Home Blog Page 1378

महिलांचे कायदेशीर अधिकार विषयावर कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, दि.६: आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण पुणे जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय आणि सेंटर फॉर ॲडव्होकसी ॲण्ड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला सक्षमीकरण आणि महिलांचे कायदेशीर अधिकार’ या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ४ मार्च ते ११ मार्च २०२३ या कालावधीत आंतरराष्ट्रीय महिला सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून याअंतर्गत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष विधी सेवा प्राधिकरण पुणे श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. मंगल कश्यप, पुणे जिल्हा न्यायालयातील न्या. सी. पी. शेळके, न्या. सुधीर वानखेडे, ॲड. मधुगीता सुखात्मे, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त नामदेव शिरगावकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शरद कुंटे आणि अशोक पलांडे, नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया चोपडे आदी उपस्थित होते.

न्या. कश्यप यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून महिला, बालके, वंचित घटकातील नागरिक आदीसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, तसेच राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना आणि महिलांच्या सक्षमीकरणात आयोगाचे असलेले योगदान याबाबत माहिती दिली.

यावेळी न्या. शेळके, न्या. वानखेडे, ॲड. मधुगीता सुखात्मे, नारी समता मंच संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त प्रीती करमरकर, आय.एम.ए. च्या माजी अध्यक्ष डॉ. वैजयंती पटवर्धन आदींनी आपले विचार मांडले. नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महिलांवरील हिंसेविरूध्द संदेश देणारे पथनाट्य सादर केले.

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. ६: महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराकरिता जिल्ह्यातील इच्छुक व्यक्ती व संस्थांनी १० दिवसाच्या मुदतीमध्ये अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.

वीरशैव लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तीच्या व संस्थांच्या कामाची दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी या उद्देशाने व्यक्तीसाठी १ व सामाजिक संस्थांसाठी १ असे एकूण २ पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांचे वितरण २२ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया सणाच्या दिवशी होणार आहे.

व्यक्तीगत पुरस्कारासाठी:
अर्जदार हे वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार आणि समाज सेवक असावेत. वयोमर्यादेची अट पुरुषांसाठी ५० वर्षे व महिलांसाठी ४० वर्षे अशी आहे. पोलीस चारित्र्य पडताळणी दाखला, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, दहावी बोर्ड प्रमाणपत्र व जातीचा दाखला आदी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

संस्थेसाठी पुरस्कार:
अर्जदार संस्था ही वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी तसेच कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी असावी. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, अभिलेखे, पोलीस चारित्र्य पडताळणी दाखला आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे. स्वयंसेवी संस्थेचे समाज कल्याण क्षेत्रातील सेवा व कार्य १० वर्षाहून अधिक असावे.

अर्जदारांनी आपले अर्ज सामाजिक न्याय भवन, सर्वे नं. १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या समोर, येरवडा, पुणे ४११००६ (दूरध्वनी क्र. ०२०-२९७०६६११) येथे उद्यापासून १० दिवसाच्या मुदतीत सायं ५.३० वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.
०००

पीएमपी संप पुकारणाऱ्या ठेकेदारांवर त्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीबद्दल कडक कारवाई करा-आ. रवींद्र धंगेकर

पुणे-

पुण्यात सार्वजनिक बस वाहतूक करण्यात बसेसचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांनी अचानक संप पुकारून पुणेकरांना वेठीस धरले. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही. यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांची भेट घेऊन केली. सध्या दहावीच्या परीक्षा सुरु झाल्या असून त्यांच्याप्रमाणेच सर्वसामान्य पुणेकरांनाही या संपामुळे अतोनात त्रास होत आहे. त्यामुळेच कोणतीही पूर्वसूचना न देता संप पुकारणाऱ्या या ठेकेदारांवर त्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीबद्दल कडक कारवाई करावी. अशी मागणी करून रवींद्र धंगेकर म्हणाले की, या ठेकेदारांच्या थकीत बिलांसंदर्भात संबंधितांशी तातडीने चर्चा करून प्रश्न मिटवावा.

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि राज्यशासन यांच्याशी यासंदर्भात तातडीने चर्चा करून हा प्रश्न मिटविण्याचे प्रयत्न करत असल्याचे यावेळी पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांनी सांगितले.

यावेळी प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी त्यांच्यासोबत होते.

कात्रज ते हडपसर बसप्रवासात महिलेच्या पर्समधून पावणेदोन लाखाच्या दागिन्यांची चोरी

पुणे- कात्रज ते गाडीतळ हडपसर अशा पीएमपीएमएल च्या बस प्रवासात एका महिलेच्या पर्समधून अज्ञात भामट्याने तब्बल पावणेदोन लाखाचे दागिने लंपास केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शेवाळवाडीत राहणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेने हि तक्रार नोंदविली आहे.५ मार्च रोजी संबधित महिला बस प्रवास करत असताना बस ची सी एन जी संपल्याने त्या खाली उतरल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आले कि कोणी तरी भामट्याने पर्सची चेन उघडून दागिने पळविले आहेत .पोलीस अंमलदार जी बी क्षीरसागर(8380097866) या भामट्याचा शोध घेत आहेत

“आयुष्मान भारत आणि जनऔषधी योजनांमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांच्या 1 लाख कोटींहून अधिक रुपयांची बचत झाली”

नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘आरोग्य आणि वैद्यकीय संशोधन’ या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषित केलेल्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कल्पना आणि सूचना प्राप्त करण्याच्या दृष्टीने सरकारने आयोजित केलेल्या 12 अर्थसंकल्पोत्तर वेबिनार मालिकेतील हा नववा भाग आहे.

आरोग्य सेवेकडे कोविडपूर्व आणि कोविडोत्तर महामारी प्रणालीच्या दृष्टीने पाहिले जाऊ शकते असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. या महामारीने समृद्ध राष्ट्रांचीही कसोटी पाहिली. जगाचे लक्ष आरोग्यावर केंद्रित झाले, त्यामुळे भारताने एक पाऊल पुढे टाकले आणि आरोग्य देखभालीवर लक्ष केंद्रित केले. “म्हणूनच एक वसुंधरा एक आरोग्य – हा एक दृष्टीकोन आम्ही जगासमोर ठेवला आहे. यामध्ये मानव, प्राणी अथवा वनस्पती, अशी सर्वांसाठी सर्वांगीण आरोग्यसेवा समाविष्ट आहे” असे ते म्हणाले.

महामारीच्या काळात शिकलेल्या धड्यांचा पुनरुच्चार करत पुरवठा साखळी हि अत्यंत चिंतेची बाब बनल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. महामारी ऐन शिगेला पोहोचली होती तेव्हा औषधे, लस आणि वैद्यकीय उपकरणे यांसारखी जीवरक्षक उपकरणे, एखाद्या शस्त्रासारखी वापरली गेली होती असे ते म्हणाले . सरकारने गत वर्षांच्या अर्थसंकल्पात, परदेशी राष्ट्रांवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्याचा सतत प्रयत्न केला आणि यामध्ये सर्व भागधारकांची भूमिका महत्वाची होती यावर त्यांनी भर दिला.

स्वातंत्र्यानंतर अनेक दशके देशात आरोग्यासाठी एकात्मिक दीर्घकालीन दृष्टीकोनाचा अभाव होता असे पंतप्रधानांनी नमूद केले. आरोग्य हा विषय फक्त आरोग्य मंत्रालयापुरता मर्यादित न ठेवता आता आम्ही त्यासाठी संपूर्ण सरकार असा दृष्टिकोन पुढे नेत आहोत. “वैद्यकीय उपचार परवडण्याजोगे करणे ही आमच्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचारांमुळे गरीब रुग्णांचे सुमारे 80 हजार कोटी रुपये वाचले आहेत. उद्या म्हणजेच 7 मार्च हा जनऔषधी दिवस म्हणून पाळला जात आहे. देशभरातील 9,000 जन औषधी केंद्रांद्वारे उपलब्ध स्वस्त औषधांमुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे सुमारे 20 हजार कोटी रुपये वाचले आहेत. म्हणजे या दोन योजनांमुळे नागरिकांचे एक लाख कोटी रुपये वाचले आहेत हे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले.

गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी बळकट आरोग्य पायाभूत सुविधांचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. चाचणी केंद्रे आणि प्रथमोपचार जवळच उपलब्ध व्हावेत यासाठी देशभरात नागरिकांच्या घरांच्या जवळ पडतील अशी 1.5 लाखाहून अधिक आरोग्य केंद्रे विकसित केली जात आहेत,अशी माहिती पंतप्रधानांनी . मधुमेह, कर्करोग आणि हृदयाशी संबंधित समस्यांसारख्या गंभीर आजारांची तपासणी करण्याची सुविधा या केंद्रांवर उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली. पीएम-आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान अंतर्गत छोटी शहरे आणि गावांमध्ये महत्वाच्या आरोग्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत, यामुळे केवळ नव्या रुग्णालयांचीच निर्मिती होत नाही तर एक नवीन आणि परिपूर्ण आरोग्य व्यवस्था देखील निर्माण होत आहे, याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. परिणामी, आरोग्य क्षेत्रातील उद्योजक, गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांसाठी अनेक संधी निर्माण होत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

या क्षेत्रातील मनुष्यबळासंदर्भात बोलताना, गेल्या काही वर्षांत देशभरात 260 हून अधिक नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. यामुळे 2014 च्या तुलनेत पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांमधील वैद्यकीय जागांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.यंदाच्या अर्थसंकल्पात परिचर्या (नर्सिंग )क्षेत्रावर भर देण्यात आल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.“वैद्यकीय महाविद्यालयांच्या परिसरात 157 परिचर्या महाविद्यालये सुरु करणे हे वैद्यकीय मनुष्यबळाच्या निर्मितीच्या दिशेने एक मोठे पाऊल असून हे केवळ देशांतर्गत गरजाच नव्हे तर जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते,” असे ते म्हणाले.

सेवा निरंतर उपलब्ध असणारी आणि परवडणारी बनवण्यात तंत्रज्ञानाची भूमिका पंतप्रधानांनी अधोरेखित केली आणि या क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीवर सरकारने लक्ष केंद्रित केल्याचे विशद केले. “आपल्याला डिजिटल आरोग्य ओळखपत्राच्या सुविधेद्वारे नागरिकांना वेळेवर आरोग्यसेवा द्यायची आहे. ई-संजीवनी सारख्या योजनांद्वारे 10 कोटी लोकांना यापूर्वीच दूरसंचार वैद्यकीय सल्ला सेवेचा फायदा झाला आहे”, असे त्यांनी सांगितले. 5जी ही सेवा स्टार्टअप्ससाठी या क्षेत्रात नवीन संधी निर्माण करत आहे.औषध वितरण आणि चाचणी सेवा पुरवण्यासाठी ड्रोन क्रांतिकारक बदल घडवून आणत आहेत. “उद्योजकांसाठी ही एक उत्तम संधी आहे आणि हे सार्वत्रिक आरोग्यसेवेसाठीच्या आमच्या प्रयत्नांना गती देईल”,असं सांगत कोणत्याही तंत्रज्ञानाची आयात टाळण्याचे आवाहन त्यांनी उद्योजकांना केले.

यावेळी आवश्यक संस्थात्मक प्रतिसादाची यादी सांगत, वैद्यकीय उपकरण क्षेत्रातील नवीन योजनांची माहिती दिली.बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाईस पार्क, उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय ) योजनांसाठीच्या 30 हजार कोटींहून अधिक तरतुदीचा त्यांनी उल्लेख केला आणि गेल्या काही वर्षांत वैद्यकीय उपकरणांच्या बाजारपेठेच्या आकारमानात 12-14 टक्के वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.येत्या काही वर्षांत ही बाजारपेठ 4 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भविष्यातील वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाचे उत्पादन आणि संशोधन यासाठी भारताने कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी काम सुरू केले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. भारतीय तंत्रज्ञान संस्थांसारख्या (आयआयटी) संस्थांमध्ये जैववैद्यकीय अभियांत्रिकीसारखे अभ्यासक्रम चालवले जातील असे ते म्हणाले. उद्योग-शैक्षणिक संस्था तसेच सरकार यांच्यातील संभाव्य सहकार्याचे मार्ग शोधण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले .

औषध उत्पादन क्षेत्रावर जगाचा वाढता विश्वास अधोरेखित करत, याचा फायदा करून घेत जगात निर्माण झालेल्या भारताच्या या प्रतिमेचे संरक्षण करण्यासाठी काम करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी तसेच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने उत्कृष्टता केंद्रांद्वारे औषध उत्पादन क्षेत्रातील संशोधन आणि नवोन्मेषला चालना देण्यासाठी एक नवीन कार्यक्रम सुरू केला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. भारतातील औषध उत्पादन क्षेत्राची बाजारपेठ आज 4 लाख कोटींच्या घरात आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.हे आकारमान आगामी काळात 10 लाख कोटींपर्यंत वाढवण्याची शक्यता असल्याने खाजगी क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्रात समन्वय निर्माण करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

गुंतवणुकीसाठी महत्त्वाची क्षेत्रे ओळखून निश्चित करण्याची सूचना पंतप्रधानांनी औषध उत्पादन क्षेत्राला केली.या क्षेत्रातील आगामी संशोधनासाठी सरकारने उचललेली अनेक पावले अधोरेखित करत, संशोधन उद्योगासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) माध्यमातून अनेक नवीन प्रयोगशाळा सुरु करण्यात आल्या आहेत, अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली .

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेबाबत सरकारने केलेल्या उपाययोजनांचा झालेला परिणाम अधोरेखित केला. स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियान, धुरामुळे होणारे आजार रोखण्यासाठी उज्ज्वला योजना, जलजन्य आजार रोखण्यासाठी जल जीवन मिशन आणि अशक्तपणा आणि कुपोषणावर उपाय म्हणून राष्ट्रीय पोषण अभियान या सरकारने राबवलेल्या योजनांची नावे मोदी यांनी यावेळी सांगितली . आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षात भरड धान्य अर्थात श्रीअन्न याच्या भूमिकेचाही त्यांनी उल्लेख केला. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, मिशन इंद्रधनुष, योग, फिट इंडिया अभियान आणि आयुर्वेद लोकांना आजारांपासून वाचवत आहेत. यावरही मोदी यांनी प्रामुख्यानं भर दिला. भारतात जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिपत्त्याखाली पारंपारिक औषधांसाठी जागतिक केंद्राची स्थापना झाल्याची दखल घेत आयुर्वेदातील पुराव्यावर आधारित संशोधन करावे या आवाहनाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधांपासून वैद्यकीय मानवी संसाधनांपर्यंत सरकारनं घेतलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्र्यांनी

प्रशंसा केली. प्रधानमंत्री पुढे म्हणाले की, नवीन क्षमता केवळ इथल्या नागरिकांच्या आरोग्य सुविधांपुरती मर्यादित नाही, तर भारताला जगातली सर्वात आकर्षक वैद्यकीय पर्यटन ठिकाण म्हणुन विकसीत करायचं आमचं उद्दिष्ट आहे. वैद्यकीय पर्यटन हे भारतातील खूप मोठं क्षेत्र आहे आणि देशात रोजगार निर्मितीचं एक मोठे माध्यम बनले आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधलं.

एक विकसित आरोग्य आणि निरोगी परिसंस्था भारतात केवळ प्रत्येकाच्या प्रयत्नांनी तयार केली जाऊ शकते. त्याचबरोबर सर्व भागधारकांना त्यांच्या मौल्यवान सूचना देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना केलं. “आम्ही ठोस आराखड्यासह निश्चित केलेल्या उद्दिष्टासाठी वेळेच्या मर्यादेत अर्थसंकल्पातील तरतुदी लागू करायला सक्षम असलं पाहिजे, यावर मोदी यांनी भर दिला. पुढील अर्थसंकल्पापूर्वी सर्व भागधारकांना सोबत घेऊन सर्व स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुमच्या अनुभवाचा लाभ घेण्याची नितांत आवश्यकता आहे”, असं मोदी उपस्थितांना म्हणाले.

देवीच्या मूर्तीखाली ठेवलेले दागिने अन पैसे चोरट्याने लांबविले

पुणे- देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून मूर्तीखाली ठेवलेली दागिने आणि रोकड असा पावणेतीन लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरून नेल्याची फिर्याद सहकारनगर पोलिसात दाखल झाली आहे.

राजेश गद्रे (वय ४७, रा. लक्ष्मीनगर )यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितले कि,’सर्वे नंबर ५४/ २ ,अण्णाभाऊ साठे वसाहत या ठिकाणी फिर्यादी यांचे आई वडील राहतात , त्यांनी घरात काळूबाई देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली . या मूर्तीच्या खाली त्यांनी अडीच लाखाचे दागिने आणि २५ हजाराची रोकड ठेवली होती . अज्ञात चोरट्याने घर बंद असताना कडी कोयंडा उचकटून मुर्तीखालील ऐवज चोरून नेला . याप्रकरणी सहायक निरीक्षक समीर शेंडे( 9527356290)अधिक तपास करीत आहेत .

दिल्लीत शैक्षणिक भरीव काम करणाऱ्या केजरीवालांच्या माणसांना केंद्राने अटक केली- शरद पवार

“चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल विचारताच तुम्ही शहाण्या माणसांबद्दल विचारा…” शरद पवारांचा पत्रकारांना सल्ला

पुणे-अलीकडच्या काळात दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारी शाळा आणि शैक्षणिक संस्था यात केलेले भरीव काम पाहण्यास देशभरातून लोक येत आहेत. परंतु याकामात पुढाकार घेणाऱ्यांना केंद्र सरकारने अटक केली. काही लोक भाजपमध्ये गेले की त्यांची चौकशी होत नाही. राज्यात असे अनेक उदाहरणं आहेत. ठाणे,वाशी अकोलामध्ये यापूर्वी कोणाची चौकशी झाली, कोणाला अटक होणार होती, हे सरकारने सांगावे. महविकास आघाडी काळातील कामांबाबत आक्षेप असेल तर त्या कामांचीही चौकशी करा, असे शरद पवार यांनी म्हटले आहे., केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतो आहे याबाबत पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावर मी पहिली सही केली आहे असेही ते म्हणाले .“चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल विचारताच तुम्ही शहाण्या माणसांबद्दल विचारा…”असा सल्ला शरद पवारांनी पत्रकारांना दिला.

आज पुण्यात पत्रकार परिषदेत ते म्हणालेखासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी एकत्रित आगामी निवडणूक लढल्यास लोकसभेला 40 तर विधानसभेला 200 जागा मिळतील, असे मत व्यक्त केले होते. याबाबत शरद पवार म्हणाले, संजय राऊत हे पत्रकार असून त्यांनी अभ्यास केला असेल. मात्र, याबाबत मला अधिक माहिती नाही. लोकांना आता बदल पाहिजे, असे राज्यातील दौऱ्यात मला दिसून येत आहे. महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता आहे. जे त्यात सहभागी नाही त्याबाबत मी बोलणार नाही, असा टोला यावेळी शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना लगावला.शरद पवार म्हणाले, खासदार राहुल गांधी हे देशातील एक राजकीय पक्षाचे प्रमुख नेते आहे. देशातील लोकशाही संदर्भात चिंता करण्याबाबत त्यांनी परदेशात मत व्यक्त केले तर त्याबाबत आक्षेपार्ह काही नाही. महाविकास आघाडी मधील पक्ष आगामी काळात एकत्र राहण्याबाबत आम्ही विचार करत असून त्यात काँग्रेस असणे महत्वाचे आहे. देशातील गावागावात काँग्रेस विचार आणि कार्यकर्ता आहे. त्यांचे यश-अपयश सोडून द्यावे. पण, त्यांचे महत्व कमी नाही.

बापटांना डावलून भाजपचे निर्णय,अन धंगेकरांसारखा जनमानसात मिसळणारा उमेदवार,कसब्याचा गड ढासळला :शरद पवार

पुणे -भाजपचा गड असलेला कसबा मतदारसंघाचे अनेक वर्षे खासदार गिरीश बापट यांनी प्रतिनिधित्व केले. ते केवळ भाजप पुरते मर्यादित नव्हते. तर गिरीश बापट यांनी अन्य पक्षांसोबतही चांगले संबंध ठेवले होते. बापट यांना डावलून भाजपने निर्णय घेतले. त्याचा फायदा आम्हाला झाला नसला तरी .रवी धंगेकर सामान्य जनतेत मिसळणारा ,दुचाकीवर फिरणारा कार्यकर्ता म्हणून निवडून आला असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

कसबा विधानसभाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, कसबा पोटनिवडणुकीत लोकांचा आवाज यावेळी महाविकास आघाडीसोबत होता. महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केले, याचा विजय हा परिणाम आहे. आगामी निवडणुकीत सर्व पक्ष एकत्रित येऊन सामोरे गेले आणि काम केले तर चांगला परिणाम दिसून येईल. महाराष्ट्रातही लोकांना बदल हवा आहे.

शरद पवार म्हणाले, माझी आणि रवींद्र धंगेकर यांची जुनी ओळख नाही. परंतु एक कार्यकर्ता म्हणून रवींद्र धंगेकर सक्षम होते. रवींद्र धंगेकरांनी अनेक वर्षे सामाजिक काम केले. त्यामुळे त्याचा परिणाम जाणवला. पोट निवडणुकीत पैसे वाटपाबाबत मला लोकांनी फोटो दाखवले ते राजकीय कार्यकर्ते नव्हते. अनेक वर्षांपासून मतदारांनी वेगळा विचारसरणीस मते दिली. पण, यंदा आम्ही गैरप्रकारांना मत देणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

प्रियकराच्या मदतीने आईनेच मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना

पुणे- अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने आईने प्रियकराच्या मदतीने मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेच्या तपासानंतर मुलीच्या आईसह प्रियकरास पोलिसांनी अटक केली आहे. खडकी पोलिसांना तीन दिवसांपूर्वी तीन वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला होता. गावातून पुण्यास पळून जाताना रेल्वेप्रवासातच मुलीला गळा दाबून संपवल्याचे पोलिसांच्या तपासाअंती स्पष्ट झाले आहे.

लक्ष्मी संताेष गवई (वय-26) व संताेष देवमन जामनिक (वय-25, दाेघे रा.खेरपुडी, ता.बाळापूर, जि.अकाेला) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सदर दाेन्ही आराेपींवर खडकी पाेलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी याप्रकरणी सखोल तपास केला .

दाेन मार्च राेजी पाेलिसांना खडकी रेल्वे स्टेशन ते खडबी बाजार यादरम्यानच्या रस्त्यावर सीएफडी मैदानाजवळ तीन वर्षाचा मुलीचा मृतदेह आढळून आला हाेता. हा मृतदेह पाेलिसांनी ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. डाॅक्टरांच्या अहवालानुसार मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

मुलगी अनेक दिवसांपासून बेपत्ता होती. पुणे- मुंबई जुन्या महामार्गावर पाेलिसांना एका दुकानात आराेपींबाबत सीसीटीव्ही फूटेज मिळाले. त्यानुसार एक जाेडपे सीसीटीव्हीत कैद झाले हाेते. महिलेच्या कडेवर संबंधित मुलगी हाेती आणि ते खडकी रेल्वे स्टेशन मधून बाहेर पडत हाेते. हे जोडपे अकोल्यातून आले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आरोपी लक्ष्मी व संताेष हे अकाेला जिल्हयातील एकाच गावचे रहिवासी असून त्यांच्यात अनैतिक संबंध होते. गाव साेडून पुण्यास जाण्याचे त्यांनी ठरवले हाेते. एक मार्च राेजी ते गावातून पुण्यास येण्याकरता निघाले. परंतु, लक्ष्मीने येताना तिच्या साेबत तीन वर्षाची मुलगी आणल्याने रेल्वे प्रवासात त्यांच्यात भांडणे झाली. आराेपीने त्यावेळी मुलीस पट्टयाने मारहाण करत तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर खडकी रेल्वे स्टेशन जवळील माेकळया मैदानात जाऊन मुलीचा मृतदेह टाकून ते पसार झाले.

‘ फागुन उत्सव ‘नृत्याविष्काराला चांगला प्रतिसाद

पुणे

होळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘ फागुन उत्सव ‘ या नृत्याविष्काराला चांगला प्रतिसाद. ‘कथक केंद्र नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डान्स(नवी दिल्ली)’ यांच्यातर्फे आणि भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन व डॉ.नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा नृत्याविष्कार सादर करण्यात आला. कथक केंद्र नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डान्स ‘च्या संचालिका प्रणामी भगवती, अध्यक्ष उमा डोग्रा, प्रसिद्ध नर्तक डाॅ.पं.नंदकिशोर कपोते, नंदकुमार काकिर्डे, शमा भाटे, सुजाता नातु, स्वाती दैठणकर या नृत्याविष्कार कार्यक्रमाला उपस्थित होते.

नुकताच ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.गौरी दिवाकर(दिल्ली),शर्वरी जमेनीस (पुणे),अदिती फणसे (नाशिक),सरिता काळे ( मुंबई)या नामवंत युवा कथक कलाकारांनी विविध नृत्याविष्कार सादर केले . रसिकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. शर्वरी जमेनीस , गौरी दिवाकर , सरिता केलेले , अदिती फणसे यांनी होरीवर आधारित सुंदर होरी रचना विविध शैलीं द्वारे सादर केल्या. कार्यक्रमाचे निवेदन अमिरा पाटणकर ने केले. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रम रंगतदार झाला.

अमिताभ बच्चन शूटिंग दरम्यान जखमी:हैदराबादेत अ‍ॅक्शन सीन करताना बरगड्यांना जखम

0

चित्रपट अभिनेते बीग बी अमिताभ बच्चन हैदराबाद येथे शूटिंगदरम्यान जखमी झालेत. त्यांनी स्वतःच आपल्या ब्लॉगवर याची माहिती दिली आहे. ते सध्या मुंबईतील आपल्या घरी आराम करत आहेत. अमिताभ बच्चन हे प्रभासच्या ‘प्रोजेक्ट ए’ या चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्यात एक अॅक्शन सीन करताना त्यांच्या बरगड्यांना इजा झाली. हैदराबादेतील उपचारानंतर त्यांना मुंबईला पाठवण्यात आले आहे.

अमिताभ बच्चन आपल्या ब्लॉगमध्ये म्हणाले – बरगडीच्या पिंजऱ्यातील स्नायू फाटले आहेत. शूटिंग रद्द करण्यात आली आहे. पट्टी बांधली असून, उपचार सुरू आहेत. खूप जास्त वेदना होत आहेत. हलण्यासही त्रास होत आहे. श्वास घेण्यासही त्रास होत आहे. या वेदना कमी करण्यासाठी मला काही औषधी देण्यात आलीत. यातून सावरण्यासाठी आणखी काही आठवडे लागतील.

अमिताभ म्हणाले – जलसावर चाहत्यांना भेटू शकणार नाही

बिग बी म्हणाले -“मी बरा होईपर्यंत सर्व कामे थांबवण्यात आली आहेत. मी जलसात विश्रांती घेत आहे. फक्त आवश्यक गोष्टींसाठी थोडेसे चालावे लागणार. होय, आराम तर सुरूच राहणार. मी जलसाच्या गेटवर माझ्या चाहत्यांना भेटू शकणार नाही, हे सांगणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. जलसावर येण्याचा विचार करणाऱ्यांना सध्या त्यांना याची माहिती द्या. बाकी सर्वकाही ठीका आहे.”

ब्लॉग वर काय म्हटले आहे….

In Hyderabad at the shoot for Project K, during an action shot, I have got injured .. rib cartilage popped broke and muscle tear to the right rib cage .. canceled shoot .. did Doctor consult and scan by CT at the AIG Hospital in Hyderabad and flown back home .. strapping has been done and rest been advocated .. yes painful .. on movement and breathing .. will take some weeks they say before some normalisation will occur .. some medication is on also for pain .. 

So all work that was to be done has been suspended and canceled dropped postponed for the moment until healing occurs ..

I rest at Jalsa and am mobile a bit for all the essential activities .. but yes in rest and generally lying around ..

It shall be difficult or let me say .. I shall be unable to meet, the well wishers at Jalsa Gate this evening .. so do not come .. and do inform as much as you can to those that intend coming ..

All else is well .. 

हैदराबादमध्ये प्रोजेक्ट के च्या शूटच्या वेळी, अॅक्शन शॉट दरम्यान, मी जखमी झालो.. बरगडी कूर्चा फुटला आणि उजव्या बरगडीच्या पिंजऱ्यात स्नायू फाटले.. शूट रद्द केले.. डॉक्टरांनी एआयजी हॉस्पिटलमध्ये सीटी द्वारे सल्लामसलत केली आणि स्कॅन केले. हैदराबाद आणि घरी परतलो.. स्ट्रॅपिंग केले गेले आणि विश्रांतीचा सल्ला दिला गेला.. होय वेदनादायक.. हालचाल आणि श्वासोच्छवासावर.. काही आठवडे लागतील काही सामान्य होण्याआधी ते म्हणतात.. वेदनांसाठी काही औषधे देखील सुरू आहेत.

त्यामुळे जे काम करायचे होते ते सर्व स्थगित करण्यात आले आहे आणि बरे होईपर्यंत रद्द केले गेले आहे.

मी जलसा येथे विश्रांती घेतो आणि सर्व आवश्यक कामांसाठी थोडासा मोबाईल असतो.. पण होय विश्रांतीमध्ये आणि साधारणपणे आजूबाजूला पडून असतो..

अवघड असेल किंवा मला सांगू द्या.. मला भेटता येणार नाही, आज संध्याकाळी जलसा गेटवर हितचिंतकांना.. त्यामुळे येऊ नका.. आणि ज्यांना येण्याची इच्छा आहे त्यांना शक्य तितकी माहिती द्या..

बाकी सर्व ठीक आहे..

रामकथा हे आमचे राष्ट्रीय चारित्र्य- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती :  रामकथा हे आमचे राष्ट्रीय चारित्र्य व राष्ट्रीय संस्कार आहे. रामकथेत अवीट व अमिट गोडवा असून आम्हा सर्वांना सन्मार्ग दाखवणारी दाखविणारी ही कथा आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

बडनेरा येथील मैदानावर आयोजित माँ कनकेश्वरी देवी जनकल्याण ट्रस्टतर्फे आयोजित रामचरित मानस कथागंगा संमेलनाला श्री. फडणवीस यांनी भेट देऊन रामायण ग्रंथ व माताजींचे दर्शन घेतले. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुलकर्णी, किरण पातुरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

माँ कनकेश्वरी व रामायणाचे दर्शन घेण्याचे भाग्य आज लाभले, अशी भावना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.  उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी काही वेळ कार्यक्रमस्थळी थांबून रामकथेचे श्रवण केले.

सरकारी यंत्रणांचे खासगीकरण, हा धोका अल कायदा, तालिबानपेक्षा भयंकर

सामनाच्या अग्रलेखात ; निवडणूक आयोग तर भाजपच्या ताटाखालचे मांजर होऊन सत्ताधाऱ्यांच्या दारात शेपटी हलवत बसला आहे

देशातले वातावरण कधी नव्हे इतक्या गोंधळाचे आहे. कालपर्यंत स्वायत्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक सरकारी यंत्रणांचे भाजपने खासगीकरण करून टाकले आहे. हा धोका अल कायदा, तालिबानपेक्षा भयंकर आहे, असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला आहे.पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, निवडणूक आयोग तर भाजपच्या ताटाखालचे मांजर होऊन सत्ताधाऱ्यांच्या दारात शेपटी हलवत बसला आहे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयास निवडणूक आयोगाच्या बाबतीत कठोर निर्णय घ्यावा लागला व मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमावी लागली. भाजपच्या मनमानीस दिलेली ही चपराक आहे.

अग्रलेखात म्हटले आहे की, देशातील नऊ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले असून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांवर दबाव आणला जात असल्याचे पत्रात म्हटले आहे. देश सरळ सरळ हुकूमशाहीच्या दिशेने जात आहे, असा या पत्राचा सूर आहे. त्याच वेळी ज्येष्ठ कायदेपंडित कपिल सिब्बल यांनी ‘इन्साफ का सिपाही’ हे आंदोलन सुरू केले. ईडी, सीबीआयचा हत्यार म्हणून वापर करून राजकीय विरोधकांचा ‘काटा’ काढला जात आहे. त्या अन्यायाविरोधात एकत्र येऊन लढण्याची गरज असल्याचे सिब्बल यांनी स्पष्ट केले आहे.

अग्रलेखात म्हटले आहे की, राहुल गांधी यांचे केंब्रिज विद्यापीठातले भाषण सध्या गाजते आहे. गांधी यांच्या फोनमध्ये ‘पेगॅसस’ सोडून त्यांचे फोन ऐकले जात होते. या हेरगिरीसाठी जनतेचाच पैसा वापरून इस्रायलमधून यंत्रणा खरेदी केली. या सगळ्यांचा स्फोट राहुल गांधी यांनी केंब्रिज येथे केला. त्यामुळे देशाची बदनामी झाल्याचा ‘राग’ भाजपच्या पोपटरावांनी आळवला. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत परदेशात जाऊन पंडित नेहरूंपासून इंदिराजी, राजीव गांधी व त्यांच्या सरकारबाबत जी मुक्ताफळे उधळत होते ती देशाची बदनामी नव्हती तर काय होते?

अग्रलेखात म्हटले आहे की, आज देशात जी हुकूमशाही राजवट सुरू आहे, त्यामुळे लोकशाहीचा मुडदाच पडलेला दिसतो. भाजपला विरोधकांच्या गैरव्यवहाराची प्रकरणे चिवडण्यात आसुरी आनंद मिळतो. त्यातली बहुसंख्य प्रकरणे खोटी आहेत. पुन्हा स्वतःच्या घरातली भ्रष्टाचाराची प्रकरणे ही मंडळी सर्रास दडपतात. हीच प्रकरणे लोकांसमोर आणायचे काम सिब्बल यांच्या ‘इन्साफ का सिपाही’ने करायला हवे व त्यासाठी वकिलांनी पुढाकार घ्यायला हवा.

अग्रलेखात म्हटले आहे की, ईडी व सीबीआयचा वापर करून भाजपने देशभर आठ सरकारे पाडली, असा हल्ला ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी सर्वोच्च न्यायालयात केला. विरोधकांना नाहक छळण्याचे मोदी सरकारचे कारस्थान असल्याचे दुष्यंत दवे यांनी सांगितले. भाजप एकापाठोपाठ एक राज्यांमध्ये विरोधी पक्षांतील आमदारांना आमिषे दाखवून दडपशाहीने आपल्या पक्षात घेत आहे. आमदारांना ‘फूस’ लावून चार्टर्ड प्लेनमधून दुसरीकडे न्यायचे आणि आलिशान हॉटेलात त्यांचा मुक्काम ठेवायचा हे प्रकार भाजप करीत आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, हे लोकशाहीचे मरण आहे. हे तुम्हीच थांबवू शकता, असे आवाहन वकील दवे यांनी सर्वोच्च न्यायालयास केले.

अग्रलेखात म्हटले आहे की, कपिल सिब्बल यांच्या ‘इन्साफ का सिपाही’ने हीच भूमिका मांडली आहे व देशातील नऊ विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या पत्रातही हाच मसुदा आहे. अरविंद केजरीवाल, चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी, भगवंत मान, तेजस्वी यादव, फारुख अब्दुल्ला, शरद पवार, उद्धव ठाकरे व अखिलेश यादव अशा नेत्यांच्या सहीचे पंतप्रधान मोदींना लिहिलेले पत्र देशाच्या हुकूमशाहीवर प्रकाश टाकणारे आहे. महाराष्ट्रासह देशात भाजपच्या ‘भ्रष्टाचार वॉशिंग मशीन’च्या विरोधात ठामपणे उभे राहायची हीच वेळ आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी ‘इन्साफ’च्या शिपायांना हातात हात घालून काम करावे लागेल. राजकारणासाठी उभा जन्म पडला आहे. देश आधी वाचवू या!

स्मिता ठाकरेंच्या महिला दिनास मुख्यमंत्री शिंदे आणि अनुपम खेर प्रमुख पाहुणे ….

मुंबई: राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम राबवित असून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. हे सर्वसामान्यांचे सरकार असून महिला सक्षमीकरणास सर्वोच्च प्राधान्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

जागतिक महिला दिनानिमित्त अंधेरी येथील मुक्ती फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, अभिनेत्री अरुणा इराणी, डॉ.भारत बालवल्ली, वीर सेनानी फाऊंडेशनचे कर्नल पत्की यांचा सत्कार करण्यात आला. मुक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा स्मिता ठाकरे यांचेसह मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

देशासाठी अनेक कर्तृत्ववान महिलांनी आपले मौलिक योगदान आहे. राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी तसेच महिला भगिनींना ताकद देण्यासाठी मी भावासारखा पाठीशी उभा राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली. आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेने अनेक जण कार्यरत असतात. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे कार्य ‘मुक्ती फाऊंडेशन’ सारख्या संस्था करीत  आहे़, असे सांगून महिला सबलीकरणासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याचा सन्मान मुक्ती फाऊंडेशनच्या माध्यमातून होत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या संस्थेचे कौतुक केले.

महिला भगिनींनी ठरवलं तर अशक्य काम शक्य करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. माता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ही आपल्यासाठी आदर्श उदाहरणे आहेत. देशाच्या प्रमुखपदी दोन महिला राष्ट्रपती म्हणून आजवर विराजमान झाल्या आहेत, ही आपल्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे, असे असे सांगून मुक्ती फाउंडेशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षास व आज सन्मानित झालेल्या महिलांचे अभिनंदन करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

महिला सबलीकरणासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती व संस्था यांच्या कार्याचा तसेच देशसेवेत आपले प्राण अर्पण करणाऱ्या शहीद वीरांच्या वीरपत्नी व वीरमातांचा तसेच सुरक्षा दलातील कर्तृत्ववान महिलांचा यावेळी मुक्ती फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला.

ज्येष्ठ गायिका डॉ अलका देव मारुलकर यांचा गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्काराने सन्मान

– ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्कार’ ज्येष्ठ तबलावादक ओंकार गुलवाडी यांना प्रदान

पुणे दि. ५ मार्च, २०२३ : ‘नाट्यसंपदा प्रतिष्ठान’च्या वतीने देण्यात येणारा ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार’ यावर्षी डॉ अलका देव मारुलकर यांना प्रदान करीत गानसरस्वती महोत्सवात आज त्यांचा सन्मान करण्यात आला. तर ज्येष्ठ तबलावादक ओंकार गुलवाडी यांना गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डी पी रस्त्यावरील केशवबाग या ठिकाणी ९ व्या गानसरस्वती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आज महोत्सवाच्या तिसऱ्या व शेवटच्या सत्रात सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले.

नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त दाजीशास्त्री पणशीकर, किशोरी आमोणकर यांचे सुपुत्र निहार आणि बिभास आमोणकर, महोत्सवाचे आयोजक पं रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर आदी यावेळी उपस्थित होते.

रोख रु. ५१ हजार व मानचिन्ह असे गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्काराचे तर रोख रु. २५ हजार व मानचिन्ह असे किशोरी आमोणकर संगतकार पुरस्काराचे स्वरूप असून सातत्यपूर्ण संगीत सेवेकरिता सदर पुरस्कार देण्यात येतात.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना ओंकार गुलवाडी यांनी पुरस्कार आपल्या गुरुंना समर्पित करीत आयोजकांचे आभार मानले. तर डॉ अलका देव मारुलकर यांनी किशोरीताई आणि त्यांच्या आई मोगूबाई कुर्डीकर यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधांना उजाळा दिला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “मोगुबाई आणि माझे वडील राजाभाऊ देव यांचे चांगले ऋणानुबंध होते. मोगुबाई यांना त्यावेळी स्मृतीभ्रम झाला होता, त्यामुळे त्या आम्हाला ओळखतील की नाही हे सांगता येत नाही असे किशोरीताई यांनी आम्हाला आधीच सांगून ठेवले होते. मात्र आम्ही केवळ त्यांच्या दर्शनासाठी गेलो. पण खोलीत पाऊल ठेवल्या ठेवल्या त्यांनी बाबा आणि मला ओळखले. माझा रियाज कसा चालू आहे याचीही विचारपूस त्यांनी केली. यावरून जन्म जन्मांतरीच्या नात्यांवर आमचा विश्वास बसला.” मोगुबाई कुर्डीकर यांच्या नावाने आज मिळालेला पुरस्कार महत्त्वाचा असून या दोन्ही कलाकारांवर केलेली स्वरचित राग श्री मधील ‘कैसे बरनू तुम्हरी महिमा…’  ही बंदिश त्यांनी उपस्थितांसमोर म्हटली.

दाजीशास्त्री पणशीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर विघ्नेश जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.