Home Blog Page 1433

‘जय जय महाराष्ट्र माझा’ राज्याचे अधिकृत राज्यगीत: राज्यगीत गायनाची नियमावली जाहीर

मुंबई, दि. 2 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्यातील तरुणाई, समाजातील सर्वच नागरिकांना स्फूर्तीदायक असणारे आणि महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे अस्मितादर्शक ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे कवी राजा नीळकंठ बढे लिखित स्फूर्तीगीत राज्य शासनाने राज्याचे अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकारले असूनन याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या राज्यगीत गायनाबाबतची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कवीवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतावर यथोचित संस्करण करून दोन चरणांसह राज्यगीत स्वीकृत करण्यात आले आहे. या गीताचा कालावधी सुमारे 1.41 मिनिटे असणार आहे. सर्व नागरिकांनी राज्यगीताच्या सन्मानपूर्वक गायन वादनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

संपूर्ण गीत हे अत्यंत आशयपूर्ण, स्फूर्तीदायक आणि राज्याच्या थोर आणि शूर परंपराची गाथा सांगणारे असले तरी राज्यगीत हे विविध प्रसंगी सातत्याने सादर होणे अपेक्षित आहे. त्यामुळे वेळ मर्यादेचे भान ठेऊन त्याचे संक्षिप्तीकरण होणे आवश्यक होते. सध्या प्रचलित असलेल्या या गीतातील दोन चरण मिळून त्यांचे नव्याने ध्वनीमुद्रण करून ते मर्यादित वेळेत म्हणजेच दीड ते पावणे दोन मिनिटात बसविण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 पासून हे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकृत करण्यात येत आहे. हे गीत 1.41 मिनिटे वाजविता / गाता येईल.

राज्यगीताचे गायन/वादन करण्याबाबत शासनाने राष्ट्रगीताप्रमाणे नियमावली तयार केली आहे. राज्यगीत अंगिकारण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरीही, राष्ट्रगीताचा मान, सन्मान व प्रतिष्ठा सर्वोच्च राहील. शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरुवातीस राज्यगीताचे गायन /वादन हे ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे. 1 मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले / गायिले जाईल. राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत / परिपाठ / प्रार्थना / प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरिकांना सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम इत्यादीमध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविण्यास / गाण्यास मुभा राहील.

राज्यगीत सुरु असताना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्य गीताचा सन्मान करावा. लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृद्ध व्यक्ती यांना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल. राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुध्दा बाळगण्यात यावे. हे गीत वाजवितांना/ गातांना त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात यावा.

वाद्यसंगीतावर आधारित या गीताची वाद्यधून पोलीस बँडमार्फत वाजविता येईल. राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये या राज्यगीताचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. राज्यगीताची लिंक राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.

सर्व शासकीय कार्यालये/ निम शासकीय कार्यालये, शासकीय अनुदानित व विना अनुदानित आस्थापना, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत उपक्रम, स्वयंसेवी संस्था व खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरिकांनी राज्यगीताच्या सन्मानपूर्वक गायन वादनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

कवीवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतावर यथोचित संस्करण करून दोन चरणांसह राज्यगीत स्वीकृत करण्यात आले आहे हे पुढीलप्रमाणे राज्यगीत असेल:-

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥1॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी

दारिद्र्याच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥ 2॥

फर्ग्युसनमध्ये रंगणार ‘मुक्तछंद’

पुणे, दि. 2 – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात 6 ते 8 फेब्रुवारी या कालावधीत ‘मुक्तछंद’ या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. सुशीलकुमार धनमने यांनी कळविली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री विभावरी देशपांडे यांच्या हस्ते सोमवारी (6 फेब्रुवारी) सकाळी 10 वाजता उद्घाटन होणार आहे. प्राचार्य डॉ. रविंद्रसिंग परदेशी अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. त्यानंतर ‘अभिनयाचे माध्यमांतर’ या परिसंवादात सिद्धार्थ बोडके, आस्ताद काळे, गौरी नलावडे, नील सालेकर सहभाग घेतील. आरती अंकलेकर-टिकेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम संध्याकाळी साडेसहा वाजता रंगणार आहे.

‘दृश्यकलांचे निर्मितीवेध’ या कार्यक्रमात यतिन पंडित (मूर्तिकला), पूजा निलेश (सुलेखन), चारुहास पंडित (व्यंगचित्र) यांचे सादरीकरण मंगळवारी (7 फेब्रुवारी) सकाळी साडेदहा वाजता होणार असून, अरुणा ढेरे आणि अशोक नायगावकर या कविश्रेष्ठांची मुलाखत सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे.

‘बीजमातेचे सृजन’ ही राहीबाई पोपेरे यांची मुलाखत आणि ‘बंक लेक्चर्सचा सीलॅबस’ हे कार्यक्रम बुधवारी (8 फेब्रुवारी) अनुक्रमे सकाळी साडेदहा आणि सायंकाळी साडेसहा वाजता होणार सादर केले जातील.

” अ ” मानांकन मिळविण्यात मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानी!

प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे राज्यातील पहिला ” अ ” मानांकन पत्र प्रदान सोहळा संपन्न!

पुणे-पुणे शहरातील मोटार ड्रायव्हिंग स्कूल प्रशिक्षण संस्थांची तपासणी करून ” “अ ” दर्जा गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या एकूण 36 सरकार मान्य ड्रायव्हिंग स्कूल संचालकांना मानांकन पत्र प्रदान सोहळा प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथे पार पडला संपूर्ण महाराष्ट्रात परिवहन आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार तपासणी पूर्ण करून मानांकन पूर्ण करून हे मानांकन प्रदान करणारे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय पुणे हे राज्यातील प्रथम कार्यालय ठरले आहे.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉ अजित शिंदे प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे संजीव भोर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंत भोसले सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी केले.


मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्याशी संलग्न असलेल्या पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी ” अ ” मानांकनात अव्वल स्थान पटकावले 100 वर्षापेक्षा जास्त काळ सरकारमान्य ड्रायव्हिंग स्कूल क्षेत्रात चौथी पिढी कार्यरत असलेले आपटे मोटार स्कूल अलका टॉकीज पुणे संचालक विलास आपटे हे असोसिएशनचे कार्याध्यक्ष आहेत कुंभार मोटार ड्रायव्हिंग स्कूल नवी पेठ पुणे चे संचालक यशवंत कुंभार हे असोसिएशनचे महासचिव आहेत तसेच न्यू विनायक मोटर ड्रायव्हिंग स्कूल कोथरूड पुणे संचालक राजू घाटोळे मोटार ड्रायव्हिंग स्कूल तसेच महाराष्ट्र राज्याचे ते अध्यक्ष आहेत तसेच राजू घाटोळे यांच्या वडिलांचे विनायक ड्रायव्हिंग स्कूल सहकार नगर पुणे 9 संचालक कुंडलिक मारुती घाटोळे यांचा 72 वर्षाचा प्रशिक्षक म्हणून अनुभव आहे ते 1971 रोजी पुण्यातील डबल डेकर बस शिकवणारे पहिले प्रशिक्षक आहेत त्यांच्या प्रशिक्षण संस्थेला सुद्धा अमानांक मिळाले आहे
मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओ नर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष व श्री उदय मोटार ड्रायव्हिंग स्कूल लेक टाऊन कात्रज पुणे संचालक एडवोकेट निलेश गांगुर्डे यांच्याही प्रशिक्षण संस्थेचा समावेश अमानांकनात आहे
मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष व श्री व्यंकटेश्वरा मोटार ड्रायव्हिंग स्कूल साने गुरुजी स्मारक पुणे संचालक अनंत कुंभार यांच्या प्रशिक्षण संस्थेला अ मानांकन प्राप्त झाले आहे. मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व लॉर्ड रामा मोटार ड्रायव्हिंग स्कूल निरा जेजुरी संचालक भाऊसाहेब कुदळे यांच्या प्रशिक्षण संस्थेला अमानांक प्राप्त झाले आहे तसेच पुणे शहर मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन पुणे शहराचे महासचिव व नितीन मोटार ड्रायव्हिंग स्कूल एकलव्य कॉलेज कोथरूड पुणे या प्रशिक्षण संस्थेचे संचालक नितीन भांबुरे यांच्याही प्रशिक्षण संस्थेला अ मानांकन प्राप्त झाले आहे.
क्लासिक मोटर ड्रायव्हिंग स्कूल एन आय बी एम रोड कोंढवा संचालक व मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स महाराष्ट्र राज्य राज्य सचिव संजय सोनवणे यांच्या प्रशिक्षण संस्थेला अ मानांकन प्राप्त झाले आहे.
भूमाता ब्रिगेड च्या सचिव व रामलिंग मोटार ड्रायव्हिंग स्कूल शिरूर पुणे च्या संचालिका पुष्पक केवडकर यांच्या प्रशिक्षण संस्थेला अ मानांकन प्राप्त झाले आहे.
पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन पुणे कात्रज विभागाचे अध्यक्ष व स्वराज मोटर ड्रायव्हिंग स्कूल कात्रज पुणे संचालक सचिन गुंड यांच्या प्रशिक्षण संस्थेला अ मानांकन प्राप्त आहे. पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन पुणे शहर उपाध्यक्ष व कैलास गिरी मोटर ड्रायव्हिंग स्कूल अंबामाता मंदिर कात्रज व कैलास गिरी मोटर ड्रायव्हिंग स्कूल कात्रज रोड संचालक निलेश गिरी गोसावी यांच्या दोन्हीही प्रशिक्षण संस्थांना मानांकन प्राप्त झालेले आहे.
पुणे शहर मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन पुणे शहर उपाध्यक्ष व जगदीश मोटार ड्रायव्हिंग स्कूल नरे आंबेगाव संचालक जगदीश मुळे यांच्या प्रशिक्षण संस्थेचा समावेश अ मानांकनात आहे.
पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल शहर उपाध्यक्ष व भरत मोटार ड्रायव्हिंग स्कूल दत्तनगर आंबेगाव संचालक भरत गायकवाड यांच्या प्रशिक्षण संस्थेला अमानांकन प्राप्त झाले आहे. पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन शहर उपाध्यक्ष व वीरेंद्र मोटार ड्रायव्हिंग स्कूल कुमार पार्क बिबवेवाडी संचालक वीरेंद्र आंबेठी यांच्या प्रशिक्षण संस्थेला अमानांकन प्राप्त आहे. मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुख व स्वरा मोटर ड्रायव्हिंग स्कूल सासवड पुणे संचालक आशिष पवार यांच्या प्रशिक्षण संस्थेला अ मानांकन प्राप्त आहे. क्षीरसागर मोटार ड्रायव्हिंग स्कूल कर्वेनगर पुणे संचालक व पुणे शहर मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन पुणे शहर उपाध्यक्ष दत्तात्रय क्षीरसागर यांच्या प्रशिक्षण संस्थेला अ मानांकन प्राप्त झाले आहे
गणेश मोटर ड्रायव्हिंग स्कूल खराडी पुणे व विमान नगर खराडी विभागाचे प्रमुख गणेश देवकर यांच्या प्रशिक्षण संस्थेला मानांकन प्राप्त झाले आहे.
पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन पुणे सोशल मीडिया विभाग प्रमुख व न्यू अक्षय मोटार ड्रायव्हिंग स्कूल सोमवार पेठ पुणे संचालक अक्षय काळे यांच्या प्रशिक्षण संस्थेला मानांकन प्राप्त आहे. न्यू प्रगती मोटर ड्रायव्हिंग स्कूल हडपसर व पुणे शहर हडपसर विभागाचे प्रमुख सुमित बाजारे यांच्या प्रशिक्षण संस्थेला मानांकन प्राप्त आहे. मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सभासद योगीराज मोटार ड्रायव्हिंग स्कूल के के मार्केट पुणे संचालक निलेश बडदे यांच्या प्रशिक्षण संस्थेला अ मानांकन प्राप्त झाले आहे. श्री मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालक व मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य सन्माननीय सभासद श्री गायकवाड यांच्या प्रशिक्षण संस्थेला अमानांकन प्राप्त आहे .
सदर प्रसंगी अ मानांकन प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले हा सन्मान पुणे शहरातील 36 ड्रायव्हिंग स्कूल संचालकांना सदर प्रसंगी सन्मानित करण्यात आले. एकूण मानांकनाच्या 70 टक्के मानांकन मिळविण्यात मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे सदर प्रसंगी एकनाथ ढोले विठ्ठल मेहता अनंत कुंभार राजू घाटोळे संजीव भोर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे व डॉ अजित शिंदे प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थितांना संबोधित केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाहिद जमादार वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक पुणे यांनी केले आभार प्रदर्शन रेशमा शेख सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुष्पक केवडकर अक्षय काळे गणेश देवकर भरत गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली.

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणेचा २९ वा स्थापना दिन उत्साहात साजरा

पुणे-

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे संस्थेने आपला २९ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा केला. यासह १९९८ मध्ये पदवी प्राप्त केलेल्या अभियंत्यांच्या पहिल्या तुकडीचा रौप्य महोत्सवही अभिमानाने साजरा केला गेला. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, PVSM, AVSM, VSM, ADC, COAS प्रमुख पाहुणे म्हणून या विशेष प्रसंगी उपस्थित होते.

एआयटीचे संचालक ब्रिगेडियर अभय भट यांनी सर्व मान्यवरांचे, निमंत्रितांचे आणि पुरस्कार विजेत्यांचे स्वागत केले. एआयटीने मागील वर्षात केलेल्या कामगिरीची आणि प्रगतीची झलक दाखवणारा एक संक्षिप्त आढावा त्यांनी सादर केला. यंदा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे प्रमाणे एआयटीच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट्स मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. यासह मान्यवर माजी विद्यार्थी आणि फॅकल्टीने मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल विशेष कौतुक केले. तसेच पुढील काही वर्षात एआयटी कशा पद्धतीने प्रगती करणार आहे, याविषयीची माहिती व नियोजन सांगितले.

या प्रसंगी एआयटीतर्फे मानाचा असा ‘जीवनगौरव पुरस्कार’ कल्याणी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांना प्रदान करण्यात आला. कल्याणी ग्रुपची प्रमुख कंपनी असलेली भारत फोर्ज लिमिटेड ही जगातील मोठी फोर्जिंग कंपनी आहे, जी राष्ट्राच्या आत्मनिर्भर बनण्याच्या प्रयत्नात अमुल्य योगदान देत आहे. तसेच ही कंपनी संरक्षण उपकरणांची निर्यात करणारी महत्वाची कंपनी आहे. प्रगत संरक्षण उपकरणांच्या निर्मितीमागील प्रेरक शक्ती आहेत, त्यांच्या निर्र्यातीत जगातील सर्वात मोठी फायरिंग आर्टिलरी गन सिस्टीम (ATAGs), स्वदेशी हेवी क्विक रिअॅक्शन फायटिंग वाहने, दारुगोळा क्षेपणास्त्रे आणि हवाई संरक्षण प्रणाली यांचा समावेश आहे.

पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांनी सन्मानास उत्तर देताना म्हणाले, भारतीय सशस्त्र दलांचे कर्तृत्व कौतुकास्पद आहे. आज भारतीय संरक्षण उद्योग प्रगत शस्त्र प्रणालीच्या आयातदारांकडून निर्यातदार बनले आहेत. भारतीय अर्थव्यवस्था, संरचनात्मक सुधारणा, उत्पादन उत्क्रांती सक्षम करणारे तंत्रज्ञान, “इंडिया फर्स्ट” मुत्सद्देगिरी आणि युवाशक्ती या पाच प्रमुख शक्तींमुळे पुढील दशकात भारत एक राष्ट्र म्हणून जागतिक व्यासपीठावर नेतृत्व करेल. २०४७ पर्यंत भारत ३३ ट्रिलियन अर्थव्यवस्था बनेल.

कार्यक्रमात या प्रसगी एआयटीच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनच्या शाखेतील पहिल्या बॅचचे माजी विद्यार्थी आणि कोलॅबरेशन.एआय या वॉशिंग्टन, अमेरिका स्थित कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समीर मैनी यांना यशस्वी माजी विद्यार्थी युवा उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

समीर मैनी म्हणाले, “यशस्वी तरुण माजी विद्यार्थी उद्योजक पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल मी नम्र आणि कृतज्ञ आहे. आज मी जिथे आहे तिथे पोहोचन्यात आणि माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारच्या जडणघडणीत एआयटीचे खूप योगदान आहे. कॉलेजमध्ये असतानाच्या क्षणांचा आनंद घ्या. प्रत्येक उपक्रमात सहभागी व्हा.”

प्रमुख पाहुणे जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते कार्यक्रमात पुढे गुणवंत विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. चीफ ऑफ आर्मी स्टाफ बेस्ट ऑल राउंडर ट्रॉफी माहिती तंत्रज्ञानाच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आकाश भाटी याला देण्यात आली. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी क्रीडा पुरस्कार राजशेखर करंडक संगणक अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी भावना निम्मगड्डा हिला देण्यात आला. सर्वोत्कृष्ट इनोव्हेशनसाठी राजपूत रेजिमेंट ट्रॉफी माहिती तंत्रज्ञान विभागाच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी अभिनव प्रताप चौहान याला देण्यात आली.

सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम संशोधन आणि सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रा. डॉ. सागर राणे यांना तर उत्कृष्ट तांत्रिक सहाय्यक कर्मचारी (बेस्ट नॉन-टीचिंग टेक्निकल स्टाफ अवॉर्ड) पुरस्कार स्वाती साळुंखे आणि सर्वोत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार अविनाश भोसले यांना देण्यात आला.

प्रमुख पाहुणे, जनरल मनोज पांडे, PVSM, AVSM, VSM, ADC, COAS, यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे आणि एआयटीच्या पहिल्या बॅचचे २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. ते म्हनाले की, “मला आनंद वाटतो की, एआयटी २०० सर्वोत्तम इंजिनिअरिंग कॉलेजच्या यादीमध्ये समाविष्ट झाले असून, गुणवत्तेचा आलेख चढता ठेवला आहे. मोठ्या संख्येने माजी विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे वळत स्वतःचे स्टार्टअप सुरु केले असून, आज ते यशश्वीपणे चालवले जात आहेत, याचा आनंद वाटतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, फाईव्ह जी, क्वांटम कम्प्युटिंग या पाच तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात क्रांतिकारी बदल होत आहेत. आधुनिक काळातील युद्धावर विघटनकारी रीतीने प्रभाव टाकण्यासाठी संभाव्य लष्करी अनुप्रयोग महत्वाचे ठरत आहेत. स्टार्टअप्स, वैयक्तिक नवोन्मेषक, एमएसएमई, संशोधन आणि विकास संस्था आणि शैक्षणिक संस्था यांच्या सक्षमतेचा लाभ घेण्यासाठी इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स (आयडीईएक्स) अंतर्गत प्रमुख प्रकल्पांचा पाठपुरावा केला जात आहे. हे भारतीय सैन्याला भविष्यात सज्ज, तंत्रज्ञानाने चालवलेले, प्राणघातक आणि चपळ सैन्यात आकार देण्यासाठी रोडमॅप बनवन्यात उपयोगी ठरत आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या संदेशाप्रमाणे “स्वप्न ती नसतात जी तुम्ही झोपेत पाहतात, तर ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत.” त्याचा आपण सतत विचार केला पाहिजे.”

या कार्यक्रमादरम्यान टाटा, झेडएस असोसिएट, पर्सिस्टंट फाऊंडेशन, होरायझन ग्रुप, बडवे ग्रुप, हॅशमॅप, उडचलो ग्रुप, न्यू इंडियन एक्सप्रेस यांसारख्या संस्थांनी प्रायोजित केलेल्या विविध शिष्यवृत्ती कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या.

एआयटीच्या मॅनेजमेंट कमिटीचे चेअरमन व सदर्न कमांड येथील सीएसओ मेजर जनरल टीएस बेन्स यांनी आभार मानले. यावेळी एआयटीचे जॉईंट डायरेक्टर एम. के. प्रसाद, प्राचार्य बी. पी. पाटील, मेजर जनरल आर. के. रैना, VSM, MD, AWES, अनेक सेवानिवृत्त अधिकारी, उद्योग प्रतिनिधी, पालक, माजी विद्यार्थी, एआयटी च्या विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पुण्यात तरुणीला विवस्त्र करुन मारहाण; विवस्त्रावस्थेतील ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित

पुणे-प्रेमप्रकरणातून तरुणीला पळवून नेल्याने तरुणाच्या बहिणीचे अपहरण करुन तिला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. अपहरण केल्यानंतर २४ वर्षीय बहिणीला विवस्त्र करुन खोलीत डांबून ठे‌वून मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात आले. आरोपींनी समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीत प्रसारित केल्याचे उघडकीस आले आहे.या प्रकरणी सात जणांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नंदकुमार माटे, सुंदराबाई माटे, आरती पिंपळे, बाळासाहेब पिंपळे, सागर जगताप, श्रीराम गोसावी (सर्व रा. उरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित तरुणीच्या बहिणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिला आणि आरोपी नातेवाईक आहेत. आरोपी नंदकुमार माटे यांच्या नात्यातील तरुणीस तक्रारदार महिलेच्या भावाने पळवून नेल्याचा संशय आरोपींना होता. आरोपींनी तक्रारदार महिला आणि तिच्या बहिणीचे अपहरण केले. माटे यांनी नात्यातील तरुणीचा ठावठिकाणा विचारला. दोघींनी ठावठिकाणा सांगितला नाही. त्यामुळे आरोपींनी दोघींना गजाने मारहाण केली. एका खोलीत त्यांना दोन दिवस डांबून ठेवले.

तक्रारदार महिलेच्या बहिणीस विवस्त्र करुन तिचे मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले. चित्रीकरण त्यांनी समाजमाध्यमात प्रसारित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक काळे तपास करत आहेत.

कसब्यात भाजपचा उमेदवार ब्राम्हण समाजाचाच ….

पुणे- येथील कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाने ब्राम्हण समाजाचाच उमेदवार देण्याचे ठरविल्याचे वृत्त हाथी आले आहे. यामुळे शैलेश टिळक आणि धीरज घाटे हि दोन नावे आता आता आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे, या खेरीज मेधा कुलकर्णी या कसब्याच्या रिंगणात नाहीतच आणि स्वरदा बापट यांची संधी खासदार बापट यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव आणि खुद्द स्वरदा या देखील प्रसुतीच्या आराम काळात असल्याने दूर गेल्याचे मानले जाते आहे. दरम्यान राज्यातील नेतृत्वाच्या वरच्या  फळीतील एका नेत्याने मात्र कसबा मतदार संघात आता ब्राम्हण मतदार किती उरला आहे याचा अभ्यास केला पाहिजे असे मत नोंदवीत ब्राम्हणेतर उमेदवार द्यावा अशी अप्रत्यक्ष मागणी नोंदविल्याचे हि समजते आहे.

भाजपकडून कसबा पोटनिवडणुकीसाठी शैलेश टिळक यांच्या नाव आघाडीवर आहे. शैलेश टिळक हे भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे पती आहेत. शैलेश टिळक यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत भेट घेतली आहे.तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे , त्यांनी ‘कळवितो ‘ असे त्यांना सांगितले आहे,तर धीरज घाटे यांनी देखील फडणवीस यांची भेट घेतली आहे आणि टिळकांना देणार नसाल तर आपला प्राधान्याने विचार करावा असे सांगितले आहे.कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी आपण कसबा मतदार संघात निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे सांगत त्यामुळे  या संदर्भात आपण कोणाला संपर्क केलेला नाही आणि कोणी आपल्याला संपर्क केलेला नाही असे म्हटले आहे. आपल्याला तेथील स्थानिक पदाधिकारी, इच्छुक यांच्या हक्कावर गदा आणण्याची अजिबात इछ्या नाही असेही त्यांनी म्हटल्याचे वृत्त समजते आहे. तर कन्यारत्न प्राप्त झाल्याने आता महिनाभर स्वरदा बापट माहेरी सांगलीतच असतील असेही समजते आहे.दरम्यान खासदार गिरीश बापट यांचा मतदार संघात मोठा प्रभाव आहे त्यांचा जसा  घरोघरी प्रत्यक्ष संपर्क आहे तसा टिळकांचा नाही आणि सर्व स्तरातील नागरिकांना सहज उपलब्ध होऊ शकेल असा उमेदवार म्हणून घाटे यांच्या सारखी तुलना टिळकांची होऊ शकत नाही . केवळ या अशाच मुद्द्यांवर आणि घराणेशाही नको या विचारावरच टिळकांना नाकारले जाईल असेही कोणाला वाटत नाही.मात्र  शेवटच्या क्षणी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी खुद्द शरद पवारांशी जर खासदार बापट यांनी संपर्क साधला तरच बिनविरोध निवडणुकीचा मार्ग खुला होऊ शकणार आहे असेही मानले जाते. मात्र बापट यांच्या प्रकृती स्वस्थ्यामुळे हि शक्यता मावळली कि काय ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होतो  आहे. महापालिकेतील माजी सभागृहनेते  गणेश बिडकर, माजी  स्थायी समिती अध्यक्ष  हेमंत रासने यापैकी ब्राम्हणेतर समाजातील इच्छुकांना हि येथून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे , एवढेच नव्हे तर रासने यांनी जोरदार तयारीही सुरु केल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. तीन वेळा स्थायी समिती अध्यक्षपद दिल्यानंतर रासने यांना उमेदवारी कशाला ? असा प्रश्न उपस्थित होत असला तरी त्यांची तयारी नजरेत भरणारीआहे .तरीही  भाजपचे राजकीय गणित धक्कातंत्रावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही .याच आधारावर काल रात्री एका ज्येष्ठ पत्रकाराने कसब्यात माजी खासदार संजय काकडे यांना उमेदवारी दिली जाईल अशी टूम सोडल्याने बरीच खसखस पिकली .भाजप उद्या किंवा परवा अधिकृत उमेदवार घोषणा करण्याची शक्यता आहे.उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी फडणवीस किंवा चंद्रकांत दादा पाटील या दोहोपैकी एक जण खा. बापट यांच्याशी फोनवर संपर्क साधून उमेदवारी घोषित करतील असेही सांगितले जाते आहे.

FPO तून उभारलेले 20 हजार कोटी अदानी परत करणार:रात्री उशीरा FPO रद्द केला, गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी निर्णय : अदानी

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने बुधवारी रात्री उशीरा 20 हजार कोटींचा पूर्णपणे सबस्क्राईब्ड एफपीओ रद्द केला आहे. गुंतवणुकदारांचा पैसा परत केला जाईल. या इक्विटी शेअर्सची फेस व्हॅल्यू एक रुपया आहे.

गौतम अदानींनी एफपीओ रद्द केल्यानंतर एक व्हिडिओ संदेश दिला. यात गुंतवणुकदारांचे आभार मानले. म्हटले, ‘गेल्या आठवड्यात स्कॉटकमध्ये झालेल्या चढ-उतारानंतरही कंपनीचा व्यवसाय आणि त्याच्या व्यवस्थापनातील आमच्याविषयीचा विश्वास आश्वासक आहे. माझ्यासाठी गुंतवणुकदारांचे हित सर्वोपरी आहे. बाकी सर्व दुय्यम आहे. म्हणून गुंतवणुकदारांना संभाव्य नुकसानीपासून वाचवण्यासाठी आम्ही एफपीओ मागे घेतला आहे.’

ते म्हणाले, ‘या निर्णयाचा आमचे विद्यमान ऑपरेशन्स आणि भविष्याच्या योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही योजनांच्या कालबद्ध परिचालनाकडे लक्ष देऊ. बोर्डाला वाटले की एफपीओसह पुढे जाणे नैतिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही. बाजारात स्थिरता आल्यावर आम्ही आमच्या भांडवली बाजार धोरणाचा आढावा घेऊ. आमचे ईएसजीवर विशेष लक्ष आहे. आमचा प्रत्येक व्यवसाय जबाबदारीने मूल्य निर्माण करत राहील.’

‘अदानी एंटरप्रायझेसने 1 फेब्रुवारीला झालेल्या बोर्डाच्या बैठकीत निर्णय घेतला की, आम्ही एफपीओ पुढे घेऊन जाणार नाही. आम्ही परिस्थिती आणि स्टॉकमधील चढ-उतार पाहता हा निर्णय घेतला आहे की ग्राहकांच्या हितासाठी एफपीओसह पुढे जाणार नाही आणि व्यवहार पूर्णपणे मागे घेतले जातील. आम्ही गुंतवणुकदारांचे एफपीओत सहभागी होण्यासाठी आभार मानतो. या एफपीओचे सबस्क्रिप्शन काल यशस्वीरित्या बंद झाले आहे.’

स्टॉक अस्थिर असूनही ही कंपनी, आमचा व्यवसाय आणि आमच्या व्यवस्थापनावरील विश्वासाबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. तथापि, आज बाजार अभूतपूर्व राहिला. आमच्या स्टॉकमध्ये दिवसभर चढ-उतार राहिला. अशी असामान्य स्थिती पाहता कंपनीच्या बोर्डाला वाटले की आता या एफपीओसह पुढे जाणे नैतिकतेच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही. आमच्या गुंतवणुकदारांचे हित सर्वात पुढे आहे.

म्हणूनच भविष्यात होणाऱ्या कोणत्याही आर्थिक नुकसानीपासून त्यांना वाचवण्यासाठी बोर्डाने निश्चित केले आहे की या एफपीओसह पुढे जाणार नाही. आम्ही आमच्या लोकांना रिफंड देण्यासाठी आमच्या बूक रनिंग लीड मॅनेजर्ससह काम करत आहोत. आमचा ताळेबंद मजबूत आहे. आमचा कॅश फ्लो आणि संपत्ती सुरक्षित आहे. सोबतच कर्ज फेडण्याचा आमचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे.

आमच्यासा या निर्णयाने आमचे सध्याचे परिचालन आणि भविष्यातील आमच्या योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही दीर्घ कालावधीत मूल्य निर्मितीवर लक्ष केंद्रित करत राहू आणि आमचा विकास अंतर्गत वाढीच्या हिशोबाने व्यवस्थापित केली जाईल. बाजार जसा स्थिर होईल तसे आम्ही आमच्या भांडवली बाजार धोरणाचा आढावा घेऊ. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला तुमचे सहकार्य मिळत राहील. आमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी धन्यवाद.’

एफपीओ काय असतो

एफपीओ म्हणजेच फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग. ही कंपनीसाठी पैसा उभारण्याची एक पद्धत असते. जी कंपनी आधीच शेअर बाजारात लिस्टेड असते. ती गुंतवणूकदारांसाठी नवे शेअर ऑफर करते. हे बाजारातील शेअरपेक्षा वेगळे असतात. बहुतांश शेअर्स प्रमोटर्स जारी करतात. एफपीओचा वापर कंपनीच्या इक्विटी बेसमध्ये बदल करण्यासाठी असतो.

आयपीओ आणि एफपीओतील फरक काय?

कंपन्या आपल्या विस्तारासाठी आयपीओ आणि एफपीओचा वापर करतात. इनिशिअल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओच्या माध्यमातून कंपनी पहिल्यांदा शेअर बाजारात उतरवते. तर एफपीओमध्ये अतिरिक्त शेअर्स बाजारात आणले जातात.

मुलींची पहिली शाळा सुरू झालेल्या भिडे वाड्यात स्मारकासाठी छगन भुजबळ मैदानात

आज उच्च न्यायालयात सुनावणीवेळी न्यायालयात भुजबळ स्वतः उपस्थित,राज्याचे महाधिवक्ता आणि विशेष सरकारी वकिलांशी चर्चा

भिडे वाड्यातील दुकानदार तडजोडीसाठी तयार, पुणे महानगरपालिकेने आता सहकार्य करणे गरजेचे – भुजबळ

मुंबई- ०१ फेब्रूवारी

देशातील पहिली मुलींची शाळा ज्या भिडे वाड्यात सुरु झाली त्या ठिकाणी पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरु करून स्मारक बनविण्यात येत आहे. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यात अनेक अडचणी येत आहे. यासाठी आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ थेट मैदानात उतरले आहेत.. आज न्यायालयात सुनावणीवेळी छगन भुजबळ स्वतः न्यायालयात उपस्थित होते यावेळी त्यांनी राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, तसेच विशेष सरकारी वकील यांच्याशी चर्चा केली आणि समन्वयाने यातून मार्ग काढावा अशी विनंती त्यांना केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की , भिडे वाड्यातील दुकानदार आणि मकानदारांना पुन्हा त्याच ठिकाणी दुकाने हवी आहेत आणि त्यांना त्याच ठिकाणी दुकाने देवून वरती शाळा आणि स्मारक करणार आहोत. गाळेधारक आता आपली याचिका मागे घेण्यास तयार आहे मात्र पुणे महानगरपालिकेने यात आता ठोस पाऊले उचलून त्यांना लेखी आश्वासन द्यायला हवे. यावेशी श्री भुजबळ यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्याशी देखील फोनवरून चर्चा केली….

भिडे वाड्यासंदर्भात झालेल्या सुनावणीत काही दिवसांपुर्वी याच जागेत शाळा असल्याचे पुरावे अपीलकर्त्यांच्या वकिलांकडून मागण्यात आले होते यावर उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की जानेवारी १८४८ साली भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा होती याचे अनेक पुरावे आम्ही उपलब्ध केले आहेत. यातले अनेक पुरावे हे कोल्हापुर विद्यापीठातील ऐतीहासिक नोंदी असलेल्या पुराभिलेख (Archives) मध्ये उपलब्ध आहेत ते देखील आम्ही कोर्टासमोर मांडू मात्र दुकानदार जर कोर्टाबाहेरच समन्वयाने यात तोडगा काढण्यास तयार असतील तर राज्य सरकारने त्यांना प्रतिसाद देऊन यात लक्ष घेतले पाहिजे.

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, यात राज्य सरकारने लक्ष घालावे यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना तातडीने पत्र पाठविले आहे. त्याचबरोबर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच ओबीसी विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्याशी देखील चर्चा करून शासनाने आयुक्तांना लेखी आदेश पाठवून हा प्रश्न तात्काळ मिटवायला हवा अशी मागणी केली आहे…

१० फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात दोन ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

नवी दिल्ली, 01 :  महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या  ब्रॉडग्रेज रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण या वर्षाच्या अखेरपर्यंत  करण्यात येईल, राज्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. यासह राज्यात सध्या 8 ‘वंदे भारत’ रेल्वेगाडया सुरू असून येत्या 10 फेब्रुवारीला आणखी दोन वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज येथे दिली.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी श्री. दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी  पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री. दानवे यांनी माहिती दिली.  ते म्हणाले, आज सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वांसाठी आहे. मध्यम वर्गीयांना न्याय देणारा, हा अर्थसंकल्प दूरदृष्टी ठेवून मांडलेला आहे.

रेल्वेला वर्ष 2014 पासून भरीव आर्थिक तरतूद केली जाते. महाराष्ट्राला 16 हजार कोटी रूपये मागील अर्थसंकल्पात देण्यात आले होते. त्यातून राज्यातील रेल्वे प्रकल्पाची बरीच प्रलंबित कामे झालेली आहेत.

भारतात येत्या काळात एकूण 400 ‘वंदे भारत’ रेल्वेगाडया धावतील. यातील सध्या 8 वंदे भारत रेल्वेगाड्या राज्यात आहेत. येत्या 10 फेब्रुवारीला आणखी दोन ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या सुरू होणार असल्याची, माहिती श्री. दानवे यांनी यावेळी सांगितले. या वंदे भारत रेल्वेगाड्या सोलापूर ते मुंबई पहिली आणि दूसरी मुंबई ते शिर्डी  अशा असणार आहेत.

वंदे भारत एक्सप्रेस

वंदे भारत एक्सप्रेस 2.0 अनेक उत्कृष्ट आणि अधिक गतीचा अनुभव देते. ही रेल्वेगाडी  प्रगत अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे, यात  रेल्वे गाड्यांची धडक टाळण्यासाठीची  स्वदेशी विकसित ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टीम – कवच  समाविष्ट आहे. वंदे भारत 2.0 अधिक अत्याधुनिकतेने सुसज्ज आहे आणि ही गाडी केवळ 52 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग वाढवू शकतो आणि या रेल्वेगाडीचा कमाल वेग ताशी 180 किलोमीटर  पर्यंत पोहोचतो, ही या रेल्वेगाडीची सुधारित वैशिष्ट्ये आहेत. सुधारित वंदे भारत एक्‍सप्रेसचे वजन 392 टन आहे, जे आधी  430 टन होते. यात वाय-फाय कंटेंट ऑन-डिमांड सुविधाही उपलब्ध आहे . या रेल्वेगाडीच्या मागील आवृत्‍तीत असलेल्या  24 इंच रुंदीच्या स्‍क्रीनच्‍या तुलनेत प्रत्‍येक डब्यामध्ये 32 इंच रुंदीचे स्‍क्रीन आहेत ज्याद्वारे प्रवाशांना  माहिती आणि मनोरंजन उपलब्ध होते. या गाडीतील वातानुकूलन 15 टक्के अधिक ऊर्जा कार्यक्षम असल्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस पर्यावरणस्नेही देखील  ठरत आहे ट्रॅक्शन मोटरच्या माध्यमातून धूळ-मुक्त स्वच्छ हवा वातानुकूलनासह, या रेल्वेगाडीतील प्रवास अधिक आरामदायी  होणार आहे. आरामदायी आसनांची म्हणजेच साइड रिक्लायनर सीटची सुविधा जी पूर्वी फक्त एक्झिक्युटिव्ह श्रेणीतील प्रवाशांना दिली जात होती ती आता सर्व श्रेणीसाठी उपलब्ध करून दिली जाईल. एक्झिक्युटिव्ह डब्यामध्ये  180-अंशात  फिरणाऱ्या आसनांचे अतिरिक्त वैशिष्ट्य आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या नवीन डिझाईनमध्ये, हवा शुद्धीकरणासाठी असलेल्या रूफ-माउंटेड पॅकेज युनिटमध्ये (आरएमपीयु) फोटो-कॅटॅलीस्ट अल्ट्राव्हायोलेट वायु शुद्धीकरण प्रणाली स्थापित करण्यात आली आहे. चंदीगढच्या केंद्रीय वैज्ञानिक उपकरणे संस्थेने केलेल्या शिफारसीनुसार,  ताजी हवा आणि परतीच्या हवेतून येणारे जंतू, जीवाणू, विषाणू इत्यादींपासून मुक्त हवा गाळून स्वच्छ करण्यासाठी डिझाईन केलेली  प्रणाली आरएमपीयूच्या दोन्ही टोकांवर स्थापित करण्यात आली आहे.

शिखर शिंगणापूर येथे शिवभक्ती संगम सोहळा,श्री श्री रवीशंकर यांची प्रमुख उपस्थिती

माळशिरस-

तीर्थक्षेत्र फाउंडेशन आयोजित शिवभक्ती संगम, कोटि लिंगार्चन व लक्ष भोजन सोहळा हा दिनांक 16 फेब्रुवारी ते दिनांक 20 फेब्रुवारी 2023 दरम्यान शिखर शिंगणापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे.

याच सोहळ्यासाठी मंडप पूजन व धर्म ध्वजारोहण करण्यासाठी आर्ट ऑफ लिविंग चे गुरुदेव श्री श्री रविशंकर जी हे दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता शिखर शिंगणापूर या ठिकाणी येत आहेत.

श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी झालेल्या महा सत्संगानंतर पुन्हा एकदा सातारा, सोलापूर जिल्ह्यातील भाविकांसाठी हा सुवर्णयोग जुळून आला आहे श्री श्री रविशंकर जी यांच्या शिवभक्ती संगम या सोहळ्याची संपूर्ण तयारी तीर्थक्षेत्र फाउंडेशन व आर्ट ऑफ लिविंग परिवार त्याचबरोबर शिखर शिंगणापूर गावचे सर्व ग्रामस्थ यांनी मिळून पूर्ण केली आहे.

या सोहळ्यासाठी श्रीमंत छत्रपती खा उदयनराजे भोसले यांच्यासह सातारा जिल्ह्यातील भाविक व माळशिरस तालुक्यातून आर्ट ऑफ लिविंग चे हजारो साधक उमाबन, शिखर शिंगणापूर या ठिकाणी जाणार असून या कार्यक्रमासाठी माळशिरस तालुक्यातून अनेकांना निमंत्रित सुद्धा करण्यात आले आहे.

यामध्ये माजी आमदार रामहरी रुपणवर, मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माजी सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य उत्तमराव जानकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य के के पाटील, नातेपुते नगरपंचायत च्या नगराध्यक्ष सौ राणी पलंगे, माजी जि प सदस्य अँड राऊत, श्रीराम शिक्षण संस्थेच्या श्रीलेखा पाटील व प्रकाश पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भीष्माचार्य कुदळे, निलेश देशपांडे, माळीनगर शुगर चे रंजनभाऊ गिरमे, रघुनाथ कवीतके यांना आर्ट ऑफ लिविंग कडून निमंत्रित करण्यात आले आहे.

अनेक दिवसांनंतर आर्ट ऑफ लिविंगचे गुरुदेव श्री श्री रविशंकर जी परिसरात येत असून साधकांनी व नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

■- महाशिवरात्रीच्या पावन काळात विशेष कार्यक्रम.
दिनांक 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री संपन्न होत असून याच पावन काळामध्ये गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या उपस्थितीमध्ये हा विशेष सोहळा संपन्न होत आहे यासाठी जवळपास एक लाख भाविकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

कसबा विधानसभा संघातील मतदारांनो ….

मतदारांना मतदार यादीतील नाव तपासून घेण्याचे आवाहन

पुणे दि.१- भारत निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार २१५ कसबापेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२३ घोषित झाली असून मतदारांनी आपली व आपल्या कुटुंबियांची मतदार यादीतील नोंद ऑनलाईन पद्धतीने तपासून घ्यावी, असे आवाहन कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले आहे.

मतदारांनी nvsp.in या संकेतस्थळावर ‘वोटर सर्च’ या पर्यायाचा वापर करावा. ८० वर्षापेक्षा अधिक वय असणारे मतदार तसेच अपंग मतदार यांना प्रथमच घरामधून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार आहे. याकरीता मतदारांना ‘नमुना १२ डी’ हा अर्ज आपले कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत वाटप करणेत येत आहेत. टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी मतदारांनी सदर अर्ज मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे तात्काळ भरून द्यावेत.

विजयी हॅट्रिकसह महाराष्ट्र खो-खो संघ उपांत्य फेरीत

महाराष्ट्राची १ डाव ४ गुणांनी पंजाब वर मात

महाराष्ट्र पुरुष संघाची पश्चिम बंगालवर सात गुणांनी मात

महाराष्ट्राने सलग चौथ्यांदा गाठली सेमी फायनल

जबलपूर
राष्ट्रीय खेळाडू दिपाली राठोड सर्वोत्तम आक्रमक खेळी करत महाराष्ट्र महिला संघाला पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्सची उपांत्य फेरी गाठून दिली. तसेच वीर अभिमन्यू पुरस्कार विजेत्या किरण वसावे सचिन पवार यांच्या सर्वोत्तम कामगिरी बरोबर नरेंद्रच्य नेतृत्वात महाराष्ट्र पुरुष संघाने सेमी फायनल मध्ये धडक मारली. महाराष्ट्र संघाने सात गुणांनी पश्चिम बंगाल वर मात केली. महाराष्ट्र संघाचा उपांत्य सामना दिल्ली विरुद्ध रंगणार आहे. तसेच महिला गटाच्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक संघ समोरासमोर असतील.
दिपाली आणि अश्विनच्या सरस खेळीच्या बळावर महाराष्ट्र महिला संघाने स्पर्धेत विजयाची हॅट्रिक साजरी केली. कर्णधार जान्हवी पेठेच्या नेतृत्वात महाराष्ट्र महिला संघाने बुधवारी गटातील शेवटच्या सामन्यात पंजाबला धूळ चारली. महाराष्ट्र संघाने एक डाव आणि चार गुणांनी सामना जिंकला. गटातील तिसऱ्या विजयासह महाराष्ट्र महिला संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला सलग पाचव्यांदा चॅम्पियन होण्याची संधी आहे.
महाराष्ट्र संघाने दमदार सुरुवात करत पहिल्याच गावात आपला मोठा विजय निश्चित केला होता. नाशिकची निशा वैजल, कोल्हापूरची श्रेया पाटील, उस्मानाबादची अश्विनी शिंदे यांनी सर्वोत्कृष्ट केळी करत महाराष्ट्र संघाला पहिल्याच गावात दहा गुणांची आघाडी मिळवून दिली होती. निशाने २: २५मिनिटे संरक्षण केले. तसेच श्रेयाने १:५० मिनिटे संरक्षण केले आणि दोन विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान महाराष्ट्र संघाने पहिल्या डावात पंजाबचे १४ गडी बाद करत आघाडी घेतली. त्यानंतर आपला दबदबा कायम ठेवत महाराष्ट्र संघाने दुसऱ्या डावातही सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला सलग तिसऱ्यांदा डावाने विजय साजरा करता आला.

दिपालीच्या ५ विकेट; अश्विनीची २:५१ मिनिट पळती
महाराष्ट्र महिला संघाच्या विजयामध्ये दिपाली आणि अश्विनी शिंदे यांनी मोलाचे योगदान दिले. त्यामुळे महाराष्ट्र संघाला डावाने विजय संपादन करता आला. पुण्याच्या दिपालीने पाच विकेट घेतल्या. तसेच तिने डावा दरम्यान १:३० मिनिटे संरक्षण केले. तसेच यादरम्यान अश्विनीने २:५१ मिनिटे सर्वोत्कृष्ट संरक्षण करत गडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या पंजाब संघाची चांगलीच दमछाक केली.

महाराष्ट्र महिला संघाच्या दबदबा कायम: कोच साप्ते
यंदाच्या पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये महाराष्ट्र महिला संघाची आगेकुच लक्षवेधी ठरत आहे. महाराष्ट्र संघ सामन्यागणिक सर्वोत्कृष्ट कामगिरीतून किताबावरचे आपले वर्चस्व राखून ठेवण्यासाठी आगेकूच करत आहे. युवा खेळाडूंच्या शानदार कामगिरीमुळे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचा दबदबा निर्माण झाला आहे. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र महिला संघांची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे, अशा शब्दात मुख्य प्रशिक्षक राजेंद्र साप्ते यांनी संघावर कौतुकाचा वर्ष केला.

दिपाली, अश्विनी यांची कामगिरी लक्षवेधी: कोच मुंडे
महाराष्ट्र महिला संघ सरस कामगिरी करत उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. यादरम्यान गटातील तिसऱ्या सामन्यात दिपाली आणि अश्विनी यांनी लक्षवेधी कामगिरी केली. त्यामुळे संघाला आपली विजय मोहीम कायम ठेवता आली. या सलग तिसरे विजयाचा महाराष्ट्र संघाने किताब बाबा चे आपले वर्चस्व कायम ठेवण्याचे संकेत दिले आहे, अशा शब्दात सहाय्यक प्रशिक्षक संजय मुंडे यांनी संघाचे कौतुक केले आहे.

महाराष्ट्राची नाईशा ६५ मिनिटात उपांत्य फेरीत; पदार्पणात चॅम्पियन होण्याची संधी

0

महाराष्ट्राला बॅडमिंटनमध्ये पदकाची संधी

ग्वाल्हेर
आंतरराष्ट्रीय क्रमवारीत ८३ व्या स्थानावर असलेल्या १४ वर्षीय बॅडमिंटनपटू नाईशा कौर अवघ्या ६५ मिनिटांमध्ये पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स ची उपांत्य फेरी गाठली आहे. तिने गटातील महिला एकेरीच्या दुसऱ्या सामन्यांमध्ये दुसऱ्या मानांकित खेळाडू नाईसा करियप्पावर सनसनाटी विजय संपादन केला. तिने दुसऱ्या सामन्यामध्ये १७-२१, २१-१८, २१-१३ अशा प्रकारे सामना जिंकला. या सर तिला महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित करण्यात आला. महाराष्ट्राच्या या युवा खेळाडूला पदार्पणात पदकाची मानकरी होण्याची संधी आहे.


पहिल्या गेम मधील अपयशातून सावरत युवा खेळाडू नाईशाने दुसऱ्या गेम मध्ये दमदार कमबॅक केले. यादरम्यान तिने 21 18 ने दुसरा गेम जिंकून सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर आपला दबदबा कायम ठेवत तिसरा गेम २१-१ ३ने जिंकुन सामना आपल्या नावे केला.
आक्रमक खेळातून मिळवला विजय: कोच गर्जे
महाराष्ट्राची पदकाची आशास्थान असलेल्या नाईशाने गटामध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे. तिने दुसऱ्या सामन्यात बलाढ्य दुसऱ्या मानांकित करियप्पाचा पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला. या दरम्यान तिने आक्रमक खेळी करत करियप्पाचा विजयाचा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे महाराष्ट्राच्या पदकाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे ते पदार्पणात महाराष्ट्राला निश्चितपणे पदक मिळवून देईल, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक विशाल गर्जे यांनी व्यक्त केला आहे.
वयाच्या सहाव्या वर्षापासून बॅडमिंटन कोर्टवर
मुंबई येथील 14 वर्षीय बॅडमिंटनपटू नाईशाची कामगिरी लक्षवेधी ठरत आहे. तिने वयाच्या सहाव्या वर्षी बॅडमिंटन कोर्टवर उतरण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान तंत्रशुद्ध प्रशिक्षण आणि कसून मेहनतीच्या बळावर तिला या खेळात अल्पावधीत यशाचा मोठा पल्ला गाठता आला. त्यामुळे तिला आंतरराष्ट्रीय क्रमवारी मध्ये ही धडक मारता आली. युवा गटातील स्पर्धेत चमकदार कामगिरी करत तिने 83 वे स्थान पटकावले आहे.

मुष्टीयुद्धामध्ये पुण्याची देविका घोरपडे सुवर्पणपदक मिळविण्याच्या मार्गावर

खेलो इंडीया युथ गेम्स २०२२-२३;

मुष्टीयुद्धामध्ये महाराष्ट्राच्या देविका घोरपडे हिने उपांत्य फेरीत स्थान मिळवित पदक निश्चित केले आहे. ५२ किलो गटात तिने हरियाणाच्या अंजली कुमारी हिचा सहज पराभव केला. तिने प्रारंभापासूनच या लढतीत आपले वर्चस्व राखले होते. महाराष्ट्राच्या अभिषेक जांगिड, कुणाल घोरपडे यांनी आगेकूच कायम राखली. भोपाळ येथील तात्या टोपे क्रीडा नगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेतील ७५ किलो गटात अभिषेक याने अरुणाचल प्रदेशचा खेळाडू रिंचन देपका याचा ५-० असा धुव्वा उडविला. या लढतीत त्याने तीनही फेऱ्यांमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याला ठोसेबाजी करण्यास फारशी संधी दिली नाही. त्याने जोरदार आक्रमक शैली आणि भक्कम बचाव अशा दुहेरी तंत्राचा उपयोग करीत या लढतीत निर्विवाद वर्चस्व गाजविले. ७१ किलो गटात महाराष्ट्राच्या कुणाल घोरपडे याला आसामच्या हेमंत छेत्री याच्याकडून पुढे चाल मिळाली.‌
पुरुषांच्या ५४ किलो गटात महाराष्ट्राच्या नीरज राजभर याचे आव्हान मात्र संपुष्टात आले. त्याला हरियाणाच्या आशिष कुमार याने ५-० असे पराभूत केले. आशिष याने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्र घेतला होता. त्याच्या तुलनेत नीरज याला अपेक्षेइतका बचाव करता आला नाही.

नेमबाजीत पदकांच्या आशा कायम

महाराष्ट्राच्या रणवीर काटकर व पार्थ माने यांनी दहा मीटर्स एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी स्थान मिळवले आणि पदकाच्या आशा कायम राखल्या. या क्रीडा प्रकारातील प्राथमिक फेरीनंतर रणवीर याने चौथे स्थान घेतले असून त्याने प्राथमिक फेरीत ६२५.६ गुण नोंदविले. पार्थ हा पाचव्या स्थानावर आहे. त्याने प्राथमिक फेरीत ६२४.९ गुण नोंदविले आहेत.‌

महाराष्ट्र लोकसेवा आयोग : सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

मुंबई, दि. १ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२२ मधील अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.

69 पदांसाठी झालेल्या परीक्षेमध्ये मंत्रालयीन विभागातून शिवकुमार चंद्रकांत माशाळकर (बैठक क्रमांक – MB001044) हे व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातून अविनाश पंढरीनाथ बडधे (बैठक क्रमांक – MB002014) हे प्रथम आले आहेत. उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व सीमांकन गुण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

या अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे, असे लोकसेवा आयोगाने कळविले आहे.