Home Blog Page 1200

राजेंद्र पवार व उज्ज्वला पवार यांना  ‘आदर्श मातापिता पुरस्कार’ प्रदान

पुणे, दि. २० फेब्रुवारी २०२४:महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार व सौ. उज्ज्वला पवार यांना सोमवारी (दि. १९) ज्येष्ठ नेते खासदार श्री. शरद पवार यांच्याहस्ते ‘आदर्श मातापिता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, आमदार श्री. रवींद्र धंगेकर, अ. भा. शिवमहोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष विकास पासलकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

       अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीकडून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवाजीनगर येथील ‘एआयएसएसएमएस’ शिक्षण संस्थेच्या प्रांगणात शिवमहोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला. समाजात आदर्शवत काम करणाऱ्या व नवीन पिढीला घडविणाऱ्या दाम्पत्यांना ‘आदर्श मातापिता पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. या पुरस्कारासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार व सौ. उज्ज्वला पवार यांची निवड करण्यात आली. या दाम्पत्याचा ज्येष्ठ नेते खासदार श्री. शरद पवार यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला विराज तावरे, प्रशांत धुमाळ, सतीश शेलार, उद्योजक प्रतिक राजेंद्र पवार आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

अबब पुण्यात तब्ब्ल 1100 कोटीचे ड्रग्ज जप्त..देशातील मोठी कारवाई..पुण्यात खळबळ

पुणे-पुणे पोलिसांनी तब्बल ११०० कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहेत. दौंड येथील कुरकुंभ औद्योगिक परिसरात अर्थ केम लॅबोरेटरी या एमडी अमली पदार्थ बनवणाऱ्या कंपनीवर,आणि विश्रांतवाडी च्या २ गोडाऊन वर पुणे पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाई मध्ये तब्बल ११०० कोटी रुपयांचे ६०० किलो एमडी अमली पदार्थ जप्त केल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. यावेळी सहपोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे उपस्थित होते.ड्रग्जच्या या गोरख धंद्यात राजकीय सहभाग नसल्याचा दावा पोलिसांनी केला असून एवढ्या मोठ्या प्रमाणात पुण्यात ड्रग्जचा साठा सापडल्याने शिक्षणाचे माहेरघर सांकृतिक राजधानी म्हणविल्या जाणाऱ्या पुण्यातील या धंद्याची पाळेमुळे कुठवर रुजली असतील याचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही . या ड्रग्जचा व्यापार त्यात अडकलेले एजंट, विक्रेते यांच्या पर्यंत पोहोचून हा व्यापार पोलिसांना आता समूळ नष्ट करावा लागणार आहे.

याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी कारवाई करत सुरुवातीला चार कोटींचे ड्रग जप्त केले होते .त्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास सुरू करत विश्रांतवाडी येथे दोन गोदामांवर छापा टाकला.यामध्ये मिठाच्या गोदामात लपवून ठेवलेले 55 किलो एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर युद्ध पातळीवर तपास करत कुरकुंभ एम आयडीसीमधील एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कंपनीवर छापा टाकण्यात आला. येथे ५५० किलोच्यावर MDजप्त करण्यात आले आहे. यानंतर ही कंपनी अनिल साबळे नावाच्या व्यक्तीची असून त्याला याप्रकरणी ताब्यात घेण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कटाचा आणि विविध परदेशी व्यक्तींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात रासायनिक तज्ञ देखील सहभागी असून त्याला ताब्यात घेण्यात आलेली आहे. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे. अंमली पदार्थांचा तरुण पिढीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्यामुळे ते रोखण्यासाठी पुणे पोलिस प्रयत्न करत आहे. या प्रकरणात आणखी अमली पदार्थ मिळून येण्याची शक्यता असून इतर ठिकाणी आरोपींनी कारखाने सुरू केले आहेत का यात देखील चौकशी करण्यात येत आहे.

बारावीची लेखी परीक्षा उद्यापासून….परीक्षेसाठी एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी केली नोंदणी…

पुणे:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी ची लेखी परीक्षा उद्यापासून म्हणजेच २१ फेब्रुवारी ते मंगळवार १९ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.या परीक्षेसाठी एकूण १५,१३,९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये ८,२१,४५० विद्यार्थी व ६,९२,४२४ विद्यार्थीनी आहेत. एकूण १०४९७ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याध्यर्थ्यांसाठी ३३२० मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

उद्यापासून सुरु होणाऱ्या लेखी परीक्षेच्यासाठी विज्ञान शाखेतून 7,60,046 तर कला शाखेतून 3,81,982 विद्यार्थी तसेच वाणिज्य शाखेसाठी 3,29,905 विद्यार्थी आणि किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमासाठी 37,226 आणि आयटीआय साठी 4,750 म्हणजेच एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये

फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (३.१२ वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्यात आलेली असून सरल डेटावरुन कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती घेऊन आवेदनपत्रे ऑनलाईन भरलेली आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी २० फेब्रुवारी पर्यंत आवेदनपत्रे स्विकारण्यात आलेली आहेत.

विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून परीक्षेदरम्यान महत्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. मंडळामार्फत प्रसिध्द व छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे, अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये.

फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (३.१२ वी) परीक्षेचे वेळापत्रक २ नोव्हेंबर रोजी मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले आहे.

परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय स्तरावर मंडळामध्ये जिल्हानिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच राज्य मंडळ व ९ विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक (रनर) परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. तसेच त्यांनी परिरक्षण केंद्रावरून गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंत व वितरीत करेपर्यंतचे चित्रीकरण मोर्बाइलमध्ये करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करण्याकरिता व उत्तरपत्रिका आणण्याकरिता नेमण्यात आलेल्या सहाय्यक परिरक्षक (रनर) यांनी जीपीएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक करण्यात आलेले आहे.

सर्व परीक्षाध्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रातही (Hall Ticket) नमूद करण्यात आलेले आहे. सकाळ च्या सत्रात स. १०.३० वाजता व दुपारच्या सत्रात दु. २.३० वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळ सत्रात
स.११.०० वाजता तसेच दुपार सत्रात दु. ३.०० वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल

गतवर्षीप्रमाणेच फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेसाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आलेली आहे.

लेखी परीक्षेपूर्वी गैरमार्ग प्रकरणी विद्याथ्यांसमोर शिक्षा सूचीचे तसेच उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस असलेल्या सूचनांचे वाचन करणेबाबत सर्व उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळामार्फत सूचित करण्यात आलेले आहे.

परीक्षेस प्रविष्ट होणान्या पात्र दिव्यांग विद्याथ्यांना दिनांक १६/१०/२०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार गणित, पुस्तपालन व लेखाकर्म, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांच्या परीक्षांसाठी कॅलक्युलेटर वापरण्यास परवानगी देण्यात येत आहे. विद्यार्थ्याने कॅलक्युलेटर स्वतःचा आणायचं आहे. कॅलक्युलेटर फक्त कॅलक्युलेटर स्वरूपातीलच असावा. मोबाईल मधील अथवा इतर इलेक्ट्रॉनिक्स साधनांमधील कॅलक्युलेटर वापरता येणार नाही.

संपूर्ण राज्यासाठी एक नियोजनबध्द व सर्व घटक समावेशक असा ‘गैरमार्गाशी लढा’ या अभियानाचा कृति कार्यक्रम या वर्षी देखील मंडळाने राबविण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात एकसूत्रीपणा हे तत्व विचारात घेवून याबाबत नियोजन करण्यात आले आहे व त्यानुसार स्थानिक दक्षता समिती व केंद्रस्तर सभा, पालकसभा, विद्याथ्यांचे उद्‌बोधन, इ.द्वारे या अभियानाचा कृति कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. त्यामुळे परीक्षेशी संबंधित घटकांच्या विशिष्ट वैचारिक मनोवृत्तीमध्ये सकारात्मक बदल होण्यास व परीक्षेतील गैरप्रकार कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा यादृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक जिल्हयामध्ये मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत असून काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्यावाचत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे. तसेच मंडळ सदस्य आणि शासकीय अधिकारी यांना परीक्षा केंद्राना आकस्मिक भेटी देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

१तसेच प्रात्यक्षिक परीक्षा सुरळीत व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक व योजना), सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विस्तार अधिकारी यांना प्रात्यक्षिक परीक्षा काळात कमीत कमी १० उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी देणेबाबत सूचित करण्यात आले आहे.

सर्व विभागीय आयुक्तांना तसेच जिल्हाधिकारी यांना अर्धशासकीय पत्र पाठवून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व अधिक जबाबदार भावी पिढी निर्माण व्हावी याकरीता व परीक्षा पध्दतीवरील विश्वास व आदर वृध्दींगत होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांच्या मदतीने ‘गैरमार्गविरूध्द लढा’ हे अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन केले आहे.

परीक्षांच्या कालावधीत गैरमार्गास आळा घालण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकांच्या भेटीचे नियोजन विभागीय मंडळ स्तरावरून करण्यात येणार असून ज्या त्या पेपरच्या दिवशी सकाळी संबधित भरारी पथकांना नियोजन देण्यात येईल.

प्रचलित पध्द्‌तीप्रमाणे ‘माहिती तंत्रज्ञान’ या विषयाची परीक्षा ऑनलाईन पध्द‌तीने घेतली जाणार असून या विषयासाठी एकूण १,९४,४३९ विद्याथ्यांनी नोंदणी केली असून सदर विद्यार्थी २०६१ केंद्रावरून परीक्षेस प्रत्रिष्ट होणार आहेत. तसेच ‘सामान्यज्ञान’ या विषयाची परीक्षा ऑनलाईन होत असून या विषयासाठी एकूण १,९७४ विद्याथ्यांनी नोंदणी केलेली असून ४० केंद्रांवरून विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ होणार आहेत.

उपरोक्त बाबी वेळोवेळी सर्व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत विच्चाच्यांना कळविण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. विद्याध्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधावा, विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांना बळी पडू नये. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्याथ्यांनी त्यांचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) व उत्तरपत्रिकेवरील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन व पालन करावे.

विद्याथ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये म्हणून सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) मुख्य परीक्षेच्या विद्याथ्यांची पुरवणी परीक्षा सर्वसाधारणपणे जुलै-ऑगस्ट मध्ये आयोजित करण्यात येत आहे.

हॅरी स्टाइल्स, सोनम कपूर, केट मिडलटन, रोसामुंड पाईक, केट मॉस यूके’च्या टॉप 40 बेस्ट ड्रेसमध्ये!

सोनम कपूर ही एक जागतिक फॅशन आणि लक्झरी आयकॉन आहे, सोनम ला पाश्चिमात्य लोक भारताची सांस्कृतिक राजदूत म्हणून संबोधतात. तिने एकटीने भारतातील फॅशनला फोकसमध्ये आणले आहे आणि सर्व प्रमुख जागतिक फॅशन आणि लक्झरी ब्रँड्ससह तिचा जबरदस्त प्रभाव  आंतरराष्ट्रीय मीडियाने वारंवार मान्य केला आहे!

काल रात्री, यूकेच्या प्रतिष्ठित मीडिया हाऊस द स्टँडर्डने सोनम कपूरला यूकेच्या टॉप ४० सर्वोत्कृष्ट ड्रेस्ड लोकांपैकी एक म्हणून गौरवले! ती यूके फॅशनमधील काही प्रतिष्ठित नावांमध्ये होती ज्यांनी मोठा जागतिक प्रभाव पाडला आहे.

सोनम, हॅरी स्टाइल्स, केट मिडलटन, रोसामुंड पाईक, केट मॉस, सिएना मिलर, बियान्का जॅगर, अलेक्सा चुंग, स्टॉर्मझी, नाओमी कॅम्पबेल, एडवर्ड एनिनफुल, स्टेला मॅककार्टनी, फोबी फिलो, अक्षता मूर्ती (व्यावसायिक आणि पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी) व्यतिरिक्त, इतरांसह टॉप 40 यादीत स्थान मिळाले!

सोनमच्या बद्दल द स्टँडर्डने लिहिले, “बॉलिवुड सेन्सेशन ही एक नॉटिंग हिल गर्ल आहे आणि कॉउचर सर्किटची आंतरराष्ट्रीय फिक्स्चर आहे – डायर आणि व्हॅलेंटिनोच्या टॉप क्लायंटपैकी एक आहे.”

अलीकडे, जागतिक फॅशन अहवालानुसार, सोनम झेंडया, काइली जेनर, केंडल जेनर, ब्लॅकपिंक, बीटीएस इत्यादी सेलिब्रिटींच्या यादीमध्ये होती ज्यांनी 2023 मध्ये लक्झरी फॅशन ब्रँडसाठी सर्वाधिक प्रभाव टाकला होता!
  कामाच्या आघाडीवर, सोनमकडे दोन मोठे प्रोजेक्ट आहेत, एक बैटल ऑफ़ बिटोरा आणि  इतर दुसऱ्या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती उपलब्ध करण्यात आलेली नाही।

Harry Styles, Sonam Kapoor, Kate Middleton, Rosamund Pike, Kate Moss in UK’s TOP 40 Best Dressed!

Sonam Kapoor is a global fashion and luxury icon, often referred by the West as the cultural ambassador of India to the world. She has single-handedly brought fashion into focus in India and her towering impact and equity with all major global fashion & luxury brands has been acknowledged by international media over and over again!

Last night, UK’s prestigious media house The Standard, hailed Sonam Kapoor as one of UK’s TOP 40 Best Dressed people! She was in the illustrious company of some of the most iconic names in UK fashion who have had a major global impact through their sartorial vision.

Apart from Sonam, Harry Styles, Kate Middleton, Rosamund Pike, Kate Moss, Sienna Miller, Bianca Jagger, Alexa Chung, Stormzy, Naomi Campbel, Edward Enninful, Stella McCartney, Phoebe Philo, Akshata Murty (businessperson and wife of Prime Minister Rishi Sunak), among others graced the TOP 40 list!

In Sonam’s citation The Standard wrote, “The Bollywood sensation is a Notting Hill girl and international fixture of the couture circuit — not to mention one of Dior and Valentino’s top clients.”

Recently, according to a global fashion report, Sonam was amongst the list of celebrities like Zendaya, Kylie Jenner, Kendall Jenner, Blackpink, BTS, etc who had the highest impact for luxury fashion brands in 2023!

The gorgeous actress is the last word in fashion in India as she impacts pop culture significantly through her fashion and style.

On the work front, Sonam is gearing up for two tent pole projects, details of which are under wraps. She also has Battle For Bittora.

तमन्ना  भाटिया ही 1000 कोटींचा चित्रपट देणारी पहिली अभिनेत्री होती?

 दीपिका पदुकोण किंवा नयनतारा नव्हे, तर तमन्ना भाटिया ही 1000 कोटींचा चित्रपट देणारी पहिली अभिनेत्री होती!

 1000 कोटींचा चित्रपट देणारी तमन्ना भाटिया ही पहिली अभिनेत्री होती आणि तिने SS राजामौली यांच्या उत्कृष्ट ‘बाहुबली 2’ सोबत काम केलं होत. हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि अनेक कारणांमुळे ती चर्चेत आली होती.

 या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर रु. 1,737 – रु. 1,810 कोटींची कमाई तर केली पण सोबतीने तमन्ना 1000 कोटीचा चित्रपट करणारी पहिली महिला अभिनेत्री ठरली. ५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट रिलीजच्या वेळी 250 कोटी आणि अवघ्या काही दिवसांत 1000 कोटीची लक्षणीय कमाई करणारा चित्रपट ठरला. 

प्रभास, राणा दग्गुबती आणि अनुष्का शेट्टी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या बाहुबलीने तमन्नाला इंडस्ट्रीतील अनोखं स्थान निर्माण करून दिलं आहे. बाहुबली 2 ने जवान, पठाण आणि KGF 2 सारख्या इतर उत्कृष्ट चित्रपटांना मागे टाकत भरभरून प्रतिसाद मिळवला आणि 1000 कोटी क्लबमध्ये या चित्रपटाने एंट्री मारली. 

 या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत तमन्ना ला अनोखी ओळख तर दिली पण आशयसंपन्न चित्रपटाचा ती भाग बनली. 2005 मध्ये तिच्या करिअरची सुरुवात करणारी ही अभिनेत्री नंतर अनेक चित्रपटांमध्ये दिसली आणि लस्ट स्टोरीज 2, प्लॅन ए प्लॅन बी, बबली बाउन्सर, आखरी सच, जी कारदा आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये तिचे खूप कौतुक झाले. तमन्ना भाटियाकडे आगामी काळात अनेक उत्तोत्तम प्रोजेक्ट्स आहेत जॉन अब्राहमसोबत वेदा या चित्रपटात आणि अरणामनाई 4 नावाच्या तमिळ प्रोजेक्टमध्येही दिसणार आहे.

जावा येझदी मोटारसायकल्स चा फेब्रुवारीत जयपूर आणि लखनऊ येथे मेगा सर्व्हिस कॅम्प

·         तीन दिवसीय सेवा शिबिराचे उद्दिष्ट दोन्ही शहरांमधील 2019-2020 जावा ग्राहकांना सेवा देणे हे असेल.

·         ग्राहकांना मदत करण्यासाठी, प्रमुख मूळ उपकरणे निर्माते देखील शिबिरात उपस्थित राहतील

·         पुढील काही महिन्यांत, क्लासिक-मोटारसायकल मार्की देशभरातील विविध शहरांमध्ये मेगा सेवा शिबिरांची मालिका आयोजित करेल


पुणे, 20 फेब्रुवारी, 2024: जावा येझदी मोटरसायकल्स त्यांच्या अत्यंत यशस्वी मेगा सर्व्हिस कॅम्पचा विस्तार जयपूर, राजस्थान आणि लखनौ, उत्तर प्रदेश येथे करणार आहे. केरळमधील दोन यशस्वी सेवा शिबिरानंतर, जयपूरमध्ये २३ ते २५ फेब्रुवारी आणि लखनऊमध्ये २९ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत तीन दिवसीय कार्यक्रम होतील, जे या प्रदेशांमधील 2019 आणि 2020 मॉडेल्सच्या जावा मोटारसायकल मालकांसाठी खास सेवा देतील.

850 जावा मोटारसायकलींची सेवा देणाऱ्या कोचीन आणि कालिकतमधील मागील सेवा शिबिरांच्या यशावर आधारित, ब्रँडने येत्या काही महिन्यांत अनेक शहरांमध्ये मेगा सेवा शिबिरे आयोजित करण्याची योजना आखली आहे. हा उपक्रम ग्राहकांच्या समाधानाला प्राधान्य देण्याच्या आणि मालकीचा अतुलनीय अनुभव देण्यासाठी ब्रँडची बांधिलकी अधोरेखित करतो.

जावा येझदी मोटरसायकलचे सीईओ आशिष सिंग जोशी यांनी देशभरात मेगा सेवा शिबिरांचा विस्तार करण्याबद्दल उत्साह व्यक्त केला, ते म्हणाले, “आम्ही देशभरात आमच्या मेगा सेवा शिबिरांचा आवाका वाढवण्यास रोमांचित आहोत. केरळमधील उत्कृष्ठ प्रतिसादामुळे आम्हाला आमच्याशी संलग्न होऊ शकले. मूल्यवान ग्राहक, जे आमची उत्पादने आणि प्रक्रियांना आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या शिबिरांच्या माध्यमातून आमच्या मोटरसायकलसाठी सर्वसमावेशक मालकी अनुभव प्रदान करण्याचे आमचे ध्येय आहे.”

सेवा शिबिराचा एक भाग म्हणून, 2019-2020 जावा मोटरसायकलच्या मालकांना सर्वसमावेशक वाहन आरोग्य तपासणी आणि निवडक भाग मोफत बदलण्याचा अधिकार आहे. Motul, Amaron, आणि Ceat Tyres सह प्रमुख मूळ उपकरण पुरवठादार ग्राहकांना मदत करण्यासाठी सक्रियपणे सहभागी होणार आहेत.

दीर्घकालीन ग्राहकांच्या समाधानासाठी सतत वचनबद्धतेनुसार, जावा येझदी मोटरसायकल मोटारसायकलच्या आरोग्य मूल्यमापनाच्या आधारे मोफत विस्तारित वॉरंटी देत ​​आहे. याव्यतिरिक्त, एक्सचेंज मूल्याचे मूल्यांकन करण्यासाठी त्यांच्या मोटरसायकल अपग्रेड करण्यात स्वारस्य असलेल्या मालकांसाठी एक नियुक्त झोन स्थापित केला जाईल.

जयपूर मेगा सेवा शिबिरासाठी तपशील:

स्थान: देव ऑटोटेक, #1 नीलकंठ कॉलनी, विधि नगर कॉर्नर, अजमेर रोड, जयपूर – 302021, राजस्थान

लखनौ मेगा सेवा शिबिरासाठी तपशील:

स्थान: क्रेसेन्डो मोटर एलएलपी, कुमार कोल्ड स्टोरेज, गिरीकुंज, हरदोई रोड, लखनौ – 226003

जावा येझदी मोटरसायकलच्या मालकांना त्यांचे स्लॉट जवळच्या ब्रँड डीलरशिपवर आरक्षित करण्यास प्रोत्साहित केले जाते. तुमच्या मोटारसायकलला उच्च दर्जाची काळजी मिळेल याची खात्री करण्याची संधी गमावू नका आणि ग्राहकांच्या समाधानासाठी वचनबद्धतेचा अनुभव घ्या.

‘व्हॅलेंटाइन डे’ला पुण्यात 120 जोडप्यांची हेलिकॉप्टर सफर

पुणे-यंदा व्हॅलेंटाइन्स डे ला पुण्यातील १२० जोडप्यांनी हेलिकॉप्टरने सफर करून साजरा केला. ८ मिनिटांच्या राइडमध्ये जोडप्यांनी हा दिवस संस्मरणीय केला. २५ किलोमीटर अंतराच्या या प्रवासासाठी एका जोडीला १०,००० रुपये मोजावे लागले.गेल्या ४ वर्षांत अशा पद्धतीने ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करणाऱ्यांची संख्या यंदा ४ पटीने वाढली आहे.

यंदा व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त पुण्यात हेलिकॉप्टर सेवा पुरवणाऱ्या ४ कंपन्यांच्या १६ हेलिकॉप्टरद्वारे खास राइड्सचे अायोजन केले होते. एका व्यक्तीसाठी ४९९९ तर जोडप्यासाठी ९९९९ रुपये शुल्क होते. या राइड्सना जोरदार प्रतिसाद मिळाला.

१० फेब्रुवारी ते व्हॅलेंटाइन्स डे म्हणजे १४ तारखेपर्यंत सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत राइड सुरू होत्या. बावधनच्या ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्टचे हेलिपॅड-दगडूशेठ गणपती आणि परत हेलिपॅड असा मार्ग होता. बुकिंग न करता आलेल्यांना तासभर वेटिंग करावे लागले. वेळ संपल्याने अनेकांची निराशा झाल्याचे महालक्ष्मी एव्हिएशन्सचे प्रोजेक्ट मॅनेजर सुजित शेंडकर यांनी सांगितले. मे महिन्यापासून हेलिकॉप्टरने चार धाम यात्रा सुरु होणार असून त्याची हि आता विचारणा होऊ लागली आहे . डेहराडून येथून हि यात्रा सुरु होऊन डेहराडून येथे संपते . डेहराडून पर्यंत पर्यटकांना आपल्या पसंतीच्या प्रवासी वाहनाने यावे लागते .

व्हॅलेंटाइन्स डे राईड चे पुण्यात गेल्या ५-६ वर्षांपासून आयोजन केले जाते. यंदा एकट्या महालक्ष्मी एव्हिएशनच्या ३१ राइडमध्ये १५२ जणांचा सहभाग होता. शहरात २०२१ मध्ये ३०, २०२२-६०, २०२३-८०, तर २०२४ मध्ये १२० जोडप्यांनी राइड्सचा आनंद घेतला. ४ वर्षांत ही संख्या ४ पट वाढली आहे.गेल्या वर्षी राइड घेतलेल्या मुलांनी यंदा त्यांच्या आई-वडिलांना व्हॅलेंटाइन डेला राइड घडवली. तर, अशा छोट्या राइड्सद्वारे उड्डाणाचे स्वप्न पूर्ण करत असल्याचे महालक्ष्मी एव्हिएशनचे शेंडकर यांनी सांगितले.

मंत्रिमंडळाची मागासवर्ग आयोगाच्या मसुद्याला मंजुरी, सगेसोयऱ्यांचा उल्लेख नसल्याने इकडे जरांगे आक्रमक

मराठा आरक्षणाविषयी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

मराठा आरक्षणाविषयी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आज होत आहे. मराठा आरक्षणाविषयीचा प्रस्ताव दुपारी 1 वाजता पटलावर ठेवला जाणार आहे. राज्याच्या कॅबिनेटने या अनुषंगाने मागासवर्ग आयोगाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आली आहे. हा मसुदा कोर्टातही टिकेल असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

स्वतंत्र संवर्गाचे आरक्षण नुकसान करणारे – मनोज जरांगे

जरांगे म्हणाले, ”दोन-तीन लोकांना मराठा समाजाचं वाट्टोळं करायचं आहे. यापूर्वी एसईबीसी प्रवर्गाचे आरक्षण लागू झाले. तेव्हा नोकरीसाठी मराठा तरुणांच्या निवडी झाल्या, पण नियुक्त्या झाल्या नाहीत. या पोरांच्या हातात आता पेन हवा होता, पण आज या पोरांच्या हातात आंदोलनाचं हत्यार आहे. त्यांचं वय निघून जात आहे. आताही मराठा आरक्षण टिकलं नाही तर तेच होणार. त्यापेक्षा आम्हाला ओबीसीत असणारं आमचं आरक्षण द्या. ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत, त्यांना सगेसोयऱ्यांचं आरक्षण द्या”, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. तसेच स्वतंत्र संवर्गाचे आरक्षण मराठा समाजाचे नुकसान करणारे आहे. तुम्हाला दोन-तीन लोक महत्त्वाचे आहेत की 6 करोड मराठा महत्त्वाचे आहेत, असा सवाल जरांगे-पाटील यांनी विचारला आहे.जरांगे म्हणाले, ”सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळाले नाही तर विधिमंडळात पारित होऊ घातलेल्या मराठा आरक्षण विधेयकाचा बहुतांश समाजाला कोणताही फायदा नाही. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून मराठा समाज झुंजत आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण कायद्यासाठी अधिवेशन बोलावले आहे. पण या कायद्यातंर्गत मिळालेल्या स्वतंत्र आरक्षणाचा फायदा केवळ 150 ते 200 मराठ्यांनाच मिळणार आहे”, असे ते म्हणाले.

सरकारने सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास आगामी काळात भयंकर असे मराठा आंदोलन उभे राहील. हे आंदोलन पाहून सरकारला पश्चाताप या शब्दाची व्याख्या काय असते, याची प्रचिती येईल, असा थेट इशाराच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. मराठा आरक्षणासाठी आज राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यापूर्वी सकाळीच मनोज जरांगे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

दरम्यान, ​​​​​​देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जे टिकणारे मराठा आरक्षण दिले होते त्याचप्रमाणे मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसवून देऊ, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आग्रा येथे दिली. छत्रपती संभाजीनगर येथील अजिंक्य देविगिरी प्रतिष्ठानतर्फे आग्ऱ्याच्या लाल किल्ल्यावर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

मराठा आरक्षणसाठी मंगळवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन होत असून फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले होते, हे विशेषअधिवेशनाबाबत विचारले असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ओबीसी, इतर समाजाचं आरक्षण कमी न होऊ देता, त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देऊ. कुणबी दाखले द्यायचे काम शिंदे समिती करतेय. मात्र, महत्वाचे म्हणजे जेव्हा मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण जे उच्च न्यायालयाने कायम ठेवलं आणि सुप्रीम कोर्टात ते रद्द झाले होते. मात्र आता कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्यायचा निर्णय उद्या आम्ही घेणार आहोत, असे शिंदे म्हणाले.

काही दिवसांपूर्वीच राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला होता. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या कायद्यासाठी राज्य सरकारने बोलाविलेल्या विशेष अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष आहे.

मराठा समाजाची लोकसंख्या २७ टक्के असल्याचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने दिला आहे. त्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने अडीच कोटी कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याआधारे मराठा समाजाला नोकरीत १२ टक्के आणि शिक्षणात १३ टक्के आरक्षणाची तरतूद विधेयकात करण्यात आल्याचे समजते. परंतु, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाणार आहे. परिणामी हे आरक्षण कायदेशीर कसोटीवर टिकू शकेल, यासाठी राज्य सरकार काय उपाययोजना करणार, हे पाहावे लागेल.

गटनेत्यांनाच बोलायची संधी मिळणे मान्य नाही:कायदा पास करतांना सर्वांना बोलण्याची संधी मिळाली पाहिजे , मंत्री छगन भुजबळ आक्रमक:

मराठा आरक्षणासाठी खास अधिवेशन

मुंबई- मराठा आरक्षणासाठी खास अधिवेशनात केवळ गटनेत्यांनाच बोलायची संधी असेल तर ते मी मान्य करणार नाही. कायदा मंजूर करताना सर्वांना बोलण्याचा संधी मिळायला हवी अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. तसेच कोणत्याही समितीचा अहवाल मला मान्य नसून राज्यात जातनिहाय जनगणना करावी असेही ते म्हणाले.

याविषयी बोलतांना ते म्हणाले, ”आम्ही कोणत्याही जनगणनेवर विश्वास ठेवत नाही. शुक्रे समितीचा अहवाल आम्ही नाकारतो आहे. राज्यात कोणत्या समाजाची किती संख्या आहे हे ठरवायचे असेल तर जातनिहाय जनगणना करा असे भुजबळ म्हणाले. तसेच बाठिया समितीने सांगितलं होतं मुंबईत ओबीसीच नाहीत. त्यावेळी आम्हाला भांडावं लागलं आणि सांगावं लागलं की ओबीसी आहेत. धनगर, माळी यांच्यासह ओबीसी मुंबईत आहेत असे भुजबळ म्हणाले. याशिवाय मागासवर्गीय बैठकीचा अहवाल आमच्या हाती आलेला नाही असेही भुजबळ यांनी सांगितले.

सगळं मनोज जरांगे यांचे ऐकायचे का?
याशिवाय भुजबळ यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे. ”सगळं जर का मनोज जरांगे पाटील यांचंच ऐकायचं असेल तर आणि 50 टक्केंच्या आत आरक्षण द्यायचं असेल तर मग वेगळा कायदा करायची गरज काय? सरकार कायदा करतं आहे याचा अर्थच असा की सरकार मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा सरकारचा उद्देश आहे”, असे भुजबळ म्हणाले.

”मराठा आरक्षण टिकावं यासाठीच विधेयक तयार करण्यात आले आहे. माजी न्यायमूर्तींनी यामध्ये लक्ष घातलेले आहे. त्या सगळ्यांनी अभ्यास केला असेल. सगे-सोयऱ्यांच्या संदर्भात साडेसहा लाख हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. महात्मा फुले समता परिषद, ओबीसी समाजाचे नेते आणि कार्यकर्ते यांचे अभिनंदन करतो. कारण त्यांनी हरकती गोळा केल्या आहेत. त्याचा अभ्यास करावा लागेल. दोन दिवस सुट्टी असूनही अनेक कर्मचारी काम करत होते”, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत निबे डिफेन्स एअरोस्पेसच्या नव्या उत्पादन प्रकल्पाचे उदघाटन

पुणे : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत निबे डिफेन्स एरोस्पेसच्या चाकण येथील नव्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाला भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, गणेश निबे, पोलीस उप अधीक्षक शिवाजी पवार आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य आणि देश घडविला. त्यांनी देशाचे संरक्षण कसे करावे हे कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या जयंतीदिनी संरक्षण क्षेत्रातील निर्मितीचे नवे दालन साकार होत असल्याचा आनंद आहे. पुणे जिल्हा शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान पुणे येथे ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. या भूमीतून भारतीय संरक्षण दलाला शक्तीशाली आणि आत्मनिर्भर करण्यासाठी महाराष्ट्र अग्रेसर राहील असा संकल्प करू या, असे आवाहन त्यांनी केले.

एमएसएमई उद्योगांचे संरक्षणविषयक सामग्री उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान-संरक्षण राज्यमंत्री अजय भट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित सामग्रीचे उत्पादन करणाऱ्या एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये वाढ झाली आहे, असे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी यावेळी केले.

ते म्हणाले, संरक्षण क्षेत्रातील सामग्री उत्पादनाच्या बाबतीत ‘आत्मनिर्भरता’ मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नव्या संरक्षण  सार्वजनिक उपक्रमांमुळे या क्षेत्रातील स्पर्धा वाढली असून दर्जेदार सामग्रीच्या खरेदीसाठी ते उपयुक्त ठरते आहे. पूर्वी आपण इतर देशांकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा खरेदी करत होतो मात्र आता, विविध स्वदेशी प्रकल्पांच्या विकासामुळे एचएएल, डीआरडीओ यांसारख्या संस्थांना जगभरात महत्त्व प्राप्त झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक योगदानाचे स्मरण करून श्री.भट यांनी महाराजांना अभिवादन केले.

प्रत्येक गरजेबाबत आत्मनिर्भर होण्याच्या नौदल कटिबद्ध असल्याचे सांगून ॲडमिरल आर. हरी कुमार म्हणाले, भारतीय नौदल स्वावलंबी होण्याच्यादृष्टीने सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये प्रगती करत आहे. वर्ष २०४७ पर्यंत नौदलाने आत्मनिर्भर होण्याचे उद्दिष्ट साध्य केलेले असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी  उद्योगांनी विशेषतः एमएसएमई उद्योगांनी पुढे  यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

श्री.निबे यांनी प्रास्ताविकात नव्या प्रकल्पाविषयी माहिती दिली. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारे राज्य असून शासनाच्या सहकार्याने डिफेन्स एक्स्पोचे आयोजन करण्यात येत आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात निबे डिफेन्स प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
००००

हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ ची जल्लोषात सांगता

तीन दिवसीय महोत्सवाला राज्य आणि देशभरातील पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध वारशाची साक्ष देणारा ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’ थाटामाटात पार पडला. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय महोत्सवाला राज्य आणि देशभरातून २५ हजार पेक्षा जास्त पर्यटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ वी जयंती निमित्त या महोत्सवाची सुरुवात १७ फेब्रुवारी रोजी संस्कृती आणि इतिहासाचे केंद्र बनलेल्या जुन्नर शहरात झाला. उद्घाटनाचा दिवस किल्ले शिवनेरी येथे महादुर्ग फोर्ट वॉक यासोबत ॲडवेंचर झोन आणि झिपलाईन एरिना मधील साहसी प्रात्यक्षिके, ऐतिहासिक वारसा दाखवून देणारा किल्ले जुन्नर येथील हेरिटेज वॉक, बुट्टे पाटील मैदानात वसलेल्या फूड डिस्ट्रिक्ट मधील मन तृप्त करणारा असा खाद्य महोत्सव, साहस आणि आराम यांचा संगम साधणारा टेन्ट सिटी आणि वॉटर स्पोर्ट्स तसेच बुट्टे पाटील मैदानातील सभास्थळी होत असलेले सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विशेष ठरला.

शाहीर सुरेश जाधव यांची पोवाडा स्वरूपातील ‘शिवमहावंदना’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची चरित्र गाथा असलेले आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य ‘जाणता राजा’ चे आयोजन सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.

दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीदेखील महोत्सवात महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीची साक्ष देणारे विविध उपक्रम आणि सादरीकरण पहायला मिळाले. उत्साहवर्धक मॅरेथॉन स्पर्धा, ॲडवेंचर झोन मधील प्रात्यक्षिके, मनमोहक हेरिटेज वॉक आणि विस्मयकारक सांस्कृतिक सादरीकरणांचा आस्वाद उपस्थित पर्यटकांना घेता आला. महोत्सवाचा प्रत्येक दिवस हा अविस्मरणीय आणि रोमांचक असा सोहळाच ठरला. यात भर पडली ती पाहुणे आणि पर्यटक यांना वेगळा अनुभव देणाऱ्या कृषी पर्यटनाची.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरवीला साजेशी मानवंदना देत १९ फेब्रुवारी रोजी या महोत्सवाची सांगता झाली. दिवसाची सुरुवात किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याने झाली. यानंतर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची अनुभूती देणारे हेरिटेज वॉक आणि साहसी प्रत्यक्षिके पर्यटकांना अनुभवायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा कथन करणारी महाशिव आरती आणि शिव सह्याद्रीद्वारा प्रस्तुत ‘शिवशंभु शौर्य गाथा’ हे कार्यक्रम सांगता सोहळ्याचे आकर्षण बिंदू ठरले.

या कार्यक्रमाला विघ्नहर साखर कारखाना जुन्नर आंबेगावचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य आशाताई बुचके, माजी सभापती संजय काळे, उपसभापती प्रकाश ताजणे, माजी नगराध्यक्ष जुन्नर नगरपरिषद शामराव पांडे, उपनगराध्यक्ष दिनेश परदेशी, पर्यटन संचालक डॉ. बी एन पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपाधीक्षक रवींद्र चौदर, पुणे विभागाच्या पर्यटन उपसंचालक शमा पवार ढोक, तहसीलदार जुन्नर रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी हेमंत गरिबे, पुरातत्त्व विभागाचे बाबासाहेब जंगले इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.हिंदवी स्वराज्य महोत्सवामध्ये सहकार्य केल्याबद्दल विविध संस्था व मान्यवरांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

पर्यटन मंत्री गिरीष महाजन– हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ ला मिळालेला दणदणीत प्रतिसाद राज्याची वैभवशाली सांस्कृतिक परंपरा आधोरेखित करणारा ठरला आहे. ‌ शासन आपली साहित्य आणि संस्कृती जपण्यासाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी ठरत असल्याचा हा पुरावा आहे.

पर्यटन सचिव जयश्री भोज
हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ हा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाचे प्रदर्शन करणारा सोहळा ठरला. सर्व उपस्थित मान्यवर व पर्यटक, आयोजक, व्यवस्थापक आणि स्वयंसेवक यांनी या महोत्सवात अत्यंत चांगला सहभाग घेतला. पर्यटन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाला सर्वांनी दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल आभार मानते आणि भविष्यातही अशाच उत्स्फूर्त प्रतिसादाची आशा आहे. सर्व सर्व लोकप्रतिनिधी,स्थानिक प्रशासन आणि नागरिक पर्यटन प्रेमी या सर्वांचे आभार.

पर्यटन संचालक डॉ. बी. एन.पाटील- हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ हा महोत्सव अविस्मरणीय बनवण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. भविष्यातही पर्यटन विभागामार्फत या ठिकाणी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतील. या महोत्सवासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषद पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण,पुणे विभागाच्या पर्यटन उपसंचालक शमा पवार ढोक आणि स्थानिक प्रशासन सर्व नागरिक, पर्यटन महोत्सवासाठी सर्व प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मंडळींचा लाभलेला प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.


आमदार नितेश राणेवर कारवाई करण्याची धमक महाराष्ट्र पोलिसांमध्ये नाही का? : अतुल लोंढे

नितेश राणेची चिथावणीखोर भाषा भाजपा व फडणवीस यांना मान्य आहे का?

दोन कवडीच्या गुंडाछाप आमदारावर कारवाई करताना शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या हाताला लकवा मारतो का?

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून फेल,कायदा व पोलिसांच्या लाठ्या फक्त विरोधकांसाठीच.

नितेश राणेंवर कारवाई करण्याची हिम्मत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा.

मुंबई, दि. १९ फेब्रुवारी

कटकारस्थान करून महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेले असंवैधानिक खोके सरकारच्या काळात सत्ताधारी आमदार, खासदारांची गुंडगिरी वाढली आहे. भारतीय जनता पक्षाचा आमदार नितेश राणे राजरोसपणे धमक्या देत आहे, हातपाय तोडू, डोळे काढू, अशी भाषा करतो, चिथावणीखोर भाषण देतो, आपला बॉस ‘सागर’ बंगल्यावर बसला आहे, पोलीस आपले काहीच वाकडं करु शकत नाहीत, असे थेट पोलिसांना आव्हान देतो. महाराष्ट्र पोलिसांमध्ये नितेश राणेवर कारवाई करण्याची धमक नाही का? असा संतप्त सवाल करून राणेंवर कारवाई करण्याची हिम्मत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

भाजपा सरकारचा समाचार घेत अतुल लोंढे पुढे म्हणाले की, आमदार नितेश राणेंची भाषा अत्यंत खालच्या दर्जाची आहे. आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे, असे म्हणूनही सागर बंगल्यावरचा हा बॉस कान, डोळे बंद करुन कुंभकर्णी झोप घेत आहे हे दिसते. सोलापुरच्या सभेत या आमदार नितेश राणेनी भडकाऊ भाषण दिले म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला पण कारवाई काहीच झाली नाही. अकोल्यातील सभेतही आमदार नितेश राणेनी गरळ ओकली. “पोलीस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत, व्हिडिओ काढतील आणि स्वतःच्या बायकोला दाखवतील, मी येथे आलो तर तुम्हाला कायदा सुव्यवस्था सांभाळणे मुश्कील होईल.” ही भाषा महिलांचा अपमान करणारी व थेट पोलिसांना आव्हान देणारी आहे. भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नितेश राणेची ही भाषा मान्य आहे का? सत्ताधारी आमदार हे काय कायद्यापेक्षा मोठे आहेत का? या गुंडाछाप दोन कवडीच्या आमदारावर कारवाई करताना शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्या हाताला लकवा मारतो का? आमदार नितेश राणेच्या भाषणावर भाजपाने भूमिका स्पष्ट करावी व त्यांना आवार घालण्याची हिम्मत दाखवावी.

भडकाऊ भाषण देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मा. सुप्रीम कोर्टाने दिले आहेत परंतु भाजपाच्या राज्यात कायदा तर धाब्यावर बसवला आहेच पण कोर्टालाही ते जुमानत नाहीत, हा सत्तेचा माज आहे. आमदार नितेश राणेवर कारवाई करु नये म्हणून पोलिसांवर दबाव आहे हे आम्हाला माहित आहे मग पोलिसांच्या लाठ्या व कायदा हा फक्त विरोधकांवर का उगारता? कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही हे पोलिसांनी लक्षात घ्यावे. सरकार येतात व जातात परंतु पोलीस व प्रशासन यांनी त्यांचे कर्तव्य चोख बजावले पाहिजे. “म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो” हे सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाने लक्षात ठेवावे, असेही अतुल लोंढे म्हणाले.

एमएसएमई उद्योगांनी संरक्षणविषयक सामग्री उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे – केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांचे प्रतिपादन

0

पुणे, 19 फेब्रुवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित सामग्रीचे उत्पादन करणाऱ्या एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये वाढ झाली आहे, असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी आज सांगितले.

संरक्षण क्षेत्रातील सामग्री उत्पादनाच्या बाबतीत ‘आत्मनिर्भरता’ मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असे सांगून ते म्हणाले की, नव्या  संरक्षण  सार्वजनिक उपक्रमांमुळे या क्षेत्रातील स्पर्धा वाढली असून दर्जेदार सामग्रीच्या खरेदीसाठी ते उपयुक्त ठरते आहे. 

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांनी आज पुणे येथे निबे  लिमिटेड या एमएसएमई उद्योगाच्या नव्या प्लांटचे उद्घाटन केले. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत,नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

देशाच्या संरक्षण क्षेत्रात घडून आलेल्या बदलांची  चर्चा करताना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री म्हणाले की पूर्वी आपण इतर देशांकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा खरेदी करत होतो मात्र आता, विविध स्वदेशी प्रकल्पांच्या विकासामुळे एचएएल, डीआरडीओ यांसारख्या संस्थांना जगभरात महत्त्व प्राप्त झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक योगदानाचे स्मरण करून राज्यमंत्र्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रात निबे कंपनीने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्य सरकार 24 ते 26 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पुणे येथे एमएसएमई संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करीत  आहे. संरक्षण क्षेत्रातील  इतर आस्थापनांसोबत या प्रदर्शनात खासगी क्षेत्रातील प्रमुख कंपन्या देखील सहभागी होणार आहेत असे ते म्हणाले.

प्रत्येक गरजेबाबत आत्मनिर्भर होण्याच्या नौदलाच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करत अॅडमिरल आर. हरी कुमार म्हणाले की भारतीय नौदल स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने त्यांच्या सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये प्रगती करत आहे. वर्ष 2027 पर्यंत नौदलाने आत्मनिर्भर होण्याचे उद्दिष्ट साध्य केलेले असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी  उद्योगांनी विशेषतः एमएसएमई उद्योगांनी पुढे  यावे असे आवाहन देखील त्यांनी केले.

 जंगलात रिक्षा थांबवून अल्पवयीन मुलाला लुटले, वानवडी परिसरातील घटना

पुणे : रिक्षातून घर जात असताना रिक्षाचालकाने त्याच्या साथीदाराच्या मदतीने अल्पवयीन प्रवासी मुलाला लुटले. हा प्रकार वानवडी इंडस्ट्रीयल एरिया मधील जंगलात शनिवारी (दि.17) सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी रिक्षाचलाकासह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी केशवनगर मुंढवा येथे राहणाऱ्या 17 वर्षीय मुलाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षाचालक अक्षय व त्याचा साथीदार प्रेम (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्याविरोधात आयपीसी 392, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण मुंढवा येथे घरी जाण्यासाठी हडपसर येथील गाडीतळ येथून आरोपी अक्षयच्या रिक्षामध्ये (एमएच 12 आर 5792) बसला. यावेळी रिक्षात अक्षयचा मित्र प्रेम याआधीच बसला होता. रिक्षा वानवडी इंडस्ट्रियल भागातील जंगलात आली असताना आरोपी अक्षय याने रिक्षा थांबवली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीचे तोंड दाबले आणि जबरदस्तीने हातातील ब्रेसलेट, मोबाईल आणि कपड्यांची सॅक जबरदस्तीने काढून घेतली. यानंतर त्याला तिथेच जंगलात सोडून आरोपींनी पळ काढल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

बारा वर्षाच्या मुलाचे अपहरण करून ७० लाखाची मागितली खंडणी,पोलिसांनी सहा तासांत मुलाची केली सुटका पण … दक्षिण पुण्यातील गुन्हेगारी

पुणे -बारा वर्षाच्या मुलाचे कात्रज येथून अपहरण करून ७० लाखाची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल होताच पुणे पोलिसांनी वेगाने केलेल्या हालचालीमुळे सहा तासांचे आत मुलाची सुखरुप सुटका झाली मात्र अपहरण करणारे गुन्हेगार पोलिसांच्या हातून निसटले .
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एका बारा वर्षाच्या मुलाचे भिलारवाडी कात्रज पुणे येथुन आरोपी राजेश सुरेश शेलार याने त्याचे चारचाकी गाडीमधुन दिनांक १८/०२/२०२४ रोजी सांयकाळीचे सुमारास घेवुन जावुन अपहरण करुन मुलाला सोडण्याच्या बदल्यात ७० लाख रुपयांची पैशाची मागणी केली. तसेच पोलीसांत तक्रार केली तर मुलाचे जीवीताची बरे वाईट करणची धमकी दिली. मुलाच्या पित्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरुन ताकाळ भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु र नं १५६/२०२४ भादवि कलम ३६४(अ), ३८७,५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आणि
घटनेचे गांभिर्य पाहुन पोलीस उप आयुक्त, परि २, पुणे शहर, पोलीस उप आयुक्त, गुन्हे , सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग यांनी घटनास्थळी भेट देवुन मुलाची सुखरुप सुटका व आरोपीचा शोध होणेबाबत मार्गदर्शन करुन दिलेल्या सुचनांप्रमाणे लागलीच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन यांनी तीन वेगवेगळी तपास पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषणावरुन प्राप्त माहीतीचे आधारे आरोपीबाबत मिळालेल्या माहीतीनुसार सातारा दिशेने सदरची पथके रवाना करुन यातील अपहरण झालेल्या मुलाचा व आरोपींचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणाचे आधारावरुन आरोपी हे अपह्त मुलास घेवुन पाटेघर, ता. जि. सातारा येथील डोंगरामध्ये लपले आहेत अशी माहीती मिळाल्याने लागलीच भारती विद्यापीठ पोलीस व गुन्हे शाखा युनिट २ चे पथकांनी स्थानिक सातारा एल.सी.बी कडील अरुण देवकर व त्यांचा पोलीस स्टाफ याचे मदतीने संपुर्ण डोंगर परीसर पिंजुन काढत असताना आरोपींना पोलीस आल्याची चाहुल लागल्याने त्यांनी अपह्त मुलांस डोंगरातच सोडून अंधारामध्ये पळुन गेले. पोलिसांनी लागलीच मुलाला सुखरुप ताब्यात घेतले. पोलीसांनी एका रात्रीत तपास करुन एक लहान मुलाची आरोपीकडुन सुखरुप सुटका करुन लहान मुलाचे प्राण वाचविले आहे. आरोपी फरार असुन त्याचा पोलीस पथके शोध घेत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त, अमितेश कुमार,पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग,प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ स्मार्तना पाटील , पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा, , अमोल झेंडे, ,सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती नंदीनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगल मोडवे, सहा. पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, आणि गुन्हे शाखा, युनिट २, पुणे शहरचे श्री अमोल रसाळ व त्यांचे कडील पोलीस स्टाफ व सातारा स्थानिक गुन्हे शाखा कडील पोलीस निरीक्षक श्री. अरुण देवकर व त्यांचेकडील पोलीस स्टाफ यांनी केली आहे.