Home Blog Page 1201

मुंबई समुद्रातील ‘शिवस्मारक झाले असते’ तर…मोदी सरकारवर ‘गॅरंटीच्या जाहीराती’ देण्याची वेळ आली नसती..! 

शिवस्मारकास होत असलेला विलंब अक्षम्य..!  काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी 

पुणे –  रयतेप्रती समर्पित छत्रपतींची ‘शिवमुद्रा’ तर नागरीकांप्रती समर्पित संविधान’ याचे साम्य ‘भारतीय संविधानात’ असल्याने, शिव छत्रपती, शाहू महाराज व महात्मा गांधी या राष्ट्रपुरूषांची ‘समता, न्याय व कल्याणकारी राज्याचे’ अंतिम ध्येय एकच असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले. पुणे मेडीसीन डिलिव्हरी असोसिएशन तर्फे आयोजित सदाशीव पेठ परीसरांत दुचाकी रॅली – शिवजयंती अभिवादन व लायन्स क्लब ऑफ पुणे लोटस तर्फे आरोग्य शिबिर कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शिवमुद्रेचे प्रतिबिंब असणारे ‘लोकार्पित संविधान’ हे प्रजासत्ताक देशात राजधर्म निभावण्याचे प्रमुख अंग आहे. संविधानास अभिप्रेत राजधर्म निभावण्याची अपेक्षाच् सत्तापक्षाकडुन केली जाते. मात्र तोंड देखलेपणाने रामराज्य व शिव छत्रपतींचे केवळ नांव घेऊन चालत नाही तर राज्यकर्त्यांकडुन कृतीशील राजधर्माचा अवलंब ही अपेक्षीत असतो. सरकारची शिवस्मारकाची ईच्छा शक्ती कमी असले मुळेच् कोट्यावधींचा सरकारी निधी खर्च करून ही, सु ८ वर्षापुर्वी मोठा डंका पिटत पंतप्रधान मोदींनी केलेले भुमिपुजन’ करून शुभारंभ केलेले मुंबई_समुद्रातील नियोजित शिवस्मारक झाले असते तर… सरकारवर ‘गॅरंटीच्या जाहीराती’ देण्याची वेळ आली नसती..! असे प्रतिपादन राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी या प्रसंगी केले.पुण्यातील महापालिकेच्या शिवस्मारकासाठी महापालिकेच्या सभागृहात फेटे घालून शहरभर हत्तीवरून पेढे वाटण्याच्या घोषणा झाल्या, फडणविसांनी बैठका घेऊन तोंडाला पाने पुसली असे ते म्हणाले. आमदार मोहन जोशी यांनी आपल्या भाषणात पुणे शहरात झालेल्या महीला अत्याचाराचा निषेध केला व मेडीसीन डिलीव्हरी बॅाईज ना तोंड द्यावे लागत असलेल्या वहातुक कोंडी साठी त्यांनी ‘वेकअप पुणेकर’ मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. मान्यवरांच्या हस्ते शिव छत्रपतींना पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वागत – प्रास्ताविक लायन्स क्लब ऑफ पुणे लोटस चे अध्यक्ष व पुणे काँग्रेस व्यापारी सेलचे ऊपाधक्ष श्री प्रसन्न पाटील यांनी केले तर सुत्र संचालन पुणे मेडीसिन डिलिव्हरी असोसिएशन अघ्यक्ष श्री पप्पू गुजर यांनी केले. या प्रसंगी श्रीमंत छत्रपती राजाराम मंडळांचे अघ्यक्ष युवराज निंबाळकर, केमिस्ट असोसिएशन चे संजय शहा, ॲड स्वप्नील जगताप, संजय आबा बिबवे, गणेश शिंदे, संजय कुंजीर, सुरसे पाटील, सुरेश कांबळे, आकाश जाधव, संजय कुंजीर, दिवाकर गोरे ,रवी बनकर इ उपस्थित होते.

अरेन्ज मॅरेज ही लव स्टोरी बनू शकते का …. ‘

ऊन सावली चित्रपटाच्या ‘टायटल  सॉंग’ ला मिळालेला उस्फुर्त प्रतिसाद पाहता आज चित्रपटाचे पोस्टर आणि टीजर लाँच करण्यात आले. ऊना मुळे लागणारे चटके आणि सावली ची शीतलता दोन्ही प्रेमाच्या रूपात पाहायला मिळणार आहे. आम्ही दोघी, टाईमपास २, फेम ऍक्टर  भूषण प्रधान आणि त्यांच्या सोबत वाळवी आणि झिम्मा २ असे बॅक टू बॅक हिट सिनेमा देणारी एक्टरेस शिवानी सुर्वे ह्या दोघांची जोडी पाहायला मिळणार आहे.

‘एक अरेन्ज मॅरेज ही अद्भुत लव स्टोरी असू शकते’  ह्या वाक्यात ‘ऊन   सावलीचे’ गूढ लपलेले आहे. प्रेक्षकांसाठी प्रेमाचा आगळा वेगळा आनंददेणारा, हळुवार स्पर्श करणारा असा हा चित्रपट आहे. आज ह्या चित्रपटाचे पोस्टर आणि टीजर जाहीर करण्यात आले. एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहणारे हे सुंदर जोडपं बरच काही सांगू पाहत आहे, बरच काही बोलू इच्छित आहेत.

‘ऊन सावली’ ह्या चित्रपट मध्ये प्रणय आणि आन्वीची प्रेमकथा आहे. प्रणयला लग्न करायचं नाही आणि दुसरीकडे अन्वीला लग्न करायचं नाही पण हे ती तिच्या आईला सांगू शकत नाही म्हणून ते दोघेही त्यांच्या पालकांच्या मनाचा विचार करता लग्नाला होकार देतात. आणि एक दिवस असा क्षण येतो जेव्हा आन्वी आणि प्रणय त्यांच्या कुटुंबियांसोबत एकमेकांना भेटतात. प्रणयला पहिल्या नजरेतच आन्वी आवडते. परंतु आन्वीचा विरोध हा कायम आहे. आज ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ च्या दिवशी ‘ऊन सावली’ ह्या चित्रपटाचे टायटल सॉंग नकुल देशमुख आणि श्रिया जैन ह्यांनी गायिले आहे व अल्ट्रा म्युजिक द्वारा लाँच करण्यात आले आहे. गाणे येताच प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. हे गाणे लोकांच्या मनात आणि मुखावर गुणगुणताना पाहायला मिळत आहे.

तिकीट विंडो पिक्चर्स बॅनर अंतर्गत समीर शेख द्वारा चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे .  चित्रपटाची कथा अभय वर्धन यांनी लिहिली आहे.  तसेच निर्देशन दिवाकर नाईक यांनी केले आहे. चित्रपटा मध्ये म्युजिक सार्थक नकुल यांनी संगीतबद्ध केले आहे. तसेच नकुल देशमुख आणि श्रिया जैन ह्यांनी हे गाणे गायिले आहे . अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे हे प्रमुख भूमिका साकारत आहेत. तसेच अजिंक्य ननवरे, राज सरनागत, अंकिता भोईर, विकास हांडे, श्वेता कामत, प्रिया तुळजापूरकर आणि मनाली निकम ह्याचा देखील समावेश आहे. हा चित्रपट १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिले गाणे एवढे हिट झाले आहे की चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. टीजर पाहिल्यावर नक्कीच ह्या दोघांमधील ऊन सावलीचा खेळ पाहण्याची लगबग प्रेक्षकां मध्ये पाहायला मिळणार आहे.

टीव्हीएस मोबिलिटी आणि मित्सुबिशी यांची भागीदारी भारतामध्ये पुरवणार इंटिग्रेटेड व्हेईकल मोबिलिटी सोल्युशन्स

टीव्हीएस व्हेईकल मोबिलिटी सोल्युशनमध्ये मित्सुबिशी सुरुवातीला ३०० कोटी रुपये गुंतवेल

नव्या वाहनांची विक्री, व्हेईकल-ऍज-अ-सर्व्हिस बिझनेस मॉडेल्स, ऑपरेटिंग सोल्युशन्स इत्यादी टीव्हीएस व्हेईकल मोबिलिटी सोल्युशन पुरवेल.

चेन्नई, १९ फेब्रुवारी २०२४:  टीव्हीएस मोबिलिटी (टी व्ही सुंदरम अयंगार अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडपासून वेगळी झालेली कंपनी) या भारतातील ऑटोमोटिव्ह डिस्ट्रिब्युशन आणि आफ्टरमार्केट उद्योगक्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीने भारतात सुट्या भागांचे उत्पादन आणि एकात्मिक आफ्टरमार्केट प्लॅटफॉर्म उभारला आहे. आज टीव्हीएस मोबिलिटीने तब्बल १७०० समूह कंपन्यांचे नेटवर्क असलेल्या, जागतिक पातळीवरील एकात्मिक व्यवसाय, जपानी उद्योगसमूह मित्सुबिशी कॉर्पोरेशनसोबत भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. भारतात सर्वसमावेशक व्हेईकल मोबिलिटी इकोसिस्टिम स्थापन करण्याच्या उद्देशाने ही भागीदारी करण्यात आली आहे.यामुळे टीव्हीएस मोबिलिटीचा डीलरशिप बिझनेस टीव्हीएस व्हेईकल मोबिलिटी सोल्युशन (टीव्हीएस व्हीएमएस) बनेल. आपल्या ग्राहकांना सेवांचा परिपूर्ण पोर्टफोलिओ प्रस्तुत करून हा व्यवसाय भारतीय ऑटोमोटिव्ह क्षेत्रात परिवर्तन घडवून आणेल. संबंधित नियामक अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा व्यवहार पूर्ण होईल.

सुरुवातीला मित्सुबिशी कॉर्पोरेशन ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. दोन्ही पक्ष या भागीदारीच्या वृद्धीला पाठिंबा देण्यासाठी बांधील राहतील. पॅसेंजर कार, कमर्शियल व्हेइकल्स आणि मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट (MHE) मधील वाहनांच्या मालकीसंदर्भातील दोन्ही पक्षांच्या व्हिजनला चालना देण्यासाठी ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. पुढील ३ ते ५ वर्षांमध्ये २ बिलियन डॉलर्सचा रेव्हेन्यू मिळवण्याची क्षमता या बिझनेस मॉडेलमध्ये असेल.

टीव्हीएस मोबिलिटीचे डायरेक्टर श्री आर दिनेश यांनी सांगितले, “टीव्हीएस मोबिलिटीने भारतात आपल्या डीलरशिप व्यवसायामार्फत वाहनांची विक्री, सेवा आणि वितरण यामध्ये आघाडी मिळवली. मित्सुबिशी कॉर्पोरेशनसबत भागीदारी टीव्हीएसला संपूर्ण व्हेईकल मोबिलिटी इकोसिस्टिमला विविध सेवा सुविधा पुरण्यासाठी सक्षम बनवेल.”

त्यांनी पुढे सांगितले, “स्वतंत्र आफ्टरमार्केटसाठी एकात्मिक आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स पुरवल्यानंतर व्हेईकल मोबिलिटी बिझनेस आमच्या सर्व व्यावसायिक, कॉर्पोरेट आणि फ्लीट मालक ग्राहकांना अभिनव व डिजिटली सक्षम सुविधा पुरवेल आणि वाहनांची विक्री, वाहनांचे संचालन व व्हेईकल-ऍज-अ-सर्व्हिस सॉल्युशन्समध्ये एकात्मिक सेवासुविधा पुरवण्यासाठी वाहन उत्पादकांसोबत आमच्या भागीदारीचा विस्तार करता येईल. सर्व हितधारकांना सेवासुविधा पुरवण्यासाठी इतर हितधारकांसोबत देखील ही भागीदारी काम करेल.”

या गुंतवणुकीबरोबरीनेच मित्सुबिशी कॉर्पोरेशनच्या जागतिक अनुभवाचा फायदा देखील या भागीदारीला मिळेल. बिझनेस मॉडेल अधिक वेगाने वृद्धिंगत व्हावे यासाठी मित्सुबिशी कॉर्पोरेशन आपल्या सर्वोत्तम प्रथा देखील यामध्ये शेयर करेल.

मित्सुबिशी कॉर्पोरेशनमध्ये ऑटोमोटिव्ह अँड मोबिलिटी ग्रुपचे सीईओ श्री शिगेरु वाकाबायाशी यांनी सांगितले, “नवीन ऑटोमोबाइल्ससाठी भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. २०२३ साली या बाजारपेठेत पाच मिलियन वाहने विकली गेली आणि येत्या काही वर्षात यामध्ये ६ ते ७ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. वेगाने वाढत असलेल्या भारतीय बाजारपेठेत विस्तार करण्यासाठी मित्सुबिशी कॉर्पोरेशन टीव्हीएस मोबिलिटी ग्रुपसोबत आपले संबंध अधिक दृढ करत असून, विक्रीपश्चात सेवा पुरवणाऱ्या टीव्हीएस ऑटोमोबाईल सोल्युशन्समध्ये गुंतवणूक देखील करणार आहे. मल्टी-ब्रँड डीलर टीव्हीएस व्हीएमएसमध्ये गुंतवणूक केल्याने मित्सुबिशी कॉर्पोरेशनचे गुंतवणूक कव्हरेज विस्तारेल, सेवा क्षमता अजून जास्त वाढतील. आमच्या सर्वसमावेशक मोबिलिटी सोल्युशन्समध्ये विक्रीपश्चात सेवा, मल्टी-ब्रँड विक्रीबरोबरीनेच व्हेईकल-ऍज-अ-सर्व्हिस मॉडेल आणि इतर ऑटोमोटिव्ह ऑपरेशन्सचा देखील समावेश करता येईल.”

सर्वसामान्य माणसांच्या स्वाभिमानासाठी शिवरायांकडून स्वराज्याची स्थापना

पुणे, दि. १९ फेब्रुवारी २०२४: छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्य स्थापनेची लढाई ही धर्म, सत्ताव संपत्तीसाठी नव्हती तर सर्वसामान्य माणसांच्या स्वाभिमानासाठी, माणूसकीच्या तत्त्वांसाठी होती. शिवरायांच्या स्वराज्याने समतेचा नवा आदर्श निर्माण केला. नैतिकता व चारित्र्याचे अधिष्ठान देत शिवरायांनी जातीधर्माऐवजी माणुसकीच्या मूल्यांवर स्वराज्याची स्थापना केली असे प्रतिपादन कवी व लेखक श्री. सतिश हानेगावे यांनी सोमवारी (दि. १९) केले.

महावितरण व महापारेषणच्या वतीने रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्य वक्ते म्हणून श्री. सतिश हानेगावे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार (महावितरण) व अनिल कोलप (महापारेषण) आणि महाव्यवस्थापक श्री. राजेंद्र गायकवाड (महापारेषण) यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात सर्व पाहुण्यांनी मनोगतामधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध कार्यासंबंधी माहीत दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. दादासाहेब पाडोळे तर सूत्रसंचालन श्री. बाबा शिंदे यांनी केले. श्री. सचिन राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महावितरण, महापारेषणमधील अभियंते, अधिकारी व सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आयोजनासाठी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

पुढील आदेशांपर्यंत शरद पवार गटाला मिळालेले नाव कायम ठेवा, 7 दिवसांत निवडणूक चिन्हही द्या

नवी दिल्ली-निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला दिलेले नाव पुढील आदेशांपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी शरद पवार गटाच्या याचिकेवर सुनावणी करताना दिले. त्यामुळे निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिलेले ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार’ हे नाव सुप्रीम कोर्टाच्या पुढील आदेशांपर्यंत कायम राहणार आहे. कोर्टाने निवडणूक आयोगाला पुढील 7 दिवसांत या गटाला निवडणूक चिन्ह देण्याचेही निर्देश दिलेत.सुप्रीम कोर्ट आदेशात पुढे म्हणाले की, शरद पवार गटाने चिन्हासाठी रितसर आयोगाकडे अर्ज करावा, आयोगाने मागणीनंतर त्यांना एक आठवड्यात चिन्हं द्यावे, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला दिले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवारांना देण्याविरोधात शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

शरद पवार गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी हे सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद करत आहेत. आता लगेच अधिवेशन आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला तात्पुरते नाव दिले आहे. काही दिवसात अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यानंतर निवडणुकांची तयारी सुरू होईल. त्यामुळे आम्ही नाव आणि चिन्हाशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे आम्हाला दिलेलं नाव कायम ठेवा आणि चिन्ह द्या, असा युक्तीवाद मनू सिंघवी यांनी केला.

शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून आजच्या सुनावणीत युक्तिवादावेळी विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. “मराठा आरक्षणासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन होतंय. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्हाला पक्षाचा प्रचार करण्यासाठी पत्रकांची छपाई करावी लागणार आहे. त्यानुसार आम्हाला तात्पुरत्या पक्षाचे नाव, चिन्हं देण्यात येईल ते निवडणुकीपुरता कायम देण्यात यावं, अशी मागणी यांनी कोर्टात केली. अजित पवार यांच्या गटाचा व्हीप शरद पवार यांच्या गटाला लागू होत नाही. आमची कोर्टाला विनंती आहे की नाव आणि पक्षाचे चिन्ह पुन्हा कायम स्वरुपासाठी देण्यात यावं”, अशी मागणी सिंघवी यांनी न्यायालयासमोर केली होती.

पवार गटाच्या मागणीवर बोलताना न्यायमूर्ती विश्वनाथन म्हणाले, मुकुल रोहतगी तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या (आयोगाच्या ) आदेशात काय लिहिलंय. दोन्ही गटांनी घटना पाळली नाही. कोणीही अपात्र ठरलं नाही. आयोगाचा निष्कर्ष काय आहे की तुम्ही दोघांनी घटना पाळली नाही. विभाजन वगळून विलीनीकरणाची तरतूद करण्यात आली, त्याचा उद्देश काय होता, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाच्या वकीलांना केला. तसेच त्यांना उत्तर सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. याशिवाय या प्रकरणाची पुढील सुनावणी आता तीन आठवड्यानंतर होईल, असंही कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

हिंदू धर्माबाबतची शिवरायांची प्रखर भूमिका आजही प्रेरणादायी

0

मुंबई, दि.१९: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी, विधीमंडळ सचिव-१ श्री जितेंद्र भोळे, मा. उपसभापती यांचे खाजगी सचिव श्री. रवींद्र खेबुडकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की,
छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगाला, देशाला, राज्याला स्वराज्याची अस्मिता निर्माण केली. त्यांची दूरदृष्टी, त्यांचे विचार, त्यांचे नियोजन, त्यांची कुटनीती, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी वापरलेले डावपेच आणि त्याच बरोबरीने हिंदू धर्माच्या संदर्भामध्ये त्यांची अत्यंत प्रखर भूमिका ही आजही प्रेरणादायी आहे.

उद्या २० फेब्रुवारी रोजी महत्त्वाचे अधिवेशन होणार आहे आणि पुन्हा २६ फेब्रुवारी ते १ मार्च पर्यंत पुढचं अधिवेशन आहे. या अधिवेशनात राज्याला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर चांगल्या प्रकारे तोडगा आणि उत्तर या विधिमंडळाचे इमारतीतून मिळण्याच्या दृष्टीने आशीर्वाद मिळावेत अशा प्रकारची प्रार्थना छत्रपती शिवाजी महाराजांकडे करून त्यांना कोटी कोटी वंदन अर्पण केले असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्न-टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली-पहा पुण्यातली गुंडागर्दी (व्हिडीओ)

पुणे-पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट रस्त्यावर वाहनांची तोडफोड करून एका महिलेला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या हल्ल्यात वर्षा दयाराम गायकवाड ही महिला सुदैवाने बचावली आहे. परंतु, त्यांच्या दुचाकी आणि कार या गाडीचे नुकसान झाले आहे. ही घटना पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खराडी परिसरात पार्किंगच्या वादातून झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी महेश राजे यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धिरज दिलीप सपाटे (वय 28, नं 1 लेन नं 1 तुकारामनगर खराडी), आकाश सोकीन सोदे (वय 23, रा चंदननगर), विशाल ससाने वय 20, रा. बीजेएस कॉलेज जवळ वाघोली) , नयत नितीन गायकवाड (वय १९, रा साईनाथनगर वडगाव) सुरज रविंद्र बोरुड़े (वय २३, रा उबाळेनगर), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. तर धिरज सपाटे हा फरार असून तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.

तक्रारदार महेश राजे व या प्रकरणातील आरोपी हे एकाच परीसरात राहण्यास आहे. त्यांच्यात मागील काही दिवसांपासून पार्किंग कारणातून वाद सुरू होते. 17 फेब्रुवारी रोजी हा वाद टोकाला गेला. यावेळी आरोपी आणि त्याच्या १३ साथीदारांनी दुचाकीवर येत तक्रारदार यांच्या कारच्या काचा लाकडी दांडक्याने फोडल्या. त्यानंतर आरोपीनी, त्यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून आग लावली. पेट्रोल चारचाकी गाडीवर पडल्याने गाडीने तात्काळ पेट घेतला. यामध्ये कारच्या गाडीचे सीट जळले.

यावेळी तक्रारदार यांच्या भाडेकरू वर्षा गायकवाड या घराबाहेर आल्या असत्या आरोपींनी त्यांच्यावर देखील पेट्रोल टाकून त्यांना जिवंत पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या घरात पळून गेल्याने थोडक्यात बचावल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सर्व आरोपींच्या हातात लाठ्या असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काहींनी तोंडाला रुमाल बांधला होता. आरोपींनी महिलेच्या घरासमोर उभ्या असलेल्या गाडीच्या काचा देखील फोडल्या. यानंतर आरोपी हे फरार झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.

शिवरायांना अभिप्रेत असलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी मोदी सरकारची गरज -काकडे

शिवजयंतीनिमित्त महाराजांना अभिवादन करून काकडेंनी लोकसभेचे फुंकले रणशिंग

पुणे- आज शहरात निघणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या विविध मिरवणुकीत सहभागी होत सर्वधर्मियांना आवाहन करत माजी खासदार संजय काकडे यांनी लोकसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले . शिवरायांना अपेक्षित असलेले स्वराज्य निर्मितीसाठी आणि रक्षणासाठी केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे हाथ बळकट करण्याची गरज असल्याचे त्यांनी वेगवेगळ्या ठीकांनी आपले विचार प्रगट करताना सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज हि महाराष्ट्राची अस्मिता आहे त्यांच्या सर्वधर्मीय सुराज्याचे आपण सैनिक बनू या असे ते म्हणाले.

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. यानिमित्त शहरात आज शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे या वेळी संजय काकडे यांनी लाल महल येथे राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्रिवार वंदन केले. यानिमित्त विविध मंडळांना भेटी देऊन महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. आणि नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कोल्हापूरचे युवराज मालोजीराजे, अमितराजे गायकवाड, माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, पुणे शहर भाजपाचे सरचिटणीस राहुल भंडारे, माजी नगरसेवक शंकर पवार व राजाभाऊ बराटे, उपाध्यक्ष तुषार पाटील, मंडळाचे अध्यक्ष अजिज शेख, विशाल पायगुडे, माजी नगरसेवक भरत निजामपूरकर, विष्णू हरिहर, विजय मरळ आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते

तंत्रज्ञानाच्या सकारात्मक वापराने समाज व देशाचे शोषणमुक्त सक्षमीकरण-ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाँलॉजीतर्फे ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
पुणे, ता. १९ : “भावी काळातील जागतिक नेतृत्व तंत्रज्ञानाच्या कुशल वापरातून पुढे येणार आहे. तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर केल्यास, समाज व देशाचे शोषणमुक्त सक्षमीकरण सहज शक्य आहे’, असे प्रतिपादन केंद्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी सोमवारी येथे केले. ‘तंत्रकुशल विद्यार्थ्यांनी तंत्रस्नेही युगात देशाच्या विकासप्रक्रियेत याच जाणीवेतून योगदान द्यावे’, असे आवाहनही डॉ. काकोडकर यांनी केले.

दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या (एआयटी) ३० व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून डॉ. काकोडकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. काॅलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगचे कमांडंट लेफ्टनंट जनरल ए. के. रमेश यांच्या हस्ते डॉ. काकोडकर यांना गौरवण्यात आले. प्रसंगी एआयटीचे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) अभय भट, एआयटीचे अध्यक्ष मेजर जनरल टी. एस. बेन्स, सहसंचालक कर्नल एम. के. प्रसाद, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शिवजयंतीचे औचित्य साधून शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, तसेच सरस्वतीपूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.
संस्थेचे माजी विद्यार्थी अंकुश तिवारी यांचा ‘यशस्वी युवा उद्योजक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. लेफ्ट. जनरल ए. के. रमेश यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. चीफ ऑफ आर्मी स्टाफ अष्टपैलू विद्यार्थ्यांसाठीचा फिरता करंडक भावना निमगडा हिला देण्यात आला. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी क्रीडा पुरस्कार जी. राजशेखर स्मृतीचिन्ह क्रीडापटू विक्रांत कुमार यांना देण्यात आले. चारही शाखेतील उत्कृष्ट विद्यार्थिनींना ‘जिओसी-इन-सी’ पारितोषिक देण्यात आले. डॉ. अश्विनी सपकाळ (सर्वोत्कृष्ट शिक्षक), प्रो. सीता यादव (सर्वोत्कृष्ट संशोधक), प्रवीण सांगळे (सर्वोत्कृष्ट टेक्निकल स्टाफ) आणि सी. नागराज रेड्डी (सर्वोत्कृष्ट प्रशासकीय कर्मचारी) यांचाही सन्मान करण्यात आला. विविध शिष्यवृत्तीचे वितरण यावेळी करण्यात आले.
डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, “आधुनिक काळात जागतिक स्तरावरील नेतृत्वाची तंत्रज्ञान हीच गुरुकिल्ली आहे. मर्यादित साधनस्रोतांमध्ये, कमी खर्चात आपण विकसित केलेले रिफ्लेक्टर्स हे तंत्रज्ञानाच्या सकारात्मक वापराचे उत्तम उदाहरण आहे. युरेनियमची कमतरता असूनही आपण अणुक्षेत्रात घेतलेली भरारी मूळ तंत्रज्ञानाच्या कुशल वापरामुळे शक्य झाली. अणुतंत्रज्ञान हे केवळ लष्करी सामर्थ्याशी न जोडता, ते समाजाच्या हितासाठीच्या सुविधांच्या निर्मितीशी जोडण्यात आपण यशस्वी झालो आहोत, हे लक्षात घेत तरुणाईने आपल्या तंत्रकुशलतेचा देशाच्या विकासासाठी विनियोग केला पाहिजे.”

लेफ्टनंट जनरल ए. के. रमेश म्हणाले, “विकासाच्या वाटेवर गतीने जाणाऱ्या आपल्या देशासाठी तंत्रज्ञान आणि नवकल्पना यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. जागतिक स्तरावरील वास्तव तंत्रज्ञानाचे महत्त्व सातत्याने वाढणार असल्याचे स्पष्ट करत आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत तंत्रज्ञानाचे प्राबल्य असणार आहे. शाश्वत विकासाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी आपली तंत्रकुशलता घेऊन वाटा उचलण्याच्या असंख्य संधी आहेत. नव्या जगात कौशल्ये, तंत्रस्नेही वावर आणि शहाणपण, यांच्या एकत्रीकरणातून ज्ञानाचे मार्ग निर्माण होणार आहेत.”

ब्रिगेडियर (निवृत्त) अभय भट यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे सादरीकरण केले. ऑटोमेशन आणि रोबोटिक्सचा अभ्यासक्रम लवकरच सुरू करत असल्याचे ते म्हणाले. संस्था स्वायत्ततेच्या दिशेने जात असून, प्लेसमेंटचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
१९९९ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रणव बैरागी यांनी मनोगत मांडले. मेजर जनरल टी. एस. बेन्स यांनी आभार मानले. दीक्षा सिंग आणि अनिकेत डिगोळे यांनी सूत्रसंचालन केले.

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात शिवजयंती जल्लोषात

पुणेः सनई-चौघड्यांच्या मंजुळ स्वर, तुतारीच्या गगनभेदी गर्जना, ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, मर्दानी खेळ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’ ‘जय भवानी, जय शिवराय!’ घोषणांचा जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणात येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२वी जयंती साजरी करण्यात आली. 
विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे प्रतिक असणारा भगवा ध्वज फडकावून जयंती उत्सवास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी एमआयटी ‘मिटकाॅम’च्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, परीक्षा विभाग संचालक डाॅ.ज्ञानदेव निलवर्ण, डाॅ.विरेंद्र शेटे, डाॅ.अतुल पाटील, डाॅ.अंजली भोईटे, डाॅ.सुराज भोयार यादी उपस्थित होते.    याप्रसंगी, लोणी-काळभोर व कदमवाक वस्ती ग्रामपंचायत येथील नागरिक, ‘एमआयटी-एडीटी’चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि शेकडो विद्यार्थ्यांच्या समोर विद्यार्थी अभिमन्यू पाटीलने शिवरायांवरील कविता व राजेश्वरी निंबाळकरने पाहाडी आवाजात केलेले भाषण व जयपाल यादव यांच्या शिवगर्जनेमुळे उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक नृत्य व मैदानी खेळांची प्रात्याक्षिके देखील दाखवण्यात आली. शिवरायांची पालखीसह मिरवणूक व त्यानंतर अश्वारूढी पुतळ्याला क्रेनद्वारे पुश्वहार अर्पण केल्यानंतर महाराजांची आरती करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.         यावेळी बोलताना, प्रा.डाॅ.कराड म्हणाले की, माझ्या ऑफिस मध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजीराजांच्या मूर्ती पुढे नतमस्तक होऊन दिनक्रम सुरू करतो. कारण छत्रपती शिवराय हे उर्जेचा प्रचंड मोठा स्त्रोत आहेत. आयुष्यात कितीही मोठ्या समस्या, संकटे आली तरी शिवचरित्र वाचल्यास त्यावर मार्ग सापडतो. त्यामुळे शिवराय आपल्यातच आहेत व ते आज ३९२ वर्षांचे झाले असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे शिवछत्रपतींचे गुण आत्मसात करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करणे हीच खरी शिवजयंती असेल, असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.  
रक्तदान शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद-शिवजयंतीच्या पार्श्वभूमिवर विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर व ऐतिहासिक शस्त्रास्त्र प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्फुर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान शिबिरात तब्बल २५० दात्यांनी रक्तदान केल्याने हे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले. विद्यापीठाच्या नवीन आयटी इमारतीच्या प्रवेशद्वारावर या दोन्ही उपक्रमांचे आयोजन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन ‘एमआयटी-मिटकाॅम’च्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, लोणी-काळभोर पोलिस स्टेशनचे पीआय शशिकांत चव्हाण, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘एमआयटी-एडीटी’च्या विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिरासारखे सामाजिक उपक्रम राबवून शिवजयंती साजरी केल्याने परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

शिवजन्मोत्सव सोहळ्यात साजरा झाला ‘पाळणा बाळ शिवरायांचा’ 

पुणे : पहिल्या दिवशी राज दरबारी, आला वंशाला असाखे तरी, बाळ शिवाजी पहिल्या अवतारी, जो बाळा जो जो रे जो…पासून ते बाराव्या दिवशी बोलवा माळी, केली आरस लावून केळी, नाव शिवाजी ऐका मंडळी, जो बाळा जो जो रे जो… असे पाळण्याचे स्वर जय गणेश प्रांगण येथे पारंपरिक वेशातील महिलांच्या उपस्थितीत निनादले. जय भवानी, जय शिवाजी च्या जयघोषात फुलांनी सजविलेल्या पाळण्यात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात पार पडला. 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शिवजयंती निमित्त आयोजित शिवमहोत्सव कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोरील जय गणेश प्रांगण येथे आयोजित करण्यात आला होता. उत्सवाचे आयोजन सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, अमोल चव्हाण, सचिन आखाडे, तुषार रायकर यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले. 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून पारंपरिक वेशात हातात भगवे झेंडे घेऊन महिला जय गणेश प्रांगण येथे छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा घोषणा देत आल्या. त्यानंतर बाळ शिवरायांचा पाळणा म्हणत महिलांनी शिवजन्मोत्सव साजरा केला. तसेच, यावेळी महिलांनी पोवाडा सादरीकरण देखील केले. 
चार दिवसीय महोत्सवात शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान, मंदार परळीकर यांचा अमर आग सांगीतिक कार्यक्रम, लेखक केतन पुरी यांचे व्याख्यान आणि मयूर थिएटर्स निर्मित नितीन सूर्याजीराव मोरे प्रस्तुत शिवराज्याभिषेक सोहळा हे ५० कलाकारांसहित भव्य नाटक आयोजित करण्यात आले होते. पुणेकरांनी मोठया संख्येने या महोत्सवात सहभाग घेतला.

‘धन्यवाद देवेंद्रजी’ उद्या भगतसिंग मैदानात कार्यक्रम

0

मुंबई -वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या म्हाडा, एसआरएतील गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सुटल्या. त्यामुळे मुंबईकरांतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘धन्यवाद देवेंद्रजी’ हा कार्यक्रम उद्या दिनांक २० रोजी शहीद भगतसिंग मैदान, अभ्यूदय नगर, काळाचौकी, मुंबई येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिवसेना नेते राहुल शेवाळे, मनसे नेते बाळा नांदगावकर, खासदार मनोज कोटक, खा. गोपाळ शेट्टी, खा. पूनम महाजन, खा. गजानन कीर्तिकर, आ. प्रविण दरेकर, भाजपा मुंबई प्रभारी आ. अतुल भातखळकर, आ. सुनील राणे, आ. योगेश सागर, आ. अमित साटम, आ. कालिदास कोळंबकर, आ. तमील सेल्वन, आ. यामिनी यशवंत जाधव, आ. सदा सरवणकर, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, आमदार प्रसाद लाड, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, भाजपा मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय, जिल्हा अध्यक्ष शरद चिंतनकर, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, अभ्यूदय नगर सह.गृह.संस्थेचे अध्यक्ष दिलीप शिंदे, अभ्यूदय नगर सह.गृह.संस्थेचे उपाध्यक्ष विलास सावंत, अभ्यूदय नगर सह. गृह. संस्थेचे सचिव तुकाराम रासम, मुंबई भाजपा सहकार आघाडीचे अध्यक्ष सुनील बांबूळकर, यांसह मुंबईतील आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत.

नमो चषक जिल्हास्तरीय शिवकालीन युद्धकला ( सिलंबम ) स्पर्धा संपन्न

मुलांमध्ये डी. इ. एस शाळा तर मुलींमध्ये स्काऊट ग्राउंड प्रशिक्षण केंद्राने पटकाविला प्रथम क्रमांक

पुणे- शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आयोजित नमो चषक शिवकालीन युद्ध कला ( सिलंबम ) स्पर्धा उत्साहात आणि 900 ( नऊ शे ) स्पर्धकांच्या प्रचंड प्रतिसादात पार पडल्याचे स्पर्धा संयोजक व भाजयुमो क्रीडा आघाडीचे पुणे शहर प्रमुख प्रतीक खर्डेकर यांनी सांगितले.
मुलांना क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन ह्या खेळांचे आकर्षण आहे पण त्याचबरोबर आपल्या मातीतील खेळ ही त्यांनी खेळले पाहिजेत यासाठी अश्या स्पर्धाचे आयोजन केले असल्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या संदेशात म्हंटले आहे.ह्या कला मुलांचे शारीरिक आणि मानसिक बल वाढविण्यासाठी उपयुक्त असल्याचे ही मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. विविध शाळांमध्ये विशेषतः विद्यार्थिनींना ही कला शिकविण्याच्या प्रस्तावावर त्यांनी आपल्या संदेशात सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे प्रतीक खर्डेकर म्हणाले.
शिवकालीन युद्धकलेत लाठी काठी, दांडपट्टा, भाला, तलवारबाजी इ कलाप्रकारांचा समावेश असल्याचे “सिलंबम असोसिएशन पुणे” चे सरचिटणीस श्री.कुंडलिक कचाले व कार्याध्यक्ष योगेश कंठाळे यांनी सांगितले. स्पर्धेचे उदघाट्न भाजयुमोचे शहर अध्यक्ष करण मिसाळ,भाजपा चे कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला,सरचिटणीस मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरूड मंडल सरचिटणीस विठ्ठल बराटे,अनुराधा एडके, गिरीश खत्री,दीपक पवार,माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील,जयंत भावे,नवनाथ जाधव, गिरीश भेलके,अमोल डांगे, राज तांबोळी,कुणाल तोंडे, सागर भोसले इ मान्यवर उपस्थित होते.
दिवसभर रंगलेल्या स्पर्धेत पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी उत्साहाने आणि खेळ भावना जपत भाग घेतला.
स्पर्धेचे सांघिक निकाल खालीलप्रमाणे…
स्पर्धेचे सांघिक निकाल खालीलप्रमाणे…
1.. मुलांमध्ये प्रथम क्रमांक डी .ई. एस. स्कुल टिळक रोड.
2 .मुलांमध्ये द्वितीय क्रमांक वनाज परिवार विद्यामंदिर कोथरूड.
3.. मुलांमध्ये तृतीय क्रमांक पंडितराव आगाशे स्कूल लॉ कॉलेज रोड

1… मुलींमध्ये प्रथम क्रमांक स्काऊट ग्राउंड सिलंबम पुणे मुख्य प्रशिक्षण केंद्र सदाशिव पेठ.
2… मुलींमध्ये द्वितीय क्रमांक ‌माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालय टिळक रोड.
3…. मुलींमध्ये तृतीय क्रमांक ज्ञानसाधना विद्यामंदिर वडगाव( बुद्रुक).
19 वर्षावरील मुलांच्या खुल्या स्पर्धेत प्रणिस गायकवाड याने प्रथम क्रमांक, शक्तीप्रसाद पात्रा याने द्वितीय क्रमांक तर ओम संगपुल्लम याने तृतीय क्रमांक मिळविला. तर 19 वर्षावरील मुलींच्या खुल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक समृद्धी चिल्लाळ, द्वितीय क्रमांक संतोषी कोत्तावार,तृतीय क्रमांक स्नेहा चौधरी यांनी मिळविला.
14 ते 17 वयोगटात मुलांमध्ये प्रथम क्रमांक शंतनू उभे, द्वितीय क्रमांक सोमेश्वर बरडे आणि तृतीय क्रमांक प्रणव पांढरे यांनी मिळविला. तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक प्रतीक्षा कांबळे, द्वितीय क्रमांक अवंती सकुंडे आणि तृतीय क्रमांक अवंती निजामपूरकर यांनी मिळविला.
14 वर्षाखालील वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवम पोटे,द्वितीय क्रमांक विहान निकम तर तृतीय क्रमांक वेदांत अंकले यांनी मिळविला तर मुलींच्या स्पर्धेत पहिला क्रमांक ईश्वरी भोकरे,द्वितीय क्रमांक सई साळुंके तर तृतीय क्रमांक प्रांजल कापसे यांनी मिळविला.

पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून शहर उपाध्यक्ष शाम देशपांडे, कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला,प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर,माजी नगरसेवक दीपक पोटे, मंडल सरचिटणीस व महिला मोर्चा प्रभारी मंजुश्री खर्डेकर,दिनेश माथवड,माजी नगरसेविका वासंती जाधव,नवनाथ जाधव,कामगार आघाडी राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब टेमकर,महिला आघाडी अध्यक्ष कांचन कुंबरे, सरचिटणीस सौ.विद्या टेमकर,युवा मोर्चा उपाध्यक्ष जयेश सरनौबत,महिला मोर्चा उपाध्यक्ष कल्याणी खर्डेकर,समीर गाडगीळ,रुपेश कुंबरे,यश काळभोर इ मान्यवर उपस्थित होते.प्रतीक खर्डेकर यांनी स्पर्धा संयोजन व सूत्रसंचालन केले तर कुंडलिक कचाले व योगेश कंठाळे यांनी संयोजनात सहाय्य केले.

महिंद्रातर्फे बोलेरो MaXX पिक-अप रेंजच्या नवीन प्रकाराचे अनावरण : एसी सह उंचावला ड्रायव्हिंगचा अनुभव

मुंबई, १९ फेब्रुवारी २०२४: भारतातील स्मॉल कमर्शियल व्हेइकल्स (SCVs) (छोटी व्यावसायिक वाहने) च्या बाजारपेठेतील अग्रणी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (M&M) ने बोलेरो MaXX पिक-अप रेंजचा नवीन प्रकार सादर करत असल्याची घोषणा अभिमानाने केली. एअर कंडिशनिंगचा समावेश आणि iMaxx ॲपवर 14 नवीन वैशिष्ट्ये या नव्या गोष्टींची भर घालून ग्राहकांना वाढीव सोयीसुविधा देण्याचा उद्देश आहे.

आपल्या कॉम्पॅक्ट आणि अष्टपैलू डिझाइनद्वारे वैशिष्ट्यीकृत बोलेरो MaXX पिक-अप रेंजने पेलोड क्षमता, इंधन कार्यक्षमता, सुरक्षितता आणि एकूण ड्रायव्हिंग अनुभव यामध्ये अभूतपूर्व मानके सेट   केली आहेत. ही गाडी सादर झाल्यापासूनच बोलेरो MaXX  रेंजने  महत्त्वपूर्ण टप्पे नोंदवले आहेत. व्यावसायिक लोड विभागात विक्रमी वेळेत १ लाख उत्पादनाचा टप्पा गाठताना १.४ लाख हून अधिक युनिट्सची विक्री करत एक नवीन मापदंड प्रस्थापित केला आहे. जोडीला, एकाच दिवसात सर्वाधिक युनिट्सची विक्री करून प्रतिष्ठित इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये उल्लेखनीय स्थान मिळवले आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नलिनीकांत गोल्लागुंटा म्हणाले, “असाधारण कामगिरी आणि अष्टपैलुत्व यासाठी प्रसिद्ध असलेल्या बोलेरो MaXX पिक-अप रेंजने आमच्या मौल्यवान ग्राहकांकडून प्रचंड प्रशंसा मिळवली आहे. तिची मजबूत बांधणी, प्रभावी पेलोड क्षमता आणि अतुलनीय विश्वासार्हता यांनी बोलेरो MaXX पिक-अपला व्यवसाय आणि वैयक्तिक पातळीवर एक विश्वासू साथीदार बनवले आहे. नवीन प्रकारांमध्ये एअर कंडिशनिंगची जोड म्हणजे ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या आमच्या बांधिलकीची पुष्टी करत त्यांच्या सोय आणि आरामासाठी सुरू असलेल्या आमच्या प्रयत्नांची पुष्टी आहे.”

कामगिरी आणि आराम

डिझेल आणि CNG पर्याय सादर करणाऱ्या महिंद्राच्या प्रगत m2Di इंजिनद्वारे समर्थित बोलेरो MaXX पिक-अप रेंज 52.2kW/200Nm ते 59.7kW/220Nm पर्यंत पॉवर आणि टॉर्क नोड्ससह जबरदस्त डिझाइन सादर करते. पेलोड क्षमता 1.3t ते 2t पर्यंत असून 3050 mm पर्यंत कार्गो बेडची लांबी आहे. या गोष्टी मालवाहतुकीसाठी अतुलनीय क्षमता सुनिश्चित करतात. CMVR-प्रमाणित D+2 आसन, उंची-ॲडजस्ट करता येणारी ड्रायव्हर सीट, टर्न-सेफ लॅम्प आणि शहर आणि महामार्ग दोन्हीवर चालवण्यासाठी योग्य रीडिझाइन केलेले अंतर्गत आणि बाह्य भाग यासारख्या वैशिष्ट्यांनी युक्त, बोलेरो MaXX पिक-अप रेंज आराम आणि कार्यक्षमतेला प्राधान्य देते. सर्व प्रवासादरम्यान अधिकाधिक आराम मिळवून देत हीटर आणि डेमिस्टरसह समग्र एअर कंडिशनिंगचा समावेश केल्याने ड्रायव्हिंगचा अनुभव आणखी उंचावतो. एसीच्या सुविधेसह शहराच्या रहदारीतून प्रवास करणे किंवा महामार्गावरुन जाणे हा आनंददायी अनुभव ठरतो. त्यामुळे बोलेरो MaXX पिक-अप रेंज अधिक आरामशीर प्रवास हवा असलेल्या ग्राहकांसाठी आदर्श पर्याय बनते.

वैशिष्ट्ये आणि iMAXX

बोलेरो MaXX च्या सुरुवातीच्या सादरीकरणानंतर नवीनतम iMAXX अपडेट वाहन व्यवस्थापन प्रणालीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी १४ नवीन वैशिष्ट्ये सादर करते. महत्त्वाच्या सुधारणामध्ये निश्चित पोहोच साठी जिओफेन्स-आधारित मोहीम आणि सुव्यवस्थित कार्यवाहीसाठी ड्रायव्हर कम ओनर वैशिष्ट्य समाविष्ट आहे. जोडीला माय MaXX स्कोअर ड्रायव्हर्ससाठी मौल्यवान कामगिरीची माहिती देते, तर फ्लीट व्यवस्थापक समर्पित प्रोफाइलद्वारे सुधारित नियंत्रण मिळवतात.

शिवाय, सिस्टीममधील नवीन अॅलर्ट वाहनांची सुरक्षा आणि कार्यक्षमता या दोन्हींना प्राधान्य देतात. त्यामध्ये जोरदार अॅक्सीलरेशन, अचानक ब्रेक लावणे, तीक्ष्ण कॉर्नरिंग आणि इंधन चोरी शोधणे या सूचनांचा समावेश आहे. या वैशिष्ट्यांमुळे केवळ सुरक्षितता वाढत नाही तर देखभाल खर्च कमी होतो आणि एकूण कार्यक्षमता सुधारते.

जोडीला iMAXX वैशिष्ट्याने 30,000 हून अधिक iMAXX वाहने तैनात करून बाजारपेठेवर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. फास्टॅग इंटिग्रेशन आणि खर्च व्यवस्थापन यांसारखी सतत अपडेट्स, वापरकर्त्यांचा सहभाग वाढवतात आणि ॲपचा दीर्घकाळ वापर करतात. त्यामुळे फ्लीट व्यवस्थापनासाठी आवश्यक साधन म्हणून त्याचे स्थान आणखी मजबूत होते.

किंमतीचे तपशील (एक्स-शोरूम) खालीलप्रमाणे:

 CityHD
 1.31.4/1.51.31.71.7L2.0L
SXi8.4910.40
VXi8.628.9210.2710.3311.22

महेंद्र गायकवाड ठरला सेनाकेसरी 2024, पृथ्वीराज मोहोळवर मात करीत कोरले चांदीच्या गदेवर नाव

पुणे-महेंद्र गायकवाड हा मानाच्या राज्यस्तरीय सेना केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरला आहे. पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड या मोठ्या कुस्तीपटूंमध्ये ही अत्यंत अटीतटीची स्पर्धा रंगली. महेंद्र गायकवाड याने पृथ्वीराज मोहोळवर चुरशीची एकतर्फी मात देऊन मानाचा ‘सेना केसरी 2024 किताब’ पहिल्यांदाच पटकावला आहे. अत्यंत कडव्या झालेल्या लढतीत गायकवाड याने मोहोळला धूळ चारत बुलेटसह मानाची गदा पटकावली.

हडपसरच्या हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडांगणावर या स्पर्धा पार पडल्या. राज्यातील जवळपास 600 पैलवानांनी यात सहभाग घेतला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शिवसेना शहरप्रमुख यांनी या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते,महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या मान्यतेने या भव्य स्पर्धा पडल्या.
शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद आ.भरतशेठ गोगावले, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना उपनेते इरफान सय्यद शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, बाळासाहेब तात्या भानगिरे व मान्यवरांच्या हस्ते पुण्याचा विजयी पैलवान महेंद्र गायकवाड याला पाच लक्ष रोख इनामासह, सेनाकेसरी किताब, सुपर बुलेट गाडी आणि मानाची चांदीची गदा बहाल करण्यात आली. तर सोबतच उपविजेता मल्ल पृथ्वीराज मोहोळ याला तीन लक्ष रोख, उपसेनाकेसरी किताब देवून गौरविण्यात आले.
महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झालेल्या मातीवरील निकाली कुस्तीत महेंद्रने प्रतिस्पर्धी पृथ्वीराज या मल्लावर मात करत सेना केसरीचा किताब आपल्या नावावर केला. पृथ्वीराज मोहोळच्या उजव्या पायाला जोरात झटका बसला तरीही तो मोठ्या जोशात ही कुस्ती खेळला.
यावेळी जिल्हाप्रमुख रमेश बाप्पू कोंडे, युवा सेना राज्य सचिव किरण साळी, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे, युवासेना शहरप्रमुख निलेश गिरमे, महिला आघाडी शहर प्रमुख पूजा रावेतकर, शहर संघटक श्रीकांत पुजारी,लक्ष्मण आरडे, सुनिल जाधव, राजाभाऊ भिलारे,संतोष राजपूत, अभिजीत बोराटे, नाना तरवडे,राजेंद्र भानगिरे,अभिमन्यू भानगिरे, उपमहाराष्ट्र केसरी अशोक माने, करण भानगिरे, प्रज्वल भानगिरे, आकाश भानगिरे अमर घुले, विकी माने, दिपक कुलाळ, नितीन लगस व असंख्य शिवसैनिक, कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते