नाशिक– ‘आम्ही ब्राम्हण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे. ब्राम्हण बुद्धीजीवी आहे, त्याचा गर्व आहे. त्यामुळेच देवेंद्रजींना न मागता मुख्यमंत्रिपद मिळाले, असे विधान अमृता फडणवीस यांनी केलं आहे.नाशिकमध्ये अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे दीपावली स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत ब्राम्हण महासंघाचा दीपावली स्नेहमिलनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अमृता फडणवीस यांनी नाशिक शहराची फार स्तुती केली.
अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘नाशिकनगरीने वाईटाचा नाश केला आहे. त्यामुळे या नगरीत येऊन धन्य वाटतं. आम्ही ब्राम्हण आहोत. त्याचा आम्हाला गर्व आहे. ब्राम्हण बुद्धीजीवी आहे, त्याचा गर्व आहे. त्यामुळेच देवेंद्रजींना न मागता मुख्यमंत्रिपद मिळाले. फक्त आम्हाला मार्केटिंग करता येत नाही’.
‘भारती ताई, सीमा हिरे, देवयानी फरांदे या तीन देवी इथे आहे. देशाचा राज्याचा विचार करा. राष्ट्र प्रथम. देशाला द्यायला विचार, बुद्धी आपल्याकडे आहे. तुमचं प्रेम हाच माझ्यासाठी पुरस्कार आहे. पुढच्या वेळी दणकट कार्यक्रम करू. आपण सगळे एक आहे. तुमच्या मागण्या मान्य होतील. कोण मध्ये येतंय? मी पाहते. सबका साथ होगा, तभी विकास होगा, असेही फडणवीस म्हणाल्या.