पुणे -भाजपचा गड असलेला कसबा मतदारसंघाचे अनेक वर्षे खासदार गिरीश बापट यांनी प्रतिनिधित्व केले. ते केवळ भाजप पुरते मर्यादित नव्हते. तर गिरीश बापट यांनी अन्य पक्षांसोबतही चांगले संबंध ठेवले होते. बापट यांना डावलून भाजपने निर्णय घेतले. त्याचा फायदा आम्हाला झाला नसला तरी .रवी धंगेकर सामान्य जनतेत मिसळणारा ,दुचाकीवर फिरणारा कार्यकर्ता म्हणून निवडून आला असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
कसबा विधानसभाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, कसबा पोटनिवडणुकीत लोकांचा आवाज यावेळी महाविकास आघाडीसोबत होता. महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केले, याचा विजय हा परिणाम आहे. आगामी निवडणुकीत सर्व पक्ष एकत्रित येऊन सामोरे गेले आणि काम केले तर चांगला परिणाम दिसून येईल. महाराष्ट्रातही लोकांना बदल हवा आहे.
शरद पवार म्हणाले, माझी आणि रवींद्र धंगेकर यांची जुनी ओळख नाही. परंतु एक कार्यकर्ता म्हणून रवींद्र धंगेकर सक्षम होते. रवींद्र धंगेकरांनी अनेक वर्षे सामाजिक काम केले. त्यामुळे त्याचा परिणाम जाणवला. पोट निवडणुकीत पैसे वाटपाबाबत मला लोकांनी फोटो दाखवले ते राजकीय कार्यकर्ते नव्हते. अनेक वर्षांपासून मतदारांनी वेगळा विचारसरणीस मते दिली. पण, यंदा आम्ही गैरप्रकारांना मत देणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.