पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताला जगातील पहिल्या क्रमांकाचे राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या दृष्टीने आपल्या ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकातून त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला निर्भय होण्याचा तसेच आत्मविश्वासाने जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला आहे, असे सांगताना ‘एक्झाम वॉरियर्स’ हे मराठी अनुवादित पुस्तक राज्यातील सर्व शाळांच्या ग्रंथालयांमध्ये पोहोचविण्यात यावे अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केली. पंतप्रधान मोदी यांनी लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाच्या नवीन व विस्तारित मराठी आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.
‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना भ्रमण करून देश समजून घेण्याचा संदेश दिल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांनी शिवनेरी, रायगड, सिंहगड हे शिवकालीन ऐतिहासिक गडकिल्ले तसेच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ सारखे आधुनिक स्मारक पाहून त्यातून प्रेरणा घ्यावी, असे राज्यपालांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अति वापर टाळावा तसेच आपल्या अंगभूत क्षमता ओळखाव्या असा सल्ला राज्यपालांनी यावेळी दिला. ‘एक्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक केवळ परीक्षांना सकारात्मकतेने तोंड देण्याचा मार्ग दाखविण्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण जीवनाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी योद्ध्याप्रमाणे जगावे असा संदेश देणारे असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
‘एक्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा शासन प्रयत्न करेल असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणाला महत्व दिले आहे. रशिया, फ्रांस, जर्मनी ही राष्ट्रे आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देत असल्याचे नमूद करून इंग्रजीचे शिक्षण न थांबवता विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून शिक्षण घ्यावे असे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. या वर्षीपासून अभियांत्रिकी तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांची पुस्तके मराठी भाषेतून उपलब्ध केली जातील असे त्यांनी सांगितले. ‘एक्झाम वॅरियर्स’ या पुस्तकातून मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी योग – ध्यानाचा मार्ग दाखविला असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुस्तक विद्यार्थी, पालक व शिक्षकांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक सिद्ध होईल असे केसरकर यांनी सांगितले.
आपल्या भाषणात शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी राज्यातील शंभर टक्के मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुरुप शिकविण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध शाळांमधील पाच विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात ‘एक्झाम वॅरियर्स’ या मराठी पुस्तकाची प्रत भेट देण्यात आली. कार्यक्रमाला मुंबई व परिसरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, तसेच कॅम्पियन , सेंट मेरी, बालमोहन विद्यामंदिर, अंजुमन इस्लाम मुलींची शाळा व गार्डियन स्कुल डोंबिवलीचे विद्यार्थी उपस्थित होते. नॅशनल बुक ट्रस्ट तर्फे या मराठी आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले आहे.
मुंबई, दि. १९ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसाच्या भेटीसाठी मुंबई येथे आगमन झाले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मेट्रो मार्गिका २ अ (दहिसर पूर्व ते डी एन नगर) व मेट्रो मार्गिका ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) चे उद्घाटन करण्यात येणार असून, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २० नवीन ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे देखील उद्घाटन होणार आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सांडपाणी प्रक्रिया, रुग्णालय बांधकाम व पुनर्विकास, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आदी कामांचे भूमिपूजन होणार आहे.
मुंबई दि. 19 जानेवारी 2023:- महावितरणच्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी कंपनी एसएमएस किंवा ऑनलाईन बिले भरण्याची सुविधा सुरक्षित असेल याची दक्षता घेत असते. ग्राहकांनी महावितरणची कार्यपद्धती समजून घ्यावी. ग्राहकांनी अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या बनावट मेसेजना बळी पडू नये व वीजग्राहकांना लुटणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध रहावे, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले.
ते म्हणाले की, बनावट संदेश पाठवून खासगी व सार्वजनिक वीज कंपन्यांच्या ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या बातम्या आहेत. फसवणूक रोखण्यासाठी ग्राहकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. महावितरण नियमितपणे ग्राहकांना जागृत करण्यासाठी विविध माध्यमातून माहिती देत असते. ग्राहकांनी त्याची नोंद घ्यावी तसेच इतरांनाही सावध करावे.
बनावट संदेशाद्वारे होणारी फसवणूक कशी रोखता येईल याबाबत महावितरणने कंपनीच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे तसेच महावितरणच्या ॲपवर माहिती दिली आहे. महावितरणकडून ग्राहकांना जो एसएमएस पाठविला जातो त्यामध्ये मेसेज पाठविणाऱ्याचा नावात स्पष्टपणे एमएसईडीसीएल असा कंपनीचा उल्लेख असतो. महावितरण कधीही खासगी क्रमांकावरून एसएमएस किंवा व्हॉट्स ॲप संदेश पाठवत नाही. महावितरणची बिले ऑनलाईन भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवर सुविधा असून लाखो ग्राहक तिचा वापर करत आहेत. पण महावितरण बिलासाठी एखाद्या नंबरवर अधिकाऱ्यास संपर्क साधण्यास सांगत नाही. महावितरण कोणालाही फोनवरून ओटीपी विचारत नाही.
सायबर भामट्यांकडून पाठवलेल्या वैयक्तिक नंबरवर ग्राहकाने संपर्क साधला तर त्याला त्याच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा ताबा घेता येईल असे एनीडेस्क किंवा तत्सम ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते किंवा एखादी बनावट लिंक पाठविली जाते. त्याचा वापर करून भामटे ग्राहकाची बँकेविषयीची गोपनीय माहिती चोरतात आणि फसवणूक करतात. ग्राहकांनी ओटीपी शेअर केला नाही तर फसवणूक रोखण्यास मदत होईल.
ग्राहकाने वीजबिल थकविले तर त्याचा वीजपुरवठा पूर्वसूचना देऊन खंडित करण्याची महावितरणची नियमित पद्धती आहे. ताबडतोब बिल भरा नाहीतर रात्री वीजपुरवठा खंडित करू असे धमक्या दिल्यासारखे संदेश महावितरण कधीही पाठवत नाही.
महावितरणचे तक्रार नोंदविण्याचे टोल फ्री क्रमांक 1800-233-3435 तसेच 1800-212-3435 असा अकरा आकडी वेगळे क्रमांक आहेत. त्यावर मोफत फोन करता येतो. महावितरण कधीही ग्राहकांना एखाद्या व्यक्तीच्या खासगी मोबाईल क्रमांकावर फोन करण्यास सांगत नाही.
आर्थिक फसवणुकीच्या हेतूने वीज ग्राहकांना बनावट मेसेज पाठविण्यात येत असल्याचे निदर्शनात आल्यापासून महावितरणने त्याविरोधात कारवाईसाठी एक वर्षापेक्षा अधिक काळापासून अनेक पावले उचलली आहेत.
महावितरणच्या ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात कंपनीच्या मुख्य कार्यालयाने तसेच प्रादेशिक कार्यालयांनी राष्ट्रीय सायबर अपराध रिपोर्टिंग पोर्टलवर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात तक्रार नोंदविली होती. तसेच मुंबईत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सायबर पोलीस ठाण्यात जानेवारी २०२२ मध्ये फिर्याद दाखल केली होती व त्यानुसार पोलिसांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये एका आरोपीला झारखंड राज्यातून अटक केली होती तसेच त्याच्या साथीदाराला ऑक्टोबर महिन्यात अटक केली होती. फसवणुकीच्या संदर्भात पोलीस कारवाई करत आहेत.
महावितरणच्या ग्राहकांची सायबर भामट्यांकडून फसवणूक झाल्याचे समजले तर स्थानिक पोलीसांकडे पाठपुरावा करावा, अशी सूचना सर्व कार्यालयांना देण्यात आली आहे.
पुणे, दि. १९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, भोर या शासकीय वसतिगृहासाठी भोर मुख्यालयापासून ३ कि.मी. अंतरामध्ये खाजगी जागा खरेदी करावयाची असून इच्छूक जमीन मालकांनी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शासकीय वसतिगृहासाठी कमीत कमी एक एकर ते जास्तीत जास्त दोन एकराच्या मर्यादेत जागा खरेदी करण्यात येणार आहे. इच्छुक जमीन मालकांनी आपल्या वैयक्तिक अथवा संयुक्त मालकीची खाजगी जमीन विकण्यास तयार असल्यास त्यांनी जागेचा सन १९३० ते २०२२ पर्यंतचे ७/१२ उतारे, सर्व फेरफार, झोन दाखला, मोजणी क प्रत, कलर झोनिंग, भाग नकाशा, गट नकाशा, अॅक्विझेशन, रिक्विझेशन नसल्याबाबत दाखला, वहिवाटीचा रस्ता आदी कागदपत्रे घेऊन सहायक आयुक्त समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन स.नं.१०५, १०४, विश्रांतवाडी रोड, येरवडा स्टेशनसमोर, येरवडा, पुणे येथे संपर्क साधावा असे आवाहन, सहायक आयुक्त समाजकल्याण संगिता डावखर यांनी केले आहे.
पुणे दि.१९: जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या मार्गिकेसाठी आवश्यक भूसंपादनाची १०० टक्के कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून रेल्वेलाईनचे कामही अंतिम टप्प्यात आहे. दुहेरी मार्गावरुन रेल्वेवाहतूक सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, व्यापारी, नोकरदारांसाठी गतीमान प्रवासाची सोय होणार असून परिसरातील अर्थविकासाला चालना मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला.
पुणे- मिरज रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या मार्गिकेची एकूण २८० कि. मी. पैकी पुणे जिल्ह्यातील बाधित लांबी ३५ कि.मी. इतकी आहे. यासाठी जिल्ह्यातील १४ गावातील एकूण १८ हेक्टर जमीनीची आवश्यकता होती. यात पुरंदर तालुक्यातील आंबळे, बेलसर, धालेवाडी, दौंडज, पिंपळे खुर्द, वाल्हा, पिसुर्टी, थोपटेवाडी, जेजुरी ही ९ गावे, हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, फुरसुंगी आणि वळती ही तीन तर दौण्ड तालुक्यातील डाळींब व ताम्हणवाडी या दोन गावांचा समावेश आहे.
भूसंपादन करण्यात आलेल्यापैकी १३.१० हे. आर खासगी जमीन होती. तर ०.३४७५ हे. आर सरकारी जमीन तर ४.५५ हे. आर वनजमीन हस्तांतरीत करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी भूसंपादन समन्वय प्रविण साळुके यांनी सातत्याने समन्वय राखत भूसंपादन कार्यवाहीला गती दिली. दौण्ड- पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड तसेच हवेली उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांनी भूसंपादनाची कार्यवाही ८ महिन्यातच पूर्ण केली. त्यामुळे प्रकल्पाच्या कार्यवाहीला गती मिळाली. महसूल, वनविभाग, रेल्वे तसेच नगररचना व मुल्यांकन विभागांच्या योग्य समन्वयामुळे रेल्वेला या जमिनीचा ताबा गतीने देता आला.
रेल्वे विभागाने विस्तारीकरणासाठी आवश्यक जमिनीचा ताबा पूर्वीच घेऊन काम जवळपास पूर्ण केले आहे. पुणे/घोरपडी- सासवड रोड, सासवड रोड- फुरसुंगी, फुरसुंगी- आळंदी, दौंडज- वाल्हा, आळंदी- शिंदवणे, आंबळे- राजेवाडी, राजेवाडी- जेजुरी, जेजुरी- दौंडज आणि वाल्हा- निरा या ब्लॉक सेक्शनमधील कामे जवळपास शंभर टक्के पूर्ण झाली आहेत. भराव, लहान-मोठे पूल, रेल्वे ओलांडणी पूल, अंडरपास इत्यादी कामे प्रगतीपथात आहेत, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.
जमीनमालकांना ४७ कोटी रुपयांचा मोबदला या प्रकल्पासाठी खासगी जमीन वाटाघाटीने खरेदी करण्याची प्रक्रिया जून २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात आली. उर्वरित खासगी जमीन सक्तीने संपादित करण्याची प्रक्रिया जुलै २०२२ पासून गतीने राबविली. २० ऑक्टोबरपर्यंत ६ गावांची भूसंपादनाची अधिसूचना जारी करुन अंतिम निवाडे ३० नोव्हेंबरपर्यंत जाहीर करण्यात आले. राहिलेल्या वाल्हे या एका गावातील जमिनीची भूसंपादनाची अधिसूचना ३० नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आली असून नुकतेच हे निवाडे जाहीर करण्यात आले. या एकूण जमीन खरेदी व भूसंपादनाचा ४७ कोटी ४० लाख रुपयांचा मोबदला जमीनमालकांना देण्यात आला आहे.
दुहेरी रेल्वेलाईनमुळे रेल्वेवाहतूक वेगवान होणार असल्याने त्याचा फायदा दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, नोकरदार, व्यापारी आदींना होणार आहे. महत्वाचे म्हणजे प्रवासाचा वेळ कमी होणार असल्याने शेतमाल तसेच अन्य नाशवंत माल लवकर बाजारपेठेत पोहचल्याने नुकसान कमी होऊन मालाला जास्त दर मिळू शकेल. दुहेरी रेल्वेलाईनमुळे क्रॉसींगसाठीचा वेळ वाचणार असल्याने रेल्वे मार्गावरील गावातील नागरिकांची गैरसोय दूर होईल.
पंतप्रधानांनी आज कर्नाटकातील कोडेकल, यादगीर येथे सिंचन, पिण्याचे पाणी आणि राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाशी संबंधित विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. जल जीवन मिशन अंतर्गत यादगीर बहु-ग्राम पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेची पायाभरणी, सूरत – चेन्नई एक्सप्रेसवे एनएच-150सी च्या 65.5 किमी विभागाचे (बदादल ते मरादगी एस आंदोला) आणि नारायणपूर डाव्या कालव्याचे विस्तार नूतनीकरण आणि आधुनिकीकरण प्रकल्पाचे (एनएलबीसी – ईआरएम) उद्घाटन यांचा या प्रकल्पांमध्ये समावेश आहे.
कर्नाटकातील लोकांचे प्रेम आणि पाठबळ यांचा आवर्जून उल्लेख करत, हे प्रेमच सामर्थ्याचा मोठा स्त्रोत बनल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. यादगीरच्या समृद्ध इतिहासावर प्रकाश टाकत, आपल्या पूर्वजांच्या क्षमतांचे प्रतीक असलेल्या आणि आपली संस्कृती, परंपरा प्रतिबिंबित करणाऱ्या रत्तीहळ्ळीच्या प्राचीन किल्ल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. ज्यांच्या स्वराज्य आणि सुशासनाच्या संकल्पनेची देशभरात दखल घेतली गेली अशा महान राजा महाराजा व्यंकटप्पा नायक यांच्या वारशाचाही त्यांनी उल्लेख केला. “आपल्या सर्वांना या वारशाचा अभिमान आहे” असे पंतप्रधान म्हणाले.
रस्ते आणि पाण्याशी संबंधित तसेच आज पायाभरणी झालेल्या प्रकल्पांचा संदर्भ देत, या प्रकल्पांमुळे या भागातील लोकांना मोठा फायदा होईल असे पंतप्रधान म्हणाले. सुरत चेन्नई कॉरिडॉरच्या कर्नाटकातील भागातही आज कामाची सुरुवात झाली, यामुळे राहणीमान सुलभ होईल आणि यादगीर, रायचूर तसेच कलबुर्गी या प्रदेशात रोजगार आणि आर्थिक विकासकामांना मदत होईल असे ते म्हणाले. उत्तर कर्नाटकातील विकास कामांसाठी पंतप्रधानांनी राज्य सरकारचे कौतुक केले. आगामी 25 वर्षे देशासाठी आणि प्रत्येक राज्यासाठी ‘अमृत काळ’ असल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. “या अमृत काळात आपल्याला विकसित भारत निर्माण करायचा आहे. प्रत्येक व्यक्ती, कुटुंब आणि राज्य या अभियानाशी जोडले जाईल तेव्हाच हे घडू शकेल. शेतातील शेतकरी आणि उद्योजक यांचे जीवन सुधारले की भारताचा विकास होऊ शकतो. चांगले पीक आले आणि कारखान्यांचे उत्पादनही वाढले तर भारताचा विकास होऊ शकतो असे पंतप्रधानांनी सांगितले.
यासाठी भूतकाळातील नकारात्मक अनुभव आणि वाईट धोरणांमधून शिकण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले. उत्तर कर्नाटकातील यादगीरचे उदाहरण देत, देश विकासाच्या वाटेवर असतानाही या प्रदेशाच्या मागासलेपणाबद्दल पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केले. या प्रदेशात क्षमता असूनही, मागील सरकारांनी केवळ यादगीर आणि इतर जिल्ह्यांना मागास म्हणून घोषित करून स्वत:ची जबाबदारीतून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला असे निरिक्षण पंतप्रधानांनी नोंदवले. भूतकाळातील सत्ताधारी सरकारांनी मतपेढीचे राजकारण केले. वीज, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधांकडे लक्ष दिले नाही, त्या काळाची आठवण त्यांनी करुन दिली. सध्याच्या सरकारच्या प्राधान्यक्रमांवर प्रकाश टाकत, या सरकारचे लक्ष केवळ विकासावर आहे, मतपेढीच्या राजकारणावर नाही असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
“विकासाच्या निकषावर जरी देशातील एखादा जिल्हा मागे पडत असेल तरीही देश विकसित होऊ शकत नाही,”पंतप्रधान म्हणाले. सध्याच्या सरकारने देशातील सर्वात मागासलेल्या प्रदेशांकडे प्राधान्याने लक्ष पुरवले आणि यादगीरसह शंभर आकांक्षित गावे अभियानाची सुरुवात केली असे मत त्यांनी नोंदवले.
पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, या भागांमध्ये उत्तम प्रशासन तसेच विकासावर अधिक भर देण्यात आला असून यादगीरमध्ये बालकांचे 100%लसीकरण पूर्ण झाले आहे, येथील कुपोषित बालकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे, जिल्ह्यातील सर्व गावे रस्त्यांनी एकमेकांशी जोडण्यात आली आहेत तसेच डिजिटल सेवा पुरवण्यासाठी ग्राम पंचायतींमध्ये सामान्य सेवा केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत अशी माहिती त्यांनी दिली. “शिक्षण, आरोग्य अथवा दळणवळण असे कोणतेही क्षेत्र असो, यादगीर जिल्ह्याने आकांक्षित जिल्हे कार्यक्रमात उत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या 10 जिल्ह्यांमध्ये नेहमीच आपले स्थान कायम ठेवले आहे,” पंतप्रधान म्हणाले. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी लोक प्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.
एकविसाव्या शतकातील भारताच्या विकासासाठी सीमा, तटवर्ती आणि अंतर्गत सुरक्षा यांच्या बरोबरीने महत्त्वाच्या असणाऱ्या जल सुरक्षेचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “दुहेरी इंजिन सरकार सन्मान आणि एकत्रीकरण यांच्या संयुक्त दृष्टीकोनासह काम करत आहे,” ते म्हणाले. वर्ष 2014 मध्ये प्रलंबित असलेल्या 99 सिंचन योजनांपैकी 50 योजनांचे काम याआधीच पूर्ण झाले असून या योजनांचा विस्तार देखील करण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये देखील, असेच अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. नारायणपूर डावा कालवा- विस्तार, नूतनीकरण आणि आधुनिकीकरण प्रकल्पातील (एनएलबीसी-ईआरएम) 10,000 क्युसेक्स वहन क्षमतेच्या कालव्यामुळे, 4.5 लाख हेक्टर क्षेत्रावर सिंचनाची सोय होणार आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. गेल्या सात-आठ वर्षांमध्ये 70 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र सूक्ष्म-सिंचनाच्या कक्षेत आणण्यात आल्यामुळे, पंतप्रधानांनी सूक्ष्म-सिंचन आणि ‘वन ड्रॉप, मोअर क्रॉप’ म्हणजेच प्रत्येक थेंबातून अधिक उत्पादन या संकल्पनांवर अभूतपूर्व लक्ष केंद्रित करण्याबाबत देखील त्यांनी चर्चा केली. आज लोकार्पण झालेल्या प्रकल्पामुळे कर्नाटकमधील 5 लाख हेक्टर क्षेत्राला लाभ होणार असून तेथील भूजलाची पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
दुहेरी इंजिन सरकारच्या काळात पूर्ण करण्यात आलेल्या कामांची उदाहरणे देऊन पंतप्रधानांनी सांगितले की साडेतीन वर्षांपूर्वी जेव्हा जल जीवन अभियानाची सुरुवात झाली त्या वेळी ग्रामीण भागातील अठरा कोटी कुटुंबांपैकी केवळ तीन कोटी कुटुंबांकडे नळाने पाणीपुरवठ्याची सोय होती. “आज ही संख्या 11 कोटीवर पोहोचली आहे,” पंतप्रधान सांगत होते, “यापैकी 35 लाख कुटुंबे कर्नाटकातील आहेत.” यादगीर आणि रायचूर येथील घरांमध्ये होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे प्रमाण संपूर्ण कर्नाटक आणि देश यांच्या एकंदर सरासरीपेक्षा अधिक आहे याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
आज उद्घाटन करण्यात आलेल्या प्रकल्पांबाबत अधिक माहिती देताना पंतप्रधानांनी,यादगीरमधील प्रत्येक घराला नळाने पाणीपुरवठा करण्याच्या उद्दिष्टाला चालना मिळेल ही बाब अधोरेखित केली.एका अभ्यासाअंती असे दिसून आले आहे की भारताच्या जल जीवन अभियानाच्या प्रभावामुळे दर वर्षी सव्वा लाखाहून अधिक मुलांचे जीव वाचणार आहेत अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. हर घर जल अभियानाच्या लाभांची नोंद घेत पंतप्रधानांनी हे ठळकपणे नमूद केले की, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देते, कर्नाटक राज्य सरकार त्यात चार हजार रुपयांची भर घालत असल्याने शेतकऱ्यांचा दुप्पट फायदा होतो. “यादगीरमधील सुमारे सव्वा लाख शेतकरी कुटुंबांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 250 कोटी रुपये देण्यात आले आहेत,” ते पुढे म्हणाले.
दुहेरी इंजिन सरकारच्या उपयुक्ततेचा अधिक विस्तार करत, पंतप्रधान म्हणाले की, केंद्राने नवे शैक्षणिक धोरण जाहीर केलेले असताना, कर्नाटक सरकार विद्या निधी योजनेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना मदत करत आहे, केंद्राने प्रगतीच्या चक्राला गती दिलेली असताना, गुंतवणूकदारांना हे राज्य अधिक आकर्षक वाटावे म्हणून कर्नाटक सरकार प्रयत्न करत आहे. “केंद्र सरकारने विणकरांना मुद्रा योजनेतून दिलेल्या मदतीमध्ये अधिक मदतीची भर घालून कर्नाटक सरकारने त्यांना जास्त फायदा करून दिला आहे,” ते पुढे म्हणाले.
देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे होऊनदेखील कोणी व्यक्ती, वर्ग किंवा प्रदेश वंचित राहिला असेल तर सध्याचे सरकार त्यांना मदत करण्याला सर्वोच्च प्राधान्य देईल हा मुद्दा पंतप्रधानांनी अधोरेखित केला. आपल्या देशातील कोट्यवधी शेतकरी देखील अनेक दशके सोयीसुविधांपासून वंचित राहिले होते आणि त्यावर उपाय योजण्यासाठी सरकारी धोरणांच्या माध्यमातून देखील कोणतेही प्रयत्न केले जात नव्हते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज हा लहान शेतकरी म्हणजे देशाच्या कृषी धोरणात सर्वोच्च प्राधान्य दिला गेलेला घटक आहे.
शेतकऱ्यांना यंत्रसामग्रीचा पुरवठा करून सहाय्य करणे, त्यांना ड्रोनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाकडे नेणे, नॅनो युरिया सारखी रासायनिक खते देणे, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे, छोट्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देणे, आणि पशुसंवर्धन, मत्स्यपालन आणि मधमाशी पालनासाठी मदत उपलब्ध करणे, ही उदाहरणे पंतप्रधानांनी दिली.
या प्रदेशाला डाळीचा वाडगा (पल्स बोल) बनवून, या क्षेत्रातील परकीय अवलंबित्व कमी करण्यासाठी देशाला मदत केल्याबद्दल पंतप्रधानांनी स्थानिक शेतकऱ्यांची प्रशंसा केली. गेल्या 8 वर्षांत किमान आधारभूत मूल्याने (एमएसपी) 80 पट अधिक डाळ खरेदी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कडधान्यांचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी गेल्या 8 वर्षांमध्ये 60 हजार कोटी रुपयांची कमाई केली असून, 2014 पूर्वी ती केवळ काही शे कोटी रुपये इतकी होती.
संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केल्याची माहिती देत, पंतप्रधानांनी नमूद केले की, कर्नाटक मध्ये ज्वारी आणि नाचणीसारख्या भरड धान्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. या पौष्टिक भरड धान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि त्याचा जगभरात प्रचार करण्यासाठी डबल इंजिन सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हा उपक्रम पुढे नेण्यात कर्नाटक मधील शेतकरी आघाडीची भूमिका बजावतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
कर्नाटकमधील संपर्क सक्षमतेच्या (कनेक्टिव्हिटी) बाबतीत डबल इंजिन सरकार जेवढे फायद्याचे आहे, तेवढेच ते कृषी, उद्योग आणि पर्यटन या क्षेत्रांसाठी देखील आहे हे पंतप्रधानांनी नमूद केले, आणि सूरत-चेन्नई आर्थिक मार्गिका पूर्ण झाल्यावर उत्तर कर्नाटकातील मोठ्या भागांना होणारे फायदे त्यांनी अधोरेखित केले. देशवासियांना उत्तर कर्नाटकातील पर्यटन स्थळे आणि तीर्थक्षेत्रांपर्यंत पोहोचणे देखील सोपे होईल, ज्यामुळे युवा वर्गासाठी हजारो नवीन रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. डबल इंजिन सरकारने पायाभूत सुविधा आणि सुधारणांवर अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे कर्नाटक गुंतवणूकदारांसाठी पसंतीचे ठिकाण ठरत आहे”, पंतप्रधान म्हणाले. भारतात गुंतवणूक करण्यासाठी जगभरातील उत्साहामुळे अशा गुंतवणुकी भविष्यात आणखी वाढणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
यावेळी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा आणि कर्नाटक सरकारचे मंत्री उपस्थित होते.
पार्श्वभूमी:
सर्व कुटुंबांना वैयक्तिक घरगुती नळ जोडणीद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा पंतप्रधानांचा दृष्टीकोन साकार करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल म्हणून, यादगीर जिल्ह्यातील कोडेकल येथे जल जीवन मिशन अंतर्गत यादगीर बहु-ग्राम पेयजल पुरवठा योजनेची पायाभरणी करण्यात आली. या योजनेअंतर्गत 117 एमएलडीचे जलशुद्धीकरण केंद्र बांधले जाईल. 2050 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा हा प्रकल्प, यादगीर जिल्ह्यातील 700 पेक्षा जास्त ग्रामीण वस्त्या आणि तीन शहरांमधील सुमारे 2.3 लाख कुटुंबांना पिण्यासाठी सुरक्षित पाणी पुरवेल. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी नारायणपूर डावा किनारी कालवा-विस्तारीकरण, नूतनीकरण आणि आधुनिकीकरण (NLBC – ERM) प्रकल्पाचे उद्घाटन केले. या प्रकल्पा अंतर्गत,10,000 क्युसेक क्षमतेच्या कालव्या द्वारे, त्याच्या क्षेत्रातील 4.5 लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन करता येईल. कलबुर्गी, यादगीर आणि विजयपूर जिल्ह्यातील 560 गावांतील तीन लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 4700 कोटी रुपये आहे.
पंतप्रधानांनी राष्ट्रीय महामार्ग, NH-150C च्या 65.5 किमी पट्ट्याच्या प्रकल्पाचीही पायाभरणी केली. 6 मार्गिकांचा हा ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्प सूरत -चेन्नई द्रुतगती महामार्गाचा भाग आहे. त्यासाठी अंदाजे 2000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज अहमदाबाद-धोलेरा दरम्यान विकसित केल्या जात असलेल्या द्रुतगती महामार्गाची पाहणी केली. हा 109 किमी लांबीचा महामार्ग, 4200 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे.
हा मार्ग, अहमदाबाद आणि धोलेरा यांच्यादरम्यानचा एक महत्वाचा मार्ग असून, तो धोलेरा आणि अहमदाबाद मधल्या अनेक विशेष गुंतवणूक क्षेत्रांना जोडतो. ह्या द्रुतगती मार्गामुळे, अहमदाबाद आणि धोलेरा दरम्यानचा प्रवास वेगवान होणार असून, त्यामुळे, प्रवासासाठी लागणारा वेळ, सुमारे एक तासाने ( सध्या हा वेळ,सुमारे सव्वा दोन तास इतका लागतो) कमी होणार आहे. तसेच, यामुळे, धोलेरा इथल्या विमानतळावर देखील थेट पोहोचता येणार आहे.
हा मार्ग नवागाम इथं धोलेरा आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गे सरखेजला जोडला जातो. तसेच सरदार पटेल रिंग रोडला धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्राशी (SIR)जोडतो. हा द्रुतगती मार्ग अहमदाबाद आणि धोलेरा येथील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठीही उपयुक्त ठरेल.
१९जानेवारी , पुणे – आयआयएचएम (इंटरनॅशनलइन्स्टिट्यूटऑफहॉटेलमॅनेजमेंट) च्या यंगशेफऑलिम्पियाड (वायसीओ) २०२३ तर्फे पुण्यात आज यंग शेफ ऑलिम्पियाडची घोषणा करण्याच्या हेतूने एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात होते. यंग शेफ ऑलिम्पियाड च्या ९ व्या पर्वाचे यजमान पद या वर्षी भारताला मिळाले असून जगभरांतील ६० देशांतून आलेल्या शेफ्स चा यावेळी गौरव करण्यात येणार आहे. या मंचाच्या माध्यमातून जगभरांतील नवोदित शेफ्स ना त्यांची कला सादर करण्याची संधी प्राप्त होणार असून त्याच बरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून खाद्य जगताची सफर घडवण्याचीही संधी त्यांना मिळणार आहे. इंडिजस्मार्ट ग्रुपचा भाग असलेल्या आयआयएचएमतर्फेआणिइंटरनॅशनलहॉस्पिटॅलिटीकाऊन्सिल, यूकेयांच्यासंयुक्तविद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
स्पर्धेची पहिली फेरी हीदिल्ली, बंगलोर, पुणे, हैद्राबादआणिगोवा येथे २ दिवस सुरु असेल. त्यानंतर सर्व देश हे शहरांची सांस्कृतिक राजधानी असलेल्या कोलकात्या कडे ग्रान्ड फिनाले, प्लेट ट्रॉफी आणि डॉ. बोस चॅलेंज ट्रॉफी साठी प्रयाण करतील. पुण्याच्यापहिल्याफेरीतफ्रान्स, सौदीअरेबिया, इंग्लंड, बोट्सवाना, इजिप्प, नेदरलँड्स, ओमान, युगांडा, टर्कीआणिथायलंड हे देश भाग घेतील. ९ व्या इंटरनॅशनल वायवीओ मध्ये जगभरांतील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात कार्यरत असलेले प्रतिथयश शेफ्स परिक्षक म्हणून काम पहाणार आहेत, यामध्ये क्राफ्ट गिल्ड ऑफ शेफ्स,यूके आणि इंग्लंड मधील लंडन येथील रॉयल गार्डन हॉटेल चे माजी एक्झिक्युटिव्ह शेफस्टीव्हमुंकली, भारतातील इंडिगो चे संस्थापक आणि रेस्ट्रॉरेटर,मास्टर शेफराहूलअकेरकर, इंग्लंड मधील वेस्टमिन्स्टर किंग्जवे कॉलेज च्या कुलिनरी आर्ट्स चे प्रोग्राम ॲन्ड ऑपरेशनल मॅनेजर शेफपॉलजर्व्हिस, कार्डिफ ॲन्ड वेल कॉलेज चे सिनियर शेफ लेक्चररजॉनक्रोकेट्टआणि ई हॉटेलियर अकादमी चे डीन पीटरएजोन्स यांचा समावेश असून ते पुण्यातील स्पर्धेचे परिक्षण करतील.
या परिषदेत यंग शेफ ऑलिम्पियाड २०२३ विषयी माहिती देतांना वायसीओग्लोबलकाऊन्सिलचेचेअरमनआणिइंटरनॅशनलहॉस्पिटॅलिटीकाऊन्सिल, लंडनचेचेअरमनतसेचइंडिस्मार्टग्रुपचेसंस्थापकआणिचीफमेंटरडॉ. सुब्रोनोबोस यांनी सांगितले “ वायसीओहाअनेकदेशातीलवैविध्यपूर्णखाद्यसंस्कृतींनाएकाचछताखालीआणूनखाद्यसवयीतीलवैविध्याचाआनंदघेण्यासाठीअसलेलाअनोखामंचआहे. याकार्यक्रमाचाशाश्वतताहाविषयअसल्यानेतरुणांनायामाध्यमातूनआंतरराष्ट्रीयपाककलांनाजाणूनत्यांचीकौशल्येहीआंतरराष्ट्रीयस्तरावरीलदेशांनादाखवण्याचीसंधीमिळणारआहे. हीस्पर्धाम्हणजेतरुणाई, मैत्रीआणिसर्वसमावेशकतादर्शवण्याचीहीसंधीआहे.”
रविवार दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी नवी दिल्ली येथे स्वागत आणि उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला असून सोमवार ३० जानेवारी २०२३ पासून स्पर्धेची सुरुवात होणार आहे. स्पर्धेची पहिली फेरी ही दोन दिवस दिल्ली, बंगलोर, पुणे, हैद्राबाद आणि गोवा येथे होणार असून त्यानंतर सर्व देश हे शहरांची सांस्कृतिक राजधानी कोलकाता येथे ग्रांण्ड फिनाले, प्लेट ट्रॉफी आणि डॉ. बोस चॅलेंज ट्रॉफी करता प्रयाण करतील. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ग्राण्ड फिनाले मध्ये पहिल्या फेरीतील आघाडीचे १० स्पर्धक भाग घेतील. त्याच बरोबर ११ ते २० वे स्थान पटकावणारे पुढील १० स्पर्धकांची घोषणा होईल आणि ते शुक्रवार ३ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात येणार्या वायसीओ प्लेट ट्रॉफी साठीच्या स्पर्धेत भाग घेतील. उर्वरीत स्पर्धकांना त्यांच्या पाककलेतील कौशल्यांसह स्पर्धा करण्याची अनोखी डॉ. बोस चॅलेंज च्या माध्यमातून प्राप्त होणार आहे.
युनायटेड वर्ल्ड ऑफ यंग शेफ चे आयोजन १ फेब्रुवारी २०२३ रोजी कोलकाता येथील आयआयएचएम ग्लोबल कॅम्पस येथे संध्याकाळी ६.३० ते ८.३० दरम्यान करण्यात येणार असून यावेळी विशेष रुपाने तयार करण्यात आलेल्या काऊंटर्स वर राष्ट्रीय ध्वजासह परंपरागत वस्तूंसह पदार्थ ठेवण्यात येणार आहेत. प्रत्येक चमूला तयार करण्यात आलेल्या पदार्थांचे १२ सँम्पल्स समोर ठेवायचे आहेत. हा कार्यक्रम विशेष असून यामध्ये भारतातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करणारे दिग्गज तसेच विशेष निमंत्रित उपस्थित राहणार आहेत, यामध्ये ॲम्बेसेडर्स आणि हाय कमिशनर्स, मोठे व्यावसायिक, सेलिब्रिटीज, कॉर्पोरेट शेफ्स, एक्झिक्युटिव्ह शेफ्स, माध्यमे आणि इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी काऊन्सिल चे सदस्य, वायसीओ परिक्षकांचे मंडळ, सेलिब्रिटी शेफ्स इत्यादी अनेकांचा समावेश आहे.
● प्रमुख परिक्षक आणि मार्गदर्शक- आयकॉनिक पद्मश्री शेफ संजीव कपूर
● प्रमुख परिक्षक- शेफ ब्रायन टर्नर सीबीई, शेफ रेस्ट्रॉरंटर, टिव्ही सेलिब्रिटी शेफ आणि लेखक, रॉयल अकादमी ऑफ कुलिनरी चे अध्यक्ष, सिटी गिल्ड्स ऑफ लंडन इन्स्टिट्यूट चे फेलो, बोक्युस डी ऑर यूके चे अध्यक्ष
· एक्सयूव्ही४०० ईसी आणि एक्सयूव्ही४०० ईएल हे दोन प्रकार आणि रंगांचे पाच आकर्षक पर्याय; ऑल-इलेक्ट्रिक एक्सयूव्ही४०० ची एक्स-शोरूम किंमत १५.९९ लाख रुपयांपासून पुढे आहे.
· एक्सयूव्ही४०० ईएल मध्ये ३९.४ केडब्ल्यूएच क्षमतेची लिथियम-आयओएन बॅटरी असून, याची एमआयडीसी रेन्ज ४५६ किमीपर्यंत आहे. यासोबत ७.२ केडब्ल्यू क्षमतेचा चार्जर दिला जातो.
· एक्सयूव्ही४०० ईसी मध्ये ३४.५ केडब्ल्यूएच क्षमतेची लिथियम-आयओएन बॅटरी असून, याची एमआयडीसी रेन्ज ३७५ किमीपर्यंत आहे. यासोबत ३.३ केडब्ल्यू आणि ७.२ केडब्ल्यू असे चार्जरचे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
· नॉन-लक्झरी सेगमेंटमधील सर्वात वेगवान ऍक्सिलरेशन; फक्त ८.३ सेकंदात ० ते १०० केएमपीएच वेग घेऊ शकते, सर्वाधिक वेग १५० केएमपीएच.
· लॉन्च केल्यापासून अवघ्या वर्षभरात २०,००० गाड्या ग्राहकांना सुपूर्द करण्याची योजना.
· शुभारंभाची किंमत प्रत्येक प्रकारच्या गाडीच्या पहिल्या ५,००० बुकिंग्ससाठी लागू राहील.
· बुकिंगची सुरुवात २६ जानेवारी २०२३ पासून.
· पहिल्या टप्प्यात ३४ शहरांमध्ये लॉन्च होणार.
· एक्सयूव्ही४०० ईएलच्या डिलिव्हरीज मार्च २०२३ मध्ये तर एक्सयूव्ही४०० ईसीच्या डिलिव्हरीज दिवाळीमध्ये.
मुंबई: भारतात एसयूव्ही सेगमेंटची प्रवर्तक, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने २०२२ मध्ये जागतिक इव्ही दिनी आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही, मौज आणि वेग दोन्ही देणाऱ्या एक्सयूव्ही४०० च्या किमतीची आज घोषणा केली. इलेक्ट्रिक क्रांतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार खरेदीदारांसाठी एक्सयूव्ही४०० डिझाईन व इंजिनीयर करण्यात आली आहे. इलेक्ट्रिफिकेशनच्या मार्गावर सुरु असलेल्या महिंद्राच्या वाटचालीला वेगवान बनवण्याची क्षमता असलेल्या या ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्हीची किंमत १५.९९ लाखांपासून पुढे आहे.
या गाडीचे एक्सयूव्ही४०० ईसी आणि एक्सयूव्ही४०० ईएल हे दोन प्रकार उपलब्ध असून प्रत्येक प्रकारच्या गाडीच्या पहिल्या ५,००० बुकिंग्ससाठी शुभारंभाची किंमत लागू आहे. लॉन्च केल्यापासून पहिल्या वर्षभरात एक्सयूव्ही४००ची २०,००० युनिट्स ग्राहकांना सुपूर्द करण्याचे लक्ष्य महिंद्राने आखले आहे. ऑटोमोटिव्ह-ग्रेड सेमीकंडक्टर्सच्या मागणी व पुरवठ्यातील संरचनात्मक तफावत आणि बॅटरी पॅक्सची उपलब्धता ही सर्व आव्हाने विचारात घेऊन हे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
अतिशय तेजस्वी असा कॉपर ट्वीन पीक लोगो असलेली एक्सयूव्ही४०० ही महिंद्राची पहिली इव्ही आहे. या लोगोमुळे रस्त्यावर या गाडीची शान आणि प्रभाव अतिशय अनोखा असेल. या गाडीचे दोन प्रकार उपलब्ध आहेत – एक्सयूव्ही४०० ईएलमध्ये ३९.४ केडब्ल्यूएच बॅटरी आणि एक्सयूव्ही४०० ईसीमध्ये ३४.५ केडब्ल्यूएच बॅटरी आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये रंगांचे पाच आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत – आर्क्टिक ब्ल्यू, एव्हरेस्ट व्हाईट, गॅलॅक्सी ग्रे, नापोली ब्लॅक आणि इन्फिनिटी ब्ल्यू सोबत सॅटिन कॉपरच्या ड्युएल टोनचा पर्याय देखील उपलब्ध आहे. महिंद्रा अँड महिंद्राच्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीसोबत ३ वर्षे/अमर्याद किमी इतकी स्टॅंडर्ड वॉरंटी देण्यात येत आहे. शिवाय बॅटरी व मोटरसाठी ८ वर्षे किंवा १,६०,००० किमी (यापैकी जे आधी संपेल तोपर्यंतची) वॉरंटी देण्यात येत आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटोमोटिव्ह सेक्टरचे प्रेसिडेंट श्री. वीजय नाक्रा म्हणाले, “एक्सयूव्ही४०० चे लॉन्च हा महिंद्राच्या इलेक्ट्रिक एसयूव्ही वाटचालीतील एक संस्मरणीय टप्पा आहे. उत्तम कामगिरी, डिझाईन, जागा, तंत्रज्ञान आणि अतिशय आकर्षक किंमत यांचा सुयोग्य मिलाप म्हणजे एक्सयूव्ही४००.पर्यावरणस्नेही, शाश्वत भवितव्य निर्माण करण्यात योगदान देण्यासाठी उत्सुक असलेल्या ग्राहकांसाठी आम्ही हा ब्रँड विकसित केला आहे. आम्हाला पक्की खात्री आहे की, आमची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतातील अधिकाधिक ग्राहकांना इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी प्रेरित करेल. भारतात पर्यावरणस्नेही मोबिलिटी सुविधा विकसित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला यामुळे अधिक बळ मिळाले आहे.”
ऑल-इलेक्ट्रिक एक्सयूव्ही४०० विकसित करण्याबाबत महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी अँड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट विभागाचे अध्यक्ष श्री. आर. वेलूसामी यांनी सांगितले, “एक्सयूव्ही४०० ची बांधणी अतिशय मजबूत जीएनसीएपी ५ स्टार रेटेड एक्सयूव्ही३०० प्लॅटफॉर्मवर करण्यात आली असून ही सर्वात रुंद सी-सेगमेंट एसयूव्ही आहे, जी प्रवाशांना श्रेणीतील सर्वोत्तम सुरक्षितता आणि आराम मिळवून देते. महिंद्राच्या सखोल संशोधन व विकास क्षमतांचा आम्ही यामध्ये उपयोग करवून घेतला आहे. जगभरात अतिशय टोकाच्या हवामानांमध्ये आम्ही या गाडीच्या चाचण्या केल्या आहेत, गाडीच्या वेगवान चार्जिंग कॉम्पॅटिबिलिटीची चाचणी विविध भूप्रदेशांमध्ये घेण्यात आली आहे. प्रवाशांना या गाडीमध्ये अमर्याद अनुभव घेता यावेत हा आमचा उद्देश आहे. अतुलनीय ऍक्सिलरेशन क्षमता हे एक्सयूव्ही४०० चे खास वैशिष्ट्य आहे. या श्रेणीमध्ये प्रथमच सादर केल्या जात असलेल्या मल्टी-मोड वैशिष्ट्यासह भरपूर रोमांच अनुभवण्याची संधी यामध्ये मिळत आहे. सिंगल पेडल आणि स्मार्ट स्टीयरिंग सिस्टिमसह अखंडित ड्रायव्हिंगची सुविधा ही गाडी प्रदान करते. आपल्या जीवनशैलीमध्ये जराही तडजोड न करता देखील इव्ही वापरता येते आणि पर्यावरणपूरक मोबिलिटीचे भविष्य देखील मौजमजेने परिपूर्ण आहे हे आम्ही एक्सयूव्ही४०० मधून दाखवून दिले आहे.”
नॉन-लक्झरी सेगमेंटमधील सर्वात वेगवान ऍक्सिलरेशन ऑल-इलेक्ट्रिक एक्सयूव्ही४०० मध्ये आहे. अवघ्या ८.३ सेकंदांमध्ये ० ते १०० केएमपीएच वेग गाठण्याची क्षमता या गाडीमध्ये असून तिचा सर्वाधिक वेग १५० केएमपीएच आहे. सी-सेगमेंट एसयूव्ही कॅटेगरीमधील एक्सयूव्ही४०० ची लांबी ४२०० एमएम असून व्हीलबेस २६०० एमएम आहे. यामुळे प्रवाशांना प्रशस्त मोठी केबिन आणि सुविधाजनक लेगरूमचा अनुभव घेता येतो. इतकेच नव्हे तर याची बूट स्पेस देखील श्रेणीमध्ये सर्वोत्तम ३७८ लिटर/४१८ लिटर (छतापर्यंत) आहे. एक्सयूव्ही४०० ची पॉवर ११० केडब्ल्यू (१५० पीएस) आणि ३१० एनएम टॉर्क दोन्ही या सेगमेंटमधील सर्वात जास्त आहे. यामध्ये ३९.४ केडब्ल्यूएच आणि ३४.५ केडब्ल्यूएच इतक्या उच्च क्षमतेच्या लिथियम-आयओएन बॅटरी आहेत, ज्यामुळे इंडियन ड्रायव्हिंग सायकल स्टँडर्ड्सनुसार (एमआयडीसी) अनुक्रमे ४५६ किमी आणि ३७५ किमी इतकी रेन्ज मिळते. एक्सयूव्ही४०० ही अस्सल महिंद्रा एसयूव्ही आहे, एक इलेक्ट्रिक गाडी म्हणून याचे डायनामिक्स आणि पर्यावरणस्नेही वैशिष्ट्यांमध्ये ‘महिंद्रा एसयूव्ही‘ पण पुरेपूर आढळून येते.
एक्सयूव्ही४०० च्या ड्राइव्ह मोड्समध्ये स्टीयरिंग, थ्रॉटल आणि रेगेन रिस्पॉन्स अर्थात फन, फास्ट आणि फियरलेस यांचा अनोखा मिलाप आढळून येतो. सिंगल पेडल ड्राइव्ह मोड या सेगमेंटमध्ये सर्वात पहिल्यांदा या गाडीमध्ये आणला गेला आहे, या लाइव्हली मोडमुळे प्रचंड ट्रॅफिकमध्ये देखील अखंडित आणि सहज-सुरळीत ड्रायव्हिंगचा अनुभव घेता येतो. ड्रायव्हिंग सवयींचे गेमिफिकेशन ही या श्रेणीत पहिल्यांदाच उपलब्ध करवून देण्यात आलेल्या सुविधेमुळे इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये साय-फाय मॅक्स रेन्जचा अनुभव घेण्याची मौज मिळवता येते. इतकेच नव्हे तर, थ्रिल-ओ-मीटरवर फन कोशंट मोजता देखील येतो. या गाडीसोबत या उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम धूळ व जल रोधक बॅटरी पॅक आणि आयपी६७ स्टँडर्ड्सचे पालन करणारी मोटर देखील येते.
ऑल-इलेक्ट्रिक एक्सयूव्ही४०० च्या बुकिंगची सुरुवात २६ जानेवारी २०२३ पासून होईल. एक्सयूव्ही४०० ईएलच्या डिलिव्हरीज मार्च २०२३ मध्ये सुरु होतील तर दिवाळीत सणासुदीच्या काळात एक्सयूव्ही४०० ईसीच्या डिलिव्हरीज सुरु होतील. आपल्या जवळच्या डीलरशिपमध्ये जाऊन या ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या शानदार टेस्ट ड्राइव्हचा आनंद घेता येईल. लॉन्चच्या पहिल्या टप्प्यात एकूण ३४ शहरांचा समावेश आहे – अहमदाबाद, सुरत, जयपूर, मुंबई एमएमआर, नाशिक, वेर्णा (गोवा), पुणे, नागपूर, बंगलोर, चेन्नई, त्रिवेंद्रम, कोचीन, हैदराबाद, चंदीगड, दिल्ली एनसीटी, कोलकाता, डेहराडून, कोईम्बतूर, औरंगाबाद, भुवनेश्वर, कोल्हापूर, म्हैसूर, मंगलोर , वडोदरा, पाटणा, कालिकत, रायपूर, लुधियाना, उदयपूर, जम्मू, गुवाहाटी, लखनौ, आग्रा, इंदूर.
*शुभारंभाची किंमत ईसी आणि ईएल या प्रत्येक प्रकारच्या गाडीच्या पहिल्या ५,००० बुकिंग्सना लागू असणार आहे.
एक्सयूव्ही४०० बद्दल माहिती
जबरदस्त कामगिरी
एक्सयूव्ही४०० आपल्या सेगमेंटमधील सर्वोच्च शक्ती ११० केडब्ल्यू (१५० पीएस) आणि ३१० एनएम टॉर्क देते. ३९.४ केडब्ल्यूएच आणि ३४.५ केडब्ल्यूएच इतक्या उच्च क्षमतेच्या लिथियम-आयओएन बॅटरीचे दोन पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत. ही मोटर ३१० एनएम इतका इन्स्टंट टॉर्क निर्माण करते ज्यामुळे ही इलेक्ट्रिक एसयूव्ही फक्त ८.३ सेकंदांमध्ये ० ते १०० केएमपीएच इतका वेग गाठू शकते, हे या सेगमेंटमधील सर्वात वेगवान ऍक्सिलरेशन आहे.
या श्रेणीत पहिल्यांदाच सादर करण्यात येत असलेले मल्टी-ड्राइव्ह मोड (फन, फास्ट आणि फियरलेस) एक्सयूव्ही४००मध्ये आहेत, ज्यामध्ये स्टीयरिंग, थ्रॉटल आणि रेगेन यांचे एकाच वेळी ट्युनिंग केले जाते. लाईव्हली मोड हा याचा सिंगल-पेडल ड्राइव्ह मोड प्रचंड ट्रॅफिकमध्ये असताना देखील अखंडित आणि सहज-सुरळीत ड्रायव्हिंगचा अनुभव मिळवून देतो. या सेगमेंटमध्ये हा मोड पहिल्यांदाच आणला गेला आहे.
दमदार प्रभाव
इलेक्ट्रिफाईंग कॉपर ट्वीन पीक लोगो असलेली महिंद्राची पहिली गाडी हा मान एक्सयूव्ही४०० ला मिळालेला आहे. युवा पिढीच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन, इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या डायनामिक्सकडे विशेष लक्ष पुरवण्यात आले आहे. त्यामुळे एक्सयूव्ही४०० ड्राइव्ह करणे ही एक आगळीवेगळी मौज आहे. या गाडीच्या स्टायलिंगमध्ये अनेक नवीन डिझाईन घटकांचा समावेश आहे. फ्रंट व रियर डिझाईन पूर्णपणे नवीन आहे. एरो फेशियावर तसेच एलईडी टेल-लॅम्प्सवर सॅटिन कॉपर एरोहेड इन्सर्टस यासारखे अनेक बारकावे देखील अतिशय बारकाईने लक्ष देऊन घडवण्यात आले आहेत. प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि विशेष ड्युएल-टोन बॉडी कलरमुळे रस्त्यावर सगळ्या नजरा एक्सयूव्ही४००वरच खिळून राहणार हे नक्की.
२६०० एमएम व्हीलबेस आणि ४२०० एमएम लांबी असल्याने एक्सयूव्ही४०० इव्हीची केबिन अतिशय प्रशस्त आहे. १८२१ एमएम ही एक्सयूव्ही४०० ची रुंदी सी-सेगमेंट इलेक्ट्रिक एसयूव्हीची सर्वात मोठी रुंदी आहे. याची बूट स्पेस ३७८ लिटर/४१८ लिटर (छतापर्यंत) असून ती या श्रेणीतील सर्वोत्तम आहे. बाह्य रूपाप्रमाणेच आत देखील दृढता, क्षमता आणि व्यवहार्यता यांच्यासह उत्तम गुणवत्ता आणि प्रभाव कायम राखण्यात आला आहे. प्रवाशांना अतिशय आरामात प्रवास करता यावा याकडे पुरेपूर लक्ष पुरवण्यात आले आहे. उच्चतम फिनिश गुणवत्ता आणि प्रीमियम मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. या गाडीमध्ये १७.७८ सेमीची इंफोटेन्मेन्ट सिस्टिम आहे जी अतिशय चांगली कनेक्टिव्हिटी आणि अतुलनीय आवाजाचा अनुभव मिळवून देते.
मजबूत तरीही सुबक
एक्सयूव्ही४०० अतिशय मजबूत आणि त्याचवेळी सुबक देखील आहे. आयपी६७ इन्ग्रेससाठी या गाडीला प्रमाणित करण्यात आले आहे, याचा अर्थ असा की बॅटरी व मोटरसाठी याचे जल व धूळ रोधक स्टँडर्ड्स श्रेणीमध्ये सर्वोत्तम आहेत. महिंद्रा एसयूव्ही असल्यामुळे ही गाडी जिंकण्यासाठी आणि ड्राइव्ह करताना अतिशय आनंददायी कामगिरी बजावण्यासाठी तयार करण्यात आली आहे. त्याचवेळी ही गाडी सिंगल-पेडल ड्राइव्ह आहे (लाइव्हली मोड) म्हणूनच शहरातील भरगच्च ट्रॅफिकमध्ये देखील तुम्ही ही गाडी अगदी सहजपणे चालवू शकता. आर१६ डायमंड-कट अलॉय व्हील्स, ऑटो हेडलॅम्प्स, इलेक्ट्रिक सनरूफ आणि इतर अनेक वैशिष्ट्यांमुळे तिची स्टाईल अतिशय उठावदार झाली आहे. आतल्या बाजूला लेदरेट सीट्स, ब्ल्यू स्टिचिंग, लेदर स्टीयरिंग व त्यावर ऑडिओ कंट्रोल्स यामुळे आकर्षकतेमध्ये अधिकच भर पडली आहे.
भविष्यातील साय-फायचा अनुभव आजच घेण्याची संधी
महिंद्राच्या नवीन एक्सयूव्ही४०० मध्ये तुम्ही उद्याचा अनुभव आजच घेऊ शकता. ड्रायव्हिंग सवयींचे गेमिफिकेशन ही या श्रेणीत पहिल्यांदाच उपलब्ध करवून देण्यात आलेल्या सुविधेमुळे इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये साय-फाय मॅक्स रेन्जचा अनुभव घेण्याची मौज मिळवता येते. इतकेच नव्हे तर, थ्रिल-ओ-मीटरवर फन कोशंट मोजता देखील येतो. १७.७८ सेमी इंफोटेन्मेन्ट सिस्टिममध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले आहे तर ब्ल्यूसेन्स प्लसऍप ६० पेक्षा जास्त मोबाईल ऍपच्या साहाय्याने मिळवता येतील अशी कनेक्टेड वैशिष्ट्ये प्रस्तुत करते, यामध्ये जवळपासच्या चार्जिंग पॉईंट्सची माहिती, महिंद्रा सर्व्हिस स्टेशन्स, गाडीचे लोकेशन ट्रॅक करता येण्याची क्षमता आणि इतर अनेक प्रभावी व उपयुक्त वैशिष्ट्ये आहेत. एक्सयूव्ही४०० ही फ्युचर प्रूफ देखील आहे. फर्म वेयरला ओव्हर-द-एअर अपडेट्स मिळवण्याची तरतूद यामध्ये आहे.
जागतिक दर्जाची सुरक्षितता
ऑल इलेक्ट्रिक एक्सयूव्ही४००ची बांधणी पंचतारांकित रेटिंगने गौरवण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मवर करण्यात आली असल्याने एक्सयूव्ही३०० ग्लोबल एनसीएपी रेटिंगमधील सर्व ज्ञान, गुणवैशिष्ट्ये यामध्ये कायम राखण्यात आली आहेत. या गाडीमध्ये श्रेणीतील सर्वोत्तम सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. या गाडीचे फंक्शनल सेफ्टी रेटिंग सर्वोच्च आहे आणि भारतात तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वेहिकलसाठी लागू असलेल्या सर्व आयएसओ स्टँडर्ड्सप्रमाणे ती विकसित करण्यात आलेली आहे. एक्सयूव्ही४०० सोबत करण्यात आलेली सर्व तीव्र क्रॅश सिम्युलेशन्स यशस्वी ठरली. जैसलमेरमध्ये +४७ अंश सेल्सियसपासून दक्षिण कोरियामध्ये -२० अंश सेल्सियसपर्यंत सर्व प्रकारच्या तीव्र हवामानामध्ये या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या काटेकोर चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या गाडीच्या फास्ट-चार्जिंग कॉम्पॅटिबिलिटीची (सीसीएस) चाचणी विविध भूप्रदेशांमध्ये घेण्यात आली आहे, यामध्ये भारत, दक्षिण कोरिया आणि जर्मनी यांचा समावेश होता.
सुरक्षिततेबरोबरीनेच एक्सयूव्ही४०० सर्वसमावेशक सुरक्षा उपकरणांनी सक्षम आहे. यामध्ये सहा एअरबॅग्स आहेत, इलेक्ट्रिक वाहनाच्या मुख्य प्रवाहातील गाड्यांच्या श्रेणीत सहा एअरबॅग्स दिल्या जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. याशिवाय डिस्क ब्रेक्स ऑल राउंड, आयएसओफिक्स सीट्स आणि इतर अनेक सुरक्षितता सुविधांचा या गाडीत समावेश आहे.
भविष्याच्या दिशेने वेगवान, महत्त्वाकांक्षी वाटचाल
इंडियन ड्रायव्हिंग सायकल स्टँडर्ड्सनुसार (एमआयडीसी) ३९.४ केडब्ल्यूएच बॅटरीसह ४५६ किमी आणि ३४.५ केडब्ल्यूएच बॅटरीसह ३७५ किमी इतकी एन्गजायटी-फ्री रेन्ज देण्याचे वचन एक्सयूव्ही४०० मध्ये देण्यात आले आहे. या ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये या उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम धूळ व जल रोधक बॅटरी पॅक आहे ज्यामध्ये आयपी६७ स्टँडर्ड्सचे पालन करण्यात आले आहे. भारतीय स्थिती आणि हवामानांमध्ये उत्तम कामगिरी बजावली जावी यासाठी या हाय-डेन्सिटी बॅटरी पॅकला लिक्विड-कूल करण्यात आले आहे.
मोटरची श्रेणीतील सर्वोत्तम कार्यक्षमता (९८.२%) आणि प्रदीर्घ कालावधीसाठी लॉन्ग-लाईफ ट्रान्समिशन ऑइल-फील्ड असल्याने अगदी निश्चिन्तपणे ही गाडी चालवता येते. डीसी फास्ट चार्जर असेल तर एक्सयूव्ही४०० ची ८०% बॅटरी अवघ्या ५० मिनिटांत चार्ज होते. याशिवाय एक्सयूव्ही४०० ही गाडी कोणत्याही १६ एएमपी प्लग पॉईंटच्या सहाय्याने देखील चार्ज करता येते.
गाडीच्या दोन्ही प्रकारांची थोडक्यात माहिती
एक्सयूव्ही४०० ईसी
एक्सयूव्ही४०० ईएल
कामगिरी· रेन्ज: ३७५ किमी (एमआयडीसी)· बॅटरी: ३४.५ केडब्ल्यूएच· मोटर: ११० केडब्ल्यू (१५० पीएस)· टॉर्क: ३१० एनएमसुरक्षितता· सर्व ४ डिस्क ब्रेक्स· आयएसओफिक्स/चाईल्ड सीट अँकर्स· पीएबी डिऍक्टिव्हेशन स्विच· ३ पॉईंट सीटबेल्ट्सडिझाईन· आर१६ स्टील व्हील्स· हॅलोजन एमएफआर हेडलॅम्प· एलईडी टेललॅम्प्स· सील क्लॅडिंग· व्हील आर्च क्लॅडिंग· स्पॉईलरतंत्रज्ञान· एल-मोड: सिटी असिस्ट (सिंगल-पेडल ड्राइव्ह)· कनेक्टेड कार· इलेक्ट्रिक ऍडजस्ट करता येण्याजोगे ओआरव्हीएम· सिंगल झोन मॅन्युअल एसी· ड्राइव्ह मोड्स (स्टीयरिंग मोड्ससह)आराम आणि सुविधा· फॅब्रिक सीट अपहोल्स्टरी· उंची कमीजास्त करता येईल असे सीटबेल्ट्स· ४ प्रकारे ऍडजस्ट करता येईल अशी ड्रायव्हर सीट· दुसऱ्या रांगेत ६०:४० स्प्लिट
कामगिरी· रेन्ज: ४५६ किमी (एमआयडीसी)· बॅटरी: ३९.४ केडब्ल्यूएच· मोटर: ११० केडब्ल्यू (१५० पीएस)· टॉर्क: ३१० एनएमसुरक्षितता· फॉलो मी होम हेडलॅम्प्स · रिव्हर्स कॅमेरा आणि त्यासोबत अडॅप्टिव्ह गाईडलाईन्स· साईड व कर्टन एअरबॅगडिझाईन· आर१६ अलॉय सोबत डायमंड कट · प्रोजेक्टर हेडलॅम्प सोबत डीआरएल· रूफ रेल्स· डोअर क्लॅडिंगतंत्रज्ञान· १७.७८ सेमी टच स्क्रीन इंफोटेन्मेन्ट· अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले· पुश बटन स्टार्टसह पॅसिव्ह कीलेस एंट्री· ऑटो हेडलॅम्प आणि वायपर· स्मार्ट वॉच कनेक्टिव्हिटी· इलेक्ट्रिक ऍडजस्टेबल आणि फोल्डेबल ओआरव्हीएमआराम आणि सुविधा· लेदरेट सीट्स· अँटी-पिंचसह इलेक्ट्रिक सनरूफ· उंची कमीजास्त करता येईल अशी ड्रायव्हर सीट· रियर वायपर आणि वॉशर· रियर डेमिस्टर· स्टोरेजची व्यवस्था असलेले रियर आर्मरेस्ट· स्टोरेजची व्यवस्था असलेले फ्रंट आर्मरेस्ट
रोजगार मेळ्या अंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या 71,000 जणांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे 20 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता नियुक्तीपत्रे वितरित करणार आहेत. याप्रसंगी पंतप्रधान नवनियुक्तांना संबोधितही करणार आहेत.
रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेने रोजगार मेळा हे एक पाऊल आहे. रोजगार मेळा, रोजगार निर्मितीमधील प्रेरणादायी घटक म्हणून काम करेल तसेच युवावर्गाला त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रविकासात त्यांच्या थेट सहभागासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करेल.
देशभरातून निवडण्यात आलेले नवनियुक्त, भारत सरकारच्या अंतर्गत कनिष्ठ अभियंते, लोको पायलट, तंत्रज्ञ, उप निरीक्षक, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, कनिष्ठ लेखापाल, ग्रामीण डाक सेवक, आयकर निरीक्षक, शिक्षक, नर्स, डॉक्टर, सामाजिक सुरक्षा अधिकारी, स्वीय सहाय्यक-पीए, बहू-उद्देशीय स्टाफ – एमटीएस, अशा विविध स्थानांवर /पदांवर रुजू होतील
अलीकडेच नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांचे, कर्मयोगी प्रारंभ मोड्युल मधून शिकण्यासंबंधीचे अनुभव देखील रोजगार मेळाव्यात होणाऱ्या कार्यक्रमात कथन केले जातील. कर्मयोगी प्रारंभ मोड्यूल म्हणजे विविध सरकारी विभागांतील नवनियुक्तांसाठी ऑनलाईन अभिमुखता (दिशानिर्देश) अभ्यासक्रम आहे.
पुणे : “आचार्य रजनीश अर्थात ओशो हे आमचे श्रद्धास्थान आहे. त्यांच्या समाधीचे दर्शन घेणे हा आमचा संविधानिक अधिकार आहे. त्यांचे छायाचित्र असलेली माळ घालून आश्रमात प्रवेश करण्यास कोणीही मज्जाव करू शकत नाही. मुंबई उच्च न्यायालयानेही समाधीच्या दर्शनापासून कोणत्याही भक्ताला रोखू नये, असे निर्देश दिलेले असतानाही ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनच्या व्यवस्थापनाकडून मुजोरी सुरु आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया ओशो भक्तांच्या वतीने ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनचे माजी विश्वस्त व ‘ओशो वर्ल्ड’चे संपादक स्वामी चैतन्य कीर्ती यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
आचार्य ओशो रजनीश यांच्या ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी ओशोंच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी देशभरातून आश्रमाच्या परिसरात दाखल झालेल्या ओशो भक्तांना आश्रम व्यवस्थापनाकडून (ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन) समाधीस्थळी जाण्यास, तसेच ओशो यांची माळ घालण्यास बंदी घालण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने भक्तांना समाधीचे दर्शन घेण्यापासून रोखता येणार नाही, असा निर्णय दिलेला असतानाही व्यवस्थापनाकडून मुजोरी सुरु आहे. याविरोधात ओशो भक्तांनी गुरुवारी ओशो आश्रमाच्या गेटसमोर निषेध आंदोलन केले. स्वामी चैतन्य कीर्ती यांच्यासमवेत माँ धर्म ज्योती, स्वामी योग सुनील, माँ आरती, स्वामी मनोज व शेकडो ओशो भक्त या आंदोलनात सहभागी झाले. स्वामी चैतन्य कीर्ती म्हणाले, “ओशो यांचा जन्म व मृत्यचे स्थळ, समाधी भारतात आहे. त्यांनी सर्वाधिक काळ भारतात घालवला. मात्र ओशोंची बौद्धिक संपदा, पुस्तके, ध्वनिफिती, दृकश्राव्य फिती, ट्रस्टची मालमत्ता या सर्वांचे मान्यता अधिकार मात्र पाश्चिमात्यांकडे आहेत. झुरीच येथे ओशो इंटरनॅशनलचे मुख्यालय नेण्यात आले असून, सगळ्या गोष्टींचा लाभही तिथेच जात आहे. ओशोंचे विचार लोकांपर्यंत पोहचू न देता भक्तांवर अनेक बंधने लादण्यात येत आहेत. ओशोंच्या बौद्धिक संपदेवर हक्क सांगत त्या साहित्यातून मिळणारा संपूर्ण पैसा बाहेरच्या देशात पळवला जात आहे. भारतीय ओशो आश्रमांना विशेषतः पुण्यातील आश्रमाला त्यातून काहीही उत्पन्न मिळत नाही. उलट ते येथील व्यवस्थापनावर आपले वर्चस्व दाखवत आहेत. आश्रमाच्या मालमत्ता विकण्याचा प्रयत्न होत आहे. हे सर्व ओशोंचे विचार संपविण्याचे षडयंत्र आहे,” असा आरोपही ओशो भक्तांनी यावेळी केला. झुरीच येथून प्रत्येक गोष्टीचे नियंत्रण होत आहे. या सर्व मालमत्तेचा, बौद्धिक संपदेच्या उत्पन्नाचा एकही वाटा भारताकडे येत नसल्याने येथील आश्रमांना व्यवस्थापनाच्या खर्चाचा प्रश्न पडतो. त्यावर तोडगा म्हणून येथील जागा परस्पर बेकायदेशीररित्या विकण्यात येते यावर आमचा आक्षेप आहे. याविषयीचे खटले धर्मादाय आयुक्त व उच्च न्यायालयात सुरु आहेत. त्यांनी भारतीय व्यवस्थापनाला फक्त नामधारक ठेवत आपली बाहुले बनवले आहे. आम्हाला ओशोंनी माळ दिली आहे, या विषयीचे महत्व त्यांच्या अनेक प्रवचनांमध्ये आपल्याला ऐकायला मिळते, मग ती घालू नये असे बंधन घालणारे हे विदेशी कोण?” असा सवालही भक्तांनी विचारला आहे.
पुणे- लोकनियुक्त प्रतिनिधींच्या लोकशाही राजवटीला डावलून आलेली प्रशासक राजवट आता निवडणुकाच वारंवार डावलल्या जाऊ लागल्याने संशयाच्या भोवऱ्यात सापडू लागली आहे. ७४ वी घटनादुरुस्ती , आणि कायदे ,नियम डावलून प्रशासक राजवट लादली जातेय असा मतप्रवाह जनतेत असताना आज पुणे महापालिकेत येऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर यासंदर्भात गंभीर आरोप केलेत .हे दोघेही स्वतःच्या स्वार्थासाठी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ई म्हणजे एकनाथ आणि डी म्हणजे देवेंद्र -यांचे मिळून ई डी सरकार
सुप्रिया सुळे म्हणाल्या, लोकशाहीमध्ये सत्त्तेचे विकेंद्रीकरण करुन कामाचे विभाजन करण्यात आले आहे. मात्र, सध्या सत्तेचे केंद्रीकरण सुरू आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि मनपा निवडणूक सरकारने लवकर घेतल्या पाहिजे . सत्ताधारी हे त्यांच्या फायद्यासाठी लवकर निवडणूक घेत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. प्रशासन नागरिकांना वेळ देत नसल्याने नागरिकांची कामे होत नाहीत. नगरसेवक प्रशासनाकडे दाद मागू शकत नाही.मागील अनेक महिन्यापासून जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी ईडी सरकारकडे करीत आहोत. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी निवडणुका घेत नाही. त्यामुळे सर्व सामान्य नागरिक भरडला जात आहे. नगरसेवक नाहीत त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांनी प्रश्न कोणाकडे घेऊन जायचे. या गोष्टीच उत्तर ईडी सरकारने द्यावे, यावर हे सरकार भूमिका मांडणार नाही. त्यामुळे या ईडी सरकार निषेध व्यक्त करित खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे फडणवीस सरकारचा निषेध नोंदविला.
एकनाथ शिंदे तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना आव्हान देण्याचे काम करत आहेत
एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन आम्ही चालणारे त्यांचे शिवसैनिक आहोत असे सांगून शिवसेना आमची आहे असे सांगणाऱ्या एकनाथ शिंदेंवर सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रहार केला आहे. त्या म्हणाल्या आपल्या हयातीतच बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे आणि आपले उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांची नियुक्ती केली . आणि त्यांच्याकडे सारे सुपूर्त केले. आता एकनाथ शिंदे हे त्याच बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेऊन त्यांच्या विचारांना आव्हान देऊ पाहत आहेत . जर उद्धव ठाकरेंना विरोध होता तर त्यांनी तेव्हाच आपले वेगळे घर करायला हवे होते .
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीबाबत महविकास आघाडी यांची अंतर्गत बैठक होऊन त्यानंतर उमेदवारीबाबत निर्णय घेण्यात येईल असेही त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, केंद्र सरकारच्याच डेटानुसार मागील तीन वर्षात सर्वाधिक स्टार्टअप हे महाराष्ट्रामध्ये सुरू झाले आहे. याकाळात अडीच वर्ष सरकार महविकास आघाडीचे होते. त्यात सर्वाधिक उद्योग पुण्यात सुरू झाले, ही अभिमानाची बाब आहे. मात्र, सध्या पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढलेली असून कोयता गँगची गुन्हेगारी ही मागील तीन ते चार महिन्यात समोर आली आहे. चाकण औद्योगिक परिसरातून कोणता प्रकल्प राज्याबाहेर जात नाही. उद्योजक आनंद महिंद्रा हे त्यांचा प्रकल्प विस्तारित करत आहेत. पुणे हा मोठा जिल्हा असून सक्षम पोलीस यंत्रणा असतानाही गुन्हेगारी वाढलेली आहे.
अब्दुल सत्तार बारामतीत
मंत्री अब्दुल सत्तार हे बारामती दौऱ्यावर येत आहे. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्या घराबाबत बोलल्याशिवाय कोणाची बातमी होत नाही. त्यामुळे आमच्याबद्दल कोणी बोलत असेल तर ते ऐकून घेण्यास आम्ही दिलदार आहे.
नरेंद्र मोदी शिवाय भाजपला पर्याय नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिवाय दुसरा पर्याय नाही. पूर्वी भाजपकडे भक्कम नेत्यांची फळी होती. परंतु तशी फळी आता दिसून येत नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मला काळजी वाटते की, ग्रामपंचायत निवडणूक ते संसद निवडणुकीसाठी त्यांना सर्वत्र पळावे लागत आहे. शिवसेना पक्षाची स्थपना ही बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि त्यांच्या हयातीत दहा वर्षे उद्धव ठाकरे हे उत्तराधिकारी म्हणून निवडले आणि त्यांनी कारभार पहिला. त्यामुळे तुम्हाला वेगळा विचार असेल तर वेगळे पर्याय शोधा आणि त्यानुसार वेगळी वाटचाल करा. दुसऱ्याच्या गोष्टीवर हक्क गाजवू नका, असा टोला सुळे यांनी लगावला.
आरोप सिद्ध केले तर प्रत्येक किंमत मोजण्यास तयार– बृजभूषण सिंह
नवी दिल्ली- जागतिक कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक, सरिता मोरसह ३० जणींनी भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या ‘हुकूमशाही’ विरोधात आघाडी उघडली आहे. सर्व कुस्तीपटू बुधवारपासून दिल्लीच्या जंतर-मंतर येथे धरणे आंदोलनाला बसले आहेत. महासंघाच्या एका अधिकाऱ्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप विनेश फोगटने केला. बृजभूषण व प्रशिक्षकांनी शिबिरात महिला पैलवानांचे लैंगिक शोषण केल्याचाही आरोप आहे.
त्यावर बृजभूषण सिंह म्हणाले, खेळाडूंचे शोषण केले नाही. कुणी आरोप सिद्ध केले तर प्रत्येक किंमत मोजण्यास तयार आहे. खेळाडूंना नियम लागू करण्यात आल्यामुळेच हे प्रकरण उचलण्यात आले आहे. बहुतांश पैलवानांनी राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला नाही. नव्या नियमानुसार, राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेते असाल तरच तुमची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी कॅम्पमध्ये निवड केली जाईल. हा लढा डब्ल्यूएफआयच्या विरोधात आहे
महासंघाचे काम खेळाडूंना साथ देणे, त्यांच्या खेळाच्या गरजा भागवणे आहे. तेच समस्या निर्माण करत असतील तर काय करावे? आता लढावे लागेल, माघार नाही असे कुस्तीपटू बजरंग पूनिया यांनी म्हटले आहे.
खेळाडू जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो, पण महासंघाने आमचे नेहमीच खच्चीकरण केले आहे. त्रास देण्यासाठी मनमानी पद्धतीने नियम केले जात आहेत. असे साक्षी मलिक यांनी म्हटले आहे.
कुस्तीपटू म्हणाले, कारवाई केली जात नाही, मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत एकाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणार नाही. पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू होत आहे. यासाठी सराव शिबिर बुधवारीच सुरू झाले.
मल्लांच्या नाराजीची ही कारणे १. राष्ट्रीय स्पर्धा अनिवार्य : आता प्रत्येक खेळाडूस वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत भाग घ्यावा लागणार आहे. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शिबिरात महासंघाचे नियमच ठरले डोकेदुखी प्रथमच अधिकारावरुन दंगल एका वजनी गटात ४ मल्लांची निवड होऊ शकते. यामुळे अनेक खेळाडूंचा समावेश झाला नाही. 2. स्पाॅन्सरशिपमध्ये भागिदारी स्पाॅन्सरशिपनंतर कंपनी खेळाडूंना आपल्या मर्जीप्रमाणे वागवते. त्यामुळे कुस्ती महासंघाने नियम बनवला की,कोणत्याही खेळाडूने स्पॉन्सरशिप घेतल्यास त्यात महासंघ सहभागी होणार नाही. हे अडचणीचे ठरत आहे. 3.ऑलिंपिक कोटा : ऑलिंपिक पात्रतेनंतर कोटा देशाचा असेल. खेळाडूचा नाही. जो खेळाडू कोटा जिंकेल त्याला देशाचे प्रतिनिधित्व करता येईल. त्यासाठी राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा होईल. यात जो जिंकेल तो कोट्यातील मल्लाशी झुंजेल. कोट्यातील मल्ल हरल्यास त्याला १५ दिवसात दुसरी संधी दिली जाईल.
रायगड आणि कणकवलीमध्ये आज पहाटेच भीषण अपघात झाले आहेत. रायगडमधील अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, कणकवली येथे झालेल्या अपघातात 4 जण दगावले आहे.आज पहाटेच दोन्ही अपघात हे मुंबई-गोवा महामार्गावर झाले. त्यामुळे महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्प्याचे काम अजूनही अपूर्ण आहे. तसेच, महामार्गावर अनेक खड्डे आहेत. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील रेपोली गावाजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातात एकूण 9 प्रवाशी ठार झाले आहेत. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे.
5 महिन्यांचे बाळ बचावले
रायगडमध्ये रेपोली गावाजवळ कार आणि ट्रकचा पहाटे 5 वाजताच समोरासमोर भीषण धडक झाली. मौजे रेपोली येथे लोटे एमआयडीसी येथून मुंबईकडे जाणारा ट्रक ( क्र. MH-43 /U/ 7119 ) व मुंबईकडून गुहागरकडे जाणाऱ्या इको गाडी ( क्र. MH- 48 BT8673) यांच्यामध्ये अपघात झाला.या गाडीतून प्रवास करणाऱ्या 9 जणांचा मृत्यू झाला. यात 4 महिला असल्याची माहिती आहे. तसेच, अपघातात 5 महिन्यांचे बाळ बचावल्याची माहिती मिळत आहे. तसेच, अपघातात एक चार वर्षाचा मुलगाही जखमी झाला आहे. जखमी मुलाला जवळच्या उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल करण्यात आले आहे.
अपघात नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समजू शकले नाही. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिस व वाहतूक पोलिसांनी मार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक तातडीने पूर्ववत केली.
कणकवलीत चौघांचा मृत्यू
कणकवलीत एक खासगी बस उलटून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली येथे वागदे पुलानजीक पहाटेच हादेखील अपघात झाला. अपघातात 23 जण जखमी झाले आहेत.कणकवली येथे पहाटे 4 वाजता खासगी स्लीपर बस उलटल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघातदेखील मुंबई-गोवा महामार्गावरच घडला. कणकवली येथे वागदे पुलाजवळ ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस मुंबईहून गोव्याला जात होती. कणकवलीत गडनदी पुलावर धोकादायक वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि हा अपघात झाला. या बसमध्ये 36 प्रवासी होते. यातील 4 जण ठार झाले आहेत. तर, 23 जण जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास करत आहेत.
पुणे: प्रकृती अस्वस्थ्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणारे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर त्यांनी थेट कसबा पेठेतील जनसंपर्क कार्यालय गाठले. कार्यकर्त्यांची विविध प्रश्नासंदर्भात त्यांनी चर्चा केली. आजारी असातनाही बापट जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. पुण्याच्या राजकारणावर छाप असलेले खासदार गिरीश बापट यांच्यावर शहरातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना श्वसनाचा त्रास असल्याचे सांगितले जात आहे.बापट रुग्णालयात असल्याचे समजल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेकांनी बापट यांची रुग्णालयात जाऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. गेल्या दीड महिन्यांपासून बापट यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती सुधारत असल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर रात्री त्यांनी कसबा पेठेतील जनसंपर्क कार्यालय गाठले. खासदार गिरीश बापट कार्यालयात आल्याचे समजताच कार्यकर्त्यांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. काही मिनिटातच हजारो कार्यकर्ते कार्यालयात उपस्थित राहिले. या सर्वांबरोबरच बापट यांनी चर्चा केली. विशेष म्हणजे पूर्ण बरे वाटत नसतानाही बापट कार्यालयात उपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात आले.