पुणे
होळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘ फागुन उत्सव ‘ या नृत्याविष्काराला चांगला प्रतिसाद. ‘कथक केंद्र नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डान्स(नवी दिल्ली)’ यांच्यातर्फे आणि भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन व डॉ.नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा नृत्याविष्कार सादर करण्यात आला. कथक केंद्र नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डान्स ‘च्या संचालिका प्रणामी भगवती, अध्यक्ष उमा डोग्रा, प्रसिद्ध नर्तक डाॅ.पं.नंदकिशोर कपोते, नंदकुमार काकिर्डे, शमा भाटे, सुजाता नातु, स्वाती दैठणकर या नृत्याविष्कार कार्यक्रमाला उपस्थित होते.
नुकताच ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.गौरी दिवाकर(दिल्ली),शर्वरी जमेनीस (पुणे),अदिती फणसे (नाशिक),सरिता काळे ( मुंबई)या नामवंत युवा कथक कलाकारांनी विविध नृत्याविष्कार सादर केले . रसिकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. शर्वरी जमेनीस , गौरी दिवाकर , सरिता केलेले , अदिती फणसे यांनी होरीवर आधारित सुंदर होरी रचना विविध शैलीं द्वारे सादर केल्या. कार्यक्रमाचे निवेदन अमिरा पाटणकर ने केले. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रम रंगतदार झाला.