मुंबई, १९ फेब्रुवारी २०२४: भारतातील स्मॉल कमर्शियल व्हेइकल्स (SCVs) (छोटी व्यावसायिक वाहने) च्या बाजारपेठेतील अग्रणी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (M&M) ने बोलेरो MaXX पिक-अप रेंजचा नवीन प्रकार सादर करत असल्याची घोषणा अभिमानाने केली. एअर कंडिशनिंगचा समावेश आणि iMaxx ॲपवर 14 नवीन वैशिष्ट्ये या नव्या गोष्टींची भर घालून ग्राहकांना वाढीव सोयीसुविधा देण्याचा उद्देश आहे.
आपल्या कॉम्पॅक्ट आणि अष्टपैलू डिझाइनद्वारे वैशिष्ट्यीकृत बोलेरो MaXX पिक-अप रेंजने पेलोड क्षमता, इंधन कार्यक्षमता, सुरक्षितता आणि एकूण ड्रायव्हिंग अनुभव यामध्ये अभूतपूर्व मानके सेट केली आहेत. ही गाडी सादर झाल्यापासूनच बोलेरो MaXX रेंजने महत्त्वपूर्ण टप्पे नोंदवले आहेत. व्यावसायिक लोड विभागात विक्रमी वेळेत १ लाख उत्पादनाचा टप्पा गाठताना १.४ लाख हून अधिक युनिट्सची विक्री करत एक नवीन मापदंड प्रस्थापित केला आहे. जोडीला, एकाच दिवसात सर्वाधिक युनिट्सची विक्री करून प्रतिष्ठित इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये उल्लेखनीय स्थान मिळवले आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नलिनीकांत गोल्लागुंटा म्हणाले, “असाधारण कामगिरी आणि अष्टपैलुत्व यासाठी प्रसिद्ध असलेल्या बोलेरो MaXX पिक-अप रेंजने आमच्या मौल्यवान ग्राहकांकडून प्रचंड प्रशंसा मिळवली आहे. तिची मजबूत बांधणी, प्रभावी पेलोड क्षमता आणि अतुलनीय विश्वासार्हता यांनी बोलेरो MaXX पिक-अपला व्यवसाय आणि वैयक्तिक पातळीवर एक विश्वासू साथीदार बनवले आहे. नवीन प्रकारांमध्ये एअर कंडिशनिंगची जोड म्हणजे ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या आमच्या बांधिलकीची पुष्टी करत त्यांच्या सोय आणि आरामासाठी सुरू असलेल्या आमच्या प्रयत्नांची पुष्टी आहे.”
कामगिरी आणि आराम
डिझेल आणि CNG पर्याय सादर करणाऱ्या महिंद्राच्या प्रगत m2Di इंजिनद्वारे समर्थित बोलेरो MaXX पिक-अप रेंज 52.2kW/200Nm ते 59.7kW/220Nm पर्यंत पॉवर आणि टॉर्क नोड्ससह जबरदस्त डिझाइन सादर करते. पेलोड क्षमता 1.3t ते 2t पर्यंत असून 3050 mm पर्यंत कार्गो बेडची लांबी आहे. या गोष्टी मालवाहतुकीसाठी अतुलनीय क्षमता सुनिश्चित करतात. CMVR-प्रमाणित D+2 आसन, उंची-ॲडजस्ट करता येणारी ड्रायव्हर सीट, टर्न-सेफ लॅम्प आणि शहर आणि महामार्ग दोन्हीवर चालवण्यासाठी योग्य रीडिझाइन केलेले अंतर्गत आणि बाह्य भाग यासारख्या वैशिष्ट्यांनी युक्त, बोलेरो MaXX पिक-अप रेंज आराम आणि कार्यक्षमतेला प्राधान्य देते. सर्व प्रवासादरम्यान अधिकाधिक आराम मिळवून देत हीटर आणि डेमिस्टरसह समग्र एअर कंडिशनिंगचा समावेश केल्याने ड्रायव्हिंगचा अनुभव आणखी उंचावतो. एसीच्या सुविधेसह शहराच्या रहदारीतून प्रवास करणे किंवा महामार्गावरुन जाणे हा आनंददायी अनुभव ठरतो. त्यामुळे बोलेरो MaXX पिक-अप रेंज अधिक आरामशीर प्रवास हवा असलेल्या ग्राहकांसाठी आदर्श पर्याय बनते.
वैशिष्ट्ये आणि iMAXX
बोलेरो MaXX च्या सुरुवातीच्या सादरीकरणानंतर नवीनतम iMAXX अपडेट वाहन व्यवस्थापन प्रणालीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी १४ नवीन वैशिष्ट्ये सादर करते. महत्त्वाच्या सुधारणामध्ये निश्चित पोहोच साठी जिओफेन्स-आधारित मोहीम आणि सुव्यवस्थित कार्यवाहीसाठी ड्रायव्हर कम ओनर वैशिष्ट्य समाविष्ट आहे. जोडीला माय MaXX स्कोअर ड्रायव्हर्ससाठी मौल्यवान कामगिरीची माहिती देते, तर फ्लीट व्यवस्थापक समर्पित प्रोफाइलद्वारे सुधारित नियंत्रण मिळवतात.
शिवाय, सिस्टीममधील नवीन अॅलर्ट वाहनांची सुरक्षा आणि कार्यक्षमता या दोन्हींना प्राधान्य देतात. त्यामध्ये जोरदार अॅक्सीलरेशन, अचानक ब्रेक लावणे, तीक्ष्ण कॉर्नरिंग आणि इंधन चोरी शोधणे या सूचनांचा समावेश आहे. या वैशिष्ट्यांमुळे केवळ सुरक्षितता वाढत नाही तर देखभाल खर्च कमी होतो आणि एकूण कार्यक्षमता सुधारते.
जोडीला iMAXX वैशिष्ट्याने 30,000 हून अधिक iMAXX वाहने तैनात करून बाजारपेठेवर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. फास्टॅग इंटिग्रेशन आणि खर्च व्यवस्थापन यांसारखी सतत अपडेट्स, वापरकर्त्यांचा सहभाग वाढवतात आणि ॲपचा दीर्घकाळ वापर करतात. त्यामुळे फ्लीट व्यवस्थापनासाठी आवश्यक साधन म्हणून त्याचे स्थान आणखी मजबूत होते.
किंमतीचे तपशील (एक्स-शोरूम) खालीलप्रमाणे:
City | HD | |||||
1.3 | 1.4/1.5 | 1.3 | 1.7 | 1.7L | 2.0L | |
SXi | 8.49 | – | – | – | 10.40 | – |
VXi | 8.62 | 8.92 | 10.27 | 10.33 | – | 11.22 |