वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन घेतला कामकाजाचा आढावा
मुंबई, दि.14:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याच्या वित्त व नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे तत्पूर्वी सकाळी त्यांनी दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेऊन वित्त व नियोजन विभागाच्या सद्यस्थितीची माहिती तसेच कामकाजाचा आढावा घेतला. अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनातून कामकाजाला सुरुवात केली. सकाळी लवकर मंत्रालयात आलेल्या अजित पवार यांनी वित्त व नियोजन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते अभ्यागत नागरिकांना भेटले.
उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे कार्यालय मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरील 503 क्रमांकाचे दालनात असून या दालनातूनच ते आपल्या विभागांचे तसेच उपमुख्यमंत्रीपदाचे कामकाज पाहणार आहेत.
भाजप,एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या महायुतीच्या सरकारचे बहुचर्चित खातेवाटप अखेर शुक्रवारी जाहीर झाले. त्यानुसार अजित पवार यांनी अपेक्षेप्रमाणे अर्थखाते पटकावले. तर धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपण्यात आली. ईडीच्या कारवाईमुळे चर्चेत राहिलेले हसन मुश्रीफ यांच्या गळ्यात वैद्यकीय शिक्षण खात्याची माळ पडली आहे.
विशेष म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेनेचे मातब्बर मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडचे कृषी खाती धनंजय मुंडे यांना देण्यात आले. आता सत्तारांकडे अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन खाते सोपण्यात आले आहे. तर संजय राठोड यांच्याकडील अन्न व औषध प्रशासन विभाग हे खाते राष्ट्रवादीच्या धर्मरावबाबा आत्राम यांना मिळाले. त्यामुळे राठोड यांच्याकडे मृद व जलसंधारण हे कमी महत्त्वाचे खाते आले आहे.
छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्रालय, तर दिलीप वळसे पाटील यांना सहकार खाते देण्यात आले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल, पशू संवर्धन खाते देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाच्या जबाबदारी देण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते कायम ठेवण्यात आले आहे.
राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
पहा महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ
1) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग. 2) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार. 3) उपमुख्यमंत्री अजित पवार – अर्थ व नियोजन
भाजपचे मंत्री
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
गिरीश महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
विजयकुमार गावित- आदिवासी विकास
अतुल सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
सुरेशभाऊ खाडे- कामगार
शिंदे गट शिवसेनेचे मंत्री
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय राठोड- मृद व जलसंधारण
संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय सामंत- उद्योग
प्रा. तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
पुणे : जीवनाच्या परिपूर्णत्वाचे दर्शन ज्यांच्या चरित्रातून घडले, ते जगद्गुरु तुकाराम महाराज. पूर्ण असणे आणि परिपूर्ण असणे वेगळे आहे. परिपूर्णतेमध्ये संपूर्ण आनंद भोगण्याची प्रक्रिया सुरु होते. हल्ली जीवन असे आहे की आनंद सगळ्यांकडे आहे, परंतु आनंद भोगण्याची कुवत कोणाकडे उरलेली नाही, असे ह.भ.प. चिन्मय महाराज सातारकर यांनी सांगितले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित महोत्सवात प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले. तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळ ट्रस्टतर्फे हा कार्यक्रम सुरु आहे. प्रवचनमालेत धाराशिव येथील संत गोरोबाकाका मंदिराचे ह.भ.प.पद्मनाभ महाराज व्यास, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे, सुतारवाडीचे ह.भ.प. राजेंद्र महाराज दहिभाते, श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील भाषाप्रभू ह.भ.प.डॉ.पंकज महाराज गावडे, पुण्याचे ह.भ.प. अभय महाराज टिळक, मुंबईचे ह.भ.प.चिन्मय महाराज सातारकर, ह.भ.प.भगवतीताई सातारकर यांचे प्रवचन झाले.
चिन्मय महाराज सातारकर म्हणाले, पूर्णत्वामध्ये कुठेतरी अभिमान आहे. दुस-याला दाखविणे आहे. मात्र, परिपूर्णतेमध्ये जगाला दाखविण्याची गरज नाही. ज्या स्थितीत आहे, त्याच स्थितीत परिपूर्ण. ताठ राहण्याकरिता, जगाला दाखविण्याकरिता आणि वाकण्यामध्ये जीवनाची सांगता होते.
ते पुढे म्हणाले, कर्माने, कृतीने, पैशाने, सत्तेने कितीही मोठा असो, जो वाकायला शिकला नाही. तो सगळे असून काहीतरी कमी असतो. परिपूर्णता ती, ज्यामध्ये मागायची गरज नाही. जीवनात पैसा कितीही कमविला, तरी सवय तशीच की आता अजून कुठून कमवू शकतो. तुकाराम महाराजांकडे काहीच नाही, परंतु अंत:करणाची परिपूर्णता आहे. तुकाराम महाराज परिपूर्ण म्हणूनच जन्माला आले, म्हणूनच ते कळस आहेत.
ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, गणेश कला क्रीडा मंच येथे दिनांक १९ जुलै पर्यंत दररोज सायंकाळी ५.३० ते ८ यावेळेत चातुर्मासामिनित्त कीर्तन महोत्सव असून त्यामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार कीर्तन सादर करणार आहेत. कीर्तन महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पुणे, दि. १४: ‘करिअर कट्टा’ च्या माध्यमातून राज्यातील महाविद्यालयात अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून युवकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
सर परशुराम महाविद्यालयात आयोजित ‘करिअर कट्टा’ अंतर्गत करिअर संसद कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, शिक्षण प्रसारक नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, सेंटर ऑफ एक्सलन्स समिती करिअर कट्टाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, स.प. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुनील गायकवाड, चॉइस ग्रुपचे फिरोदिया गाडिया आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, ‘करिअर कट्टा’च्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना राज्य पातळीवरील स्पर्धा परीक्षा, महाराष्ट्र व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा, उद्योजकता व्यक्तिमत्व विकास, व्यवस्थापकीय कौशल्य व प्रत्यक्ष उद्योजकांचे मार्गदर्शन, वित्त व्यवस्थापन पोलीस भरती, बँकींग सेवा, कमिशन अशा विविध अभ्यासक्रमाचे ३६५ रुपयांमध्ये मार्गदर्शन करण्यात येत असून त्यातून विद्यार्थ्यांना यश मिळत आहे, ही समाधानाची बाब आहे. विद्यार्थ्यांना फक्त मार्गदर्शन करुन चालणार नाही त्यांना सर्वदृष्टीने पाठबळ मिळणे आवश्यक आहे. महाविद्यालयांनी औद्योगिक कंपन्याशी समन्वय करुन विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणचे ज्ञान मिळण्याच्यादृष्टिने प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांन यावेळी दिले.
केंद्र शासनाने सन २०२० साली नवीन शैक्षणिक धोरणाची घोषणा केली असून आज त्याला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणात पारंपरिक कला, वाणिज्य या सारख्या शिक्षण पद्धतीत बदल करून कौशल्य विकास, मातृभाषेतून शिक्षण, नैतिक बहुमुखी शिक्षण आणि आपल्या परंपरेचा अभिमान असणाऱ्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात येणार आहे. मातृभाषेतील शिक्षणामूळे विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान चांगल्याप्रकारे होऊन संशोधनाची वृत्ती वाढेल. अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम मराठीतून करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
श्री. देवळाणकर म्हणाले, स्पर्धा परीक्षेत मराठी टक्का वाढविण्याच्या दष्टिने ‘करिअर कट्टा’ चा उपक्रम अत्यंत महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आणि त्यांची संवेदनक्षमता वाढवणारा हा उपक्रम असून केंद्रीय लोकसेवेमध्ये मराठी प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. फक्त पुणे, मुंबई पुरताच हा उपक्रम न राहता राज्यातील ग्रामीण भागात हा उपक्रम राबविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांना कौशल्य युक्त बनविण्यासाठी करिअर कट्टाने सहभाग घेतला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांना सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्राद्वारे आवाहन
पुणे दि. १४- जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या मतदारांची १०० टक्के मतदार नोंदणी करण्यासाठी येत्या २२ व २३ जुलै २०२३ रोजी जिल्ह्यातील २० हजार ९३६ गृहनिर्माण संस्थांमध्ये ‘गृहनिर्माण सोसायटी मतदार नोंदणी अभियान’ राबविण्यात येणार असून गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनी या अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.
अभियानाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आणि दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व मतदार नोंदणी अधिकारी , सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.
डॉ.देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करावे. अभियानाची माहिती सोसायटीतील सदस्यांपर्यंत पोहोचवावी. तेथील अपेक्षित मतदार संख्या, झालेली मतदार नोंदणी याबाबत माहिती घेऊन अभियानाचे सूक्ष्म नियोजन करावे. अभियानाशी संबंधीत घटकांना सहभागी करून घेतल्यास मतदार नोंदणीस चांगला प्रतिसाद लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
छावणी क्षेत्रातील लष्कराच्या अधिकाऱ्यांशी अभियानाबाबत चर्चा करावी. हिंजवडीसारख्या भागातील मोठ्या गृहनिर्माण संस्थांवर विशेष लक्ष केंद्रीत करावे. औद्योगिक क्षेत्रातील आस्थापनांच्या प्रमुखांचे अभियानासाठी सहकार्य घेण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
पुणे जिल्ह्यात साधारणपणे २० हजार ९३६ इतक्या नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आहेत. संस्थांमधील प्रत्येक पात्र व्यक्तीची नोंद मतदार यादीमध्ये व्हावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक कार्यालया तर्फे हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व इतर कर्मचारी २२ व २३ जुलै रोजी गृहनिर्माण संस्थांना भेट देऊन मतदार नोंदणी करणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी स्वत: गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींना पत्र लिहून यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रीयेची माहिती दिली आहे आणि त्यांना सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
गृहनिर्माण संस्थांच्या चेअरमनची या अभियानात महत्वाची भूमिका आहे. त्यांनी सर्व सभासदांना अवगत करावे, ज्यांची मतदार नोंदणी झालेली नाही त्यांची पुराव्यांच्या कागदपत्रासह यादी करून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे सादर करावी. मयत व स्थलांतरीत मतदारांची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावी आणि आपली सोसायटी १०० मतदार नोंदणी असलेली सोसायटी करावी. मतदार यादी शुद्धीकरण मोहीमेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनी डॉ.देशमुख यांनी पत्राद्वारे केले आहे.
जिल्ह्याची अंतिम मतदार ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्ये विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून नवमतदारांची नोंदणी वाढविण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांना वर्षातुन चार वेळा म्हणजेच १ जानेवारी १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर मतदार नोंदणी करता येणार आहे.
मतदार नोंदणीसाठी अर्जासोबत रहिवास पुरावा म्हणून विद्युत देयक, पाणी पट्टी, आधार कार्ड, बँकेचे किंवा पोस्टाचे पास बुक, भारतीय पारपत्र, नोदणीकृत विक्रीखत, नोंदणीकृत भाडेकरार इत्यादी तर वयाचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, आधारकार्ड, राज्यशिक्षण मंडळाने निर्गमित – केलेले १० वी किंवा १२ वी चे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. पात्र नागरिकांनी अभियानात सहभागी होवून मतदार नोंदणी करावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
पुणे :प्रागतिक विचारसरणीच्या राज्यातील १३ घटक पक्षांच्या पुण्यात झालेल्या दोन दिवसीय सत्ता परिवर्तन शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. शेतकरी कामगार पक्ष,स्वाभिमानी पक्ष व शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,भारतीय कम्युनिस्ट पार्टी, जनता दल सेक्युलर महाराष्ट्र, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, बहुजन विकास आघाडी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, भाकपा लिब्रेशन पार्टी, रिपाई सेक्युलर पार्टी, श्रमिक मुक्ती दल यांच्या वतीने दोन दिवसीय सत्ता परिवर्तन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील अल्पबचत भवन येथे हे शिबीर उत्साहात पार पडले.शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील,समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी,डॉ राम पुनयानी,डॉ. भालचंद्र कांगो,कॉ.अशोक ढवळे,आमदार हितेंद्र ठाकूर,श्रीपतराव शिंदे,भारत पाटणकर,डॉ.सुरेश माने,संजीव चांदोरकर,एड.असीम सरोदे,मेराज सिद्दिकी,विजय कुलकर्णी ,दत्ता देसाई,स्मिता पानसरे यांच्यासह मान्यवर नेत्यांनी,विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले. शिबिराचे स्वागतअध्यक्ष जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी स्वागत केले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील म्हणाले की, ‘सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी गेल्या एक वर्षापासून राज्यातील छोटे पक्ष तसेच संघटना एकत्र आले आहे. जरी आमचे विचार वेगळे असले, मतभेद असले तरी आम्ही भाजपला रोखण्यासाठी एकत्र आलो आहे. आमची ताकद कमी आहे. पण आम्ही विचारांचे पक्के आहोत. आम्ही महाविकास आघाडी सोबतच आहोत. आमच्या विचारांचे जे पक्ष आहेत त्यांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. शरद पवार हतबल झाले आहेत असे मला वाटत नाही, शरद पवार हे शरद पवार आहेत, असे यावेळी भाई जयंत पाटील यांनी आलेल्या कार्यकर्ते यांना संबोधित करताना सांगितले. स्वागतअध्यक्ष जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे व शिबिरार्थी यांचे आभार मानले.’भविष्यात प्रागतिक पक्ष एकत्र येउन महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडवणार असून संपूर्ण महाराष्ट्रात या प्रागतिक पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यानुसार मोर्चा,आंदोलन,शिबीर,तसेच विविध प्रकारचे राजकीय मेळावे घेऊन विरोधी पक्षाला आपली ताकद दाखवू,’ असे नाथाभाऊ शेवाळे म्हणाले. तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी म्हणाले, ‘जेलमध्ये चक्की पिसायला लावू म्हणणारे आज सत्तेत आहेत. आज देशात महात्मा गांधी यांच्या आरोपीची मूर्ती बनविली जात आहे. तसेच हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील सरकार हे ईडीचे सरकार आहे. आज सत्तेच्या लालसेपोटी आणि भीतीपोटी विचार बदलत आहेत. येत्या 2024 ला राज्यात ईडी सरकार दिसणार नाही. शरद पवार हे देशातील एक मोठे नेते आहेत. एखादा मोर्चा जर भाजप विरोधी होणार असेल, तर आम्ही त्याला नक्की पाठिंबा देणार आहोत’ या कार्यक्रमात विविध विषयांवर आलेल्या मान्यवर व प्रमुख पाहुणे व्यक्ते यांनी शिबिरर्थी यांना मार्गदर्शन केले.या यामध्ये ‘भारतीय संविधान व भाजपा आरएसएस यांचे षडयंत्र’ याविषयी एड. असीम सरोदे तसेच बी आर एस पी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष एड.डॉ. सुरेश माने यांनी मार्गदर्शन केले. तर ‘धर्मनिष्ठ राष्ट्रवाद आणि नफरत की राजनीति’ याविषयी डॉ. राम पुणयानी व समाजवादी पार्टीचे प्रवक्ता मेराज सिद्दिकी यांनी मार्गदर्शन केले. तर ‘कृषी क्षेत्रावर आरिष्टे आणि उपाय’ याविषयी कॉ.अशोक ढवळे, मासवादी कम्युनिस्ट पार्टी यांनी मार्गदर्शन केले. तर ‘आर्थिक औद्योगिक धोरणाची समीक्षा आणि उपाय’ याविषयी संजीव चांदोरकर व लाल निशाण पक्षाचे विजय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. ‘ दलित आदिवासी ओबीसी अल्पसंख्यांक समुदायावरील आव्हाने -उपाय’ याविषयी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. किशोर ढमाले यांनी मार्गदर्शन केले. तसेच ‘प्रकल्प विस्थापित व गायरान जमीन व जमीन धारकांच्या पुनरसंरचनेचा प्रश्न’ याविषयी कॉ. भारत पाटणकर श्रम मुक्ती दल व ऍड. डॉ.सुरेश माने बी आर एस पी संस्थापक अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले. ‘वर्ग जाती स्त्रियांकरिता राजकीय सांस्कृतिक चळवळ’ याविषयी दत्ता देसाई व कॉम्रेड स्मिता पानसरे भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनी मार्गदर्शन केले. ‘शिक्षण रोजगार आणि आरोग्य क्षेत्रातील आव्हाने’ याविषयी कॉ. डॉ. भालचंद्र कांगो भाकपा यांनी मार्गदर्शन केले. ‘प्रागतिक पक्षाची आगामी वाटचाल आणि दिशा’ याविषयी आमदार शेकापचे पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील, कॉ. अशोक ढवळे भाकप, आमदार हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी, डॉ. भालचंद्र कांगो भाकपा,डॉ. सुरेश माने बी आर एस पी, माजी आमदार श्रीपतराव शिंदे जनता दल सेक्युलर, श्रमिक मुक्ती दलाचे काँ.भारत पाटणकर यांनी आलेल्या कार्यकर्त्यांना व शिबिरार्थी यांना मार्गदर्शन केले.
पुणे, १४ जुलै, २०२३: महाराष्ट्रातील हॉस्पिटल्सची सर्वात मोठी शृंखला असणाऱ्या सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये सक्शन कॅथेटर वापरून ब्लॉक्ड कोरोनरी आर्टरीमधून क्लॉट काढून टाकण्याची प्रोसिजर यशस्वीपणे केली आहे. ही अशाप्रकारची भारतातील पहिली डॉक्युमेंटेड केस आहे. धमन्यांमध्ये निर्माण झालेला अडथळा काढून टाकण्यासाठी सक्शन कॅथेटरचा वापर पहिल्यांदाच करण्यात आल्यामुळे ही प्रक्रिया म्हणजे हृदयाच्या आजारांवरील उपचारांमध्ये लक्षणीय प्रगतीदर्शक ठरली आहे. नुकतीच पुण्यातील एका ६२ वर्षांच्या रुग्णावर ही प्रक्रिया करण्यात आली. प्रक्रिया करण्यात आल्याच्या तिसऱ्या दिवशी रुग्णाला घरी पाठवण्यात आले आणि आता त्यांची प्रकृती पूर्णपणे सुधारली आहे.
या रुग्णाला सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये भरती केले तेव्हा त्यांच्या छातीमध्ये गंभीर वेदना होत होत्या आणि प्रचंड प्रमाणात घाम येत होता. तपासण्या केल्यावर याची खात्री पटली की त्यांना हार्ट अटॅक आलेला होता, रक्तामधील एका गुठळीमुळे त्यांच्या धमनीमध्ये (आर्टरी) अडथळा निर्माण झालेला होता. डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कार्डिओलॉजी संचालक, डॉ. अभिजित पळशीकर आणि तेथील तज्ञ वैद्यकीय टीमने मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी ही प्रक्रिया करण्यासाठी सक्शन कॅथेटरचा वापर केला.
प्रक्रियेदरम्यान धमनीमध्ये जिथे अडथळा निर्माण झालेला होता त्या भागात कॅथेटर अतिशय काळजीपूर्वक पोहोचवला गेला व एका स्पेशल व्हॅक्युम पंपच्या साहाय्याने सक्शन लावून गुठळी बाहेर काढण्यात आली. यामुळे हृदय स्नायूमधील रक्तप्रवाहामध्ये लक्षणीय सुधारणा झाली. मायोकार्डियल ब्लश ग्रेड (एमबीजी) मध्ये हे दर्शवण्यात आले. ही नाविन्यपूर्ण सिस्टिम आणि सक्शन इंजिन या दोन्हींचा वापर करून हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधून गुठळी प्रभावीपणे बाहेर काढली गेली, रक्तप्रवाहामध्ये सुधारणा झाली आणि रुग्णाच्या प्रकृतीमध्ये अजून जास्त गुंतागुंत होण्याचा धोका कमी झाला. कॅथेटर आत सरकवण्यापासून गुठळी काढून टाकण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रिया फक्त १० मिनिटात पूर्ण झाली. भविष्यात अजून जास्त गुठळ्या निर्माण होऊ नयेत आणि उपचारांमधून जास्तीत जास्त अनुकूल परिणाम मिळावेत यासाठी रुग्णाला औषधे देखील देण्यात आली.
या प्रक्रियेनंतर रुग्णाला छातीमधील वेदनांपासून आराम मिळाला आणि तपासण्यांमधून दिसून आले की, हृदयाला होणारा रक्तपुरवठा पुन्हा सुरळीतपणे सुरु झाला आहे. रुग्णाच्या हृदयाच्या कार्यात सुधारणा झाली, त्यामुळे त्यांची प्रकृती वेगाने सुधारली व तब्येतीमध्ये अजून काही गुंतागुंत होण्याचा धोका कमी झाला. २४ तास रुग्णाला इंटेन्सिव केयर युनिटमध्ये ठेवण्यात आले आणि त्यादरम्यान काहीही समस्या उद्भवली नाही. यानंतर आता पुढे कोणतीही इन्व्हेसिव्ह (ज्यामध्ये शरीरावर चिरा देऊन शस्त्रक्रिया करावी लागेल अशी) प्रक्रिया करण्याचे ठरवण्यात आलेले नाही पण रुग्णाची फॉलो-अप काळजी घेतली जाईल व त्यांची औषधे सुरु राहतील.
या अनोख्या प्रक्रियेबद्दल डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कार्डिओलॉजी संचालक, डॉ. अभिजित पळशीकर यांनी सांगितले, “या केसमध्ये सक्शन सक्शन कॅथेटरचा वापर करण्यात आला, हृदयाच्या आजारांवरील उपचारांमध्ये मिळवण्यात आलेले हे एक लक्षणीय यश आहे. मेकॅनिकल ऍस्पिरेशन वापरून धमनीमधील अडथळे काढून टाकण्याची क्षमता हा एक सुरक्षित व प्रभावी उपाय आहे, खासकरून जेव्हा अडथळे जास्त असतात अशा केसेसमध्ये हे खूप उपयोगी आहे.”
त्यांनी पुढे सांगितले, “कोरोनरी एम्बोलिजमवरील उपचारांसाठी सक्शन कॅथेटरचा वापर पहिल्यांदाच करण्यात आला. याआधी पल्मनरी एम्बोलिजम, पेरिफेरल एम्बोलिजम आणि सेरेब्रल एम्बोलिजमवरील उपचारांसाठी या साधनाचा यशस्वीपणे वापर करण्यात आला होता. पण सक्शन कॅथेटर हे कोरोनरी आर्टरीजसाठी डिझाईन करण्यात आले आहे कारण त्या नाजूक, मऊ व लवचिक असतात. सक्शन कॅथेटरमध्ये प्रगत सक्शन क्षमता आहे. याला एफडीएने मान्यता दिली आहे आणि त्यामुळे रुग्णांना त्यांच्या संपूर्ण जीवनकाळात मेटॅलिक स्टेंट्सचा वापर टाळता येतो.”
बऱ्याच वर्षांपासून, हळूहळू जमा होत गेलेले कोलेस्टेरॉल आणि धमन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने, वयस्क रुग्णांना हार्ट अटॅक येतात, त्याबरोबरीनेच छातीमध्ये वेदना होणे, श्वास घ्यायला त्रास होणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. युवा रुग्णांच्या बाबतीत आधीच्या निरोगी धमनीमध्ये रक्ताची गुठळी निर्माण झाल्याने हार्ट अटॅक येतात. जेव्हा धमनीच्या भिंतीला चिरा पडतात व आतील मटेरियल बाहेर येते व रक्त त्यामध्ये मिसळते तेव्हा असे होते. अगदी थोड्याच काळात गुठळी तयार होते व ती धमनीला संपूर्णपणे ब्लॉक करून टाकते, यामुळे अचानक हार्ट अटॅक येतो.
म्हणूनच या दोन्ही प्रकारच्या हार्ट अटॅकवरील उपचारांचे दृष्टिकोन वेगवेगळे असतात. गुठळी जर असेल तर ती काढून टाकल्यानंतर स्टेंटची गरज नसते. परंतु याआधीच्या काळात काही मर्यादांमुळे डॉक्टर्स गुठळी पूर्णपणे काढून टाकू शकत नव्हते. गुठळी काढून टाकण्याच्या पारंपरिक पद्धतीमध्ये सिरिंज व कॅथेटरचा वापर केला जातो पण सिरिंजमधील दाब हळूहळू कमी होतो. ही मर्यादा दूर करण्यासाठी सक्शन कॅथेटर हे पंप जोडलेले मेकॅनिकल थ्रोम्बो-सक्शन साधन प्रस्तुत करण्यात आले. या पंपमधून सातत्याने निगेटिव्ह दाब निर्माण केला जातो, त्यामुळे क्लॉट एम्बोलायझेशनला प्रतिबंध घातला जातो आणि संपूर्ण गुठळी अगदी कमी वेळात काढून टाकता येते. यामुळे स्टेंट्सची गरज भासत नाही, रुग्णाला याचे लाभ मिळतात. या प्रक्रियेमध्ये रक्त वाहून जाण्याचे प्रमाण कमी असते. गुठळी काढून टाकणे १००% प्रभावी असल्याने रुग्णाची प्रकृती अधिक वेगाने सुधारते, गुठळीची अधिक हालचाल होण्याचा प्रश्न नसतो त्यामुळे तब्येतीमध्ये अधिक गुंतागुंत होत नाही.
अशाप्रकारची प्रगत प्रक्रिया करून आपल्या रुग्णांना अभिनव व उत्कृष्ट देखभाल सेवा पुरवण्यासाठी सह्याद्रि हॉस्पिटल्स वचनबद्ध आहे. या प्रक्रियेमध्ये मिळालेले यश वैद्यकीय उपचारांमध्ये प्रगती व आमच्या रुग्णांना उपचारांमधून मिळणाऱ्या परिणामांमध्ये सुधारणा घडवून आणण्याप्रती आमची निष्ठा दर्शवते.
कारभार प्रशासकांच्या हाती म्हणजे लोकाभिमुख कारभार नाही तर एक केंद्रित कारभार ….
नवी दिल्ली–
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने राज्यातील 23 महापालिकांसह काही जिल्हा परिषदा व नगरपालिकांचा कारभार प्रशासकांच्या हाती गेला आहे. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाच्याच 2006 च्या आदेशानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कालावधी जास्तीत जास्त 6 महिने लांबवता येऊ शकतो. तरीही राज्यात गेल्या सहा ते सात वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे सर्वांचे लक्ष सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, आजसुद्धा सुनावणी लांबणीवर टाकण्यात आली आहे. आता पुढील 18 जुलैरोजी होणार आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.
विशेष म्हणजे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या या प्रकरणाची गेल्या वर्षभरापासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झालेली नाही. त्यामुळे आता तरी पुढची सुनावणी 18 जुलैला होईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ओबीसी आरक्षणाचा पेच निर्माण झाल्याने राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. ओबीसी आरक्षणाची मुदत संपल्याने हे आरक्षण पुन्हा मिळावे, यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. अशाच प्रकरणी मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रालाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार 23 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 207 नगरपालिका, पंचायत समित्यांमध्ये ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेता येणार आहे. मात्र, याव्यतिरिक्त 92 नगरपरिषदांमधील ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा अद्याप प्रलंबित आहे. या नगरपरिषदांमध्येही ओबीसी आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारने ऑगस्ट 2022ला सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
राजकीयदृष्ट्या ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची असली तरी वर्षभरापासून या प्रकरणावर सुनावणी होऊ शकलेली नाही. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं एप्रिल, मे महिन्यातील तारीख दिली होती. पण त्यादिवशीही सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी कोणतीही सुनावणी पार पडली नाही. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्टमध्ये याबाबतचा निकाल लागेल, अशी शक्यता वर्तवली आहे. तसेच, येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये राज्यात पालिका निवडणुका होण्याची शक्यताही फडणवीसांनी वर्तवली आहे.
नवी दिल्ली ठाकरे गटाने शिंदे गटाच्या 16 आमदारांविरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली. कोर्टाने नार्वेकरांना अवघ्या 2 आठवड्यांत या नोटीसीवर आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिलेत.
आमदार अपात्रततेबाबत ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत विधानसभा अध्यक्षांना कारवाईचे अधिकार दिले होते. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झालेला नसल्याने ठाकरे गटाने पुन्हा याचिका दाखल केली होती. या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांना नोटीस बजावली असून या संदर्भात उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे.
विधानसभा अध्यक्षांनी निर्णय न घेतल्यानं ठाकरे गटाची विधानसभा अध्यक्षांविरोधात ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अध्यक्षांना तातडीने निर्णय घ्यावा, अशी याचिकेत विनंती करण्यात आली आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्षांना निर्णय घ्यायचा आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या आणखी 15 आमदारांचा समावेश आहे.
याबाबत राहुल नार्वेकर म्हणाले की, मला खात्री आहे. मी ज्या सभागृहाचे नेतृत्व करतो. घटनेत दिलेल्या तरतुदींप्रमाणे असेल. नियमानुसार निर्णय घेण्यात येईल. सर्व बाबींचा विचार करावा लागेल. राजकीय पक्षाचे नेतृत्व कोण करत होते. याचिकेत काय म्हटले आहे, आदी बाबी तपासल्या जातील. निर्णय काय घेणार हे आत्ताच सांगितले तर जनतेवर अन्याय. तडकाफडकी निर्णय घेतला तर म्हणतील की अध्यक्षांनी दबावात निर्णय घेतला.
राहुल नार्वेकर यांनी म्हटले होते की, मी निर्णय घेतल्यानंतर न्यायालय निर्णय घेऊ शकते, परंतु न्यायालय सभापतींना आदेश देऊन ठराविक मुदतीत निर्णय घेण्यास भाग पाडू शकत नाही. या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी किती वेळ लागेल या बाबत नार्वेकर म्हणाले होते की, महाराष्ट्रात जे घडले ते अभूतपूर्व आहे. माझ्याकडे अशा घटनेचे इतर कोणत्याही राज्यातील उदाहरण नाही. त्यामुळे अशा प्रकरणाचा निर्णय कसा घ्यायचा हे माझ्यासाठी गुंतागुंतीचे आणि महत्त्वाचे आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांना उत्तर देण्यासाठी आणखी वेळ मागणारी याचिका आल्यास त्या विनंतीच्या आधारे त्यावर निर्णय घेऊ, असे नार्वेकर म्हणाले.
काही दिवसांपूर्वी मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन असं वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केलं. निर्णय आत्ता सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार असं सूचक वक्तव्य नार्वेकरांनी केलं होते. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. महाराष्ट्राच्या या केसच्या सुनावणीदरम्यान अध्यक्षांकडे निर्णय देताना कालमर्यादा असावी की नाही यावरही युक्तीवाद झाले होते. म्हणजे शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनीही हवं तर अध्यक्षांना 2-3 महिन्यांत निर्णय घ्यायला सांगा, पण निर्णय तेच घेतील असं म्हटलं होते होते.
आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांच्या कार्यवाहीला आता वेग आला आहे. विधिमंडळानं निवडणूक आयोगाकडे तत्कालीन शिवसेनेच्या घटनेची प्रत मागवून घेतली आहे. त्यासाठी औपचारिक पत्रही देण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येत्या पावसाळी अधिवेशनाआधी मोठा निर्णय येऊ शकतो, अशी माहिती विधिमंडळातील खात्रीलायक सुत्रांकडून दिली जात आहे. या कार्यवाहीत गरज पडली तर लवकरच दोन्ही गटाच्या प्रमुखांना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना देखील सुनावणीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली: चंद्रयान-3 चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून दुपारी अडीच वाजता होईल. २३-२४ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग केले जाईल. जर लँडर सॉफ्ट दक्षिण ध्रुवावर उतरला तर भारत हा दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश बनेल.
लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर १४ पृथ्वी दिवसांच्या समतुल्य दिवसात त्यांचे कार्य आणि चाचण्या करतील. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ही वेळ चंद्राच्या एका दिवसाच्या बरोबरीची असेल.
इस्रोचे माजी संचालक के सिवन म्हणाले की, चांद्रयान-3 च्या यशामुळे भारताच्या पुढील प्रमुख मोहिमेला गगनयान प्रोत्साहन मिळेल. त्यांच्या कार्यकाळात २०१९ मध्ये चांद्रयान-2 मोहीम पाठवण्यात आली होती, ज्यामध्ये लँडर चंद्रावर उतरण्यात यशस्वी ठरला नाही. ते म्हणाले की, इस्रोने या अपयशास कारणीभूत घटकांची पुनर्रचना केली आहे आणि त्या दुरुस्त केल्या आहेत. यावेळी तुम्हाला यश नक्कीच मिळेल.
सिवन म्हणाले की, चांद्रयान-3 पूर्वीच्या मोहिमांप्रमाणेच आव्हानांना सामोरे जात असताना, अंतराळात अनेक गोष्टी अज्ञात आहेत. पण चुकांमधून शिकून नवा आत्मविश्वास मिळवला आहे. या वेळी आशा आहे या वेळी यश मिळाले तर भावी पिढीला लाभ होईल. केवळ चंद्राच्या प्रुष्ठभूमीची नव्हे तर पृथ्वीच्या उत्पत्ति विषयी सुध्दा वैज्ञानिकांना माहिती मिळू शकेल.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या जगप्रसिद्ध कास पठारावर असलेल्या तलावातील गाळाच्या नव्या अभ्यासानंतर , होलोसीन युगाच्या पूर्वार्धाच्या मध्य काळात म्हणजे आजपासून सुमारे 8664 वर्षांपूर्वी भारतातील उन्हाळी पावसाच्या पद्धतीत महत्वाचे बदल होऊन, ह्या भागात कमी पावसामुळे कोरडे हवामान कसे निर्माण झाले , याचा अंदाज बांधणे शक्य झाले आहे. या तलावातील गाळ सुमारे 8000 वर्षांपूर्वीचा असून, त्यातून होलोसीनच्या उत्तरार्धापर्यन्त म्हणजे, सुमारे 2827 वर्षांपूर्वी, हा प्रदेश कमी पावसाचा आणि कमकूवत मोसमी पावसाचा प्रदेश बनल्याचे सूचित झाले आहे.
यूनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या पश्चिम घाटाचा भाग असलेले कास पठार, तिथे आढळणाऱ्या कासा ह्या वृक्षामुळे, या नावाने सुपरिचित आहे.
विपुल जैवविविधता असलेल्या ह्या कास पठारावर, ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात, विविधरंगी रानफुलांचे ताटवे फुललेले दिसतात.
पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेने , तिरूअनंतपुरम इथल्या पृथ्वी विज्ञान राष्ट्रीय संशोधन केंद्रासोबत या तलावातील गाळावर संशोधन आणि अध्ययन केले. कार्बन डेटिंग नुसार 8000 वर्षांपूर्वीच्या या मातीवरुन, तेव्हाच्या हवामानाच्या परिस्थितीचा अंदाज बांधता आला. त्यावरून, 8000 वर्षांपूर्वी, या तलावात मोसमी पाऊस पडत असावा आणि, साधारण 2000 वर्षांपूर्वी हा तलाव कोरडा झाला असावा, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
या अध्ययनातील निरिक्षणे असेही सांगतात की, हा मोसमी तलाव हे भू वचाची झीज होऊन तिथे तयार झालेल्या मोठ्या खड्डयामुळे विकसित झाला असावा. आजचे कास पठार याच प्राचीन तलावावर आहे.
होलोसीनच्या उत्तरार्धात (सुमारे 2827 वर्षांपूर्वी ) पर्जन्यमान कमी झाल्याचे आणि नैऋत्य मोसमी पाऊस कमकुवत झाल्याचे शास्त्रज्ञांना निरीक्षणात दिसून आले. मात्र, गेल्या 1000 वर्षांच्या काळात या तलावात मोठ्या संख्येने आढळलेले परागकण, प्लँकटोनिक आणि डायटॉम टॅक्स यामुळे ह्या तलावाचे युट्रोफिकेशन झाले म्हणजेच, तलावात नायट्रोजनसारखी पोषणमूल्ये वाढल्याचे सूचित झाले आहे. पाणलोट क्षेत्रातील गुरांचा वावर आणि मानवी प्रभावामुळे हा बदल झाला असल्याची शक्यता आहे.
या अध्ययनानुसार, कास पठारावर, होलोसीनच्या पूर्वार्धात फुलांचे ताटवे अधिक काळ म्हणजे अगदी मार्च एप्रिल पर्यन्त फुलत असावेत असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे.
‘क्वाटरनरी सायन्स ॲडव्हान्सेस’ मध्ये प्रकाशित झालेले हे निष्कर्ष, या स्थळाच्या अमूल्य नैसर्गिक वारशाचे संरक्षण करण्यासाठीच्या उपाययोजनांवर भर देण्याची शिफारस करणारे आहेत.
Figure 1 Diatom assemblage recovered from the sediments of Kaas Lake
Figure 2 Palynological and Non-Pollen Palynomorph recovered from the sediments of Kaas Lake
अधिक माहितीसाठी डॉ. कार्तिक बालसुब्रमण्यन (karthickbala@aripune.org, 020-25325053), शास्त्रज्ञ, जैवविविधता आणि पॅलेओबायोलॉजी ग्रुप, आणि डॉ. पी.के. ढाकेफळकर, संचालक, ARI, पुणे, (director@aripune.org, 020-25325) यांच्याशी संपर्क साधावा.
केंद्रीय जल आयोग साप्ताहिक आधारावर देशातील 146 धरणांच्या जिवंत पाणी साठवण स्थितीचे निरीक्षण करते.यापैकी 18 धरणे जलविद्युत प्रकल्पातील आहेत या धरणांची एकूण प्रत्यक्ष साठवण क्षमता 34.960 अब्ज घनमीटर आहे.146 धरणांची एकूण जिवंत साठवण क्षमता 178.185 अब्ज घनमीटर आहे. दिनांक 13.07.2023 रोजी जारी केलेल्या धरण जलसाठवण संदर्भातील विवरणानुसार ,या धरणांमध्ये उपलब्ध असलेला जिवंत पाणीसाठा 59.503 अब्ज घनमीटर असून एकूण जिवंत साठवण क्षमतेच्या 33% आहे. तथापि, मागील वर्षी याच कालावधीमध्ये या धरणांमध्ये उपलब्ध जिवंत जलसाठा 69.726 अब्ज घनमीटर होता आणि गेल्या 10 वर्षांची या जलसाठ्याची सरासरी 53.904 अब्ज घनमीटर होती.अशाप्रकारे, 13.07.2023 च्या विवरणानुसार, 146 धरणांमध्ये उपलब्ध असलेला जिवंत साठा हा गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील जिवंत साठ्याच्या 85% आणि गेल्या दहा वर्षांच्या सरासरीच्या 110% इतका आहे.
एकूण साठवण स्थिती संपूर्ण देशात गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा कमी आहे मात्र मागील दहा वर्षांच्या याच कालावधीतील सरासरी साठ्यापेक्षा ती चांगली आहे.
देशात उपलब्ध असलेल्या जिवंत पाणीसाठ्याची स्थिती
146 धरणांच्याउपलब्ध डेटाच्या आधारे दिनांक 13.07.2023 च्या जलाशय साठ्याच्या विवरणानुसार,देशात निर्माण होणाऱ्या अनुमानित एकूण जिवंत पाणीसाठा 257.812 अब्ज घनमीटरच्या तुलनेत देशात अनुमानित जिवंत पाणीसाठा 83.816 अब्ज घनमीटर आहे .
संबंधित कालावधीसाठी मागील वर्षाच्या तुलनेत (% मध्ये) चांगला पाणीसाठा असलेली राज्ये: हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, झारखंड, ओदीशा , उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड.
संबंधित कालावधीसाठी मागील वर्षीप्रमाणेच समान जलसाठा (% मध्ये) असलेली राज्ये: गुजरात.
संबंधित कालावधीसाठी गेल्या वर्षीपेक्षा कमी जलसाठा (% मध्ये) असलेली राज्ये: पश्चिम बंगाल, त्रिपुरा, नागालँड, बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा (दोन्ही राज्यांमधील दोन एकत्रित प्रकल्प), आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू.
पुणे -आज सकाळी कोंढवा बुद्रुक येथील येवलेवाडीतील एका कपड्याच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कोंढवा पोलिस स्टेशन अंतर्गत येवलेवाडी गाव येथे येवलेवाडी कमानी जवळ दीपचंद धर्मचंद शहा या फॅब्रिक कंपनीचे गोडाऊन आहे. येथेच आज सकाळी आग लागल्यामुळे गोडाऊन मधील फॅब्रिक मटेरियलने पेट घेतला. त्यामुळे परिसरात आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात उठले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
आग लागलेले गोडाऊन व आजुबाजूच्या परिसरामध्ये सुरक्षित अंतर आहे. त्यामुळे आगीमुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे कोंढवा पोलिसांनी सांगितलेल आहे. तसेच, शेजारील इमारतीमधील नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे, अशी माहिती कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिली आहे.
येवलेवाडी येथे गोडाऊनमधे भीषण आग लागल्याचे समजताच, पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकुण 12 अग्निशमन वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली. आग विझवण्याचे काम सुरू असून हे गोडाऊन कापड, पडद्याचे असल्याची प्राथमिक माहिती अग्निशामक दलाने दिली. घटनास्थळी 8 फायर इंजिन व 7 वॉटर टँकर आहेत, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी निलेश महाजन यांनी दिलेली आहे.
पॅन-इंडिया म्हणून जी अभिनेत्री सध्या टॉप लिस्ट वर आहे ती म्हणजे तमन्ना भाटिया ! जी करदा मधील तिच्या अभिनयामुळे ती चर्चेत आली. आता तिच्या बद्दल अजून एक गोष्ट समजते ती म्हणजे जॉन अब्राहम वेदा चित्रपटात ती दिसणार असल्याचं समजतंय. या दोन प्रतिभावान कलाकारांना एका पडद्यावर पाहणे एखाद्या व्हिज्युअल ट्रीटपेक्षा कमी नसणार यात शंका नाही. सूत्रांनी या बाबतीत एक मनोरंजक अपडेट देत ते दोघे स्क्रीन शेयर करणार असल्याचं सांगितलं आहे . सूत्राने सांगितले की, “जॉन अब्राहमसोबत तमन्ना भाटिया एका नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. लवकरच अधिक गोष्टी समजतील.चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केले आहे आणि तो 7 वर्षांनंतर एका दमदार कथेसह पुन्हा काम करणार आहे” बरं हा एक मनोरंजक माहितीचा भाग आहे आणि जॉन अब्राहमच्या विरुद्ध तमन्ना भाटिया पाहण्यासाठी ला बघण्यासाठी उत्सुकता वाढली आहे. ही नवीन जोडी काय धुमाकूळ घालणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे. तमन्ना आगामी जेलर, भोला शंकर, वांद्रे आणि अश्या अनेक चित्रपटात दिसणार आहे.
पुणे : महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा विभागाने राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या पाकिस्तानी, बांग्लादेशी व अतिरेकी कारवायातील बंदी वगळता इतर विदेशी बंद्यांना कुटुंबियांशी व नातेवाईकांशी संपर्क साधण्याकरीता ई-प्रिझन प्रणालीद्वारे व्हिडीओ कॉलिंग सुविधा उपलब्ध करुन द्यावी असे निर्देश कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता राज्यातील सर्व कारागृह प्रमुखांना दिले आहेत.मानवतेच्या दृष्टीकोनातून सर्व बंद्यांसाठी ही सुविधा ४ जुलै २०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्यातील विविध कारागृहात सध्या ६३७ बंदी दाखल आहेत. यामध्ये मुंबई,नवी मुंबई व इतर मेट्रोपॉलिटन शहरातील कारागृहात विदेशी बंद्यांचे प्रमाण अधिक आहे. कारागृहात नायजेरियन, बांग्लादेश, केनिया, कोलंबिया, इराण, इराक, ब्रिटन, ग्रीस, गिनी, घाना, ब्राझील, थायलंड, युगांडा, चीन, पाकिस्तान, नेपाळ इत्यादी देशांचे नागरिक विविध गुन्ह्यांमध्ये अटक होऊन दाखल आहेत.
विदेशी बंद्यांचे नातेवाईक अथवा वकील प्रत्यक्ष भेटून मुलाखत घेण्यासाठी येवू शकत नसल्याने विदेशी बंद्यांना कायदेशीर मदत मिळण्यास व कारागृहातून सुटका होण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे विदेशी बंद्यांमध्ये नैराश्य वाढू लागते. कारागृह प्रशासनाला या बंद्यांवर सतत निगरानी ठेवावी लागते. ही सुविधा विदेशी बंद्यांना उपलब्ध करून दिल्याने त्यांना कायदेशीर मदत लवकर मिळेल व कारागृहातून लवकर सुटण्यास मदत होईल. त्यामुळे कारागृहातील बंद्यांची गर्दी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
ही सुविधा नुकतीच प्रथमतः ऑर्थर रोड कारागृहात बंदिस्त असलेला नायजेरियन विदेशी बंदी व त्याचे नातेवाईक यांनी सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शनाखाली एनआयसी या संस्थेने विकसित केलेल्या ई-प्रिझन प्रणालीद्वारे बंदी व नातेवाईक मुलाखत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेतली. ही सुविधा यशस्वीपणे विदेशी बंद्यांना लागू करण्याची जबाबदारी कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षक, डॉ जालिंदर सुपेकर यांच्याकडे असल्याचे श्री. गुप्ता यांनी कळविले आहे.