Home Blog Page 1523

सत्या हिंदुजा, अल्केमिक सॉनिक एन्व्हॉरमेंटचे संस्थापक साउंड अज फ्रीडम डायलॉग सादर करणार

0

मुंबई२३ नोव्हेंबर – सत्या हिंदुजा – विविधगुणी कलाकारस्पॅशियल साउंड एनव्हॉरमेंट कंपोझर आणि अल्केमिक सॉनिक एन्व्हॉरमेंटच्या संस्थापक (एएसई) मानसिक स्वातंत्र्य आणि आरोग्यासाठी नव्या वाटा खुल्या करण्याविषयी संवाद साधणार असून त्यासाठी ध्वनीचा साधन म्हणून वापर करणार आहेत. त्या डॉ. जेफ्री थॉम्प्सन यांच्यासह बोलणार असून डॉ. जेफ्री सेंटर ऑफ न्यूरोअकॉस्टिर रिसर्चचे संस्थापक- संचालरब्रेनवेव एंनट्रेनमेंट तज्ज्ञकंपोझरएज्युकेटरलेखकफ्युच्यरिस्ट आहेत. त्यांच्यासोबत ब्रिटिश व्हॉइस टीचर आणि फॅमिली कॉन्स्टलेशन्स तज्ज्ञ जिल पर्सही बोलणार असून हा कार्यक्रम २३ नोव्हेंबर २०२२ एएसई (२४ नोव्हेंबर २०२२, भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे १.३० वाजता) होणार असून प्रोजेक्ट इमर्स साउंड अज फ्रीडम डायलॉग हा व्हर्च्युअल अनुभव सादर केला जाणार आहे.

या अनुभवामागचा हेतू व्यक्त करताना सत्या म्हणाल्या, ‘आपल्या श्रवण विश्वाशी भावनिक आणि कल्पकतेने जोडले जाण्यासाठी श्रवणाचा सखोल दृष्टीकोन जाणून घेणे गरजेचे आहे. साउंड ऑफ फ्रीडम आपल्याला आजूबाजूच्या हवामानासाठी सुविधा शोधण्यास आवश्यक असलेला दृष्टीकोन व आकलन मिळवून देण्यासाठी मदत करेल. त्याचबरोबर स्वास्थ्य, मानसिक आरोग्य व स्वातंत्र्यासाठी खुले अवकाश तयार करण्याच्या हेतूने विविध मार्गांना चालना देण्यासाठी मार्गदर्शन करेल.’

जगभरातील लोकांसाठी अधिक शाश्वत हवामान कसे तयार करता येईल व त्यात ध्वनी कशाप्रकारे मदत करू शकते याचा शोध सत्या सध्या घेत आहे. आपली कला आणि जागतिक व्यासपीठावर विविध कलाशाखांना एकत्र आणण्याच्या क्षमतेतून त्यांनी सखोल श्रवण कौशल्य अंतर्गत स्वास्थ्य आणि बाह्य विपुलता साध्य करणे शक्य असल्याचे वेळोवेळी दाखवून दिले आहे.

एएसईसह सत्या बहुसंवेदी, साइट स्पेसिफिक स्पॅशियल ध्वनी अनुभव तयार करतात, जे श्रोत्यांना ‘ध्वनीमध्ये विचार’ करण्यास प्रोत्साहन देतात. आजकालच्या वातावरणात बहुतेक वेळेस ताण अनुभवणाऱ्या श्रवणक्षमतेच्या प्रत्येक पैलूला चालना देण्यासाठी व त्याला शांत करण्यासाठी त्यांच्या रचनांमध्येव त्याला शांत करण्यासाठी सत्या मंत्रोच्चार, आवाज, फील्ड रेकॉर्डिंग्ज आणि विविध उपकरणे ध सत्या सध्या घेत आहे. आपली कला आणि जागति मंत्रोच्चार, आवाज, फील्ड रेकॉर्डिंग्ज आणि विविध उपकरणांचा समावेश केलेला असतो. एएसईमध्ये विज्ञान आणि कलेचा संगम साधला जातो, ज्याला सत्या ‘भारावलेले सामूहिक अचेतन’ म्हणतात. एएसईने दीपक चोप्रा फाउंडेशनह नेव्हर अलोन ग्लोबल मेंटल हेल्थ समिटसाठी भागिदारी केली होती, तेव्हा या मिशनमधील सर्वात ताकदवान मॅनिफेस्टेशन मे २०२१ रोजी घडले होते. या समिटसाठी सत्या यांनी स्पॉटलाइट इंडिया हा तीन तासांचा कार्यक्रम तयार केला होता, ज्यामध्ये त्यांनी मन- शरीर औषध आणि देशाच्या मानसिक स्वास्थ्यासाठी शाश्वत यंत्रणा उभारणीवर आधारित संवाद त्यांनी साधला होता.

मुंबई हून न्यूयॉर्क (जे एफ के), फ्रँकफर्ट आणि पॅरिस साठी विमाने वाढविली.

एअर इंडियाने भारतापासून यूएसए आणि यूरोप मधील सहा गंतव्यस्थानांपर्यंत नेटवर्क अजून मजबूत केले.

मुंबई आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणांहून नवीन विना-थांबा उड्डाणे चालू केली.

    दिल्ली हून कोपेनहेगनमिलान आणि विएन्ना साठी विमान पुन्हा चालू केले.

भारतापासून या आंतरराष्ट्रीय स्थळांपर्यंत न थांबता उड्डाण करणारी एअर इंडिया ही एकमेव विमान कंपनी आहे.

नवी दिल्ली२३ नोव्हेंबर२०२२: भारतातील आघाडीची विमान कंपनी आणि स्टार अलायन्स सदस्य एअर इंडिया ने आज मुंबई हून न्यूयॉर्क, फ्रॅंकफर्ट आणि पॅरिस ला जोडणारी नवीन उड्डाणे आणि दिल्ली हून कोपेनहेगन, मिलान आणि विएन्नाला जोडणारी विना-थांबा उड्डाण पुन्हा सुरू करून जागतिक स्तरावर विस्ताराची आणि बळकटी आणण्याची घोषणा केली.

            एयर इंडिया भाडेतत्वावर नवीन विमाने घेऊन आपल्या विमानांच्या ताफ्यात वाढ करीत असल्यामुळे आणि विद्यमान विमाने सेवेत परत सक्रिय करण्यामध्ये सतत प्रगती करत असल्याने हा विस्तार शक्य झाला आहे.

            ही नवीन मुंबई ते न्यूयॉर्क सेवा ‘जॉन एफ केनडी आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्यूयॉर्क’पर्यंत दररोज ‘बी ७७७-२०० एल आर’ एअर क्राफ्ट  वापरुन देण्यात येणार आहे आणि ही सेवा १४ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू होईल. एअर इंडियाच्या दिल्ली ते  ‘जॉन एफ केनडी आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्यूयॉर्क’पर्यंत आणि नेवार्क् लिबर्टी विमानतळासाठी चार साप्ताहिक उड्डाणे या सध्याच्या सेवेला ही नवीन सेवा पूरक असेल. यामुळे एयर इंडिया ची भारत अमेरिका फ्रिक्वेन्सी दर आठवड्याला ४७ विना-थांबा फ्लाइटस् वर जाईल.

            यूरोप साठी एअर इंडिया १ फेब्रुवारी, २०२३ पासून आठवड्यातून चार वेळा  दिल्ली-मिलान व्ही व्ही विमानसेवा आणि १८ फेब्रुवारी, २०२३ पासून दिल्ली-विएन्नाला व्ही व्ही साठी आणि १ मार्च, २०२३ पासून दिल्ली- कोपेनहेगन व्ही व्ही या दोन्ही ठिकाणांसाठी आठवड्यातून तीनदा अशी विमान सेवा चालू करणार आहे. मुंबई हून पॅरिस कडे आठवड्यातून तीनदा जाणारी नवीन विमानसेवा आणि मुंबईहून फ्रॅंकफर्टला आठवड्यातून चार वेळा जाणारी विमानसेवा पुढच्या तिमाही मध्ये चालू होईल. ही सर्व उड्डाणे एअर इंडियाच्या बी ७८७-८ ड्रीमलाइनर विमानद्वारे चालविली जातील; ज्यामध्ये १८ बिझनेस क्लास आणि २३८ इकॉनॉमी क्लास च्या सीटस् असतील.

            ही उड्डाणे पुन्हा चालू केल्यामुळे, एअर इंडिया यूरोप मधील सात शहरांना ७९ साप्ताहिक विना-थांबा फ्लाइटस सह; ४८ यूनायटेड किंगडम ला आणि ३१ यूरोप खंडाला,  सेवा देईल.

            या विस्तारावर भाष्य करताना एअर इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी( सी इ ओ) आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. कॅम्पबेल विल्सन म्हणाले की, “आमच्या पंचवार्षिक परिवर्तन योजनेचा म्हणजे ‘विहान, ए आय’ चा एक महत्वाचा घटक म्हणजे भारताचे जागतिक नेटवर्क मजबूत करणे आणि भारतातील प्रमुख शहरांना आणखी जास्त गंतव्य स्थानांशी जोडणे हे आहे. न्यूयॉर्क, मिलान, कोपेनहेगन, विएन्ना, फ्रॅंकफर्ट आणि पॅरिस येथे नवीन विना-थांबा विमान चालू करणे हे आमच्या या प्रवासातील एक पुढचे पाऊल आहे, जे आमच्या विमानांचा ताफा  जसजसा वाढत जाईल तसतसे अजून वेगाने वाढेल. आम्ही पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना आपले एअर इंडिया चे भारतीय आदरातिथ्य देण्यासाठी उत्सुक आहोत.”

या नवीन विमानांची, पॅरिस आणि फ्रॅंकफर्ट सोडून, तिकीट विक्री चालू झाली आहे. पॅरिस आणि फ्रॅंकफर्ट चे वेळापत्रक आणि तिकीट विक्री सुरू होण्याची तारीख वेगळी जाहीर होईल.

तिकीट बूक करण्यासाठी कृपया www.airindia.in पहा किंवा आपल्या ट्रॅव्हल एजेंट किंवा एयर इंडियाच्या कार्यालयात संपर्क करा.

Flight Schedules

Mumbai – New York (JFK) Schedule from February 14, 2023
Flight NoDept ArpDept TimeArvl ArpArrv TimeTypeFrequency
AI 0119BOM00:55JFK06:55B777-200LRDaily
AI 0116JFK10:55BOM11:35 + 1B777-200LRDaily
Delhi – Milan (MXP) Schedule from February 1, 2023
Flight NoDept ArpDept TimeArvl ArpArrv TimeTypeFrequency
AI 0137DEL14:20MXP18:30B787-84x weekly
AI 0138MXP20:00DEL08:00 + 1B787-84x weekly
Delhi – Vienna Schedule from February 18, 2023
Flight NoDept ArpDept TimeArvl ArpArrv TimeTypeFrequency
AI 0153DEL14:35VIE18:45B787-83x weekly
AI 0154VIE20:15DEL08:05 + 1B787-83x weekly
Delhi – Copenhagen Schedule from March 1, 2023
Flight NoDept ArpDept TimeArvl ArpArrv TimeTypeFrequency
AI 0157DEL13:30CPH17:50B787-83x weekly
AI 0158CPH19:50DEL07:40 + 1B787-83x weekly

वीस वर्षांपूर्वी बंद पडलेले कारखाने बाहेर चाललेत असे सांगून जनतेची दिशाभूल होतेय : महावितरणच्या पाठकांचा दावा

0

 पुणे दि. २३ नोव्हेंबर २०२२ सर्वाधिक वीजदरामुळे राज्यातील पोलाद कारखान्यांनी परराज्यात स्थलांतर केले असा दावा करताना काल ज्या कारखान्यांचा उल्लेख केला त्यांचे काम आठ ते तेवीस वर्षांपूर्वीच बंद झाले आहे. वीस वर्षांपूर्वी राज्यात बंद झालेल्या कारखान्यांच्या नावांचा वापर करून जनतेची दिशाभूल करणे निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी बुधवारी व्यक्त केली. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशने सावध रहावे आणि खोटे पसरविणाऱ्या व्यक्तींना आपला प्रतिष्ठीत मंच वापरू देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

ते म्हणाले की, नागपूरमधील पत्रकार परिषदेच्या वृत्तात ज्या कंपन्यांच्या नावांचा उल्लेख केला आहे त्यांची महावितरणच्या रेकॉर्डमध्ये पडताळणी केली असता गणपती अलॉय अँड स्टील प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा वीजपुरवठा फेब्रुवारी २००२ मध्ये बंद झाला आहे. अर्थात त्या कारखान्याचे काम त्यावेळी बंद झाले. अशा प्रकारे बाबा मुंगिपा स्टील इंडस्ट्री या कारखान्याचा वीज पुरवठा जानेवारी २०१३ मध्ये बंद झाला आहे. ज्या कंपन्यांच्या नावांचा उल्लेख झाला त्या कंपन्यांचा महावितरणकडील वीजपुरवठा १९९९, २००२, २००३, २००६ साली बंद झाला आहे अर्थात त्या कारखान्यांचे राज्यातील काम त्यावेळी बंद झाले. या कंपन्यांकडे सव्वीस लाख ते पावणे तीन कोटी रुपयांचे बिलही थकीत आहे. अशा कारखान्यांच्या नावांचा हवाला देऊन स्टील इंडस्ट्री आता राज्याबाहेर चालली असा आभास निर्माण करणे चुकीचे आहे. के. सी. फेरो अँड रिरोलिंग मिल्स प्रायव्हेट लिमिटेडचे काम मात्र महाविकास आघाडी सरकार असताना ऑक्टोबर २०२१ मध्ये बंद झाले हे खरे आहे.

राज्यातील कंपन्यांच्या सध्याच्या कामाबद्दलही दिशाभूल करण्यात आली आहे. राज्यात उद्योग बंद पडण्याच्या ऐवजी अधिक गतीने चालत आहेत, असे वीजवापरावरून दिसते. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या २०२१ – २२ या आर्थिक वर्षात राज्यात ४,५३,४३८ औद्योगिक ग्राहक होते व त्यांनी ५०,५६३ दशलक्ष युनिट इतकी वीज वापरली होती. मार्चनंतर गेल्या सहा महिन्यात औद्योगिक ग्राहकांची संख्या दोन हजारने वाढून ४,५५,२७१ झाली असून त्यांनी सप्टेंबर अखेर सहा महिन्यात २७,७१२ दशलक्ष युनिट इतकी वीज वापरली आहे. आधीच्या वर्षभरातील वीज वापराच्या ५४ टक्के वापर सहा महिन्यात झाला आहे. उद्योग बंद पडत असते तर वीजवापर कसा वाढला असता, हा प्रश्न आहे. यामध्ये विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे सहापैकी तीन महिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आहे.

वीज दराबाबतही लोकांची दिशाभूल करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील औद्योगिक ग्राहकांचा सरासरी दर प्रति युनिट ८ रुपये ४८ पैसे असा दिसत असला तरी औद्योगिक ग्राहकांना मिळणाऱ्या विविध सवलतींचा लाभ घेतल्यास प्रत्यक्षात हा दर सरासरी ५ रुपये प्रतियुनिट इतका पडतो. तसेच विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र तसेच डी व डी प्लस क्षेत्रातील उद्योगांना चालना देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने २०१६ सुरू केलेल्या योजनेमुळे उद्योगांना आणखी सवलत मिळते. त्यासाठी सरकार दरवर्षी बाराशे कोटींचा बोजा सोसते.

नागरिकांनी व उद्योजकांनी वस्तुस्थितीची नोंद घ्यावी आणि वैयक्तिक हितसंबंधांसाठी दिशाभूल करण्याच्या कोणाच्या प्रयत्नांना बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले.

राज्य सरकारकडून पॅकेज्ड स्कीम इनसेन्टिव्ह नावाचा लाभ दिला दिला जातो. तो मिळण्यासाठी उद्योजकांनी पंधरा वर्षे उद्योग चालविणे अपेक्षित आहे. त्यापूर्वी आधी उद्योग बंद केला तर घेतलेला लाभ व्याजासकट परत करावा लागतो. अशा उद्योजकांकडून वसुलीसाठी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनने आवाहन करावे आणि सरकारला मदत करावी, असेही ते म्हणाले.

आघाडीचा दारुण पराभव ही पुणे मनपातील भाजपा च्या भावी यशाची नांदी – संदीप खर्डेकर.

पुणे-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट च्या निवडणुकीत 10 पैकी 9 जागा जिंकून विद्यापीठ विकास मंच ने दणदणीत विजय मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी ह्या निवडणुकीत आपले पॅनल उतरविले होते. अनेक ठिकाणी निवडणूक कार्यालयांचे उदघाट्न करून राष्ट्रवादी च्या नेत्यांनी विजयाच्या वलग्ना केल्या होत्या. विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनीही निवडणुकीत जातीने लक्ष घातले होते. मात्र त्यांच्या पॅनल चा दारुण पराभव हा पुणे मनपा निवडणुकीत भाजपा ला मिळणाऱ्या यशाची नांदी असून महाविकास आघाडीने मतदारांचा कौल लक्षात घ्यावा अशी प्रतिक्रिया भाजपा चे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी दिली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळालेले यश, भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत खा. धनंजय महाडिक यांनी मिळविलेले यश आणि आता पुणे विद्यापीठ सिनेट च्या निवडणुकीत मिळालेले यश हे आघाडीला महाराष्ट्राच्या जनतेने सपशेल नाकारल्याचे निदर्शक असून यातून बोध घेऊन राष्ट्रवादी च्या पुण्यातील नेत्यांनी अश्लाघ्य टीका करायचे थांबवावे असे आवाहन ही संदीप खर्डेकर यांनी केले आहे. सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना येणाऱ्या काळात पुणे विद्यापीठ अधिक प्रगती करेल व पारदर्शी कारभाराचा आदर्श निर्माण करेल असा विश्वास ही श्री. खर्डेकर यांनी व्यक्त केला आहे.

संपत्तीपेक्षा पुण्यप्राप्तीसाठी आपण प्रयत्न करायला हवा-कीर्तनकार ह.भ.प. रवींद्रबुवा चिखलीकर

श्री रामजी संस्थान तुळशीबागतर्फे उत्पत्ति एकादशीनिमित्त कीर्तन
पुणे : संत सांगतात, दान देताना निरपेक्ष भावनेने द्या. जीवनात संपत्ती कमी मिळवा. मानवी देह तुम्हाला पुण्यप्राप्तीसाठीच मिळालेला आहे, त्यामुळे ते पुण्य मिळविण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा, असे मत कीर्तनकार ह.भ.प. रवींद्रबुवा चिखलीकर यांनी व्यक्त केले.              
श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग राम मंदिरात उत्पत्ति एकादशीनिमित्त मंदिरात कीर्तनाचे आयोजन करण्यात आले.  यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. 
ह.भ.प. रवींद्रबुवा चिखलीकर म्हणाले, देह जाईल रे बा जाईल रे… पुण्य काम येईल रे… पुण्य मिळविण्याचे साधन म्हणजे आपले दोन हात आहेत. आपण समाजचे देणे लागतो म्हणून दान धर्म केला पाहिजे.  परंतु त्या देण्यामागची भावना कशी आहे याला महत्त्व आहे. 
ते पुढे म्हणाले, आपल्याच विश्वात जो गुरफटून रमतो त्याला संत मूर्ख म्हणतात. जोपर्यंत आहे तुमचा देह आहे, तुम्ही ऐश्वयार्संपन्न आहात, तोपर्यंत तुम्हाला मान सन्मान आहे. परंतु तुमच्या मृत्यू पश्चात देखील तुम्हाला तो मान मिळाला पाहिजे असे पुण्याचे काम करायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

‘अमृत महाआवास अभियान 2022-23’मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 24 नोव्हेंबरला मुंबईत राज्यस्तरीय शुभारंभ

0

मुंबई, दि. 23 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर, 2022 रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनापासून ते 31 मार्च 2023 या कालावधीत ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ व महाआवास अभियान पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 24 नोव्हेंबर, 2022 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर ऑडिटोरिअम, मुंबई येथे दुपारी 3 वाजता होणार आहे. राज्यात राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ या अभियानामुळे 5 लाख गरीब, गरजू, बेघर व भूमिहीन लाभार्थ्यांचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

‘सर्वांसाठी घरे-2024’ या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची गतीने प्रभावी अंमलबजावणी करणे व कामात गुणवत्ता आणणे हा या अभियानाचा हेतू आहे. या अभियान कालावधीत 1) भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे, 2) घरकुलांना उद्दिष्टांप्रमाणे 100 टक्के मंजूरी देणे, 3) मंजूर घरकुलांना सर्व हप्ते वेळेत वितरीत करणे, 4) सर्व मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे, 5) प्रलंबित घरकुले (Delayed Houses) पूर्ण करणे, 6) ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे, 7) इंदिरा आवास योजनेंतर्गत उर्वरित सर्व घरकुले पूर्ण करणे व क्षेत्र अधिकारी ॲप वापरणे, 8) सामाजिक लेखापरीक्षण वेळेत करणे, 9) शासकीय योजनांशी कृतीसंगम (Convergence) करणे आणि 10) नावीन्यपूर्ण उपक्रम (Innovations / Best Practices) राबविणे, असे 10 उपक्रम राबविण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंत्री श्री. महाजन यांनी केले.

या कार्यक्रमाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ग्राम विकास व पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ. राजाराम दिघे तसेच राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व पुरस्कारार्थी उपस्थित राहणार असल्याची माहितीही मंत्री श्री. महाजन यांनी दिली.

रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्याचे आवाहन

पुणे,दि. २३ : नैसर्गिक आपत्ती, किडी व रोगांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्याला विमा संरक्षण देणे आणि नुकसानीच्या परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवण्यात येते. रब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक आहे. खातेदाराव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत सर्व पीकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे. योजनेअंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी ज्वारी बागायत व जिराईत या पीकांसाठी अंतिम मुदत ३० नाव्हेंबर आहे. बागायत ज्वारीसाठी प्रतिहेक्टरी विमा संरक्षित रक्कम ३३ हजार रुपये, जिराईत ज्वारीसाठी विमा संरक्षित रक्कम ३१ हजार आहे. बागायत गहू पीकासाठी विमा संरक्षित रक्कम ३८ हजार रुपये, हरभरा पीकासाठी विमा संरक्षित रक्कम ३५ हजार रुपये, रब्बी कांदा पीकासाठी विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये असून या तिन्ही पिकांसाठी १५ डिसेंबर पर्यंत विमा हत्पा भरुन सहभागी होता येणार आहे. उन्हाळी भूईमुग पीकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टरी ४० हजार रुपये असून ३१ मार्च २०२३ पर्यंत सहभागी होता येणार आहे.

शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी विमा कंपनी आय.सी.आय.सी.आय. जनरल लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, पुणे टोल फ्री क्रमांक १८००१०३७७१२, customersupportba@icicilombard.com या इमेल पत्त्यावर तसेच नजीकची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँकेची शाखा, विविध कार्यकारी सहकारी संस्था, कृषि विभागाचे कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, पुणे, खेड, बारामतीचे उपविभागीय कृषि अधिकारी, जवळचे नागरीक सुविधा केंद्र, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय आदींशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुभाष काटकर यांनी केले आहे.
0000

अग्नीवर भरती प्रकियेचा निकाल घोषित

पुणे, दि. २३ : भारतीय लष्करामध्ये अग्नीपथ योजनेंतर्गत अग्नीवर भरतीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पार पडलेल्या ‘अग्नीवीर भरती’ मेळाव्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे निकालअग्नीवर भरती प्रकियेचा निकाल घोषितhttps://joinindianarmy.nic.inया संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून उमेदवारांनी पुणे क्षेत्रीय भरती कार्यालयात २६ नोव्हेंबर पर्यंत हजर होऊन कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अग्नीवीर जनरल ड्युटी, अग्नीवीर टेक्निकल, अग्नीवीर क्लर्क/स्टोअरकीपर आणि अग्नीवीर ट्रेड्समन या पदांसाठी २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ दरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडली. या भरती मेळाव्यामध्ये पुण्यासह अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांनी सहभाग घेतला होता, अशी माहिती भरती क्षेत्रीय कार्यालय पुणेचे संचालक मनिष कर्की यांनी दिली आहे.
000

पुणे विद्यापीठ सिनेट निवडणूक:10 जागांपैकी 9 जागांवर भाजप प्रणित मंचचे उमेदवार विजयी

बाप्पू मानकर यांच्या भाजयुमो टीमचे राजेश पांडेंनी केले विशेष कौतुक

पुणे-क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत भाजप-शिंदे गटाने महाविकास आघाडीपुरस्कृत पॅनलचा धुव्वा उडवला आहे. विद्यापीठाच्या अधिसभा नोंदणीकृत पदवीधर गटाच्या निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचने सावित्रीबाई फुले प्रगती पॅनलचा पराभव केला आहे. 10 जागांपैकी 9 जागांवर विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार निवडणून आले आहेत. तब्बल 20 तास ही मतमोजणी चालली.

राज्यात सत्ताबदल होताच छोट्या निवडणुकांमध्येही भाजप महाविकास आघाडीला धक्का देत आहे. पुणे विद्यापीठाच्या अधिसभा नोंदणीकृत पदवीधर गटाच्या निवडणुकीच्या 10 जागांसाठी रविवारी मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजनी ही मंगळवारी विद्यापीठातील सभागृहात सकाळी 8 वाजता सुरू झाली. ही मतमोजणी बुधवारी पहाटे पर्यन्त सुरू होती. तब्बल 20 ते 21 तास देखील भाजप पक्षप्रणित विद्यापीठ विकास मंचाने निर्विवाद वर्चस्व मिळवत. महाविकास आघाडीला धक्का दिला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचचे विजयी उमेदवार प्रसेनजीत फडणवीस (खुला प्रवर्ग), सागर वैद्य (खुला प्रवर्ग), दादासाहेब शिनलकर (खुला प्रवर्ग), युवराज नरवडे (खुला प्रवर्ग), बागेश्री मंठाळकर (महिला प्रवर्ग), राहुल पाखरे (एस.सी.प्रवर्ग), गणपत नांगरे (एस.टी.प्रवर्ग), विजय सोनवणे (एन.टी.प्रवर्ग) आणि सचिन गोरडे (ओबीसी प्रवर्ग)

विद्यापीठ विकास मंचाचे समन्वयक राजेश पांडे म्हणाले कि,’ जगातील नामांकित अशा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कारभार ही फार मोठी जबाबदारी आहे. भविष्यातील पिढी घडविण्याची ही जबाबदारी म्हणजे राष्ट्र घडविण्याची जबाबदारी होय. अशी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडण्यासाठी आणि विद्यापीठाचा लौकिक वाढविण्याचे कार्य करण्यासाठी सर्व विजयी सदस्यांना शुभेच्छा !!विद्यापीठ विकास मंच पहिल्यांदाच ताकदीने अधिसभेच्या निवडणूक रिंगणात उतरला होता. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये कोणाशी ना कोणाशी मंचची युती असायची. यंदाची निवडणूक फक्त आणि फक्त मंचच्या सदस्यांनी ताकदीने लढविली. आम्ही हे धाडस करू शकलो यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली ती आमच्या अभाविपच्या कार्यकर्त्यांनी. त्यांनी सर्वांनी राष्ट्र निर्मितीच्या विचारांप्रती निष्ठा ठेवून आग्रहाने पूर्व नियोजन करून निवडणुकीत अचूक नियोजन अमलात आणून ही जबाबदारी सांभाळली. त्यांना भाजप शहर पदाधिकारी, नगरसेवक यांनी सहकार्य केलं. यात विशेष उल्लेख करावा वाटतो तो राघवेंद्र मानकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चाच्या सहकाऱ्यांनी जे बळ दिलं. या सगळ्या ‘टीम वर्क’मुळे विजयाचा मार्ग सुकर झाला.शिक्षण क्षेत्रात तळमळीने काम करू इच्छिणाऱ्या मंचच्या सदस्यांना शिक्षणाविषयी आस्था असलेल्या प्रत्येक घटकाने खंबीर साथ दिली. त्यामुळेच प्राचार्य, संस्थाचालक, पदवीधर अशा तिन्ही ठिकाणी अधिसभेवर विद्यापीठ विकास मंचचा प्रभाव यंदाच्या निकालातून दिसतो आहे. मंचचे एक-दोन प्रतिनिधी अधिसभेवर निवडून यायचे, हा इतिहास काही जुना नाही. गेल्या पाच वर्षांत मंचचे काम विस्तारले. मंचमधून निवडून आलेल्या प्रतिनिधींनी प्रभावी काम केले. शिक्षण क्षेत्रात विद्यापीठ विकास मंचचे नाव चर्चेत आले. त्यामुळेच, आजच्या अधिसभेच्या निवडणुकीनंतर मंचची वाढलेली ताकद प्रेरणा देणारी आहे. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्याच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे राहतो, हा संदेश निकालाद्वारे मतदारांनी दिला आहे. हा संदेश माझी आणि मंचच्या विजयी सदस्यांची उमेद वाढवणारा आहे.या विजयाचे खरे शिल्पकार मंचाचे सर्व मान्यवर, आवाहक डॉ.गजानन एकबोटे, डॉ.राजेंद्र विखे पाटील, डॉ.अपूर्व हिरे, डॉ.सोमनाथ पाटील, अॅड.नितीन ठाकरे, अॅड.एस.के.जैन, डॉ. सुधाकर जाधवर, श्री.बेबीलालजी संचेती, श्री.अजितभाऊ सुराणा, श्री.दिलीप बेलगांवकर, श्री.बापू येवला, श्री.हेमंत धात्रक, श्री.पंढरीनाथ थोरे, श्रीमती हेमलताताई बिडकर, डॉ.संदीप कदम, प्रा.एन.डी.पाटील, श्री.अनिल ठोंबरे, डॉ.प्रशांत साठे, संतोष ढोरे ल, राघवेंद्र बापू मानकर यांच्यासह अनेक मित्र आणि सहकारी वर्ग तसेच विविध संस्थांचे प्राध्यापक आणि इतर कर्मचारी बांधव हे आहेत. ह्या सर्व निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले. तसेच प्रसारमाध्यमांनी देखील आमची भूमिका अतिशय योग्य पद्धतीने मतदार आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचविली. ज्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असे मतदार बंधु-भगिनी, निवडणुक अधिकारी आणि कर्मचारी तसेच ज्ञात-अज्ञात सर्व हितचिंतक या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.

विक्रम गोखले मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल

पुणे-मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विक्रम गोखले यांची महत्त्वाची भूमिका असलेला गोदावरी हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्यांच्यासह जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे हे कलाकार दिसले. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या चित्रीकरणाआधी विक्रम गोखले रुग्णालयात दाखल होते. रुग्णालयातून सुटी मिळताच त्यांनी गोदावरी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली होती. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकाची पावती मिळाला आहे.

अलीकडेच ते छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत दिसले होते. विक्रम गोखलेंनी मालिकेत गुरु पंडित मुकूल नारायण यांचे पात्र साकारले होते. यापूर्वी अग्निहोत्री मालिकेत विक्रम गोखलेंनी मोरेश्वर गोखलेंचे पात्र साकारले होते. अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर ते या मालिकेत दिसले होते.

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून विक्रम गोखले यांनी काम केले आहे. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला होता.

विक्रम गोखले यांना घरातून अभिनयाचा वारसा मिळाला आहे. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या अभिनेत्री होत्या. तर त्यांच्या आजी कमलाबाई गोखले पुर्वीच्या कमलाबाई कामत या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. 1913 मध्ये दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ‘मोहिनी भस्मासुर’ नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका साकारली होती. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी 71 हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत.

दिवाळी अंक हे मराठी भाषेचं लेणं – विश्वास पाटील

0

नवी दिल्ली : मराठी साहित्याची परंपरा मोठी असून यामध्ये  दिवाळी अंक मराठी भाषेचं लेणं ठरले आहे.  याचा सुगंध राजधानीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून केले जात असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी काढले. 

            महाराष्ट्र परिचय केंद्रातील ग्रंथालयात ‘दिवाळी अंक प्रदर्शना’चे उद्घाटन कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री. पाटील यांचे स्वागत शाल, रोपटे आणि दिवाळी विशेषांकाचा संच भेट देऊन  केले.  यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर-कांबळे, ग्रंथपाल रामेश्वर बरडे तसेच परिचय केंद्राचे कर्मचारी यांच्यासह कॅनडा राजदूत कार्यालयाच्या वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी तथा लेखिका अर्चना मिरजकर उपस्थित होत्या.

            श्री. पाटील म्हणाले, मराठी वाचक चोखंदळ असून तो अस्सल, दर्जेदार वाचन साहित्याला मान देतो. या वाचनाला दिवाळी विशेषांकांची जोड हा वाचकांसाठी तसेच लेखकांसाठी विशेष देणे आहे. दिवाळी विशेषांक हा कैवल्याचा आनंद देत असून या माध्यमातून लेखक, चित्रकार, पत्रकार घडत असतात. दिवाळी विशेषांकांची परंपरा ही दुर्गा पूजानिमित्त बंगालमध्ये सुरू झाली. ती मराठी लेखकांनी दिवाळीनिमित्त शंभर- सव्वाशे वर्षापूर्वी सुरू केली. आज ही परंपरा मराठी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनून अधिक वृद्धिंगत होत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

            परिचय केंद्र दिवाळी अंकांचे विशेष प्रदर्शन राजधानी दिल्लीत आयोजित करीत असल्यामुळे येथील मराठी वाचकांसाठी, पत्रकारांसाठी, संसद सदस्यांसाठी ही पर्वणी ठरत असल्याचे श्री. पाटील  म्हणाले.

            विश्वास पाटील हे सिद्धहस्त कादंबरीकार असून ते भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी होते. पानिपत, झाडाझडती, संभाजी, महानायक अशा सरस, वाचनप्रिय ऐतिहासिक तसेच सामाजिक भान असणाऱ्या कादंबऱ्यांचे लेखन त्यांनी केलेले आहे. त्यांच्या कादंबऱ्या अनेक भाषेत अनुवादित झालेल्या आहेत. झाडाझडती या कांदबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. आजच्या कार्यक्रमात त्यांनी पानीपत कादंबरी लिहितांना दिल्ली, हरियाणा आणि आसपासच्या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक खाणाखुणांच्या आठवणींना  उजाळा दिला.

            श्री. पाटील लिखित  ‘शिवाजी महासम्राट कांदबरी’चा  पहिला खंड  इंग्रजीमध्ये वेस्टलँड प्रकाशनाने  मंगळवारी प्रकाशित केला.

आजपासून ‘दिवाळी अंक’ प्रदर्शन वाचकांसाठी खुले

            महाराष्ट्र परिचय केंद्राच्या दिवाळी अंक प्रदर्शनात विविध विषयांवरील नामांकित प्रकाशकांसह नवोदित प्रकाशकांचे 90 च्या वर दिवाळी अंक मांडण्यात आलेले आहेत. यामध्ये थिंक पॉझिटिव्ह,  महाराष्ट्राची जत्रा, किशोर, कालनिर्णय, दिवाळी आवाज, मिळून साऱ्याजणी, तारांगण, माहेर, मार्मिक, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सामना, लोकप्रभा, मिडिया वॉच, लोकमत दीपोत्सव, चपराक, उत्तम अनुवाद, गोंदण, शब्दगांधार, प्रतिबिंब, कथाश्री, अनघा, किल्ला, अक्षरभेट, अलका, ऋतुरंग असे एकापेक्षा एक सरस वाचनीय दिवाळी अंक परिचय केंद्रात वाचकांसाठी उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन आजपासून ग्रंथालय सदस्यांसाठी खुले आहे.  हे प्रदर्शन पुढील काही दिवस सुरू राहील.

दंगलसदृश परिस्थिती निर्माण करण्यासाठी चिथावणी:राज्यपालांवर फौजदारी कारवाई हवी,उच्च न्यायालयात याचिका

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, जोतिबा फुले यांचा अवमान करून महाराष्ट्रात दंगलीसदृश परिस्थिती निर्माण करण्यासाठी चिथावणी देणाऱ्या राज्यपालांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतून करण्यात आली आहे. कोश्यारी यांच्यावर माहभियोगाची कारवाई करण्यात यावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे. दीपक जगदेव यांनी कोश्यारींविरोधीत ही याचिका दाखल केली आहे.वकील नितीन सातपुतेंच्या माध्यमातून जगदेव यांनी ही याचिका दाखल केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात आता थेट न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. कोश्यारींविरोधात महाभियोग चालवण्यात यावा अशी मागणी याचिकाकार्त्याने केली आहे. या याचिकेमध्ये राज्यपालांनी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होईल अशी विधान केल्याचाही दावा करण्यात आला आहे.भारतीय राज्यघटनेनुसार, उच्च न्यायालयाने पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना करावी आणि अनुच्छेद ६१ आणि १५६ अन्वये राज्यपालांना हटवण्याचा निर्णय लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्य विधानमंडलाच्या अध्यक्षांना घ्यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमधून राज्यपाल कोश्यारी देशातील शांतता, सुरक्षा आणि एकतेला बाधा ठरत असल्याचं या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सिद्ध झालं तर त्याच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव सादर करण्यात यावा. ते कधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतात तर कधी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंबद्दल वादग्रस्त विधानं करतात. त्यामुळे त्यांना राज्यपाल पदावरुन हटवण्यात यावं अशी मागणी जगदेव यांनी केली आहे.

महापालिका निवडणुका ढकलाढकलीचे उच्चस्तरीय राजकारण लोकशाहीला धोकादायक

पुणे- गेल्या नोव्हेंबर २०२१ मध्ये जाहीर व्हायला पाहिजे होत्या त्या महापालिका निवडणुका १ वर्षे झाली तरी पुढे ढकलाढकलीचे राजकारण राज्यसरकार आणि आयोगाच्या स्तरावरून संगनमताने होत आहे काय ? अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.कोरोनाचे निमित्त मिळाले आणि पुढे मग सुरु झाले ढकलाढकलीचे राजकारण, महापालिका बरखास्त झाल्यावर ६ महिन्याच्या वर प्रशासक राजवट ठेवू नये असे कायदेशीर संकेत असताना,आरक्षणाचे मुद्दे,प्रभाग रचनेचे मुद्दे पुढे आणून न्यायालयात त्याबाबत प्रकरणे टाकून पद्धतशीरपणे महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत असे भासू लागले आहे.महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याचे कारणे काहीही देण्यात येत असली तरी या माध्यमातून मुंबई, पुणे,पिंपरी अशा बिग बजेट महापालिकांचा कारभार आता प्रशासकाच्या मार्फत राज्य सरकारेच हाकीत असल्याचे दिसून आले आहे. या वर्षभराच्या काळात काही हजार कोटीची कामे महापालिकेच्या पातळीवरून केली गेलीत या सर्वांना ज्या त्या महापालिकेचे प्रशासक जबाबदार धरले जातील.पण त्यांच्याकरवी काम राज्य सरकारच्याच पातळीवरून केलेले असेल हे लोकांच्या लक्षात येणार नाही असे काही होणार नाही.पुणे,पिंपरी सोडा पण काही ठिकाणी २ वर्षे झालीत तरी प्रशासकीय राजवटी हटलेल्या नाहीत हे उल्लेखनीय आहे.स्थानिक नागरिक, मतदार यांना डावलून अशा पद्धतीने काही काळ कारभार हाकता येतो हे कोरोनाचे कारण घेऊन पुढे ढकललेल्या निवडणुकांच्या राजकारणाने स्पष्ट केले आहे.आणि हे कशासाठी ? या प्रश्नाची उत्तरे शोधण्यापत कुणी दुधखुळे राहिलेले नसावे.

प्रभाग रचना कुणाच्या हितासाठी ? नागरिकांच्या कि राजकीय पक्षांच्या ?

मुंबई महापालिका सिंगल वार्ड पद्धतीने निवडणुका घेत आली आहे आणि घेणार आहे.मात्र राज्यातील अन्य महापालिकांमध्ये गेली काही वर्षांपासून प्रभाग पद्धतीने निवडणुका घेतल्या जात आहेत.मग प्रभाग २ चा कि ३ चा कि ४ सदस्यांचा यावर खलबते आणि त्यांच्या सोडती काढल्या जातात. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी,शिवसेना आणि कॉंग्रेस असे तीन पक्ष होते,या सरकारने ३ सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने रचना केली होती आता ती बदलून फडणवीस -शिंदे सरकरने ४ सदस्यांचा प्रभाग करण्याचे आदेश दिला आहे.नेमकी हि प्रभाग रचना वेगवेगळ्या पक्षांना वेगवेगळ्या पद्धतीने का हवी असते ? फडणवीस आणि शिंदे सरकार ला ४ सदस्यीय प्रभाग रचना का हवी आहे ?यामागे जनतेचे किंवा मतदारांचे कोणते हित जडलेले आहे ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.नागरिकांना प्रभाग रचना सोयीची वाटते कि सिंगल वार्ड रचना सोयीची वाटते ? यावर अनेक नागरिक उघडपणे सांगतात आम्हाला आमचा वार्ड आणि १ नगरसेवक असला किं त्याच्यापुढे हक्काने कामे करवून घेण्यास जाता येते.मग तो कोणत्याही पक्षाचा असो,आपली मतदार शक्ती वाढविण्यासाठी प्रत्येकाला जुमानतो आणि जबाबदारही राहतो.पण प्रभाग पद्धती आली कि ३ किंवा ४ नगरसेवकांना निवडून द्यायचे म्हटल्यास एका मतदाराने ४ मते द्यायची इथूनच सारा घोटाळा सुरु होतो,एक मतदार एक प्रतिनिधी निवडून देण्याच्या वैचारिकतेला छेद दिला जातो.अशा ठिकाणी प्रभागात उमेदवार देताना राजकीय पक्ष मोठ्या राजकीय खेळी खेळतात त्यापुढे मतदार हतबल होतो.एक हुशार अनुभवी चेहरा देऊन अन्य उमेदवार मात्र पेरले जातात,कुणाचे काय स्वार्थ असतात कि नसतात तेच जाणोत.पण ५ वर्षे मतदारांचा फुटबॉल मात्र या चार नगरसेवकांकडून होतो, त्यामुळे नागरिक १ वार्ड १ नगरसेवक पद्धतीलाच प्राधान्य देतात हे माहिती असूनही राजकीय पक्ष का त्यांच्यावर प्रभाग पद्धती लादत आहेत हेच अनेकांना उमजत नाही. त्यामुळे आता निवडणुका झाल्या तर मोठ्या संख्येने नोटा (एक हि उमेदवार पसंत नाही ) अशा मतात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

12 चौक सुशोभीकरण करण्याचे आदेश, एकूण 43 प्रस्ताव

पुणे-पुढील वर्षी जानेवारी 2023 मध्ये पुण्यात जगातील आर्थिक विकसित देशांची जी 20 परिषद होणार आहे. या परिषदेसाठी शहरातील प्रमुख 60 चौकांचे सुशोभिकरण खासगी सहभागातून करण्यात येणार असून त्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र शहर सौंदर्यीकरण कक्ष स्थापन केला आहे.सदर कक्षामार्फत एक खिडकी योजने अंतर्गत BOT प्रस्तावाला मंजुरी देण्यात येत आहे. आत्ता पर्यंत 43 चौकांचे प्रस्ताव दाखल झालेले आहेत. छाननी करून 12 चौकांचे प्रस्तावांना मंजुरी देण्यात आलेलीआहे.महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या हस्ते मंगळवारी हे मान्यतांचे प्रस्ताव संबधित संस्थाच्या प्रतिनिधींना देण्यात आले आहेत. बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सुधीर कदम त्यामुळे, या 12 ठिकाणी तातडीनं काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ज्याच्या हाती सत्ता तोच…पुन्हा प्रभाग रचनेचा गोंधळ

0

कुणाची स्वकर्तृत्वाने सिंगल वॉर्ड प्रमाणे नाहीच, 3 सदस्यीय प्रभागात देखील लढण्याची हिंमत नाही.

नागरिक म्हणतात 3/4 नगरसेवक कशाला आम्हाला हवा एकच जबाबदार स्वकर्तृत्वान लोकप्रतिनिधी

जे निवडून येऊ शकत नाहीत अशांना माळा घालण्यासाठी प्रभाग रचनेचा गोंधळ

पुणे-राज्याच्या नगरविकास विभागाने मंगळवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी महानगरपालिकांच्या प्रभागांची संख्या आणि प्रभाग रचनेचा प्रारूप तातडीने बनविण्याच्या सूचना पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांना दिल्या.

फडणवीस-शिंदे सरकारच्या काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांची निवडणूक तीनऐवजी चार सदस्यीय पद्धतीनेच होण्याची शक्यता आहे. मात्र, आदेशात प्रभागरचनेची सदस्य संख्या स्पष्ट करण्यात आलेली नसल्याने संभ्रम कायम आहे.

ओबीसीचे राजकीय आरक्षण आणि बदललेल्या प्रभाग रचनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर 28 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असतानाच, नगरविकास विभागाने सर्व आयुक्तांना पत्र पाठवून राज्य सरकारने सुधारित केलेल्या तरतुदीप्रमाणे मुदत संपलेल्या आणि नजीकच्या काळात मुदत संपत असलेल्या महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी लगतच्या जनगणनेनुसार प्रभाग संख्या आणि प्रभाग रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी तत्काळ काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर चार सदस्यीय प्रभाग रचना रद्द करून तीन सदस्यीय रचना स्विकारण्यात आली. राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे महापालिका प्रशासनाने समाविष्ट 34 गावांसह 173

सदस्यांसाठी 58 प्रभागाची रचना तयार केली होती. प्रभाग रचनेवर हरकती व सुचना मागवून ती अंतिम केली होती. तसेच आरक्षणाची सोडत काढून आरक्षणही अंतिम केले होते. मात्र, राज्यात सतांतर होऊन शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले.

या सरकारने महाविकास आघाडीचा तीन सदस्यीय प्रभाग पद्धत रद्द करत पूर्वीप्रमाणे चार सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. त्या एकत्रित करून त्यांची सुनावणी सुरू आहे. पुढील सुनावणी 28 नोव्हेंबर रोजी असतानाच अचानक राज्य शासनाने प्रारूप प्रभागरचना तयार करण्याचे आदेश काढल्याने प्रशासन संभ्रमात आहे.