपादन करून व्यक्तिमत्व विकसीत करण्यासाठी ग्रंथ वाचन गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घोले मार्ग येथील पंडीत जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवनात आयोजित ‘पुणे जिल्हा ग्रंथोत्सव २०२२’ तसेच ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, शासकीय विभागीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल सुरेश रिद्धीवाडे, सहायक ग्रंथालय संचालक अर्चना काळे, कवी विसुभाऊ बापट, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक सोपान पवार, तहसीलदार राधिका हावळ-बारटक्के आदी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, ग्रंथ हेच खऱ्या अर्थाने ज्ञानाचे वाहक आहेत. पुण्याच्या सांस्कृतिक विकासात ग्रंथ चळवळीचे मोठे योगदान आहे. एखाद्या गोष्टीकडे तंत्रशुद्ध पद्धतीने, चिकित्सक वृत्तीने बघण्याचे ज्ञान ग्रंथामधून मिळते. आजच्या स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी ग्रंथ वाचनाशिवाय पर्याय नाही. ग्रंथोत्सवामुळे वाचन संस्कृती विकसित होण्याबरोबरच ग्रंथाविषयी रुची निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डिजीटल वातावरणातही पुस्तकांचा स्पर्श प्रेरक-भारत सासणे
कार्यक्रमाचे अध्यक्ष सासणे म्हणाले, डिजीटल साधनांकडे नव्या पिढीचा कल वाढत असताना अशा वातावरणातही पुस्तकांचा स्पर्श आणि त्याच्याशी असलेली मैत्री प्रेरक आहे. अनेक समस्यांवर मात करण्याची शक्ती त्यातून प्राप्त होते. पुस्तक वाचनाने मिळणारा आनंद विलक्षण असतो. जीवनाच्या विविध टप्प्यांवर मार्गदर्शन करण्याचे कार्य ग्रंथ करीत असतात. ग्रंथ हे आपले गुरु आणि त्याबरोबरच मित्र आहेत. ते आपल्याला मित्रत्वाच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत असतात. म्हणूनच पुस्तकांना केंद्रबिंदू ठेऊन जगभरात वाचन संस्कृतीच्या विकासासाठी प्रयत्न होत आहेत.

कुमारावस्थेत वाचनामुळे संस्कार होऊन व्यक्तिमत्वाचा विकास होण्यास मदत होते. बाल्यावस्थेत वाचनामुळे झालेले संस्कार आयुष्यात कायमस्वरुपी उपयोगी पडतात. पुस्तकांच्या सानिध्यात आल्याने वाचन होते, वाचनातून संस्कार होतात आणि व्यक्ती सकारात्मक विचार करतो. संकटकाळात ग्रंथचळवळीचे महत्वपूर्ण मार्गदर्शन मिळते. एकंदरीत जीवन यशस्वी होण्यास मदत होते. त्यामुळे वाचन चळवळीचा प्रसार आणि प्रचार वेगवेगळ्यास्तरावर होण्याची गरज आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून समाजात वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत होते, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात श्रीमती गोखले म्हणाल्या, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि कार्यालयाच्या स्थापनेचे रौप्य महोत्सवी वर्षाचा दुहेरी संगम आणि ग्रामीण व शहरी भागात वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी तसेच त्याची जोपासना होण्यासाठी ग्रंथ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

ग्रंथदिंडीने शुभारंभ
पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमणार यांच्या हस्ते मनपा भवन येथून ग्रंथ दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. बालगंधर्व मंदीर चौक मार्गे पुढे पंडीत जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन, घोले मार्ग, शिवाजीनगर येथे या ग्रंथदिंडीचा समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विविध तालुक्यातील ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, बाजीराव मार्ग येथील नूतन मराठी महाविद्यालय आणि गुरुवार पेठ येथील सेंट हिल्डाज् माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

बुधवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप
जिल्हा ग्रंथोत्सवाचा समारोप बुधवारी सायंकाळी 4 वाजता पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. सकाळच्या सत्रात 11.30 वाजता ऋचा थत्ते यांचा ‘सुचलेलं काही…वेचलेलं काही’ हा कार्यक्रम होणार आहे. तर अर्पणा निरगुडे आणि अजित कुंटे यांचे कथाकथन होईल. ग्रंथ प्रदर्शन व विक्री बुधवार 16 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 यावेळेत सुरू राहणार असून यात विविध विषयांच्या पुस्तकांसोबतच शासकीय प्रकाशनेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

लग्नसराईत बँक्वेट हॉलच्या मागणीत ६८% आणि दागिन्यांच्या मागणीत ४३% ची वाढ : जस्ट डायल कंझ्यूमर इनसाईट्स

–    देशभरात लग्नासाठीचे दागदागिने आणि बँक्वेट हॉलच्या मागणीत मुंबई अग्रेसर, त्यापाठोपाठ दिल्ली आणि हैदराबाद

–    लग्नासाठीच्या दागदागिन्यांकरता सर्वाधिक मागणीसह टियर २ शहरांमध्ये सूरत, राजकोट

–    टियर १ शहरांमध्ये मागणीत २२% वाढ आणि टियर २ शहरांत ४८% वाढ

–    लग्नासाठीचे दागदागिने, बँक्वेट हॉल, डेकोरेटर्स, फोटोग्राफर्स आणि केटरर्स या आघाडीच्या ५  सर्वाधिक शोधल्या गेलेल्या विवाहसंबंधी सेवा

मुंबई, १५ नोव्हेंबर: कोविड निर्बंधांमुळे दोन वर्ष सर्व समारंभ साजरे करण्यावर मर्यादा होत्या. यावर्षी मात्र लग्नसराईत विवाहसंबंधित सेवांच्या विस्तृत श्रेणीसाठी मागणी (वर्ष दर वर्ष) वाढली असून बँक्वेट हॉलसाठीच्या सर्च मध्ये ८३% ची वाढ, केटरर्सच्या सर्च मध्ये ५७% वाढ आणि लग्नासाठीच्या दागदागिन्यांकरता ४४%ची वाढ झाल्याचे जस्ट डायल कंझ्यूमर इनसाईट्सच्या  नवीनतम अहवालात म्हणले आहे.

बँक्वेट हॉल, केटरर्स, डेकोरेटर्स, डीजे, इव्हेंट आयोजक, वेडिंग ज्वेलर्स, टेलर, मेहंदी कलाकार, गुरुजी, फोटोग्राफर, वधू-वर सूचक मंडळे आणि लग्नासाठीचे बँड यांचा समावेश असलेल्या विवाह सेवांसाठी जस्टडायलवरील एकूण मागणीमध्ये भारतातील १,००० गावे आणि शहरांमध्ये ३०% वाढ झाली आहे. ही मागणी प्रामुख्याने टियर २ शहरांत दिसून आली असून तिचे प्रमाण ४८% तर टियर १ शहरांत ते प्रमाण २२% होते.  

या लग्नसराईतील ग्राहकांच्या प्रवाहाबद्दल भाष्य करताना जस्टडायलचे सीएमओ श्री. प्रसून कुमार म्हणाले: “आम्ही या लग्नाच्या हंगामात मागणीत मोठी वाढ पाहत आहोत कारण भारतात पुढील ३० दिवसांच्या कालावधीत ३२ लाख विवाहसोहळे होतील. कोविड मुळे विवाह समारंभांवर आलेल्या  निर्बंधांमुळे विवाह सेवांसाठी गेली दोन वर्षे कठीण होती. भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी विवाह हा एक मोठा चालना देणारा घटक ठरला आहे आणि टियर २ शहरांमध्ये मागणी वेगाने वाढत आहे हे पाहणे उत्साहवर्धक आहे. विवाह विषयक सेवांच्या मागणीत टियर २ शहरात आता टियर १ च्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेसाठी चांगले आहे. यावरून हे देखील प्रतिबिंबित होते की टियर २ गावे आणि शहरांमधील सर्व प्रकारचे व्यवसाय आता त्यांची जास्तीत जास्त पोहोच वाढवण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय विस्तारण्यासाठी ऑनलाइन होत आहेत.”

विवाह सेवांमध्ये, ज्वेलर्स, बँक्वेट हॉल, डेकोरेटर्स, फोटोग्राफर आणि केटरर्स या सर्वाधिक मागणी असलेल्या आघाडीच्या ५ सेवा होत्या आणि प्लॅटफॉर्मवरील लग्नाच्या सेवांशी संबंधित एकूण सर्च मध्ये त्यांचे प्रमाण जवळपास ६०% होते.

लग्नाकरता ज्वेलर्ससाठी मुंबईहून देशभरात सर्वाधिक मागणी आहे आणि त्यानंतर दिल्ली आणि हैदराबादचा क्रमांक लागतो. टियर १ शहरांमधील सर्च २९% वाढला तर टियर २ शहरांमध्ये ४४% वाढ झाली. टियर २ शहरांमध्ये मागणीच्या शर्यतीत जयपूर आघाडीवर होते आणि त्यानंतर सुरत, राजकोट, चंदीगड आणि कोईम्बतूर होते.

सर्व विवाह संबंधित सेवांमध्ये बँक्वेट हॉलची मागणी (वर्ष दर वर्ष) वाढ ही सर्वाधिक होती कारण भारतातील सर्चमध्ये त्यात ६८% वाढ दिसून आली. टियर २ शहरांमध्ये ही मागणी ८३% आणि टियर १ शहरांमध्ये ४६% नी वाढली. बँक्वेट हॉलच्या सर्चमध्ये मुंबईने अव्वल स्थान पटकावले आणि टियर १ शहरांमधील मागणीत जवळपास २७% योगदान दिले, त्यानंतर दिल्ली आणि चेन्नई अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. बँक्वेट हॉलची सर्वाधिक मागणी असलेली कोईम्बतूर, सुरत, नागपूर, लखनौ आणि पटणा ही आघाडीची ५ टियर २ शहरे होती.

टियर १ शहरांमध्ये मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये सर्वाधिक मागणी वाढल्याने डेकोरेटर्सच्या सर्चमध्ये ३१% ची वाढ झाली आहे. चंदीगड, इंदौर, जयपूर, लखनौ आणि सुरत यांसारख्या शहरांमध्ये सर्वाधिक मागणी वाढताना टियर २ शहरांमधील मागणी ४३%नी वाढली आहे.

देशात लग्नासाठीच्या छायाचित्रकारांची मागणी २३%नी वाढली असून टियर २ शहरांमधील सर्च टियर १ शहरांच्या तुलनेत २.३ पट आहे. टियर १ शहरांद्वारे निर्माण होणाऱ्या मागणीपैकी जवळपास ५०% वाटा मुंबई आणि दिल्लीचा आहे. चंदीगड, लखनौ, पटणा, राजकोट आणि कोईम्बतूर ही लग्न छायाचित्रकारांची सर्वाधिक मागणी असलेली आघाडीची ५ टियर २ शहरे होती.

केटरर्सच्या शोधात ३१% वाढ झाली असून मागणीच्या बाबतीत टियर २ शहरांनी टियर १ शहरांना मागे टाकले आहे. टियर २ शहरांमध्ये मागणी ३१%नी आणि टियर १ शहरांमध्ये ५७%नी वाढली आहे. टियर १ शहरांमध्ये बंगळुरू या यादीत अव्वल क्रमांकावर होते तर त्याखालोखाल मुंबई आणि दिल्लीमध्ये केटरर्सची सर्वाधिक मागणी होती. टियर २ शहरांमध्ये जयपूर, लखनौ, कोईम्बतूर, चंदीगड आणि एर्नाकुलम ही केटरर्सना सर्वाधिक मागणी असलेली आघाडीची ५ शहरे होती.

फंडाच्या सुरुवातीला गुंतवलेले १० लाख रुपये ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत १८.९५ कोटींपर्यंत वाढले

यू टी आय मास्टर शेअर यूनिट योजना’यांचा दावा   

ऑक्टोबर १९८६ मध्ये चालू झालेली यू टी आय मास्टर शेअर यूनिट योजना भारतातील सर्वात पहिले आणि गेल्या ३५ वर्षांपासून पैसा वाढविणारे फंड अशी मान्यता असलेले    इक्विटि ओरीएण्टेड फंड आहे.  

यू टी आय मास्टर शेअर यूनिट योजना ही एक ओपेन एंडेड इक्विटि योजना आहे जी मुख्यतः अशा मोठ्या कंपन्यांमध्ये (लार्ज कॅप कंपनी) गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवते ज्या कंपन्या त्यांच्या संबंधित क्षेत्रात स्पर्धात्मक फायदा मिळवत आहेत. स्टॉक निवडण्यासाठी वाजवी किमतीत वाढ (ग्रोथ अॅट रीजनेबल प्राइस- जी ए आर पी) या गुंतवणूक शैलीचा वापर ही योजना करते. याचा अर्थ असा की, कंपनीच्या मिळकतीची वाढ लक्षात घेऊन पोर्टफोलिओ मध्ये तो स्टॉक खरेदी करण्यासाठी वाजवी किंमत द्यावी लागते.

या फंडाचे उद्दिष्ट अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे आहे ज्या कंपन्यांची सातत्याने महसूल वाढ होत आहे, ज्यांचे नफ्यावर लक्ष आहे, ज्या भांडवलावरील खर्चापेक्षा भांडवलावर जास्त परतावा मिळवतात आणि ज्या  नियंत्रित कर्ज घेऊन मुळात मजबूत आहेत. अशा कंपन्या  कदाचित भविष्यात विस्तारासाठी आणि विद्यमान समभागांना टिकवण्यासाठी फ्री कॅश फ्लो निर्माण करू शकतात.

जी ए आर पी आणि स्पर्धात्मक फ्रेंचाईजी या दोन्हीला मिळून एकत्रित दृष्टिकोनातून यू टी आय मास्टर शेअर यूनिट योजना अशा कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकते ज्या:

1.  ज्यांच्या दीर्घकाळ वाढ टिकवून ठेवण्याच्या किंवा मूल्य शक्तीचे फायदे घेण्याच्या  क्षमतेला बाजार कमी लेखत आहे.

2.  ज्या कंपन्यांचा वाढीचा वेग हा अशा घटकांमुळे सुधारत आहेत जे घटक संपूर्ण क्षेत्रासाठीच लागू पडतात; जसे की, काही नियम कायद्यांचा अडथळा दूर होणे, मागणीत अनुकूल वाढ होणे, एकत्रीकरण इत्यादी आणि काही अशा घटकांमुळे वाढत आहे ज्या त्या कंपनीशी संबंधित आहेत जसे, विवेकपूर्ण क्षमता विस्तार आणि उत्पादनाची अन्य स्पर्धकांच्या तुलनेत कमी किंमत इत्यादी.

3.  अशा कंपन्या ज्यांचा व्यवसाय हा भांडवलाचा आहे पण त्या विवेकबुद्धी ने गुंतवणूक करून त्यास अत्यंत कार्यक्षमतेने अमलात सुद्धा आणतात.

4.  ज्या कंपनींना कॅपिटल एम्प्लॉयएड वर जास्त परतव्याने कॅश फ्लो ची पुनर्गुंतवणूक करण्याची संधी असते.

5.  ज्या कंपनीचे त्या क्षेत्रातील सापेक्ष मूल्यांकन चांगले आणि आकर्षक आहे.

या मुळे गुंतवणूकदारांना उत्तम गुणवत्तेच्या कंपनींचा समावेश असलेल्या पोर्टफोलिओतून  दीर्घकालिक संपत्ती निर्माण करण्याची संधी मिळते.

यू टी आय मास्टर शेअर यूनिट योजना; जी लार्ज कॅप फंड म्हणून वर्गीकृत केली जाते; तिच्याकडे सध्या आय सी आय सी आय बँक लिमिटेड, इन्फोसिस लिमिटेड, एच डी एफ सी लिमिटेड, भारती एयरटेल लिमिटेड, अॅक्सीस बँक लिमिटेड, मारुती सुजुकी इंडिया लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, महिंद्रा बँक लिमिटेड, एल अँड टी लिमिटेड अशा आघाडीच्या कंपनींचे पोर्टफोलिओ आहे आणि या शिवाय पोर्टफोलिओ मध्ये ४९% वाटा हा पहिल्या १०  स्टॉक अकाऊंटचा आहे.

ही योजना सध्या ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑटोमोबाइल, ऑटो कॉम्पोनंट, कॅपिटल गुडस्, ग्राहक सेवा, टेलीकम्यूनीकेशन, कनस्यूमर डयूरेबलस् यामध्ये अधिक मजबूत तर तेल, गॅस, उपभोग्य इंधन, एफ एम सी जी, धातू आणि खाण काम, वीज आणि बांधकाम साहित्य या मध्ये थोडी कमकुवत आहे.

या फंड मध्ये आता ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ७.५२ लाख गुंतवणूकदारांच्या खात्यासह रू १०,८७८ कोटी हून जास्त निधी आहे. या फंडाचे उद्दिष्ट दीर्घकालीन भांडवल वाढ किंवा उत्पन्नाचे वितरण मिळवणे हे आहे. हा फंड वर सांगितलेल्या प्रमाणे शिस्तशीर पद्धतीने गुंतवणूक करतो आणि त्याने सुरुवातीपासून दरवर्षी वार्षिक लाभांश चा प्रवाह कायम ठेवला आहे.  यू टी आय मास्टर शेअर यूनिट योजनेने आतापर्यंत एकूण रू ४२०० कोटी हम जास्त डिवीडंट वाटले आहेत.

या योजनेमध्ये पोर्ट फोलिओ चरनिंग चे प्रमाण खूप कमी आहे. चालू झाल्यापासून ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत एस अँड पी बी एस इ १०० टी आर आय चा जो निर्धारीत १४.३१% रिटर्न मानक आहे त्याच्या तुलनेत यू टी आय मास्टर शेअर यूनिट योजनेने (सी ए जी आर)

१५.६५% एवढा रिटर्न मिळवला आहे. या शिवाय सुरुवातीला १० लाखाची गुंतवणुक केलेला

हा फंड  जो एस अँड पी बी एस इ १०० टी आर आय च्या रू १२.४६ कोटींच्या मानकाच्या तुलनेत तेवढ्याच कालावधीमध्ये १८.९५ कोटी एवढा वाढला आहे म्हणजे त्याने गेल्या ३५ वर्षांमध्ये १९० पट रिटर्न्स मिळविले आहेत.

जितेंद्र आव्हाडांना विनयभंगप्रकरणी 15 हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन

0

मुंबई-

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणी ठाणे कोर्टाकडून आज मोठा दिलासा मिळाला आहे. 15 हजारांच्या जातमुचकल्यावर आव्हाडांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना विवियाना माॅल प्रकरणी अटक आणि जामीन मिळाला होता. त्यानंतर कळवा पुलाच्या उद्गघाटन कार्यक्रम आटोपल्यानंतर गर्दी सारून पुढे जाताना महिलेला त्यांनी बाजूला केले होते. या महिलनेने आपला विनयभंग झाला असा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्यावर लावला. त्यानंतर या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंदही करण्यात आली होती.

न्यायालयाकडून दिलासा

मुंब्रा येथे रविवारी (ता. 13) रात्री कार्यक्रमादरम्यान घडलेल्या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाड यांनी याच प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून न्यायालयात धाव घेतली होती. यावर आज सुनावणी झाली असून आव्हाडांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला हा त्यांना दिलासा मानला जात आहे.

भारतात महागाई कमीच; चंद्रशेखर बावनकुळे

पुणे :देशात वाढलेली महागाई ही जगाच्या तुलनेत कमीच आहे, असे पटवून देण्याचा प्रयत्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केला. पुणे दौऱ्यावर असताना बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, गणेश बिडकर, गणेश घोष यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

‘‘महागाई हा आंतरराष्ट्रीय बाजाराशी निगडित विषय आहे. त्यावर फार बोलण्याने काही उपयोग होत नाही. १० वर्षांपूर्वी ४० हजार रुपयांचा मोबाईल, आज चार हजार रुपयांना मिळतो. यावरून गेल्या १० वर्षांत महागाईच्या दराच्या तुलनेत तो स्वस्तच आहे, हे आम्ही घरोघरी जाऊन लोकांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत,’’ असे सांगत त्यांनी महागाई कमी झाल्याचा दावा केला.

ब्राम्हण बुद्धीजीवी त्यामुळेच देवेंद्रजींना न मागता मुख्यमंत्रिपद मिळाले-अमृता फडणवीस

नाशिक– ‘आम्ही ब्राम्हण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे. ब्राम्हण बुद्धीजीवी आहे, त्याचा गर्व आहे. त्यामुळेच देवेंद्रजींना न मागता मुख्यमंत्रिपद मिळाले, असे विधान अमृता फडणवीस यांनी केलं आहे.नाशिकमध्ये अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे दीपावली स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत ब्राम्हण महासंघाचा दीपावली स्नेहमिलनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अमृता फडणवीस यांनी नाशिक शहराची फार स्तुती केली.

अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘नाशिकनगरीने वाईटाचा नाश केला आहे. त्यामुळे या नगरीत येऊन धन्य वाटतं. आम्ही ब्राम्हण आहोत. त्याचा आम्हाला गर्व आहे. ब्राम्हण बुद्धीजीवी आहे, त्याचा गर्व आहे. त्यामुळेच देवेंद्रजींना न मागता मुख्यमंत्रिपद मिळाले. फक्त आम्हाला मार्केटिंग करता येत नाही’.

‘भारती ताई, सीमा हिरे, देवयानी फरांदे या तीन देवी इथे आहे. देशाचा राज्याचा विचार करा. राष्ट्र प्रथम. देशाला द्यायला विचार, बुद्धी आपल्याकडे आहे. तुमचं प्रेम हाच माझ्यासाठी पुरस्कार आहे. पुढच्या वेळी दणकट कार्यक्रम करू. आपण सगळे एक आहे. तुमच्या मागण्या मान्य होतील. कोण मध्ये येतंय? मी पाहते. सबका साथ होगा, तभी विकास होगा, असेही फडणवीस म्हणाल्या.

जिल्हा विधी सेवा प्राधिकारणातर्फे शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन

पुणे – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे नेस वाडिया महाविद्यालयात शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकारणाचे कार्यकारी अध्यक्ष संजय गंगापूरवाला यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती माधव जे. जामदार, न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर, महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दिनेश सुराणा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्याम चांडक आदी उपस्थित होते.

यावेळी श्री नवलमल फिरोदिया विधि महाविद्यालय पुणे येथील विद्यार्थ्यांनी ‘मोटार वाहन कायदा व्यवस्था’ विषयावरील नाटिका प्रस्तूत करुन लोकन्यायालयाचे तसेच विधि साक्षरतेचे महत्त्व सांगितले.

महामेळाव्यामध्ये विविध शासकीय योजनांचे ७० स्टॉल्स होते. यात निवडणूक शाखा, महसुल विभाग, अन्नधान्य वितरण कार्यालय , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक विभाग, जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग , समाज कल्याण आयुक्तालय, महिला बाल विकास विभाग पुणे महानगरपालिका, पुणे आणि हवेली तहसील कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरोसा विभाग, वाहतुक विभाग, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन, कृषी विभाग, हवेली, आरोग्य विभाग पुणे, महावितरण, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, एस. टी. महामंडळ विभाग, भू-संपादन कार्यालय, कुळकायदा विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, स्टेट बँक ऑफ इंडिया, धर्मादाय आयुक्त कार्यालय, वाडीया महाविद्यालय, बजाज विमा कंपनी, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, यु.सी.ओ बँक, जनसेवा फाऊंडेशन आणि लायन्स क्लब अशा विविध शासकीय विभागांनी सहभाग घेतला.

लाभार्थ्यांना न्यायमूर्तींच्या हस्ते लाभाचे वाटप करण्यात आले. स्टॉल्सच्या माध्यमातुन १ हजार ३७५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. कार्यक्रमात विधी सेवा प्राधिकरण पुणे यांनी यावर्षी केलेल्या कामाच्या “सेवा कार्य वृत्त” पुस्तिकेचे प्रकाशन न्यायमूर्ती गंगापूरवाला यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा न्यायाधीश के. पी. नांदेडकर, एस. जी. वेदपाठक, ए. एस. वाघमारे , ए. एन. मरे , एस. बी. हेडाव, एस. आर. नावंदर, जे. एन. राजे, बी. पी. क्षीरसागर, के. एन. शिंदे तसेच सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

जिल्हा विधि सेवा प्राधिकरण सदस्य सचिव मंगल कश्यप व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले

देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी नवीन संशोधनाला चालना देणे आवश्यक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

0

पदविका व पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या मराठी भाषेतील पुस्तकांच प्रकाशन

मुंबई : भारत आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सकल राष्ट्रीय उत्पादनात माहिती तंत्रज्ञानाचे योगदान मोठे आहे. आत्मनिर्भर भारताच्या मजबूत पायाभरणीसाठी आणि  देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी नवीन  संशोधनाला चालना देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

मुंबई विद्यापीठ येथे तंत्रशिक्षण संचालनालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांनी निर्मित केलेल्या पदविका व पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या मराठी भाषेतील पाठ्यपुस्तकांचा वितरण सोहळा संपन्न झाला.

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या पदविका व पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या मराठी भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन आणि वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमास आमदार आशिष शेलार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रा. जगदेश कुमार, नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रीडीटेशन नवी दिल्ली अध्यक्ष प्रा. के. के. अग्रवाल, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली उपाध्यक्ष प्रा. एम. पी. पुनीया, तंत्रशिक्षणचे संचालक डॉ.अभय वाघ, महाराष्ट्रातील प्राध्यापक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीच्या दृष्टीने महाराष्ट्राने पावले उचलली आहेत. यामध्ये मातृभाषेतून शिक्षण असावे यावर लक्ष केंद्रित करून बहुभाषिकता आणि मातृभाषेची ताकद नवीन शिक्षण धोरणामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. नवीन शिक्षण धोरणामध्ये भाषांमध्ये शिकण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण देणाऱ्या संस्थांनी प्रादेशिक भाषेत शिकविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी धोरण विकसित करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. तंत्र शिक्षण मातृभाषेतून मिळाले तर विद्यार्थ्यांना विषय लवकर समजेल, नवीन कल्पकता सुचेल आणि ते संशोधनाकडे वाटचाल करतील. पेटंट मिळवतील आणि मातृभाषेतील ज्ञानामुळे आत्मविश्वास सुद्धा वाढण्यास मदत होईल.

देशातील विद्यार्थ्यांना इंग्रजी व्यतिरिक्त प्रादेशिक भाषेमध्येही अभियांत्रिकीचे शिक्षण घेता यावे यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एआयसीटीई) यांनी देखील पुढाकार घेतलेला आहे. प्रादेशिक भाषेत अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी एआयसीटीईने मान्यतेची प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२१- २२ पासून सुरु केलेली आहे. तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या पुस्तकांचे बारा प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करण्याचा एआयसीटीईने स्वागतार्ह निर्णय घेतलेला आहे.  मराठी भाषेमधील प्रथम वर्षाची अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची ०९ व पदविका अभ्यासक्रमांची ११ अशा एकूण २० पुस्तकांची निर्मिती एआयसीटीईकडून करण्यात आलेली आहे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

संस्कार आणि संस्कृती जपण्यासाठी मातृभाषा महत्त्वाची – केंद्रीय राज्यमंत्री सुभाष सरकार

उच्च व तंत्र शिक्षण व्यवस्थेमधील आव्हाने आणि बदल याचा अभ्यास करून  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले आहे. शिक्षण सर्वकष बनवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. संस्कार आणि संस्कृती जपण्यासाठी मातृभाषा महत्त्वाची आहे. महाराष्ट्राला समृद्ध आणि सुसंस्कृत वारसा लाभलेले अग्रेसर राज्य आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे मराठी भाषेत पुस्तक उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञान मिळविण्यासाठी नक्कीच मदत होईल. विषय लवकर समजेल म्हणून  तंत्र शिक्षण आणि मेडिकल शिक्षण मातृभाषामध्ये देण्याचे प्रयत्न आहे त्यामुळे शिक्षणाच्या समतोला बरोबरच एकरेषीय बल प्रणाली तयार होईल.

0000

केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी मुंबईत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या माध्यम कार्यालयांच्या कामकाजाचा आणि स्वच्छता मोहीम 2.0 अंतर्गत सुरु असलेल्या उपक्रमांचा घेतला आढावा

0

मुंबई – केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा आणि क्रीडा व्यवहार मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज मुंबईतील आकाशवाणी, दूरदर्शन, फिल्म्स डिव्हिजन आणि पत्र सूचना कार्यालयाच्या प्रादेशिक कार्यालयांना भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. आपल्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात ठाकूर यांनी  स्वच्छता 2.0 मोहिमेअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या माध्यम कार्यालयांमध्ये सुरु असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला आणि  देशात सर्वत्र जलदगतीने सुरु असलेल्या स्वच्छता मोहिमेचा वेग कायम ठेवण्याचे आवाहन सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केले.

केंद्रीय मंत्र्यांनी सर्वप्रथम चर्चगेट येथील आकाशवाणी प्रसारण भवनाला  भेट दिली, आणि विविध कार्यालयांमध्ये फिरून त्यांच्या कामांचा आढावा घेतला. केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी वरळी येथील दूरदर्शन केंद्र आणि मरीन लाईन्स येथील पत्र सूचना कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत आढावा बैठका घेतल्या. त्यांनी संपूर्ण परिसराचा  फेरफटका मारला आणि तेथील  स्वच्छता उपक्रमांबाबत माहिती घेतली. तसेच त्यांनी  डॉ. जी. देशमुख मार्गावरील फिल्म्स डिव्हिजनलाही भेट दिली. या सर्व कार्यालयांमध्ये उपलब्ध जागेचे प्रभावी व्यवस्थापन करावे, अशी सूचना त्यांनी केली. स्वच्छता कृती मोहिमेचा एक भाग म्हणून, ठाकूर यांनी सर्व संबंधितांना अनावश्यक कागदपत्रे, फाईल्स काढून टाकण्याचे आणि भंगार साहित्याचा लिलाव करण्याचे निर्देश दिले. सर्व अधिकाऱ्यांनी शक्य तितक्या उत्कृष्ट पद्धतीने नागरिकांशी संवाद साधावा असे आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी केले. 

यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक मोनिदीपा मुखर्जी,  आकाशवाणी आणि दूरदर्शनचे पश्चिम विभागाचे अतिरिक्त महासंचालक  जुगल चंदिरा आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक मोनिदीपा मुखर्जी,  आकाशवाणी आणि दूरदर्शनचे पश्चिम विभागाचे अतिरिक्त महासंचालक  जुगल चंदिरा आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आपल्या मुंबई दौऱ्यात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर काल ‘हिमाचल मित्र मंडळ’ संस्थेच्या 71 व्या  स्थापना दिन सोहळ्यात सहभागी झाले. मुंबईत राहणाऱ्या हिमाचल प्रदेशच्या नागरिकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमादरम्यान त्यांनी संस्थेच्या  सन्माननीय सदस्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केले. हिमाचल मित्र मंडळ ही धर्मादाय संस्था 1952 मध्ये स्थापन झाली असून ही संस्था हिमाचल प्रदेशातील  संस्कृतीला प्रोत्साहन देणे, गरजूंना वैद्यकीय मदत, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि कर्करोग ग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मोफत निवास व्यवस्था पुरवणे इत्यादी कार्य सातत्याने करत.

रिता इंडिया फाउंडेशन तर्फे “खुशियो के पल, बच्चो के संग” कार्यक्रम उत्साहात साजरा

पुणे l बाल दिनाचे औचित्य साधत रिता इंडिया फाउंडेशन तर्फे “खुशियो के पल, बच्चो के संग” हा कार्यक्रम श्रीलोचन बालविकास केंद्र, आंबेगाव खुर्द पुणे येथील मुलांबरोबर उत्साहात साजरा करण्यात आला.

रिता इंडिया फाउंडेशन च्या अध्यक्षा डॉ. रिता शेटीया आणि त्यांच्या टीमने विविध खेळ , ॲक्टिविटी घेऊन मुलांमधील विविध गुण खेळा द्वारे दाखवण्यात आले. सर्व मुले आणि मुलींना बिस्किट्स, चॉकलेट्स आणि शालेय साहित्य वाटप संस्थेच्या विश्वस्त संस्थापिका एच.सी.डॉ . सविता शेटीया यांच्या हस्ते करण्यात आले. मुलांनी प्रत्येक ॲक्टिविटी आणि खेळात सहभाग घेऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला.

रिता इंडिया फाउंडेशन नेहमीच गर्ल वूमन आणि युथ एम्पॉवरमेंट तसेच मेडिकल इमरजन्सी साठी निधी जमवणे. कोवीड काळात कर्मचारी वर्ग, तृतीय पंथीय, दीव्यांग यांना जवळपास 1500 अन्नधान्य किट चे वितरण करण्यात आले. अश्या विविध उपक्रमांसाठी कार्य करत असते. अश्या प्रकारचे सामाजिक कार्य करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आव्हान डॉ. रिता शेटीया यांनी केले.

या कार्यक्रमास आर्थिक सहाय्य आणि मोलाची साथ दिली ती अंशुमन एज्युकेशनल वेलफेअर सोसायटी इंडिया, डॉ. मालती रॉय, वास्तू शिल्प चे डायरेक्टर मंगेश वाघमारे आणि सचिन सकपाळ , सुप्रिया सातवेकर, चित्रा पनमड, उद्धव चव्हाण, संतोष गेडाम, शोभा गायकवाड , विद्या साठे, रूतुजा कणसे, जिगीशा चावडा, रश्मी सुरे, प्राजक्ता चांदेकर, प्राची बडवे, राहुल सुतार , कमलेश पोखरणा आणि अनुजा गडगे यांनी दिली.

यावेळी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य ब्रम्हांड संस्थान सामाजिक राष्ट्रसेवा, कात्रज चे अध्यक्ष चारुहास रेडकर आणि श्रीलोचन बालविकास केंद्राचे प्रोजेक्ट कोऑर्डीनेटर नागेश पवार, निकिता कंटाले, संगीता वळवी, रेश्मा चव्हाण आणि निवेदिता माझिरे, मयुरी महाकाळकर, आकांक्षा गिरी, शिवानी बनकर, आणि सुनील कणसे यांनी केले.

महाविकास प्रणित “सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल” च्या मुख्य प्रचार कचेरीचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

पुणे-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी “सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल”च्या मुख्य निवडणूक कचेरीचा शुभारंभ आज महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजितद पवार यांच्या हस्ते तर महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत महाविकास आघाडी “सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल”च्या माध्यमातून निवडणूक लढवत असून सर्व दहा ते दहा ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने तरुण युवक व उच्च विद्याविभूषित उमेदवारांना संधी देण्यात आली असून पॅनलच्या जाहीरनाम्याचा जाहीरनामाचे प्रकाशन देखील या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की , पुणे विद्यापीठाची सिनेट निवडणूक ही राज्याच्या शैक्षणिकदृष्ट्या एक महत्त्वाची निवडणूक मानली जाते. पुणे विद्यापीठाचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा व समाजातील सर्वसामान्य बहुजन वर्गातील मुला-मुलींना तेथे उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे हीच सावित्रीबाई फुले प्रगती पॅनलची माफक अपेक्षा आहे. विद्यापीठाच्या संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे, विद्यापीठाची परीक्षा पद्धती अधिकाधिक पारदर्शक करणे, विद्यापीठाच्या अहमदनगर व नाशिक केंद्रात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे या प्रमुख मुद्द्यांसह सावित्रीबाई फुले प्रगती पॅनलचे उमेदवार ही निवडणूक लढवित असून या पॅनलमधील सर्व उमेदवार हे उच्चविद्याविभूषित असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे आहेत त्यांना आपले पसंती क्रमांक ०१ चे मत देऊन त्यांना आपले प्रश्न सिने मध्ये मांडण्याची संधी नक्की द्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, आमदार चेतन तुपे, माजी आमदार जयदेवराव गायकवाड , कमल ढोले पाटील, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, दिपाली धुमाळ,नगरसेवक रत्नप्रभा जगताप,नंदा लोणकर,सायली वांजळे, प्रदीप देशमुख,डॉक्टर सुनील जगताप,रुपाली ठोंबरे पाटील यांसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची आर. के. लक्ष्मण संग्रहालयाला भेट

पुणे, दि.१४: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज बालेवाडी येथील आर. के. लक्ष्मण संग्रहालयाला भेट दिली. आर. के. लक्ष्मण यांच्या समृद्ध कलेचा हा ठेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन श्री.पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार, आर. के. लक्ष्मण यांचे सुपुत्र श्रीनिवास लक्ष्मण, स्नुषा उषा लक्ष्मण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.पाटील यांनी स्वत: तिकीट घेऊन संग्रहालयाला भेट दिली.

संग्रहालय उत्तम पर्यटनस्थळ व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजचे आहे असे नमूद करून यावेळी श्री. पाटील म्हणाले, आर.के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांद्वारे कलेसोबत आशय स्पष्ट व्हायचा. वाचक केवळ त्यांची व्यंगचित्रे पाहण्यासाठी वृत्तपत्र घेत असत. त्यांच्या व्यंगचित्रांना, त्यांच्या आयुष्यातील प्रसंगांना एकाच ठिकाणी पाहता यावे अशी इच्छा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. त्यानुसार ही सर्व व्यंगचित्रे सर्वसामान्यांना एकाच ठिकाणी बघता यावी यासाठी संग्रहालयाची उभारणी करण्यात आली आहे.

बाल दिनानिमित्त आज विद्यार्थ्यांनी या संग्रहालयाला भेट दिली आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संग्रहालयाला भेट द्यावी, तसेच येथे शाळेतील विद्यार्थ्यांची सहल आयोजित करावी, असे आवाहन त्यांनी केले.

‘कामायनी’ तील २५० मुलांना चित्रकलेच्या साहित्यांची भेटबालदिनानिमित्त आबा बागुल मित्रपरिवाराचा उपक्रम

पुणे -ज्यांना जग काय आहे हेही माहित नाही… ज्यांचे आयुष्य केवळ स्वतःपुरते सीमित आहे. अशा विशेष मुलांच्या ‘बेरंगी दुनियेत भरू या, आनंदाचे रंग’ या उपक्रमांतर्गत माजी उपमहापौर आबा बागुल व मित्रपरिवारातर्फे २५० विशेष मुलांना चित्रकलेचे साहित्य भेट देण्यात आले.


देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त कामायनी संस्थेतील २५० विशेष मुलांना चित्रकलेचे साहित्य भेट देऊन बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे युवा नेते अमित बागुल, कामायनी संस्थेचे व्यवस्थापक कालिदास सुपाते, प्राचार्या सुजाता आंबे, मानसोपचार तज्ञ् नारायण शिंदे यांच्यासह नंदा ढावरे, सागर आरोळे, महेश ढवळे,साई कसबे,इम्तियाज तांबोळी, संतोष पवार, योगेश निकाळजे व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अमित बागुल म्हणाले, दरवर्षी आम्ही समाजातील वंचित घटकांमधील मुलामुलींसमवेत बालदिन साजरा करत असतो.विशेष करून ज्यांचे आयुष्य केवळ स्वतःपुरते सीमित आहे. अशा विशेष मुलांकडे समाजाने लक्ष द्यावे या हेतूने विविध उपक्रम राबविले जातात मात्र त्यातून ही मुलेही समाजाच्या मुख्य प्रवाहात सामिल करून घेऊ या,तेही ‘आपल्यातीलच एक’ आहेत याची जाणीव म्हणा संदेश देण्याचा आमचा उद्देश नेहमी असतो.

अशोक लेलँड तर्फे नवीन आयसीव्ही प्लॅटफॉर्म – पार्टनर सुपर सादर

0
AL_Partner_Super_Codriver_Isometric_Brown

१४ नोव्हेंबर २०२२, चेन्नई: हिंदुजा समूहाची प्रमुख कंपनी आणि भारतातील अग्रगण्य व्यावसायिक वाहन उत्पादक अशोक लेलँडने आज अनुक्रमे 9.15T, 10.25T आणि 11.28T GVW श्रेणी मध्ये 914, 1014 आणि 1114 मॉडेल्ससह “पार्टनर सुपर” हा एक नवीन आयसीव्ही प्लॅटफॉर्म सादर केला.

नव्याने सादर करण्यात आलेले प्लॅटफॉर्म ड्रायव्हरला सर्वोत्तम आराम देण्यासाठी समकालीन टिल्ट-एबल डे केबिनसह डिझाइन केले आहेत आणि त्यात सर्वोत्तम पेलोड क्षमता आहे. पार्टनर सुपर मानांकित लोड अॅप्लिकेशन्समध्ये ग्राहकांच्या गरजा पूर्ण करेल जसे की ई-कॉमर्स, बेव्हरेज, एफएमसीजी, व्हाईटगुड्स, पार्सल, फळे इत्यादी.  अधिक चांगले मायलेज देणारी वाहने त्यांना हवी असतात. हे वेगवान आहे आणि अरुंद/गर्दी असलेल्या रस्त्यांमध्ये उत्तम दळणवळणाची खात्री देते.

या प्रसंगी बोलताना अशोक लेलँडच्या MHCV चे प्रमुख श्री संजीव कुमार म्हणाले, “ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारी आणि ग्राहकांचा खर्च कमी करून सुधारणा करणारी सर्वोत्कृष्ट श्रेणीतील उत्पादने सादर करण्याची अशोक लेलँडची परंपरा आहे. पोर्टफोलिओ बळकट करण्यासाठी आणि ग्राहकांच्या सतत वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आयसीव्ही विभागामध्ये आमच्या उत्पादन योजनांचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आम्ही पार्टनर सुपर सादर केला आहे. वेगवेगळी उत्पादने सादर करून जागतिक स्तरावर आघाडीच्या १० सीव्ही प्लेयर्स मध्ये येण्याची आमची आकांक्षा प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आम्ही ही गती कायम ठेवू इच्छितो.”

पार्टनर सुपर प्लॅटफॉर्मची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे:

·         समकालीन टिल्ट-सक्षम डे केबिन

·         सर्वोत्तम श्रेणीतील पेलोड

·         सर्वोत्तम मायलेज

·         सर्वोत्तम-इन-क्लास पॉवर (104 kW (140 hp))

·         लोडिंग स्पॅन पर्याय-4.3m (14 फूट), 5.2m (17 फूट), 6.2m (20 फूट) आणि 6.8m (22 फूट)

·         प्रथम वर्ष विनामूल्य i-alert सदस्यता

·         ४ वर्षे आणि ४ लाख किमी ड्राइव्हलाइन वॉरंटी

बालकामगारीवर आधारित विचारांना चालना देणारी,  पुरस्कारविजेती शॉर्ट फिल्म ‘बैतुल्लाह’ सादर

शोषित मुलांची सुटका, पुनर्वसन आणि मुख्य प्रवाहात त्यांना नव्याने समाविष्ट करण्यास वचनबद्ध असल्याचा पुनरूच्चार

पुणे, १४ नोव्हेंबर २०२२ – आपल्यापैकी बहुतेक जण बालमजुरीकडे दुर्लक्ष करतात. बैतुल्लाह ही शॉर्ट फिल्म तुमचे नक्कीच या समस्येकडे लक्ष वेधून घेईल. शहरात चहाच्या ठेल्यावर काम करणाऱ्या बैतुल्लाह नावाच्या एका लहान मुलावर चित्रित करण्यात आलेल्या या फिल्ममधून प्रेक्षकांसाठी प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे, तो म्हणजे, ‘तुमच्यासारखं बनण्यासाठी या मुलाला काय करावं लागेल?’. फिल्ममध्ये या प्रश्नाचं उत्तर अवघड शांतता इतकंच असलं, तरी त्यातून प्रेक्षक आणि सुदैवी नागरिकांमध्ये त्यावर चर्चा घडून येईल अशी आशा आहे.

तुम्ही हा लेख वाचू शकताय, हीच गोष्ट तुम्ही सुदैवी असल्याचं दाखवून देणारी आहे. जगभरात विशेषतः भारतात लाखो मुलांचे  शोषण होते आणि बालपणीचा आनंद व हक्क त्यांच्याकडून हिरावून घेतला जातो. त्यांना वर्गाबाहेर ठेवलं जातं आणि कुटुंबासाठी रोजंदारीवर ठेवलं जातं. गरीबीमुळे, जागरूकतेच्या अभावामुळे किंवा केवळ निष्काळजी व दुर्लक्षितपणामुळे बहुतेक मुलं चपला, दागिने किंवा फटाक्यांच्या दुकाना घाम गाळत असतात आणि जगापासून लपवली जातात. मात्र, काही अगदी आपल्या समोर असतात. तुमच्या घराजवळच्या चहाच्या ठेल्यावरच्या किंवा खाद्यपदार्थांच्या दुकानात एखादा ‘छोटू’ सहज आढळून येतो.

जितेंद्र राय लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित (मेसर्स मॅथेनो फिल्म्स) या फिल्ममध्ये प्रमुख भूमिका ओम कनोजियानं केली असून त्याच्यासोबत इश्तियाक खान आणि विपिन शर्मा आहेत. या फिल्मला ८५+ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन आणि निवड झाली असून तिने २६ पुरस्कार जिंकले आहेत.

या फिल्मविषयी जितेंद्र राय म्हणाले, ‘दिग्दर्शक या नात्याने आजूबाजूच्या जगाकडे मी डोळसपणे पाहातो. आसपास दिसणाऱ्या बालमजुरीकडे मी दुर्लक्ष करू शकलो नाही. त्याचबरोबर आपण काही करू शकत नसल्याची भावनाही माझ्या मनात निर्माण झाली. दिग्दर्शक या नात्याने ही असहायता, सुस्थितीत असलेल्या इतरांकडे पाहाताना या मुलांच्या डोळ्यात दिसणारी मदतीची आस टिपण्याचे मी ठरवले.’

राय पुढे म्हणाले, ‘मुकुल माधव फाउंडेशनसारखी संस्था या क्षेत्रात करत असलेलं काम पाहून या असहायतेचं आशेत रुपांतर झालं. या फिल्मसाठी त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे.’

मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया म्हणाल्या, ‘वंचित व दुर्लक्षित मुलांसह काम करतानाच्या प्रवासात आमच्यापुढे उभा राहिलेला प्रश्न ही फिल्म मांडते. आपण आपल्या आयुष्यात ज्या गोष्टींचा सहजपणे आनंद आहे, तो या मुलांना कधी मिळणार? आम्ही त्या दिशेने हळूहळू प्रयत्न करत आहोत.’

१९९९ मध्ये स्थापन झालेले मुकुल माधव फाउंडेशन भारतातील विविध समाजांत काम करत वंचितांना आशा व सन्मान देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुलांसाठी विशेषतः शोषण, छळ आणि तस्करीमुळे पीडीत मुलांसाठी संस्था करत असलेले काम तळागाळापर्यंत पोहोचत आहे. शिक्षण, पोषण आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रात काम करत मुलांना मदत केली जात आहे. मुलांसाठी हेल्पलाइन, कौन्सेलर्स, कायदेशीर मदत मिळवून दिली जात आहे. शोषित मुलांची सुटका व पुनर्वसन करणे आणि त्यांना परत मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्याचे कामही केले जात आहे. त्याहीपेक्षा समाज अधिकाधिक बळकट केला जात आहे. पालक व तरुणांना आरोग्यसेवा, स्वच्छता, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या जात आहेत. प्रत्येकाला मान दिला जात आहे. मुले सुरक्षित राहाण्यासाठी आधी समाज आर्थिक व भावनिक पातळीवर सुरक्षित असायला हवा या तत्वासह काम केले जात आहे.