बाप्पू मानकर यांच्या भाजयुमो टीमचे राजेश पांडेंनी केले विशेष कौतुक
पुणे-क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत भाजप-शिंदे गटाने महाविकास आघाडीपुरस्कृत पॅनलचा धुव्वा उडवला आहे. विद्यापीठाच्या अधिसभा नोंदणीकृत पदवीधर गटाच्या निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचने सावित्रीबाई फुले प्रगती पॅनलचा पराभव केला आहे. 10 जागांपैकी 9 जागांवर विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार निवडणून आले आहेत. तब्बल 20 तास ही मतमोजणी चालली.
राज्यात सत्ताबदल होताच छोट्या निवडणुकांमध्येही भाजप महाविकास आघाडीला धक्का देत आहे. पुणे विद्यापीठाच्या अधिसभा नोंदणीकृत पदवीधर गटाच्या निवडणुकीच्या 10 जागांसाठी रविवारी मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजनी ही मंगळवारी विद्यापीठातील सभागृहात सकाळी 8 वाजता सुरू झाली. ही मतमोजणी बुधवारी पहाटे पर्यन्त सुरू होती. तब्बल 20 ते 21 तास देखील भाजप पक्षप्रणित विद्यापीठ विकास मंचाने निर्विवाद वर्चस्व मिळवत. महाविकास आघाडीला धक्का दिला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचचे विजयी उमेदवार प्रसेनजीत फडणवीस (खुला प्रवर्ग), सागर वैद्य (खुला प्रवर्ग), दादासाहेब शिनलकर (खुला प्रवर्ग), युवराज नरवडे (खुला प्रवर्ग), बागेश्री मंठाळकर (महिला प्रवर्ग), राहुल पाखरे (एस.सी.प्रवर्ग), गणपत नांगरे (एस.टी.प्रवर्ग), विजय सोनवणे (एन.टी.प्रवर्ग) आणि सचिन गोरडे (ओबीसी प्रवर्ग)
विद्यापीठ विकास मंचाचे समन्वयक राजेश पांडे म्हणाले कि,’ जगातील नामांकित अशा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कारभार ही फार मोठी जबाबदारी आहे. भविष्यातील पिढी घडविण्याची ही जबाबदारी म्हणजे राष्ट्र घडविण्याची जबाबदारी होय. अशी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडण्यासाठी आणि विद्यापीठाचा लौकिक वाढविण्याचे कार्य करण्यासाठी सर्व विजयी सदस्यांना शुभेच्छा !!विद्यापीठ विकास मंच पहिल्यांदाच ताकदीने अधिसभेच्या निवडणूक रिंगणात उतरला होता. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये कोणाशी ना कोणाशी मंचची युती असायची. यंदाची निवडणूक फक्त आणि फक्त मंचच्या सदस्यांनी ताकदीने लढविली. आम्ही हे धाडस करू शकलो यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली ती आमच्या अभाविपच्या कार्यकर्त्यांनी. त्यांनी सर्वांनी राष्ट्र निर्मितीच्या विचारांप्रती निष्ठा ठेवून आग्रहाने पूर्व नियोजन करून निवडणुकीत अचूक नियोजन अमलात आणून ही जबाबदारी सांभाळली. त्यांना भाजप शहर पदाधिकारी, नगरसेवक यांनी सहकार्य केलं. यात विशेष उल्लेख करावा वाटतो तो राघवेंद्र मानकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चाच्या सहकाऱ्यांनी जे बळ दिलं. या सगळ्या ‘टीम वर्क’मुळे विजयाचा मार्ग सुकर झाला.शिक्षण क्षेत्रात तळमळीने काम करू इच्छिणाऱ्या मंचच्या सदस्यांना शिक्षणाविषयी आस्था असलेल्या प्रत्येक घटकाने खंबीर साथ दिली. त्यामुळेच प्राचार्य, संस्थाचालक, पदवीधर अशा तिन्ही ठिकाणी अधिसभेवर विद्यापीठ विकास मंचचा प्रभाव यंदाच्या निकालातून दिसतो आहे. मंचचे एक-दोन प्रतिनिधी अधिसभेवर निवडून यायचे, हा इतिहास काही जुना नाही. गेल्या पाच वर्षांत मंचचे काम विस्तारले. मंचमधून निवडून आलेल्या प्रतिनिधींनी प्रभावी काम केले. शिक्षण क्षेत्रात विद्यापीठ विकास मंचचे नाव चर्चेत आले. त्यामुळेच, आजच्या अधिसभेच्या निवडणुकीनंतर मंचची वाढलेली ताकद प्रेरणा देणारी आहे. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्याच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे राहतो, हा संदेश निकालाद्वारे मतदारांनी दिला आहे. हा संदेश माझी आणि मंचच्या विजयी सदस्यांची उमेद वाढवणारा आहे.या विजयाचे खरे शिल्पकार मंचाचे सर्व मान्यवर, आवाहक डॉ.गजानन एकबोटे, डॉ.राजेंद्र विखे पाटील, डॉ.अपूर्व हिरे, डॉ.सोमनाथ पाटील, अॅड.नितीन ठाकरे, अॅड.एस.के.जैन, डॉ. सुधाकर जाधवर, श्री.बेबीलालजी संचेती, श्री.अजितभाऊ सुराणा, श्री.दिलीप बेलगांवकर, श्री.बापू येवला, श्री.हेमंत धात्रक, श्री.पंढरीनाथ थोरे, श्रीमती हेमलताताई बिडकर, डॉ.संदीप कदम, प्रा.एन.डी.पाटील, श्री.अनिल ठोंबरे, डॉ.प्रशांत साठे, संतोष ढोरे ल, राघवेंद्र बापू मानकर यांच्यासह अनेक मित्र आणि सहकारी वर्ग तसेच विविध संस्थांचे प्राध्यापक आणि इतर कर्मचारी बांधव हे आहेत. ह्या सर्व निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले. तसेच प्रसारमाध्यमांनी देखील आमची भूमिका अतिशय योग्य पद्धतीने मतदार आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचविली. ज्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असे मतदार बंधु-भगिनी, निवडणुक अधिकारी आणि कर्मचारी तसेच ज्ञात-अज्ञात सर्व हितचिंतक या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.