Home Blog Page 1503

हिंदुजा समूह समर्थित युनिकॉर्न माईंडमेझने भारतीय आणि अमेरिकी बाजारपेठेत केला आपला कार्यविस्तार

0

मुंबई: भारतीय वंशाच्या न्यूरोसायंटिस्टने स्थापन केलेली हिंदुजा समूह समर्थित युनिकॉर्न माईंडमेझ ही एआय प्रणीत न्यूरोटेक्नॉलॉजीच्या विकासातील जागतिक अग्रणी असून अमेरिका आणि भारतामध्ये आपला कार्याविस्तार करत आहे. माईंडमेझ तंत्रज्ञान जगभरातील १३० हून अधिक अग्रणी वैद्यकीय केंद्रांवर वापरण्यात येत आहे. भारतात, संपूर्ण मालकीची उपकंपनी माईंडमेझ इंडिया द्वारे शिखर सरकारी रुग्णालय AllMS, नवी दिल्ली यासह डझनहून अधिक संस्थांमध्ये याचा वापर होत आहे.

अमेरिकी बाजारपेठेत आपले स्थान अधिक मजबूत करण्यासाठी माईंडमेझ ने निवडक व्हिब्रा हॉस्पिटलमधील रूग्णांसाठी माईंडमेझचे डिजिटल हेल्थ टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म (MindPod® आणि MindMotion®GO) रुग्णालयात आणि घरी बसविण्यासाठी रुग्णालयातील गंभीर रुग्णाची नंतर घ्यायची काळजी या क्षेत्रात अग्रणी असलेल्या अमेरिकेतली व्हिब्रा हेल्थकेअरसोबत भागीदारी केल्याचे जाहीर केले. व्हिब्रा हेल्थकेअर अमेरिकेतली १९ राज्यांमध्ये ९० हून अधिक विशेष रुग्णालये तसेच संक्रमणकालीन काळजी युनिट्स/सुविधा केंद्रात कार्यरत आहे. सुमारे १०० दशलक्ष अमेरिकन लोक न्यूरोलॉजिकल विकारांनी ग्रस्त आहेत.

“माईंडमेझ गंभीर न्यूरोलॉजिकल आजार असलेल्या रुग्णांसाठी वास्तविक परिस्थितीवर  आधारित उपायांच्या विकासाद्वारे सातत्यपूर्ण शुश्रूषे दरम्यान न्यूरो रिकव्हरी पुन्हा परिभाषित करण्यासाठी वचनबद्ध आहे,” असे माईंडमेझचे संस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तेज ताडी म्हणाले. “आम्ही डॉक्टरांना शक्तिशाली, डिजिटली-सक्षम, अत्याधुनिक साधने प्रदान करण्यावर तसेच रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना वापरण्यास सुलभ, आकर्षक आणि सहजी उपलब्ध होतील अशा उपायांनी सक्षम बनविण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. मेंदूच्या आरोग्यामध्ये चांगला बदल तसेच रुग्णाच्या परिणामांमध्ये अर्थपूर्ण सुधारणा करण्याची बांधिलकी आणि खरी क्षमता या दोन्ही गोष्टी जोपासणारा जागतिक दर्जाचा भागीदार आम्हाला व्हिब्रा द्वारे मिळाला आहे.”

माईंडमेझ स्ट्रोक/ट्रॉमॅटिक ब्रेन इंज्युरी, स्पाइनल कॉर्ड इंज्युरी आणि पार्किन्सन्स रोग इत्यादीसारख्या न्यूरोलॉजिकल रोगांसाठी नवीन सॉफ्टवेअर-आधारित हस्तक्षेप आणि मूल्यांकन पुरविते तसेच जुनाट आजारांच्या दीर्घकालीन व्यवस्थापनादरम्यान रुग्णाच्या कार्याचे परीक्षण आणि मोजमाप करणारी क्षमता प्रदान करते. गेम-आधारित उपचार पद्धतीचा वापर पारंपरिक/सध्याच्या ठरलेल्या पद्धतींच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर सुधारित परिणामांसह पुनर्वसन अधिक आकर्षक बनवते (उदाहरणार्थ – व्हीलचेअरवर जखडून गेलेले आणि गतिशीलता परत मिळविण्यासाठी धडपडत असलेले काही रुग्ण माईंडमेझच्या मदतीमुळे आता स्वत:च्या पायावर चालत आहेत आणि जवळपास सामान्य जीवन जगत आहेत.)

“माईंडमेझने आमच्या टीमला केवळ त्यांच्या तांत्रिक क्षमतेच्या सामर्थ्याने प्रभावित केले असे नाही तर जगभरातील देशांमध्ये स्ट्रोक आणि इतर न्यूरोलॉजिकल आजार असलेल्या रुग्णांसाठी वास्तवात अवलंबता येणारे शुश्रूषा मार्ग वापरण्याच्या त्यांच्या अनुभवाने देखील प्रभावित केले आहे,” असे व्हिब्रा हेल्थकेअरचे संस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रॅड हॉलिंगर म्हणाले.

आखाती देशात यंदा प्रथमच लावणी महोत्सव..

पुणे, दि. ९ डिसेंबर: आखाती देशात स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला आपल्या महाराष्ट्राच्या दैदिप्यमान संस्कृती व लोककलेची ओळख करून देण्यासाठी आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रम पार पाडणाऱ्या ईन्स्पायर इव्हेंट्स युएई यांनी यंदा आखाती देशात प्रथमच लावणी महोत्सवाचे दुबई येथे ११ डिसेंबर २०२२ रोजी आयोजन केले आहे. महाराष्ट्राची लोककला, संस्कृती व शान “लावणी” आखाती मराठी व आंतराष्ट्रीय प्रेक्षकापर्यंत पोहचविण्यासाठी ईन्स्पायर इव्हेंट्सच्या वतीने या विशेष महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आखातातील मराठी मंडळींचे आपली संस्कृती विषयक प्रेम व आदर पाहून सर्व स्थानिक कलावंताना या कार्यक्रमाच्या दरम्यान लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचे खास मार्गदर्शन लाभणार आहेत. लावणी महोत्सवात यूएईतील स्थानिक कलावंत लावणी व सवाल-जवाब यासारखे सांस्कृतिक नृत्य प्रकार आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करणार आहेत.

दुबई येथील सागर जाधव (एस.जे.लाईव) हे हा कार्यक्रम जगातील सर्व ऑनलाईन प्रेक्षकांपर्यंत एफबी लाईव माध्यमातून पोहोचविणार आहेत. वरील कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक चंद्रशेखर जाधव व त्यांचे सर्व सहकारी अथक मेहनत घेऊन भव्य व आदर्श असा आंतरराष्ट्रीय लावणी महोत्सव आयोजित करून अटकेपार झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकविणार आहेत. यूएई येथील स्थानिक मराठी प्रेक्षकांना लाभलेली ही सुवर्ण पर्वणी आहे. 

गुजरात विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा मराठी महिला आमदार विजयी!

सूरत : गुजरात विधानसभेत सलग तिसऱ्यांदा एका महिलेने विजय मिळवला आहे. ही महिला मराठी आहे, मूळची महाराष्ट्रातली आहे. संगीता पाटील या गुजरातमधील लिंबायत मतदारसंघातून सलग तिसऱ्या वेळेस विजयी झाल्या आहेत. संगीता पाटील या भाजपाच्या आमदार आहेत, त्या भाजपा प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या विश्वासू कार्य़कर्त्यांपैकी एक आहेत. लिंबायत या मतदारसंघात संगीता पाटील या एक-दोन नाही तर सलग तिसऱ्या वेळेस विजयी होत आहेत. लिंबायत मतदारसंघातील मराठी मतदारांचा त्यांना प्रचंड प्रतिसाद आहे.सी.आर.पाटील देखील गुजरातमधून खासदार आहेत, मराठी मतदारांचा त्यांनाही मोठा फायदा झाला आहे.

गोपाळ डी पाटील या काँग्रेस उमेदवाराला एकूण २९ हजार मतं मिळाली, तर आपचे उमेदवार पंकजभाई तायडे यांनी ३७ हजार मतं मिळाली, तर भाजपाच्या संगीता पाटील यांना ९५ हजार मतं मिळाली. या तीन मराठी उमेदवारांच्या लढतीत संगीता पाटील या विजयी झाल्या आहेत. महाराष्ट्रातील खानदेशातील मराठी लोकांची संख्या जास्त आहे. या मतदारसंघात ८० हजार मराठी मतदार आहेत, ७६ हजार मुसलमान, ३८ हजार गुजराथी, २१ हजार उत्तर भारतीय, तर ११ हजार राजस्थानी आणि १२ हजार तेलुगू लोकांचा समावेश आहे.

पिण्याचं पाणी, शुद्ध पाणी ही मतदारसंघातील मुख्य अडचण आहे. पाणी आता सी.आर.पाटील आणि संगीता पाटील यांनी मराठी लोकांसाठी सुरत, उधना,नवसारी, लिंबायत या ठिकाणी सर्व सुविधा असलेले सांस्कृतिक हॉल उभारण्याची मागणी होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना तब्बल दीड वर्ष त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव खुप काही शिकवून गेला,असे सांगत आ.पाटील म्हणाल्या,की सुरतसारख्या शहरी भागातून प्रथमच निवडून येत असताना तेथील बहुसंख्येने असलेल्या मराठी जनतेने खुप मदत केली होती . भाजप सारखा पक्ष केंद्रातही सत्तेत आल्याने मतदारसंघात विकासकामे करताना खूपच आनंद मिळतो. आगामी सर्व निवडणुकीत विकास हा एकमेव मुद्दा चालेल,असे सांगतानाच आपल्या तरुणांच्या देशात सोशल मिडियाचा प्रभाव वाढल्याचेही त्यांनी सांगितले. गुजरातमध्ये असूनही मराठी-गुजराथी असा भेदभाव तेथे नसल्याचे सांगत जातीयवादाचा मुद्दा त्यांनी खोडून काढला.पुणे महापालिकेत भाजपची सत्ता येईल,असा विश्वास व्यक्त केला.

२०१७ साली आमदार संगीता पाटील यांचे स्वागत करताना चा फोटो

सीमावादात अमित शहांची मध्यस्थी:14 डिसेंबरला महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार, खासदार अमोल कोल्हेंची माहिती

महाराष्ट्र-कर्नाटक वादात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मध्यस्थी करणार आहेत. येत्या 14 डिसेंबरला अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे व कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

सीमावादाच्या मुद्द्यावर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केले म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदावरून हटवावे, या मागणीसाठी राज्यातील खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. भेटीनंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी याबाबत माहिती दिली.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोनवर बोलणे झाले आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्र्यांनी कर्नाटक व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी समोरासमोर बोलून समन्वयाने या वादावर तोडगा काढावा, अशी मागणी आम्ही केली. अमित शहा यांनी संवेदनशीलपणे हा मुद्दा समजून घेतला. ते 14 डिसेंबरला महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, सीमाभागातील नागरिक 1956 पासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. कर्नाटक सरकारकडून त्यांच्यावर अत्याचाराचा वरंवटा फिरवला जात आहे. आताही सीमाभागातील नागरिकांवर अत्याचार केला जात आहे. हे सर्व गृहमंत्री अमित शहा यांनी समजून घेतले आहे. ते लवकरच या वादावर तोडगा काढतील , असा विश्वास आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी केलेल्या अवमानजनक वक्तव्याबाबत संसदेत खासदार डॉ. अमोल कोल्हे मुद्दा मांडत असतानाच त्यांचा माईक बंद पडला. याबाबत आपण लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत मी बोलत असतानाच माईक बंद पडला व त्यानंतर लगेच सदन स्थगित करण्यात आले, हा प्रकार अख्ख्या देशाने पाहिला आहे. याबाबत मी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे.

‘भारत जोडो’मुळे सामाजिक ऐक्य, सलोखा वाढेल : डॉ. गणेश देवी

अठराव्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत ‘भारत जोडो’ महाराष्ट्रातील यात्रेच्या छायाचित्रांचे तीन दिवसीय प्रदर्शन

पुणे : “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १०२ वर्षांपूर्वी देशभर झपाटून प्रवास केला. हजारो अनुयायांना स्वातंत्र्यसंग्रामात आणले. आज राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून तितक्याच झपाट्याने प्रवास करताहेत. देशातील द्वेष संपवून समाजाला जोडण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. भारत जोडो यात्रेमुळे सामाजिक ऐक्य, सलोखा वाढेल. तसेच सामाजिक, राजकीय व अध्यात्मिक उद्देशाने निघालेल्या ‘भारत जोडो’ यात्रेतुन काँग्रेसही उभारी घेईल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी केले.

श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहांतर्गत महाराष्ट्रातील ‘भारत जोडो’ पदयात्रेतील छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. देवी यांच्या हस्ते झाले. बालगंधर्व कलादालनात हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. येत्या शुक्रवारपर्यंत (दि. ९) सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी होते. यावेळी सौ. देवी, शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावर, माजी मंत्री रमेश बागवे, शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, राजस्थान काँग्रेसचे नेते जुगल प्रजापती, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस वीरेंद्र किराड, दत्ता बहिरट, चंद्रशेखर कपोते, रमेश अय्यर, चेतन अगरवाल, प्रशांत सुरसे, आयुब पठाण, प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे आदी उपस्थित होते.

डॉ. गणेश देवी म्हणाले, “महात्मा गांधींचा जो झंजावात होता, तोच झंझावात राहुल गांधींच्या यात्रेत दिसत आहे. आपल्या हातून झालेल्या चुकांचा पश्चाताप करण्याची ही वेळ आहे. मात्र, या कठोर तपश्चर्येतून समाजातील तणाव, दुरावा दूर करून समाज व देशाला एकसंध ठेवण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. भाजपच्या धोरणामुळे समाज विभागाला जात आहे. हे थांबवण्यासाठी द्वेषमुक्तीचा हा लढा अधिक विस्तृत व्हायला हवा. त्यासाठी भारत जोडो यात्रेत प्रत्येक भारतीयाने सहभागी व्हावे. आजचा अंधार दूर करून उद्याची पहाट उजाडणार, हा आशावाद या यात्रेने दिला आहे.”  

प्रास्ताविकात मोहन जोशी म्हणाले, “देशाच्या इतिहासात ‘भारत जोडो’ यात्रा एक महत्त्वाची घटना आहे. दोन आठवडे ही यात्रा महाराष्ट्रातून गेली. या देदीप्यमान यात्रेत अनेकांना सहभागी होता आले नाही. त्यामुळे या छायाचित्र प्रदर्शनातून ही यात्रा पुणेकरांना अनुभवता येईल. निवडक २०० छायाचित्रातून ही चित्ररूपीयात्रा साकारली आहे.”

जयंत आसगावकर म्हणाले, “मोहन जोशी यांच्या प्रयत्नातून सुरु असलेल्या या सप्ताहाचे सातत्य खूप महत्वाचे आहे. राहुल गांधी झपाट्याने काम करताहेत. द्वेषभावना संपवण्याचे ध्येय घेऊन चालत आहेत. यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अधिक लोकांनी यात सहभागी होऊन एकजूट दाखवावी. यातून तरुण कार्यकर्त्यांनाही प्रोत्साहन मिळत आहे.”

गजानन आमदाबादकर म्हणाले, “राहुल गांधींची भारत जोडो यात्रा भविष्याची नांदी आहे. शेतकरी या देशाचे चित्र बदलू शकतो. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राहुल गांधी प्रयत्न करताहेत. त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेताहेत. त्यामुळे शेतकरी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले. आपल्या मुलांच्या मनात द्वेष पसरवण्याचे काम होतेय, हे थांबले पाहिजे.”

अजित जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रथमेश आबनावे यांनी आभार मानले.

जिल्हा परिषदेत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन

पुणे : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण (दिव्यांग कल्याण) विभागामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेनुसार जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा परिषद परिसरात आयोजित या शिबिरात पुणे येथील डॉ. मनोहर डोळे फाऊंडेशन यांचेमार्फत अथर्व नेत्रालयकडून मोबाईल आय क्लिनिकद्वारे नेत्र तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन आयुष प्रसाद यांनी केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शिबिराच्या आयोजनात वरिष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. स्नेहल पाठक, वरिष्ठ प्रशासन कार्यकारी अधिकारी प्रितम वाघमारे, मंगेश चव्हाण यांचे सहकार्य लाभले. शिबिरामध्ये जिल्हा परिषदेच्या सुमारे १७० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. यातील ७५ कर्मचाऱ्यांना चष्मा आवश्यक असल्याचे दिसून आले. तर काचबिंदू १, मोतीबिंदू शत्रक्रिया आवश्यक ४, डायबिटीक रेटीनोपॅथी ४ आणि डायबेटिक रेटिनाथेरेपीसाठी २ अधिकारी/कर्मचाऱ्यांना पुढील तपासणीसाठी नेत्रतज्ज्ञांकडे शिफारस करण्यात आली.

“शरद पवार तिकडे जाऊन काय दिवे लावणार?” सीमावादावरून विजय शिवतारेंचा खोचक टोला

पुणे- माजी राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, “४८ तासांत शरद पवार तिकडे जाऊन काय दिवे लावणार आहेत? उगीच काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलत आहेत. ते चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी काय केलं? असा माझा सवाल आहे. हा वाद आता सुप्रीम कोर्टात आहे, तिथे चांगल्या पद्धतीने बाजू मांडून निर्णय घेता येतील,” शिवतारे म्हणाले.

“सीमावादावरून शरद पवार शंभर टक्के राजकारण करत आहेत.

“एखाद्या गोष्टीचं राजकारण करून मूळ मुद्द्यांपासून लक्ष हटवण्याचं काम केलं जात आहे. हे सरकार अतिशय चांगलं काम करत आहे. प्रचंड वेगाने निर्णय घेत आहे. महाविकास आघाडीला तीन वर्षात जे जमलं नाही, ते सगळे निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने अवघ्या तीन महिन्यात घेतले आहेत. या निर्णयांमुळे या सरकारची लोकप्रियता आणखी वाढेल आणि आपल्याला अडचण निर्माण होईल, यासाठी केलेलं हे नाटक आहे,” असा आरोपही विजय शिवतारे यांनी केला.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना माजी राज्यमंत्री शिवतारे म्हणाले, ‘विमानतळ प्रकल्प बारामतीला करण्याचे महाविकास आघाडी सरकारने ठरविले होते. मात्र, नव्या जागेला केंद्राकडून नकार देण्यात आला आहे. पुरंदर तालुक्यातील सात गावांत यापूर्वी निश्चित केलेल्या जागेतच प्रकल्प होणार असून सर्व प्रकारच्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (महाराष्ट्र इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमआयडीसी) माध्यमातून भूसंपादन करण्यात येणार आहे. त्याबाबतची अधिसूचना पुढील १५ दिवसांत निघेल.’

3 हजार 110 तलाठी भरती आणि 518 मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार_महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

3 हजार 628 पदे निर्मितीला राज्य शासनाची मान्यता

मुंबई, दि. 8 : तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ‍ अधिकारी असे एकूण 3 हजार 628 पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने कामांना विलंब व्हायचा आणि महसूल यंत्रणेवर ताण येत होता. मंत्री श्री. विखे- पाटील यांनी तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रियेला गती मिळावी यासाठी पुढाकार घेतला होता. गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी याच्याशी संबंध येत असतो. सातबारा, विविध दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते.तलाठी हे पद ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाचे असते. आता होणाऱ्या तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे.तलाठी साझा पुनर्रचनेनुसार विहित केलेल्या निकषाच्या अनुषंगाने संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडून महसुली विभागनिहाय प्राप्त माहितीस अनुसरुन वाटप करण्यात आलेल्या 3 हजार 110 साझे आणि 518 महसुली मंडळ कार्यालयासाठी 3 हजार 110 तलाठी भरती आणि 518 मंडळ अधिकारी यांची पदोन्नती असे एकूण 3 हजार 628 पदे निर्मितीला मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय 7 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

पुणे महसुली विभागाअंतर्गत एकूण 602 तलाठी साझे आणि 100 महसुली मंडळे आहेत. अमरावती महसुली विभागाअंतर्गत एकूण 106 तलाठी साझे आणि 18 महसुली मंडळे आहेत. नागपूर महसूली विभागाअंतर्गत एकूण 478 तलाठी साझे आणि 80 महसुली मंडळे आहेत. औरंगाबाद महसुली विभागाअंतर्गत एकूण 685 तलाठी साझे आणि 114 महसुली मंडळे आहेत. नाशिक महसुली विभागाअंतर्गत एकूण 689 तलाठी साझे आणि 115 महसुली मंडळे आहेत. कोकण महसुली विभागाअंतर्गत एकूण 550 तलाठी साझे आणि 91 महसुली मंडळे आहेत.

0000

रिक्षा चालकांना आंदोलन न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे: राज्यात बेकायदेशिररित्या व विनापरवानगी चालणाऱ्या बाईक टॅक्सी ॲपवर बंदी घालण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून गृह आणि परिवहन विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत असून नागरिकांना होणारी असुविधा टाळण्यासाठी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कायम राखण्यासाठी रिक्षा चालकांनी 12 डिसेंबरचे आंदोलन करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

रिक्षा चालकांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रिक्षा चालकांच्या न्याय्य मागण्यांबाबत विचार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गठीत समितीमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस उपआयुक्त (सायबर शाखा), पोलीस उपआयुक्त (वाहतूक), पोलीस उपआयुक्त(गुन्हे) आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने 7 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत बाईक टॅक्सी ॲपवर कारवाईबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाने रिक्षा चालकांच्या न्याय्य मागण्यांबाबत नेहमीच सहानुभूतीने विचार केला आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर वाहतूक होऊ नये यासाठी प्रादेशिक परिवहन विभागातर्फेदेखील विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. बेकायदेशिर बाईक टॅक्सी ॲप चालविणाऱ्या कंपनी विरोधात गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई सुरूच असून ॲपवर बंदी घालण्याबाबत राज्याच्या सायबर शाखेकडे पोलीस उपआयुक्तांमार्फत पाठपुरवा करण्यात येत आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता रिक्षा चालकांनी आंदोलन करणे उचित होणार नाही. अशा आंदोलनामुळे नागरिकांची अधिक प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे.

रिक्षा चालकांनी नेहमीच प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. शिवाय रिक्षा चालकांच्या समस्यांबाबतही प्रशासन संवेदनशिलतेने निर्णय घेत असते. स्वत: पालकमंत्र्यांनीदेखील त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून गृह आणि परिवहन विभागाकडेदेखील बाईक टॅक्सी ॲपवर बंदी घालण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. हे लक्षात घेता रिक्षा चालकांनी आंदोलन करू नये आणि यावेळीदेखील प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ.देशमुख यांनी केले आहे.
0000

दक्षिण कमांड द्वारे पुणे येथे जनरल बिपीन रावत स्मृती कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, 8 डिसेंबर 2022

भारतीय सशस्त्र दलांचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ  दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त  दक्षिण कमांडने गुरुवारी एका स्मृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

हा कार्यक्रम एका चर्चासत्राच्या स्वरूपात संमिश्र पद्धतीने आयोजित करण्यात आला होता, ज्याची संकल्पना  “भारतीय सशस्त्र दलांसाठी परिवर्तनाची अत्यावश्यकता” अशी होती.  जनरल बिपिन रावत यांच्या जिव्हाळ्याच्या  मुद्द्यांवर  तसेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असताना ज्या मुद्द्यांवर  त्यांनी अथक लक्ष केंद्रित केले , त्यावर चर्चा करणे हा यामागचा उद्देश होता.  दक्षिणी  कमांड मुख्यालय आणि  पुणे आंतरराष्ट्रीय केंद्र यांनी  कमांड हॉस्पिटल, पुणे येथे  संयुक्तपणे  चर्चासत्राचे आयोजन केले  होते.दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या कन्या  कृतिका रावत यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम स्मरणीय झाला.

दक्षिण कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग, एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम  यांनी आपल्या प्रारंभिक  भाषणात दिवंगत जनरल बिपिन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.  राष्ट्र मजबूत करण्यासाठी पारंपारिक मूल्ये आणि  आधुनिक तंत्रज्ञान यांमध्ये विना अडथळा एकीकरणासाठी पहिल्या सीडीएसनी मांडलेल्या रुपरेषेवर  आर्मी कमांडर यांनी भाष्य केले.  सध्याच्या भू-राजकीय व्यवस्थेत भारताचा वाढता प्रभाव अधोरेखित  करताना  त्यांनी भारत आणि सशस्त्र दलांसमोरील आव्हाने स्पष्ट केली. .

माजी परराष्ट्र व्यवहार सचिव   विजय गोखले, माजी संरक्षण सचिव डॉ अजय कुमार आणि लेफ्टनंट जनरल सुब्रत साहा, लेफ्टनंट जनरल संजीव लंगर , लेफ्टनंट जनरल पीएस राजेश्वर, लेफ्टनंट जनरल एसएस हसबनीस, लेफ्टनंट जनरल ए के सिंग, एअर मार्शल  एसएस सोमण आणि रिअर अॅडमिरल प्रवीण नायर  यांच्यासारख्या  अनेक नामवंत वक्त्यांनी  भारतीय सशस्त्र दलांसाठी परिवर्तनाच्या गरजा आणि बारकावे यावर आपले मत मांडले .

या चर्चासत्राला तिन्ही सेवा दलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी , आयएनएस  शिवाजी, पश्चिम नौदल कमांड, मुंबई आणि , लोहगाव हवाई तळ येथील अधिकाऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राच्या सदस्यांनीही या चर्चासत्रात सक्रिय सहभाग घेतला. दक्षिण कमांड मुख्यालयाच्या सर्व आउटस्टेशन फॉर्मेशन्ससाठी चर्चासत्राचे  थेट प्रक्षेपण करण्यात आले.

लष्करात परिवर्तन घडवून आणण्याचा  जनरल रावत यांच्या अतुलनीय प्रयत्नांनी आपल्याला एक मजबूत चौकट आणि स्पष्ट मार्ग दाखवला आणि म्हणूनच या मार्गावर वाटचाल करत   अद्ययावततंत्रज्ञान आणि आत्मनिर्भर  सैन्य च्या माध्यमातून सुरक्षित राष्ट्राच्या .इच्छित निष्कर्षापर्यंत पोहोचणे यापेक्षा चांगली श्रद्धांजली त्यांना  असू शकत नाही.

हायड्रोजनवरील वाहनांच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्रात होणार पहिली गुंतवणूक

‘ट्रिटॉन’च्या सीईओंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई, दि. ८ : – हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या प्रकल्पासाठी राज्यात मोठी गुंतवणूक होणार असून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी अमेरिकास्थित ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स कंपनीशी सकारात्मक चर्चा झाली आहे. जानेवारी २०२३ मध्ये दावोसमध्ये होणाऱ्या परिषदेत यासंबंधीचा सामंजस्य करार करण्यात येणार असून या कंपनीला महाराष्ट्रात उद्योग सुरु करण्यासाठी सर्व आवश्यक त्या सुविधा राज्य सरकारकडून पुरविल्या जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले, दरम्यान, राज्यात हायड्रोजनवर आधारित वाहनांचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर अशा प्रकारचा प्रकल्प सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

अमेरिकेच्या ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिमांशू पटेल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स ही कंपनी विद्युत वाहनांबरोबरच हायड्रोजन वाहन निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत आहे. महाराष्ट्रात हायड्रोजन प्रकल्प आणि हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांचे निर्मिती केंद्र सुरु करण्यासाठी ट्रिटॉन कंपनीने पुढाकार घेतला असून त्यासाठी श्री. पटेल यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा हायड्रोजन वाहने ही वापरण्यास किफायतशीर, सुरक्षित असून सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा देखील स्वस्त आहेत. इंग्लंड , जर्मनी, चीन, अमेरिका आदी देशांमध्ये हायड्रोजन वाहनांचा वापर होत असून महाराष्ट्रात देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन उपक्रमांतील बसेस भाडेत्त्वावर घेऊन हायड्रोजनवर चालविता येणे शक्य आहे, त्यासाठी कंपनीने सविस्तर प्रस्ताव दिल्यास सकारात्मक निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्यात हायड्रोजन वाहनांचा प्रकल्प ट्रिटॉन कंपनीने सुरु केल्यास हायड्रोजन निर्मिती प्रकल्प आणि या प्रकल्पांसाठी लागणारे इतर उद्योगदेखील महाराष्ट्रात सुरु होतील, परिणामी गुंतवणूक वाढेल आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ट्रिटॉन कंपनी जानेवारी २०२३ मध्ये दावोसमध्ये होणाऱ्या परिषदेत महाराष्ट्राबरोबर सामंजस्य करार करणार असून या कंपनीला महाराष्ट्रात उद्योग सुरु करण्यासाठी पुणे, ऑरिक (औरंगाबाद), नागपूर, असे विविध पर्याय उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचे ११ डिसेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत असून या महामार्गाचा मोठा लाभ उद्योग-व्यवसायांना होणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय, बहुमताचा आकडा केला पार

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. येथे काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. सध्या काँग्रेसचा ३९ जागांवर विजय झाला आहे. तर भाजपाला फक्त १८ जागांवर विजय मिळवता आला आहे. तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. तर अद्याप ८ जागांचा निकाल येणे बाकी आहे. यामध्ये सात जागांवर भाजपा आघाडीवर आहे तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. येथे काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. सध्या काँग्रेसचा ३९ जागांवर विजय झाला आहे. तर भाजपाला फक्त १८ जागांवर विजय मिळवता आला आहे. तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. तर अद्याप ८ जागांचा निकाल येणे बाकी आहे. यामध्ये सात जागांवर भाजपा आघाडीवर आहे तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.

गुजरातेत 156 जागा जिंकून भाजपचा नवा विक्रम

गुजरातमध्ये भाजपने 156 जागा जिंकून विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. माधवसिंह सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 1985 मध्ये विधानसभेच्या 149 जागा जिंकल्या होत्या. त्याच वेळी, नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना 2002च्या निवडणुकीत भाजपने 127 जागा जिंकल्या होत्या. या विजयासह भाजपने दोन्ही विक्रम मोडीत काढले आहेत.यावेळी कॉंग्रेस अवघ्या १७ जागांवर तर आप अवघ्या ५ जागांवर विजय प्राप्त करू शकले आहेत .

या ऐतिहासिक विजयानंतर 12 डिसेंबर रोजी गांधीनगर येथील विधानसभेच्या मागे असलेल्या हेलिपॅड मैदानावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. विशेष म्हणजे निवडणूक प्रचारादरम्यान पीएम मोदी म्हणाले होते- भूपेंद्र नरेंद्रचा विक्रम मोडतील. निवडणुकीच्या निकालात नेमके हेच दिसून येत आहे. भाजप समर्थक आनंद साजरा करत आहेत.

गुजरातमधील विधानसभेच्या 182 जागांपैकी भाजपने 156 जागा जिंकल्या आहेत. 2017 च्या तुलनेत 58 जागा वाढल्या आहेत. त्याचवेळी काँग्रेसला सर्वाधिक 61 जागांचे नुकसान झाले आहे. गेल्या वेळी पक्षाला 77 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना केवळ 16 जागा मिळाल्या आहेत.

गुजरातमध्ये गुरुवारी सकाळी 8 वाजेपूर्वी अर्ध्या तासात पोस्टल मतपत्रिकांची मोजणी झाल्यानंतर EVMवरून मतमोजणी सुरू झाली. गुजरात भाजपचे प्रमुख सीआर पाटील म्हणाले की, गुजरातचे नवे मुख्यमंत्री 12 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत.

जिग्नेश मेवाणी वडगाममधून दुसऱ्यांदा आमदार

गुजरातेतील दलित नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिग्नेश मेवाणींनी वडगाम मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या मणिभाई वाघेलांचा पराभव केला.व्यवसायाने वकील असलेले जिग्नेश मेवाणी गुजरातमधील प्रभावी दलित नेते म्हणून ओळखले जातात. ते सध्या गुजरात विधानसभेत वडगाम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. याच मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

2004 मध्ये मेवाणींनी मुंबईतून गुजराती भाषेतील वृत्तपत्र अभियानसाठी पत्रकारितेला सुरुवात केली. त्यांनी तीन वर्षे या वृत्तपत्रात काम केले. शेतकरी आत्महत्येवर आधारित गुजराती माहितीपट खेदू मोरा रे बघितल्यानंतर त्यांनी पत्रकारिता सोडण्याचा निर्णय घेतला.

हार्दिक पटेल विजयी:अवघ्या 29व्या वर्षीच आमदारकी

पाटीदार आरक्षण आंदोलनातून देशभरात ओळख मिळालेले गुजरातमधील नेते हार्दिक पटेल हे विरमगाम विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या लाखाभाई भरवाड यांचा पराभव केला आहे.हार्दिक पटेल हे गुजरातमधील पाटीदार समुदायात प्रभाव असलेले नेते म्हणून ओळखले जातात. जुलै 2015 मधील पाटीदार समुदायाच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनातून हार्दिक यांच्या नेतृत्वाचा उदय झाला. पाटीदार आरक्षणासाठीच्या आंदोलनाने त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. 2020 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना गुजरात प्रदेश काँग्रेस समितीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र याच वर्षी त्यांनी काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केला.

सध्या ते विरमगाम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. विरमगाम हे त्यांचे जन्मगाव आहे.

गुजरातसाठी सर्व काही, पण गुजरात म्हणजे संपूर्ण देश नाही ; निकालानंतर प्रतिक्रिया

पुणे-  गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत भाजप १५८ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं गेल्या २७ वर्षांपासून सत्तेत असलेली भाजप पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचं केवळ निश्चितच झालं आहे असे नाही तर नवा रेकोर्ड केल्याचे स्पष्ट दिसत आहे .

सर्व निर्णय गुजरातच्या हिताचे घेतले , देशाची सर्व शक्ती गुजरातच्या हितासाठी वापरली मग तिथे बहुमत मिळणार हे नक्की होतेच पण गुजरात म्हणजे देश नाही हे लक्षात घ्यावे अशी प्रतिक्रिया भाजपा विरोधी पक्षांकडून येत असताना आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी हि गुजरातच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,’ गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल, याबाबत कोणाच्याही मनात शंका नव्हती. देशातील सर्व शक्ती त्या निवडणुकीसाठी वापरली गेली. एका राज्याच्या सोईचे अनेक निर्णय घेतले गेले. अनेक प्रकल्प त्या राज्यामध्येच कसे जातील, याची काळजी घेतली गेली. त्याचा परिणाम हा निवडणूक निकालावर होणारच होता. गुजरातमध्ये तसाच निकाल लागला आहे. मात्र गुजरातचा निकाल भाजपाच्या बाजूने लागला म्हणाजे देशामध्ये लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातोय हे खरं नव्हे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिल्लीची महापालिका निवडणूक,दिल्ली महापालिकेची सूत्रं अगोदर भाजपकडे होती. आता येथे आम आदमी पार्टीची सत्ता आली. हिमाचल प्रदेशमध्ये अगोदर भाजपाची सत्ता होती. आताच्या माहितीनुसार येथे भाजपाला २७ जागा मिळाल्या. काँग्रेसला ३७ जागा मिळाल्या आहेत. येथील भाजपाचे राज्य गेले. दिल्लीमध्येही भाजपाची सत्ता गेली. याचा अर्थ हळूहळू बदल होत आहे. राजकारणामध्ये पोकळी असते. गुजरातची पोकळी ही भाजपाने भरून काढली. तर दिल्लीची पोकळी केजरीवाल यांनी भरून काढली. आज लोकांना बदल हवा आहे. मात्र याची नोंद राजकीय कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले

राष्ट्रीय महामार्ग क्रमाक ४ वरील अतिक्रमण व सेवा वाहिन्या काढून घेण्याचे आवाहन

पुणे, दि. ८: राष्ट्रीय महामार्ग क्रमाक ४ वरील खेड शिवापूर-नवीन कात्रज बोगदा-नवले पूल- वारजे दरम्यान दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर अनाधिकृतपणे करण्यात आलेले अतिक्रमण तसेच सेवा वाहिन्या ७ दिवसाच्या आत स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्यावतीने करण्यात आले आहे.

मिळकतधारकांनी अनाधिकृतपणे केलेले अतिक्रमण व विनापरवाना बांधकाम मुदतीत काढून न घेतल्यास ती दि कन्ट्रोल ऑफ नॅशनल हायवेज (लॅन्ड अँड ट्राफिक) ॲक्ट २००२ अन्वये निष्कासित करण्यात येतील तसेच त्याचा खर्च व दंड संबंधितांकडून वसूल करण्यात येईल.

प्राधिकरणाच्यावतीने ही अतिक्रमणे काढताना, सेवा रस्त्याची सुधारणा करताना काही नुकसान, असुविधा झाल्यास याला प्राधिकरण जबाबदार राहणार नाही, असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे पुणे येथील प्रकल्प संचालक संजय कदम यांनी स्पष्ट केले आहे.