आरोप सिद्ध केले तर प्रत्येक किंमत मोजण्यास तयार– बृजभूषण सिंह
नवी दिल्ली- जागतिक कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक, सरिता मोरसह ३० जणींनी भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या ‘हुकूमशाही’ विरोधात आघाडी उघडली आहे. सर्व कुस्तीपटू बुधवारपासून दिल्लीच्या जंतर-मंतर येथे धरणे आंदोलनाला बसले आहेत. महासंघाच्या एका अधिकाऱ्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप विनेश फोगटने केला. बृजभूषण व प्रशिक्षकांनी शिबिरात महिला पैलवानांचे लैंगिक शोषण केल्याचाही आरोप आहे.
त्यावर बृजभूषण सिंह म्हणाले, खेळाडूंचे शोषण केले नाही. कुणी आरोप सिद्ध केले तर प्रत्येक किंमत मोजण्यास तयार आहे. खेळाडूंना नियम लागू करण्यात आल्यामुळेच हे प्रकरण उचलण्यात आले आहे. बहुतांश पैलवानांनी राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला नाही. नव्या नियमानुसार, राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेते असाल तरच तुमची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी कॅम्पमध्ये निवड केली जाईल. हा लढा डब्ल्यूएफआयच्या विरोधात आहे
महासंघाचे काम खेळाडूंना साथ देणे, त्यांच्या खेळाच्या गरजा भागवणे आहे. तेच समस्या निर्माण करत असतील तर काय करावे? आता लढावे लागेल, माघार नाही असे कुस्तीपटू बजरंग पूनिया यांनी म्हटले आहे.
खेळाडू जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो, पण महासंघाने आमचे नेहमीच खच्चीकरण केले आहे. त्रास देण्यासाठी मनमानी पद्धतीने नियम केले जात आहेत. असे साक्षी मलिक यांनी म्हटले आहे.
कुस्तीपटू म्हणाले, कारवाई केली जात नाही, मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत एकाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणार नाही. पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू होत आहे. यासाठी सराव शिबिर बुधवारीच सुरू झाले.
मल्लांच्या नाराजीची ही कारणे
१. राष्ट्रीय स्पर्धा अनिवार्य : आता प्रत्येक खेळाडूस वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत भाग घ्यावा लागणार आहे. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शिबिरात महासंघाचे नियमच ठरले डोकेदुखी प्रथमच अधिकारावरुन दंगल
एका वजनी गटात ४ मल्लांची निवड होऊ शकते. यामुळे अनेक खेळाडूंचा समावेश झाला नाही.
2. स्पाॅन्सरशिपमध्ये भागिदारी
स्पाॅन्सरशिपनंतर कंपनी खेळाडूंना आपल्या मर्जीप्रमाणे वागवते. त्यामुळे कुस्ती महासंघाने नियम बनवला की,कोणत्याही खेळाडूने स्पॉन्सरशिप घेतल्यास त्यात महासंघ सहभागी होणार नाही. हे अडचणीचे ठरत आहे.
3.ऑलिंपिक कोटा : ऑलिंपिक पात्रतेनंतर कोटा देशाचा असेल. खेळाडूचा नाही. जो खेळाडू कोटा जिंकेल त्याला देशाचे प्रतिनिधित्व करता येईल. त्यासाठी राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा होईल. यात जो जिंकेल तो कोट्यातील मल्लाशी झुंजेल. कोट्यातील मल्ल हरल्यास त्याला १५ दिवसात दुसरी संधी दिली जाईल.