Home Blog Page 1418

नरेंद्र मोदी ‘चले जाव’ आंदोलन सर्वांनी सहभागी व्हावे, टिळकांवर कारवाई होईलच- अरविंद शिंदे;सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबत सर्वांचेच मौन

पुणे : १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नियोजित पुणे दौऱ्याच्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उध्दव ठाकरे गट), रिपब्लिकन व डाव्या तसेच आंबेडकरवादी, पुरोगामी पक्ष संघटना यांच्या वतीने १ ऑगस्ट रोजी ठिक सकाळी ९.०० वा., मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा येथे नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून नरेंद्र मोदी चले जाव आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करताना शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी मोदींना पुरस्काराने सन्मानित करणाऱ्या रोहित टिळक आणि कॉंग्रेस नेत्यांवर कारवाई होईल असे स्पष्ट केले आहे. मात्र त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही .मोदींना पुरस्कार देण्यात टिळकांच्या समवेत समितीत कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे देखील आहेत. मात्र त्यांच्याबाबत सर्व स्तरावर मौन पाळण्यात आलेले आहे.

अरविंद शिंदे म्हणाले,’ मणिपूर येथील हिंसाचार व महिला अत्याचाराच्या घटनांकडे होत असलेले दुर्लक्ष तसेच संसदेला सामोरे न जाता विरोधकांचा केला जाणारा अनादर यासह केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ होणाऱ्या सदर आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव, गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी, पुणे शहर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रशांत जगताप, शिवसेना (उध्दव ठाकरे गट) चे संजय मोरे व गजानन थरकुटे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, डाव्या चळवळीचे अजित अभ्यंकर, नितीन पवार, सुभाष वारे, डॉ. अभिजीत वैद्य, विश्वंभर चौधरी, शरद जावडेकर, लुकस केदारी इ. सह संबंधित पक्षांच्या प्रमुख मान्यवरांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाच्याच ठिकाणी निषेध सभा घेतली जाणार असून यात मान्यवर आपले मत व्यक्त करतील.

सदर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस आयुक्त रितेश कुमार, अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या समवेत काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांच्या शिष्टमंडळाची भेट झाली. सदर भेटीमध्ये आंदोलना विषयी चर्चा होऊन नियोजित ठिकाणी आंदोलन करण्यास कोणतीही हरकत नसल्याचा निर्वाळा संबंधित अधिकाऱ्यांनी दिला आहे.दरम्यान संसदीय लोकशाही परंपरा पायदळी तुडविण्याचे काम नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाकडून सुरू असून मणिपूर प्रकरणी नरेंद्र मोदी यांचा व्यवहार हा संपूर्णत: हुकूमशाही वृत्तीचा आहे. तसेच संपूर्ण देश प्रधानमंत्री यांनी संसदेत मणिपूर प्रकरणी निवेदन करावे याची वाट पाहत असताना ते टाळून प्रधानमंत्री पुणे येथे पुरस्कार व उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असल्याने त्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करीत सर्व विरोधी पक्षांच्या वतीने होणाऱ्या नरेंद्र मोदी ‘चले जाव’ आंदोलनात सर्वसामान्य पुणेकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले.
उद्या होणाऱ्या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उध्दव ठाकरे गट), रिपब्लिकन युवा मोर्चा व डाव्या चळवळीतील सी. पी. एम., सी. पी. आय., अंग मेहनती कष्टकरी समिती, सुराज्य सेना, भारत जोडो अभियान, जनता दल सेक्युलर, समाजवादी पार्टी, बी. आर. एस. पी., सी. पी. आय., एम. एल., युवक क्रांती दल, महात्मा फुले प्रतिष्ठाण, आरोग्य सेना, शिक्षण हक्क सभा, जनता दल युनायटेड, सत्यशोधक आघाडी, निर्भय बनो आंदोलन, जबाब दो आंदोलन, रिजनल ख्रिश्चन सोसायटी यांच्या सह इतर अनेक संघटना सहभागी होणार आहेत.असेही शिंदे यांनी सांगितले .

विविध सामाजिक उपक्रमाद्वारे अण्णाभाऊ साठेंना अभिवादन

पुणे-संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो की कामगारांच्या कामाचा मोबदला डफावर थाप मारून दिल्लीपर्यंत शोषितांचा आवाज पोहोचवण्याचे काम अण्णाभाऊ साठेंनी केलं. आज मणिपूरच्या घटना असो की  महापुरुषांबद्दल केली जाणारी अवमानकारक वाक्य, महागाई, बेरोजगारीचे मुद्दे पाहता आज अण्णाभाऊ असते, तर याविरोधात जोमाने लढले असते. अण्णाभाऊनंतर ही जबाबदारी आपली सर्वांची आहे. अन्याय सहन न करणे, हीच अण्णांना खरी आदरांजली आहे असं परखड मत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले. निमित होते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त पं. नेहरू स्टेडियम ब्लॉक, कसबा ब्लॉक कॉंग्रेस कमिटी आणि लोकायत नागरी समिती आयोजित साहित्य दिंडीचे.
ही साहित्य दिंडी ३० जुलै २०२३ रोजी संध्या ५ वा. महात्मा फुले वाडा ते लहुजी वस्ताद तालिमी पर्यंत काढण्यात आली. याप्रसंगी लोकायत नागरी समितीच्या समन्वयिका अ‍ॅड. मोनाली अर्पणा यांनी सांगितले कि समाजातील विषमता दूर होवून वाचनाची आवड निर्माण व्हावी व लॅाकडाउनमुळे मोबाईल मध्ये गुंतलेली आजची पिढीने वाचनाच्या नवचेतनाच्या प्रवाहात याव हा या साहित्यदिंडीचे आयोजनचा मुख्य उद्देश आहे.  वस्तीतील विविध चौकात या साहित्य दिंडीचे स्वागत सम्राट अशोक मित्र मंडळ, समता मित्र मंडळ, सावधान मित्र मंडळांनी केले. या दिंडी दरम्यान अण्णाभाऊंच्या कार्याची माहिती असणार माहिती पत्रकही वाटण्यात आले. अण्णा भाऊंचा इतिहास सर्वांना सांगणार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो अशा घोषणाही या दरम्यान देण्यात आल्या. अण्णाभाऊ साठेंना वंदन त्रिवार जुलमी राजवटी वरती केला पहिला वार या गाण्याने अण्णाभाऊंच्या कार्याला अभिवादन करण्यात आले
पं. नेहरू स्टेडियम ब्लॉकचे अध्यक्ष हेमंत राजभोज यांनी साहित्य दिंडीचे प्रास्ताविक केले तर कसबा ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अक्षय माने यांनी आभार मानले. दिंडीचा समारोप करताना सर्वानी शेवटी छातीवर हात ठेवून संकल्प केला कि मी अण्णाभाऊंचा वारसदार यंदा अण्णाभाऊ साठेंची जयंती किमान एक तरी पुस्तक वाचून साजरी करणार व कमीत कमी ५ मित्रांना अण्णाभाऊंची माहिती पोहोचवणार. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी अविनाश बागवे, कमल व्यवहारे, अजित दरेकर, रमेश सोनकांबळे, रवी ननावरे, वाल्मिकी जगताप, अजित जाधव, विकी खन्ना व लोकायतचे स्वप्नील फुसे, कल्याणी दुर्गा उपस्थित होते. या उपक्रमासोबतच महिला मोहल्ला कमिटी, गुलटेकडी व लोकायत नागरी समितीच्या वतीने मीनाताई ठाकरे वसाहतीत अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचं स्टिकर घरोघरी, गाड्यांवर व दुकानावर लावण्याचं अभियान राबविण्यात आले तसेच लोकायत ऑफिसला अण्णाभाऊ साठेंच्या ‘अकलेची गोष्ट’ या कथेचं वाचन व त्यावर चर्चाही करण्यात आली. सर्व उपक्रमांना तरुणाईचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला

मोदींसोबत एकत्र येण्यापूर्वी विचार करा,काँग्रेसचे पवारांना आवाहन; राऊत,सप्तर्षी यांचाही कार्यक्रम टाळण्याचा सल्ला

संजय राऊत नाराज; कुमार सप्तर्षी पवारांना भेटले

रोहित टिळक यांनाही समज देण्यात आली

मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळवारच्या पुणे दौऱ्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. या दौऱ्यात मोदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत एकत्र येणार आहेत. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. काँग्रेस व शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी या प्रकरणी पवारांना मोदींसोबत व्यासपीठ शेअर करण्यापूर्वी एकदा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. जनतेच्या मनात संभ्रमावस्था निर्माण करणाऱ्या भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेऊ नये, असे ते म्हणालेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांनीही या प्रकरणी पवारांची भेट गेऊन त्यांना मोदींसोबत व्यासपीठ शेअर करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर देशात वेगळा संदेश जाईल, अशी बाब त्यांनी पवारांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्या पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी शरद पवार त्यांच्यासोबत व्यासपीठावर असतील. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर प्रथमच हे दोन मोठे नेते एका मंचावर असतील. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणी पवारांना या कार्यक्रमापासून स्वतःला दूर ठेवण्याची विनंती केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याला येत आहेत. शरद पवार त्या कार्यक्रमाला जाणार आहेत. पण महाविकास आघाडी म्हणून आमची त्यांना विनंती आहे की, त्यांनी जाण्यापूर्वी एकदा विचार करावा, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

आपण महाविकास आघाडी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मणिपूर घटनेविरोधात सर्वसामान्यांमध्ये जातोय. त्यांचा निषेध करतोय. त्यामुळे त्यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र येणे कितपत योग्य आहे? त्यामुळे शरद पवार यांनी मोदींसोबत व्यासपीठावर एकत्र येण्यावर एकदा विचार करावा, असे काँग्रेसचे आवाहन आहे, असे त्या म्हणाल्या.

मणिपूरमध्ये महिला मदतीचा हात मागत होत्या. पण केंद्र सरकारने केवळ तमाशा पाहिला. देशाचे पंतप्रधान परदेशात फिरत होते. मणिपूरला जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. त्यांनी या प्रकरणी कोणतीही मदत केली नाही. त्याच्या निषेधार्थ आम्ही मशाल मार्च काढून सरकारचा निषेध नोंदवणार आहोत, असेही वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या.

गायकवाड पुढे म्हणाल्या की, या प्रकरणी रोहित टिळक यांनाही समज देण्यात आली आहे. कारण या प्रकरणी सर्व हेवेदावे बाजूला सोडून विरोध करणे गरजेचे आहे.

अमेरिकेन अल्बम मराठी नाटक रंगमंचावर लवकरच येणार….

पुणे, ३१—लेखक आणि दिग्दर्शक यांच्यातील अतिशय दृढ नात्यामुळे चांगली कलाकृती रसिकांसमोर सादर होत असते. गेली ५० वर्षात मला या नात्यामुळे यश मिळत आहे असे जेष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी येथे सांगितले.

रसिकमोहिनी आणि एफ एफ टी जी ग्रुप निर्मित अमेरिकन अल्बम या नाटकाचा मुहूर्त करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. नाटकाचे लेखक राजन मोहाडीकर, दिग्दर्शक आणि नेपथ्यकार पुरुषोत्तम बेर्डे, निर्माते भाग्यश्री देसाई, झरीर इराणी, मोहनदास प्रभू , नाटकातील प्रमुख कलाकार रविंद्र मंकणी, आशुतोष नेर्लेकर, राजश्री आठवले, रुतुजा जोशी.. त्याप्रमाणे योगेश सोमण, केशव साठ्ये, ओंकार केळकर, सत्यजीत धांडेकर, अतुल ताम्हणकर, सुनील नाईक, नावडकर बंधू, जया जोग, नाटकाचे सूत्रधार सुनील महाजन, नृत्य दिग्दर्शक निकिता, मोघे आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मी भाग्यवान आहे कारण या नाटकाचा मुहूर्त माझ्या हस्ते होत आहे असे नमूद करुन काळे म्हणाल्या की, या नाटकाचा पहिला आणि ५०० व्या प्रयोगाला उपस्थित राहणार आहे. रंगभूमीशी माझे अनेक वर्षांचे नाते आहे. त्यामुळे रसिकांना आनंद देता आला आणि मला देखील आनंद मिळाला आहे.

लेखक मोहाडीकर यांनी नाटय लेखनाचा प्रवास उलगडला आणि नाट्य संहिता लेखनामागची भूमिका मांडली. निर्माती भाग्यश्री देसाई यांनी पुण्यात व्यावसायिक नाट्यनिर्मीती होणे गरजेची असल्याचे अधोरेखित केले. देसाई यांनी ‘रसिकमोहिनी’ संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला तसेच येत्या दोन महिन्यात हे नाटक रंगमंचावर येईल असे सांगितले. निर्माते इराणी आणि प्रभू यांनी मनोगत व्यक्त केले.

रुतुजा जोशी यांनी सूत्र संचालन केले.

 रूबी हॉल क्लिनिकमध्ये ‘सायबर नाईफ’ लेझर मशिनचे उद्घाटन 

शस्त्रक्रियेशिवाय कर्करोगावर उपचार 

pune- – शस्त्रक्रियेशिवाय कर्करोगावर उपचार करणारे,अशा स्वरूपाचे   पहिलेच ‘सायबर नाईफ’ लेझर मशिन  रूबी हॉल क्लिनिक आणि बजाज फिनसर्व्ह च्या वतीने     शनिवारी (दि. २९ जुलै २०२३) आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या उपस्थितीत  कार्यान्वित करण्यात आले.  
 या वेळी सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ.सायरस पुनावाला, बजाज उद्योग समूहाचे संजीव बजाज, शेफाली बजाज, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, अल्पसंख्याक आयोगाचे राष्ट्रीय सल्लागार अली दारूवाला, रूबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉ. परवेज ग्रँट आणि रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .बेहराम खोदाईजी आदी मान्यवर उपस्थित होते. 
‘रूबी हॉल क्लिनिकमध्ये कर्करोगात क्रांतिकारक उपचार करणाऱ्या नवीन लेझर प्रणालीमुळे पुणे उपचारांचे मोठे केंद्र होईल. ग्रामीण भागापासून मुंबईच्या रुग्णांना यांचा फायदा होईल,’ असा विश्वास डॉ. कराड यांनी व्यक्त केला.

डॉ.परवेज ग्रँट म्हणाले,’सायबर नाईफ लेझर मशिन हे  कर्करोग रुग्णावर २० मिनिटांच्या कालावधीत वेदनारहित उपचार करेल. रूबी हॉल क्लिनिक आणि बजाज फिनसर्व्ह कडून १६ वर्षांखालील कर्करोगग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतील. साधारण रोज २०० कर्करोग रुग्णांवर या लेझर मशिनद्वारे उपचार करता येतील. या मशिनमुळे पुण्यातील वैद्यकीय पर्यटन वाढेल.’
अली दारूवाला, डॉ. परवेझ ग्रॅंट यांचा  सत्कार मुस्लीम समाजातून अली दारूवाला, तर पारशी समाजातून डॉ. परवेझ ग्रॅंट यांची भारत सरकारच्या अल्पसंख्याक आयोगाचे राष्ट्रीय सल्लागार म्हणून नुकतीच नेमणूक करण्यात आली. त्याबद्दल या कार्यक्रमात डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.आयोगाच्या कामकाजात भरीव योगदान देऊ,असे अली दारूवाला,डॉ. परवेझ ग्रॅंट  यांनी यावेळी बोलताना  सांगितले. 

वैद्यकीय उपकरण निर्मितीमध्येही आत्मनिर्भरता :अर्थ राज्यमंत्रीडॉ. कराड म्हणाले, ‘नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून वैद्यकीय क्षेत्रात सुधारणा सुरु झाल्या. २०१४ पर्यंत वैद्यकीय शाखेत विद्यार्थ्यांच्या ५१ हजार ३४८ जागा होत्या. आता एक लाख ७ हजार ९४८ झाल्या. वैद्यकीय महाविद्यालये ३८७ होती. २०१४ पासून त्यांची संख्या वाढली. आता ती ७०४ झाली. त्यात ८२ टाक्यांची वाढ झाली. पदवीव्युत्तर पदवीच्या जागा ३१ हजार १८५ होत्या. त्या ६७ हजार ८०२ झाल्या. याशिवाय मेडिकल इक्विपमेंटसाठी ‘पीएलआय स्कीम’ ‘स्टार्ट अप,’ ‘स्टॅंडप इंडिया’ या योजनांच्या मदतीने पंतप्रधान मेडिकल इक्विपमेंट बनवणाऱ्या उद्योगांना सुद्धा आत्मनिर्भर करत आहेत. पन्नास कोटी जनतेला आयुष्यमान भारत इन्शुरन्स दिल्यामुळे याचा फायदा गोरगरीब नागरिकांना होणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागात ‘नॅशनल रूरल हेल्थ मिशन’ आणि शहरी भागासाठी ‘नॅशनल रूरल अर्बन मिशन’द्वारे आरोग्य सेवा वाढविल्या आहेत.’

‘स्वातंत्र्यानंतर भारतात आरोग्य सुविधा रखडल्या होत्या. २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाटचालीत यामध्ये क्रांतिकारक बदल झाला आहे. भारतात आरोग्य विषयक पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांच्या संख्येत १०० पटीने वाढ झाली आहे,’ असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. 

पवारसाहेब एक भूमिका घ्या .. मोदींच्या विरोधात नाही तर त्यांच्या सोबत राहा ..कार्यकर्त्यांचे मरण कशाला ?

पुणे- शरद पवार हे पीएम मोदी यांना देण्यात येणाऱ्या टिळक पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याने आणि दुसरीकडे पवारांनाच मानणारे कार्यकर्ते मात्र मोदी चले जाव, हाय हाय च्या घोषणा देत काळे झेंडे घेऊन निदर्शने करणार असल्याच्या बातम्यांनी सामान्य स्तरावरील आणि आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे . अजित पवारांसारखी ठाम भूमिका शरद पवार घेताना दिसत नाहीत असे आता कार्यकर्ते बोलू लागले आहेत . एक तर मोदी यांच्या विरोधात ठाम राहावे अन्यथा त्यांह सोबत राहावे पण कार्यकर्त्यांना द्विधा मनस्थितीत टाकू नये असे सांगण्यात येते आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या वतीने दिल्लीतील सेवा विधेयक आज लोकसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेत एनडीएचे 332 खासदार म्हणजेच पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळे हे विधेयक पहिल्यांदा लोकसभेत मांडून नंतर ते राज्यसभेत मांडले जाईल. त्यामुळे शरद पवार यांच्यासमोरील पेच सुटला असून ते पुणे येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. आणि दुसरीकडे मोदी यांच्या विरोधात INDIA चे गठन करून देशभर मोहीम राबविली जात आहे. आप चे अरविंद केजरीवाल यांनीही पवार यांना आपण मोदींच्या सन्मान सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणे योग्य नसल्याचे पवार यांना सांगितल्याचे वृत्त येथे पसरले आहे. मोदींचा सन्मान शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित होणार आणि पवारांचे चाहते , कार्यकर्ते maatra

रोहित टिळकांच्या हकालपट्टीची मागणी ..पण पुढाकार घेणार कोण ? कॉंग्रेस नेत्याचा सवाल

पुणे- पीएम नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतल्याने आणि त्यास विरोध न करता तो जाहीर करणारे कॉंग्रेसचे जुने पदाधिकारी रोहित टिळक यांना कॉंग्रेस पक्षातून तातडीने ६ वर्षासाठी निलंबित करावे अशी मागणी आज कॉंग्रेस मधील कार्यकर्ते येथे करत आहेत पण यासाठी पुढाकार कोणी घ्यायचा असा सवाल खुद्द एका कॉंग्रेस नेत्यानेच प्रतिप्रश्न करत विचारला आहे. एकीकडे आम्ही कॉंग्रेस कार्यकर्ते सर्व मिळून मोदी हाय हाय च्या घोषणा देत आलो आहोत आणि दुसरीकडे मात्र टिळकांनी या घोषणेला हरताळ फासण्याचे काम चालविले आहे जे त्यांना शोभणारे तर नाहीच पण राजकारणाची नितीमत्ता नेमकी कशी आहे ? असा प्रश्न उपस्थित करणारी आहे. मोदींना काळे झेंडे जरूर दाखवा , जरूर गो बक च्या घोषणा द्या पण आपल्यात राहून त्यांचा गौरव करणारांची म्हणजेच डबल ढोलकी चे राजकारण खेळणाऱ्यांची प्रथम दखल घ्या असे म्हणे कार्यकर्ते मांडून लागले आहेत . आता टिळकांवर कारवाई झाली नाही तर यापढे नेत्यांवर कोणीही विसंबून राहणार नाही असे म्हणणे कार्यकर्ते मांडू लागले आहेत .

‘मनुस्मृती’ पूजक ‘स्वयंसेवक महाराष्ट्राला कलंकित करताहेत, महात्मा फुलेंचा अपमान बहुजन समाज पार्टी सहन करणार नाही

मुंबई, ३१ जुलै २०२३-पुरोगामी महाराष्ट्राची ओळख पुसून टाकण्याच्या अनुषंगाने ‘मनुस्मृती’ विचाराने प्रेरित ‘स्वयंसेवकांची’ एक फळी कार्यरत आहे. ही फळी अग्रणी महाराष्ट्राला कलंकित करण्याचे काम करीत आहेत.सामाजिक परिवर्तनाचे केंद्र असलेल्या विदर्भाच्या भूमितून महात्मा गांधींचा अपमान केल्यानंतर देखील भंगलेला बाजार मांडलेल्या संभाजी भिडेने महात्मा ज्योतिराव फुलेंचा अपमान केला.भिडेची व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिपमुळे बहुजन समाज संतापला आहे.भिडेने महाराष्ट्रासह अवघ्या देशाची माफी मागावी, अन्यथा त्यांच्यासह त्यांच्या बोलवित्या ‘मालकांना’ धडा शिकवून,अशा संतप्त इशारा बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी सोमवारी दिला.

भिडे, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसारख्या बौद्धिक दिवाळखोरीने ग्रस्त मानसिकतेला अद्दल घडवणे काळाची गरज आहे.पुरोगामी महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकांमधून भिडेंसह त्यांच्या मागील शक्तींना धडा शिकवेल आणि मतपेट्यांमधून निषेध नोंदवेल,असा दावा अँड.ताजने यांनी केला.

देशात अनेक महत्वाचे मुद्दे आहेत.केंद्र सरकार या मुद्दयांना बगल देत आहेत.मुळ मुद्दयांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भिडे सारख्या लोकांचा वापर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत असल्याचा दावा अँड.ताजने यांनी केला. मणिपूरमधील हिंसाचार, समान नागरी संहिता, देशातील बेरोजगारी, महागाई, धर्माधर्मामध्ये निर्माण झालेली धार्मिक तेढ यावर केंद्र आणि राज्यातील सरकार मुग गिळून गप्प बसले आहे.बहुजनांनी त्यामुळे भिडेंच्या चक्रव्युहात न अडकता अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी सत्ताप्राप्तीचे लक्ष ठेवले पाहिजे,असे आवाहन अँड.ताजने यांनी केले.

महाराष्ट्रात ‘बसपा सरकार’ हेच बहुजनांचे ध्येय-भीम राजभर
बहुजन नायक कांशीराम यांच्या प्रेरणेने मायावती जी यांनी देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशात बसपाची सत्ता येताच महात्मा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसह इतर महात्म्यांचे नाव राज्यभरात कोरले. ‘महात्मांच्या’ नावाने शैक्षणिक केंद्र उभी केली.विद्यादानाचे काम केले. पंरतु, समाज सुधारणेची जननी असलेल्या महाराष्ट्रातच जर मुलींना शिक्षणांच्या मुख्यप्रवाहात आणणाऱ्या महात्मा फुलेंचा अपमान होत असेल तर बहुजन समाज तो खपवून घेणार नाही. ‘बहुजन’ अर्थात ‘बहुसंख्यांकांनी’ राज्यासह केंद्रात सत्ता केंद्र होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे,असे आवाहन पक्षाचे प्रदेश प्रभारी भीम राजभर यांनी केले.

‘मन की बात बंद करो मणिपूर की बात करो’, नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी युवक काँग्रेसच्या वतीने पुण्यात बॅनरबाजी

पुणे

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्विकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या नव्या मार्गिका सेवांचे उद्‌घाटन, पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पांचे लोकार्पण, नव्या गृहप्रकल्पांची पायाभरणी यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या दौऱ्याच्या आधीच पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दौऱ्याच्या आधल्या दिवशीच पुणे शहरात पंतप्रधानांविरोधातील बॅनर झळकले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याआधीच विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. पुणे युवक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध करणारे बॅनर्स शहरात लावण्यात आले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून ‘मन की बात बंद करो मणिपूर की बात करो’ तसेच ‘गो बँक क्राईम मिनिस्टर’, ‘देश जळत असताना पुरस्काराच्या मेजवान्या कशासाठी?’ अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. या बरोबरच विरोधकांच्या वतीने आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या पुरस्कार प्रदान सोहळ्यच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पडलेल्या फुटीनंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. यामुळे देखील या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे दोघे या आधी देखील एकाच मंचावर दिसून आले होते. मात्र, आता पंतप्रधानांनी केलेला भ्रष्ट्राचाराचा आरोप आणि अजित पवार यांनी दिलेली भाजपची साथ याची पार्श्वभूमी महत्त्वाची ठरणार आहे.

शिवसेनेसह धनुष्यबाण कोणाचा? एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे चिन्ह देण्याबाबतच्या याचिकेवर आज सुनावणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचा अधिकृत दर्जा देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील उद्धव गटाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगी दिली होती. आयोगाच्या या निर्णयाला उद्धव गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

उद्धव ठाकरे गटाचे वकील अमित आनंद तिवारी यांनी याचिका दाखल करून तातडीने सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली. निवडणूक आयोगाचा निर्णय बाजूला ठेवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

त्यावर न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 31 जुलै ही तारीख 10 जुलै रोजी निश्चित केली होती. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस. नरसिंह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या याचिकेत निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकेत म्हटले आहे- अशा वादाच्या परिस्थितीत आयोगाने प्रतीक आदेशाच्या पॅरा 15 अंतर्गत आपले कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले आहे.

आयोगाने आपली घटनात्मक स्थिती कमकुवत करण्याचे काम केले आहे. उद्धव गटाला शिवसेनेच्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र, 22 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने एकनाथ शिंदे आणि निवडणूक आयोगाला उद्धव गटाच्या याचिकेवर दोन आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले होते. प्रत्युत्तरात, निवडणूक आयोगाने सांगितले की त्यांनी आपल्या क्षमतेनुसार आदेश दिले आहेत. शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि पक्षाच्या चिन्हाचा दर्जा देणेच योग्य होते.

शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत स्टेजवर, तर कार्यकर्ते करणार आंदोलन

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मंगळवारी (दि. १ ऑगस्ट) शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यासह डाव्या विचारसरणीच्या व आंबेडकर चळवळीतील विविध पक्षसंघटना आंदाेलन करणार आहेत. या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे मंडईतील टिळक पुतळ्याजवळ सकाळी ८.३० वाजता आंदोलन करून निषेध करण्यात येणार आहे.

एकीकडे लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मंचावर उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे, त्यांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंगळवारी पुण्यात येत आहेत. या पुरस्कार सोहळ्याला उद्या १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल होणार आहे

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या वतीने दिल्लीतील सेवा विधेयक आज लोकसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेत एनडीएचे 332 खासदार म्हणजेच पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळे हे विधेयक पहिल्यांदा लोकसभेत मांडून नंतर ते राज्यसभेत मांडले जाईल. त्यामुळे शरद पवार यांच्यासमोरील पेच सुटला असून ते पुणे येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदाण करण्यात येणार आहे. या पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पवारांनी दिल्लीतील सेवा विधेयक मांडले जात असताना संसदेत उपस्थित राहावे अशी विनंती केली होती. त्यामुळे पवार कोणाल महत्त्व देतील? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, आता पवार यांच्यासमोरील पेच सुटला आहे. हे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर ते राज्यसभेत मंजूरीसाठी येईल. त्यानंतर यावर मतदान घेतले जाणार आहे. यासाठी शरद पवारांनी राज्यसभेत उपस्थित राहावे अशी विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केली हेाती.

मणिपूर जळत असताना पंतप्रधान पुण्यात पुरस्कार घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे मंडई येथील टिळक पुतळ्याजवळ भजन करून त्यांना सद्बुद्धी देण्याची मागणी करणार आहोत. निषेध म्हणून काळे कपडे परिधान करणार आहाेत, असे आंदाेलनाच्या तयारीतील कार्यकर्त्यांनी सांगितले. यावर आता दुसरीकडे पोलिसांनी महाविकास आघाडीसह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना नोटीस धाडल्या आहे.

जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आणि आशियातील सर्वात लांब अत्याधुनिक बोगदा हे राष्ट्रीय स्तरावरील काही महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक  : डॉ जितेंद्र सिंह

उधमपूर मतदारसंघात असलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आणि आशियातील सर्वात लांब अत्याधुनिक बोगदा हे राष्ट्रीय स्तरावरील काही महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहेत, जे नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर गेल्या 9 वर्षांत या मतदारसंघात आले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी केले. डॉ जितेंद्र सिंह यांनी त्यांच्या मतदारसंघातील पंचायत राज संस्थांचे प्रतिनिधी, पंच, सरपंच, भाजप पदाधिकारी आणि इतर कार्यकर्त्यांसाठी दोन तासांची स्नेहभोजन बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ जितेंद्र सिंह हे त्यांच्या मतदारसंघातील विविध भागांतील प्रतिनिधींसोबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी नियमितपणे अशा बैठकीचे आयोजन करतात. आजची बैठक अशाच सत्राचा भाग होती. आजच्या बैठकीत डोडा, बाशोली, बिल्लावर, कठुआ आणि रामबन येथील प्रतिनिधी सहभागी झाले होते.

उधमपूर-दोडा-कठुआ लोकसभा मतदारसंघात गेल्या 9 वर्षांत अभूतपूर्व विकास कामे झाली आहेत, मात्र मतदारसंघाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्याबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याची गरज आहे, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले यावेळी म्हणाले.

उधमपूर-दोडा-कथुआ लोकसभा मतदार संघ हा भारतातल्या सर्वात विकसित मतदार संघांपैकी एक असावा अशी प्रतिक्रिया देणारा जन सर्वेक्षणाचा अहवाल या प्रतिनिधी मंडळाने जितेंद्र सिंह यांना सादर केला.

या विकासाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. पंतप्रधानांनी मे 2014 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर जम्मू आणि काश्मीर तसेच ईशान्य क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे, असेही ते म्हणाले.

गेल्या पाच वर्षांत तीन केंद्रीय अर्थसहाय्यित वैद्यकीय महाविद्यालये मिळवणारा उधमपूर-दोडा-कठुआ हा भारतातील एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. 

महाराष्ट्राच्या सादरीकरणाने जागतिक बँकेचे शिष्टमंडळ प्रभावित -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: जागतिक बँकेच्या सहकार्याने यापूर्वीही राज्यात अनेक मोठे प्रकल्प उभारले गेले असून भविष्यातही अनेक प्रकल्प उभारले जातील, पण केवळ पायाभूत सुविधांसाठी नव्हे तर इतरही क्षेत्रांत संस्थात्मक क्षमता बांधणीसाठी जागतिक बँकेने सहकार्य करावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांसमवेत हॉटेल ट्रायडंट येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक, मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी तसेच विविध विभागांचे सचिव तसेच जागतिक बँकेतर्फे भारतातील कार्यकारी संचालक परमेश्वरन अय्यर तसेच युके, अर्जेंटिना, ब्राझील, टांझानिया, इंडोनेशिया, चीन, सौदी अरेबिया, मेक्सिको, पोलंड, नायजेरीया आदी देशांचे कार्यकारी संचालक देखील उपस्थित होते.

जीवनमान अधिक सुधारण्यावर भर

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, जागतिक बँक ही केवळ निधी देणारी संस्था नाही तर त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे विकसनशील देशांसाठी ज्ञानाचा मोठा स्रोत आहे. जागतिक बँकेसोबत राज्याची भागीदारी महाराष्ट्रातील लोकांचे जीवनमान अधिक सुधारण्यासाठी उपयोगी पडेल. देशात महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगले कुशल मनुष्यबळ, उत्कृष्ट पायाभूत सुविधा असून आपले राज्य हरित तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य सेवा आणि बंदर पायाभूत सुविधा या क्षेत्रात भरीव प्रयत्न करत आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी सुधारणा, महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि सर्वांसाठी घरे यासाठी उचललेल्या काही महत्त्वाच्या पावलांची माहिती दिली.
महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद स्थापन करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही या परिषदेची स्थापना केली असून परिषदेने केलेल्या शिफारशींचा अभ्यास फास्ट ट्रॅक कमिटीमार्फत करण्यात येईल तसेच कालबद्ध अंमलबजावणीसाठी पावले उचलली जातील.

दुर्बलांना सक्षम करणार

आमचे सरकार शाश्वत विकासावर भर देत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, हे लोकाभिमुख, सरकार असून गरीब आणि दुर्बलांना सक्षम करणे या जागतिक बँकेच्या उद्दिष्टांना अनुरूप अशी आमची धोरणे आणि कार्यक्रम आहेत.
देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करत असून पंतप्रधानांनी जगात सर्व देशांशी परस्पर विश्वास आणि आदर यावर आधारित दृढ संबंध राहतील यासाठी प्रयत्न केले आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणार- उपमुख्यमंत्री

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेषत: नदी जोड प्रकल्पाविषयी माहिती देऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी गोदावरी खोऱ्याकडे वळविणे तसेच पूर्व आणि पश्चिम विदर्भातील नदी जोड प्रकल्पातून तेथील जिल्ह्यांमधील दुष्काळ संपविणे याला प्राधान्य असल्याचे सांगितले.

प्रारंभी बैठकीत महाराष्ट्राच्या वतीने नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय आणि सचिव शैला ए यांनी सादरीकरण केले. जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यात अनेक प्रकल्प यापूर्वी पूर्ण झाले असून काही प्रकल्प सुरू आहेत तर काही
प्रकल्पांवर कार्यवाही सुरू आहे. विशेषतः जलस्वराज्य प्रकल्प टप्पा एक, टप्पा दोन, विविध जलसंपदा प्रकल्पांमधील सुधारणा, महाराष्ट्र जल क्षेत्रातील सुधारणा प्रकल्प, कृषी विषयक स्पर्धात्मक प्रकल्प यापूर्वी पूर्ण झाले असून सध्या कृषी आणि ग्राम विकासाचा स्मार्ट प्रकल्प जलसंपदा प्रकल्पांच्या सुरक्षा, सुधारणा, कार्यक्षमता आणि देखभालीचा प्रकल्प तसेच पोकरा सारखे प्रकल्प सुरू आहेत. कौशल्य विकासाचा दक्ष प्रकल्प, पर्यावरण विषयक एमआरडीपी अशा प्रकल्पांवर कार्यवाही सुरू आहे अशी माहिती देण्यात आली.

जागतिक बँकेकडून अपेक्षा

याशिवाय नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई महानगरातील वाहतुकीमधील सुधारणा प्रकल्प, हरित ऊर्जा, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आर्थिक विकास आणि नागरिकांना जलद सेवा देणे यासारख्या प्रकल्पांबाबतीत जागतिक बँकेकडून सहकार्य अपेक्षित आहे यावर या सादरीकरणामध्ये भर देण्यात आला.
यावेळी जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांनी विविध मुद्द्यांवर चर्चाही केली

धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल ठाणे जिल्ह्यासह राज्यासाठी देखील महत्त्वाचे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे :-  “माझ्या गुरुचे नाव या हॉस्पिटलला दिले आहे,  हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा क्षण आहे. धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल हे केवळ ठाणे जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी देखील महत्त्वाचे आहे”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

टाटा मेमोरियल सेंटर,  ठाणे महानगरपालिका आणि जितो ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून बाळकूम रोड (ग्लोबल हॉस्पिटल) ठाणे येथे धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल व त्रिमंदीर संकुलाचा भूमीपूजन समारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत व दादा भगवान फाऊंडेशनचे दीपकभाई देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला,  त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देंवेद्र फडवणीस केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई,  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे,  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण,  कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा,  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,  राहुल शेवाळे,  जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी,  कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार,  ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे प्रख्यात वैद्यकीय कॅन्सर तज्ञ डॉ. शैलेश श्रीखंडे,  महसूल, पोलीस व इतर शासकीय विभागातील वरिष्ठ अधिकारी, व्यापार, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवर यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, राज्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. औषधोपचाराबरोबरच आशिर्वाद व प्रार्थनेचीही गरज असते. या हॉस्पिटलच्या नावातच आनंद आहे. ज्यांनी आयुष्यामध्ये फक्त इतरांच्या आनंदाचाच विचार केला, दुसऱ्यांचे दुःख कमी करण्याचे काम केले, अशा धर्मवीर आनंद दिघेंचे नाव या कॅन्सर हॉस्पिटलला देण्यात आले आहे. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत मोलाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,  परिवाराच्या दुःखापेक्षा समाजाचे दुःख आपले  मानणाऱ्यांपैकी आम्ही  आहोत. या हॉस्पिटलची समाजाला नितांत आवश्यकता होती. अत्याधुनिक सुविधा या हॉस्पिटलमध्ये निर्माण केल्या जाणार आहेत. या हॉस्पिटलसाठी शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल. दि.३१ डिसेंबरचा दिवस आम्ही आजही रक्तदानाने साजरा करतो. ही परंपरा धर्मवीर दिघे यांनी सुरू केली होती, त्यांच्यामुळेच आम्ही घडलो.  आज मी जरी मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो व यापुढेही असेच काम करीत राहीन.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सुरुवातीलाच ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटलचे निर्माण करण्यात येत आहे, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानले. ते पुढे म्हणाले, या कार्यक्रमाला लाखो सेवा कार्य ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात ते सरसंघचालक मोहन भागवत व आध्यात्मिक गुरु श्री.दीपक भाई हे उपस्थित आहेत, हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. राजकारणापेक्षा सेवा करणारा नेता म्हणून धर्मवीर आनंद दिघे यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांचा वारसा मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे नेत आहेत. जितो ट्रस्टच्या माध्यमातून चांगले काम होत आहे. ज्याच्या मागे जितो आणि जैन समाज आहे, त्याच्याकडे संसाधनांची कमतरता भासत नाही. या ट्रस्टच्या माध्यमातून देशभरात मोठ्या प्रमाणात सेवा कार्य होत आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,  कॅन्सर रोगामध्ये देशभरात दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हा रोग जगातील दुसऱ्या क्रमांकाचा किलर रोग आहे. या रोगामुळे फक्त आजारी एकट्या व्यक्तीलाच नव्हे तर कुटुंबातील सर्वांनाच त्रास होतो. टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून ठाणे शहरात कॅन्सर हॉस्पिटल होत आहे. आस्थेचे व सेवेचे मंदीर आजूबाजूला होत आहे. या हॉस्पिटलमध्ये आलेला रुग्ण बरा होऊनच जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, उत्तम शिक्षण आणि आरोग्य या गोष्टी आजच्या काळाची गरज आहेत.  देशात नि:स्वार्थी भावनेने मोठ्यात मोठी व सामान्य व्यक्ती देखील समाजासाठी आणि देशासाठी चांगले काम करीत आहे. नजिकच्या काळात आपला देश सर्व चांगल्या बाबतीत पुढे असेल, असा विश्वास त्यांनी  शेवटी व्यक्त केला.

या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या आरोग्य सोयीसुविधांसह सहाशेहून अधिक खाटांचे नियोजन करण्यात येणार असून गरजू कॅन्सरग्रस्त रुग्णांना अत्याधुनिक क्रोटॉन थेरपीचीही सुविधा तसेच रुग्णांबरोबर येणाऱ्या नातेवाईकांसाठी अत्यल्प दरात भोजन व्यवस्था देखील  असणार आहे, अशी माहितीही अजय आशर यांनी दिली.

मणिपूर व्हिडिओ प्रकरण, पीडित महिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव; केंद्र आणि सरकारविरोधात याचिका

इंफाळ

मणिपूरमध्ये निर्वस्त्र धिंड प्रकरणी दोन महिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लाइव्ह कायद्यानुसार दोघींनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात अपील केले आहे. त्यात काय म्हटले आहे, त्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड खंडपीठ आज सुनावणी होणार आहे.दुसरीकडे आदिवासी भागात स्वतंत्र प्रशासनाच्या मागणीसाठी कुकी महिलांनी गेल्या पाच दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 102 रोखून धरला आहे. कुकी संघटनांच्या हजारो महिलांनी टेंगनौपाल येथे मोरेह​​​कडे जाणाऱ्या लष्कराच्या दहा वाहनांना रोखले. त्यानंतर सैनिकांना एअरलिफ्ट करून मोरेह येथे पाठवावे लागले.

राष्ट्रीय महामार्ग 102 इम्फाळला म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या मोरेहला जोडतो. काही दिवसांपूर्वी या मार्गाने म्यानमारमधून 718 अवैध स्थलांतरितांनी मणिपूरमध्ये प्रवेश केला होता. सरकार आता अवैध स्थलांतरितांची बायोमेट्रिक मोजणी करत आहे.बायोमेट्रिक गणनेच्या नावाखाली सरकार कुकी आदिवासींच्या मोरेह शहरात मेईतेई समुदायाचे सुरक्षा दल तैनात करत असल्याचे आदिवासी संघटनांचे म्हणणे आहे.

बिष्णुपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, 9 वर्षीय विद्यार्थिनी गोळी लागल्याने जखमी
मणिपूरच्या बिष्णुपूरमध्ये रविवारी (३० जुलै) पुन्हा हिंसाचार उसळला. क्वाक्ता गावात कुकी आणि मेईतेई समुदायाच्या लोकांमध्ये झालेल्या गोळीबारात ९ वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. चुरचंदपूरमध्येही हिंसाचाराच्या घटना घडल्या.